Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नंदिनीची अस्वच्छतेने कोंडी

$
0
0

पाहणी दौऱ्यातील फोटोंसह आयुक्तांकडे तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी आणि तिच्या उपनद्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या 'नाशिकची आई गोदामाई' या सामाजिक संस्थेने नंदिनी नदीची नुकतीच पाहणी केली. यात ठिकठिकाणी आढळलेली अस्वच्छता, दुर्गंधीयुक्त नाल्याचे पाणी व साचलेला कचरा याची त्यांनी महसूल आयुक्तांकडे फोटोसह तक्रार केली. गोदावरी नदी प्रदूषण याचिकेत उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत करण्यात आलेल्या समितीचे आयुक्त हेच अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे करण्यात आलेल्या या तक्रारीत विशेष महत्त्व आहे.

'नाशिकची आई गोदामाई' सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत गाव, शिवार आणि शहर भागात या नदीची स्थिती पूर्ण वेगळी आहे. गाव शिवारात नंदिनीचे पाणी निर्मळ आहे. मात्र, शहरात याच नदीचे पाणी दुर्गंधीयुक्त होते. या नदीवर व तिला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यांवर संरक्षक जाळी बसावावी, अशी मागणीही या संस्थेने अनेकदा केलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पाहणीत काय आढळले?

संस्थेने पिंपळगाव बहुला गावापासून ते काठे गल्लीजवळील इस्कॉन मंदिरापर्यंत पाहणी केली. पाहणी दौऱ्यामध्ये पिंपळगाव बहुलाचे पाणी आणि नदीकाठी संपूर्ण स्वच्छता पाहण्यास मिळाला. तसेच पपय्या नर्सरीच्या पूलाच्या दोन्ही बाजूला कचरा आढळला. तर सातपूर गावात स्मशानभूमीच्या अलिकडे असलेल्या स्वच्छतागृह आणि तिथून निघालेले गटारीचे दुर्गंधी मलमूत्रयुक्त पाणी नंदिनीमध्ये थेट मिसळले जाते. उंटवाडीतील सिटी सेंटर मॉलमागील बाजूस अशीच परिस्थिती आहे. जळालेला कचरा, वाळू उपसा आढळून आला आहे. किनारा हॉटेलपासून ते इस्कॉन मंदिरापर्यंत नदीपात्राजवळ कचरा आढळून आला.

... अशी असावी नदी

नंदिनी नदी स्वच्छ निर्मळ आणि बारामाही वाहत रहावी, नदी परिसर स्वछ असावा, नदी काठी मोकळ्या जागी झाडे असायला हवे, नदी ही वाहती असावी, अशी आमची मागणी आहे. ती पूर्ण करावी आणि सर्व संबंधितांना आदेश द्यावे, असे संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने गोदावरी व तिच्या उपनद्यांवर प्रदूषणासंबंधी जे आढळेल त्याची विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही पाहणी करून ही तक्रार केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा तक्रारी कराव्या. त्यामुळे या नद्यांचे प्रदूषण थांबवता येईल.

- राजेश पंडित, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अशोका ग्लोबल अकॅडमीला ब्रिटीश कौन्सिलचा ‘आयएसए’ पुरस्कार

$
0
0

अशोका ग्लोबलला 'आयएसए' पुरस्कार

ब्रिटीश कौन्सिलतर्फे गौरव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोका ग्रुप ऑफ स्कूल संचलित अशोका ग्लोबल अॅकॅडमीला ब्रिटीश कौन्सिलचा सन २०१८-१९साठी प्रतिष्ठेचा असलेला 'इंटरनॅशनल स्कूल पुरस्कार' (आयएसए) जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशा शैक्षणिक व्यवस्थांची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

विद्यार्थ्यांमधील आंतरराष्ट्रीय मानसिकता विकसन घडविण्याच्या शाळांच्या दृष्टिकोनाचे मूल्यमापन या पुरस्काराच्या मानकांतर्गत करण्यात येते. अशा शाळांमधील विद्यार्थी जगभरातील विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू शकण्याची पात्रता राखू शकतो, हा त्यामागील उद्देश आहे. पुरस्कार प्रक्रियेमध्ये सहभागी शाळांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील प्रकल्पांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रवृत्त करणे अपेक्षित असते.

या प्रकल्पांअंतर्गत अमेरिका, रशिया, इटली यांसारख्या देशांचे सहकार्य घेऊन ज्ञानाभिमुख देवाणघेवाणे, सामाजिक, सांस्कृतिक आदानप्रदान, मानसिक व आध्यात्मिक विकास, सामाजिक उत्तरदायित्व आदी विषयांना स्पर्श करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेला भेट देऊन स्मार्ट सिटीचा अभ्यास केला. नाशिक ही स्मार्ट सिटी कशी होऊ शकते, यावर प्रकल्प सादरीकरण केले. तसेच जल संवर्धनासारख्या प्रकल्प सादरीकरणातून शेतीला लागणाऱ्या पाणी वापरात कपात करता येईल, हे समोर आणले. उर्जा बचतीवरील प्रकल्पातून उर्जाबचत जगभरात किती फायदेशीर ठरू शकते, त्याद्वारे उर्जा पुनर्निमाणाला कसे प्रोत्साहन देता येईल, याची माहिती देण्यात आली. असा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले. या सर्वांची दखल घेऊन हा पुरस्कार प्राप्त झाला असून अशोका ग्लोबल अॅकॅडमीच्या शिरपेचात मानाचा आणखी तुरा खोवला गेल्याचे मत शाळेकडून व्यक्त केले जात आहे.

