Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बलात्कार प्रकरणी मनमाडमध्ये आणखी एका महिलेला अटक

$
0
0
नाशिक येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मनमाड येथील मनोरमा सदन या मुलींच्या अनाथ आश्रमशाळेतील माजी अधीक्षिका सुमन रणदिवे यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

चार गारपीटग्रस्त गावांसाठी निधी प्राप्त

$
0
0
तालुक्यातील अंगुलगाव, रेंडाळे, न्याहारखेडा, पांजरवाडी या चार गावांतील गारपीटग्रस्त ९४० शेतकऱ्यांना शासनाकडून मदत म्हणून ७० लाख ८४ हजार २५० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

चैत्रोत्सवासाठी सजला सप्तशृंग गड

$
0
0
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंग गडावर उद्यापासून (दि. ८) चैत्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. रामनवमी ते पौर्णिमा या कालावधीत उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवात सुमारे आठ ते दहा लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. या उत्सवाची तयारी झाली असून प्रशासनाने सुविधांचे नियोजन केले आहे.

पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन

$
0
0
जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला कराड न्यायालयात सादर करून त्याला महाराष्ट्र एक्स्प्रेसने पोलिस बंदोबस्तात जळगावकडे आणले जात होते.

साई पालख्यांनी फुलले महामार्ग

$
0
0
श्री रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे जाणाऱ्या श्री साईबाबा पायी दिंडी, पालख्या अन् सायकलयात्रांनी महामार्ग फुलले आहे. जळगाव, धुळे, नांदगाव, चाळीसगाव परिसरातून मोठ्या संख्येने पायी दिंडी पालख्या, सायकलयात्रा शिर्डीकडे श्री साईबाबा दर्शनासाठी येत असतात.

सटाणा शहरवासियांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0
सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळे पालिकेतर्फे पाणी कपातीतस सुरुवात झाली आहे. शहरवासीयांना या पुढील काळात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीटंचाईचे वाढते संकट

$
0
0
अस्मानी व सुलतानी संकटानंतर आता पाणीटंचाईची झळ ग्रामीण भागाला बसू लागली आहे. जिल्ह्यात सध्या ४८ गावात पाण्याचे टँकर सुरू असून त्यात दिवसागणिक वाढ होत आहे.

इगतपुरी रेल्वे स्थानकात जलकुंभावर गर्दी

$
0
0
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक असणाऱ्या इगतपुरी स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागेत आहे. त्यामुळे जलकुंभाची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

देवळालीत पुन्हा पाणीटंचाई

$
0
0
देवळाली कॅम्पमध्ये सोडलेले पाण्याचे आवर्तन आठवडाभर पुरल्यानंतर आता पुन्हा एकदा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या या भागात दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला असून, ८ ते ११ एप्रिल या काळात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

‘आप’साठी भाजपचा जप

$
0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात जनता दलाचे ज्येष्ठ नेते व मालेगावचे माजी आमदार निहाल अहमद यांच्या पारड्यात बहुसंख्य मुस्लिम बांधवांची मते पडल्याने भाजपचे उमेदवार प्रतापदादा सोनवणे यांचा विजय सुकर झाला होता.

आक्षेपार्ह एसएमएसवर पोलिसांचा ‘वॉच’!

$
0
0
निवडणूक काळात मोबाईलच्या माध्यमातून आक्षेपार्ह एसएमएस पाठविणे संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. असे एसएमएस पाठविणाऱ्यांवर पोलिसांचाही वॉच असणार आहे. तसेच, नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आक्षेप नोंदविता यावा यासाठी मोबाईल क्रमांकांची हेल्पलाइनही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात मोदींच्या चार सभा

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांसाठी तब्बल चार सभा होणार आहेत. मोदींच्या देशव्यापी १५० हून अधिक सभा होत असून, त्यात उत्तर महाराष्ट्रातील चार सभांचाही समावेश आहे.

सारे काही टक्का वाढविण्यासाठी!

$
0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाल्याने निवडणूक यंत्रणा यंदा चांगलीच कामाला लागली आहे. यंदा ही टक्केवारी किमान ७५ असावी, या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

उन्हाने वाढवला उमेदवारांचा ‘ताप’!

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता हळूहळू वेग येत असून, राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. याचदरम्यान तापमानाचा पारा देखील वाढून ३९ अंशाच्या पुढे गेल्यामुळे त्याचा फटका प्रचारयंत्रणेला बसू लागला आहे.

अवैध वाहतुकीला पोलिसांचा आशीर्वाद

$
0
0
परवानगी नसतानाही प्रवाशांची सर्रास अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार कसारा येथील अपघातामुळे उघडकीस आला आहे. महामार्ग पोलिसांच्या आशीर्वाद असल्यानेच अशा अवैध वाहतुकीला उधान आल्याचे स्पष्ट होत असून, अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मोहीम उघडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अपुऱ्या बसगाड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

$
0
0
नाशिकरोड येथून बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बस अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना गाड्यांना लोंबकळून प्रवास करावा लागत आहे. परीक्षेच्य़ा कालावधीत बसेसची संख्या वाढवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

कारागृहातून कैदी फरार

$
0
0
नाशिकरोड कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने रविवारी सकाळी आठ वाजता कारागृहाच्या भिंतीवरुन उडी टाकून पलायन केल्याने खळबळ उडाली. यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याचे सिध्द झाले आहे.

बसस्थानक परिसरात खड्डे

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात होत असताना महापालिकेचे बांधकाम खाते व एसटी महामंडळ मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. या भागातील खड्डे त्वरित न बुजवल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असून, हे खड्डे ताबडतोब बुजवावेत, अशी मागणी प्रवासी तसेच रहिवाशांनी केली आहे.

फायरस्टेशन नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

$
0
0
आडगाव, पंचवटीसह नाशिकरोड भागासाठी उपयुक्त ठरणाऱ्या फायर स्टेशनचे काम येत्या नोव्हेंबरअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. आडगाव तसेच औरंगाबाद हायवेलगत वाढत असलेल्या रहिवाशी क्षेत्राला ‘कव्हर’ करण्यासाठी महापालिकेने हायवेवरील के. के. वाघ कॉलेजजवळील मोकळ्या जागेत मागील वर्षी हे काम हाती घेतलेले आहे.

मनसेशी सलगी; शिवसेनेची नाराजी

$
0
0
शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीच्या नात्याला राज्यात दोन दशके होत आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात अद्याप युतीत मधूर संबंध निर्माण होऊ शकलेले नाही. जिल्ह्यात भाजपकडून शिवसेनेला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याच्या नाराजीचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images