Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धरणांचा पाणीसाठा अतिगंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मान्सूनच्या पावसाने काही तालुक्यांत जून महिन्यातील सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने २४ पैकी एकाही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. उलट गेल्या वर्षीच्या जूनअखेरीस धरणांत असलेला १३ टक्क्यांवरील पाणीसाठा यंदा ५ टक्केच शिल्लक राहिलेला असल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाई गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक सुपरक्रिटीकल (अतिगंभीर) झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १३ प्रकल्प अद्याप कोरडेठाक आहेत.

जिल्ह्यात ७ मोठे आणि १७ मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत सध्या अवघा ५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. एकमेव मुकणे धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ७ मोठ्या प्रकल्पांपैकी करंजवण, कडवा आणि चणकापूर हे तीन प्रकल्प कोरडेठाक आहेत, तर मध्यम १७ प्रकल्पांपैकी आळंदी, वाघाड, पुणेगाव, तीसगाव, नांदूरमध्यमेश्वर बंधारा, वालदेवी, भोजापूर, केळझर, नागासाक्या आणि माणिकपुंज हे १० प्रकल्पदेखील कोरडेठाक पडले आहेत. जिल्ह्यातील २४ पैकी तब्बल १३ प्रकल्पांतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक सुपरक्रिटीकल झाली आहे. मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाला असला तरी अद्याप कोणत्याही प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने चिंतेचे ढग कायम आहेत.

संततधारेची गरज

जिल्ह्यातील गंगापूर धरणसमूहात ९ टक्के, पालखेड धरणसमूहात १ टक्का, दारणा धरणसमूहात ४ टक्के, गिरणा धरणसमूहात ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय भोजापूर प्रकल्प कोरडाठाक, तर पुनद समूहातही केवळ एक टक्का पाणीसाठा आहे. माणिकपुंज, नागासाक्या आणि भोजापूर हे तिन्ही प्रकल्प गेल्या वर्षीही कोरडेठाक होते. जून महिन्यात प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने आता संततधार पावसाची गरज वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (दलघफू)

प्रकल्प-२०१८ मधील पाणीसाठा- २०१९ मधील पाणीसाठा

गंगापूर-१८२०-७५२

कश्यपी-३३७-९०

गौतमी गोदावरी-९४-७२

आळंदी-१४५-०

पालखेड-१५९-९६

करंजवण-५८४-१

वाघाड-७५-०

ओझरखेड-३३३-४४

पुणेगाव-५०-०

तीसगाव-१०-०

दारणा-१४७९-५३२

भावली-२४२-८०

मुकणे-६६-११५

वालदेवी-५५-०

कडवा-८९-०

नांदूरमध्यमेश्वर-२४३-०

भोजापूर-०-०

चणकापूर-२७५-०

हरणबारी-११७-३०

केळझर-२९-०

नागासाक्या-०-०

गिरणा-१८२१-१३७९

पुनद-५०२-१०

माणिकपुंज-०-०

एकूण-८४६४-३२०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्य परवान्याच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंद पडलेल्या दारू दुकानाचा परवाना नावावर करून देतो, असे आमिष दाखवत अमरावतीतील तीन जणांनी जळगाव जिल्ह्यातील एकाकडून तब्ब्बल १८ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

राकेश मधुकर देशपांडे, रंजना राकेश देशपांडे, आणि दामोधर वामनराव माथाने (सर्व रा. प्लॉट क्रमांक ५५, अंबा कॉलनी, सेतू केंद्राजवळ, अमरावती) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी जगन्नाथ विठ्ठल पाटील (४५, रा. मौजे किनगाव, ता. यावल, जिल्हा जळगाव) यांनी फिर्याद दिली. काही वर्षांपूर्वी पाटील आणि संशयित राकेश याच्याबरोबर शहरातील सीबीएस परिसरातील एका हॉटेलमध्ये औपचारिक ओळख झाली. आपली मोठ्या ठिकाणी ओळख असल्याचे राकेश देशपांडेने भासवले. यानंतर दोघांची ओळख वाढली. पाटीलसुद्धा व्यावसायिक आहेत. दरम्यान, छोटा-मोठा व्यवसाय काय करता, मी तुम्हाला दारूचा परवाना काढून देतो, असे आमिष देशपांडेने दाखवले. एक बंद पडलेला परवाना असून, तो पूर्ववत सुरू करून देतो, असे राकेशने सांगितले. सहजतेने मोठी संधी मिळत असल्याच्या अपेक्षेने पाटील यांनी संशयितांना पैसे देण्यास सुरुवात केली. तब्बल १८ लाख १३ हजार रुपये संशयितांनी उकळले. पैसे देऊनही परवाना मिळत नसल्याने पाटील यांनी अनेकदा तगादा लावला; पण संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पाटील यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. भद्रकाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी तपास करीत आहेत.

