Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोडसे सव्वा चार कोटींचे मालक

$
0
0
शिवसेना, भाजप आणि रिपाइं अशा महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण सव्वा चार कोटी रुपयांची संपत्ती आहे. गोडसे यांचा व्यवसाय शेती व बांधकाम असा आहे. ते सिव्हिल इंजिनीअर आहेत.

शिवसेना जोरात, नियोजन बारगळले!

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत गोडसे यांचा उमेवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र, सभेचे नियोजन बारगळल्याने काही काळ कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

तुटेपर्यंत ताणू नका

$
0
0
काही अनपेक्षित गोष्टी घडत असतात. पण त्यामुळे तुटेपर्यंत ताणायचे नसते, असे सूचक विधान करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला.

भुजबळ एकवीस कोटींचे धनी

$
0
0
भुजबळ हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असले तरी त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा व्यवसाय हा शेती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. भुजबळ दांपत्याने आपली संपत्ती सुमारे एकवीस कोटी दाखवली आहे.

आपुलीच प्रतिमा आपुलीच वैरी

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा मतदारंसघ म्हणून नाशिकचा उल्लेख होतो, तो विविध आरोपांचे धनी असलेले राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ आणि ज्यांच्या आरोपांमुळे अजितदादा पवारांसारख्या तगड्या राष्ट्रवादी नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, ते आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे यांच्या उमेदवारीमुळे.

प्रचारामुळे महिलांच्या हाताला रोजगार

$
0
0
लोकसभा निवडणुकीमुळे सिडको, सातपूरमधील महिलांना प्रचाराचे काम मिळाले असून ‘रोज’ मिळत असल्याने त्यांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. एवढेच नव्हे, तर महिलांना दररोज प्रचारासाठी घेऊन जाण्यासाठी तसेच पुन्हा घरापर्यंत सोडण्यासाठी खास गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

१४००० विद्यार्थी देणार जेईई

$
0
0
राज्यातील शासकीय अनुदान‌ित आण‌ि खासगी व‌िना अनुदान‌ित इंज‌िनीअरिंग कॉलेजमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई (मेन) परीक्षा आज (६ एप्र‌िल) व‌िव‌िध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ज‌िल्ह्यातून सुमारे १४ हजार व‌िद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

‘इप्कॉस’ची घसघशीत पगारवाढ

$
0
0
टिडीके इप्कास कंपनीतील कामगारांच्या त्रैवार्षीक पगारवाढीच्या करारानूसार साडेअकरा ते साडेबारा हजार रुपयांची भरघोस पगारवाढ देण्यात आली असून कंपनीत ६० ट्रेनी कामगारांना कायम करण्यात आले आहे.

डासांच्या त्रासातून सोडवा

$
0
0
सातपूरगाव व परिसरातील रहिवाश्यांना नासर्डी नदीतील प्रदूषण व साचलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास होत आहे. या त्रासातून सुटका करण्याची मागणी रहिवाशांनी महापालिकेकडे केल्यानंतर आरोग्य अधिकारी सुन‌ील बुकाणे यांनी नासर्डी नदीची पाहणी केली व नदीचा प्रवाह सुरळीत करण्याच्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

टकल्या गँगच्या गुंडाना रिव्हॉल्व्हरसह अटक

$
0
0
शहरात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या कुख्यात टकल्या गँगच्या दोघा गुंडांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हरसह अटक केली.

बनावट जातीचा दाखला देणाऱ्यांवर गुन्हा

$
0
0
उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमताने बनावट जातीचा दाखला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोजगार हमी शाखेतील शिपायासह तिघांवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चैत्रोत्सवासाठी वणीला ३०० जादा बसेस

$
0
0
वणी गडावर चैत्रोत्सवात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. ८ ते १६ एप्रिल या कालावधीत जिल्हाभरातून नियोजित बसेस व्यतिरिक्त ३०० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ऑनलाइनची सूचना अवघी २ द‌िवस अगोदर

$
0
0
मॅनजमेंटच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व‌िद्यार्थ्यांना ‘मॅनेजमेंट’ श‌िकव‌िणाऱ्या पुणे व‌िद्यापीठाने अवघ्या दोन द‌िवस अगोदर ऑनलाइन परीक्षेची सूचना द‌िली आहे. परिणामी, मॅनेजमेंटचे धडे श‌िकू पाहणाऱ्या व‌िद्यार्थ्यांना व‌िद्यापीठाच्या या अजब कारभाराने संभ्रमात टाकले आहे.

धरणात मुबलक पाणीसाठा

$
0
0
उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने महापालिकेने मागणीनुसार पाणी पुरवठ्यात वाढ केली आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत होत असून पाणी कपात सुरू झाली की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

नाशकात २९ तर दिंडोरीत १५ उमेदवारी अर्ज

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी दुपारी तीनला संपली. नाशिकमध्ये एकूण २९ जणांनी तर दिंडोरी मतदार संघातून १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी (दि. ७) ला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून बुधवारी (दि.९) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.

जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

$
0
0
बंद घरात जुगार अड्डा चालविला जात असल्याचा प्रकार पंचवटी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सुनील मारुती गुंजाळ (२४, रा. तेलंगवस्ती, पेठरोड, पंचवटी) याच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

सत्ताधाऱ्यांकडून गारपिटीचे राजकारण

$
0
0
‘राज्यात गारपिटीने थैमान घातले असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या मतदारसंघांचा दौरा करत राजकारण केले.’ असा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांसह मुख्यंत्र्यावर टीका केली.

मार्चनंतरही पालिकेत सामसूम

$
0
0
मार्च एण्डची कामे संपली नाही तोच महापालिकेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. आयुक्त संजय खंदारे मोठ्या सुट्टीवर असून नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने महापालिकेत कामाच्या वेळी देखील सामसूम निर्माण होते.

अबब ! १२.५ हजारांची चिल्लर

$
0
0
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट तुम्ही पाह‌िला असेलच. मग तुम्हाला त्यातील मकरंद अनासपुरेचा धम्माल उडवून देणारा अनामत रक्कमेचा किस्साही आठवेल. उमेदवारी अर्ज भरतेवेळी चिल्लर देऊन त्याने धम्माल आणली होती.

गृहीत धरणाऱ्यांची मस्ती जिरवा

$
0
0
‘वारंवार निवडून येणारे तुम्हाला गृहीत धरतात, पैशाच्या जीवावर माज करतात अशांची मस्ती जिरवा’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर बरसले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images