Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रोडरोमियोंना दणका

$
0
0

\B- अवघ्या २० दिवसांत २३५ जणांवर कारवाई\B

- निर्भया पथकाकडून ४६१ व्यक्तींचे समुपदेशन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या निर्भया पथकाने ८ ते ३० जून या कालावधीत २३५ जणांवर मुंबई पोलिस अॅक्टमधील तरतुदींनुसार कारवाई केली. या व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणाऱ्या दोघांना थेट कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना प्रत्येकी हजार रुपयांचा दंड ठोठावला. महिलांची छेड काढून अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने ८ मार्च रोजी निर्भया पथकाची सुरुवात करण्यात आली. या पथकाची पोलिस ठाणेनिहाय विभागणी केली आहे. त्यानुसार चार पथके सध्या कार्यरत असून, त्यात एक पोलिस उपनिरीक्षक दर्जाची महिला पोलिस अधिकारी, तर दोन महिला आणि दोन पुरुष असे चार कर्मचारी आहेत. पथकातील अधिकारी व कर्मचारी साध्या वेषात गर्दीच्या व छेडछाड होऊ शकते, अशा ठिकाणी फिरतात. पथकातील कर्मचाऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे मोबाइल कॅमेरे असून, त्याद्वारे ते घटनास्थळाचे शूटिंग करतात. महिलांची छेडछाड होत असेल किंवा साध्या वेषातील महिल पोलिसांबाबत असा प्रकार घडला, तर रोडरोमियोंना पकडले जाते. याबाबत निर्भया पथकाच्या समन्वयक भावना महाजन यांनी सांगितले, की आतापर्यंत २३५ टवाळखोरांवर कारवाई केली आहे. त्यांचे समुपदेशन करण्यात येते. संबंधितांच्या घरच्यांनासुद्धा अवगत केले जाते. अर्थात हा भाग फक्त किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वापरला जातो. गंभीर गुन्हे असतील, तर थेट गुन्हे दाखल करण्यात येतात. याचा चांगला परिणाम दिसून येत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. मागील २० दिवसांपासून होत असलेल्या या कारवाईच्या परिणामांबाबत बोलताना पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे यांनी सांगितले, की साध्या वेषात दोन ते तीन तास थांबूनही टवाळखोर जवळ फिरण्याची हिंमत करीत नाही. या पथकाच्या कार्यपद्धतीबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. गर्ल्स होस्टेल, शाळा-कॉलेज, गर्दीच्या ठिकाणी निर्भया पथकाबाबत माहिती पोहचविली जात असल्याकडे कांगणे यांनी लक्ष वेधले. आपल्या डोळ्यांसमोर छेडछाड, टवाळखोरीचा प्रकार सुरू असल्याचे दिसून आल्यास नागरिकांनी निर्भया पथकाशी संपर्क साधावा. अशा नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे कांगणे यांनी स्पष्ट केले.

...

निर्भया पथकाच्या मदतीसाठी येथे करा संपर्क

टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक - १०९१

९४०३१६५८३०, ९४०३१६५६७४, ९४०३१६५५०६, ९४०३१६५१९३

फेसबुक- nirbhyanskpathak

मेल- nirbhyanashik@gmail.com

...

अश्लिल चाळ्यांचे प्रमाण अधिक

शहरातील मोकळे मैदान, जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणी युवक युवतींचे अश्लिल चाळे सुरू असतात. भविष्यात यातून एखादी दुर्घटना घडू शकते. निर्भया पथकाने आजवर दोन जोडप्यांना पकडले असून, यातील एक घटना उपनगर भागातील शिखरेवाडी मैदानातील आहे. असाच प्रकार गंगापूररोड भागातील बापू पुलाजवळ निर्भया पथकाच्या निदर्शनास आला होता. या युवकांविरुद्ध कारवाई करीत पोलिसांनी त्यांना कोर्टात धाडले. कोर्टाने त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठवला.

...

निर्भयाची कामगिरी

- आत्महत्या करणाऱ्या निघालेल्या विवाहितेस वेळीच रोखले

- लाखलगाव येथून अल्पवयीन मुलीची सुटका

- गस्तीदरम्यान सापडलेल्या पाच वर्षांच्या गतिमंद मुलीची वेळीच दखल घेऊन पालकांपर्यंत पोहचवले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डॉक्टरांनी रुग्णांबद्दल आत्मियता दाखवावी’

$
0
0

भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे १३ डॉक्टरांचा सत्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुग्णांमध्ये डॉक्टरांबद्दल कमालीचा आदर व विश्वास असतो आणि डॉक्टरांनी आपल्या कृतीने तो अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केले.

