Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बनावट 'ईमेल'द्वारे अडीच कोटींचा गंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक दोन कंपन्यांमध्ये ज्या ईमेलद्वारे अर्थव्यवहारांची देवाणघेवाण होते, तसाच बनावट ईमेल तयार करीत सायबर चोरट्यांनी सातपूर 'एमआयडीसी'तील एका कंपनीकडून तब्बल तीन लाख ४० हजार डॉलर म्हणजेच जवळपास अडीच कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीतर्फे विकास रघुनाथ बोरवणकर (वय ३८, रा. अंबड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या कंपनीचा जपानस्थित दुसऱ्या कंपनीशी अर्थव्यवहार होत असतात. याबाबत माहितीची देवाणघेवाण एक ठराविक ईमेलद्वारे होते. सायबर चोरट्यांनी हीच संधी साधत त्याच डोमेनचा बनावट ईमेल तयार करून बँकेचा खाते क्रमांक बदल्याचे सांगत नवीन खाते क्रमांक देऊन ही फसवणूक केली. मार्च महिन्यात संबंधित कंपनीने थकित पैशांबाबत पत्र पाठविल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लस १ लीड

$
0
0

कलाविष्कारांचा नजराणा

...

'कलासंगम'मधील भरगच्च कार्यक्रमात नाशिककर मंत्रमुग्ध

...

- शिल्पकला आणि पॉटरीचे प्रात्यक्षिक

- चित्र प्रदर्शनात हरखले चाहते

- गिटारवादनात नाशिककर मंत्रमुग्ध

- कॉम्पोजिशन पेंटिंगचे सादरीकरण

- शास्त्रीय नृत्याने घातली मोहिनी

- व्हायोलिनच्या स्वरांनी श्रोते मुग्ध

- तबला वादनाची अनोखी मेजवानी

- जम्बेत रंगल प्रेक्षक

..........

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'कलासंगम'च्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध कलाकारांनी रसिकांसमोर कालाविष्काराचा खास नजराणा पेश केला. गायन, वादन, नृत्य, जागरण गोंधळ, चित्र प्रदर्शन, तबला वादन, जम्बे वादन आदी कलाप्रकारांच्या सादरीकरणाने रसिकांच्या मनावर पकड मिळविली. कलासंगमच्या माध्यमातून रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने व फ्रवशी अॅकॅडमी प्रायोजित 'कलासंगम'मध्ये दोन दिवस नाशिककरांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. कलासंगमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कॉम्पोजिशन पेंटिंगच्या सादरीकरणाने झाली. दिवसभर एकापाठोपाठ एक सुरू असलेल्या कार्यक्रमांनी नाशिककरांना जागेवरच खिळवून ठेवले.

विहंग वैद्य आणि कुणाल देशमुख यांनी जम्बे वाद्य वाजवत नाशिककरांनाही ते वाजविण्याची संधी दिली. शास्त्रीय नृत्यशैलींपैकी भरतनाट्यम्, ओडिसी आणि कथकचे बहारदार सादरीकरण नाशिकच्या प्रसिध्द नृत्यांगनांच्या शिष्यांनी सादर केले. वाद्य वादनामध्ये व्हायोलिनचे स्वर श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले. या वाद्याच्या जादूने उपस्थित श्रोते मुग्ध झाले.

पारंपरिक कलांसोबतच तरुणाईला आकर्षित करणाऱ्या कलांचा समावेशही 'कलासंगम'च्या व्यासपीठावर करण्यात आला. वेस्टर्न, क्लासिकल, बॉलिवूड आदी वादन प्रकारात गिटारवादन करीत श्रोत्यांचे चित्त कलावंतांनी वेधले. पवार तबला अकादमीच्या तबला सहवादनाने रंगत वाढवली. जागरण, गोंधळ या पारंपरिक कलेने नाशिककरांना मंत्रमुग्ध केले. आज, रविवारी आठ ठिकाणी 'मटा हेरिटेज वॉक' होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट पोलिसींग गरज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कायदा व सुव्यवस्था अबाधित असेल तरच त्या शहराची ओळख निर्माण होते आणि विकाससुद्धा. सुरक्षीत वातावरण मिळणे महत्त्वाचे असून, पोलिसांविषयी सर्वसामान्यांना प्रेम तर समाजकंटकांना भीती वाटायला हवी. स्मार्ट पोलिसींग हे या समस्याचे उत्तर असून, शहर पोलिसांना त्यात यश मिळेल, अशी अपेक्षा जलसंपदा आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान पुनर्रचना करण्यात आलेल्या निर्भय पथकाचे अनावरण करण्यात आले. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या एका मोबाइल अॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले. १०९१ या हेल्पलाईन क्रमांकासह निर्भया पथक एनएसके हे फेसबूक पेज सुरू करण्यात आले आहे. या पेजवर महिला आपल्या तक्रारी मांडू शकतील. या कार्यक्रमाचे प्रमुख असलेल्या महाजन यांच्या हस्ते वेगवेगळ्या महिलांचा, पोलिस अधिकाऱ्यांचा, चोरट्याला झुंज देणाऱ्या सविता मुर्तडक अशा वेगवेगळ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. मुर्तडक यांना निर्भया शौर्य पुरस्कार देण्यात आला. पालकमंत्र्यांनीही ११ हजार रूपयांचे पारितोषीक जाहीर केले. पोलिसांनी स्मार्ट तर असावेच पण फ्रेंडली आणि फिट असावे, असा महत्त्वाचा सल्ला पालकमंत्र्यानी दिला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. कार्यक्रमाला वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, अभिनेत्री प्रार्थना बेहरे, प्रदीप लोखंडे, मविप्रच्या सचिव निलीमा पवार आदी उपस्थित होते.

