Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘आषाढी’नंतर नाशिककराचे पांडुरंगास ‘नीज नीज’

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त अनेक गाणी येतात. किती तरी विठ्ठलभक्तीचे अभंग, भजनं त्यात असतात. वारकरी पंढरपूरला येतो, परंतु तो घरी नीट पोहोचला की नाही, याची काळजी पांडुरंगाला असते. 'आम्ही पोहोचलो पांडुरंगा तू नीज आता' अशी भावना असलेले एक वेगळेच गीत नाशिकच्या प्राजक्त देशमुखने लिहिले असून, त्याला प्रख्यात शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा स्वर लाभला आहे. आज हे गाणे यू ट्यूबवर रिलीज होत आहे.

रागभक्तीनिर्मित हे गाणे 'निर्माणमोहा'ने प्रस्तुत केले आहे. नाशिक महापालिका शाळा क्रमांक ५, मानूर येथील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन हा व्हिडीओ चित्रीत केलेला असून, संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. वारकरी पंढरपुराहून निघाल्यानंतर घरी पोहोचला की नाही, या चिंतेत भगवंत असतो. परंतु, तो थकलेला आहे, त्याला विश्रांतीची गरज आहे म्हणून एक वारकरी त्याला झोप घेण्यासाठी आळवत आहे, असा भाव या गाण्यात आहे.

प्राजक्त म्हणतो, हा व्हिडीओ मी आईला दाखवला तेव्हा आई म्हणाली, ही देवशयनी एकादशीच आहे. म्हणजे देव झोपी जातात, आजच्या दिवशी आणि पुन्हा कार्तिकी एकादशीला उठतात. देव आता झोपणार आहे म्हणून झोपण्यापूर्वीचे शेवटचे दर्शन म्हणजे आषाढी एकादशी! मी अचंबित झालो, कारण मला यातलं काहीच माहीत नव्हतं. मी एका सहजसाध्या भावनेने हे करायचं ठरवलं. पण, मग लक्षात आलं झोपी जाणाऱ्याला कलकलाट करीत भेटण्यापेक्षा असंच मंजूळ संगीत ऐकवत का झोपवू नये आपण? पांडुरंगाचे हे अंगाईगीत You tube Search : Nij Nij Devaki Pandit Prajakt Deshmukh या नावाने https://youtu.be/kySvSJBLIZw या लिंकवर भक्तांसाठी आजपासून खुले होणार आहे.

---

...अशी आहे टीम

छायाचित्रण-संकलन : अभिषेक कुलकर्णी दिग्दर्शन सहाय्य : अभिषेक वालझाडे, बासरी : संदीप कुलकर्णी, साईड ऱ्हिदम : दीपक थोरकर, कलावंत : सार्थक जाधव, गौरव मिटके, करण दरोडे, कृष्णा नवले, कृष्णा राथड, माया टोकरे, राधिका बुधर, साहील गावित, अर्चना राथड, वैष्णवी बेलेकर आणि विजय साळवे, सूत्रधार : गिरीश गर्गे, हेमंत महाजन, निर्मिती व्यवस्था : राजेश भुसारे, प्रणव प्रभाकर, श्रीपाद देशपांडे, प्रकाशयोजना : प्रफुल्ल दीक्षित, सुलेखन : सुप्रिया देशमुख.

--

आषाढ सुरू झाला, की पंढरपूरचे मंदिर चोवीस तास उघडे ठेवतात. देवाच्या काळजीपोटी विठोबा-रखूमाईच्या मूर्तींमागे तक्क्या-उशा ठेवण्याचा प्रघात आहे. आषाढीला सर्व भाविक वाजतगाजत त्याच्या दारी जातात. पण, नंतर त्याचे काय होत असेल? या कलकलाटानंतर त्याला कुणी 'झोप आता, खूप केलंस' म्हणतं का? मी तेच म्हणायचं ठरवलं. देवकीताईंचा दैवी स्वर त्याला मिळाला.

-प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक-गीतकार

---

ही कल्पना जेव्हा मला प्राजक्तने सांगितली तेव्हाच मला ती विलक्षण आवडली. तोच भाव आहे जो अंगाईचा आहे. फक्त यावेळी भक्त माउली झाले आहेत, आई झालेले आहेत. खूप सढळ हस्ते तू आम्हाला दिले. आता तू झोप. निखळ प्रेमातूनच हा वात्सल्याचा भाव उतरलाय. या विलक्षण कल्पनेचा मला भाग होता आले याचा मला मनस्वी आनंद आहे.

-देवकी पंडित, गायिका-संगीतकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाइपलाइनचे काम अंगलट

$
0
0

सटाणा पालिका, ठेकेदाराला दंड

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करताना सटाणा नगरपरिषद व ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे हे काम त्यांच्या अंगलट आले असून, बांधकाम विभागाने सटाणा नगरपरिषदेला लाखो रुपये दंडाची आकारणी केली आहे. तसेच बांधकाम विभागाच्या नियमांचा व अटी, शर्ती यांचा भंग करून रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर बाहेरऐवजी आत पाइप टाकण्याचे काम सुरू असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे खोदकाम करून शासकीय मालमत्ता, राज्य महामार्गाचे नुकसान केल्याबद्दल सटाणा नगरपरिषदेवर व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवारसह कृती समितीच्या सदस्यांनी केली होती. यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हांडे यांनी ६ जुलै रोजी हे काम बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सटाणा नगरपरिषद व ठेकेदार यांना नोटीस देऊन काम बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर १२ जुलै रोजी बांधकाम विभागाच्या परवानगीने व दंड भरून काम पुन्हा सुरू करण्यात आले.