लक्ष्मण सावजी आणि मान्यवरांच्या हस्ते 'डॉक्टर दिना'चे औचित्य साधून भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे वैद्यकीय क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सावजी बोलत होते. मंचावर भाजपचे महानगर संघटन सचिव प्रशांत जाधव, पवन भगूरकर, मध्य-पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, वैद्यकीय आघाडीचे महानगर अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. अजय गुजर, डॉ. वैभव जोशी, डॉ. मनोज दगडे, नितीन क्षीरसागर आदी होते.

वैद्यकीय क्षेत्रात असतांनाही अनेकांनी राजकीय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. नाशिकला डॉ. वसंत गुप्ते यांनी नगराध्यक्षपद भूषविले. डॉ. दौलतराव आहेर राज्याचे आरोग्यमंत्री होते. डॉ. शोभा बच्छाव यांनी महापौर आणि राज्यमंत्रिपद भूषविले, असे सांगताना राजकारण आणि वैद्यकीय क्षेत्र यांचे निकटचे नाते असल्याचे सावजी यांनी नमूद केले. व्यवसायाने डॉक्टर नसले तरी महाआरोग्य शिबिरे भरवून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गरीब आणि गरजू रुग्णांबद्दल आपणास किती कळकळ आहे, हे दाखवून दिले आहे. डॉक्टरांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक रहावे व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

डॉ.चंद्रशेखर नामपूरकर यांनी प्रास्ताविकात आघाडीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. वैभव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. उदय साकुरीकर, डॉ. शाम थविल, डॉ. चंचल चव्हाण, संध्या तोडकर, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.

यांचा झाला गौरव

डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. श्रीकांत खरे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ. अमित धांडे, डॉ. ज्ञानेश निकम, डॉ. एकनाथ कुलकर्णी, डॉ. मनीषा पगार-मराठे, डॉ. दीपाली कुलकर्णी, डॉ. सीमा ताजणे, डॉ. अनुप भारती आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊसदैना!

$
0
0

शहरात सर्वत्र गुडघाभर पाणी, वाहतूक कोंडी; जनजीवन विस्कळीत

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरात सर्व भागात गुडघ्याइतके पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून वाट काढाताना वाहनचालक व नागरिकांची दैना झाली. मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दमदार पाऊस त्यात तुंबलेल्या नाशिकनगरीत नागरिकांची दाणादाण उडाल्याचे दिसून आले.

नाशिक शहरात सोमवारी दिवसभरात ४७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळेत १४.२ मिमी, तर सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या दोन तासात ३३.४ मि.मी. पाऊस झाला. या पावसाने शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. सीबीएस, शालिमार, अशोक स्तंभ, त्र्यंबक नाका हा मध्यवर्ती भाग पूर्णत: ठप्प झाला. इंदिरानगर अंडरपास, सिटी सेंटर मॉल परिसर, नाशिकरोड उड्डाणपूल, त्र्यंबकरोडसह सातपूर, पंचवटी, आरके, शरणपूररोड, जेलरोड, पेठरोड, गंगापूररोड, द्वारका, सिडको, संभाजी चौक या सर्व ठिकाणी रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. सराफ बाजारात कंबरेइतक्या पाण्यातून नागरिकांना वाट शोधावी लागली. पंचवटी परिसरातील सर्व नाले ओसंडून वाहत होते. रस्त्यातील गटारे ओव्हरफ्लो झाल्याचे दिसून आले. रस्त्यात साचलेल्या तुडुंब पावसातून वाहने नेताना अनेक वाहने बंद पडली. यामुळे नागरिकांच्या त्रासात अधिक भर पडल्याचे दिसून आले. वीजपुरवठाही खंडित झाला. यामुळे महापालिका प्रशासनाच्या कामाचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

...

वाड्याची भिंत कोसळली

पिंजरघाटातील जोगवाड्याची भिंत कोसळली. यामुळे दोन दुचाकींचे नुकसान झाले. या वाड्यात कोणीही राहत नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

...

पोलिस गायब

वाहतूककोंडी होऊनही वाहतूक पोलिस मात्र रस्त्यावर दिसले नाहीत. यामुळे कित्येक तास वाहतूककोंडी कायम होती. द्वारका, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर, त्र्यंबकरोड, शालिमार, जुना गंगापूर नाका, चांडक सर्कल, मायको सर्कल, उपनगर, नाशिकरोड या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अवघे पंधरा मिनिटे लागतात, त्या ठिकाणी जाण्यास वाहनधारकांना दीड ते दोन तास लागले.

...

शहर अंधारात

पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. रस्त्यावर अगोदरच गुडघ्याइतके पाणी असताना, पथदीप बंद पडले. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहरातील अनेक भागात वीज गायब झाली. यामुळे शासकीय व खासगी कार्यालयातले कामकाज ठप्प झाले. यामुळे शहर अंधारात गेल्याचे दिसून आले.

...

