Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाण्याची टाकीच ठरली काळ!

$
0
0

घटनास्थळी कामगारांचा आक्रोश

...

म. टा. वृत्तसेवा, सातपूर /म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आला पावसाळा जीवाला सांभाळा' अशी म्हण मराठीत आहे. परंतु, यातील गांभीर्याकडे दुर्लक्ष केल्याने गंगापूररोडवरील ध्रुवनगर येथे पाण्याची टाकी चौघा कामगारांसाठी काळ ठरली. सम्राट ग्रुपच्या 'अपना घर' या बांधकाम साइटवर मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बीबी सनाबी शेख (वय २७, पश्चिम बंगाल) या महिलेसह अब्दुल गरीबुल बारी (वय ३०, रा. बिहार), सुदाम खिरदार (रा. ओडिसा), अनामी चंदन (वय ५०, रा. ओडिसा) अशी मृत्युमुखी पडलेल्या चौघांची नावे आहेत. या घटनेत शेख मझार आलम (वय ३०, रा. पश्चिम बंगाल) हा कामगार जखमी झाला आहे. ही बांधकाम साइट मोठी असून, सध्या येथे जोरदार काम सुरू आहे. बांधकामासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथून आलेल्या कामगारांच्या निवासासाठी तात्पुरती सोय केली आहे. याच मजुरांच्या पाण्याची सोय करण्यासाठी ३० हजार लिटर क्षमतेची ही टाकी उभारली होती. मंगळवारी सकाळी काम सुरू करण्यापूर्वी कामगारांची नेहमीप्रमाणे तयारी सुरू होती. पाण्याच्या टाकीजवळ किमान आठ ते दहा कामगार आंघोळ, कपडे धुणे, दात घसत होते. अचानक एक आवाज झाला. विस्फोट व्हावा त्याप्रमाणे टाकी कोसळून पडली. विटा आणि हजारो लिटर पाण्याने तिथे असलेल्या कामगारांना कवेत घेतले. सुदैवाने काही वेळतेच बाजूला सरले. मात्र, वरील चौघा कामगारांना नियतीने तेवढा वेळ दिला नाही. या घटनेने साइटवरील कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. आर्त किंकाळ्यांनी हा परिसर गजबजून गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पोहचले तेव्हा दोघा जखमी कामगारांना तेथून हलविण्यात आले होते. इतर बांधकामाच्या राडारोड्याखाली दबलेले होते. रविवारी रात्रीच्या पावसामुळे तेथे मदत पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळे एका ट्रॅक्टरने कसाबसा गाळातून तिथपर्यंत मार्ग काढला. एक मोठा चबुतरा असून, त्यावर विटा आणि सिमेंटच्या मदतीने या मोठ्या टाकीचे बांधकाम केले होते. पावसामुळे जमिनीत पाणी मुरून टाकीचा चबुतरा हलला आणि आतील पाण्याच्या प्रेशरमुळे पुढील प्रकार घडला असावा, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.

...

... तर दुर्घटना टळली असती!

संबंधित बांधकाम व्यावसायिकाने काम करणाऱ्या मजुरांसाठी पत्र्याचे टेंट उभारले आहे. मजुरांना आंघोळ, पिण्याचे पाणी व इतर कामासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली होती. ही टाकी वरच्या बाजूने झाकलेली नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे टाकी ओव्हरफ्लो झाली होती, असे प्रत्यक्षदर्शी मजुरांनी सांगितले. पाण्याची टाकी नादुरुस्त झाल्याबाबत तक्रार मजुरांनी केली होती. मात्र याकडे ठेकेदाराने लक्ष दिलेच नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक माहिती घेत असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साबळे करीत आहेत. 'अपना घर' या घरकुलच्या बांधकामाच्या ठिकाणी तब्बल सात ते आठ ठेकेदारांनी काम घेतले असल्याचे समजते.

...

कच्च्या जागेवर स्ट्रक्चरल ऑडिट कसे?

'अपना घर' या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी महापालिका आयुक्त गमे यांनी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संबंधित जागेचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, अशी माहिती दिली. प्रथम दर्शनी बांधकाम कच्चे असल्याचे दिसते. त्याबाबत अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असेही गमे यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे सातपूर विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी व कर्मचारी उपस्थित होते.

...

महापालिकेच्या अहवालानंतर गुन्हा

शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह इतर अधिक हजर होते. ही आकस्मात घटना असून, महापालिकेकडून माहिती मिळाल्यावर सदोष मनुष्य गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी संपूर्ण जागेची पाहणी करून गंगापूर पोलिसांना योग्य सूचनाही दिल्या. परंतु, संबंधित जागेवर केवळ बांधकाम मजुरांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याबाबत कुठलीही ठोस व्यवस्था ठेवली नसल्याने मजुरांना त्यांचे प्राण गमवावे लागले, असा आरोप केला जात आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी महापालिका व पोलिस आयुक्तांनी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदा वृक्षतोड; चाडेगावात गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील चाडेगाव येथील गटनंबर १२ मधील पाच वृक्ष अनधिकृतरित्या तोडल्याप्रकरणी वसंत श्रीधर नागरे (रा. चाडेगाव) यांच्याविरोधात नाशिकरोड उद्यान विभागाचे निरिक्षक एजाज शेख यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियम कायद्यातील तरतुदींनुसार फिर्याद दाखल केली आहे.

