Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बंदूकधारी सुरक्षारक्षकांची उणीव

0
0

परवाना देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे पोलिस आयुक्तांचे आश्वासन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बहुतांश छोट्या-मोठ्या बँका आणि संस्थांना बंदुकधारी सुरक्षारक्षकांची उणीव असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाली. आरोपी अगदी सहजपणे रेकी करून दरोड्याची तयारी करतात, हे सुद्धा स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढाल असलेल्या संस्थांना बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी शहरात नाशिकरोड येथील मुत्थुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बनावट पोलिसांनी दिवसाढवळ्या लूट केली होती. पोलिस बनून आलेल्या आरोपींनी एका गुन्ह्यातील चोरीचे सोने तपासण्याच्या नावाखाली हे कृत्य केले होते. मण्णपूरम गोल्डमध्येही सोन्याची लूट करण्यात आली होती. एमजीरोडवर एटीएममध्ये रोकड टाकण्यासाठी गेलेल्या व्हॅनमधील पैशांची बॅग लंपास करण्याची घटनासुद्धा अद्याप ताजी आहे. फायनान्स कंपन्यांमध्ये लूटमारीचे प्रकार सातत्याने घडत असताना, तेथील सुरक्षेकडे मात्र डोळेझाक केली जाते. या दरोड्याच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तालय स्थरावरदेखील बैठक घेण्यात येणार असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी काळात सुरक्षा व्यवस्थेतील ही उणीव भरून काढण्यासाठी सर्वतोपरी योजना राबविण्याचे आश्वासन नांगरे पाटील यांनी दिले.

...

बँका, संस्थांबरोबर आज बैठक

शहरातील बँका आणि संस्थांमध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असणे गरजेचे आहे. याबाबत आज, शनिवारी पोलिस ठाणेनिहाय अशा संस्था आणि बँकांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. बंदूकधारी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याबाबत काही अडचणी असल्यास आणि त्याबाबतचे परवाने व इतर तांत्रिक बाबी प्रलंबित असल्यास त्यास चालना देण्यात येईल, असे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतीवर अत्याचार

0
0

हॉटेल मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मध्यवर्ती भागात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणीवर तेथील कामगारानेच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयितास मदत करणाऱ्या हॉटेलमालकासह अन्य कामगाराविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

इरफान उर्फ राजू रशिद कुरेशी व निवृत्ती दत्तात्रेय सोनवणे असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. फुलेनगर भागातील पीडित तरुणी गेल्या वर्षभरापासून ठक्कर बाजार परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करते. तेथे तिची ओळख इरफान उर्फ राजू या कामगाराशी झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. मागील पाच महिन्यांपासून हे प्रकरण सुरू होते. या काळात संशयित इरफानने विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या कृत्यास संशयित निवृत्ती सोनवणे उर्फ बाळू मामा या कामगारासह हॉटेलमालक हेमंत जनिमल सबलानी यांनी त्यास मदत केल्याचा आरोप पीडित युवतीने आपल्या फिर्यादीत केला आहे. हॉटेलमालक आणि दुसऱ्या कामगाराने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. युवतीने त्यास विरोध केल्याने संबंधिताकडून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यामुळे हादरलेल्या युवतीने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघा संशयितांना अटक केली. हॉटेलमालकाची प्रकृती बिघडल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १७) पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः अज्ञातांकडून ४ ते ५ वाहनांची तोडफोड

0
0

नाशिक

नाशिक शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. सशस्त्र दरोड्याच्या घटनेने नाशिक शहर हादरले असतानाच शहराद दशहत कायम राहावी यासाठी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. लाखो रुपयांच्या गाडीचे नुकसान करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

नाशिकमधील म्हसरूळ परिसरात पहाटे दोन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी ४ ते ५ गाड्यांची तोडफोड केली आहे. या तोडफोडीत गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्याची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तोडफोड करण्यात आलेल्या गाड्यामध्ये स्कॉर्पिओ आणि फिगो या महागड्या गाड्याचा समावेश आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून गुन्हेगारांकडून पोलिसांना वारंवार आव्हान दिले जात आहे. या गाड्याची नासधूस कोणी व कशासाठी केली याचा शोध पोलीस घेत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जितेंद्र आव्हाड यांना पुरोगामी संघटनांचे बळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात नेहमीच सोशल मीडियावर आक्रमक भूमिका मांडणारे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी संघासह प्रतिगामी संस्था आणि संघटना सरसावल्या असतानाच, आता आव्हाड यांच्या समर्थनार्थ पुरोगामी आणि समविचारी संघटना मैदानात उतलल्या आहेत. प्रतिगामी संघटनांचा डाव हाणून पाडण्यासाठी आणि आव्हाड यांना पुन्हा विजयी करण्यासाठी पुरोगामी संघटना आता पुढे आल्या आहेत. नाशिकमध्ये राज्यव्यापी बैठक घेऊन या संघटनांनी आव्हाड यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची घोषणा पुरोगामी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा-मुंब्रा मंतदारसंघाचे आमदार डॉ. आव्हाड भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेविरोधात नेहमीच आक्रमक असतात. सोशल मीडियावर पोस्ट टाकून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक कृतीचा निषेध ते करीत असतात. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आव्हाड यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. संघासह प्रतिगामी संघटनांना कळवा- मुंब्रा या मतदारसंघात जाऊन आव्हाड यांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखली जात असल्याचे बोलले जाते. त्या पार्श्वभूमी पुरोगामी व समविचारी संघटनाही डॉ. आव्हाड यांच्या समर्थनार्थ अॅक्टिव झाल्या आहेत. नाशिकमध्ये शनिवारी पुरोगामी विचार मंच, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, छत्रपती युवा सेना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, पँथर क्रांतिवीर जनरल कामगार सेना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, तुफान सेना, युवा स्वाभिमानी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पक्ष अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रसाद देशमुख, यश बच्छाव, राजू देसले, विद्याधर घुगे, विजय वाहुळे, मदन गाडे-पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी प्रतिगामी संघटनांचा निषेध करीत, आव्हाड यांच्या पाठीशी राहण्याची घोषणा केली आहे. प्रतिगामी संघटनांच्या विरोधात आम्ही कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाड यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू, असा निर्धार या वेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपट्टी वसुलीत ६० टक्के घट

