Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अंबड अग्निशमन केंद्राचे आज होणार लोकार्पण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड एमआयडीसीतील बहुचर्चित अग्निशमन केंद्राचे आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. निमा व आयमा औद्योगिक संघटनेकडून या अग्निशमन केंद्राबाबत सातत्याने मागणी केली जात होती. प्रसारमाध्यमांनीही अग्निशमन केंद्र नसल्याने आगीच्या संभाव्य आपत्तीमुळे कारखान्यांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे निर्दशनास आणले होते. यानंतर एमआयडीसीने स्वतंत्र जागा अग्निशमन केंद्रासाठी मंजूर केली होती. वर्षभरापासून तयार असलेली अग्निशमन केंद्राची इमारत केवळ मनुष्यबळाअभावी पडून होती. अखेर अग्निशमन केंद्रात मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने आज त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन यांसह एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजक उपस्थित असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रक्तपेढ्यांना अद्यापही भासतोय प्लेटलेट्सचा तुटवडा

$
0
0

मागणी-पुरवठ्याचा मेळ साधताना कसरत; दात्यांना पुढे येण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराची लोकसंख्या वाढल्याने रक्ताबरोबरच शरीरात महत्त्वाचे स्थान असलेल्या प्लेटलेट्सची देखील मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. त्या तुलनेत प्लेटलेट्सचे संकलन कमी होत असल्याने रक्तपेढ्यांना मागणी आणि पुरवठ्याचा मेळ साधताना कसरत करावी लागते आहे.

अनेकदा जळीत रुग्ण, कॅन्सर, डेंग्यू, मलेरियाबाधित रुग्णांना प्लेटलेट्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. ज्या पेशंटच्या शरीरातून जास्त रक्त वाहत असेल अशा पेशंटला प्लेटलेट्स दिल्यास त्याचा रक्तस्राव थांबण्यास मदत होते. त्याचप्रमाणे किमोथेरपी झालेल्या रुग्णांसाठी देखील प्लेटलेट्स उपयुक्त ठरतात. शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास अंतर्गत रक्तस्राव होऊन रुग्ण दगावण्याचा देखील संभव असतो. शरीरातील प्लेटलेट्स या पूर्वी रक्तातून वेगळे केले जात होत्या. मात्र आता नवीन तंत्रज्ञानाने शरीरातून रक्त घेत असतानाच त्यातील फक्त प्लेटलेट्स घेऊन उर्वरित रक्त पुन्हा रक्तदात्याच्या शरीरात सोडण्यात याते. या अगोदर रक्त पिशवीतून प्लेटलेट्स वेगळे केले तर ४ ते ४५०० प्लेटलेट्सचे काऊंट मिळत होते. मात्र, सिंगल प्लेटलेट्स डोनरमुळे एका वेळी ५० ते ६० हजार काऊंट प्लेटलेट मिळणे सहज शक्य झाले आहे. एका व्यक्तीला जितके प्लेटलेट्स लागतात, तेवढे नॉर्मल रक्तदानातून घेतले तर चार ते पाच लोकांना रक्तदान करावे लागते तेव्हा एका रुग्णाची गरज भासते. मात्र सिंगल प्लेटलेट्स दात्यने फक्त प्लेटलेट्स दिल्या तर त्याचा काऊंट जास्त वाढतो व त्याची प्रत चांगली रहाते. या करिता ज्या व्यक्तींचे वजन ४५ किलो पेक्षा जास्त आहे व ज्यांच्या शरीरात २ लाखापेक्षा जास्त पेल्टलेट्सची संख्या आहे अशा दात्यांकडूनच प्लेटलेट्स घेतले जातात. शरीरातून काढलेले रक्त हे ४५ दिवसांपर्यंत साठवून ठेवता येते. त्याचप्रमाणे प्लाझ्मा हा एक वर्षापर्यंत सांभाळून ठेवता येतो. प्लेटलेट्सचे आयुष्य हे केवळ पाच दिवसांचे असते. रक्तदात्याच्या शरीरातून ३५० मिली रक्त घेतले जाते तसेच प्लेटलेट्स देणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून केवळ २०० ते ३०० मिली प्लेटलेट्स घेतल्या जातात. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीने एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा तीन महिने त्याला रक्तदान करता येत नाही. मात्र प्लेटलेट्स देणाऱ्या व्यक्तीला १५ दिवसानंतर पुन्हा प्लेलेट्स देता येतात. शहरातील बहुतांश रक्तपेढ्यांनी याबाबत जनजागृती करणे सुरू केले आहे. तरीही नागरिकांनी गरजू व्यक्तींना प्लेटलेट्स देण्यासाठी पुढे यावे, असे रक्तपेढ्यांकडून आवाहन केले जात आहेत.

