Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रशासनाचा मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणावर भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूकप्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने आता आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीच्या तयारीकडे वळविला आहे. मतदारयादीच्या शुद्धीकरणाला प्राधान्य देत गेल्या महिनाभरात तब्बल २६ हजार दुबार व मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आणखी किमान २५ हजार नावे वगळली जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील, असे अलीकडेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. २७ ऑक्टोबरला दिवाळी असून, तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, असा अंदाज उप जिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मतदारयाद्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यापासून आजतागायत १५ विधानसभा मतदारसंघांमधील मतदारयादीतील २६ हजार दुबार, तसेच मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये सिन्नर मतदारसंघात सर्वाधिक ५,७३० दुबार, तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत. त्या खालोखाल चांदवडमध्ये ३९४२, दिंडोरीत ३८०७, मालेगाव मध्यमध्ये २९५८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. काही मतदारसंघांमध्ये हे काम धीम्या गतीने सुरू असून, आणखी २५ हजार नावे वगळली जाऊ शकतात, असा अंदाज आनंदकर यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा मतदारसंघ वगळलेल्या नावांची संख्या

नांदगाव १९२७

मालेगाव मध्य २९५८

मालेगाव बाह्य २०८१

बागलाण ४३४

कळवण ११२१

चांदवड ३९४२

येवला २०५२

सिन्नर ५७३०

निफाड १००

दिंडोरी ३८०७

नाशिक पूर्व ३३७

नाशिक मध्य ४६३

नाशिक पश्चिम ४१४

देवळाली ११७

इगतपुरी ८१८

एकूण २६३०१

१ जुलैपासून मतदार जनजागृती मोहीम

एकीकडे १ जुलैपासून वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ होणार आहे, तर हेच औचित्य साधून मतदार जनजागृती मोहीमदेखील हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा तयारीला लागली असून, मतदार जनजागृतीवर अधिक भर देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी नायब तहसीलदारांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या वेळी त्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांकडून बेकायदेशीर कामकाज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसने महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करूनही त्याची अधिकृत घोषणा टाळणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी शुक्रवारी पक्षाचा आदेश येताच, नवीन सभागृहनेते आणि गटनेत्यांना महासभेतील घोषणेपूर्वीच पदांचा दर्जा बहाल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महासभेतील अधिकृत घोषणेशिवाय कोणाचीच पदावर नियुक्ती होत नाही. त्यामुळे नूतन गटनेता, सभागृह नेत्यांची महापौरांसह भाजपने केलेली नियुक्तीही तांत्रिक पेचात अडकली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या डॉ. पाटील यांना वेगळा न्याय आणि सोनवणे, पाटील यांना वेगळा न्याय लावल्याने महापौरांनी राजधर्म पाळला नसल्याची टीका होत आहे.

भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी विविध मुद्द्यांवर महासभेत ठिय्या आंदोलन करीत पक्षालाच अडचणीत आणले. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांचा काटा काढण्याची आयती संधी साधत, त्यांच्या तक्रारी केल्यानंतर पक्षाने तडकाफडकी त्यांची सभागृह नेतेपदावरून उचलबांगडी केली. केवळ पाटील यांचेच पद नव्हे, तर गटनेता संभाजी मोरुस्कर यांनाही पदावरून काढले. सभागृह नेतेपदी सतीश सोनवणे, तर गटनेतेपदी जगदीश पाटील यांची शुक्रवारी मध्यरात्री नियुक्ती करण्यात आली. त्या संदर्भातील अधिकृत पत्र येण्यापूर्वीच सोनवणे आणि पाटील यांनी नूतन पदांच्या नियुक्तीचे सत्कार स्वीकारले. एवढेच नव्हे, तर महापौर भानसी यांनी त्यांचा सत्कार करीत, त्यांना पाणीकपातीच्या बैठकीत गटनेता, सभागृह नेतेपदाचा मान दिला. विशेष म्हणजे सोनवणे यांनी सभागृह नेतेपदाचा कार्यभारही स्वीकारला. मात्र, या पदभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. महापालिकेत कोणत्याही पदावरील नियुक्तीचे अधिकार महापौरांना आहेत. महापौरांकडून या पदांची घोषणा नियमानुसार सभागृहातून केली जाते. त्यासाठी पक्षांकडून पत्र देण्यात येते. या पत्राचे महासभेत वाचन झाल्यानंतरच त्यांची अधिकृत नियुक्ती होते. महापौरांनी शुक्रवारी अशी प्रक्रिया टाळत, आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करीत, त्यांना दालने उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाटील यांनी आपल्याला पदमुक्त केल्याचे पत्र आले नसल्याचा दावा केला, तर दुसरीकडे सोनवणे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे एकाच वेळी तांत्रिकदृष्ट्या दोन सभागृह नेते कार्यरत असल्याचे चित्र आहे.

