Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून तीन मजूर ठार

$
0
0

नाशिक:

नाशिकमध्ये गंगापूर रोडवर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजूर जागीच ठार झाले. या दुर्घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंगापूर रोडवरील सोमेश्वर कॉलनी येथे अपना घर या प्रकल्पाचं काम सुरू आहे. या प्रकल्पात काम करणारे अनेक मजूर प्रकल्पाच्या ठिकाणीच राहत होते. आज सकाळी दहा मजूर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आंघोळ करत होते. काही कामगार ब्रश करत होते, तर काही कपडे धूत होते. यावेळी अचानक पाण्याची टाकी कोसळल्याने त्यात पाच कामगार दबले गेले. या दुर्घटनेत एकूण तीन कामगार जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. मोहम्मद बारीक आणि बेबी खातून असं या कामगारांचं नाव आहे. जखमी कामगारांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील मॉल्सना महापालिकेच्या नोटिसा

$
0
0

मोफत पार्किंग सुविधा देण्याचे आदेश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मॉल्समधील पार्किंग मोफत करण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यानंतर प्रशासनाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानंतर नगररचना विभागाने शहरातील मॉल्सना नोटिसा बजावल्या आहेत.

सिटीसेंटर, पिनॅकल आणि बिग बजार या मॉल्सना नोटिसा बजावण्यात आल्या असून, विकास नियंत्रण नियमावलीत अधिकचे चटईक्षेत्र दिल्याने नागरिकांना पार्किंगची सुविधा मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिशीनंतरही पार्किंगमध्ये नागरिकांकडून शुल्क घेताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मॉल्समधील पार्किंगबाबत गेल्या बुधवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने नगररचना विभागाला आदेशित करीत ठरावाची वाट न बघताच त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नगररचना विभागाकडून शहरातील उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉल्स, त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल, कॉलेजरोड आणि नाशिकरोडवरील बिग बाजार मॉल्सला नोटिसा बजावल्या आहेत. मॉल्समध्ये पार्किंग शुल्क घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनटीए’च्या चुका दाखविण्यासाठी हजाराचा भुर्दंड

$
0
0

दावा योग्य ठरल्यास शुल्क परत मिळणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएच्या वतीने जून महिन्यात घेण्यात आलेल्या नेट (नॅशनल इलिजीबिलटी टेस्ट) या परीक्षेची अॅन्सर की मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अॅन्सर-की वर आक्षेप घेण्यासाठी परीक्षार्थींना हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. पण उमेदवाराचा दावा योग्य ठरल्यास हे शुल्क त्याला परत मिळणार आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या या उत्तरतालिकेत चुकीचे प्रश्न विचारले गेल्याचा उमेदवाराचा दावा असल्यास हा दावा सादर करताना 'एनटीए'कडे उमेदवाराला हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. 'एनटीए'च्या वेबसाईटवर ही उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात २० ते २६ जून या कालावधीत ही परीक्षा विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत ३०० गुणांसाठी दीडशे प्रश्न विचारण्यात आले होते. बहुपर्यायी पद्धतीने पार पडलेल्या या परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांना दुसऱ्या क्रमांकाचा पेपर पहिल्याच्या तुलनेत अवघड वाटला होता.

निकाल १५ जुलैला

दरम्यान, 'एनटीए'च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली अॅन्सर की विद्यार्थी त्यांच्या एनटीएकडील अकाऊंटवर लॉग इन करून बघू शकतात. या परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुचनांचे स्वागत!

$
0
0

सुचनांचे स्वागत!

नाशिक : वेगवेगळ्या भागातील नागरिकांशी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी संवाद साधत आहे. चोपडा लॉन्स येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात आयुक्तांनी पोलिसांची भूमिका मांडली तर, नागरिकांच्या सूचना, तक्रारी समजावून घेतल्यात. इंदिरनगर येथे वडाळा पाथर्डी रोडवरील सुदर्शन लॉन्स येथे बुधवारी (दि. ३) सांयकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक पोलोतमहाराष्ट्र उपविजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक पतियाला (पंजाब) येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय हार्डकोर्ट बाइक पोलो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेत ८ राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एनआयएस पतियाळाचे तलवारबाजीचे मुख्य प्रशिक्षक अशोक खत्री, पुनीत चोपडा, नरेंद्र कुमार, शरद कुमार, भारतीय तलवारबाजीचे खजिनदार अशोक दुधारे यांचे हस्ते पार पडला. अंतिम सामन्यात केरळने महाराष्ट्राचा ८ विरुद्ध ७ गोलाने पराभव केला. महाराष्ट्रातर्फे अविनाश वाघ, कृष्णा शेवाळे, निखील गवळी, करण भंडारे, अदिती हिरे, सुरज पिसाळ, अमोल शेवाळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राचे संघ मार्गदर्शक म्हणून मयूर गुरव व व्यवस्थापक म्हणून प्रीतम सोनावणे यांनी काम पहिले. या सर्वाना डॉ. उदय डोंगरे, दीपक निकम, चंद्रकांत कांबळे आदींनी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून दर गुरुवारी ‘ड्राय डे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला प्रामुख्याने पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला असून, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने महापालिकेने दुसऱ्यांदा पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. शहरात आता एकवेळ पाणीपुरवठ्यापाठोपाठ आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात आता दर गुरुवारी ड्राय डे पाळण्यात येणार असून, त्याची अंमलबजा‌णी उद्या, गुरुवारपासून (दि. ४) करण्यात येणार आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पुरेशी वाढ होईपर्यंत शहरात पाणीकपात कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