ब्लड ग्रुपचा शोध लावणाऱ्या कार्ल लॅन्ड स्कॅनर यांचा १४ जून हा जन्मदिवस. तो रक्तदान दिन म्हणून पाळला जातो. गेल्या काही दिवसांपासून रक्त आणि प्लेटलेट्स दात्यांची संख्या यांचा ताळमेळ साधताना कसरत करावी लागते आहे. जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे.

विनय शौचे, प्रशासकीय अधिकारी, जनकल्याण रक्तपेढी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आता स्मार्ट पार्किंग

$
0
0

१ जुलैपासून १५ ठिकाणी सुविधा

.....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमएससीडीसीएल) च्या वतीने १ जुलैपासून शहरातील १५ ठिकाणी ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट स्मार्ट पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर प्रामुख्याने ही योजना अंमलात आणली जाणार असून, या १५ स्मार्ट पार्किंग ठिकाणांच्या माध्यमातून २ हजार १९० दुचाकी व ९८६ चारचाकी, असा ३ हजार १७६ वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे.

या स्मार्ट पार्किंगसाठी अॅप तयार तयार केले असून, त्याद्वारे पार्किंगची व्यवस्था पहाता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहे, याची माहिती वाहनधारकांना घरबसल्या मिळणार आहे. त्याचप्रमाणे घरातून निघताना ज्या ठिकाणी जायचे आहे, तेथील पार्किंगची जागा अगोदरच बुक करता येणार आहे. या अॅपच्या वापरासाठी कोणतेही जास्तीचे पैसे आकारले जाणार नाहीत. पार्किंगची क्षमता आणि उपलब्धता याची माहिती मिळवण्यासाठी रस्त्यांवर सेन्सर आणि कॅमेरे लावण्यात आले आहेत. या ठिकाणी गाडी लावण्यासाठी ग्राहकांना प्रतितासाने पैसे मोजावे लागणार आहेत. सर्व जागांसाठी एकसमान पार्किंग शुल्क असेल. दुचाकीसाठी १० रुपये प्रतितास, तर चारचाकी गाडीसाठी २० रुपये भाडे आकारले जाणार आहे. ट्रिगिन टेक्नोलॉजीज प्रा. लि. या खासगी कंपनीने शहरातील एकूण ३३ स्मार्ट पार्किंगचे व्यवस्थापनाचे काम घेतले आहे. यातील २८ ऑन स्ट्रीट आणि ५ ऑफ स्ट्रीट पार्किंगचा समावेश आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून १५ पार्किंगच्या जागा सुरू होणार आहेत, तर उर्वरित १८ जागा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

…..

स्मार्ट पार्किंग अॅप

नाशिक स्मार्ट पार्किंग नावाचे अॅप विकसित केले असून, त्या माध्यमातून पार्किंगच्या स्लॉटची उपलब्धता मोबाइलद्वारे तपासता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक स्मार्ट पार्किंग जागेवर व्हर्च्युअल मेसेज डिस्प्ले (व्हीएमडी) उभारण्यात आला आहे. त्या माध्यमातून रिक्त पार्किंगची जागा समजणार आहे.

...

ऑन स्ट्रीट पार्किंग

ठिकाण....क्षमता

कुलकर्णी गार्डन - २६

कॅनडा कॉर्नर बीएसएनएल ऑफिस - ६६

ज्योती स्टोअर्स, गंगापूर नाका - २४०

प्रमोद महाजन गार्डन - ८३

गंगापूर नाका ते जेहान सर्कल - ५९३

जेहान सर्कल ते गुरुजी रुग्णालय - १६५

जेहान सर्कल ते एबीबी सर्कल - ७८७

गुरुजी रुग्णालय ते पाइपलाइन रोड - ७९

मोडक पॉईंट ते खडकाळी रोड - ७८

थत्ते नगर (दोन्ही बाजूला) - १६४

शरद पेट्रोलियम ते वेस्टसाइड - २१७

कॅनडा कॉर्नर ते विसेमळा - ११६

शालिमार ते नेहरू गार्डन (दोन्ही बाजूला) - १०५

...

ऑफ स्ट्रीट पार्किंग

ठिकाण....क्षमता

बी. डी. भालेकर मैदान - ४०७

अण्णा शास्त्री हॉस्पिटल - ५०

..

एकूण- ३१७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता आरोग्याबाबत स्थायीत नाराजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेच्या दवाखान्यात औषधे पुरविण्यासाठी होत असलेला विलंब, जंतू नाशक औषधे पुरवणेकामी मागवण्यात आलेली निविदा, नव्याने खरेदी करावयाच्या ५३ घंटागाड्या, शहरातील स्वच्छता आदी विषयांवर मालेगाव महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या सभागृहात सभापती जयराज बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी स्थायी समितीची बैठक झाली. एमआयएम गटनेते डॉ. खालिद परवेज, नगरसेवक नबी अहमद, उपायुक्त राहुल मर्ढेकर, सहा. आयुक्त विलास गोसावी, लेखाधिकारी कमरुद्दीन शेख, नगरसचिव राजेश धसे उपस्थित होते.

