Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बसचे नव्हे, कचऱ्याचे आगार!

$
0
0

फोटो आहेत--इंटर्न बातमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन सीबीएसचे आगार हे बसचे नाही तर कचऱ्याचेच असल्याचे दिसून येत आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेने हा परिसर भरलेला असून, त्याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाचे याकडे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी डासांचाही उपद्रव वाढल्याने परिसरातील विक्रेतेही त्रस्त झाले आहेत.

अस्वच्छता पसरलेली असतानाही महामंडळाकडून येथे कोणत्याही प्रकारची साफसफाई करण्यात येत नाही. महामंडळ प्रशासनास येथील परिस्थितीबद्दल विचारले असता ते स्वच्छता ठेकेदाराकडे बोट दाखवतात. क्रिस्टल या ठेकेदाराला महामंडळाने स्वच्छतेचा ठेका दिला आहे. याअंतर्गत ठेकेदाराला संपूर्ण बसचे आगार स्वच्छ करण्याचे काम दिले असताना या ठेकेदाराकडून फक्त बसचा पार्किंग परिसर आणि प्रवासी जेथे बसतात त्याच ठिकाणची स्वच्छता केली जाते. उर्वरित परिसरात अस्वच्छता पसरली असून, संपूर्ण आगाराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यातच भर म्हणजे येथील शौचालयांची इतकी दुरवस्था झाली आहे, की अनेक लोक येथे शौचास जाण्यास टाळतात. पुरुषांच्या शौचालयाची अवस्था इतकी बिकट आहे, की आतमध्ये एकही पाण्याचा नळ नाही. हात धुण्यासाठी बाहेर यावे लागते. तेथेही फक्त दोनच नळ उपलब्ध आहेत. स्त्रियांच्या शौचालयांची अवस्थाही पुरुषांच्या शौचालयासारखीच आहे. त्यातही या दोन्हीही शौचालयांमधून दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी संपूर्ण आगारात पसरली असून, प्रवाशांना नाकावर रुमाल ठेवूनच येथे बसावे लागत आहे. या दुर्गंधीमुळे प्रवाशांना अनेक आजार जडण्याची शक्यता आहे.

'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे. दिवसभरात साडेचारशे ते पाचशे गाड्या नाशिक सीबीएस येथे येतात. म्हणजे जवळपास तीन ते चार हजार प्रवासी येथून प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासीसंख्या असूनसुद्धा महामंडळ प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रवाशांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शौचालयाची सुविधा मोफत असतानाही पैशांची आकारणी

महिला व लहान मुलांसाठी शौचालयाची सुविधा मोफत असतानाही येथे पैसे आकारले जातात. विशेष म्हणजे महिलांच्या शौचालयाच्या बाहेर लहान मुले व महिलांसाठी मोफत सुविधा असतानासुद्धा या ठिकाणी पैसे आकारले जातात. लघुशंकेसाठीही महिला वर्गाकडून पैसे आकारले जातात. याबद्दल महामंडळाला तक्रार देऊनसुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आलेली नाही.

मी माझ्या लहान मुलीबरोबर शौचास गेली असता मला रोखण्यात आले. आधी पाच रुपये देण्यास सांगण्यात आले. ही सुविधा मोफत आहे असे मी सांगताच त्यांनी फक्त लहान मुलांसाठीच ही सुविधा मोफत असल्याचे सांगितले. पैसे घेऊनसुद्धा येथील शौचालय अतिशय अस्वच्छ आहेत.

- लक्ष्मीबाई पांचाळ, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभिनव संकल्पाचे अनुकरण करावे

$
0
0

ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजांमध्ये लग्नविधीत अनेक रूढी-परंपरा, मानपान यांना फाटा देऊन यातून जमा झालेली रक्कम समाजातील गरजू, गरीब समाजबांधवांसाठी मदत केली तर कन्यादानाचे पुण्य लाभेल, असे प्रतिपादन अभिनेते गोविंद नामदेव यांनी केले.

जुना आडगाव नाका येथील लंडन पॅलेसमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील निकुंभ यांच्या कन्येच्या विवाहाप्रसंगी नवदाम्पत्यास आशीर्वाद देताना गोविंद नामदेव म्हणाले, की समाजात सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून, समाजबांधवांनी याचे अनुकरण करावे. या वेळी सपत्निक नामदेव यांच्या हस्ते उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. निमंत्रणपत्रिकेत जाहीर केल्याप्रमाणे भेटवस्तू, पुष्पगुच्छ न घेता रोख रक्कम विवाहस्थळी ठेवण्यात आलेल्या सत्पात्री हुंडीत जमा करण्यात आली. त्याचा सन्मान करून वधू-वरांसह पालकांनीही आर्थिक योगदान दिले. या निधीचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी केला जाणार आहे. श्याम निकुंभ यांनी स्वागत केले. अशोक निकुंभ व प्रवीण निकुंभ यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या अहवालावर दुष्काळाशी सामना

