Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मटा गाइड - व्याघ्रगणना

$
0
0

मटा गाइड - व्याघ्रगणना

--

राज्यनिहाय व्याघ्र संख्या

राज्य....२००६....२०१०...२०१४....२०१८

उत्तराखंड....१७८,....२२७....३४०.......४४२

उत्तर प्रदेश.....१०९.....११८....११७........१७३

बिहार....१०....८....२८......३१

आंध्रप्रदेश....९५....७२....६८........४८

तेलंगाणा......--......--....--.....२६

छत्तीसगड....२६....२६....४६........१९

मध्यप्रदेश....३००....२५७....३०८.......५२६

महाराष्ट्र....१०३....१६९....१९०....३१२

ओडिसा....४५....३२....२८........२८

राजस्थान....३२....३६....४५........६९

झारखंड....--....१०....३........५

कर्नाटक....२९०....३००....४०६........५२४

केरळ....४६....७१....३६.....१९०

तामिळनाडू....७६....१६३....२२९.........२६४

गोवा....--....--....५......३

आसाम....७०....१४३....१६७.......१९०

अरुणाचल प्रदेश....१४....००....२८.......२९

मिझोरम....६....५....३..........०

उत्तर पश्चिम बंगाल....१०....--.....३.....०

एकूण....१४११....१७०६....२२२६.......२९६७

--

कुठे किती वाघ?

प्रदेश......२००६..........२०१०.....२०१४....२०१८

शिवालिक पर्वत आणि गंगेचा प्रदेश....२९७....३५३.....४८५.....६४६

मध्य भारत आणि पूर्व घाट....६०१.....६०१.....६८८....१०३३

पश्चिम घाट.....४०२......५३४.....७७६....९८१

ईशान्य आणि ब्रह्मपुत्रेचा प्रदेश....१००....१४८.....२०१......२१९

--

येथे घटले वाघ

छत्तीसगड राज्यात २०१४ मध्ये ४६ वाघ होते. २०१८ मध्ये त्यात घट झाली असून आता तेथे १९ वाघ शिल्लक आहेत. गोव्यामध्ये गेल्या गणनेत ५ वाघ आढळले होते. तर गेल्या वर्षी तेथे केवळ तीनच वाघ आढळून आले. मिझोरममध्ये गेल्या गणनेत ३ वाघ दिसले होते. यंदा तेथे एकाही वाघाची नोंद झालेली नाही. उत्तर पश्चिम बंगाल क्षेत्रातही गेल्यावेळी ३ वाघ दिसले होते. यंदा तेथे एकही वाघ आढळून आलेला नाही.

--

देशातील व्याघ्र प्रकल्प

देशात एकूण ६० व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात संवेदनशील क्षेत्र ४०१४५ वर्ग किलोमीटर, तर बफर झोन ३२६०३ वर्ग किलोमीटर असा एकूण ७२७४९ वर्ग किलोमीटर एवढे क्षेत्र राखीव आहे. १९७३-७४ मध्ये व्याघ्र संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्प साकारण्याची घोषणा झाली. त्याच वर्षी एकूण ९ ठिकाणी व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आले. २०१६ मध्ये ओरंग (आसाम) आणि कमलांग (अरुणाचल प्रदेश) हे व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आले.

--

महाराष्ट्र चौथा

महाराष्ट्रात एकूण ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा-अंधारी यांचा समावेश आहे. व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राचा नंबर चौथा आहे. मध्यप्रदेशात सर्वाधिक ५२६, कर्नाटकात ५२४ आणि उत्तराखंडमध्ये ४४२ वाघांची नोंद झाली आहे.

--

गणनेत यांचा सहभाग

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डेहराडून), राज्य सरकारांचे वनविभाग, वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (नवी दिल्ली), युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलिअम अँड एनर्जी स्टडिज् (डेहराडून), रिसर्च बायोलॉजिस्ट, प्राधिकरणाचे माजी अधिकारी, व्याघ्र तज्ज्ञ.

अशी झाली गणना

३,८१,४०० वर्ग किलोमीटर एवढे वनक्षेत्र गणनेसाठी निवडण्यात आले.

५,२२,९९६ किलोमीटर क्षेत्रावर पायाच्या ठशांचे सर्वेक्षण करण्यात आले.

१४१ ठिकाणी २६,८३८ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले

कॅमेऱ्यांद्वारे १,२१,३३७ वर्ग किलोमीटर एवढ्या क्षेत्रावर नजर टाकली गेली

कॅमेऱ्यांद्वारे तब्बल ३,४८,५८,६२३ एवढे फोटो काढण्यात आले. त्यातील ७६,६५१ फोटो हे वाघांचे होते तर ५१,७७७ फोटो बिबट्यांचे होते.