यावेळी आर्थिक वर्ष २०१८-१९ करिता प्रभाग १ व २ कार्यक्षेत्रात पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आलेली सर्वात कमी दाराची निविदा मंजूर करण्याचा विषय स्थायी समितीपुढे मांडण्यात आला. यावर समितीने चारही प्रभागांसाठीची निविदा विषय एकत्रित आणावा अशी सूचना प्रशासनास केली व हा विषय तहकूब करण्यात आला. पालिकेच्या दवाखान्यातील औषध साठ्याचा विषय चांगलाच गाजला. दवाखान्यांना औषध पुरवठा करणाऱ्या मक्तेदाराची मुदत संपून देखील अद्याप निविदा प्रसिद्ध करण्यात न आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर डॉ. त्रिभुवन यांनी स्पष्टीकरण देत येत्या बुधवारपर्यंत औषध पुरवण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जंतू नाशक औषध पुरविण्यासाठी २२ जून पर्यंत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून मात्र समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ५३ नव्या घंटागाड्या घेण्यासाठी प्रशासकीय मंजुरी झालेली असताना देखील अद्याप घंटागाड्या का पुरविण्यात आल्या नाहीत? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवतेसाठी ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी

$
0
0

राजस्थानची धावपटू सुफिया खानचे मालेगावी स्वागत

तुषार देसले, मालेगाव

भारतातील काश्मीर ते कन्याकुमारी असे सुमारे ४ हजार किलोमीटर अंतर....हे अंतर १०० दिवसांत पार करण्यासाठी ती धावतेय....तिचं हे धावणं व्यक्तिगत ध्येयासाठी नाही...देशात शांतात नांदावी व नागरिकांमध्ये मानवता बंधुत्व वाढावे हा उदात्त हेतूने ती धावतेय...न थांबता...न थकता...ही कहाणी आहे राजस्थान अजमेर येथील ३३ वर्षीय सुफिया खान या तरुण महिला धावपटूची. एका अनोख्या उद्देशाने धावणाऱ्या या सुफियाचे बुधवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. महामार्गावरून धावणारी सुफिया अनेकांशी संवाद साधत असून, मानवतेचा संदेश देत पुढे जात आहे.

बुधवारी जेव्हा सुफिया मालेगाव तालुक्यातील झोडगे गावानजीक पोहचली तेव्हा छायाचित्रकार मुकुंद थोरात, संदीप देसले, डॉ. गर्दे आदींसह ग्रामस्थांनी तिचे स्वागत केले. काही अंतर तिच्यासोबत धावत तिला प्रोत्साहित केले. यानंतर सायंकाळी तिचे मालेगावी आगमन झाले त्यावेळी देखील महामार्गावर अनेक ठिकाणी तिचे स्वागत करण्यात आले. १० वर्षांपासून विमान बनविण्याच्या व्यवसायात असलेली सुफियाला कामाच्या व्यापात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाली. आरोग्यासाठी धावणे सुरु केले आणि नंतर तोच तिचा छंद झाला. अनेक लहान मोठ्या स्पर्धेत महिला धावपटू म्हणून सहभागी होत तिने मार्च २०१८ मध्ये आपल्या कर्तृत्वावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. नेहमीच नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ती सज्ज असते. आता तिने देशभरात मानवता, एकात्मा, शांती, समतेचा संदेश देण्यासाठी धावायला सुरुवात केली आहे.

आपल्या या अनोख्या प्रयत्नाबद्दल सांगताना सुफिया म्हणाली, शंभर दिवसात मी काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर पार करण्याचे धेय्य निश्चित केले आहे. यासाठी रोज किमान ५० किमी धावणार असून, २१ एप्रिलपासून मी प्रवास सुरू केला आहे. आपल्या देशात मानवता व शांतीचा संदेश देण्याचा सगळ्यात चांगला मार्ग मला धावणे वाटतो. कारण यामुळे देशातील अनेक प्रांत, भाषा, संस्कृती जाणून घेत माणसांशी संवाद साधता येतो. अलीकडे आपली संस्कुती, मूल्य, बंधुत्व एकमेकांविषयीचा आदर आपण विसरतो आहोत. मी लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या या प्रवासात स्थानिक नागरिक, धावपटू, सायकलपटू यांच्याकडून खूप प्रेम मिळतेय. धावणे हेच माझे आयुष्य असून माझ्या पालकांनी मला प्रोत्साहित केल्याने मी हे करू शकले आहे. देशातील सर्वात वेगाने काश्मीर ते कन्याकुमारी अंतर पार करणारी महिला होण्याचे माझे धेय्य असल्याचे तिने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील प्रवेशद्वारांवर चोवीस तास नाकाबंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक दुष्काळी पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसह सराईत गुन्हेगारांचेही मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आहे. त्यात मुख्यत्वे घरफोडी, चेन स्नॅचिंग, चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर १२ ठिकाणी २४ तास तपासणी सुरू करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. सध्या चोरी, घरफोडी, वाहनचोरी असे गुन्हे होण्याच्या प्रमाणात वाढ होते आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली. मिशन ऑल आउटसह कोम्बिंग ऑपरेशन सातत्याने राबवले जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारांचा सक्रिय सहभाग कमी झाला आहे. यासाठी गुन्हेगारांचे अदान-प्रदान ही मोहीमसुद्धा उपयोगी पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवूनसुद्धा गुन्हे घडत असून, त्यात शहराबाहेरील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा निष्कर्ष शहर पोलिसांनी काढला आहे. यास पर्याय म्हणून शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर २४ तास नाकाबंदी लावत असल्याकडे नांगरे पाटील यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खारीचा वाटा’ उचलण्याची मनमाडकरांना संधी

