Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्र्यंबकराजा’चे पेड दर्शन महाग

$
0
0
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पैसे आकारणाऱ्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला हा निर्णय महागात पडण्याची चिन्हे आहेत. पेड दर्शनाचा हा ‘उद्योग’ बेकायदेशीर असल्याच्या केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या पत्राकडे देवस्थानने दुर्लक्ष केल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

कार्यकर्त्याचा टोला

$
0
0
कार्यकर्त्यांसह कामाच्या लोकांना सांभाळणं ही निवडणुकीतील उमेदवारांची महत्त्वाची जबाबदारी. यात त्यांच्या जाण्या-येण्यापासून खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी लागते. त्यातून एखादा गमतीदार प्रसंग घडतो. परवा जिल्हाधिकारी कार्यालयात असाच एक किस्सा झाला.

स्वार्थासाठी आरक्षण नको

$
0
0
आज आपल्या देशात पहायला गेलं तर राजकारणातील प्रत्येक महिलेच्या मागे तिच्या घरातील पुरूष असतो. तिला दिले गेलेले पद हे नावापुरतेच असते. महिलांना दिलेल्या आरक्षणाचा फायदा खरे तर त्यांना होत नसून, आपल्या राजकीय स्वार्थासाठी फायदा करून घेणाऱ्यांनाच जास्त होतो.

तरुणाई ध्येयवादी उमेदवाराच्या पाठिशी!

$
0
0
‘पारंपरिक मुद्द्यांच्या चौकटीबाहेर भव‌िष्यातील सरकारने बघायला हवे. यासाठी पंतप्रधान या पदावर बसणारा उमेदवार हा स्वतंत्र आण‌ि स्वयंपूर्ण व्यक्तिमत्वाचाच असायला हवा. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आण‌ि असुरक्ष‌ितता ही आव्हाने सक्षमपणे पेलून आगामी सरकारने देशाची प्रत‌िमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवावी,’ असा सूर ‘महाराष्ट्र टाइम्स’ तर्फे आयोज‌ित ड‌िबेट मधून उमटला.

वीज बिलासाठी महावितरण व्हॉट्सअॅपवर

$
0
0
ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरावे, यासाठी महावितरण अनेक उपाय करत असून आता व्हॉट्सअॅपवरून बिल भरण्याचे आवाहन केले जात आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केलेले आवाहन प्रभावी ठरत असल्याने हा उपक्रम राज्यभर राबवल्यास तो रोल मॉडेल ठरेल, अशी चर्चा होत आहे.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये १,९६१ जागा भरणार

$
0
0
आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी पाच वर्षांपूर्वी सादर केलेल्या प्रस्तावावर आदिवासी विकास विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने मुंबई हायकोर्टाने आदिवासी विभागाला खडसावले होते.

भक्तीभावात रंगणार रामजन्म सोहळा!

$
0
0
रामनवमीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून आज शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा होणार आहे. यासाठी सर्व मंदिरांमध्ये पहाटेपासून कार्यक्रमांचे आयोजन केले असून सोमवारपासूनच तयारीला प्रारंभ झाला आहे.

श्रीराम नवमीसाठी नाशिकरोड सज्ज

$
0
0
श्रीराम नवमीनिमित्त नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव परिसरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. प्रसिध्द मुक्तीधामध्ये उद्या दुपारी रामनवमीचा उत्सव साजरा होणार आहे.

चोरीच्या मोटरसायकलींच‌ी होतेय शहराबाहेर विक्री

$
0
0
शहरातून मोटरसायकली चोरायच्या आणि त्यांची जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर विक्री करायची असा उद्योग करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनीट दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

राज्यात अकराशे फिडरवर भारनियमन

$
0
0
महावितरणचे जे ग्राहक वीज बील नियमीत भरत नाहीत, अशा ठिकाणी भारनियमन केले जात असून राज्यातील अकराशे फिडरवर भारनियमन केले जात आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहकांचा समावेश आहे.

नगरसेवकांना चुना लागतो तेव्हा...

$
0
0
व्हीआयपी नंबर्सचा मोह कुणाला नसतो. गाड्यांचा व मोबाइलचे आकर्षक नंबर्ससाठी लोक कितीही पैसा खर्च करायला तयार असतात. याचाच फायदा घेत काही तरुणांनी शहरातील पाच सहा नगरसेवकांना काही हजारांना चुना लावला.

वडाळा गावात बालिकेवर बलात्कार

$
0
0
एका सहा वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडाळा गावात रविवारी पहाटे घडली. या प्रकाराबद्दल परिसरात संताप व्यक्त व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

डासांनी दिली धोक्याची घंटा

$
0
0
उन्हाच्या कडक झळा सहन करणाऱ्या नागरिकांसाठी डासांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी डासांची घनता ४.१ इतकी होती. आता, ही घनता ४.३ इतकी झाली असून, नदीपात्रातील साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीचे स्त्रोत ठरले आहेत.

महिला टक्का वाढविण्यासाठी साऱ्यांचाच खटाटोप!

$
0
0
महिलांचा निवडणुकांमधील सहभाग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला असून, त्या मतदानालाही येत नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांचा खटाटोप सुरू आहे. राजकीय पक्षांनी महिलांपर्यंत पोहचण्यासाठी पथके तयार केली असून, त्यांच्या माध्यमातून थेट किचनपर्यंत शिरकाव करून महिलांना मतदानाचे आवाहन केले जात आहे.

मंडल अधिकाऱ्याविरोधात आचारसंहिता कक्षाकडे तक्रार

$
0
0
कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील मंडल अधिकारी एम. एल. पवार हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा प्रचार करीत असल्याची तक्रार आचारसंहिता कक्षाकडे करण्यात आली आहे.

नाशिकला प्रतीक्षा मतदान यंत्रांची

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघात तब्बल १४ अपक्ष उमेदवारांनी रिंगणात उडी घेतल्याने निवडणूक यंत्रणेला मतदान यंत्राची काळजी लागली आहे. या लोकसभा मतदारसंघात १,८५० मतदान यंत्र कमी पडल्यामुळे ही यंत्रे विदर्भातील काही जिल्ह्यांमधून आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

भुजबळांची संपत्ती तिप्पट, तर गोडसेंची चौपट

$
0
0
निवडणुकीत उमेदवारांकडून सादर होणारे संपत्तीचे विवरण चर्चेचा विषय असते. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रंणागणात उतरलेल्या उमेदवारांची संपत्तीही चर्चेत असून, यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सादर केलेल्या विवरणानुसार गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत जवळपास तिप्पट वाढ झाली आहे.

मतदानासाठी पगारी सुटी

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २४ एप्रिलला मतदान असून, या दिवशी उत्तर महाराष्ट्रातील विविध कामगारांना भरपगारी सुटी देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यानिमित्ताने मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा आहे.

पाच जणांचे अर्ज ठरले अपात्र

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघात ५ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून, एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात आहेत. येत्या ९ एप्रिलपर्यंत उमेदवारी माघार घेण्याची मुदत असून, त्यानंतर मतदारसंघाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

दिंडोरीत चौघांचे अर्ज नामंजूर

$
0
0
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ४ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्याने ११ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images