Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिव्हिलमध्ये जन्मले सयामी जुळे

$
0
0

पाच लाखांतील एक घटना; मातेची नैसर्गिक प्रसूती

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शरीर दोन मात्र जुळलेले अशा दोन सयामी बालकांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच घटना असण्याची शक्यता असून, या बालकांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक प्रसूतीनंतर सयामी जुळे जन्माला आली.

मंदा दिलीप वारडे (वय ३०, रा. गुरटेंभी, पो. बाऱ्हे, ता. सुरगाणा) असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रसूतीसाठी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारस मंदा यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासी महिलेची सोनोग्राफी केलेली नव्हती. त्यातच त्यांची प्रकृती नाजूक असल्याने स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजित तिदमे यांनी ही केस हातात घेतली. डॉक्टरांनी लागलीच सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. त्यात गर्भात जुळे असून, त्यांचे शरीर एकमेकांना चिकटले असल्याचे समोर आले. सिझरियनमुळे बालकांसह आईच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे डॉक्टरांनी प्रसूती नैसर्गिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास महिला प्रसूत झाली. याबाबत बोलताना डॉ. तिदमे यांनी सांगितले की, खूप जोखमीचे बाळंतपण होते. माता व नवजात बालकांची प्रकृती स्थिर आहे. सध्यातरी त्यांचे लिंग कोणते हे अस्पष्ट आहे. या नवजात बालकांना दोन डोके, चार हात आणि चार पाय असे अवयव आहेत. पंरतु, त्यांच्या शरीराचा छाती व पोटाचा भाग एकमेकांना चिकटलेला आहे. त्यांच्या पोटाची नाळदेखील एकच आहे.

..

सयामी जुळे जन्माला येण्याची सिव्हिल हॉस्पिटलमधील पहिलीच घटना आहे. असे बालक आफ्रिका व दक्षिण आशिया खंडामध्ये जन्माला येण्याचे प्रमाण अधिक असून, सुमारे पाच लाख नवजात बालकांच्या जन्मामागे एखादी घटना अशी घडते. या मुलांना विलग करण्याची सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर होताच, त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

- निखील सैंदाणे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य उपसंचालकांना शिस्तभंग नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उपजिल्हा रुग्णालयांची अचानक तपासणी करून त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य सेवा उपसंचालक रत्ना रावखंडे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य सेवाचे आयुक्त तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केल्याने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाही, असा सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर कळवण उपजिल्हा रुग्णालयास ६ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रुग्णविषयक सोयी सुविधा, वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती व कार्यपाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य सेवाच्या सहसचांलकांमार्फत नाशिक परिमंडळच्या उपसंचालक रत्ना रावखंडे यांना देण्यात आले होते. परंतु, हा आदेश रावखंडे यांनी गांभीर्याने न घेतल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या या निष्काळजीपणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस रावखंडे यांना बजावण्यात आली आहे. आपण स्वत:हूनच उपजिल्हा रुग्णालयांची तपासणी करणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. दिलेल्या आदेशाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासणी अहवाल सादर करणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सरकारी कामाकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच आदेशित केलेल्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी ही निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्याकडे सोपवून वरिष्ठांच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याचा ठपका रावखंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमान्वये शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस मुंढे यांनी रावखंडे यांना बजावली आहे. या कारवाईची आरोग्य सेवा विभागाच्या वर्तुळात चर्चा असून, परिमंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरच कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

निवृत्त डॉ. जगदाळे हजर

मुंढे यांनी केलेल्या कारवाईमुळे आरोग्य सेवा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. पुढील कोणतेही आदेश त्यांना प्राप्त झालेले नाहीत. परंतु, मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने डॉ. जगदाळे हे सुद्धा कोणतीही ऑर्डर नसताना सोमवारी त्यांच्या दालनात हजर झाल्याचे समजते. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत ते हॉस्पिटलमध्येच ठाण मांडून होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परस्कारार्थी असे विशेष वारकरी सेवा पुरस्कार :

$
0
0

परस्कारार्थी असे

विशेष वारकरी सेवा पुरस्कार : एकनाथ महाराज थोबडे (वाशी)

सांप्रदायिक मृदंगवादन वारकरी सेवा पुरस्कार : राम महाराज काजळे (परभणी)

सांप्रदायिक चाली भजन वारकरी सेवा पुरस्कार : महेश महाराज भगुरे (आळंदी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दिवसांनंतरही विकृत गँग मोकाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तरुणाची लूटमार आणि कथित अत्याचार करून पसार झालेल्या विकृत टोळीच्या घटनेनंतर पाच दिवसांनी कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे समोर आलेल्या या विकृत टोळीचा पर्दाफाश होणे महत्त्वाचे असून, पोलिसांनी काही रिक्षा व्यावसायिकांसह स्थानिक नागरिकांकडे चौकशी केल्याचे समजते.

