Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सेंट्रल किचनसाठी १३ ठेकेदार पात्र

$
0
0

महिला बचत गट आंदोलनाच्या पवित्र्यात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या 'सेंट्रल किचन' योजनेसाठी प्राप्त ३३ पैकी १३ निविदाधारक पात्र ठरले आहेत. पुढील आठवड्यात संबंधितांना आहार पुरवठ्यासाठी कार्यादेश दिले जाणार आहेत.

सेंट्रल किचन प्रणालीला महिला बचत गटांचा विरोध आहे. मात्र, या प्रणालीच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याने ती प्रक्रिया अंतिम होईपर्यंत महिला बचत गटांमार्फत आहार पुरवठ्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, सरकार केवळ गरजेपुरता वापर करीत असल्याचा आरोप बचत गटांनी केला आहे.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये आहार पुरवठा करण्यासाठी सरकारने केंद्रीय स्वयंपाकीगृह प्रणाली अर्थात सेंट्रल किचनच्या माध्यमातून आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वारस्य अभिव्यक्ती देकारही मागविण्यात आले होते. यासाठी २९ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. या योजनेसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे ३३ निविदा प्राप्त झाल्या. या निविदांची छाननी केल्यानंतर १३ निविदाधारक पात्र ठरले आहेत. सेंट्रल किचन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने १३ रूट तयार केले असून रूटनिहाय तसेच क्षमतानिहाय पात्र ठेकेदारांना काम दिले जाणार आहे. त्याची तयारी सुरू असतांनाच, बचत गटांनी मात्र त्याला तीव्र विरोध केला असून थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सभागृहनेत्यांचाही विरोध

सभागृहनेते दिनकर पाटील यांनी सेंट्रल किचन प्रणालीला विरोध दर्शवित महिला बचत गटांमार्फतच हे काम सुरू ठेवण्याची मागणी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सेंट्रल किचनची निविदा प्रक्रिया रद्द करून महिला बचत गटांनाच हे काम देण्याची सूचना पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात आक्रमक होत, प्रसंगी आंदोलन करू, अशा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जून महिन्यात पाऊस निम्माच बरसला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत यंदा निम्माच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात १४४.९ मिली पर्जन्यमान घटले आहे. १ ते १४ जून या कालावधीत यंदा अवघ्या २९२.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. २०१८ मध्ये याच कालवधीत जिल्ह्यात ४३६ मिमी पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाच्या निम्म्याच सरी यंदा कमी बरल्याने जिल्ह्यातील भीषण दुष्काळापासून सुटका होणार का, ही चिंतेची बाब प्रत्येकाला सतावत आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमान जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असून यानुसार जून महिन्यात एकूण पर्जन्यमान २३२४.५० मिमी इतके असते. मात्र, आतापर्यंत अवघ्या २९२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा काही भागात बसला असून, चौदा दिवसात नाशिक तालुक्यात १३.४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पेठ तालुक्यात सर्वाधिक ७०.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. २०१८ च्या तुलनेत जून महिन्यात आतापर्यंत सरासरी ९.६ मिमी कमी पावसाची नोंद झाल्याने दुष्काळाची दाहकता अधिक वाढणार का, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राकेश चौरासिया यांचे २२ रोजी बासरी वादन

$
0
0

राकेश चौरासिया यांचे

२२ रोजी बासरी वादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्नेह संवर्धन मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरी वादक पंडित राकेश चौरासिया यांचे बासरी वादन आणि नाशिकच्या शिवानी दसककर यांच्या गायनाची मैफिल शनिवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजता 'ग्रँड बॉल रूम', सिटी सेंटर मॉल नाशिक येथे होणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

दिग्गज कलावंतांच्या समावेशासह स्थानिक कलाकारांना उत्तेजन मिळावे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी देखील स्नेह संवर्धन मंडळाचा प्रयत्न असतो. यंदाच्या कार्यक्रमात नाशिकच्या शिवानी दसककर यांच्या गायनाच्या कार्यक्रमचा लाभ पंडित राकेशजी चौरासिया यांच्या बासरी वादनाबरोबरच नाशिककरांना घेता येणार आहे. राकेश चौरसीयायांना पंडित सत्यजीत तळवळकर (तबला), नितिन वारे (तबला), ईश्वरी दसककर (हार्मोनीयम) हे साथसंगत करणार आहे. रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका सिटी सेंटर मॉल येथे १५ जूनपासून सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती स्नेहसंवर्धन मंडळाच्या अध्यक्षा कुमारी आर्या सारडा यांनी दिली.

