Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जराजर्जर देहांना येथे लाभतो ‘दिलासा’!

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

jitendratarte@MT \B

नाशिक : \Bजिथे रक्ताच्या नात्यातले ज्येष्ठही कुटुंबांसाठी ओझे बनतात, अशा काळात एकाच छताखाली विविध व्याधींनी जखडलेले एक-दोन नव्हे तर तब्बल ६० वृद्ध सख्ख्या भावंडांप्रमाणे राहत असतील, ही कल्पनाही दंतकथाच वाटते... पण हे प्रत्यक्षात घडते आहे अन् ते ही आपल्या शहरात. काही ना काही प्रसंगाघाताने रक्ताच्या बंधांपासून दुरावलेले जर्जर आजी-आजोबा आयुष्याची संध्याकाळ 'दिलासा' च्या कुशीत शांतपणे व्यतीत करताहेत. जराव्याधींनी शिणलेल्या ज्येष्ठांच्या देह अन् मनांवर सिडकोतील दिलासा केंद्र पोटच्या मुलाप्रमाणे आभाळमायेची पखरण करणारे एक कुटूंबच बनले आहे.

जागतिक कुटूंब दिनानिमित्त समोर आलेली ही कहाणी आहे सिडकोतील दिलासा केंद्राची. उभी हयात ज्यांनी रक्ताचे पाणी करून आपल्या चिमुकल्यांच्या पंखांत बळ भरले, त्याच चिमुकल्यांच्या सावलीला दैवगतीने पारखे झालेले वृद्ध 'दिलासा'च्या सावलीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी या केंद्राचे सतीश आणि उज्ज्वला जगताप या दाम्पत्याने रोवलेले रोपटे आज चांगलेच विस्तारले आहे. शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी ज्येष्ठांना कुणीतरी जवळ करते. पण अनेक कुटुंबांना सतावतो तो शारीरिकदृष्ट्या परावलंबी ज्येष्ठांचा प्रश्न. पण ज्येष्ठांवर आभाळमायेची पखरण करीत दिलासा या संस्थेने शारीरिकदृष्ट्या परावलंबी ज्येष्ठांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. या सेवाभावी जगताप दाम्पत्यांसाठी आता 'दिलासा' हाच श्वास झाला आहे.

\Bऔक्षण अन् स्मृतींना उजाळाही

\Bआता 'दिलासा'च्या या केंद्रात ६० आजी-आजोबा निवासी आहेत. सर्वांचा दिनक्रमही निश्चित आहे. पहाटेच्या आन्हिकांपासून प्रार्थना, चहा-पाणी-नाश्ता, योगाभ्यास, आरोग्य तपासणी दुपारच्या सत्रात विविध संस्थांच्या वतीने आयोजित होणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम, गप्पा-गोष्टी, यासोबतच कुणाचे वाढदिवस किंवा प्रत्येक सणवारही येथे आवर्जून साजरे होतात. प्रत्येक सणाला जसा येथे गोडाधोडाचा स्वयंपाक होतो. वाढदिवसाला औक्षणाचेही ताट ओवाळले जाते. काही ज्येष्ठांना काळाच्या प्रभावाने निरोप देण्याचे दु:खद प्रसंगही दिलासा परिवारावर ओढावले आहेत. पण बाह्य समाजातील कुटुंबे विसंवादाने विस्कटत असताना अशा बंधांमुळे दिलासा परिवाराचीची वीण घट्ट बसली आहे.

अंतर्बाह्य स्वच्छता, सकस आहार अन् प्रेम-आदराच्या भावनेची जीवापाड जपवणूक ही दिलासा परिवाराच्या कार्याची त्रिसूत्री आहे. समाजऋण फेडण्यासाठी या ज्येष्ठांचा अवयवदान रुपाने असणारा सहभाग, त्यांच्या नातवंडांचे त्यांच्या हस्ते होणारे सत्कार, ज्येष्ठांचे वाढदिवस-सणवार सारेकाही इथे एखाद्या कुटुंबासारखे जपले जाते. येथे आजी-आजोबा रमले की त्यांना स्वत:चे घरदेखील पाहुण्यासारखे वाटू लागते हा या परिवारातील प्रेमाचा बंध आहे.

- \Bउज्ज्वला व सतीश जगताप, \Bसंचालक, दिलासा केअर सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वरासह बहिणीचे मोबाइल चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मंगल कार्यालयात झोपी गेलेल्या नवरदेवासह त्याच्या बहिणीचे मिळून चार मोबाइल चोरट्याने नेले. उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेत नवरदेवाने तक्रार दिली आहे.

