Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

म टा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण क्षेत्रात जेथे विविध प्रकारचे पॅटर्न प्रचलित झाले अशा शहरांत हल्ली स्पर्धेतून शिक्षकांचे खून पडत आहेत. शिक्षण क्षेत्रात धंदेवाईकपणा बोकाळला असून, त्यामुळेच हे क्षेत्र कुरुक्षेत्र बनले आहे. शिक्षणाचे वस्त्रहरण रोखून त्याला गुरुक्षेत्र बनविण्याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले.

महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना विद्यालय या मातृशाळेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात देशपांडे बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र समाजसेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, संस्थेचे पदाधिकारी निरंजन ओक, शांताराम आहिरे, सुधाकर साळी, विजय डोंगरे, अलका गाजरे, शीतल पवार, संगीता टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

'शिक्षण गुरुक्षेत्र की कुरुक्षेत्र' या विषयावर डॉ. देशपांडे यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाबरोबरच अंगी शिस्त बाणविण्यासाठी सैनिकी शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. हल्ली राष्ट्रगीत ऐच्छिक, पण हेल्मेटसक्तीचे बनू पाहत आहे. डोके सुरक्षित राहाणे महत्त्वाचे आहेच. परंतु, त्याहूनही डोक्यातील विचार सुरक्षित राहाणे अधिक महत्त्वाचे आहे. हल्ली मुलांना शर्टचे तुटलेले बटणही लावता येऊ नये, ही शोकांतिका आहे. हल्लीच्या पाठ्यपुस्तकांत फार काही नाही. आगामी काळ हा कौशल्यविकासचा असून, नव्या जाणिवेने कौशल्यविकासाचे काम सुरू करायला हवे.

स्वावलंबी शिक्षण रुजवावे

कुटुंबातील सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना घरातील फॅन, मिक्सर, मोबाइल, शेतपंपाची मोटार यांसारख्या उपकरणांची किमान जुजबी दुरुस्ती करता यायला हवी. येणाऱ्या पिढीने स्वत:च्या पायावर उभे राहावे याकरिता अशा प्रकारच्या स्वावलंबी शिक्षणाचे मूल्य त्यांच्यामध्ये आतापासूनच रुजवायला हवे. हल्ली मुलांना गोष्टी सांगणेच बंद झाले आहे. मुलांवर संस्कार होण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून जे साध्य करता येते ते अन्य कशातूनही होऊ शकत नाही. आपला प्रवास राइट टू एज्युकेशनपासून राइट वे ऑफ एज्युकेशनच्या दिशेने व्हायला हवा, असे मतही डॉ. देशपांडे यांनी यावेळी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक विश्वस्तपदी डॉ. सत्यप्रिय शुक्ल

$
0
0

त्र्यंबक विश्वस्तपदी

डॉ. सत्यप्रिय शुक्ल

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वस्तपदी डॉ. सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल यांची सहायक धर्मादाय आयुक्त यांनी निवड केली आहे. डॉ. शुक्ल यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

यापूर्वी ४ जुलै २०१८ रोजी देवस्थान विश्वस्त सदस्यांची निवड झाली होती. त्यावेळेस पूजक प्रतिनिधी म्हणून डॉ. शुक्ल आणि मिलिंद दशपुत्र असे दोन अर्ज आले होते. त्र्यंबकेश्वर देवस्थानात स्थानिक भाविकांमधून चार सदस्य, तुंगार मंडळी प्रतिनिधी एक सदस्य, पुरोहित संघ प्रतिनिधी एक सदस्य आणि त्रिकाल पूजक प्रतिनिधी एक असे सात सदस्य घ्यावे लागतात. नगरपालिका मुख्याधिकारी सचिव आणि जिल्हा सत्र न्यायाधीश अध्यक्ष असे एकूण नऊ सदस्य असलेला आराखडा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.

विश्वस्त सदस्यांची २०१३ मध्ये मुदत संपल्यानंतर चार जुलै २०१८ रोजी नव्याने निवड झाली होती. यात स्थानिक भाविक प्रतिनिधी सदस्य अॅड. संतोष दिघे, अॅड. पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे यांची मुलाखतीद्वारे निवड झाली होती. पुजारी तुंगार मंडळी यांनी दिलीप तुंगार यांची आणि पुरोहित संघ प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष प्रशांत गायधनी यांची नियुक्ती झाली. मंदिराचे त्रिकाल पूजक दशपुत्रे, शुक्ल आणि तेलंग आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाचे वस्त्रहरण रोखणे गरजेचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण क्षेत्रात जेथे विविध प्रकारचे पॅटर्न प्रचलित झाले अशा शहरांत हल्ली स्पर्धेतून शिक्षकांचे खून पडत आहेत. शिक्षण क्षेत्रात धंदेवाईकपणा बोकाळला असून, त्यामुळेच हे क्षेत्र कुरुक्षेत्र बनले आहे. शिक्षणाचे वस्त्रहरण रोखून त्याला गुरुक्षेत्र बनविण्याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले.

महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना विद्यालय या मातृशाळेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात देशपांडे बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र समाजसेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, संस्थेचे पदाधिकारी निरंजन ओक, शांताराम आहिरे, सुधाकर साळी, विजय डोंगरे, अलका गाजरे, शीतल पवार, संगीता टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

'शिक्षण गुरुक्षेत्र की कुरुक्षेत्र' या विषयावर डॉ. देशपांडे यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाबरोबरच अंगी शिस्त बाणविण्यासाठी सैनिकी शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. हल्ली राष्ट्रगीत ऐच्छिक, पण हेल्मेटसक्तीचे बनू पाहत आहे. डोके सुरक्षित राहाणे महत्त्वाचे आहेच. परंतु, त्याहूनही डोक्यातील विचार सुरक्षित राहाणे अधिक महत्त्वाचे आहे. हल्ली मुलांना शर्टचे तुटलेले बटणही लावता येऊ नये, ही शोकांतिका आहे. हल्लीच्या पाठ्यपुस्तकांत फार काही नाही. आगामी काळ हा कौशल्यविकासचा असून, नव्या जाणिवेने कौशल्यविकासाचे काम सुरू करायला हवे.