पंडित राकेश चौरासिया हे जगप्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे पुतणे आहे. दुसऱ्या पिढीच्या संगीतकारमध्ये त्यांनी बासरी वादक म्हणून स्वत:चे एक विशिष्ट स्थान तयार केले आहे. शास्त्रीय आणि गैर-शास्त्रीय मैफलीमध्ये प्रेक्षकांना प्रेरणा देऊन राकेश यांनी जागतिक स्तरावर कीर्ती प्राप्त केली आहे.

राकेश यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. २००७ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 'भारतीय संगीत अकादमी पुरस्कार', २००८ मध्ये 'आदित्य बिर्ला कालकिरण पुरस्कार', २०११ मध्ये 'गुरु शिष्य पुरस्कार', २०१३ मध्ये 'आयडब्ल्यूएपी-पंडित जसराज संगीत रत्न पुरस्कार' आणि २०१३ मध्ये 'पन्नालाल घोष पुरस्कार' इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभांजी पवार यांची बिनविरोध निवड

$
0
0

सभांजी पवार यांची

बिनविरोध निवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या चेअरमनपदी संभाजी पवार तर व्हाईस चेअरमनपदी शशिकांत आव्हाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जिल्हा मजूर संघाचे तत्कालीन चेअरमन हरिभाऊ वाघ व व्हाईस चेअरमन आशा चव्हाण यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे यापूर्वीच दिले होते. त्यामुळे या रिक्त झालेल्या या पदासाठी शुक्रवारी संघाच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया पार पडली. संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदासाठी संभाजी पवार यांच्या नावाची सूचना संचालक शिवाजी रौंदळ यांनी तर त्यास अनुमोदन सतिश सोमवंशी यांनी दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी आव्हाड यांची सूचना संचालक शशिकांत उबाळे यांनी तर, सुरेश भोये यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक अधिकारी सौंदाणे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक शेअर बातमी

$
0
0

सर्वाधिक शेअर झालेली बातमी

भारत-पाक सामन्याचा 'भाव' कडाडला!

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान रविवारी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात रंगणाऱ्या विश्वचषक सामन्याच्या तिकीटांची किंमत ६० हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवादन सभा आज

$
0
0

अभिवादन सभा आज

नाशिक : प्रगतिशील लेखक संघ नाशिक आयोजित प्रागतिक लेखक, नाट्य व सिनेअभिनेते गिरीश कर्नाड यांची अभिवादन सभा शनिवारी (दि. १५) सायंकाळी ५.३० वाजता हुतात्मा स्मारक नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी प्रमोद अहिरे असून प्रमुख वक्ते डॉ. शरद बिन्नर हे असतील. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन राकेश वानखेडे, प्रल्हाद पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हायब्रंट व्होकल’चेवैविध्यपूर्ण सादरीकरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्हायब्रंट व्होकल या आर. जे., व्ही.जे. व निवेदक घडविणाऱ्या प्रशिक्षण संस्थेच्या १३व्या बॅचचा समारोप नुकताच कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील स्वगत सभागृहात उत्साहात झाला. कार्यक्रमासाठी आर.जे. भूषण मटकरी, सुप्रसिद्ध निवेदक अमित उपाध्ये, निवेदिका रसिका कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.

