Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरात दमदार हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात रविवारीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने सहा ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत शहर परिसरात ९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. २४ तासांत शहरात एकूण १७.८ मिलिमीटर पाऊस पडला.

शहरात पावसाने चांगलाच जोर धरला असून, अनेक भागात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात वाहने आदळून अपघात होत आहेत. शहर आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अंबड परिसरात एक झाड पडले होते. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे पथक पोहोचल्याने हे झाड रस्त्यातून त्वरित हटविण्यात आले. दुसरी घटना विद्याविकास सर्कल येथे घडली. या वर्दळीच्या भागात झाड पडत असल्याची कल्पना नागरिकांना आल्याने काही काळ येथील वाहतून थांबविण्यात आली होती. हे धोकादायक झाड त्वरित हटविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातही झाड कोसळले. रविवार असल्याने या परिसरातील कार्यालये बंद असल्याने येथे वर्दळ कमी असल्याने दुर्घटना टळली. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या भिंतीजवळ एक झाड जमिनीला टेकले होते त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडथळा येत होता. अग्निशमन दलास माहिती मिळताच फायरमन गवळी, श्याम राऊत यांच्या पथकाने या ठिकाणी धाव घेऊन धोकादायक फांदी हटविली. वाढत्या पाण्याचा अंदाज घेऊन अग्निशमन दलाच्या वतीने नदीकाठच्या रहिवाशांना सर्तकतेचा इशारा देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाड रेल्वे गेट तीन दिवस बंद म टा वृत्तसेवा निफाडशिर्डी सुरत अर्था

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड-पिंपळगाव बसवंत मार्गावर कुंदेवाडी गावाजवळ असलेले मध्य रेल्वेचे रेल्वे गेट सोमवारपासून पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. यामुळे मार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या निफाड रेल्वे स्टेशन येथील रेल्वे फाटक क्र ९९ येथे अप आणि डाऊन मार्गावरील काम सुरू असल्याने सोमवार २९, ३० व ३१ जुलै हे तीन दिवस सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. गेट बंद असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

रेल्वे गेट सलग तीन दिवस बंद असल्याने गुजरातकडून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयासाठी पिंपळगाव बसवंत येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दावचवाडी, कुंदेवादी रौळस, पिंप्री अशा अनेक गावातून निफाडला येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.

असा आहे पर्यायी मार्ग

रेल्वे गेटचे काम सुरू असल्यामुळे या मार्गाला पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. पिंपळस, पिंप्री, दावचवाडी नांदुर्डी, उगाव शिवडी निफाड असा राहणार आहे. यामुळे १५ किलोमीटरचे अंतर वाढून वेळ व पैसा खर्च होणार आहे. हे काम रेल्वेने रात्री करायला हवे होते असे मत अनेकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली. २४ तासांत ५६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्र्यंबकेश्वरवासीयांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला.

त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठा पुन्हा पाण्यात गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले असून, नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात सातत्याने अतिवृष्टीची नोंद होत असून, गंगापूर धरण समूहासह दारणा व जवळपासच्या अन्य धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ५९७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ४८ तासांमध्ये ११५७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांत इगतपुरीत अनुक्रमे २१२ आणि १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर त्र्यंबकेश्वरमध्ये अनुक्रमे १४० आणि १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पर्जन्यवृष्टीच्या निकषांनुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

संबंधित वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांदगाव मतदारसंघातपंकज भुजबळच हवे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील पाणीप्रश्नासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी आमदार पंकज भुजबळ यांना समर्थन देऊन त्यांच्या पाठीशी समर्थपणे राहण्याचा निर्धार रविवारी नांदगाव येथे झालेल्या भुजबळ समर्थकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. नांदगावमधील राष्ट्रवादीचे काही ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी भुजबळ हटाव नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा पंकज भुजबळ आमदारकी मिळवतात का, हा महत्त्वाचा मुद्दा असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी भालूर येथे झालेल्या बैठकीत भुजबळ हटावचा नारा देऊन उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, रविवारी नांदगाव येथे भुजबळ समर्थकांची विशेष बैठक होऊन नांदगावच्या विकासासाठी पुन्हा भुजबळच हा सूर आळवण्यात आला. या वेळी मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रईस फारुकी, डॉ. वाय. पी. जाधव, विजय पाटील, बाळकाका कलंत्री, भाऊसाहेब सूर्यवंशी, आबा साळुंके, शिवाजी जाधव, संजय जाधव, तेजस्विनी इप्पर, दादा पगार, देवदत्त सोनवणे आदींनी आपल्या भाषणातून पंकज भुजबळ हेच विधानसभेत सक्षम पर्याय असून, त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा केला. आमदार भुजबळ नांदगाव विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे सक्षम पर्याय असल्याचा सूर आळवण्यात आला. आमदार भुजबळ नांदगावचा विकास करतील, अशी खात्री या बैठकीत देण्यात आली. छगन भुजबळ यांनी मांजरपाडासारखा प्रकल्प उभारल्याने चांदवड व येवला मतदारसंघात पाणी नेऊन शेतीचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या अनुपस्थितीत झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण असून, भुजबळांनी डॅमेज कंट्रोल केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्पलाइनमुळेच आज शिकतोय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'दहावीनंतर कॉलेज कसे करावे अशा विवंचनेत असताना 'मटा'ने मला हेरले. माझी आर्थिक विवंचना पाहिली आणि 'मटा हेल्पलाइन'साठी माझी निवड केली. आमचे घर फार मोठे नाही; परंतु आई-वडिलांचा पाठीवर हात होता. वडील म्हणायचे 'तू शिक, पैशांची चिंता करू नको', परंतु मला कळत होते. दहावीनंतर माझे शिक्षण करणे त्यांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे, पण ऐनवेळी 'मटा' मदतीला धावून आला आणि आज हेल्पलाइनमधून मिळालेल्या पैशांवरच माझे शिक्षण सुरळीत सुरू आहे' हे शब्द आहेत रुपेश विश्वास गांगुर्डे याचे. 'मटा हेल्पलाइन २०१३' मधील तो एक लाभार्थी होता.