मार्च महिन्यात चाडेगाव येथील सुभाष पर्वत मानकर यांनी महापालिकेच्या उद्यान विभागकडे वसंत नागरे यांच्याविरोधात या प्रकरणी तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उद्यान विभागाचे निरिक्षक एजाज शेख यांनी या तक्रार अर्जाची चौकशी केली असता चाडेगाव येथील गट नंबर १२ मधुन बाभुळ, सुबाभुळ, विलायती चिंच, बोर आणि कडुनिंबाची प्रत्येकी एकेक असे एकूण पाच वृक्ष वसंत नागरे यांनी तोडल्याची माहिती चौकशीत समोर आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंट बोर्डाला २६ कोटींचा निधी द्या

$
0
0

शिष्ट मंडळाचे मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना साकडे

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्य सरकारकडून मिळणारा ५ कोटी, आरोग्य सुविधांतंर्गत आरोग्यमंत्र्यांकडून १३ कोटी तर जीएसटीच्या रुपाने ४.७५ कोटी असे एकूण २६ कोटी रुपये द्यावे, या मागणीकरिता आमदार बाळासाहेब सानप, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांच्यासह नगरसेवक बाबूराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, विलास धुर्जड आदींनी भेट घेतली.

जीएसटी कर लागू होण्यापूर्वी बोर्डाला जकातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैश्यांचा वापर हा नागरी विकासाच्या कामांसाठी करता येत होता. मात्र, आता जीएसटी लागू होऊन दोन वर्षे उलटली तरी बोर्डाला त्या बदल्यात अद्याप ४.७५ कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळालेले नाही. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डातील विकासकामांना राज्य सरकारचा निधी उपलब्ध होईल, असे जून २०१८ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी उपलब्धतेबाबत मंजुरी देण्यात आली होती. याशिवाय कॅन्टोन्मेंट बोर्डाला ६० बेडचे हॉस्पिटल नव्याने उभारण्यासाठी १३ कोटी रुपये उपलब्ध व्हावेत, अशा मागण्या शिष्ट मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्र्यांना सांगून साकडे घातले. हा सर्व निधी उपलब्ध झाल्यास देवळालीतील रखडलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे.

पालकमंत्र्यांचे आश्वासन

कॅन्टोन्मेंट बोर्ड शिष्टमंडळाच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडे यापूर्वीच सादर करण्यात आल्या असून त्याची फाईल मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे आहे. अर्थसंकल्पामध्ये त्यासाठीचा निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीसह अनेक गाड्या रद्द

$
0
0

पावसाने रेल्वेसेवा विस्कळीत

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रुळांवर पाणी साचून मुंबईची लोकलसेवा मंगळवारी ठप्प झाली. घाट क्षेत्रात ब्रेक डाउन झाल्यामुळे काही पॅसेंजर आणि एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. काही गाड्या मुंबईत न येता नाशिक, इगतपुरी, देवळाली स्थानकांवरच थांबविण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

पंचवटी, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी, मुंबईला जाणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर, तपोवन, मुंबई हावडा दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. आज (दि. ३) त्या धावणार की नाही याबाबत रेल्वेने कळवलेले नाही. मुंबईतील पावसाच्या जोरावर हे अवलंबून आहे.

मुंबईहून सुटणारी भुसावळ एक्स्प्रेस मुंबई-भुसावळ पॅसेंजर बुधवारी (दि. ३) धावणार नाही. डाउन एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस ३ जूनला मनमाड स्टेशन ते भुवनेश्वर स्टेशनपर्यंतच धावेल.

नाशिकमार्गे जाणारी भुसावळ-पुणे हुतात्मा मंगळवारी मनमाड-दौड मार्गे धावली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडपर्यंतच, तर टाटानगर-मुंबई एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंत, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस देवळालीपर्यंतच धावल्या. मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक ते नागपूरपर्यंत चालविण्यात आली. अप हावडा-मुंबई एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनपर्यंतच धावली. डाउन मुंबई हावडा एक्स्प्रेस मुंबईऐवजी भुसावळ ते हावडा स्टेशनपर्यंतच गेली. गोरखपूर-एलटीटी मुंबई एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनपर्यंत धावली.