प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात चित्रा इंगळे, अपूर्वा जाधव यांनी गीतगायन केले. भूमिका शिंदे हिने गणेशवंदना, प्रथमेश मराठे याने 'आई मला खेळायला जायचंय' यावर नृत्य सादर केले. जान्हवी राजापूरकर व पार्थ पाटूरकर यांनी एकपात्री सादर केले. शायना पिंजारी, अक्षता साळवे, पूजा वाळूंजे यांनी कविता वाचन केले. चैतन्य गांधी यांची विनोदी मुलाखत वंदना शिंदे यांनी घेतली. अभिनेत्री तेजस्विनी गायकवाड, योगपटू मुग्धा पाटील, राजकीय कार्यकर्ते नंदन भास्करे व अमोल पांढारकर यांनी छोटेखानी नाटिका सादर केली. प्रातिनिधिक स्वरूपात गणेश खैरनार, सारिका राणे, जयश्री भाटिया, श्रीरंग मोरे, मनिषा लुनावत यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्णिता न्याहातकर, डॉ. अमोल पांढारकर व मुग्धा पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सारिका राणे यांनी करवून दिला तर आभार नंदन भास्करे यांनी मानले.

संयोजनासाठी डॉ. राहुल पाटील, नंदन भास्करे, गणेश खैरनार, चैतन्य गांधी, श्रीरंग मोरे व तेजस्विनी कुमावत यांनी प्रयत्न केले. सादरीकरणांनंतर यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मल्लखांबवर मध्य प्रदेशचे वर्चस्व

$
0
0

प्रत्येक जिल्ह्यात मल्लखांब अकादमी; महाराष्ट्रात मात्र उदासिनता

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

महाराष्ट्राच्या मातीतल्या असलेल्या मल्लखांब खेळावर मध्य प्रदेश राज्याने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली असून, येथील सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मल्लखांब अकादमी सुरू करुन महाराष्ट्र सरकारला चपराक दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या कोठूर या गावी बाळंभट दादा देवधर यांनी मल्लखांब हा खेळ सुरू केला. बाळंभट दादा देवधर हे पेशव्याच्या दरबारी सरदार होते. हैद्राबादच्या निजामाकडे असलेला अली आणि गुलाब हे दोन पैलवान महाराष्ट्रात कुस्ती करण्यासाठी आले होते. पेशव्याच्या दरबारी असलेल्या ५२ पैलवानांनी या दोन्ही पैलवानांशी कुस्ती करण्यास नकार दिला. मात्र बाळंभट दादा देवधर यांनी त्यांच्याशी कुस्ती करण्याचा विडा उचलला. कुस्तीच्या अगोदर त्यांनी भरपूर मेहनत घेतली. देवधरांच्या आईने त्यांना सांगितले की वणीच्या गडावर जाऊन देवीचा आशीर्वाद घे तुला नक्की यश मिळेल. आईचे म्हणणे ऐकून त्यांनी वणीच्या गडावर प्रस्तान केले. दर्शनाला जात असताना एका खांबावर माकडाच्या कसरती त्यांच्या नजरेस पडल्या. आपण या दोन पैलवानांना या पद्धतीच्या कसरती करुन निश्चित हरवू शकतो असा यावेळी त्यांना साक्षात्कार झाला. पुढे कोठूरला येऊन बाळंभट दादा देवधर यांनी एक खांब तयार केला या खांबा बरोबर कुस्तीचा सराव करीत असे, म्हणून त्याला मल्लखांब हे नाव दिले. पहिली कुस्ती अली शी होती. अली याला बाळंभट दादा देवधर यांनी मल्लखांबावरच्या कसरती करून क्षणाधार्थ चीतपट केले. हे पाहून गुलाब नावाचा पैलवान पळून गेला. पुढे इंग्रजांच्या राजवटीत हा खेळ मागे पडला मात्र स्वतंत्र्य प्राप्तीनंतर या खेळाला पुन्हा चांगले दिवस येऊ लागले. सुरुवातीला या खेळावर महाराष्ट्राची मक्तेदारी होती, मात्र सरकारने या खेळाकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला हवे होते त्या प्रमाणात ते दिले नाही. त्यामुळे या खेळाची हवी तशी प्रगती होऊ शकली नाही. महाराष्ट्रासह भारतातील २९ राज्यात व ४० देशात हा खेळ खेळला जात आहे. अनेक राज्यांनी या खेळासाटी स्वतंत्र अकादमी स्थापन केल्या आहेत. मात्र महाराष्ट्राने अद्याप त्याबाबत पाऊल उचललेले नाही. दुसरी मल्लखांब विश्व स्पर्धा २०२१ मध्ये न्युयॉर्क येथे होणार असून युएस मल्लखांब फेडरेशनने त्याचे यजमानपद स्विकारले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या क्रीडा मंत्री यशोधरा राजे सिंधीया यांनी या खेळाला मात्र चांगला बुस्ट दिला. मध्य प्रदेश मधील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी अकादमी सुरु केली असून नियमीत प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना कधीच मागे टाकले आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय महापौर चषक मल्लखांब स्पर्धेत मध्य प्रदेशच्या संघाने महाराष्ट्राला हरवून विजेतेपद पटकावले. त्याच प्रमाणे विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत पुरलेल्या मल्लखांबवर जपानच्या काइकी टाकेमोटो हिने प्रथम, इटलीच्या डेलिया चिरुटी हिने द्वितीय क्रमांक तर महाराष्ट्राच्या हिमानी परब हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