स्वावलंबी शिक्षण रुजवावे

कुटुंबातील सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना घरातील फॅन, मिक्सर, मोबाइल, शेतपंपाची मोटार यांसारख्या उपकरणांची किमान जुजबी दुरुस्ती करता यायला हवी. येणाऱ्या पिढीने स्वत:च्या पायावर उभे राहावे याकरिता अशा प्रकारच्या स्वावलंबी शिक्षणाचे मूल्य त्यांच्यामध्ये आतापासूनच रुजवायला हवे. हल्ली मुलांना गोष्टी सांगणेच बंद झाले आहे. मुलांवर संस्कार होण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून जे साध्य करता येते ते अन्य कशातूनही होऊ शकत नाही. आपला प्रवास राइट टू एज्युकेशनपासून राइट वे ऑफ एज्युकेशनच्या दिशेने व्हायला हवा, असे मतही डॉ. देशपांडे यांनी यावेळी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाला धक्का

$
0
0

निविदेला शून्य प्रतिसाद; ग्रेप पार्क, बोटक्लब, कन्व्हेन्शन सेंटर, कलाग्राम पुन्हा रखडले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या ग्रेप पार्क रिसोर्ट, बोटक्लब, कन्व्हेन्शन सेंटर व कलाग्राम या चारही प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा त्याचे टेंडर काढले जाणार आहे. ऑनलाईन टेंडर भरण्याची २४ जूनपर्यंत मुदत होती. त्यानंतर २७ जूनला ते उघडण्याचे ठरले होते. पण, एकही निविदा न आल्याने आता पुन्हा नव्याने प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे एमटीडीसी प्रशासनाने स्पष्ट केले.

गेल्या चार ते पाच वर्षापासून तयार असलेले पर्यटनस्थळ विविध कारणांनी रेंगाळले होते. पण, याची निविदा महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने काढल्यानंतर नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या. या निविदांमधून हे काम मंजूर होऊन पर्यटन स्थळ खुले होईल, असे अपेक्षित होते. पण, या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे हे प्रकल्प पुन्हा रखडणार आहे. आता पुन्हा निविदाची प्रक्रिया सुरू होईल. त्यातही त्याला प्रतिसाद मिळाला नाही, तर प्रकल्प पुन्हा रखडतील. त्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असल्याने विधानसभा निवडणूक काळात हे प्रकल्प सुरु होईल का, असा प्रश्न कायम राहणार आहे.

शहर परिसरातील प्रकल्प ३० वर्षांच्या भाडेतत्वानुसार दिले जाणार आहेत. त्यात ग्रेप पार्क रिसोर्ट, बोटक्लब, कन्व्हेन्शन सेंटर आणि कलाग्राम यांचा समावेश आहे. यातील काहींचे तीन स्थळांचे काम जवळपास पूर्ण तर एका ठिकाणचे काम सुरू आहे. तरीपण या चारही सेंटरला पर्यटक महामंडळाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गंगापूर धरणालगत तीन सेंटर आहेत. तर कलाग्राम हे गोवर्धन गावात आहे.

ग्रेप पार्क व बोट क्लब

ग्रेप पार्क रिसोर्टमध्ये २८ कक्ष असून स्विमिंग पूल, ट्रिन्क व्हिला सुद्धा आहे. प्रादेशिक पर्यटन योजना व केंद्रीय सहाय्यता निधीतून २५ कोटी रुपये खर्च करुन हे बांधण्यात आले आहे. गंगापूर धरणा कठड्यावरच असल्याने येथून सर्व धरणांचे दृष्य दिसते. बोटक्लबही धरणालगत आहे. २०१४ ला याचे संपूर्ण काम झाले. यूएसए मेड युरो ४ नॉर्मच्या ४७ अत्याधुनिक बोटी येथे आणण्यात आल्या. पण, हा क्लबही रेंगाळला आहे.

कन्व्हेन्श सेंटर व कलाग्राम

वेगवेगळ्या बिझनेस परिषदेसाठी कन्व्हेन्श सेंटरही येथे तयार झाले. तेथे मोठमोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा घेता येणार आहेत. या तीन सेंटरसह हैदराबादच्या धर्तीवर हाट बाजाराप्रमाणे उभारण्यात आलेल कलाग्रामही महत्त्वाचे सेंटर आहे. १० कोटी रुपये खर्च करून हे साडेचार एकरमध्ये उभारण्यात आले आहे. प्रशासकीय इमारतीबरोबरच ९२ गाळे महिला बचत गटासाठी येथे आहे. पाच वर्षांपासून हे धुळखात पडले आहे. या सेंटरचे उर्वरित काम हे भाडेतत्वावर घेणाऱ्या ठेकेदारांनेच पूर्ण करायचे निविदेत म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट पार्किंग’ वादात!

$
0
0

- घोटाळा झाल्याचा आरोप

- तंत्रज्ञान पुरवठा करणाऱ्या कंपनीची माघार

- काम पूर्णत्वास नेल्याचा संचालकांचा आरोप

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होत असलेल्या 'स्मार्ट पार्किंग योजने'त घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. स्मार्ट पार्किंगसाठी ट्रायजन टेक्नोलॉजी या कंपनीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मार्ट तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरविणाऱ्या मिलेनियम सिनर्जी या कंपनीने प्रक्रियेतून अंग काढून घेतले. असे असताना ट्रायजन कंपनीने स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणि निकृष्ट दर्जाचे तंत्रज्ञान वापरून काम पूर्ण केले आहे. निविदा प्रक्रियेतील अटी-शर्तींनुसार या कामासाठी नव्याने निविदा काढणे गरजेचे होते. मात्र त्याबाबत निविदा काढली नसल्याचा आरोप करीत यातील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी बोरस्ते यांनी केली आहे.

