Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निफाडमध्ये जोरदार हजेरी

$
0
0

निफाडमध्ये जोरदार हजेरी

निफाड : तालुक्यात पूर्व भागातील गावांसह निफाड शहरात सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. लासलगाव, देवगाव, शिरवाडे वाकद, विंचूर, वाहेगाव, भरवस या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. याच भागात शुक्रवारी (दि. ७) जूनला सुमारे तासभर पाऊस झाला होता. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेड नेट, व्यापाऱ्यांचे कांदा शेड कोसळले होते. ते व्यवस्थित करीत असतानाच पुन्हा पावसाने तडाखा दिला. पावसामुळे नुकसान होत असले तरी शेतकरी व नागरिकांनी पावसाचे स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्काडा’वरून रंगला वाद

$
0
0

अध्यक्षांकडे स्पष्टीकरणाची संचालकांची मागणी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणणाऱ्या स्काडा प्रणालीच्या निविदा प्रक्रियेवर संचालकांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. संचालकांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत सीईओंनी खुलासा करीत सदरचे बदल वरिष्ठांच्या संमतीने केल्याचा दावा केल्याने वादात आणखी भर पडली आहे. याबाबत आता स्मार्ट सिटी कंपनीच्या लोकनियुक्त संचालकांनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे मोर्चा वळवत अध्यक्षांवरच आरोप झाल्याने त्यांनीच या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.

स्मार्ट सिटी अंतर्गत बसविण्यात येत असलेल्या स्काडा मीटर प्रणालीच्या निविदा प्रक्रियेवर लोकनियुक्त संचालकांनी आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्ष सीताराम कुंटेंनी निविदा प्रक्रिया थांबवली आहे. निविदा खुल्या होण्याच्या काही दिवस आधीच एका शुध्दीपत्रकाच्या माध्यमातून फेरबदल करण्यात आले. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार असल्याचा आरोप करीत स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, शाहू खैरे व गुरुमीत बग्गा यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष कुंटे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अध्यक्षांनी बैठक रद्द केली. या प्रकरणाला अधिक वाच्यता झाल्यानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ थविल यांनी खुलासा केला. त्यात अध्यक्षांच्या परवानगीनेच फेरबदल केल्याचा दावा केल्याने संचालक अधिक संतप्त झाले आहेत. बोरस्ते, खैरे व बग्गा यांनी पत्रकार परिषद घेत थविल यांच्यावर टीका केली. अध्यक्ष कुंटे यांच्या परवानगीने निविदेत फेरबदल झाले असतील, तर आता कुंटे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी केली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

..

सीईओंवर कारवाई करा : पाटील

स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांच्या खुलाशावर सभागृहनेते दिनकर पाटील यांनीही टीका केली असून, अध्यक्ष सीताराम कुंटेंनी या प्रकरणी थविल यांच्यावर कारवाई करावी. अध्यक्ष हे प्रामाणिक असून, त्यांना या प्रकरणात गोवणे योग्य नसल्याचे सांगत थविल यांच्या खुलाशाबाबत आता अध्यक्षांनीही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. कुंटेंनी जर बदल केले असते, तर निविदा प्रक्रियेला त्यांनी स्थगिती दिलीच नसती असे सांगत नाशिककरांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही संचालक एकत्र असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. थविल यांनी आपल्या कार्यकाळात केलेले गैरव्यवहार आणि अनियमित कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी विद्यार्थ्यांना मिळणार करिअर टीप्स

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

वेगवेगळ्या कारणाने आजवर मालेगाव शहर व परिसरातील पालकांना व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर स्थलांतरित व्हावे लागत आहे. पालकांना व पाल्यांना करियरच्या योग्य संधी व क्षेत्र यांविषयी स्थानिक पातळीवर माहिती उपलब्ध होत नसल्याने मालेगावचा तरुण मागे पडू नये म्हणून येथील रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट व हिंदुस्थान कंम्युटर करियर गाईडन्स यांच्या वतीने करिअर अॅण्ड एज्युकेशनल गाईडन्स फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. मालेगाव शहरात २९ व ३० जून हा मेळावा होणार असल्याची माहिती अॅड. शिशिर हिरे यांनी दिली.

येथील शासकीय विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष विजेंद्र शर्मा, नितीन ठाकरे, दिलीप ठाकरे, सर्जेराव पगार, किशोर कुटमुटीया, देवेंद्र अलइ, योगेश कोठावदे, नीलेश पाटील आदी उपस्थित होते. हिरे यांनी सांगितले की, दोन दिवशीय एज्युकेशन फेअरमध्ये करियरच्या विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ९ ते ६ या वेळेत शहरातील आयएमए हॉल येथे हा फेअर विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. स्वयंरोजगार विषयावर केतन दत्तानी, संजय हिरे, संजय फतनानी, अर्पिता लाड हे मार्गदर्शन करतील. १२ वी नंतरच्या शिक्षणाविषयी प्रा.वर्षा वाघ, सरिता गव्हाणे हे मार्गदर्शन करतील. विधी शिक्षणानंतर कॉर्पोरेट जगतातील संधी याविषयी प्रशांत भारती, अॅड.रमेश दुबे हे मार्दर्शन करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिस ठाण्यातबच्छाव यांची नियुक्ती

