Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महिला मंडळ कॉलम

0
0

आम्ही साऱ्या जणी लोगो - फोटो आहे

- -

युनिक महिला मंडळ

- -

२००९ साली अनिता सतीश सोनवणे यांनी युनिक महिला मंडळाची स्थापना केली. राजीवनगर येथे हे मंडळ कार्यरत आहे. सुमारे १५० महिला सदस्यांचा समावेश असलेले हे मंडळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विविध क्षेत्रात उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. लघुउद्योजिकांना प्रोत्साहन देणे, गरजूंना आर्थिक मदत, भारतीय संस्कृतीची जपणूक, लहानांपासून ज्येष्ठांसाठी उपयुक्त उपक्रम अशा अनेक हेतूने मंडळातील महिला प्रभावी कार्य समाजात करत आहेत.

- -

सामाजिक बांधिलकीची जपणूक

समाजातील अनेक घटकांना मदतीची गरज असते. या घटकांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत महिला मंडळ मदत करत असते. हिवाळ्यात पाड्यांवर ज्येष्ठ, लहान मुलांसाठी उबदार कपड्यांचे वाटप केले जाते. नवरात्रोत्सवात देवीच्या समोर महिला ओटी भरतात, त्यात भर घालण्याचे आवाहन करत आदिवासी भागांमध्ये, निरीक्षण गृहात गहू, तांदूळ, कडधान्यांचे वाटप केले जाते. या उपक्रमाच्या पहिल्या वर्षी साडे चार क्विंटल तर दुसऱ्या वर्षी साडे पाच क्विंटल धान्याचे वाटप मंडळाकडून करण्यात आले. याशिवाय, येथील मुलामुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी वही, पेन, पेन्सिल, आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. तसेच दिवाळीत दिवाळीत कपडे, फराळाचे वाटप करण्यात आले. नाशिक येथे आलेल्या पूरात अनेकांचे संसार सावरण्यासाठी कपडे, भांडी, पांघरुणे अशा प्रकारची मदत, केरळ येथे आलेल्या पूरासाठी विविध सामग्री मंडळाने पुरविली होती.

- -

पारंपरिक सण, उत्सवांचा आनंद

दरवर्षी युनिक महिला मंडळाकडून 'संक्रांतोत्सव' साजरा केला जातो. दोन दिवस स्टॉल्स लावून लघुउद्योजिकांना प्रोत्साहन दिले जाते. वाणाच्या वस्तू, तिळगूळ आदींची विक्री येथे केली जाते. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हे सणदेखील मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. नवरात्रात महिलांसाठी दांडियाचे आयोजन केले जाते. आरती, श्रीसूक्तम्, कुंजिकास्तोत्राचे पठन, केले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणपूरक गणपती, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे बंदीचा समावेश या उत्सवात असतो. याविषयी प्रबोधन करण्यासाठी शाळांमध्ये प्रबोधन केले जाते. सर्व पारंपरिक सण, उत्सव आनंदाने साजरे केले जाते.

- -

प्रबोधनातून चांगल्या बदलासाठी प्रयत्न

समाजात शांतता नांदावी, वाहन चालक सुरक्षित राहावे, पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी महिला मंडळाकडून सातत्याने विविध मार्गाने प्रयत्न केले जातात. शाळांमध्ये जाऊन त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाते. वृक्षारोपण, रक्तदान, हेल्मेटचा वापर आदी विषयांचा यात समावेश असतो.

- -

महिला मंडळातील सदस्य

अनिता सोनवणे, सुरेखा सोनवणे, मंजुषा पत्की, कल्पना बारसकर, जयश्री महाले, अलका रकिबे, सुवर्णा गांगुर्डे, रेणुका मराठे, प्रिया काळे, प्रिती जैन, सुनिता नंबियार, राजश्री वाघ, सुरेखा सावंत, मीनल हेगडे, अल्बिना शेख, लता शिंदे, नीता किणी, नीता बिडवई, मनिषा खैरनार, वर्षा मुसळे, मनिषा कुलकर्णी, सुजाता कुडे, नाझिया काझी, अदिती वाघमारे, सीमा महाब‌ळ, स्वाती बेलदार, रोहिणी कुलकर्णी, सविता एरंडे, मेघना संधाने

- -

(शब्दांकन - अश्विनी कावळे)

