Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मालेगावातही पोटनिवडणूकशहरात २३ जून रोजी पोटनिवडणुक प्रभाग ६ क मध्ये निवडणूक कार्य

$
0
0

मालेगाव : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या प्रभाग ६ 'क' मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २३ जून रोजी मतदान होणार असून, ३० मेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने शुक्रवारपासून या प्रभागात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील नऊ पालिकांमधील रिक्त जागांवर पोटनिवडणूक होत असून, मालेगावातील प्रभाग ६ 'क'चा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक

--

सोमवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक…… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

नवी दिल्ली… - नाशिक

सकाळी ११.०० …- दुपारी १२.५५

नाशिक… - नवी दिल्ली

दुपारी १.२५… - दुपारी ३.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनेश मोडणार स्वत:चाच विक्रम

$
0
0

फोटो - सतीश काळे

पन्नास तास ड्रम वादनास सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ड्रम वादनात विविध विक्रम करून त्याद्वोर मिळणारा निधी सामाजिक कामांसाठी वापरणाऱ्या विनेश नायर या तरुणाने नवे उद्दिष्टे हाती घेतले आहे. शहरातील सिटी सेंटर मॉलच्या तळमजल्यावरील सभागृहात त्याने शुक्रवारी संध्याकाळी ड्रम वादनास सुरुवात केली. तब्बल ५० तास तो ड्रमवादन करणार असून याद्वारे मिळणारा निधी तो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देणार आहे.

विनेश नायर या तरुणाने या आधीही ड्रमवादनात काही विक्रम रचले आहेत. या अगोदर त्याने २०१४ मध्ये सलग १६ तास ड्रम वाजविण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी मिळालेला निधी त्याने आधारतिर्थ आश्रमातील अनाथ मुलांकरिता दिला. २०१८ मध्ये सलग ३० ड्रम वादनाचा विक्रम करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच तो निधी वापरला होता. आता हा ही विक्रम विनेश मोडीत काढणार असून सलग ५० तास ड्रमवादन करणार आहे. त्याला जोडीला गायक आणि गिटारिस्ट राहूल आंबेकर आणि कि बोर्डवर गणेश जाधव हे सहकारी साथ देत आहेत.

'आधी मन सुंदर करा'

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आपले जगणे सुंदर करायचे असेल तर आधी आपले मन सुंदर केले पाहिजे. मनाची सुंदरता ही वाचनाने वाढते. मन सदा प्रफुल्लित राहण्यासाठी गायन, वादन, नृत्य अशा कलांपैकी एखाद्या कलेचा छंद जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले. गुलमोहर नगर म्हसरूळ येथे ओम हास्यसरिता आयोजित वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. २४) रोजी 'जगणे सुंदर आहे' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

म्हसरूळ येथील गुलमोहर नगर येथे झालेल्या व्याख्यानमालेप्रसंगी महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, गणेश गिते आदी उपस्थित होते.

मिठे म्हणाले, गाणे ऐकले पाहिजे, गाणे गुणगुणले पाहिजे, एकदा का तुमचे मन आनंदित झाले, की मग तुम्हाला जग सुंदर वाटू लागते. आनंदी मन हे नेहमी सकारात्मक विचार करते आणि हे सकारात्मक विचार जीवनाला योग्य दिशा देते. निसर्गाच्या सहवासात राहायला हवे, त्याला समजून घ्या. पक्षांचे आवाज ऐका. रिमझिम पावसात भिजा, तुमच्या आवडीची गाणी ऐका, मग बघा तुमच्या मनाचा मोर नाचू लागेल. परमेश्वराने कितीतरी गोष्टी माणसाच्या आनंदासाठी निर्माण केलेल्या आहेत, त्यांचा उपभोग घ्या. म्हातारपण आले म्हणून कुढंत बसू नका. शरीर थकले तरी मन थकत नाही. आपल्या अनुभवाचा उपयोग कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी करा. नव्या पिढीला मार्गदर्शन करा, असे मिठे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेची बाधा, सत्ताधाऱ्यांचा वांदा

$
0
0

प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीमुळे धोरणात्मक निर्णयांवर मर्यादा

...

- मिळकतप्रश्न रखडणार

- शालेय पोषण आहार व मोबाइल टॉवरच्या सर्वेक्षणाचा निर्णय लांबणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली आचारसंहिता ही येत्या २९ तारखेला संपत असतानाच नाशिक महापालिकेच्या प्रभाग १० मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी कात्रीत सापडले आहेत. पोटनिवडणुकीची घोषणा होताक्षणी लागू झालेल्या नव्या आचारसंहितेमुळे येत्या महासभेच्या पटलावरील मिळकतप्रश्नांसह शालेय पोषण आहार व मोबाइल टॉवरच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या प्रस्तावांवर आता कुठलाही निर्णय घेता येणार नाही. यामुळे सत्तारूढ भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.

नाशिकमधील मिळकतींचा प्रश्न चिघळल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर २९ मे रोजी महासभा बोलावली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता संपत नाही तोच शुक्रवारी प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्याने दुसरी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महापालिकेतील धोरणात्मक निर्णयांवर पुन्हा मर्यादा आल्या आहेत. ही आचारसंहिता प्रभाग १० पुरतीच मर्यादित असली तरी त्या निवडणुकीवर परिणाम होतील असे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.

निवडणुकीची घोषणा होताच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रक काढून आदर्श आचारसंहितेचे पालन होईल याची दक्षता घेण्याचे सर्व विभागांना आदेश दिले आहेत. समाजमंदिरे, उद्याने, इमारती व मैदानांचा वापर उमेदवार आणि नागरिकांना निवडणुकीच्या कामासाठी पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. सातपूर प्रभाग सभेत या प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव घेता येणार नाहीत. प्रभागातील राजकीय पक्षांशी संबंधित पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकण्याचे निर्देश अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आले आहेत. प्रभाग १० मधील घंटागाडी, पाण्याच्या टाक्यांवरील नगरसेवकांची नावे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या महासभेत ठेवलेले मिळकत विषयासह शालेय पोषण आहार, मोबाइल टॉवर यासारखे धोरणात्मक निर्णय पुन्हा लटकले आहेत.