राज्यासह नाशिकमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले असले तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणक्षेत्रात चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. महापालिकेने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून शहरात एकवेळ पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात दोन वेळ पाणी पुरवठा होतो, तेथे एकवेळ पाणी देण्यात येत आहे. त्यातून दररोज ५० ते ६० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे. याबरोबरच आठवड्यातून एका संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी गुरुवारची निवड करण्यात आली होती. रविवारपासून चांगला पाऊस सुरू झाल्याने एक दिवस पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. परंतु, नाशिकसह अन्य तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असताना गेल्या शनिवारी १२ मिलिमीटर, रविवारी ९ मिलिमीटर तर सोमवारी अवघा ७ मिलिमीटर एवढ्या अल्प पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत बदल झालेला नाही. मंगळवारी महापालिकेने अखेर दुसऱ्यांदा पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एकवेळ पाणीपुरवठा करण्यासोबतच आठवड्यातून दर गुरुवारी शहरात एका संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कपातीमुळे ४१० दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर करताना काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस हजर; टँकर सुटीवर

$
0
0

त्र्यंबकमधील पाणी टँकर थांबिवले

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील पाड्यांवर आठ पाणी टँकर रविवारपासून थांबविण्यात आले आहेत. यावर्षी तालुक्यात ३ गावे आणि २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता पाऊस 'मुक्कामी' आल्याने टँकरने होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. सरकारी टँकर व्यतिरिक्त अनेक ठिकाणी दानशूर व्यक्ती आणि काही खासगी संस्थांचे खासगी टँकर सुरू होते. ते देखील आता थांबविण्यात आले आहेत. गत वर्षी पावसाळ्यात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊसही झाला नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्याला टंचाईच्या झळा जाणवल्या. मे महिन्याच्या अखेरपर्यंत जवळपास सर्वच तालुका होरपळून निघाला होता. गत वर्षी शासकीय टँकर जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच थांबविण्यात आले होते. यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने जुलै उजाडण्याची वाट पहावी लागली आहे. त्र्यंबक शहरासह संपूर्ण तालुक्यात समाधानकारक पाऊस होत आहे. धरणक्षेत्रातील पावसाने धरणांची साठी वाढत आहे. तथापि त्र्यंबक शहरास दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाऊस धोधो कोसळत असतानाही शहरात दोन दिवसाआडच पाणी मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमावाकडून युवकांना मारहाण

$
0
0

एक गंभीर जखमी; गिरणा धरण परिसरातील घटना;

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

जमावाकडून होणाऱ्या हल्ल्या विरोधात (मॉब लिंचिंग) विविध मुस्लिम संघटनांतर्फे मोर्चे काढून निषेध नोंदविले जात असतानाच नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण येथे सोमवारी सायंकाळी मुस्लिम युवकांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या युवकांना धरण क्षेत्रात मारहाण केल्यानंतर पुन्हा कळमधरी गावात नेत तेथेही मारहाण करण्यात आली. याप्रकारणी नांदगाव पोलिस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहणीतील युवकांपैकी एक जण जखमी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पाऊस पडला की मालेगाव तालुक्यातून असंख्य पर्यटक गिरणा धरणावर येतात. काही जण हौसेखातर मासेमारीही करतात. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सायंकाळी मालेगाव शहरात प्लास्टिकचा व्यवसाय करणारा शफिक खान हफिक खान हा तरुण आपल्या मुकीम, नासिर, अरसु, गुलाम रसूल आणि जुबेर या मित्रांसह गिरणा धरण येथे तीन मोटारसायकलवरून मासेमारी करण्यासाठी आला होता. बराच वेळ मासेमारी केल्यानंतर सायंकाळी मोटारसायकलने मालेगाव येथे परतत असताना कळमदरी गावात शफिक खान व त्याच्या मित्रांना १५ ते २० जणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र न थांबता ते घाबरून धरणाकडे पळाले. पुढे गिरणा पुलाचे गेट बंद असल्याने त्यांचा पर्याय खुंटला. तोपर्यंत त्यांचा पाठलाग करीत आलेल्या ५ ते ६ जणांनी शफिक व त्याचा मित्र मुकीम याना मारहाण केली. त्यानंतर सर्वांना कळमदरी गावात जबरदस्तीने घेऊन गेले. तेथे पुन्हा शफिकसह सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गावातील काही नागरिकांनी या तरुणांची सुटका केल्याने ते कसेबसे मालेगावकडे रवाना झाले. यात जमावाने शफिक खानच्या डोक्यात काठीने मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. त्याला मालेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या मारहाणीबद्दल मंगळवारी शफिकने नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे. नांदगाव पोलिसांनी अज्ञात १५ ते २० जणांवर बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