'माझे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण कसे करायचे या विवंचनेत आम्ही होतो. अशातच 'मटा' देवदूतासारखा धावून आला, माझी आर्थिक मदत केली. आज मी माझ्या मनासारखे शिक्षण घेत आहे ते केवळ 'महाराष्ट्र टाइम्स'च्या माध्यमातून समाजाने केलेल्या मदतीमुळेच. 'मटा' तुम्हालाही इतरांना मदत करण्यासाठी समर्थ बनवेन, फक्त तुम्ही घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्या, असे रुपेश म्हणतो. रूपेश आता बीएएमएसच्या पहिल्या वर्षाला आहे. मुंबई, वरळी येथील आर. ए. पोतदार मेडिकल कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे.

वडील विश्वास गांगुर्डे यांचा रिक्षा व्यवसाय असल्याने त्यातून हवे तितके अर्थार्जन होत नाही. अशात संसाराचा गाडा चालवायचा की मुलांचे शिक्षण करायचे या द्विधा अवस्थेत असतानाच 'मटा'ने त्याच्या हुशारीला पारखत हेल्पलाइनच्या उपक्रमाद्वारे मदत मिळवून दिली. आज तो त्याचे आवडीचे शिक्षण घेत इतरांनाही मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस स्कूटीहटविण्याची मागणी

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोडच्या जेलरोडवरील सेंट फिलोमिना स्कूलसमोरील ड्रीम मिनी मार्केट बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दहा-पंधरा दिवसांपासून जुनी अॅक्टिव्हा स्कूटी उभी आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही ही दुचाकी नेण्यासाठी कोणीही आलेले नाही. पोलिसांनी येऊन पाहणीही केली. ही दुचाकी चोरीची तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या प्रकरणी कार्यवाहीची मागणी मनविसेचे नितीन धानापुने, शशी चौधरी, सागर दाणी, गुड्डू शेख, मयूर कटारे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकी

$
0
0

सोमवार, २९ जुलै

व्याख्यान

सावाना पुस्तक मित्र मंडळातर्फे रविराज गंधे यांचे 'माध्यमरंग' या पुस्तकावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गंधे यांच्या 'माध्यमरंग' या पुस्तकाला 'सावाना'चा डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आपल्या या ललितेतर ग्रंथाची ओळख ते स्वतःच करून देणार आहे.

मु. शं. औरंगाबादकर सभागृह, टिळक पथ, सायंकाळी ६ वाजता

गुरूवार १ ऑगस्ट

व्याख्यान

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांचे व्याख्यान होणार आहे.

मु. शं. औरंगाबादकर सभागृह, टिळकपथ, सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद पगारेंच्या लघुपटाला पुरस्कार

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या कृषिकन्या या विषयावरील लघुफिल्म निर्मितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नाशिकचे आनंद पगारे यांच्या कृषिकन्या या माहितीपटाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय लघुचित्रपट स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत पार पडला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून फिल्म्सचा सहभाग होता. त्यातून शासनाने उत्कृष्ट लघुचित्रपट प्रथम पारितोषिक नाशिकचे आनंद पगारे यांच्या कृषिकन्या या माहितीपटाला दिला. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ५१ हजारचा चेक असे होते. दादाजी पगारे या मालेगाव तालुक्यातील सायने गावातील युवकाने १७ वर्षांपासूनच लघुपट निर्मितीला सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्षाविहाराची साधली पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसांपासून श्रावण सरींप्रमाणे कोसळणाऱ्या पावसाचा आनंद लुटत शेकडो नाशिककरांनी पावसाळी 'सुपर संडे' एन्जॉय केला. पावसाच्या सरी अंगावर झेलत तरुणाईसह अनेक कुटुंबीयांचे जथे रविवारी सकाळपासूनच पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरासह लगतच्या ठिकाणांवर धम्माल करताना दिसून आले. संततधार अन् मध्येच विश्रांती घेणाऱ्या पावसामुळे वर्षाविहाराच्या पर्वणीत सहभागी पर्यटकांमधील उत्साह सायंकाळी उशिरापर्यंत कामय होता.