कुटुंबातील शुभकार्याच्या पत्रिका वाटण्यासाठी केरळहून नाशिकमध्ये आलेल्या या तरुणाचा पंचवटी परिसरात मंगळवारी रात्री १२ ते बुधवारी पहाटे चारच्या दरम्यान मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. केरळमधील कोटायम येथे राहणारा हा पीडित तरुण सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. यापूर्वी तो काही वर्षे नाशिकमध्ये वास्तव्यास होता. परिचितांना कुटुंबातील शुभकार्याची पत्रिका देण्यासाठी तो नाशिकमध्ये आला होता. तो मंगळवारी (ता. ४) रात्री नऊ वाजता पंचवटी परिसरात पोहोचला. येथील एका हॉटेलमध्ये त्याने खोली घेतली. भद्रकाली परिसरात रात्री अकराच्या सुमारास तो जेवणासाठी गेला. त्यानंतर तो फळ बाजारपेठेजवळ आला. पंचवटीतील हॉटेलमध्ये येण्यासाठी त्याने रिक्षाची मदत घेतली. रिक्षाचालकाने त्याला थोडा वेळ भद्रकाली परिसरातच फिरविले. नंतर दामोदर चित्रपटगृहाजवळ चार जणांना रिक्षात बसविले, तर दोन जण मागोमाग दुचाकीने येऊ लागले. रिक्षाचालक आणि रिक्षात बसलेल्या अन्य तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याने रिक्षा थांबवून उतरून देण्याची मागणी केली. मात्र, रिक्षातील एकाने त्याच्या गळ्याला चाकू लावून चूपचाप बसून राहण्याबाबत धमकावले. त्यानंतर थोड्याच अंतरावर एकाने रिक्षाचालकाकडे बीअरच्या बॉटल्स आणून दिल्या. त्यानंतर संशयित त्याला निर्जन ठिकाणी घेऊन गेले. त्याला बीअर पाजली व मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासाबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की काही रिक्षाचालकांसह स्थानिक भागातील नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. अद्याप ठोस पुरावे समोर आले नसून, लवकरच या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभाविप पोहोचणार एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यातील एक हजार कॉलेजांमधील एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. येत्या ९ जुलै रोजी विद्यार्थी दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शिक्षण घेतानाच्या अडचणी आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यानंतर आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा महाराष्ट्र प्रदेश अभ्यास वर्ग व महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठक भोसला मिलिटरी स्कूल येथे झाली. या वेळी प्रदेश अभ्यासवर्गाची माहिती, महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीमध्ये घेण्यात आलेले विविध निर्णय आणि २०१९-२०२० ची आगामी विविध शैक्षणिक विषयांतील अभाविपची भूमिका प्रदेशाध्यक्ष सारंग जोशी व प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. या वेळी प्रदेशाध्यक्ष सारंग जोशी म्हणाले, की अभ्यास वर्गामध्ये कार्यकर्त्यांसाठी विविध वैचारिक सत्र व व्यावहारिक स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 'गुरू नानक देव' या विषयावर हरविंदरसिंग, 'अंतर्गत व बाह्य सुरक्षा : एक राष्ट्रीय आव्हान' या विषयावर अरुण करमरकर, 'विद्यापीठ अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन व आपल्या सूचना' हे अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, तर 'महाविद्यालय परिसराचे नवे स्वरूप व विविध उपक्रम' हे सत्र अभाविप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री जी. लक्ष्मण यांनी मांडले. या वेळी यजुर्वेंद्र महाजन यांच्या मुलाखतीचे आयोजन या वेळी करण्यात आले होते. विविध विषयांवर करण्यात येणारे आंदोलन व सदस्यता, मीडिया आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर अशा व्यावहारिक प्रशिक्षणाचे आयोजनही या वेळी करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीमध्ये घेण्यात आलेले विविध निर्णय आणि २०१९-२०२० ची आगामी विविध शैक्षणिक विषयांतील अभाविपच्या भूमिकेबाबत प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांनी माहिती दिली. अभाविपचे ५४ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुणे येथे होणार असून, प्रतिभासंगम या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन विभाग आणि राज्य अशा दोन्ही स्तरावर करण्यात येऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात येणार आहे.