नाशिक म्युनिसीपल कार्पोरेशन स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात २८ ठिकाणी ऑनस्ट्रीट आणि पाच ठिकाणी ऑफस्ट्रीट अशा एकूण ३३ ठिकाणी पीपीपी तत्त्वावर पार्किंग स्थळे विकसित करण्यात येत आहेत. त्यासाठी कंपनीने २०१८ मध्ये निविदा काढली होती. या निविदा प्रक्रियेत ट्रायजन टेक्नोलॉजी लि. आणि मिलेनियम सिनर्जी प्रा. लि. या भागीदार कंपन्या पात्र ठरल्या होत्या. या अंतर्गत ट्रायजन कंपनी प्रकल्पाचा अर्थपुरवठा आणि अंमलबजावणी, तर मिलेनियम कंपनी यासाठी तंत्रज्ञान आणि दर्जेदार साहित्य पुरविणार होती. त्यानुसारच निविदा प्रक्रियेत दोन्ही भागीदार कंपन्यांनी सहभाग घेतल्याने त्या पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर नऊ महिन्यांनी काम सुरू करण्याचे नियोजन करीत ट्रायजन कंपनीने तंत्रज्ञान आणि साहित्य वापरात काहीसा परस्पर बदल केला. परंतु, सदरचे तंत्रत्रान हे निकृष्ट दर्जाचे असल्याने मिलेनियम कंपनीने ते वापरण्यास विरोध केला. आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून ट्रायजन कंपनीने दिलेला प्रस्ताव मिलेनियम कंपनीने फेटाळला. त्यामुळे ट्रायजन कंपनीने मिलेनियम कंपनीलाच बाजूला सारत स्थानिक निकृष्ट कंपन्यांना हाताशी धरून सदरचे काम पूर्ण केल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. मिलेनियम कंपनीने सदरच्या तंत्रज्ञानाला विरोध करूनही ट्रायजन कंपनीने काम सुरू केल्याचे पत्र महापालिका आयुक्त, तसेच स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांना दिले. ट्रायजन कंपनीशी असलेली भागीदारी तोडून स्मार्ट पार्किंगच्या तंत्रज्ञानात काही गडबड झाल्यास आपण जबाबदार राहणार नाही, असे पत्र मिलेनियम कंपनीने महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीला दिले. जवळपास सहा पत्रे देऊनही आयुक्त आणि सीईओ यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. त्यामुळे शहरात सध्या झालेले पार्किंगचे काम हे निकृष्ट दर्जाचे असून, या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे.

येत्या १ जुलै रोजी स्मार्ट पार्किंग प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वीच हा प्रकल्प वादात सापडला आहे.

...

स्मार्ट पार्किंगचा अनुभव मिलेनियम कंपनीला असल्यानेच ट्रायजन आणि मिलेनियमला कंत्राट मिळाले होते. त्यामुळे तंत्रज्ञान पुरवठा करणाऱ्यानेच अंग काढल्याने सदरची निविदा रद्द होणे आवश्यक होते. परंतु, स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि ट्रायजन कंपनीने अटी ‌व शर्तींचा भंग करून, तसेच निकृष्ट तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प साकारला आहे. त्यामुळे या बेकायदेशीर कामांची चौकशी होणे गरजेचे आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, मनपा

...

या प्रोजेक्टमधून मिलेनियम कंपनी बाहेर पडली असून, या दोन कंपन्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे कराराचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. तसेच, निविदा प्रक्रियेनुसारच तंत्रज्ञान पुरवले जाणार असून, त्याच्याशी तडजोड केली जाणार नाही.

- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक हेल्पलाइनवर तक्रारींचा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लोकसभा निवडणूक काळात मतदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रारींचा ओघ अव्याहतपणे सुरू आहे. १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर आतापर्यंत तब्बल ८,९३० मतदारांनी संपर्क साधून सजगता दर्शविली आहे. त्यामध्ये निम्म्याहून अधिक फोन हे मतदारयादीमधील नावाबाबत माहिती करून घेण्यासाठी केले गेले आहेत. मतदारयादी आणि निवडणुकीची प्रक्रिया याबाबत नागरिकांना सहजगत्या माहिती मिळावी यासाठी यंदा प्रथमच जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने १९५० हा हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित केला. लोकसभा निवडणूकप्रक्रियेची तयारी सुरू असताना हा क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याने नागरिकांनाही त्याचा लाभ झाला. मतदारयादीमध्ये नाव कसे समाविष्ट करावे, या प्राथमिक स्वरूपाच्या प्रश्नासह मतदारयादीमध्ये नाव सापडत नसल्याच्या तक्रारीपर्यंतचे अनेक कॉल या क्रमांकावर येऊ लागले. नागरिकांना फोनद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा, मतदानप्रक्रियेबाबत मतदारांना घरबसल्या माहिती मिळावी, त्यांच्या मतदानप्रक्रियेशी संबंधित विविध शंकांचे घरबसल्या निरसन व्हावे यासाठी ही हेल्पलाइन उपयुक्त ठरू लागली आहे. या हेल्पलाइनवर आतापर्यंत नऊ हजार मतदारांनी संपर्क साधला आहे. यामध्ये मतदार नोंदणी कशी आणि कोठे करावी या प्रश्नासह मतदारयादीमध्ये नाव नसणे, मतदान केंद्राची माहिती, मतदारयादीतील नाव व पत्ता दुरुस्ती, मतदान ओळखपत्र मिळविण्यासाठीची माहिती, ऑनलाइन मतदारनोंदणी प्रक्रिया जाणून घेण्याबाबतचे फोन अधिक होते. सर्वाधिक फोन हे मतदारयादीमध्ये नाव सापडत नाही, अशा स्वरूपाची तक्रार करणारे आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीमध्ये कलविले विष

$
0
0

नांदगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने विष टाकल्याची घटना शनिवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच गावातील विहिरीतील पिण्याच्या पाण्यात विष कालविण्यात आले होते. वारंवर घडणाऱ्या या प्रकारांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी साकोरे येथील सर्व विहिर मालकांनी नांदगाव पोलिसांकडे केली आहे.

