Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरावर सीसीटीव्हीचा वॉच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिककरांच्या सुरक्षेसाठी शहरात ठिकठिकाणी ८०० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. या प्रकल्पासाठी १६० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून, युएस टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या मक्तेदार कंपन्यांना सदरचे काम देण्यात आले आहे. मक्तेदार कंपनीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेत, प्रस्तावित कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटरच्या जागेची देखील पाहणी करण्यात आली.

स्मार्ट सिटी अंतर्गत 'स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक' करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पांअतर्गत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये तसेच वर्दळीच्या ठिकाणी तब्बल ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीतील वरच्या मजल्यावर कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरची उभारणी केली जाणार आहे. यासाठीच्या खर्चावरून गेले अनेक दिवस महापालिका, पोलिस आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू होता. अखेरीस हा खर्च स्मार्ट सिटी कंपनीच्या माथी मारण्यात आला आहे. स्मार्ट सिटीने तब्बल १५९.१५ कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट युएस टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या मक्तेदार कंपन्यांना देण्यात आले आहे. या तीन कंपन्याकडून कॅमेरे बसविण्यासह कंमाड अॅन्ड कंट्रोल रुम तयार केले जाणार आहे. याबाबत संबंधित कंपन्याच्या प्रतिनिधींनी बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष गमे आणि पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेवून त्यांना प्रकल्पाची माहिती दिली आहे.

कमांड अॅन्ड कंट्रोल सेंटर

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ऑप्टीकल फायबरसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. त्या माध्यमातून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनप्रणाली नियंत्रित करण्यासह सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाणार असून, आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना सूचना देण्याची व्यवस्था देखील याद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाय फाय सुविधा, स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, हेल्पडेस्क आदी सुविधा देखील या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या मिळकतींवर करवाढीची शक्यता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या ५९ हजार मिळकतींवर आकारण्यात आलेल्या नवीन वार्षिक करयोग्य मूल्य दरानुसार घरपट्टी आकारण्याची थांबलेली सुनावणीची कारवाई आता पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेने नोटीसा बजावलेल्या ४९ हजार मिळकतींपैकी पाच हजार मिळकतींवर प्राथमिक सुनावणी घेतली होती. आता पुढील आठवड्यापासून शिल्लक राहीलेल्या मिळकतींची विभागनिहाय सुनावणी सुरू केली जाणार आहे.

नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत असताना नाशिक महापालिकेच्या दप्तरी अवघ्या चार लाख मिळकतींचीच नोंद आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण सुरू केले होते. या सर्वेक्षणात नव्याने ५९ हजार मिळकती आढळून आल्या होत्या. तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांनी या मिळकतींना नवीन वार्षिक करयोग्य मूल्य लावण्याचा निर्णय घेतला होता. नवीन वार्षिक करयोग्य मूल्य हे पाच ते सहा पट वाढल्याने या निर्णयाचा सर्वाधिक फटका त्यांना बसला होता. घरपट्टीची लाखाची देयके प्राप्त झाल्याने या मिळकतींमधील रहिवाशांच्या पायाखालची वाळू सरकली होती. या करवाढीविरोधात शहरात आगडोंब उसळल्यानंतर मुंढे यांनी करवाढ निम्म्याने मागे घेतली. मात्र त्यानंतरही महापालिकेने यातील ४९ हजार मिळकतींना नोटीसा बजावल्या होत्या.

या नोटीसांवर नियमानुसार हरकती मागवून सुनावणीची प्रक्रिया राबविणे बंधनकारक होते. त्यामुळे या मिळकतधारकांकडून महापालिकेने हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार पालिकेवर हरकतींचा पाऊस पडला. हरकतींवर सुनावणीची प्रक्रियाही सुरू झाली. मात्र त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात ही प्रक्रिया मागे पडली. आता मात्र पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा या मिळकतींच्या सुनावणीच्या प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे. त्यामुळे नवीन करआकारणीचा घोळ लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षण ९९ टक्के पूर्ण

महापालिकेतर्फे शहरात सुरू असलेले मिळकत सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. सध्यस्थितीत मिळकत सर्वेक्षणाचे काम ९९ टक्के झाले असून, आता केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयाचे सर्वेक्षणाचे काम अपूर्ण राहिले आहे. तत्कालिन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिओ इन्फोसिस कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. गेल्या साडे तीन वर्षात टप्प्याटप्प्याने झालेले सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत ५९ हजार नवीन मिळकती आढळून आल्या आहेत. अद्याप सर्वेक्षणाचे काम अपूर्ण असल्याने नवीन मिळकतींची त्यात भर पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून पुन्हा या सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार असून, अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खो प्रीमियर लीगला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे नाशिक जिल्हा खो-खो प्रीमिअर लीगला बुधवारी सुरुवात झाली. ही देशातील पहिली खो-खो लीग असून, 'डिफेन्स अँड चेस' अशा घोषवाक्याने आयोजित केलेल्या या लीगमध्ये सहा संघांचा सहभाग आहे. ही लीग स्पर्धा १९ मेपर्यंत सुरू राहील.