...

स्थायी निवडणूकही अडचणीत

पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका स्थायी समितीच्या नियुक्तीलाही बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर स्थायी समितीच्या एका रिक्त जागेवरील सदस्याची नियुक्ती तसेच, त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु प्रभाग १० 'ड'ची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने स्थायी समिती सभापतिपदाची निवडही लांबणीवर पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. त्यामुळे सत्ताधारी भाजपची पुन्हा कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथं घटल्या भाजपच्या निम्म्या जागा!

$
0
0

चंदिगड पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी चंदिगड ही देशातील पहिली प्लॅन कॅपिटल सिटी मानली जाते. येथे २०१४ मध्ये भाजपने अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांना संधी दिली होती. त्यांनी मोदी लाटेवर स्वार होत काँग्रेसचे मातब्बर नेते पवनकुमार बन्सल यांना पराभूत केले. आताही २०१९ मध्ये याच निकालाची पुनरावृत्ती झाली आहे. खेर निवडून येईपर्यंत १९९९ पासून बन्सल यांची चंदिगडवर मजबूत पकड होती. मात्र, आता सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्याने बन्सल यांची राजकीय कारकीर्द धोक्यात सापडली आहे. अंदमान-निकोबार अंदमान-निकोबार म्हणजे बंगालची खाडी आणि अंदमानदरम्यान सुमारे ५७२ छोट्या-मोठ्या बेटांचा समूह. येथे भाजपच्या विशाल जॉली यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुलदीप राय शर्मा यांनी मात दिली आहे. भाजपच्या बिष्णुपद राय यांनी २०१४ मध्ये शर्मा यांना हरविले होते. आता जॉली यांना हरवत काँग्रेसने अंदमानवर पुन्हा हुकूमत सिद्ध केली. लक्षद्वीप ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून तयार झालेल्या ३६ बेटांचा समूह म्हणजे लक्षद्वीप होय. यातील केवळ सात बेटांवर मानवी वस्ती असून, सहा बेटांवर भारतीयांना, तर दोन बेटांवर विदेशी पर्यटकांना प्रवेशाची परवानगी आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण लक्षद्वीपवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पी. पी. मोहम्मद फैजल यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. 'यूपीए'चा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीची येथे मात्र काँग्रेसशी लढत झाली. काँग्रेसने मोहम्मद हमदुल्लाह सईद यांना संधी दिली होती. त्यांचे वडील मोहम्मद सईद १९६७ ते २००४ पर्यंत सलग दहा वेळा लक्षद्वीपचे खासदार राहिलेले आहेत. २००९ मध्ये मोहम्मद हमदुल्लाह निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये त्यांना फैजल यांनी पराभूत केले. मोदी लाटेत या निकालात कोणताही बदल झाला नाही. पुद्दुचेरी तामिळनाडूच्या कुशीत चार भूखंडांमध्ये विस्तारलेल्या पुद्दुचेरीवर द्रविडी पक्षांचा वरचष्मा आहे. 'द्रमुक'सोबत असलेल्या आघाडीचा काँग्रेसच्या व्ही. वेथलिंगम यांना लाभ झाला. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण सामी यांचा या मतदारसंघावर ताबा होता. मात्र, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वेथलिंगम यांना संधी देण्यात आली. तब्बल १८ उमेदवारांच्या भाऊगर्दीत वेथलिंगम यांनी ऑल इंडिया एनआर काँग्रेस या प्रादेशिक पक्षाचे नारायणसामी केशवन यांनी सुमारे दीड लाख मतांची आघाडी घेतली. दीव-दमण भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र आणि गुजरातशी जोडलेल्या दीव-दमणमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्येच परंपरागत लढत होते. केवळ तीनच उमेदवार असलेल्या या लढतीत भाजपचे ललूभाई पटेल सलग दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे केतन पटेल यांना पुन्हा पराभूत केले. केतन हे माजी खासदार डहयाभाई पटेल यांचे पुत्र आहेत. केतन स्वत: आणि त्यांच्या आई चंचल दीव-दमण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. या सत्ताकाळात पटेल कुटुंबाने कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता कमावल्याच्या संशयावरून दीड वर्षांपूर्वी सीबीआयने छापे टाकले होते. यात अद्याप आरोप सिद्ध झाले नसले तरी राजकीयदृष्ट्या केतन पटेल यांची मोठी हानी झाली. त्याचा परिणाम ताज्या निवडणूक निकालात दिसून आला. दादरा नगरहवेली सर्वाधिक धक्कादायक निकाल दादरा नगरहवेलीमध्ये लागला. येथे भाजपचे विद्यमान खासदार नाटूभाई गोमनभाई पटेल यांना अपक्ष मोहनभाई संजीभाई पटेल यांनी मात दिली. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या मधोमध वसलेल्या आणि सुमारे ४० टक्के वनसमृद्धी असलेल्या या भागात नाटूभाई पटेल यांच्या रूपाने २००९ मध्ये सर्वप्रथम भाजपने सत्ता मिळविली. त्याची पुनरावृत्ती २०१४ मध्ये झाली. मात्र, खासदारकीची हॅटट्रिक साधण्याची संधी नाटूभाई पटेल यांना मिळू शकली नाही आणि यात मोहनभाई पटेल यांच्या रूपाने अपक्ष उमेदवाराची लॉटरी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकथा

$
0
0

झिप झॅप झूम - बालकथा

पक्ष्यांची सभा

प्रज्ञा आहेर, नाशिक

डेरेदार व डौलदार वडाचा वृक्ष हजारो वर्षांपासून आडवाडीच्या भूमीवर बसलेला आहे. वडाच्या झाडाजवळच एक मोठे तळे होते. तेथे अनेक पशू - पक्षी पाणी पिण्यासाठी येत होते. तळ्याजवळ छोटी-छोटी रोपटी होती. त्यावर अनेक फुलपाखरे बागडत होती.