पॉइंटर्स

- स्मार्टरोडवर साचले तळे

- जुने नाशिकमधील नाले ओव्हरफ्लो

- नाशिकरोड उड्डाणपुलाखाली दुचाकीच्या मध्यापर्यंत पाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनजमध्ये वीज पडून मुलाचा मृत्यू

$
0
0

मालेगाव : तालुक्यातील सोनज येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बिपीन दशरथ घोंगडे असे या मृत मुलाचे नाव आहे. शाळा सुटल्यानंतर तो सायंकाळी घरी आला तेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला होता. घराच्या धाब्यावर असलेले साने (डक) झाकण्यासाठी तो गेला असता अचानक कडाडलेली वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी, मजुरांची आरोग्य तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिंद्रा ईपीसी कंपनीच्या सीएसआर-सेहत या उपक्रमांतर्गत नामको हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्यातर्फे पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतकरी वर्गासह गरीब शेतमजूर अशा २०० जणांनी शिबिराचा लाभ घेतला.

अन्नदाता असूनही आरोग्याबाबत सातत्याने उपेक्षित राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या मजूरवर्गाचे आरोग्य जपले जावे, हा शिबिरामागील हेतून असल्याचे नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी शशिकांत पारख यांनी सांगितले. कृषी बाजार समितीचे अध्यक्ष शिवाजी चुंबळे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. दंतरोग, नेत्ररोग, हाडांचा ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह, मुखरोग अशा विविध प्रकारच्या तपासण्या संयोजक संस्थांनी या आरोग्य शिबिरातून उपलब्ध करून देण्यात आल्या.

नामको रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमराव दळवी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मनोज दगडे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा मराठे, फिजिशीयन डॉ. पंकज दाभाडे यांनी रुग्णांची तपासणी केली. क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या वतीने सीबीसी, हाडांचा ठिसूळपणा अशा तपासण्या करत सर्व रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महिंद्रा ईपीसी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मकरंद मल्लीकर, व्यवस्थापक सुनील पाथरकर, रमेश घुले, आर. एन. आहेर, आर. डी. धात्रक, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश भावसार आदी प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण धोरणावर शनिवारी चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व शैक्षणिक संस्था व शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्व संघटनेतील व्यक्तींचे 'नवीन शैक्षणिक धोरण' या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. अशोकस्तंभावरील जु. स. रुंगटा हायस्कुलमध्ये शनिवारी (दि. ६) सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ही चर्चा होणार आहे. या चर्चासत्रातून शैक्षणिक धोरणा संदर्भातील आलेल्या सूचना पुढे शिक्षा मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. भारतीय शिक्षण मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष महेश दाबक यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट पार्किंगचा प्रारंभ प्रायोगिक तत्त्वावर

$
0
0

स्मार्ट सिटी कंपनीने दिले स्पष्टीकरण

..

- चाचणीनंतर शुभारंभ

- पहिल्या दिवशी ९०० वाहनधारकांकडून वापर

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३३ पैकी १५ ठिकाणी स्मार्ट पार्किंगला प्रायोगिक तत्त्वावर सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीचे पंधरा दिवस स्मार्ट पार्किंगची केवळ चाचपणी केली जाणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे. पहिल्या पंधरा दिवसांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चाचणी यशस्वी झाल्यानंतर अधिकृतपणे या पार्किंगचा शुभारंभ केला जाणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात खासगी कंपनीच्या मदतीने ३३ ठिकाणी ऑन स्टीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी स्मार्ट पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील चाचपणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ९०० वाहनचालकांनी या पार्किंगचा लाभ घेतला. परंतु, स्मार्ट सिटीच्या संचालकांना विश्वासात न घेताच या पार्किंग सुरू केल्याने नाराजी पसरली होती. परंतु, कंपनीने या योजनेचा अधिकृत शुभारंभ झाला नसल्याचा दावा केला आहे. या पार्किंगची केवळ प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी केली जात आहे. यातील त्रुटी दूर केल्यानंतरच अधिकृतपणे पार्किंग सुरू होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षयच्या मदतीने सावरले पोलिसांचे कुटुंबीय

$
0
0

प्रत्येकी अडीच लाखांची केली मदत

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्तव्य बजावत असताना दोघांच्या दिशेने एक टेम्पो काळ बनूनच आला होता. त्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा कर्मचारी वाचला, पण अपघातानंतर अनेक प्रश्नही निर्माण झाले. शहर पोलिस दलातील या दोघा कर्मचाऱ्यांची व्यथा बॉलिवूड स्टार अक्षय कुमार यास समजली अन् यानंतर अवघ्या चौवीस तासांत त्याने प्रत्येकी अडीच अशी पाच लाख रुपयांची मदत या पोलिस कुटुंबीयांना केली.

सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या अक्षय कुमारने यापूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना कोट्यवधी रुपयांची मदत केली होती. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अक्षय कुमार चांगले स्नेही असल्याने अधूनमधून त्यांच्यात चर्चाही होत असते. काही दिवसांपूर्वी एकमेकांची खबरबात घेत असताना, नंदू जाधव आणि राजेश लोखंडे या दोघा कर्मचाऱ्यांचा विषय निघाला होता. पेठरोडवरील राऊ चौकात १ एप्रिल रोजी तिहेरी अपघात झाला होता. या अपघातात रस्त्याच्या कडेला आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी नंदू जाधव (वय ४०, रा. शेरीमळा, पंचवटी) यांचा मृत्यू झाला होता, तर राजेश लोखंडे हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे पोलिस कर्मचारी कुटुंबाची वाताहात झाली. एका कुटुंबाचा आधारवड हरवला. दुसऱ्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या कुटुंबांसमोरील समस्या आ वासून उभ्या राहिल्या. कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. सरकारी पातळीवरील शक्य ती मदत देणे हाती असून, या व्यतिरिक्त काय करता येऊ शकते, याबाबत त्यांच्या मनात विचार सुरू होते. सुदैवाने त्याचदरम्यान नांगरे पाटील आणि अक्षय कुमार यांच्यात मोबाइलवर बोलणे झाले. ख्याली खुशाली विचारता विचारता नांगरे पाटील यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यांसोबत झालेली घटना अक्षय कुमार यास सांगितली. मी काय मदत करू शकतो, असा स्वाभाविक प्रश्न अक्षयकुमारने उपस्थित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारने या दोन्ही कुटुंबासाठी प्रत्येकी अडीच लाख असे पाच लाखांची मदत पाठवून दिली. पोलिस आयुक्तांनी हे धनादेश जाधव आणि लोखंडे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

...

आयुक्तांची 'मटा' कार्यालयाला भेट

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी १ जुलै 'मटा'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले. आयुक्तांनी विविध विषय आणि प्रश्नांवर संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वत:ला पक्ष समजू नका

$
0
0

पालकमंत्र्यांनी उपटले पदाधिकाऱ्यांचे कान; मोठी शस्रक्रिया करण्याचे सूतोवाच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्र्यावर विश्वास टाकून नागरिकांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. परंतु, सव्वा दोन वर्षात मनपा पदाधिकाऱ्यांना कामाचा सूर सापडत नसून काही पदाधिकारी स्वत:लाच पक्ष आणि महापालिकेचे मालक समजू लागले आहेत. रोज बाहेर येणाऱ्या भानगडी आणि नौटंकीमुळे महापालिकेचे काम भूषणावह नसल्याचे सांगत, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. महापालिकेत सध्या मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे मी लवकरच मोठे ऑपरेशन करणार असल्याचा इशारा देत त्यांनी थेट कारवाईचा सज्जड दम भरला.

महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपानंतर महाजन यांनी रविवारी (दि. ३०) रात्री भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची बैठक घेतली. यात महाजन यांनी महापालिकेतील कारभार आणि पदाधिकाऱ्यांच्या अपयशाचा पाढाच वाचला. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यापासून भाजपच्या कारभाराला सूरच लागलेला नाही. पदाधिकाऱ्यांमधील आपसातील स्पर्धा, आमदारांमधील वर्चस्ववादाचा लढा, पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेले हेवेदावे यामुळे कारभारच भरकटला आहे. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी तर पक्षालाच आव्हान देत, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महासभेत ठिय्या आंदोलन केले. यामुळे भाजपचीच शोभा झाली. अखेर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर हे बंड थंड झाले.

पालकमंत्र्यांनी महापालिकेतील भरकटलेल्या कारभारासह पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. भाजपला सत्ता ही नागरिकांची कामे करण्यासाठी दिली आहेत. परंतु, काही पदाधिकारी तिचा गैरवापर करीत आहेत. आमचे तुमच्यावर लक्ष आहे, अशा इशारा महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. तुम्हाला कार्यकर्त्यांनी निवडून दिले आहे, त्यामुळे जमिनीवर रहायला शिका, मनमानी कारभार करू नका, असा सज्जड दमही त्यांनी भरला. आपण म्हणजे पक्ष आहे, अशा अविर्भावात काही पदाधिकारी वावरत आहेत. त्यामुळे रोजच महापालिकेतील भानगडी बाहेर येत आहेत. महापालिकेचे असे काम भूषणावह व आशादायी मुळीच नाही. यापुढे थेट मोठी शस्रक्रिया मी पक्षात आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये करण्याचा इशारा महाजन त्यांनी दिला. नगरसेवकांसमक्ष पदाधिकारी व महापालिकेवर वर्चस्व ठेवणाऱ्या आमदारांना पालकमंत्र्यांनी खडे बोल सुनावले. त्यामुळे पुढच्या काळात महापालिकेत आणि पक्षात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोणीच समाधानी नाही

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढतांना, महाजन यांनी संतप्त होऊन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना 'तुम्ही महापालिकेच्या कामकाजावर समाधानी आहात का' असा थेट प्रश्न विचारला. त्यावर सभागृहातील कार्यकर्त्यांनी एक सुरात 'नाही' असे उत्तर आले. विशेष म्हणजे उपस्थित काही नगरसेवकांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळविला. त्यामुळे उपस्थित पदाधिकारी आणि आमदारांचे चेहरेच पडले. महापालिकेचे सध्याचे काम बिल्कुल अपेक्षित नाही, आपण आता मोठी सर्जरी करणार असल्याचा इशाराच महाजन यांनी दिला.