एकूण ५,९३,८८२ एवढ्या मानवी दिवसांच्या परीश्रमानंतर गणना पूर्ण झाली

दर चार वर्षांनी देशात व्याघ्रगणना

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बागलाण, मालेगाव अन् नाशिकला २०० टक्के पाऊस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी तालुके अशी ओळख असलेल्या मालेगावसह बागलाण तालुक्यात पावसाने बॅकलॉग भरून काढला आहे. दोन्ही तालुक्यांसह नाशिक तालुक्यात पावसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली असून, दुप्पट म्हणजेच २०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे नांदगाव, देवळा आणि कळवण हे तीन तालुके वगळता अन्य नऊ तालुक्यांमध्येही जुलैच्या सरासरीच्या १०० ते १८० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेष म्हणजे ज्या तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविली होती तेथेही दमदार सरी कोसळू लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्याने आणि या आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्हावासीय सुखावले आहेत. अनेक तालुक्यांमध्ये पावसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली आहे. बागलाण तालुक्याचे जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ९७.६० मिलिमीटर आहे. परंतु, तालुक्यात चालू महिन्यात आतापर्यंत २२४ मिलिमीटर म्हणजेच २३० टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मालेगाव तालुक्यातही जुलैमध्ये सरासरी ११२. ३० मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, येथेही २२७ मिलिमीटर म्हणजेच २०२ टक्के पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात २२३.५० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. या तालुक्यातही ४५० मिलिमीटर म्हणजेच २०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे.

--

१०० ते १८२ टक्के पाऊस

या महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांवर पाऊस तुटून पडला आहे. १५ पैकी नऊ तालुक्यांमधील पावसाची टक्केवारी १०० टक्क्यांच्या पुढे सरकली आहे. निफाड तालुक्यात जुलैमध्ये ११८.१० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. परंतु, या महिन्यात २१५ मिलिमीटर म्हणजेच १८२ टक्के पाऊस पडला आहे. येवला, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांमध्ये १६० टक्क्यांहून अधिक पाऊस पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

--

कळवण, नांदगावमध्ये ६८ टक्के

कळवण तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. जून महिन्यातही तालुक्यात पाऊस सरासरी गाठू शकला नाही. जुलै महिन्यातदेखील अशीच परिस्थिती आहे. तालुक्यात जुलैमध्ये २२३.९० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, जुलै महिना सरत येऊनही आतापर्यंत केवळ १५३ मिलिमीटर म्हणजेच ६८ टक्के पाऊस झाला आहे. अशीच परिस्थिती नांदगाव तालुक्याचीदेखील आहे. या तालुक्यात १११.५० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना ६८ टक्के म्हणजेच ७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. देवळा तालुक्यात १९८.१० मिलिमीटर पाऊस पडायला हवा होता. परंतु, आतापर्यंत १४२.४ मिलिमीटर म्हणजेच ७२ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

-

जुलैमधील तालुकानिहाय स्थिती

--

तालुका जुलै सरासरी(मिमी) पडलेला पाऊस(मिमी) टक्के

बागलाण ९७.६० २२४ २३०

मालेगाव ११२.३० २२७ २०२

नाशिक २२३.५० ४४३.७ १९९

निफाड १९८.१० २१४.६ १८२

येवला १०७.४० १७८.२ १६६

सिन्नर १५२.६० २५१ १६५

दिंडोरी २५६.५० ४११ १६०

त्र्यंबकेश्वर ९३६.४० १४२५ १५२

इगतपुरी १३३९.८० १९३९ १४५

सुरगाणा ७११.८० ८४० ११८

चांदवड १४५.१० १६५ ११४

पेठ ९३६.४० १०४० १११

देवळा १९८.१० १४२.४ ७२

नांदगाव १११.५० ७६ ६८

कळवण २२३.९० १५३ ६८

एकूण ५६७१ ७७३० १३६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर, पालखेडमधून विसर्ग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांमधील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे गेल्याने या हंगामात प्रथमच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय पालखेड, कडवा या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सोमवारी सुरू करण्यात आला. दारणा आणि भावली धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

नदीकाठालगत राहणाऱ्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. जिल्हावासीयांच्या पाण्याशी संबंधित वर्षभराच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात याकामी धरणांची मोठी मदत होते. दुष्काळाच्या झळा आणि उन्हाची तीव्रता यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला. गिरणा धरण समूहात हीच परिस्थिती कायम असली, तरी गंगापूर आणि पालखेड धरण सूमहातील काही धरणांसाठी सध्याचा पाऊस वरदान ठरला आहे. नाशिकसह, अहमदनगर आणि मराठवाडावासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या गंगापूर धरण सूमहातील उपयुक्त पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सोमवारी सकाळपर्यंत हा पाणीसाठा ७१ टक्क्यांवर पोहोचला. या धरणसूमहामध्ये ७ हजार ३४३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गंगापूर धरणातील पाणी साठा ८० टक्क्यांवर गेल्याने दुपारी दोनच्या सुमारास धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यामुळे गोदेच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली.