$
0
0

करंजवणसाठी थकबाकी भरण्याचे पालिकेचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

करंजवण योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर मनमाडकरांना ही योजना प्रत्यक्षात कधी उतरते, याचे वेध लागलेले असताना नगरपालिकेने एक पत्रक काढून नागरिकांनाही या आनंदवार्तासाठी 'वाटा' उचलण्याचे आवाहन केले आहे. या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठी मनमाड नगरपालिकेला शासनाकडे तातडीने तीन कोटी रुपये भरायचे असल्याने नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरावी, अन्यथा थकबाकीदारांवर कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन मनमाड नगरपालिकेने गुरुवारी पत्रकाद्वारे केले आहे. मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर यांच्या सहीचे हे पत्रक सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. त्यामुळे करंजवण पाणी योजनेसाठी जागरुक मनमाडकर किती 'वाटा' उचलतात हे लवकरच कळणार आहे.

मनमाडची पाणीटंचाई संपूर्ण राज्यासाठी काळजीचा विषय झाला आहे. महिन्या-दीड महिन्यातून एकदाच पाणी येणाऱ्या मनमाडकरांबाबत सहानभुतीही दाखविली जाते. त्यामुळे दुष्काळग्रस्त आणि पाणीटंचाईने होरपळलेल्या मनमाडसाठी सरकारने मदतीचा हात पुढे करून करंजवण योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मनमाडकरांना ही योजना प्रत्यक्षात कधी उतरते, याचे वेध लागले असतानाच पालिकेने त्यांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी लोकवर्गणी, लोकसहभाग महत्त्वाचा आहे. हे आव्हान पालिका प्रशासन कसे पेलणार असा चर्चा सुरू असतानाच वसुलीच्या पत्रकामुळे नागरिकांनाही यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता लांडगे याना सदर योजनेबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असल्याने योजनेची व्यवहार्यता व त्यात मनमाडसह नांदगावचा समावेश करता येईल का, याबाबतचे सर्वेक्षण तातडीने व्हावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुपोषण निर्मूलनासाठी नव्याने होणार सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यात यंदाही ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यासाठी पहिल्या टप्यात उपकेंद्रनिहाय बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात येणार असून ० ते ६ वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

सर्वेक्षण केलेल्या सर्व बालकांचे १०० टक्के वजन घेण्यात येणार आहे. यामधून तीव्र कुपोषित असलेल्या बालकांसाठी बाल उपचार केंद्र, राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र व ग्राम बाल विकास केंद्र या माध्यमातून उपचार, पोषक आहार व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. सदर बालकांच्या पालकांना गृहभेटीद्वारे पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत विकास आराखड्यात महिला व बालविकासासाठी असलेल्या निधितून आहारावर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गिते यांनी दिली. याबाबत बालविकास व आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो, रिक्षावाल्यांकडून हप्ते घेत नाही!

$
0
0

पोलिस आयुक्तांचे कारवाईबाबत स्पष्टीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिक्षा व्यावसायत काही गुन्हेगारी प्रवृत्तींनी शिरकाव केला आहे. त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हप्तेखोरी नसल्यानेच हे काम पूर्ण होत असून, अप्रत्यक्ष भाडेवाढीविरूद्ध सुद्धा याच पद्धतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

शहरात सध्या तीन प्रवाशी आणि एक रिक्षाचालक या पद्धतीने वाहतूक व्हावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुद्धा होते आहे. मात्र, काही रिक्षाचालक चार प्रवाशी घेऊन प्रवास करतात. तसेच रिक्षाचालकांनी वाढविलेले भाडे देखील वसूल केले जाते. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्तांनी सांगितले, की रिक्षाच्या एवढ्याशा जागेत चार प्रवाशी अक्षरश: कोंबले जातात. काही रिक्षाचालक तर पुढेही दोन प्रवाशी बसवतात. यात महिला, वृद्ध अशा सर्वांनाच त्रास होतो. एक प्रकारे शोषणच होते. पण, अप्रत्यक्ष नियमांमुळे प्रवाशी शांत बसत होते. आता याबाबत जनजागृती होते आहे. मीटरप्रमाणे भाडे आकरणी सुरू होईपर्यंत ही कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांबाबत करा तक्रार

बळजबरीने केलेली भाडेवाढ अथवा इतर तक्रारींबाबत प्रवाशांनी थेट १०० या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. २० टक्के गुन्हेगारांमुळे ८० टक्के प्रामाणिक काम करणारे रिक्षा व्यावसायिक त्रस्त असून, त्यांचाही या मोहिमेला पाठिंबा आहे. नागरिकांनी तक्रार केल्याबरोबर ही माहिती वाहतूक शाखेला देण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.