अभियंत्याचा आशीर्वाद

पाइपलाइन जाणाऱ्या राज्यमार्ग २१ वरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नियुक्त शाखा अभियंता हे सटाणा शहरातील असल्याने ठेकेदाराला त्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर बाहेरऐवजी आत पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही पाइपलाइन काढावी अशी मागणी पवार यांच्यासह महेंद्र हिरे, हेमंत पाटील, संदीप वाघ यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन कमी, आढावाच अधिक!

$
0
0

- नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे झालेल्या कामांचे पाढे

- 'येतो परत म्हणत' दिले पुन्हा सरकार येण्याचे संकेत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या शेवटच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी झालेल्या कामाचे पाढे वाचत पाच वर्षांच्या कामांचा आढावा घेतला. या पंचवार्षिकमधील ही शेवटची बैठक असल्यामुळे त्यांनी नियोजनाच्या कामांवर बोलणे टाळत सर्वांनी सहकार्य केल्याचे सांगत आभारही मानले. जिल्ह्यात अनेक संकटे आली, पण त्याला समर्थपणे कसे तोंड दिले हे त्यांनी सांगितले. भाषणाचा शेवट करताना त्यांनी 'येतो परत' सांगत पुन्हा आमचेच सरकार येईल, याचे संकेतही दिले. या वेळी त्यांनी सरकारी योजनांची जंत्री वाचली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने अद्ययावत केलेल्या नियोजन भवनात बैठक झाली. या वेळी महाजन यांनी शेवटची बैठक चांगल्या खुर्च्यांमध्ये व हॉलमध्ये होत असल्याचा आनंद व्यक्त करून पुढील पाच वर्षे मिळायला हवीत, असेही सांगितले. या वेळी त्यांनी पाच वर्षे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यात कुंभमेळा आला. अनेक अडचणी आल्या; पण त्या समर्थपणे पेलत सोडवल्या. त्यामुळे या कुंभमेळ्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली, ती चोखपणे बजावली, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात या पाच वर्षांत गारपीट, वादळ, महापूर, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारखी अनेक संकटे आली. एकदा तर अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. त्या वेळी मी मुख्यमंत्र्यांना घेऊन आलो होतो. त्यानंतर सरकार खंबीरपणे उभे राहिले. आता हमीभावामुळे कापूस, मक्यासारख्या पिकांना दीड पट भाव मिळतो आहे. पुढचा काळ उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी लोडशेडिंग का नाही झाली, त्यासाठी काय केले, याचेही पाढे वाचले.

योजनांची वाचली जंत्री

या वेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची जंत्री वाचत योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. योजना चांगल्या असल्या तरी त्यावर कार्यवाही व्हायला हवी, हे सरकार गतिमान आहे. कामेही गतिमान झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कारवाईची वेळ आणू नका, वर्षभर फाइल दाबून ठेवल्यावर कसे होणार, असेही त्यांनी सांगितले.

वृक्षलागवडीचे ब्रँडिंग

वृक्षलागवडीच्या सरकारच्या योजनांचे ब्रँडिंग करीत लोकप्रतिनिधींनी यात सामील होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. या वेळी त्यांनी वृक्षलागवडीत सर्वांनी सहभाग घ्यावा, असेही सांगितले. दुष्काळ का पडतो याचे दाखले देत त्यांनी वृक्षलागवडीचे महत्त्वही सांगितले. या वेळी स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्वही त्यांनी सांगितले.

निधी परत जाता कामा नये

पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना जिल्ह्याचे कौतुक केले. या वेळी कोणताही निधी जाता कामा नये, असे सांगत त्यांनी काम चांगले झाले पाहिजे. शाळा दुरुस्तीचे प्रश्नही सोडवू, असेही त्यांनी सांगितले. 'मेरा देश आगे बढ रहा है' अशा योजना प्रभावीपणे राबविण्याचे संकेतही दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७९१ कोटींचा आराखडा मंजूर

$
0
0

- रस्ते विकासासाठी ३६.१० कोटी

- पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८.५० कोटी

- सार्वजनिक आरोग्यासाठी १५ कोटी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेचा ७९१ कोटी २४ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३४६ कोटी, आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३४७ कोटी ६९ लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९७ कोटी ५५ लाखांच्या योजनांचा या प्रारूप आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. आराखड्यात रस्ते विकासासाठी ३६ कोटी १० लाख, पर्यटन आणि यात्रास्थळांच्या विकासासाठी ८ कोटी ५० लाख, तर सार्वजनिक आरोग्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक झाली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छ भारत अभियान, जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ३३ कोटी वृक्षलागवडीसाठी लोकप्रतिनिधी व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने सर्वांना हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

८८३ कोटी खर्च

जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळेस जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत मार्चअखेर एकूण मंजूर ९२१ कोटी ५७ लाख नियतव्ययापैकी ९२१ कोटी २२ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ८८७ कोटी ४७ लाख निधी वितरित करण्यात आला असून, ८८३ कोटी ५६ लाख इतका खर्च झाल्याचे सांगितले.