शहरातील पंचवटी, रामकुंड, तपोवन, कपिला संगम, सोमेश्वर, सोमेश्वर धबधबा, बॅक वॉटर परिसर, पांडवलेणी आदी ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होता. खळाळते पाणी पर्यटकांचा उत्साह वाढवित होते. संततधार पावसात कुटुंबीयांसह आलेले बहुसंख्य पर्यटक गरमागरम भजी आणि मक्याच्या कणसांवर ताव मारताना दिसून आले. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांची संख्या अधिक वाढली. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या परिसरातील पार्किंग फुल्ल झाल्याचे दिसून आले. पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पोलिसांनीही पर्यटनस्थळांवर 'वॉच' ठेवला होता. मात्र, तरीही धोकादायक ठिकाणी जात सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना अनावर झाला होता. सोमेश्वर धबधबा येथे तरुणाईची सर्वाधिक गर्दी झाल्याचे दिसले. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली. यावेळी कुणी पावसाच्या पाण्यात चिंब भिजण्याची मजा लुटत होते, तर काही जण रेनकोट, छत्रीने चिंब होणे टाळत पर्यटनाचा आनंद लुटताना दिसले. गेल्या काही दिवसात दमट व उष्ण हवेमुळे त्रासलेल्या पर्यटकांनी रविवारी पावसामध्ये चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. पावसाच्या सरी आणि रविवारची सुटी हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने पर्यटकांनी वर्षाविहारास प्राधान्य देत सुपर संडे एन्जॉय केला. (छायाचित्रे पान ३)

- -

खाणे, पोहण्याची मौज

चार दिवसांनी श्रावण महिन्यास प्रारंभ होत असल्याने अनेकांनी हॉटेलिंगला पसंती दिली. चहा, भजी, मक्याचे कणीस अशा चटकमटक पदार्थांवर ताव मारल्यानंतर पेटपूजेसाठी अनेकांनी हॉटेलची वाट धरली. त्यामुळे सायंकाळनंतर शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये वेटिंग असल्याचे दिसून आले. दोन दिवसाच्या संततधारेने गोदावरीच्या वाढलेल्या पाणीपातळीत मस्ती करण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. काहींनी पाण्यात उड्या घेत पोहण्याची हौस भागवली. काहीजण खळाळत्या पाण्यात जीव धोक्यात घालत सेल्फी घेताना दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावा सेनेची बैठक छावा क्रांतिवीर सेना बैठकपंचवटी - शिर्डी येथे होणाऱ्या छावा क्रांत

$
0
0

पंचवटी : शिर्डी येथे होणाऱ्या छावा क्रांतिवीर सेनेच्या पाचव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाबाबतची आढावा बैठक वरदलक्ष्मी लॉन्समध्ये झाली. बैठकीत संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी अधिवेशनासंदर्भात माहिती दिली. प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला असून, अन्य समस्यांवर संघटन पातळीवर आपण यापुढेही काम करीत राहणार असल्याचे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले. शिवा तेलंग, उमेश शिंदे ,शिवाजी मोरे, संतोष माळोदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, नितीन सातपुते, नितीन दातीर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक - स्कूलमेट

$
0
0

मेरी हायस्कूलतर्फे वृक्षारोपण

वृक्षारोपण करणे व वृक्षांचे जतन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रियंका निकम यांनी केले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी व समतोल राखण्यासाठी मेरी हायस्कुल मधील स्काऊट व गाईड विभागाचे वतीने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे असे उपप्रमुख नरेंद्र मोहिते यांनी सांगितले. शिक्षक प्रतिनिधी व शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे यांच्या संकल्पनेतून विभागाच्या सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण करून संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. यावेळी मनोहर कुलकर्णी, यशश्री रत्नपारखी, कविता खोटरे, कांचन कोथळकर, यशश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

- -

स्ट्रॉबेरी इंग्लिश शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा

स्ट्रॉबेरी इंग्लिश माध्यमिक शाळेने पीजी आणि मिनी केजी विद्यार्थ्यांसाठी पालकांसह एक फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली. स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू फक्त मजेने शिकण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि प्रेक्षकांच्या समोर बोलणे आणि त्यांच्या पालकांशी मजबूत नातेसंबंध जोडण्याची संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हाच होता. फॅन्सी ड्रेस युवा आणि पालकांसाठी देखील सर्वात रोमांचकारी गोष्टींपैकी एक आहे. स्पर्धेमध्ये पालकांनीदेखील त्यांच्या मुलांसह भाग घेतला होता. गणपती स्तोत्र आणि शाळेची शपथ घेऊन स्पर्धा सुरू झाली. परीक्षक सोनिया भट्ट आणि जेम्स इमॅन्युएल यांना संचालिका सायली काळे आणि प्राचार्य मणप्रीत कौर यांनी सन्मानित केले. फॅन्सी ड्रेस ड्रेसची थीम अतिशय अनोखी होती. फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला स्वच्छता, वृक्ष संवर्धन, राष्ट्रीयता, संस्कृती आदींबद्दल संदेश दिला. स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम शिक्षण अनुभव असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांना त्यांच्यातील छोट्या छोट्या प्रतिभांचा शोध घेण्यासाठी मंच उपलब्ध झाला. मनप्रीत आणि पीजी आणि मिनी केजी शिक्षकांच्या समन्वयाने यशस्वीरित्या स्पर्धा आयोजित केली गेली.