साकोरा येथील चांदोरा मार्गावर मढी शिवारात शेतकरी भावराव बोरसे व सर्जेराव त बोरसे यांच्या सामायिक विहिरीत शनिवारी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले. बोरसे यांनी थेट पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली. नांदगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोरसे बंधू हे त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीतील पाणी कृषी पंपाच्या साहाय्याने काढत होते. पाण्याचा रंग बदलल्याचे तसेच त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने त्यांना आढळून आले. बोरसे बंधूंनी विहिरीची पाहणी केली असता पाण्यात विषारी औषध टाकल्याचे दिसून आले. यावेळी हवालदार मधुकर सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, भाऊराव बोरसे, दीपक बोरसे, भागवत मोरे, योगेश बोरसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवकाल अनुभवण्याची आज सुवर्णसंधी

$
0
0

मटा कल्चर क्लबतर्फे 'शिवकल्याण राजा'चे आयोजन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुवर्णकाळ शिवशाहिरांच्या तेजस्वी वाणीतून ऐकण्याची संधी नाशिककरांना आज (दि. ३०) मिळणार आहे. लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज, दस्तुरखुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्फूर्तिदायी निवेदन आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरांत पोहोचलेले 'शिवकल्याण राजा' आज पुन्हा रसिकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त कल्चर क्लबतर्फे 'शिवकल्याण राजा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाकवी कालिदास कलामंदिर येथे रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

चाळीस वर्षांपूर्वी 'शिवकल्याण राजा'ची निर्मिती झाली. 'गुणी बाळ असा, आनंदवनभुवनी, म्यानातून उसळे तलवारीची पात, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा आणि सरणार कधी रण' यासारख्या गाण्यांची आठवण झाली की 'शिवकाल' पुन्हा मनामनांत जागा होतो. शिवकाल म्हटले, की शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांनी परकियांशी दिलेले लढे, मावळ्यांची सात्र आणि त्यातून उभे राहिलेले स्वराज्य मग आपसूकच नजरेसमोर येतो. शिवाजी महाराजांच्या या साऱ्या पराक्रमास 'शिवकल्याण राजा' या खास कार्यक्रमामुळे पुन्हा उजाळा मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमोघ वाणीतून उभा राहणारा जाज्ज्वल्य इतिहास आणि प्रतिभावंत संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची साथ. या दोहोंकडून उभा राहणारा शिवकाल अनुभवणे ही मोठी पर्वणी असेल, हे नक्की!

..

महाकवी कालिदास कलामंदिर येथे आज, रविवार सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ वाजेपासून तिकीट विक्री सुरू आहे.

...

कार्यक्रमाच्या मिळवा प्रवेशिका

नव्याने कल्चर क्लब मेंबर व्हा आणि या कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका मिळवा.

...

चौकट

२९९ रुपयांत व्हा 'मटा कल्चर क्लब'चे सदस्य

ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Article 1

महिला आरक्षणासाठी भाजप आग्रही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक राज्यसभेने मंजूर केले आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या बाजूने भाजप असून, हे विधेयक लवकरच लोकसभेतही मंजूर केले जाईल, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही कॉँग्रेस- राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत २८८ मतदारसंघांमध्ये संघर्षाची तयारी ठेवा, अशी सूचनाही केली आहे. यंदाच्या दिवाळीत पुन्हा आपले सरकार सत्तेत येणार असून, तुम्ही आता 'रक्षाबंधनपर्व' साजरे करा, नंतर भाऊबीज जोमाने साजरी करू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपच्या महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन येथील हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये दानवे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २९) झाले. त्या वेळी ते बोलत होते. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अध्यक्षस्थानी होत्या. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. माधवी नाईक यांनी प्रास्ताविक केले. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी पूजा कपिल मिश्रा, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश प्रभारी उमा खापरे, माजी अध्यक्षा निशिगंधा मोगल, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, लक्ष्मण सावजी, नीलम गोंधळे आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत महामिलावट आघाडी तयार केली होती. मात्र, देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदींवर विश्वास दाखविला आहे. मोदींचे नेतृत्व, पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे कुशल मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच लोकसभेतील हा विजय सुकर झाला. कधी काळी अवघ्या दोन खासदारांचा पक्ष म्हणून भाजपवर टीका करणाऱ्या कॉँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवारही देता आला नाही आणि आता या पक्षाचे अध्यक्षपदही सांभाळण्यास कोणी तयार नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी कॉँग्रेसला पराभूत करण्याचे आवाहन दानवे यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या नावाखाली नारायण राणे समिती स्थापून कॉँग्रेस आघाडीने केवळ देखावा केला. आम्ही मात्र कायद्याच्या कक्षेत बसवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. आम्ही करून दाखवले, असे सांगत एकीकडे कॉँग्रेसवर टीकास्त्र डागताना नारायण राणे यांनाही प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी चिमटा काढला. लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक महिला उमेदवार दिले आणि सर्वाधिक महिला निवडून लोकसभेतही पाठविल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची भाजपची भूमिका आहे. काही पक्षांचा त्याला विरोध असला तरी आता त्यांचे अस्तित्व संपत चालले आहे, असे त्यांनी नमूद केले. शहराध्यक्षा रोहिणी नायडू यांनी स्वागत केले.

महिलांनाही संधी

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान महिलांनी केले आहे. त्यामुळे महिला मोर्चाने सर्व शक्ती पणाला लावून लोकसभेच्या निवडणुकीतील घवघवीत यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत घडवावी. झाशीच्या राणीप्रमाणे रणांगणात उतरून भाजपचा झेंडा अटकेपार पोहोचवावा. चांगले काम करणाऱ्या महिलांनाही उमेवारीची संधी मिळेल. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या २८८ जागा निवडून आणा. जेथे भाजपचा उमेदवार असेल तेथे भाजप उमेदवाराच्या व जेथे मित्रपक्ष सेनेचा उमेदवार असेल तेथे सेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा. सर्व २८८ जागांच्या विजयासाठी संघर्ष करा, असे आवाहनही दानवे यांनी केला.

फडणवीसच मुख्यमंत्री होणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा हा वाद युतीत सुरू असताना, भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मात्र राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. फडणवीस यांचे काम उत्तम असल्याचे सांगत, केंद्रातील भाजप सरकार महिला उद्योजकांसाठी धोरण आखणारे देशातील पहिले सरकार असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी या वेळी केला. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मातृशक्ती पाठीशी राहिल्यास भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या विकासासाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिमंत्री डॉ. बोंडे आज नाशिकमध्ये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कृषिदिनाचे निमित्त साधून राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आज, सोमवारी (दि. १ जुलै) नाशिकमध्ये येणार आहेत. त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कृषिसंबंधी विविध प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपचे अमरावती येथील आमदार असलेल्या डॉ. बोंडे यांना कृषी विभागाचा भार देण्यात आला. त्यानंतर त्यांचा हा नाशिकमध्ये पहिलाच दौरा आहे. आतापर्यंत कृषी विभागाचा स्वतंत्र कार्यभार मंत्र्याच्या वाट्याला आला नाही. त्यामुळे डॉ. बोंडे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. डॉ. बोंडे अमरावतीहून नाशिकला सकाळी रेल्वेने येणार आहेत. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होईल व त्यानंतर दीड वाजता ते मुंबईला रवाना होतील.