डाउन मुंबई सिंकदराबाद देवगिरी एक्स्प्रेसऐवजी नाशिक ते सिंकदराबादपर्यंतच धावली. अप शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस खेरवाडीपर्यंतच धावली. अप गोंदिया मुंबई-विदर्भ एक्स्प्रेस नाशिक स्टेशनपर्यंतच चालवली गेली. डाउन मुंबई फिरोजपूर पंजाब एक्स्प्रेस मुंबईऐवजी मनमाड ते फिरोजपूरपर्यंत, तर डाउन मुंबई अमृतसर एक्स्प्रेस मनमाड ते अमृतसरपर्यंतच धावली.

औरंगाबाद दादर जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडपर्यंत, डाउन दादर औरंगाबाद जनशताब्दी एक्स्प्रेस दादरऐवजी मनमाड स्टेशन ते औरंगाबादपर्यंत धावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समिती सभापतींची उद्या निवड

$
0
0

मालेगाव : येथील महापालिकेच्या विद्यमान प्रभाग समिती सभापतिपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्य प्रभाग समिती सभापतीची निवड ४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती नगरसचिव राजेश धसे यांनी दिली. गेल्यावेळी सत्ताधारी काँग्रेस शिवसेनेचे या प्रभाग समित्यांवर वर्चस्व होते. हे वर्चस्व कायम राखण्यात यश मिळते का? याकडे शहराचे लक्ष लागून आहे. प्रभाग १ साठी शिवसेनेच्या राजाराम जाधव यांचा एकमेव अर्ज आहे. प्रभाग २ साठी कमरुन्नीसा रिजवान व अन्सारी मन्सूर अहमद शब्बीर अहमद यांनी अर्ज दाखल. प्रभाग ३ साठी रजिया बेगम अब्दुला मजीद व अन्सारी आसफा मोहम्मद राशीद यांनी अर्ज दाखल केले आहे. तर प्रभाग ४ साठी इसराई खा इस्माईल व अन्सारी आयाज मोहम्मद सुलतान यांनी अर्ज दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पावसाचे आगमन

$
0
0

सोनगीर, चिमठाणे परिसरात दमदार पाऊस

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरासह तालुक्यातील सोनगीर, चिमठाणे परिसरात मंगळवारी (दि. २) दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. तर तालुक्यात काही गावांमध्ये पहिल्यांदाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. गेल्या महिन्याभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनगीर चिमठाणे परिसरात तासभर पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

शहर आणि परिसरात गेल्या आठवड्याभराच्या कालखंडानंतर मंगळवारी (दि. १) पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरण्यांच्या कामाला वेग येऊन शेतमजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शहरात सर्वकडे पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याचे चित्र दिसून आले. भाजीबाजारात चिखल झाला होता.

जिल्ह्यात पेरण्यांना वेग
दमदार पावसाअभावी जिल्ह्यात अजूनही खरीप पेरणीला वेग आलेला नाही. मात्र, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या केवळ १०.७० टक्के पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ५२ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यंदा ४ लाख ८९ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यात एकूण १ लाख २२ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर शिरपूर तालुक्यात एकूण १ लाख २७ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रापैकी २० हजार ५०० क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्याखालोखाल धुळे तालुक्यात १ लाख ३५ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार ५०० क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर साक्री तालुक्यात १ लाख ४ हजार ४३ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ८५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्लक्षामुळेच घडली दुर्घटना

$
0
0

विजय पांढरे यांचे मत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानेच चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि दुर्घटना घडली. याठिकाणी योग्य काम झाले असते तर धरण फुटले नसते. कोकणातील बहुतांश धरणांची कामे योग्य पद्धतीने झालेली नाहीत. येथे अनेक ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप जलसंपदा विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे सेवानिवृत्त अधिकारी विजय पांढरे यांनी केला आहे.

धरण सुरक्षेबाबत पांढरे यांनी 'मटा'ला सांगितले, की राज्यात धरणांची सर्वात वाईट कामे ही कोकणात झाली आहेत. धरण बनवण्यासाठी योग्य जागा निवडणे आवश्यक असते. तेथे काळी माती उपलब्ध नाही. मी अधिकारी असतांना अनेक धरणांना भेट दिली होती. तेथे नको ते काम करण्यात आले आहे. तेथे काही धरणांची कामे अनेक वर्षांपासून रखडली आहेत. या धरणांमुळे १० टक्के सुद्धा पाणी शेतीला मिळत नाही. त्यामुळे येथील धरणांची अवस्था चांगली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील इतर धरणे व जलसंपदाच्या कामाबद्दल त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सरकारमध्ये एक-दोन माणसे चांगली असून चालत नाही. त्यासाठी सिस्टिम बदलणे गरजेचे आहे. अजित पवारांच्या काळात जे चालले होते ते आजही गिरीश महाजनांच्या काळात सुरू असल्याचे सांगत त्यांनी गैरव्यवहारावर बोट ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगचा वाद आरटीओपर्यंत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

अशोका मार्गावर असलेल्या सेक्रेड हार्ट या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यास शाळेच्या आवारात जागा देण्यात यावी, या मागणीवरून वाहनचालक, पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद उद्भवला. या प्रकरणी शाळा प्रशासन, पालक, वाहनचालक आणि परिवहन अधिकारी यांच्यात बैठक झाली. मात्र, त्यातही तोडगा निघाला नाही. याबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचे समजते.