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी १३० कोटी

यंदा महाडीबीटी पोर्टलमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्यस्तरावरून १३० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन सभागृहाचे उद्घाटनही करण्यात आले. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, नरेंद्र दराडे, निर्मला गावित, अनिल कदम, किशोर दराडे, योगेश घोलप, नरहरी झिरवळ, जिवा पांडू गावित, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, राजाभाऊ वाजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक व नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

आराखड्यातील तरतुदी

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी १३.५७ कोटी

जनसुविधा ग्रामपंचायतींना सहाय्यक अनुदान २६.५८ कोटी

लघुपाटबंधारे विभाग : ३३.५० कोटी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : ५१.९० कोटी

महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत नगरपालिका, महापालिकांना अर्थसाह्य : २२ कोटी

अंगणवाडी बांधकाम : १२.७४ कोटी

प्राथमिक शाळा विशेष दुरुस्ती : ८ कोटी

नावीन्यपूर्ण योजना : १३.८४ कोटी

दलितोत्तर वस्ती सुधारणा : १० कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासाठी देव पाण्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा तालुक्यासह कसमादे परिसराकडे यंदा पाठ फिरवल्याने खालप गावातील १०१ आदिवासी महिलांनी पावसाला साकडे घालण्यासाठी ग्रामदैवत हनुमान मंदिरातील शंकराची पिंड पाण्यात बुडवली. यासाठी महिलांनी ७०फूट खोल विहिरितून पाणी शेंदून पावसाला साकडे घातले. या महिलांसोबत गावातील भजनी मंडळाने हरिनामाचा जप करीत पावसाला साद घातली.

देवळा तालुक्याकडे पावसाने यंदा पाठ फिरवली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी पेरणीलायक पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. खालप परिसरातील पिण्याचे पाणी, जनावरांना चाराची समस्या भेडसावत आहे. शासनाने परिसरातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती बघून कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या वनमाला पवार यांनी केली आहे. तसेच खालप येथे चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी सरपंच नानाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणी काहीही म्हणो, पुढील मुख्यमंत्री भाजपचाच: पांडे

$
0
0

राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावरून शिवसेना भाजपत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेने पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे जाहीर करून काही दिवसच उलटले असताना, 'कोणाचाही कल्पनाविलास काहीही असो, मुख्यमंत्री भाजपचाच होणार' असा पुनरुच्चार भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी केला आहे. देशात भाजप हा अत्यंत मजबूत पक्ष असून लोक भाजपत यायला इच्छुक असल्याचेही त्या म्हणाल्या. नाशिक जिल्हा आढावा बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

जून महिन्यातील मुंबईतील आढावा बैठकीतही पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचा होणार असे वक्तव्य केले होते. पांडे यांच्या या वक्तव्याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील असे दानवे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राज्याच्या प्रभारी असलेल्या पांडे यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य करत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात शिवसेनेशी आमची युती आहेच, मात्र देशात मोदी आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. देशात भाजप मजबूत पक्ष आहे, असे सांगताना त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

राज्यात विरोधक निष्प्रभ

लोकशाही शासन व्यवस्थेत विरोधी पक्ष मजबूत असावा लागतो. मात्र, देशात आणि राज्यात विरोधी पक्ष निष्प्रक्ष असल्याची टीका पांडे यांनी केली.

कर्नाटकातील परिस्थितीवरून काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचेही त्या म्हणाल्या. काँग्रेसला आपले लोक सांभाळण्यात अपयश आल्याचे त्या म्हणाल्या. भाजप कधीही 'डर्टी पॉलिटिक्स' करत नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा फेडरेशनने घेतली भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेत ठेवी अडकल्यामुळे राज्य सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनने धरणे आंदोलन करीत असताना, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशनने विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण विकास शेती सहकारी पतसंस्थेच्या अडकलेल्या ठेवींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर व बँकेचे संचालक शिरीष कोतवाल, कार्यकारी संचालक सतीश खरे उपस्थितीत होते. यावेळी लाठकर यांना फेडरेशनतर्फे निवेदन देण्यात आले. त्यानंतर लाठकर यांनी जिल्हा बँकेस योग्य सूचना देऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात असे सांगितले. यावेळी फेडरेशनच्या जनसंपर्क संचालिका डॉ. आश्विनी बोरस्ते, अध्यक्ष भास्करराव कोठावदे, कार्याध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष काशीनाथ चव्हाण, व्यवस्थापक सोपान थोरात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत मतदारांच्या नावांना कात्री