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी सहाय्यक निरीक्षक सुजोग बच्छाव यांची नियुक्ती झाली आहे. सुधीर पाटील यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. बच्छाव यांनी नवी मुंबई आयुक्तालयात सहा वर्षे तसेच इगतपुरी रेल्वे पोलिस ठाण्यात सेवा दिलेली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यातर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे, मांगुलाल पारधी, रवींद्र पाटील, सुभाष कुलकर्णी, संतोष उफाडे, शरद सोनवणे, धम्मदीप काकडे, चंद्रकांत उबाळे, जावेद शेख, सत्यभामा चव्हाण, बेबीनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० रिक्षाचालकांवर शहरात कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी १५० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. यापैकी नऊ जणांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रिक्षामधून केवळ तीनच प्रवाशांची वाहतूक करण्याचे बंधन रिक्षाचालकांना घालण्यात आले आहे. परंतु, शहरात सर्रास चार ते सहा प्रवाशांची रिक्षामधून वाहतूक केली जाते. अशा नियम धाब्यावर बसविणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. मंगळवारी सुमारे १५० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, फ्रंट सिट वाहतूक करणे, सिग्नलवर न थांबणे, एकेरी वाहतुकीचे नियम मोडणारे तसेच आवश्यक कागदपत्रे न बाळगणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रामुख्याने ही कारवाई करण्यात आली आहे. चौकाचौकांत थांबून कारवाई करण्यापेक्षा पोलिसांचे फिरते पथक वेगवेगळ्या भागात जाऊन ही कारवाई करते आहे.

कारवाईच्या डोकेदुखीचा सामना करावा लागू नये, यासाठी काही रिक्षाचालक रात्री प्रवासी वाहतूक करण्यास पसंती देत आहेत. तर काही रिक्षाचालक सायंकाळपर्यंत नियमात राहून व्यवसाय करतात तर सायंकाळनंतर मात्र सर्रास चार ते सहा प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘तो’ विद्यार्थी परतला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दहावीची परिक्षाच दिलेली नसल्याने पालक रागावण्याच्या भितीने ऐन निकालाच्या दिवशीच बेपत्ता झालेला बाभळेश्वर येथील अल्पवयीन विद्यार्थी सोमवारी (दि. १०) रात्री सुखरुपपणे घरी परतला आणि त्याच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. तो विद्यार्थी घरी परतला असला तरी त्याच्या शाळा प्रवेशाचे गूढ अद्यापही उलगडलेले नाही.

बाभळेश्वर येथील सुमित शिंदे (नाव बदलेले आहे) हा १७ वर्षांचा विद्यार्थी शनिवारी (दि. ८) दहावीचा निकाल घेण्यासाठी जातो, असे सांगून बाभळेश्वर येथून त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून पळसे येथे गेला. परंतु, घरी न परतल्याने सुमित बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मोठ्या भावाने नाशिकरोड पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दिली. यानंतर सुमितच्या पालकांनी आणि नातेवाइकांनी त्याच्या जेलरोडच्या होली फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही शोध घेतला असता सुमितने तेथे प्रवेशच घेतलेला नसल्याची धक्कादायक बाब होली फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल प्रशासनाकडून समजले होती. त्यामुळे बेपत्ता सुमितच्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला होता.

सुमितची नागपूरवारी

दहावीच्या वर्गात प्रवेशच घेतलेला नसल्याने निकाल कसा आणायचा या भीतीने या घटनेतील सुमित शनिवारी दहावीचा निकाल आणण्यासाठी घरातून बाहेर पडला. थेट रेल्वे स्टेशन गाडून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसला. तेथून तो नागपूरला पोचला. तेथील दीक्षाभूमी येथे सुमित गेला. जवळचे पैसे संपल्यावर पुन्हा रेल्वे स्टेशनला येऊन नाशिकच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेत तो बसला आणि सोमवारी रात्री आठवाजेच्या दरम्यान नाशिकरोड रेल्वे स्टेशनला उतरल्याची माहिती सुमितने त्याच्या पालकांना दिली.

गूढ उलगेना

पालकांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथून त्याला ताब्यात घेतले आणि त्याला नाशिकरोड पोलिस स्टेशनला मंगळवारी आणून पोलिसांपुढे उभे केले. सुमितने सातच्या इयत्तेनंतर प्रवेशच घेतला नसल्याचा दावा होली फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनाने आधीच केला असला तरी या शाळेत प्रवेश घेऊन नववीपर्यंत शिक्षण घेतल्याचे शाळेचे आयकार्ड आपल्याकडे असल्याचे सुमितचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा प्रबोधिनीला मिळणार सहाय्यक प्रशिक्षक

$
0
0

कंत्राटी पद्धतीने होणार पदभरतीचा

म. टा.प्रतिनिधी, नाशिक

येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये रायफल पिस्तोल शुटिंग या खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी सहाय्यक प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार असून हे पद करार पद्धतीने भरण्यास सरकारने मान्यता दिल्याने या खेळाडूंकडे लक्ष देणे सोयीचे होणार आहे.

