Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सक्तीची कर्जवसुली थांबवा

$
0
0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा बँकेवर आंदोलन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सक्तीची कर्जवसुली थांबवा, ठेवीदारांच्या ठेवी परत द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (दि. १५) जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीजवळ धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनानंतर बँकेचे चेअरमन केदा आहेर यांच्याबरोबर आंदोलकांनी चर्चा केली. पण, चर्चेने त्यांचे समाधान झाले नाही.

बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अगोदर मोठ्या कर्जदारांकडून कर्जवसुली करावी, सक्तीने लिलाव करू नये, शासनाने बँकेला मदत करावी असे मुद्दे समोर ठेवले. त्यावर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी गोलमोल उत्तर दिल्याचे संघटनेने सांगितले. पण, आम्ही या वसुलीला ठिकठिकाणी विरोध करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेने थकीत वसुलीसाठी मोहीम उघडली असून, त्याला ठिकठिकाणी विरोध होत आहे. त्याचप्रमाणे पीककर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे बँकेविरोधात वातावरण असताना, हे आंदोलन स्वाभिमानी संघटनने करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, राज्य कार्यकारणी सदस्य साहेबराव मोरे, जिल्हाप्रमुख सुधाकर मोगल, युवा जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव, संजय पाटोळे, भाऊसाहेब तस्कर, गजानन घोटेकर, राम निकम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

..

जिल्हा उपनिबंधकावर मोर्चा

बँकेवर धरणे आंदोलन केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मोर्चा वळवला. यावेळी प्रलंबित कांदा अनुदानाच्या दिरंगाईबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे पीककर्ज न देणाऱ्या सरकारी व सहकारी बँकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॅग लिफ्टिंगप्रकरणी संशयित जाळ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुनियोजित पद्धतीने व्यापाऱ्याच्या कारमधील २१ लाखांची रोकड हातोहात लंपास करणाऱ्या गुजरातमधील आंतरराज्य सराईत टोळीतील आणखी एका सदस्यास अटक झाली आहे. या टोळीने आडगाव आणि पंचवटी भागात यापूर्वी केलेल्या बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

राकेशभाई कांतीभाई तमायचे (रा. कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात) असे अटक झालेल्या नवीन संशयिताचे नाव आहे. क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने या संशयितांकडून आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील ६० हजार रुपये आणि चिंचबन येथील बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यातील एक लाख ९१ हजार रुपये असे दोन लाख ५१ हजार रुपये आणि एक युनिकॉर्न जप्त केली आहे.

....

वाहनास कट का मारला, अशी कुरापत काढून चिंचबन येथील व्यापाऱ्याची बॅग राकेशभाईसह त्याचे साथिदार शिसेदिया उर्फ मुन्ना जयसिंग राठोड (रा. छारानगर) आणि रवी उर्फ रविया इंद्रेकर (रा. कुबेरनगर) आणि मेहरू इंद्रेकर अशा चौघांनी चोरी केली होती. या बॅगेत २१ लाख ५० हजारांची रोकड होती. त्यापैकी राठोड आणि रवीला यापूर्वीच अटक करीत पोलिसांनी १२ लाखांची रोकड हस्तगत केली होती. संशयित आरोपी तमायचे हा नाशिकरोड परिसरातील मुक्तीधामसमोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रँचने त्याच्याही मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात १४ लाख ५१ हजारांची रोकड हस्तगत केली आहे. उर्वरित नऊ लाख ५० हजार रुपयांची रोकड फरार आरोपी मेहरू इंद्रेकर याच्याकडे असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. अटक आरोपीने यापूर्वी पंचवटी व आडगाव परिसरात बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ंचवटी - गुणवंतांचा गौरव (फोटो आहे)प

$
0
0

पंचवटीत गुणवंतांचा गौरव

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व या वर्षात राज्य राष्ट्रीय पातळीवर सहभागी खेळाडू यांचा गुणगौरव समारंभ मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली झाला. अभिषेक प्लाझा म्हसरूळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, श्री छत्रपती पुरस्कार विजेते अविनाश खैरनार, जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशी, शहराध्यक्ष अनिल मटाले, नगरसेवक सलिम शेख, सागरमल मोदी शाळेचे मुख्याध्यापक निकम, विभागाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, मनविसे जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, शहराध्यक्ष सौरभ सोनवणे आदी उपस्थित होते. दीपक निकम यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ वडजे यांनी प्रास्ताविक केले. चिन्मय देशपांडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ कार्यालयावर पेन्शनधारकांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

निवृत्त सहकारी, निमसरकारी व खासगी आस्थापनात काम करणाऱ्या पेन्शनधारकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर सोमवारी आंदोलन केले. इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती व निवृत्ती कर्मचारी समन्वय, लोककल्याण संस्था यांच्या वतीने पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आयुक्त एम. एम. अशरफ यांच्याकडे पेन्शनधारकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर व जळगाव जिल्ह्यातील पेन्शनधारक उपस्थित होते.

