Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मांजरपाडा बोगद्याचे काम निकालानंतर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळाच्या दाहकतेत होरपळणाऱ्या येवला तालुक्यातील काही गावांना सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. देशमाने गावापासून त्यांनी दुष्काळी दौऱ्याची सुरुवात करीत नगरसूल व राजापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणीसमस्या जाणून घेतली. सर्वांच्या सहकार्याने या संकटाला सामोरे जायचे आहे, अशी साद महाजन यांनी जनतेला घातली.

पालकमंत्री महाजन यांचे सोमवारी दुपारी देशमाने गावात आगमन झाले.

जिल्ह्यातील मांजरपाडा योजनेच्या बोगद्याचे प्रलंबित काम चांदवड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक निकालानंतर सुरू केले जाईल, असे सांगत गेल्या १५ वर्षांपासून मांजरपाडा प्रश्नावर निवडणुका जिंकून येथील आमदारांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची केवळ आश्वासनावर बोळवण केली असल्याचा आरोपही महाजन यांनी केला. आम्ही याप्रश्नी प्रत्यक्षात काम करून दाखवले असून, येत्या पावसाळ्यात पहिल्या पावसात पाणी कालव्यात सोडले जाईल, असेही पालकमंत्री महाजन म्हणाले.

येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे दुष्काळाचा सामना करताना येणाऱ्या विविध अडचणींविषयी पालकमंत्री महाजन यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये मजुरांच्या हातांना काम हवे असल्यास त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेसह सरकारच्या विविध योजनांतर्गत कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे मजुरांनी कामांची यादी द्यावी, त्यांना त्वरित कामे उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले. तालुक्यातील नगरसूल व राजापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महाजन यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार, शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, येवला तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता पवार, पंचायत समितीच्या सभापती कविता आठशेरे, शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शरद लहरे, दिलीप मेंगळ, विठ्ठल आठशेरे, भाजपचे प्रमोद सस्कर, तालुकाध्यक्ष राजू परदेशी, नाना लहरे, समीर समदडिया, नगरसूलचे सरपंच प्रसाद पाटील, मनोज दिवटे आदींसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व येवला तालुक्यातील शिवसेना-भाजपचे पदाधिकारी दौर्‍यात सहभागी झाले होते.

'जमीन लिलाव स्थगित करण्याचे नियोजन'

दुष्काळी परिस्थितीबाबत आम्ही आपल्या पाठीशी आहोत' असे सांगताना पालकमंत्री महाजन यांनी जिल्हा बँकेच्या कारवाईबाबत शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकीत कर्जवसुलीसंदर्भात जाहीर झालेल्या नोटिशीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, की या संदर्भात आपण जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबतीत पुढील दोन दिवसांत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमीन जाहीर लिलावाबाबतची प्रक्रिया स्थगित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आमचे नियोजन आहे. कांदा अनुदानासह विविध शासकीय योजनांमधील उर्वरित शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

दौऱ्यात अधिकाऱ्यांनाही मुभा!

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सोमवारच्या येवला दौऱ्यादरम्यान आचारसंहिता कारणास्तव विविध शासकीय विभागाचे अधिकारी दूर राहिले होते. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकाद्वारे आजपासून त्याला स्थगिती दिली असून, उद्यापासून संपूर्ण राज्यात मंत्र्यांच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आल्याची माहितीही पालकमंत्री महाजन यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली. दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला दिलासा येतानाच जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला बरोबर घेऊन लवकरच या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशीही ग्वाही महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभ्यासक्रमांचा मसुदा जाहीर

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bचालू व आगामी शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ माध्यमिक स्तरावर बदलण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे. या क्षमता विधानांच्या मसुद्यावर पाठ्यपुस्तकाच्या वेबसाईटवर तज्ज्ञ व जाणकारांना शुक्रवार, १० मे रोजीपर्यंत अभिप्राय देण्यात येणार आहे. या नंतरच्या टप्प्यात या मसुद्याला अंतिम रूप देण्यात येणार आहे.

अकरावीचा अभ्यासक्रम २०१९-२० पासून बदलणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचा अभ्यासक्रम पुनर्रचित होणार आहे. पाठ्यपुस्तक मंडळाने अभ्यासक्रमाच्या बदलांसाठी क्षमता विधानांची मांडणी केली होती. त्यानुसार काही मुद्द्यांची मांडणी पाठ्यपुस्तक मंडळाने केली आहे.

मंडळाच्या वेबसाईटवर मांडणी करण्यात आलेल्या मुद्द्यांचा समावेश आहे. यामध्ये शिक्षणाचे दैनंदिन व्यवहारात कृतिशील उपयोजन, शिक्षण संशोधन उद्योग व्यवसायासाठी आवश्यक कौशल्याची पायाभरणी, प्रगल्भ व जबाबदार नागरिकत्वाचे भान, नवनिर्मिती व सर्जनशीलतेचा विकास, भारतीयत्वाचा सार्थ अभिमान, विवेकनिष्ठ दृष्टिकोनाची जोपासना व उच्च शिक्षणासाठीची पूर्वतयारी प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.

पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या क्षमता विधानांवर प्रत्येक इयत्तेच्या अखेर विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण व प्रत्येक इयत्तेच्या अखेरीस काय शिकले याची मांडणी करण्याच्या दृष्टीने ही विधाने तयार करण्यात आली आहे. बदलण्यात व पुनर्रचित करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांशी संबंधित तज्ज्ञ व संबंधितांचे अभिप्रायही पाठ्यपुस्तक मंडळाने मागविले आहेत. येत्या १० मे पर्यंत यासाठी अभिप्राय पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे. यानंतर या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमंताच्या जीवनाचे प्रयोजन रामकार्यच

$
0
0

स्वामी अद्वैतानंद यांचा संदेश

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\B

रामायणाच्या कालखंडात हनुमंताचा प्रत्येक श्वास हा रामकार्यासाठी कार्यरत राहीला. प्रभू रामचंद्रांची सुग्रीवाशी झालेली भेट असो वा बिभिषण भेट, या महत्त्वाच्या प्रसंगातही हनुमंताची शिष्टाई त्याच्यातील उत्कृष्ट राजनीतीज्ञाचे दर्शन घडविते. रामकार्य हेच हनुमंताच्या जीवनाचे प्रयोजन होते, असा संदेश स्वामी अव्दैतानंद यांनी दिला.

चिन्मय मिशनच्या नाशिक शाखेतर्फे गंगापूर रोडवरील शंकराचार्य सभागृहात आयोजित प्रवचनमालेदरम्यान ते बोलत होते. प्रवचनमालेचा मंगळवारी (दि. ७) समारोप होणार आहे. यावेळी स्वामी म्हणाले, की रामायणाच्या कथाभागात कधी सत्यपक्षापुढे मोठा पेच उभा राहीला. कधी मोठे आव्हान निर्माण झाले तर कधी निराशेचे प्रसंग आले पण हनुमंतांनी अतिशय धीराने या प्रसंगोत्पातांचा सामना केला. शत्रुपक्ष कितीही का बलाढ्य असेना पण रामाच्या सत्यपक्षाला साथ देत हनुमंताने कधीही हार मानली नाही. हनुमंतापासून काही शिकायचे असेल तर समर्पणभाव शिकायला हवा, असाही संदेश त्यांनी दिला.

सात दिवसीय प्रवचनमालेची सांगता मंगळवारी (दि. ७) होत आहे. या समारोप सत्राचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिटलरविषयी समाजात दोन विचार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक स्तरावर खूपच मोठे नुकसान झाले. पाच वर्षे, आठ महिने, सात दिवस चाललेले हे युद्ध ८ मे १९४५ला हे युद्ध संपले. जर्मनीचा तत्कालीन सर्वेसर्वा एडॉल्फ हिटलर या युद्धाला कारणीभूत होता. या महायुद्धातील हिटलरच्या अत्याचारांची, त्यांच्या महत्त्वाकांक्षांच्या वर्णनाची इतिहासात नोंद केली आहे. हिटलरविषयी त्यांना आदर्श मानणारे तर काही लोक कर्दनकाळ मानणारे, असे दोन्ही विचारांचे दिसतात, असे प्रतिपादन अध्यापक पुष्पावती, रुंग्ठा कन्या विद्यालयचे डॉ. जोगेश्वर नांदूरकर यांनी गुंफले.

प्रौढ नागरिक मित्र मंडळ आयोजित वसंत व्याख्यानमालेचे सहावे पुष्प सोमवारी पार पडले. डॉ. नांदूरकर यांनी हे पुष्प 'एडॉल्फ हिटलर व दुसरे महायुद्ध' या विषयावर गुंफले. ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन हिटलरविषयी नांदूरकरांनी विचार मांडले. ऋचक योग हिटलरच्या कुंडलित होता. या योगामुळे आणि मंगळ ग्रह चांगला असल्यामुळे हिटलर ते शूर, धाडसी, होता. त्यामुळेच त्याच्यात लढाऊ वृत्ती निर्माण झाली. या ग्रहांमुळे कौटुंबिक सौख्य त्यांना मिळाले नाही. वडिलांनी कठोरपणे वागणूक दिली. खरेतर हिटलर स्वभावाने हळवा होता. परिस्थितीने त्यांना कठोर बनवले. सैन्यात दाखल झाल्यानंतर खूप पराक्रम त्यांनी करून दाखवला. पण ज्यू लोकांविषयी त्यांच्या मनात अतिशय राग होता. त्यामुळे त्यांनी सोयीनुसार डाव टाकून सत्ता आपल्या हातात घेतली. नाझी पक्षाची स्थापना केली.