माझ्याच घरात कुरबूर

कौटुंबिक कलह असलेल्या आणि पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा एकत्र आलेल्या काही दाम्पत्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मीच दोन महिन्यांपासून घराबाहेर असून, माझ्याच घरात कुरबूर सुरू असून, पोलिसांच्या सहकाऱ्याची अपेक्षा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगतच एकच हशा पिकला. दरम्यान, या सोहळ्याला भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर असल्याने या शासकीय सोहळ्याची पक्षीय पातळीवर चर्चा रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीची कासवगती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत महापालिकेकडून यंदा ५० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. परंतु, ठेकेदारांच्या संथ कारभारामुळे ५० हजार वृक्ष लागवडीचे आव्हान पेलणे महापालिकेला अशक्यप्राय असल्याचे चित्र आहे.

पावसाळा तोंडावर आला असतानाही ठेकेदारांकडून केवळ २४ हजार ३०६ खड्डे खोदण्यात आले आहेत. गेल्या अडीच महिन्यांत ठेकेदाराने अवघे २४ हजार खड्डे खोदल्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर ठेकेदार वृक्ष लागवडीसाठी २८ हजार खड्डे खोदणार कसे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या या वृक्ष लागवड मोहिमेवरच आता आक्षेप घेतला जात आहे.

राज्य सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी महापालिका ५० हजार वृक्षांची लागवड करणार आहे. सोबतच महापालिकेकडून दोन हजार जादा वृक्ष लावले जाणार आहेत. त्यामुळे या उद्दिष्टपूर्तीसाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच महापालिकेने काम सुरू केले होते. त्यासाठी महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने सहाही विभागांत निविदा प्रसिद्ध करीत वृक्ष लागवडीसाठी चार ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. महापालिकेने शहरातील ७६ ठिकाणेही त्याकरिता निश्चित केली आहेत. महापालिकेने रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्याऐवजी मोकळे भूखंड, नदीकाठ अशा जागांची निश्चिती केली आहे. रस्ता रुंदीकरण करताना लागवड केलेल्या वृक्षांची कत्तल होऊ नये याचीही दक्षता घेण्यात आली आहे. सहाही विभागांत ७६ ठिकाणी ५२ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असून, वर्षभर या वृक्षांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे.

नियोजन कोलमडण्याची चिन्हे

लोकसभा निवडणुकीपूर्वीच ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु, आदेशानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे वृक्ष लागवडीचे काम रखडले होते. वृक्ष लागवड करण्याऐवजी ठेकेदारांनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदून ठेवावेत, असे आदेश उद्यान विभागाने दिले होते. आचारसंहिता संपुष्टात येताच वृक्ष लागवडीला सुरुवात करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यामुळे अडीच महिन्यांत ठेकेदार ५२ हजार खड्डे खोदून ठेवतील अशी अपेक्षा महापालिकेला होती. परंतु, ठेकेदारांनी हाती आलेली संधी गमावली असून, अडीच महिन्यांत केवळ २४ हजार ३०६ खड्डे खोदले आहेत. अजूनही २८ हजार खड्डे खोदण्याचे काम अपूर्ण आहे. पावसाळा आता तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ठेकेदार उर्वरित २८ हजार खड्डे खोदणार कधी आणि वृक्ष लागवड होणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिकेचे वृक्ष लागवडीचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

-----

विभागनिहाय वृक्ष लागवडीची ठिकाणे व उद्दिष्ट

--

विभाग ठिकाणे वृक्षसंख्या

--

नाशिकरोड ४२ १०,१७०

नाशिक पश्चिम २ ८५००

नाशिक पूर्व ३ ८०००

सातपूर ७ ८१००

सिडको ४ ८८००

पंचवटी १८ ९०८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टागोरनगरला आज नेत्र तपासणी शिबिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

फुले-शाहू-आंबेडकर शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था, मानव आधार ज्येष्ठ नागरिक संघ व सुजय नेत्र सेवा यांच्यातर्फे आज (दि. ९) अहिल्यादेवी होळकर जयंती व जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे.