$
0
0

पाच वर्षांपासून भूजल मूल्यांकन नाहीच; परिपूर्ण नियोजनाचा अभाव

Gautam.Sancheti@timesgroup.com

Tweet : @sanchetigMt

नाशिक : केंद्रीय भूजल मंडळाच्या जुन्यात भूजल मूल्यांकन अहवालावर पाण्याचे नियोजन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशभरातील पाण्याची स्थिती सांगणारा हा अहवाल असल्याने त्यावर योजना आखणे सोपे जाते. पण, नवा अहवाल नसल्याने जुन्याच अहवालाचा आधार घेतला जात आहे. दर तीन वर्षांनी प्रसिद्ध होणार हा अहवाल २०१३ नंतर तयार करण्यात आलेलाच नाही.

देशभरातील पाण्याचे ऑडिट करण्यासाठी १९७० मध्ये केंद्रीय भूजल मंडळाच्या स्थापना करण्यात आली. हे मंडळ देशभरात पाऊस किती पडतो, पाणी किती वाहून जाते, जमिनीत पाणी किती मुरते, उपसा किती होते, याचा ताळमेळ करून त्याचा भूजल अहवाल तयार करते. यासाठी राज्यातील भूजल सर्वेक्षण कार्यालयातून एकत्रित माहिती त्यांना देण्यात येते. त्यानंतर ते हा भूजल मूल्यांकन अहवाल तयार करतात. त्यावरून पाणीनियोजन करणे सोपे जाते. या अहवालात जमिनीत पाण्याचा उपसा किती होतो, याची माहिती दिली जाते तसेच उपाय देखील सांगितले जाते. त्यात प्रचंड उपसा, कमी उपसा, संवेदनशील क्षेत्र ,सुरक्षित क्षेत्र अशी विभागनिहाय माहिती असते. जेथे प्रचंड उपसा होत असेल तेथे राज्यात महाराष्ट्र भूजल व्यवस्थापन अधिनियम २००९ नुसार विहिरी व बोअरवेल करण्यास मनाई असते. या अहवालात पाण्याबाबत याव्यतिरिक्त अतिशय सूक्ष्म माहिती असते. त्यामुळे पाण्याच्या योजना, पाण्याचे नियोजन करतांना त्याचा आधार घेतला जातो.

प्रचंड उपशाची ११ ठिकाणी

२०१३-१४ च्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात जिल्ह्यात प्रचंड उपसा असलेले ११ ठिकाण होते. तर कमी उपसाचे ११, सुरक्षित असे ५७ तर संवेदनशील असलेले १२ ठिकाण होते. भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यात ८० वॉटर शेड परीक्षणासाठी तयार केल्या आहे. त्यातून दरवर्षी चार वेळा सर्वेक्षण करते. त्यातून पाणीपातळी किती खाली गेली हे कळते. पण, भूजल मूल्यांकनामध्ये त्याबाबत सर्व बाबींचा विचार करून त्याची माहिती दिली जाते.

पाणीनियोजन महत्त्वाचे

पाण्याचे नियोजन जिल्हा स्तरावर धरणांच्या पाण्यावर केले जाते. पण, जमिनीच्या पाण्याकडे पूर्ण लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नियोजन अचूक होत नाही. त्यासाठी भूजल मूल्यांकन अहवाल हा महत्त्वाचा भाग आहे.

भूजल पातळीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, आपल्याकडे तहान लागल्यावर विहीर खोदली जाते, तसा हा प्रकार आहे. दुष्काळातच भूजलाचे महत्त्व आपण ओळखतो. मात्र, भूजल राहिले तर आपले भविष्य अधिक चांगले राहील.