सर्वत्र शिस्त लागणार

वाहतूक शाखा कारवाईपेक्षा हप्तेखोरीमुळे नेहमीच चर्चेत असते. ठिकठिकाणी वाहने तपासणीच्या नावाखाली पैसे गोळा केला जातात, असा आरोप होतो. याबाबत पोलिस आयुक्तांनी सांगितले, की मी स्वत: हप्तेखोरी सुरू नसल्याबाबतची खात्री केली. कोणाची पिळवणूक होणार नाही, अशी खात्री झाल्यानंतरच कारवाई हाती घेण्यात आली. हप्तेखोरीच होत नसल्याने सर्वच ठिकाणी शिस्त लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगी गडावरील कर्मचारी रविवारी संपावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

श्री सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्ट, सप्तशृंगी गड येथील कर्मचारी विविध मागण्यांसाठी १६ जून रोजी लाक्षणिक संपावर जाणार आहेत. याबाबतच निवेदन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, वर्कर्स युनियनचे संतोष काकडे यांनी न्यासाचे अध्यक्ष, सचिव व कळवणचे तहसीलदार यांना दिले.

सप्तशृंगी गडावर बाराही महिने यात्रेचे स्वरूप असते. त्यामुळे सतत भाविकांची वर्दळ असते. भाविकांच्या सुविधेसाठी ट्रस्टने कर्मचारी भरती केली आहे. त्याद्वारे १२४ व २८ किमान वेतन कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात आले आहे. मात्र देवस्थान प्रशासनाने आपल्याला अनेक अधिकारांपासून वंचित ठेवले आहे, असा आरोप या कमर्चाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी १६ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संपाबर जाण्याचे ठरविले आहे.

कर्मचारी संपाचे निवेदन प्राप्त झाले आहे. संघटनेच्या अधिकृत प्रतिनिधींना अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत चर्चा करण्यासाठी आवाहन केले आहे.--सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, ट्रस्ट

d

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी पद्धतीने व्हॉल्व्हमन भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील बहुतांश व्हॉल्व्हमन सेवानिवृत्त झाल्याने या विभागात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा अभाव जाणवू लागला आहे. त्यावर उपाय म्हणून नाशिक महापालिकेने कंत्राटी पद्धतीने व्हॉल्व्हमनची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची निविदा काढण्यात आली आहे.

महापालिकेच्या सर्वच विभागांमध्ये मनुष्यबळाचा अभाव आहे. महापालिकेचा प्रशासकीय खर्च जास्त असल्याने राज्य सरकारने नव्या आकृतिबंधानुसार पदे भरण्यास नकार दिला आहे. महापालिकेत नव्याने भरती होत नसल्याने व जुने कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने व्हॉल्व्हमनची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या कामासाठी १ कोटी ७१ लाख ७२ हजार रुपयाची निविदा काढली आहे. १४ ते २८ जून या कालावधीत कोरे फॉर्म वितरीत केले जाणार आहेत. अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, राजीव गांधी भवन येथे १९ जूनला दुपारी ३ वाजता निविदापूर्व बैठक होणार आहे. ही निविदा २९ जून रोजी दुपारी ३ वाजता उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धार्थनगरला मोबाइल पळविला

$
0
0

सिद्धार्थनगरला मोबाइल पळविला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना वर्दळीच्या बॉईज टाऊन स्कूल परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश अशोक शर्मा (रा. रायगड चौक, सिडको) या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. ११) सायंकाळी तो बॉईज टाऊन स्कूल समोरून पायी जात असतांना ही घटना घडली. मोबाइलवर बोलत जाणाऱ्या जगदीशच्या पाठीमागून मोपेडवर आलेल्या दोघांपैकी एका चोरट्याने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावला. यानंतर आरोपींनी सिद्धार्थनगर झोपडपट्टीच्या दिशेने पोबारा केला.