चंद्रकांत जामदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक केले आहे. कल्पना कुवर यांनी परिचय करून दिला. अनंत साळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रदीप देवी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रमजान’साठी वाहतूक बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रजानच्या महिन्यास मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवार दुधबाजार, चौकमंडई परिसरात गर्दी होण्याची शक्यता असल्याने या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून, ७ मे ते ६ जून या कालावधीत साडेचार ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

रमजानच्या कालावधीत जुने नाशिक, भद्रकाली दुधबाजार, चौकमंडई, महात्मा फुले चौक या परिसरात दररोज सायंकाळी उपवासाचे पदार्थ खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या परिसरात त्यांना अडथळा होऊ नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. दुधबाजार ते महात्मा फुले मार्केट, मौलाबाबा दर्गा ते येथून आत जाणाऱ्या सर्व मार्गांवरील वाहनांच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी तसेच बादशाही कॉर्नर येथून दुधबाजाराकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जुने भद्रकाली टॅक्सी स्टॅण्ड येथून पिंपळचौक मार्गे, त्र्यंबक पोलिस चौकी व गाडगेमहाराज पुतळा अशा मार्गाचा वापर करावा. फाळकेरोड टी पॉईंट येथून फुले मार्केट, मौलाबाबा दर्गाकडे जाणारी वाहतूक फाळकेरोड टी पॉइंट येथून सारडा सर्कल मार्गे, गंजमाळ, खडकाळी सिग्नल, त्र्यंबक चौकी, पिंपळचौक मार्गे इतरत्र जाईल. महात्मा फुले पोलिस चौकी, चौक मंडई, फाळके रोड टी पॉईंट चौक (हॉटेल हाजी दरबार) या मार्गावरून महात्मा फुले पोलिस चौकी येथून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. चौक मंडईकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल व टाळकुटेश्वर पूल मार्गे इतरत्र जाईल.

वडाळ्यातही निर्बंध

रमजान महिन्यात वडाळागाव येथेही उपवासाच्या पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने येथील गौसिया मशिद ते खंडोबाचौक तसेच खंडोबा चौक ते गौसिय मशिद हा मार्ग सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहनधारकांनी इतर मार्गांचा अवलंब करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येयनिश्चितीतूनच यश शक्य

$
0
0

प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एखाद्या ध्येयाने पछाडलेला माणूसच क्रांती करू शकतो. तुमच्यापुढे ध्येयाची निश्चिती असेल तरच यश मिळते, असे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.

संवादच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात प्राचार्य पी. एस. पवार यांच्या 'फुला फुलातून चाललो' या आत्मचरित्रावर आधारित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. गुंजाळ यांनी पी. एस. पवार यांचा जीवनपट आपल्या व्याख्यानातून उलगडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिमन्यू सूर्यवंशी होते. प्रा. गुंजाळ म्हणाले, की 'फुलाफुलातून चाललो' हे प्राचार्य डॉ. पी. एस. पवार यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा आलेख आहे. जीवनाच्या सर्वच कालखंडाचे दर्शन यातून घडते. या पुस्तकात त्यांनी जीवनातील सर्वच घटना या प्रामाणिकपणे मांडल्या. प्रामाणिकपणा हाच आत्मचरित्राचा गाभा असतो. पवार सरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली. गिरणाकाठी असलेले भऊर हे सरांचे मूळ गाव. दहावीपर्यंतचे शिक्षण गावात झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी नाशिक गाठले. विद्यार्थ्यांसाठी काम करताना प्रत्येक कामाची त्यांनी नोंद ठेवली. मुलांना शाळेत शिकवत असताना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. एम. ए. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बाबुराव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी पवारांना सिन्नर महाविद्यालयात मुलांना शिकवण्याची संधी दिली. एखाद्या व्यक्तीला नोकरी लागल्यानंतर त्याच्यातील शिक्षणाची उर्मी कमी होते; मात्र पवारांच्या बाबतीत तसे घडले नाही. अहमदनगर येथील लोक साहित्याचे अभ्यासक गंगाधर मोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कवी अनिल यांच्या कवितांवर १९८० मध्ये पीएचडी मिळवली. याच दरम्यान इगतपुरी येथे 'मविप्र'चे महाविद्यालय सुरू झाले. तेथे त्यांना प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर निफाड, सटाणा, नांदगाव येथेही प्राचार्य म्हणून काम केले. याच दरम्यान सावित्रीबाई फुले विद्यापीठात विविध अधिकार मंडळावर काम करण्याची संधी मिळाली. ध्येय निष्ठता कशी असावी हे पवार सरांकडून शिकावे, असे गुंजाळ यावेळी म्हणाले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजानचा आज पहिला उपवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुस्लीम बांधवांचा धार्मिकदृष्ट्या पवित्र महिना असलेल्या रमजान पर्वला सोमवारी (५ मे) रोजी सुर्यास्तानंतर प्रारंभ झाला. मुस्लीम बांधव आजपासून (मंगळवार) पहाटेपासून रमजानचा पहिला निर्जळी उपवास करणार असल्याचे शाही मशिदीमध्ये झालेल्या चॉँद समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

रमजान पर्वाला आजपासून सुरुवात झाली असून, बाजारपेठ सज्ज झाली आहे. शहरातील सर्व मशिदींमध्ये बैठकीची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. संपूर्ण महिनाभर समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो.