...म्हणून आला संशय

जमावाने या तरुणांना मारहाण का केली? मासे पकडण्यासाठी गिरणा धरण परिसरात अनेक जण येतात, मात्र अशी मारहाण यापूर्वी कोणालाही झालेली नसल्याने या जमावाच्या हल्ल्यामागे काय कारण आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. रविवारी रात्री कळमदरी गावात एका महिलेवर सशस्त्र हल्ला करून तिला लूटण्यात आल्याने नागरिकांच्या मनात संताप होता. परिसरात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची माहिती घेतली जात होती. त्यातून हा हल्ल्याचा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मालेगावच्या तरुणांना झालेली मारहाण ही लुटीच्या घटनेच्या संशयातून झाली असावी. शफिक व मुकीम यांना कळमदरी येथे जमावाने अडवले. मात्र त्यांनी मोटारसायकल न थांबविल्याने जमावाचा संशय बळावला. त्यातून मारहाण झाली असावी. मारहाण करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

--अनिल भवारी, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खुटवडनगरला चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सिडकोतील खुटवडनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना सोमवारी (दि. १) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. खुटवडनगर येथील स्टेट बँकेसमोरून महिला स्कूटीवर जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.

--

हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

शिकवणीवरून परतणऱ्या युवकाचे दुचाकीवर अपहरण करून त्यास बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाशिकरोड भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली.

अभिजीत राजकुमार तडवी (रा. नारायणबापू नगर), पीयूष दिलीप गायकवाड (रा. कुबेर सोसायटी, जेलरोड), चेतन अनिल सोनवणे (रा. शिवाजीनगर, जेलरोड) आणि आकाश किरण दोंदे (रा. भीमनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी प्रथमेश कपोते (१७ रा. पुष्पकनगर, लोखंडेमळा) या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि.२९) सायंकाळी नेहमीप्रमाणे तो कलानगर भागातील एक्स्पर्ट अकादमी येथे शिकवणीसाठी गेला होता. ६ वाजेच्या सुमारास तो आपल्या क्लासमधून बाहेर पडला. यावेळी क्लासखालीच त्यास दोन दुचाकींवर आलेल्या चौघांच्या टोळक्याने गाठले. चॉपरचा धाक दाखवित टोळक्याने एका दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. प्रथमेश टोळक्याच्या दुचाकीवर बसताच त्यास भीमनगर येथील गार्डन भागात नेवून अभिजीत तडवी या संशयिताने तू माझ्या गर्लफ्रेंडशी बोलतो या कारणातून कुरापत काढून तुझा गेमच करतो अशी धमकी देत मारहाण केली. यावेळी संशयितापैकी एकाने हातातील फायटरने तर एकाने लाकडी दांडक्याने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनोणे करीत आहेत.

--

महिलेची पर्स चोरी

बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून पाकीट चोरून नेल्याची घटना नाशिकरोड बसस्थानकात घडली. पाकिटात रोकड व मोबाइल असा सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला सोमवारी (दि. १) दुपारी शहरात येण्यासाठी पंचवटी बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. नाशिकरोड बसस्थानकात हा प्रकार घडला.

--

गुंगीचे औषध देवून बलात्कार

नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या संशयिताने अल्पवयीन युवतीस गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश रवींद्र कपोते (रा. लोखंडेमळा, जेलरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित युवकाचे नाव आहे. २४ जून रोजी सकाळी ही घटना घडली. संशयिताने अल्पवयीन मुलीस बारावी क्लासच्या नोट्स देण्याचा बहाणा करून आपल्या घरी नेले. यावेळी घरात कुणी नसल्याने त्याने युवतीस पाण्याच्या ग्लासमध्ये काही तरी गुंगीचे औषध बळजबरीने पाजले. मुलीने विरोध केला असता तिला मारहाण केली. पीडित विद्यार्थिनी बेशुद्ध पडताच तिच्यावर बलात्कार केला, असे युवतीच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक भदाणे करीत आहेत.

--

कारखाना मालकावर गुन्हा

पत्र्याच्या शेडवरून पडल्याने कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुपर मेटल प्रा. लि. या कंपनी मालकाविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेत त्रुटी ठेवल्याने ही कार्यवाही करण्यात आली. सागर नवीन शहा (रा. स्वारबाबानगर) असे कंपनी मालकाचे नाव आहे. शहा यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत सुपर मेटल प्रा. लि. नावाची कंपनी आहे. १९ जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. कंपनी आवारातील पत्र्याचे शेड कोसळल्याने सुदाम विष्णू जमदाडे या कामगाराचा मृत्यू झाला होता. दीपक तूपसुंदर आणि देवराम कडाळे हे कामगार जखमी झाले होते. कंपनीतील शेड गंजलेले असताना संशयिताने सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न करता हे काम मृत व जखमींना दिले होते. अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

--

पर्समधून मंगळसूत्र चोरी

मेनरोड भागात खरेदी करीत असताना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून पाकीट चोरून नेले. या पाकिटात रोकडसह सोन्याचे मंगळसूत्र असा सुमारे ८१ हजारांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील महिला सोमवारी (दि.१) दुपारी खरेदीसाठी मेनरोड भागात आली होती. गाडगे महाराज पुतळा भागात ती खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून पाकिट चोरून नेले. अधिक तपास हवालदार वाटपाडे करीत आहेत.

