Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गिरीश महाजन प्रतिक्रिया

$
0
0

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर झालेला विजय हा भाजपचे संघटन कौशल्य, जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या शक्तीचा विजय आहे. या आठही मतदारसंघांमध्ये भाजपचा जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजय होईल हे मी आधीच सांगितले होते. त्यापेक्षा अधिक मताधिक्क्य आम्हाला जनतेने दिले आहे. उत्तर महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी आम्ही तीन उमेदवार बदलले, त्या ठिकाणीही आमचा मोठा विजय झाला आहे. आगामी काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू. तसेच विकासाची कामे अधिक जोमाने करू.

- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूर १

$
0
0

सुशीलकुमार शिंदे

आंबेडकरांमुळे 'वंचित'

सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे विजयापासून वंचित राहिले. भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी कमळ फुलवत सोलापूर लोकसभा भाजपकडे ठेवण्यात यश मिळविले. महास्वामींनी शिंदे यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने देशभराचे लक्ष लागलेल्या व शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माढा मतदारसंघात भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा दारुण पराभव करीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त केला. या पूर्वी राष्ट्रवादीकडून माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील आणि शरद पवार यांनी माढ्याचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेऊन संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी दिली. परंतु, निंबाळकर यांनी शिंदे यांचा दारुण पराभव केला आणि भाजपचे कमळ फुलविले.

सोलापूरसाठी ५८ तर माढा मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले होते. सोलापूर लोकसभा निवडणुकीत एकूण १८ लाख ५० हजार २ मतदारांपैकी १० लाख ७९ हजार ८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा विधानसभेचा मतदारसंघ असलेल्या शहर शहर उत्तर मतदारसंघात ५८ आणि शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे आमदार असलेल्या शहर मध्य मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले होते. मोहोळ मतदासंघातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी शिंदे यांना तारेल असे वाटत होते. मात्र, मोहोळचे लीड अन्य विधानसभा मतदारसंघात तुटल्याने शिंदे यांच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले. त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने शिंदे यांचा घात केला. सुरुवातीपासूनच महास्वामी लिडवर होते. अखेरपर्यंत महास्वामींनी लीड कायम ठेवले. शिंदे दुसऱ्या क्रमांकावर तर आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. शहर उत्तर, अक्कलकोट, शहर मध्य या तीन मतदारसंघात महास्वामींना लीड मिळाला. लिंगायत समाजाने महास्वामींनी तारले.

या शिवाय माढा लोकसभा मतदारसंघात १९ लाख ४ हजार ८४५ पैकी १२ लाख ११ हजार ४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. माढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २ लाख २५ हजार ७०८ मतदारांनी मतदान केले होते. त्या खालोखाल मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असलेल्या माळशिरस तालुक्यात सुमारे २ लाख ७ हजार ५६१ मतदारांनी मतदान केले होते. माढा मतदारसंघातील विजेता या दोनच मतदारसंघातील मताधिक्यावर निवडून येणार असेच चित्र होते आणि झाले सुद्धा तसेच माळशिरसने निंबाळकरांना तारले. सायंकाळपर्यंत महास्वामी दीड तर निंबाळकर ७० हजाराने लिडवर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेच आहे वेअर हाऊस!

$
0
0

हेच आहे, वेअर हाऊस!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड वेअर हाऊस येथे मतमोजणीच्या कामासाठी नेमलेल्या नाशिक बाहेरचे पोलिस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना रिक्षाचालकांनी लूटल्याचे दिसून आले. अंबड परिसरातील एखाद्या कंपनीजवळ रिक्षा थांबवत 'इथे पुढेच आहे वेअर हाऊस', 'हेच आहे, वेअर हाऊस', असे सांगून कर्मचाऱ्यांना उतरवून देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. रिक्षाचालकांनी अनेकांना चुकीच्या पत्त्यावर उरतवल्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ झाली.

सकाळी ड्युटीवर हजर होण्याच्या घाईत असलेल्या कर्मचाऱ्यांना रिक्षाचालकांनी गुंगारा दिला. एमआयडीसी परिसरातील कोणत्याही कंपनीज‌‌वळ उतरवित 'हेच वेअर हाऊस' असल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी वेअर हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी चक्क तीन ते चार रिक्षा बदलविल्याचे समजले. मतमोजणी केंद्राबाहेर कर्मचाऱ्यांच्या रंगलेल्या गप्पांच्या फडातून ही बाब समोर आली. रिक्षाचालकांनी युक्तीने प्रवाशांची आर्थिक लूट केली असली, तरी ड्युटीवर हजर होण्यासाठी कर्मचाऱ्यांची मात्र मोठी फरफट झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोफाईल : हेमंत गोडसे

$
0
0

(स्केच वापरावे.)

हेमंत तुकाराम गोडसे

मतदार संघ : नाशिक

पक्ष : शिवसेना

कौल : विजयी

...

देवळाली परिसरातील संसरी गावात ३ ऑगस्ट १९७० रोजी हेमंत गोडसे यांचा जन्म झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून २००७ ते २०१२ या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच, २००८ ते २००९ या कालावधीत ते पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यदेखील होते. पुढे २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवित त्यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी, २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी 'मनसे'तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला. राज ठाकरे यांच्या प्रभावी भाषणांमुळे गोडसे यांना भरभरून मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना खासदारकी लढविण्याची संधी दिली. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उमेदवार होते. मात्र, मोदी लाटेमुळे भुजबळ यांचा पराभव करीत गोडसे 'जायंट किलर' ठरले. सप्टेंबर २०१४ नंतर ते केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीत सदस्य म्हणून कार्यरत होते. हवाई उडाण योजनेंतर्गत नाशिक देशातील नऊ शहरांशी जोडले जाण्यासाठी गोडसे यांनी प्रयत्न केले. रेल्वे व्हील दुरुस्ती कारखाना आणि इलेक्ट्रिकल लॅबचे भूमिपूजन करून त्यांनी नाशिकमधील मतदारांना आपण विकासाप्रती गंभीर असल्याचे दाखवून दिले. नाशिक मतदारसंघात खासदाराची पुनरावृत्ती होत नाही, असा इतिहास असतानाही शिवसेनेने गोडसे यांच्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे ते पुन्हा उमेदवार झाले आणि आता ते निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये इतिहास घडविला आहे. यंदा त्यांनी भुजबळांचे पुतणे समीर यांना शह दिला आहे. त्यामुळे भुजबळ काका-पुतण्याला पराभूत करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाने साधला निशाणा