- -

इस्पॅलिअर शाळेत कारगिल दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

देशासाठी युद्धभूमीवर शत्रूशी सामना करत लढाई जिंकलेल्या कारगिल युद्धातील जवानांना इस्पॅलियर स्कूलमधील विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने वंदन करत विजय दिनानिमित्त विजयोत्सव साजरा केला. यावेळी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी जवानाची मुलगी आणि वडील यांचे नाते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, स्केटिंगच्या सहाय्याने देशभक्तीपर गीतांवर नाट्य-नृत्य सादर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. युद्धीभूमीवर शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांची अभिमानास्पद वाटणारी भावना, पत्नीचे व मुलांची प्रेरणा असा प्रवास यावेळी नृत्याविष्कारातून उलगडून दाखविण्यात आला. शिक्षक राहुल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे प्रमुख सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापिका अंकिता कुरिया आदी उपस्थित होते.

- -

रासबिहारी शाळेत पालक-शिक्षक संघाची स्थापना

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक आणि शाळा यामधील दुवा असलेली शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी पालक-शिक्षक संघ स्थापना झाली. यावेळी शाळेमध्ये सरकारमान्य नियमावलीप्रमाणे नवीन पालक शिक्षक संघासाठी पालक प्रतिनिधी, संयुक्त सचिव, वाहतूक सचिव आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. सर्व शिक्षक व शिकक्षेतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने प्रिया सोनवणे, निवेदिता कमोद आणि बिंदु विजयकुमार यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

- -

रायफल शूटिंगमध्ये ग्रिष्माचे यश

कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे आयोजित रिजनल स्पोर्ट्स् व गेम्स २०१९च्या आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेत फ्रवशी अॅकॅडमीची ग्रिष्मा लोखंडे या विद्यार्थिनींनी एअर पिस्तुल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापकीय मंडळाने ग्रिष्माच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.

- -

प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत कारगिल दिन

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत कारगिल युद्धातील पराक्रमी वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शाळेतील कब-बुलबुलचे विद्यार्थी व मुख्याध्यापिका, शिक्षक यांनी मेणबत्ती पेटवून सामूहिक गीत 'आझादी की खुली हवा में' गायन करून युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री खोडके यांनी जवानांनी केलेल्या कार्याचा पराक्रम सर्वांना सांगितला. प्रज्ञा जोशी यांनी कारगिल युद्धाचा इतिहास सर्वांना सांगितला. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना भामरे, सुनंदा साळुंखे, भावना जगताप, तृप्ती बडगुजर, भगवंत महाले, महेंद्र गवळी व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या आठवड्यात राज्यस्तरीय समितीकडून घेतल्या जाणार होत्या; पण राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप व शिवसेनेत जात असल्यामुळे या मुलाखतीसुद्धा आता लांबणीवर पडल्या आहेत. विशेष म्हणजे मुलाखत घेणाऱ्या राजस्तरीय समितीत असलेल्या तीन नेत्यांपैकी एक असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनीसुद्धा भाजपचा रस्ता धरल्यामुळे या समितीत आता बदल होणार आहेत. त्यानंतर या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादीने अगोदर इच्छुक उमेदवारांसाठी फॉर्म भरून घेतले. त्यानंतर या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत राजस्तरीय नेत्यांची समिती केली. जिल्ह्यात यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मधुकरराव पिचड यांची नावे होती; पण त्यात आता पिचड गळाल्यामुळे या मुलाखती घेण्यात अडचणी आल्या आहेत. भुजबळ यांचे नावही पक्षाला रामराम ठोकण्यात आघाडीवर असले तरी त्यांनी मात्र इन्कार केला आहे. त्यामुळे या मुलाखती आता केव्हा होणार हे अद्याप निश्चित नाही.

जिल्ह्यातील १५ पैकी १४ विधानसभा मतदारसंघांसाठी ४० हून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात नाशिकच्या चार विधानसभा मतदारसंघांत २५ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित अकरा मतदारसंघांत उमेदवारी मागण्याची संख्या तुलनेत कमी आहे. विशेष म्हणजे चारही आमदारांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे, तर इतर ठिकाणी जुनेच चेहरे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक - स्कूलमेट

$
0
0

मेरी हायस्कूलतर्फे वृक्षारोपण

वृक्षारोपण करणे व वृक्षांचे जतन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रियंका निकम यांनी केले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी व समतोल राखण्यासाठी मेरी हायस्कुल मधील स्काऊट व गाईड विभागाचे वतीने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे असे उपप्रमुख नरेंद्र मोहिते यांनी सांगितले. शिक्षक प्रतिनिधी व शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे यांच्या संकल्पनेतून विभागाच्या सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण करून संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. यावेळी मनोहर कुलकर्णी, यशश्री रत्नपारखी, कविता खोटरे, कांचन कोथळकर, यशश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