खतांप्रश्नी सूचनेकडे लक्ष

संमिश्र खतांमध्ये राख मिसळली जात असल्याचा आरोप डॉ. बोंडे यांनी नुकताच केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचेही ते म्हणाले आहेत. यापुढे खतांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आता सोमवारी ते या विषयावर अधिकाऱ्यांना काय सूचना करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी कांदा व द्राक्षांचे उत्पादन घेतात. त्यांचे प्रश्न व त्यासंबंधीच्या अडचणी यावेळी मांडल्या जाव्यात व त्यावर डॉ. बोंडे यांनी सकारात्मक चर्चा करून दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलंबित कामांचे अपडेट्स व्हॉट्सअॅपवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामान्य नागरिकांना त्यांच्या व्यक्तिगत सरकारी कामकाजाचा पाठपुरावा करता यावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात व्हॉट्सअॅप ग्रीवन्स रिड्रेसल योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्याकरिता स्वतंत्र मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात येणार आहे. ९४२१९५४४०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधून नागरिक त्यांच्या कामाचे पुढे नेमके काय झाले याची माहिती घेऊ शकणार आहेत. सामान्य नागरिकांना त्यांच्या व्यक्तिगत सरकारी कामकाजासाठी सरकारी कार्यालयांत चकरा मारून पाठपुरावा करावा लागतो. मात्र, तरीही वस्तुस्थितीदर्शक माहिती मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे नागरिकांना मन:स्तापाला सामोरे जावे लागते. अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही नागरिकांशी संवाद साधताना वेळ खर्ची पडतो. नागरिकांची काम कोणत्या टप्प्यावर आहेत, त्यांची सद्य:स्थिती काय याची माहिती संबंधित नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर दिली जाणार आहे. तीन दिवसांत कार्यवाही होऊन संबंधित अर्जदाराला माहिती न मिळाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शास्तीची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी या योजनेची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे आदेश मांढरे यांनी दिले आहेत.

---

अशी असेल कार्यप्रणाली

सामान्य शाखेचे तहसीलदार या कक्षाचे समन्वय अधिकारी असतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सर्व शाखा व तालुका स्तरावरील कार्यालयप्रमुख हे प्रभारी अधिकारी असतील. ते मध्यवर्ती कक्षातील प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करून पूर्तता अहवाल सादर करण्यास जबाबदार राहतील. ज्या नागरिकांनी महसूल कार्यालयांत पूर्वीच अर्ज केले, परंतु माहिती मिळालेली नाही, असे नागरिकही व्हॉट्सअॅप ग्रीवन्स रिड्रेसल सेवा वापरू शकतात. अशा नागरिकांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक द्यावा. ज्या कर्मचाऱ्याकडे मूळ अर्ज केला त्या कार्यालयाचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक द्यावा, तसेच मूळ अर्जाचा स्वच्छ व वाचण्यायोग्य फोटो या व्हॉट्सअॅप क्रमाकांवर पाठवावा. समन्वय अधिकारी अशा अर्जाचे पुढे काय झाले याची माहिती संबंधित कक्षातील नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मागवतील. तीन दिवसांत त्यावर कार्यवाही करून प्राप्त माहिती तयार करून विहित नमुन्यात समन्वय अधिकाऱ्यांमार्फत मध्यवर्ती कक्षात सादर करतील. त्याची प्रत व्हॉट्सअॅपद्वारे संबंधित अर्जदाराला दिली जाईल. संबंधित शाखाप्रमुखांनी तीन दिवसांत माहिती सादर न केल्यास त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्यात येईल. ही शास्ती पाच हजार रुपयांपर्यंत असू शकते. व्हॉट्सअॅपवर प्राप्त अर्ज व त्यावरील कार्यवाहीचा अहवाल दर सोमवारी समन्वय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. या योजनेसाठीचा व मध्यवर्ती कक्षाचा खर्च सेतू समितीच्या निधीतून भागविण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक खर्चाचा ताळेबंद सुरूच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा ताळेबंद मांडून विविध यंत्रणांची देयके अदा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. निवडणूक शाखेने आतापर्यंत सुमारे दहा कोटी रुपयांची देयके अदा केली आहेत. यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसभाड्यासह कर्मचाऱ्यांच्या मानधनाचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली, तर २३ मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ३० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. मतदान प्रक्रियेच्या वेळी कर्मचारी, तसेच वोटिंग मशिन्स घेऊन जाण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ४८६ बसेसची मदत घेण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी याकरिता हजारो कर्मचारी रात्रंदिवस राबले. अंबड वेअर हाउसची डागडुजी, मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा पुरविणे, वोटिंग मशिन्सच्या सुरक्षेसाठी दक्ष केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान, वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर घेतलेली वाहने यांसह विविध प्रकारच्या कामांवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. निवडणुकीवर नेमका किती खर्च झाला याचा ताळेबंद मांडत देयके अदा करण्याचे काम सध्या निवडणूक शाखेकडून सुरू सुरू आहे.

खर्चाची कोटी, लाखांत उड्डाणे...

राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ४८६ बसेच्या भाड्यापोटी एक कोटी २९ लाख रुपये मोबदला अदा करण्यात आला आहे. निवडणूक कर्मचारी वाहतुकीसाठी छोटी-मोठी ५०० वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. या वाहनांच्या भाड्यापोटी एक कोटी रुपये अदा केले गेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधन खर्चावर ९० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या वेब कास्टिंग सेवेसाठी 'बीएसएनएल'ला ६३ लाखांचे देयक अदा करण्यात आले आहे. अंबड वेअर हाउसची डागडुजी, रंगरंगोटी, विद्युत, तसेच मंडप व्यवस्था, निवडणूक कर्मचाऱ्यांचे जेवण यावर सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. अन्य खर्चाची आकडेवारी संकलित करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनस्थळांवर प्रतिबंधक उपाय योजा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यटन अथवा धार्मिक स्थळ ज्या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात आहे त्यांनी तातडीने तेथे प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

या कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ५६ अन्वये संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मांढरे यांनी दिला आहे. पावसाळा सुरू झाला, की पर्यटकांच्या उत्साहाला भरते येते. शहरासह जिल्हाभरातील पर्यटनस्थळांकडे पर्यटनप्रेमींची पावले वळू लागतात. परंतु, पुरेशी खबरदारी न घेतल्यास अशा ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होते. गेल्याच आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर प्रमाणापेक्षा अधिक पर्यटकांची गर्दी झाली. त्यामुळे येथे अत्यंत जोखमीची परिस्थिती निर्माण झाली होती. गतवर्षीदेखील असाच प्रकार घडला होता. हे प्रकार दर वर्षीच घडू लागल्याने 'महाराष्ट्र टाइम्स'ने या विषयावर राउंड टेबल कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. यामध्ये महसूल, वने, पर्यटन, ग्रामीण पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांसह ट्रेकिंग प्रशिक्षक, दुर्गप्रेमीदेखील सहभागी झाले होते. गड-किल्ल्यांवरील धुडगूस थांबायला हवा, असा सूर या राउंड टेबल कॉन्फरन्समधून उमटला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी शनिवारी हे आदेश काढले.

जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. तेथे देशभरातून पर्यटक येत असतात. या पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन तेथे गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करा, असे आदेश संबंधित स्थानिक प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहेत. यामध्ये संरक्षक कथडे बसविणे, प्रवेशावर नियंत्रण ठेवणे, भेटीचे वेळापत्रक निश्चित करणे यांसारख्या बाबींचा समावेश करा, असे निर्देश दिले आहेत. याकामी स्थानिक पोलिसांनी मदत करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.

गर्दीवर नियंत्रण राहावे, वाहतूक यंत्रणा सुरळीत राहावी, नो सेल्फी झोन जाहीर केला जावा, येथे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घेतली जावी, तसेच कोणतीही आपत्तीजन्य घटना घडू नये यासाठी पूर्वतयारी केली जावी, अशा सूचना मांढरे यांनी स्थानिक प्राधिकरणाला केल्या आहेत.

--

ग्रामपंचायतींवरही जबाबदारी

ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे पर्यटनस्थळ आहे त्या ग्रामपंचायतीने येणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची नोंद ठेवावी. त्यांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे, कुठल्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये यासाठी प्रयत्न करावेत, भाविक, पर्यटक, गिर्यारोहकांमध्ये जनजागृती करावी, तसेच पर्यावरण व वन्यजीवांचे नुकसान होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा मांढरे यांनी व्यक्त केली आहे.

--

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचना

हरिहर किल्ला येथे वीकेंड व सुटीच्या दिवशी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस आणि वन विभागाने त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी राहुल पाटील यांनी दिले आहेत. हरिहर किल्ला पाहण्यासाठी एकावेळी किती पर्यटक जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन नियोजन करावे. अगोदर गेलेले पर्यटक परतल्यानंतरच अन्य पर्यटकांना किल्ल्यावर सोडण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना सहायक वनसंरक्षकांना देण्यात आल्या आहेत. या पत्राची प्रत तहसीलदार, त्र्यंबकेश्वरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर, तसेच त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सपने उसके सच होते है, जिसके हौसले बुलंद होते है

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'सपने उसके सच होते है, जिसके हौसले बुलंद होते है' असे सांगत भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी पूजा मिश्रा यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी महिलांमध्ये जोश भरत त्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी त्यांनी नारीशक्ती व पुरुषशक्ती आता बरोबर काम करीत आहे. त्यामुळे लोकसभेत घवघवीत यश मिळाले. पण, आता आपली परीक्षा विधानसभेतसुद्धा असल्याची जाणीव करून देत त्यासाठी जोमाने कामाला लागा, असा संदेशही महिलांना दिला. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले. पंतप्रधानांचा डंका देशाबरोबरच आता विदेशांतही वाजत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून देशात ४० कोटी लाभार्थींनी आतापर्यंत लाभ घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारसुद्धा चांगले काम करीत असून, त्यांनीही विविध योजना राबवून जनतेचे प्रश्न सोडविल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. या बैठकीच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय सोशल मीडिया संयोजिका प्रीती गांधी यांचे सत्र झाले. त्यानंतर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी विधानसभा निवडणूकपूर्व तयारीबाबत गटचर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण झाले व बैठकीचा समारोप झाला. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, महापौर रंजना भानसी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्षा रोहिणी नायडू यांच्यासह महिला मोर्चाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सपकाळ हब’प्रश्नी आज बैठक

$
0
0

'सपकाळ हब'प्रश्नी आज बैठक

पालकमंत्री मंत्रालयात घेणार आढावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जातीने लक्ष घाला अशी साकडे आमदार देवयानी फरांदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना घातल्यानंतर याबाबत लवकरच संयुक्त बैठक बोलावून या प्रश्नी मार्ग काढू आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन महाजन यांनी दिले. याप्रश्नी मुंबईत पालकमंत्र्यांच्या दालनात शिक्षणमंत्री, समाजकल्याणमंत्री, वित्तमंत्री यांच्यासमवेत आज (१ जुलै) बैठक होणार आहे.

सपकाळ नॉलेज हब ही संस्था गेल्या वर्षभरापासून विविध समस्यांचा सामना करत आहेत. या शैक्षणिक वर्षात विध्यार्थ्यांचे वर्ग अजून सुरू झाले नसून अशीच परिस्थिती राहिली तर हबमधील सुमारे ४५०० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पूर्णत: काम बंद सुरु केले आहे. संस्थेला मिळणारी शिष्यववृत्ती ही संस्थेच्या खात्यात जमा होत नाही. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत पालकमंत्री महाजन यांना याबाबत माहिती दिली. यावेळी नामदार महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सदर प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी निर्णय घेतो असे सांगितले. सोमवारी पालक आणि विद्यार्थींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मेळाव्यात महाजन ‘पॉप्युलर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन महिलांमध्येसुद्धा रविवारी 'पॉप्युलर' ठरले. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत त्याची झलक सर्वांनी बघितली.