$
0
0

सोशल मीडियाने साधला निशाणा

निकालाचे अंदाज, विनोदांचा पाऊस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हल्ली देशभरात चाललेल्या प्रत्येक घटनेचे प्रतिबिंब सोशल मीडियाच्या व्यासपीठावर उमटत असतं. लोकसभा निवडणुकीसारखा महत्त्वाच्या विषयाने सोशल मीडिया चांगलेच गाजवले. निकालाचा दिवस तर प्रत्येकाची उत्सुकता ताणणारा असल्याने सकाळपासूनच राजकीय पोस्ट्स, निकालाचे अंदाज, जोक्सचा पाऊस पडत होता. निकालाचे अंदाज जसजसे समोर येऊ लागले तसतसा विरोधी पक्षावर नेटीझन्सने निशाणा साधला.

प्रचार, प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात प्रत्येक पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते. गतकाळात केलेली जनतेची सेवा, येत्या काळातील उद्दिष्टे लोकांपर्यंत कमी वेळात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या माध्यमाने उमेदवारांना चांगलेच बळ दिले. निकालाच्या दिवशीही एकीकडे विजेत्यांवर कौतुकाचा वर्षावर होत असताना दुसरीकडे हार पत्करावी लागलेल्यांविषयी मात्र हास्याचे फवारे उडविण्यात आले. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, पार्थ पवार, राज ठाकरे आदी राजकीय नेत्यांवर निशाणा साधण्यात आला. याबरोबरच, पंतप्रधान मोदी यांच्यावर तुफान स्तुतीसुमने नेटीझन्सने उधळली. निकालाच्या संपूर्ण दिवसात सोशल मीडिया अशा वातावरणात रंगला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयेगा तो वोही...

$
0
0

आयेगा तो वोही...

लोकसभा २०१९ चे निकालाचा कौल जाहीर होण्यास सुरुवात होताच मतदारांनी सोशल मीडियावर जल्लोष केला. भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे समजताच 'आयेगा तो वोही...' असे स्टेटस अपलोड करण्यात आले. सकाळी ८ वाजेपासून नेटिझन्सने सोशल मीडियावर स्टेटस अपलोड करण्यास सुरुवात केली. जेव्हा भाजपाचे उमेदवार विजयी होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले तेव्हा 'आयेगा तो वोही...' हा हॅशटॅग चालविण्यात आला.

--

मी आजीच्या गावाला चाललोय

लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी या दोन राजकीय चेहऱ्यांच्या भोवती प्रामुख्याने रंगली. महाआघाडीचे उमेदवार पिछाडीवर पडल्यावर राहूल यांच्या विरोधातले जोक्स व्हायरल झाले. 'मी आजीच्या गावाला चाललोय. पुढच्या निवडणुकीला भेटू', '‌‌वोट भी दिया करो... अंग्रेज समझकर हाथ मिलाने आ जाते हो.', 'या पेक्षा एक्झिट पोलचे आकडे बरे होते', अशा विनोदी पोस्ट राहूल यांच्या विरोधात शेअर केल्या गेल्या.

--

लाव रे फटाके, वाजव ढोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात 'लाव रे व्हिडिओ' हा फंडा वापरला. मात्र, निकालातून भाजपचेच उमेदवार आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. राज यांच्या 'लाव रे व्हिडिओ'चा फंडा फुसका ठरल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'लाव रे फटाके वाजव ढोल' असे पोस्टर शेअर करत आनंद व्यक्त केला.

--

नहीं बदलेगा चौकीदार

'कितना भी कर लो हाहाकार... नहीं बदलेगा चौकीदार. फिर एक बार मोदी सरकार', अशी पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. महायुतीच्या समर्थकांनी मोदींच्या समर्थनार्थ सकाळपासून पोस्ट, फोटो, व्हिडिओ शेअर केल्या. 'राज तिलक की तैयारी करो. आ रहे है भगवा धारी' असे पोस्ट करत मोदींचा फोटो शेअर करत समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद शेअर केले गेले. मतदारांनी भाजप-सेनेच्या उमेदवारांच्या विजयाच्या संदर्भात पोस्ट शेअर करण्यासह विरोधकांवर टीका केली. या मेसेजेसमध्ये 'नागरिकशास्त्रात हे शिकलो होतो की, सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात. पण, २०१९ मध्ये एका पंतप्रधानाने सगळे खासदार बनवलेत', हा मेसेज सर्वाधिक चर्चेचा ठरला.

--

बालकविता हुकली

'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!, वरती खाली मोद भरे, वायुसंगे मोद फिरे, नभात भरला, दिशांत फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे... या काव्यपंक्तीमध्ये एक वेलांटी राहिली आणि बालकवींची राजकीय दूरदृष्टी असलेली कविता हुकली', ही पोस्ट सकाळपासून सोशल मीडियावर शेअर केली गेली. मोदी सरकारला बहुमत मिळणार होतेच, असे लिहित ही पोस्ट शेअर केली गेली.