घरफोडीचा प्रयत्न

घरफोडीच्या उद्देशाने वडाळा-पाथर्डी रोडवरील बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. हिंमतराव फकीरराव सूर्यवंशी (रा. साईनाथनगर, वडाळा- पाथर्डी रोड, इंदिरानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. ते २३ जून रोजी मुलाकडे परगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडला. घरातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थकीत पैशांवरून मारहाण

डिझेलचे थकीत पैसे न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी एकाला लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. मोहन भाऊराव आव्हाड (रा. दापूर, ता. सिन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित प्रतीक सोनवणे (वय ३६) व त्याच्या दोन साथीदारांनी अंबड औद्योगिक वसाहतीतील अल्फा इंजिनीअरिंग कंपनीजवळ मोहन आव्हाड यांना शिवीगाळ करीत त्यांच्याकडे डिझेलच्या थकीत पैशांची मागणी केली. त्या वेळी आव्हाड यांनी, सध्या धंदा मंदीत असून पैसे आले की देतो, असे सांगितले. मात्र संशयितांनी मारहाण करीत तुझा मुडदा पाडतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन जणांची आत्महत्या

इंदिरानगर परिसरात पाथर्डी शिवारात एकाने, तर पांडवनगरीमध्ये महिलेने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली. संदीप पोपट वाघचौरे (वय ३४, रा. गौळाणे रोड, पाथर्डी शिवार) यांनी पाथर्डी फाटा येथील जी. पी. स्वीट्स दुकानासमोर शनिवारी (ता. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते. भाऊ सुमित याने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मीनाताई राजेंद्र चव्हाण (वय ४६, रा. पांडवनगरी, इंदिरानगर) यांनी शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोडी वर्गाला सुरुवात

$
0
0

\Bमोडी वर्गाला सुरुवात

\Bनाशिक : ज्ञानदुर्ग इतिहास संशोधन संस्थेमार्फत १ जुलै ते १६ जुलै २०१९ या कालावधीत रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग होणार आहे. या प्रशिक्षण वर्गास प्रा. रामनाथ रावळ मार्गदर्शन करणार असून, या वर्गात बेसिक व अॅडव्हान्स प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच सरावासाठी प्रत्यक्ष जुनी कागदपत्रे दिली जाणार आहेत. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेक्निकल समितीचा ‘ईव्हीएम’प्रश्नी प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ईव्हीएम कार्यपद्धतीच्या मुळाशी जाण्याकरिता देशपातळीवर टेक्निकल एक्सपर्ट समिती स्थापन करावी, असा प्रस्ताव आम्ही शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दिल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नाशिकमध्ये दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष तयारीला लागला असून, जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारी विश्रामगृहावर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, ज्ञानेश्वर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनच्या कार्यपद्धतीबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या. परंतु, त्या सिद्ध करता येऊ नयेत, हाच आमच्यापुढील अडचणीचा मुद्दा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांत २४ व्या फेरीपर्यंत आमच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या जवळपास मते होती. अनेक ठिकाणी मोजलेली मते व पडलेली मते यांमध्ये तफावत आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत शंकेला वाव आहे. परंतु, या शंका सिद्ध करण्यात आम्हाला अडचणी येत आहेत. भाजपची भिस्तच ईव्हीएम मशिनवर आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमला विरोध करूनही आगामी निवडणुकांत बॅलेट पेपरचा वापर होऊ नये असे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. ईव्हीएम मशिनमध्ये कशाप्रकारे घोळ होऊ शकतो याचे अनेक तर्क विविध घटकांकडूनही लावले जात आहेत. ईव्हीएमबाबत सर्वत्र तक्रारी होत आहेत. म्हणूनच ईव्हीएमच्या कार्यपद्धतीच्या मुळाशी जाण्याकरिता देशपातळीवर टेक्निकल समिती स्थापन करावी, अशी मागणी आम्ही शनिवारी दिल्लीत झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडे केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलनाच्या शर्यतीत नाशिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला व्हावे यासाठी औरंगाबाद येथील मराठी साहित्य महामंडळाला सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला होता. या मागणीचा विचार करून महामंडळाचे पदाधिकारी सप्टेंबर महिन्यात नाशिकला भेट देणार असून, त्यानंतर उस्मानाबाद की नाशिक यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा आणि नाशिक या चार शहरातील पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला होता. त्यापैकी लातुर आणि बुलढाणा येथील प्रस्ताव महामंडाळाने रविवारी ( ३० जून) रोजी झालेल्या बैठकीत नाकारला. त्यामुळे उरलेल्या उस्मानाबाद आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या दोन्ही ठिकाणांची व आयोजनाची माहिती घेण्यासाठी अखिल भारतीय मराठी महामंडळांच्या ७ सदस्यांचे पथक सप्टेंबर महिन्यात नाशिकला भेट देणार असल्याची माहिती साहित्यिक प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी दिली. या भेटीनंतर उस्मानाबाद की नाशिक यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये पाणीटंचाई व अनेक समस्या आहेत. त्या नाशिकमध्ये नाहीत. मात्र, उस्मानाबादने गेल्या अनेक वर्षांपासून मागणीत सातत्य ठेवले आहे. याचा विचार होतो की, आयोजनातील सकारात्मक बाबींचा विचार होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आयोजनाच्या बाबतीत नाशिकमध्ये अनेक चांगल्या सुविधा आहेत. सावानाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या समितीमध्ये ४ सदस्य महामंडळाचे, १ सदस्य विदर्भ, १ सदस्य पुणे, १ सदस्य मुंबई मराठी साहित्य संघाचा असणार आहे. सप्टेबर महिन्यात समिती येणार असल्याची माहिती प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी दिली.