- -

स्ट्रॉबेरी इंग्लिश शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा

स्ट्रॉबेरी इंग्लिश माध्यमिक शाळेने पीजी आणि मिनी केजी विद्यार्थ्यांसाठी पालकांसह एक फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली. स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू फक्त मजेने शिकण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि प्रेक्षकांच्या समोर बोलणे आणि त्यांच्या पालकांशी मजबूत नातेसंबंध जोडण्याची संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हाच होता. फॅन्सी ड्रेस युवा आणि पालकांसाठी देखील सर्वात रोमांचकारी गोष्टींपैकी एक आहे. स्पर्धेमध्ये पालकांनीदेखील त्यांच्या मुलांसह भाग घेतला होता. गणपती स्तोत्र आणि शाळेची शपथ घेऊन स्पर्धा सुरू झाली. परीक्षक सोनिया भट्ट आणि जेम्स इमॅन्युएल यांना संचालिका सायली काळे आणि प्राचार्य मणप्रीत कौर यांनी सन्मानित केले. फॅन्सी ड्रेस ड्रेसची थीम अतिशय अनोखी होती. फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला स्वच्छता, वृक्ष संवर्धन, राष्ट्रीयता, संस्कृती आदींबद्दल संदेश दिला. स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम शिक्षण अनुभव असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांना त्यांच्यातील छोट्या छोट्या प्रतिभांचा शोध घेण्यासाठी मंच उपलब्ध झाला. मनप्रीत आणि पीजी आणि मिनी केजी शिक्षकांच्या समन्वयाने यशस्वीरित्या स्पर्धा आयोजित केली गेली.

- -

इस्पॅलिअर शाळेत कारगिल दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

देशासाठी युद्धभूमीवर शत्रूशी सामना करत लढाई जिंकलेल्या कारगिल युद्धातील जवानांना इस्पॅलियर स्कूलमधील विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने वंदन करत विजय दिनानिमित्त विजयोत्सव साजरा केला. यावेळी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी जवानाची मुलगी आणि वडील यांचे नाते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, स्केटिंगच्या सहाय्याने देशभक्तीपर गीतांवर नाट्य-नृत्य सादर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. युद्धीभूमीवर शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांची अभिमानास्पद वाटणारी भावना, पत्नीचे व मुलांची प्रेरणा असा प्रवास यावेळी नृत्याविष्कारातून उलगडून दाखविण्यात आला. शिक्षक राहुल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे प्रमुख सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापिका अंकिता कुरिया आदी उपस्थित होते.

- -

रासबिहारी शाळेत पालक-शिक्षक संघाची स्थापना

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक आणि शाळा यामधील दुवा असलेली शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी पालक-शिक्षक संघ स्थापना झाली. यावेळी शाळेमध्ये सरकारमान्य नियमावलीप्रमाणे नवीन पालक शिक्षक संघासाठी पालक प्रतिनिधी, संयुक्त सचिव, वाहतूक सचिव आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. सर्व शिक्षक व शिकक्षेतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने प्रिया सोनवणे, निवेदिता कमोद आणि बिंदु विजयकुमार यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

- -

रायफल शूटिंगमध्ये ग्रिष्माचे यश

कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे आयोजित रिजनल स्पोर्ट्स् व गेम्स २०१९च्या आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेत फ्रवशी अॅकॅडमीची ग्रिष्मा लोखंडे या विद्यार्थिनींनी एअर पिस्तुल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापकीय मंडळाने ग्रिष्माच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.

- -

प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत कारगिल दिन

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत कारगिल युद्धातील पराक्रमी वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शाळेतील कब-बुलबुलचे विद्यार्थी व मुख्याध्यापिका, शिक्षक यांनी मेणबत्ती पेटवून सामूहिक गीत 'आझादी की खुली हवा में' गायन करून युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री खोडके यांनी जवानांनी केलेल्या कार्याचा पराक्रम सर्वांना सांगितला. प्रज्ञा जोशी यांनी कारगिल युद्धाचा इतिहास सर्वांना सांगितला. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना भामरे, सुनंदा साळुंखे, भावना जगताप, तृप्ती बडगुजर, भगवंत महाले, महेंद्र गवळी व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाडचे पाणी पाइपलाइनने नेण्यास विरोध

$
0
0

मडकीजांब येथील बैठकीत शेतकऱ्यांचा संताप

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाइपलाइनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मडकीजांब येथे झालेल्या सभेत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.

वाघाड धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी केला जातो. हातनोरे, निळवंडी, पाडे, मडकीजांब, दिंडोरी, कोराटे, अक्राळे, मोहाडी, आंबेदिंडोरी, खतवड, जानोरी, जऊळके दिंडोरी या गावांची शेती या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. या कालव्याची रब्बी व उन्हाळी आवर्तने शेतीसाठी वरदान ठरतात. द्राक्षशेती सुद्धा याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.