-

गंगापूरमधून दुपारी सोडले पाणी

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाचा जोर असल्याने अखेर सोमवारी दुपारी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दिली. परंतु, पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्गही टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. दुपारी तीन वाजता ३ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरू होता, तर दुपारी साडेचार वाजता तो ४ हजार १६१ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. सायंकाळी पाच वाजता ५४९९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्याचे प्रमाण आणि वेग वाढतच असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला, तर धरणातून विसर्ग वाढविण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

-

कडवा, पालखेड, पुनदमधूनही विसर्ग

पालखेड धरण समूहामधील दारणा आणि भावली या दोन धरणांपाठोपाठ कडवा आणि पालखेड या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी दारणा धरणातून १६ हजार ६८८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. कडवा धरणातून १० हजार ९९८ क्युसेकने, तर पालखेड धरणातून ४ हजार ७०० क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. भावली धरणातूनही १५०९ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. विशेष म्हणजे गिरणा धरण समूहामध्येही पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने २८९५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

----

प्रमुख धरणांतील पाणीसाठा

--

---

धरण पाणीसाठा (टक्केवारी)

गंगापूर ७९

दारणा ८७

भावली १००

काश्यपी ५१

गौतमी ६३

आळंदी ८२

मुकणे ४३

वालदेवी ८९

कडवा ९०

पालखेड ७०

ओझरखेड ०५

वाघाड ४५

भोजापूर २४

पुणेगाव ११

करंजवण २७

हरणबारी २७

गिरणा ०८

चणकापूर २५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुवाधार बरसात सुरूच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, धरणांमधील पाणीपातळीतही लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे हंगामात पहिल्यांदाच गंगापूरसह पालखेड धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी, दारणासह तिच्या उपनद्यांमधील पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थ‌िती निर्माण होण्याची शक्यता असून, अनुचित घटना टाळण्यासाठी नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता आठवडाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ६४१.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने त्याचेच गेल्या आठवडाभरातील रेकॉर्ड तोडले आहेत. केवळ शिडकावा किंवा हलक्या सरींच्या रूपाने कोसळणाऱ्या पावसाने सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. सातत्याने कमी पावसाची नोंद होत असलेल्या कळवणमध्येदेखील २४ तासांत २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यांमध्येही काही प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचे प्राप्त माहितीवरून स्पष्ट होते. सोमवारी दिवसभरदेखील जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा वाढण्यास मदत झाली असून, वरुणराजाच्या कृपावर्षावामुळे बळीराजाही सुखावला आहे.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये अतिवृष्टी

इगतपुरी तालुकावासीयांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. शनिवारी २७ जुलैला तालुक्यात २४ तासांत २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. परंतु, सोमवारी सकाळी पावसाने हा रेकॉर्ड तोडला. तालुक्यात २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा, भावलीसह कडवा धरणातूनही विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार सातत्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, सोमवारी सकाळी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर धरण समूहामधील पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे.

--

दिवसभर पावसाचा जोर

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी दिवसभर पावसाचा जोर होता. रविवारपासून पावसाचा जोर कायम असून, शहरवासीयांची सोमवारची सकाळही पावसाच्या दर्शनानेच उजाडली. कधी हलक्या, कधी मध्यम, तर कधी मुसळधार सरी बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत शहरात १५.८ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला.

---

सोमवारी सकाळपर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

तालुका पाऊस

नाशिक २९.३

इगतपुरी २२६

त्र्यंबकेश्वर १००

दिंडोरी ३३

पेठ ६८.२

निफाड ११.४

सिन्नर १३.०

चांदवड ११.०

देवळा ७.८

येवला ४.०

नांदगाव ४.०

मालेगाव २०

बागलाण १७

कळवण २२

सुरगाणा ७५

एकूण ६४१.७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचे आव्हान ऑगस्टपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गत वर्षाच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव जास्त आहे. हा फैलाव रोखण्याबाबत मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, मंत्री महोदयांना स्थानिक प्रशासनाचे कान पिळावे लागले. या सर्व उठाठेवीचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष असले तरी स्वाइन फ्लूची खरी परीक्षा पुढील महिन्यापासूनच सुरू होणार आहे. मागील दोन वर्षांचा विचार करता या आजाराचा जास्त फैलाव ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांतच झालेला आहे.