सहाय्यक पदाची जाहिरात प्रबोधिनीचे प्राचार्य रवींद्र नाईक यांनी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी प्रतिभावान खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करण्याच्या दृष्टीने व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने राज्यात अकरा ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरू आहेत. या ठिकाणी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची शारीरिक क्षमता आजमावून प्रवेश दिला जातो. क्रीडा प्रबोधिनीत राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर नैपुण्य दाखवलेल्या खेळाडूंना प्रवेश देऊन विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. नाशिक येथील प्रबोधिनीमध्ये रायफल व पिस्तोल शुटिंगच्या सहाय्यक प्रशिक्षकाची गरज होती. सरकारने नकतीच या पदाला करार पद्धतीने भरण्यास मंजुरी दिल्याने आणखी एका प्रशिक्षकाची भर पडणार आहे. या पदासाठी एनआयएस डिप्लोमा असणे आवश्यक आहे किंवा प्रशिक्षक हा अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्वत: सहभागी झालेला असावा. या खेळासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी मिळालेला असावा. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मान्यता प्राप्त खेळाच्या आशियायी चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, सॅफ गेम्स या स्पर्धांमध्ये सहभागी झालेला असावा. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सतत पाच वर्ष सहभाग घेऊन किमान एक पदक मिळवलेले असावा. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत तीन वर्ष सहभागी होऊन किमान एक वेळा पदक प्राप्त खेळाडू या पदासाटी पात्र रहाणार आहे. अर्जदार हा पदवीधारक व एमएससीआयटी प्रशिक्षित असावा. या पदासाठी अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंतची संधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिव्यांगांना मोफत प्रवेश

$
0
0

दिव्यांगांना

मोफत प्रवेश

नाशिक : दिव्यांगांना अपंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अपंग कल्याण आयुक्तालय पुणे मार्फत देगलूर (जि. नांदेड) येथे सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. इच्छूक अपंग, मुकबधीर, मतिमंद, अंढ प्रौढ मुला-मुलींनी किंवा पालकांनी ५ जुलैपर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, देगलूर (जि. नांदेड) येथे पत्रव्यवहार करावा किंवा ९९६०९००३६९, ९४०३२०७१००, ९५०३०७८७६७ या मोबाइल क्रमांकावर प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राच्या प्राचार्यांनी केले आहे.

..

संस्थेत व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी १८ ते ४० वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, अंध प्रौढ मुला -मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या केंद्रात प्रौढ अस्थिव्यंगांसाठी शिवण व कर्तनकला व सौंदर्य शास्त्र (ब्युटी पार्लर) प्रौढ मुकबधीरसाठी कॉम्प्युटर टायपिंग, डीटीपी, टॅली, नेटवर्कींग, प्रौढ मतिमंदासाठी इन्व्हलप, कार्ड बोर्ड बॉक्स, फाईल बनविणे, स्क्रिन प्रिंटींग, प्रौढ अंधासाठी फिजीयोथेरपी प्रशिक्षण, योगा व मसाज प्रशिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व वैद्यकीय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ बिबट्यांचा दोन महिन्यात अंत!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाण्याच्या शोधासह अन्य कारणामुळे दोन महिन्यात तब्बल १२ बिबटे जिल्ह्यात विविध ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत २ बिबटे विहिरीत पडून तर रस्ते अपघातात ४ बिबटे ठार झाले आहेत. तसेच नैसर्गिकरित्या मृत्यू होणाऱ्या बिबट्यांची संख्याही समतूल्य आहे. यावरुन पाण्याच्या शोधासह रस्ते ओलांडताना बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

वन विभागाच्या जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ च्या अहवालानुसार बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. २०१८ मध्ये राज्यभरात ८८ बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यात रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात २४, नैसर्गिकरित्या ५७, तर शिकारीत ७ बिबटे मृत्युमुखी पडले. यंदाच्या वर्षीही बिबट्यांचे संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वर्षाच्या प्रारंभी फक्त नाशिक जिल्ह्यातच १२ बिबट्यांचा अंत झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नाशिक परिक्षेत्रातील संगमनेर, अहमदनगर, पूर्व नाशिक आणि मालेगावमध्ये बिबट्यांचा अंत झाला आहे. १२ पैकी २ बिबट्यांचा अंत आजारपणामुळे झाला असून ४ बिबट्यांचा अंत नैसर्गिकरित्या झाला आहे. पाण्याच्या व सावजाच्या शोधात असताना विहिरीत पडून २ बिबटे मृत्युमुखी पडले. रस्ते ओलांडताना झालेल्या अपघातात ४ चार बिबटे ठार झालेत. यातील ३ बिबटे संगमनेर भागात, तर १ बिबट्या पूर्व नाशिक परिसरात ठार झाल्याचे वन विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्याच्या वन विभागाच्या परिक्षेत्रात वनजीवांची संख्या अधिक असल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात येतो. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना कार्यान्वित करत असून वन्यजीवांचे संवर्धनाचा वसा उचलल्याचे वन विभाग कायम सांगते. असे असले तरी वन विभागाच्या अहवालात अवघ्या दोन महिन्यात १२ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शहरातही बिबट्या येण्याचेप्रमाण अधिक असून कचऱ्याच्या आणि निवाऱ्याच्या शोधात बिबट्या शहरातील वस्तीत येत असल्याचे वनअधिकारी सांगतात. वन साधनसंपत्तीचा ऱ्हास बिबट्यांच्या नैसर्गिक मृत्यूला कारण ठरल्याची शक्यता वनधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