वडाच्या अंगाखांद्यावर चिमणी, कावळा, पोपट, कबुतर, फुलपाखरे व माकड गप्पा मारत बसले होते. एकदम कबुतर म्हणाले की, ऊन फार वाढले आहे. त्यामुळे आमची संख्याही कमी झाली आहे. मध्येच कबुतराचे बोलणे थांबवून चिमणी म्हणाली की, अरे दादा, तुझी माझी व्यथा सारखीच आहे. गावात तरी मी दिसते पण शहरात दिसत नाही. चिमणीचे बोलणे थांबवून पोपट म्हणतो, तुझ्या चिवचिवाटामुळेच हे झाले. तर ती म्हणले, अरे वा, अरे वा आणि सर्वांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. पोपट म्हणाला, पूर्वी आम्ही गावातील मोठमोठ्या वृक्षांवर असायचो. लोकं आम्हाला मिरची, पेरू खाऊ घालत पण आज फक्त आठवणी उरल्या आहेत. मध्येच पोपटाला थांबवून कावळा म्हणाला की, तुला आवडीने खाऊ घालणारे लोकं होते. पण आमची आठवण फक्त वर्षश्राद्ध किंवा पितृपक्षातच काढतात. मध्येच हळू आवाजात फुलपाखरे म्हणाली की, आम्ही बोलू का? तर कावळेदादा म्हणाला, बोला ना, झाडेझुडपे कमी झाली त्यामुळे आमची संख्याही कमी झाली. मध्येच इतक्या वेळ शांत बसलेली कोकिळा म्हणाली की, माझा आवाज मधुर, गोड आहे पण झाडे मात्र कोणीच लावत नाही.

सर्वांचे बोलणे संपल्यावर माकड म्हणाले, मनुष्य प्राण्याचा लोभ, हव्यास व प्रगतीच्या नावाखाली मोठमोठी झाडे तोडली पण नवीन झाडे मात्र कोणीच लावली नाही. या वसुंधरेला फक्त मनुष्यच आवश्यक आहेत. तर चला आपण सगळे मिळून या वसुंधरेचे रक्षण करुया.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - काव्यकोडी

$
0
0

\Bकाव्यकोडी

\B- दिलीप पाटील

- -

दिसायला आहे लहान, पण

काम मात्र नामी करतो

नकोसं दृश्य क्षणभरात

अदृश्य करण्याची हमी देतो

- - -

उत्तर उद्याच्या अंकात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजन बंधूंचा ‘एव्हरेस्ट’वर झेंडा

$
0
0

नाशिकचे पहिले एव्हरेस्टवीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सायकलिस्ट महाजन बंधूंनी आपल्या आणि नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महेंद्र व हितेंद्र या महाजन बंधूंनी सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करून नाशिकचे पहिले एव्हरेस्ट वीर होण्याचा मान मिळवला आहे. महाजन बंधूंनी 'सी टू स्काय' मोहिमेंतर्गत बुधवारी (२२ मे) सकाळी ९ वाजता एव्हरेस्ट शिखर सर केले. एव्हरेस्टची मोहीम संपल्यानंतर उतरत असताना हितेंद्र महाजनांची प्रकृती खालावल्याने त्यांना शुक्रवारी दुपारी काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच रविवारपर्यंत ते नाशिकला परतण्याची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र नेहते यांनी दिली.

हितेंद्र व महाजन बंधूंनी सीपीआर प्रणालीचा प्रसार करण्यासाठी 'सी टू स्काय' ही मोहीम आखली होती. या मोहिमेंतर्गत मुंबई ते काठमांडू सायकलिंग, त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग, त्यानंतर गिर्यारोहण असा त्यांचा प्रवास होता. या मोहिमेला ३ मार्च रोजी मुंबईतून सुरुवात झाली. त्यानंतर मुलूंड, ठाणे, नाशिक, धुळे, इंदूर, भोपाळ, सागर, झाशी, कानपूर, लखनऊ, बस्ती, बुतवाल, भरतपूर मार्गे ते काठमांडू येथे पोहचले. दि. ८ मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे जाण्यासाठी ट्रेकिंगला सुरुवात केली.

एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर एव्हरेस्ट शिखर सर करण्यास प्रारंभ केला. दि. १८ आणि १९ मे रोजी कॅम्प २, २० मे रोजी कॅम्प ३, २१ मे रोजी कॅम्प ४, याच दिवशी रात्री ८ वाजता ८ हजार ८४८ फुटावर असलेल्या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली. दि. २२ मे रोजी सकाळी ७ वाजता ते शिखरावर पोहचणे अपेक्षित होते, मात्र गिर्यारोहकांची संख्या जास्त असल्याने त्यांना शेवटच्या ठिकाणी पोहचण्यास दोन तास उशीर लागला. ते या ठिकाणी सकाळी ९ वाजता पोहचले. तेथून महेंद्र महाजन यांनी उतरण्यास सुरुवात केली रात्री १ वाजता ते कॅम्प २ वर पोहचले. याच दरम्यान हितेंद्र महजान यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना कॅम्प दोनवर येण्यास सकाळ उजाडली. आठ हजार फुटावर असताना हितेंद्र महाजन यांना अस्वस्थ वाटू लागले. जास्त प्रमाणात दम लागल्याने संपूर्ण शरीर थकले होते. त्याचप्रमाणे महेंद्र महाजन यांनाही बर्फावरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशामुळे कमी दिसू लागले. त्यामुळे त्यांना उतरताना शेरपांचा सहारा घ्यावा लागला. यावर्षी जास्त गिर्यारोहकांना एव्हरेस्टवर जाण्यास परवानगी दिल्याने गर्दी झाली होती. ज्या दिवशी महाजन बंधूंनी सर्वोच्च शिखरावर चढाई केली त्या दिवशी दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे खाली आल्यानंतर सात गिर्यारोहकांचा मृत्यू झाला.