प्रवाशांनी रिक्षाचालकास लुटले

प्रवाशी म्हणून बसलेल्या चौघांनी लोखंडी रॉडचा धाक दाखवित रिक्षाचालकास लुटल्याची घटना सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शामकांत कोर (रा. शिवाजीनगर, सातपूर) या रिक्षाचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री कोर रिक्षा घेऊन सातपूर थांब्यावर थांबले होते. यावेळी तिथे चौघे संशयित आले. त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेलपर्यंत जायचे आहे, असे सांगून ते रिक्षात बसले. लुटारू असलेल्या प्रवाशांना घेऊन रिक्षा त्र्यंबकरोडने जात असतांना आरोपींनी सिद्धार्थनगरपर्यंत रिक्षा घेण्याची विनंती केली. त्यानुसार कोर रिक्षा घेऊन निघाले. निर्जनस्थळी रिक्षा थांबावण्यास सांगत संशयितांनी चालकास बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या खिशातील रोकड आणि मोबाइल असा सुमारे आठ हजारांचा मुद्देमाल काढून घेत लोखंडी रॉडचा धाक दाखवून रिक्षा पंचवटीच्या दिशेने नेली.

युनियनच्या वादात कामगारास दमदाटी

कामगार संघटनेच्या वादातून तिघांनी एका कामगारास शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

योगेश भामरे, प्रमोद बोरसे व संतोष शिंगाडे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी राकेश बाळासाहेब अहिरे (रा. सातपूर कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. ड्रिलबिट कारखान्यात आहिरे काम करतात. या कारखान्यात दोन युनियनमध्ये संघर्ष आहे. अहिरे हे मंगळवारी (दि. ११) सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी सातपूर गावात गेले असता ही घटना घडली. भाजी मार्केट परिसरात संशयितांनी दुचाकी अडवित अहिरे यांना दमदाटी केली. 'तू युनियन सोडून आमच्या संघटनेत सहभागी हो', असा आग्रह त्यांनी धरला. अहिरे यांनी नकार देताच संशयितांनी शिवीगाळ करीत दमदाटी केली.

चिकन विक्रेत्यांमध्ये मारहाण

गंमत केल्याचा जाब विचारल्याने दोघा चिकन विक्रेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एकाच्या डोक्यात चिकन कापण्याचा सुरा मारला. जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुबाब खाटीक, तरबेज खाटीक व नवाब खाटीक अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी रियाज आसिफ खाटीक (रा. केदारनगर, श्रमिकनगर) यांनी तक्रार दिली. संशयित आरोपी व तक्रारदार यांचे एकाच भागात चिकन विक्रीचे दुकान आहे. रियाज खाटीक बुधवारी (दि. १२) सकाळी आपल्या दुकानात असतांना संशयितापैकी रुबाब खाटीक याने त्यांची चेष्टा केली. त्यामुळे रियाज याने जाब विचारला. यामुळे तिघा संशयितांनी शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एकाने रियाज यांच्या डोक्यात धारदार चाकूने वार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची वर्तणूक येणार 'ऑन रेकॉर्ड'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काय काम आहे? साहेब नाही आता... अशी दमबाजी वजा कारणांची यादी सादर करणाऱ्या ठाणे अंमलदारांवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याच्या हालचाली शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरू केल्या आहेत. यासाठी तक्रार देणाऱ्या फिर्यादींचे अनुभवच रेकॉर्डवर घेण्यात येणार आहे. या सर्व्हेअंती चांगली कामगिरी करणाऱ्या ठाणे अंमलदारांना बक्षीस, तर मनमानी करणाऱ्यांना शिक्षा देण्यात येणार आहे.

चोर परवडले पण पोलिस नको, अशी काहीशी मानसिकता सर्वसामान्यांची असते. या मानसिकतेला कारणीभूत ठरते ते पोलिस ठाण्यातील वातावरण! फिर्यादी फिर्याद देण्यासाठी आला म्हणजे फार काही तरी चुकीचे होतेय, असे वातावरण निर्माण केले जाते. यामुळे फिर्यादी आल्या पावली माघारी जाण्यास प्राधान्य देतात. याच पार्श्वभूमीवर ही संकल्पना राबविली जाणार आहे. ज्या दिवशी फिर्याद दाखल होते, त्याच्या दुसऱ्या दिवशीच सकाळी पोलिस आयुक्तालयातून एक फोन कॉल फिर्यादीला करण्यात येईल. त्यात फिर्यादीकडे चौकशी करण्यात येईल. आपली फिर्याद लागलीच दाखल करण्यात आली काय, आपल्याला काय वागणूक मिळाली आणि शेवटी आपल्या फिर्यादीची दखल कशा पद्धतीने घेण्यात आली, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय केले असे हे प्रश्न असतील. या प्रश्नांची काय उत्तरे येतात, ती नोंदवून घेण्यात येतील. हाती आलेल्या डेटानुसार कोणत्या पोलिस ठाण्याची, अंमलदाराची वागणूक चांगली होती, याचा निष्कर्ष काढण्यात येईल. चांगली कामगिरी असलेल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस, तर चुकीची वागणूक ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या सर्व्हेमुळे काम करणाऱ्या प्रत्येकावर एका विशिष्ट प्रकारची जबाबदारी अधोरेखित होईल, तसेच आपल्या कामावर लक्ष असल्याची जाणीव सतत राहील, असेही त्यांनी सांगितले.