- -

हा पुरस्कार केवळ अशोका समूहापुरता मर्यादित न राहता त्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्वरुप प्रतिबिंबित होते. तो दिवस फार दूर नाही, ज्यादिवशी नाशिक शैक्षणिक क्षेत्रात जगाच्या नकाशावर चमकलेले असेल.

श्रीकांत शुक्ला, सहसचिव, अशोका ग्रुप ऑफ स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निखिलच्या स्वप्नांना खीळ!

$
0
0

जीवघेण्या हल्ल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेच्या सहभागाला मुकणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय रोईंगपटू निखिल भाऊसाहेब सोनवणे याच्यावर मंगळवारी (दि. १४) रात्री अज्ञात तीन हल्लोखोरांनी चोपडा लॉन्सजवळील पेट्रोल पंपासमोर प्राणघातक हल्ला केला. यानंतर तिघे हल्लेखोर फरार झाले तर जखमी निखिल याला खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. येत्या १७ मेपासून होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तो सहभागी होणार होता. हीच स्पर्धा त्याला राष्ट्रीय स्पर्धेत घेऊन जाणार होती. त्याच्या स्वप्नांना खीळ काहीसे लांबणीवर पडले आहे.

पंचवटी, क्रांतिनगरमधील बाफना चाळीत राहणारा निखिल हा लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा खेळाडू आहे. तो एम. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तो रोईंग खेळाचा सराव देखील करतो. यासाठी रोज सकाळी व सायंकाळी आसाराम बापू पुलाजवळील वॉटर एज स्पोर्ट्स क्लबवर जात असतो. सराव करून मंगळवारी रात्री घरी परतत असताना निखिलवर पेट्रोल पंपाजवळ तीन चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने अडवून मारहाण केली. यात त्याच्या हाताला खोलवर जखम झाली आहे. पुण्यातील आर्मी बोटींग क्लब येथे १७ ते १९ मे दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरी रोईंग स्पर्धेत निखिल सहभागी होणार होता. त्या स्पर्धेचीच तो तयारी करीत होता. मात्र, आता झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तो स्पर्धेला मुकणार आहे. स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी नवीन वर्षी संधी, तसेच सरावात खंड यामुळे राष्ट्रीय पातळीवर चमक दाखविण्याच्या निखिलच्या स्वप्नांना आता खीळ बसली आहे. निखिलने यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलेले आहे.

निखिल हा चार खेळाडूंच्या संघात सहभागी होता. आता तो खेळू शकणार नसल्याने त्याच्यासह उर्वरित तीन खेळाडूंचेही नुकसान झाले आहे. सामान्य कुटुंबातील निखिलवर घरातील व्यक्तींचीही जबाबदारी आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी.

- अंबादास तांबे, निखिलचे प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनात गुरूचा प्रभाव असतोच

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

लोगो - सोशल कनेक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिष्य आणि गुरू हे अतूट नाते आहे. जीवनात साधना, आराधना आणि अध्यात्मासह गुरू असणेदेखील गरजेचे आहे. जीवनात योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य गुरू करतात. मानव कितीही नाही म्हटला, तरी प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचा प्रभाव असतोच. यातूनच जीवनात आनंद, यश आणि मोक्ष मिळतो, असे निरुपण हरिद्वार येथील आचार्य हरिकृष्ण महाराज यांनी केले.

'नाशिक सेवा समिती ट्रस्ट'च्या वतीने 'प्रेम रसमयी श्रीमद्भागवत कथा सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याचे अखेरचे पुष्प बुधवारी गुंफण्यात आले. श्री कृष्णांच्या कथा प्रवचनात सांगण्यात आल्या. हरिकृष्ण महाराज म्हणाले की, महाभारतातील अर्जुनाचा विजय झाला. त्यात श्री कृष्णांचे श्रेय आहे. गुरू आणि शिष्य हे नाते शुद्ध असून त्याचा आदर प्रत्येकाने राखायला हवा. प्रत्येकाने आपल्याजवळचे ज्ञानाचे भांडार उघडणे आवश्यक आहे. आपले ज्ञान इतरांच्या उपयोगात येईल, ही मानसिकता निर्माण व्हायला हवी. मात्र, बदलत्या काळानुसार विचारधाराही बदलत आहे. त्यामुळे नव्याने काही विचार पुनर्प्रस्थापित करावे लागणार आहे. अध्यात्म, संस्कृती आणि संस्काराच्या प्रवाहात प्रत्येकाला जगणे शिकविणे, आजची गरज बनली आहे. सभोवताली घडणारी प्रत्येक गोष्ट चांगली आहे, असा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बहुतांश वेळा सत्कृत्य करणाऱ्या व्यक्तींबाबत आणि घटनेवर संशय घेतला जातो, ही विचित्र मानसिकता थांबायला हवी, असे ते म्हणाले. भागवत कथांचे श्रवण आणि कीर्तनात भाविक दंग असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: डबे मागे सोडून मालगाडीचे इंजिन पुढे धावले!

