Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांचा रास्तारोको

$
0
0
चुकीच्या पंचनाम्यांच्या निषेधार्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी राजापूर येथे येवला-नांदगाव महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन पंचनाम्यांची शहानिशा केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार मंडलिक यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

धुळ्यात मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त अन् व्यवस्था

$
0
0
येत्या १६ मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे गर्व्हमेन्ट मेडिकल कॉलेजमध्ये होणार आहे. सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीसाठी ८४ टेबल ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

नाशिकच्या फुलांचा धुळ्यात सुगंध

$
0
0
मोगरा, झेंडू, गुलाब, निशिगंधा, लिली अशा फुलांनी सध्या नाशिकसह धुळे शहरातील फुलबाजाराला बहर आला आहे. लग्नसराई असल्यामुळे या व्यवसायात दररोज हजारोंची उलाढाल होत आहे. अनेक हातांना रोजगार मिळाला आहे.

...अखेर झाडाने स्वतःच देह ठेवला

$
0
0
देवळाली कॅम्प येथील आठवडे बाजारातील वडाचे मोठे झाड मंगळवारी उन्मळून पडले. यामध्ये जीवितहानी झाली नाही. आठवडे बाजार नसल्याने दुर्घटना टळली.

रस्ते अजूनही दुर्लक्षित

$
0
0
अपघातांना निमंत्रण ठरणारे त्रिमूर्ती चौक व तेथील रस्त्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. परंतु अजूनही येथील वाहतूक सुलभ होण्यासाठी प्रशासनाने पावले उचललेली नाहीत.

यंदा अकरावी ऑनलाइन?

$
0
0
शताब्दी महोत्सवांतर्गत मराठा व‌िद्या प्रसारक संस्थेच्या वतीने व‌िव‌िध उपक्रमांच्या सोबतीनेच नव्या सुव‌िधा पुरव‌िण्यावरही भर देण्यात येत आहे. या संकल्पनेंतर्गतच यंदाच्या शैक्षण‌िक वर्षापासून अकरावीची‌ प्रवेश प्रक्र‌िया ऑनलाइन करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

सिंहस्थाचे १८० कोटी पडून

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या वर्षावर येऊन ठेपला असताना या सिंहस्थासाठी राज्य सरकारकडून प्राप्त झालेले १८० कोटी रुपये पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. कामांची प्रगती नसल्याने या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही.

आरोग्य केंद्रे सलाइनवर

$
0
0
शहरातील ५० हजार लोकसंख्येमागे एक शहरी आरोग्य केंद्रांची गरज असते. शहरातील सध्याची लोकसंख्या १५ लाखांच्या जवळपास असून यासाठी किमान ३० प्राथमिक केंद्र सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत शहरात केवळ १६ आरोग्य केंद्रे असून त्यातही कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वानवा आहे.

सहकार भारतीचे अधिवेशन

$
0
0
गेल्या ३४ वर्षांपासून सहकार क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सहकार भारती या संस्थेचे नववे प्रदेश अधिवेशन मुंबई नाक्याजवळील भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात ३१ मे व १ जून रोजी होणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि मान्सून पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा १९ मे पर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली.

क्रीडा धोरणातंर्गत १२ पदांची निर्मिती

$
0
0
महापालिकेने तयार केलेल्या क्रीडा धोरणाच्या प्रस्तावानुसार १२ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. यात क्रीडा अधिकारी, सहाय्यक क्रीडा अधिकारी, लिपिक या पदांचा समावेश आहे. संबंधीत कर्मचाऱ्यांकडे खेळ व खेळाडुंचा विकास तसेच सर्व साधन साहित्यांच्या देखभालीची जबाबदारी देण्यात येणार आहे.

विवेक पाटलांना पाठिंबा

$
0
0
अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत विद्यमान उपाध्यक्ष विवेक पाटील यांच्या नावाची सत्ताधारी एकता पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, पाटील यांच्या नावाला विरोधी गटाचे तुषार चव्हाण यांनी विरोध दर्शवला आहे.

मतमोजणीसाठी निरीक्षक दाखल

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी येत्या शुक्रवारी होणार असल्याने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक नाशकात दाखल होत आहेत. मतमोजणीच्या कामकाजाचा आढावा घेतानाच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी निरीक्षकांचा प्रयत्न राहणार आहे.

इतिहासाच्या गळ्याला नख लावू नका

$
0
0
‘महापुरूषांच्या विचारांचे गळे कापण्याची वृत्ती काही कुप्रवृत्तींमध्ये फोफावू लागली आहे. आपण इतिहासापासून प्रेरणा घेणार नसला तर किमान त्याच्या गळ्याला नख तरी लावू नका. इतिहासातून काही शिकायचे असते; त्याला टाळून आपल्याला पुढे जाता येणार नाही.’ असे मत नितीन डांगे पाटील (दहेगाव, ता. राहाता) यांनी व्यक्त केले.

नाशिक क्राइम डायरी

$
0
0
नाशिकचे गुन्हेविषयक वृत्त

सात सरकारी बाबू गजाआड

$
0
0
नाशिक विभागांतर्गत वेगवेगळया जिल्ह्यांमध्ये लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमध्ये ७ सरकारी बाबुंना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिसांसह जलसंधारण, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सात मिनिटांत वाहन परवाना

$
0
0
वाहन चालविण्याचा ‌शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी आता आठवडाभर प्रतिक्षा करण्याची गरज नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्यासाठी खास स्टॉल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून त्यामुळे अवघ्या सात मिनिटांत परवाना मिळू लागला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा!

$
0
0
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होऊ घातलेल्या सिंहस्थाच्या आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे, असेच वातावरण आहे. या सोहळ्याप्रती जिल्हा प्रशासनाला नसलेले गांभीर्य त्यास विशेषत्वाने कारणीभूत आहे.

लेटलतिफांची दुनिया!

$
0
0
कामावर उशिरा येणे हा जणू सरकारी कर्मचाऱ्यांचा जन्मसिद्ध हक्कच बनला आहे. सरकारी काम अन् बारा महिने थांब, अशी म्हण अशाच लेटलतीफ मंडळींमुळे प्रचलित झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र पावलोपावली अडवणूक होते.`मटा`ने केलेल्या स्टींग अॉपरेशनमध्ये लेटलतिफांची दुनियाच अनुभवायला मिळाली.

भावाचा बहिणीवर बलात्कार

$
0
0
कधी मारहाण करून तर ठार मारण्याची धमकी देऊन भावासह चुलता आणि अन्य दोघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीचा भाऊ फरार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images