रमजान पर्वकाळात मुस्लीम समाजबांधवांची संपूर्ण दिनचर्या बदललेली असते. मशिदींमध्ये नमाजपठणासाठी दिवसभर गर्दी असते. तसेच रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये 'तरावीह'ची विशेष सामुहिक नमाज अदा केली जाते. इस्लामी कालगनणा चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे उर्दू महिना चंद्रदर्शन घडल्यानंतर सुरू होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेड डावा कालवा; मेअखेर आवर्तन सोडणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दुष्काळाच्या परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी विंचूर येथे चारा डेपो व या भागात पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यासाठी आवर्तन सोडणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यात निफाड तालुक्यातील विंचूर, भरवस फाटा या ठिकाणी त्यांनी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले. गेल्या वर्षी अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे विंचूर व परिसरात दुष्काळाच्या झळा जाणवायला लागल्या असून, पिण्याचे पाणी शेतीसाठी पाणी, जनावरांना चारा व पाणी अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विंचूर, भरवस फाटा व परिसरात दुष्काळ पाहणी दौरा केला.

या वेळी पालकमंत्री महाजन यांच्यासमवेत दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य संजय शेवाळे, निफाड तालुकाध्यक्ष संजय वाबळे आदी होते.

शेतकरी कर्जवसुली थांबवावी, पालखेड डाव्या कालव्यास आवर्तन सोडावे, तसेच परिसरात विंचूर मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागण्या विंचूर व भरवस फाटा येथील शेतकऱ्यांनी महाजन यांना केल्या. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पालखेड डाव्या कालव्यास आवर्तन सोडण्यात येईल, तसेच विंचूर, लासलगाव व देवगाव जि.प. गट मिळून विंचूर येथे येत्या दोन ते तीन दिवसांत चारा डेपो सुरू करणार असल्याचे महाजन यांनी जाहीर केले. याचबरोबर शेतकऱ्यांचे नादुरुस्त रोहित्रही बदलून द्यावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

याप्रसंगी विंचूरच्या सरपंच ताराबाई क्षीरसागर, जि. प.चे माजी सदस्य ज्ञानेश्वर पवार, पं.स.चे माजी सदस्य राजाराम दरेकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष नीलेश सालकाडे, प्रसिद्धिप्रमुख किशोर पाटील, शिवसेना तालुका उपाध्यक्ष निवृत्ती जगताप, शहराध्यक्ष नानासाहेब जेऊघाले, भाजपचे विंचूर शहराध्यक्ष सोपान दरेकर, उपाध्यक्ष गोरख सोनवणे, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. रमेश सालगुडे, नीलेश दरेकर, ज्ञानेश्वर जाधव, महेश गिरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवचरित्राच्या आदरासह अंमलबजावणीही हवी!

$
0
0

प्रा. सोपान वाटपाडे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

समाजातील लाखो तरुण आज व्यसनाधीन झाले असून शिवछत्रपतींना हे अपेक्षित नव्हते. त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापूर्वी त्यांचे विचार घेतले पाहिजे. जीवनात खऱ्या अर्थाने कुशल व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, समता, न्यायप्रविष्ठ, कृषी धोरण, बालकांचे व विधवांचे संगोपन व न्याय याचे खरे उदाहरण म्हणजेच शिवचरित्र आहे. आदर राखत त्यांच्या विचारांची जीवनात अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत प्रा. सोपान वाटपाडे यांनी व्यक्त केले.

इंदिरानगर येथील क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना सन्मान व आदर होता. आता आपण त्यांच्याच स्वराज्यात गर्भलिंग चाचणी करून मुलींची हत्या करीत आहोत. माता-पित्यांचा सांभाळ करण्याऐवजी आपण वृद्धाश्रमांची संख्या वाढवित आहोत. शिवधर्म व शिवतंत्र पाळले पाहिजे. जाती-धर्माच्या नावाखाली दहशतवाद व दंगली घडवून आणल्या जातात. शिवरायांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज उभारले, अशी माहिती प्रा. वाटपाडे यांनी दिली.