- -

पाठवा तुमच्या मंडळाची माहिती

प्रिय सखी,

आपलंही महिला मंडळ आहे? तुम्हीही विविध प्रकारचे उपक्रम राबवतात? तर मग, आजच आम्हाला त्याविषयी कळवा. आपल्या मंडळाची आजवरची कारकीर्द कशी आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? हे सारे आपण 'आम्ही साऱ्या जणी' या कॉलमसाठी 'मटा'ला कळवू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे व फोटोदेखील यामध्ये अपेक्षित आहे. मंडळाची माहिती ashwini.kawale@timesgroup.com या ई मेल आयडीवर किंवा महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी अश्विनी कावळे यांच्याशी ०२५३ - ६६३७९३८ या क्रमांकावर दुपारी १२ वाजेनंतर संपर्क साधावा.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकः पाण्याचा अपव्यय केल्यास नळ कनेक्शन तोडणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना नाशिक शहरात मात्र सर्रासपणे पाण्याचा अपव्यय केला जात आहे. दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेऊन नागरिकांना फरक पडत नसल्याने महापालिकेने आता नळकनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराला गंगापूर व दारणा या धरणातून पाणीपुरवठा होतो. नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार असूनही नागरिक सर्रासपणे पाण्याचा अपव्यय करीत आहेत. सिडकोत विशेषकरून पाण्याची अधिक नासाडी होत आहे. यामुळे दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय सुरूच असल्याने महापालिकेने आता थेट नळ कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराला गंगापूर व दारणा धरणातून पाणीपुरवठा होतो. परंतु, सातपूर विभागात अधिक पाणीपुरवठा करावा लागत असल्याने महापालिकेने मुकणे धरणातील आरक्षित तीनशे दशलक्ष लिटर्स पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे. मुकणे पाइपलाइनमार्फत दररोज पन्नास दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जात आहे. यामुळे इंदिरानगर, पाथर्डी व सिडकोतील काही भागात पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महापालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकीलवाडीची ‘कोंडी’

0
0

वकीलवाडीची 'कोंडी'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट रोडच्या शेवटच्या कामाचा टप्पा अशोक स्तंभापासून सुरू करण्यात आला. प्रशासनाने अशोक स्तंभ सर्कल हटविले असून, तेथे बॅरेकडिंग केली आहे. ही बॅरकेडिंग थेट रविवार कारंजा रस्त्यापर्यंत असल्याने वकीलवाडीकडे जाणारी आणि येणारी वाहतूक बंदच झाली. यामुळे वकीलवाडी, घनकर लेन आदी भागातून थेट गंगापूररोडकडे वाहनचालकांना येणे शक्य होणार नाही.

अशोक स्तंभ परिसरातील बाजारपेठेमुळे येथे सतत वर्दळ वाहतूक असते. वकीलवाडी भागातील अरुंद रस्ते जुना मुंबई आग्रा हायवे, गंगापूर रोड, रविवार कारंजा आणि पुढे एमजी रोड या मार्गांना जोडतो. वकीलवाडीतील हा रस्ता वन वे असला तरी त्या नियमाचे पालनसुद्धा होत नाही. दरम्यान, प्रशासनाने रस्त्याचे काम हाती घेताना हा रस्ता बंदच केला असून, यामुळे गंगापूर रोडकडे येणाऱ्या वाहनचालकांना महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल आणि त्यानंतर गंगापूर रोड असा प्रवास करावा लागणार आहे. विशेषत: रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे वेळेबरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठेगल्लीमध्ये तरुणीची आत्महत्या

0
0

नाशिक : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत ३१ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना द्वारका परिसरातील काठेगल्लीत घडली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पूनम राजेंद्र दिंडे (३१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. काठे गल्लीतील बनकर चौकातील साईविहार सोसायटीत दिंडे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. पूनम यांनी अज्ञात कारणातून शनिवारी (दि. २५) सायंकाळी तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. या घटनेत ती गंभीर जखमी झाल्याने परिसरातील रहिवाशांनी धाव घेत तिला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक संस्थेची लवकरच निवडणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षणसंस्था असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक संस्थेची निवडणूक लांबविण्याचा विरोधकांचा आरोप सत्ताधारी गटाने फेटाळून लावला आहे. संस्थेच्या घटनेतील निर्देशांनुसार योग्य कालावधीत निवडणूक कार्यक्रमही घोषित करण्यात येईल. यासाठी येत्या पंधरवड्यात कार्यकारिणीची बैठक घेण्याचे आश्वासन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिले.

संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. यात संस्थेच्या निवडणूकांसोबतच अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली. संस्थेच्या घटनेनुसार निवडणुकीच्या किमान ३० दिवस अगोदर अधिसूचना द्यावी लागते. यानुसार विचार करता कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अद्याप विद्यमान कार्यकारिणीच्या हाताशी वेळ असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. सत्ताधारी गटाकडून नियोजनपूर्वक निवडणूका लांबणीवर टाकून त्याचा फायदा विधानसभेत घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी विरोधी गटाने केला होता. या मुद्द्यावरून माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्याचा इशाराही विरोधकांनी दिला होता. मागील पंचवार्षिकसाठी २० जुलै २०१४ रोजी पार पडलेला निवडणूक कार्यक्रम त्यावेळी २० जून २०१४ रोजी जाहीर करण्यात आला होता. तसेच यंदाही घटनेतील निर्देशांनुसार निवडणूक पार पडणार असल्याचा शनिवारच्या बैठकीचा सूर असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त धर्माजी बोडके, बाळासाहेब गामणे, बबनराव सानप, दामोदर मानकर विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी अद्याप घटनेनुसार हाताशी अवधी आहे. संचालक मंडळाच्या लवकरच पुन्हा बोलविल्या जाणाऱ्या बैठकीत चर्चा करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करू. निवडणूक पुढे ढकलण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही.

- कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्ष, क्रांतीवीर व्ही.एन.नाईक संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - ओळख नाण्यांची

0
0

छोटे कुटुंब - सुखी कुटुंब

डॉ. प्रमोद पाठक, नाशिक

सुमारे अर्धशतकापूर्वी भारत सरकारने कुटुंब नियोजनाचे धोरण स्वीकारले. ते अंमलात आणण्यासाठी विविध योजना राबवण्यास सुरुवात केली. सर्व देशभर कुटुंब नियोजनाचे.

चिन्ह असलेला त्रिकोण आणि सोबत घोषणा ठिकठिकाणी रंगविण्यात येत होत्या. तो संदेश मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने १९७४ साली १० पैसे दर्शनी किंमत असलेले अॅल्युमिनमचे १२ कंगोरे असलेले दररोजच्या वापरातील आणि १० रुपये दर्शनी किंमत असलेले आणि जास्त मूल्याचे तांबे-निकल मिश्र धातूचे केवळ संग्रहकांसाठी पाडलेले, अशी दोन नाणी प्रचारात आली. दोन्ही नाण्यांवर त्रिकोणात आई-वडील, मोठी मुलगी आणि छोटा मुलगा असे चित्र होते. त्यात मोठी मुलगी असण्याला महत्त्व दिले होते. त्रिकोणाच्या दोन्ही बाजूला धान्य उत्पादन निदर्शक धानाच्या लोंब्या होत्या. कडेने उजव्या बाजूला देवनगरीत 'नियोजित परिवार: सबके लिये अनाज' ही घोषणा आणि तीच डाव्या बाजूला इंग्रजीत आहे. दहा रुपयाच्या नाण्याचे वैशिष्ट्य असे की ते सर्वात मोठ्या आकाराच्या नाण्यांत गणले जाते. त्याचा व्यास ३९.४ मिमी आहे आणि ते चांगले वजनी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे बेपत्ता वाहनांचा लागेना थांगपत्ता

0
0

चार महिन्यांत १६४ पैकी अवघी ३६ वाहने सापडली

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांकडून गत वर्षीचा हवाला देत गुन्हे कमी असल्याचे सांगत वेळकाढूपणा करण्यात येत आहे. वास्तविक गुन्ह्यांचा शोध लागणे महत्त्वाचे असून, याकडे सपशेल दुर्लक्ष होते आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत चोरी गेलेल्या १६४ वाहनांपैकी तब्बल १२८ वाहनांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. घरफोडीतसुद्धा 'लखपती' झालेले चोर पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत आहेत.

मागील दोन महिन्यांपासून स्ट्रीट क्राईममध्ये हळूहळू वाढ होते आहे. विशेषत: चेन स्नॅचिंग, लूटमार, वाहनचोरी या गुन्ह्यांनी गती पकडली आहे. दुर्दैवाने या गुन्ह्यांचा शोध लागण्याचे प्रमाण फारच कमी असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. नाशिक शहरातून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत १६४ वाहने चोरीस गेली. त्यात परिमंडळ एक म्हणजे गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबई नाका, पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल १०२ वाहने चोरीस गेली आहेत. जवळपास ६५ टक्के वाहने परिमंडळ एकमधून चोरीस गेल्याचे दिसते. बाजारपेठ, प्रमुख एसटी बसस्थानक, गोल्फ क्लब अशा गर्दीच्या ठिकाणांना चोरटे लक्ष करतात. मात्र, चोरट्यांच्या तुलनेत पोलिसांची सर्तकता कोठेतरी कमी पडते.

परिमंडळ दोन म्हणजे सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून गत चार महिन्यांत ६२ वाहने चोरीस गेली आहेत. शहरातून चोरी गेलेल्या १६४ वाहनांपैकी अवघी ३६ म्हणजे २२ टक्के वाहने परत मिळाली. चोरी गेलेल्या १२८ वाहनांचे नक्की काय झाले, याचे रहस्य कायम असून, हतबल वाहनमालक पोलिस ठाण्यांचे उबंरठे झिजवत आहेत.

...

रात्रीच्या घरफोडी 'अंधारात'

वाहन चोरीपाठोपाठ घरफोडीच्या गुन्ह्यांनीसुद्धा नागरिक त्रस्त आहेत. दुर्दैवाने या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना अपयश येते आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ६३ घरफोडीचे गुन्हे नोंदविण्यात आले. त्यात कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यापैकी अवघे २१ टक्के म्हणजे १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस पकडतात, ही चोरट्यांची धारणा पक्की झाली की हे गुन्हे कमी होतात, हा पूर्वइतिहास आहे. त्यामुळे सध्या क्राईम ब्रँच आणि गुन्हे शोध पथक काय करते, हा संशोधनाचा भाग ठरत आहे.

...

शहरातील स्थिती

वाहनचोरी

गुन्हे - १६४

उघडकीस - ३६

...

रात्रीची घरफोडी

गुन्हे - ६३

उघडकीस - १३

..

दिवसाची घरफोडी

गुन्हे - ६

उघडकीस - २

...