विश्वास बँक पुरस्कृत दिलीप ब्लास्टर्स, बागड प्रॉपर्टीज पुरस्कृत सागर वॉरिअर्स, काका तांबे पेट्रोलियम (राहुरी) पृरस्कृत स्वप्नील फ्लायर्स, रेडिओ विश्वास पुरस्कृत निशा रायझिंग, ग्रॅडीयुर रिटेलर्स पुरस्कृत मनीषा रॉयल चॅलेंजर, ऋणानुबंध ग्रुप पुरस्कृत चंदू डेअरडेव्हिल असे सहा संघ लीगमध्ये आहेत. यां संघांतून ७२ खेळाडू आपले कौशल्य पणास लावतील. या खेळाडूंमध्ये १८ खेळाडू राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत खेळलेले आहेत. लीगमध्ये नेहमीच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेत मुले आणि मुली एकत्र खेळणार आहेत. एका संघात १२ खेळाडू असतील. यापैकी प्रत्येक संघात किमान ४ महिला खेळाडू असणे आवश्यक आहे. मैदानावर आक्रमण करताना प्रत्यक्ष ९ खेळाडू खेळतात. या ९ खेळाडूंमध्ये किमान तीन महिला खेळाडू आवश्यक आहेत. स्वरक्षण करताना नेहमीच्या तीन खेळाडूंच्या बॅचऐवजी चार खेळाडूंची बॅच पळतीसाठी मैदानात उतरणार आहे. मैदानाचा आकार २२ बाय १५ मीटर असा आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते झाले. या वेळी मंचावर विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर, ऋणानुबंध ग्रुपचे प्रमुख राजेश आहेर, काका तांबे पेट्रोलियमच्या उषा तांबे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक नरेंद्र छाजेड, आनंद खरे, अविनाश खैरनार, ज्येष्ठ खो- खो संघटक प्रकाश तांबट आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी केले. या उमेश आटवणे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी नाईक यांनी या भारतातील पहिल्या खो-खो लीगचे कौतुक करताना, सरकारकडून अशा स्तुत्य उपक्रमांना भरघोस मदत केली जाईल, असे सांगितले. विश्वास ठाकूर आणि नरेंद्र छाजेड यांनीही या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. दररोज सायंकाळी तीन सामने खेळविले जाणार आहेत, अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक मंदार देशमुख आणि उमेश आटवणे यांनी दिली.

स्वप्नील फ्लायर्सची विजयी सलामी

स्पर्धेचा पहिला सामना स्वप्नील फ्लायर्स विरुद्ध चंदू डेअरडेव्हिल यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अभिमन्यू पुरस्कार विजेत्या स्वप्नील चिकणे यांच्या स्वप्नील फ्लायर्सने हा सामना २३ विरुद्ध २१ गुण अशा केवळ दोन गुणांनी जिंकून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून दीपक चारोस्करने ६ गडी बाद केले, तर पळताना २ मिनिट ५ सेकंदांची वेळ नोंदवली. स्वप्नीलने ४ गडी बाद केले, तर १.३५ मिनिटे पळून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. चंदू डेअरडेव्हिल संघाकडून राष्ट्रीय खेळाडू चंदू चावरे याने चार गडी बाद केले आणि ३ मिनिटे पळतीचा खेळ करून सामन्यात रंगत आणली. सर्व सामने साखळी पद्धतीने खेळविले जाणार असून, सर्व संघांना समान संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकारात्मकतेवर मिळवा विजय!

$
0
0

डॉ. तुषार चांदवडकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनाचेच मनाशी युद्ध करून नकारात्मक विचारांवर विजय मिळविणे म्हणजेच आनंदी जीवन जगणे होय, असे प्रतिपादन प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले.

नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार आणि लोकमान्य वाचनालय यांच्यातर्फे आयोजित नवीन नाशिक वसंत व्याख्यानमालाचे दुसरे पुष्प 'पेला अर्धा भरला आहे का सरला आहे?' या विषयावर डॉ. चांदवडकर यांनी गुंफले. कै. पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानाप्रसंगी मंचावर आमदार सीमा हिरे, साहित्यिक विवेक उगलमुगले, देवराम सौंदाणे उपस्थित होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात सकारात्मकता विचारांचे महत्त्व विषद केले. जीवनात येणाऱ्या वेगवगळे संकटांमुळे आपण निराश होतो, या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया देतो. पण त्या घटनेला त्वरित प्रतिक्रिया न देता त्या घटना मान्य करायला शिकले पाहिजे हीच सकारात्मक आपली मरगळता घालवितो. त्यामुळे आपण वास्तवापासून दूर न पळता आलेल्या संकटाना आनंदाने सामोरे गेले पाहिजे, असे डॉ. चांदवडकर यांनी सांगितले. आयुष्यात प्रगतीचा पेला अर्धा भरला आहे हे समजून घेणारा मनुष्य समस्या नाकारतो. जे मिळेल आहे किंवा जे वास्तव आहे त्यात आनंद मानतो. जीवनाकडे सकारात्कतेने पाहून आपल्यासोबत दुसऱ्यांना आनंद देणे म्हणजेच आनंदी जीवन जगणे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार दुसानिस यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. पोपटराव हिरे यांच्या स्मृती सावळीराम तिदमे यांनी जागविल्या. विनोद जोशी यांनी स्वागत केले तर मुकुंद पाठक यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते : मुकुंद दीक्षित

विषय : नक्षलवाद एक आव्हान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखोई नुकसानग्रस्तांचे मदतीचे भिजत घोंगडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळलेल्या 'सुखोई-३०' या लढाऊ विमान अपघातात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसानाचा मोबदला मिळू शकलेला नाही. एचएएल नियमानुसार मदत देण्यास तयार असले तरी बाधित शेतकऱ्यांना अधिकची भरपाई हवी असल्याने या मदतीचे घोंगडे भिजत पडले आहे. वाढीव मदत हवी असल्यास एचएएल प्रशासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांनी तसे पत्र आणावे असे सांगत जिल्हा प्रशासनानेही हात वर केले आहेत.

एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करताना तांत्रिक बिघाडामूळे कोसळले होते. या अपघातामुळे सुकदेव निफाडे, संदीप ढोमसे, योगेश ढोमसे, विलास निकम या शेतकऱ्यांच्या ७. ३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन या फळबागा जगविल्या आहेत. परंतू येथे विमान कोसळल्याने हे शेतकरी उध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले. शासन निर्णयाचा आधार घेऊन मूल्यांकन केले. उत्पादन खर्चापेक्षाही अधिक तोकडी मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी निर्यातीचा दर द्यावा, अशी मागणी केली. परंतु एचएएल नियमानुसार पैसे देण्यास तयार आहेत. या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी अलीकडेच या शेतऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेतली. नियमात राहून मदत दिली जाईल, असे खेडकर यांनी स्पष्ट केले. वाढीव मदत हवी असल्यास एचएएल प्रशासनाशी चर्चा करून तसे पत्र आणावे, असे या शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस हायटेकचं कोंदण

$
0
0

बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा असणार; मोबाइल अॅपवर वेळापत्रक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिकेच्या सिटीबस सेवेला अधिक गती दिली जाणार आहे. बड्या कंपन्यांच्या आग्रहास्तव बससेवेच्या निविदेला पालिकेने २१ मे पर्यंत मुदतवाढ दिली असून, बससेवा हायटेक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा असणार आहे. तसेच मोबाइल अॅपवर प्रत्येक बसचा मार्ग, फेऱ्यांच्या वेळा व बसचे वेळापत्रक पहाता येणार आहे. जीपीएस यंत्रणा व नियंत्रण कक्षाच्या उभारणीसाठी आचारसंहितेनंतर तातडीने निविदा दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी महासभेचा 'ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट' तत्त्वावरचा ठराव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने बससेवेच्या कारवाईला गती दिली आहे. बससेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या धर्तीवर 'नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड' कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. सदर बसेस या ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार असून, त्यासाठीची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता संपताच निविदा उघडल्या जाणार आहेत. तसेच तिकीट वसुलीसाठी महापालिकेने स्वतंत्र निविदा जारी केल्या आहेत. तर बसडेपो आणि पीपीपी तत्त्वावर शेल्टर उभारण्यासाठी देखील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे ही सगळी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असतानाच, प्रशासनाने ही बससेवा हायटेक करण्याचा निश्चय केला आहे.

सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महापालिकेच्या बससेवेत प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून, पालिकेची बससेवा जीपीएस यंत्रणेशी संलग्न असणार आहे. प्रत्येक बसचा मार्ग व फेऱ्यांच्या वेळा निर्धारित असणार आहेत. बसडेपोतून बस किती वाजता निघाली, कोणत्या स्टॉपवर किती वाजता पोहोचली, किती वेळ थांबली, किती प्रवासी बसमध्ये प्रवास करीत आहेत, तिकीटाच्या माध्यमातून किती पैसा मिळाला, कोणत्या मार्गावर प्रवाशांचा कसा प्रतिसाद आहे, प्रतिसाद नसलेल्या कोणत्या भागात बसफेऱ्या कमी करता येऊ शकतील, याची संपूर्ण माहिती महापालिकेला ऑनलाइन नियंत्रण कक्षाद्वारे कळू शकणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, बसमध्ये प्रवाशांची लूटमार, महिला प्रवाशांची छेडछाड आदी गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे. आचारसंहिता संपताच या हायटेक सेवांसाठी निविदा जारी केली जाणार आहे.

घरबसल्या मार्ग कळणार

महापालिकेची बससेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच प्रवाशांचा अधिकाधिक प्रतिसाद लाभण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवेचे मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मोबाइलवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर बसेसची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कोणत्या रुटवर किती वाजता कोणती बस येणार याची माहिती प्रवाशाला या अॅपद्वारे मिळू शकणार आहे. तसेच बस जीपीएस संलग्न असल्याने ऑनलाइनही ती प्रवाशांना ॲपवर दिसू शकले. त्यामुळे नागरिकांना आपल्या कामाच्या वेळा निश्चित करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लखनौ : 'गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर

$
0
0

लखनौ : 'गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान पद भूषविणाऱ्या नरेंद्र मोदी यांची कारकीर्द अराजकता आणि द्वेषाने भरलेले आहे,' असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी केला. 'मोदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावर विराजमान होण्यासाठी अनफिट आहेत. त्यांचा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेला वारसा आणि त्यांची कारकीर्द हा देशाच्या जातीय इतिहासावरील काळा डाग असून, तो भारतीय जनता पक्षावरील बोजा आहे,' असेही मायावती यांनी सांगितले. 'आपण चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर होतो. परंतु, आपली कारकीर्द अतिशय शांततापूर्ण, कायदा-सुव्यवस्थेची, विकासात्मक होती. मोदीही दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री होते. परंतु, मोदींचा काळ द्वेष, हिंसाचार, अराजकता, तणावाचा होता. सार्वजनिक पद सांभाळण्यात त्यांना अपयश आले आहे, हेच यातून दिसते,' असेही मायावती म्हणाल्या.

-----

महंमद अयूब यांना जामीन

मुजफ्फरनगर : आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी जामीनपात्र वॉरंटचे आदेश निघाल्यानंतर पीस पार्टीचे अध्यक्ष महंमद अयुब बुधवारी येथील न्यायालयासमोर शरण आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्य न्यायाधीश राकेश गौतम यांनी वीस हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. सन २०१७मध्ये विधानसभा निवडणुकांच्या वेळी आक्षेपार्ह जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी अयूब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्या विरोधात दोषारोपपत्रदेखील दाखल केले होते.

---

'गोडसे प्रकरणावर सुनावणी नाही'

नवी दिल्ली : अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांच्या 'नथुराम हा पहिला हिंदू दहशतवादी आहे,' या विधानाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. तसेच, धर्माचा गैरवापर निवडणुकीत होता कामा नये, याबाबत काळजी घेण्याच्या सूचनादेखील निवडणूक आयोगाला केल्या. कमल हासन यांच्या विधानाविरोधात भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिका दाखल केली होती. हासन यांनी मतांसाठी मुद्दाम मुस्लिम जमावासमोर अशा पद्धतीचे विधान केले असा आरोपही त्यांनी याचिकेद्वारे केला होता. परंतु, हासन यांनी विधान केले तो परिसर येथील न्यायालयाच्या हद्दीत येत नाही, असे सांगून न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. न्या. जी. एस. सिसतानी आणि ज्योतीसिंग यांच्या पीठाने हा निर्णय दिला.

-----

'केंद्रात एनडीएचे सरकार येणार नाही'

पाटणा : 'लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन होऊ शकणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होऊ शकणार नाही,' असे भाकित कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबि आझाद यांनी बुधवारी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वर्तविले. 'निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता सुरू आहे आणि मी देशभरात केलेल्या प्रचाराच्या अनुभवावरून मी सांगू शकतो, की केंद्रात पुन्हा भाजप किंवा एनडीएचे सरकार येणार नाही,' असे ते म्हणाले. 'भाजपच्या जागांमध्ये घट होऊन त्यांना १२५ जागा मिळतील,' असे त्यांनी सांगितले. परंतु, कॉँग्रेसला किती जागा मिळतील या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले.