संस्काराची जपवणूक केली पाहिजे. महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्याची गरज निर्माण झाली आहे. थोड्याशा फायद्यासाठी लोक बेईमानी करतात. परंतु, स्वराज्यात माणसांची मरायची शर्यत लागली होती. शिवरायांनी येथे माणसे पैशावर नाही तर निष्ठेवर तयार केली होती. हुंडा दिला वा घेतला नाही तर हुंडा बळी व प्रथा थांबवा असे फर्मानच महाराजांनी काढले होते. शिवरायांनी ५० किल्ले बांधले, १११ किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. ३६० किल्ले सांभाळले, त्यांची डागडुजी केली. परंतु, कोठेही स्वत:चे नाव दिले नाही. शिवचरित्राचा अभ्यास केला तर समाजात कोणतीही समस्याच राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राजश्री शौचे यांनी प्रा. वाटपाडे यांचा सत्कार केला. रमेश नागरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भालचंद्र जगताप यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'हनुमंताच्या जीवनाचे प्रयोजन रामकार्यच'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक रामायणाच्या कालखंडात हनुमंताचा प्रत्येक श्वास हा रामकार्यासाठी कार्यरत राहीला. प्रभू रामचंद्रांची सुग्रीवाशी झालेली भेट असो वा बिभिषण भेट, या महत्त्वाच्या प्रसंगातही हनुमंताची शिष्टाई त्याच्यातील उत्कृष्ट राजनीतीज्ञाचे दर्शन घडविते. रामकार्य हेच हनुमंताच्या जीवनाचे प्रयोजन होते, असा संदेश स्वामी अव्दैतानंद यांनी दिला. चिन्मय मिशनतर्फे गंगापूर रोडवर शंकराचार्य सभागृहात ते बोलत होते. रामायणातील प्रत्येक प्रसंगात हनुमंतांनी अतिशय धीराने या प्रसंगोत्पातांचा सामना केला. शत्रुपक्ष बलाढ्य असताना रामाच्या सत्यपक्षाला साथ हनुमंताने साथ दिल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येयनिश्चितीतूनच यशप्राप्ती होते शक्य!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ध्येयाने पछाडलेला माणूस क्रांती करू शकतो. तुमच्यापुढे ध्येयाची निश्चिती असेल तर यश मिळते, असे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांनी केले. संवादच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात प्राचार्य पी. एस. पवार यांच्या 'फुला फुलातून चाललो' या आत्मचरित्रावर आधारित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. गुंजाळ यांनी पी. एस. पवार यांचा जीवनपट आपल्या व्याख्यानातून उलगडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिमन्यू सूर्यवंशी होते. प्रा. गुंजाळ म्हणाले, की 'फुलाफुलातून चाललो' हे प्राचार्य डॉ. पी. एस. पवार यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा आलेख आहे. जीवनाच्या सर्वच कालखंडाचे दर्शन यातून घडते. या पुस्तकात त्यांनी जीवनातील सर्वच घटना या प्रामाणिकपणे मांडल्या. प्रामाणिकपणा हाच आत्मचरित्राचा गाभा असतो. पवार सरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. गिरणाकाठचे भऊर हे सरांचे मूळ गाव. दहावीपर्यंतचे शिक्षण गावात झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी नाशिक गाठले. विद्यार्थ्यांसाठी काम करताना प्रत्येक कामाची त्यांनी नोंद ठेवली. मुलांना शाळेत शिकवत असताना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बाबुराव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी पवारांना सिन्नर महाविद्यालयात शिकवण्याची संधी दिली. एखाद्या व्यक्तीला नोकरी लागल्यानंतर त्याच्यातील शिक्षणाची उर्मी कमी होते; मात्र पवारांच्या बाबतीत तसे घडले नाही. अहमदनगर येथील लोक साहित्याचे अभ्यासक गंगाधर मोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कवी अनिल यांच्या कवितांवर १९८० मध्ये पीएचडी मिळवल्याचे प्रा. गुंजाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टिकोन बदला; अन्यथा नाती संपतील!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्यानेच आज कौटुंबिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्फोट हे फक्त अणू रेणूंचे होत नाहीत तर नात्यांचेही होत आहेत. घटस्फोट हे फक्त पती-पत्नींचे होत नाही तर आई-मुलगी, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, बहिण-बहिण असे नात्यांचेही होत आहेत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नाही तर नाती संपतील, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ राकीब अहमद यांनी केले. नाशिकरोड बँक आणि मसाप नाशिकरोड शाखेतर्फे नाशिकरोडला सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत 'नांदा सौख्यभरे' या विषयावर राकीब यांनी विचार मांडले. 'थँक्यू, सॉरी, प्लीज' या तीन शब्दांनी जीवन सुंदर होते. फक्त हे तीन शब्द व्यक्ती व काळ बघून वापरू नयेत, असा सल्ला अहमद यांनी यावेळी श्रोत्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान ऑनलाइनवरील बातमी

$
0
0

पाचव्या टप्प्यात झाले

६२.५६ टक्के मतदान

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७४.६ टक्के

दिल्ली : काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता सात राज्यांतील ५१ जागांवर आज शांततेत मतदान पार पडलं. या सातही राज्यात एकूण ६२.५६ टक्के मतदान झालं असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७४.६ टक्के तर उत्तर प्रदेशात ५७.३३ टक्के आणि बिहारमध्ये ५६.७९ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. आज झालेल्या मतदानामुळे यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आदींचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.