नाशिक-पुणे मार्गावरील टागोरनगर येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शिबिर होईल. आदिवासी विभागाचे माजी अप्पर आयुक्त एस. बी. हिंगोणीकर, पांडुरंग जगताप, हरिभाऊ साळवे, उषा आहिरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. डॉ. नानासाहेब खरे, डॉ. सुनीता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर संगणकाच्या सहाय्याने नेत्र तपासणी करतील. सवलतीच्या दरात बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल. अधिक माहितीसाठी ०२५३-२५९५२२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीचे आगमन प्लॅटफार्म एकवर

$
0
0

अंमलबजावणी सुरू; मुंबईला जाताना मात्र प्लॅटफार्म तीनवरून सुटणार

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईहून येताना पंचवटी एक्स्प्रेस आता प्लॅटफार्म क्रमांक एकवर थांबू लागली आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती स्टेशनमास्तर एस. के. कुठार यांनी दिली. ही गाडी कायमस्वरुपी प्लॅटफार्म एकवरच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला जाताना मात्र ही गाडी नेहमीप्रमाणे प्लॅटफार्म तीनवरच थांबणार आहे.

पंचवटी एक्ऱ्प्रेस ही इंटरसिटी ट्रेनचा दर्जा असलेली महत्त्वपूर्ण ट्रेन आहे. मनमाड, नाशिक, इगतपुरीच्या प्रवाशांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. या गाडीतून दररोज सुमारे अडीच हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, रुग्ण, विद्यार्थी यांची संख्या मोठी आहे. मुंबईला जाताना सकाळी सातच्या सुमारास ही गाडी नाशिकरोडला येते. ती प्लॅटफार्म तीनवर थांबते. नाशिकच्या प्रवाशांना तिच्यात बसण्यासाठी जाण्याकरिता पादचारी पूल चढून जावा लागतो. त्यांची धावपळ होते. मुंबईहून गाडी साडेनऊच्या सुमारास प्लॅटफार्म दोनवर थांबते. तेव्हा थकलेल्या प्रवाशांना पुन्हा जिने चढून प्लॅटफार्म एकवर यावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे हे हाल लक्षात घेऊन ही गाडी प्लॅटफार्म एकवर थांबवावी, अशी प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी प्रवाशी संघटनांनी प्रशासनाला अनेकदा निवेदनही दिली होती. आता ही मागणी पूर्ण झाली आहे.

चार जूनला गाडीची याबाबत चाचणी झाली. तसा फलक प्लॅटफार्म एकवर लावण्यात आल्याचे कुठार यांनी सांगितले. प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट ईमेलद्वारे अडीच कोटींचा चुना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन कंपन्यांमध्ये ज्या ईमेलद्वारे अर्थव्यवहारांची देवाणघेवाण होते, तसाच बनावट ईमेल तयार करीत सायबर चोरट्यांनी सातपूर 'एमआयडीसी'तील एका कंपनीकडून तब्बल तीन लाख ४० हजार डॉलर म्हणजेच जवळपास अडीच कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कंपनीतर्फे विकास रघुनाथ बोरवणकर (वय ३८, रा. अंबड) यांनी फिर्याद दिली आहे. विकास हे कोसो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करीत असून, या कंपनीचा जपानस्थित दुसऱ्या कंपनीशी अर्थव्यवहार होत असतात. याबाबत माहितीची देवाणघेवाण एक ठराविक ईमेलद्वारे होते. सायबर चोरट्यांनी हीच संधी साधत त्याच डोमेनचा बनावट ईमेल तयार करून कोसो कंपनीशी संवाद सुरू केला. त्यात त्यांनी काही कारणास्तव बँकेचा खाते क्रमांक बदल्याचे सांगत नवीन खाते क्रमांक दिला. नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मेल आले. जपानच्या कंपनीला देणे असलेले तीन लाख ४० हजार डॉलर्स अदा करण्यात आले. मार्च महिन्यात संबंधित कंपनीने थकित पैशांबाबत पत्र पाठविल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत. यापूर्वी याच पद्धतीने शहरातील एका उद्योजकाची फसवणूक करण्यात आली होती. चीन येथून घेतलेल्या कच्च्या मालाचे पैसे ट्रान्सफर करण्याचे ते प्रकरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडोबारायाचं याड लागलं...

$
0
0

जागरण गोंधळानं संचारलं वातावरणात चैतन्य

\B...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

'जेजुरीच्या खंडेराया जागराला या..या..', अशी आळवणी करणारे वाघ्ये तुळजापूर अन् वणीच्या जगंदबेपाठोपाठ पंचवटीच्या रामरायाला जागराला येण्याचं साकडं घालू लागले अन् तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या नामगजरानं वातावरणात चैतन्य संचारले. खंजिरी, संबळ अन् टाळ-ढोलकीच्या साथीवर खंडोबाची पारंपरिक लोकगीतांमधून जेव्हा 'खंडोबारायाचं याड लागलं मुरळीला...लागलं मुरळीला अन् लागलं वाघ्याला..' अशा गीतांनी लय पकडली तेव्हा गोंधळाचे साक्षीदार बनणाऱ्या भाविकांच्या अंगावरही रोमांच फुलले.