\Bआंदोलनांतून उठवणार आवाज\B

आगामी काळात स्वयंचलित अभियांत्रिकी महाविद्यालय आणि खासगी विद्यापीठांच्या वाढत्या फी व मनमानी कारभाराविरोधात अभाविप आंदोलन करणार आहे. अवाजवी शुल्काचे गांभीर्य लक्षात घेता, विद्यापीठाच्या शुल्कनिर्धारण समितीच्या विरोधातही आंदोलन करणार आहे. आयटीआय व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची छात्रवृत्तीसाठी आगामी काळात आंदोलन करण्यात येणार आहे. अभ्यास संचालक मंडळ विद्यार्थी नामांकनाचा वाढता घोळ लक्षात घेता, त्या विरोधातही अभाविप आंदोलन करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेतू केंद्रास ‘मेट’मध्ये प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणी ते महाविद्यालयामधील प्रवेश आणि कागदपत्रांचे सादरीकरण या पूर्ण प्रक्रियेसाठी मेट, भुजबळ नॉलेज सिटी महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्रास शासनाची मान्यता मिळाली आहे.

तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी शिक्षण, मत्स्य व दुग्ध, कलाशिक्षण या विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी या केंद्राद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण झाल्यानंतर राज्य प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. यादीनुसार विद्यार्थांना ज्या कॉलेजात प्रवेश मिळाला आहे, त्या संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन सर्व कागदपत्रे व शुल्काचा ड्राफ्ट सादर करावा लागतो. पालक व विद्यार्थांचा वेळ आणि आर्थिक खर्च या दोन्ही गोष्टींचा अपव्यय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे महाविद्यालय आणि विद्यार्थान मध्ये 'सेतू असिस्टंट अॅडमिशन रजिस्टर' (सार) या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन सेतू उभारण्यात आला आहे. सेतूअंतर्गत 'एक खिडकी' उपक्रम प्रथमच शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. यामुळे इंजिनीअरिंग, मेडिकल, कृषी, मत्स्यविज्ञान, नर्सिंग, फाइन आर्टस्, आयुष अशा कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती, समुपदेशन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी ते अंतिम प्रवेशही प्रक्रिया एकाच ठिकाणावरून पार पाडता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाभा संशोधन केंद्रात सहाय्यकपदाची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक भाभा अणू संशोधन केंद्रात कार्य सहाय्यक पदाची भरती जाहीर करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी पात्र आहेत. सहाय्यक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांना १ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असून पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. भाभा अणू संशोधन केंद्रात कार्य सहाय्यक पदाच्या ७४ जागांसाठी भरती होत आहे. या भरतीप्रक्रियेतून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना अठरा हजार रुपये मासिक वेतनासह केंद्र सरकारच्या नियमावली अंतर्गत येणारे इतर वेतन भत्ते देण्यात येतील. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण ही पात्रता असून प्रयोगशाळेत कार्य करण्यासह त्यांची देखरेख करण्याची जबाबदारी कार्य सहाय्यकावर असेल. सहाय्यकाच्या कामाचा तपशील व अधिक माहिती संशोधन केंद्राच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली असून १ जुलैपर्यंत उमेदवारांना शुल्क भरणा करून अर्ज नोंदणी करणे अनिवार्य आहे. कागदपत्रांची तपासणी करून पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी https://recruit.barc.gov.in/barcrecruit/main_page.jsp या वेबसाइटवर अर्ज नोंदणी करावी. तसेच भरतीसंदर्भातील माहिती वेबसाइटवर व ई-मेलद्वारे कळविण्यात येईल, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे. ...तर अर्ज बाद! ऑनलाइन अर्ज नोंदवताना उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी आढळल्यास अथवा परीक्षेच्या वेळी ऑनलाइन अर्जात नमूद माहितीचे पुरावे सादर न करू शकल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल, अशी सूचना केंद्राने केली आहे. या भरतीसाठी केंद्राने इतर कोणाचीही नेमणूक केली नसून फक्त केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणारी माहितीच ग्राह्य धरावी, असे आवाहन केंद्राने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांना धडा शिकविणार