$
0
0

याद्यांमधून ४० हजार नावे वगळली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात मतदान यादी शुद्धिकरण केले जात असून त्यात मृत्यू झालेल्या ४० हजार मतदारांची नावे गेल्या महिनाभरात मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. रोज एक हजारपेक्षा जास्त नावे वगळली जात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादी शुद्धिकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे जिल्हा निवडणूक शाखेचे शर्थीचे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निर्दोष आणि दोष विरहित मतदारयादी ही यशस्वी निवडणूक संचलनाचा पाया असल्याने मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण आणि दोषविरहित करण्यासाठी ही मोहीम असल्याचे प्रशासनाने सांगण्यात आले. यावेळी निवडणूक शाखेने घरातील अथवा आपल्या परिचयातील कुटुंबातील कुठलीही व्यक्ती मयत झालेली असल्यास यादीतून वगळण्यासाठीचा फॉर्म नमुना नंबर -७ भरण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मतदाराचा मृत्यूचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह परिसराच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालयात सादर करावा, असेही सांगितले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यापूर्वी मतदार यादीचे शुद्धिकरण करणे आणि मतदार यादी दोष विरहित आणि परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन अनेक उपाययोजना करीत असल्याचेही म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस उपायुक्तांच्या बदल्या

$
0
0

माधुरी कांगणे यांच्या जागी विजय खरातांची वर्णी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गृह विभागाने सोमवारी (दि. १५) पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नाशिकमधून पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुंबईतील राज्य पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस अधीक्षक विजय खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील ५२ पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यात काहींच्या पदोन्नतीच्या बदलीचा समावेश आहे. कांगणे यांची नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण विभागात बदली झाली. सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त रमेश चोपडे यांची नाशिकच्या राज्य गुप्त वार्ता विभागात बदली झाली असून, साताऱ्यातील पोलिस उपअधीक्षक जयश्री देसाई आणि सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस उपधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची पदोन्नतीने महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली करण्यात आली आहे. यापूर्वी नाशिक पोलिस दलातून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नागपूरच्या राज्य राखीव पोलिस बलाच्या समादेशकपदी गृह विभागाने बदली केली आहे.

एसीपींची कमी संख्या डोकेदुखी

गृह विभागाने ११ जुलै रोजी सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या (एसीपी) बदल्या केल्या आहेत. त्यात नाशिक शहरासाठी दोन अधिकारी देण्यात आले असून, शहरातील एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या जवळपास सहा जागा रिक्त असून, याबाबत गांभीर्याने पाहिले गेले नाही. 'एसीपी'च नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसह पोलिस ठाण्यांच्या कामांना खो बसतो आहे. शहर पोलिस दलासाठी नवी मुंबई येथून प्रदीप जाधव आणि पुणे शहर पोलिस दलातील समीर शेख हे दोन अधिकारी येणार आहेत. शहर पोलिस दलातील मोहन ठाकूर यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली झाली आहे. दोन अधिकारी आले आणि एक गेले, अशी ही स्थिती आहे. यामुळे शहर पोलिस दलातील रिक्त जागा कायम राहिल्या आहेत. चार डिव्हिजनसह आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक, प्रशासन आदी महत्त्वाच्या जवळपास नऊ जागांवर एसीपी दर्जांचे अधिकारी काम पाहतात. अवघे चार एसीपी उपलब्ध असून, त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. यामुळे बहुतांश कामांचा खोळंबा होत असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर तर थेट परिणाम झालेला दिसून येतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास बसल्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्याच्या नशेत झोळीवर बसलेल्या तरुणाच्या गळ्यास दोरीचा फास बसल्याने मृत्यू झाला. ही घटना आंगलून (ता. पेठ) येथे घडली. रवींद्र दामू भोये (२८) असे फास बसल्याने मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

मद्यसेवनाची सवय असलेला रवींद्र रविवारी (दि. १४) रात्री दारूच्या नशेत घरी पोहचला होता. लहान मुलांसाठी बांधलेल्या झोळीवर तो बसला अन अचानक त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास बसला. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्याची सुटका केली. मात्र रवींद्रची प्रकृती नाजूक असल्याने त्यास चुलत भाऊ छगन भोये याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना सोमवारी (दि. १५) पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गोदापात्रात आत्महत्या

नाशिक : गोदावरी नदीपात्रात उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रामवाडी पुलावर घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल अनिल मोरे (वय २३, रा. मोरेमळा, रामवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. विशालने रविवारी (दि.१४) रात्री अज्ञात कारणातून रामवाडी पुलावरील सिद्धेश्वर मंदिर भागात गोदापात्रात उडी घेतली होती. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांसह जीवरक्षकांनी त्यास शोधून पाण्याबाहेर काढले होते. आई संगिता मोरे यांनी त्यास मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. राहुल पाटील यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर म टा वृत्तसेवा, कळवणकळवण तालुक्यातील बारीचापाडा येथ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील बारीचा पाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जनावरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला तरुण गंभीर झाल्याची घटना घडली असून, कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी तरुणाला नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विसापूर येथील पिंटू तुळशीराम पवार (वय ३५) जनावरे चारण्यासाठी चाचेर शिवारातील बारीपाड्याजवळील डोंगरावर गेला होता. त्याच वेळी दुपारी तीनच्या सुमारास बिबट्याने मागून हल्ला करीत कानाला चावा घेतला. बिबट्याशी झालेल्या झटापटीत पवार डोंगरउतारावरून खाली कोसळल्याने त्यांच्या उजव्या पायालाही दुखापत झाली. उजवा पाय घोट्यापासून बाहेर आला असून, उजवा कान फाटल्याने पवार रक्तबंबाळ झाले. त्यांच्यासोबत काही अंतरावर असलेल्या तरुणाने परिसरातील ग्रामस्थांना बिबट्याने हल्ला केल्याची माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी पवारला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील, शशिकांत वाघ यांनी पवारची भेट घेऊन माहिती घेतली व वन विभागाच्या वतीने मदतीचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त स्कूल बसेसवर ‘आयटीओ’ची कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या २० स्कूल बस व व्हॅनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई केली. 'आरटीओ'च्या पथकाने सोमवारी सकाळी व्हॅनची तपासण मोहीम राबविली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्हॅन चालकांची तांराबळ उडाली.