निमित्त होते 'महाराष्ट्र टाइम्स' च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कलासंगम सोहळ्यातील जागरण गोंधळाच्या सादरीकरणाचे. कलासंगमच्या व्यासपीठावर वाघ्याच्या पारंपरिक वेशभूषेत के. के. वाघ ललित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा जागरण गोंधळ सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

श्री गणेश आणि श्री शिव वंदनेने जागरणास सुरुवात करण्यात आली. यानंतर कृष्ण अन् राधेच्या प्रेमाची गोष्ट सांगणारी बहरदार गौळण त्यांनी सादर केली. यानंतर खंडेरायाची आळवणी करणाऱ्या लोकगीतांचे सादरीकरण पारंपरिक वाद्यांच्या साथीने करताना जागरणात रंगत भरत गेली. जागरणाच्या गीतांद्वारे यावेळी सादरकर्त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं अन् भगवान शिवाचं चरित्रच पहाडी आवाजतल्या सादरीकरणातून उलगडून दाखविलं. प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या जागरण गोंधळास लाभला. सायंकाळी कार्यक्रमाच्या अगोदर पावसाने हजेरी लावली असली तरीही विशाखा सभागृह प्रेक्षकांच्या गर्दीने तुडूंब भरले होते. पारंपरिक कलेच्या थेट सादरीकरणातून कुलदैवतांचा लोकगीतांमधून होणारा परिचय अन् साथीला बहरलेल्या साजेशा वातावरणात प्रेक्षकांनीही ठेका धरला होता. यावेळी प्रेक्षकांच्या मागणीनंतर देवीच्या जागरणाचीही लोकगीतं सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अखेरीस श्री खंडेरायाची आरती करून जागरण गोंधळाची सांगता 'येळकोट ...येळकोट..जय मल्हार' अशा जयघोषात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाच्या खूनप्रकरणीदोन जणांना कोठडी

$
0
0

नाशिकरोड : टाकळी भागातील समतानगर परिसरातील पडीक विहिरीत सुशील गायकवाड या तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याचा खून केल्याच्या संशयावरून उपनगर पोलिसांनी हमीद रशीद शेख आणि सोनू सुब्रमण्यम स्वामी यांना अटक केली. त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी दिली. सुशील प्रवीण गायकवाड (वय १९, विहितगाव, कोठुळे मळा, नाशिकरोड) याला विहितगाव येथून टाकळीतील संशयित हमीद, सोनू सुब्रमण्यम स्वामी व आणखी एकाने पाच जूनला दुपारी दीडला रिक्षात घेऊन गेले होते. त्यानंतर संशयितांनी सुशीलला समतानगर येथे नेऊन पडीक विहिरीत त्याला फेकून दिल्याचा संशय आहे. सुशीलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मस्थळांबाबतीत विश्वस्तांची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि आमदारांमध्ये वादाचे राजकारण रंगले आहे. तीन दिवसापूंर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धार्मिक स्थळांवर तोडगा काढण्याची मागणी करणाऱ्या आमदारांवर विश्व हिंदू परिषदेने टीका केली आहे. आमदार नाशिककरांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप विहिंपचे जिल्हा सहमंत्री विनोद थोरात यांनी केला आहे. आमदार विश्वस्तांना खरी माहिती देत नसल्याचे सांगत शहराची फसवणूक करीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला असून, आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील धार्मिक स्थळांचा प्रश्न हा गेल्या तीन वर्षांपासून गाजत आहे. महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर विश्वस्तांनी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यामुळे उच्च न्यायालयाने फेरसर्वेक्षण, तसेच हरकती व सुनावणीची प्रक्रिया नव्याने राबविण्याचे आदेश मनपाला दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महापालिकेने धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करीत ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरविली आहेत. त्यामुळे शहरातील धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सुमारे ६४७ पैकी ९० टक्के धार्मिक स्थळे ही मोकळ्या भूखंडांवर आहेत. त्यामुळे विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीचा आधार घेत महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय करण्याचा ठराव दोन वर्षापूर्वीच शासनाला सादर केला आहे. परंतु, या ठरावावर शासनाने वेळीच कारवाई न केल्याने धार्मिक स्थळांवर हातोडा मारला जाण्याची शक्यता आहे. सत्तारूढ भाजप-सेनेच्या आमदारांनी या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे कुठलाही पाठपुरावा न केल्यामुळेच धार्मिक स्थळांवर कारवाईचे अरिष्ट कोसळल्याचा आरोप धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांकडून करण्यात आला होता. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीच शहरातील आमदार प्रा. देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नव्या डीसीआरमध्ये धार्मिक स्थळांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. परंतु, यावर मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळालेले नसल्याने विश्वस्त पुन्हा आक्रमक झाले असून, त्यांनी येत्या सोमवारी पुन्हा विश्वस्तांची बैठक बोलवली आहे. त्या पार्श्वभूमीवर विहिंपच्या थोरातांनी आमदारांच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. धार्मिक स्थळांबाबतीत मध्य नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडून दिशाभूल होत आहे. धार्मिक स्थळाच्या ठरावाबाबत उलटसुलट माहिती दिली जात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसोबत विहिंप कार्यकर्त्यांची भेट दिली जात नसल्याचा आरोप थोरातांनी केला आहे. त्यामुळे आमदारांनी फसवणूक करण्याचे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - शब्द आणि अर्थ