परिमंडळनिहाय गुन्हे

परिमंडळ एक परिमंडळ दोन

वाहनचोरी - १०२ ६२

गुन्हा उघड - १८ १८

..

रात्रीची घरफोडी - ३१ ३२

गुन्हा उघड - ४ ९

...

दिवसाची घरफोडी - २ ४

गुन्हा उघड - १ १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुनी इमारत कोसळली

0
0

- एक जण किरकोळ जखमी

- सुदैवाने जीवित हानी टळली

- दुबेरकर इमारत ७० वर्षांपूर्वीची

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा परिसरातील झुलेलाल पतसंस्थेशेजारील सत्तर वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतीच्या सांगाड्याचा काही भाग शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला. इमारतीच्या खाली सुमारे १३ गाळे असून, काही गाळे बंद तर काही गाळ्यात विक्रेते व्यवसाय करतात. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एक जण किरकोळ जखमी झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कोसळलेला भाग, माती, विटा त्वरित हटविल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील झुलेलाल पतसंस्था आहे. तिच्याशेजारी सुमारे सत्तर वर्षांपूर्वीची दुबेरकर ही इमारत आहे. तिच्या वरच्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग पडीक होता. काही भागाचा केवळ सांगाडा उरला होता. हा भाग शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. इमारतीच्या खाली अनेक दुकाने असून, यामध्ये भाडेकरू व्यवसाय करतात. इमारतीच्या भिंती जीर्ण झालेल्या आहेत. यावेळी अनेक दुकानदार दुकानात असले तरी ग्राहक नव्हते. इमारत कोसळताच नागरिकांनी तत्काळ धाव घेतली व दुकानदारांना बाहेर काढून दुकान बंद केली. याच वेळी किशोर पठारे व त्यांचे दोन्ही लहान मुले दुकानात असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी गेलेले पठारे यांना किरकोळ दुखापत झाली. या वाड्यामध्ये योगीराज गोसावी यांचे मेघदूत रेडिओ सेंटर, किशन अमेसार यांचे कल्पना ड्रेसेस, नरेश भोजवणी यांचे दिनेश प्रॉव्हिजन, शर्मा यांचे रॉयल, दिलीप रामवानी यांचे साई कलेक्शन आदी दुकाने आहेत. यामध्ये अनेक दुकाने बंदस्थितीत आहेत. इमारत कोसळल्याचे मनपाचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना समजताच त्यांनी येऊन पाहणी केली.

...

जुन्या इमारती व वाड्यांचा विषय ऐरणीवर

शहरात अनेक जुन्या इमारती व वाडे आहेत. महापालिका पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वाडे व इमारतींना नोटिसा बजावत असते. असे असेनही रहिवासी या इमारतीत राहतात. नाशिकरोडची ही ७० वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग पडल्याने जुन्या वाड्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात १

0
0

\Bआज काव्यमेळावा\B

नाशिक : नाशिक कवी संस्थेतर्फे रविवारी (२६ मे) सायंकाळी पाचला काव्यमेळावा होणार आहे. चैत्रदीप, मोदकेश्वर मंदिरासमोर, इंदिरानगर येथे हा मेळावा होईल. काव्यवाचनानंतर तीन सर्वोत्कृष्ट कवितांना प्रत्येकी एक कवितासंग्रह पारितोषिक देऊन कवींचा सन्मान केला जाणार आहे. नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मगर अध्यक्षस्थानी असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थायरॉईड

0
0

\Bआज थायरॉइड दिन\B

नाशिक : जागतिक थायरॉइड दिन २५ मे रोजी जगभरात साजरा केला जातो. नाशिकमधील हार्मोनी हेल्थ स्पेशालिटी क्लिनिकतर्फे या दिनाचे औचित्य साधून जनजागृतीसाठी मार्गदर्शन शिबिर झाले. डॉ. तुषार गोडबोले यांनी मुलांमधील थायरॉइड आजाराबद्दल, तर डॉ. यशपाल गोगटे यांनी उपचारांवर मार्गदर्शन केले. नवजात शिशूंचे थायरॉइड तपासून त्यावर उपचार केल्यास मतिमंदत्व टाळता येऊ शकते. मयुरी सहस्त्रबुद्धे यांनी थायरॉइड आणि आहारासंबंधी चर्चा केली.

\Bआज आंबा महोत्सव

\Bनाशिक : शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा मिळावा, या उद्देशाने रविवारी (२६ मे) आंबा महोत्सव होणार आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे हा एकदिवसीय महोत्सव होणार असून, संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तो खुला असेल. महोत्सवात पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, कळवण या भागांतील शेतकरी निरनिराळ्या जातींची आंबे विक्रीसाठी आणणार आहेत, याशिवाय लोणची बनविण्यासाठी कैऱ्या, मुरांबा आणि कैरी पन्हेसुद्धा विक्रीस असतील. आंबा महोत्सवाचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले, मंथ लीडर किशोर थेटे आणि तुषार उगले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानाचा दिलासा