पाचव्या टप्प्यात महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. आतापर्यंत एकूण ४२४ जागांसाठी मतदान झाल्याचं निवडणूक उपायुक्त डॉ. सक्सेना यांनी सांगितलं. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिकांमध्ये हाणामारी झाली. अनंतनागमध्ये सर्वात कमी म्हणजे ३ टक्के मतदान झालं. लडाखमध्येही हिंसक घटना घडल्या. मात्र या ठिकाणी ५२ टक्के मतदान पार पडलं. बिहारमध्ये मात्र शांततापूर्वक मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यांतील ५१ जागांसाठी एकूण ६७४ उमदेवार निवडणूक रिंगणात होते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांत आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये सर्वात कमी ३७.३७ टक्के मतदान झालं तर होशंगाबादमध्ये सर्वाधिक ६८.३८ टक्के मतदान झालं आहे. ६ वाजल्यानंतरही मध्यप्रदेशातील सातही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे काँग्रेसचे उमेदवार पवन काजल यांनी आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायप्रोफाइल जागांवर मतदान

पाचव्या टप्प्यात अनेक हायप्रोफाइल जागांवर मतदान झालं. रायबरेलीत यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी मैदानात आहेत. तर अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मुकाबला भाजपच्या उमेदवार स्मृती इराणींशी आहे. लखनऊमध्ये राजनाथ सिंह, हजारीबागमधून जयंत सिन्हा आणि जयपूरमधून राज्यवर्धन सिंह राठोड मैदानात असून या जागांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

असं झालं मतदान (टक्केवारीत)

पश्चिम बंगाल : ७४.०६

उत्तर प्रदेश: ५७.३३

बिहार : ५६.७९

मध्यप्रदेश : ६२.९६

झारखंड : ६३.९९

राजस्थान : ६३.०३

जम्मू-काश्मीर : १७.०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी आयोग आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बोगस आदिवासींनी प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकऱ्या लाटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये निकाल देऊनही महाराष्ट्र सरकारकडून कारवाई केली जात नसल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राज्याच्या मुख्य सचिवांसह आदिवासी सचिवांना समन्स काढल्याचा दावा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, सदस्य एच. के. डमोर, जॉइंट सेक्रटरी शिशिरकुमार रथ, महाराष्ट्र सरकारतर्फे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, उपसचिव, खासदार चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या सुनावनीत आयोगाने हे आदेश दिले आहेत.

राज्यातील सेवेत असलेल्या बोगस आदिवासींबाबत न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही राज्य सरकारकडून कारवाई केली जात नसल्याने खा. चव्हाण यांनी आदिवासी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर सोमवारी दिल्लीत आयोगाच्या कार्यालयात सुनावणी झाली. खा. हरिश्चंद्र चव्हाण व राज्यातील आदिवासी संघटना पदाधिकारी यांनी सुनावनी दरम्यान अनेक बाबी आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या. तीन बोगस आदिवासी प्रमाणपत्र देणारे वसू पाटील यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली नाही, एसआयटी रिपोर्ट राज्य सरकारने दाबून ठेवला, १२ हजार बोगस आदिवासी प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या लाटणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असून, ते बनावट प्रमाणपत्र अद्यापही रद्द केलेले नसल्याची धक्कादायक माहिती सुनावणी दरम्यान निदर्शनास आली आहे.

आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी महाराष्ट्र सरकारने बोगस आदिवासी प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या लाटणाऱ्यांना न काढता हेतूपुरस्कर त्यांना संरक्षण देण्याचा धक्कादायक आदिवासी विरोधी निर्णय घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होऊन तब्बल २ वर्ष उलटले. तरी मुख्यमंत्री व मंत्री मंडळाने एक समिती गठीत करून लोकसभा, विधानसभा निवडणूका होईपर्यंत चालढकल करण्यासाठीच २०२० या वर्षात समिती बैठक ठेवल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या प्रतिनिधीने यावेळी दिली. बोगस आदिवासी हटावसाठी राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही अॅक्शन टेकन रिपोर्ट देखील आयोगाला दिला नसल्याचे उघडकीस आले आहे. तसेच राज्याचे मुख्य सचिव, आदिवासी सचिव हे देखील कारण न देता हेतूपुरस्कर सुनावनीला गैरहजर राहिल्याने आयोगाने दोघांना समन्स काढले आहेत. आयोगापुढे सुनावणीसाठी वनवासी कल्याण संघटनमार्फत गोवर्धन मुंडे, ओपरोडचे सचिव नंदकुमार कोडापे, विष्णू साबले, डॉ. ठोंबरे, लुकमान तडवी, लिनेश वळवी, सतीश लेंबे, आत्र्यभाई वलवी यांच्यासह विदर्भ, ठाणे, नाशिक, जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारवरही नाराजी