राज्यात २५ मृत्युमुखी

नाशिक, चंद्रपूर, पुणे, ठाणे, अमरावती, यवतमाळ, धुळे, कोल्हापूर आणि नागपूर या परिक्षेत्रात जानेवारी व फेब्रुवारी २०१९ या कालावधीत बिबट्यांचा अंत झाला आहे. या सर्व विभागात मिळून २५ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. यातील १५ बिबट्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असून ८ बिबटे रस्ते अपघातात, तर २ बिबटे शिकारीत मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाच्या अहवालात आहे. यामुळे बिबट्यांच्या आणि एकूणच वन्यजीवांच्या संवर्धनासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तरंगांनी सजला युवा महोत्सव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठाचा परिसर मंगळवारी चर्चासत्र, गीत-संगीत, नाट्य, लघुचित्रपटनिर्मिती, पोस्टरनिर्मिती, अंधश्रद्धानिर्मूलन प्रात्यक्षिक व खेळातून निवडणूक प्रक्रिया, अशा सप्तरंगांनी सजून गेला. निमित्त होते ते 'श्रुती' या सामाजिक संस्थेतर्फे विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात 'विवेक' या सामाजिक चित्रपटाविषयी चर्चासत्र घेण्यात आले. त्यानंतर जनगीत, नाट्य, समाज माध्यमे, चित्रपट, पोस्टर, काळी जादू व विज्ञान कार्यशाळा आणि खेळातून निवडणूक प्रक्रिया असे विविध गट तयार करण्यात आले. या महोत्सवात सहभागी १२ विविध राज्यातील २२० हून अधिक युवक-युवतींना या सहा गटात त्यांच्या आवडीनुसार विभागण्यात आले. दरम्यान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी विविध प्रात्यक्षिक गटांना भेटी देत सहभागी युवक-युवतींची मते जाणून घेतली. सुप्रसिद्ध व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी संयोजन केले.

नाट्यातून प्रबोधन

नवी दिल्ली येथील 'इंडियन ओशन बँड'चे संगीतकार राहुल राम यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विविध भारतीय भाषा मिळून एक जनगीत तयार करण्यात आले. बिहारचे प्रसिद्ध नाटककार विनोदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक विषयावर आधारित नाट्यनिर्मितीचा प्रयोग सुरू होता. पर्यावरण, जल-वायू परिवर्तन, शेती, परंपरा व आधुनिकता, बेरोजगारी या विषयांवर समाजमाध्यामांसाठी मोबाइल संदेश तयार करण्यात आले. समाजमाध्यामांच्याच उपरोक्त विषयांनुसार मोहन बिश्त, प्रेम पिराम यांनी मोबाइलच्या सहाय्याने चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण सहभागी युवक-युवतींना दिले.

जलसंकटावर चर्चा

जलसंकट व गावाच्या समस्या या विषयावर योगेश सोनवणे व राहुल शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर निर्मितीची कार्यशाळा झाली. काळी जादू व विज्ञान कार्यशाळा यात डॉ. ठकसेन गोराणे व शहाजी भोसले यांनी सहभागी युवक-युवतींना अंधश्रद्धा निर्मूलनाची विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. अबीर कपूर या युवा पत्रकाराच्या नेतृत्वाखाली 'द पोल' हा भारतीय लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभूती देणारा खेळ विविध पक्ष, त्यांचे जाहीरनामे, सभा, टी. व्ही. वरील चर्चासत्रे व मुलाखाती अशा वेगवेगळ्या प्रारूप अंगांनी चांगलाच रंगात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांदा निर्यात’लाहवी मुदतवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने कांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस अजून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली.

कांद्याला निर्यातीसाठी १० टक्के एमईआयएस दर लागू राहील, असे केंद्र सरकारने २८ डिसेंबर २०१८ रोजी जाहीर केले होते. त्यानुसार ही योजना ३० जून २०१९ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती. मात्र ११ जून रोजी अचानकपणे केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेनुसार सदरचा दर शून्य टक्के केल्याने त्याचा परीणाम कांदा निर्यातीवर होऊन पर्यायाने कांदा दरात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता आहे.

सध्या लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याची आवक आहे. लासलगाव बाजार समितीत दररोज साधारणत: २० ते २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. त्यास सर्वसाधारपणे ११५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.