या कालव्यावर अनेक वर्षांपासून उचल व प्रवाही पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या असून पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाची निर्मिती केली आहे. पाणी वापर संस्थांना त्यांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करून पाणी पुरवण्यात येते. त्या प्रमाणात पाणीपट्टीही आकारण्यात येते. अशी परिस्थिती असताना काही दिवसांपूर्वी वाघाड पाणी वापर महासंघाच्या बैठकीत पाणी गळतीचे कारण देत वाघाड डाव्या कालव्यातून ० ते १५ किलोमीटरपर्यत, तसेच वाघाड उजवा कालव्यातून ० ते ४५ किलोमीटरपर्यंत बंदिस्त पाइपलाइनने पाणी नेण्याचा ठराव झाल्याची माहिती शेतकऱ्यांना कळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मडकीजांब येथे बैठक घेऊन या निर्णयास कडाडून विरोध केला.

यावेळी वाघाड पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष तुषार वसाळ, उपाध्यक्ष मधुकर पवार, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत राजे, प्रकाश वडजे, दिनकर जाधव, दत्तात्रय जाधव, दिलीप जाधव, बाळासाहेब मुरकुटे, कैलास पाटील, बाळासाहेब धुमणे, रमेश वडजे आदी उपस्थित होते.

...तर आंदोलन करू

पाणी गळती रोखण्यासाठी महासंघाने आवश्यक त्या कठोर उपाययोजना कराव्यात, संपूर्ण कॅनालला सिमेंट काँक्रिटीकरण करावे, अनधिकृत पाणी वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी, प्रत्येक किलोमीटरला पाणी मोजण्याची व्यवस्था करावी व पाणी गळती थांबवावी अशा सूचना शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. तरीही पाइपलाइनचा निर्णय घेतला तर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलपटू सुजाताची क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हरसूलच्या कन्या छात्रालयाची तेरा वर्षीय सायकलपटू सुजाता कालिदास वाघेरे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, कुठलेही शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेता विविध सायकलिंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याने तिची केंद्रीय क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या आदिवासीकन्येला आता शास्रोक्त प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. पेठ तालुक्यातील कोहरपाडा येथील सुजाताचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

सुजाताला लहानपणापासून सायकलची आवड होती. घर ते शाळा हे चार किलोमीटरचे अंतर पायी जात असताना मिळेल त्याची सायकल घेऊन सुजाता सराव करीत होती. तिच्यातील गुण हेरून सुजाताच्या वडिलांनी विश्व हिंदू परिषदेच्या हरसूल येथील कन्या छात्रालयात प्रवेश घेतला. तेथे तिच्या कौशल्याला चालना मिळाली. वडील शेती करतात. एका साधारण कुटुंबातील सुजाताला सायकलिंग स्पर्धेचा थाट अजिबात माहीत नव्हता. स्पर्धेत वेगळ्या प्रकारचा ड्रेस लागतो, हेल्मेट लागते हेदेखील तिला माहीत नव्हते. स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर धावपळ करून तिला या सुविधा पुरवण्यात आल्या. कन्या छात्रालयातील शिक्षकांनी सुजाताला स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला म्हणून तिने सर्वप्रथम तालुका स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात यश मिळवल्यानंतर तिने जिल्हा पातळीवरही अव्वल क्रमांक पटकावला. त्यानंतर नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक मिळवला. २०१८- १९ मध्ये तिने जसपाल मेमोरियल स्पर्धा (तृतीय क्रमांक), नाशिक पेलेटॉन (प्रथम क्रमांक), जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धा (शासकीय, प्रथम क्रमांक), विभागीय क्रीडा स्पर्धा (शासकीय, द्वितीय क्रमांक), राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा (शासकीय, अमरावती, चौथा क्रमांक), तसेच २०१९- २० मध्ये नाशिक पेलेटॉनमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे तिची केंद्रीय क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली आहे. सुजाताची ही कठोर मेहनत व यश बघून, छात्रालयाचे पालक श्याम घरोटे व न्यासाचे कोशाध्यक्ष हेरंब गोविलकर यांनी तिला व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे यासाठी बालेवाडी, पुणे येथील केंद्रीय क्रीडा प्रबोधिनीशी संपर्क साधला व पाठपुरावा केला, त्याचे फलित म्हणून तिची केंद्रीय क्रीडा प्रभोधिनीमध्ये निवड झाली आहे. विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रशिक्षणप्रमुख श्रीराम महाजन, गोविलकर, घरोटे, क्षितिजा खटावकर, सुजाताचे वडील कालिदास वाघेरे, छात्रालय अधीक्षक आदींच्या उपस्थितीत तिचा सत्कार व निरोप समारंभ झाला.

मला सायकलची लहानपणापासून आवड असून, माझ्याकडे असलेल्या साध्या सायकलवरच सराव करते. या भागात शास्त्रशुद्ध शिकवणारे कुणीही नाही. अनुभवातून शिकते आहे. केंद्रीय क्रीडा प्रबोधिनीत निवड झाल्याने शास्त्रोक्त शिक्षण घेता येईल.