0
0

नाशिक : राज्यात विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुण्याच्या हवामान शास्त्र विभागाने वर्तविली असली तरी नाशिककरांना मात्र दिलासा मिळणार आहे. शनिवारी ३७.९ अंश सेल्सियस नोंदविले गेलेले कमाल तापमान येत्या आठवड्यात घसरून ३६ अंश सेल्सियसपर्यंत स्थिरावू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मालेगावात मात्र येत्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात मालेगावचा पारा ४१.६ अंशांच्या पुढे जाऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाणीव नेणीव : डॉ. भरत केळकर

0
0

जाणीव नेणीव : डॉ. भरत केळकर

---

बंदुकीच्या गोळ्या आणि मध

आफ्रिकेच्या वरच्या टोकाला असलेल्या जिबोटीच्या विमानतळावर आठ सीटर छोट्या विमानात येमेन च्या राजधानीला 'साना'ला जायला आम्ही बसलो होतो. सौदी अरेबिया सरकारकडून चार तासाचा विंडो-पीरियड MSF (Medicines Sans Frontiers) म्हणजे डॉक्टर विदाउट बॉर्डर या संस्थेने घेतला होता, त्याच वेळेत आम्हाला सानाला सोडून ते विमान परत येणे गरजेचे होते.

२०१६, दिवाळीच्या अगोदरचा महिना. आदल्याच वर्षी २०१५ ला भारत सरकारने येमेन च्या यादवी युद्धात अडकलेल्या हजारो भारतीय आणि शेकडो विदेशी नागरिकांची ऑपेरशन राहत मध्ये सुटका केली होती. परंतु अजूनही चालूच राहिलेल्या यादवी युद्धात लाखो येमेनी नागरिक होरपळत होतेच. सानाच्या विमान तळावर उतरताना खिडकीतून उध्वस्त विमाने, हेलिकॉप्टर, इमारती दिसत होत्या. साना मधील MSF च्या कार्यालयात एक रात्र राहतानाही तीनदा बाँबस्फोटाचे प्रचंड आवाज जागे करत होते. डिप्लोमॅटिक परिसरात ते असल्याने त्या परिसरात सौदी बाँबिंग करत नाही असे सांगितले गेले. पहाटे दोन सुरक्षा गाड्यांनी, १९ चेकपोस्ट (बंडखोरांच्या) क्रॉस करत, पाच तासात कुठेही न उतरत,आम्ही MSF च्या तात्कालिक हॉस्पिटल मध्ये पोहोचलो. सुरक्षेच्या कारणास्तव महिनाभरच्या माझ्या वास्तव्यानंतरच मी त्या हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या बाहेर येणार होतो.

येमेनी लोक छान स्वभावाची. नैसर्गिक संसाधन असणार्‍या येमेनचा मध जगात प्रसिद्ध आहे. तसेच ते प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे असलेल्या बंदुकांच्या संख्येमुळे. वर्षानुवर्षे चाललेल्या यादवी युद्धात सर्व समाज जीवन उध्वस्त होतंय. बहुतेंकांकडे एका पेक्षा जास्त शस्त्र, बंदुका असतातच. हॉस्पिटलमध्ये आत येताना बंदुका, मशीन-गन्स, बॉम्बचे पट्टे, बाहेरील खोलीत काढून आल्यानंतरच तपासणी व्हायची. युद्धग्रस्त भागात सर्व सामाजिक चलनवलन ठप्प होते. अनेक येमेनी डॉक्टर आणि स्टाफ, MSF हॉस्पिटलमध्ये कामासाठी लागले होते. डॉ अब्दुल्ला अस्थिरोग शिकत असताना युद्ध सुरू झाल्याने दोन वर्षांपासून त्याचे शिक्षण बंद होतेच, तसेच काहीच मैलांवरील त्याच्या आईवडिलांचे सुसज्ज हॉस्पिटल बंडखोरांनी ताब्यात घेतल्याने तो गेले दोन वर्ष आपल्या आईवडिलांना भेटू पण शकत नव्हता. डॉ रौफ, सर्जन होते. पेशंटवरील उपचार करताना, यांना प्रशिक्षण देणे हेसुद्धा माझे काम होते. बेकारीमुळे पूर्वी मोठ्या पगाराच्या नोकरी करणारे प्राध्यापक किंवा अधिकारी आता हॉस्पिटलमध्ये इंग्लिश-अरेबिक भाषेचे साधे दुभाषे होते. उपचारानंतर डिस्चार्ज झाल्यावर परत कुठे जायचे हा प्रश्नही पेशंट समोर होताच. माझ्यासारखे काही काळासाठी तिथे वास्तव्य करून मदत करणारे सुद्धा हे सर्व बघून दीङमुढ झाले होते. परंतु वर्षानुवर्ष अशा परिस्थितीत राहण्यासाठी मनाची खंबीरता आणि जगण्याचा विलक्षण आशावाद यांच्याकडून शिकायलाच पाहिजे.