यापूर्वीही यशस्वी आयोजन

मराठी साहित्य महामंडळातर्फे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यामुळे या महामंडळाला वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. १९४२ मध्ये नाशिक येथे साहित्य संमेलन झाले. त्यानंतर ६३ वर्षांनी दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांच्या पुढाकाराने २००५ मध्ये शहरात साहित्य संमेलन झाले. त्यानंतर आता बारा वर्षांनी 'सावाना'ने यासाठी पुढाकार घेतला आहे.

….

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शिक्षकाची आज होणार चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पंचक येथील जनता विद्यालयातील काही विद्यार्थिनींना छडीने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या शिक्षक अण्णासाहेब ठाकरे यांची आज (दि.१) नाशिकरोड पोलिसांकडून चौकशी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेला सुटी आल्याने चौकशी करता आली नसल्याची माहिती तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी रविवारी दिली.

रांगेत नीट उभे न राहणे, केसांचा आडवा भांग पाडणे यासारख्या कारणांवरून पंचक येथील जनता विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गातील चार ते पाच मुलींना मराठी विषयाचे शिक्षक अण्णासाहेब ठाकरे यांनी छडीने मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी शाळेत घडला होता. या शिक्षकाने मद्यपान केलेल्या अवस्थेत छडीने मारल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांकडे केल्यावर शनिवारी दुपारी संबंधित पालकांनी शाळेत धाव घेऊन झाल्या प्रकाराचा शाळा प्रशासनाला जाबही विचारला होता. परंतु, मुख्याध्यापिका घोलप यांची भेट होऊ न शकल्याने मारहाण झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शिक्षक ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आजपासून वृक्षारोपण मोहीम

$
0
0

महापालिकेचे ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे

…..

- नदीपात्रांलगत ३५ हजार बांबूची झाडे लावणार

- वृक्षारोपणासाठी ५.५ कोटी रुपये खर्च

- दोन वर्षांसाठी झाडांची देखभाल ठेकेदार करणार

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारने यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे ठरवले असून, त्या अंतर्गत नाशिक महापालिकेला ५० हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात आज (१ जुलै) पासून उंटवाडी येथे करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता उंटवाडी स्मशानभूमी जवळ, दत्तमंदिर चौक, नवीन नाशिक येथे होणार आहे.

महापौर रंजना भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहरातील खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून सुमारे ५० हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या झाडांचे दोन वर्षांपर्यंत संगोपन करण्याची जबाबदारीदेखील संबंधित ठेकेदाराची असणार आहे. गोदावरी, नंदिनी, वाघाडी आणि वालदेवी नदीपात्रालगत ३५ हजार बांबूची झाडे लावण्यात येणार असून, त्यामुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत होणार आहे. इतर झाडे शहराच्या सहा विभागांत लावण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी महापालिकेने १२ हजार झाडे लावली होती. यंदा हा आकडा ५० हजार इतका करण्यात आला आहे. लागवड करणाऱ्या झाडांमध्ये बांबू, नीम, बदाम, करंज, बकुल, सप्तपर्णी इत्यादी झाडांच्या रोपांचा समावेश आहे. या वृक्षारोपणासाठी ५.५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व सहा विभागांमध्ये ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. वृक्षारोपणानंतर त्यांना दोन वर्षांसाठी झाडांची देखभाल ठेकेदाराला करावी लागेल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चातर्फे महाजन यांचा सत्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने सकारात्मकता दर्शविल्याबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा रविवारी नाशिकमध्ये सत्कार करण्यात आला.