डॉ. पाटलांवर अन्याय

महापलिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्याचे पत्र खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच दिले आहे. मात्र, या आदेशानंतरही महापौर भानसी यांनी सभागृहात त्यांच्या पत्राचे वाचन केलेले नाही. गटनेत्याकडून पत्र आले नसल्याचे सांगत त्यांची नियुक्ती टाळली आहे, तर मनसेचे गटनेते सलीम शेख यांच्याऐवजी नंदिनी बोडकेंच्या नियुक्तीचे पत्र मात्र भानसी यांनी गेल्या महासभेत वाचवून दाखवले आहे. महासभेतील घोषणेनंतरच बोडकेंनी कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे पाटील यांना वेगळा न्याय, तर आपल्या पक्षातील नूतन पदाधिकाऱ्यांना कायद्याचे उल्लंघन करून वेगळा न्याय लावल्याने त्यांच्याकडून राजधर्माचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांच्या या बेकायदेशीर कामकाजाविरोधात विरोधकांनी आता कायदेशीर तक्रार करण्याची तयारी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलवारीतील बालकाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सायकलवरून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या बाल सायकलस्वाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. प्रेम सचिन निफाडे (९, रा. आशियाना अपार्टमेंट, नारायणबापूनगर, जेलरोड) असे या बालकाचे नाव आहे. अपघाताची घटना शुक्रवारी (दि.२८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास सिन्नर बायपासवरील हॉटेल सर्वज्ञसमोर घडली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सदर ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिक सायकलिस्टतर्फे दरवर्षी नाशिक-पंढरपूर सायकलवारी आयोजित करण्यात येते. या सायकलवारीत प्रेमचे वडील सचिन आणि आई रत्ना निफाडे हे सहभागी होत असतात. प्रेम यालाही सायकलिंगची आवड असल्याने यंदा तो या वारीत सहभागी झाला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास हे कुटुंब सायकलवर पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. नाशिक-पुणे हायवेवरील सिन्नर बायपासरोडवर चहा-नाश्ता करून प्रेम एका ग्रुपसमवेत पुढे निघाला. हॉटेल सर्वज्ञसमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एमएच १४, एफटी ९७८१) प्रेमच्या सायकलला धडक दिली. यामुळे सायकलवरून खाली पडलेला प्रेम थेट ट्रकच्या चाकाखाली सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. नागरिकांनी ट्रकचालक बबन कृष्णा राऊत (रा. पुणे) यास बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ट्रकचालकाविरूद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. उपस्थित नागरिकांनी केलेल्या दाव्यानुसार ट्रकचालकाने मद्यपान केलेले होते. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

(सविस्तर वृत्त...२)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये उद्यापासून एकवेळ पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असली, तरी धरणात मात्र पुरेसा साठा नसल्याने संभाव्य टंचाईस्थिती टाळण्यासाठी अखेरीस शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पाणीकपातीच्या मात्रेमुळे दररोज ५० ते ६० दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत होणार आहे.

महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर शहरात जेथे दोन वेळा पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रविवार (दि. ३०)पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील चार दिवस समाधानकारक पाऊस झाला नाही, तर आठवड्यातून गुरुवारी पूर्ण एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान, वॉटर पार्क आणि जलतरण तलावांचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे.

जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने प्रामुख्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा तळाला गेला आहे. दारणा धरणात पाणी आरक्षित असले, तरी अळ्यायुक्त पाण्यामुळे चेहेडी पंपिंग स्टेशन येथून पाणीउपसा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीउपसा वाढल्याने इंटेकवेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणीसाठा पोहोचला आहे. शहरासाठी गंगापूर धरणातून ४२००, दारणातून ४००, तर मुकणेतून ३०० असे एकूण ४९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत गंगापूरमधून ३७१४, दारणातून २५२ आणि मुकणेतून १०३ दशलक्ष लिटर्स असे एकूण ४०६९ दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले आहे. धरण क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस होत नसल्याने सध्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करायचा असेल, तर कपात करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. महापौर रंजना भानसी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रशासनाने अहवाल तयार करावा, असे निर्देश महापौरांनी दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचे नियोजन करीत आयुक्त व महापौरांसमोर ठेवले होते.

जुलैपर्यंत पुरवठ्याचे नियोजन

सध्या पावसाला सुरुवात झाली असली, तरी पावसाने पुन्हा ओढ दिल्यास टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत धरणात समाधानकारक पाणीसाठा होत नाही तोपर्यंत कपात करणे आवश्यक असल्याने शुक्रवारी महापौर भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपचे नवनियुक्त सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते सतीश पाटील, शिवसेनेचे गटनेते शाहू खैरे, 'मनसे'च्या गटनेत्या नंदिनी बोडके, 'रिपाइं'च्या दीक्षा लोंढे, नगरसेवक गुरुमित बग्गा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात रविवारपासून संपूर्ण शहरात एकाच वेळेस पाणीपुरवठा करण्यासह पाऊस लांबल्यास पुढील आठवड्यापासून प्रत्येक गुरुवारी 'ड्राय डे 'पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आल्याने रविवारपासूनच शहरात पाणीकपात लागू होणार आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करणे सुकर होणार आहे.

जलतरण तलाव बंद

महापालिकेने शहरात पाणीकपात लागू करताना शहरातील वॉटर पार्क आणि जलतरण तलावांना होणारा पाणीपुरवठाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जलतरण तलाव आणि हॉटेल्समध्ये असलेल्या वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे या पाण्याच्या वापरालाही प्रतिबंध घालण्यात आला आहे. शहरातील उद्यानांना आता धरणातील पाणी बंद करण्यात येऊन या ठिकाणी असलेल्या बोअरवेल्समधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम साइटवरील नळ कनेक्शनही बंद करण्यात येणार असून, पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे नियोजनदेखील करण्यात आले आहे.