--------

'लोहियांचे स्वप्न मोदी पूर्ण करतील'

गोरखपूर : 'राम मनोहर लोहिया यांच्या नावावर अनेक लोक राजकारण करत असले, तरी त्यांचे स्वप्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतील,' असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी व्यक्त केला. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान ते बोलत होते. 'डॉ. लोहिया यांनी श्रीमती इंदिरा गांधींना सांगितले होते, की देश खेड्यांतून जगतो. ज्या दिवशी देशातील प्रत्येक गरिबाच्या घरी शौचालय असेल, प्रत्येकाला इंधन मिळत असेल, त्या वेळी जी व्यक्ती पंतप्रधान असेल, ती पुढे २५ वर्षे राज्य करेल,' असे आदित्यनाथ यांनी सांगितले. 'लोहिया यांचे ते स्वप्न मोदी पूर्ण करतील,' असेही ते म्हणाले. 'उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ८० पैकी ७४ जागा मिळतील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळलेले झाड ठरतेय धोकादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील मोहमुख ते भगुर्डी रस्त्यालगतचे व वीजवितरण कंपनीच्या मेन लाइन जवळचे वाळलेले आंब्याचे झाड पूर्ण वाळले असून, ते केव्हाही उन्मळून पडू शकते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे झाड तोडावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसे निवेदन तालुका प्रमुख अंबादास जाधव यांनी कार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांना दिले आहे. या झाडा शेजारून महावितरणची मेन लाइन गेली आहे. वादळवाऱ्यात हे झाड या तारेवर कोसळण्याची दाट शक्यता आहे. तसे घडल्यास परिसरातील रोहित्र बंद पडण्याची भीती आहे. यामुळे या भागातील अनेक दिवस वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकसचिव कुंटे आज सिन्नरमध्ये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याचे पालक सचिव सिताराम कुंटे गुरुवारी (दि. १६) सिन्नर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी करणार आहेत. गुळवंच येथील चारा छावणीला भेट देतानाच आसपासच्या गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये कुंटे पाहणीसाठी जिल्ह्यात येणार आहेत. सिन्नर तालुक्यात जिल्ह्यातील पहिली चारा छावणी सुरू झाली असून या छावणीची पाहणी गुरुवारी दुपारी ते करतील. त्यानंतर आसपासच्या दुष्काळी गावांमधील ग्रामस्थांशी ते संवाद साधतील. सायंकाळी ते नाशिक मुक्कामी असून, शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते दुष्काळ आढावा बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाते जडले नाशिकशी

$
0
0

पान १ साठी

लोगो -

आय लव्ह यू नाशिक

नाते जडले नाशिकशी

बहुविध सीमा ओलांडून असंख्य समाजघटक नाशिकमध्ये आले आणि रुळलेही. हे सर्व मोठे होता होता त्यांनी नाशिकलाही मोठे केले. अशा समूहांचे नाशिकशी जडलेल्या नात्याचा पदर लवकरच उलगडणार...

वाचत राहा महाराष्ट्र टाइम्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव प्रसारमाध्यमांनी वाचनाचा प्रसार करावा

$
0
0

रविराज गंधे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रसार माध्यमांनी वाचन संस्कृतीचा प्रसार केला पाहिजे. आज वाचन संस्कृतीच्या बाबतीत निराशाजनक चित्र दिसते. वाचनापेक्षा रेडिओ व टीव्ही लोकप्रिय आहे. यांचा विचार करून वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी रेडिओ, टीव्ही व सोशल मीडिया यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सह्याद्री वाहिनीचे निर्माते रविराज गंधे यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेत द. गें. खैरनार गुरुजी स्मृती व्याख्यानात 'प्रसार माध्यमे आणि वाचन संस्कृती' या विषयावरील बुधवारी ते बोलत होते. यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर झालेल्या व्याख्यानाप्रसंगी वसंत खैरनार, सुनीता जाधव, व्ही. एस. जाधव, जयंत खैरनार, विद्या लोंढे उपस्थित होते.

रविराज गंधे म्हणाले, की भारतीय समाजाला वाचन संस्कृती हा विषय नवीन नाही. रामायण व महाभारत यांच्यातून साहित्य प्रवाहाची सुरुवात होते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता हा आपला आद्य ग्रंथ आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी यांच्या साहित्याचा खोल ठसा उमटला आहे. तो आस्तेचा, श्रद्धेचा विषय झाला. नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. इंग्रजांच्या काळात साहित्याच्या गौरवशाली सुंदर परंपरा खंडित व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या काळात इंगजी ही व्यवहाराची व ज्ञान भाषा झाली. त्यामुळे ती भाषा आपल्या मानगुटीवर बसली. त्यामुळे आपल्या वाचन संस्कृतीला ओहटी लागली. भारतात अनेक सत्तांचे आक्रमण झाल्यामुळे आपल्यावर संमिश्र संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख करून देता आली नाही, असेही गंधे यांनी सांगितले. शरद वाघ यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश वाळुंजे यांनी परिचय करून दिला.