$
0
0

नाशिक: नाशिकमध्ये आज दुपारी मोठी दुर्घटना होताना टळली आहे. कपलिंग तुटल्याने मालगाडीचे इंजिन १४ डबे सोडून पुढे धावले. सुदैवाने मालगाडीचे डबे रुळावरून खाली आले नाहीत. नाही तर मोठा अनर्थ घडला असता असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

आज दुपारी मनमाड-नांदगाव दरम्यान ही घटना घडली. या मार्गावरून जात असलेल्या मालगाडीचे कपलिंग तुटल्याने इंजिन सहा डबे पुढे गेले. त्यामुळे मालगाडीचे १४ डबे मागेच राहिले. सुदैवाने मालगाडीचा वेग कमी होता आणि मालगाडी रुळावरून खाली घसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेचं वृत्त कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालगाडी धावे पुढे, डबे राही मागे!

$
0
0

कपलिंग तुटल्याने पानेवाडीजवळील घटना

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाडजवळील पानेवाडी येथील प्रकल्पातून इंधन भरून भुसावळकडे जात असलेल्या धावत्या मालगाडीची कपलिंग तुटून काही डबे इंजिनसोबत पुढे, तर काही डबे मागेच राहिले. पानेवाडी ते नांदगावदरम्यान गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. मालगाडीचा वेग कमी असल्याने भीषण अपघात टळला. तसेच या डब्यात इंधन असूनही कोणताही अनर्थ घडला नाही. दरम्यान, रेल्वे तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडीचे कपलिंग जोडून दिले. त्यानंतर गाडी भुसावळकडे मार्गस्थ झाली.

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पानेवाडी येथील पेट्रोल प्रकल्पातून इंधन भरलेले तब्बल ५२ टँकर घेऊन भुसावळकडे निघालेल्या मालगाडीच्या १४ व्या डब्याजवळ दोन डब्यांचे कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनदरम्यान अचानक तुटले आणि ते लोहमार्गावर पडले. त्यामुळे मालगाडीचे काही डबे इंजिनसोबत पुढे गेले, तर जवळपास ३८ डबे मागेच राहिले. गाडीचा वेग कमी असल्याने कपलिंगपासून तुटलेला डब्यांचा मोठा लोड मागे राहिला व जागीच थांबला. हा प्रकार लक्षात येताच इंजिनचालकाने गाडी तातडीने थांबवली. रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कपलिंग जोडले. त्यानंतर मालगाडी भुसावळकडे मार्गस्थ झाली.