हितेंद्र महाजन यांची प्रकृती खालावल्यानंतर ते असलेल्या ठिकाणी जादा ऑक्सिजन सिलिंडर पाठविण्यात आले. त्रास झालेल्या ठिकाणाहून परत येण्यासाठी दोन जादा शेरपा पाठविण्यात आले होते. त्यातून ते सुखरूप काठमांडूला पोहचले आहेत.

- डॉ. राजेंद्र नेहते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांचे साहित्य संमेलन ५ जूनला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामशेज शिक्षणसंस्था आणि जीवनगौरव शैक्षणिक मासिक यांच्यातर्फे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन ५ जून रोजी पेठ रोडवरील रामशेज, आशेवाडी येथे होणार आहे. सकाळी ७ वाजता हे संमेलन सुरू होणार आहे. महिला बाल कल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे संमेलनाच्या अध्यक्षपदी असतील. सकाळी ७ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात होणार आहे. ९ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साडे दहा वाजता डॉ. रत्ना चौधरी, डॉ. सतीश म्हस्के, प्रा. भगवान विसे यांचा विविध विषयांवर परिसंवाद होणार आहे. सकाळी ११.३० वाजता भाऊसाहेब चासकर यांचे व्याख्यान होणार असून त्यानंतर हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. तसेच कथाकथन, चर्चासत्र असे कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातील शिक्षक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत.

- - - - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वसंतराव पवार चषक यंदा पुण्याच्या ‘मॉडर्न’कडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक क्रीडाप्रावीण्य प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाला विद्यापीठातर्फे डॉ. वसंतराव पवार चषक देऊन सन्मानित करण्यात येते. सलग चौथ्या वर्षीचा डॉ. वसंतराव पवार चषक पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाला मिळाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ शुक्रवारी ३१ मे रोजी विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाच्या सभागृहात होणार आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना महाराष्ट्राचे ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक व ५१ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. मुलांच्या विभागात मविप्र समाजाच्या पिंपळगाव येथील क. का. वाघ. महाविद्यालयाचा राष्ट्रीय कांस्यपदक विजेता व गतवर्षी हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेला नौकानयनपटू सागर नागरे व मुलींच्या विभागात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बीएमसीसी महाविद्यालयाची जलतरणपटू युगा बिरनाळे खाशाबा जाधव सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. युगाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत ५ सुवर्णपदके पटकावली होती.

पारितोषिक वितरणास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्रीकांत कल्याणी व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू गायत्री वर्तक, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित राहणार आहेत. खाशाबा जाधव सुवर्णपदकावर कायम नाशिककरांचे वर्चस्व राहिलेले आहे. यापूर्वी हा पुरस्कार संजीवनी जाधव, सुरेश वाघ, सिद्धार्थ परदेशी, सुलतान देशमुख या खेळाडूंना मिळालेला आहे. या समारंभासाठी नाशिक विभागातील सर्व पदकविजेत्या खेळाडूंनी, तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक विभाग क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. आर. वाय. बोरसे, सचिव डॉ. दीपक जुंद्रे, मविप्र क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या तरुणांकडून एव्हरेस्ट सर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन तरुणांसह अकरा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करीत तिरंगा फडकावला. वाघेरा येथील मनोहर गोपाळ हिलीम आणि पिंप्री येथील अनिल पांडुरंग कुंदे या तरुणांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील ११वीच्या विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट शिखर मोहिमेसाठी निवड झाली होती. जवळपास सात महिन्यांपासून मनोहर व अनिल यांचा सराव सुरू होता. मनोहर हा वाघेरा येथील आश्रमशाळेत, तर अनिल हा बोरीपाडा येथील आश्रमशाळेत ११वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सात महिन्यांपूर्वी आदिवासी विकास विभागाने त्यांची निवड केली. त्यावेळेस विभागातील २७० मुलामुलींचा समावेश होता. विविध चाचण्या झाल्यानंतर त्यापैकी सात मुले आणि चार मुली अशी ११ जणांची निवड निश्चित झाली होती. त्यांना सिक्कीम, लडाख, वर्धा, हैदराबाद अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. मार्च २०१९ मध्ये पालकांना घरी जाऊन त्यांचे प्रशिक्षक भेटले. त्यांना एव्हरेस्ट मोहीम काय असते याची कल्पना देत परवानगी घेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे एव्हरेस्ट सर केल्याचे संदेश पालकांना मिळाले. त्यांना शेरपांची मदत झाल्याचे पालकांनी सांगितले.

..

मनोहरला धाडसी खेळांची आवड आहे. त्याला पर्वत, शिखर चढाई करायला आवडते. जगातील सर्वोच्च शिखरावर तो जाऊन पोहचला याचा अभिमान वाटतो.

- भगवान हिलीम, मनोहरचा भाऊ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीचा अखेर वाजला बिगुल

$
0
0

प्रभाग १० 'ड'साठी २३ जूनला मतदान

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच महापालिकेच्या प्रभाग क्र. १० 'ड' या रिक्त जागेवरील पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे ही जागा गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त आहे. प्रारुप मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक प्रकियेची घोषणा करण्यात आली. या प्रभागासाठी २३ जून रोजी मतदान घेतले जाणार आहे. येत्या ३० मेपासून निवडणूक प्रकिया सुरू होणार आहे.

प्रभाग क्र. १० 'ड'मधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांचे गेल्या वर्षी जुलैमध्ये निधन झाले. यामुळे भाजपचे संख्याबळ ६६ वरून एकने कमी झाले. त्यामुळे स्थायी समितीमधील भाजपचे बहुमत धोक्यात आले आहे. स्थायीच्या एका जागेवर शिवसेनेने तौलानिक संख्याबळाचा आधार घेत दावा केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली. महापालिकेने यासंदर्भात निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले होते. परंतु, आयोगाने पालिकेलाच झापून काढले होते.