-पाणीकपातीतून ६० दशलक्ष लिटर्स पाणी वाचणार

-पाऊस लांबल्यास दर गुरुवारी शहरात 'ड्राय डे'

-जलतरण तलाव, उद्यानांचा पाणीपुरवठा बंद

-बांधकाम साइटवरील नळ कनेक्शन बंद करणार

-पाणी नासाडी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

-पाऊस लांबल्यास दोन डिवस 'ड्राय डे'चे नियोजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्री मुसळधार, दिवसा संततधार

$
0
0

इगतपुरीत २४ तासांत ११८ मिमी पाऊस; त्र्यंबकला जोरदार हजेरी

टीम मटा

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुरुवारी सायंकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे आगमन झाल्यामुळे ग्रामीण भागात आनंद पसरला आहे.

इगतपुरी : कधी मुसळधार तर कधी संततधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात ११८ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

इगतपुरी तालुक्यात जूनअखेर पाऊस सुरू झाला असला तरी एका रात्रीत पावसाने चांगलीच मुसंडी मारली. गेल्या चोवीस तासांत घाटमाथ्यावरील इगतपुरी, घोटी, भावली, मानवेढे, काळूस्ते, वैतरणा पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेतात पाणी साचले आहे. इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत २७६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तब्बल दहा ते बारा तासांपासून सुरू असलेल्या या पावसाने सर्वच घटकांना दिलासा मिळाला. शेतकरी, सामान्य नागरिक तसेच टंचाईग्रस्त गावांना हा पाऊस दिलासादायक आहे. पहिल्या पावसात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. मात्र गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले.

टँकरपासून होणार सुटका

तालुक्यात जवळपास वीस गावे, वाड्या-पाड्याना टँकरने पाणिपुरवठा सुरू आहे. या दमदार पावसाने या टँकरग्रस्त गावांची पाणीटंचाई दूर होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

पाऊस आला, वीज गेली

एका बाजूला दहा ते बारा तास झालेल्या दमदार पावसाने घोटीकर सुखावले असले तरी दुसऱ्या बाजूला पाऊस सुरू होतास तब्बल बारा ते पंधरा तास अर्धे घोटी शहर अंधारात होते. घोटी-अंबुजी वाडी परिसरात ११ के.व्ही.ची केबल जळून गेल्याने अर्ध्या शहराचा वीजपुरवठा तब्बल १५ तास खंडित होता. त्यामुळे सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. अंबुजी वाडी, संताजी नगर रामरावनगर परिसरातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. घोटीतही वीजपुरवठा खंडित असल्याने जनजीवनच ठप्प झाले. इगतपुरी तालुक्यात संततधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले आहेत.

धरणक्षेत्रात पाऊस

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात गुरुवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसाने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. जून महिना संपण्यास अवघे दोन दिवस राहिले असतांना त्र्यंबकेश्वर परिसरत गोदावरी उगम क्षेत्रात पाऊस होत नसल्याने भविष्यातील पाणी संकटाच्या भीतीने अक्षरश: तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली होती. मात्र गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशरापर्यंत सरीवर सरी कोसळत राहिल्या. शुक्रवार सकाळपासून भीजपाऊस सुरू होता. या पावसाने जमिनीचा शोष कमी झाला आहे. ओहळ नाले प्रवाहीत होत असल्याने जलाशयांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी वर्गास देखील दिलासा मिळाला आहे. पेरण्यांना वेग आला आहे. तसेच याआधी झालेल्या पेरण्यांच्या रोपवाटीकांना संजीवनी मिळाली आहे. ब्रह्मगिरी पवर्तावरील धबधबे प्रवाहीत झाले आहेत. पायथ्याला असलेल्या अहिल्या धरणात पाणी साठले आहे. येथील ब्राह्मगिरीवर ढगांनी मांडव धरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा भाडे देऊनही सुरक्षेशी खेळ

$
0
0

रिक्षांचे गणितच डोकेदुखी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिक्षाचालकांनी कॉलेजरोड ते सीबीएस आणि शालिमार या पट्ट्यासाठी अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची वाढ केली आहे. इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी, सातपूर अशा सर्वच पट्ट्यांवर भाडे दुप्पट करण्यात आले आहे. तीन प्रवाशांच्या नावाखाली झालेली ही दरवाढ वसूल करणारे रिक्षाचालक बिनधास्तपणे फ्रंटशीट प्रवाशांची वाहतूक करण्यात गर्क आहेत. सुरक्षेच्या मुद्यावरून सुरू करण्यात आलेली ही मोहीम फ्रंट शीट वाहतुकीमुळे पुन्हा असुरक्षित ठरू लागली असून, वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मीटरप्रमाणे भाडे देण्यास परवडत नसल्याने शहरात शेअर रिक्षांचे प्रमाण वाढले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रवाशी शेअर रिक्षांना प्राधान्य देतात. प्रवाशांची ही गरज ओळखून रिक्षा व्यावसायिकांनी चार आणि नंतर सहा असे प्रवाशी वाहण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिसांकडून फ्रंटशीट कारवाई अधुनमधून होत असल्याने या गैरप्रकाराला खतपाणी मिळाले. विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मीटरप्रमाणे रिक्षा सुरू करण्यास प्राधान्य दिले. दुसरीकडे चार प्रवाशी वाहतूक करताना महिला व वृद्धांची गैरसोय होत असल्याने परमीटप्रमाणे तीन प्रवाशांची वाहतूक होईल, याकडे लक्ष दिले. मात्र, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू होताच तीन प्रवाशी घेणाऱ्या रिक्षाचालकांनी भाडेवाढ केली. या भाडेवाढीविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागासह शहर पोलिसांनी चुप्पी साधली आहे. नागरिक ओरड करतात. मात्र पुढे जाण्याची निकड लक्षात घेता, दुर्लक्ष करण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय नसतो. दरम्यान, मुथूट दरोडा व गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आपले लक्ष तपासांकडे केंद्रित केले. परिणामी मागील १५ ते २० दिवसांपासून रिक्षांवरील कारवाई थंडावली. ही संधी साधत रिक्षाचालकांनी पाठीमागे तीन व पुढे दोन असे पाच प्रवाशी वाहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जादा पैसे देणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ सुरूच असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येते आहे.