अशोका मार्गावर असलेल्या सेक्रेड हार्ट या शाळेतील अनेक विद्यार्थी खासगी वाहनांनी येतात. मात्र, या वाहनांना उभे राहण्यासाठी जागाच नसल्याने अनेक वर्षांपासून हे वाहनचालक शाळेच्या आवारात त्यासाठी जागेची मागणी करीत आहेत. शाळेच्या जवळपास लोकवस्ती असल्याने येथील नागरिकही या गाड्या उभ्या करू देत नाहीत. अशोका मार्ग वर्दळीचा रस्ता असल्याने विद्यार्थ्यांना या रस्त्यावर सोडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शाळेच्या आवारातच या वाहनांना परवानगी दिली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोयीचे होणार असल्याचे वाहनचालक व पालकांचे म्हणणे आहे. वारंवार मागणी करूनही शाळा प्रशासन लक्ष देत नसल्याने वाहनचालक आणि पालकांनी याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला. मात्र, शाळेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालक, वाहनचालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यासाठी आयोजित बैठकीत आरटीओतील काही अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, यावर निर्णय झाला नाही.

शिक्षण विभागाने घालावे लक्ष

इंदिरानगर, अशोकामार्ग परिसरातील शाळांमध्ये पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. शाळा प्रशासन वाहनचालकांना जागा देत नाही. त्यामुळे या मुलांना कुठे आणि कसे सोडावे, हा मोठा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा असतो. वाहनचालकांच्या तसेच शाळेजवळ होणाऱ्या पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शिक्षण विभागानेच कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळावर अखेर नाइट लँडिंग

$
0
0

नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळाला अखेर नाइट लँडिंगची परवानगी मिळाली आहे. हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमानतळ प्राधिकरणाला तसे पत्र दिले असून, यामुळे नाशिक ते गोवा या सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ओझर विमानतळावरुन प्रवासी विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे येत्या काळात प्रवासी विमानसेवा वाढण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वृत्त...३

शिवनेरी, अश्वमेधच्या

तिकीट दरात कपात

पुणे : पुणे-मुंबईसह राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या आणि एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या गाड्यांच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. नवे तिकीट दर येत्या सोमवारपासून, म्हणजेच ८ जुलैपासून लागू होणार आहेत.

सविस्तर वृत्त...१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी सेंटर मॉलकडून नगररचनालाच आव्हान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहरातील मॉलमध्येही पार्किंग मोफत सुरू करण्याच्या नगररचना विभागाने दिलेल्या नोटिसा अंगलट आल्या आहेत. उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉल प्रशासनाने महापालिकेला उलट नोटीस देत कोणत्या अधिकाराने किंवा कायद्याखाली नोटीस काढली, असा जाब विचारला आहे. सिटी सेंटर मॉल प्रशासनाने पालिकेकडूनच उत्तर मागितल्याने प्रशासन अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आता प्रशासन महासभेचा ठराव पुढे करते की कायदेशीर मार्ग अवलंबते याकडे लक्ष लागून आहे.

शहरातील पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या शहर सुधार समितीने गेल्या महिन्यात ठराव करीत, शहरातील सर्व मॉलमध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय घेतला. त्या ठरावाची तातडीने अंमलबजावणीदेखील सुरू झाली. त्यानुसार शहरातील मॉलमध्येही मोफत पार्किंग करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेवर सादर केला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर नगरचना विभागाने शहरातील सहा मॉल्सना नोटिसा पाठवून पार्किंग मोफत खुली करून देण्यास बजावले होते. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. परंतु, सिटी सेंटर मॉल प्रशासनाने याविरोधात पालिकेच्या नगररचना विभागालाच आव्हान दिले. आपण कुठल्या कायद्याखाली, अधिकारान्वये नोटीस पाठविली याचे उत्तर नगररचना विभागाकडून मागितले आहे. जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत कारवाई करू नये अशी विनंतीदेखील नगररचना विभागाकडे केली आहे. कार्यकारी अभियंता राजू आहेर यांच्या नावाने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. मोफत पार्किंगबाबत पुन्हा कायदेशीर तिढा निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुथूट फायनान्सवरील दरोडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांच्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य संशयित अजूनही पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. अटक आरोपींकडून त्यांच्याबाबत माहिती मिळविण्याकरीता पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.

उंटवाडी रोडतील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर १४ जून रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला होता. यात संशयितांना धाडसी वृत्तीने प्रतिकार करणाऱ्या अभियंता सॅजू सॅम्युअल यांच्यावर गोळ्या झाडून दरोडेखोरांनी त्यांची हत्या केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्रसिंग राजपूत व परमेंदरसिंग या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी अन्य आरोपी अजूनही पोलिसांना मिळू शकलेले नाहीत.