…..

महाराष्ट्र सरकारने नोकरीमध्ये आरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मध्य प्रदेशप्रमाणे मल्लखांब आकादमी सुरू व्हावी अशी आमची इच्छा आहे.

-उदय देशपांडे, विश्व मल्लकांब फेडरेशन, जनरल सेक्रेटरी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांवर कांदे फेकून मारा

$
0
0

निर्यात अनुदान हटवल्याप्रकरणी राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रद्द केलेले कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे तसेच बांगलादेशमध्ये कांदा आयातीवर लावलेले आयात शुल्क माफ तात्काळ माफ केले नाही तर केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांवर कांदे फेकू, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणूक संपताच केंद्र सरकारने कांद्यांवरील निर्यात अनुदान रद्द केल्यासह जिल्हा बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुलीवरून शेट्टी आक्रमक झाले आहेत. दुष्काळी उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून जिल्हा बँकेचे अधिकरी व पदाधिकारी कर्जवसुलीसाठी आल्यास त्यांना पळवून लावा असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर शेट्टी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी उपाययोजनाबाबत चर्चा केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टींनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून साडेसात महिने झाले तरी, दुष्काळी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यासाठी राजू शेट्टी आक्रमक झाले असून हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्याना या भागात कांदे फेकून मारू, असा इशारा शेट्टींनी सरकारला दिला आहे. जिल्ह्यात कुठेही दुष्काळी उपाययोजना दिसल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली केली जात आहे. महावितरण कंपनीकडून थकबाकीसाठी वीज तोडली जात आहे. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांकडून कर्जवसुली केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जवसुली करू नये, असे आदेश दिले असतांनाही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोणताही संबंध नसतांना जिल्हा बँकेचा बोजा हा बेकायदेशीरपणे चढ‌वला जात असल्याचा आरोप शेट्टींनी केला आहे.

शेतकऱ्यांवर अन्याय होत असतांना सरकार काय करतय, असा सवाल त्यांनी यावेळी केली. कांद्याला चांगला भाव मिळत असतांना अचानक केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात अनुदान रद्द केले. त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा गडगडले आहे. देशात गरजेपेक्षा जास्त कांदा उपलब्ध असतांनाही, सरकारने हे पाऊल उचलले आहे. सोबत केंद्र सरकारने ग्राहकांचे हित पाहण्यासाठी बांग्लादेशने लावलेल्या कांदा आयात शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे तसेच आयात शुल्क हटवावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. जिल्ह्यातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना सरकार संरक्षण देत असल्याचा आरोपही शेट्टींनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा

नांदगाव तालुक्यातील चांदोरे गावातील लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चारा छावणीची मागणी केली. परंतु, ती पूर्ण न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी गायी आणि जनावरे हे जंगलात सोडून दिले. लोकवर्गणीतून या ठिकाणी चारा छावणी सुरू केल्यानंतर दीडशेच गायी परत आल्यात. चारा आणि पाण्याअभावी जवळपास ५० ते ५५ गायी जंगलात मृत पावल्या. या प्रकरणी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेट्टींनी केली आहे. सामान्य माणसाप्रमाणेच सरकारलाही न्याय लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

अधिकाऱ्यांना पळवून लावा

शेतकऱ्यांच्या जमीन लिलावांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली तरी बँकेकडून लिलाव केले जात आहेत. निफाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनीवरच बँकेने जप्तीचा बोर्ड लावला आहे. हा अधिकार बँकेला कोणी दिला? असा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. तर बँकेने लिलावाचा प्रयत्न केला तर कायदा हातात घेऊन लिलावासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना पिटाळून लावा, असा सल्ला शेट्टींनी शेतकऱ्यांना दिला आहे.