शहरासह जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात असून, त्यांची वाहतूक करण्याची जबाबदारी स्कूल बसेससह स्कूल व्हॅनवर आहे. मात्र, यासाठी सर्रास जुन्या वाहनांचा वापर होत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. मागील वर्षी अशाच एका व्हॅनला नाशिकरोड परिसरात आग लागली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जिवितहानी झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वाहनांची तसेच परमीटची कालमर्यादा निश्चित केली आहे.

शहरात जवळपास एक हजाराच्या घरात स्कूल बस आणि व्हॅनची संख्या असून, त्यात वर्षागणिक वाढ होते आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा असून, काही चालक थेट विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करतात. काही वर्षांपूर्वी अशाच एका स्कूल व्हॅनला आग लागली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नव्हती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेला प्राधन्य देत सरकारने स्कूल व्हॅन आणि बसेसच्या वाहतुकीसाठी अनेक निर्बंध घालून दिले आहेत. पंरतु व्हॅनचालक या नियमांचे पालन करीत नाही.

या पार्श्वभूमीवर 'आरटीओ'ने सोमवारी सकाळी अचानक बस आणि व्हॅन तपासणी सुरू केली. त्यात, सुरक्षितता नियमांकडे दुर्लक्ष, जादा विद्यार्थ्यांची वाहतूक, अग्निप्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष, स्पीड गर्व्हनस, फिटनेस, टॅक्स, परमीट तसेच पाच वर्षांपूर्वीचा वाहन परवाना असे नियम मोडणाऱ्या २० स्कूल व्हॅन-बस असल्याची माहिती समोर आली. 'आरटीओ'ने या वाहनांवर कारवाई केली. यापुढे सातत्याने अशी मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधित वाहनचालकांनी नियमांच्या पूर्ततेकडे लक्ष पुरवावे, असे आवाहन 'आरटीओ'ने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रचारास वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. प्रत्यक्ष भेटीगाठींसोबतच सोशल मीडियाचा आधार दोन्हीही प्रतिस्पर्धी पॅनल्सने घेतला आहे. दोन्हीही पॅनल्सकडून विकासकामांच्या चर्चेसोबतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

सत्ताधारी गटाकडून गत पाच वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासोबतच आगामी उद्दिष्टे प्रचाराच्या अजेंड्यावर आहेत. प्रतिस्पर्धी गटाने सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवतानाच संस्था विकासाच्या दृष्टीने असणारी उद्दिष्टे मांडण्यावर भर दिला आहे. अर्ज माघारीनंतर तयार झालेल्या क्रांतिवीर पॅनलचे नेतृत्व पंढरीनाथ थोरे करीत आहेत, तर प्रगती पॅनलनचे नेतृत्व कोंडाजी आव्हाड करीत आहेत.

...

२९ जागांसाठी ७० उमेदवार

संस्थेच्या एकूण २९ जागांसाठी २० जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आता ७० उमेदवार रिंगणात आहेत. यात १२ उमेदवार अपक्ष आहेत. अ‍ॅड. गजेंद्र सानप निवडणूक मंडळाचे अध्यक्ष आहेत. निवडणूक मंडळात अ‍ॅड. अशोक कातकाडे, अ‍ॅड. संतोष दरगोडे यांचा समावेश असून, लवाद म्हणून अ‍ॅड. एस. जी. सोनवणे यांची नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’वरून नाराजीनाट्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पदे वाटप करताना भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या नाशिक पूर्व मतदारसंघाला झुकते माप दिले जात असल्यावरून पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजी असतानाच आता पुन्हा स्थायीच्या सभापतिपदासाठी गणेश गितेंची वर्णी लागणार असल्याने भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.

भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीतही याचे पडसाद उमटले असून, संघटनमंत्र्यांकडेही याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गिते यांच्या नावाला भाजपत विरोधाची धार अधिक तीव्र होऊ लागल्याने पक्षात बंडाळी उफाळून येऊ नये म्हणून आता सभापतिपदाची उमेदवारी जाहीर करण्याबाबत भाजपत गोपनीयता बाळगली जात असून, बुधवारीच (दि. १७) या नावाची घोषणा केली जाणार आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असला, तरी,स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत सत्तास्पर्धेमुळे मात्र शहराचा विकासच भरकटला आहे. त्यामुळे पक्षाच्या एकूणच कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाच्या तिन्ही आमदारांमध्ये सुरू झालेली चढाओढ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच तीव्र बनली असून, स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीत या वर्चस्ववादाचा प्रत्यय आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवकांना खूश करण्याकरिता तीनही आमदारांमध्ये स्पर्धा असताना या स्पर्धेत शहराध्यक्ष तथा आमदार सानप यांनी आतापर्यंत बाजी मारली आहे. स्थायी समितीतील भाजपच्या नऊ सदस्यांपैकी सर्वाधिक चार पूर्व विधानसभा मतदारातून, तर पश्चिममधून तीन व मध्य मतदारसंघातून जेमतेम दोन सदस्य दिले गेले. आता तर सानप यांनी स्थायीचे सभापतिपदही आपल्याच मतदारसंघात ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. महापालिकेच्या आर्थिक चाव्या हातात ठेवण्यासाठी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणीही आमदार सानप यांचीच चलती असून, सभापतिपद आपल्या मतदारसंघाकडे खेचण्यात त्यांना जवळपास यश आले आहे.नाशिक पूर्वमधून सभापतिपदासाठी गणेश गिते, कमलेश बोडके, उद्धव निमसे, तसेच प्रा. शरद मोरे हे चौघे इच्छुक असले, तरी सध्या मात्र गिते यांचे पारडे जड आहे. मध्य नाशिकमधून आमदार फरांदेसमर्थक स्वाती भामरे यांचेही सभापतिपदासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच आमदार सानप आणि पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या गिते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ जवळपास पडणारच असल्याने भाजपमध्ये पुन्हा अस्वस्थता वाढीस लागली आहे. त्याचे पडसाद भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस सरोज पांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या शहर-जिल्हास्तरीय बैठकीत दिसून आले. यावेळी इच्छुकांनी संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याकडे याबाबतची नाराजी बोलून दाखवली, तसेच आपणच कसे योग्य, असा दाखला देण्याचा प्रयत्नही काही इच्छुकांनी केला. काळकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले असून, अजून निर्णय झाला नसल्याचे सांगत नाराजी शांत करण्याचा प्रयत्न केला.

---

बंडाळीची भीती

गिते यांच्या नावाला भाजपात विरोधाची धार अधिक तीव्र होऊ लागल्याने सभापतिपदाची उमेदवारी जाहीर करण्याबाबत भाजपत गोपनीयता बाळगली जात आहे. भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस पाहता बंडाळी होऊ नये यासाठी पक्षाकडून दक्षता घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सभापतिपदाचा उमेदवार कोण असणार याचे नाव ऐनवळी १७ तारखेला अर्ज दाखल करताना जाहीर केले जाणार आहे. परंतु, गितेंचे नाव निश्चित असल्याच्या चर्चेमुळे मात्र भाजपमधील सत्तास्पर्धा अधिकच वाढीस लागली असून, त्याचे तीव्र पडसाद महापौरपदाच्या निवडीवेळीही उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

--

स्थायी समिती सभापतिपदासाठी समितीतील अनेक सदस्य इच्छुक आहेत. त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी उमेदवारी ऐनवेळी जाहीर करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत पक्षाचा उमेदवार जाहीर केला जाईल.

-किशोर काळकर, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुंडशाहीला विरोध

$
0
0

बहुजन मुस्लिम संघर्ष समितीचा मोर्चा

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है, धर्म के नाम पर हत्या बंद करो, नहीं चलेगी नहीं चलेगी हुकूमशाही नहीं चलेगी' अशा विवीध घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकाची झुंडशाहीने हत्या केली. त्या पार्श्वभूमीवर बहुजन मुस्लिम संघर्ष समितीच्या वतीने नाशिक शहरातून सोमवारी मोर्चा काढण्यात आला. निषेध म्हणून मोर्चेकऱ्यांनी काळे झेंडे घेतले होते.

चौकमंडई येथून मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीला शहर ए खतीब हाफीज हिसमुद्दीन साहब खतीब यांनी उपस्थित समुदायाला उद्देशून या मोर्चाची पार्श्वभूमी सांगत शांततेत मोर्चा काढण्याचे आवाहन केले. त्यानंतर शहर ए काझी सय्यद आजीमुद्दीन काझी, नायब शहर ए काझी सय्यद राजा काझी, हाफीज कोकणी समीर, आसिफ इब्राहीम व किरण मोहिते यांनी समुदायाला सूचना केल्या. यावेळी विवीध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या चार वर्षांत केवळ झारखंडमध्ये १८ झुंडबळीच्या घटना घडल्या आहेत. संपूर्ण देशात हा आकडा २६६ वर पोहचला आहे. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी ज्या लोकांनी हे कृत्य केले, त्यांचा सन्मानदेखील करण्यात आला आहे. तबरेज अन्सारीची हत्या हे एक राजनैतिक षडयंत्र आहे. ही गुंडगिरी थांबवावी व देशात कायदा करावा, असे मत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी धर्मगुरुंनी प्रार्थना म्हटली. त्यानंतर मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

चौकमंडईतून निघालेला मोर्चा वाकडी बारव, महात्मा फुले मंडई, अब्दुल हमीद चौक, त्र्यंबक पोलिस चौकी, खडकाळी सिग्नल, इदगाह मैदान येथे विसर्जित करण्यात आला. यावेळी शेख शाद शब्बीर अली, सिद्दीकी आरशिवा जनामउद्दीन, खान इन्शार फातिमा व श्रावस्ती किरण मोहिते या युवतींनी मोर्चाला संबोधित केले.