...तर शेतकऱ्यांचे नुकसान

गेल्या १० ते १५ दिवसांपासून कांदा बाजारभावात थोड्याफार प्रमाणात सुधारणा झाल्यामुळे येथील शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेचा दर शून्य टक्के केल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकाने ही योजना अचानक बंद केल्यामुळे त्याचा परीणाम कांदा निर्यातीवर होऊन परीणामी शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होएयाची शक्यता आहे.

सध्या पावसाळी हंगाम सुरू असून, शेतकरी वर्गास खरीप पिकांची लागवड करण्यासाठी पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याने ते आपला कांदा विक्रीस आणत आहेत. केंद्राने ही एमईआयएस योजना पूर्ववत सुरू ठेऊन त्यास दिर्घकाळ मुदतवाढ द्यावी अशी मागणी होळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात वादळी पाऊस; झाडांची पडझड

$
0
0

‌म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या वादळी पावसाने सर्वांची धावपळ उडाली होती. वेगाने वाहणाऱ्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक घरे व दुकानांचे पत्रे उडाले, तसेच विजेचे खांब वाकले आहेत. यामुळे शहरातील अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच अवधान औद्योगिक वसाहत परिसरासह बाजार समितीत पत्र्यांची शेड उडाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाचा ७ जूनचा मुहूर्त हुकल्यानंतर प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. मंगळवारी (दि. ११) दुपारी ४ वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बाजारपेठेत साहित्य गोळा करणेही कठीण झाले होते. काहींचे साहित्य वादळामुळे इतरत्र उडाले होते. तर गृहिणींनी छतावरील साहित्य आवरण्यासाठी कसरत करावी लागली. सुमारे ३० मिनिटे वादळासह पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे शहर पसिरातील सर्व रस्ते चिंब झाले होते. वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी वाहनधारकांनी जवळपासच्या दुकानांचा आसरा घेत विसावा घेतला. त्यामुळे प्रमुख रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून आली.

झाडे पडली, वीजपुरवठा खंडित

पावसासोबत वेगाने वादळी वारे वाहत होते. या वादळाने शहर परिसरातील अनेक झाडे व फांद्या तुटून पडल्या आहेत. शहरातील ८० फुटी रोडवर एक मोठे निंबाचे झाड उन्मळून पडल्याने दुचाकींचे नुकसान झाले. तसेच जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथेही झाडे उन्मळून पडली. जेलरोडवरही अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या दिसून आल्या. शिवाय अनेक कॉलन्यांमध्ये झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडलेल्या दिसत होत्या. तसेच धुळे-अमळनेर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच मुंबई-आग्रा महामार्ग, सुरत-नागपूर महामार्गावरही अनेक झाडे उन्मळून पडली होती. शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य भावनेतून काम सुरू आहे. खंडित सेवेबद्दल दिलगीर आहोत. तरी नागरिकांनी या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकला जीपची धडक; धुळ्यातील तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर-पुणे महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकवर जीप आदळून झालेल्या भीषण अपघातात धुळे येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला. मंगळवारी (दि. ११) पहाटे साडेचारच्या सुमारास पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द गावाजवळ हा अपघात झाला. हे सर्व जण महाबळेश्वर येथे गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला.

जीप ट्रकवर आदळल्याने जीपची एक बाजू पूर्णपणे कापली गेली. उजैर तसलीम अख्तर अन्सारी (वय ३०, रा. फिरदोस नगर, धुळे), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय २०, रा. मच्छिबाजार, धुळे), इरफान शयशोदोहा अन्सारी (वय २०, रा. मच्छिबाजार, धुळे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अदनान निहाल अन्सारी (वय २१, रा. तिरंगा चौक, धुळे) हा जखमी आहे.

याप्रकरणी जुनेर महंमद याच्या फिर्यादीवरून जीपचा चालक शोएब मलिक (गफूरनगर, धुळे) याच्याविरुद्ध अपघात घडवून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धुळे येथील पाच तरुण महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी भाडोत्री जीप (एमएच १८ एजे ८४४२) घेऊन गेले होते. पहाटेच्या वेळी पळवे खुर्द गावाजवळ मालट्रक (एमएच २२ एए ०५२४) चे पुढील बाजूचे ड्रायव्हर साइडचे टायर पंक्चर झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा होता. यावेळी जीपने मालट्रकला उजव्या बाजूने जोराची धडक दिली. त्यात बसलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अदनान अन्सारी, जुनेर महंमद किरकोळ जखमी झाले. जीपचा अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी जीपचालक शोएब मलिक हा अपघातस्थानावरून पळून गेला. मंगळवारी सकाळी ते शिरुर पोलिस स्टेशनला हजर झाला असता पोलिसांनी त्याला सुपा पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