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हॉटेल रॉयल हेरिटेज येथे हा सत्कार करण्यात आला. मराठा क्रांती आंदोलनाचे अनेक मोर्चे, आंदोलने, बैठकांमध्ये महाजन सहभागी झाले होते. मराठा आंदोलनकर्त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते त्यांनी सरकार दरबारी मांडले. आरक्षण लागू केल्यानंतर कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या. या याचिकांविरोधात कोर्टात चांगले वकील सरकारने दिले. त्यामुळे न्यायालयीन लढाई यशस्वी झाली. नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेले मराठा वसतिगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाचा लाभ मिळवून देणे, मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे काढून घेण्यासाठीदेखील महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील बागुल, उद्धव निमसे, मनीषा पवार, तुषार जगताप, दादा जाधव, डॉ. सुनील बच्छाव, विलास जाधव, नीलेश मोरे, सचिन पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्केट यार्डमधील हमालावर हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मागील भांडणाची कुरापत काढून मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करणाऱ्यावर शनिवारी (दि. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हमाल जखमी झाला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पंचवटीतील फुलेनगर परिसरातील महाराणा प्रतापनगर येथे राहणारा सागर रामदास येलमामे (वय २५) हा दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डात हमाली काम करतो. रोजच्या प्रमाणे मार्केट यार्डातील हमालीचे काम आटोपून घरी जात असतानाच पेठरोडवरील फुलेनगर परिसरात असलेल्या बुद्धविहाराजवळ गोकुळ मधुकर येलमामे, (वय २३), सनी मधुकर येलमामे (वय १९), रवि मधुकर येलमामे (वय २२), सोनू नामदेव वारुंगसे (वय २०), अरुण पिंटू सैय्यद (वय १९) सर्व रहाणार कालिकानगर, पेठरोड यांनी अडवून मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी झालेल्या झटापटीत गोकुळ येलमामे याने जवळील चॉपरने सपासप वार करून गंभीर जखमी केले. तेथे असलेल्या पप्पू रणमाळे हा भांडण सोडवायला गेला असता, त्यालाही मारहाण करून ते पळून गेले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता लक्ष्य उत्तर महाराष्ट्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ४७ मतदारसंघांत विजय मिळविण्याचा निर्धार रविवारी भाजपच्या जिल्हा मेळाव्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी कार्यकर्ता हा विजयाचा शिल्पकार आहे, मी स्वत:ला आजही कार्यकर्ता समजतो, असे सांगत आपला विद्यार्थी परिषद, युवा मोर्चापासूनचा सर्व प्रवास सांगितला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

भाजपच्या वसंतस्मृती या पक्षाच्या कार्यालयात अगोदर जिल्ह्याच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण अशा दोन वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यात दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करण्यात आली. दोन्ही बैठकींत सदस्य नोंदणी अभियान व मतदार नोंदणी अभियानावर भर देण्यात आला. यावेळी आगामी कार्यक्रमाची रुपरेषाही सांगण्यात आली.

यावेळी महाजन म्हणाले, की लोकसभेत ज्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात सर्व जागा जिंकल्या, त्याचप्रमाणे विधानसभेतही सर्व जागा जिंकण्याचे प्रयत्न करावेत. बैठकीस प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर संघटनमंत्री किशोर काळकर यांनी आगामी कार्यक्रमाची माहिती दिली, तर सदस्य नोंदणीची माहिती शशिकांत वाणी यांनी दिली. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी संघटनकार्याचा आढावा घेतला. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार आदी उपस्थित होते. शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरेंसह भाजपचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

गणेशोत्सवातही प्रचार

गणेशोत्सव कार्यक्रमात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित सजावट करणे व सजावट स्पर्धा असे कार्यक्रम भाजप घेणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारचे काम पोहोचविण्यावर यापुढे भर दिला जाणार आहे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.

आगामी कार्यक्रम असे...

- २२ जून ते ८ जुलै विधानसभा शक्ती केंद्र प्रमुख बैठका

-६ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वत्र मंडल सदस्यता अभियान प्रारंभ

-जुलैअखेर नाशिक जिल्ह्यातील सर्व निर्वाचित सदस्यांचे संमेलन

- १ जुलै ते १ ऑगस्ट नवमतदार नोंदणी अभियान

- १५ जुलै ते १ ऑगस्ट सर्व शक्ती केंद्रांपर्यंत विस्तारक योजना

-ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंडल अध्यक्ष व प्रदेश कार्यसमिती बैठक

-२५ जुलै ते १० ऑगस्ट प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बूथ कार्यकर्ता संमेलन

-१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट भाजप महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन पर्व उपक्रम

-१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर मुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यात विकासवारी

-१५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात नवमतदार संवाद कार्यक्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑफलाइन टिवटिवाटा’त विचारमंथन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील औद्योगिक, सांस्कृतिक, पर्यटन, प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतील विविध मुद्द्यांवर विकासाच्या दृष्टीने आपले मत मांडणारे नाशिककर... शहराच्या विकासासाठी फक्त प्रशासकीय धोरणांवर अवलंबून राहण्यापेक्षा नाशिककर म्हणून शहराचे वेगळेपण प्रसारित करण्याची मांडलेली भूमिका... शहराच्या विकासाचा आपण अविभाज्य भाग असून, ट्विटरच्या माध्यमातून नाशिककरांची एकजूट दाखवावी अन् नाशिक ब्रँडिंगसाठी आपणच पुढाकार घ्यावा, असा उमटलेला सूर... हे अनोखे विचारमंथन नाशिकच्या विविध घटकांतील मुद्द्यांना स्पर्श करणारे ठरले. निमित्त होते, 'नाशिक ट्विटअप'चे.