.....

अॅम्ब्युलन्स सुविधा

मोर्चाला नाशिक शहरातून मुस्लिम बांधव येणार असल्याने तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी चौकमंडई, त्र्यंबक पोलिस चौकी, खडकाळी सिग्नल, इदगाह मैदान येथे अॅम्ब्युलन्स तैनात ठेवल्या होत्या.

.....

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मोर्चा इदगाह मैदान येथे पोहचत असताना बहुजन मुस्लिम संघर्ष समितीचे हाफीज हिसामुद्दीन खतीब, काजी मोइजोद्दिन सय्यद, शेख आसिफ सर, किरण मोहिते, अस्लम खान ( बाबा), वामनदादा गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांना पाठविण्यात येणार आहेत.

…..

...या आहेत मागण्या

- अल्पसंख्याक, दलितांना विशेष सुरक्षा द्यावी.

- झुंडबळीची सुनावणी जलदगती न्यायालयात होऊन आरोपींना कठोर शिक्षा द्यावी.

- झुंडबळी विरोधी कायदा बनवावा.

- झुंडबळीत बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत, एकास सरकारी नोकरी देण्याची तरतूद करावी.

- खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अल्पसंख्याक समुदायासाठी विशेष अ‍ॅट्रॉसिटी कायदा तयार करावा.

- शिक्षणातील आरक्षण तातडीने लागू करावे.

- 'मुस्लिम पर्सन लॉ'मध्ये सरकारचा हस्तक्षेप थांबवावा.

...

सन २०१५ पासून झुंडबळीच्या घटनांत वाढ झाली आहे. याविरुध्द सगळ्यांनी आवाज उठवण्याची गरज आहे. पीडितांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी लढण्याची गरज आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायदा तयार करायला हवा.

- शेख शाद शब्बीर अली

…..

देशात झुंडबळीचे प्रकार वाढले आहेत. सरकारने या झुंडशाही करणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे. दोन समाजांत फूट पाडण्याचे काम होत असून, त्याला वेळीच आळा घातला पाहिजे.

- सिद्दीकी आरशिवा जनामउद्दीन

…..

अल्पसंख्याक समाज दहशतीखाली जगतो आहे. दहशतवादामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होत आहे. झुंडबळीत बळी गेलेल्या युवकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. लोकशाही मार्गाने दोषींना कडक शासन व्हावे.

- खान इन्शार फातिमा

…..

झुंडशाहीला बळी पडलेल्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. सर्व देशद्रोह्याना शासन व्हावे, यासाठी न्यायामार्गाने लढा देण्याची गरज आहे.

- श्रावस्ती किरण मोहिते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झुंडशाहीविरोधात निफाडला मूक मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

देशभरातील होणाऱ्या झुंडबळीच्या घटनांविरोधात निफाड शहरात सोमवारी मुस्लिम समाज बांधवांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला. झुंडबळीच्या घटनेतील दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन तहसीलदार दीपक पाटील यांना देण्यात आले.

सोमवारी सकाळी दहा वाजता नियोजनानुसार निफाड तालुक्यातील मुस्लिम बांधव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मुस्लिम समाजाच्या विविध जमातींचे नागरिक एकत्र आले होते. हा मूक मोर्चा निफाड तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसीलदार पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वि. दा. व्यवहारे, नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, भाजपचे नगरसेवक राजाराम शेलार, शिवसेनेचे मुकुंद होळकर, प. स. सभापती सोमनाथ पानगव्हाणे, राष्ट्रवादीचे अनिल कुंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष सुधीर कराड, काँग्रेसचे राजेंद्र मोगल, मधुकर शेलार, आसिफ शेख, देवदत्त कापसे आदींसह तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष पिकाबाबत आज ओझरला बैठक

$
0
0

द्राक्ष पिकाबाबत

आज ओझरला बैठक

नाशिक : जिल्हा द्राक्ष पिक घेण्यात देशात अग्रेसर आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे संघटन व द्राक्ष पिकाची मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखड्याचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी (दि. १६) दुपारी तीन वाजता ओझर (ता. निफाड) येथील द्राक्ष बागायतदार संघ कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी उत्सुक व उपक्रमशील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक व द्राक्ष बागायतदार संघ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

यंत्रमागधारकांसाठी अनुदान

नाशिक : राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजात ५ टक्के सवलत अनुदान दिले जाणार आहे. त्याअंतर्गत २०१७-१८ या काळासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची ३० जूनपर्यंत असलेली अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी सर्व साधे यंत्रमागधारकांनी www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर वेळेच्या पूर्वी अर्ज भरावे, असे वस्त्रोद्योग उपायुक्तांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५४०५३६३ या फोन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर अंडरब्लास्टबाबत आज पथकातर्फे पाहणी