देवळालीगावातील रेणुका मंदिर, तेली गल्ली येथे राहणारे समाधान गणपत जाधव (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचे १५ मे रोजी लग्न आहे. त्यानिमित्त १२ मे रोजी जवळच असलेल्या संताजी मंगल कार्यालयात गोंधळाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर नवरदेवसह सर्व मंडळी मंगल कार्यालयात झोपी गेली. रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्याने जाधव यांचा ओप्पो व जियो असे दोन मोबाइल तर त्यांची बहीण सविता गोरख मोरे यांचे लावा व रिलायन्स कंपनीचे दोन असे चार मोबाइल फोन चोरून नेले. मोबाइल चोरी झाल्याचा प्रकार सकाळी लक्षात आला. जाधव यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीगावात वृद्धेचा विनयंभग

$
0
0

देवळालीगावात

वृद्धेचा विनयंभग

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वृद्ध महिलेचा दोन तरुणांनी मागील भांडणाच्या कुरापतवरून विनयभंग केल्याची घटना देवळालीगावात घडली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, घराजवळील सार्वजनिक शौचालयात सोमवारी (दि. १३) जात असताना देवळालीगावातच राहणारे संशयित राहुल भीमा राक्षे व जयराम लोंढे हे आले व मागील भांडणाची कुरापत काढून महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचं ऋण फेडणारा धामणकर परिवार

$
0
0

नाशिक : मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, या विचाराला धामणकर उद्योगसमूहाने छेद दिला आहे. पन्नास वर्षांपूर्वी नाशिक शहरातल्या कर्मठ वातावरणात ब्रेडसारखे उत्पादन करून त्यांनी हा व्यवसाय नावारुपाला आणला. आपण नाशिककरांचे देणे लागतो या उदात्त भावनेने या कुटुंबाने नफ्यातील कोट्यवधींची रक्कम शहरातील अनेक संस्थांना दान दिली आहे. जागतिक कुटुंबदिन साजरा करणाऱ्या सर्वांसाठीच या कुटुंबाचे दातृत्व पथदर्शी ठरणारे आहे.

धामणकरांचा आदर्श ब्रेड हा नाशिकच्या प्रत्येक नागरिकाला परिचित आहे. धामणकर कुटुंबीयांपैकी सर्वांत मोठे असलेले श्रीराम सदाशिव धामणकर रेल्वेत नोकरीला होते. रेल्वेतील वातावरण न पटल्याने त्यांनी नाशिकमध्ये हिंद एजन्सी या नावाने 'फिक्स रेट' असलेले कापडाचे दुकान सुरू केले. काही दिवसांनंतर सरकारने कापडाच्या व्यवसायावर नियंत्रण आणल्याने त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर नाशिकरोड जेलमध्ये तयार होत असलेला बेकरीचा माल विकण्यास धामणकरांनी सुरुवात केली. या मालाबाबत तक्रारी वाढल्याने त्यांनी हा माल विकणे बंद केले आणि स्वत: बेकरीचा माल उत्पादित करून विकण्याचे ठरविले. उत्पादनाचे ज्ञान नसल्याने पुण्याच्या हिंदुस्तान बेकरीत काम करून त्यांनी ज्ञान अवगत केले. नाशिकमध्ये येऊन त्यांनी उत्पादनाला सुरुवात केली. आपण शिकून आलेले बेकरी व्यवसायातील कसब त्यांनी बंधू श्रीकृष्ण, बहीण कृष्णा, गंगू, सिधू यांनाही शिकविले. सचोटीने व्यवसाय हा त्यांचा बाणा होता. आपण ग्राहकाकडून पैसे घेतो त्याचा योग्य मोबदला त्याला दिलाच पाहिजे, या हेतूने त्यांनी मालात कधीही तडजोड केली नाही. २००४ मध्ये हा व्यवसाय एका उंचीवर पोहोचल्यावर त्यांनी तो बंद करण्याचा निर्णय घेतला.

अनेक संस्थांना देणगी

अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत असल्याने नाशिककरांनी भरभऱून प्रेम दिले. या प्रेमाचे उतराई व्हावे यासाठी त्यांनी अनेक संस्थांना मदतीचा हात दिला. पुणे विद्यार्थिगृहाला त्यांनी एक कोटी रुपयाची देणगी दिली. या देणगीतून श्रीराम धामणकर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कॉलेजची उभारणी करण्यात आली. दुसरे बंधू श्रीकृष्ण धामणकर यांच्या नावाने एमबीएचे कॉलेज सुरू केले. धामणकर बंधू-भगिनींचे शिक्षण नाशिक शिक्षण प्रसाराक मंडळाच्या रुंगटा हायस्कूलमध्ये झाले होते. या संस्थेच्या ऋणातून उतराई व्हावे म्हणून त्यांनी या संस्थेला एक कोटींची देणगी देऊन सभागृह बांधण्यास मदत केली. गंगापूररोडवर असलेले श्री गुरुजी रुग्णालय, बालाजी मंदिर, गायत्री मंदिर अशा अनेक संस्था, मंदिरांना या कुटुंबाने देणग्या दिल्या आहेत. शहरात अशा अनेक संस्था आहेत, ज्यांना धामणकर कुटुंबीयांनी मोलाचा आधार दिला आहे.