कमी वेगामुळे टळला अनर्थ

पेट्रोल भरलेले ५२ टँकर घेऊन ही मालगाडी भुसावळकडे डाऊन ट्रॅकवरून निघाली होती. धावत्या रेल्वेचे कपलिंग तुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकली असती. गाडीचा वेग जास्त असता तर हे डबे लोहमार्गावरून घसरून पुढे जाणाऱ्या एखाद्या गाडीवर आदळले असते. त्यात इंधनामुळे आणखी गंभीर समस्या निर्माण झाली असती. मात्र, कोणतीही आपत्ती न कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. धावत्या गाडीची अचानक कपलिंग तुटणे हा तांत्रिक दोष असून, असे प्रकार घडू शकतात, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वास्तू अन् आयुर्वेदवर कार्यशाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे वास्तू आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून आरोग्य आणि लाभ याविषयावर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सारडा संकुल येथील राठी सभागृहात २४ मे रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यशाळेत चार वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई येथील वास्तुशास्त्र तज्ज्ञ देवराम बोरसे हे समृद्धी, प्रगती आणि आरोग्य मिळविण्यासाठी वास्तुचा उपयोग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. नाशिक येथील डॉ. मयूर सुराणा हे पंचमहाभूत, वास्तू आणि यशस्वी जीवनासाठी फिजिओ, सायको, आत्मिक हेल्थचा प्रसार या विषयावर बोलणार आहेत. वास्तू सल्लागार, रेकी हिलिंग तज्ज्ञ निशा दत्ता या घर, ऑफिस, कारखाना, उद्योग याठिकाणी समृद्धी, संपत्ती आणि प्रगतीसाठी कुठल्याप्रकारच्या वास्तू प्लांट्सचा (वास्तूमध्ये कुठली झाडे असावीत) वापर करावा या विषयावर तर गुरुजी अभिजित पैठणे हे अग्निहोत्र, आपले जीवन आणि भाग्य सुधारण्यासाठी (अग्नी तत्त्व) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा हे उपस्थित राहणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून, नावनोंदणीसाठी महाराष्ट्र चेंबरच्या ०२५३-२५७७७०४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, एचआर व सीएसआर समितीचे चेअरमन श्रीधर व्यवहारे, सचिव चंद्रकांत दीक्षित, विनी दत्ता यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन साहित्य विकणाऱ्या कंपनीला १० लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन साहित्य विक्री करणाऱ्या पेखम सिस्टिम लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड या कंपनीला कार्यलयातील व्यवस्थापक, पर्यवेक्षक आणि डिलिव्हरी बॉय यांनी संगनमत करुन १० लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. या तिघा संशयितांवर मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरियाणा राज्यातील गुडगाव येथे असलेल्या पेखम सिस्टिम लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीचे नाशिक-पुणे रोडवर नाशिक क्लब हॉटेलसमोर गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. या कंपनीच्या माध्यमातून मिंत्रा डॉट कॉम या कंपनीकडील विविध प्रकारच्या वस्तुंची ऑनलाइन विक्री होत असते. पेखम कंपनीच्या नाशिक येथील कार्यालयात निखिल राजाराम आहेर हा व्यवस्थापक, विशाल रामदास माळेकर हा पर्यवेक्षक तर अक्षय राजाराम आहेर हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होते. या तिघांनी मिळून फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत अनेक ग्राहकांना विवीध प्रकारच्या वस्तुंची विक्री केली. मात्र, या माध्यमातून आलेले १ लाख ७३ हजार ३४० रुपये कंपनीला दिले नाही. तसेच ऑफलाइन उत्पादने विकून आलेले सवलतीचे ३ लाख ९८ हजार १९७ रुपये दिले नाही. ७ लाख ९६ हजार ३९४ रुपये असे एकूण ९ लाख ६९ हजार ७३४ रुपयांची फसवणूक केली आहे. पैसे दिल्याच्या खोट्या नोंदी करून या पैशाचा हिशेब ठेवला नाही. ही बाब कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वारंवार या तिघांकडे पैशाची मागणी केली; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संभाजी महाराजांनी केला साम्राज्यविस्तार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, शौर्य व पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला, असे प्रतिपादन प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी केले. हुतात्मा स्मारक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. मुठाळ बोलत होते. महाराज लहानपणापासूनच चातुर्यवान व खेळात पटाईत होते. आपल्या कारकिर्दीत सर्व लढाया त्यांनी जिंकल्याचा विक्रम केला, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध प्रकारच्या भाषा, युद्धकला, चातुर्य, अफाट ताकद व धर्मनिष्ठा यात संभाजी महाराज कसे निष्णात होते, याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी निशिकांत पगारे, संतोष इंगळे, सुरेश भोर, राजेंद्र भांड, प्रकाश बेळे, चंद्रकिरण सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपवर जागा राखण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील तौलनिक संख्याबळ कायम राखण्यासाठी भाजपने आता प्रयत्न सुरू केले असून, प्रभाग क्र.१० ची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रभागातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी प्रयत्न सुरू केले असून, उमेदवाराच्या चाचपणीसाठी गुरूवारी सातपूरमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. या निवडणुकीत सुदाम नागरे यांच्या कुटुबांतील व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रभाग क्र.१३ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवाराविरोधात भाजपने उमेदवार दिल्याने विरोधक या निवडणुकीत मनसे उमेदवार देतात काय याकडे लक्ष लागून आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० ड मधील जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. नागरे यांच्या निधनामुळे भाजपचे संख्याबळ ६६ वरून ६५ झाले होते. त्यामुळे स्थायीमधील भाजपचे बहुमत धोक्यात आले आहे. स्थायीच्या एका जागेवर शिवसेनेने तौलनिक संख्याबळाचा आधार देत दावा केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक घेण्यासंदर्भात उशीर झाल्याचा फटकाही भाजपला बसला आहे. परंतु, उशीरा का होईना आयोगाने या ठिकाणचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.

पोटनिवडणुकीत भाजपने ही जागा गमावली तर, त्याचा थेट परिणाम स्थायीमधील बहुमतावर होणार आहे. त्यामुळे भाजपसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. प्रभाग क्र.१३ मध्ये मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनानंतर तेथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेने प्रयत्न केले होते. परंतु, या ठिकाणी भाजपसह शिवसेनेने उमेदवार दिला होता. त्यामुळे प्रभाग क्र.१० पोटनिवडणूक बिनविरोध करणे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे. भाजपने ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी या प्रभागातील नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. भाजपने प्रभाग क्र.१० मध्ये बैठक घेवून निवडणुकीची चाचपणी केली आहे. दिनकर पाटील यांच्यावर या पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून, सातपूरमधील अन्य पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि काँग्रेस याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