$
0
0

अभ्यासानंतर होणार निर्णय

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणाचा पाणीसाठा वाढला असला तरी या धरणातील मृतसाठा महापालिकेच्या इंटेकवेलपर्यंत आणण्यासाठी 'अंडर वॉटर कंट्रोल ब्लास्ट' करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. धरणात ब्लास्ट केल्यास उद्भवणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) चे पथक आज (दि. १६) नाशकात येत आहे. अभ्यासानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

गंगापूरमध्ये इंटेकवेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणी आल्याने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात सुरू केली होती. तसेच मृतसाठा वापरण्यासाठी महापालिकेने १७ वर्षांपूर्वी प्रलंबित राहिलेले चर खोदऱ्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची निविदा काढली होती. पावसाला सुरुवात झाल्याने धरणसाठ्यात वाढ झाली. मात्र भविष्याची गरज लक्षात घेत प्रशासनाने मुंबई डॉक यार्डच्या कामासाठी वापरात आणलेले 'अंडर वॉटर कन्ट्रोल ब्लास्ट' करून खडक फोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जलंसपदा विभाग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील विचारणा केली होती. परंतु, तिवरे धरण फुटण्याची घटना घडल्यानंतर प्रशासन सावध झाले होते. गंगापूर धरण मातीचे असल्यामुळे खडक फोडण्यासाठी पाण्याखाली स्फोट घडवून आणल्यास धरणाला धोका पोहोचेल या भीतीच्या पार्श्वभूमीवर महासभेवर निर्णय ढकलला होता. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार महापालिकेने पुणे येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राशी संपर्क साधत धरणातील स्फोटाबाबत विचारणा केली. यासंदर्भात केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्रोचे पथक आज (दि. १६) नाशिक दौऱ्यावर येत असून, ते गंगापूर धरणाला भेट देऊन पाहणी करणार आहे.

...

अहवालानंतरच निर्णय

खडक फोडण्यासाठी धरणात पाण्याखाली स्फोट केल्यास धरणाला धोका उद्भवू शकतो काय, स्फोटातून किती प्रमाणात कंप निर्माण होतील. त्याचा कितपत फटका बसू शकेल, याचा अभ्यास या पथकामार्फत केला जाणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर जलसंपदा विभागाच्या संमतीने पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गमे व अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोखाडा प्रवासी बसचा त्र्यंबकजवळ अपघात

$
0
0

मोखाडा प्रवासी बसचा त्र्यंबकजवळ अपघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोखाडाहून नाशिककडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुमारे ४० प्रवासी असलेली ही गाडी दरीत जाण्यापासून थोडक्यात बचावली. यादरम्यान त्याच्या हाताला किरकोळ जखम झाली. प्रवाशांना मात्र कोणतीही इजा झाली नाही.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा (ता. जव्हार) येथून सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली बस नाशिककडे निघाली. त्र्यंबकजवळील तोरणमाळ घाटात गाडी आली. पावसामुळे मोठ्या प्रमाणात घाटातील माती मार्गावर पसरली होती. वळण मार्गावर याच मातीमुळे बस घसरू लागली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस दरीकडे जाणार नाही, याची काळजी घेतली. बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला डोंगराच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला. पाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मोरीकडे बस नेली. परंतु, तेथेही पाणी असल्याने बस रस्त्याच्या खाली आणि दरीच्या कडेला गेली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून बसमधील प्रवासी वाचले. बसमध्ये महिला प्रवाशांसह गर्भवतींचाही समावेश होता. या घटनेने भेदरलेल्या प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाचा आधार घेत नाशिक गाठले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेविरोधात पतसंस्थांचे धरणे

$
0
0

अडीचशे कोटींच्या ठेवी अडकल्यामुळे संस्था अडचणीत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेत विविध पतसंस्थांच्या २५० कोटींच्या ठेवी अडकल्यामुळे सोमवारी या पतसंस्थांच्या पदाधिकारी, कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधींनी धरणे आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला. बँकेच्या जुन्या इमारतीसमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.

या अगोदर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन ठेवी मिळविण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. बँक या ठेवी देत नसल्यामुळे आम्हाला कर्जदारांना कर्जवाटप करणे व दररोजचे व्यवहार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर बँकेने या ठेवी देणे बंद केल्या. त्यानंतर वसुलीचे कारण सांगून बँकेने थांबण्यास सांगितले. पण, त्यानंतरही बँकेने या ठेवीचे पैसे दिले नाही. त्यामुळे पतसंस्थेचे व्यवहारही ठप्प झाल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी बँकेच्या समोरच धरणे देऊन घोषणा दिल्या. या आंदोलनात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव लोढा, कार्याध्यक्ष गोपाळराव पाटील, संचालिका अॅड. अंजली पाटील, जिल्हा पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनचे मधुकर भालेराव, नंदुकुमार खैरनाद, नरेंद्र बागडे, प्रकाश गवळी, निशिगंधा मोगल आदी उपस्थित होते. धरणे आंदोलनानंतर पतंसस्थांच्या प्रतिनिधींनी विभागीय निबंधक कार्यालयात बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images