0
0

बिलवाटप न झाल्याचा परिणाम

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चालू आर्थिक वर्षात महापालिकेची घरपट्टी वसुली तब्बल ६० टक्क्यांनी घटली आहे. गेल्या आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १२ जूनपर्यंत ३९ कोटींची वसुली झाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीला घरपट्टी विभागाचे कर्मचारी प‌ळविल्याने नागरिकांना बिलेच वाटप झाली नाहीत. त्यामुळे या कालावधीत केवळ १६ कोटींची वसुली झाली. त्यामुळे निवडणुका संपताच वसुलीवर भर दिला असून, सहा विभागांत घरपट्टी बिलांचे वाटप करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात जीएसटी अनुदान आणि नगररचना नंतर घरपट्टी विभागाचा वाटा असतो. दरवर्षी साधारण शंभर कोटींपर्यंत घरपट्टी वसूल होते. शहरात चार लाख २० हजार घरपट्टीचे ग्राहक असून, बिलांचे जानेवारीपासूनच वाटप करण्यास सुरुवात होते. त्यानंतर नागरिक एप्रिलपासून घरपट्टी भरण्यास सुरुवात करतात. परंतु, गेल्या वर्षापासून घरपट्टीवाढीचा घोळ सुरू असल्याने यंदा त्याचा फटका पालिकेला बसला आहे. जुन्या मिळकतींना १८ टक्के करवाढ, तर नवीन मिळकतींच्या घरपट्टीत भरमसाठ वाढ झाल्याने नागरिक संभ्रमात आहेत. त्यातच महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणुकीच्या कामासाठी पळवले होते. त्यामुळे जानेवारी महिन्यात सुरू झालेली घरपट्टी बिले वाटपाची मोहीम मध्येच थांबली. सहा विभागांत जेमतेम १० टक्केच घरपट्टीच्या बिलांचे वाटप झाले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात त्याचा वसुलीवर परिणाम झाला. बिले वेळेत न मिळाल्याने नागरिकांनी घरपट्टी भरण्याकडे पाठ फिरवली आहे.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १२ जूनपर्यंत ३९ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीच्या स्वरुपात जमा झाले होते. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १२ जूनपर्यंत अवघे १६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टी वसुलीत तब्बल २३ कोटींची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कर विभागाने आता धावपळ सुरू केली आहे. सहा विभागांत घरपट्टीची बिले वाटपाचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले आहे. बिल मिळताच तात्काळ भरावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

...

ऑनलाइन कर सवलतीचा प्रस्ताव

घरपट्टी वसुलीत मोठी घट आल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला चूक उमगली असून, करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन कर सवलत योजनेचा विचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'डिजिटल इंडिया'च्या संकल्पपूर्तीसाठी घरपट्टी, पाणीपट्टीसाठी ऑनलाइन कर सवलत योजना पूर्ववत सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी करवसुली विभागाला दिले आहेत. यापूर्वी कर सवलत योजना सुरू होती, मात्र तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही योजना बंद केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारताबरोबरील चर्चासमानतेच्या पातळीवर

0
0

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा सूर

वृत्तसंस्था, बिश्केक (किर्गिझस्तान)