विधानसभेच्या २५ जागा लढविणार

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरोधात सर्व विरोधकांची एकजूट व्हावी, यासाठी आपण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचा खुलासा शेट्टी यांनी यावेळी केला. या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला पराभूत करण्यासाठई सर्व महाआघाडीतील सर्व घटकांनी एकत्रित येत निवडणूक लढवावी असा आपला प्रयत्न आहे. युती सरकारला पराभूत करणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगत स्वाभिमाना संघटना विधानसभेच्या सुमारे २० ते २५ जागा लढवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमधील गृहकलह उघड

$
0
0

विश्वासात घेतले जात नसल्याचा उपमहापौरांचा पदाधिकाऱ्यांवर आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असतांना महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा दुफळी निर्माण झाली आहे. महापालिकेच्या कामकाजात आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप उपमहापौर प्रथमेश गिते यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

गिते यांनी प्रसार माध्यमांकडून थेट नाराजी व्यक्त केली आहे. महापौर, सभागृह नेते, गटनेते विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. बैठकांना आपल्याला बोलाविले जात नाही, तशा कार्यक्रमाची माहिती देखील दिली जात नसल्याची कैफियत मांडत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबाबत उपमहापौरांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. महापालिकेत प्रथमच भाजपला एकहाती सत्ता मिळाली. परंतु, त्याचा वापर भाजपचे काही नेते शहराऐवजी स्वयंविकासासाठीच करीत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात असतांना आता पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सव्वादोन वर्षे झाली. मात्र, या काळात शहर हिताचे एकही काम भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांचाच भ्रमनिरास झाला आहे. सत्ता आल्यानंतर आमदारांमध्ये महापालिकेवर वर्चस्व गाजविण्याची स्पर्धा लागली. त्यातून तत्कालिन आयुक्तांची कोंडी करण्यात आली. आयुक्तांना बदलीला सामोरे जावे लागले. त्यानंतर आलेल्या तुकाराम मुढे आणि भाजपमध्ये संघर्ष उभा राहिला. यात काळात मुढेंनी भाजपमध्ये दोन गट तयार करून त्यांचा सोयीने वापर केला. त्यामुळे स्थायी समितीतच भाजप पदाधिकाऱ्यांनी सभापतींविरोधात दंड थोपटले. भाजपच्या नवीन नगरसेवकांना कामे करताना पदाधिकाऱ्यांची मदत होत नसल्याचा वाद थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहचला होता.

निवडणुकीत बसणार फटका

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधील हा संघर्ष काही काळासाठी थांबला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेली असताना पुन्हा पक्षातंर्गत संघर्ष उफाळून आला आहे. उपमहापौर प्रथमेश गिते यांनी माध्यमांकडून थेट नाराजी व्यक्त करत महापौर, सभागृह नेते, गटनेते विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, बैठकांना बोलाविले जात नाही. एखाद्या कार्यक्रमाची माहिती फोनवरून देखील कळविली जात नसल्याची कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली आहे. या अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपला आगामी महापौर, उपमहापौर निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेत होणाऱ्या महत्त्वाच्या विषयावरील बैठकांनाही बोलविले जात नाही. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकांमध्येही मला टाळले जात आहे. महत्त्वाच्या विषयांमध्ये उपमहापौरांनाही विश्वासात घेतले जात नाही.