--

स्टेट बँकेचे कर्ज बुडविले

गृह कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवळाली कॅम्प शाखेला दोघांनी तब्बल सव्वानऊ लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान शिवाजी पवार (रा. सावतानगर, सिडको) आणि दिलीप तुकाराम कासार (रा. तांबटलेन, जुनेनाशिक) अशी संशयितांची नावे आहे. या प्रकरणी बँकेच्या वतीने सुयोग शेवतेकर यांनी तक्रार दिली आहे. संशयितांनी भद्रकाली परिसरातील जुनी तांबट लेन भागातील सदनिका खरेदीसाठी बँकेकडे सन २००८ मध्ये पंधरा लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. त्यानुसार बँकेने नऊ लाख १७ हजाराचे कर्ज मंजूर केले होते. मात्र या दोघांनी कर्ज घेऊन त्यानंतर प्रत्यक्षात कोणतीही परतफेड केली नाही. दहा-अकरा वर्षांपासून अशी टाळाटाळ सुरू असल्यामुळे संशयितांनी बँकेचा विश्वासघात व फसवणूक केली. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावाकडं चल माझ्या दोस्ता !

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चारा पाण्यासाठी घरधनी आणि अन्य जिवलगांपासून दुरावलेली जित्राबं आता घराकडे परतू लागली आहेत. वरुणराजाने दिलेली सलामी अन शेतकऱ्याला लागलेली मशागतीची ओढ यामुळे छावण्यांमध्ये आश्रयाला आलेल्या जित्राबांनी पुन्हा आपल्या गोठ्याची वाटं धरली आहे. आतापर्यंत ४ हजार १९७ जनावरे आपल्या गोतवळ्यात परतली असून नांदगाव जिल्ह्यातील दोन छावण्या यामुळे बंद करण्यात आल्या आहेत.

'काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता' कवी इंद्रजित भालेराव यांची ही कविता. जवळच्या मित्राला गावाकडे चालण्याचा आग्रह धरणारी आणि ग्रामीण भागाचं हुबेहूब वर्णन उभे करणारी ही कविता. या कवितेचा भावार्थ थोड्या फार फरकाने छावणीतून घरधन्याच्या अंगणाकडे निघालेली जित्राबंही जगत आहेत. दुष्काळाच्या झळा माणसांना जाणवल्या तशा जनावरांनाही. माणसं किमान आपली व्यथा मांडू तरी शकतात. जित्राबांची तर ती ही सोय नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी त्यांची अवस्था. दुष्काळाच्या झळांनी जेथे माणसांचा जीव व्याकूळ झाला तेथे या जनावरांची काय कथा? दुष्काळातील पाणीटंचाईच्या समस्येत ही जनावरं होरपळून निघाली. यामध्ये गायी, बैलं, वासरं, शेळ्या अशा जित्राबांचा समावेश होता. घरधनी आणि त्याच्या कुटुंबीयांची पाण्यासाठीची परवड या जनावरांच्या डोळ्यांनीही टिपली. दुष्काळाच्या दाहकतेतही पोटच्या लेकरांप्रमाणंच वाढविलेल्या जनावरांना घरधनी आणि कुटुंबातील अन्य जिवलगांनी अंतर दिले नाही.

एप्रिल, मेमध्ये उन्हाचे चटके अधिकच वाढले. चारा पाण्याची व्यवस्था करणे घरधन्यालाही अशक्य होऊ लागले. जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी जनावरांना उपाशी तरी कसा ठेवणार. त्याने स्वत:च्या पोटाला चिमटा जित्राबांची व्यवस्था केली. अखेर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या मेहेरबानीने या जनावरांसाठी छावणीची व्यवस्था झाली अन शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. गोठ्यातील खुंट्याला बांधलेली जनावरे छावणीत नेऊन सोडताना घरधनी अन सर्वच जिवलगांचे अंतकरण जड झाले. जनावरांना नजरेआड होताना पाहून डोळ्यांच्या कडाही ओलावल्या. परंतु, त्याचवेळी त्यांची चारा पाण्याअभावी आबाळ होणार नसल्याची सुखद भावनाही शेतकरी कुटुंबांना स्पर्शून गेली. या जित्राबांनी छावण्यांमध्ये तब्बल महिनाभराचा पाहूणचार स्वीकारला. पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला तशी घरी जावयास मिळणार म्हणून ही जित्राबंही सुखावली. शेतीच्या कामांना सुरुवात करावयाची असल्याने अन घराजवळच चारा पाण्याची सोय झाल्याने शेतकरी जनावरे घरी नेत आहेत. जित्राबांना अगंणात घेऊन जाण्याचा आनंद जसा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय तसे आपल्या अगंणात हुंदाडवयास मिळणार असल्याच्या भावनेने ही जित्राबंही सुखावली नसतील तरच नवल.

नांदगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ आणि साकोरे येथील साकोरा परिसर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या दोन संस्थांद्वारे चारा छावण्या चालविल्या जात होत्या. परंतु, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे सुरू करावयाची आहेत. शेतकरी जनावरे घेऊन जाऊ लागल्याने या दोन्ही छावण्यांमध्ये एकही जनावर शिल्लक नसल्याचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे या छावण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी दिली.

चारा छावण्यांमधील स्थिती

एकत्रित जनावरे : १००१४

परतलेली जनावरे : ४१९७

आश्रयाला उरलेली जनावरे : ५८१७

(आकडेवारी चारा छावण्या असलेल्या सिन्नर, नांदगाव, मालेगाव तालुक्यांमधील आहे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर बँकांवर गुन्हे दाखल करू

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचा पीककर्ज प्रश्नी इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पीककर्जासाठी पात्र असतानाही शेतकऱ्याला असे कर्ज उपलब्ध करून देण्यास बँकांनी टाळाटाळ केली तर संबंधित बँकेवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत ६८८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून ही टक्केवारी एकूण उद्दिष्टाच्या २१ टक्के असल्याची माहिती मांढरे यांनी दिली.

शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करण्यास काही बँका टाळाटाळ करीत असल्याचे निरीक्षक मांढरे यांनी नोंदविले आहे. त्यामुळे पिक कर्ज वाटपाचा प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी आढावा घेण्याचा निर्णय मांढरे यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पिक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. यंदा ३ हजार १४३ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ६८८ कोटी रूपये कर्ज वितरीत केले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला खरीप पिक कर्जाद्वारे दिलासा देण्यासाठी मांढरे यांनी आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पीककर्ज वाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑड इंडीया, बँक ऑफ बडोदा या बँकाना अधिक उद्दिष्ट दिले आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास बँकांवर गुन्हे दाखल करू असा इशाराच मांढरे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटचा घटक विकासापासून वंचित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजकरण्यांनी सामान्य माणसांना कायमच झुलवत ठेवण्याचे काम केले. त्याचा विकास झाला, तर आपली पोळी भाजली जाणार नाही, याची दक्षता घेतली. परिणामी शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचलाच नाही, असे प्रतिपादन लेखक, विचारवंत तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी केले.

प्रसाद सोशल ग्रुप व राष्ट्रीय विचार प्रबोधिनीतर्फे आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. प्र. शं. तथा बंडोपंत जोशी यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'अंत्योदयाची सुरुवात' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी करंजीकर म्हणाले, की सरकारे बदलली, मात्र दारिद्र्याचे परिमाण मात्र बदलले नाही. त्यात जास्त भीषणता आली. राजकारण्यांनी विकास घडवून आणलाच नाही. अंत्योदयाची सुरुवात म्हणजे शेवटच्या माणसाचा विकास, हा विकास कधी झालाच नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. आता कुठे विकासाची काही चिन्हे दिसू लागली आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. घरकुल परिवाराच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर कले. यावेळी घरकुल परिवाराच्या विद्या फडके यांना दीपक करंजीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते सुहास फरांदे, माजी महापौर दशरथ पाटील, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, नगरसेवक योगेश हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी मंत्री घेणार आज आढावा

$
0
0

मुख्यालयात प्रथमच बैठक; विभागातील बेदिली रोखण्याचे आव्हान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कार्यकाळात भरकटलेल्या आदिवासी विभागाच्या कामकाजाला सावरण्याची जबाबदारी नूतन आदिवासी विकास मंत्री डॉ. सुभाष उईके यांच्याकडे आली आहे. उईके प्रथमच या विभागाच्या कामकाजाचा आढावा बुधवारी (दि. ३) घेणार आहे.

आदिवासी विभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक मुख्यालयात उईके यांच्या उपस्थितीत प्रथमच आदिवासी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी आमदारांसह खासदारांचीही उपस्थिती राहणार आहे. आदिवासी विभागातील वादग्रस्त फर्निचर खरेदी, आश्रमशाळांमधील दुरवस्था आणि अधिकाऱ्यांच्या बेफाम कारभाराला लगाम घालण्याचे मोठे आव्हान उईके यांच्यासमोर असणार आहे.

राज्य मंत्रिमंडळात नुकत्यात करण्यात आलेल्या खांदेपालटात विष्णू सावरा यांना आदिवासी विभागातून नारळ देण्यात आला होता. सावरा यांना विभागाच्या कामकाजावर कोणतेही नियंत्रण ठेवता आलेले नाही. त्यामुळे गेले साडेचार वर्ष विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. सावरा यांचा मंत्रालयावर ताबा नसल्याने मंत्रालयातील बाबूंनीच विभागाचे कामकाज हाकले होते. आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्यास विभागासह मंत्र्यानाही अपयश आले होते. त्यात आदिवासी विभागातील फर्निचर घोटाळ्याने तर विभागाची मोठी नामुष्की झाली. ठेकेदारांनी थेट न्यायालयात आव्हान दिल्याने ही खरेदी अद्यापही रखडली आहे.