$
0
0

धार्मिक स्थळ बचाव समितीचा इशारा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप-सेनेच्या आमदारांनी धार्मिक स्थळ बचाव समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने विश्वस्त आक्रमक झाले असून, आमदारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. तसेच, जोपर्यंत मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाचा महापालिकेचा प्रस्ताव राज्य शासन मंजूर करीत नाही तोपर्यंत येत्या महासभेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

महापालिकेने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात ६४७ धार्मिक स्थळे ही अनधिकृत ठरवली आहेत. यातील ९० टक्के धार्मिक स्थळे ही मोकळ्या भूखंडांवरील आहेत. शहरातील कॉलनींतर्गत मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे नियमितीकरणाचा महासभेचा शासनाला पाठविलेला ३७/१ चा प्रस्ताव मंजूर झाल्यास ९० टक्के धार्मिक स्थळे वाचणार आहेत. परंतु, हा प्रस्ताव दोन वर्षापासून शासन दरबारी पडून आहे. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक झाली. यासाठी आमदार, नगरसेवक व पालिकेतील पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. परंतु सभागृहनेते दिनकर पाटील, दिलीप दातीर, राकेश दोंदे, रवींद्र धिवरे, सचिन कुलकर्णी, गोकूळ निगळ वगळता अन्य सर्वच पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठ फिरवली. त्यामुळे धार्मिक स्थळांचे विश्वस्त संतप्त झाले. अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना गल्लीतील धार्मिक स्थळदेखील वाचविता येत नाही, अशा शब्दांत काशीनाथ बोडके, विनोद थोरात, नंदू कहार आदी धार्मिक स्थळ बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदारांना निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा दिला.

सभागृहनेते पाटील यांनी धार्मिक स्थळ बचाव समितीचा लढा अराजकीय असल्याचे स्पष्ट करीत काही लोकांकडून राजकारण केला जात असल्याचा अप्रत्यक्ष टोला भाजप आमदारांना लगावला. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री भेटीनंतर धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक घेत खुलासा का केला नाही, असा सवाल करीत दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवू असा इशारा दिला.

..

सभागृहनेते पाटलांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

धार्मिक स्थळ नियमितीकरणाचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर केला जात नाही, तसेच महापालिकेने सील केलेल्या मिळकती उघडल्या जात नाहीत आणि सिडकोच्या घरांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येत्या महासभेत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा दिनकर पाटील यांनी दिला आहे.

..

महापौरही लक्ष्य

भाजप-सेनेच्या चारही आमदारांसह महापौर रंजना भानसी यांच्यावरही विश्वस्तांसह पाटील यांनी टीकास्र सोडले. आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ देत नाही अन् महापौर रामायण बंगल्याच्या बाहेर पडत नाही अशा शब्दांत पाटील यांनी महापौरांना लक्ष्य केले. या कामांचे श्रेय आमदार, महापौरांनी घ्यावे, परंतु ही धार्मिक स्थळे वाचवावीत, असे आवाहन यावेळी ‌पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्षपदी खिंवसरा

$
0
0

नाशिक : राजस्थानी लेडिज सर्कल यांचा शपथविधी सोहळा नुकताच दि केन्सिग्टन क्लब, नाशिक येथे पार पडला. माजी अध्यक्ष अनिता अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नीलू खिंवसरा यांच्याकडे सुपूर्द केली. उपाध्यक्षपदी पायल राठी, मानद सचिवपदी विद्या साखला, खजिनदार पद्मा राठी, सहसचिव पूनम राठी, तसेच कमिटी सदस्य म्हणून अल्का राठी, अंजली अग्रवाल, सरीता काबरा, अंजू अग्रवाल, सरोज डागा, अशिमा केला, सखी बुब यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