प्रभाग क्र. १० 'ड'मधील जागेसाठी पोटनिवडणुकीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक सुरू असतानाच जाहीर केला होता. महापालिकेच्या निवडणूक कक्षाने १० एप्रिल २०१९ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी निश्चित केली असून, ती प्रारुप यादी हरकती व सूचनांसाठी जाहीर केली आहे. त्यावेळेस एकूण मतदारांची संख्या २४ हजार १९९ एवढी होती. सातपूर विभागीय कार्यालयात ही यादी लावली असून, त्यावर २१ मेपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली होती. नव्याने या मतदार यादीत मतदारांची वाढ होऊन मतदारसंख्या आता २८ हजार ५६ पर्यंत पोहचली आहे. येत्या २७ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ३० मेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल.

..

निवडणुकीचा कार्यक्रम

प्रभाग १० 'ड'च्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ जून रोजी मतदान घेतले जाणार आहे. ३० मे ६ जून दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार आहेत. तर ७ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. दि. १० जूनपर्यंत माघारीची असेल. दि. ११ जूनपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दि. २३ तारखेला मतदान पार पडल्यानंतर २४ तारखेला मतमोजणी होईल.

..

बिनविरोधसाठी प्रयत्न

महापालिकेतील तौलानिक संख्याबळ कायम राखण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले असून, प्रभाग क्र. १० ची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत सुदाम नागरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून, त्याबाबत चाचपणी सुरू आहे. दरम्यान, प्रभाग क्र. १३ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवाराविरोधात भाजपने उमेदवार दिल्याने विरोधक या निवडणुकीत उमेदवार देतात काय, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुसुमाग्रज’मध्ये तालासुरांचा अभिषेक

$
0
0

पवार अकादमीकडून तालाभिषेक महोत्सवाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तबल्याचा नाद, सिथेसायझर व सतारीतून निघालेले धीर गंभीर सूर आणि त्यांना प्रतिसाद देणारे दर्दी श्रोते अशा स्वरमय वातावरणात शुक्रवारी कुसुमाग्रज स्मारकात तालाभिषेक महोत्सव पार पडला. पवार तबला अकादमीच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात नागवेणी क्रिएशन्सचे सतीश राव, अकादमीचे प्रशिक्षक गिरीश पांडे, मनिषा अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुवीर अधिकारी यांनी केले. त्यानंतर तबला सहवादन करण्यात आले. पवार तबला अकादमीचे विद्यार्थी शुंभकर हिंगणे व यश मालपाठक यांनी झपतालातील पेशकार, कायदे, रेले, तुकडे, चक्रदार यांचे सादरीकरण केले. त्यांना आशुतोष इप्पर याने हार्मोनिअमवर साथ केली. यानंतर माधव दसककर यांच्या शिष्या रमा मुळे, मिहीका कोठावदे, स्नेहल जानोरकर, चिन्मयी फडके, तेजस्वीनी शिंदे, भूपाली देवरे यांनी शंकरा रागातील बंदिश, तराणा, एक पारंपारिक गवळण सादर केली. त्यानंतर सिथेसायझर वादन करण्यात आले. सुभाष दसककर यांचे शिष्य सोहम बस्ते, श्रेया पाठक, श्रृती पाठक, चारुता कमलापूर, चिन्मय कुलकर्णी, कृपा परदेशी, सुरश्री दसककर व इश्वरी दसककर यांनी मत्त तालात राग जोग मध्ये विलंबीत गत सादर केली. दृत तीन तालात एक बंदीश सादर केली. त्यांना सुजीत काळे यांनी तबल्यावर साथ केली. यानंतर पुष्कारज भागवत यांनी राग बिहाग मध्ये बडा ख्याल तिलवाडा तालात तर दृत बंदीश तीन तालात सादर केली. त्यांनतर निगूर्मी भजन सादर केले. त्यांना तबल्यावर गौरव तांबे व हार्मोनियमवर इश्वरी दसककर यांनी साथ केली. उद्धव अष्टुरकर यांचे सतारवादनही झाले. त्यांनी राग किरवाणी मध्ये आलाप, जोड, झाला याने सुरुवात केली. यावेळी उपस्थित रसिक श्रोत्यांनी प्रत्येक बंदिशीला दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या बालेकिल्ल्यामुळे मताधिक्य

$
0
0

- रामनाथ माळोदे

पंचवटी आणि नाशिकरोड विभाग मिळून असलेला नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला. यात भाजपचे २९ तर शिवसेनेचे ७ नगरसेवक आहेत. त्यामुळे लोकसभेला युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मताधिक्य मिळणे, अपेक्षित होतेच. निकालानंतर तेच स्पष्ट झाले. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपापल्या भागातून मताधिक्य मिळवून देण्याचा इच्छुकांच्या प्रयत्नाने हे यश मिळाले आहे.

महापालिकेत पंचवटी विभागाने कायम भाजपला साथ दिलेली आहे. पंचवटीत सध्या असलेल्या २४ पैकी तब्बल भाजपचे १९ तर शिवसेनेचा एक असे एकूण २० नगरसेवक आहेत. तर नाशिकरोड परिसरात भाजपचे १० तर शिवसेनेचे ६ असे एकूण १६ नगरसेवक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा या स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली. त्यामुळे आपापल्या प्रभागातील मतदारांशी संपर्क साधण्याचे काम त्यांनी पार पाडले. हे या निवडणुकीच्या यशाचे गमक मानले जात आहे.

भाजपचे शहराध्यक्ष असलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे या मतदारसंघातून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी होती. नाशिक पूर्व मतदार संघातील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अन्य उमेदवारांनी प्रचारावर भर दिला. आपापल्या भागातून युतीच्या उमेदवाराला कसे जास्त मते मिळतील, याकडे लक्ष दिले गेले. विधानसभेची रंगीत तालिम ठरलेल्या या निवडणुकीत स्थानिक आमदारांसह इच्छुक असलेले उद्धव निमसे, अॅड. राहुल ढिकले, अरुण पवार, गणेश गिते, सुनील आडके, सुनील बागूल, सचिन हांडगे आदींनी प्रचारात घातलेल्या लक्षावरून दिसून आले.