$
0
0

झिप झॅप झूम - शब्द आणि अर्थ

- -

Q फॉर

Quantity - प्रमाण

Quality - गुणवत्ता

Quickly - त्वरीत, जलद

Queue - रांग

Quarterly - तिमाही, दर तीन महिन्यांनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन येमेन

$
0
0

his is a High Security Mission" असे मला या २०१६ च्या येमेन मिशनविषयी स्पष्ट कल्पना दिली होती. या अगोदर भारतीय म्हणून मला येमेनविषयी भारताच्या सरकारने २०१५ मध्ये "ऑपरेशन राहत" या नावाने जनरल व्ही. के. सिंग यांनी विलक्षण यशस्वी मोहीम राबवल्याचे माहिती होते. येमेनमधील भयानक यादवी युद्धात अडकून बसलेल्या हजारो भारतीय आणि शेकडो परदेशी नागरिकांना सोडवून आणले होते. परंतु, अजूनही तिथे बंडखोरी होती आणि अगोदरचे सरकार यांच्यात सशस्त्र यादवी संघर्ष चालूच होता. त्यात राजधानी सानावर हौतींनी ताबा घेतला होता. पूर्वीच्या सरकारमधील नेते मोठे बंदर असलेल्या एडेनमध्ये व त्यानंतर सौदी अरेबियात आश्रयास गेले होते. सशक्त सरकार नसल्याने अल कायदा आणि ईसीससारखे ग्रुप सक्रीय झाले होते. या यादवी युद्धात अगोदरच गरीब असलेल्या देशात लाखो लोक, महिला, मुले अगदी हताश आणि अकल्पनीय अवस्थेत होते. त्यात सौदी अरेबियाने आणखी काही देशांना (सौदी-अलायन्स) बरोबर घेऊन येमेनवर अनेक हवाई हल्ले चालू केले. एमएसएफचे हॉस्पिटल कॉ-ऑर्डिनेटस् सौदीला देऊनसुद्धा त्यावरही एअर स्ट्राइक केल्याने काही ठिकाणी एमएसएफने हॉस्पिटल्स बंदही केले. अशा धगधगत्या परिस्थितीत अडकलेल्या आणि वैद्यकीय सेवांपासून पूर्णपणे वंचित असलेल्या नागरिकांसाठी एमएसएफची वैद्यकीय सेवा काही ठिकाणी चालू होती. स्फोटक जखमांसाठी तिथे अस्थिरोगतज्ज्ञांची खूप गरज निर्माण झाली होती. माझी जायची इच्छा व्यक्त केल्यावर माझी पत्नी आणि कुटुंबियांनी मोठ्या धीराने मला परवानगी दिल्यानेच मी असे मिशन करू शकतो. हातून चांगले घडते तेव्हा, मानवतेच्या मूल्यांवर माझ्यासारखाच ठाम विश्वास असणारे माझे कुटुंबीयही माझ्या कार्यात असे सहभागी असतातच. येमेनमध्ये कोणीही असे जाऊ/प्रवेश करू शकत नाही, सौदी अरेबियाच्या सततच्या बॉम्बिंगमुळे, कोणतीही व्यावसायिक विमान कंपनी, राजधानी सानाला जात नाही. माझ्या व्हिसाची व्यवस्था होती. बंडखोरांच्या सरकारकडून झाली. प्रथम मी एमएसएफच्या जिनिव्हामधील कार्यालयात ब्रिफिंगसाठी गेलो. तेथून मला जिबोटी या आफ्रिकेच्या अगदी उत्तरेच्या टोकाला असलेल्या देशात एमएसएफने नेले. तेथे एक एमएसएफचे ८ सिटर छोटे विमान होते. एमएसएफने सौदी अरेबियाकडून चार तासाचा विंडो पिरिएड परवानगी घेतली होती. त्याचवेळेत, विशिष्ट उंचीवरून विमान नेणे आणि मी व माझे सहकारी (इटलीतील अॅनेस्थेटिस्ट धरून आणि काही जण), यांना साना विमानतळावर सोडून, परत जिबोटीला येणे गरजेचे होते. त्या छोट्या विमानात प्रत्येकी १५ किलो सामान नेण्यास परवानगी होती आणि त्याच्यात प्रत्येक प्रवाशाचे पण वेगळे वजन करून विमानातील लोडाचे गणित केले होते. एमएसएफच्या त्या छोट्याशा विमानात दोन वैमानिक सर्व मदत करत होते. जिबोटीहून या विमानाने उड्डाण केले. एवढ्या छोट्या विमानाचा सारखा धडधड आवाज येत होता. एडनची सामुद्रधुनी आणि रेड-सी ओलांडून येमेनच्या एअर-फील्डमध्ये आल्यावर वैमानिक जास्त काळजीने सौदीशी संपर्क साधून होते. साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर येमेनची राजधानी सानाच्या विमानतळावर उतरले. उतरताना विमानाच्या खिडकीमधून उध्वस्त झालेल्या विमानांचे आणि हेलिकॉप्टरचे अवशेष बाजूला दिसत होते. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे त्या दिवसाचे ते एकमेव विमान होते. अर्धवट उध्वस्त झालेल्या त्या विमानतळाच्या इमारतीत इमायग्रेशन झाल्यावर आम्हाला घ्यायला आलेला येमेनी सारखाचा लायेसन ऑफिसर भेटला. त्याच्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात त्याच्या गरजू देशबांधवांना मदत करायला आलेल्या आमच्याविषयी विलक्षण कृतज्ञता दिसत होती. सानामधील त्याही रात्री तीन वेळा प्रचंड मोठे आवाज झाले. मिशनप्रमुखाला विचारले तर तो म्हणाला, सौदीचे असे एअर-स्ट्राइक रोज होतात, पण आपण डिप्लोमेटिक एरियामध्ये असल्याने या को-ऑर्डिनेट्सवर ते बॉम्ब टाकत नाही. या दिलाशावर, मी पुढच्या प्रवासासाठी सकाळची वाट बघू लागलो. धोकादायक परिस्थितीत चांगले काम करताना आम्ही एकमेकांना शुभेच्छा द्यायचो. "Take Care, Give Care". जगण्यासाठीचा काय छान मंत्र आहे हा! (क्रमश:) (लेखक डॉक्टर विदाऊट बॉर्डर्स संघटनेचे स्वयंसेवक सर्जन आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस१