$
0
0

मनमाड : जळगाव बुद्रूक (ता. नांदगाव) येथे सर्पदंश झाल्याने नंदाबाई काळू बुरकुले (वय ४०) या महिलेचा राहत्या घरी मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री या महिलेला सर्पदंश झाल्यानंतर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसावर जमावाचा प्राणघातक हल्ला

$
0
0

अंडा भुर्जी स्टॉलवर राडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंडाभुर्जी स्टॉलवर राडा करणाऱ्या टोळक्यांना आवर घालण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. ९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सीबीएस परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले तर, नऊ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शाहीर आसाराम जावळे (२०), नितीन धुराजी हिवाळे (१९), सोनू सुभाष कांबळे (२०), सौरभ पाराजी पाथरे (२०), भिमा रामभाऊ पाथरे (२०), सुरज तुळशीराम लहाडे (२१), योगेश धुराजी हिवाळे (२३) अमोल पांडुरंग कोळे (२३) आणि शाम मच्छिंद्र चव्हाण (२१) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्व संशयित गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टी भागातील आहे. याच गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांनी चौघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. हाणामारीची घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

ठक्कर बाजार परिसरातील सीबीएस कॉर्नरजवळ अंडाभुर्जी व्यावसायिकास मारहाण केली. संशयितांनी व्यावसायिकास मारहाण करीत त्याच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहचले. मात्र, संशयित आरोपींनी पोलिसांच्या पथकावर सुद्धा दगडफेक करीत लाकडी दंडुक्यांनी हल्ला चढविला. पोलिसांना दमबाजी करणाऱ्या या टोळक्यापैकी एकाने पळून जाण्याच्या प्रयत्त्नात कॉन्स्टेबल सागर हजारी यांच्यावर हल्ला चढविला. हजारी यांच्या डोक्यात लाकडी दंडुका व फावड्याने वार करण्यात आला. त्यात हजारी यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन ते खाली कोसळले. यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर जखमी हजारी यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांनी प्राणघातक हल्ला, दंगल माजविणे, शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नऊ संशयितांना सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. त्यांना कोर्टाने १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघा अल्पवयीनांना बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६ प्रकारच्या रक्त, लघवी चाचण्या मोफत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रक्त, लघवीशी संबंधित विविध प्रकारच्या २६ चाचण्यांसंदर्भात महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांची होणारी लुबाडणूक आता थांबणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर महापालिकेच्या १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता २६ प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. शासन अंगीकृत हिंदुस्तान लॅटेक्स लिमिटेड (एचएलएल) या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना ही मोफत सुविधा सर्व आरोग्य केंद्रामध्ये मिळणार आहे. या चाचण्यांना येणारा खर्च महापालिका आणि सरकार उचलणार आहे.

सध्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्त आणि लघवीची तपासणी केली जाते. परंतु, केवळ मलेरिया आणि मधुमेहाचेच निदान होत असल्याने अन्य निदानासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना खासगी लॅबचा आधार घ्यावा लागतो. खासगी पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जाते. ते सर्वसामान्य रुग्णांना परडवत नाही. त्यामुळे रुग्णांची उपचारांअभावी हेळसांड होते. ती रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पावले उचलली असून, ग्रामीण भागात एचएलएल कंपनीमार्फत दिली जाणारी मोफत सेवा पालिका हद्दीतही सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून 'एचएलएल'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी सरकारने विविध २६ प्रकारच्या रक्त, लघवी चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच धर्तीवर शहरी भागातील महापालिकेच्या १९ प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांना प्रतिचाचणी येणारे ८० रुपये शुल्क सरकारकडून कंपनीला दिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक शहरी आरोग्य सेवा केंद्रावर कंपनीचा एक प्रतिनिधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रतिनिधीमार्फत मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांचे रक्त, लघवीचे नमुने गोळा केले जातील. प्रयोगशाळेत तपासल्यानंतर दुसऱ्या दिवशी तपासणी अहवाल त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या चाचण्या होणार

मलेरिया, मुधमेह, प्लेटलेट काऊंट, कंप्लिट ब्लड काऊंट, ब्लड युरिया, सिरेटिन क्रिएटिनिन, एसजीओटी, सीरम कॅल्शिअम, सीरम पोटॅशियम, युरिन मायक्रोस्कोपी आदी २६ प्रकारच्या चाचण्या.

