Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिंहस्थ निधी त्वरित द्या

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कार्यरत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी केली. शहर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी हजर होते.

‘मान्सूनपूर्व’चा तडाखा

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर त्र्यंबकला वीज पडून दोन जण ठार आणि दोघे जखमी झाले. याच काळात विजेचा खेळखंडोबा झाल्याने संपूर्ण जिल्हावासीय प्रचंड त्रस्त झाले होते.

आम्ही कुठलेच नाह‌ी

$
0
0
संत सूरदास आणि संत कबीर यांच्या रचनांवर आधारीत मैफलीची सर्वांनाच ओढ लागली होती. मैफलीला सुरुवात होणारच होती. मंचावर गायक, वादक, निरुपणकार आणि समोर दर्दी रसिकांची मांदियाळी असा मेळ कुर्तकोटी शंकराचार्य न्यासात जुळून आला होता.

नाशिक-पुणे वाहतूक होणार वेगवान

$
0
0
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवरानदीवर असलेल्या जुन्या पुलास नवीन समांतर जोडपुलाचे काम पूर्णत्वास येत असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी संगमनेर बाह्यवळण हा विना टोल ९ किमीचा रस्ता मंजूर झाला आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; चौघे ताब्यात

$
0
0
लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कोळगाव येथे एका अल्पवयीन मुलीला मारहाण करत तिचा विनयभंग करून अपहरण करण्यात आल्याच्या आरोपावरून लासलगाव पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एपीआय शशिकांत चव्हाण यांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

गोपीनाथ मुंडेंबाबत भाजपची स्टंटबाजी

$
0
0
भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कृषी खाते देण्याबाबत राजनाथसिंह यांनी जाहीर सभेत केलेली घोषणा ही एक राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वरला ‌सिंहस्थाच्या नियोजनाचे वाजले बारा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर येवून ठेपला असताना जिल्हा प्रशासनाचा त्र्यंबकेश्वर येथील साधू महंतांशी संपर्क तुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघे १३ महिने हाती असतांना पूर्वनियोजनाचे बारा वाजले आहेत. याबाबत येथील साधू महंतांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपळगावात शेड कोसळले

$
0
0
शहर व परिसरात दुपारी चार वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे नाफेड परिसरात पत्र्याचे शेड उडाले. तसेच परिसरातीले अनेक कांद्यांचे शेड कोसळले.

सटाणा, मालेगावात जोरदार पाऊस

$
0
0
सलग दुसऱ्या दिवशीही सटाणा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. वादळामुळे दोनशेच्यावर घरावरील पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक भागात कांद्याचेही अतोनात नुकसान झाले.

लेखानगरचा भूखंड बनला अवैध पार्किंगचा अड्डा

$
0
0
सिडकोतील लेखानगरच्या मोकळ्या भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पार्किंग होत आहे. बाराही महिने या ठिकाणी वाळूच्या गाड्यांचा मुक्काम असतो. या गाड्यांतील वाळू तेथे सर्रासपणे ओतली जाते आणि तेथेच तिची विक्री केली जाते. या अवैध व्यवसावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

वृक्ष याचिका निकाली

$
0
0
नाशिक शहरातील झाडांची सुरू असलेली तोड, वृक्ष प्राधिकरण समितीचे कामकाज, शहरातील वृक्षांची गणना याप्रश्नी दाखल करण्यात आलेली याचिका पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने निकाली काढली आहे. यापूर्वीच हा विषय मुंबई हाय कोर्टाने हाताळल्याने याचिकाकर्त्यांना हाय कोर्टात म्हणणे मांडण्यास ट्रिब्युनलने सांगितले आहे.

सव्वाशे झाडांची बेकायदेशीर कत्तल

$
0
0
त‌िडके कॉलनी ते इंद‌िरानगर जॉग‌िंग ट्रॅक या रस्त्यावर सुमारे १३० वृक्षांची बेकायदेशील कत्तल करण्यात आल्याची तक्रार आम आदमी पार्टीने महापाल‌िकेकडे केली आहे. या प्रश्नी दुर्लक्ष करणाऱ्या महापाल‌िकेचे कर्मचारी आण‌ि अध‌िकारी वर्गावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मनपा आयुक्तांकडे न‌िवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

बत्ती गूल, नागरिक बेहाल!

$
0
0
मान्सून पूर्व पावसाने शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडीत झाला. वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला तरी फोल ठरल्याचे दिसून आले.

दिंडोरी विधानसभेसाठी मनसेची मोर्चेबांधणी

$
0
0
लोकसभा निवडणुकीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील झालेल्या मतदानाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांना धोक्याची घंटा देत आत्मपरीक्षण करायला लावले असले, तरी अद्याप हे दोन्ही पक्ष लग्नांमध्ये अडकले असतानाच मनसेने मात्र `अब की बार राज सरकार`ची घोषणा देत दिंडोरी-पेठ विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

बचतीसाठी लावणार येवल्यात एलईडी दिवे

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर बुधवारी येवला नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विषय पटलावरील १३ विषयांना सभागृहाने मंजुरी दिली.

अपहरणाचा गुन्हा दाखल

$
0
0
डोंबिवली येथील नगरसेविकेच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी तेथील आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ना‌शिक व डोंबिवली येथील एकूण तीन नगरसेवकांवर इंदिरानगर पो‌लिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी हा अपहरणाचा प्रकार घडल्याचे नगरसेविकेने फिर्यादीत म्हटले आहे.

इगतपुरी, घोटीत गारपीट

$
0
0
इगतपुरी, घोटीमध्ये रेल्वे परिसरात वादळी वाऱ्याचा व गारांसह जोरदार वादळी पावसामुळे रेल्वेची ओवरहेड वायर (वैची) तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या व नाशिककडे येणाऱ्या रेल्वे गाड्या दीड ते दोन तास खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले.

नाशिककरांची दुसऱ्या दिवशीही दैना

$
0
0
नाशिक शहर व परिसराला बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसाने झोडपले. दुपारी अचानक आलेला सोसाट्याचा वारा, सोबत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांमुळे नाशिककरांची पुरती दैना उडाली. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. मान्सूनपूर्व पावसामुळे चाकरमानी आणि विक्रेत्यांचीही चांगलीच धावपळ होताना दिसली.

पित्याचा मुलीवर बलात्कार

$
0
0
भद्रकाली परिसरात पित्यानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा ‌पिता सुशिक्षित असून एका बांधकाम साईटवर सुपरवायझर आहे. न्यायालयाने त्याला ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्यास नकार

$
0
0
नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याची गरज नाही, असा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाने बुधवारी दिला. यामुळे मराठवाड्याला इतक्यात तरी पाणी मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयाचे गोदावरी, मुळा, प्रवरा या खोऱ्यातील शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images