प्रारुप याद्या आजपासून

रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर १७ मे पासून प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्याचे काम सुरू होणार आहे. आजपासून प्रारुप याद्या अधिकृतपणे जाहीर केल्या जाणार असून, त्यावर हरकती व सुनावणीची प्रक्रिया पुढील १० दिवस राबविली जाणार आहे. त्यानंतर २७ मे रोजी अंतिम मतदार यादी तर २८ मे रोजी मतदान केंद्रांची यादी जाहीर केली जाणार आहे. पोटनिवडणुकीच्या तारखेचीही लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत टॉवर हटवला

$
0
0

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने मिळकतींवरील कारवाईसोबतच आता आपला मोर्चा अनधिकृत मोबाइल टॉवर्सकडे वळवला आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरूवारी वासननगर येथील एका इमारतीवरील रिलायन्स कंपनीचा अनधिकृत मोबाइल टॉवरचे अतिक्रमण काढले. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. याचबरोबरच शहरातील इतर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.

महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मोबाइल टॉवर्स आहेत. या टॉवर्सबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेकडे प्रलंबित आहेत. मुंबई-आग्रा महामार्ग परिसरातील वासननगर येथील एका इमारतीवर रिलायन्स कंपनीचा अनधिकृत टॉवर होता. गेल्या अनेक दिवसांपासून टॉवर असल्याने परिसरातील नागरिकांना या टॉवरमुळे आरोग्यासह जीवितास धोका असल्याच्या तसेच टॉवरला पालिकेची परवानगी नसल्याच्या तक्रारी नगररचना व अतिक्रमण विभागाकडे केल्या होत्या. अतिक्रमण विभागाने नगररचना विभागाला तपासणीचे आदेश दिले होते. त्यानंतर या तक्रारींची दखल घेऊन अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने या टॉवरचे संपूर्ण अतिक्रमण गुरूवारी काढून टाकले. शहरातील सिडकोसह सातपूर, गंगापूररोड, पंचवटी, नाशिकरोड भागातील इमारतींवर अनेक ठिकाणी अनधिकृत टॉवर असून, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती बहिरम यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशुधनासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती लक्षात घेता गुळवंच येथील चाराछावणीत शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत पशुधन आणावेत. प्रशासनाकडून ते स्वीकारले जातील, या जनावरांची प्रशासन काळजी घेईल, अशा आश्वासन सूचना पालक सचिव सिताराम कुंटे यांनी गुरुवारी दिल्या.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालक सचिव कुंटे हे नाशिक दौऱ्यावर आले होते. सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, गुळवंच, डुबेरे, आशापूर तथा टेंभूवाडी येथे त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी स्थानिक आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, उपजिल्हा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय विसावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गर्जे, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, कृषी विभागाचे अधिकारी जिल्हास्तरीय अधिकारी, तालुकाअधिकारी पशुवैद्यकीय डॉक्टर मिलिंद भणगे, वनपरिक्षेत्र पाल प्रवीण सोनवणे, उपस्थित होते.

जलयुक्त शिवार योजनेसाठी कुंदेवाडी येथील देवनदी बंधाऱ्याची कुंटे यांनी पाहणी केली. चाराछावणीला भेट दिली असता तेथे पशुधनासाठी चाऱ्यासह अन्य सुविधा वाढविल्या जाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे केली. त्यावर गुळवंच येथील चाराछावणीत शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत जनावरे छावणीत आणावीत, अशी सूचना पालक सचिवांनी दिल्या. या छावणीत आतापर्यंतत १०० जनावरे दाखल झाल्याचे प्रशासनाने सांगितले. डुबेर येथे शेतबांधावर जाऊन कुंटे यांनी फळबागांची पाहणी केली तसेच फळबागांची माहिती घेत शेतकऱ्यांची संवाद साधला.

पिकअपने सवारी

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या आशापुर गावालाही कुंटे यांनी आपल्या दौऱ्यात भेट दिली. यावेळी बंधाऱ्यापासून सुमारे दोन किलोमीटरवर आपल्या दौऱ्यातील वाहनांचा ताफा लांब ठेवत पालक सचिव स्वतः पिकअप व्हॅनमध्ये पुढे बसले. कामाच्या ठिकाणी जाऊन तेथील जलयुक्त शिवाराची कामे, बंधाऱ्यातील खोलीकरण गाळ उपसा याची त्यांनी पाहणी केली. श्रमदानात भाग घेतलेल्या जलरागिनीचे व जलवीरांचे त्यांनी कौतुक केले. तसेच पाणी फाउंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना शरम वाटत नाही!

$
0
0

दुष्काळी उपाययोजनांबाबत बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सध्या १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयावह दुष्काळाचा सामना करत असतांना सरकार आचारसंहितेचा बाऊ करीत आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याला दिलासा देणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे जिल्हा बँका शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करत आहेत. तरीही मुख्यमंत्र्याना शरम वाटत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी केली.

राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने विभागवार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमार्फत राज्यभर पाहणी दौरे केले जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी दौऱ्याची जबाबदारी थोरात यांच्याकडे असून थोरात यांनी गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी भागांमधील उपाययोजनांची पाहणी केली. त्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या थोरात यांनी काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी संवाद साधत दुष्काळाबाबत सरकारच्या अनास्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पक्षनिरीक्षक विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार निर्मला गावित, आमदार डॉ. सुधीर तांबे याच्यासह विविध सेलचे प्रमुख उपस्थित होते. १९७२ सालचा दुष्काळ फक्त अन्नधान्यापुरता मर्यादित होता. परंतु, यंदाचा दुष्काळ भीषण असून राज्यभरात जनावरांसाठी चाऱ्याच्या अनुपलब्धतेबरोबरच पाण्याची समस्याही भीषण बनली आहे. राज्यभर बिकट पाणीटंचाई असताना पुरेसे टँकर पाठविले जात नाही. जेवढे टँकर मागितले जातात, तेवढेही सरकारकडून पुरेसे दिले जात नाहीत, असा आरोप थोरात यांनी केला. ग्रामीण भागात पुरवले जाणार निम्मे टँकर गळके आहेत. तरीही सरकारचे त्याकडे लक्ष नाही, असेही थोरात म्हणाले.

भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मंजुरांना कामही उपलब्ध करून दिले जात आहे. सरसकट कर्जमाफी, बँकाकडील कर्जांचे पुनर्गठण गरजेचे असताना सरकारतर्फे कोणतीच तरतूद करण्यात येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या तीन महिन्यात ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप थोरात यांनी केला.

विखेंबाबत 'नो कॉमेंट्स'

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याबाबत थोरातांनी यावेळी चुप्पी साधली. विखेंच्या प्रश्नांवर आपण येत्या २३ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही, असे सांगत त्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. विरोधी पक्षनेते पद स्वीकारणार काय, याबाबत विचारले असता, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसमधील वादाबाबत विचारले असता, सध्या आपण पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगत प्रतिक्रिया देणेही टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदलेले रस्ते दुरुस्त होणार कधी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात मोबाइल केबलसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदलेले आहेत. ते बुजवून डांबरीकरण कधी होणार हा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

नाशिकरोडला अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. सैलानीबाबा चौकात केबलसाठी रस्ता खोदला होता. तो काही दिवस तसाच होता. चार दिवसांपूर्वी पेव्हरब्लाक टाकून तो बुजवला असला तरी वाहनांना हादरे बसतात. असाच केबलचा खड्डा जेलरोडच्या राजराजेश्वरी चौकापुढील भगवती मंगल कार्यालय येथे खोदण्यात आला आहे. मोटवानीरोडवरही केबलसाठी रस्ता खोदलेला आहे. उपनगर, नाशिकरोड येथे अनेक ठिकाणी केबलसाठी रस्ता फोडण्यात आलेला आहे. मात्र, त्यांची दुरुस्ती केलेली नाही.

जेलरोडच्या सैलानीबाबा चौकाजवळील सचिन फर्निचर समोर काही महिन्यांपूर्वी रस्ता खोदण्यात आला होता. अनेक दिवस वाहनचालकांनी त्रास सहन केला. शेवटी रस्ता डांबर टाकून दुरुस्त करण्यात आला. मात्र, एवढे डांबर टाकण्यात आले आहे की, या खड्ड्याचा गतीरोधक तयार झाला आहे. वाहने जोरात आदळतात. त्यांचे नुकसान होतेच परंतु, वाहनचालकाच्या पाठीला व मानेला हादरे बसतात. शहरातही अशाच प्रकारे खड्डे खोदण्यात आले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणी वालीच नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांचेही नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोईंगपटू हल्ला प्रकरण; दुसरा संशयित अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका संशयिताला गुरुवारी अटक केली. विशेष म्हणजे, तो अल्पवयीन असल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी कसून केलेल्या तपासात तो अल्पवयीन नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याला शुक्रवारी (दि. १७)न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बुधवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास घरी जात असताना निखिल सोनवणे याच्यावर तीन संशयितांनी प्राणघातक हल्ला केला. यातील एक संशयित दीपक डगळे याला न्यायालयाने २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, अन्य एक संशयित अल्पवयीन असल्याने त्यास रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे. मात्र, आपण अल्पवयीन असल्याचे सांगणाऱ्या सचिन कानकाटे याचा भांडाफोड झाला आहे. तो अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याला आता शुक्रवारी न्यायलयात हजर केले जाणार आहे. अधिक चौकशीसाठी त्याची पोलिस कोठडी न्यायालयाकडे मागण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, जखमी निखिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला एकूण सात टाके पडले आहेत. त्याची प्रकृती आता ठीक असली तरी शुक्रवारी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तो सहभागी होऊ शकणार नसल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात

$
0
0

\Bकार्याध्यक्षपदी काकड,

उपाध्यक्षपदी सानप

\Bनाशिक : वंजारी सेवा संघाची बैठक नुकतीच झाली. बैठकीमध्ये पिंपळगाव बहुला येथील सरपंच पांडुरंग काकड यांची वंजारी सेवा संघाच्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी, तर अनिल सानप यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अनिल फड, विभागीय उपाध्यक्ष के. के. सानप, शहराध्यक्ष एकनाथ चकोर, विभागीय महिला अध्यक्षा मंदा फड, महिला शहराध्यक्षा शालिनी सांगळे, युवा शहराध्यक्ष समाधान सांगळे आदी उपस्थित होते. जिल्हा व शहर कार्यकारिणी नियुक्त करणे, तसेच पुढील कार्यक्रमांसंदर्भात या वेळी चर्चा करण्यात आली.