सुरुवातीच्या काळात महाआघाडीच्या झालेले मेळावे, बैठका यांना मिळालेला प्रतिसाद नंतरच्या काळात कमी झाला. महापालिकेत या मतदार संघात सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक नसल्याने दोन अपक्ष (जे मुळचे काँग्रेसचे आहेत) आणि दोन मनसे अशा चारच नगरसेवकांवर महाआघाडीच्या प्रचाराची धुरा होती. सुरुवातीला महाआघाडीला चांगले वातावरण दिसत असताना नंतर प्रचाराचा जोश मावळलेला दिसला. मनसेचे अॅड. राहुल ढिकले यांच्यामुळे राष्ट्रवादीला चांगले पाठबळ मिळत असल्याचे दिसत होते. तरी नाशिक पूर्वमध्ये असलेल्या गावांचा आणि त्यांच्या परिसराचा विचार करता त्यांच्याकडून आघाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

पूर्व मतदार संघात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. हा वर्ग जिल्हा बँकेशी संबंधित असल्याने त्याच्या कारभाराच्या जोरावर मते मिळविण्याचा अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांची यंत्रणा या मतदार संघाच्या सर्वच भागापर्यंत पोहचण्यास अपुरी ठरली. त्यातुलनेत स्थानिक उमेदवार असल्याने वंचित आघाडीचे पवन पवार यांना जेलरोडसह इतर भागातून प्रतिसाद मिळाला. त्यांची मते अॅड. कोकाटे यांच्यापेक्षा जास्त आहेत, हे विशेष.

बळीराजाची महाआघाडीकडे पाठ

२०१४ च्या लोकसभेच्या तुलनेत हेमंत गोडसे यांना 'पूर्व'मधून मिळालेली मते अधिक असल्याने हा मतदार संघ युतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुकांची रस्सीखेच प्रचंड वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झालेल्या पूर्व मतदार संघात मानूर, नांदूर, म्हसरुळ, मखमलाबाद, आडगाव, दसक, पंचक यासारख्या गावांचा समावेश आहे. तेथे मोठ्या प्रमाणात असलेल्या शेतकरी वर्गाची मते मिळविण्यात महाआघाडी फोल ठरल्याचे ताज्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिपॉझिट जप्तीची नामुष्की

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत मातब्बरांसह अनेकांचा दारूण पराभव झाला असून, नाशिकमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार, अपक्ष अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह तब्बल १६ जणांवर डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्तीची नामुष्की ओढावली आहे. दिंडोरीतही माकपचे जिवा गावित यांच्यासह तब्बल सहा उमेदवारांनी डिपॉजिट गमावले आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात आली. अंबड वेअर हाऊस येथे मध्यरात्री दोनपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. या निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या, तर दिंडोरीतून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे समीर भुजबळ आणि धनराज महाले यांना मात्र पराभवाची चव चाखावी लागली. खासदारकीची माळ गळ्यात पडावी याकरिता या दोन्ही मतदारसंघांमधून एकूण २६ उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले होते. यामध्ये दिंडोरी मतदारसंघात अवघे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी नाशिकमधून तब्बल १८ जणांनी उमेदवारी कायम ठेवल्याने प्रशासनाला तांत्रिक मर्यादेमुळे मतदान प्रक्रियेकरिता एकऐवजी दोन मशिन्सचा वापर करावा लागला. या कामी अतिरिक्त यंत्रणा कामाला लागल्याने प्रशासनाचा त्यावरील खर्च तीन कोटी रुपयांनी वाढला होता. ही सर्व पार्श्वभूमी, तसेच राजकीय पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनीदेखील निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मतमोजणी प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या फेरीपर्यंत त्यामध्ये सातत्य राखले. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना पाच लाख ६३ हजार ५९९ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार समीर भुजबळ यांना दोन लाख ७१ हजार ३९५ मतांवर समाधान मानावे लागले. दिंडोरीतही डॉ. भारती पवार यांना पाच लाख ६७ हजार ४७० मते मिळाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवार धनराज महाले यांना तीन लाख ६८ हजार ६९१ मतांवर समाधान मानावे लागले.

--

डिपॉझिट कोणाचे वाचते?

मोजण्यात आलेल्या एकूण वैध मतांमधून 'नोटा'ची मते वजा केल्यानंतर जे एकूण मतदान शिल्लक राहते त्याच्या एकषष्ठांश (१६.६६) मते एखाद्या उमेदवाराला मिळाली, तर त्याला त्याचे डिपॉजिट परत मिळू शकते, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघात डिपॉजिट वाचविण्याकरिता उमेदवाराला किमान एक लाख ८५ हजार ७०९ मते मिळविणे आवश्यक होते, तर दिंडोरीत १ लाख ८८ हजार २७ मते मिळविणाऱ्या उमेदवाराचे डिपॉजिट त्याला परत मिळू शकले असते. एवढी मते मिळवू न शकलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होणार असून, त्यासाठीची कार्यवाही सुरू केल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली. या निकषानुसार नाशिकमध्ये गोडसे आणि भुजबळ, तर दिंडोरीत डॉ. पवार आणि महाले यांचेच डिपॉजिट परत मिळू शकणार आहे.

--

याप्रमाणे रक्कम होणार जप्त

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना खुल्या गटातील उमेदवारांकडून २५ हजार रुपये, तर मागासवर्गीय गटातील उमेदवारांकडून साडेबारा हजार रुपये डिपॉजिट घेण्यात आले होते. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषाएवढी मते मिळवू न शकणाऱ्या नाशिकमधील १६, तर दिंडोरीतील सहा उमेदवारांना त्यांचे डिपॉजिट गमवावे लागले आहे. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार, अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे, बसपचे अॅड. वैभव आहिरे, दहा अपक्ष उमेदवारांसह एकूण १६ जणांचे डिपॉजिट जप्त होणार असल्याचे आनंदकर यांनी सांगितले. दिंडोरीतही माकपचे जिवा गावित, वंचित बहुजन आघाडीचे बापू बर्डे, बसपचे अशोक जाधव यांच्यासह सहा जणांचे डिपॉजिट जप्त होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहमदाबाद विमानसेवा रद्द, प्रवाशांना मनस्ताप

$
0
0

नाशिक:

तब्बल चार ते पाच तास विमानतळावर विमानाची वाट पाहिल्यानंतर नाशिकहून अहमदाबादला जाणारी विमानसेवा रद्द करण्यात आल्याचा मेसेज विमानतळ प्रशासनाने दिल्याने नाशिक विमानतळावरील प्रवाशांचा संतापाचा पारा चढला आहे. विमानतळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सुमारे पाच तास विमानाची वाट पाहावी लागल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला. शनिवारी संध्याकाळची ट्रुजेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद-नाशिक विमानसेवेने प्रवाशांची निराशा केली.