पाकिस्तान भारताबरोबर समानतेच्या स्तरावर आणि प्रतिष्ठेनेच चर्चा करेल. आता, दोन्ही देशांमधील सर्व मुद्द्यांविषयी पाकिस्तानबरोबर चर्चा करायची की नाही, हे भारतावरच अवलंबून आहे, असा सूर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी लावला.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आणि पाकिस्तानने भारताबरोबर चर्चेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, ही भारताची भूमिका स्पष्ट आहे. यानंतरही, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाईसाठी फारशी पावले उचलण्यात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर, शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषेदेमध्ये मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यामध्ये ओझरती भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुरेशी यांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि त्यांच्यात थोडा संवाद झाला, असे त्यांनी सांगितले. मात्र, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू न होण्यासाठी पाकिस्तानने भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, 'भारतीय सरकारने आपली मतपेढी कायम ठेवण्यासाठीच निवडणुकीच्याच मानसिकतेमध्ये होते. पाकिस्तानला जे करायचे आहे, ते केले आहे. आता भारताला निर्णय घ्यायचा आहे. मात्र, ही चर्चा समानतेच्या पातळीवर आणि प्रतिष्ठेने होईल. आम्ही कोणाच्या मागे पळणार नाही किंवा हट्टीपणाही करणार नाही.'

इम्रान खान यांच्याबरोबरच शाह मेहमुद कुरेशी यांनीही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर याना पत्र लिहून, द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३८८ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील १३८८ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली.

राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मागील वर्षापासून ऑनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ ते १३ जून या कालावधीत शिक्षकांना बदल्यांसाठी संगणकीय अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. या बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील मराठी माध्यमातील १३७३ तर उर्दू माध्यमातील १५ अशा एकूण १३८८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये विशेष संवर्ग १ मधील २३१, विशेष संवर्ग २ मधील २१८, बदली अधिकार प्राप्त संवर्गातील १४८ व बदली पात्र संवर्गातील ७९१ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

अशा झाल्यात बदल्या

तालुका.......शिक्षक संख्या

निफाड..............१४३

मालेगाव..............१४२

चांदवड..............११५

इगतपुरी..............११४

त्र्यंबकेश्वर..............११४

येवला..............१०८

दिंडोरी..............९६

पेठ..............८७

सिन्नर..............८६

कळवण..............८४

सुरगाणा..............७६

नांदगाव..............७५

बागलाण..............७३

देवळा..............५७

नाशिक..............१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकथा

0
0

लोगो - बालकथा

भावंडं आणि समज

उमा खर्डिकर, नाशिक

एका मोठ्या शहरामध्ये पुष्प नावाचा बंगला होता. या बंगल्यात आई-बाबा आणि त्यांची दोन मुले राहत होती. मीरा आणि राज या दोन्ही भावंडांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. राज लहान आणि मीरा मोठी होती. दोघेही सोबत खेळायचे, एकत्र अभ्यास करायचे. शाळेत कोणी राजला त्रास दिला की, मीरा त्याच्या बाजूने उभी रहायची. असंच एकदा राज आणि मीरा शाळा सुटल्यावर घरी आले. त्यांनी शहाण्या मुलासारखे हात पाय धुतले. कपडे बदललून दूध प्यायले. आईने त्यांना चॉकलेट दिले. मीरा पहिले बाहेर गेली तेवढ्यात राजने तिचं चॉकलेट ही स्वतःच्या खिशात ठेवले. राजही तिच्या मागोमाग मैदानावर खेळायला गेला. मीराला मैदानावर गेल्यावर एक सवय होती. ती सवय अशी की, जास्वंदीच्या फुलाशी गप्पा मारणे. तिला जास्वंदीच्या फुलांशी खेळायला खूप आवडायचे. दिवसभरात काय केले हे ती त्या फुलांशी बोलायची. तिने नेहमीप्रमाणे राजला पुढे खेळायला जायला सांगितले. ती त्या सुंदर जास्वंदीच्या फुलांशी बोलू लागली.

ती फुलांना म्हणाली की, 'मला तू खूप आवडतेस जास्वंदी. किती सुंदर आहेस तू!' असं म्हणून ती खेळण्यासाठी मागे फिरली. तेवढ्यात एक चमत्कार घडला. 'थांब मीरा', असा आवाज आला. मीरा चपापली. तिला कोण बोलतंय हेच कळत नव्हते. पुन्हा आवाज आला. 'इकडे पाहा. आता तू माझ्याशी गप्पा मारत होतीस ना', मीराने जास्वंदाकडे पाहिले. खरंच जास्वंदीचे फुल बोलत होते. मीराला आश्चर्याचा धक्का बसला. पुन्हा फुल बोलू लागले, 'मीरा तू खूप प्रामाणिक मुलगी आहेस. या अगोदरही तू माझ्याशी गप्पा मारल्या आहेत. म्हणून मी तुला आज एक गोष्ट सांगणार आहे. तुझ्या आईने तुला दिलेले चॉकलेट तू आज विसरलीस आणि तशीच मैदानावर आलीस. आता घरी गेलीस तुला चॉकलेटची आठवण येईल पण ते नसेल.' मीरा म्हणाली, 'तुला कसे माहीत?'. जास्वंदीने उत्तर दिले की, 'ते चॉकलेट राजच्या खिशात आहे.' एवढे बोलून जास्वंदीचे फुल बोलण्याचे बंद झाले.