किमान पेन्शन साडेसात हजार रुपये देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी पेन्शनधारकांनी केली. तसेच मोफत आरोग्य सुविधा, पेन्शनपासून वंचित असलेल्यांना किमान पाच हजार पेन्शन द्यावी, बँकांमध्ये दरवर्षी होणारा पेन्शनधारकांचा त्रास कमी करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे सुभाष पोखरकर, चंद्रकांत शिंदे, देवीदास जाधव, गोरख माळी, बाळासाहेब सोनवणे, विवेक देशपांडे, जे. आर. सूर्यवंशी, आशा शिंदे आदी पेन्शनधारक आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​​​मालेगावसाठी घुगे यांना संधी

$
0
0

मालेगाव : येथील अप्पर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची पदोन्नतीने बदली झाली असून त्यांच्या जागी पदोन्नतीने सहायक अधीक्षक संदीप घुगे यांची अपर अधीक्षक मालेगाव येथे नियुक्ती झाली आहे. राज्याच्या गृहविभागाने राज्यातील ५२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचा शासननिर्णय सोमवारी जारी करण्यात आला. यात येथील अपर अधीक्षक नीलोत्पल यांची पदोन्नतीने पोलिस उपायुक्त परिमंडळ-५, नागपूर शहर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी संदीप घुगे यांची पदोन्नतीने मालेगाव अपर अधीक्षकपदी बदली झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेत साकारले वनौषधी उद्यान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड महापालिकेच्या पंचक येथील शाळा क्रमांक ४९ च्या मैदानावर उभारलेल्या वनौषधी उद्यानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. पालिकेच्या शाळांतील या पहिल्यावहिल्या वनौषधी उद्यानाची उभारणी पालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आणि महारुद्र नर्सरीचे संचालक योगेश निसाळ यांच्या संकल्पनेतून झाली असून या उद्यानामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता शालेय अभ्यासाबरोबरच वनौषधींची ओळख आणि त्यांचा मानवी आरोग्याशी संबंध या विषयाचाही अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. योगेश निसाळ यांनी पालिकेच्या पंचक येथील शाळा क्रमांक ४९ च्या मैदानावर विविध ३९ प्रकारच्या वनौषधींचा समावेश असलेल्या एका छोटेखानी वनौषधी उद्यानाची उभारणी नुकतीच केली. या उद्यानामुळे पालिकेच्या स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांसह इतर शाळांतील विद्यार्थी आणि नागरिकांनाही वनौषधींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. य उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, नगरसेवक प्रा. शरद मोरे, रंजना बोराडे, प्रशांत दिवे, मुख्याध्यापक कचरू

लभडे आदींसह शिक्षक, पालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनांनी शहर ठप्प

$
0
0

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंदोलनांचा दणका

...

- सीबीएस, त्र्यंबकनाका, गडकरी चौक, खडकाळी, सारडा सर्कलवर वाहनकोंडी

- तब्बल दोन तास ही कोंडी

- शहर वाहतूक बसेसचे वेळापत्रक कोलमडले

- सुमारे तीनशे वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकाचवेळी असलेल्या चार वेगवेगळ्या आंदोलनांमुळे सोमवारी (दि. १५) शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक ठप्प झाली. तब्बल दोन तास वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. स्मार्ट रोडवर एकेरी वाहतूक असताना दोन्ही बाजूंनी वाहने घुसल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली. यामुळे सीबीएस, त्र्यंबकनाका, गडकरी चौक, खडकाळी, सारडा सर्कल येथे वाहनांची कोंडी दिसून आली.

सोमवारचा वार आंदोलनवार ठरला. विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर आंदोलने केली. या आंदोलनासाठी एकच परिसर निवडण्यात आल्याने वाहतुकीचा पुरता फज्जा उडला. सोमवारी सकाळी काँग्रेसने इंधन वाढीविरोधात त्र्यंबकनाका येथे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीवर जिल्ह्यातील पतसंस्थाचा मोर्चा निघाला. या मोर्चानंतर स्वाभिमानी संघटनेचेसुद्धा येथे आंदोलन झाले. यापाठोपाठ बहुजन मुस्लिम संघर्ष समितीचा मोर्चा गोल्फ क्लबवर आला. एका पाठोपाठ आणि काही वेळाच्या अंतरानंतर ही आंदोलने झाल्यामुळे येथील आधीच कमकुवत असलेली वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडून पडली. जिल्हा बँकेच्या म्हणजे जुने आग्रा हायवेवर सध्या स्मार्टरोडचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था एकेरी करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने तब्बल तीनशे ते साडेतीनशे वाहतूक पोलिसांचा फौजफाटा या भागात तैनात केला होता. मात्र, येथील अरुंद रस्त्यांवर वाहतूककोंडीची निर्माण होणारी समस्या वाढतच गेली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या मार्गावर येणारी वाहने थांबवली होती. मात्र, काही वेळेतच येथे वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनचालकांना पुन्हा परतण्याचे मार्गसुद्धा बंद झाले. त्यातच काही वाहनचालकांनी एकेरी मार्गावर विरुद्ध बाजूने वाहने घातली. त्यामुळे एकेरी मार्गसुद्धा बंद पडला. अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका व्हाया मुंबई नाका या रस्त्यासह त्यास जोडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास ही कोंडी कायम राहिली.