पैसे परत दे भो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाआघाडीला बाहेरुन पाठींबा देत लोकसभेच्या प्रचारात भाजप-सेनेच्या विरोधात भाषणे ठोकली. तेव्हा राष्ट्रवादीकडून राज यांना प्रचारासाठी पैसे दिल्याचा आरोप होत होता. निकाल जाहीर होण्यास सुरुवात होताच नेटिझन्सनी महाआघाडीच्या नेत्यांवर टिकेची झोड उठविली. 'शरद पवार पोरं घेऊन कृष्णकुंजवर दाखल. माझे पैसे परत दे रे भो', अशी मागणी केल्याची पोस्ट अपलोड करण्यात आली. तसेच राज आहेत बील घ्यायला म्हणत 'मैं शरदचंद्र पवार ईश्वर की शपथ लेता हूं... तेवढ्यात सुप्रियाताई येतात. अहो बाबा उठा, झोपेत का बडबडताय?. ते राज ठाकरे आलेत सभांचे बिल मागायला.' हा जोक मतदारांनी शेअर केला.

--

एक दिवासाचे पंतप्रधान

'महाआघाडी चे पंतप्रधान पदाचे उमेदवार निश्चित. सोमवारी मायावती, मंगळवारी चंद्राबाबू नायडू, बुधवारी अखिलेश यादव, गुरुवारी ममता बॅनर्जी, शुक्रवारी ओवेसी आणि फारुख अब्दुल्ला (विभागून अर्धा दिवस), शनिवारी अरविंद केजरीवाल, रविवारी राहुल गांधी, असे रोज एका दिवसाचे वेगळे पंतप्रधान असतील. यापैकी कोणी सुटीवर असेल, तर त्यांच्याऐवजी शरद पवार काम पाहतील', हा मेसेज व्हायरल झाला. महाआघाडीने सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, सकाळपासूनच महाआघाडीचे उमेदवार पिछाडीवर होते. त्यामुळे महाआघाडीवर विनोदात्मक मेसेज व्हायरल करण्यात आले.

--

पाकिस्तानमध्ये घबराट

पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येणार, हे ऐकून पाकिस्तानमध्ये घबराट परसल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. मोदी सरकारने केलेला सर्जिकल स्ट्राइक लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी निर्णायक ठरला. या आशयाच्याही पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. सोबतच 'पाकिस्तान में अफरा तफरी का माहोल. �&x1f602;किसी ने अफवा उडादी की, भारत के अगले रक्षा मंत्री सनी देओल होंगे.' हा जोक व्हायरल होत होता.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप कार्यालयात जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होताच भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती कार्यालयात दुपारी जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पदाधिकारी व कार्यकत्यांची दुपारी गर्दी झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात ताल धरला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी व आमदार देवयानी फरांदे यांनी फुगडी खेळून जल्लोष व्यक्त केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पेढे वाटप केले. आमदार सीमा हिरे त्यांचे पती महेश हिरे यांनीदेखील नाचून आनंद व्यक्त केला. यावेळी नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष केला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके, नगरसेविका वर्षा भालेराव, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, महेश हिरे, देवदत्त जोशी, योगेश बक्षी, उत्तमराव उगले, उषा नायडू, सुरेश अण्णा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजप-मित्रपक्षांच्या आघाडीला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल नाशिकरोडच्या बिटको चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटत व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. नाशिक मतदारसंघातील युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयानिमित्त शिवसेनेनेही आनंदोत्सव साजरा केला.

लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपल्यानंतर सर्वत्र एक्झिट पोलमध्ये भाजप व मित्रपक्षांची आघाडी दाखवण्यात आली. गुरुवारी सकाळी देशभरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या फेरीपासून भाजप व मित्रपक्षांना मोठ्या प्रमाणात आघाडी मिळू लागली. त्यामुळे विजय निश्चित होऊ लागताच बिटको चौकात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी फटाके, गुलालाची उधळण व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा नेते सुनील आडके, नगरसेवक शरद मोरे, दिनकर आढाव, बाजीराव भागवत, भाजयुमो अध्यक्ष शांताराम घंटे, रामदास सदाफुले, योगेश भोर, नवनाथ ढगे, प्रकाश घुगे, निवृत्ती भोर, किरण मैद, ज्ञानेश्वर आढाव, राजेश आढाव, जयंत नारद, गणेश सातभाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे, नंदुरबारही राखण्यात यश

$
0
0

डॉ. भामरेंचा सव्वा दोन लाखांनी, तर डॉ. गावितांचा ९५ हजारांनी विजय

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेत एकूण ६,१३, ५३३ मते मिळवली. त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांना ३ लाख ८४ हजार २९० मते मिळाली. डॉ. भामरे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवित २ लाख ३० हजार ३७८ मताधिक्याने विजयावर शिक्कामोर्तब केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी ६ लाख ३९ हजार १३५ मते मिळवून काँग्रेसचे उमेदवार अॅड. के. सी. पाडवी यांचा ९५ हजार ६२८ एवढे मताधिक्याने पराभव केला. अॅड. पाडवी यांना ५ लाख ४३ हजार ५०७ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांना १३,१२० मते मिळाली.

धुळे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांनी टक्कर दिली. मात्र, डॉ. भामरे यांनी तब्बल सव्वा दोन लाखांनी विजय मिळवित सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. या ठिकाणी अनिल गोटे यांनी केलेले बंड, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद अहमद दुल्ला यांची उमेदवारी या सर्व गोष्टींचा कुठेही प्रभाव दिसून आला नाही.
अनिल गोटे यांना ८४१८ मते तर वंचित आघाडीच्या नबी अहमद यांना ३९४४९ एवढी मते मिळाली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या प्रारंभी काँग्रेसचे उमेदवार के. सी. पाडवी यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात सन्नाटा पसरला होता. मात्र, चौथ्या फेरीत बाजी पलटली आणि के. सी. पाडवी यांचे मताधिक्य कमी झाले. दरम्यान, भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी पाचव्या फेरीपासून मताधिक्य घेत विजयाकडे घोडदौड सुरू केली. पाचव्या फेरीपासून वाढलेले मताधिक्य अखेरपर्यंत वाढतच राहिले. नंदुरबार मतदारसंघात आदिवासींची नाराजी, मराठा आरक्षणाचा मुद्दा, डॉ. सुहास नटावदकर यांचे बंड या सर्व गोष्टी पूर्णत: निष्फळ ठरल्या. मतदारांनी धुळे, नंदुरबारला पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारास संधी दिली आहे. त्यामुळे आता डॉ. भामरेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळते का, याकडेही धुळेकरांच्या नजरा आहेत.