धुळ्यातील मच्छीबाजारात शोककळा

धुळे : ईदनिमित्त आनंदी वातावरण असलेल्या मच्छीबाजार, फिरोजनगर भागात मंगळवारी सकाळी तरुणांच्या अपघाती मृत्यूची बातमी येताच वातावरण बदलून गेले. मच्छीबाजार भागात मोठी शोककळा पसरली असून, मृत तरुणांच्या कुटुबीयांसह नातेवाईकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. मृत तरुणाचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळाल्याने धुळ्यातून नातेवाइकांसह तरुण तिकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सानेगुरुजी यांना ‘सावाना’त अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक सानेगुरुजी कथामाला बालभवन तर्फे सानेगुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. बालसभासद चिन्मय गरुड, नेहा कोठावदे व दर्शन कोठावदे यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते तथा सावानाचे अभ्यासिका प्रमुख प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले, की श्यामची आईमधील आई ही जगभरातल्या मातांची प्रतिनिधी आहे. धर्म, जात, पंथ या पलीकडचा एकमय समाज निर्माण व्हावा यासठी साने गुरुजींची शिकवण महत्त्वाची आहे.साने गुरुजीना मुले प्रिय होती. त्यांना धडपडणारी मुले आवडत त्यांचा विचार आणि वाङमयातून माझी जडणघडण झाली. सेवादलातून गुरुजींनी असंख्य कार्यकर्ते घडविले.

या प्रसंगी सावाना अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते बालसभासदांचा सत्कार करण्यात आला. बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. देवदत्त जोशींनी आभार मानले. यावेळी कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, अर्थसचिव शंकरराव बर्वे, प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, सहाय्यक सचिव अॅड अभिजित बगदे व अंतर्गत हिशेब तपासनीस सी. जे. गुजराथी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महेश नवमीनिमित्ताने नाशिकरोडला शोभायात्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथे श्री महेश नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थी गुणगौरव, वृक्षरोपण, विविध स्पर्धा आदी उपक्रम झाले. खासदार हेमंत गोडसे यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.

देवी चौकातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ बग्गीमध्ये भगवान शंकराची प्रतिमा ठेवून शोभायात्रेला सुरवात झाली. शिवाजी पुतळा, बिटको चौक, मुक्तिधाम, आर्टिलरी सेंटर रोडमार्गे खोले मळ्यातील महेश भवनपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत बॅण्ड, ढोल पथक तसेच लाल व केशरी साड्या घातलेल्या माहेश्वरी महिला भगिनी व पांढऱ्या कपड्यातील बांधव सहभागी झाले. एकही नारा, एकही संदेश, जय महेश, जय महेश अशा घोषणा ते देत होते. माहेश्वरी भवनमध्ये उस्मानाबादचे श्रीकिसनजी भन्साळी यांच्याहस्ते प्रतिमापूजन व महाआरती झाली. माहेश्वरी भवन आवारात वृक्षारोपण करण्यात आले. महेश नवमीनिमित्त दोन दिवस उपक्रम राबविण्यात आले. यावेळी नंदलाल लाहोटी, जयंतीलाल लाहोटी, ओमप्रकाश सोमाणी, रामेश्वर जाजू, अनिल मालपाणी, विजय जाजू, विजय केला, विश्वनाथ भुतडा, रामनिवास सारडा, अजित करवा, अशोक भट्टड, सोमनाथ भट्टड, बंटकलाल राठी, गणेश झंवर, सुनील जाजू, दिनेश करवा, महेश कलंत्री, मुकेश चांडक, मयूर करवा, आशिष चरखा, सतीश कलंत्री, सुनील बूब, रमेश कासट, रामविलास राठी, प्रकाश लाहोटी, सचिन मालपाणी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा गौरव

माहेश्वरी भवनमध्ये विद्यार्थी सत्कार झाला. यावेळी ओमकारनाथ मालपाणी, नाशिकरोड माहेश्वरी सभा अध्यक्ष श्रीनिवास लोया, सचिव रामेश्वर मालपाणी, अशोक तापडिया, राधेशाम बूब, महिला मंडळ अध्यक्षा मीना जाजू, विजय करवा, महेश बूब, अमर मालपाणी, अच्युत राठी, संकेत राठी, शीतल राठी, सारिका करवा, प्रणाली भट्टड, निकिता मालाणी आदींची प्रमुख उपस्थित होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचे धरणे

$
0
0

विविध मागण्यांचे निवेदन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा तीन हजार वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेने हे आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

धरणे आंदोलनाला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली. या वेळी महिलांनी घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. 'कोण म्हणतो देत नाही घेतल्या शिवाय रहाणार नाही' अशा घोषणा महिलांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंशकालीन स्त्री परिचरांना गेल्या २५ वर्षांपासून दरमहा बाराशे रुपये मानधन मिळत होते. आरोग्यसेवा संचालनालयाने १६ मार्च रोजी हे मानधन वाढवून तीन हजार इतके करीत १ जानेवारी २०१९ पासून देण्यात येईल असे आदेश काढले. मात्र आदेश निघूनही या नियमांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या नियमांची अंमलबजावणी करून फरकाची रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हे आंदोलन आयटकचे राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी चित्रा जगताप, हसीना शेख, शालिनी बागूल, सुमन राजगुरू, अरुणा संगमनेरे, तुळसाबाई निकम, रत्ना आहिरे, विमल कुवर, रंजना देठे, अंजनाबाई काळे, विठाबाई हुने, सत्यभामा मोरे, कांताबाई पतंगराव, सुशीला सोनवणे, कमल माळी, अरुणा सजन, मोतनबाई गुरव, वत्सला पगार आदी महिला उपस्थित होत्या.

