Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टोल दरवाढ तूर्तास लांबणीवर

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीसाठी देण्यात येणा-या बंदोबस्ताचे कारण देत टोल नाक्याला पोलिस संरक्षण देण्यास पोलिस यंत्रणेने असमर्थता दाखविल्याने हतबल झालेल्या टोल प्रशासनाने सोमवार (ता. १२) पासून पिंपळगाव बसवंत येथील बहुचर्चित व वादग्रस्त टोलनाक्यावरील प्रस्तावित टोल दरवाढ तूर्तास तरी रद्द केली आहे.

विमा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

$
0
0
म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोडशिक्षण, महसूल, एलआयसी, बँक या विभागांनी समन्वय साधून आम आदमी विमा योजनेचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहचवावा, अशी सूचना विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी आज येथे केली.

संशोधनाची सुरुवात Phd नंतर...

$
0
0
संशोधनाची खरी सुरुवात पीएचडीनंतर सुरू होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. अतुल श्रीवास्तव यांनी आज येथे केले. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे पंचवटी कॉलेज ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट आणि पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे आजपासून वाणिज्य प्राध्यापकांसाठी आठ दिवसांचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू झाला.

रस्ते अपघातात दोघे ठार

$
0
0
मुंबई- आग्रा महामार्गावर घोटी येथील टोल नाक्याजवळ रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या ट्रकने पुढे असलेल्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात इगतपुरी तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब रायकर (वय ५६) जागीच ठार झाले

दोन वर्षांत ५०० बालकांचा घरातच जन्म

$
0
0
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वैद्यकीय सुविधा चांगल्या आहेत. त्यातच जन्मदराचे प्रमाण वाढावे म्हणून सरकारने अनेक सवलतीही जाहीर केल्या आहेत. या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्ची होत असताना ना​शिक शहरात मात्र वर्षाकाठी २५० बाळंतपणे असुरक्षित म्हणजे घरातच होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

उमेदवारांचा खर्च ५० लाखांच्या आतच?

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची रक्कम ४० लाखांवरून ७० लाख करण्यात आली असली तरी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च ५० लाखांच्या आतच राहण्याची दाट शक्यता आहे. आजवर या उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चातूनच ही बाब स्पष्ट होत आहे.

नगरसेवकपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

$
0
0
लोकसभा निवडणुकीमुळे रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी पुढील महिन्याच्या अखेरीस पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

प्रवासी संकटात

$
0
0
नाशिकरोड एसटी स्थानकात बस नेणे आणि बाहेर काढणे एसटी चालकांसाठी आव्हान ठरले आहे. नाशिकरोड एसटी स्थानक रेल्वे स्थानकाला जोडूनच असल्याने रेल्वे आणि बसप्रवाशांची प्रचंड गर्दी येथे असते. या गर्दीतून वाट काढणे एसटी चालकांसाठी कठीण होत आहे.

सिंहस्थासाठी मॉकड्रील

$
0
0
अलाहाबाद येथे गेल्यावर्षी तर नाशकात मागच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली असून आपत्ती व्यवस्थापनासाठी तातडीने मॉक ड्रील घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

कोर्टातली कस्टडी

$
0
0
कोर्टाच्या आवारात आरोपींनी कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी आता पोलिसांनीच खबरदारी घेण्याचे ठरविले आहे. आरोपींचा त्यांच्या नातलगांशी संपर्कच होऊ नये यासाठी त्यांना कोर्टातही एका विशिष्ट कस्टडीत ठेवण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून तयार केला जात आहे.

परदेशी महिलेचा कोर्टात गोंधळ

$
0
0
व्हिसाची मुदत संपुनही भारतात बेकायदेशीर रित्या वास्तव्यास असलेल्या पोलंडच्या महिलेला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. व्हिसाची मुदत वाढवून मिळावी, आपल्याला ब्लॅकलिस्टमधून वगळावे यांसह अनेक मागण्यांसाठी तिने कोर्टाच्या आवारात ‘हेल्प मी, हेल्प मी’ असे ओरडत मदतीसाठी याचना केली.

राकेश कोष्टीला अटक

$
0
0
वर्षभरापुर्वी झालेल्या मोहन चांगले खूनप्रकरणातील आणखी एका फरारी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली. या प्रकरणातील तीन अन्य आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सूनावण्यात आली.

मराठी शाळांना घरपट्टी माफ?

$
0
0
अनुदानित विशेषतः मराठी शाळांचा यामुळे आर्थिक डोलारा कोसाळण्याची शक्यता असून अशा शाळांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव लवकरच महासभेत मांडला जाणार आहे.

सुपरपेसर राकेश पवार

$
0
0
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसोबत मुंबईनंतर नाशिक येथे पार पडलेल्या सुपरपेसर टॅलेंट हंटमध्ये नाशिक विभागातून धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या राकेश पवारने ताशी १२५ किमी वेगाने गोलंदाजी करीत नाशिकचा सुपरपेसर होण्याचा बहुमान पटकावला.

भावाकडून बहिणीवर बलात्कार

$
0
0
भावा-बहिणीच्या नात्याचा अपमान करणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना नाशिकमध्ये घडला आहे. बिगारी काम करणा-या भावाने आपल्या काका आणि दोन मित्रांसह सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे.

मैफलीत वाचन

$
0
0
मे महिन्याची सुटी असल्याने शहरातील सांस्कृतिक वातावरण चांगलंच रंगलंय. जागोजागी व्याख्यानमाला होत असून त्याला रसिकांचा भरभरुन प्रतिसादही मिळत आहे. अनेक ठिकाणी मातब्बर वक्ते असल्याने रसिकांना ‘किती घेऊ आणि किती नको’ असे होऊन जातंय.

जप्तीला विरोध

$
0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरळीत चालण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू असताना एमएससी (राज्य सहकारी बँक) बँकेने जप्तीची नोटीस बजावली आहे. दि. १५ मे रोजी जप्तीची कारवाई होणार असून त्याला विरोध करण्यासाठी सभासद, कामगार निदर्शने करणार

हरणबारीमधून आज आवर्तन

$
0
0
बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणातून आज (दि. १४) सकाळी ७ वाजता मोसमनदी पात्रात पिण्यासाठी अखरेचे रोटेशन सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे सुमारे ८० टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.

चोरीचा प्रयत्न

$
0
0
मनमाड-चांदवड रस्त्यावरील मार्केट यार्डातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाल्याने बँका व पतसंस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरटीओ अधिकाऱ्याला मालेगावात मारहाण

$
0
0
आरटीओ कार्यालयात काम करण्याच्या कारणावरून वादविवाद होऊन एका ड्रायव्हिंग स्कूल संचालकाने परिवहन अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images