मीरा ताबडतोब राजला आवाज देऊ लागली. राजला घरी घेऊन गेली. तिने आईला तिच्या चॉकलेट संदर्भात विचारले. आईने तिला टेबलवर पाहायला सांगितले. पण तिथे चॉकलेट नव्हतेच. मग तिने राजला विचारले. राज नाकबूल झाला. तिने आईला हाक मारुन राजचे खिसे तपासायला लावले. त्यात मीराचे ही चॉकलेट होते. मीरा राजवर खूप रागावली. ती तिच्या खोलीत गेली. राजला वाईट वाटले. मग आईने राजला रागावले. आईने त्याला समजावून सांगितले की, 'तू मागितले असतेस तर मी तुला दोन चॉकलेट दिले असते. पण, असे खोटे बोलणे गैर आहे.', असे आई म्हणाली. 'तुला खोटं बोलायची सवय लागली, तर शाळेत तुला शिक्षा होईल. यामुळे तुझ्याबाबत गैरसमज वाढण्यास सुरुवात होईल', असे त्याला समजावून सांगण्यात आले. राजला त्याची चूक समजली. त्याने आईला वचन दिले की, तो कधीही खोटे बोलणार नाही. त्याने मीराची माफी मागितली. त्यानंतर दोघांनी एकत्र चॉकलेट खात एकमेकांसोबत खेळण्यास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारशे टँकर्सची तृष्पूर्तीसाठी धाव

0
0

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सुमारे १ हजार फेऱ्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळग्रस्त खेडोपाड्यांमधील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी सहा महिन्यांपासून टँकर धावत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या संख्येची चारशेकडे वाटचाल सुरू असून जिल्ह्यात आजमितीस ३८९ टँकर्स तृष्णातृप्तीचा आनंद देण्याचे काम करीत आहेत.

यंदाच्या दुष्काळाने सरकार, प्रशासन आणि राज्यातील रहिवाशांच्या तोंडचेही पाणी पळविले आहे. गतवर्षी सरासरीहूनही कमी झालेला पाऊस आणि त्यामुळे काठोकाठ भरू न शकलेली जलाशये यामुळे यंदा जलसंकट अधिक तीव्र होणार, याचे संकेत मिळाले होते. डिसेंबर २०१८ पासूनच त्याचा प्रत्यय येऊ लागला. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. दिवसागणिक तहानलेली गावे, वाड्या आणि त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या वाढतेच आहे. विशेष म्हणजे शतक, द्विशतक, त्रिशतक पार केल्यानंतर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या संख्येने आता चारशेकडे वाटचाल सुरू केली आहे.

३८९ टँकर्सची मदत

जिल्ह्यात सद्यस्थितीत ३८९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. नाशिक आणि कळवण हे दोन तालुके वगळता अन्य १३ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. या तालुक्यांमधील २८२ गावे आणि ९५७ वाड्या अशा एकूण १२३९ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पोचविण्याचे काम सध्या सुरू आहे. याकामी खासगी ३६९ आणि सरकारी २० अशा ३८९ टँकर्सची मदत घेण्यात येते आहे.

टँकर्सच्या ९९८ फेऱ्या मंजूर

खेडोपाडी आणि वाड्या वस्त्यांवर पाणी पोहोचविण्यासाठी टँकरला फेऱ्या माराव्या लागतात. आतापर्यंत टँकर्सच्या अशा ९९८ फेऱ्या मारण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी आजमितीस ८६८ फेऱ्या होत आहे. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात काळाबाजार होऊ नये, आहे त्यापेक्षा अधिक फेऱ्या दाखविल्या जाऊ नयेत, यासाठी जीपीएस प्रणालीची मदत घेण्यात येते आहे.

तालुकानिहाय टँकरस्थिती

तालुका गाव/वाड्या टँकर

बागलाण ५४ ३९

चांदवड ९० २३

दिंडोरी १ १

देवळा ६५ १९

इगतपुरी २६ १३

मालेगाव १४७ ५८

नांदगाव ३६० ७८

नाशिक ० ०

निफाड १ १

पेठ ९ ६

सुरगाणा २१ १०

सिन्नर ३२१ ६२

त्र्यंबक ३१ ८

येवला ११३ ६५

एकूण १,२३९ ३८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांतर्फे दोन दिवस बंद

0
0

कोलकाता घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलनही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. १६) आणि सोमवारी (दि. १७) डॉक्टरांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. यात नाशिकचे डॉक्टरही सहभागी होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्व प्रकारच्या बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मात्र चालू राहतील.