- प्रथमेश गिते, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोर माडसांगवी शिवारात असल्याचा संशय

$
0
0

पंचवटी : उंटवाडी येथील दरोड्यातील संशयित दरोडेखोर औरंगाबाद रोडवरील माडसांगवी शिवारातील शिंदेवाडी परिसरात शुक्रवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास येथील शेतकऱ्यांना दिसले. या शेतकऱ्यांनी या दरोडेखोरांना हटकले असता, संशयित घाबरून पळाले. ही माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळताच त्यांच्यासह पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली आणि पोलिस कर्मचारी या परिसरात दाखल झाले. त्यांनी चारी नं. ६ पासून चारी नं. ९ पर्यंतचा सर्व मळे परिसर पिंजून काढला. दरम्यान, माडसांगवी शिवारातून औरंगाबाद रोड आणि मुंबई-आग्रा महामार्गाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांच्या चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. या दिशेने येणारी वाहने थांबून त्यांची तपासणी करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निताणेत ऊस जळून खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सटाणा

तालुक्यातील निताणे येथील जयंत देवरे यांच्या शेतात वीजवाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसाबरोबरच ठिबकचे पाइपही जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतावरून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट झाल्याने ही आग लागली. आधीच पाणी नसल्याने ऊसाच्या सुकलेल्या पाचटाने तत्काळ जोरात पेट घेतल्याने लागवड क्षेत्रातील निम्यापेक्षा अधिक ऊस व पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप जळाल्याने मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मका वाचविण्यासाठी युनोचे प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड मका पिकावर नवीन अमेरिकन लष्करी अळीचे गंभीर संकट उद्भवल्याने जगभरात मका उत्पादक देश संकटात सापडले आहेत. मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव कर्नाटकात आढळल्याने देशातील मका उत्पादनात यंदा ३० ते ४० टक्के घट होण्याचे संकट आहे. युनो या जागतिक संघटनेनेही भारतापुढील संभाव्य संकटाची दखल घेऊन अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती पुण्यात एका कार्यशाळेमधून दिली. जगभरातील मका उत्पादक देशांतील मकाचे उत्पादन अमेरिकन लष्करी अळीच्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात घटले आहे. अमेरिकन लष्करी अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या देशांनी केलेल्या उपायोजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. आफ्रिका आणि युरोप खंडातील मका उत्पादक देशांतील मका पिकावर अमेरिकन लष्करी अळ्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. या अळीने भारतातही प्रवेश केला आहे. ही बाब वेळीच लक्षात आली नाही तर काही मिनिटांत लाखो हेक्टर क्षेत्राला बाधा पोहचू शकते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात अमेरिकन लष्करी अळींना रोखण्याचे राज्याच्या कृषी विभागासह मका उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. यासंदर्भात युनोनेही भारतातील मका पीक वाचविण्यासाठी मंगळवारी पुणे येथे कृषी आयुक्त कार्यालयात विशेष कार्यशाळा आयोजित करुन राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या संकटाबाबत माहिती दिली. या सुचविल्या उपाययोजना हलक्या जमिनीत पीक घेऊ नये. कडधान्यांची आंतरपिके घ्यावीत. स्पोडोल्यूर्सचे कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांत अडकणाऱ्या लष्करी अळ्यांच्या संख्येवर बारकाईने लक्ष ठेवावे. प्रमाण वाढल्यास ताबडतोब स्पिनेरोटॅम (११.७%) एससी, क्लोरॅन्ट्रॅनिलोप्रोल (१८.५%) एससी, थायोमेथॉक्झॅम (१२.६%) एससी आणि लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन (९.५%) झेडसी या रसायनांचा समावेश असलेल्या शेती औषधांची फवारणी करण्याचे आदेश सर्व राज्यांच्या कृषी विभागांना भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या फरिदाबाद (हरियाणा) येथील वनस्पती संगरोध आणि संग्रह निदेशालयाने नुकतेच दिलेले आहेत. नाशिक विभागात यंदाच्या खरिपात ४२२६.०३ लाख हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी प्रस्तावित आहे.  मक्यावरील नवीन अमेरिकन लष्करी अळीच्या संकटाबाबत विभागातील शेतकऱ्यांसाठी उद्बोधन कार्यशाळा आयोजित करून उपाययोजनांबाबत माहिती दिली. या संकटाचे दक्षिण भारतात आगमन झाले असून महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी अमेरिकन लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मका पिकाचा विमाही काढावा. -रमेश भताणे, विभागीय कृषी सहसंचालक,नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मिरातील स्थलांतरितांना प्रतिनिधित्व द्या