सोमवारचा पहिलाच दिवस असल्याने रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त वाहने होती. कॉलेज प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना याचा फटका बसला. ठक्कर बाजार, जुने सीबीएस येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या, तसेच शहर वाहतूक बसेसचे वेळापत्रक कोलमडून पडले. विशेष म्हणजे या सर्व आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली होती. त्यामुळे पूर्वनियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन अगोदर करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

$
0
0

सततच्या पूर परिस्थितीचा घेणार आढावा

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात पाणीच पाणी झाले होते. थोडा पाऊस झाला तरी शहरातील घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे बैठक घेणार आहेत.

रविवारी १४ जुलै रोजी महाराष्ट्र टाइम्समध्ये 'तुंबकेश्वर' हा वास्तवदर्शी लेख प्रसिद्ध झाला होता. नाशिक येथील आढावा बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लेख वाचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत त्र्यंबक येथू जावून वस्तूस्थिती जाणून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी चार वाजता नगरपालिका सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. बैकठीत सिमेंट काँक्रेटच्या अतिरेकामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे काय? याबाबत आढावा घेतला जाणार आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरातील रस्त्यांवर सिमेंटचे थर चढविल्याने घरांच्या उंबऱ्यांपेक्षाही रस्त्यांची उंची झाली आहे. रस्ता उंच आणि मंदिर प्रवेशद्वार व कुशावर्त तीर्थ खोल असे झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट कुशावर्त तीर्थात आणि मंदिर प्रांगणात शिरते. शहरातील घरांमध्येही पाणी शिरते. दरम्यान या पूर परिस्थितीस आजूबाजूच्या टेकड्यांवर झालेले उत्खनन, सपाटीकरण आणि काँक्रिटीकरणही कारणीभूत ठरत आहे. तसेच तहसील कार्यालय आणि नगर पालिका प्रशासन यांनी यापूर्वी पूर परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून कोणती कामे केली आहेत व त्याचा कितपत फायदा झाला याचा देखील आढवा घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...जेव्हा बस पोलिस ठाण्यात येते मटा वृत्तसेवामनमाडबसमधील महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल ब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

बसमध्ये प्रवासी युवतीचा मोबाइल चोरीला गेल्याने चोराच्या तपासासाठी बस प्रवाशांसह थेट पोलिस ठाण्यात आणल्याची घटना सोमवारी सायंकाळी मनमाड येथे घडली. पोलिसांनी प्रवाशांची चौकशी व तपासणी करूनही मोबाइल चोर न सापडल्यामुळे संबंधित युवतीसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

नवापूर-शिर्डी बस चांदवडमार्गे मनमाडकडे येत होती. बसमध्ये चांदवडहून बसलेल्या एका कॉलेज युवतीचा मोबाइल चोरीला गेला. बसमध्ये बसेपर्यंत मोबाइल होता यावर ती युवती ठाम असल्यामुळे तिने चालकाला बस थांबविण्यास सांगून चौकशी करण्याची विनंती केली. मात्र तिच्या मोबाइल स्वीच ऑफ असल्यामुळे त्यावर संपर्क होत नव्हता. त्यामुळे बस थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आली. मात्र ठाण्यात जागा नसल्याने उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर बस उभी करण्यात आली. तेथे मनमाड पोलिसांनी तपासणी करूनही मोबाइल सापडला नाही. यात अर्धा ते पाऊण तास वेळ गेल्याने शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. तसेच मोबाइल न सापडल्याने सदर तरुणीने फिर्याद देखील दिली नाही.

सोनसाखळी चोरीस

या घटनेच्या दोन तासांपूर्वी मनमाड-नांदगाव बसमधून महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याची तक्रार महिलेच्या मुलाने केली. मनमाड बस स्थानकात सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्यात काहीच हाती आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल घोटाळ्याचा १ ऑगस्ट रोजी निकाल?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या जळगाव घरकुल घोटाळा खटल्याच्या निकालाची सुनावणी सोमवारी (दि. १५) सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता १ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली असून, न्यायमूर्ती डॉ. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी करण्यात आले. त्यावेळी खटल्याचा निकाल तयार नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली.

जळगावच्या घरकुल घोटाळ्यात अनेक बडे नेत्यांचा समावेश असून, अनेक दिवसांपासून ही सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. या अगोदर चारवेळेस निकाल पुढे ढकलण्यात आला होता. सोमवारी (दि. १५) या खटल्याचे धुळे न्यायालयात झाले मात्र, याची पुढील सुनावणी आता १ ऑगस्ट रोजी होणार असून, त्यावेळी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच आरोपींनी हजर राहावे अशी माहिती संशयित आरोपींचे वकील जितेंद्र निळे यांनी दिली. या खटल्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ५२आरोपी आहेत. यातील तीन आरोपी मृत झाले असून एक आरोपी फरार आहे. न्या. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले त्यावेळी या खटल्यातील सर्व ४८ संशयित आरोपी हजर होते. जळगाव घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल अजून तयार झालेला नसल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे, असेही बचाव पक्षाचे वकील निळे यांनी सांगितले. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी जर निकाल लागणार नसेल तर त्याबाबत संबंधित वकिलांना तीन दिवसांआधी कळविण्यात येणार असल्याची माहिती अॅड. निळे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