नाशिक-पुणे अशी थंड हवेचे ठिकाणे स्वाइन फ्लूच्या फैलावासाठी पोषक ठरतात. त्यामुळे राज्यात या दोन जिल्ह्यांतच सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. यंदा स्वाइन फ्लूने नाशिकमध्ये चांगलेच हातपाय पसरले. मार्च आणि एप्रिल या उष्ण महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला. २०१८ मध्ये जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे अवघे सहा रुग्ण आढळून आले होते तर, तिघांचा या आजाराने बळी घेतला होता. यंदा आजपर्यंत २८९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, ३२ जणांचा बळी गेला आहे. २०१८-१९ मधील रुग्णांची वाढलेली संख्या स्वाइन फ्लू वाढीतील गांभीर्य स्पष्ट करते. दुर्दैवाने आगामी महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता जास्त आहे. २०१७ आणि २०१८ मधील ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यातील रुग्णांची संख्या तीव्रतेने आगामी संकटावर प्रकाश टाकते. २०१७ मध्ये ऑगस्ट १३३, सप्टेंबर १२९ तर ऑक्टोबरमध्ये २३ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. त्यात अनुक्रमे २२, १५ आणि नऊ जणांचा बळी गेला होता. या वर्षी एकूण ५२९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती, तर ९१ जण त्यामुळे दगावले हेाते. २०१८ मध्येही अशीच परिस्थिती होती. ऑगस्टमध्ये ५०, सप्टेंबर महिन्यात तर २५८ आणि ऑक्टोबरच्या उन्हाळासदृश महिन्यात तब्बल १५८ रुग्ण समोर आले होते. या तीन महिन्यांत अनुक्रमे पाच, ३१ आणि ३३ असा ६९ नागरिकांचा जीव गेला होता. या दोन वर्षांत जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचा तितका प्रभाव नव्हता. यंदा मात्र स्वाइन फ्लू रोखण्यात प्रशासन सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. आगामी तीन महिन्यांत सातत्याने कोसळणाऱ्या जलधारा आणि त्यातून निर्माण होणारा गारवा स्वाइन फ्लूच्या फैलावास पोषक वातावरण निर्माण करणार आहे.

वेळीच जा डॉक्टरांकडे!

आधीच आक्रमक असलेल्या या आजारांच्या विषाणूंचे झपाट्याने संक्रमण होण्याचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लू आणि फ्लू यात साम्य असते. त्यामुळे अनेकदा रुग्ण हा आजार अंगावर काढतात. त्यातून स्वाइन फ्लूचा फैलाव झपाट्याने होतो. कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे, हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे, सतत कोमट-गरमच खाणे अथवा पिणे अशा काही सवयींमुळे या आजारापासून बचाव होऊ शकतो, असे आरोग्य विभागातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.

--

महिना- २०१७ २०१८ २०१९

लागण-मृत्यू लागण-मृत्यू लागण-मृत्यू

जानेवारी- १-० १-१ २०-३

फेब्रुवारी- ४-१ ०-० ८४-९

मार्च- ७२-१९ १-१ ९४-१७

एप्रिल- ७५-१० ०-० ६१-१

मे- २३-४ ०-० १४-१

जून- १९-२ ०-० ७-१

जुलै- ४८-९ ४-१ ९-०

ऑगस्ट- १३३-२२ ५०-५ --

सप्टेंबर- १२९-१५ २५८-३१ --

ऑक्टोबर- २३-९ १५८-२२ --

नोव्हेंबर- २-० १४-२ --

डिसेंबर- ०-० ७-२ --

एकूण- ५२९-९१ ४९३-७६ २८९-३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात अखेर रद्द

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुबलक पाऊस कोसळल्याने गंगापूर आणि दारणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर आणि विरोधकांच्या दबावामुळे शहरातील पाणीकपात अखेर रद्द करण्यात आली आहे. महापौर रंजना भानसी यांनी याबाबतचे आदेश दिले. तब्बल महिनाभरानंतर आजपासून शहरात दोनवेळा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.

यंदा पावसाळा लांबल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यात जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी आरक्षण देताना मृतसाठा गृहीत धरला होता. त्यामुळे जून महिन्यातच धरणाने धोकादायक तळपातळी गाठली होती. जून अखेरीस जॅकवेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणी आल्याने शहरावर पाणी संकट कोसळण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली. एकीकडे जॅकवेलची खोदाई मृत पाणी साठ्यापर्यंत करण्याची तयारी करताना प्रशासनाने पाणी कपातीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांसमोर समोर ठेवला. त्यामुळे ३० जूनपासून शहरात जेथे दोन वेळ पाणीपुरवठा असेल तेथे एकवेळ, तर आठवड्यातून गुरुवारी संपूर्ण दिवस पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पुढील वेळापत्रकावरही परिणाम झाला होता. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने विरोधकांकडून किमान गुरुवारचा पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव येऊ लागला. महापौर भानसी यांनी महासभेत गुरुवारचा संपूर्ण दिवसाचा बंद पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला.

विरोधकांचा दबाव

महासभेतील टीकेनंतरही धरण ८० टक्के भरेपर्यंत दोनवेळचा पाणीपुरवठा करता येणार नाही, अशी अडेलतट्टू भूमिका प्रशासनाने घेतली होती. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. परिणामी, दारणा ८७ टक्के तर गंगापूर धरणात सोमवारी ८० टक्के पाणीसाठा झाला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यावरून मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठीच पाणीकपात केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येऊ लागला. त्यामुळे महापौर भानसी यांनी सोमवारी आयुक्तांसमवेत चर्चा केली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे जाहीर केले. आज, मंगळवारपासून शहरातील काही भागात नियमितपणे दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहम, आरती विजयी