\Bजूनमध्ये आरोग्य शिबिर

\Bनाशिक : डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १ जून ते १५ जूनदरम्यान मोफत आरोग्य तपासणी पंधरवडा शिबिर होणार आहे. शिबिरात ३१ मेपर्यंत सकाळी ९ ते ५ या वेळेत रुग्णालयात पूर्वतपासणी व नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

\Bम्हसोबा यात्रा महोत्सव\B

नाशिक : केवडीबन श्री म्हसोबा महाराज देवस्थान यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. म्हसोबा महाराज देवस्थान, पंचवटी कॉलेजमागे, पंचवटी येथे रविवारी (१९ मे) सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हा महोत्सव होईल. सकाळी ५.३० ते ९ वाजेदरम्यान महापूजा, १० ते ११ मिरवणूक व ध्वज स्थापना, दुपारी ११ ते सायंकाळी ६ दशावतारी सोंगे, रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर व सत्कार समारंभ, दुपारी दोनला महाप्रसाद, सायंकाळी साडेसहाला आरती होणार आहे. आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार जयवंत जाधव, नगरसेवक महिंद्र सानप, हेमंत शेट्टी, रुची कुंभारकर, समाधान जाधव उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्याही विकासासाठी हिंसेचा उपाय नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शस्त्रांच्या साहाय्याने मिळवलेले हक्क किंवा स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सतत शस्त्राचाच वापर करावा लागतो. हिंसा हा कोणत्याही विकासासाठी उपाय होऊच शकत नाही, शांततामय सुस्थिर समाज अहिंसात्मक संवादातूनच निर्माण होऊ शकतो. नक्षलवादाला पोलिस हे उत्तर दोन्ही बाजूचं नुकसान करणारेच ठरले आहे, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी केले.

जुने सिडको येथील शिवाजी भाजी मार्केट येथील मैदानात नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार आणि लोकमान्य वाचनालय यांच्यातर्फे आयोजित नवीन नाशिक वसंत व्याख्यानमालाचे तिसरे पुष्प 'नक्षलवाद एक आव्हान' या विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते. कै. गोपाळराव तिदमे-पाटील स्मृती व्याख्यानच्या प्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक शंकर बोऱ्हाडे, सावळीराम तिदमे, वासंती दीक्षित, कवियत्री सुरेखा अशोक बोऱ्हाडे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे देवराम सौंदाणे, नंदकुमार दुसानिस आदी उपस्थित होते.

दीक्षित यांनी स्वतःच्या जीवनातील नक्षलवादीशी झालेल्या संघर्षाचे प्रत्यक्ष अनुभव कथन केले. त्याबाबत त्यांनी सांगितले, की मी नक्षलवादी भागात काही वर्षे काम केले आहे. अन्यायाविरोधात लढणारे, गरिबांना मदत करणारे नक्षलवादी, असा काहीसा समज आहे; पण तो चुकीचा आहे. महाराष्ट्रात नक्षलवादी भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्याकडे पाहिले जाते.

व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी जयराम माळी, राजेंद्र चौधरी, आकाश तोटे, शरद जाखडे, रामदास शिंपी, विजय गोसावी, विनोद जोशी, जनार्दन माळी, केशवराव गवांदे, दिगंबर निकुंभ, सूर्यकांत सोनावणे, विजय सोनार अलका गारसे विनय गुंजाळ यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरला चोरी; ४३ हजार लंपास

$
0
0

निफाड : ओझर येथे भीमगर्जनानगरमध्ये घराचा मागचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश करीत लोखंडी कोठीत ठेवलेल्या सात हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली आहे. बालाजी दगडी मोरे यांच्या घराचा मागचा दरवाजा

मंगळवारी (दि. १४) दुपारी तीन ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान उघडा होता. या काळात अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत चोरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्तपदांचे ओझे कनिष्ठांवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मे महिन्याच्या अखेरीस महापालिकेतून एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त आणि एक सहाय्यक आयुक्त अशा तीन महत्त्वाच्या पदांसह १५ कर्मचारी रिक्त होत आहेत. तर चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या सेवेतून तब्बल १२२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने पालिकेच्या कारभाराचा डोलारा सांभाळायचा कसा असा प्रश्न आयुक्तांसमोर उभा राहिला आहे. शासनाकडून नोकरभरतीला परवागी दिली जात नसल्याने दोन हजार रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी एकतर नोकरभरतीला परवानगी द्या; अन्यथा परसेवेतील अधिकार द्या, अशी विनंती शासनाला केली आहे. त्यामुळे परसेवेतील अधिकारी येण्याची जास्त शक्यता आहे.