'डीबीटी'वर नाराजी

डीबीटीमुळे या विभागातील ठेकेदारांचा वावर कमी झाला असला तरी, डीबीटीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदार या डीबीटी प्रणालीवर नाराज आहे. त्यामुळे विभागाच्या एकूणच भरटकलेल्या कारभाराला लगाम घालण्याचे मोठे आव्हान डॉ. ऊईके यांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काहीच करू शकलो नाही...

$
0
0

चार कोवळ्या जीवांची आई काळाने हिरावली

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. चार पैसे हाती मिळाले, तर परराज्यातील वृद्ध माता-पित्यांना पाठवता येईल म्हणून तो कुटुंबासह शहरात आला. अगदीच १५ दिवसांपूर्वी तो बांधकाम साइटवर पोहचला. त्याची पत्नीही खांद्याला खांदा लावून संसाराचा गाढा ओढत होती. या घटनेने मात्र त्याच्या कुटुंबाच्या अशा अपेक्षांना सुरूंग लावला. त्याच्या डोळ्यादेखत त्याची पत्नी विटांच्या खचाखाली दाबली गेली. त्याचेही पाय अडकले होते. डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू झाला, पण काहीच करू शकलो नाही, हे सांगताना शेख मझार आलम (वय ३०, रा. पश्चिम बंगाल) यांना अश्रू आवरता आले नाही.

पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेख यांची पत्नी बीबी सनाबी शेख (वय २७, पश्चिम बंगाल) हिचाही मृत्यू झाला. या घटनेबाबत माहिती देताना शेख यांनी सांगितले, की सकाळी नेहमीप्रमाणे मी आंघोळीसाठी टाकीवर पोहचलो होतो. त्यापूर्वी पत्नी बीबीने आपल्या दोन मुलांना शाळेत सोडले. एक मुलगा झोपलेला होता, तर एक पत्र्याच्या शेडवजा घराजवळ खेळत होता. पुढील काम आटोपण्यापूर्वी बीबी कपडे धुण्यासाठी त्या टाकीजवळ पोहचली. या आमच्यासह तिथे आणखी सहा ते सात कामगार होते. अचानक एक मोठा आवाज झाला अन् टाकी कोसळली. मी पाठीमागे सरकलो पण पाय बांधकामाच्या राडारोड्याखाली दबले गेले. मात्र पत्नी पूर्णत: दबली गेली होती. तिची जगण्याची धडपड सुरू होती, तर दबलेले पाय मोकळे करून पत्नीकडे धाव घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो. अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडला. माझी पत्नी डोळ्यादेखत गेली. मी काहीच करू शकलो नाही, हे सांगताना शेख यांना अश्रू अनावर झाले.

या दुर्घटनेनंतर ठेकेदाराला अनेक फोन केले. पण सर्वांचे फोन बंद असून, या मुलांच्या प्रश्नांना, घरच्यांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न शेख यांच्यासमोर उभा राहिला आहे.

...

१२ जून रोजीच कामावर हजर

शेख दाम्पत्य आपल्या मंजुमा (वय ५) सारेरामजन (वय ४), सराफतअली (वय ३) आणि समाहिल राजा (वय २) या मुलांसोबत या बांधकाम साइटवर पोहचले होते. कामाच्या शोधार्थ साधारणत: नऊ महिन्यांपूर्वी हे कुटुंब नाशिकमध्ये आले होते. ठिकठिकाणी काम केल्यानंतर एका ठेकेदारामार्फत हे कुटुंब बांधकाम साइटवर पोहचले होते. या दुर्घटनेनंतर ही मुले फारच घाबरली. 'अम्मी किधर है', हा मुलांचा निरागस प्रश्न उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत होता.

..

पाण्याच्या टाकीचे काम फारच निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केल्यानंतर दिसून आले. या घटनेत चौघाजणांचा जीव गेला असून, या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. यात कोणीही दोषी असला तरी त्यास सोडणार नाही.

- विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेथे सत्य असते तेथे भयाची गरज नसते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणूस जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याने गांधीजी येथे असते तर काय केले असते, असा विचार करावा, त्याला यशाचा मार्ग नक्की दिसेल. अर्थात त्यासाठी आधी त्याने गांधीजींचे साहित्य वाचलेले हवे. गांधीची वाचलेले असतील तर जेथे सत्य असते तेथे भयाची आवश्यकता नसते, असे प्रतिपादन 'स्नेहालय'चे डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी केले.

महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित सार्वजनिक वाचनालय नाशिक आयोजित महात्मा गांधी विचारमालेचे दहावे पुष्प स्नेहालय व प्रेमराज सारडा विद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख, अहमदनगरचे डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. सावाना आवारातील औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, की स्वातंत्र्यसैनिकांची उठबस असलेल्या घरात जन्माला आल्याने सामाजिक कामाचे बाळकडू जन्मापासूनच मिळालेले होते. अनेक चळवळीच्या प्रवासातून जात आपण लालबत्ती एरियासाठी काहीतरी करायला हवे असे वाटले आणि तेथून प्रवास सुरू झाला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गांधीजी मेहतर समाजाच्या वस्तीत रहात होते; परंतु आज गांधीची असते तर ते रेड लाईट एरियामध्येच राहीले असते. महिलांना देहविक्रय व्यवसाय करावा लागतो हीच मोठी शोकांतिका असून आमची संस्था त्यांच्यासाठी काम करते, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी विविध अभ्यासक्रमात साहित्यकृतींचा निवड झालेल्या किशोर पाठक, विजयकुमार मिठे, शरद पुराणिक, किरण भावसार, संजय वाघ यांचा मान्यवर साहित्यिकांचा सत्कार सावानाच्यावतीने करण्यात आला. प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जगन्नाथ मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना

$
0
0

जगन्नाथ मूर्तीची

उद्या प्रतिष्ठापना

नाशिक : मानव उत्थान सेवा समितीच्या तपोवन येथील सर्व धर्म मंदिर आश्रमात भगवान जगन्नाथांच्या मूर्तीची गुरुवारी (दि. ४) सकाळी १० ते १२ या वेळेत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. देशभरात ४ जुलै रोजी भगवान जगन्नाथांची रथयात्रा काढली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मानव धर्म प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या मानव उत्थान सेवा समितीच्या तपोवन परिसरातील आश्रमातही कार्यक्रम होणार आहे. समितीच्या नाशिक प्रबंधक साध्वी हिराजी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये भगवान जगन्नाथजी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यावेळी महात्मा चतुरवेदानंदजी, साध्वी मुक्तिकाजी, साध्वी उत्तमजी, महात्मा कुलदीपजी यांसह मानव धर्म प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुंडावरच उलटला डाव

$
0
0

मारण्यासाठी आला अन् स्वत:च मारहाणीत जखमी झाला

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

…एका चारचाकी गाडीतून एक कुख्यात गुंड त्याच्या साथीदारांसह पिस्तूल आणि कोयता घेऊन येतो. ……ते पाहताच सर्व घरांचे दरवाजे बंद होतात. ……मध्ये कोणी आल्यास मर्डरच करतो, अशा शब्दांत धमकावतो. एका ट्रॅव्हल्सचालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून बळजबरीने खाली आणतो. स्वतःसह कुटुंबाचा जीव वाचविण्यासाठी ट्रॅव्हल्सचालक गुंडाच्या साथीदाराच्या हातातील कोयता हिसकावून घेत कुख्यात गुंडावरच सपासप वार करतो…. गुंड जखमी होताच …त्याच्या साथीदारांची पळता भूई थोडी होते. …एखाद्या हिंदी सिनेमातील प्रसंग वाटावा, अशी ही घटना सोमवारी रात्री अरिंगळे मळा, एकलहरे रोड, सिन्नर फाटा येथे घडली.

या घटनेत नवाज बाबू शेख उर्फ बाबा हा कुख्यात गुंड गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारातून सराईत गुन्हेगार मोकाट झाल्याचे आणि पोलिसांचा जराही धाक राहिला नसल्याचे सिद्ध झाले आहे.

समीर समीम खान (वय २९, रा. एकलहरे रोड, अरिंगळे मळा, नाशिकरोड) यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

समीर खान हे ट्रॅव्हल्सच्या गाड्या भाड्याने देतात. सराईत गुन्हेगार बाबा शेख याने समीर खान यांच्याकडे नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी चार वाजता मित्रांसोबत गोव्याला जाण्यासाठी गाडी भाड्याने देण्याची आणि सोबत चालण्याची मागणी केली होती. परंतु, यापूर्वी भाडे देण्यावरून बाबा शेखने समीरला शिवीगाळ आणि दमदाटी केलेली होती. त्यामुळे यावेळी समीरने बाबा शेखला गाडी देण्यास व सोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर बाबा शेख हा त्याच्यासोबत चार ते पाच गुंडांना घेऊन रात्री दहा वाजता एका चारचाकी गाडीतून पुन्हा समीर यांच्या घरी गेला. इमारतीबाहेर उभे राहून त्याने मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मध्ये पडणाऱ्याचा मर्डर करण्याची धमकी देत प्रचंड दहशत निर्माण केली. बाबा शेखसोबतच्या गुंडांच्या हातात कोयता बघून आजूबाजूच्या नागरिकांची पळापळ झाली. सर्वांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद केले. समीरच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून त्याला बळजबरीने खाली आणले. यावेळी सोबत आलेली समीरची पत्नी समीरला मारू नका, अशी गयावया करीत होती. मात्र बाबा शेखने तिला मारहाण करून तिचे कपडे फाडले. कोणत्याही क्षणी बाबा शेख व त्याचा साथीदार स्वतःसह पत्नीचा घात करू शकतो, याची कल्पना समीरला आल्याने स्वतःसह पत्नीला या गुंडांच्या तावडीतून वाचवण्यासाठी मोठ्या धाडसाने समीरने बाबा शेख सोबतच्या गुंडाच्या हातातील कोयता हिसकावून घेत थेट बाबा शेखवर वार केले. जखमी बाबा शेखवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या रुग्णालयाबाहेर पोलिसांचा खडा पहारा सुरू आहे. त्याचे सहकारी मात्र फरार आहेत.