..

पोलिसांकडे तक्रार करा

काही महत्त्वाच्या घटनांचा तपास करण्यासाठी मोठे मनुष्यबळ गुंतले आहे. आगामी दोन आठवड्यांत बेशिस्त रिक्षा व्यावसायिकांना पुन्हा रडारवर घेतले जाईल. त्यात गैरप्रकारे भाडेवसुलीसह फ्रंटशीट प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांना लक्ष करण्यात येईल. एखाद्या प्रवाशाने जादा पैसे देण्यास नकार म्हणून अथवा मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यास नकार दिला म्हणून नागरिकांनी रिक्षा क्रमांकासह तक्रार केल्यास अशा रिक्षांवर वाहतूक विभागामार्फत नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोवळ्या खांद्यांवर अनपेक्षित जबाबदारीचे ओझे

$
0
0

दोघा बालकामगारांची सुटका; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'त्यांच' वय शिक्षण घेण्याचे. मात्र एकाची आई निघून गेली, तर दुसऱ्याला बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे. कोवळ्या खांद्यांवर दप्ताराऐवजी अपेक्षांचे गाठोडे पडले अन् त्यांचा प्रवास सुरू झाला. वर्षागणिक अवघे चार ते पाच हजार रुपयांची कमाई. खाण पिणं सुटते, हे नशिबच! चाइल्ड लाइनने नुकतीच सुटका केलेल्या दोघा बालकामगारांची ही व्यथा, त्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठी पुरेशी आहे. संस्थेसह प्रशासनाने मेहनत करून मुलांची सुटका तर केलीच पण मेंढपाळ मालकाविरुद्ध गुन्हादेखील दाखल झाला. बालकामगारांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण होण्याची घटना संसरीगावात सुरू होती.

कारभारी भिकाजी पुणेकर (रा. संसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मेंढपाळ व्यावसायिकाचे नाव आहे. चाइल्ड लाइन नवजीवन वर्ल्ड पिस रिसर्च फाउंडेशन संस्थेचे निखील काकुळते यांनी या प्रकरणी तक्रार दिली. दाखल फिर्यादीनुसार, संसरी गावात अल्पवयीन मुले मेंढ्याचा सांभाळ करीत असल्याची माहिती संस्थेस मिळाली होती. त्यानुसार संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संसरी शिवारात शोध मोहीम हाती घेतली. त्यात जिल्ह्यातील घोटी आणि सिन्नर येथील अनुक्रमे दहा ते बारा वयोगटातील मुलांना संशयिताने कामावर ठेवल्याचे निदर्शनास आले. ही मुले अगदीच अल्प मोबदल्यात मेंढ्या चारण्याचे काम करीत होते. संशयित आरोपीने मुलांच्या कामाची वेळ निश्चित न करता त्यांच्याकडून क्षमतेपेक्षा जास्तीचे काम करून घेत असल्याचे समोर आले. त्यांच्या जीवितास धोका होईल याची माहिती असताना त्याचे आर्थिक, शारीरिक शोषण केले. यातील एका बालकामगाराचे अंदाजे वय १२ वर्षे असून, त्याचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. त्याचे पालक हयात असून, हा मुलगा वर्षाला चार ते पाच हजार रुपये आणि खाणं-पिणं या अटीवर कामावर होता. मार्च महिन्यापासून तो मेंढपाळाकडे होता. या मुलाला दोन लहान भाऊ असून, मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. वडील मिस्त्री काम करतात, तर घरातील भांडणामुळे आई निघून गेली आहे.

...