$
0
0

भीष्मराज बाम मेमोरिअल स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटनेतर्फे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरिअल महाराष्ट्र एअर गन स्पर्धेत अकोला येथील सोहम देशमुख व पुण्याच्या आरती पडले हिने विजेतेपद पटकावून रायफल जिंकली. सुधा बाम, अजित बाम यांच्या हस्ते सोमवारी पारितोषिक वितरण झाले. जिल्हा नेमबाजी संघटनेच्या सचिव मोनाली गोऱ्हे यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत एकूण ६७१ नेमबाज सहभागी झाले होते. नाशिकमधून ७४ नेमबाजांनी सहभाग घेतला. १० मी. एअर रायफल, पिस्तूल अशा २४ प्रकारांत ही स्पर्धा झाली. ओपन साइट एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक विजेत्या नेमबाजांनी रायफल बक्षीस देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जवाटप गुरुवारपासून

$
0
0

दाखले वितरणातील गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहावी आणि बारावीचे निकालांनंतर विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी उडणारा गोंधळ टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गुरुवार, १ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी अर्ज वितरित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेशाचे वेध लागतात. परंतु, यासाठी विविध दाखले सादर करणे अनिवार्य ठरते. सेतू कार्यालये तसेच महा ई-सेवा केंद्रांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची झुंबड उडते. एकाचवेळी हजारो नागरिकांचे अर्ज आल्याने दाखले वितरण यंत्रणेवर ताण पडतो. दाखले मिळविण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. मे आणि जून महिन्यात जिल्हा प्रशासनाला असाच अनुभव आला. प्रलंबित दाखल्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी नाशिक प्रांताधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना कार्यालयात ठाण मांडून बसावे लागले. नागरिकांनी त्यांना गराडा घातल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दाखले वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुटसुटीत व्हावी, यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आतापासून दाखल्यांचे अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला आहे. त्यानुसार, १ ऑगस्टपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे अर्ज वितरण केले जाणार आहे. यात उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जापासून जातीच्या दाखल्यासाठींचे अर्ज दिले जाणार आहेत. या दाखल्यांसाठी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

जबाबदारी प्राचार्यांकडे

आवश्यक कागदपत्रांसह दाखल्यांचे अर्ज शाळा-महाविद्यालयांत सुरू करण्यात येणाऱ्या कक्षाकडे जमा करावे लागणार आहेत. महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी हे अर्ज संकलित करतील. या कागदपत्रांची पडताळणी करून यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यास सांगितले जाईल. परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर दाखले बनवून ते पुन्हा शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे सुपूर्द केले जाणार आहेत. या दाखल्यांचे विद्यार्थ्यांना वाटप कले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात ‘आरटीई’च्या १,४३४ जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्यांतर्गत आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत असून, आतापर्यंत पार पडलेल्या तीन लॉटरी प्रक्रियेत ४ हजार ३०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. जिल्ह्यातील अद्याप एक हजार ४३४ जागा रिक्त आहेत.

जिल्हाभरातील ४५७ शाळांमध्ये पाच हजार ७३५ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरटीई प्रक्रियेला दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठा विलंब झाला आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला तरी ही प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. त्यामुळे राज्यभरातून पालकांची नाराजी यंदा प्रक्रियेवर ओढावली आहे. तिसऱ्या लॉटरी प्रक्रियेतील प्रवेश प्रक्रिया २४ जुलै रोजी बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ४ हजार ३०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित एक हजार ४३४ जागांसाठी पुढील लॉटरी प्रक्रिया काढण्यात येणार की नाही, याविषयी अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले आहे. राज्यातही ३९ हजार ९८७ जागा रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो एंट्रीचा फक्त तमाशा!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील काही प्रमुख ठिकाणी नो एंट्रीचा नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम पोलिस असतानाच पाळला जातो. अन्यथा नो एंट्रीमधून सर्रास वाहतूक होते. नो एंट्रीचे नियोजन चुकीचे की वाहनचालकांची मानसिकता, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

शहराचा विस्तार आणि वाहनांची संख्या जशी वाढत आहे तसे बहुतांश रस्ते, परिसर अरुंद पडतात. ट्रॅफिक इंजिनीअरिंगचा दोष किंवा कुठे अतिक्रमणांचा विळखा! वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक विभागाकडे अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या, की अशा भागांमध्ये वन-वे अथवा नो एंट्री असे नियम लागू करण्यात येतात. शहरातील मेनरोड, नेहरू उद्यान चौक, शिवाजीरोड, मायको सर्कल ते शरणपूररोड, पगडबंद लेन, हुंडीवाला लेन, हॉटेल साई मुस्कान, गोदावरी हॉटेल, अशोक स्तंभ, घनकर गल्ली या वर्दळीच्या ठिकाणी एकेरी वाहतुकीचे मार्ग आहेत, तर इंदिरानगर अंडरपास अथवा नव्याने काही ठिकाणांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. २५ पेक्षा अधिक मार्गांवर नो एंट्री नियम लागू आहे. मात्र, वाहनचालक सर्रास या नियमांची पायमल्ली करतात. नो एंट्री नियमामुळे वाहनचालकांना फिरून जाण्यास भाग पडते. वाहनचालकांना नेमकी हेच नको असते.