रक्त, लघवीच्या चाचण्यांसंदर्भातील महिनाभराचा अहवाल विविध प्राथमिक केंद्रांकडून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला सादर होईल. त्यानंतर वैद्यकीय विभागाकडून पडताळणी होऊन तो शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल. त्यानंतर शासनाकडून तपासण्यांचे देयक सदर कंपनीला अदा केले जाणार आहे.

डॉ. राहुल गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्काडा’तील बदल अध्यक्षांच्या आदेशानेच

$
0
0

सीईओंनी जबाबदारी ढकलली सिताराम कुंटेवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्काडा निविदा प्रक्रियेतील शुद्धीपत्रक हे कंपनी अध्यक्ष सिताराम कुंटे यांच्या परवानगीनेच काढले. निविदेचे तीन तुकडे केलेले नाही. एकाच कंत्राटदारामार्फत तीन फेजेसमध्ये काम करण्यासाठी बदल केल्याचा दावा करीत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)) प्रकाश थविल यांनी या प्रकरणातील बदलांची जबाबदारी अध्यक्षांवरच ढकलली आहे.

स्मार्ट कंपनीतील अनागोंदी आणि स्काडा प्रणालीच्या निविदा प्रक्रियेतील घोळास जबाबदार धरत कंपनीचे सीईओ थविल यांच्याबाबत आक्रमक भूमिका संचालकांनी घेतली होती. त्यास तीन दिवस उलट्यानंतर कंपनीने स्काडा योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देत भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आहेत.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कॉर्परेशन लिमिटेडच्या शनिवारी होणारी संचालक मंडळाची बैठक निविदा प्रक्रियेतील परस्पर झालेल्या बदलांवरून रद्द करण्यात आली होती. महापौरांसह लोकनियुक्त संचालकांनी स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार आणि स्काडा योजनेत तीनवेळा काढलेल्या शुद्धीपत्रकावरून थेट सीईओ थविल यांच्यासह आयटी व्यवस्थापक प्रमोद गुजर यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. संचालकांच्या आरोपांबाबत तीन दिवसांनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. स्काडा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत संचालक मंडळाच्या बैठकीतच स्पष्टीकरण दिले जाणार होते. परंतु, बैठक रद्द झाल्याने स्पष्टीकरण देता आले नाही. स्काडा वॉटर मीटरबाबतचे निर्णय हे स्मार्ट सिटीचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांच्या एकत्रित चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने तसेच निविदाधारकांच्या वेळोवेळी एकत्रित बैठका घेऊन त्यांच्या सूचनांवर अभ्यास करून पूर्ण पारदर्शकरितीने व्यापक स्पर्धेसाठी परिपूर्ण निविदा तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. निविदा प्रक्रियेतील बदल हे अध्यक्षांच्या समंतीनेच केले. तसेच स्काडा वॉटर मीटर टेंडरचे तीन तुकडे केलेले नसून एकाच कत्रांटदारामार्फत तीन फेजेसमध्ये काम पूर्ण करून घेतले जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हा तर पायलट प्रोजेक्ट

शहरात एकाच वेळी सर्व मीटर बसवले तर पाणीपट्टीत अचानक वाढ होऊन नागरिकांची नाराजी ओढावली जाऊ शकते. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने ही योजना राबविण्याचा मानस असल्याचा दावा केला आहे. तसेच सिस्टर कंपनी आणि आयएसओ सर्टिफिकेट आणि एफसीआरआय सर्टिफिकेटबाबत केलेले बदल हे निकोप स्पर्धेसाठी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सदर प्रकल्प ह निविदास्तरावरच असून कोणालाच काम मिळालेले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भ्रष्टाचाराचा आरोप करणे संयुक्तिक नाही, असे मत कंपनीने मांडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या परीक्षेत शाळांचे यश

गिरीश कार्नाड जोड

$
0
0

अनेक विषयांत पारंगत असणारे जे अत्यल्प लोक असतात, त्यांच्यामध्ये गिरीश कार्नाड अग्रणी होते. भालचंद्र नेमाडे यांना जनस्थान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे होते. त्यावेळचे त्यांचे भाषण डोळ्यांत अंजन घालणारे होते. कार्नाड यांच्या रूपाने कलावंत तर हरपलाच; पण आपण अत्यंत निधड्या वृत्तीचा विचारवंतही गमावला आहे.