- डॉ. प्राजक्ता बस्ते, जलतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तहसील स्तरावरकृती दल नेमा'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड विभागातील पाणीटंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याबाबत सरकार संवेदनशील असून, नागरिकांना आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसील स्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात यावे आणि या दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना टंचाईव्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येऊ नये, असे निर्देश उपायुक्त डॉ. दिलीप स्वामी यांनी दिले. पर्जन्यमापक प्रशिक्षण कार्यशाळेनिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित असलेल्या विभागातील नायब तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांना डॉ. स्वामी यांनी हे निर्देश दिले आहेत. दुष्काळाची भीषणता वाढल्याने महसूल प्रशासनानेही आता या समस्येबाबत अधिक गांभीर्याने कामकाज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला हे निर्देश देण्यात आले आहेत. पथकातील सदस्यांनी स्वत: टंचाईची परिस्थिती विविध माध्यमातून जाणून घ्यावी आणि आवश्यतेनुसार तत्काळ प्रतिसाद द्यावा. तलाठी आणि ग्रामसेवकांच्या साप्ताहिक बैठकी घेण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा. जूनअखेरपर्यंत पाणी उपलब्ध होईल, असा जलस्रोत शोधून ठेवावा. उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकी घ्याव्यात. चाराटंचाईची माहिती घेऊन आवश्यकता असल्यास चारा छावणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावे. त्याबाबत कृषी व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी दैनंदिन संपर्क ठेवावा. जलस्रोताची व टँकरद्वारे वितरित होणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची नियमित तपासणी करावी व जलस्रोताच्या ठिकाणी ब्लीचिंग पावडरचा योग्य उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीच्या गतीमुळे ‘लेटमार्क’चा शेरा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वारंवार विलंबाने धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमुळे नाशिकहून मुंबईला दररोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांकडून डेक्कन आणि पंचवटीच्या बाबतीत नाशिककरांवर अन्याय का असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. पंचवटीच्या उशीराचा फटका प्रवाशांना बसत असून, लेटमार्क मिळू लागल्याने डेक्कन एक्स्प्रेसप्रमाणे पंचवटी एक्सप्रेसची गती वाढविण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने ठोस प्रयत्न करण्याची मागणी या प्रवाशी वर्गाकडून करण्यात आली आहे.

पंचवटी एक्सप्रेस नाशिकहून मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या नाशिककरांची हक्काची गाडी आहे. या गाडीशी नाशिककरांचे वेगळेच नाते आहे. परंतु सध्या हीच गाडी रेल्वे प्रवाशांसाठी डोकेदुखीचे कारण ठरू लागले आहे. पंचवटी एक्स्प्रेस मुंबईला नियोजित वेळेत पोहचत नसल्याने नाशिककर प्रवाशी त्रस्त झालेले आहेत. पंचवटी एक्सप्रेसला २१ बोगी असून, दररोज या गाडीला प्रवाशांची खच्चून गर्दी असते. या गाडीमुळे रेल्वे प्रशासनाला योग्य असा महसुलही मिळतो. असे असतांनाही ही गाडी कायमच उशिराने धावत असते. त्यामुळे या गाडीने मुंबईला नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लेटमार्कचा सामना करावा लागत आहे.

पंचवटी एक्सप्रेसला वेगळा न्याय का?

मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसला आणि नाशिक ते मुंबई धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला सारखाच एलएचबी रेक आहे. अंतरही सारखेच आहे. असे असताना डेक्कन एक्स्प्रेस केवळ अडीच तासांत मुंबईला पोहचते. मात्र तेच अंतर पार करण्यासाठी पंचवटी एक्सप्रेसला साडे तीन तासांचा वेळ लागतो. याशिवाय पंचवटी एक्स्प्रेस कधीही वेळेत मुंबईला पोहचत नाही. दोन्ही गाड्यांचा रेक सारखाच असतांना दोन्ही गाड्यांना सारखेच अंतर धावण्यासाठी वेगवेगळा वेळ लागत असल्याने पंचवटी एक्सप्रेसला वेगळा न्याय का? असा सवाल नाशिककर प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

डेक्कन एक्सप्रेसचा आणि पंचवटी एक्सप्रेसचा रेक सारखा आहे. दोन्ही गाड्यांचे अंतरही सारखेच आहे. असे असतानाही पंचवटी एक्सप्रेसला जास्त वेळ लागतो. शिवाय ही गाडी नेहमी उशिराने धावते. राजधानी एक्स्प्रेस जर या मार्गावरून अडीच तासांत धावते तर पंचवटी एक्सप्रेसचा गाडीचा स्पीड वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. कसारा येथील थांबा रद्द केला पाहिजे.

-किरण बोरसे, प्रवाशी

डेक्कनला कमी थांबे आहेत. पंचवटी एक्सप्रेसला मात्र जास्त थांबे आहेत. परिणामी पंचवटी एक्सप्रेसला जास्त वेळ लागतो. ही तांत्रिक बाब आहे, असे असले तरी रेल्वे प्रशासनाकडून पंचवटी एक्सप्रेस निर्धारित वेळेत पोहचण्यासाठी काळजी घेतली जाते.