महाजन उवाच

- जनतेने सत्ता मुख्यमंत्र्यांकडे पाहून दिली

- काही पदाधिकाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर

- जमिनीवर रहायला शिका

- तुमच्यावर आमचे बारीक लक्ष

- महापालिकेचा कारभार असमाधानकारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत नाल्यांना पूर

$
0
0

पंचवटी : सोमवारी (दि. १) दुपारी साडेतीन वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. परिसरातील नाल्यांना पूर आले. पाणी तुंबण्याचे आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे प्रचंड हाल झाले. औरंगाबाद रोडवर बुजविण्यात आलेल्या नाल्यांचे पाणी रस्त्यावर तुंबल्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून वाहने पुढे नेण्यास अडचणी येत होत्या. पंचवटी परिसरातील सर्वच नाल्यांना पूर आले. नांदूरनाका येथे रस्त्यावर पाणी साचल्याने तलावासारखी स्थिती निर्माण झाली.

चिंचबन येथे योगेश बुंदीले यांच्या घरात पाणी शिरले. फुलेनगर, एरंडवाडी, वज्रेश्वरी या झोपडपट्ट्यांत पाणी शिरले. इंद्रकुंड, पुरिया मार्ग, शनिचौक, सरदार चौक या परिसराकडून रामकुंडाकडे उताराने पाणी वाहत गोदापात्रात जात होते. अनेक ड्रेनेज लाइनचे ढापे पावसाच्या पाण्याने उखडले त्याचे पाणी गोदापात्रात वाहून जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी थकविणारी सरकारी आस्थापनेही रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीपट्टी थकविल्यामुळे शहरातील सर्वसामान्य थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडणाऱ्या महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांकडे मोर्चा वळवला आहे. पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आयुक्तालय, महाराष्ट्र पोलिस अकादमी, कृषी विभाग, उपवनसंरक्षक कार्यालय (पश्चिम), शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्रासह केंद्र सरकारच्या बीएसएनएलला नोटीस बजावली आहे. थकबाकी तत्काळ भरली नाही तर महापालिकेने थेट नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने उशिरा का होईना थकबाकीदार सरकारी आस्थापनांना वसुलीसाठी रडारवर घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'वर्षा'नेच पाणीपट्टीची थकबाकी थकवल्याचे समोर आल्यानंतर महापालिकांच्या बड्या थकबाकीदारांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेने थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानालाच नोटीस दिल्याने राज्यातील महापालिकांचे मनोबल उंचावले आहे. नाशिक महापालिकेने अगोदरपासूनच शहरातील थकबाकीदार पाणीपट्टीच्या ग्राहकांवर कारवाई सुरू केली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची २५ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या याद्या करवसुली विभागाने तयार करीत घरपट्टीच्या थकबाकीदारांवर मिळकत जप्तीची, तर पाणीपट्टी थकबाकीदारांवर नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने आता सामान्यांप्रमाणेच बड्या थकबाकीदारांकडेही मोर्चा वळवला आहे. प्रलंबित पाणीपट्टी वसुलीसाठी नोटिसा देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. नाशिक पश्चिम विभागीय अधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे कॅनडा कॉर्नर व उंटवाडी रोडवरील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र, कृषी कार्यालय, उपवनसंरक्षक पश्चिम कार्यालय, कार्यकारी अभियंता करंजवण धरण, पोलिस अकादमीला नोटीस बजावत थकबाकी भरण्याची सूचना केली आहे. विहित कालावधीत पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा या नोटिशींद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे इतरांना नियम शिकवणाऱ्या सरकारी आस्थापनांनी महापालिकेची पाणीपट्टी थकवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोटीस दिलेली आस्थापने थकीत रक्कम

सार्वजनिक बांधकाम विभाग १,३०,००० रुपये

बीएसएनएल २,५०,००० रुपये

पोलिस अकादमी ३४,००० रुपये

शासकीय कृषी कार्यालय- ३४,००० रुपये

शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र- ५०,००० रुपये

उपवनसंरक्षक पश्चिम कार्यालय- ८३,००० रुपये

कार्यकारी अभियंता करंजवण डॅम- ५,४३,००० रुपये

अधिकारीही रडारवर

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थकबाकी वसुलीकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही रडारवर घेतले आहे. करवसुली मोहिमेअंतर्गत थकबाकीदारांच्या मिळकतींची जप्ती, लिलाव व करवसुलीबाबतची माहिती देता न आल्याने आयुक्तांनी सहा विभागीय अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्तांनी सहाही विभागीय अधिकाऱ्यांना वसुलीसाठी दहा कलमी कार्यक्रम तत्काळ सादर करा, असे निर्देश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिहर गडावर जायचंय, परवानगी घ्या!