$
0
0

ज्येष्ठ अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाकव्याप्त जम्मू आणि काश्मिरमध्ये स्थलांतरीत झालेल्या साडेसात लाख नागरिकांना विधानसभा निवडणुकीत प्रतिनिधीत्व द्यावे. प्रतिनिधित्वासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २४ जागा त्यांना लढू द्याव्यात, असे आवाहन ज्येष्ठ अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात याबाबत 'वुई द सिटिजन्स' या संस्थेतर्फे अर्ज करण्यात आला असल्याचेही कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

गजरा फाउंडेशन, नाशिक यांच्यावतीने 'धरतीवरचा स्वर्ग काश्मिर नरकमय कसा झाला' या विषयावर महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी व्याख्यान झाले. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, भाजप नेते लक्ष्मण सावजी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कुलश्रेष्ठ म्हणाले, की लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनसाठी ज्या दोन जागा राखीव ठेवल्या जातात, त्या बगजीस्थानमधील नागरिकांना प्रतिनिधित्व म्हणून देण्यात याव्यात. भारतातील ५०० ठिकाणांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. तेथे पोलिस कोणताही कायदा अमलात आणू शकत नाहीत. तेथे जाऊ देखील शकत नाहीत त्यामुळे आता समाजानेच कठोर होण्याची गरज आहे. भारताला विदेशापासून कोणतीही भीती नाही, आंतरिक आव्हाने इतकी आहेत की ते निपटवण्यात शक्ती वाया जात आहे. कॅन्सर पसरला जात असेल तर त्याचा इलाज करा, ऑपरेशन करा; परंतु कॅन्सर नष्ट झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

मंदिरातील रक्कम शिक्षणासाठी वापरावी

देशातील मंदिरांमध्ये भक्तांकरवी दान स्वरूपात जो पैसा येतो तो सरकार जमा का होतो, असा प्रश्न करून त्या पैशांचा हक्क कलेक्टरला देण्यात येऊन सनातन संस्कृतीचे शिक्षण देण्यासाठी त्याचा वापर व्हावा, असे आवाहन पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. नागरिकांनी ठरवावे, की मी मंदिरात देणारा पैसा सरकारला कोणत्याही स्थितीत नेऊ देणार नाही, त्या पैशांचा वापर पुढे कसा होतो ते माहीत नसल्याने हा निर्णय घेण्यात यावा, असेही कुलश्रेष्ठ यांनी सूचविले.

प्रेक्षकांची तोबा गर्दी

कालिदास कलामंदिर व बाल्कनी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली असल्याने फोटो गॅलरीच्या शेजारी स्क्रिन लावण्यात आली होती. तेथेही प्रचंड गर्दी होती. नागरिकांनी वेळोवेळी जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. नंदन रहाणे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरवरील हल्लाचा ‘आयएमए’तर्फे निषेध

$
0
0

काळ्या फिती लावून शहरात काम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेने तीव्र निषेध केला. याप्रकरणी आपल्या मागण्यांचे निवेदन नाशिक शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले तर सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर पेशंटच्या नातेवाइकांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर डॉक्टरची प्रकृती अतिशय नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आयएमएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. 'आयएमए'कडून वारंवार आवाज उठवित आहे. केंद्र सरकारने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणाऱ्या हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे तेथील रुग्ण वेठीस धरले जातात. तसेच अशा गोष्टींमुळे रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीच्या खाली असल्याने त्यांची कार्यक्षमताही खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणीही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रुग्ण दाखल करू धजावणार नाही. घटल्या प्रकाराची गंभीर दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नाशिक आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सचिव डॉ. विशाल गुंजाळ यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे. याप्रसंगी आयएमएचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्समधून सोनसाखळी लंपास

$
0
0

नाशिक : भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईच्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी पेंडल असलेली सोनसाखळी हातोहात लांबविल्याची घटना देवळाली कॅम्प येथील रविवार बाजार भागात घडली. अनिल नंदराम परदेशी (रा. देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दिली. २६ मे रोजी सायंकाळी परदेशी उल्हासनगर येथे राहणाऱ्या त्यांच्या आत्या करुणा अशोक धनतोले यांना घेऊन भाजीबाजारात खरेदीसाठी गेले होते. रविवार बाजार मार्केट परिसरात दोघे आंबे खरेदी करीत असताना अज्ञात चोरट्यांनी धनतोले यांच्या खांद्यास अडकविलेल्या पर्सला ब्लेड मारून सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली.