केंद्र सरकारने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे अशी मागणी या आंदोलनातून केली जाणार असल्याची माहिती 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे व सचिव डॉ. विशाल गुंजाळ यांनी दिली. कोलकाता येथील घटनेत डॉक्टर अत्यवस्थ अवस्थेत असून त्याची मृत्युशी झुंज सुरू आहे. परंतु, प्रशासन अद्याप गंभीर नाही. 'आयएमए'ने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. वैद्यकीय व्यावसायिक आणि हॉस्पिटल्स यांचेवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहेत. 'आयएमए'ने याविरोधात वेळोवेळी आवाज उठवला. आताही याबाबत पंतप्रधान आणि केंद्रीय गृह मंत्री यांना निवेदन पाठवणार असल्याचेही 'आयएमए'तर्फे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या आंदोलनास निमा, महाराष्ट्र शाखा तसेच होमिओपॅथी असोसिएशन व एम. आर. असोसिएशन यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौंटुबिक वादाच्या १७५ तक्रारी निकाली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक वादाच्या प्रकरणात समुपदेशन करून ग्रामीण पोलीस दलाच्या महिला सुरक्षा विभागाने १७५ कुटुंबाचे संसार रुळावर आणले. पती व सासरच्या विरोधात जिल्ह्यातून गेल्या वर्षी ४४० तर यावर्षी २६३ तक्रारीची नोंद झाली. त्यानंतर यात समुपदेशन करून त्यातील १७५ तक्रारीचा निपटारा करण्यात आला.

नाशिक पोलिस ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा विभागाने ही कामगिरी केली. यात पोलिस उपनिरीक्षक पूनम श्रीवास्तव व पोलिस कर्मचाऱ्यांनी हे समुपदेशन केले. सासरी महिलांवर संशय, शारिरीक तक्रार, वंध्यत्व, पैशाची मागणी, मुलींचा जन्म, व्यसनाधिनता, विवाहबाह्य संबध, मानसिक व शारिरीक छळ, अशाप्रकारच्या तक्रारी होत्या. त्यात पोलिसांनी दोन्ही कडील मंडळींना समुपदेशन देश या तक्रारी निकाली काढल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मलखांब प्रिय आहे...’

0
0

जागतिक मलखांबदिनी दोनशे खेळाडूंची प्रात्यक्षिके

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पद्ममासन, वृश्चिकासन, एक पाच शिरासन, फरारा, पताका अन् वाघूळउडी यांसारखी विविध प्रकारची मलखांबाची प्रात्यक्षिके दाखविणारे खेळाडू, टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना प्रोत्साहन देणारे पालक, 'मलखांब सर्वाधिक प्रिय वाटतो...' हे गाणे गात रोप मलखांबासह इतर प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधणारे खेळाडू, प्रत्येक प्रात्यक्षिकाला मिळणारा टाळ्यांचा दर्दी प्रतिसाद... असे वातावरण यशवंत व्यायामशाळेत पाहायला मिळाले. निमित्त होते 'जागतिक मलखांब दिनाचे'.

जागतिक मलखांब दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा मलखांब असोसिएशन आणि यशवंत व्यायामशाळेतर्फे शनिवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मलखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. दोनशेपेक्षा अधिक खेळाडूंनी या वेळी मलखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, मलखांब प्रशिक्षक आबासाहेब घाडगे, यशवंत जाधव, उत्तरा खानापुरे आदी उपस्थित होते. नाशिकच्या मातीतून विकसित झालेला मलखांब जागतिक स्तरावर पोहोचविण्यात नाशिकच्या खेळाडूंचा विशेष वाटा असून, ही परंपरा अविरत सुरू ठेवणार असल्याचे या वेळी खेळाडूंनी सांगितले. प्रात्यक्षिके ५ ते २५ या वयोगटांतील मुला-मुलींनी सादर केली. मुलींच्या गटाने पद्मासन, वृश्चिकासन, साधी अढी, एक पाच शिरासन, तर मुलांच्या गटाने फरारा, पताका, ‌वाघूळउडी हे प्रकार सादर केले. लाकडी मलखांब, दोरी मलखांब आणि टांगत्या मलखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. खेळाडूंची वेधक प्रात्यक्षिके मोबाइलमध्ये टिपण्याचा मोह पालकांना अनावर झाला. प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट करीत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात येत होते. यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह अधिक वाढल्याचे दिसून आले.

खेळाडूंचा गौरव

जागतिक मलखांब दिनानिमित्त झालेल्या प्रात्यक्षिक सादरीकरण कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोनशे खेळाडूंना प्रशिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील विविध व्यायामशाळांतून हे खेळाडू या कार्यक्रमासाठी यशवंत व्यायामशाळेत दाखल झाले होते. मलखांब प्रात्यक्षिक सादर केल्याचे प्रमाणपत्र देत या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक नगरसचिवपदी राजू कुटे

0
0

आयुक्त कार्यालयातील लघुलेखकासह लिपिकांच्या बदल्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिकेतील स्वीय सहाय्यक तसेच लिपिकांच्या बदल्या केल्या असून गोरखनाथ आव्हाळे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या सहाय्यक नगरसचिवपदी वरिष्ठ लिपिक राजू कुटे यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त कार्यालयातील लघुलेखक दिलीप काठे यांच्यासह चार लघुलेखक व दोन कनिष्ठ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांच्या पदभारातही किरकोळ बदल करण्यात आले आहेत.