$
0
0

पश्चिम वनविभागाचा नियम; पर्यटकांची होणार तपासणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हरिहरगडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसावा. तसेच पर्यटकांची सुरक्षा राखली जावी. म्हणून पश्चिम वनविभागाने परवानगीशिवाय कोणालाही गडावर प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच पर्यटकांना गडावर जाता येणार आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असून, पर्यटकांच्या गर्दीचे चोख नियंत्रण केले जाणार आहे.

नाशिक पश्चिम वनविभागातर्फे हरिहरगडाच्या पायथ्याशी 'प्रवेश निषिद्ध' असे फलक लावण्यात आले आहे. गेल्या आ‌ठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर पर्यटकांच्या गर्दीने मोठी कोंडी झाली होती. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यानंतर पश्चिम वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी किल्ल्याच्या परिसराची पाहणी करण्याचे आदेश परिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. यानुसार परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी राखीव वन क्षेत्रात येणाऱ्या किल्ल्याच्या परिसराची पाहणी केली. पाहणीअंती पर्यटकांना विनापरवानगी गडावर जाता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

वनविभाग, पोलिस, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने हरिहरगड येथे वन व्यवस्थापन समिती नेमण्यात येणार आहे. या समितीचे संपूर्ण लक्ष गडावर जाणाऱ्या पर्यटकांसह ट्रेकर्सवर असले. गडाच्या पायथ्याशी सर्वांची तपासणी केली जाईल. परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच गडावर जाता येईल. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून, या शुल्कातून गडसंवर्धनाचे कार्य पुढील टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. यामुळे हरिहरगडावर जायचं झाल्यास आता पर्यटकांना परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसह वन क्षेत्राचे रक्षण होईल, असा विश्वास वन खात्याने व्यक्त केला आहे.

हरिहरगड येथे हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याची तक्रारी होत्या. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेकरिता गडावर जाण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. तसेच पर्यटकांना परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय ट्रेकिंग किंवा पर्यटनासाठी जाता येणार नाही.

- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक

पावसाळ्यात हरिहरगडावर ट्रेकर्स व पर्यटकांची गर्दी अधिक असते. या काळात गडावर सुरक्षेची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. वनविभागाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून या कार्यवाहीत सातत्य राहिले पाहिजे.

- संजय अमृतकर, ट्रेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुथूट दरोड्यावेळी वापरलेला टेम्पो जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात आलेला आयशर टेम्पो अखेर शहर पोलिसांनी शोधून जप्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या जितेंद्रसिंग राजपूत याच्या मालकीचा हा टेम्पो आहे. घटनेनंतर त्याने तो शिताफीने आपल्या सुरतमधील कार्यालयाजवळ दडवून ठेवला होता. या गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी यापूर्वीच हस्तगत करण्यात आल्या आहेत.

उंटवाडीरोडवरील म्हसोबा मंदिर पुलाजवळील मुथूट फायनान्स कार्यालयावर १४ जून रोजी पडलेल्या सशस्त्र दरोड्यावेळी आरोपींनी टेम्पोचा खुबीने वापर केला होता. जवळपास १६ कोटी रुपयांचे सोने लुटून याच टेम्पोत भरून आरोपी पलायन करणार होते. दरोडेखोर दुचाकीवर पसार झाल्याचे चित्र निर्माण केल्याने पोलिसांना टेम्पोचा सुगावा लागण्याची शक्यता कमी राहणार होती. या पार्श्वभूमीवर आरोपींनी दरोड्याच्या दिवशी हा टेम्पो चामरलेणी परिसरात उभा केला होता. यावेळी टेम्पोत चालक आणि आरोपी होता. कार्यालयात सॅज्यू सॅम्युअलच्या विरोधामुळे दरोडेखोरांना सोने लुटण्याची संधी मिळाली नाही. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी परमेंदरसिंगने सॅम्युअलवर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर सहा आरोपी तीन दुचाकींवर बसून पसार झाले होते. सर्व आरोपी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाले. तिथे त्यांनी दुचाकी लावून पाठीमागून आलेल्या टेम्पोत आसरा घेतला. या टेम्पोतूनच आरोपी पसार झाल्याने त्यांना पोलिसांना चकवा देता आला होता. या गुन्ह्याचे एक केंद्र सुरत, तर दुसरे केंद्र बिहार आणि उत्तर प्रदेश ठरले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात दोघांना अटक केली असून, त्यापैकी एक असलेल्या जितेंद्रसिंग राजपूतचा हा टेम्पो आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारे, पीएसआय विकास लोंढे, पीएसआय तुषार चव्हाण, हवालदार संजीव जाधव, हवालदार मारुती गायकवाड, पोलिस नाईक अविनाश देवरे, धनंजय दोबांडे, संभाजी जाधव, मनोहर कोळी, मच्छिंद्र वाघचौरे आदींनी सुरत गाठून हा टेम्पो जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम. लॉ संदर्भातहवा ठोस निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बी. कॉमच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील 'बिझनेस रेग्युलेटरी फ्रेम वर्क' (एम. लॉ.) या पेपरचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित निकाल ३० जूनला जाहीर होणार होता. मात्र, हा निकाल लांबणीवर पडला आहे. यामुळे आज (२ जुलै) सकाळी ११ वाजता विद्यार्थी पुन्हा शहराच्या विद्यापीठ उपकेंद्रात धडक देणार आहेत. आश्वासन देऊनही निकाल लांबणीवर गेला असून, निकालाबाबत ठोस निर्णय जाहीर व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या बी. कॉम पदवीचा निकाल सदोष असल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला होता. या संदर्भात नाशिक उपकेंद्रात दोन्ही विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने ३० जून रोजी सुधारित निकाल जाहीर करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ३० जून रोजी निकाल जाहीर झाला नाही. या विषयात १२ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची माहिती असून यातील ६ हजाराच्या सुमारास विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले आहेत. निकाल रखडत