नंदुरबारला २१ हजारांपेक्षा अधिक ‘नोटा’

काँग्रेसला नवापूरमधून २५ हजार तर साक्रीमधून ९ हजारांचे मताधिक्य मिळाले. अक्कलकुवा व शहादा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवाराला थोडाफार फरक सोडला तर सारखी मते मिळाली आहेत. मतमोजणीत एक चमत्कारिक आकडेवारी आली आहे, ती नोटा मतदानाची. या ठिकाणी सुमारे २१ हजारांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’ला मतदान करून दोन्ही प्रमुख उमेदवारांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही आकडे यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ठ्यपूर्ण ठरली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा खान्देशगड अभेद्य

$
0
0

महायुतीचे उन्मेष पाटलांना विक्रमी मताधिक्य; रक्षा खडसे सलग दुसऱ्यांदा खासदार

टीम मटा, जळगाव / धुळे

जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील ७ लाख ११ हजार ५८८ मते मिळवित विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा ४ लाख १० हजार ३२० मतांनी पराभव केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी ६ लाख ५५ हजार ३८६ मते मिळवित खासदारकी राखली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा ३ लाख ३४ हजार २६६ मतांनी पराभव केला. धुळे, नंदुरबारलाही भाजप-शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी विजयश्री खेचत खान्देशातील गड अभेद्य राखण्यात यश मिळविले.


जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील ४ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेवून तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा निखील खडसे या सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेवून विजयी झाले. जळगाव मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व रावेर मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी हे निकाल जाहीर केले.

रावेरमधून डॉ. उल्हास पाटलांचा पराभव
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांना ६ लाख ४९ हजार ८८५ मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना ३ लाख १८ हजार २९ मते मिळाली. रक्षा खडसे यांना ३ लाख ३१ हजार ८५६ मतांचे मताधिक्य मिळाले. जळगावमधील बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांना ३७ हजार १४८ मते मिळालीत. तर रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांना ८७ हजार ७९९ इतकी मते मिळाली.

जिल्ह्यात १९ हजार ४१६ मते ‘नोटा’ला
मतमोजणीसाठी जळगाव मतदारसंघासाठी एकूण २९ तर रावेर मतदारसंघासाठी २४ फेऱ्या झाल्या. गुरुवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. जळगाव मतदारसंघात १० हजार २५२ इतकी तर रावेर मतदारसंघात ९ हजार १६४ मते ‘नोटा’ म्हणजेच ‘यापैकी कुणीही नाही’च्या खात्यात गेली. तर पोस्टल मतांमध्ये भाजपचे उन्मेष पाटील यांना ४३६४, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना ३०१७ तर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर यांना २०२ पोस्टल मते मिळाली. पोस्टलमध्ये ३७ मते ‘नोटा’ला होती. तर रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांना ३१७४, काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना ७६४ तर वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर यांना २५७ पोस्टल मते मिळाली. २८ पोस्टल मते ‘नोटा’ला गेली.

आम्हाला सुरुवातीपासून जिल्ह्यातील दोन्ही जागांवर मोठ्या मताधिक्क्याची खात्री होतीच. महाराष्ट्रातदेखील सर्वाधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याने त्याचा आनंद आहे. यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत सार्थकी लागली आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते.
- रक्षा खडसे, खासदार, रावेर मतदारसंघ

परंपरेनुसार जळगाव जिल्हा हा भाजपचा अभेद्य किल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या सादेला मतदारांनी साथ दिली आहे. जलंसपदामंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे उपनेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मेहनतीला फळ आले आहे. मला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.
- उन्मेष पाटील, खासदार, जळगाव मतदारसंघ

देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबविराजमान व्हावे आणि धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे खासदारव्हावे हे जनतेने मतदानापुर्वीच ठरवलेले होते. माझा विजय हा धुळ्यातील जनतेचा विजय आहे. माझ्या विजयाचे श्रेय जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आहे. मतदारसंघातील उर्वरित योजनांना गती देणार असून, रोजगारावरही आमचा भर राहणार आहे.
- डॉ. सुभाष भामरे, खासदार, धुळे मतदारसंघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नियोजनबद्ध विकासाला जनतेने साथ दिली आहे. नंदुरबार मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीनेच हा विजय शक्य होऊ शकला असून, त्यांचेही आभार. - डॉ. हीना गावित, खासदार, नंदुरबार

राज्यासह जळगाव जिल्ह्यातील मतदात्यांनी मोदी सरकारवर विश्वास ठेवला आहे. रक्षा खडसे यांना मोठे मताधिक्य मिळाले असून, मोदींच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवल्याचेच यातून दिसत आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर व मतदारांच्या विश्वासावर जिंकल्याचा आनंद आहे.
- एकनाथ खडसे, आमदार

युतीने विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अपेक्षापेक्षा जास्त यश मिळाले आहे. त्यामुळे देशभर विजयाचा उत्सव सुरू आहे.
- गुलाबराव पाटील, राज्यमंत्री

जळगाव लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा अनेपेक्षित लागला आहे. ईव्हीएमचा हा परिणाम असून, पहिल्या फेरीपासून मोजणीचा रेषो शेवटपर्यंत सारखाच राहिला आहे. इतक्या मोठ्या फरकाने फरकाने पराभव शक्य वाटत नसल्याने हा संशोधनाचा विषय आहे.
- गुलाबराव देवकर, पराभूत उमेदवार, जळगाव

धुळे लोकसभेतील मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेने दिलेल्या कौलचा कायमच आदर राहील. विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी बांधील आहे. लोकसभेच्या निवडणूक प्रचारात मतदारांना दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.
- कुणाल पाटील, पराभूत उमेदवार, धुळे

सक्षम नेतृत्वाचा हा दमदार विजय आहे. भाजपने घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांमुळे विकासाची नवी दालने उघडली गेली आहेत आणि हीच गोष्ट सर्वसामान्य माणसाच्या पसंतीला उतरली. शेतीमध्ये क्रांतिकारी बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी नक्कीच करतील असा विश्वास आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यास विरोध'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकिकडे राज्य सरकार महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र संपूर्ण राज्याला अंधारात ठेवून ४६ टीएससी पाणी गुजरातला देण्याची तयारी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर प्रधान सचिवांनी तसे पत्रही दिले असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यास सर्वपक्षीय नेत्यांनी प्रखर विरोध केला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नितीन भोसले यांनी केले.

वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेच्या सत्रात ते बोलत होते. शुक्रवारी 'खरंच गुजरात महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी पळवतंय?' या विषयावर व्याख्यानमालेतील २४वे पुष्प त्यांनी गुंफले. हे पुष्प शांतारामबापू वावरे यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे ही व्याख्यानमाला सुरू आहे.

भोसले म्हणाले, शासनाने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरात सरकारला देऊ नये, यासाठी पाणीयात्रा या जनआंदोलनाच्या माध्यमातून हा विषय सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. पाण्यासाठी संघर्ष करणारे जिल्हे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामधील पाण्यासाठी होरपळणाऱ्या नागरिकांतपर्यंत पाण्याचा विषय पोहचविण्यासाठी पाणी यात्रा दौरे सुरू असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. गोदावरी खोरे समृद्ध करणारी योजना महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर अवलंबून असताना मुख्यमंत्री मात्र गुजरातला ४६ टीएससी पाणी देऊन उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा वाळवंट करीत आहे. नाशिकच्या पश्चिमेकडील पाणी महाराष्ट्राचे, धरण बांधण्यासाठी जमीन महाराष्ट्राची धरणग्रस्ताचे प्रश्न महाराष्ट्राचे केवळ पाणी मात्र गुजरातला जाणार, अशी मानसिकता ठेवून निर्णय घेतले जात आहेत. दुष्काळ भागाच्या दौऱ्यावर असणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांनी प्रथम महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यासाठी विरोध करावा, असेही आवाहन भोसले यांनी यावेळी केले.

आजचे व्याख्यान

वक्ता : डॉ. दिलीप धोंडगे

विषय : माणूस आणि त्याचे जगणे

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकविता

$
0
0

विनीत शिंपी, नाशिक झाली सुरू उन्हाळी सुट्टी नका करू मोबाइलशी गट्टी खेळा खेळा मैदानी खेळ घालवा त्यात मोलाचा वेळ आला आला उन्हाळा, डोक्यावर तुम्ही टोपी घाला. खेळ खेळा, बनवा मित्र कागद पेन्सिल, काढा चित्र घ्यावा आपला पौष्टिक आहार नको ते चायनीज वारंवार आता येईल जून, संपेल सुट्टी करावी लागणार अभ्यासाशी गट्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठरापैकी १४ उमेदवार १० हजारांच्या आता!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदारपद मिळविण्यासाठी तब्बल १८ उमेदवार रिंगणात होते. त्यातील १४ उमेदवारांना १० हजार मतांचा टप्पाही पार करणे शक्य झाले नाही. अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकोटे यांच्याकडून कडवी झुंज अपेक्षित मानली जात होती. पण, कोकाटे विजयापासून फारच दूर राहिल्याचे दिसून आले.

निवडणूक रिंगणात छोट्या पक्षांची, तसेच अपक्षांची रेलचेल असते. काही वेळा मतविभाजनामुळे प्रमुख दावेदारांचे जय-विजयाचे सूत्रच बदलते. यावेळी मतमोजणीच्या दिवसापर्यंत ही शक्यता सर्वाधिक मानली जात होती. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष अथवा छोट्या पक्षांचा तसा परिणाम दिसून आला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित आघाडी वगळता रिंगणात एकूण १५ छोटे पक्ष आणि अपक्ष होते. भाजप सोडून अपक्ष दावेदारी करणाऱ्या कोकाटे यांना सर्वाधिक म्हणजे एक लाख ३४ हजार ५२७ मते मिळाली. त्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मतांचा वाटा ९१ हजार ११४ इतका मोठा होता.

--

'नोटा'पेक्षाही कमी मतांचे दान

कोकाटेंनंतर दुसऱ्या क्रमांकावरील मते भारतीय ट्रायबल पार्टीच्या सोनिया जावळे यांना मिळाली. जावळे यांना सहा हजार ९५२ मतदारांनी पत्ती दर्शविली. त्यानंतर बहुजन समाज पक्षाचे वैभव आहिरे यांना पाच हजार ७१९, देवीदास सरकटे यांना चार हजार २७२, विलास मधुकर देसले-पाटील यांना तीन हजार ८२६ मते मिळाली. प्रियंका शिरोळे यांना दोन हजार २०६, धनंजय भावसार यांना १८८५, सुधीर देशमुख यांना १८८१, सिंधूबाई केदार १७३६, शरद आहेर १३८७, विनोद शिरसाठ यांना १३६२, प्रकाश कनोजे यांना ९२२, तर शिवनाथ कासार आणि संजय घोडके यांना अनुक्रमे ८६६ आणि ८९९ मते मिळाली. १५ पैकी कोकाटे यांचा अपवाद वगळता इतरांना 'नोटा' इतकेही मतांचे दान मिळू शकले नाही.