हिंदू संघटनांसह नागरिकांकडून हल्ल्याच्या घटनांचा निषेध

म. टा. वृत्तसेवा, धुळे

हिंदू देवदेवता आणि माता-भगिनींविषयीची समाज माध्यमांवर आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित करीत निर्माण करण्यात आलेली जातीय तेढ. हिंदू धर्म संरक्षक, संघटक, प्रचारक, गोरक्षकांवर निर्दयी कारवाईच्या निषेधार्थ शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने सोमवारी (दि. १५) धुळे शहर बंदची हाक देऊन विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकरण्यात आल्यानंतरही बंदी झुगारत निषेध नोंदविण्यात आला. शहरात ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सोमवारी (दि. १५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास आग्रारोडवर एकत्र येत श्री रामचंद्र, हनुमान यांच्या प्रतिमा, झेंडे आदींसह मोर्चाधारी सज्ज झाले होते. ‘जय श्रीराम, जय हनुमान’, ‘भारत माता की जय’ आदी घोषणांनी धुळे शहर दणाणले होते. आग्रा रोडवरील मनोहर चित्रमंरिाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पूष्पहार अर्पण करीत विराट मोर्चा मुख्य बाजारपेठ पाच कंदिल चौकात धडकला. त्याठिकाणी मोर्चेकरांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले यानंतर तेथून पुढे मार्गस्थ होत फुलवाला चौकातील श्रीराम मंदिरात त्यांनी महाआरती केली.

शहरात काही दिवसांपासून गोरक्षकांवर होत असलेले हल्ले थांबवावे, त्यांच्यावरील खटले मागे घ्यावेत, लव-जिहादसारखे विषय सुरू असून, हिंदु मुलींना त्यांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या ठिकाणांवर पोलिसांनी उपाय करावेत, अवैध कत्तलखाने बंद करावेत या मागण्यांसह हप्तेखोरांच्या बदल्या तत्काळ करण्यासंदर्भात शहर बदंचे आवाहन करण्यात आले होते. शहरातील व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवत याला उत्स्फूर्त पाठींबा दिला म्हणून मोर्चेकरींनी त्यांचे आभार मानले.

या मोर्चात आमदार कुणाल पाटील, महापौर चंद्रकांत सोनार, विनोद मोराणकर, भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, डॉ. माधुरी बाफना, विजय भट्टड, संदीप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अपंळकर, निशा पाटील, महेश मिस्तरी, प्रदीप जाधव, मनोज मोरे, भिकन वराडे, सुनील चौधरी यांच्यासह विविध हिंदूत्ववादी संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय व जनसामान्यांनी सहभाग नोंदविला होता.

समाजकटंकाकडून प्रसारित करण्यात आलेल्या चित्रफिती नशेत तयार केल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात कोणतेही राजकीय नेते, धर्मप्रमुख सहभागी नाहीत. अनूचित प्रकार घडल्यास पोलिसांना कारवाई करू दिल्यास परिस्थिती बिघडणार नाही. कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हाभरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-विश्वास पांढरे, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्यशोधकांनी साजरा केला बारावा 'संघर्ष स्मृति दिवस'

$
0
0

नाशिक:

'सुजलानवाले'चले जाव , 'फॉरेस्टवाले जाव', 'कोई नही हटेगा , टावर नही बनेगा 'या घोषणांच्या निनादात शेतकरीकर्जमुक्ती, पीकविमा, ,वनहक्क याविषयी लढण्याचा निर्धार करीत
१४ जुलै २०१९ रोजी हजारो सत्यशोधकांनी बारावा संघर्ष स्मृति दिवस साजरा केला. सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभा आयोजित या कार्यक्रमात नंदुरबार, नवापूर,साक्री, सटाणा, मालेगाव, धुळे ,औरंगाबाद येथील १०००० हून अधिक शेतकरी आदिवासी स्त्रीपुरुष सहभागी झाले होते.

२००९ साली याच दिवशी धुळ्यातील मोगरा पाडा येथे पवन ऊर्जा क्षेत्रातील सुजलानं कंपनीला आदिवासींच्या वनहककाची साडे सहाशे एकर जमीन पवन ऊर्जेचे पंखे उभारण्यासाठी केंद्र सरकारने दिली होती. कंपनीने लगेच हजारो झाडांची कत्तल करून त्यावर टाँवर उभारणीचे काम सुरू केले होते .त्याविरोधात आंदोलन झाले होते. कंपनीचे कर्मचारी, महसूल खात्याचे अधिकारी, पोलीस खात्याचा बंदोबस्त घेऊन टॉवर उभारणीचा विरोध मोडून काढण्यासाठी घटनास्थळी आलेले होते .त्यामुळे स्थानिक पर्यावरण रक्षक आदिवासी व एस आर पी ,पोलीस यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. यावेळी लाठी हल्ला, अश्रुधूर, हवेत गोळीबार झाला होता. त्यात १८ आदिवासी जखमी झाले होते .तर अनेकांवर गुन्हे दाखल झाले .परंतु कंपनीला मात्र टॉवर उभे न करता हात हलवत परत जावे लागले होते .ह्या रोमहर्षक घटनेचा दर वर्षी हजारो शेतकरी , आदिवासी एकत्र येऊन स्मृति दिवस साजरा करतात. यावर्षीही १४ जुलै रोजी बारावा स्मृति दिवस साजरा करण्यात आला . त्याचप्रमाणे १४ एप्रिल १९४४ रोजी धुळे जिल्ह्यातील चिमठाणा येथे स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा साडे पाच लाखाचा खजिना लुटला होता. त्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने वर्षभर दर महिन्याच्या १४ तारखेला स्मृती जागर करून कार्यकर्ते स्फुर्ती घेतात. तो दिवसही ही यावेळी मोगरा पाडा येथे साजरा करण्यात आला .