...

...या मागण्यांचा समावेश

प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांना शासनाच्या आरोग्यसेवेत सामावून घ्यावे, या कर्मचाऱ्यांना किमान १८ हजार वेतन मिळावे, अंशकालीन स्त्री परिचरांच्या सर्व रिक्त जागा भराव्यात. अंशकालीन स्त्री परिचरांच्या वारसांची रिक्त पदावर नेमणूक करावी, अंशकालीन स्त्री परिचरांना रजा व सुट्यांचा लाभ मिळावा, प्रवासभत्तादेखील देण्यात यावा, आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा १० हजार देण्याची शिफारस केली होती, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेवढे काम, तेवढेच दाम!

$
0
0

महाआयटीला कंपनी कामानुसार मोबदला अदा करणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर सुरक्षिततेसाठी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही आणि माहिती तंत्रज्ञान प्रकल्पासाठी महाआयटीला ७८ कोटी ७८ लाखांचा एकत्रित निधी देण्यास लोकनियुक्त संचालकांनी विरोध दर्शवल्यानंतर कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटेंनी आता सावध पवित्रा घेतला आहे. महाआयटीला सीसीटीव्ही आणि आयसीटी (माहिती व तंत्रज्ञान) साठी एकत्रित निधी देण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कामानुसार निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाआयटीकडून जेवढे काम केले जाईल, तेवढेच पैसे कंपनीकडून महाआयटीला दिले जाणार असून, त्यासंदर्भात संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे महाआयटीच्या निधीबाबत निर्माण झालेल्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीच्या वतीने शहरात सुरक्षिततेसाठी आयसीटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प सुरुवातीला स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने राबविण्यात येणार होता. कालांतराने यात बदल करून शहरात आता हा प्रकल्प महाआयटीच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. आयसीटी अंतर्गत शहरात आठशे ठिकाणी ३११५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन असून, त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ४५ कोटी ४३ लाख रुपयांचा वाटा शासनाला देण्याचे निश्चित केले होते. त्यात पुन्हा बदल करून सीसीटीव्हीसोबतच शहरात ५० ठिकाणी वायफाय सेंटर्स उभे केले जाणार आहेत. ऑप्टीकल फायबरचेही जाळे निर्माण केले जाणार आहे. परंतु, महाआयटीने (महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कार्पोरेशन) २४ डिसेंबर २०१८ रोजी स्मार्ट सिटी कंपनीला पत्र लिहून आयसीटीसाठी ४५ कोटी ४३ लाखांऐवजी ७८ कोटी ७८ लाख रुपयांची मागणी केली. शासनाने या प्रकल्पासाठी अधिकचा निधी देण्यास नकार दिल्यानंतर महाआयटीने अधिकचे ३३ कोटी ४३ लाखांचा निधी मागीतला आहे. तसेच हा निधी एकत्रित स्वरुपात महाआयटीकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महाआयटीला ७८.७८ कोटींचा निधी हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, संचालकांनी महाआयटीला एकत्रित ७८ कोटी ७८ लाखांचा निधी हस्तांतरीत करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे सीसीटीव्ही प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. संचालकांच्या विरोधानंतर आता कंपनीने आपला पवित्रा बदलून नवीन तोडगा काढला आहे. आता महाआयटीला एकत्रित ७८ कोटींचा निधी हस्तांतरीत करण्याऐवजी जेवढे काम महाआयटी करेल तेवढा निधी टप्प्याटप्प्याने कंपनीकडून अदा केला जाणार आहे. त्यासाठीचा फेरप्रस्ताव येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...

सीसीटीव्हींचा अडसर दूर

स्मार्ट सिटी कंपनीकडून महाआयटीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह अन्य प्रकल्पांसाठी निधी मिळण्याची गॅरंटी मिळाल्यास तत्काळ काम सुरू होण्याची शक्यता आहे. पुढच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काम केल्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल, असा प्रस्ताव मंजूर करून तो महाआयटीला सादर केला जाईल. महाआयटीला निधी मिळण्यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त होताच कामाला सुरुवात केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करकोंडी फुटणार!