महापालिकेचा कारभार हा सध्या प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. सध्यस्थितीत दोन अतिरिक्त आयुक्तांसह तीन उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. महापालिका क वर्गातून ब वर्गात गेली असली तरी, पालिकेचा सुधारित आकृतींबद मंजूर झालेला नाही. क वर्गानुसार पालिकचा आकृतीबंद हा ७०७२ पदांचा होता. परंतु, त्यातून जवळपास दोन हजार अधिकारी व कर्मचारी आता सेवानिवृत्त झाले आहेत. तर ब वर्गानुसार शासनाकडे पालिकेने १४ हजार कर्मचारी व अधिकारी पदाचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवला आहे. ब वर्गानुसार दोन अतिरिक्त आयुक्त व पाच उपायुक्त पदे मंजुर झाली आहेत. शासनाकडे नवीन आकृतीबंध मंजूर केलेला नाही. उलट जुन्या आकृतीबंधानुसार पदे भरण्यासह परवानगी नाकारली आहे.

महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्‍क्‍यांच्या वर गेल्याने रिक्त पदे भरता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. अत्यावशक्‍य पदांमध्ये सफाई कर्मचारी आऊटसोर्सिंगने भरती करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे; तर अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदांसाठी महापालिकेकडून लवकरचं प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, यावर्षी १२२ अधिकारी व कर्मचारी निवृत्त होणार आहे. मे महिन्यात अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ व उपायुक्त (अतिक्रमण) रोहिदास बहिरम, सहाय्यक आयुक्त अशोक वाघ हे तीन बडे अधिकारी सेवा निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या तीन महत्त्वपूर्ण पदांचा पदभार द्यायचा कुणाकडे असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

परसेवेतील अधिकारी द्या

आयुक्तांनी शासनाला पत्र लिहून नोकरभरती मागणी केली आहे. नाहीतर परसेवेतील अधिकारी द्या, अशी विनंती केली आहे. निवृत्ती अधिकाऱ्यांनंतर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे पालिकेचे अधिकारी नसल्याने परसेवेतील अधिकारी येण्याची शक्यता वाढली आहे. परसेवेतील अधिकारी अधिक आल्यास पालिकेत परसेवेतील अधिकारी विरुद्ध महापालिकेचे अधिकारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक महापालिकेतील पदांची स्थिती

गट मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे

अ १३९ ७३ ६६

ब ८३ ४२ ४१

क २१६४ १२७४ ८९०

ड २७०३ १७२७ ९७६

सफाई कर्मचारी १९९३ १८८६ १०७

-------------------------------------------------------------------------

एकूण ७०८२ ५००२ २०८०

-------------------------------------------------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस खत प्रकरणाचे गुढ वाढले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

भेंडाळी (ता.निफाड) येथील मे. सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीजच्या गोडावूनमध्ये आढळून आलेल्या बोगस खताच्या साठ्याप्रकरणी राहुरी येथील मे. एन. के. फर्टीलायझर अॅण्ड केमिकल कंपनीने हात वर केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच कृषि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणात कोणत्याही कृषि अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला जबाबदार न धरता उलट सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भेंडाळी येथे पोटॅश, सुफर फॉस्फेट आणि सिलिकॉन या खतांचा मोठा बोगस साठा आढळून आला होता. या ठिकाणी पोटॅश खताचे उत्पादनही सुरू होते. राहुरीतील मे. एन. के. फर्टीलायझर अॅण्ड केमिकल या कंपनीच्या नावाने या खताचे उत्पादन आणि पॅकिंग करताना सत्यम ॲग्रोच्या मॅनेजर आणि इतरांना कृषि विभागाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले होते. या छाप्यात १५ लाख २१ हजार ९०० रुपयांचा बोगस खताचा साठा आढळून आला होता. राहुरीतील ज्या खताच्या कंपनीच्या नावाने या ठिकाणी उत्पादन आणि पॅकिंग करण्यात आलेले होते त्या मे. एन. के. फर्टीलायझर ॲंड केमिकल या कंपनीने मात्र या प्रकरणाची कंपनीचा काहीएक संबंध नसल्याचे तपासात सांगितल्याचे कृषि अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यामुळे या बोगस खत निर्मितीचे गुढ वाढले आहे.

विभागात वर्षभरात अशा झाल्या केसेस

बोगस बियाणे ६ केस

बोगस खते १०केस

किटकनाशक ८ केस

एकूण २४ केस

पूर्वीच्या ११३ केसेस न्यायालयात प्रलंबित

क्वॉलिटी अॅण्ड कंट्रोल विभागाची ही जबाबदारी असल्याने या विषयावर जास्त भाष्य करता येणार नाही. मात्र खते, बियाणे, किटकनाशके नमुणे तपासणीचे उद्दिष्ट्ये विभागाने साध्य केले होते. त्यात काही केसेसही दाखल करण्यात आल्या होत्या.

-रमेश भताणे, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images