जितेंद्र व परमेंदर यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना अंबड पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अन्य आरोपींची माहिती मिळविण्याकामी तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलिस कोठडीला मुदतवाढ मागितली. त्यामुळे आरोपींचा पोलिस कोठडीतील मुक्काम तीन दिवसांनी वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - झेडपी कर्मचारी महासंघाचे धरणे आंदोलन

$
0
0

जोड

दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व त्याच्याशी संलग्न सतरा कर्मचारी संघटनांतर्फे जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर विविध प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात राज्य महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष कैलास वाकचौरे, जिल्हा अध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील यासह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्यात मागेल त्याला खावटी कर्ज मिळणार’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने आदिवासींचे सुमारे साडेतीनशे कोटींचे कर्ज माफ केले आहे. आता आदिवासींकडून मागणी झाल्यास पुन्हा असे कर्ज दिले जाईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांबाबत भेदभाव झाल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षण संस्थाची मान्यता रद्द केली जाईल. तसेच आश्रमशाळांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यास दोषी धरले जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

मंत्रीपद स्वीकारल्यानंतर उईके यांनी बुधवारी (दि. ३) प्रथमच आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर घेतली. विविध योजनांचा आढावा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आदिवासी विकास विभागाने तब्बल पंचवीस हजार मुला-मुलींना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात बसविले जात असल्याच्या तक्रारी आल्या. प्रवेशावेळी ५० टक्के आदिवासी आणि ५० टक्के बिगर आदिवासी विद्यार्थी असावेत अशी अट आहे. परंतु, कोणी असा भेदभाव करत असेल तर, त्यावर थेट कारवाई केली जाईल, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, डॉ. राहुल आहेर, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते आदी उपस्थित होते.

'डीबीटी'वर विचारमंथन

आदिवासी विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधींनी 'डीबीटा'ला विरोध केला आहे. त्याबाबत विचारले असता, 'डीबीटी'ला कोणाचा विरोध नाही. मात्र, विद्यार्थी हित व त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न आहे. मात्र, जी वसतिगृह शहरापासून लांब आहेत, तेथील मुलींना जेवण देण्याबाबत आपल्या विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत. मुलींच्या वसतिगृहांमध्ये सेंट्रल किचनद्वारेच जेवण देण्यात येईल. मुलींच्या वसतिगृहामध्ये महिला अधीक्षका असाव्यात, अशा सूचना दिल्याचेही डॉ. उईके यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची झाडाझडती

बैठकीत डॉ. उईके यांनी आदिवासी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आदिवासींसाठी राबविण्यात येत असलेल्या उपायांकडे दुर्लक्ष करणे, आश्रमशाळांच्या सुविधांकडे दुर्लक्षासह जलयुक्त शिवार योजनेतील कामांवरून डॉ. उईके यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. आदिवासींना वेळेत योजनेचा लाभ मिळत नाही, अधिकारी कार्यालयात बसूनच काम करतात, असा आरोप करत त्यांनी आदिवासींच्या तक्रारी येऊ देऊ नका, असा सज्जड दमही यावेळी भरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील धरणे ‘डेंजर झोन’मध्ये नाहीत

$
0
0

'मेरी'च्या धरण सुरक्षितता विभागाचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चिपळूण येथील तिवरे धरणफुटीमुळे राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा रडारवर आला असताना, नाशिक मेरी येथील राज्याच्या धरण सुरक्षितता विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, राज्यातील एकही धरण डेंजर झोनमध्ये नसल्याची माहिती दिली. जलसंपदा विभागाची राज्यात तीन हजार मध्यम व मोठी धरणे आहेत. त्यातील एका धरणाचे काम सुरू असून, इतर कोणत्याही धरणाच्या फुटीची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाच्या धरणांच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी अगोदर एकूण खर्चाच्या २ टक्के निधी दिला जात होता. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता धरण दुरुस्तीचे व देखभालीचे काम करण्यासाठी आता निधीची अडचण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑटो डीसीआर’बाबत एक पाऊल मागे

$
0
0

सॉफ्टेक कंपनीला पुन्हा आठ दिवसांटी मुदत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगररचनातील वादग्रस्त ऑटो डीसीआर प्रणाली काळ्या यादीत टाकण्याबाबतची कायदेशीर कारवाई आपल्यावरच उलटू नये, यासाठी महापालिकेने एक पाऊल मागे घेतले आहे. बांधकाम परवानग्यांसाठी नगररचना विभागात वापरात येत असलेल्या सदोष ऑटो-डीसीआर संगणक प्रणाली संचालित करणाऱ्या कंपनीला एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ दिवसांत प्रणालीतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कायदेशीर कारवाईचा अंतिम इशारा देण्यात आला आहे.