ट्रुजेट कंपनीच्या वतीने उड्डान योजनेअंतर्गत नाशिक-अहमदाबाद ही विमान सेवा दिली जाते. त्याला मोठा प्रतिसाद आहे. शनिवारी दुपारपासून प्रवासी ओझर विमानतळावर आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहिल्यांनातरही विमान येत नसल्याने प्रवासी वैतागले होते. अखेर रात्री ८ च्या सुमारास कंपनीने प्रवाशांना माहिती दिली आणि तांत्रिक कारणास्तव सेवा रद्द झाल्याचे सांगितले. सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने विमानसेवेला मोठा प्रतिसाद आहे. त्यातच तांत्रिक कारणास्तव सेवा रद्द झाल्याची घटना ट्रुजेटच्या सेवेबाबत प्रथमच घडली आहे. मात्र सोमवारपासून नियमित सेवा मिळेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅलेट पेपरच हवा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनेक देशांमध्ये ईव्हीएम मशिन हद्दपार झाली असताना आपल्याकडे त्याद्वारेच निवडणूकप्रक्रिया राबविण्याचा एककल्ली कार्यक्रम सुरू आहे. याबद्दल काँग्रेस, डावे पक्ष नाराजी व्यक्त करीत असून, आगामी विधानसभा निवडणुका पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरद्वारेच घ्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

देशातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजप बहुमताने सत्तेत आला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि मित्र पक्षांचा दारुण पराभव झाला असून, या निकालांवर स्थानिक पातळीवरही पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना संधी मिळेल, असे निवडणुकीपूर्वीदेखील वाटत होते, असे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आता खासगीत सांगत आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांना एवढे भरभरून मते मिळतील, यावर आमचाच नव्हे, तर सामान्य माणसाचाही विश्वास बसत नसल्याकडेही पदाधिकारी लक्ष वेधू लागले आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अनुक्रमे शिवसेना आणि भाजपचे हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. या निकालामुळे आता राजकीय पक्षांनीदेखील चिंतन सुरू केले आहे. निवडणुकांत जय-पराजय समजण्यासारखा असला तरी ईव्हीएम मशिनबाबत अजूनही राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासार्हता नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. राजकीय पक्षांनी आता विधानसभा निवडणूक तयारीला महत्त्व दिले असून, या निवडणुकीत ईव्हीएम मशिनला हद्दपार करून बॅलेट पेपरचाच वापर करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करू लागले आहेत. विशेष म्हणजे यासाठी आतापासूनच निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करण्याचा विचारही काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पेठ येथील विद्यमान आमदार जिवा गावित यांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीत सुमारे एक लाख १० हजार मते मिळविली. या मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्या पाठोपाठ गावित यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ईव्हीएम मशिनमधील मतांमध्ये फेरफार करता येत नसल्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दावा असला तरी परदेशात या मशिनऐवजी बॅलेट पेपरचा वापर होऊ लागल्याकडे गावित यांनी लक्ष वेधले. लोकसभा निवडणूकप्रक्रियेत कोणत्याही चिन्हाचे बटण दाबले तरी मत कमळालाच मिळते, असा आरोप काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केला. या निवडणुकीचे निकाल धक्कादायक असून, आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरद्वारेच व्हाव्यात, या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोट

ज्या देशांनी ईव्हीएम मशिन बनविले तेच निवडणुकांत त्याचा वापर करीत नाहीत. मग आपल्याकडेच ईव्हीएम वापराचा अट्टहास का, हा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानप्रक्रियेसाठी बॅलेट पेपरचाच वापर व्हावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

कोट

निवडणुकीत ईव्हीएम मशिनबरोबरच व्हीव्हीपॅटचाही वापर करावा लागतो. निकालाविरोधात कुणी न्यायालयात गेले तर व्हीव्हीपॅटची पावती पुरावा म्हणून दाखविली जाऊ शकते. एटीएममधील पावतीसारखी ही पावती असल्याने ती काही दिवसांतच पुसट होऊ शकते. त्यामुळे ती न्यायालयात सादर करण्यासही मर्यादा येऊ शकतात. यापेक्षा बॅलेट पेपरवरच निवडणुका घेणे सर्वांच्या हिताचे आहे.

जिवा गावित, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शून्य होऊनच नवी सुरुवात शक्य