बहिणीच्या विवाहाची जबाबदारी

दुसरा बालकामगार दहा वर्षांचा असून, त्याचे वडील हयात नाही. आई मजुरी करते, तर दोन बहिणी १६ ते १७ वर्षांच्या आहेत. हा मुलगा वयाच्या चौथ्या वर्षांपासून कामाला असून, मोठ्या बहिणींच्या लग्नासाठी तो पैसे जमा करीत आहे. या दोन्ही मुलांना झोपण्यासाठी मेंढ्यांच्या गोठ्याच्या बाजूला झोपडी बांधली होती. जेवायला रोज भाकरी आणि ठेचा मिळायचा. घटनेचा अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुथूटचा फैसला कायदेशीर सल्ल्यानंतर

$
0
0

निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाल्यास दाखल होणार गुन्हा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयांवर देशभरातील विविध ठिकाणी दरोड्यांच्या घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये उंटवाडीरोडवरील कार्यालयात इतर ठिकाणांची पुनर्रावृत्ती झाली. यात कंपनीने सुरक्षा उपायांबाबत हलगर्जीपणा दाखविल्याच्या निष्कर्षांप्रती पोलिसांचा तपास पोहचला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन यात कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करणे शक्य आहे काय, याचा शोध घेण्यात येतो आहे.

उंटवाडीरोडवरील एका इमारतीतील मुथूट फायनान्स कार्यालयावर सशस्त्र दरोडेखोरांनी १४ जून रोजी नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकला होता. या घटनेवेळी सॅज्यु सॅम्युअल या तरुण आयटी इंजिनीअरची हत्या करण्यात आली. सॅज्युने दरोडेखोरांना प्रतिकार करीत अलार्मचे बटण देखील दाबले होते. शहर पोलिसांनी तपास करीत या प्रकरणातील दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात सुरत आणि उत्तर प्रदेश तसेच बिहार कनेक्शन असल्याचे उघड झाल्याने पोलिस सध्या उर्वरित या राज्यांमध्ये ठाण मांडून अन्य गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास करताना फायनान्स कंपनीने सुरक्षा विषयक बाबींमध्ये कानाडोळा केल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हींचा दर्जा, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, बंदुकधारी सुरक्षारक्षकांचा अभाव असे अनेक कारणांमुळे दरोडेखोरांचे काम सहज झाले तसेच सॅम्युअलचाही मृत्यू झाला.

याबाबत परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले, की सिक्युरीटी ऑडिटमध्ये या बाबींचा उहापोह करण्यात आला. मात्र, कॉस्ट कटिंगने या महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात घटनेच्या दिवशी कार्यरत असलेला सुरक्षारक्षकांनी आपल्या कामांबरोबर इतरही प्रशासकीय कामांना प्राधन्य दिले. सर्वसामान्यांच्या किमान १७ कोटी रुपयांच्या ठेवी, तसेच कर्मचाऱ्यांसह ग्राहकांचे जीव यासाठी धोक्यात घालण्यात आले. विशेष म्हणजे कंपनीच्या कार्यालयांवर दुसरीकडे सुद्धा दरोडे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेच्या अनुषंगाने कंपनीवर काय कारवाई करता येईल, याचा सध्या चाचपणी केली जात आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'त्या' बँकेच्या मुख्यालयाला पत्र

अंबड परिसरातील माऊली लॉन्स जवळील ठाणे जनता सहकारी बँकेच्या शाखेबाबत धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला. या बँकेचे अधिकारी व कर्मचारी चक्क बँकेला कुलूप लावायचेच विसरून गेले होते. सुदैवाने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी त्याच दिवशी बँकेच्या मुख्यालयास फोन करून माहिती दिली. मात्र, आता या निष्काळजीपणाबाबत एक पत्र देखील देण्यात येणार असल्याचे उपायुक्त तांबे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपा मुख्यालय स्वच्छतेचे काम आता आऊटसोर्सिंगने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील रिक्त पदांची वाढती संख्या आणि शासनाकडून नोकरभरतीला मिळत असलेल्या नकारघंटेमुळे प्रशासनाने आता पालिकेतील विविध सेवांच्या खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. वैद्यकीय, अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच वाहनचालकांचे आऊटसोर्सिंग केल्यानंतर आता महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या स्वच्छतेचे कामही आऊटसोर्सिंगने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील मंजूर ७०९० पदांपैकी सुमारे २२०० पदे रिक्त झाली आहेत. वाढत्या आस्थापना खर्चाचे कारण देत शासनाकडून पालिकेच्या रिक्त पदांच्या नोकरभरतीला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण वाढत असल्याने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून रिक्त पदांची भरती करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेने यापूर्वी शहरात सफाई कर्मचाऱ्यांची ७०० पदे आऊटसोर्सिंगने भरण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यानंतर अग्निशमन आणि वैद्यकीय विभागातील १९२ पदेही मानधनावर भरली जाणार आहेत. त्यातच सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीवरून महापालिका आणि सफाई कर्मचारी संघटनांमध्ये वाद सुरू आहे. हा वाद सुरू असतानाच आता महापालिका मुख्यालयाची स्वच्छता खासगी संस्थेमार्फत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी उद्या (दि. १) पर्यंत निविदा प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. त्यामुळे नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्यनिर्वाह निधी संघटनेत संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेत २ हजार १८९ जागांसाठी मेगा भरती होत असून, कोणत्याही शाखेतील पद‌वीधर उमेदवार यास पात्र आहेत. यासाठी ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार असून, २१ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा ५ हजार शब्द प्रति तास टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे. अर्ज नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून, या परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे २५ हजार रुपये प्रति महिना वेतन लागू असेल. अर्ज नोंदणी https://www.epfindia.gov.in/ या वेबसाइटवरून करता येणार असून, उमेदवारांनी अधिकृत माहितीच्या आधारे अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा आज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा रविवारी (दि. ३०) होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संत निवृत्तिनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्यसंस्थापक आहेत. यावर्षी त्यांचा ७२२ वा समाधीदिन आहे. संत निवृत्तिनाथ महाराजांचा समाधी सोहळा दुपारी साडेबारा वाजता होत असतो. सभामंडपात कीर्तन सुरू असते. संत नामदेव महाराज कृत समाधी सोहळ्याचे अभंग सेवा सादर करत पुष्पवृष्टी करतात. या दिवशी पालखी नगर मुक्कामी असते. तेथे संत निवृत्तिनाथांच्या पादुका पूजन केले जाते.

संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ७५० वर्षांपूर्वी ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरूप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली.

दिनदर्शिकांमध्ये चुकीची माहिती

दिनदर्शिकांमध्ये मागील काही वर्षांपासून ज्येष्ठ वद्य एकादशी तथा योगिनी एकादशी या तिथीला संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा असे छापण्यात येत आहे. यंदाही शनिवारी (दि. २९) एकादशीस संत निवृत्तिनाथ यात्रा असे छापले आहे. ही माहिती चुकीची आहे. संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव पौष महिन्याच्या वद्य एकादशीला म्हणजेच षटतीला एकादशीस असतो. संत निवृत्तिनाथ महाराजांचा समधी दिन ज्येष्ठ वद्य द्वादशीस असतो. तेव्हा वारकरी पंढरपुरच्या दिशेने दिंड्या पालखी घेऊन निघालेले असतात. वारकरी पंढरपुरच्या वाटेवरून माघारी फिरत नाही. पूर्वापार पद्धतीने पौष वद्य एकादशीस यात्रोत्सव साजरा करत असतात. त्यावेळेस लाखो वारकरी भाविक पायी दिंड्या घेऊन येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात शिक्षकांना 'टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड'

$
0
0

सात शिक्षकांना 'टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड'

राज्यातील ८७ शिक्षकांचा होणार गौरव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 'टीचर इनोव्हेशन ॲवार्ड २०१९' राज्यातील ८७ शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये नाशिकमधील सात शिक्षकांचा समावेश आहे.

शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार 'एज्युकेशन इनोव्हेशन बँक' या प्रकल्पांतर्गत हे ॲवार्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश निवड झालेल्यांमध्ये आहे. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरावरील 'इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स' मध्ये होणार असून शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कॉन्फरन्समध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.

- - -

जिल्ह्यातील या शिक्षकांचा सन्मान

राज्यस्तरीय 'टीचर इनोव्हेशन अवार्ड' विजेत्या शिक्षकांमध्ये प्राथमिक गटात नाशिकच्या प्रेरणा एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका मंजुषा खत्री, आडगाव येथील मनपा शाळा क्रमांक ६ च्या तोरंगण, त्र्यंबकेश्वर येथील शिक्षिका भारती शिंदे, शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक नितीन केवटे, फांगदर, देवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक खंडू मोरे तसेच माध्यमिक गटात नाशिकच्या शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयाच्या शिक्षिका राजश्री कोष्टी-घायदार, वणीच्या केआरटी हायस्कूलचे शिक्षक प्रवीण पानपाटील आणि विशेष पुरस्कार कनाशी, कळवण येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना जाहीर झाला आहे, असे सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि हेमा शिंदे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत यशाची भाऊबीज करू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही कॉँग्रेस- राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्यासाठी महिलांनी २८८ मतदारसंघांमध्ये संघर्षाची तयारी ठेवावी. यंदाच्या दिवाळीत पुन्हा आपले सरकार सत्तेत येणार असून, तुम्ही आता 'रक्षाबंधनपर्व' साजरे करा, नंतर भाऊबीज जोमाने साजरी करू, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी व्यक्त केला.

भाजपच्या महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन येथील हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये दानवे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २९) झाले. त्या वेळी ते बोलत होते. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अध्यक्षस्थानी होत्या. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. माधवी नाईक यांनी प्रास्ताविक केले. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी पूजा कपिल मिश्रा, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश प्रभारी उमा खापरे, माजी अध्यक्षा निशिगंधा मोगल, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, लक्ष्मण सावजी, नीलम गोंधळे आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या नावाखाली नारायण राणे समिती स्थापून कॉँग्रेस आघाडीने केवळ देखावा केला. आम्ही मात्र कायद्याच्या कक्षेत बसवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. आम्ही करून दाखवले, असे सांगत एकीकडे कॉँग्रेसवर टीकास्त्र डागताना नारायण राणे यांनाही प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी चिमटा काढला. लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक महिला उमेदवार दिले आणि सर्वाधिक महिला निवडून लोकसभेतही पाठविल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची भाजपची भूमिका आहे. काही पक्षांचा त्याला विरोध असला तरी आता त्यांचे अस्तित्व संपत चालले आहे, असे त्यांनी नमूद केले. शहराध्यक्षा रोहिणी नायडू यांनी स्वागत केले.