बोगस आदिवासींनी प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकऱ्या लाटल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारकडून कारवाई केली जात नसल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त करताना राज्य सरकारच्या कामागिरीवरही आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा दावा खासदार चव्हाण यांनी केला आहे. यावर राज्य सरकारला उत्तर द्यावे लागणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी लांबविले पासबुक प्रिंटिंग मशीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील कुसूंबा गावात सोमवारी (दि. ६) पहाटे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम लुटीची घटना घडल्याचे समोर आले. मात्र, या घटनेत चोरट्यांनी एटीएमऐवजी पासबुक प्रिंटिंगचे मशीन चोरून गावापासून काही अंतरावर फेकून पळ काढला. चोरट्यांच्या गोंधळाचा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असून, साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालय परिसरात गेल्याच आठवड्यात कॅनरा बँकेचे एटीएम लुटीचा प्रयत्न फसला होता यानंतर आताच्या घटनेने पोलिसांच्या सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कुसुंबा गावात सोमवारी पहाटे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला. या वेळी आलेल्या चोरट्यांनी सुरुवातीस कुऱ्हाडीने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी ठरले. यानंतर चोरट्यांनी बाजूला असलेल्या पासबुक प्रिंटिंग मशीन ओढून नेत गावाबाहेर फोडून फेकून दिले. त्यांना या मशीनमध्ये रोकड हाती न लागल्याने त्यांचा अखेर भ्रमनिरास झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डेसह पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सर्व माहिती जाणून घेत पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे चोरटे एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यात गुन्ह्याच्या घटना वाढत असून, त्यावर वचक लावण्यात पोलिस दल अपयशी ठरत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना रोखण्याचे आव्हानच आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारामध्ये ‘अक्षय्य’बहर!

$
0
0

घागरीसह, पुजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ६) पूर्वसंध्येला पितरांच्या पूजेसाठी लागणाऱ्या पूजा सामग्रीच्या वस्तुंनी बाजारपेठ सजली होती. घागरीसह पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत असल्याने बाजारामध्ये ‘अक्षय्य’बहर आला होता. या दिवशी होणारी सोने खरेदी लक्षात घेता सुवर्णबाजारही सजला असून, हा मुहूर्त कॅश करण्याच्या तयारीत आहे.

खान्देशात अक्षय्य तृतीयेला अन्यनसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सासुरवाशिणीला अक्षय्यतृतीयेची ओढ असते. इतर कुठल्याही सणाला माहेरी जाण्याचे टाळणारी महिला अक्षय्य तृतीयेला मात्र माहेरी जातेच. याच दिवशी घराघरा पूर्वजांच्या नावाने घागरी भरून विधीवत पूजा करून पितरांना भोजन देण्याची प्रथा आहे. बाजारातही अक्षय्य तृतीयाचा बहर सोमवारी सायंकाळी दिसून आला. नागरिकांनी आंबे, घागरी तसेच पूजासाहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी केली होती.

अक्षय्य तृतीयेच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तुंची दुकाने मध्यवर्ती बाजारबपेठेत मांडण्यात आली आहेत. या दिवशी पितरांच्या नावाने घागर भरून तिची पूजा करण्यात येते. या घागरी बाजारात आल्या आहेत. केसर, बदामा आंब्याला या वेळी मागणी होत आहे. यासह केळीची पाने, नागवेलची पानेही विक्रीस आली आहेत. पूजा साहित्य व फुलांनाही मागणी वाढली असून, फुलबाजारात मोठी गर्दी झाली आहे.

सुवर्णबाजाराची सज्जता
‘अक्षय्य’ म्हणजे कधीही क्षय न पावणारे, म्हणजेच कधीही न संपणारे. म्हणूनच या दिवशी नागरिक सोने खरेदी करतात. कारण सोने म्हणजे भाग्याची आणि भरभराटीची खुण. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात कायम भरभराट होईल आणि लक्ष्मीचे वास्तव्य राहील अशी त्या मागची लोकभावना असते. हे लक्षात घेऊन सुवर्णबाजारही सज्ज झाला आहे. बाजारातील मरगळ दूर करून अक्षय्यतृतीयेचा हा मुहूर्त कॅश करण्यासाठी सराफ बाजारात अंलकाराच्या आकर्षक व वैविध्यपूर्ण श्रृखंलांनी दुकाने सजली आहेत.

पत्त्याच्या डावांचेही नियोजन
खान्देशात अक्षय्य तृतीयेला पत्ते अर्थात जुगार खेळण्याचीही परंपरा आहे. जो कधीही पैसे लावून जुगार खेळत नाही त्या व्यक्तीही या दिवशी प्रथा म्हणून जुगार खेळतात. त्यामुळे काही हौशींनी पत्त्यांचे डाव मांडण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. या सणाला ‘अक्षय्य तृतीया’ नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले आहे की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही’ म्हणून हिला मुनींनी अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे.