--

सर्वमिळून १५ टक्के मते

छोटे पक्ष आणि अपक्ष असे सर्वमिळून १५ उमेदवारांना १५ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली. त्यात मोठा वाटा हा कोकाटे यांचाच ठरला. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ११ लाख २२ हजार ९२ मतदरांनी मतदान केले होते. त्यापैकी १५ उमेदवारांना एक लाख ६९ हजार २७७ मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - शब्दांचे खेळ उत्तर

$
0
0

लोगो - शब्दांचे खेळ

--

कालचे उत्तर

- फळ (देश) : पेरु

- वेल (मुलीचे नाव) : लता

- पालेभाजी (सांभाळणारे) : पालक

- एक प्राणी (लोणच्याचा रस) : खार

- गाण्याचा प्रकार (शेतातील काम) : लावणी

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटे फॅक्टरचे आव्हान

$
0
0

- शैलेन्द्र तनपुरे

shailendra.tanpure@timesgroup.com

सिन्नर विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणेच माणिकराव कोकाटे यांनी भरघोस मते घेतली असली तरी महायुतीचे हेमंत गोडसे यांनीही तुलनेने लक्षणीय मते घेतल्याने कोकाटेंचे आपल्या गावातूनच मोठ्या आघाडीचे गणित फिस्कटले. परिणामी गोडसेंना रोखण्याचे प्रयत्नही फोल ठरले.

शिवसेना व भाजप युती झाल्याने उमेदवारी मिळणार नाही हे गृहित धरून कोकाटे यांनी बंडाचे निशाण फडकविले. बंड करताना आपल्या स्वभावधर्मानुसार संपूर्ण लोकसभा मतदारसंघात त्यांनी उभा केलेला माहोल चुरस वाढविणारा होता. तथापि, सिन्नरचे होमपीच वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघात त्यांना अगदीच मामुली मते पडल्याने प्रत्यक्षात आव्हान नव्हतेच असे स्पष्ट झाले. 'मी माणिकराव' अशी कॅम्पेन राबवून सिन्नरवासीयांनी कोकाटेंना साथ द्यायची ठरविली होती. आमदार राजाभाऊ वाजे यांनाही त्यांच्या समर्थकांनी यावेळेस कोकाटेंबरोबर राहू द्या, विधानसभेला तुमच्याबरोबर आहोतच असे सांगितल्याची वदंता होती. त्यामुळे सिन्नर मतदारसंघातून कोकाटे दीड लाखाहून अधिक मते घेतील, असे वातावरण तयार केले गेले. पण त्याचवेळेस हा धोका ओळखून वाजे यांनीही सारी ताकद पणास लावल्याने कोकाटेंचा रथ लाखाच्या आतच अडखळला आणि गोडसेंनी अर्धशतकी खेळी केली. समीर भुजबळ यांनाही ३५ हजारांच्या आसपास मते मिळाल्याने सिन्नरवासीयांनी कोकाटेंचा ट्रॅक्टर एकतर्फी चालविण्याचा निर्धार केल्याचा दावाही पोकळ ठरला. वंचित आघाडीच्या पवन पवार यांनीही आठ हजारांहून अधिक मते घेतली हे विशेष.

गेल्या खेपेस हेमंत गोडसे यांना पन्नास हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळाले होते. यंदा कोकाटेंच्या उमेदवारीमुळे त्यावर पाणी सोडावे लागणार हे गृहितच होते. तेव्हा कोकाटे हे गोडसेंचे प्रचारप्रमुख होते, तर वाजे यांनी भुजबळांना मदत केली होती. यावेळेस सारेच फासे उलटे पडले आणि कोकाटे व वाजे यांची भूमिका बदलली. मोदींच्या सुप्त लाटेतही लाखाच्या आसपास मते घेऊन कोकाटे यांनी आगामी विधानसभेसाठी आपली दावेदारी अधिक पक्की केली आहे. भाजपमधून निलंबित झालेले कोकाटे आता कदाचित राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारतील आणि वाजेंसमोर आव्हान उभे करतील, असे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत कोकाटेंच्या कन्या सीमंतिनी या उमेदवार असतील असे त्यांनीच जाहीर केलेले आहे. त्यावर ते ठाम राहिले तर लोकसभेत मिळालेला सिन्नरवासीयांचा कौल टिकवून ठेवण्याचे आव्हान सीमंतिनी यांच्यासमोर राहील. सीमंतिनी या जिल्हा परिषद सदस्या या नात्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच भविष्यातील उमेदवारीच्या तयारीला लागल्या होत्या. वडिलांचा तालुक्यातील सारा जनसंपर्क त्यांनी मोठ्या हिकमतीने चालविला होता. त्यांनी उमेदवारी केलीच तर तब्बल ५२ वर्षांनंतर सिन्नरला महिला उमेदवार रिंगणात राहील, असे दिसते. सन १९६७ मध्ये रुक्मिणीबाई वाजे यांनी सिन्नरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर आजतागायत कोणाही महिलेने उमेदवारी केलेली नाही. त्यामुळेच सीमंतिनी कोकाटे या उमेदवार झाल्या तर राजाभाऊ वाजे यांच्यासमोर त्यांचा कितपत निभाव लागेल, याची चर्चा आजपासूनच सुरू झाली आहे. ऐनवेळेस कदाचित पुन्हा माणिकराव कोकाटे हेच बोहोल्यावर चढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली मते ही त्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याने विधानसभेतही पुन्हा नव्याने रिस्क घेण्यात अर्थ नाही, असाही विचार ते करू शकतात.

वाजेंची रणनीती काय?

राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांचे मराठा-वंजारी कनेक्शन या निवडणुकीत फारसे यशस्वी झाल्याचे दिसले नाही. कोकाटेंनी दोन्ही समाजात मुसंडी मारल्याचे दिसत असल्याने वाजेंना विधानसभेतील आपली जागा राखण्यासाठी विशेष सावध राहण्याबरोबरच नव्याने डावपेचांची आखणी करावी लागणार आहे. गोडसेंच्या अभूतपूर्व विजयाचा फायदा वाजेंना होईल, पण कोकाटेंचा वाढलेला प्रभाव त्यात अडथळा तर आणणार नाही ना याचा विचार करूनच आगामी रणनीती वाजेंना ठरवावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हजारावर टपाली मते ‘रिजेक्ट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी मतदारसंघातील टपाली मतदानातील एकूण तीन हजार ९४८ मतदानापैकी दोन हजार ८५९ मते वैध ठरली असून, एक हजार ७१ मते रिजेक्ट झाली आहेत. या मतांमध्येही सर्वाधिक मते भाजपच्या पारड्यात गेली असून, त्या खालोखाल राष्ट्रवादीला पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे आठही उमेदवारांना यात मते मिळाली असून, त्यांचे निवडणुकविषयीचे आकलन चक्रावणारे आहे.