मे महिन्यात महापालिकेच्या सेवेतून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तासह जवळपास ३१ अधिकारी कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळे अगोदरच रिक्तपदांमुळे उपलब्ध अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर फेरबदल करण्याचे धोरण आयुक्त गमे यांनी स्वीकारले आहे. वरिष्ठ पातळीसोबतच आता कनिष्ठ पातळीवरही फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. बदलीपात्र ९५ लिपिकांची यादी तयार करण्यात आली आहे. आता टप्प्या-टप्प्याने बदल्यांचे आदेश प्रशासनाकडून जारी केले आहेत. आयुक्त कार्यालयातील लघुलेखक दिलीप काठे यांची बदली नगरसचिव विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील लघुलेखक कैलास दराडे यांची नियुक्ती केली आहे. लेखा विभागातील लघुलेखक अनिता निकम-पाटोळे यांची नगररचना विभागात तर लघुलेखक संगिता पवार यांची अतिरिक्त आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. याशिवाय आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय रेवर यांची लेखा विभागातील अजय कमोद यांच्या जागी तर कमोद यांची रेवर यांच्या जागेवर बदली करण्यात आली आहे.

डॉ. डोईफोडेना दणका

अतिरिक्त आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्याकडील महिला बालकल्याण व समाजकल्याण विभागाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे यांच्याकडे तर नलावडे यांच्याकडील नगरसचिव विभाग डॉ. डोईफोडे यांच्याकडे वर्ग केला आहे. दोघांच्या विभागात किरकोळ बदल केले असले तरी, महिला आयोगाच्या येत्या १७ रोजीच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी डॉ. डोईफोडे यांच्याकडील महिला बालकल्याण विभागाचा कार्यभार काढण्यात आल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर विभागात वाढीव घरपट्टींवर सुनावणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर भागात चार हजारांहून अधिक मिळकतधारकांना वाढीव घरपट्ट्या देण्यात आल्याने महापालिकेकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. या वाढीव घरपट्ट्यांबाबत शनिवारी तिसरी सुनावणी घेण्यात आली. यावेळी शेकडो मिळकतधारकांची उपस्थिती होती.

महापालिकेच्या सातपूर विभागात एकूण ४७ हजार मिळकतधारक आहेत. यात नव्याने बांधकाम केलेल्या १० हजारांहून अधिक मिळकतधारकांना नवीन घरपट्ट्यांच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. याबाबत लेखी तक्रारीचे आवाहन करण्यात आले होते. सातपूर विभागात चार हजार मिळकतधारकांनी तक्रार अर्ज दिला होता. यासाठी आतापर्यंत घरपट्टीबाबत तीन सुनावण्या घेण्यात आल्या. शनिवारी सातपूरच्या विभागीय कार्यालयात सहाशे जणांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मिळकतधारकांना दिलेल्या घरपट्टीची शहानिशा करण्यासाठी योग्य कागदपत्रे सादर करण्याबाबत महापालिकेकडून सूचना करण्यात आल्या. घरगुती वापर व व्यावसायिक वापर याबाबत नव्याने घरपट्या देण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. आतापर्यंत २३०० मिळकतधारकांच्या घरपट्टीबाबत सुनावणी घेण्यात आली आहे. सुनावणीला कर उपायुक्त महेश डोईफोडे, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांसह कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि पुण्यातील

0
0

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि पुण्यातील आरभाट फिल्म्सच्या सहयोगाने रावी मोशन पिक्चर्सतर्फे 'विवा नाशिक चित्रचळवळ' नाशिकमध्ये सुरू झाली आहे. त्याचे तिसरे सत्र सोमवारी (१७ जून) रंगणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. जून महिना म्हणजे पावसाच्या आगमनाचा महिना. म्हणूनच या सत्रात नागराज पोपटराव मंजुळे यांची 'पावसाचा निबंध' ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात येणार आहे. या शॉर्ट फिल्मला अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या निमित्ताने गार्गी कुलकर्णी-मंजुळे, तसेच सिनेमातील इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत. या शॉर्ट फिल्मबरोबर इतर अनेक फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थ्रीडी मेकअपमधून मिळाल्या सौंदर्याच्या टिप्स

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असते, असे म्हणतात. तरीही सौंदर्य प्रसाधने (कॉस्मेटिक्स) रुप खुलविण्याचे काम करतातच. मेकअप कसाही करून चालत नाही तर ते तंत्र आहे. त्वचेचा रंग, कांती, डोळ्यांचा आकार अन् चेहऱ्याची ठेवण यावर मेकअपचे बरेचसे गणित अवलंबून असते. याबाबतच्या टिप्स तरुणी आणि महिलांनी अगदी काळजीपूर्वक जाणून घेतल्या. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त 'मटा कल्चर क्लब' च्या वतीने आयोजित 'मेकअपचे वर्कशॉप'चे.