आम्ही काही श्रीमंत नाही. जो व्यवसाय केला तो सचोटीने केला. त्यातून आलेल्या रकमेतून नाशिककरांचे ऋण फेडावे या भावनेने आम्ही संस्थांना देणगी दिली. आम्ही कठीण परिस्थितीतून आलो आहोत. त्यामुळे खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे-गंगू धामणकर, ज्येष्ठ सदस्य, धामणकर परिवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच रात्रीत दोन घरफोड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड बस स्टँड मागील महालक्ष्मीनगर व फुलेनगरात सोमवारी (दि. १३) रात्री दोन घरफोडी घडल्या आहेत. शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

महालक्ष्मी नगरमधील बाळासाहेब अनाजी कासव हे शिक्षक सुटीनिमित्त बाहेरगावला गेले होते. कुलूप असलेल्या त्यांच्या गंगासदन या बंगल्याची कडी तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील रोकड व इतर साहित्यावर डल्ला मारला. तसेच फुलेनगरमधील श्रीमती मोरे यांच्याही घराला कुलूप असल्याने चोरट्यानी आत प्रवेश केला. परंतु नेमका त्याच वेळी गुरखा तेथे आल्याने त्यांचा चोरीचा डाव फसला. चोरट्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान पेज फोटो

$
0
0

रमजान पेज फोटो - पंकज चांडोले

--

खाद्यपदार्थांची रेलचेल...

रमजानचे उपवास सुरू झाल्याने जुने नाशिक परिसरात बहुविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आले आहेत. त्यात सुतारफेणी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सुतारफेणीच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कोटींचा टीडीआर घोटाळा दडपला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचा नगररचना विभाग हा शहरातील काही निवडक बिल्डर आणि धनाढ्यांसाठी काम करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थायी समितीने नाशिकरोड विभागातील देवळाली शिवारात रस्त्यासाठी जागा हस्तांतरीत करताना झालेल्या टीडीआर घोटाळ्याची सुरू केलेली चौकशी नगररचना विभागाने परस्पर गुंडाळली असून, जागा मालकाला अभय देण्याचा प्रताप विभागाने केला आहे. विशेष म्हणजे शंभर कोटींच्या या टीडीआर घोटाळ्याचा तपास दडपण्यासाठी भाजपच्याच एका बड्या पदाधिकाऱ्यांने आपली शक्ती पणाला लावल्याची चर्चा आहे.

महापालिकेचा नगररचना विभाग हा वादाचा विषय बनला आहे. नगरचना विभाग टीडीआर घोटाळ्यासाठी आधीच बदनाम झाला असून, हा शिक्का पुसण्याचे काम करण्याऐवजी घोटाळ्यांची मालिका वाढवण्याचे काम या विभागात सुरू आहे. देवळाली शिवारातील टीडीआर संदर्भातील असाचं एक घोटाळा जानेवारी महिन्यात समोर आला होता. नाशिकरोड विभागातील देवळाली शिवारातील दत्त मंदीर येथील सर्वे क्र.२९५ येथील रस्त्याच्या जागेच्या बदल्यात संबंधित जागा मालकाला टीडीआर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू नगररचना विभागाच्या प्रिटिंग मिस्टेकमध्ये सिन्नर फाटा येथील जागा दत्त मंदीर येथे दर्शविण्यात आली होती. नगररचना विभागाने आपली प्रिटिंग मिस्टेक दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आलेली संधी साधून मोठी आर्थिक उलाढाल करून घेतली. रेडिरेकनरच्या दराप्रमाणे सिन्नर फाटा येथील जागेचा दर सुमारे साडे पाच हजार रुपये प्रति चौरस मीटर तर दत्त मंदीर येथील जागेचा दर २५ हजार रुपये चौरस मीटर होता. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी सिन्नर फाटा येथील जागेचा दर देण्याऐवजी संबंधित शाह नामक व्यक्तीला दत्त मंदीर येथील दरानुसार २५ हजाराचा टीडीआरचा दर दिला. या दरामुळे संबंधित व्यक्तीला शंभर कोटींचा फायदा झाला. जानेवारी महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय गाजला होता. त्यामुळे या यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

नगररचना विभागाने याची चौकशी सुरू करण्याचा प्रयत्न करत संबंधित अभियंत्याला नोटीसही बजावली होती. परंतु, भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्यांने हे चौकशी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोट्यवधीचा टीडीआर घोटाळा दडपून बड्या व्यक्तींना वाचवून पालिकेचे आर्थिक नुकसान केले जात असल्याची चर्चा आहे.

'त्या' तीस प्रकरणांनाही अभय

देवळाली गावातील टीडीआर घोटाळ्याबरोबरचं गेल्या दोन वर्षात टीडीआरचे वाटप करताना तीस प्रकरणात अनियमितता केल्याचा पुराव्यानिशी आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला होता. यासंदर्भात त्यावेळी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. परंतू या प्रकरणांच्या चौकशीकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. स्थायी समितीत सदस्यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यावर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली; मात्र अद्यापपर्यंत त्यावर कुठलांच निर्णय झालेला नाही. यासंदर्भात माहिती घेतली असता अधिकाऱ्यांनी चौकशी संदर्भात कुठले पत्र अथवा सुचना प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे सत्ताधारी भाजपचेच लोक एकीकडे घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी करत असतांना, भाजपचेच काही पदाधिकारी घोटाळे दडपत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुसुचित जाती आयोगाचे अध्यक्ष घेणार आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसुचित जाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राम शंकर कठेरिया बुधवारी नाशिक विभागाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या मुख्य उपस्थितीत शिर्डी येथे अनुसुचित जाती संदर्भातील प्रलंबित खटल्यांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे.