यावेळी समर भूमीला वंदन करून मिरवणुकीने सभास्थळी आल्यावर पाच तासांची जंगी सभा झाली. यावेळी झालेल्या सभेत वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली . डॉक्टर पायल तडवींच्या खुन्यांना शासन करा, जेष्ठ वकील ऍड इंदिरा जयसिंग यांच्यावरील धाडीचा निषेध, प्रस्तावित वनकायदा २०१९ मंजूर करू नका .सन २००५ च्या वन हक्क कायद्याप्रमाणे दावे दारांना सातबारे उतारे द्या. सेंद्रिय शेतीची लागवड करा, दुष्काळी परीस्थीत क्रुत्रिम पाऊस पाडा, झाडे लावा , झाडे जगवा इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्रीपदावरून नाशिकमध्ये युतीत पोस्टरवॉर

$
0
0

नाशिक

राज्यात मुख्यमंत्री कोणाचा या विषयावरून शिवसेना आणि भाजपच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचे शाब्दिक युद्ध सुरू असतांनाच नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी भाजप कार्यालयासमोरच ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार’ असा दावा करणारे पोस्टर्स लावून भाजपलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

गामणे यांनी लावलेल्या पोस्टर्समुळे युतीमध्ये खळबळ उडाली असून दोन्ही पक्षातील नेत्यांची कोंडी वाढली आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले असून संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे. दरम्यान भाजपने युती तोडण्याचे हे षडयंत्र असल्याचे सांगत, अशा लोकांपासून सावध रहावे असे आवाहन सेना नेत्यांना केले आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीवेळी राज्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार हे भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ठरले होते. त्यामुळे ‘आमच ठरलंय’ असे सांगत वरीष्ठ नेत्यांनी विधानसभेनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार याबाबतचे मौन पाळले आहे. परंतु, या वादानंतरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगितले आहे. तर सोमवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे ठणकावून सांगीतले होते. तसेच शिवसेनेला कल्पनाविलासात रमू द्या असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यामुळे सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून शाब्दिक वार सुरू असतांनाच आता कार्यकर्त्यांमध्येही धुसफूस सुरू झाली आहे. पांडे यांची पाठ फिरताच, शिवसेनेच्या सिडकोतील नगरसेविका किरण गामणे यांनी मंगळवारी भाजपला आव्हान देणारे पोस्टर्स थेट भाजपच्या कार्यालयासमोरच लावलेत.

‘मुख्यमंत्री भाजप सेना युतीचाच होणार याचा अर्थ शिवसेनाचाच होणार ’ असे थेट मोठे होर्डिंग तीन ठिकाणी लावून भाजपला डिवचले आहे. शिवसेनेच्या नगरसेविकेनेच अशा प्रकारचे होर्डिंग लावल्याने शहरात एकच चर्चेला उधान आले. या होर्डिंगमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. संबधित नगरसेविकेने भाजपच्या परिसरात तीन होर्डिंग लावून भाजपला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यातून अधिक वाद उद्भवू नये म्हणून पोलिसांनी होर्डिंग काढून घेतल्याचे समजते. या प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजपच्या युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता असून या प्रकरणाची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. तर स्थानिक भाजपन नेत्यांनी शिवसेनेतील काही लोक हे युती तोडण्यासाठी षडयंत्र करत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे युतीत वादाची ठिणगी पडली आहे.

पक्षप्रमुखांचे आदेश डावलले
नगरसेविका गामणे यांनी लावलेल्या होर्डिंगमुळे स्थानिक भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तणाव निर्माण होवू नये यासाठी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी या होर्डिंगच्या प्रकारापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तर या प्रकारामुळे वाद ओढावू नये म्हणून आऊट ऑफ रेंज जाणे पसंत केले आहे. संबधित नगरसेविकेचे हे वैयक्तिक मत असे सांगत, याबाबत स्थानिक नेत्यांनी अधिक बोलण्यास स्थानिक नेत्यांनी नकार दिला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत कुणीही बोलू नये असे स्पष्ट आदेश असतांनाही, स्थानिक नगरसेविकेच्या या प्रयत्नामुळे शिवसेनेच्या नेत्यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे शिवसेना संबधितांबाबत काय भूमिका घेते,याकडे भाजपचे नेते लक्ष ठेवून आहेत.

'मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे सरोज पांडेचे वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्लात येवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रकाराचे आहे.त्यामुळे शिवसैनिक खपवून घेणार नाही.मुख्यमंत्रीपदाचा निर्णय वरीष्ठांनी घेतला आहे.त्यात कुणी पडू नये'
- किरण गामणे,नगरसेविका

'मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हे आश्वासक चेहरा आहेत.त्यामुळे त्यांचा चेहरा वगळून कोणालाही मते मिळणार नाहीत.भाजप कार्यालयासमोर होर्डिंग लावणारे हे शिवसेनेचे अधिकृत आहेत का याचाही शोध आम्ही घेत आहोत.शिवसेना आणि भाजपची युती आकाराला येत असतांना कुणीतही युतीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न करत आहे.युतीत बिघाडाचे हे षडयंत्र आहे.त्यामुळे शिवसेने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे'
- लक्ष्मण सावजी, सरचिटणीस, भाजप


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासूनचा संप मागे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज, बुधवार (दि. १७)पासून म्युनिसिपल कर्मचारी संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन राधाकृष्ण गमे यांनी दिल्यानंतर, तसेच विविध मागण्यांसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आल्याने संघटनेने आज होणारा संप मागे घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. महापालिका आस्थापना परिशिष्टावरील सर्व संवर्गांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना १०० टक्के पदोन्नती मिळावी, कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विमा योजना पूर्ववत सुरू केली जावी, विम्याची रक्कम कामगार कल्याण निधीतून भरण्यात यावी, आस्थापना परिशिष्टावरील सर्व संवर्गांतील रिक्त पदे, तसेच सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यासह विविध ३६ मागण्यांसाठी कर्मचारी संघटनने १० जुलैपासून संप करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर संघटनेच्या वतीने १७ जुलैपासून संपावर जाण्याची नोटीस प्रशासनाला बजावली होती. त्यामुळे प्रशासनाने नमते घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

आयुक्तांकडून कार्यावाहीचे आश्वासन

नोटीस बजावल्यानंतर प्रशासनाने तातडीने बैठक बोलावली आणि मागील मान्य मागण्यांचे इतिवृत्त देण्याचे कबूल केले. आयुक्तांनी मंगळवारी सातवा वेतन लागू करण्याचे आश्वासन संघटनेला दिले आहे. याबाबत शासकीय पातळीवर प्रशासकीय कार्यवाही केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. शासन स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. सोबतच महापालिकेच्या पातळीवर मागण्या मान्य करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) आणि उपायुक्त (प्रशासन) यांची समिती नियुक्त केली. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन संप मागे घेत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी पत्रकान्वये दिली. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

००००००००स्वतंत्र सिंगल००००००००००००

चंदनाच्या झाडांची लष्करी हद्दीत चोरी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरातील लष्कराच्या हद्दीतून चंदनाच्या झाडांची चोरी करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. यापूर्वीही लष्करी हद्दीतून दोन वेळा चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती.

नाशिकरोड येथे नाशिक-पुणे महामार्गालगत सुमारे शंभर एकर क्षेत्रात लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असून, तेथे मोठ्या प्रमाणात जंगलही आहे. या जंगलात चंदनाची अनेक झाडे असून, काही महिन्यांपासून चोरट्यांची नजर या झाडांवर पडली आहे. या हद्दीमध्ये चोरट्यांनी तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न केला आहे. शनिवारी (दि. १३ जुलै) येथील म्युझियम सेंटरजवळील २१ हजार रुपये किमतीची झाडे चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ जूनला लष्कराच्या हॉकी ग्राउंडजवळ असलेले पाच हजार रुपये किमतीचे चंदनाचे खोड चोरीस गेले होते. १ जुलैला कोशाबच्या जवळ असलेली चंदनाची झाडे चोरट्यांनी तोडली. मात्र, ती वाहून नेण्यात ते अपयशी ठरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी कट्ट्यासह अटक

$
0
0

नाशिक : देशी कट्टा बाळगणाऱ्या अक्षय गणेश नाईकवाडे (वय २३, रा. सामनगावरोड, नाशिकरोड) यास भद्रकाली पोलिसांनी शिताफिने अटक केली. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा कट्टा आणि एक जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. काठे गल्ली परिसरातील जयशंकर गार्डन येथे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयितास अटक केली. नाईकवाडे हा कट्टा विकण्यासाठी आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यानांसाठी प्रभागनिहाय ठेका

$
0
0

महासभेवर प्रस्ताव; साडेआठ कोटींचा खर्च अपेक्षित

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मालकीच्या उद्यानांची देखभाल दुरुस्ती विभागनिहाय आऊटसोर्सिंगने करण्याचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर प्रशासनाने आता प्रभागनिहाय कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील ३१ प्रभागांमधील ४८१ पैकी २८० उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रभागनिहाय ठेक्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. या २८० उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीवर तब्बल साडेआठ कोटींचा खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे महापालिकेने सन २०१६ मध्ये आपल्या ८८१ उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आऊटसोर्सिंग केले होते. तीन वर्षांच्या मुदतीसाठी हे काम दिले असले तरी, त्यातून उद्यानांची स्थिती सुधारण्याऐवजी बिकटच झाली. ठेकेदाराने कामाकडे लक्ष न दिल्याने अनेक उद्यानांचे नुकसान झाले होते. विभागासाठी एकच ठेकेदार असल्याने आणि उद्यानांची संख्या जास्त असल्याने लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे अखेर विभागीय ठेक्यांचा हा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे प्रशासनाने आता प्रभागनिहाय ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यानांच्या ठेक्याची मुदत ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता उद्यान देखभालीचे पुन्हा खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावदेखील येत्या १९ जुलै रोजी होणाऱ्या महासभेत सादर केला जाणार आहे. यासाठी ठेकेदारांनाही खिरापत वाटण्यात आली आहे. ठेकेदाराच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षे मुदतीच्या या ठेक्यासाठी ८.४७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

-

विभाग प्रभाग संख्या उद्यानांची संख्या

पंचवटी ६ ७०

पश्चिम ३ ३५

पूर्व ५ ३०

नाशिकरोड ६ ५१

सातपूर ५ ४२

नवीन नाशिक ६ ५२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्चस्ववादाची नांदी!