$
0
0

४९ हजार मिळकतींची देयके होणार कमी

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या अवाढव्य करकोंडीतून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर विभागाने मिळकत सर्वेक्षणात अनधिकृत आढळलेल्या ५९ हजार मिळकतींपैकी नोटिसा बजावलेल्या ४९ हजार मिळकतींच्या बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यांची तपासणी सुरू केली आहे. तसेच, प्रकरणनिहाय सुधारित घरपट्टी आकारणीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, आयुक्तांनी घोषित केलेल्या सवलतींचा लाभ या मिळकतींना दिला जाणार आहे. त्यामुळे या मिळकतीचे देयके कमी होण्याची शक्यता आहे. चौदा हजार घरांना दंड माफ होण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

तुकाराम मुंढेंनी गेल्या वर्षी ३१ मार्च रोजी आपल्या अधिकारात आदेश क्रमांक ५२२ काढत नाशिककरांवर पाच ते सहा पट करवाढ लादली. करयोग्य मूल्यात अचानक वाढ केल्याने नाशिकमधील मिळकतींच्या करात अचानक मोठी वाढ होऊन शहरात संतापाचा आगडोंब निर्माण झाला होता. मुंढेंनी सामासिक अंतरासह शेतीवरही कर लागू केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. नवीन मिळकतींचे करयोग्य मूल्य थेट २२ रुपये प्रतिचौरस मीटरपर्यंत गेल्याने घरपट्ट्यांनी लाखांचा आकडा ओलांडला होता. या नाशिककरांना करकोंडीत ढकलल्यामुळे मुंढेंची डिंसेबरमध्ये बदली झाली. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यानी करकोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावरही नाशिककरांचे समाधान न झाल्याने काही पदाधिकाऱ्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून, हायकोर्टाने याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी घरपट्टीचाही मोठा आधार असल्याने प्रशासनाने यात तोडगा काढण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मिळकत सर्वेक्षणात आढळेलल्या ५९ हजार मिळकतींना प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. या ४९ हजार मिळकतींची नव्याने छाननी सुरू झाली असून, आयुक्तांनी सामासिक अंतरातील करवाढ रद्द केली असून, त्याचा लाभ या मिळकतींना दिला जाणार आहे. तसेच ६०० चौरस फुटापासून पुढील मिळकतींना शासन निर्णयानुसार दंडात सवलत देण्याची तयारी करण्यात येत आहे. तसेच, या मिळकतींना सहा वर्षांच्या दंडाऐवजी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यापासून कर आकारणी केली जाणार आहे. तसेच बिल्टअप एरियावरील घरपट्टी रद्द झाल्याने आणि सामासिक अंतरही माफ झाल्याने घरपट्टीचे २५ टक्के करभार कमी होणार आहे. तसेच ६०० चौरस फुटांपुढील मिळकतींना लागू केलेल्या दंडातही सवलत दिली जाणार असल्याने साधारण ४० टक्के करभार कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी नवीन आर्थिक वर्षात आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.

...

२६ हजार मिळकतींना दिलासा

मिळकतींच्या कर आकारणीबाबत राज्य शासनाने ११ जानेवारी २०१७ रोजी काढलेल्या एका आदेशाचाही लाभ देण्याची तयारी सुरू केली आहे. या आदेशानुसार ६०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामाला दंड आकारू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ६००१ ते एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामात प्रतिवर्ष ५० टक्केच दंड करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एक हजाराच्या पुढील निवासी मिळकतींना मालमत्ता कराच्या दुप्पट दरापेक्षा अधिक दंड करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे १४ हजार मिळकतींना दंड माफ होणार आहे, तर १२ हजार मिळकतींचा दंड निम्मा माफ होणार आहे. त्यामुळे एकूण २६ हजार मिळकतींना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसार पडले उघड्यावर

$
0
0

वादळी वाऱ्याचे जिल्हाभरात थैमान; बळीराजासह नागरिकांना मदतीची आस

टीम मटा

जिल्हाभरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याच्या थैमानामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. ठिकठिकाणी घरांचे पत्रे उडून गेल्याने ऐन पावसाळ्यात आसरा शोधण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी शिरल्याने साठवण करून ठेवलेला कांदा वाया गेला. आता आस्मानी संकटात बळीराजासह नागरिकांना मदतीची आस लागलेली आहे.

मालेगाव : तालुक्यातील दाभाडी, पाटणे, मुंगसे, टेहरे गाव परिसरात सोमवारी दुपारी आलेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि सोसाट्याच्या वादळ वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडून गेले. पॉली हाउस, नेटशेड यांचेही नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांची तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी मंगळवारी भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली. शासननिर्णयानुसार नुकसानग्रस्त कुटुंबाना शक्य ती मदत तत्काळ देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असे देखील राजपूत यांनी मटाशी बोलतांना सांगितले.

सोमवारी शहरात तुरळक पावसाने हजेरी लावली होती. मात्र, तालुक्यातील दाभाडीसह परिसरात वादळ वाऱ्यामुळे इंदिरानगर, नवीन वस्ती या परिसरातील नागरिकांच्या घराचे पत्रे उडाले होते. पॉली हाउसचे नुकसान झाले. कांदा चाळीसाठी लागणाऱ्या जाळी बनवणाऱ्या कारखान्याचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. दाभाडीसह परिसरात १५ ते २० घरांचे पत्रे उडाले. भिंती कोसळ्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून नुकसानग्रस्त कुटुंब व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ मदत करावी, अशी मागणी मराठा महासंघ तसेच अन्य सामाजिक संस्थांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images