महिलांनाही संधी

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान महिलांनी केले आहे. त्यामुळे महिला मोर्चाने सर्व शक्ती पणाला लावून लोकसभेच्या निवडणुकीतील घवघवीत यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत घडवावी. झाशीच्या राणीप्रमाणे रणांगणात उतरून भाजपचा झेंडा अटकेपार पोहोचवावा. चांगले काम करणाऱ्या महिलांनाही उमेवारीची संधी मिळेल. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या २८८ जागा निवडून आणा. जेथे भाजपचा उमेदवार असेल तेथे भाजप उमेदवाराच्या व जेथे मित्रपक्ष सेनेचा उमेदवार असेल तेथे सेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा. सर्व २८८ जागांच्या विजयासाठी संघर्ष करा, असे आवाहनही दानवे यांनी केला.

फडणवीसच मुख्यमंत्री होणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा हा वाद युतीत सुरू असताना, भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मात्र राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. फडणवीस यांचे काम उत्तम असल्याचे सांगत, केंद्रातील भाजप सरकार महिला उद्योजकांसाठी धोरण आखणारे देशातील पहिले सरकार असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी या वेळी केला. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मातृशक्ती पाठीशी राहिल्यास भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या विकासासाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर रेल्वे प्रवासी दिलीप चंद्रभान सातपुते (४८) यांचे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास आकस्मात निधन झाले. वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असे मत सहप्रवाशांनी व्यक्त केले आहे.

सातपुते हे मुंबईत जे. जे. रुग्णालयात लॅब असिस्टंट होते. ते पंचवटी एक्स्प्रेसने नियमित प्रवास करत असत. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सकाळी सातच्या सुमारास गाडीची वाट पहात असताना त्यांना अचानक चक्कर आली, त्यांच्या डोक्याला मार लागला. नाशिकरोडच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सातपुते हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे सहप्रवाशांनी हळहळ व्यक्त केली. दसक येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, पंचवटी प्रवासी संघटनेचे राजेश फोकणे, नगरसेवक केशव पोरजे, प्रशांत दिवे, अशोक सातभाई आदी उपस्थित होते. सातपुते यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार आहे.

रुग्णवाहिका नाही

नव्या स्वरुपातील पंचवटी एक वर्षापूर्वी नाशिकरोड स्थानकात आली. तिच्या उद्घाटनप्रसंगी रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन झाले होते. ओढा येथे आठ दिवसांपूर्वी रेल्वेतून पडल्याने युवती जखमी झाली होती. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने तिचेही निधन झाले. राजेश फोकणे यांनी सांगितले, की या स्टेशनवर रुग्णवाहिका, स्ट्रेचर नाही. गर्दीच्या वेळी पंचवटी, राज्यराणी, गोदावरी, तपोवन या गाड्यांच्या वेळी मोठी गर्दी असते. यावेळी तरी रेल्वे प्रशासनाने रुग्णवाहिका, डॉक्टर, कर्मचारी उपलब्ध करावेत. ही सुविधा नसल्याने अनेकांचा जीव जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम लूट प्रकरणी दोघांना शहरातून अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेठ येथे एका बँकेचे एटीएम फोडून त्यातील रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमधून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता आहे.

राजेश बाळू खाणे (वय २८, रा.आंबेडकरवाडी, नासर्डीपूल) आणि अंबादास पवार (रा. बोधलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघा संशयितांनी आयडीबीआय बँकेचे एटीएम मशिन हातोडी व स्क्रुड्रायव्हरने फोडून रोख रक्कम चोरून नेण्याचा गुरुवारी (दि. २७) प्रयत्न केला होता. या घटनेबाबत आयडीबीआयचे पेठ तालुका शाखेचे व्यवस्थापक श्रीकिरण नंदकिशोर विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षक आरतीसिंग यांनी तपासाबाबत सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. एमटीएम फोडणारे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यांचे वर्णन व पेहरावावरून गुन्ह्यातील आरोपी नाशिकमधील असावेत, असा कयास पोलिसांनी बांधला.

खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक संशयित नंदिनी पूल परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पेठ पोलिस यांनी राजेश खाणे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार अंबादास पवार याचे नाव सांगितल्याने त्यास बोधलेनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेने आणखी काही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक करपे, पेठ ठाण्याचे निरीक्षक गाडे पाटील, पोलिस उपनिरीक्षक संदीप कहाळे, रामभाऊ मुंढे, हवालदार हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, वसंत खांडवी, जे. के. सूर्यवंशी, भूषण रानडे, कॉन्स्टेबल प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, संदीप लगड, भाऊसाहेब उगले, दिलीप रहिरे, विजय भोये याच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओझरला घरफोडी; ६० हजार लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

घर बंदाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी कपाटातून ६० हजार रुपये रोख चोरून नेले असल्याची घटना ओझरजवळील खोतकर मळ्याजवळील नवनाथ कॉलनीत घडली.

नर्मदा फत्तेलाल गढरी या १८ जून रोजी कुंटुबीयांसह बाहेरगावी गेलेले होते. याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून ६० हजार रुपये लंपास केले. गावावरून शनिवारी पहाटे परतल्यानंतर गढरी यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी ओझर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रंगणार टिवटिवाट

$
0
0

'नाशिक टि्वटअप'अंतर्गत होणार चर्चा

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विकासासह नव्या ट्रेडिंगवर चर्चा करण्यासाठी टि्वटर यूजर्स एकवटले आहेत. टि्वटरवरच्या हँडल नियमानुसार एकमेकांना ओळखण्यापेक्षा समोरासमोर येत नाशिक या विषयावर चर्चा केली जाणार आहे. यासाठी 'नाशिक टि्वटअप' हा उपक्रम राबविण्यात येणार असून, या अंतर्गत आज (दि. ३०) टि्वटर यूजर्सचे संमेलन भरणार आहे.