$
0
0

मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत धुसफूस; होर्डिंग्जमुळे कोंडी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात मुख्यमंत्री कोणाचा या विषयावरून शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचे शाब्दिक युद्ध पेटले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी भाजप कार्यालयासमोरच 'मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार' असा दावा करणारे पोस्टर्स लावून भाजपलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे युतीमध्ये खळबळ उडाली असून, या पोस्टर्सने दोन्ही पक्षातील नेत्यांची कोंडी वाढली आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले असून, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे. दरम्यान, भाजपने युती तोडण्याचे हे षडयंत्र असल्याचे सांगत, अशा लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन सेना नेत्यांना केले आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीवेळी राज्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार हे भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ठरले होते. त्यामुळे 'आमच ठरलंय' असे सांगत वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार याबाबतचे मौन पाळले आहे. परंतु, या वादानंतरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानव यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगितले. सोमवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे ठणकावून सांगितले. तसेच, शिवसेनेला कल्पनाविलासात रमू द्या, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून शाब्दिक वार सुरू असतानाच आता कार्यकर्त्यांमध्येही धुसफूस सुरू झाली आहे. पांडे यांची पाठ फिरताच शिवसेनेच्या सिडकोतील नगरसेविका किरण गामणे यांनी मंगळवारी भाजपला आव्हान देणारे पोस्टर्स थेट भाजपच्या कार्यालयासमोरच लावले. 'मुख्यमंत्री भाजप-सेना युतीचाच होणार याचा अर्थ शिवसेनेचाच होणार' असे थेट मोठे होर्डिंग तीन ठिकाणी लावून भाजपला डिवचले आहे. शिवसेनेच्या नगरसेविकेनेच अशा प्रकारचे होर्डिंग्ज लावल्याने शहरात एकच चर्चेला उधाण आले. या होर्डिंग्जमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. यातून अधिक वाद उद्भवू नये म्हणून पोलिसांनी हे होर्डिंग्ज काढून घेतल्याचे समजते. या प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजपच्या युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता असून, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. स्थानिक भाजपन नेत्यांनी शिवसेनेतील काही लोक हे युती तोडण्यासाठी षडयंत्र करीत असल्याचा आरोप केला आहे.

...

पक्षप्रमुखांचे आदेश डावलले

नगरसेविका गामणे यांनी लावलेल्या होर्डिंग्जमुळे स्थानिक भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तणाव निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी या होर्डिंग्जच्या प्रकारापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तर या प्रकारामुळे वाद ओढवू नये म्हणून संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाणे पसंत केले आहे. संबंधित नगरसेविकेचे हे वैयक्तिक मत आहे असे सांगत, याबाबत स्थानिक नेत्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

...

मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे सरोज पांडेचे वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्लात येऊन शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार आहे. शिवसैनिक हे खपवून घेणार नाही. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे. त्यात कुणी पडू नये.

- किरण गामणे, नगरसेविका

...

भाजप कार्यालयासमोर होर्डिंग्ज लावणारे हे शिवसेनेचे अधिकृत आहेत का, याचाही शोध आम्ही घेत आहोत. शिवसेना आणि भाजपची युती आकाराला येत असताना कुणीतही युतीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न करीत आहे. युतीत बिघाडाचे हे षडयंत्र आहे. त्यामुळे शिवसेनेने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे.

- लक्ष्मण सावजी, सरचिटणीस, भाजप

...

मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशिवाय मुख्यमंत्री पदाबाबत कुणी बोलू नये हे आधीच ठरलंय. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी संयम पाळला पाहिजे. नाशिकमधील होर्डिंग्ज प्रकाराबाबत संबधितांकडून माहिती मागवली आहे.

- भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळद, मोहरीच्या नोंदींनी शिक्षक बेजार

$
0
0

\B

\Bashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : बदलत्या शिक्षणपद्धतीबरोबरच शिक्षकांची कामेही बदलत चालली असून, अध्यापनाशिवाय कराव्या लागणाऱ्या कामांनी शिक्षकवर्ग बेजार झाला आहे. शालेय पोषण आहारातील हळद, मोहरीची मिलीग्रॅममध्ये नोंद ठेवण्यापासून रोजचा ऑनलाइन हिशेब ठेवता ठेवता शिक्षकांच्या नाकी नऊ येत आहेत. पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने विद्यार्थीसंख्येनुसार दर दिवशी किमान दोन तास शिक्षकांना या योजनेच्या कामात अडकून पडावे लागत असल्याची स्थिती सध्या राज्यभरात आहे.