- सुजाता वाघेरे, सायकलिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरगाण्यात स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या मदतीने एक कोटी १६ लाख रुपये खर्च करून दहा हजार स्क्वेअर फुटांचा मल्टिपर्पज हॉल साकारणार आहे. 'एचएएल'ने नुकतीच त्याला मान्यता दिली असून, कामाची वर्क ऑर्डरसुद्धा कंत्राटदाराला दिली आहे. आदिवासी भागातील हे पहिले ट्रेनिंग सेंटर राहणार असून, हा संपूर्ण हॉल सोलर रूफ राहणार आहे.

प्रतापगड येथे सुरू होणाऱ्या बांबू क्लस्टरजवळच हे ट्रेनिंग सेंटर होणार असल्याने त्याचा फायदा आदिवासी युवकांना होणार आहे. या मल्टिपर्पज हॉलमध्ये कॅन्टीन, क्लासरूम, कॉन्फरन्स रूम यांसह विविध सुविधा राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या सेंटरसाठी 'एचएएल'कडे पाठपुरावा सुरू होता. त्यांनी त्यासाठी अगोदर प्रस्ताव मागितला. त्यानंतर त्याची पाहणी करून त्याला अंतिम मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी स्किल डेव्हलपमेंट या विषयाच्या गरजेचे महत्त्व सांगितल्यानंतर त्यावर सर्वांनी भर दिला आहे. केंद्र सरकारपासून विविध शासकीय संस्था यासाठी सर्वत्र प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे हे स्किल डेव्हलमेंट ट्रेनिंग सेंटर उपयोगी ठरणार आहे.

बांबू क्लस्टर व स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरसाठी मी समन्वयकाची भूमिका केली. क्लस्टरचे काम पूर्णत्वास आहे, तर ट्रेनिंग सेंटरचा मल्टिपर्पज हॉलही काही दिवसांत तयार होईल. त्याचा आदिवासी युवकांना फायदा होईल.

-डॉ. कविता बोंडे, समन्वयक

--

प्रतापगड येथे 'एचएएल'च्या मदतीने स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर तयार होणार आहे. त्यासाठी एक कोटी १६ लाख रुपये खर्च आहे. क्लस्टर व ट्रेनिंग सेंटरमुळे गावातील विकासाला चालना मिळणार आहे.

-कमळीबाई चव्हाण, सरपंच, प्रतापगड

--

आदिवासी भागातील पहिले स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर हे माझ्या जन्मगावी होणार आहे. त्यासाठी गेले काही दिवस पाठपुरावा केला. आता त्याचे काम १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. बांबू क्लस्टरचे काम जवळपास झाले आहे.

-हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारी लालपरीची’ आज नाशिकमध्ये

$
0
0

फिरत्या प्रदर्शनातून एसटीच्या प्रवासाची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटीचा आमुलाग्र बदल प्रवाशांना कळावा व प्रवाशी सेवचे अंतरग उलगडून दाखवण्यासाठी 'वारी लालपरीची' हे फिरते प्रदर्शन मंगळवारी (दि. ३०) नाशिकरांना बघायला मिळणार आहे. जुन्या सीबीएस बसस्थानकावर सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन असणार आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. नाशिकप्रमाणेच मालेगाव येथे बुधवारी (दि. ३१) नवीन बसस्थानकावर हे दाखवण्यात येणार आहे. एसटीचा आतापर्यंत प्रवास व त्यानंतर झालेले बदल याची संपूर्ण माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. त्यात सत्तर वर्षातील प्रवास, विविध योजना, आगामी काळातील प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. एसटी महामंडळ व एसटी बस फॉर अस फाउंडेशन यांच्यातर्फे हे फिरते प्रदर्शन राज्यभर दाखवण्यात येत आहे. एसटीची सुरुवात १ जून १९४८ रोजी झाली. त्यानंतर तिचा प्रवास कसा होता हे सुद्धा या प्रदर्शनातून बघायला मिळणार आहे. या फिरते प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसी उमेदवारांना संधी द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना संधी देऊन अधिकाधिक ठिकाणी उमेदवारी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

राज्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ओबीसी समाज बांधवांची संख्या अधिक असलेल्या मतदार संघांची चाचपणी करून उमेदवार निश्चित करण्यात यावेत. ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या मतदारसंघाची माहिती प्रदेशाध्यक्ष थोरात यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नाशिक पूर्व मतदार संघातून ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत, अशोक खलाणे, ठाणे येथील ओवळा-माजीवाडा मतदारसंघातून कृष्णा भुजबळ, जालना मतदार संघातून सत्संग मुंडे, परतूरमधून राजेश राठोड, नागपूरमधून संगीता तलमले, कुलाबामधून धनराज राठोड, हडपसरमधून शिवाजी केदारी किंवा प्रशांत सुरासे, परभणीमधून भगवान वाघमारे आदींना उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. विविध समाजातील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याबरोबरच प्रदेश कार्यकारिणीत समाविष्ट करून काम करण्याची संधी द्यावी, अशी सूचनाही पक्षाकडे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा गांधीजींच्या चित्राने ‘रवी’ प्रकाशमान