बुधवारी (दि. १५) दुपारी साडे तीन वाजता कठेरिया विमानाने शिर्डी येथे दाखल होतील. गुरुवारी दुपारी दोन वाजता ते अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात प्रलंबित अनुसुचित जाती विषयक खटल्यांचा आढावा घेणार आहेत. जातीवाचक शिवीगाळ व तत्सम अनेक खटल्यांची जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेतानाच पोलिस आणि संबंधित यंत्रणांना याबाबतचे निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. १७ मे रोजी कोपरगाव येथून रेल्वेने ते आग्राकडे मार्गस्थ होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीताराम कुंटेंचा उद्या पहाणी दौरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याचे पालकसचिव सीताराम कुंटे गुरुवारी (दि. १६) जिल्ह्यात दाखल होणार असून, येवला, चांदवड, सिन्नर यांसारख्या काही तालुक्यांमध्ये ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. यानंतर शुक्रवारी (दि. १७) ते जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

पाणी टंचाईची समस्या भीषण रूप धारण करीत असून, यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासन विविध स्तरावर उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व पालक सचिवांनी जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्याचे पालक सचिव कुंटे गुरुवारी जिल्ह्यात येणार आहेत. सिन्नर, येवला, चांदवड यांसारख्या काही तालुक्यांमधील दुष्काळी गावांना भेट देऊन ते ग्रामस्थांनी चर्चा करणार आहेत. गुरुवारी ते नाशिकमध्ये मुक्कामी असून, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी आढावा बैठक घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप - चित्र

पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर ऑनलाइन ‘वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा आणि पेपर तपासणीच्या पद्धतीतील अत्याधुनिकीरणापाठोपाठ आता विद्यापीठाने राज्यभरातील सर्व परीक्षा केंद्रांना जोडणारे अटेंडन्स ॲप विकसित केले असून, त्याची त्वरित अंमलबजावणीही सुरू झाली आहे. हे ॲड्रॉइड ॲप सर्व परीक्षाकेंद्रांवर नेमून दिलेल्या पर्यवेक्षकांना अनिवार्य करण्यात आले आहे. याद्वारे पर्यवेक्षक, भरारी पथके आणि परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील मॉनिटरींग रूममधून ऑनलाइन लक्ष ठेवता येणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या संकल्पनेतून हे अॅप साकारले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या विविध ज्ञानशाखांमधील एकूण १५० अभ्यासक्रमांची परीक्षा सुरळीत सुरू झाली. राज्यभरातील ७२९ परीक्षा केंद्रांवर एकूण ६ लाख ८७ हजार ४०४ एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सर्व परीक्षा केंद्रे ऑनलाइन जोडली गेली असून, नाशिकमधील मध्यवर्ती कार्यालयातून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. पर्यवेक्षकांना हे ॲप देण्यात आले असून, परीक्षा केंद्रावर येताच त्यांनी ते ओपन करून सेल्फी त्यावर अपलोड केली की त्या पर्यवेक्षकाचा फोटो आयडी तसेच लोकेशन विद्यापीठाच्या सिस्टीमवर दिसते. इन आणि आऊट असे दोन्ही पर्याय त्यात असून पर्यवेक्षकांना पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्र सोडतानाही ॲपवर आऊटचा पर्याय क्लिक करणे अनिवार्य आहे.

पेपर तपासण्याच्या यापूर्वी विकसित केलेल्या 'कॅप' (सेंट्रल ॲसेसमेन्ट प्रोग्राम) सिस्टीमनंतर अटेंडन्स ॲपचा वापर सुरू झाल्याने परीक्षापद्धतीत आणखी पारदर्शकता आली आहे. राज्यात प्रथमच अशी प्रणाली तयार करण्यात आली आहे.

'अॅप'मधील सुविधा

अॅपमध्ये पहिल्याच दिवशी पर्व परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांची नोंद झाली आहे. या ॲपद्वारेच पर्यवेक्षकांची मानधनाची देयके निघणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कक्षातून मोठ्या स्क्रीनवर संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांचे लोकेशन पाहता येते. पर्यवेक्षकाच्या फोटोओळखीसह सर्वप्रकारच्या काटेकोर नोंदी या सिस्टीमद्वारे ठेवता येऊ लागल्या आहेत. विविध परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देणाऱ्या भरारी पथकालाही या ॲपचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या पथकानेही आपल्या ठिकठिकाणच्या भेटी या ॲपच्या माध्यमातून नोंदवायच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटर्न फास्ट

$
0
0

माहिती दर्शक फलकाची दुर्दशा

गंगापूर रोड : स्वामी विवेकानंद मार्गावरील विद्यानगर सोसायटी येथे प्रभागाचे नाव दर्शवणाऱ्या फलकाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पत्ता शोधताना त्रास होत आहे. हा फलक वाकला असून, वाहनचालकांना संबंधित प्रभागाकडे जाण्याची चुकीची दिशा दाखवत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत असून, त्वरित येथे नवीन फलक बसवण्याची मागणी केली जात आहे.