नवीन शहर विकास नियंत्रण नियमावलीत ऑनलाइन पद्धतीनेच बांधकाम परवानग्या देणे बंधनकारक असल्याने महापालिकेने १ मे २०१७ पासून ऑटो-डीसीआर प्रणालीनुसार परवानग्या देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या परवानग्या देताना गेल्या दोन वर्षांपासून अनंत अडचणींना व्यावसायिकांना सामोरे जावे लागले. वेळेत परवागनी न मिळणे, प्रस्ताव फेटाळणे, पुनर्प्रस्तावासाठी छाननी फी वसूल करणे, प्रस्तावाचे ट्रॅक रेकॉर्ड न दिसणे आदी असंख्य तक्रारी होत्या. बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी देखील अनेकदा आयुक्तांकडे तक्रारी केल्या. परंतु, अद्यापही त्यात दुरुस्ती होत नाही. पालिका प्रशासनाने पुणेस्थित सॉफ्टेक कंपनीला ३५ वेळा नोटीस बजावल्यानंतरही दुरुस्ती होत नसल्याने अखेरीस आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील तयारीही प्रशानाने सुरू केली आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराकडून महापालिकेवर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या बैठकीत कंपनीला शेवटचा अंतिम इशारा देण्यात आला आहे. आठ दिवसांत प्रणालीत सुधारणा झाली नाही तर मात्र कायदेशीर कारवाई करू असा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी तीन दिवसांत लेखी उपाययोजना नगररचना विभागाकडे देण्याचेही कंपनीला आदेशीत करण्यात आले आहे. त्यामुळे आठ दिवसांत कंपनी कसा कारभार सुधारते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेगाड्या बारा तास उशिराने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईत पावसाने गेले दोन दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर आज थोडी विश्रांती घेतली. मात्र, तरीही गोदावरी, राज्यराणी, तपोवनसह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्यांना एक ते बारा तास उशीर झाला. पहाटे पाचची भुसावळ- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आज नाशिकरोडला आली नाही. ती मनमाड-दौंड मार्गाने गेली. त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांची गैरसोय झाली. पंचवटी आज मुंबईला गेली. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिकांनी सुस्कारा सोडला.

गेले दोन दिवस लोहमार्गावर पाणी साचून मुंबईत लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे काही गाड्या मुंबईत न येता नाशिक, इगतपुरी, देवळाली स्थानकांवरच थांबविण्यात आल्या होत्या. पंचवटी, मनमाड- एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी, मुंबईला जाणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर, तपोवन, मुंबई हावड़ा दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या सोमवारी रद्द करण्यात आल्या होत्या.

रद्द झालेल्या गाड्या

मुंबईला आज जाणारी पंचवटी आणि मुंबईहून दिल्लीला जाणारी राजधानी वगळता बहुतांश गाड्या रद्द झाल्या होत्या. मुंबई-वाराणसी महानगरी, मुंबईला जाणारी व येणारी राज्यराणी, गोदावरी, तसेच मुंबई-भुसावळ, मनमाड-इगतपुरी पॅसेंजर, मुंबईला जाणारी तपोवन पॅसेंजर रद्द करण्यात आली. औरंगाबादला जाणारी तपोवन मात्र सकाळी धावली. नागपूरची सेवाग्राम फक्त नाशिकपर्यंत येऊन परत माघारी गेली. ही गाडी नाशिक ते मुंबई रद्द करण्यात आली. रेल्वेसेवा गुरुवारी सुरळीत होणार का, ते रेल्वेने स्पष्ट केलेले नाही

कामायनी, गरीबरथ मार्गी

मुंबईहून दोन जूनला सुटणाऱ्या गाड्या आज, तीन जूनला सोडण्यात आल्या. त्यामध्ये कामायनी सोमवारऐवजी मंगळवारी सकाळी साडेनऊला, गरीबरथ सोमवारी सायंकाळी पाचऐवजी मंगळवारी सकाळी अकराला, कानपूर एक्स्प्रेस सोमवारी सायंकाळी साडेसातऐवजी मंगळवारी दुपारी साडेबाराला गेली. मुंबईला जाणाऱ्या गाड्यांमध्ये सोमवारी रात्री तीनची पंजाब मेल मंगळवारी सकाळी नऊला, कोलकाता मेल मंगळवारी सकाळी सातऐवजी अकराला, सुविधा एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी सातऐवजी सव्वाअकराला, जनता एक्स्प्रेस साडेसहाऐवजी पावणेअकराला मुंबईला गेली. मुंबईला दोन जूनला रात्री दोनला जाणारी उद्योगनगरी आज सकाळी पावणेदहाला गेली. ती सात तास उशिराने आली.