आजचे व्याख्यान

विषय : समाज माध्यमावरील अनोखी सामाजिक चळवळ

वक्ते : प्रमोद गायकवाड

स्थळ : यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त​ अप्रशिक्षित शिक्षकांना दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, म्युन्सिपल कार्पोरेशन आणि मान्यता प्राप्त विद्यालयात १ जुलै १९७२ नंतर सेवेत लागलेले व व्यासायिक प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या शिक्षकांना निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात आले नव्हते. अशा निवृत्त अप्रशिक्षित शिक्षकांनी निवृत्तीनंतरचे लाभ मिळावे यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने अशा शिक्षकांना दिलासा दिला असून, निवृत्तीचे लाभ देण्याचा निर्णय दिला असल्याची माहिती मालेगाव तालुका पेन्शनर असो. संघटनेचे अध्यक्ष बी. के. नागपुरे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पेन्शनर असो., पुणे मार्फत उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात यासाठी याचिका दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणिकखांबमध्ये घराला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब गावातील एका घराला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत जनावरांसाठी चारा साठविलेले वैरण, शेतीपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाले. घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. आज दुपारी माणिकखांब येथील लक्ष्मण पांडुरंग चव्हाण यांच्या घराला अचानक आग लागली. यावेळी हे चव्हाण कुटुंबिय शेतात कामाला गेले होते. घटनेची माहिती मिळताच सरपंच हरीश चव्हाण यांनी तत्काळ नगरपालिका इगतपुरी, घोटी टोल नाका, जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषींवर हवी कठोर कारवाई

$
0
0

हल्ल्याचा क्रीडा क्षेत्रातून निषेध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोईंगपटू निखिल सोनवणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व क्रीडा संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून हल्लेखांरावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

खेळाडूंवर अशा प्रकारचे हल्ले होत असून त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीवर परिणाम होत आहे. काही वर्षांपूर्वी 'मविप्र'चे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. निखिलवरील हल्ल्याप्रकरणी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेण्यात येणार असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी आणि आगामी काळात अशा घटना घडू नयेत म्हणून दक्षता घ्यावी, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी केली आहे.

निखिलवर भ्याड हल्ला झाला आहे. अशा हल्ल्यामुळे एखाद्याला कायमचे अपंगत्व येऊन त्याची कारर्किद धोक्यात येऊ शकते. त्याचे वय लहान आहे. ऐन उमेदीच्या काळात असे होणे निश्चित दुखद घटना आहे.

- नितीन हिंगमिरे, क्रीडा संघटक

निखिल राष्ट्रीय स्पर्धेसाठी वर्षभरापासून तयारी करीत होता. या हल्ल्यामुळे तो किमान वर्षभर मागे गेला आहे. आता खेळणार असलेल्या वयोगटातून त्याला यापुढे खेळता येणार नाही.

- शेखर भंडारी,

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक

खेळाडूंना वारंवार टार्गेट केले जात आहेत. अशा हल्ल्यामुळे एखाद्याचे कुटुंब उद्धवस्त होऊ शकते. अनेक खेळाडू जीव तोडून मेहनत करतात. या मेहनतीवर त्यांचे भविष्य अवलंबून असते. यामुळे त्याचे करिअर धोक्यात येणार आहे.

- अविनाश खैरनार,

शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त संघटक

राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचे अपघाती निधन झाले. याता त्यानंतर निखिलवर गुंडांनी हल्ला केला. ही बाब नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. महाराष्ट्रात अशी गुंडगिरी वाढली असेल तर पोलिसांनी त्यात लक्ष देणे गरजेचे आहे.

- मकरंद देव, बॅडमिंटन प्रशिक्षक

निखिलची १७ तारखेला राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्यासाठी तो गेल्या वर्षीपासून सराव करीत होता. ही स्पर्धा हुकल्याने त्याच्या करिअरवर परिणाम होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खेळाडू टार्गेट केले जात आहेत.

- प्रशांत भाबड, कबड्डी प्रशिक्षक

खेळाडूंचा देश म्हटल्या जाणाऱ्या आपल्या देशात हव्या तशा सुविधा मिळत नाहीत. निखिलवरील हल्ला ही शहरातील वाईट घटना आहे. समाज सुदृढ होण्यासाठी खेळ गरजेचा आहे. खेळातच असे होऊ लागले तर पुढील काळ कठीण आहे.