--

पोलिस असताना पालन, पण...

नो एंट्री अथवा वन वे नियमाची जाणिव करून देणारे फलक संबंधित रस्त्यांवर आजही दिसून येतात. या रस्त्यांवर पोलिस उभे असल्यास वाहनचालक फिरून जाण्यास तयार असतात. काही पोलिसांकडे कानाडोळा करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी हटकले तर बोर्डच दिसला नाही किंवा आमच्यावरच कारवाई का, असे आरोप करीत वाद घातले जातात. वन वे नियमाचे योग्यरीतीने पालन न झाल्यास सातत्याने वाहतूक कोंडी होऊन वेळ आणि इंधन खर्च होते. दुसरीकडे नवीन पिढीसुद्धा असे नियम पाळण्यास धजावणार नाही, अशी प्रतिक्रिया सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जाते आहे.

--

अवघा पाऊण किलोमीटरचा प्रश्न

इंदिरानगर अंडरपास हा नो एंट्रीचा मार्गसुद्धा वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गोविंदनगरकडून येणाऱ्या वाहनचालकांना ७०० मीटर रस्ता वळून इंदिरानगर गाठावे लागते. मात्र, बहुतांश वाहनचालक पोलिस नसल्यास नो एंट्रीमध्ये वाहन घालतात. अत्यंत अरुंद असलेल्या या रस्त्यावर समोरून अथवा नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने येतात. मोठ्या वाहनांना वळण्यासाठी पुरेसा टर्निंग रेडिअस नसल्याने वाहतूक कोंडी होते. अवघा एक मिनीट वाचविण्यासाठी नियम मोडणारे वाहनचालक अर्धा तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ तेथे अडकले आहेत. मात्र, बऱ्याच वाहनचालकांना वेळ आणि इंधनापेक्षा नियम मोडण्यात जास्त रस असतो.

--

'नो एंट्री'तील दंडात्मक कारवाई

--

वर्ष- केस- दंडवसुली

२०१८ १२५२ २२२८०३

२०१९ २१३८ ४२७६००

--

नो एंट्रीच नव्हे, तर वाहतूक नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनचालकावर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलिस लक्ष देतात. नो एंट्री, सिग्नल जंपिंगसारखे नियम पाळण्याची जबाबदारी वाहनचालकांची असते. वाहतूक शाखेत २०० कर्मचारी असून, अशा प्रत्येक ठिकाणी पोलिस नियुक्त करणे शक्य होत नाही. वाहनचालकांनी जबाबदारीने अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

-लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेकडूनच नियमभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर विकास नियंत्रण नियमावलीत खुल्या जागेत १५ टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम अनुज्ञेय नसतानाही, महापालिकेने शहरातील तब्बल ६५ खुल्या जागांवर नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. नगररचना विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सदरची बाब उघड झाली आहे. पालिकेने बांधलेली समाजमंदिरे, वाचनालये, प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे यावर स्थानिक नागरिकांनी आणखी बांधकाम केल्याने ते नियमबाह्य झाले आहे.

शहरातील नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केल्यास त्यावर महापालिकेकडून हातोडा चालविला जातो. परंतु, महापालिकेने आपल्या इमारतींमध्ये अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा गेल्या अडीच वर्षांपासून गाजत आहे. शहरातील ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळे महापालिकेने अनधिकृत ठरवली आहेत. या धार्मिक स्थळांसंदर्भात हरकती व सुनावणीची प्रक्रिया महापालिकेने पूर्ण केली असून, त्यांच्यावर हातोडा मारण्याची तयारी सुरू आहे. यातील बहुसंख्य धार्मिक स्थळे पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवरील आहेत. शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार खुल्या भूखंडावर १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय आहे. त्यामुळे १५ टक्क्यांपर्यंत बांधकामे असलेली धार्मिक स्थळे नियमित करण्याचा ठराव महापलिकेने मंजूर करून शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. मात्र, त्यावर प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे पालिकेने आपल्याच मिळकतींचा उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्वेक्षण केले आहे. या अहवालानुसार शहरात मंजूर अभिन्यासातील सुमारे ५५० खुल्या जागा असून, त्यापैकी ६५ ठिकाणी बांधकाम झाल्याचे नगररचना विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक पूर्व विभागातील सर्वाधिक २८ मिळकतींचा समावेश आहे. त्याखालोखाल नवीन नाशिक १५ तर नाशिक पश्चिम विभागातील १० मिळकतींचा समावेश आहे. विभागातील अभिन्यासातील खुल्या मिळकतींवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित विभागीय अधिकारी आणि उपअभियंत्यांना आयुक्तांनी जाब विचारला असून, याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