राज्यभरातून आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चक्क रांग लावली होती, तर स्टेजवर त्यांच्याभोवती सर्वांनी गराडाही घातला. काही वेळा महाजनांनीसुद्धा सेल्फी काढत सर्वांचा उत्साह वाढवला. राज्यातील नाशिक, जळगाव, धुळे, नगर येथील महापालिका निवडणुकींत पक्षाला विजयी बनविण्यात यशस्वी ठरल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. उत्तर महाराष्ट्रातही लोकसभेतही सर्व जागा जिंकण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्याचबरोबरच अनेक मोर्चांमध्ये यशस्वी मध्यस्थी त्यांनी करून ते थोपविण्याचे कामही केले. अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांना त्यांनी पक्षात आणण्यासाठीही महत्त्वाची भूमिका वठवली. त्यामुळे ते भाजपमध्ये लोकप्रिय झालेले असतानाच महिला पदाधिकाऱ्यांतही रविवारी त्यांची 'क्रेझ' दिसून आली. या महिला मेळाव्यात प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक हेसुद्धा येणार होते. पण, ते न आल्यामुळे महिलांमध्ये महाजन एकटेच व्यासपीठावर होते. त्यांनी २५ वर्षांत मला पहिल्यांदा महिलांच्या मेळाव्यात येण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे मला येथे येता आले, असेही त्यांनी नमूद केले.

हसत हसत टाळले उत्तर

अर्ध्या तासाहून अधिक काळ महिलांच्या गराड्यात सापडल्यानंतर पत्रकारांनी त्यांना, तुम्ही महिलांमध्ये 'पॉप्युलर' झाले असल्याचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नाला हसत हसतच बगल दिली. आता तुमचे प्रश्न सर्व संपले असल्याचे सांगून त्यांनी त्यावर बोलणे टाळले. कार्यक्रम संपल्यानंतर महिलांनी फोटासाठी व्यासपीठाकडे धाव घेतली. यावेळी महाजन महिलांच्या गराड्यात सापडले. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करताना एकच पुष्पगुच्छ त्यांनी शेवटपर्यंत फोटोसाठी वापरला. कार्यक्रमातही महिलांचा सत्कार करताना हीच 'ट्रिक' वापरली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या श्वानांची धास्ती, नागरिकांना मिळेना मुक्ती!

$
0
0

अवघ्या पाच महिन्यांत ३,२०१ नागरिकांना चावा

....

म. टा. खास प्रतिनधी, नाशिक

शहरासह ग्रामीण भागात मागील पाच महिन्यांत दिवसाला सरासरी २१ जणांना श्वान दंश झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यात ६० टक्के वाढ झाली असून, पावसाळ्यात हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिन्याकाठी साडेतीनशे ते चारशे व्यक्ती श्वान दंश झाल्यामुळे येतात. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण पाचशेच्या पुढे पोहचते. सन २०१७ या पूर्ण वर्षभरात पाच हजार ३०६ नागरिकांना श्वान दंश झाला होता. या नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले. यंदा पहिल्या पाच महिन्यांतच श्वान दंशामुळे तब्बल तीन हजार २०१ नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटल गाठावे लागले. गतवर्षाच्या तुलनेत निम्म्याहून अधिक पेशंट पहिल्या पाच महिन्यांतच समोर आले आहेत. याबाबत अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. निखील सैंदाणे यांनी सांगितले, की श्वान या दिवसांमध्ये आक्रमक असतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या एकूण केसेसपैकी ५० टक्के केसेस शहरी भागातील असतात. श्वानांची संख्या वाढण्यासाठी आवश्यक ते वातावरण शहरी भागात निर्माण होते. भटक्या श्वानांची संख्या यामुळे झपाट्याने वाढते आहे. भटक्या श्वानांची आक्रमकता त्यांच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असते. त्यामुळे सर्वसामान्यांनीसुध्दा याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. --

'रेबीज'च्या ७ पेशंटचा मृत्यू, तर १८ वाचले

रेबीजची लागण झालेल्या श्वानाने चावा घेतल्यास त्या व्यक्तीलाही रेबीजची लागण होते. अशा पेशंटला उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्ड आहे. गतवर्षी रेबीजची लागण झालेल्या २५ पेशंटवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला, तर १८ पेशंट पूर्णत: बरे झाले. या आजाराची लागण झालेल्या पेशंटवर उपचार करणे हे मोठे आवाहन असते. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल वगळता या पेशंटवर क्वचितच उपचार होतात.

...

श्वान पिसाळलेले असो की नसो, चावा घेतल्यानंतर नागरिकांनी उपचार घेणे आवश्यकच असते. अनेकदा उपचाराकडे दुर्लक्ष होते. रेबीजची लागण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात काही लक्षणे दिसून येतात. ती ओळखून वैद्यकीय उपचार सुरू करणे आवश्यक असते. तसे न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते.

- निखील सैंदाणे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपशिवाय पर्याय नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत राज्यात चंद्रपूरमध्ये काँग्रेसची एक जागा आली नसती, तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला असता, काँग्रेस राज्यातून नेस्तनाबूत झाली असती, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी केले.

आज काँग्रेस व राष्ट्रवादीत कोणी राहण्यास तयार नाही. या पक्षांतील पहिल्या फळीतील नेते काहीतरी करा, असे आम्हाला सांगायला लागले आहेत. राष्ट्रवादीसुद्धा पवार कुटुंबीयांपुरती बनली आहे. भाजपशिवाय आता पर्याय नाही, असे सांगत महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चिमटा काढला. हॉटेल रॉयल हेरिटेजच्या हॉलमध्ये आयोजित भाजप महिला मोर्चाच्या दोनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ते बोलते होते. लोकसभेत अनेकांचे वेगवेगळे अंदाज होते, तरी भाजपने यश मिळविले. आता अशीच लाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. पन्नास-पन्नास वर्षे जे प्रश्न विरोधकांना सोडवता आले नाहीत, ते प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवले. मराठा आरक्षणाचा प्रश्नही त्यांनी असाच सोडवला, जो आजपर्यंत कोणालाही सोडवता आला नाही, असेही त्यांनी नमूद केले. या आघाडीच्या विधानसभा निवडणुकीत ५० जागासुद्धा निवडून येणार नसल्याच्या भाकिताचा त्यांनी पुनरुच्चार केला.