नाशिकच्या ट्विटर यूजर्सनी एकत्र येत नाशिकच्या सर्वांगीण विकासावर विचारमंथन करण्यासाठी 'नाशिक ट्विटअप' हा उपक्रम राबविला. रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत कृषिनगर येथील सिपर्स चाय कॅफेमध्ये हे यूजर्स एकत्र आले होते. या चर्चेत यूजर्सनी शहरातल्या विविध ‌विषयांवर विचारमंथन केले. शहरातील औद्योगिक स्थिती, पर्यटनाला असलेला वाव, स्मार्ट पोलिसिंगची गरज, नाशिकचे ब्रँडिंग वाढविण्यासाठी नागरिकांनी घ्यायचा पुढाकार यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व वयोगटांतील ट्विटर यूजर्स या संमेलनास उपस्थित होते. मुंबई, पुणे या शहरांपाठोपाठ नाशिकमध्येही ट्विटरचा प्रभावी वापर होऊ लागला आहे. शहरात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, ज्याचे प्रमोशन नाशिककर म्हणून आपणच करायला हवे. महापालिका, पोलिस व इतर शासकीय प्रशासन त्यांच्या भूमिका बजावत राहतीलच. पण, नाशिककर या नात्याने नाशिकचे ब्रँडिंग करण्यासाठी आपण पुढाकार घेऊया, असा सूर या चर्चेतून उमटला. शहरात रंगलेला हा ऑफलाइन टिवटिवाट नाशिकच्या यूजर्सची एकजूट दर्शविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत यूजर्सने व्यक्त केले. ट्विटर संमेलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यापुढेही हा उपक्रम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले. संमेलनाच्या अखेरीस यूजर्सना रोप भेट देण्यात आले. नाशिकच्या पर्यावरण संवर्धनाला या माध्यमातून हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाचे संयोजन 'जस्ट नाशिक', 'वूई आर नाशिक' आणि 'नाशिक न्यूज' यासह नाशिकच्या इतर यूजर्सनी एकत्र येत केले होते.

--

पोलिस अॅक्टिव्ह नाहीत!

नाशिक पोलिसांचे ट्विटर हँटल अॅक्टिव्ह नसल्याचे मत ट्विटर यूजर्सनी मांडले. सुरुवातीच्या काळात पोलिसांच्या ट्विटर हँडलला माहिती टॅग केल्यास, कोट केल्यास अथवा री-ट्विट केल्यास प्रत्युत्तर यायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. यामुळे पोलिसांपर्यंत एखादी माहिती पोहोचवायची कशी, हा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलिसांचे ट्विटर हँडल अॅक्टिव्ह होण्याची गरज असून, यासंदर्भात पोलिस आयुक्तांची भेट घेऊ, असे मत यूजर्सनी संमेलनात मांडले.