- कुंदन महापात्रता, वाणिज्य प्रबंधक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त पोलिस निरीक्षकांची बदली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असतांनाच समांतर रस्त्यावर सुरू असलेला ढाबा बंद करण्याची जबरदस्ती करणाऱ्या इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍तांच्या आदेशाने झालेल्या या बदलीनंतर अनिल पाटील यांची जबाबदारी पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांना देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता सुरू असतांना मिशन कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रात्री दहा वाजेनंतर सर्वच हॉटेल्स, ढाबे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गाच्या समांतर रस्त्यावरील हरिओम ढाबा रात्री दहानंतर सुरू होता. त्यानुसार अनिल पाटील यांनी हा ढाबा बंद करण्याचे आदेश दिले. एक तासानंतरही ढाबा सुरुच असल्याचे पाटील यांना आढळले. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकांना बळजबरीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे काही वकील त्यांच्या कुटुंबियांसह बसलेले होते. त्यांच्यासह ग्राहकांनी पाटील मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करीत पोलिस वाहनास घेराव घातला. गस्त पथकात असलेल्या पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्यासमोर हा प्रकार घडला. आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होताच अनिल पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलनात पोलिस प्रशासन खोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी व महापालिकेच्या भूखंडांवर असलेल्या झोपडपट्टीधारकांचे घरकूल योजनेत स्थलांतर करण्यासाठी वारंवार पोलिस बंदोबस्त मागूनही तो दिला जात नसल्याने शहर विकासास खीळ बसते आहे. पोलिस प्रशासनाची मानसिकता शहराला आहे त्याच स्थितीत ठेवण्याची असल्याचा आरोप महापौर शेख रशीद यांनी केला असून, याप्रश्नी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेत बदल न झाल्यास रमजान ईदनंतर थेट मंत्रालय स्तरावर आवाज उठवणार असून, प्रसंगी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महापौर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला.

आयशानगरमधील काँग्रेस कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. अतिक्रमण थांबवितानाच लाभार्थी स्थलांतरासाठी बंदोबस्ताची फी भरण्यास महापालिका तयार असली तरी पोलिस बंदोबस्त पुरविला जात नाही. भाजप सरकारच्या दबावाखाली पोलिस हेतूपूरस्करपणे मुस्लिमबहुल शहराच्या विकास प्रक्रियेला सहकार्य करीत नसल्याचा थेट आरोप महापौर शेख यांनी केला. अतिक्रमण निर्मूलनासाठी असहकार्य करणारे पोलिस स्वत: महापालिकेच्या भूखंडांवर अतिक्रमण करीत असल्याचीही टीका महापौरांनी केली. पवारवाडी पोलिस ठाणे, सरदार चौक, भिक्कू चौक, संगेमेश्‍वर, दरेगाव येथील पोलिस चौक्या या मनपाच्या भूखंडांवर आहेत. त्यापोटी मनपाला उत्पन्नही लाभत नाही. रमजाननंतर पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यास हा विषय मंत्रालय स्तरापर्यंत नेण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. निवडणुकीत अतिक्रमण निर्मूलनाचे शहरवासीयांना आश्‍वासन दिले होते. परंतू, पोलिस आणि मनपा प्रशासनाच्या अहसकार्यामुळे अतिक्रमण निर्मूलन करण्यात अपयशी ठरत असल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात चालक ठार

$
0
0

निफाड : ओझर येथील मुंबई आग्रा महामार्गावर एचएएल उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मालट्रक चालक ठार झाला. संदीप रामकरणसिंह (रा. निनावली, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.

पिंपळगांव बाजूकडे जाणाऱ्या मालट्रकचे टायर गुरुवारी पहाटेच्या सुमारास पंचर झाले होते. ते चाक काढत असताना संदीप बाजूला बसला होता. त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात संदीप गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्यास पिंपळगांव येथील रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ओझर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनुभवी व्यक्तींमुळे सोशल नेटवर्किंग समृद्ध

$
0
0

'सोनेफो'चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावाकडची चावडी किंवा मारुतीचा पार हे पूर्वी सोशल मीडियाचे प्रतिनिधित्व करीत होते. या पारावर येऊन कुणीही आपले म्हणणे मांडत असे, त्याला कोणत्याही लाईकची किंवा कमेंटची गरज भासत नसे. यातूनच पुढे सोशल मीडिया आला आणि त्यातून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमला अनुभवसंपन्न माणसांनी समृद्ध केले, असे प्रतिपादन सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी केले.

वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्या वतीने यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे आयोजित व्याख्यानमालेच्या सत्रात ते बोलत होते. 'समाज माध्यमांवरील अनोखी सामाजिक चळवळ' या विषयावरील गुरुवारी त्यांनी सोळावे पुष्प गुंफले. हे पुष्प वसंतराव नेवासकर यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले. गायकवाड म्हणाले, की प्रारंभी सोशल मीडियाला सर्वजण शिव्या घालत असत. त्याच्याविषयी फारसे चांगले मत नव्हते. त्यामुळे साहजिकच त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु, ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांचा एक लेख वाचनात आला. त्यांनी अमेरिकेच्या तरुणांना आकृष्ट करण्यासाठी फेसबूकचा प्रभावी वापर केल्याचे त्यात सांगितले होते. त्यातून विचार घेऊन सोशल मीडियाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. पहिल्यांना ऑर्कुटवर तरुणाईची चळवळ सुरू केली. त्यानंतर फेसबूकवर सामाजिक कार्यांचे फोटो काढून पोस्ट करायला सुरुवात केली. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. अनेक तरुण आपला वाढदिवस आदिवासी मुलांबरोबर साजरा करू लागले. मग लक्षात आले, की परदेशातील काही तरुण यात जॉईन होत आहेत. त्यांनी संपर्क साधून भारतासाठी आम्हाला खूप काही करण्याची इच्छा आहे, काहीतरी ठोस काम सुरू करा असे सांगितल्यावर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मत आणि आदिवासींच्या पाड्यावरील पाणीप्रश्न हाती घेतला. त्याला भरघोस यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंचावर अरुण नेवासकर, अर्चना नेवासकर, प्रा. सुमती पवार यांची उपस्थिती होती. अॅड. अजय निकम यांनी वसंतराव नेवासकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांचा परिचय हिरालाल परदेशी यांनी करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