आपल्याकडेही अशी दुर्दम्य आशावादी जागोजागी दिसतात. वनवासी कल्याण आश्रमामुळे आदिवासी बहुल क्षेत्रातील लोकांची माहिती झाली. पाड्यावर पुरेशा संधी नसल्याने 'जगायला' स्थलांतर करणारी धडपडणारी माणसे, मैलोंमैल चालत रोज शाळेत शिकायला जाणारे विद्यार्थी, भरपूर पायपीट करून पिण्याचे पाणी भरणाऱ्या महिला, त्यांच्या पाड्यावरील घरी आपण गेलो तर आवर्जून आदरातिथ्य करतील. अनेक समस्यांना सामोरी जाणारी ही माणसे अगदी मधाळ, गोड माणुसकी दाखवणारी आहेत.

ज्यांना मदतीची नितांत गरज आहे अशी माणस बघितली तर असंही वाटू शकेल, 'मलाच काही करायची गरज आहे का?' किंवा 'मी काय करू शकणार आहे, माझ्याने काय डोंबल्याचा फरक पडणार आहे.' आपल्यापुढे अनेक पर्याय असू शकतात. एक तर आपण टीका करू शकतो, जाणून बुजून दुर्लक्ष करू शकतो आणि आपले आयुष्य तसेच चालू ठेवू शकतो. परंतु आपण माणूस आहोत. सर्वांशी, भोवताली पण आपण कनेक्टेड असतो. आपल्याला माहिती आहे की आपण दुसऱ्याला मदत करून आपणच समृद्ध होत असतो. अशा लोकांसाठी आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने वेगळ्या अनुभवाला सामोरे जायला पाहिजे. आपल्या जाणिवा समृद्ध करून समाज सूर्याला आपल्या प्रयत्नांचे अर्घ्य द्यायची गरज आहे.

(लेखक डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेचे स्वयंसेवक सर्जन आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा मारहाणीत मृत्यू

0
0

महिलेचा मारहाणीत मृत्यू

नाशिक : पतीने केलेल्या मारहाणीत त्र्यंबक तालुक्यातील दीपा चंदर किरकिरे (वय ३०, रा. त्र्यंबक) या महिलेचा मृत्यू झाला. दीपा यांना त्यांचे पती चंदर यांनी मारहाण केल्याने शनिवारी (दि. २५) दुपारी तीन वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे. तपासाअंती गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उधार दिलेले पैसेन मिळाल्याने आत्महत्या

0
0

नाशिकरोड : उसने दिलेले पाच लाख रुपये परत केले नाही म्हणून कंटाळलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जुना सायखेडा रोड, जेलरोड येथे ही घटना घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणाली राकेश गोंधळे (रा. आकाश पार्क, जेलरोड) हिने तक्रार दाखल केली आहे. पती राकेश गोंधळे याने दोन वर्षापूर्वी निखिल घुले याला पाच लाख रुपये उसने दिले होते. या रक्कमेची मागणी राकेशने वेळोवेळी केली. दोन वर्षे होऊनही पैसे मिळत नसल्याने वैतागलेल्या राकेशने घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 5


नाशिकः ताल-नृत्याची रसिकमनावर मोहनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ताल त्रितालात उठाण, पेशकार, कायदा, रेला आदींमध्ये तबलावादन व तोडे, तुकडे, चक्रदार, गिणतीत सादर झालेल्या कथक नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. निमित्त होते, 'तालाभिषेक' या कार्यक्रमाचे.

संगीत क्षेत्रात संगीताचा प्रसार आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या पवार तबला अकादमी या संस्थेस यंदा ५० वर्षे व संगीत आणि सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणाऱ्या एसडब्ल्यूएस फायनान्शियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉटेल करी लिव्हजचे संचालक विक्रम उगले, प्रख्यात तबलावादक पंडित राजेंद्र अंतरकर व निर्मला सावल यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. त्यानंतर वैष्णवी भडकमकर यांनी ताल त्रितालात उठाण, पेशकार, कायदा, रेला, तुकडे, चक्रदारमध्ये तबलावादन केले. त्यांना पुष्कराज भागवत यांनी संवादिनी साथ दिली. त्यानंतर नाशिकच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांचे कथक नृत्य सादर झाले. त्यांनी तालपक्ष ताल त्रितालात प्रथेनुसार थाट, तोडे, तुकडे, परण, चक्रदार, गिणती, तिहाई, ततकार आदींमध्ये नृत्य सादर केले. त्यानंतर पणजी येथील मयंक बेडेकर यांनी तबलावादन सादर केले. या कलाकारांना पुष्कराज भागवत, प्रशांत महाबळ (संवादिनी) तर वैष्णवी भडकमकर (तबला) यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाला पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार, एसडब्ल्यूएस फायनान्शीयल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी आदी उपस्थित होते.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. २६) सुजित काळे यांचे तबलावादन, पं. सुभाष दसककर यांचे संवादिनी वादन आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक आदित्य कल्याणपूर यांचे तबलावादन होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अंधश्रद्धा दूर होण्यासाठी जीवनमानात सुधार गरजेचा'

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजातील सर्वच नागरिकांची विचारसरणी आधुनिक विज्ञानवादी सशक्त होण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या अंधश्रद्धा दूर होण्यासाठी सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारणा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अॅड. समीर शिंदे यांनी केले.