धार्मिक स्थळांबाबत ३० ला बैठक

शहरातील ६४७ अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणार असल्याने सरकारने यावर हालचाली गतिमान केल्या आहेत. मोकळ्या भूखंडावर १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय करण्याचा महासभेचा ठराव सरकारकडे प्रलंबित आहे. ही धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळ नियमितीकरणासाठी महाराष्ट्र नगररचना अधिनियम कलम ३७ (१) नुसार अनुज्ञेय करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केल्यानंतर ३० जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांनी नाशिकच्या धार्मिक स्थळांबाबत मंत्रालयात बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पदोन्नतीद्वारे दोन एसीपींची नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गृह विभागाने सोमवारी (दि. २९) पदोन्नती मिळालेल्या सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या (एसीपी) बदल्या केल्यात. त्यात नाशिक शहरासाठी दोन अधिकारी देण्यात आले असून, शहरातील दोघा अधिकाऱ्यांची पदोन्न्तीने बदली करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सरकारने पदोन्नती दिली होती. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. पदोन्नती मिळाली पण तसे आदेश नसल्याने संबंधित अधिकारी आहे त्या पदावर कार्यरत होते. या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. यापूर्वी थेट एसीपींच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात नवी मुंबई येथून प्रदीप जाधव आणि पुणे शहर पोलिस दलातील समीर शेख या दोघा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील एसीपींची संख्या सातच्या घरात पोहचली आहे.

अशी झालीय पदोन्नती

अधिकाऱ्याचे नाव..........कोठून.........कोठे

मंगलसिंग सूर्यवंशी........पोलिस निरीक्षक, नाशिक शहर........एसीपी, नाशिक शहर

प्रभाकर रायते........पोलिस निरीक्षक, नाशिक शहर........एसीपी, टीआरटीआय, नाशिक

अनिरूद्ध आढाव........पोलिस निरीक्षक जळगाव........एसीपी, नाशिक शहर

सोमनाथ तांबे........पोलिस निरीक्षक, नाशिक शहर........एसीपी, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती

अशोक करपे........एलसीबी, नाशिक ग्रामीण........एसीपी, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर

राजेंद्र पडवळ........पोलिस निरीक्षक, नाशिक ग्रामीण........एसीपी, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीतून अखेर सुटका

$
0
0

नाशिक : मुबलक पाऊस कोसळल्याने गंगापूर आणि दारणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर आणि विरोधकांच्या दबावामुळे शहरातील पाणीकपात अखेर रद्द करण्यात आली आहे. महापौर रंजना भानसी यांनी याबाबतचे आदेश दिले. तब्बल महिनाभरानंतर आजपासून शहरात दोन वेळा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.

सविस्तर वृत्त...३

येडियुरप्पांनी

जिंकला विश्वास

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारवर सोमवारी विधानसभेत विश्वास व्यक्त करण्यात आला. येडियुरप्पा यांनी मांडलेला विश्वासदर्शक ठराव सोमवारी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्या पाठोपाठ गेल्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्पही मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आला नाही.

सविस्तर वृत्त...१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महम्मद साहब, आपकी याद मे!

$
0
0

रफी यांच्या गीतांची रंगली सुरेल मैफल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जॉन जानी जनार्दन, आज मौसम बडा, मस्त बहारोंका मै आशिक अशा एकापेक्षा एक सरस गीतांची मैफल नाशिककरांना स्वरात चिंब करून गेली. निमित्त होते ए. एन. ग्रुपतर्फे आयोजित 'महम्मद साहब, आपकी याद मे' या कार्यक्रमाचे.

प. सा. नाट्यगृहात स्व. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ गायक घनश्यम पटेल यांनी या कार्यक्रमाची प्रस्तुती केली. छु लेने दो नाजूक गुनगुना रहे है भवरे, बेखुदी मे सनम, तुम्हारी नजर क्यु खपा हो गयी, मस्त बहारो का, क्या हुवा तेरा वादा, जवानिया मस्त मस्त अशा बहारदार गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. तत्पूर्वी आमदार देवयानी फरांदे, डॉ. नारायण देवगावकर, पत्रकार संजय देवधर, डॉ. पटेल आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले.

एक हसीन शामको दिल मेरा खो गया या गीताने घनश्याम पटेल यांनी मैफलीचा प्रारंभ केला. ए. एन. कराओके क्लबचे संचालक नितीनकुमार चव्हाण या मैफलीचे संयोजन केले. मोहम्मद रफी यांची लोकप्रिय गाणी कराओके म्युझिक ट्रॅक समवेत नाशिकच्या हौशी कलाकारांनी सादर केली. मुख्य गायक पटेल यांच्यासह जयंत चांदवडकर, स्मिता पांडे, प्रकाश रत्नाकर, अंजली चव्हाण या कलाकारांनी सुरेल गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. फिर मिलोगे इस बात का वादा करलो या समर्पक गीताने मैफलीचा समारोप करण्यात आला. उस्मान पटणी यांनी अभ्यासपूर्ण व खुमासदार निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुसुमाग्रज’मध्ये आज गजल मैफल