सिंचनाकडेही लक्ष देणार

$
0
0

डॉ. भामरेंचा आश्वासन; पूनदचे काम सुरू होणार

म. टा. वृत्तसेवा सटाणा

सटाणा शहरासाठी मंजूर झालेल्या पुनद पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या कामास लवकरच प्रारंभ करण्यात येईल. कळवण-देवळावासियांवरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनपातळीवर दखल घेतली जात असून, त्यांच्या शेतीसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी आपल्यासह खासदार भारती पवार प्रयत्नशील असतील, असा आशावाद धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.

सटाणा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित खरीप पूर्व टंचाई आढावा बैठकीचे आयोजन खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. सुभाष भामरे बोलत होते.

व्यासपीठावर पंचायत समिती सभापती विमल महाले, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, जि. प. सदस्य लता बच्छाव, प्रातांधिकारी प्रविण महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, साहेबराव सोनवणे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विलास बच्छाव, बिंदूशेठ शर्मा उपस्थित होते.

आढावा बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले,'बागलाणमधील पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. धरणातील मृतसाठा शिल्लक आहे. पावसाळा देखील लांबण्याची भिती आहे. याची जाणीव ठेवून प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनींनी एकत्रित येवून टंचाईवर मात करण्यासाठी समन्वयाची भूमिका घ्यावी. गरज असेल तेथे तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, सक्तीचे कर्जवसुली थांबवावी, वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवून शेतकरीवर्गाला नाहकच त्रास देवू नये, यासारख्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या दोघाही धरणातील जलसाठा संपुष्ठात आला आहे. दोघाही धरणात मृतसाठा शिल्लक आहे. परिणामी तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ४५ गावे व ४६ वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून,३८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी दिली.

तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पाण्याचे टँकरचे वितरण १ किंवा २ वेळाच करण्यात येत असल्याचे संबंधित सरपंच व उपसरपंच यांनी लक्षात आणून दिले असता पाण्याच्या टँकरचे फेऱ्या वाढविण्याच्या सूचना खासदार डॉ. भामरे यांनी केली. या प्रसंगी आढावा बैठकीस विविध विभागाचे अधिकारी, भाजपाचे पदधिकारी व विविध गावातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीला वेग देण्यासाठी सचिव समिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळावी आणि लवकरात लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला व्हावा, याकरिता राज्य सरकारने आता त्रयस्थ यंत्रणा नेमण्याचा पर्याय स्वीकारला आहे. सचिव दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची या कामी समिती नेमण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने या कामाला गती द्यावी, याकरिता पाठपुरावा करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडण्यासाठी समृद्धी हा शीघ्रगती महामार्ग बनविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनींचे संपादन करावे लागले. या भूसंपादन प्रक्रियेतच प्रशासनाचा बराचसा वेळ खर्ची पडला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधून हा महामार्ग जातो. त्याकरिता या दोन तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर संपादन करण्यात आले आहे. मात्र, अजूनही भूसंपादनाचे काही विषय प्रलंबित आहेत. नागपूरमध्ये महामार्ग उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून, अवघ्या सात तासांत मुंबईला पोहोचणे शक्य होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. या महामार्गाचे आतापर्यंत राज्यभर काम सुरू होणे अपेक्षित असताना अजूनही भूसंपादन, कायदेशीर बाबींची पूर्तता या अडचणींमुळे हे काम होऊ शकलेले नाही. स्थानिक प्रशासनाने या समस्यांचा तातडीने निपटारा करून महामार्ग उभारणीच्या कामाला गती द्यावी, यासाठी सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्गाचे बऱ्यापैकी काम करण्याचा सरकारचा मानस आहे. महामार्ग उभारणीला दिरंगाई होत असल्याने सरकारचा खर्चही वाढतो आहे. या कामाला गती मिळावी यासाठी प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा, असे आदेश या समितीला देण्यात आले आहेत. वित्त, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम या विभागांच्या सचिवांचा या समितीमध्ये समावेश असेल. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ही समिती बैठक घेऊन महामार्ग कामाच्या प्रगतीचा आढावा मंत्रिमंडळाला सादर करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावच्या विकासकामांसाठी ५ कोटी मंजूर