राज्यात शालेय पोषण आहार योजना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. विद्यार्थ्यांची शाळांमधील गळती रोखण्यासाठी ही योजना अतिशय प्रभावी असली तरी, त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा शाळांना पुरविण्यात आलेली नाही. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत स्वच्छ आहार पोहचविण्याबरोबरच, अन्नपदार्थांचे मोजमाप, ऑनलाइन नोंदणी, दैनंदिन भाजीपाला, इंधन, पिण्याचे पाणी, भांडी धुण्यासाठी पाणी अशी अनेक बारीकसारीक कामांची व्यवस्था शिक्षक, मुख्याध्यापकांनाच करावी लागते. विद्यार्थी संख्येनुसार किमान तीन ते चार शिक्षक दररोज या व्यवस्थापनात अडकले असल्याने अध्यापनाबरोबरच या कामांसाठी शिक्षकांना राखीव वेळ द्यावा लागत आहे. अध्यापनाचे मूळ कर्तव्यावर लक्ष केंद्रीत करू देण्याची मागणी सध्या विविध संघटनांकडून जोर धरत असून, शालेय पोषण आहाराचा संपूर्ण भार उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी मागणी प्रामुख्याने ग्रामीण भागातील शिक्षक, मुख्याध्यापकांकडून करण्यात येत आहे.

\Bइंटरनेटही नाही\B

शालेय पोषण आहाराचा रोजचा हिशोब ऑनलाइन माध्यमातून देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. परंतु, ग्रामीण भागांमधील अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सोय अद्याप उपलब्ध नाही. असली तरी तिथल्या स्पीडनुसार हिशोब देताना शिक्षकांच्या नाकीनऊ आले आहे. इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने डाटा अपलोड करण्यासाठी अधिक वेळ लागत आहे.

शालेय पोषण आहार योजनेचा हेतू अतिशय चांगला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ चांगल्या प्रकारे होतो. पण शिक्षकांच्या दृष्टीने विचार करता अध्यापनाचा मोठा वेळ या कामासाठी खर्च करावा लागत आहे.

\Bप्रकाश अहिरे, जिल्हा नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

\B

पोषण आहार तयार करण्याचे काम बचत गटांना देण्यात आले आहे. त्या महिलांना तीन-चार महिन्यांतून त्यांचे मानधन मिळते. त्यामुळे त्यांनाही आम्ही पोषण आहाराबाबत सूचना करू शकत नाही. अंडे व दूध असे पदार्थ या योजनेत समाविष्ट केले आहे. या पदार्थांच्या गुणवत्तेचा मोठा प्रश्न समोर उभा असतो. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा मिळणे गरजेचे आहे.\B

-एस. बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गो. बा. पाटील यांचा तिसरा प्रयत्न अयशस्वी

$
0
0

माजी उद्यान अधीक्षकाचा मंत्रालयातून दबाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्यान विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ झालेले माजी उद्यान अधीक्षक गोविंद पाटील यांचा महापालिकेत सेवेत परतण्यासह आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्याचा तिसरा प्रयत्न असफल ठरला आहे. महापालिकेच्या सेवेत पुन्हा घेण्यासह लाभ पदरात पाडून घेण्यासाठी पाटील यांनी थेट मंत्रालयातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाने पाटील यांच्यावरील आरोपांचा तसेच चौकशीत आरोप सिद्ध झाल्याचा अहवालच प्रशासाने मंत्रालयात पाठविल्याने पाटील यांच्या प्रयत्नांना खो बसला आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असताना पाटील यांनी शहरातील उद्यानांमध्ये पुरविण्यात आलेल्या साहित्याच्या एकत्रित निविदा काढण्याऐवजी त्यांचे तुकडे करून काम केले होते. त्यामुळे पाटील यांच्या या कामाविरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी पाटील यांच्या कामाची चौकशी केली होती. त्यात कामांच्या अनेक संचिकाही गायब असल्याचे आढळले होते. यासंदर्भात झालेल्या चौकशीत पाटील दोषी आढळले तर न्यायालयानेही कारवाईचे आदेश दिले. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. त्यानंतर पाटील यांनी मंत्रालयात डॉ. गेडाम यांच्या विरोधात तक्रार करतं कारवाई चुकीची ठरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. गेडाम यांनी प्रशासन विभागाकडे सविस्तर अहवाल सादर केला. त्याच दरम्यान डॉ. गेडाम यांची बदली झाली. अभिषेक कृष्णा व तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात देखील पाटील यांनी पालिकेच्या सेवेत येण्यासाठी फिल्डींग लावली. परंतु, त्यांचा हा प्रयत्नही असफल ठरला होता. पंरतु, मुढे गेल्यानंतर आलेल्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यावर देखील मंत्रालयातून दबाव आणण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला आहे.

रुजू करून घ्या

गोविंद पाटील यांनी मंत्रालयात मागणी केल्यानंतर मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या मागणीला मम म्हणतं रुजू करून घेण्याचे आदेश दिले होते. परंतु, प्रशासनानेही पाटील यांच्या कार्याचा अहवालच मंत्रालायत सादर करत, त्यांच्या पुनरागमनाला खो दिला आहे. त्यामुळे पाटील यांचा महापालिकेत येण्याचा तिसरा प्रयत्नही असफल ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images