कचऱ्याचे साम्राज्य

गंगापूर रोड : वसंत विहार कॉलनीमध्ये गोदापात्राजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा टाकण्यास मनाई असताना देखील येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. शिळे अन्न, प्लास्टिक, कागदाचे तुकडे असा कचरा इथे टाकला जात आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, स्थानिकांना त्याचा त्रास होतो आहे. त्यातच पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून येथे सफाईच केली जात नसल्याने नागरिक त्रासले आहेत.

डीपी धोकादायक

गंगापूर रोड : आयचीत नगरमधील विजेचे डीपी धोकादायक स्थितीत आहेत. येथील समाजमंदिराबाहेर असणाऱ्या डीपीचे झाकणच गायब झाले आहे. त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तर याच रांगेत पुढे असणाऱ्या डीपीचे झाकण अर्धे उघडेच आहे. जवळपास परिसरातील सर्वच डिपींची अवस्था सारखीच आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याआधी येथील डिपीची डागडूजी करण्याची मागणी होत आहे.

फलकासमोरच पार्किंग

कॉलेजरोड : बिग बाजारच्या समोरच्या रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रातच वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे येथे चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर पार्क केले जात आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना वाहन चालवण्यास अडचण होत आहे. त्यातच शहरात ठिकठिकाणी वाहन नो-पार्किंगमध्ये पार्क केल्यास कारवाई होत असताना इथे मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसते. त्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

कचऱ्याचे साम्राज्य

कॉलेज रोड : विसे मळा परिसरातील सुदर्शन कॉलनीमध्ये मोकळ्या भूखंडावर कचरा टाकला जात आहे. येथे शिळे अन्न टाकले जाते. त्यामुळे मोकाट जनावरांचा येथे वावर वाढला आहे. तसेच येथून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. या कचऱ्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असून, त्वरित संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

०००००००००००००००००००००००००००

पालिकेचे दुर्लक्ष

चांडक सर्कल : होलाराम कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रभागाचे नाव दर्शवणाऱ्या फलकाची दुर्दशा झाली आहे. हा फलक चांडक सर्कलवरून होलाराम कॉलनीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना दिशा दाखवण्याचेही काम करतो. पण हा फलक विरुद्ध दिशेला वाकल्यामुळे वाहनचालकांना हा फलकच दिसत नाही. त्यामुळे या प्रभागाचा पत्ता शोधताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्वरित येथे नवीन फलक बसवण्याची मागणी होत आहे.

पालापाचोळ्यांचा ढिगारा

राका कॉलनी - येथील उद्यानांबाहेर पालापाचोळ्याचा ढिगारा पसरला आहे. आणि ह्याच ढिगारांवर लोक कचरा टाकत असून त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. परिसरातील रस्त्यांच्या बाजूला देखील पालापाचोळ्याचा ढिगारा पसरला आहे. पालिकेच्या सफाई विभागाने येथिल सफाईकडे कानाडोळा केला असून परिसर अस्वच्छ होण्यास हातभार लागत आहे. येथे त्वरित परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पेअरपार्ट चोरी; दोन जण जेरबंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहनचोरीसह वाहनांचे स्पेअरपार्ट काढून भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोपेड, वाहनांच्या बॅटऱ्या तसेच चार टायर मॅकव्हीलसह असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चोरट्यांच्या अटकेने भद्रकाली पोलिस ठाण्यातील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला.

समीर हमीद शहा (रा. पिरबाबा दर्गाजवळ, गंजमाळ पोलिस चौकीसमोर) आणि इरफान नईम शेख (एमएसईबी सबस्टेशनसमोर, ढिकलेमळा, जेलरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. क्राइम ब्रँचचे पीएसआय बलराम पालकर व त्यांचे सहकारी ११ मे रोजी सांयकाळी गस्त घालत असताना गंजमाळ येथे एक नंबर प्लेट नसलेली अॅक्सेस मोपेड त्यांना दिसली. पोलिसांनी संशयितांना थांबवून नंबर प्लेटबाबत विचारणा केली. मात्र, संशयितांची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदरचे वाहन त्यांनी पंचशीलनगर येथून चोरी केल्याची कबुली दिली. युनिटच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यात तथ्य आढळून आले.

दरम्यान, संशयितांची पोलिस कोठडीत चौकशी सुरू असताना पोलिस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना याच संशयितांनी रिक्षाच्या व ट्रकच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून संशयितांकडून नऊ बॅटऱ्या, कारचे चार टायर मॅकव्हीलसह असा एक लाख ३९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यामुळे देवळाली कॅम्प व भद्रकाली पोलिस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई युनिट एकच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्ती निस्वार्थ असावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'संसाराला भक्तीची जोड असणे गरजेचे असते. आत्मिक समाधान आणि शांतता अध्यात्मिक ग्रंथांच्या चिंतनातून प्राप्त होते. पण, मानव कायम परमेश्वराची भक्ती केल्यानंतर फळाची अपेक्षा ठेवतो. त्यामुळे साधनेचा आणि चिंतनाचा सकारात्मक परिणाम जाणवत नाही. जीवनात सौख्य, समाधान आणि आनंद उपभोगायचा असेल, तर निस्वार्थ भक्ती असावी,' असे निरुपण हरिद्वार येथील आचार्य हरिकृष्ण महाराज यांनी केले.