सुंदरता ही दैवी देणगी आहे. परंतु, अधिक सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा पर्याय अवलंबला जातो. विशेषत: सणवार, लग्न व तत्सम समारंभामध्ये सहभागी होण्यापूर्वी महिलावर्ग मेकअपला प्राधान्य देतो. किंबहुना मेकअप ही हल्लीच्या पिढीची गरज बनली आहे. अधिक सुंदर दिसण्यासाठी मेकअप कसा असावा, याचे रहस्य शनिवारी उलगडले. तरुणींसह महिलांनाही मेकअपचे तंत्र प्रात्यक्षिकांसह अनुभवता आले. कॉलेजरोडवरील पाटील लेन ४ येथील स्पेस वायझर अपार्टमेंटमधील न्यूफॉर्म अॅकॅडमीमध्ये ही कार्यशाळा झाली. त्यामध्ये मेकअप आर्टिस्ट प्रज्ञा भालेकर यांनी मार्गदर्शन केले.

मेकअपचे स्पेशल इफेक्ट

सध्या थ्रीडी मेकअपची क्रेझ असून ब्रायडल मेकअप, आय मेकअप आणि इंडोवेस्टर्न लूक मेकअपची प्रात्यक्षिके दाखविण्यावर या वर्कशॉपमध्ये भर देण्यात आला. केवळ मेकअप कसा करावा, हे न दाखविता त्याचे तंत्रही छोट्या-छोट्या टिप्सच्या माध्यमातून सांगण्यात आले. सेटल आय, ग्लीटरी आय मेकअप कसा असतो, बेस एसडी मेकअपचे टेक्निक्स काय असतात याबाबतच्या टिप्स देत प्रात्यक्षिकांना सुरुवात करण्यात आली. प्रत्येकवेळी मेकअपसाठी ब्रॅण्डेड परदेशी कंपन्यांचे महागडे कॉस्मेटिक्स वापरण्याची गरज नाही. भारतात उत्पादित होणाऱ्या तुलनेने स्वस्त कॉस्मॅटिक्सद्वारेही देखील चांगला मेकअप करता येतो याची प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली. विशेष म्हणजे मेकअपचे इफेक्टस पाहून सहभागी महिलाही थक्क झाल्या.

सुंदरतेचे अनोखे तंत्र

डोळे मोठे अथवा लहान असतील तर कोणते काजळ लावावे, चेहऱ्याचा कोणता भाग कॉस्मॅटिक्सद्वारे हायलाईट करावा, कोणता लपवावा याच्या टिप्स यावेळी देण्यात आल्या. आयशॅडो, लिप्स्टिक आणि फाऊंडेशन म्हणजे ब्रायडल मेकअप नव्हे. तर चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स, पिंपल्स लपवून चेहरा खुलविण्याची कला म्हणजे ब्रायडल मेकअप असा संदेशही या वर्कशॉपमधून मिळाला. मेकअप संदर्भातील शंका उपस्थित करून त्याचे निरसनही सहभागी सदस्यांनी प्रज्ञा भालेकर यांच्याकडून करवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यासाठी चोरीच्या दुचाकी

0
0

रामशेज किल्ल्याजवळ तीन मोटारसायकली हस्तगत

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडीरोडवरील मुथूट फायनान्स या कार्यालयात एका कर्मचाऱ्यावर बंदुकींमधून पाच गोळ्या झाडून फरार झालेल्या दरोडेखोरांचा माग काढण्याचे काम ३६ तासानंतरही सुरूच आहे. या घटनेतील सहा आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकल पेठरोडवरील रामशेज किल्याच्या पायथ्याशी मिळून आल्या आहेत.

सोने लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स या कार्यालयात गोळीबार करून मुरियाईकिरा सजू सॅम्युअल (वय २९) या आयटी इंजिनीअरची निर्घृण हत्या केली. या घटनेने नाशिक शहर हादरले. दरोडेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचल्याचे पुरावे समोर येत आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. लुटीचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर आरोपी हायस्पीड मोटारसायकलने पसार झाले. पोलिस त्यांच्या मागावर असताना शनिवारी सकाळी आरोपींच्या तीन दुचाकी पेठरोडरोडवरील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी लावलेल्या आढळून आल्या. याबाबत येथील स्थानिक रहिवाशी दत्तात्रय जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली. शुक्रवारी दुपारपासून शनिवारी सकाळपर्यंत वाहने जैसे थे असल्याने जाधव यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरील हेल्मेट व टी शर्टही होता. क्राईम ब्रँचच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपी पसार झाले, त्या मोटारसायकली याच असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले. यातील एक मोटारसायकल २९ मे रोजी आडगाव परिसरातून चोरीला गेली असून, त्याची नोंद पोलिस ठाण्यात आहे. उर्वरित वाहनांचा छडा लावण्याचे काम सुरू आहे.

..

सुनियोजित प्लॅन

पोलिसांनी हस्तगत केलेल्या तीन मोटारसायकलींचे रजिस्ट्रेशन क्रमांक बदललेले आहे. याशिवाय चोरट्यांनी चेसीज क्रमांकसुद्धा खोडून काढले आहेत. लुटीच्या अयशस्वी घटनेनंतर सर्व आरोपी एकाच ठिकाणी आले आणि तेथून ते दुसऱ्या वाहनाने पसार झाले. यामुळे दरोड्याच्या घटनेची आरोपींनी खूप दिवसांपासून तयारी केली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

..