- उमेश आटवणे,

सहसचिव, खो-खो असोसिएशन

अशा घटनांसाठी खेळाडूंनीच सक्षम होणे गरजेचे आहे. रात्री अपरात्री सराव करून खेळाडूंना जावे लागते. त्यावेळी असे प्रकार वारंवार घडतात. संघटनानंनी खेळाडूंना कल्पना देऊन ठेवावी व कणखरपणे या घटनांकडे बघावे.

- हेमंत पाटील, क्रीडा प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा ३८ मिळकतींना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत महापालिकेने मिळकत जप्तीसाठी राबविलेल्या मोहिमेत तब्बल ३७४ मिळकती सील केल्याचे समोर आले आहे. या ३७४ मिळकतींपैकी पालिकेने आतापर्यंत सार्वजनिक वापरासाठीच्या २५ मिळकतींची फेरतपासणी केल्यानंतर त्यांचा व्यावसायिक वापर नसल्याचे समोर आल्याने त्या नागरिकांना वापरासाठी खुल्या केल्या आहेत. व्यावसायिक वापर होत असलेल्या १३ मिळकतधारकांनी अडीच टक्क्याप्रमाणे भाडे भरल्याने त्याही खुल्या करण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून पालिकेने मिळकती सील करण्याची कारवाई सुरू करीत करारनामा नसलेल्या आणि अनधिकृत वापर सुरू असलेल्या व्यायामशाळा, अभ्यासिका, वाचनालये, योगा हॉल, संगीत वर्ग, समाज मंदिरे, ज्येष्ठ नागरिक संघ यांना थेट टाळे लावले आहे. अचानक झालेल्या या कारवाईने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. परीक्षा सुरू असतानाच होत असलेल्या कारवाईने विद्यार्थी त्रस्त झाले असून, नागरिकांसाठी दैनंदिन वापर असलेले वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघ, योगा हॉल, समाज मंदिरांना टाळे लागल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यानंतर पालिकेतील पदाधिकारी आणि आमदारांनी या प्रकरणात उडी घेत, नरमाईचे धोरण स्वीकारण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला. यानंतर प्रशासनाने दोन पावले मागे येत यातील सार्वजनिक वापर असलेल्या मिळकतींना कारवाईतून सूट देण्याचा निर्णय घेतला तर, व्यावसायिक वापर असलेल्या मिळकतींना अडीच टक्के रेडीरेकनर दराने आकारणी सक्तीची केली. नागरिकांच्या दबावानंतर महापालिकेने या मिळकतींचे फेरसर्वेक्षण सुरू केले. यात ज्या ठिकाणी व्यावसायिक वापर होत नाही, त्या मिळकतींचे सील पुन्हा खुले करून दिले जात आहे. ज्या मिळकतींचा व्यावसायिक वापर सुरू असेल त्यांच्याकडून अडीच टक्के दराने रेडीरेकनरप्रमाणे पैसे भरून घेत, मिळकती खुल्या करून दिल्या जात आहेत. बुधवारी महापालिकेने यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महापलिकेने बेकायदा वापर सुरू असलेल्या ४०० मिळकतींपैकी आतापर्यंत ३७४ मिळकती सील केल्याचे जाहीर केले आहे. व्यावसायिक वापर नसलेल्या २५ मिळकतींचे सील पुन्हा काढण्यात आले आहे. व्यावसायिक वापर असलेल्या १३ मिळकतधारकांनी अडीच टक्के रेडीरेकनर दराने दोन आणि तीन महिन्यांचे भाडे भरल्याने त्यांच्या मिळकती पुन्हा खुल्या करून देण्यात आल्या आहेत.

विभाग सील मिळकती खुल्या केलेल्या सार्वजनिक मिळकती पैसे भरलेल्या मिळकती

पंचवटी ७४ ०८ ००

नाशिकरोड ३१ ०३ ०६

सिडको ५८ ०३ ०३

सातपूर ५३ ०१ ००

नाशिक पूर्व १०२ ०६ ०१

नाशिक पश्चिम ५६ ०४ ०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात

$
0
0

\Bअजित जोशी यांचे

सोमवारी व्याख्यान

\B

नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेअंतर्गत यंदा महिला व अर्थसाक्षरता या विषयावर सीए अजित जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. २० मे रोजी संध्याकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये हे व्याख्यान होणार आहे. महिला हक्क संरक्षण समिती यंदाच्या व्याख्यानाचे आयोजन आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

$
0
0

महसूल विभागाकडून बँकांना नव्याने याद्या सादर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले होते. तांत्रिक अडचणी व बँक-महसूलच्या दिरंगाईमुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गच झाले नव्हते. अखेर दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान येत्या दोन ते तीन दिवसात वर्ग केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिली. याबाबत 'मटा'ने १० मे रोजी 'दुष्काळात शेतकऱ्यांची थट्टा' असे वृत्त प्रसिद्ध केले होते.