$
0
0

फोटो : पंकज चांडोले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शून्यातूनच काही नवीन गोष्टी सुचत असतात. पाटीवर नवीन रेघोट्या मारण्यापूर्वी जुन्या रेघोट्या पुसून टाकाव्या लागतात. त्याशिवाय नवीन रेघोट्या व्यवस्थित उमटत नाहीत. तसेच आधीच्या निवडणुकीत काय केले ते या निवडणुकीत उपयोगाचे ठरत नाही. आताही काही पक्षांनी शून्य होऊन नव्याने सुरुवात करायला हवी, असे प्रतिपादन अभिनेते सुबोध भावे यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रा. वसंत कानेटकर स्मृतिरंग सोहळ्याचा प्रारंभ परशुराम सायखेडकर नाट्यगृहात करण्यात आला. '...आणि काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातून लाल्यासारख्या अनेक भूमिका ठसठशीतपणे उमटविणारे भावे यांच्या मुलाखतीने या स्मृतिरंग सोहळ्याचा प्रारंभ झाला. संवादक सदानंद जोशी आणि आमदार हेमंत टकले यांनी ही मुलाखत खुलविली. या वेळी कानेटकर यांच्या सून अंजली कानेटकर, सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, धर्माजी बोडके, जयप्रकाश जातेगावकर, अभिजित बगदे आदी उपस्थित होते. कर्ता बदलतो, कर्मही बदलते; परंतु तरीही क्रियापदाचे रूप बदलत नाही तो 'भावे' प्रयोग असतो, अशी मिश्कील टिप्पणी करीत जोशी यांनी मुलाखतीला सुरुवात केली. "मी जन्मजात अभिनेता नाही. प्रयत्न आणि परिश्रमपूर्वक मी अभिनय शिकतो आहे. प्रत्येक गोष्ट करून बघण्याची, आपण हे का करीत आहोत हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची माझी सवय असून, यामुळेच आतापर्यंतचा प्रवास होऊ शकला, असे भावे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रहिवाशांना मराठीबद्दल न्यूनगंड असतो. तो का हा प्रश्न मला नेहमी सतावतो. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, रंगभूमी समृद्ध करणारे बालगंधर्वांसारखे कलावंत मराठी असल्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगून न्यूनगंड बाजूला करायला हवा, अशी अपेक्षा भावे यांनी व्यक्त केली.

कोण्या एका भूमिकेचा शिक्का आपल्यावर बसू नये, अशी प्रांजळ भावनाही भावे यांनी व्यक्त केली. नाटक कलावंताला ताळ्यावर आणते. नाटक कलावंताला शून्य करते. त्यामुळे पुन्हा कलावंताला त्यामध्ये जीव ओतावा लागतो. व्यवस्थेचेही असेच असून, ती शून्य केल्याशिवाय नव्याने सुरुवात करता येत नाही असे मत भावे यांनी व्यक्त केले. प्रारंभी जातेगावकर यांनी दोन वर्षे चालणाऱ्या स्मृतिरंग सोहळ्याची माहिती दिली. यामध्ये कानेटकर यांच्या नाटकाचे अभिवाचन करण्याचा, तसेच हौशी कलावंतांना सोबत घेऊन या नाटकांचा प्रयोग करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आगामी साहित्य संमेलन नाशिकमध्ये व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. २०२२ मध्ये कानेटकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेषांक काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रेक्षकांना समाधान, आनंद मिळणे महत्त्वाचे

पूर्वी वर्षाला १५ ते २० चित्रपट प्रदर्शित होत असत. हल्ली वर्षाला १८० हून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. काही लोक त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून चित्रपट करतात. काहींना पैसे कमवायचे आहेत म्हणून करतात, तर काही लोक समाजाला संदेश देण्यासाठी चित्रपट करीत असल्याचे सांगतात. मात्र, महाराष्ट्रात अनेक संतांनी समाजाला संदेश देण्याचे काम केले. संतांनी प्रबोधन करूनही लोक सुधारले नाहीत. त्यामुळे चित्रपट करताना संदेश देण्याच्या भानगडीत पडू नये, असे मत भावे यांनी व्यक्त केले. जे समाधान, आनंद मिळविण्याठी प्रेक्षक पैसे देऊन चित्रपटगृहांपर्यंत येतात ते त्यांना कसे मिळेल हे महत्त्वाचे, असेही ते म्हणाले. भारतीय शास्त्रीय संगीत मोठेच असून, ते चुकीच्या पॅकेजमधून पुढे आणल्याने रसिकांना ते नीरस वाटू लागल्याबद्दल भावे यांनी खंत व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे उद्या धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त, परंतु या दिनांकानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या काही शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जीपीफ नंबरपासून वेतन पथकाने आजवर वंचित ठेवल्याने या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधीची कपात होऊ शकली नाही. तसेच, सातव्या वेतन आयोगाचा फरकही जमा होऊ शकलेला नाही. वेतन पथकाच्या या शिक्षकांच्या हिताविरोधी आणि मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. २७) दुपारी २ वाजता नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

एकच नियुक्ती दिनांक असताना आणि शंभर टक्के अनुदान मिळालेले असतानाही वेतन पथकाने काही शिक्षकांना जीपीएफ नंबरसाठी गेल्या दहा वर्षापासून वंचित ठेवल्याचा आरोप नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि जुनी पेन्शन जीपीफ नंबर वंचित समितीने केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे यांचे नेतृत्वाखाली उद्या (दि. २७) दुपारी दोन वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाणार आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, एस. बी. शिरसाठ, एस. बी. देशमुख व सर्व पदाधिकारी, अनिल गांगुर्डे, माणिक गांगुर्डे, सुनील पाटील, संदीप बोराडे, पंडित सोमवंशी, जनक निकम आदींनी या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उधाण युवा ग्रुपतर्फे 'एक दप्तर मोलाचे'

$
0
0

उधाण युवा ग्रुपतर्फे

'एक दप्तर मोलाचे'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण घेता यावे व चांगले दप्तर व शालेय साहित्य मिळावे यासाठी याही वर्षी उधाण युवा ग्रुपतर्फे 'एक दप्तर मोलाचे' हा उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांच्या संकल्पेनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना दप्तराबरोबरच शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी सुमारे सातशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरासह शैक्षणिक वस्तुंचे वाटप या उपक्रमांतर्गत करण्यात आले होते. पुढील महिन्यात शाळा सुरू होतील, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांपर्यत ही मदत पोहोचविण्याचा मानस संस्थेचा आहे. नव्या वर्गाबरोबरच विद्यार्थी नवे दप्तर व नव्या शालेय साहित्यासह शाळेत प्रवेश करतील. कोणत्याही विद्यार्थ्याला फाटलेले दप्तर घेऊन शाळेत जावे लागू नये यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. या उपक्रमात नाशिककरांना सहभागी होता येणार असून ९७६६२४७५५५, ९६३७६७५५५५ या क्रमांकावर संपर्क साधून सुस्थितीत पण विनावापरात असलेले दप्तर देता येणार आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी आपला सहभाग नोंदवावा व आपल्याकडील दप्तर व अन्य शालेय साहित्य लवकरात लवकर जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images