...

साधारणत: असे असतील प्रश्न

- आपली फिर्याद लागलीच दाखल केली काय?

- आपल्याला कशी वागणूक मिळाली?

- फिर्यादीची दखल कशा पद्धतीने घेतली?

- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय केले?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर हल्ल्यांविरोधात आज देशव्यापी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल येथे डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर पेशंटच्या नातेवाइकांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर डॉक्टर अत्यवस्थ अवस्थेत असून त्याची मृत्युशी झुंज सुरू आहे. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेने तीव्र निषेध केला आहे.

आयएमएने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. 'आयएमए'ने वेळोवेळी या विरुद्ध आवाज उठविला आहेच. यावेळी देखील शुक्रवार (दि. १४) देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. देशभरात सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून काम करतील, तसेच जागोजागी धरणे धरतील. केंद्र सरकारने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणाऱ्या हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी आमची मागणी आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे तेथील रुग्ण वेठीस धरले जातात. तसेच अशा गोष्टींमुळे रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीच्या खाली असल्याने त्यांची कार्यक्षमताही खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणीही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रुग्ण दाखल करू धजावणार नाही. अशा अर्थाचे निवेदन आम्ही सर्वजण पंतप्रधान आणि केंद्रीय गृह मंत्री यांना पाठविणार असल्याचे 'आयएमए नाशिक'ने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये दरोडेखोरांचा धुडगूस, मुत्थुट फायनान्सवर गोळीबार

$
0
0

नाशिक: उंटवाडी येथील मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात सहा दरोडेखोरांनी आज धुडगूस घातला. या कार्यालयात लूटमार करतानाच दरोडेखोरांनी गोळीबार करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. त्यात कार्यालयातील एक कर्मचारी ठार झाला असून तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. भरदिवसा दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

उंटवाडी येथे मुत्थुट फायनान्सचं कार्यालय आहे. आज सकाळी सहा दरोडेखोरांनी मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात प्रवेश करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यातील दोन दरोडेखोरांच्या चेहऱ्याला मास्क लावलेले होते. चौघांच्या हातात पिस्तुल आणि दोघांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. या दरोडेखोरांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली असता सजू स्याम्युअल यांनी त्याला विरोध करताच एका दरोडेखोराने स्याम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर कार्यालयातील एकाच्या डोक्यावर बंदुकीच्या बटाने प्रहार करत व्यवस्थापकालाही मारहाण केली. या हल्ल्यात चंद्रशेखर देशपांडे आणि कैलास जैन हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरोडेखोरांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू असतानाच सुरक्षा रक्षकाने सायरन वाजविल्याने चिडलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करत तिथून पलायन केलं. या दरोडेखोरांच्या हाती काहीही लागलं नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक याप्रकरणी कसून तपास करत आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी धुडगूस घातल्याने नाशिक शहर हादरून गेलं आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर मंत्र्याना कांदे फेकून मारणार: राजू शेट्टी

$
0
0

नाशिक:

कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे, बांगलादेशचे लावलेले निर्यात शुल्क माफ करावे या मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाहीत तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्याना या भागात कांदे फेकून मारू असा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिला आहे.

नांदगाव मधील चांदोरे गावात वेळेत चारा छावणी सुरू न केल्याने ५५ गायी मृत झाल्या आहेत. या गायींच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गो हत्येचा गुन्हा दाखल करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. आज एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हा बँकेची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी नाहीतर वसुलीला येणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना पळवून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

...तर महाआघाडीसोबत जाणार

विधानसभा निवडणुकीविषयीही ते बोलले. विधानसभेत भाजप-शिवसेनेविरोधातच आमची लढाई असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. विधानसभेत २० ते २५ जागा लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. सगळे सोबत आले तर आम्ही विधानसभेसाठी महाआघाडीसोबत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी: मंदिरात नाण्यांचा ढीग; बँकाही घेईनात!

$
0
0

शिर्डी:

शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या दानपात्रात जमा होणारी नाणी स्वीकारण्यास बँकांनी नकार दिला आहे. हे पैसै इतके आहेत की ते ठेवण्यास बँकेत जागाच नाही, असं कारण बँकांनी दिलं आहे. ही चिल्लर तब्बल दीड कोटी रुपयांची आहे! श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे सीईओ दीपक मुंगळीकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी बँकांसह आता रिझर्व्ह बँकेकडे या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

मुंगळीकर यांनी सांगितले की दर आठवड्याला दोन वेळा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिराच्या दानपात्रातून पैशांची मोजणी केली जाते. दरवेळी साधारणपणे दोन कोटी रुपयांच्या नोटा आणि पाच लाख रुपयांची नाणी मोजली जातात. मंदिरातला नाणी आणि रोख रक्कम देशातील आठ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आलटूनपालटून जमा केली जाते.