पोलिसांची शोधमोहीम

आरोपींचा शोध लावण्यासाठी शहरातील सराईत गुन्हेगार, या पद्धतीने दरोडा टाकण्याची प्रवृत्ती असलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १३ पथके तयारी केली आहेत. एक पोलिस अधिकारी व सात कर्मचारी समाविष्ट आहेत. हे पथक शहरातील हॉटेल्स, झोपडपट्टी भाग पिंजून काढण्याचे काम करीत आहे. आरोपींच्या शोधासाठी चार स्वतंत्र पथके असून, त्यात एक पोलिस निरीक्षक, दोन पीएसआय आणि सहा कर्मचारी आहेत. याशिवाय अंबड, मुंबईनाका आणि क्राईम ब्रँचचे एक युनिट आरोपींच्या मागावर आहे.

..

आरोपींचा माग काढण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जात असून, ते पेठरोडने पुढे गेल्याचे सध्यातरी दिसते. आरोपींनी सुनियोजित पद्धतीने हा गुन्हा केला असला तरी ते फार काळ चकवा देऊ शकणार नाही.

- पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त, क्राईम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेतील ढिलाई दरोडेखोरांच्या पथ्यावर

0
0

पोलिसांकडून कंपनीला सूचना

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोठी आर्थिक उलाढाल होत असताना सुरक्षिततेबाबत झालेले अक्षम्य दुर्लक्ष दरोडेखोरांच्या पथ्यावर पडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची दरोडेखोरांनी योग्य ती माहिती संकलीत केली. दुर्दैवाने त्यांना विरोध होण्याची किंवा त्या अनुषंगाने पुरावे मागे ठेवण्याची व्यवस्थाच कुचकामी असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचनासुद्धा केल्या आहेत.

क्राईम ब्रँचच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी मुथूट कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी काही साक्षीदार व कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. चौगुले यांनी सांगितले, की कार्यालयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. मात्र, येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दर्जा फारच खालावलेला आहे. त्यामुळे चित्र अस्पष्ट दिसते. दुसरी कमी येथील अलार्म व्यवस्थेची दिसून आली. मयत साजू सॅम्युअलने सर्वांना अर्लट करण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून ही व्यवस्था कार्यन्वित केली. मात्र, त्याचा आवाज फक्त याच कार्यालयात ऐकू आला. यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येथील सुरक्षारक्षकाची ढिलाई ठरली. चारपैकी एक आरोपी सर्वात पुढे आला होता. तीन थोडे मागेच थांबले होते. कर्ज घ्यायचे आहे असे म्हणून आरोपीने आपल्याकडील एक सोन्याची चेन येथील सुरक्षारक्षकास दाखवली. त्यामुळे जुजबी नोंद करीत कार्यालयाचे गेट उघडण्यात आले. याचाच फायदा पाठीमागे थांबलेल्या तिघांनी घेतला. काही सेकांदात चारही आरोपी कार्यालयात घुसले आणि पुढील घटनाक्रम सुरू झाला.

मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या संस्थांनी प्रशिक्षित आणि बंदुकधारी सुरक्षारक्षक नेमणे आवश्यक असते. आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास कर्मचाऱ्यांनी काय करावे काय करू नये याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले असावे. मात्र, येथे याची उणीव दिसून आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून, त्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतसाठ्यावर भिस्त

0
0

पाऊस अधिक लांबल्यास प्रशासनाची वाढणार डोकेदुखी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाचा जोर नसल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधुक वाढू लागली आहे. लांबणीवर पडलेला पाऊस आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेला गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा यामुळे प्रशासनाला नागरिकांची तहान भागविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. धरणातील मृत पाणी साठ्याचा याकामी वापर करावा लागतो की काय याची चिंता प्रशासनाला सतावू लागली आहे.

मान्सूनने गतवर्षी जिल्ह्याकडे पाठ फिरविली. यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाने अजूनही जिल्हावासीयांची पाठ सोडलेली नाही. यंदा दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना जिल्हावासीयांना करावा लागतो आहे. तहानलेल्यांची तहान भागावी आणि सर्वांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासह विविध प्रकारच्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहेत. परंतु, तरीही दिवसागणिक पाण्याची मागणी वाढतच आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असून पाऊसही लांबणीवर पडण्याचे संकेत हवामान विभागाकडून मिळत आहेत. आणखी काही दिवस पावसाचा जोर वाढला नाही तर धरणांमधील पाणी पातळी वाढण्यावरही मर्यादा येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपयुक्त पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याच्या धोरणास प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.

... तर दिवसाआड पाणी

शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात सध्या ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबणीवर पडला तर या धरण समूहातील मृत पाणी साठ्याचा उपयोग करावा लागतो की काय याची चिंताही सतावू लागली आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबणीवर पडला तर दिवसाआड पाणी देण्याचे किंवा दिवसातून एकदाच पाणी देण्याचे धोरण सरकारला अवलंबवावे लागेल, असे संकेत सूत्रांकडून दिले जाऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images