नाशिक शहराच्या नावाने अनेक टि्वटर हँडल्स आहेत. शहरातील प्रशासकीय व खासगी संस्थांचे देखील टि्वटर हँडल्स आहेत. या हँडल्सवर कायम नाशिकच्या विविध विषयांवर चर्चा होते. अनेक मुद्दे टि्वटरद्वारे उपस्थित केले जातात. या मुद्द्यांना नाशिकच्या टि्वटर यूजर्ससमोर मांडून संबंधित विषयांवर विचारमंथन केले जाणार आहे. येथील सिपर्स चाय कॅफेमध्ये दुपारी दोन वाजता यूजर्सचा मेळावा भरणार असून, वेगवेगळ्या विषयांवर यूजर्सचा टिवटिवाट यानिमित्ताने ऐकायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलाने केला महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

व्यावसायाने वकील असणाऱ्या संजय हरिप्रसाद कनोजिया (वय ५४, रा. तनिष्क पार्क, जेलरोड) या व्यक्तीने विनयभंग केल्याची तक्रार त्यांच्याच सोसायटीत राहणाऱ्या विवाहित महिलेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या फ्लॅटसमोरच अॅड. कनोजिया वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून तो महिलेला गॅलरीतून अश्लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत होता. याशिवाय फिर्यादी महिला जिमखान्यात चालण्यासाठी गेल्यावर तो तिचा पाठलाग करीत असे. या प्रकाराची माहिती महिलेने तिच्या पतीला दिली. तिच्या पतीने अॅड. कनोजिया याला समज दिली. सोसायटीच्या चेअरमन सुरेश राजूरकर यांच्याकडेही तक्रार केली. त्याच्याकडून सोसायटीतील नागरिकांकडून अजून काही तक्रारी असल्याची माहिती समोर आली. राजूरकर यांनीही अॅड. कनोजिया यास समजवले. पण त्याने धमकी दिली. त्यानंतर शनिवारी (दि.२९) सकाळी सात वाजेच्या दरम्यान फिर्यादी महिला जिमखान्यावर चालण्यासाठी गेली असता अॅड. कनोजियाने याने पाठलाग केला तसेच अचानक समोर येत खांद्याने धक्का देत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना चहा देण्यासाठी जात असताना मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने शनिवारी पहाटे तरुणाचा मृत्यू झाला. राहुल निवृत्ती मुंढे (वय २५, रा. सिन्नर) असे त्याचे नाव आहे. माजी नगरसेविका लता मुंढे यांचा तो मुलगा होता.

शहरातील गावठा भागातील मारुती मंदिरासमोर सिन्नर-घोटी रोडवर मुंढे यांचे हॉटेल आहे. रोजच्याप्रमाणे राहुल हा रस्त्याजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांना सेवा देत होते. शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना शनिवारी पहाटे चहा देण्यासाठी तो जात होता. त्याचवेळी मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. दोन्ही वाहनांमध्ये सापडल्याने राहुल गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचाराआधीच त्याला मृत घोषित केले.

राहुल हा समता परिषदेचे सिन्नर तालुकाध्यक्ष संजय काकड यांचा भाचा होता. अपघाताची माहिती काकड यांनी पोलिसांना दिली. राहुल याच्यावर शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अपघाताची वाहने ताब्यात घेतले आहे. राहुल पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती निवारणासाठी ऐक्याचे आवाहन'एखाद्या

$
0
0

आपत्ती निवारणासाठी ऐक्याचे आवाहन

'एखाद्या आपत्तींचा सर्वांत मोठा फटका समाजातील गरीब जनतेलाच बसत असतो. त्यामुळे आपत्तीच्या काळामध्ये तातडीने आणि कार्यक्षमपणे उपाययोजनांची गरज असते,' असे सांगत आपत्ती निवारणासाठी जागतिक आघाडी उभारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० देशांना केले. या परिषदेत बोलताना, भविष्यातील आपत्ती निवारणाच्या आघाडीवर मोदी यांनी विशेष भर दिला. नैसर्गिक किंवा मानवनिर्मिती, कोणत्याही आपत्तीमध्ये तातडीने बचावकार्य सुरू करणे गरजेचे असते. सुरक्षित पृथ्वी तयार करण्यासाठी आपण आणखी जवळ येऊ या, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

'खशोगी हत्येचा संताप;

राजकुमारावर आरोप नाही'

'पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येविषयी प्रचंड संताप आहे. मात्र, कोणीही सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान यांच्याकडे बोट दाखविले नाही,' अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिली. इस्तंबूलमध्ये सौदी अरेबियाच्या वकिलातीमध्ये गेल्या वर्षी खशोगी यांची हत्या झाली होती. ही हत्या महंमद बिन सलमान यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोप आहे. या हत्येनंतर अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर, जी-२० परिषदेवेळी झालेल्या भेटीमध्ये खशोगी हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्यावर महंमद बिन सलमान यांच्याकडे कोणी बोट दाखविले नव्हते, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images