गेल्या काही महिन्यांपासून बँकांनी ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांच्याकडे ही नाणी ठेवण्यास जागा नसल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. मंदिर व्यवस्थापनाने रिझर्व्ह बँकेसह अनेक बँकांना पत्र लिहून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीए’मध्ये नाशिकचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या जुलै २०१९ मध्ये सुरू होणाऱ्या १४२ व्या तुकडीसाठी सुदर्शन अॅकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेली लेखी परीक्षा व एसएसबी मुलाखतीचा टप्पा पार करून नाशिकचे हे दोघे विद्यार्थी एनडीएमध्ये दाखल होणार आहेत. यासोबतच आणखी १२ विद्यार्थ्यांची औरंगाबादच्या एसपीआय (महाराष्ट्र शासन) अकादमीसाठी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांत आकाश विलास काकड आणि प्रथम संजय बाजड यांचा समावेश आहे. आकाश मखमालाबादचा रहिवासी आहे. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूलमधून तर बारावीपर्यंतचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून पूर्ण केले. त्याचे वडील विलास काकड हे शेतकरी तर आई कुसूम या गृहिणी आहेत. आकाशने अखिल भारतीय अंतिम गुणवत्ता यादीत ३७ वा क्रमांक पटकावला. त्याला एनडीएनंतर आर्मीच्या स्पेशल फोर्सेसमध्ये अधिकारी बनायचं आहे.

प्रथम बाजड हा नाशिकच्या गोविंदनगरचा रहिवासी आहे. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण एमएस कोठारी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबादच्या सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमधून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्या दोन प्रयत्नात आलेल्या अपयशाने खचून न जाता त्याने बारावीनंतर पुन्हा एनडीएची तयारी सुरूच ठेवली. यंदा अंतिम गुणवत्ता यादीत १६३ वा क्रमांक पटकावून स्वप्न साकार केले. त्याला भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक व्हायचे आहे. त्याचे वडील संजय बाजड हे पीसीआयएल या कंपनीत नोकरीस असून आई शिल्पा या गृहिणी आहेत. निवड झालेले दोघे विद्यार्थी पुढील महिन्यात 'एनडीए'त तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणासाठी दाखल होतील. त्यानंतर आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून आकाश लष्करात लेफ्टनंट तर प्रथम हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर रुजू होईल.

\Bएसपीआय औरंगाबादसाठी १२ विद्यार्थी \B

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एनडीएचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या, महाराष्ट्र सरकारच्या सर्व्हिसेस प्रिपेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) औरंगाबाद या नामांकित संस्थेची अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यात शहरातून एकूण १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. राज्यभरातून दहा हजाराहून अधिक विद्यार्थी एसपीआयच्या परीक्षेस प्रविष्ट होतात. त्यापैकी केवळ ६० जणांची निवड होते. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नाशिकमधील आदित्य गोपाल राकेचा, पार्थ चंद्रशेखर देशमुख, योगेश त्रंबकराज चोपडे, श्रेयश सुनील सावरकर तसेच सूरज शिंदे, अभिषेक खोसे (दोघेही अहमदनगर), मिहीर तावडे (जळगाव), आदित्य आगरकर (शिरूर, जि. पुणे), दिग्विजय सरकपाटील (सातारा), संकेत सूर्यवंशी (कोपरगाव) व हार्दिक देशमुख (नवी मुंबई) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांमध्ये सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न व त्यासाठी लागणारी धडपड, पालकांमध्ये त्याबद्दलची वाढलेली जागरुकता ही यंदाच्या यशामध्ये महत्त्वाची बाजू आहे.

- हर्षल आहेरराव, मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समता परिषद प्रदेश चिटणीसपदी शेलार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश चिटणीसपदी गजानन शेलार यांची वर्णी लागली आहे. गेले काही वर्षे भुजबळ व शेलार यांचा वाद सुरु होता. पण, महापालिका निवडणुकीनंतर तो काहीसा मावळला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शेलार यांनी भुजबळांसाठी आपले बळ लावले व प्रचाराचे रानही उठवले. त्यामुळेच त्यांना समता परिषदेचे प्रदेशपद देऊन त्यांनी बक्षिसी देण्यात आल्याचे मानले जात आहे.

शेलार यांच्या निवडीबरोबरच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक, नाशिक जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

शेलार चर्चेत

शहरातील तिन्ही निवडीत शेलार यांची नियुक्ती मात्र राजकीय पटलावर चर्चेची ठरली. एकेकाळी शेलार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद मिळावे यासाठी भुजबळांनी मंत्रीपदही पणाला लावले होते. त्यानंतर २०१२ च्या महापालिकेत शेलार यांचा पराभव झाल्यानंतर ते प्रचंड नाराज झाले. त्यानंतर भुजबळ व शेलार वाद चर्चेत राहीला. पण, आता तो मावळल्यामुळे शेलार समता परिषदेचे प्रदेश चिटणीस झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images