'नाशिक सेवा समिती ट्रस्ट'च्या वतीने 'प्रेम रसमयी श्रीमद् भागवत कथा सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याचे सहावे पुष्प मंगळवारी गुंफण्यात आले. गेल्या पाच दिवसांत या सोहळ्यात अध्यात्म, भक्ती, आराधना, साधना, सत्संग, प्रवचन याबाबत निरुपण करण्यात आले. श्री कृष्ण भगवान यांच्या कथेतून जीवनाला अध्यात्मिकतेकडे नेण्यासाठीचे निरुपण केले गेले.

मंगळवारी प्रचवनात हरिद्वार येथील आचार्य हरिकृष्ण महाराज म्हणाले, 'मानवाला जाणीव होण्यासाठी मनाची आवश्यकता असते. मनासाठी अंतःकरण गरजेचं असतं. त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे अंतःकरणावरच अवलंबून असतात. अंतःकरणाचे प्रारब्ध संपल्यास मानवाचा मृत्यू होणारच असतो. याचाच अर्थ असा की, जाणीव आणि शरीराला मनाच्या मार्गातून अंतःकरण जोडलेले असते. अंत:करण आणि मनाची सांगड अध्यात्मिक कथांच्या वाचनातून, श्रवणातून आणि सत्संगातून घालता येते. परमेश्वर सर्वांना सारखेच फळ देत असतो. पण, प्रत्येकाला अधिक फळाची अपेक्षा असते. त्यामुळे व्यक्ती असमाधानी असतो. जेव्हा निस्वार्थपणे भक्ती केली जाते. परमेश्वराची आराधना करण्यात येते. तेव्हा जीवन सार्थकी लागते. त्यामुळे मानवाने अध्यात्मिक पुस्तकांच्या वाचनात मन गुंतवणे गरजेचे आहे.' भागवत कथांच्या श्रवणात भाविक दंग झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विजेचा शॉक लागल्याने मंगळवारी (दि. १४) वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. एकजण नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरावर पत्रे फिट करीत होता, तर दुसरा पाणी मारीत होता. विद्युत वाहिनीस धक्का लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी ओझर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमनाथ भारत दिवे (२५ रा. हिवरगाव ता. सिन्नर) मंगळवारी (दि.१४) सकाळी सुशिला साळवे (रा. दिक्षी ता. निफाड) यांच्या घराच्या बांधकामावर पत्रे फिट करीत असताना विजेच्या तारेस लोखंडी अँगलचा धक्का लागल्याने जमिनीवर कोसळला. अरविंद दिवे यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत गंगावाडी (पो. लाखलगाव) येथील शरद अंबादास वळवे (२४) हा युवक बांधकाम सुरू असलेल्या आपल्या घरावर पाणी मारत असताना घरावरून गेलेल्या वीज तारेस त्याचा धक्का लागला. यामुळे शॉक बसून तो गंभीर भाजला गेला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. नाशिकरोड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजी महाराज म्हणजे धगधगते क्रांतिपर्व

$
0
0

शिवव्याख्याते डॉ. आबा पाटील यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती संभाजी महाराजांची विनाकारण बदनामी करण्यात आली. ते इतिहासातील धगधगते क्रांतिपर्व होते, असे प्रतिपादन सायखेडा येथील शिवव्याख्याते डॉ. आबा पाटील यांनी केले.

गोदाघाटावरील वसंत व्याख्यानमालेचे चौदावे पुष्प गुंफताना मंगळवारी (दि. १४) ते बोलत होते. पंडितराव खैरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात 'शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार ऐकला तरी आजही रक्त सळसळते. मग छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा खराखुरा काळ कसा असेल, याची कल्पनाच करता येते. इतिहासातील अनेक व्यक्तिरेखांना विनाकारण बदनाम करून ठेवण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज हेदेखील यातीलच एक नाव आहे. ते कोणत्याही शाळेत गेले नाहीत. त्यांची मातोश्री हेच त्यांचे विद्यापीठ होते. छत्रपती संभाजी महाराज अवघ्या साडेआठ वर्षांच्या असताना महाराष्ट्रावर मिर्झाराजे जयसिंग व दिलेर खान यांचे आक्रमण चालून आले. नाईलाज झाल्याने शिवाजी महाराजांना काही किल्ले त्यांच्याकडे सुपूर्द करावे लागले. महाराष्ट्राचे पाणी काय असते हे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला वयाच्या नवव्या वर्षी दाखवून दिले. संभाजी महाराज अत्यंत विद्वान होते. त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना सोळा भाषा अवगत होत्या, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंचावर नगरसेवक शाहू खैरे, योगेश खैरे, डॉ. शिरीष राजे उपस्थित होते. हिरालाल परदेशी यांनी पंडितराव खैरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अरुण शेंदुर्णीकर यांनी परिचय करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

आजचे व्याख्यान :

वक्ते : रविराज गंधे (मुंबई)