$
0
0

'कुसुमाग्रज'मध्ये

आज गजल मैफल

नाशिक : शहेनशाह-ए-गजल मेहदी हसन यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि आनंदस्वर यांच्यातर्फे मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी ६.३० वाजता 'गुलों में रंग भरें' या गजल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. विशाखा हॉल, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे होणाऱ्या या कार्यक्रमात गायक आनंद अत्रे गजल पेश करणार असून तबल्यावर सतीश पेंडसे तर निवेदन अपर्णा क्षेमकल्याणी करणार आहेत. सार्थक कन्स्ट्रक्शन्स आणि ग्लोबल व्हिजन अॅकॅडमी यांचे सहकार्य या मैफलला लाभले आहे. गजलप्रेमींनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर. एम. ग्रुपतर्फे दोन गीत मैफिली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर. एम. ग्रुप, आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी महान गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प. सा. नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता 'यादे रफी' आणि 'रंग मराठमोळा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे यंदा १९ वे वर्ष आहे. दोन दिवसाच्या या कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि. ३१) 'यादे रफी' हा कार्यक्रम होईल. तर गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) 'रंग मराठमोळा' हा मराठी लोकनृत्य आणि लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सर्वांसाठी मोफत असलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आर. एम. ग्रुपचे संचालक प्रकाश साळवे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’च्या अध्यक्षपदी शशिकांत जाधव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज् अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (निमा) वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ जुलै रोजी सायंकाळी ५.३० रोजी सातपूर येथील निमा सभागृहात पार पडणार आहे. यात लघु उद्योग गटातील उपाध्यक्ष शशिकांत जाधव हे अध्यक्षपदाचा पदभार मावळते अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांच्याकडून स्वीकारणार आहेत.

'निमा'ची निवडणूक दर दोन वर्षांनी होते. त्यानुसार गेल्या निवडणुकीत मोठ्या उद्योग गटातील हरिशंकर बॅनर्जी हे अध्यक्षपदी तर लघु उद्योग गटातून शशिकांत जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. अध्यक्षपदाचा कालावधी एक वर्षाचा असतो. नूतन अध्यक्ष शशिकांत जाधव यांचा कालावधी हा २०१९-२० हा आहे. निमाची स्थापना १९७१ साली स्थापन झाली असून, सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यात शशिकांत जाधव हे ५० वे अध्यक्ष असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादरोडवर मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आषाढी अमावस्येनिमित्त मद्याची होणारी तस्करी रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागला यश मिळाले आहे. सीमावर्ती भागासह जिल्हाभरात विभागाने नाकाबंदी लावली असून, औरंगाबाद रोडवरील पहिल्याच कारवाईत पथकाने एकास अटक केली. अल्टो कारसह विदेशी मद्याचा सुमारे एक लाख रुपये किमतीचा मद्यसाठा पथकाने जप्त केला आहे.

अबकारी खात्याच्या पथक क्रमांक एकचे दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक यांना सोमवारी (दि. २९) मिळालेल्या माहितीवरून भरारी पथकाने नाशिक-औरंगाबाद मार्गावरील लाखलगाव चौफुली येथे नाकाबंदी केली. यावेळी आनंद पद्मनाभ शेट्टी (वय ५४, रा. वैभव हाईटस, पाथर्डी फाटा) हा संशयित बेकायदा मद्याची वाहतूक करताना सापडला. संशयिताच्या ताब्यातील मारुती अल्टो (एमएच १५ एचएच ९२४८) कारमध्ये विविध कंपन्यांचा देशी-विदेशी मद्याचा साठा आढळून आला. संशयितास अटक करीत पथकाने कारसह मद्यसाठा असा सुमारे १ लाख ८ हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ व जिल्हा अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, जवान विलास कुवर, सुनील पाटील, श्याम पानसरे, धनराज पवार, अनिता भांड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखले वितरण होणार सुकर

$
0
0

नाशिक : दहावी आणि बारावीचे निकालांनंतर विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी उडणारा गोंधळ टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गुरुवार, १ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी अर्ज वितरित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेशाचे वेध लागतात. मात्र, यासाठी विविध दाखले सादर करणे अनिवार्य ठरते. यातील त्रुटी आता टाळण्यात आल्या आहेत.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसनाचा उद्या आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काश्यपी, नर्मदा सरोवर, भावली, भूम आदी प्रकल्पांतर्गतचे पुनर्वसन आणि प्रकल्पबाधित यासंबंधीची आढावा बैठक गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) नाशिकरोड येथे होणार आहे. राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर भंडारी हे सायंकाळी ५.३० वाजता प्रमिला लॉन्स, पिंपळगाव बसवंत येथे व्याख्यानमालेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृह पिंपळगाव येथे मुक्काम करणार आहेत. शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी ते देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे जाणार आहेत. तेथे शतावरी औषधी वनस्पती पाहणी आणि शेतकरी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता ते इगतपुरीत आरोग्यविषयक वस्तूंचे वाटप आणि शालेय विद्यार्थी गुणगौरव समारंभास उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images