--

नाशिकचे वेगळेपण जपा

नाशिक म्हणजे केवळ रामकुंड, वाइन कॅपिटल, द्राक्षबागा, इतकेच मर्यादित क्षेत्र नाही, तर नाशिकला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. नाशिकची संस्कृती अनोखी आहे. वाइनप्रमाणे मिसळचे अनेक प्रकार शहरात आहेत. शहराच्या खवय्येगिरीचे वेगळेपण आहे. शहरातल्या प्रत्येक मंदिराला एक वेगळा इतिहास आहे. शहरात अनेक ठिकाणी पर्यटनाला विशेष वाव आहे. या सर्व बाबींचे वेगळेपण नाशिककरांनी जपले पाहिजे. नाशिकच्या अनोखेपणाच्या गोष्टी ट्विटरवर शेअर करीत, शहराचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करूया, असे संमेलनात ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दि न्यू एज्युकेशनची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण ७९ वी सभा रविवारी सकाळी झाली. सभेत २०१९-२४ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश वैशंपायन, उपाध्यक्षपदी प्रभाकर कुलकर्णी, सचिवपदी हेमंत बरकले, सहाय्यक सचिवपदी सरला तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रमेश महाशब्दे, रवींद्र कदम, अंजली प्रधान, नंदलाल चोरडिया, दिनेश वैशंपायन, रोहित वैशंपायन, अमृता कवीश्वर, भारती चंद्रात्रे, कैलास बागूल, अनिल ठाकरे, अनुराधा बस्ते यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. रेखा काळे, वासंती पेठे, नेहा मुळे, अनिल महाजन, भास्कर कवीश्वर, अमिता भट, शीतल लिंगायत, बाळासाहेब बैरागी, विकास देवरे, मीनाक्षी दौंड यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. अॅड. अभिजित बगदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका बजावली. सभेसाठी रेखा कुलकर्णी, मोहन अलाणे, सुरेखा कमोद, दिलीप निकम, भरत ठाकरे, नरेंद्र बटाविया आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहसी लघुपटांचा अनुभवला थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथील हिमालयन क्लब, कॅनेडियन हायकमिशन व नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात बांफ फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देश-विदेशांतील अकरा साहसी फिल्म्स दाखविण्यात आल्या. या साहसी लघुपटांचा थरार नाशिककरांनी अनुभवला. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साहसवीरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, गिरीश टकले, रमेश कनानी, सुभेदार मेजर आय. बी. गुरुंग, डॉ. हितेंद्र महाजन, महेंद्र महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाशिकचे नाव एका उंचीवर नेणाऱ्या साहसवीरांचा सत्कार करण्यात आला. भारतीय लष्कारातील सुभेदार मेजर आय. बी. गुरुंग यांनी अनेक मोहिमा केल्या. १९८५ मध्ये एव्हरेस्ट मोहिमेवर असताना त्यांच्या चमूला अपघात झाला. त्या ठिकाणी त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाला. त्या सहकाऱ्याला परत घेऊन येण्यासाठी अवघ्या शंभर मीटर अंतरावरून त्यांना मोहीम सोडून परतावे लागले. या कामगिरीच्या आधारे त्यांना भारत सरकारच्या वतीने कीर्तिचक्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांनी आतापर्यंत ४५ शिखरे सर करण्याचा मान मिळविला आहे. यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नुकतीच एव्हरेस्टची मोहीम यशस्वी पूर्ण करणारे महाजन बंधू यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला. अमेरिकेतील डेका या आयर्न मॅन स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या अमर मियाजी यांचादेखील सन्मान करण्यात आला. अनेकांना धावण्याचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक अनिरुद्ध अथनी यांनादेखील या महोत्सवात गौरविण्यात आले. यावेळी राँग एलिमेंट कॉर्बेट काउलिअर, लिव्ह अलाँग द वे, फार द लव्ह ऑफ मेरी, दिस माउंटन लाइअफ, फार आउंट, द मिरनॅव्हेटर, सरफेस, ड्रीम राइड-३, द बिएवर बिलिव्हर्स, रिल रॉक, स्कीर व्हीएस ड्रोन या फिल्म्स दाखविण्यात आल्या.

चार ते ३९ मिनिटांच्या फिल्म्स

बांफ फिल्म फेस्टिव्हलचे संपूर्ण भारतात आयोजन केले जाते. गेल्या चार वर्षांपासून वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण ही संस्था नाशिकमध्ये हा फिल्म महोत्सव आयोजित करीत आहे. साहसी खेळ खेळताना ज्या पद्धतीने धोका पत्करला जातो तसाच तो चित्रीकरणातदेखील उतरवला जातो. त्यासाठी कोणतेही संवाद लिहिलेले नसतात. असे खेळ कॅमेऱ्यात टिपणे आणि ते पडद्यावर उतरवणे हेदेखील साहसी खेळांइतकेच थरारक असते. जागतिक स्तरावरील अशाच काही दर्जेदार साहसी लघुपटांचा थरार अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळाली. या महोत्सवात निवडक जगप्रसिद्ध साहसी लघुपटांचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. चार मिनिटांपासून ते ३९ मिनिटांच्या अकरा फिल्म्स यात दाखविण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा रुग्णालयात३४ मृतदेह पडून!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबक रोडवरील जिल्हा रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) शवागृहात तब्बल सव्वादोनशे दिवसांचे ३४ मृतदेह पडून असल्याची बाब समोर आली आहे. पोलिस व महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे हे चित्र निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. हे मृतदेह सडल्याने तेथील कर्मचारी व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी आढळलेले बेवारस मृतदेह, अपघात, तसेच अनोळखी व्यक्तींचे मृतदेह ओळख पटेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवले जातात. सद्य:स्थितीत शवागृहात असे एकूण ३४ मृतदेह पडून आहेत. अनोळखी मृतदेहांची ओळख पोलीसांनी १४ दिवसांत पटवणे आवश्यक आहे. ओळख न पटल्यास पोलिसांकडून महापालिकेला तसा अहवाल दिला जातो. त्यानंतर महापालिकेकडून त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, गेल्या दोन ते सव्वा दोन महिन्यापासून अशा प्रकारचे अहवाल पोलिसांकडून न देण्यात आल्याने हे ३४ मृतदेह पडून आहेत. ते आता कुजल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी १४, तर शहर पोलिसांनी २० मृतदेहांबाबत अहवाल देणे आवश्यक होते. मात्र, ते न दिल्याने आता या कुजलेल्या मृतदेहांचा उग्र वास येत असून, त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांसह परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा सुरू असल्याने या दुर्गंधीने साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. जिल्हा रुग्णालयातील शवागृहाची क्षमता ५६ मृतदेह ठेवण्याची आहे. यातील काही कप्पे बंद आहेत, तर ३४ कप्पे या पडून असलेल्या मृतदेहांनी व्यापले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रोज नवीन मृतदेह दाखल होत असल्याने आता या मृतदेहांना ठेवण्यासाठी जागाही शिल्लक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पोलिस व महापालिकेने तातडीने समन्वय ठेवून अनोळखी मृतदेहांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.