$
0
0

जॉगिंग ट्रॅक, अभ्यासिकेसह शहरातील २५ कामे होणार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिका क्षेत्रातील विविध मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासकामांसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून ५ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या निधीतून शहरात २५ कामे होणार असून, लवकरच या कामांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

राज्यमंत्री भुसे यांच्यासह स्थायी समितीचे सभापती जयराज बच्छाव, शिवसेना गटनेते नगरसेवक नीलेश आहेर, राजाराम जाधव, राजेश गंगावणे, मनोहर बच्छाव, डॉ. यतीन कापडणीस, भरत देवरे, संजय धिवरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी भुसे यांनी सांगितले, की राज्यातील महापालिकांना मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी अनुदान देण्यात येते. त्याअंतर्गत शहरासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुलात जॉगिंग ट्रॅक, विद्युत खांब, साउंड सिस्टीम, बेंच, तसेच कॉलेज रोड- एकात्मता चौक- कॅम्प रोडलगत जॉगिंग ट्रॅक, मोसम पूल शाळा येथे अभ्यासिका व शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा प्रमुख कामांचा समावेश आहे. यासह सभामंडप, भुयारी गटार, चौक सुशोभीकरण आदी कामेदेखील यात केली जाणार आहेत. या कामांना मंजुरी दिल्याबद्दल भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

१४ जूनला उद्योजक परिषद

मालेगावच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी १४ जून रोजी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई १४ जून रोजी मालेगाव येथे येणार असल्याची माहिती राज्यमंत्री भुसे यांनी दिली. या वेळी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सटाणा रोडवरील यशश्री कंपाउंड येथे दुपारी दोन वाजता उद्योजक परिषद होणार आहे. सरकारच्या विविध उद्योगविषयक योजनांची माहिती या वेळी दिली जाईल. परिषदेसाठी मालेगावसह जिल्हा व राज्यभरातील उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले आहे. उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते सायने व रावळगाव अजंग एमआयडीसीच्या भूखंड नोंदणीचा प्रारंभ केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नाशिकच्या खेळाडूंनी देशासाठी खेळावे'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक प्रो कबड्डीमुळे कबड्डीचा चांगला प्रसार व प्रचार झाला असून, नाशिकच्या खेळाडूंनी मेहनत घेऊन त्याचा फायदा करून घ्यावा. स्वतःसाठी खेळण्यापेक्षा देशासाठी खेळावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कबड्डीपटू सचिन भोसले यांनी केले. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी नाशिक व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे कबड्डी दिनानिमित्त ज्येष्ठ खेळाडू, संघटकांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी भोसले बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या ज्युदो हॉलमध्ये रविवारी हा कार्यक्रम झाला. जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, आनंद खरे, जयवंत जाधव आदींनी मार्गदर्शन केले. मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विलास पाटील, सतीश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कालिकामाता क्रीडा मंडळाचा ज्येष्ठ कार्यरत संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले. शिखरेवाडी क्रीडा मंडळाला उत्कृष्ट कार्यरत संस्था, सिन्नरच्या सह्याद्री युवा मंचाला उत्कृष्ट स्पर्धा आयोजक संस्था, बाळासाहेब गायधनी, प्रा. भास्कर देवरे, जगन्नाथ हांडगे, श्रीराम कातकडे, विश्वनाथ राठोड, अंबादास भालेराव यांना ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार, हसन हमीद अन्सारी, गोपाळ म्हस्के, बाळासाहेब रूमने, अशोक शिंदे, दिवाक ऐळीजे यांना उत्कृष्ट संघटक, दत्ता गायकवाड यांना उत्कृष्ट प्रशिक्षक, सुवर्णा क्षोत्री शुक्ल, मीनल केदारे गांगुर्डे, रवी खैरे यांना माजी राष्ट्रीय खेळाडू, तर शीतल सांगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उदय सांगळे, गणेश मोराडे, दर्शन भाबड, विजय नाईक, जगन्नाथ धात्रक, डॉ. मंगेश चव्हाण, डॉ. श्रीकांत चौधरी यांना कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर तेजस ढिकले, ऋतुजा लभडे या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टे.टे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी छाजेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक लोणावळा येथे झालेल्या राज्य टेबल टेनिस संघटनेच्या निवडणुकीत पुण्याचे राजीव बोडस अध्यक्षपदी, तर शिवछत्रपती पुरस्कारविजेते आणि नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणीत शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शेखर भंडारी यांची सदस्यपदी, तसेच राजेश भरवीरकर यांची असोसिएट सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. माजी राष्ट्रीय खेळाडू संजय मोडक यांची राज्य मानांकन समितीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात नाशिकला राज्य संघटनेत स्थान मिळाले आहे. निवडणुकीत पुण्याचे प्रकाश तुळपुळे (पुणे) सहसचिव, तर प्रकाश जसानी, संजय कडू (रायगड) यांची कोशाध्यक्षपदी निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड कोसळल्याने पाच जण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अंबड पोलिस स्टेशनजवळ झाड कोसळल्याने गाडीतील पाच जण जखमी झाले. तर रायगड चौकात झाड पडल्याने सात दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने सिडकोत अनेक ठिकाणी झाडे पडलेत. यात अंबड पोलिस ठाण्याजवळील मोठा वृक्ष तेथून जाणाऱ्या कारवर कोसळला. यावेळी गाडीतील पाच जण जखमी झाले. सुदैवाने नागरिकांनी त्यांनी गाडीच्या डिकीतून सुखरुपपणे बाहेर काढले. तसेच रायगड चौकात शिवनेरी उद्यानाजवळील जोरदार वाऱ्यामुळे झाड कोसळले. कोसळलेली झाडे काढण्याचे काम अग्निशामक दलातर्फे दिवसभर सुरू होते. कॉलेजरोड, विसे मळा येथील स्वाती सोसायटीत वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. पार्किंगमधील कारवर झाडाचा काही भाग कोसळल्याने गाडीचे नुकसान झाले.