$
0
0

नाशिकच्या कलाकाराचा राष्ट्रीय स्पर्धेत झेंडा

prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : 'अहिंसा परमो धर्म:' विषय... भारतीय डाक सेवेची राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा...भारतभरातून तब्बल ९००० चित्रे स्पर्धेत उतरलेली आणि या राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा तरुण चित्रकार रवी सोमनाथ दंडगव्हाळ दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावतो, इतकेच नाही तर त्याने चितारलेले 'अहिंसा परमो धर्म:' हे चित्र १५ रुपयांच्या तिकिटावर दिमाखाने झळकते. नाशिकमधील चित्रकाराला बहुमान मिळण्याची ही बहुदा पहिलीच घटना. या तिकिटाचे मंगळवारी (दि. ३०) नाशिकला अनावरण होणार आहे.

यंदाच्या वर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात येत आहे. सरकार, अनेक सेवाभावी संस्था आपल्या राष्ट्रपित्यासाठी आपापल्या परीने काहीतरी करण्याच्या तयारीत असताना भारतीय डाकसेवेने गांधीजींचा अहिंसा परमो धर्म: हा विषय देऊन राष्ट्रीय स्तरावर चित्रस्पर्धेचे आयोजन केले. यात रवी दंडगव्हाळ या तरुणाने नऊ हजार चित्रांमध्ये आपल्या चित्राचे वेगळेपण ठसविले. अॅक्रेलिक माध्यमात काम करणारा हा चित्रकार १९९८ पासून या क्षेत्रात आहे.

स्वत:शी व चित्रनिर्मितीशी प्रामाणिक राहिल्याने रवीला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आर्ट टुडे गॅलरी पुणे, आर्ट प्लाझा मुंबई, बिरला कला व संस्कृती अकादमी कोलकाता, वैश्विक आर्ट गॅलरी पुणे, केरळ ललित कला अॅकॅडमी, गोवा कला अकादमी, ठाणे कला भवन तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शन झालेली आहेत. या उत्तुंग यशाबद्दल मंगळवारी सायंकाळी चार वाजता नाशिक पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे रवी दंडगव्हाळ यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

असे आहे चित्र

अहिंसा परमो धर्म: हा भारतीय तत्त्वातील महत्त्वाचा विचार असून त्याला अनेक कंगोरे आहेत. गांधीजींनी पूर्ण आयुष्य या तत्त्वानुसार आचरण केले. जैन तत्त्वात असणाऱ्या गाय आणि सिंह या प्रतिकांना यात चित्रित केले आहे. गांधीजींशी संबंधित सर्वधर्मसमभाव या अर्थाने सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळाचा समावेश यात केला आहे. शांततेचे प्रतिक म्हणून कबुतरही चित्रित केले असून येणाऱ्या पिढीला हे तत्त्व दिले जावे, या अर्थाने पाटीवर लहान मुलाच्या हस्ताक्षरात 'अहिंसा परमो धर्म:' असे लिहिले आहे. गांधीजींचे प्रतिक म्हणून त्यांचा चेहरा चित्रीत न करता त्यांचे कर्माचे प्रतिक म्हणून हात चित्रित केला आहे.

या पारितोषिकाचा खूप आनंद मला आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे की नाशिकच्या चित्रकाराला हा मान मिळाला. परंतु, तरीही कोणत्याही व्यक्तीचा मोठेपणा किंवा त्याच्या कलाकृतीची उत्कृष्ठता ही पारितोषिकावर ठरू नये, असेही वाटते. त्या कलाकृतीचा आनंद सर्वांनी घ्यावा, रसग्रहण करावे.

- रवी दंडगव्हाळ, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकता विकास केंद्र सुरू करावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आपल्या मोठ्या उद्योग सदस्यांसाठी आपापल्या जागेत छोटेखानी उद्योजकता विकास केंद्र सुरू करावे. आठवड्यातील दोन दिवस तेथे नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करावे, असा सल्ला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातील अतिरिक्त सचिव व विकास आयुक्त राम मनोहर मिश्रा यांनी दिला.

मिश्रा यांना नाशिक भेटीदरम्यान चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत मंडलेचा यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली आणि एमएसएमईसाठी चेंबर उद्योजकता विकास कार्यशाळा, परिषदा, प्रदर्शने अशा विविध उपक्रमांद्वारे कार्य करीत असल्याचे सांगितले. या कामाचे मिश्रा यांनी कौतुक केले.

भेटीदरम्यान नाशिक जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग सहसंचालक पी. डी. रेंदाळकर, चेंबरच्या शेती आणि अन्न प्रक्रिया समितीच्या अध्यक्षा सुनीता फाल्गुने, एमएसएमई उपसमितीच्या अध्यक्षा दीपाली चांडक, कार्यकारिणी सदस्य सचिन शाह, दिलीपसिंग बेनीवाल, राजेश मालपुरे, दिलीप मेढे, सलीम बटाडा, प्रशांत जोशी, सत्यजित महाजन, मिथिला कापडणीस, दीप्ती पंडित, रोहिणी नायडू उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images