आजचे व्याख्यान

वक्ता : पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

विषय : युवकांपुढील आव्हाने आणि अपेक्षा

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यात दुष्काळामुळे शेतीसाठी पाणी नसल्याने शेतकरी, शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. रोजगार हमी योजनेतून काम मिळत नाही. आघाडी सरकारच्या काळात पाणी व चाऱ्याच्या प्रश्न निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात आली होती. मात्र विद्यमान सरकारकडून प्रत्येक गोष्टीत अट घालत आहे. या दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नाही, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. या प्रश्नी आपण सरकारकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. राजकीय नेत्यांचे दुष्काळी दौरे सुरू आहेत. काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात धुळे व नाशिक जिल्हा दौरावर आलले असताना गुरुवारी त्यांनी तालुक्यातील झोडगे व गुगुळवाड या दोन्ही गावांना भेट दिली. स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी देखील आपल्या व्यथा थोरात यांच्यापुढे मांडल्यात. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

झोडगेसह माळमाथ्यावर दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गुरांना देखील चाऱ्याचा तुडवडा भासत आहे. बाळासाहेब थोरात यांनी झोडगे येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी त्यांना समस्यांचे निवेदन दिले. यात चारा छावण्यांना तात्काळ सुरू कराव्यात, गावासह परिसरातील जनतेच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. देवेंद्र देसाई, विनोद देसले, लक्ष्मण देसले, ललित देसले, प्रशांत देसले, तलाठी मनिषा जाधव, ग्रामसेवक अशोक बच्छाव आदी उपस्थित होते. थोरात यांनी झोडगेनजीक असलेल्या गुगुळवाड या गावी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: रोइंगपटू दत्तू भोकनळवर गुन्हा

$
0
0

नाशिक:

राष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलेनं भोकनळविरोधात तक्रार दिली आहे. विवाहाची तारीख दोनदा ठरवूनही तो विवाहाला उपस्थित राहिला नाही आणि त्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

आशा दत्तू भोकनळ असं तक्रारदार महिलेचं नाव असून, ती सध्या नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. आशा भोकनळ यांच्या तक्रारीनुसार, २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१९ या कालावधीत दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आडगाव येथील नाशिक पोलीस मुख्यालय आणि पुण्यातील रोइंग रोड येथे ते एकमेकांना भेटले. या दरम्यान दत्तूने आशा यांच्याशी विवाह केला. मात्र या विवाहाची माहिती त्याने नातेवाईकांना दिली नाही. त्यामुळे सर्वांसमक्ष विवाह करण्यासाठी आशा यांनी तगादा सुरू केला. यामुळे ९ फेब्रुवारी रोजी विवाह करण्यास दत्तू राजी झाला. त्यानुसार आशा यांच्या परिवाराने लग्नाची तयारी सुरू केली. लॉन्स बुक करण्यात आला. मात्र काहीतरी कारण सांगून दत्तूने हा विवाह पुढे ढकलला. त्यामुळे पुन्हा २४ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यावेळीही हा विवाह सोहळा पार पडू शकला नाही. दोघांच्या सहमतीने झालेल्या विवाहानंतर दत्तूने आपल्याला मानसिक व शारिरीक त्रास दिल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दत्तूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

$
0
0

नाशिक : शक्ती विकास अॅकॅडेमी, नाशिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यंदाही मोफत सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावी आणि पदवीधर मुला-मुलींसाठी २१ ते २५ मे या कालावधीत हे शिबिर होणार आहे.

शिबिरात धावणे, गोळाफेक, लांब उडी, सामान्य ज्ञान, विज्ञान, अंकगणित, बुध्दीमत्ता आदी विषयांचे मार्गदर्शन तज्ज्ञ प्रशिक्षक व आजी-माजी सैनिकांकडून दिले जाईल. शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार, गरीब तथा वंचित युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप व सचिव मनीषा जगताप यांनी केले आहे.