महिलांच्या प्रश्नांबाबत बोलताना महाजन म्हणाले, की सरकार महिलांच्या आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. ३३ टक्के महिलांना आरक्षणासाठी आता अडचण नाही. चूल व मूल या चौकटीतून महिला बाहेर आल्या आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांत यश मिळविले आहे. आता त्या राजकारणातही बरोबरीने काम करीत आहेत. महिलांना मोठी संधी आहे. पण, परिश्रमांशिवाय हाती काही पडणार नाही. तुम्ही जोपर्यंत तळागाळात काम करीत नाहीत, तोपर्यंत यश मिळणार नाही. राज्यात राणे, पवार, शिंदे, चव्हाण यांचा पराभव झाला. मोदी लाट असली, तरी स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रमसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. कठोर परिश्रम करणाऱ्यांना कोणीही हरवू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

दुधाची बाटली व मुलगी मांडीवर

महिला आरक्षणाबाबत बोलताना महाजन म्हणाले, की माझे लग्न झाल्यानंतर माझा जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाला. पत्नी तेथून निवडून आली. पण, त्यानंतर आम्हाला मुलगी झाली. ती छोटी असताना तिला घेऊन मी पत्नीबरोबर जिल्हा परिषदेत जात होतो. त्यावेळी हातात दुधाची बाटली व मांडीवर मुलगी असायची. तेथील शिपाईसुद्धा मला बैठक हॉलपासून दूर बसायला सांगायचा, असा किस्साही सांगितला. आपण महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

२५ महिलांना तिकीट द्या!

महिला मोर्चाने राखी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांना दहा लाख राख्या पाठवायचा निर्णय घेतला आहे. त्याचे कौतुक करताना महाजन म्हणाले, की सर्वांना ओवाळणी देणे मुख्यमंत्र्यांना शक्य नाही. पण, त्यासाठी लकी ड्रॉ काढा, अशी सुचना करणार आहे. पण, यावेळी महिलांनी त्यापेक्षा २५ नावे काढा व त्यांना विधानसभेचे तिकीट द्या, अशी मागणी करताच महाजन यांनी मी फसलो, असे सांगितले अन् सर्वत्र हशा पिकला.

महिलांनी केली दुरुस्ती

लोकसभेत महिलांचा टक्का वाढला आहे. राज्यातही ज्या महिलांना तिकीट दिले तेथे सर्वच विजयी झाल्या असे सांगताच महिलांनी बारामतीची जागा हरल्याचे सांगितल्यानंतर महाजनांनी चुकीची दुरुस्ती केली.

अंदाज चुकणार नाहीच

माझे नाशिक, धुळे, जळगाव, नगर येथील महापालिका व इतर निवडणुकींविषयी व्यक्त केलेले अंदाज चुकले नाहीत. त्यामुळे विधानसभेतही तो चुकणार नाही. आघाडीच्या फक्त ५० जागा येतील, असा माझा अंदाज आहे. पण, हा आकडा अजून कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले. आपण आतापर्यंत पाच लाख शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मदत केली आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघात शस्त्रक्रिया झालेल्यांची संख्या इतकी आहे, की त्यांनी मला मतदान केले तरी मी विजयी होईल, असे सांगत महाजन यांनी शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचणे कसे महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमध्ये येण्यास दिग्गज इच्छुक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी काँग्रेस पक्ष तयारीला लागला असून, राज्यातील इच्छुक उमेदवारांचे प्रस्ताव ६ जुलैपर्यंत मागविले आहेत. निवडून येण्याची क्षमता या निकषावरच उमेदवारी दिली जाणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील अनेक दिग्गज काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असून, काही दिवसांत याची प्रचीती येईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी रविवारी नाशिकमध्ये केला.

सरकारी विश्रामगृहावर रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्याबाबतची माहिती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, की या निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत जिल्हा स्तरावर जाऊन आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत आहोत. यंदा तरुण चेहऱ्यांना, तसेच महिला पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षही अनुकूल आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीवर तत्त्वत: शिक्कामोर्तब झाले आहे. रिपब्लिकन पक्षासह अन्य समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असून, जुलैअखेरपर्यंत ही चर्चा पूर्ण होईल.

मनसेबाबत चर्चा नाही

वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांमुळे काँग्रेसला ११ जागांवर फटका बसला. या मतांचा फायदा वंचित आघाडीला न होता शिवसेना- भाजपच्या उमेदवारांना झाला. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. वंचितच्या नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत मात्र अद्याप चर्चा झाली नसल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या रांगेतील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत, या महाजन यांच्या वक्तव्याकडे चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. शिवसेना भाजपचेही अनेक नेते काँग्रेस आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

'ईव्हीएमचे काम झाले वाटते!'

राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला फार तर ५० जागा मिळू शकतात, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याबाबत चव्हाण म्हणाले, की काँग्रेसला ५० जागा मिळतील असे महाजन म्हणत असतील तर याचा अर्थ निवडणुकांसाठीच्या ईव्हीएमचे काम झालेले दिसते. म्हणूनच महाजन यांना असे बोलणे सुचत आहे. त्यामुळेच राज्यात शिवसेना- भाजपला २२० जागा मिळतील, असा दावा ते करीत आहेत. अमित शहा यांनी असाच लोकसभा निवडणुकीपूर्वी ३०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. सरकार बॅलेटवर निवडणुका घेण्यास का तयार होत नाही, याचा खुलासा महाजन यांनी करावा. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हवा असल्याचे बोलले जात असले तरी हवा येते तशी जाण्यासही वेळ लागत नाही, असे चव्हाण म्हणाले.

'दानवेंनी त्यांचा उत्तराधिकारी शोधावा'

काँग्रेसमध्ये कोणी अध्यक्ष होण्यास तयार नसल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. आमच्या पक्षात किती लोक अध्यक्ष होण्यास इच्छुक आहेत हे दानवेंना काय माहीत. त्यापेक्षा त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी शोधावा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. राजवट लागू करूनही बरेच दिवस लोटले आहेत. मात्र, अजूनही तेथील परिस्थितीमध्ये बदल झाला असे चित्र पाहायला मिळत नाही. जम्मू- काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार यायला हवे. मात्र, भारतीय जनता पक्ष त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची वाट पाहत आहे, अशी टीका चव्हाण यांनी या वेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images