बारा तास उशीर

मुंबईहून नाशिकला येणाऱ्या गाड्यांना बारा तासांपर्यंत उशीर झाला. सोमवारची पवन एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी अकराला गेली. पटना सुपर बारा तास, कोलकाता मेल नऊ तास, पाटलीपुत्र कृषीनगर सात तास, साकेत, गोदान, पवन, कामायनी अडीच तास, काशी दीड तास, तपोवन डाऊन एक तास, गीतांजली व पुष्पक अर्धा तास उशिरा आली. मनमाड- गोदावरीला दीड तास उशीर झाला.

वेटिंग रूम फुल्ल

नाशिकरोड स्थानकात दोन वेटिंग रूम आहेत. गाड्यांना बारा तास उशीर झाल्याने वेटिंग रूम प्रवाशांनी फुल्ल झाल्या होत्या. अनेक प्रवाशांनी खाली पथारी अंथरली. रेल्वे स्थानक प्रवेशद्वार, तिकीट बुकिंग, रिझर्व्हेशन, प्लॅटफॉर्म एक, दोन व तीनवरही अनेक प्रवाशांनी पथारी टाकून आराम करणे पसंत केले. गाड्यांना उशीर झाल्याने तिकीट तपासणीस व अन्य अधिकाऱ्यांवर ताण वाढला. त्यांना जास्त काम करावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणघारीला दिलेशेतकऱ्याने जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कसबे सुकेणे येथील शेतकरी सागर भंडारे याने कोकणघार या पक्ष्याला जीवदान दिले. निफाड तालुक्यातील कसबे सुकणे येथे भंडारे कुटुंबीयांची शेती आहे. शेतात अशोकाचे शंभर फुटीचे झाड आहे. झाडावर कोकणघारीचे घरटे आहे. या घरट्यातून कोकणघार सायंकाळी कोसळली. यात घारीच्या पायाला दुखापत झाली. भंडारे यांनी आई व भावाच्या मदतीने घारीच्या जखमेवर उपचार केल्यानंतर घारीला जीवदान मिळाले. काही दिवसांतच घारीने पुन्हा आकाशात झेप घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी पोलिसांचे डोळे व कान व्हावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरातील गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी सामान्य नागरिकांनीसुद्धा विनागणवेशातील पोलिस म्हणून काम केले पाहिजे. पोलिसांचे डोळे आणि कान नाशिककरांनी व्हावे. तरच गुन्हेगारी पूर्णपणे संपुष्टात येईल, असा विश्वास पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.

अंबड, सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी सांगितले, की शहराच्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसबळ खूपच कमी आहे. सुमारे ५५० नागरिकांच्या मागे एक पोलिस कर्मचारी, असे प्रमाण आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना खूपच घडत असतात. शहरात औद्योगिक वसाहत ते झोपडपट्टी एरिया असा सर्वच भाग असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक भागात गुन्हेगारीचा प्रकार हा वेगवेगळा आहे. या सगळ्या प्रकाराचा अभ्यास करून गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी पोलिस सज्ज आहे. बऱ्याचदा गुन्हा घडल्यानंतर तास- दीड तासाने पोलिसांना त्याची माहिती मिळते. मात्र, गुन्हा घडल्यावर ताबडतोब त्या ठिकाणच्या नागरिकांनी जर पोलिसांना माहिती दिली, तर गुन्हेगारांना पकडणे सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा उभारून जतमध्ये क्यूआर कोडसारख्या यंत्रणेचा वापर करून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिस काम करीत आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात संवाद वाढवण्याच्या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या वेळी अंबड, सातपूर, सिडको आणि इंदिरानगर भागातील नागरिकांनी होत असलेल्या गुन्हेगारीची माहिती दिली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले म्हणून सभागृह नेते सतीश सोनवणे, नगरसेवक श्याम बडोदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, बजरंग शिंदे, एकनाथ नवले यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीय पंथीयांचा शेतकऱ्यांना त्रास!

$
0
0

पिंपळगाव बाजार समितीतील प्रकार; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून तृतीय पंथीयांचा त्रास सहन करावा लागत आहे. हे तृतीयपंथी शेतकऱ्यांकडून बळजबरीने कांदा घेत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत मार्केटमध्ये चौकशी केली असता त्यात तथ्य असल्याचा दुजोरा मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

पिंपळगाव बाजार समितीत जिल्हाभरातून शेतकरी येतात. लिलाव झाल्यानंतर संबंधित तृतीय पंथीय खाली पडलेले कांदे गोळा करतात. तर कधीकधी शेतकऱ्यांकडून मागून घेतात. वाद नको म्हणून शेतकरीही विरोध करीत नाही. मात्र आता हा त्रास वाढल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे पडसाद पडले आहेत. पिंपळगाव बाजार समितीत हंगामात २५ ते ३० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. प्रचंड वर्दळ असल्याने याकडे कोणी लक्ष देत नाही. त्याचा फायदा ही मंडळी उठवते. त्यांच्यासोबत रोजंदारीने लावलेले काही मुलेही असतात. एकिकडे असे चित्र असले तरी दुसरीकडे मात्र तृतीय पंथीयांनी आपल्या वाहनाला हात लावला तर चांगला भाव मिळेल म्हणून काही शेतकरी स्वतःच तृतीयपंथीयांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचेही काहींनी सांगितले. बाजार समिती प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून संबंधितांचा बंदोबस्त करायला हवा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच वणी आणि सायखेडा बाजार समितीतही असे प्रकार होत असल्याची माहिती आहे.