या घटनेनंतर पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे, पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर डोंबरे आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

...

पोलिसांचा धाकच नाही उरला

जीवघेणे हल्ले केयाप्रकरणी या घटनेतील बाबा शेखवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. एका माजी नगरसेवकाच्या घरावरही त्याने त्याच्या साथीदारांसह हल्ला केल्याची घटना घडली होती. मोठ्या मुश्किलीने यावेळी बाबा शेख पोलिसांच्या हाती लागला होता. आता पुन्हा बाबा शेख व त्याच्या साथीदारांनी दहशत निर्माण केरण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांचा धाक नसल्यानेच सराईत गुन्हेगार मोकाट झाले असल्याबद्दल नागरिकांतून पोलिसांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकी दुर्घटना मृतांची नावे

दारूबंदीसाठी ठिय्या

$
0
0

माडसांगवी येथे रणरागिणींचा एल्गार

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

माडसांगवी गावात अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याने त्रस्त झालेल्या गावातील महिलांनी एकत्र येत मंगळवारी गावात दारुबंदीच्या मागणीसाठी जनजागृती रॅली काढली. या महिलांनी काही दिवसांपूर्वीच ग्रामसभेत मांडलेला संपूर्ण दारुबंदीचा ठराव मंजूरही झाला होता. मात्र, त्यानंतरही सुधारणा न झाल्याने महिलांनी अखेर गावात जनजागृती रॅली काढत आपले संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी आर्त हाक दिली. महिलांनी हाती फलक घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्याही दिला.

माडसांगवी गाव आणि परिसरात अवैध दारू विक्रीमुळे महिलावर्गाबरोबरच ग्रामस्थदेखील त्रस्त झाले आहेत. अवैध दारू विक्रीचे पीकच फोफावल्याने काही संसारदेखील उद्ध्वस्त झाले आहेत. रोजचे भांडण, कटकटी याला कंटाळून येथील महिलांनी एकत्र येत दारूबंदीसाठी आंदोलन उभे केले आहे. अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी माडसांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. यावेळी अवैध दारू धंदे बंद करण्यात यावेत, असा ठराव करण्यात आला होता. हा ठराव संमतही झाला होता. मात्र तरीही परिस्थिती जैसे थेच राहिल्याने त्रस्त महिलांनी दारूबंदीसाठी महिला आणि लहान मुलांनी गावात दारू बंदी जनजागृती रॅली काढली. यावेळी जागर नारीशक्तीचा, दारू हटवा संसार वाचवा, दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणाही देण्यात आल्या. महिलांनी हाती फलक घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्याही दिला.

गावातील महिलांचा दारुबंदीसाठीचा ठाम निर्धार बघून सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सूरज बिजली आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी माडसांगवी येथे येऊन ठिय्या आंदोलन करणाऱ्या महिलांची मागणी समजून घेत निवेदन स्वीकारले. यावेळी काही दारू विक्रेत्यांनी स्वतःहून दारू विक्री करणार नसल्याचे उपस्थितांसमोर जाहीर करून येथील महिलांच्या आंदोलनाला साथ दिली. याप्रसंगी पोलिसपाटील आण्णासाहेब गरड, सरपंच रेखा घंगाळे, उपसरपंच मीरा पेखळे, ग्रामपंचायत सदस्य हिरामण पेखळे, सुनंदा पेखळे, बाळासाहेब अश्वरे, अरुण खरात, सुभाष मांडवे, संगीता नेटरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

..

गावात दारू विक्री करणाऱ्यांवर रितसर कारवाई केली जाईल. गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ग्रामरक्षा पथकाची स्थापना करून त्यांनाही काही प्रमाणात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात येतील.

- मोहन ठाकूर, सहाय्यक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हार्डकोर्ट बाइक पोलोतमहाराष्ट्र उपविजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतियाला (पंजाब) येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय हार्डकोर्ट बाइक पोलो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.

या स्पर्धेत ८ राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एनआयएस पतियाळाचे तलवारबाजीचे मुख्य प्रशिक्षक अशोक खत्री, पुनीत चोपडा, नरेंद्र कुमार, शरद कुमार, भारतीय तलवारबाजीचे खजिनदार अशोक दुधारे यांचे हस्ते पार पडला. अंतिम सामन्यात केरळने महाराष्ट्राचा ८ विरुद्ध ७ गोलाने पराभव केला. महाराष्ट्रातर्फे अविनाश वाघ, कृष्णा शेवाळे, निखील गवळी, करण भंडारे, अदिती हिरे, सुरज पिसाळ, अमोल शेवाळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राचे संघ मार्गदर्शक म्हणून मयूर गुरव व व्यवस्थापक म्हणून प्रीतम सोनावणे यांनी काम पहिले. या सर्वाना डॉ. उदय डोंगरे, दीपक निकम, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, आनंद खरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, राजू शिंदे, मनिषा काठे, ऋषीकेश शिंदे, अमोल आहेर आदींनी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images