विषय : प्रसारमाध्यमे आणि वाचन संस्कृती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशियर लूटप्रकरणी दोन जण गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

चंदनपुरी शिवारातील सावकार पेट्रोल पंपांवरील कॅशियरला चाकू मारून लूटमार करणाऱ्या दोन्ही गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर गजाआड केले. पंपावरील कामगारानेच लुटीचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेख अझरूद्दीन शेख शहाबुद्दीन (वय २०, रा. म्हाळदे शिवार, मालेगाव) आणि अंकुश बापू वाघ (वय २२, रा. कुंजर ता. चाळीसगाव जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. तर मुख्य संशयित युसूफ भुऱ्या (पूर्ण नाव माहीत नाही) हा फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. युसूफ सराईत गुन्हेगार आहे. अंकुश हा लुटण्यात आलेल्या कॅशियरच्या पंपावर काम करीत होता.

किल्ला पोलिस ठाणे हद्दीत २१ मार्च २०१९ रोजी हा गुन्हा घडला होता. सावकार पेट्रोल पंपावरील कॅशियर राहुल पारख हे दिवसभरातील हिशेबाचे सुमारे २ लाख ८० हजार रुपये पेट्रोलपंप मालकाकडे रात्री घेऊन जात होते. दोन अज्ञात व्यक्तींनी मंसुरा कॉलेज परिसरात दुचाकीवरून पाठीमागून येत पारख यांच्या डोक्यावर हल्ला केला आणि रोख रकमेसह मोबाइल लंपास केला होता. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाकडून या गुन्हाचा तपास सुरू होता. शहरातील सुजन थिएटर परिसरात शेख अझरुद्दीन हा तरुण दुचाकीवर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्याने त्याचा साथीदार युसूफ भूऱ्या व अंकुश यांच्यासोबत या गुन्हाचा कट रचून चोरी केल्याचे कबूल केले.

कामगारानेच केला घात

कामगार अंकुश याच्याशी अझरुद्दीन व युसूफ यांची दोन महिन्यापूर्वी सावकार पेट्रोल पंपावर ओळख झाली. वाघ यानेच कॅशियर पारख हा रोज रात्री रोख रक्कम मालकास देण्यात जात असल्याचे दोघांना सांगून लुटण्याचा कट रचला. त्या दिवशी कॅशियर पंपावरून निघाला. त्यावेळी अंकुशने अझरुद्दीन व युसूफ यांना मिसकॉल दिला. दबा धरून बसलेल्या त्या दोघांनी हा कट यशस्वी केला. चोरट्यांनी रक्कम आपसात वाटून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्याचा उपनिरीक्षकावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलिस कर्मचारी संजय खंडू पवार यांनी राखीव पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बनतोडे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. १३) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. काही महिन्यांपूर्वी गैरहजेरी लावल्याचा राग आल्याने संबंधित कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. त्याप्रकरणी त्याला पंधरा दिवसांपूर्वीच शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. त्याचा राग येऊन कर्मचाऱ्याने चाकूहल्ला केला असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याविरोधात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राखीव पोलिस उपनिरीक्षक बनतोडे हे सोमवारी (दि. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे काम संपवून घराकडे जात होते. त्यावेळी कर्मचारी संजय पवार याने बनतोडेंना शिवीगाळ करून गोंधळ घातला. तसेच त्यांना बजावलेली नोटीस फाडून अधिकाऱ्यांच्या तोंडावर मारून फेकली. यानंतर पवार यांनी खिशातील चाकू काढून बनतोडेंवर हल्ला केला. त्यांनी चाकूचा वार वाचविण्यासाठी हात पुढे केला असता अधिकारी बनतोडे यांचे दोन्ही हातांवर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर बनतोंडेंना खाली पाडून पवार यांनी चाकूने छातीत वार करणार तितक्यात इतर कर्मचारी दाखल झाले. तोपर्यंत पवार यांनी दुचाकीवरून पळ काढला.

बंदीवानाचा कारागृहात
आत्महत्येचा प्रयत्न
धुळे : अत्याचार प्रकरणातील संशयित भारत बुधा कोळी याने सोमवारी (दि. १३) सायंकाळी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लोखंडी सळईवर डोके आटपून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी कारागृह पोलिस बापू निकम यांच्या फिर्यादीवरून बंदीवानावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील भारत बुधा कोळी याला अत्याचारप्रकरणी दाखल गुन्ह्यात रविवारी (दि. १२) पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, अत्याचाराचा आरोप असलेल्या भारत कोळीला नागरिकांनी चोप दिला होता. त्यात त्याला दुखापत झालेली होती. कारागृहात आल्यावर त्याने सोमवारी (दि. १३) सायंकाळी स्वच्छतागृहात जाऊन लोखंडी सळईवर डोके आपटून घेत त्यानंतर बराकमध्ये आल्यावर टीव्ही डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच कारागृह पोलिस आणि बंदिवान त्याच्या दिशेने धावले. त्यानंतर त्याला शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: रोईंगपटू निखिलवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला

$
0
0

नाशिक:

राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावं लागणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल हा मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोल पंपासमोर चोरट्यांनी त्याला अडवलं. मात्र, त्याच्याकडे काहीही मिळालं नाही. याच रागातून त्यांनी त्याच्यावर कोयता आणि चाकूने हल्ला केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेला मुकावं लागणार आहे. पुण्यातील नाशिक फाट्याजवळ आर्मी बोटिंग क्लब येथे १७ ते १९ मे दरम्यान राज्यस्तरीय रोईंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी निखिल कसून सराव करत होता. याआधीही त्यानं राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्य पदकाची कमाई केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटप्रेसला ६२०० दशलक्ष नोटांचे टार्गेट

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

येथील करन्सी नोट प्रेसमध्ये वीस रुपयांच्या नव्या नोटेची छपाई केली जाणार आहे. या नोटेचे डिझाइन प्रेसला मिळाले आहे. या आर्थिक वर्षात वीस रुपयाच्या तब्बल ८०० दशलक्ष नोटा छापल्या जाणार आहेत. या आर्थिक वर्षात प्रेसला विविध प्रकारच्या ६२०० दशलक्ष नोटा छपाईचे लक्ष्य देण्यात आल्याची माहिती प्रेसच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, या प्रेसला दहा, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नव्या डिझाइनमधील नोटा छपाईचे काम देण्यात आले होते. ते यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. आता फक्त वीसच्या नव्या नोटांची छपाई बाकी आहे. दोन-तीन दिवसांत तिची छपाई सुरू होईल, अशी माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी 'मटा'ला दिली.

या वर्षी एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँकेने वीस रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचे जाहीर केले होते. महात्मा गांधींच्या मालिकेतील या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही आहे. ही नोट हिरवट पिवळ्या रंगाची आहे. प्रेसच्या सूत्रांनी सांगितले की या नोटेचे डिझाइन मिळालेले असल्याने तिची छपाई कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. वीस रुपयांच्या नव्या स्वरुपातील ८०० दशलक्ष नोटांची छपाई केली जाणार असून, त्यासाठी यंत्रणा व कामगार सज्ज आहेत.

यंदाचे लक्ष्य मोठे

नाशिकरोड नोट प्रेसमध्ये सध्या विविध प्रकारच्या १७ दशलक्ष नोटांची दररोज छपाई केली जात आहे. त्यामध्ये पाचशेच्या आठ दशलक्ष, शंभराच्या पाच दशलक्ष, पन्नासच्या चार दशलक्ष नोटांचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात सहा हजार दशलक्ष नोटा छपाईचे लक्ष्य देण्यात आले होते. कामगारांनी अविरत श्रम करून ही छपाई केली आणि एक वेगळा आदर्श घालून दिला. या आर्थिक वर्षात नाशिकरोड प्रेसला एकूण ६२०० दशलक्ष नोटा छपाईचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामध्ये वीस रुपयाच्या ८०० दशलक्ष नोटा तसेच पाचशे, शंभर, पन्नास व दहाच्या नोटांचा समावेश आहे.

कामगारांचे सहकार्य

याबाबत जगदीश गोडसे म्हणाले की, गेल्या वर्षी सहा हजार दशलक्ष नोटा छपाईचे लक्ष्य नाशिकरोड नोट प्रेसला देण्यात आले होते. कामगारांनी ते यशस्वीरीत्या पूर्ण केले. नोटबंदीच्या काळात येथील प्रेस कामगारांनी वर्षभर सुटी न घेता काम करून देशवासीयांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातही या कामगारांनी साप्ताहिक सुटी न घेता काम केले. गेल्या वर्षी दहा, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नव्या डिझाइनच्या नोटा छापून दिल्या. आता वीसच्या नोटांची छपाई बाकी आहे. नाशिकरोड प्रेस कामगार अत्यंत मेहनती, कुशल व प्रामाणिक आहेत. त्यांच्या मदतीने हे लक्ष्यही पूर्ण करू. नवीन आधुनिक मशिनरी आल्यानंतर काम आणखी वेगात होईल.

नाशिकची आघाडी

देशात नोटांची छपाई करणाऱ्या चार प्रेस आहेत. त्यात रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालबोनी प्रेसचा तसेच प्रेस महामंडळाच्या नाशिकरोड आणि मध्यप्रदेशातील देवास येथील प्रेसचा समावेश आहे. त्यात नाशिक नोट प्रेसने आघाडी घेतली आहे. प्रेस महामंडळ हे सरकारी चलन तसेच पासपोर्ट, चेक, बाँड अशा सुरक्षाविषयक इतर कागदपत्रांची छपाई करते. प्रेस महामंडळाच्या देशभरात नऊ प्रेस असून, त्यात हैदराबाद, मुंबई, कोलकता, नोयडा, देवास, होशिंगाबाद यांचा तसेच नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरीटी प्रेस (आयएसपी) व करन्सी नोट प्रेसचा (सीएनपी) समावेश आहे. आयएसपीमध्ये रिव्हेन्यू स्टॅम्प, पोस्टल स्टॅम्प, पासपोर्ट, व्हिसा, चेक आदींची छपाई होते. सीएनपीमध्ये चलनी नोटांची छपाई होते. त्यामध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे व पाचशेच्या नोटांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images