पिंपळगाव कांदा मार्केटमध्ये असे प्रकार होत असल्याची माहिती आहे. लिलावसाठी मोठी गर्दी असते. या बाबत शेतकऱ्यांनी कधी तक्रारी केल्या नाही. हा प्रकार नेमका आताच का व्हायरल होतोय असाही प्रश्न आम्हाला पडला आहे. ज्यानी व्हायरल केले त्यांनी तक्रार केलेली नाही.

---- संजय पाटील, सचिव, पिंपळगाव बाजार समिती

तृतीय पंथीयांकडून दादागिरीची अथवा दहशतीची पिंपळगाव बाजार समिती किंवा शेतकरी कुणाकडूनही तक्रार आलेली नाही. आमची पेट्रोलिंगची व्हॅन बाजार समितीत रोज जाते. तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल.

------ संजय महाजन, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव

मी पिंपळगाव बाजार समिती मार्केटमध्ये कोणाही शेतकरी अथवा व्यापारी यांच्याकडून दादागिरी करून पैसे किंवा शेतीमाल वसूल करीत नाही. शेतकरी स्वतःच मला बोलावून पैसे व शेतीमाल देतात. सोशल मीडियावर माझ्याबाबत व्हायरल झालेली माहिती गैरसमज पसरवणारी आहे.

----- रूपा, तृतीयपंथी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पलुस्कर सभागृह रास्त दरात

$
0
0

कालिदास दिन कार्यक्रमात आयुक्तांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये नाट्यपरंपरा अविरत सुरू राहण्यासाठी नव्याने काही सुरू होत नसले तरी आहे त्या परंपरांना प्रोत्साहन द्यायलाच हवे. सभागृह कुलूप बंद ठेवण्यापेक्षा कलाकारांना सरावासाठी देणे केव्हाही योग्य ठरेल. म्हणूनच, येत्या काळात पंडित पलुस्कर सभागृहाचे नुतनीकरण होणार असून, रास्त दरात ते नाट्यकलाकार व रसिकांसाठी खुले होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्यातर्फे कालिदास दिनानिमित्त कालिदास कलामंदिरात बुधवारी विशेष कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी यांच्यासह नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते.

नाट्यगृहाचे नुतनीकरण झाल्यावर नवी नियमावली जाहीर झाली. तसेच कलामंदिराची भाडेवाढही करण्यात आली. अनेकदा नाट्यप्रेमींना ही भाडेवाढ परवडत नाही. यामुळे परंपरा अविरत सुरू राहिल, याकडे महापालिकेने लक्ष द्यावे, असे मत सुनील ढगे यांनी प्रास्ताविक करताना मांडले. यानंतर महापालिका आयुक्त गमे यांनी नियमावलीचा कोणताही बाऊ न करता, महापालिका नाट्य परंपरांच्या पाठीशी आहे. पलुस्कर सभागृहाचे लवकरच नुतनीकरण होणार असून, याचे दर रास्त असतील, असे संकेत दिले.

नांदी, नाट्यप्रवेशाचे सादरीकरण

कार्यक्रमाच्या प्रारंभी चारुदत्त दीक्षित यांच्या बागेश्री वाद्यवृंदातर्फे 'संगीत शाकुंतल' या नाटकातील नांदी सादर केली गेली. यात शर्वरी पद्मनाभी, सावनी कुलकर्णी, श्रेया गायकवाड, साक्षी झेंडे आणि रुचा झेंडे यांनी गायन केले. त्यांना चारुदत्त दीक्षित (संवादिनी), सुधीर करंजीकर (तबला) आणि दीपक दीक्षित (तालवाद्ये) यांनी साथसंगत दिली. ही नांदी नामवंत तबलावादक भाई गायतोंडे यांना समर्पित करण्यात आली. यानंतर राजेश शर्मा व सहकाऱ्यांनी 'आषाढातील एक दिवस' हा नाट्यप्रवेश सादर केला. के. एन. केला इंग्लिश स्कूल व बालनाट्य परिषद यांच्यातर्फे धनंजय वाबळे लिखित व दिग्दर्शित 'रिले' हे बालनाट्य सादर झाले. अकल्पित, प्रेमाचा त्रिकोण आणि त्याच्या भोवती फिरणारे तो, ती आणि नाटक या एकांकिकेने रसिकांवर नाट्यविष्काराची मोहिनी घातली. नाट्यसेवा व नाट्य परिषदेच्या वतीने आनंद-कृतार्थ दिग्दर्शित एकांकिका सादर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images