म्हसरुळ, गुलमोहरनगर येथील ओम गुरुदेव हास्य सरितातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत शनिवारी 'अंधश्रद्धा निर्मूलन : एक चळवळ' या विषयावर ते बोलत होते. माणसाचे पाऊल चंद्रावर गेली कित्येक वर्षांपूर्वी पोहचले आहे. विज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे. मात्र, अजूनही समाजात प्रस्तापित असलेली बुवाबाजी, मांत्रिक आदींची लोकांची विविध प्रकारे शोषण फसवणूक जशी शारीरिक,मानसिक, आर्थिक अशा विविध मार्गाने शोषण करीत राहिलेली आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी अनेक वर्षांपासूंनच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या प्रयत्नाने जादुटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. त्याने या सर्व प्रकारच्या गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आजच्या काळाबरोबरच पुरातन काळापासून संत समाजसुधाकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात संतांच्या विचारसरणीचा वारसा फार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनरेटर बॅटरीचा बिटकोमध्ये स्फोट

0
0

साडेतीन तासवीज पुरवठा बंद; रुग्णांच्या जीवाशी खेळ

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

ऐन लोडशेडिंगच्या काळात महापालिकेच्या नाशिकरोडमधील बिटको रुग्णालयातील जनरेटच्या बॅटरी आणि चार्जरचा स्फोट झाल्याची घटना शनिवारी (दि. २५) सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. वीजपुरवठ्याअभावी साडेतीन तास या रुग्णालयातील रुग्णांना असह्य उकाड्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नवजात शिशु विभागातील इनक्युबेटरचे वॉर्मरही वीजपुरवठ्याअभावी बंद पडले. त्यामुळे सर्व नवजात बालकांना तातडीने इन्क्युबेटरमधून बाहेर काढण्याची वेळ आली.

महावितरणच्या वतीने देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर बिटको रुग्णालयातील जनरेटर सुरू करण्यात आले. परंतु, काही मिनिटांतरच या जनरेटरची बॅटरी आणि चार्जरचा स्फोट झाला. जनरेटर नादुरुस्त झाल्याने संपूर्ण बिटको रुग्णालयातील सर्व वॉर्डांमधील वीजपुरवठा खंडित झाला. रुग्णालयातील सर्व दिवे, ट्यूब, फॅन, एसी बंद झाले. उकाड्यामुळे तेथील रुग्णांचे प्रचंड हाल झाले. उकाड्यामुळे रुग्णांना वॉर्डमधून बाहेर काढावे लागले. पर्यायी जनरेटरची व्यवस्था न झाल्याने सर्व वॉर्डांत गोंधळ उडाला. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत जनरेटर दुरुस्तीचे काम सायंकाळी साडेपाच वाजता पूर्ण झाले. दरम्यान महावितरणचा वीजपुरवठा दुपारी दोन वाजता सुरळीत झाल्याने रुग्णांचा जीव भांड्यात पडला. रुग्णालयातील डॉक्टरासंह इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि इतर सुविधांचा उडालेला बोजवारा याकडे नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

नवजात शिशुंच्या जीवाशी खेळ

जनरेटर नादुरुस्त झाल्याने रुग्णालयातील वीजपुरवठा बंद झाला. नवजात शिशु कक्षात सर्वात जास्त अडचण निर्माण झाली. या कक्षातील सर्व इन्क्युबेटरची वॉर्मर यंत्रण बंद झाल्याने या विभागात दाखल सर्व नवजात शिशुंवर उकाड्याने अक्षरशः तडफडण्याची वेळ आली. पालक आणि उपस्थित परिचारिकांची ही बाब लक्षात आल्यावर या कक्षात गोंधळ उडाला. त्यानंतर या नवजात शिशुंना तात्काळ इन्क्युबेटरमधून काही काळासाठी बाहेर काढण्यात आले. एवढ्या मोठ्या रुग्णालयात अशा आपत्कालीन संकटात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणारी यंत्रणा नसल्याने नवजात शिशूंसह अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याचे यातून उघड झाले.

सकाळी साडेदहा वाजता बिटकोतील ऑटो जनरेटर सुरू झाल्यावर त्याच्या बॅटरी आणि चार्जरचा स्फोट झाला. जनरेटर नादुरुस्त झाला. इलेक्ट्रिशियनच्या म्हणण्यानुसार हा स्फोट अतिउष्णतेमुळे झाला. त्यानंतर महापालिकेच्या वीज विभागाशी तात्काळ संपर्क साधून त्यांच्यामार्फत जनरेटर दुरुस्त करून घेण्यात आले.

- डॉ. नितीन रावते,

वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकविता

0
0

झिप झॅप झूम - बालकविता

- -

\Bकाजवा

\B

- शोभा बडवे, नाशिक

- -

रात्रीच्या अंधारात

खोलीत माझ्या काजवा

म्हणे माझ्या प्रकाशाने

अंधाराला सजवा

अंधारात प्रकाशाचा

थेंब उडू लागे

झोपेला विसरुन

डोळे टक्क जाणे

लुकलुकता प्रकाशथेंब

कधी दिसे.. नसे

उडता उडता खिडकीच्या

पडद्यावर बसे

मी म्हटले त्याला

तसाच बस रात्रभर

तिथेच झोप काढ

अन् मला सोबत कर

पण बेट्या चक्क

बाहेर गेला उडून

खोली माझी गेली

अंधारात बुडून

थंडी असून मी खिडकी

तशीच उघडी ठेवली

म्हटले असू दे कदाचित

जर स्वारी परत आली.

- - - - - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यप्रयोग केवळ शहरांपुरता मर्यादित नसावाः भावे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाट्यप्रयोग केवळ मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांपुरताच मर्यादित नसावा. राज्याच्या अन्य भागांतील रसिकांनाही नाटकाची भूक आहे. त्यांना नाट्य मनोरंजनाच्या दुष्काळाचा सामना करावा लागू नये, याकरिता 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे प्रयोग राज्यभर करण्याचा निर्धार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. पावसाळ्यात शहरी भागात या नाटकाचे प्रयोग करणार असून, गणेशोत्सवानंतर राज्यात सर्वदूर या नाटकाचे प्रयोग होणार असल्याचे भावे यांनी सांगितले.

प्रा. वसंत कानेटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्मृतिरंग सोहळ्याच्या प्रारंभानिमित्त भावे नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी आणि अभिनेता उमेश जगताप यांनी पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, की कानेटकर यांनी 'अश्रूंची झाली फुले', 'लेकुरे उदंड जाहली', 'बेइमान' यांसारखी अनेक दर्जेदार नाटके दिली. त्यांची नाटके माणसांवर आधारित होती. माणसांप्रमाणेच नाटकही कधी शिळे होत नाही. 'अश्रूंची झाली फुले' ही अजरामर नाट्यकृती असून, रसिकांना पुन्हा नाटकाकडे आकर्षित करण्यासाठी या नाटकाचे प्रयोग राज्यभर करण्याचे आम्ही ठरविले आहे. आतापर्यंत १० प्रयोग केले असून, प्रत्येक प्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या नाटकाचे किमान ५१ प्रयोग करणार असल्याचे भावे यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवानंतर विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आम्ही दौरे करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात या नाटकाचा किमान एक तरी प्रयोग केला जाईल. याशिवाय परदेशात जेथे मराठी बांधवांची संख्या अधिक आहे, तेथेही या नाटकाचा प्रयोग करण्याचा मानस भावे यांनी व्यक्त केला. चिपळूण हे काशिनाथ घाणेकरांचे गाव असून, ते मुक्त अभिनेते होते. त्यामुळे येथे हा प्रयोग साजरा व्हायला हवा, असा आमचा मानस आहे. तीन ते चार हजार रसिक बसतील एवढा मंडप टाकून 'अश्रूंची झाली फुले'चा प्रयोग करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सवलतींसाठी सरकारकडे पाठपुरावा करू

नाटकाचे अर्थकारण मोठे आहे. नाटकाचा प्रयोग करणाऱ्यांना टोलनाका, डिझेल, नाट्यगृहाचे भाडे, कलावंताचा मुक्काम, जेवणासह अनेक बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. तुलनेने तेवढे पैसे त्यातून मिळतातच असे नाही. नाटक करण्यासाठी आम्हाला सरकारकडून मोफत काहीच नको; परंतु सवलती मात्र मिळायला हव्यात, अशी अपेक्षा भावे यांनी व्यक्त केली. नाटकाच्या वाहनाला टोल माफ करावा, कलावंतांना रेल्वे तिकिटामध्ये सवलत मिळावी, सरकारी विश्रामगृह कलावंतांना उपलब्ध करून दिले तरी त्यामधून बराचसा खर्च वाचू शकेल. असे झाले तर ठिकठिकाणी नाटकाचे प्रयोग करणे, काही दर्जेदार नाटकं रसिकांपर्यंत घेऊन जाणे परवडेल. यासाठी आम्ही सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत, असे भावे यांनी सांगितले. नाट्यगृह चांगले आणि सुस्थितीत ठेवणे ही केवळ महापालिका, नगरपालिकांची जबाबदारी नाही, तर ती कलावंतांचीदेखील तेवढीच जबाबदारी आहे. हौशी कलावंतांना ताशी १०० रुपये भाडे घेऊन तालमीसाठी नाट्यगृह दिले तर त्यातून काय बिघडणार आहे, असा सवाल भावे यांनी उपस्थित केला.

शरद पवारांची भूमिका साकारायला आवडेल

भावे यांनी यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका साकारल्या आहेत. कोणाची भूमिका साकारायला आवडेल, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. शरद पवार हे राजकारणातील अत्यंत अनुभवी असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या मनात काय चालले हे ते कधी कुणाला कळू देत नाहीत. त्यांची भूमिका करायला आवडेल, असे भावे म्हणाले. लोक घरात बसून सोशल मीडियाद्वारे देशाच्या राजकारणावर वाट्टेल तशा कमेंट देतात. यावरून आपल्या डोक्यात आणि मनात किती घाण आणि कचरा साचला आहे, हे लक्षात येत असल्याची टीका भावे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images