या प्रशिक्षण शिबिरात मंगळवारी (दि. २१ मे) सकाळी ८ वाजता, त्र्यंबक रोड, वेद मंदिराजवळ, श्रम सहकार भवनसमोर, स्त्री मंडळ सभागृह, तिडके कॉलनी, नाशिक येथे हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासाका’ वाचविण्यासाठी आज युवा परिषद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील ३५५ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना गेल्या चार ते पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा, या उद्देशाने विविध गावे मिळून स्थापन करण्यात आलेल्या नासाका बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज (दि. १८) कारखाना कार्यस्थळावर युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी, कामगार, मजूर यांची चूल बंद करणाऱ्या सहकार क्षेत्रातील राजकारण्यांनी स्वार्थापोटी नासाका पुन्हा सुरू करण्याकडे काणाडोळा केला. आजमितीला जमिनीसह कोट्यवधी रुपयांचे यंत्र व मशिनरी धूळ खात पडून आहेत. कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी धडपडणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येत काही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नासाका बचाव कृती समिती स्थापन केली. कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी जनजागृती करून हा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचा चंग बांधला आहे. आज, शनिवारी होणाऱ्या युवा परिषदेत विलास गायधनी, बाळासाहेब म्हस्के, विश्वास कळमकर, रामा कटाळे, शरद तुंगार, शांताराम चव्हाणके, सदानंद नवले, प्रमोद आडके, भारत घुमरे, मनोज शहाणे, संतोष कटाळे, दिगंबर वडघुले, संदीप घुले, कैलास मोरे, योगेश महाले, गणेश टोचे, किरण खुळे आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेस परिसरातील युवावर्ग, शेतकरी, कामगार तसेच तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नासाका बचाव कृती समितीने केले आहे.

...

परिषदेतील प्रमुख मागण्या

- कारखाना सुरू व्हावा म्हणून सरकार अयशस्वी झाले असून, त्याचे खासगीकरण करून रोजगार उपलब्ध होऊन परिसरात पुन्हा एकदा वैभव उभे करावे.

- स्वत:चे खिसे भरणाऱ्या संचालकांची मालमत्ता जप्त करून कारखान्याचे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करावा.

- कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर टळला असता रोइंगपटूवरील हल्ला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सराव करून घरी परतणारा राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनवणे याच्यावर मंगळवारी (दि. १४ मे) चोपडा लॉन्सजवळील पेट्रोलपंपावर प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेच्या आठ दिवसांपूर्वीच एका राज्यस्तरीय रोइंगपटूवर ६ मे रोजी याच परिसरात असाच हल्ला झाला होता. त्याच्या तक्रारीवर वेळीच कारवाई झाली असती, तर हल्लेखोरांना चाप बसला असता व निखिलवरील प्राणघातक हल्लाही टळला असता, असा सूर क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेणारा व राज्यस्तरीय रोइंग स्पर्धेसाठी सराव करणारा छगन लक्ष्मण गायकवाड याच्यावर ६ मे रोजी तीन जणांनी हल्ला केला होता. ही घटना निखिलवरील हल्ल्याच्या आठ दिवसांपूर्वीची आहे. निखिलवर हल्ला करणारेही तिघेच होते. छगन गायकवाड आदिवासी भागातील विद्यार्थी असून, शिक्षणासाठी तो नाशिकमध्ये होस्टेलवर राहतो. केटीएचएममध्ये बी.ए.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून, तेथेच बोट क्लबवर रोइंगचा सराव करतो. नेहमीप्रमाणे ६ मे रोजी सकाळी सहा वाजता सरावासाठी गोदा पार्कवरून बोट क्लबकडे येत असताना त्याला तीन जणांनी अडवत मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातून १२ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावला. कोणाला सांगितले तर ठार मारू, अशी धमकीही या तीन हल्लेखोरांनी दिली. या घटनेने छगनला असुरक्षिततेने ग्रासले होते. या प्रकरणी त्याने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ६ मे रोजी तक्रारही दिली.

पोलिसांनी दिला दुसरा मोबाइल!

छगनवर बेतलेला प्रसंग पोलिसांनी जाणून घेतला. आदिवासी विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याने पोलिसांनाही त्याच्याविषयी कणव निर्माण झाली. त्यांनी त्याला दुसरा मोबाइल देत सांगितले, की आदिवासी मुले प्रामाणिक असतात. त्यामुळे तू हा मोबाइल ठेव. पोलिसांची ही भूमिका माणुसकीच्या दृष्टीने कौतुकास्पद असली, तरी छगनच्या तक्रारीवर गांभीर्याने तपास होणे आवश्यक होते. छगनवर हल्ला करणाऱ्यांचा तपास लागला असता, तर अशा घटनांना चाप बसला असता. मात्र, तसे न झाल्याने हल्लेखोरांची हिंमत वाढली आणि त्याचा फटका राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनवणेला बसला. यामुळे निखिलचे राज्यस्तरीय स्पर्धेतून भारतीय संघात प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न भंगले. आता याच राज्यस्तरीय स्पर्धेत छगन सहभागी होणार आहे.

खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना

'मटा'शी बोलताना छगन म्हणाला, की मला तिघांनी मारहाण सुरू केली. चाकूचा धाक दाखवत त्यांनी मोबाइल हिसकावला. त्यावेळी मी प्रतिकारही करू शकलो असतो; पण त्यांच्या हातात धारदार चाकू होता. मी आयुष्यात मोबाइल कधीही मिळवू शकतो. मात्र, प्राणघातक हल्ला झाला असता, तर माझे मोठे नुकसान झाले असते, या भावनेतूनच मी प्रतिकार केला नाही. आदिवासी भागातून माझ्यासह अनेक जण येथे शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्यावर असे प्राणघातक हल्ले होत असतील, तर आम्ही काय करावे? मात्र, या भागातून जाताना आता असुरक्षित वाटते. रस्त्यात लूटमार करणाऱ्या हल्लेखोरांवर पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अशी मागणीही छगनने केली आहे.

निखिलवरील हल्ल्याच्या आठ दिवसांपूर्वीच माझ्यावरही हल्ला झाला होता. मी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दिली होती. मात्र, पोलिसांनी सहानुभूती दाखवत मला दुसरा मोबाइल दिला. या घटनेनंतर मला दिवसाही गोदा पार्ककडून जाताना असुरक्षित वाटते.

-छगन गायकवाड, राज्यस्तरीय रोइंगपटू

एका आदिवासी खेळाडूची मोबाइल हरवल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्याची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्ही त्याला दुसरा मोबाइल घेऊन दिला. मात्र, मारहाण करून मोबाइल हिसकावल्याची तक्रार नव्हती.

-संजय सांगळे, पोलिस निरीक्षक, सरकारवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नर्मदा परिक्रमा'वर उद्या अनुभव कथन

$
0
0

'नर्मदा परिक्रमा'वर उद्या अनुभव कथन म. टा. प्रतिनिधी, नाशिक माणसातील अपुरेपण घालवून त्याला परिपूर्ण करणारा अभिनव प्रवास म्हणजे नर्मदा परिक्रमा. या परिक्रमेचे अनुभव व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिक्रमा नुकतेच पायी पूर्ण करून आलेले विशाल मित्रा यांची मुलाखत डॉ. सुनीता वावरे या घेणार आहेत. ही मुलाखत रविवारी (दि. १९) सकाळी ९.३० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक मेक वल्ड बेटर व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास, विश्वास गार्डन, कम्युनिटी रेडिओ यांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायकदादा पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, विक्रम मोरे व मेक वर्ल्ड बेटरच्या मंजू बेळे-राठी, विनायक रानडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झोक्याचा गळफास; दाभाडीत मुलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी गावात झोका खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दाभाडी शेतकरी मिलिंद कदम यांचा मोठा मुलगा वेदांत हा घराच्या वरच्या मजल्यावर एकटाच झोका खेळत होता. खेळताना त्याच्या गळाल्या झोक्याच्या दोरीचा फास लागला. त्यातच तो गतप्राण झाला.

वेदांतला तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दाभाडी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. वेदांत याच्या पश्‍चात वडील, आई, लहान भाऊ, काका, काकू असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी भागाकडे नेत्यांचे वळले पाय

$
0
0

स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांना मिळेना यश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याने राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांची पाय आता दुष्काळग्रस्त भागाकडे वळली आहे. दुसरीकडे, स्थानिक नेत्यांचे प्रयत्न कमी पडत आहे. काही मोजक्या नेत्यांनी दुष्काळ भागाचा पाहणी दौरा करून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. तर काही जण अजूनही लोकसभा निवडणुकीच्या रंगातच दंग आहे.

जिल्ह्यातील १५ पैकी ८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा वाढत आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिंधीनी एकत्र येत दुष्काळाच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याची गरज आहे. पण, ती स्थिती दिसत नाही. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सर्वात प्रथम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. त्यानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब काँग्रेसचे नेत्यांनी जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात सरकारी टँकरची संख्या वाढली आहे. चारा छावण्याही सुरू होत असल्या तरी त्यास बराच उशीर होत असल्याचे मानले जात आहे. काही गोष्टीत तर प्रशासनही कागदांवरच काम करीत आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीचे संकेत

$
0
0

शहराची तहान ३१ जुलैपर्यंत भागविण्याचे आव्हान

...