क्रेन कोसळली

देवळाली कॅम्पमधील बालगृह रोडभागात सुरू असलेल्या जैन मंदिराच्या उभारणीसाठी लावण्यात आलेली ८० फूट क्रेन कोसळली. येथील बालाजी सोसायटीमधील सहा फ्लॅटसह भिंतीचे मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांच्या कामांनाच लागणार कात्री

$
0
0

वाढत्या बजेटने प्रशासन हैराण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षाच्या विकासाकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापौरांनी नगरसेवकांवर साडेतीनशे कोटींची केलेली खैरात आता अंगलट आली आहे. महापौरांच्या वाढीव ३५३ कोटींच्या विकासकामांमुळे महापालिकेचा अर्थसंकल्प अडचणीत आला असून विकासकामांनाच प्रशासनाकडून आता कात्री लावली जात आहे. विकासकामांच्या फाईलींवर कामाची योग्यता ठरवा, असे शेरे मारले जात आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांच्या यादीला कात्री लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता संपल्यानंतर महापौरांनी प्रशासनाकडे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट अंमलबजावणीसाठी सादर केले. प्रशासनाने स्थायी समितीवर १ हजार ८७४ कोटींचे बजेट सादर केले. त्यात स्थायी समितीने ८८ कोटी ५८ लाखांची वाढ सुचवल्याने अंतिम बजेट हे १९८२ कोटी २२ लाखापर्यंत पोहचले होते. महासभेत नगरसेवकांच्या प्रस्तावांसह सुकन्या योजना, रस्ते विकास, खेडे विकास निधी व नगरसेवकांना प्रभाग विकास निधी मंजूर करण्यात आला असून महापौरांनी तब्बल ३५३ कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे बजेट हे २३३५ कोटींपर्यंत पोहचले आहे. एकीकडे बजेटने दोन हजार कोटीचा टप्पा ओलांडला असला तरी, दुसरीकडे मात्र उत्पन्नात तेवढी भर पडत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षात नगरसेवकांची कामे झाली नसल्याने नगरसेवकांनी दोन वर्षांचा वनवास संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुचवली आहेत. परंतु,उत्पन्न आणि बजेटचे तालमेल बसत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. या वाढीव कामांमुळे बजेट बिघडण्याची शक्यता असल्याने प्रशासनानेही सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांची योग्यता ठरवा आणि कामे मार्गी लावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या काही कामांना कात्री लागण्याची शक्यता आहे.

उपलब्ध निधीवर भरोसा

महापालिकेला दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न हे नगररचना विभागाकडून मिळते. त्यानंतर घरपट्टी आणि पाणीपट्टीचा क्रमांक लागतो. यंदा नगररचनाकडून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. दोन महिन्यातच विभागाने ४५ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे नगररचना, घरपट्टी, पाणीपट्टीच्या उपलब्ध निधीवर विकासकामे अवंलबून असणार आहे. त्यामुळे हा निधी जसा मिळेल तसे कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images