नवा कर्मचारी नियुक्त

दीड महिन्यापूर्वी शवागृहातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे अनेक दिवसांच्या मागणीनंतर महापालिकेने नवीन कर्मचारी येथे नियुक्त केला आहे. मात्र, अनेक मृतदेहांच्या कागदपत्रांचाही गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यरात्री जोरदार; दिवसभर रिमझिम

$
0
0

वीजपुरवठा खंडित, रस्त्यांवर साचले पाणी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली, तर दिवसभर रिमझिम पावसाने नाशिकमध्ये तळ ठोकला. रविवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाने सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विश्रांती घेतली. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने, बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

रविवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यात ६.३, तर शहरात दिवसभरात ३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्री जोरदार पावासाने हजेरी लावल्याने दिवसभर पावासाचा जोर कायम राहील, अशी चिन्हे होती. मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास ओसरलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. असे असले तरी, अनेक भागात पावसाची रिमझिम सुरूच होती. सायंकाळी ५ वाजेनंतर पुन्हा पावसाने काही काळ जोर धरला. यामुळे शहरातले जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. मध्यरात्रीपासून शहरातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळपासून दुपारपर्यंत शरणपूररोड, नाशिकरोड, सातपूर, गंगापूररोड, पंचवटीसह इतर भागात विजेचा लपंडाव बघायला मिळाला. वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली. मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातले रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याचे चित्र होते. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील वाहतुकीचा वेग जलमय रस्त्यांमुळे मंदावल्याचे दिसून आले. वीजपुरवठा नसल्याने शहरातील बहुतांश सिग्नलदेखील बंद असल्याचे दिसून आले. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. अनेक चौकात वाहतूक कोंडी झाल्याचेही यावेळी दिसले. रस्त्याच्या कडेला चिखलाचा खच साचलेला दिसून आला.

--

रस्त्यांना तळ्याचे रूप

शहरातील सीबीएस, शालिमार, कॉलेजरोड, गंगापूररोड भागातील काही ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे रूप आल्याचे दिसून आले. पावसाचा जोर ओसरल्यावर दुपारी रस्त्यावरील पाणी कमी झाले. मात्र, रस्त्यांतील डबके कामय होते. यामुळे वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'एनएमआरडीए'मध्ये मुबलक विकासाच्या संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रातील कोणत्याही भागाचा योग्य, शिस्तबद्ध आणि जलद विकास करण्यासाठी १ मार्च २०१७ रोजी नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणची (एनएमआरडीए) स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाला सरकारकडून १० कोटी रुपयांचा निधी सरकारकडून प्राप्त होणार आहे. त्यामुळे 'एनएमआरडीए'मध्ये विकासाच्या मुबलक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन 'एनएमआरडीए' प्रमुख प्रतिभा भदाणे यांनी केले. 'नरेडको'च्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या. गेट वे हॉटेल येथे झालेल्या सभेत भदाणे बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, की विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे योग्य नियोजन आणि नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येईल, याबरोबरच नव्या योजनेत रहिवाशी, औद्योगिक, कृषी आणि पर्यटन याकरिता विशेष विभाग करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी विविध उद्योग व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे. वाहतुकीसाठी आहे त्या रस्त्यांचे रुंदीकरण व नव्या रस्त्यांचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी परिसरात दर्जेदार नागरी सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महानगर प्रदेश क्षेत्रातील कोणत्याही भागाचा शिस्तबद्ध आणि जलद विकास करण्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाची क्षमता आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांना व विविध संघटनांना यामध्ये विकासाची संधी असून सर्वांनी याकडे डोळसपणे बघण्याची नितांत गरज आहे, असेही भदाणे म्हणाल्या. मंदार राजेंद्र यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम देशपांडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'डॉक्टरांनी रुग्णांबद्दल आत्मीयता दाखवावी'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक रुग्णांमध्ये डॉक्टरांबद्दल कमालीचा आदर व विश्वास असतो आणि डॉक्टरांनी आपल्या कृतीने तो अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन

भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केले. लक्ष्मण सावजी आणि मान्यवरांच्या हस्ते 'डॉक्टर दिना' निमित्त भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सावजी बोलत होते. मंचावर भाजपचे महानगर संघटन सचिव प्रशांत जाधव, पवन भगूरकर, देवदत्त जोशी, वैद्यकीय आघाडी महानगर अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. अजय गुजर, डॉ. वैभव जोशी, डॉ. मनोज दगडे, नितीन क्षीरसागर आदी होते. यांचा झाला गौरव डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. श्रीकांत खरे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ. अमित धांडे, डॉ. ज्ञानेश निकम, डॉ. एकनाथ कुलकर्णी, डॉ. मनीषा पगार-मराठे, डॉ. दीपाली कुलकर्णी, डॉ. सीमा ताजणे, डॉ. अनुप भारती आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलेरो गाडीतून पाच लाख लांबवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

विजयनगर परिसरातील अहुजा कॉम्प्लेक्समधून बोलेरो गाडीतील (एमएच १५ एफटी ०६५१) पाच लाखांची बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

राजू पंढरीनाथ तळपे यांनी फिर्याद दिली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेतून त्यांनी पाच लाख रुपये काढले होते. पैशांची बॅग बोलेरो या वाहनात क्लिनरच्या बाजूवरील सीटवर नेऊन ठेवली. ते पुन्हा पांढुर्लीकडे परतत असताना, भगूर परिसरात किराणा घेण्यासाठी थांबले. त्यावेळी पैशांची बॅग सोबत होती. त्यावेळी किराणा दुकानातील माणसाने गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगितले. अहुजा कॉम्प्लेक्स जवळील एका गॅरेजमध्ये ते हवा भरण्यास थांबले. याचदरम्यान गाडीच्या दरवाजाचे लॉक उघडे राहिल्याचे लक्षात आले म्हणून पाहिले असता, पैशांची बॅग तेथे नव्हती. घडलेला सारा प्रकार त्यांनी आपले मालक मुकुंदा चौघुले यांना सांगितला. समोरील जगदंबा स्वीट दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने पोलिसांनी तेथील फुटेज तपासले असता, गाडीमधून अंदाजे ३० वर्षे वयाची अनोळखी व्यक्ती बॅग काढत असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षांचे संवर्धन करा

$
0
0

सिडको : वृक्षांची लागवड आणि संवर्धन यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार असून, सर्वच विभागांनी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले. महापालिकेतर्फे वृक्ष लागवडीचा शुभारंभ सिडकोतील नंदीनी नदीलगतच्या उंटवाडी, अमरधाम परिसरात करण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, सिडको प्रभाग समिती सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्यामकुमार साबळे, उद्यान व वृक्ष प्राधिकरण उपायुक्त शिवाजी आमले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनएमआरडीए’मध्ये मुबलक विकाससंधी

$
0
0

\Bनरेडको बैठकीत \Bप्रतिभा भदाणे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महानगर प्रदेश क्षेत्रातील कोणत्याही भागाचा योग्य, शिस्तबद्ध आणि जलद विकास करण्यासाठी १ मार्च २०१७ रोजी नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणची (एनएमआरडीए) स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाला सरकारकडून १० कोटी रुपयांचा निधी सरकारकडून प्राप्त होणार आहे. त्यामुळे 'एनएमआरडीए'मध्ये विकासाच्या मुबलक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन 'एनएमआरडीए' प्रमुख प्रतिभा भदाणे यांनी केले. 'नरेडको'च्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या.

गेट वे हॉटेल येथे झालेल्या सभेत भदाणे बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, की विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे योग्य नियोजन आणि नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येईल, याबरोबरच नव्या योजनेत रहिवाशी, औद्योगिक, कृषी आणि पर्यटन याकरिता विशेष विभाग करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी विविध उद्योग व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे. वाहतुकीसाठी आहे त्या रस्त्यांचे रुंदीकरण व नव्या रस्त्यांचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी परिसरात दर्जेदार नागरी सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महानगर प्रदेश क्षेत्रातील कोणत्याही भागाचा शिस्तबद्ध आणि जलद विकास करण्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाची क्षमता आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांना व विविध संघटनांना यामध्ये विकासाची संधी असून सर्वांनी याकडे डोळसपणे बघण्याची नितांत गरज आहे, असेही भदाणे म्हणाल्या. सर्वसाधारण सभेत, विविध असोसिएशन यांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदार राजेंद्र यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम देशपांडे यांनी आभार मानले.

या तालुक्यांचा कार्यक्षेत्रात समावेश

'एनएमआरडी'च्या कार्यक्षेत्रात नाशिक मनपाचे क्षेत्र वगळून इतर भागाचा समावेश होतो. त्यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, इगतपुरी, नाशिक, सिन्नर, ओझर, पिंपळगाव, शिंदे आणि गोंदे या तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे. या समाविष्ट भागातून आतापर्यंत एनएमआरडीकडे प्रकरणे दाखल आहेत. नवीन ले-आऊट, इमारतींच्या बांधकामांची मंजुरी, जमीन आकर्षक करण्याचे प्रस्ताव या प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी येत असल्याची माहिती भदाणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images