टपाली मते अर्थात, पोस्टल मते ही निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असतात. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर न जाता मतपत्रिकेद्वारे केलेले मतदान म्हणजेच टपाली मतदान असते. यात भारतीय सैन्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मतदान करता येते. मतदानाच्या सात दिवसांपूर्वी हे मतदान करणे आवश्यक असते. त्यासाठी विहित नमुन्यात अगोदर अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्यासाठी मतपत्रिकेसह विविध फॉर्म दिले जातात. त्यात मतदारसंघ, मतदान केंद्र, मतदान यादी क्रमांक आदींचा उल्लेख करावा लागतो. त्यानंतर टपाली मतपत्रिका पाठविण्याचा पत्ता त्यात लिहून ते पाठविले जाते.

स्थानिक स्वराज संस्थांतही २००१ पासून असे मतदान करता येते. कोणत्याही निवडणुकीत मतदान सुरू होण्याअगोदर या टपाली मतदानाची मोजणी केली जाते. ती संख्येने कमी असली, तरी त्यातून कल निश्चिती होत असल्याचे मानले जाते. पण, काही वेळा या टपाली मतांच्या कलाविरुद्धही निकाल लागतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना दोन हजार ८५९ मतांपैकी दोन हजार १८ मते पडली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांना ५८० मते पडली. माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांना ८५, तर वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बापू बर्डे यांना ९८ मते पडली. त्याचबरोबर माजी सनदी अधिकारी असलेले टी. के. बागुल यांना सात, बसपचे अशोक त्र्यंबक जाधव यांना ४२, अपक्ष उमेदवार दादासाहेब पवार यांना १७, दत्तू बर्डे यांना १२ मते पडली.

--

कर्मचाऱ्यांच्या चुका चिंतेची बाब

निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच सैन्य दलातील कर्मचारी व अधिकारी पोस्टल मतदान करीत असतात. ते सर्व सरकारी कर्मचारी असून, त्यांचे मतदान रिजेक्ट होणे ही चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य माणसांनी या चुका केल्या तर समजण्यासारखे आहे. पण,तीन हजार ९४८ मतदानांपैकी एक हजार ७१ मते रिजेक्ट होणे म्हणजे २७ टक्के मते बाद होणे असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या या चुका मात्र चिंतेची बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन अपक्षांच्या पदरी १५ हजार मतांचेच दान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ११ लाख ३७ हजार ६१३ वैध मतदानापैकी तीन अपक्षांना केवळ १५ हजार ८८७ मतदान झाले. या तिन्ही उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी पाच हजारांचा आकडा पार केला, तर एकाला साडेचार हजार मते पडली. त्यामुळे या निवडणुकीत पाच राजकीय पक्षांकडून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना या अपक्षांचा कोणताही फटका बसला नाही.

कोणत्याही निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व दिले जाते. अटीतटीची निवडणूक झाली, तर अशी मते निर्णायक ठरतात. पण, या निवडणुकीत दिंडोरीतील विजयी व दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या उमेदवारांमध्ये १ लाख ९८ हजार ७७९ मतांचा फरक असल्यामुळे अपक्ष उमेदवारांचा फटका कोणत्याही उमेदवाराला बसला नाही. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात एकूण आठ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढविली. त्यात भाजप, राष्ट्रवादी, माकप, वंचित बहुजन विकास आघाडी, बसपचे उमेदवार होते.

तिघेही सहा हजारांच्या आत

दिंडोरीतील आठपैकी तीन उमेदवार अपक्ष होते. त्यातील दादासाहेब पवार यांना पाच हजार ७३१, बर्डे दत्तू यांना पाच हजार ६३१, तर टी. के. बागुल यांना चार हजार ५०२ मते मिळाली. एकूण वैध मतांपैकी याची टक्केवारी दीड टक्कासुद्धा नाही. औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवारांमुळे विद्यामान खासदारांची दांडी उडाली, तर अमरावती येथे अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. पण, दिंडोरीत असा कोणताही परिणाम झाला नाही. या उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात फारसा प्रचार केल्याचे कुठेही दिसले नव्हते. त्यांना मिळालेली पाच हजार मते परिणामकारक ठरली नसली, तरी त्यांना एवढे मतदान पडले हेही विशेष असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीची हुकूमत अधोरेखित

$
0
0

मतदारसंघ विश्लेषण : नाशिक पश्चिम

- राजन जोशी

हेमंत गोडसे यांच्या विजयात सर्वाधिक वाटा विधानसभेच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाचा दिसून आला आहे. पराभूत उमेदवारांच्या चारपट मते गोडसे यांच्या खात्यात गेल्याने हा मतदार संघ युतीचा बालेकिल्ला असल्याचे अधोरखित झाले आहे. मात्र, याच बालेकिल्ल्यात इच्छुकांची वाढती संख्या पाहता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह भाजपकडून सर्वाधिक बंडखोरी झाल्यास आश्चर्य वाटू नये. अशा वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची मदार युतीच्या बंडखोरांवरच राहिल असे चित्र दिसते.