पाण्याची स्थिती (दशलक्ष घनफूटमध्ये)

- महापालिकेसाठी आरक्षित पाणी : ४,९००

- आतापर्यंत वापरलेले पाणी : ३,४४७

- आजमितीस उपलब्ध पाणी : १,४५३

- दररोज होणार विनियोग : १६.१८

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आणि शहरवासीयांची तहान ३१ जुलैपर्यंत भागविण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीकपातीचा विचार गांभीर्याने करायला हवा, अशा सूचना जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेअंती योग्य निर्णय घ्यावा, असे सांगत कुंटे यांनी शहरात पाणीकपात केली जाण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कुंटे नाशिक दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी पाणीकपातीचे संकेत दिले. कुंटे म्हणाले, की नाशिक महापालिका कार्यक्षेत्रासाठी यंदा ४ हजार ९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ४४७ दशलक्ष घनफूट पाण्याचा आतापर्यंत विनियोग करण्यात आला आहे. आजमितीस शहरासाठी १ हजार ४५३ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. शहरवासीयांसाठी दररोज साधारणत: १६.१८ दशलक्ष घनफूट पाण्याचा विनियोग केला जातो. पाऊस किती आणि केव्हा पडेल याची माहिती नसल्याने महापालिकेने पाणीकपातीचा विचार करायला हवा, असे जलसंपदा विभागाने पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला सूचविल्याची माहिती कुंटे यांनी दिली.

नाशिक महानगरासाठी उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, याकरिता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हायला हवा. यासाठी महापालिकेने पाणीकपातीचा विचार करणे उपयुक्त ठरेल, असे जलसंपदा विभागाने सूचविले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून चर्चेअंती योग्य निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्याची माहिती कुंटे यांनी दिली. कपात करावयाची झाल्यास ती किती करावी हे चर्चेतूनच ठरवावे लागेल. नागरिकांनी देखील पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कुंटे यांनी केले आहे.

...

शहरातील उधळपट्टी थांबणार का?

सिडकोसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात पाण्याची उधळपट्टी होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. नागरिक पाण्याचा अपव्यय करीत असूनही महापालिकेकडून त्याबाबत ठोस कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, पाणीकपातीचे धोरण अवलंबले गेले, तर पाणीपुरवठ्यावरच मर्यादा येतील. त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबून नागरिक त्याचा काटकसरीने वापर करतील का, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता चर्चा आमरस पार्टीची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक लोकसभा निवडणुकीनंतर नाशिक शहरात मिसळपार्ट्या रंगल्या होत्या. तिखट मिसळ खाल्ल्यानंतर आता आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या निकालापूर्वी नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी (दि. १७) सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी पुरणपोळी आणि आमरसाच्या पार्टीची चर्चा रंगली.

कालिका मंदिराच्या सभागृहात ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी यापूर्वी सर्वप्रथम मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर आज आमरसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. शहरात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी राजकीय मिसळपार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सीमा हिरे, निर्मला गावित, डॉ. सुधीर तांबे, माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल आहेर, माणिकराव कोकाटे, डॉ. कैलास कमोद, नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, नाना महाले, दत्ता पाटील, मामा ठाकरे, डॉ. सुभाष देवरे, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, महेश हिरे, गिरिश चिटणीस, विजय पाटील, अॅड. नितीन ठाकरे, अशोक सावंत आदींसह विविध सामाजिक शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

निवडणूक एक दिवसाची असते, मात्र विकासासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र राहणेही गरजेचे असते. त्याच उद्देशाने तोंड गोड करण्यासाठी ही पार्टी आयोजित केली होती.

-अण्णा पाटील, अध्यक्ष, कालिका ट्रस्ट, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासन दरबारी टँकर प्रस्ताव प्रलंबित

$
0
0

तळवाडेतील महिलांचा हंडा मोर्चाचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड आणि सिन्नर तालुक्याच्या सीमारेषेवरील तळवाडे या १५०० लोकवस्ती असणाऱ्या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने टँकरची मागणी केली होती. मात्र, ती अद्याप पूण करण्यात आली नसल्याने स्थानिक महिलांनी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

तळवाडे गावात भीषण दुष्काळ असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. निफाड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून पंधरा दिवस उलटूनही प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने गावातील महिलांनी निफाड तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच लता सांगळे यांनी दिला आहे.

तळवाडे ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समितीला टँकर सुरू करण्यासंदर्भात ४ मे रोजीच प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर गावातील बोअरवेल, विहीर आधिग्रहण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. केवळ पाच दिवस पाणी पुरेल, असे पत्र ग्रामपंचायतीने सादर केले. गावातील विहिरीचे पाणी ९ मेपर्यंत पुरले, त्यानंतर एक बोअरवेल खोदण्यात आली. मात्र पाण्याचा थेंबही लागला नाही. आता आठवडा उलटून गेला तरी गावात पाणी नाही, हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. तात्काळ टँकर सुरू झाला नाही तर तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढू असा इशारा महिलांनी दिला आहे.

सरकार एकीकडे मागेल त्याला टँकर देण्याची घोषणा करते. आचार संहिता शिथिल करते पण तालुका प्रशासन पाण्याचा टँकर सुरू करीत नाही. तात्काळ कारवाई नाही झाली तर तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल.

- लता सांगळे, सरपंच, तळवाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images