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर झाले होते. महसूल यंत्रणेने देखील युद्धपातळीवर काम करीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या होत्या. शासनाकडून मालेगाव तालुक्यासाठी शासनाकडून ७५ कोटी ८३ लाख १८ हजार ७९७ रुपये इतके अनुदान प्राप्त झाले होते. तालुक्यातील एकूण १ लाख २२९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र महसूल व बँकांच्या दिरंगाईमुळे अनुदान खात्यावर वर्ग करण्यातील तांत्रिक अडचणी दूर न झाल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित होते. तालुक्यातील सुमारे २१० शेतकऱ्यांचे ३३ लाख ८३ हजार रुपये अनुदान महसूलकडे परत आले होते.

दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खाते क्रमांकातील चुका, इतर हक्कातील नावांचा गोंधळ तसेच तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने तहसीलदार राजपूत यांनी संबंधित तलाठ्यांना दुरुस्ती करावयाच्या याद्या परत पाठवल्यात. त्यातील शेतकऱ्यांचे खाते क्रमांक व अन्य बाबींची दुरुस्ती करून नव्याने लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बँकाकडे पाठवण्यात आल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 6

प्रवेशपत्रावर चूक; विद्यार्थ्यांना फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राची चुकीची माहिती दिल्याचा फटका दिंडोरीत आलेल्या परीक्षार्थींना बुधवारी बसला. परीक्षेपूर्वी काही वेळ अगोदरच नवीन केंद्र समजल्यानंतर तिथपर्यंत पोचणे शक्य नसल्याने त्यांना परीक्षाला मुकावे लागले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने पदवी परीक्षा बुधवारपासून सुरू झाल्या. त्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र मेनरोड, दिंडोरी असा उल्लेख होता. मात्र, प्रत्यक्षात वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात परीक्षा असल्याची माहिती परिक्षार्थींना दिंडोरीत गेल्यानंतर देण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी वणी येथील परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू शकले नाही. दिंडोरी येथील परीक्षा केंद्र असलेले महाविद्यालय शहरापासून तीन किलोमीटरवर आणि ते देखील गावाबाहेर आहे. येथे जाण्यासाठी प्रवासी रिक्षांनी अवाजवी पैसे मागितल्याने अनेक परिक्षार्थी महाविद्यालयापर्यंत पायी गेले. तेथे पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षाकेंद्र दिंडोरी नव्हे तर वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे परिक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे १२ विद्यार्थी परीक्षेस मुकले.

मी अंगणवाडी सेविका असून आमचे प्रशिक्षण अटोपून मी प्रवेशपत्रावरील पत्रानुसार दिंडोरी येथे परीक्षेसाठी गेले. परंतु, तेथील कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्र वणी येथे असून तेथे जाण्यास सांगितले. त्यामुळे मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

- आशा थोरमिसे, परीक्षार्थी

प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचे ठिकाण मेनरोड, दिंडोरी असे विद्यापीठाकडून छापून आलेले आहे. दिंडोरीला गेल्याने अनेक विद्यार्थ्यांना वणी केंद्रात पोहचण्यास उशीर झाला. त्यांना परीक्षेस बसवण्यास परवानगी देण्यात आली असून विद्यापीठास प्रवेशपत्रातील चूक निदर्शनास आणून दिली आहे.

- प्रा. प्रवीण कांबळे,

केंद्र समन्वयक, वणी महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार आरोपींना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गाडीवर थुंकल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून वृद्ध नागरिकास लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी करणाऱ्या चार आरोपींना नाशिकरोड न्यायालयाच्या न्या. मयुरा यादव यांनी प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांनुसार आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

फुलासिंग पाटील (वय ५५, रा. रमाबाई आंबेडकर नगर, देवळालीगाव) या नागरिकास सप्टेंबर २०१६ मध्ये मनीष तेलोरे याने त्याचे नातेवाईक प्रविण तेलोरे, गणेश साळवे आणि लक्ष्मण भालेराव यांच्या मदतीने मारहाण केल्याची घटना घडली होती. जखमीच्या पत्नीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात या चौघा संशयितांविरोधात फिर्याद दाखल केलेली होती. तपासाधिकारी पोलिस उपनिरिक्षक होनमाने याने नाशिकरोड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या चौघा आरोपींविरोधात सरकार पक्षातर्फे दिलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरुन त्यांना प्रत्येकी दोन वर्षाची सक्तमजुरीची आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय प्रत्येकी ५०० दंड आणि दंडातून जखमीस भरपाईपोटी ३० रुपये देण्याचा निकाल नाशिकरोड न्यायालयाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images