असल्याने पदव्युत्तर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपकेंद्रातून बाहेर पडणार नाही, असे विद्यार्थी प्रतिनिधींनी

सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जूनमध्ये सरासरी नाहीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जुलैच्या पहिल्याच दिवशी शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असला तरी जूनमध्ये सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमीच झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीच्या ६९ टक्के पाऊस झाला असून, नाशिकसह पेठ, सुरगाणा आणि येवल्यात मात्र १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

हल्ली पावसाच्या लहरीपणामुळे १२ महिन्यांत कधीही तो हजेरी लावतो. परंतु, १ जून ते ३० सप्टेंबर हाच पावसाचा खरा कालावधी मानला जातो. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २३२४.५० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, यंदा १ ते ३० जून या कालावधीत १६०२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरेतर सुरुवातीचे अनेक दिवस गायब असणारा पाऊस महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात अधिक सक्रिय झाला. तरीही यंदा सरासरीच्या ७२२.४२ मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी

गतवर्षी २०१८ मध्ये तब्बल २४४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच जिल्ह्यात सरासरीहूनही अधिक पाऊस पडला होता. परंतु, यंदा पाऊस सरासरीदेखील गाठू शकलेला नाही. किंबहुना सरासरीच्या ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे.

चार तालुक्यांत दमदार; कळवण कोरडाच

जिल्ह्यातील नाशिक, पेठ, सुरगाणा आणि येवला या तीन तालुक्यांमध्ये जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तीनही तालुक्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. नाशिकमध्ये ९३.५० टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, तालुक्यात १२६.९ मिलिमीटर म्हणजेच १३५ टक्के पाऊस पडला आहे. पेठमध्ये ११९.३ टक्के, सुरगाण्यात १११.४ टक्के तर येवल्यात १२९.६ टक्के पाऊस झाला आहे. कळवणकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. तालुक्यात सरासरी १२०.६० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, यंदा केवळ तीन मिलिमीटर पाऊस पडला आहे. देवळ्यातही अवघा १९ टक्केच पाऊस झाला आहे. दिंडोरीत अनेक दिवस पाऊसच नव्हता. परंतु, शेवटच्या तीन-चार दिवसांत जोरदार हजेरी लावल्याने या तालुक्यात २२ टक्के पाऊस झाला आहे.

जूनमधील पाऊस

तालुका पाऊस (मिमी) टक्केवारी

नाशिक १२६.९ १३५.७

इगतपुरी ३८८ ८३.४

दिंडोरी २६.० २२.८

पेठ ३१०.८ ११९.३

त्र्यंबकेश्वर १११.० ४२.६

मालेगाव ४७.० ४५.९

नांदगाव ४५ ४१.५

चांदवड २९ २५.१

कळवण ३.० २.५

बागलाण ५७.० ५७.१

सूरगाणा १७६.३ १११.४

देवळा २२.३ १९.३

निफाड ४४.५ ४४.३

सिन्नर ६०.० ६७.२

येवला १५६.० १२९.६

एकूण १६०२.८ ६८.९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये ‘जोर’धार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागाला पावसाने सोमवारी झोडपून काढले. जुलैच्या पहिल्याच दिवशी दमदार सलामी देत पावसाने नाशिककरांची कोंडी केली. शहरात सिटी सेंटर मॉल चौकासह अनेक रस्ते जलमय झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. पुढील तीन दिवस जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जुलैच्या प्रारंभीच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने शेतकरी सुखावले आहेत. पावसाने शहरात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हजेरी लावली. पावसाचा जोर सायंकाळी पाचनंतर वाढला. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत १४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या तीन तासांत तब्बल ३३.४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे दिवसभरात शहरात ४७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रस्ते जलमय झाल्याने शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीचा फज्जा उडाला. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली.