नाशिक लोकसभा मतदार संघांर्तगत येणाऱ्या विधानसभेपैकी पश्चिम मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. या मतदार संघातील महापालिकेच्या ४४ पैकी तब्बल ४० नगरसेवक युतीचे आहेत. उर्वरित चारमध्ये मनसेचे दोन तर राष्ट्रवादी आणि रिपाइंचा प्रत्येक १ नगरसेवक आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीचे वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोडसे यांना येथून ९७ हजार मते मिळाली होती. तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्यापेक्षा निम्मीच मते मिळाली होती. यंदा मात्र गोडसेंनी सव्वा लाखाहून अधिक मते पटकाविली. भाजप आमदार सीमा हिरे, सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचार केला. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेळन शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, शिवाजी चुंभळे यांनी प्रचाराची जबाबदारी पार पाडली.

याउलट परिस्थिती महाआघाडीच्या तंबूत अशा नियोजनाचा अभाव दिसून आला. भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे तसेच नाना महाले यांनी प्रचाराची धुरा घेतली; मात्र प्रभागानिहाय यंत्रणा नसल्याने युतीचे मताधिक्य वाढले. संपूर्ण मतदारसंघात काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नसल्याने महाआघाडीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसला. तसेच या मतदार संघात भाजपाच्या विद्यमान आमदारांची दोन कार्यालये तसेच सिडको, इंदिरानगर व सातपूर भागातही शिवसेनेचे प्रचार कार्यालय होती. याउलट राष्‍ट्रवादीने सिडकोत नेहमीप्रमाणे महाले मळ्यातील नाना महाले यांच्या कार्यालयात व भुजबळ फार्म हे दोनच कार्यालये असल्याने प्रचाराला जोर चढू शकला नाही.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर पश्चिममधून लढू इच्छिणाऱ्या युतीतील शिवसेना भाजपच्या इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या मतदार संघातून विद्यमान भाजप आमदार सीमा हिरे, सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह शिवसेनेकडून सुधाकर बडगुजर, शिवाजी चुंभळे, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपसह शिवसेनेकडूनही या मतदारसंघावर दावा सांगितला जाणार आहे. मात्र, जागावाटपात दोन्ही पक्षांपैकी कोणाच्या वाट्याला हा मतदारसंघ जातो, हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, मतदारसंघ कोणाकडेही गेला तरी दोन्ही पक्षांमधील इच्छुकांकडून बंडखोरी होण्याचीही शक्‍यता आहे. त्या बंडखोरीला रोखण्याचे मोठे आव्हान युतीपुढे असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आश्वासनपूर्ती करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी विजयानंतर शुक्रवारी थेट मुंबईत धाव घेऊन 'मातोश्री' गाठत शिष्टमंडळासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनीही गोडसे यांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करून आगामी काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काम करण्याचे निर्देश दिले.

यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, शिवाजी चुंबळे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, दीपक खुळे, प्रमोद मोजड, तानाजी भोर, राहुल ताजनपुरे, बाळा दराडे, बाळू कोकणी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीसाठी धोक्याची घंटा

$
0
0

- केशव ढोन्नर

इगतपुरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना यंदा ५ हजार ६५२ मतांची आघाडी मिळाली. गत वेळी हेच प्रमाण केवळ १३०० मते म्हणजे त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यापेक्षा कमी होते. अर्थात, पाच वर्षे प्रतिनिधित्व केल्याने खासदार गोडसे यांना यंदा साडेपाच हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळविणे शक्य झाले. परंतु, त्यांचे वाढलेले मताधिक्य आदिवासीबहुल त्र्यंबक आणि इगतपुरी परिसरात आतापर्यंत प्रभावी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी धोक्याची घंटा तर नाही, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातील एकमेव इगतपुरी-त्र्यंबक हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांची त्र्यंबक तालुक्यावरही कायम आहे. तथापि, इगतपुरी तालुक्यात मात्र त्यांना यापुढे अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नाने समीर भुजबळ यांना यंदा त्र्यंबक तालुक्यातून सुमारे ४५ हजार मते मिळली. इगतपुरी तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. भाजपाने पाच वर्षात त्र्यंबक तालुक्यात विशेषत: हरसूल भागात बऱ्यापैकी काम उभे केले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्या सामूहिक प्रयत्नातून महायुतीच्या उमेदवाराला बऱ्याच ठिकाणी बरोबरीची लढत देणे शक्य झाले आहे. खासदार गोडसे यांना इगतपुरी तालुक्यातून मताधिक्य मिळालेले आहे. अर्थात, त्र्यंबक तालुक्यात त्यांना गत वेळेपेक्षा अधिक मते मिळाली आहेत, हे विशेष.

महायुती झाल्याने आणि इगतपुरी विधानसभा उमेदवारी शिवसेनेस मिळेल म्हणून आगामी विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून इच्छुकांनी नेटाने प्रचार केलेला दिसून आला. यामध्ये माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आघाडीवर होते. तसेच इगतपुरीची जागा भाजपाला अथवा शिवसेना यापैकी कोणालाही सुटली तरी तिकीट आपल्यालाच मिळेल या अपेक्षेने हरसूल भागातील विनायक माळेकर यांनीही आपल्या त्यांच्या समर्थकांसह प्रचारकार्यात विशेष सहभाग दिलेला दिसून आला आहे. माजी आमदार शिवराम झोले हे देखील प्रचारात सक्रिय राहिले. आमदार निर्मला गावित आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकोप्याने आघाडी लढवली आहे. लोकसभेला माकपची उमेदवारी नव्हती; मात्र विधानसभा निवडणुकीत माकपची भूमिका महत्त्वपूर्ण राहील.

इगतपुरीत मराठा मतांचे विभाजन

त्र्यंबक तालुक्यात गोडसे व कोकाटे यांच्या लढतीत मराठा मतांमध्ये विशेष विभागणी झाली नाही; मात्र इगतपुरी तालुक्यात तो परिणाम दिसून आला. निवडणूक प्रचारादरम्यान अॅड. माणिकराव कोकाटे यांचा प्रभाव पडेल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्याबाबत बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार यांच्या उमेदवारीने थोड्या प्रमाणात मतविभागणी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images