- लोकेश शेवडे, माजी कार्यवाह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान

प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार' प्रदान करण्यासाठी नाटककार गिरीश कर्नाड नाशिक येथे आले होते. त्या वेळी त्यांची भेट झाली होती. भारतीय रंगभूमी समृद्ध करण्यात कार्नाड यांचा मोलाचा वाटा आहे. राजकीय व सामाजिक परिस्थितीचे त्यांना तीव्र भान होते. रंगभाषा आणि त्याच्या अनुषंगाने सादरीकरण याची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली होती आणि त्याला जगभर मान्यता मिळाली. विनम्र अभिवादन.

- विश्वास ठाकूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप

$
0
0

हत्येप्रकरणी

पतीला जन्मठेप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चरित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

अंबादास मुरलीधर देसाई (६०, रा. विष्णूनगर, म्हसोबा मंदिराजवळ, स्टेशनवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. अंबादास देसाईने २१ एप्रिल २०१७ रोजी त्याची पत्नी शोभा (५२) हिची निर्घुण हत्या केली होती. चरित्र्याच्या संशयावरून अंबादास देसाई सतत शोभा यांना मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी अंबादासने शोभा यांना सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथे पिरबाबाला घेऊन जाण्याचा बहाणा केला. शोभा यांना दुचाकीवर घेऊन नाशिक-पुणे हायवे रोडने देसाई दाम्पत्य गेले. मोह शिवारातील बंद असलेले हॉटेल साईलीलाच्या पाठीमागे नेऊन अंबादासने कापडी फेट्याने शोभा यांचा गळा आवळून खून केला. यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करून अंबादासला बेड्या ठोकल्या. या खटल्याचे काम प्रमुख जिल्हा न्यायाधिश साहेब आर. एम. जोशी यांच्या कोर्टात चालले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील शिरीष कडवे यांनी १९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यात शोभा हिला आरोपीसोबत शेवटचे पाहणारे साक्षीदार व इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवले. तसेच त्यास आजीवन कारावसाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पुनदप्रश्नी पालकमंत्र्यांनी आता पुढाकार घ्यावा'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण सटाणा शहरास कालव्याद्वारे पाणी देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम असून, त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनाआधी जलवाहिनीविरोधी कृती समितीची बैठक घेणे गरजेचे आहे. आमच्या भावना पायदळी तुडवून पाइपलाइनचा अट्टहास केल्यास उद्रेक अटळ राहील, असा इशारा कळवण, देवळा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. पुनद पाइपलाइनप्रश्नी शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी कळवणच्या नाकोडा विश्रामगृह येथे जलवाहिनीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सटाणा शहरास पाणी देण्यास विरोध नसून पाइपलाइनला विरोध आहे. सटाणा शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी ठेंगोडा धरणातील गाळ काढावा व धरणाची उंची वाढवावी. पावसाळ्यातील पुरपाणी धरणात जाण्यासाठी प्रयत्न करावे, ठेंगोडा केटीवेअरचे काम त्वरीत करावे, सुळे उजव्या कालव्याचे काम होवून तो सुरू करावा, मालेगावचा रोटेशन कालावधी कमी करावा जेणेकरुन सटाण्याला पाणी मुबलक व लवकर उपलब्ध होईल आदी मुद्दे शेतकऱ्यांंनी मांडले. पवार यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, रवींद्र देवरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, माजी सभापती शैलेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, हेमंत पाटील, राजेंद्र भामरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याच्या बैलजोडीची चोरी

$
0
0

शेतकऱ्याच्या

बैलजोडीची चोरी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील टेहरे गावातील शिवारातून एका मळ्यात उभे असलेली बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी टेहरे येथील शेतकरी भूषण दादासाहेब शेवाळे ( वय २५, रा. टेहरे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास घडला. अज्ञात चोरट्यांनी शेवाळे यांचे पत्र्याचे शेडला असलेले कोयंडा तोडून शेडमध्ये घुसून बांधलेल्या बैलांचे दोर कापून बैल चोरून नेलेत. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकरी या चोरीच्या घटनेने हादरले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोडी चोरीला गेल्याने शेवाळे हे हवालदिल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, सतर्कतेचा इशारा