..

प्रवासात पाकीट चोरी

नाशिक : बस प्रवासात चोरट्यांनी प्रवाशाच्या पाकिटावर डल्ला मारल्याची घटना शालिमार ते सारडा सर्कल दरम्यान घडली. पाकिटात तीन हजाराची रोकड होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोईस कली तैयबअली साहिल (वय ६७, रा. शंकरनगर, टाकळीरोड) यांनी तक्रार दिली. दरम्यान, घटनेचा उलगडा होताच बस थांबवून प्रवाशांची तपासणी केली असता समीरउल्ला बाबू खान (वय ३० रा. मेहमूदनगर, वडाळागाव) हा संशयित हाती लागला.

...

उघड्या घरातून चोरी

नाशिक : उघड्या घरात घुसून चोरट्यांनी सुमारे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. छाया सचिन सोनवणे, शुभम पवार व कमल राजेंद्र पवार (रा. वैदूवाडी, दिंडोरीरोड) अशी संशयितांची नावे आहेत. मीनाबाई रामचंद्र साळवे (रा. म्हसोबा मंदिरामागे, वैदूवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली. मीनाबाई साळवे मंगळवारी (दि. ११) दुपारी किरकोळ कामानिमित्त घराबाहेर पडल्या. चोरट्यांनी उघड्या घरात शिरून कपाटातील दहा हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची पोत व वेढा असा सुमारे १७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठरोड पुलाजवळ फेकला जातोय कचरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी पेठरोड परिसरातील फुलेनगरच्या झोपडपट्टीच्या भागातील कचरा हा थेट येथील कालव्यावरील पुलावरच फेकण्यात येतो. त्यामुळे हा भाग जणू काही कचरा फेकण्यासाठी हक्काची जागा असल्यासारखा वापरला जात आहे. परिणामी अस्वच्छता आणि दुर्गंधींचा सामना परिसरातून ये-जा करणाऱ्यांना करावा लागत आहे. पेठनाक्यापासून पुढे जाणाऱ्या या पेठरोडच्या मार्गावर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा फळ आणि धान्य बाजाराचे मार्केट आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय असल्याने येथे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच हा राज्यमार्ग असल्यामुळे इतरही वाहनांची संख्या मोठी असते. अशा या वर्दळीच्या रस्त्यांच्या या मार्गावरच फुलेनगरच्या परिसरातून कचरा थेट या कालव्याच्या पुलावर टाकला जात आहे. त्या पुलावरच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे कचरा पडलेल्याने तेथे कायम अस्वच्छता असते. पुलाजवळील अस्वच्छतेत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांमुळे आणखी भर पडते. दाट वस्तीच्या भागात अजूनही शौचालये करणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी येथे मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी तिचा वापर केला जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचारी निदर्शने

जखमी हरणाला मिळाले जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी मार्गावर वावी येथील शिंदे वस्तीनजीक शुक्रवारी (दि. १४) दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या हरणाला उपचार करून वावी पोलिसांनी सुखरुप वनविभागाच्या ताब्यात दिले. शिंदे वस्तीनजीक अज्ञात वाहनाने हरणाला धडक दिल्याचे रस्त्यावरील नागरिकांनी पाहिले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. परिसरातील ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत असलेल्या हरणाला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. खासगी पशुवैद्यक डॉ. रमेश देव्हाड यांनी उपचार करून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या हरणास शुद्धीवर आणले. पुढील उपचारासाठी पोलिसांच्या मदतीने वनविभागाचे के. आर. इरकर व नारायण वैद्य यांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images