पाणलोट क्षेत्रातही सरी

गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. दिंडोरीत दिवसभरात २९ मिमी पावसाची नोंद झाली. सिन्नरमध्ये दुपारी चारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. देवळ्यात हलक्या स्वरूपाचा, तर सटाण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. निफाड तालुक्यातील लासलगाव, नांदूरमध्यमेश्वर आणि रानवड भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कळवणकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. अन्य तालुक्यांमध्ये हलक्या सरी कोसळल्या.

सविस्तर वृत्त... २, प्लस १, ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोम्बिंगमध्ये तडीपारांची धरपकड

$
0
0

नाशिक : झोपडपट्टी भागात रविवारी रात्री राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील ११४ आरोपींची तपासणी करण्यात आली. शानु अश्पाक शेख (वय २६, रा. भगूर) आणि सागर मुन्ना सोळंखे (तपोवनरोड, जुने स्टेशन, देवळाली कॅम्प) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा तडीपार व्यक्तींची नावे आहेत. नाकाबंदी दरम्यान ३६४ वाहने तपासण्यात आली, तर सात वाहनचालकांकडून चौदाशे रुपयांचा दंड वसूल केला. पाच तळीरामांवर कारवाई करण्याबरोबर मुंबई पोलिस अॅक्टनुसार ५६ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’विरुद्ध कडक कारवाई करा

$
0
0

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेती कर्ज उपलब्ध करण्यात बँका कुचराई करतील तसेच बी-बियाणे व खते यामध्ये भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. केवळ कार्यालयात बसून न राहता अधिकाऱ्यांनी फिरते रहावे. यापुढे कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शेतकरी भेटीची अॅटेडन्स ट्रॅकिंग केली जाईल, असेही त्यांनी साांगितले.

कृषिदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. बोंडे बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपचे अमरावती येथील आमदार असलेल्या डॉ. बोंडे ते पहिल्यांदा नाशिकला आले. यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी कान टोचले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्याबरोबरच त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना सन्मान मिळायला हवा, त्यासाठी ते आर्थिक सक्षम होणे सुद्धा गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी गट शेती करण्यावर भर द्यावा. शेती उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी या माध्यमातून अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावीत, विभागीय आयुक्त राजाराम माने, कृषी आयुक्त शिवाजी धिवसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा पवार, कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, उपस्थित होते.

पुस्तिका, घडीपत्रकेचे प्रकाशन

माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर कृषी योजनांच्या पुस्तका व घडीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने तयार केलेल्या www.krushivibhagnashik.com या वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सुमन माधव कुऱ्हाडे (ता. सिन्नर) यांना दोन लाख रुपये आरटीजीएस सेवेतून देण्यात आल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे आज व्याख्यान

$
0
0

डॉ. गिरीश कुलकर्णी

यांचे आज व्याख्यान

नाशिक : अहमदनगर येथील स्नेहालय व प्रेमराज सारडा विद्यालय-राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी हे मंगळवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजता सावाना आयोजित महात्मा गांधी विचारमालेचे दहावे पुष्प गुंफणार आहेत. सावाना आवारातील औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. म. गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित महात्मा गांधी विचारमालेतील या व्याख्यानाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात कायम!

$
0
0

प्रशासनाचा खुलासा, एक दिवस बंदबाबत आज अंतिम निर्णय

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या धरणांत पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरातील एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कायम राहणार आहे. पुरेसा पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत ही कपात कायम राहणार आहे. दरम्यान, एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याबाबत आज, मंगळवारी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

जूनमध्ये दारणा आणि गंगापूर धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने भविष्यात टंचाई भासू नये म्हणून महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो, तेथे एकवेळ पाणीपुरवठा रविवारपासून सुरू असून, त्यातून दररोज ५० ते ६० दशलक्ष लिटर्स पाणी वाचविले जात आहे. या निर्णयानंतर मात्र गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी भागात चांगला पाऊस पडत असला तरी अजून जमिनीची तहान भागलेली नाही. पाण्याचा प्रवाहही सुरू झालेला नाही. परंतु, पाऊस सुरू झाल्याने पुन्हा कपात रद्द होण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. परंतु, प्रशासनाने धरणसाठ्यात कोणताही बदल झालेला नाही. समाधानकारक बाब म्हणजे न्यूनतम पातळी खालावत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चर खोदण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे कपात अध्यापही मागे घेतली जाणार आहे. आठवड्यातून गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत आज, मंगळवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images