$
0
0

शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह संततधार पावसाने सोमवारी सायंकाळी शहराच्या अनेक भागात हजेरी लावली. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मंगळवारी (दि. ११) देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने मुक्काम ठोकला आहे. पावसाने रविवारी (दि. ९) ढगाळ वातावरण होऊनही सुटी घेतली. उकाड्याने मात्र सर्वांनाच घाम फोडला. नाशिकचे सोमवारी कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सियस तर किमान तापमान २४.९ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविले गेले. मालेगावात अनुक्रमे ४२.५ आणि २८.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शहरावर सायंकाळी ढग दाटून आले. सायंकाळी सव्वा सहानंतर काही भागात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. इंदिरानगर, देवळालीगाव, पंचवटी, नाशिकरोड, सिडको परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सिडकोसह काही परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे अभियंतानगरसह काही परिसरात झाडे, झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. सिडको, सातपूर, सिडको, पंचवटीसह नाशिकरोड परिसरात वीजपुरवठा खंडित झाला.

आकाशात वीज; घरात नाही

पावसाने सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या कडकडाटाने नागरिकांना धडकी भरविली. पावसामुळे महावितरणची यंत्रणा काही भागात पुन्हा कामाला लागली. विजेच्या तारांवर झाड, झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.

दुर्घटनांत तिघांनी गमावला जीव

गत आठवड्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात तिघांनी जीव गमावला आहे. जिल्ह्यात ६ आणि ७ जूनला वादळी वारे, गारपिटीसह जोरदार मान्सुनपूर्व पाऊस झाले. येवला तालुक्यात वादळी वारा व पावसामुळे घरांची भिंत व छत उडून गेल्याच्या २५ घटना घडल्या आहेत. यामुळे संबंधित कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदगावमधील सावरगावमध्ये वीज अंगावर पडून बाळू सावंत (वय ४७) यांचा मृत्यू झाला. येवल्यातील आडगाव चौथवा येथे लताबाई आहेर (४५) आणि निफाडमधील काथरगावला द्वारकाबाई रणपिसे यांचा भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला. सावंत यांच्या कुटुंबीयांना नांदगाव तहसील कार्यालयाच्या माध्यमातून चार लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. येवला तालुक्यात २५ ठिकाणी घर, शाळा व दुकानांचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या असून पॉलिहाऊसचेही नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे दोन ठिकाणी द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रेंडाळे येथे भिंत कोसळून कचरू राऊत जखमी झाले. काही तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पत्रे उडून गेले आहेत. या शाळांची डागडुजी केल्याशिवाय तेथे विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊ नका, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. या पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती राज्य सरकारला कळविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकमत व्हावे, ही सदिच्छा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'ईव्हीएम'बाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, की या काका-पुतण्यामध्ये एखाद्या विषयावर तरी एकमत व्हायला हवे, अशी आमची सदिच्छा आहे. लोकशाही विकसित करण्यास त्याचा अधिक उपयोग होईल.

जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना ४७ वर्षे, दोन महिने, एक दिवस देशाची सत्ता दिली. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस १५ वर्षे सत्तेत होते. परंतु, लोकांनी त्यांना नाकारून आम्हाला संधी दिली आहे. आम्ही जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करीत आहोत. आम्ही कुठे चुकलो, तर राष्ट्रवादी काँग्रेस योग्य पद्धतीने आमच्यावर टीका करते. ही टीका अभ्यासपूर्ण असते. आमच्या सरकारला जाग येण्यासाठी त्यांना ईश्वराने कमीत कमी २५ वर्षे अशी टीका करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागाऐवजी आता शहरावर अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याकडे मुनगंटीवार यांचे लक्ष वेधण्यात आले. ५२ पत्ते पिसले, तरी चारच एक्के येणार, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. पत्ते कितीदा पिसले यावर अवलंबून नाही. मनापासून जनसेवा करण्याचा संकल्प त्यांच्या कृतीत आला, तर ते लोकांचा विश्वास संपादन करू शकतील. आम्ही चांगले काम केले म्हणून आम्हाला संधी मिळाली. त्यांनी जास्त सेवा केली, तर त्यांनाही लोक संधी देतील. सत्ता कुणाची अमर नाही. आम्ही चुकलो, तर लोक आम्हाला माफ करतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images