धुळ्यात आंब्यांचा दरवळ
धुळे : शहरातील बाजारपेठेत अक्षय्य तृतीयानिमित्त आंबे दाखल झाले आहेत. चार दिवसांपूर्वी ८० रुपयांच्या पुढे विकल्या जाणाऱ्या आंब्यांची सोमवारी (दि. ६) मागणी वाढली होती. सध्या बाजारात केसर, बदाम, लंगडा, हापूस व गावराणी आंब्यांचा दरवळ ग्राहकांना खेचून घेत आहे. हापूस आंब्यांची सातशे रुपये प्रति पेटीप्रमाणे विक्री होत आहे. अक्षय्य तृतीयेच्या पुजेसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीच्या विक्रेत्यांनी शहरात ठिकठिकाणी दुकाने थाटली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे मिळकती सील

$
0
0

महापालिकेची तीन दिवसांतील कारवाई

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने आपल्या मालकीच्या मिळकती जप्त करण्याचा सपाटा लावला असून, गेल्या तीन दिवसांत तब्बल २५८ मिळकती सील केल्या आहेत. सोमवारी तब्बल १३५ मिळकतींना टाळे लावण्यात आले. नागरिक, नगरसेवक आणि आमदारांचा विरोध झुगारत महापालिकेने जोमाने कारवाई केल्याने या प्रकरणी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगत अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा यांना सील लावण्याची कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी महापालिकेने सर्वेक्षणात आढळलेल्या ९०३ मिळकतींना नोटिसा बजावल्या आहेत. करारनामा नसलेल्या ४०० मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली होती. परंतु, राजकीय दबावानंतर ही कारवाई टाळण्यात आली होती. परंतु, रतन लथ यांच्या याचिकेवरील सुनावणीनंतर महापालिकेने या कारवाईला जोर दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून शहरातील मिळकती जप्त करण्याची कारवाई जोमाने राबवली जात आहे. शनिवारी आणि रविवारी सुटी असतानाही महापालिकेने मिळकती सील केल्या. त्यामुळे नागरिक तसेच, लोकप्रतिनिधींमध्ये संतापाची भावना असतानाच महापालिके सोमवारी ही जप्तीची मोहीम तीव्र करीत पुन्हा १३५ मिळकती सील केल्या.

...

उच्च न्यायालयात धाव

महापालिकेच्या या कारवाई विरोधात छत्रपती शिवाजी सामाजिक संघटनेने सोमवारी सायंकाळी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संघटनेच्या वतीने अॅड. संदीप शिंदे यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर आज (दि. ७) सुनावणी होण्याची शक्यता आहे. ओपन स्पेसवर असलेल्या समाज मंदिरांवर पालिकेचा हक्क नसल्याने पालिकेला या मिळकतींवर कारवाईचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ओपन स्पेस या स्थानिकांच्या मालकीच्या असल्याचे सांगत त्या संदर्भात थेट उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

...

मनपा कोणासाठी काम करते : बोरस्ते

महापालिकेच्या कारवाई विरोधात पालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आक्रमक होत सत्ताधारी भाजपसह प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. महापालिकेकडून न्यायालयाच्या आदेशाचा बाऊ केला जात असल्याचा आरोप करीत ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे महापालिका नेमके कुणासाठी काम करीत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अभ्यासिकांबाबतीत महापालिकेने अतिरेक थांबवावा, न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

...

अभ्यासिकांना दिलासा

विरोक्षी पक्षनेते आणि स्थानिक संस्थांसह पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर महापालिकेने अभ्यासिकांबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. परीक्षांचा काळ असल्याने तुर्तास अभ्यासिकांवर सील लावण्याची कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश प्रशासनाकडून विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे अभ्यासिका तूर्त तरी सील केल्या जाणार नाहीत. परंतु, यापूर्वी सील केलेल्या अभ्यासिका पुन्हा सुरू होणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, काही संस्थांनी पैसे भरण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्या उघडण्याबाबत निर्देशही दिले.

...

विभागीयनिहाय जप्ती

नाशिकरोड - ३८

नाशिक पश्चिम - २९

नाशिक पूर्व - ७३

पंचवटी - ३५

सातपूर - २६

सिडको- ५७

एकूण - २५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोहयो’मुळे पेटतेय चूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील रहिवाशांना रोजीरोटीसाठी रोजगार हमी योजनेच्या कामांचा सहारा मिळत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजेनेंतर्गत १ हजार ७०८ कामे सुरू असून, ४१ हजार ६९ मजुरांच्या हातांना या माध्यमातून काम मिळाले आहे.

गतवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्याला यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. मालेगाव, चांदवड, बागलाण, येवला, नांदगाव, सिन्नर, नाशिक आणि निफाड या तालुक्यांना दुष्काळी जाहीर करण्यात आले आहे. याखेरीज १७ मंडळांचाही दुष्काळी परिस्थितीत समावेश होतो. या भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असून, पिके करपली आहेत. शेतीमध्येही मजुरांना कामे नाहीत. त्यामुळे नांदगावसारख्या तालुक्यातील काही ग्रामस्थांनी गाव सोडून रोजगारासाठी तालुक्याची ठिकाणे आणि शहराची वाट धरली आहे.

ग्रामीण भागात अशा मजूरवर्गाला आता रोजगार हमीच्या कामांचा आधार मिळू लागला आहे. ग्रामपंचायत व सरकारी यंत्रणेच्या स्तरावर ही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध प्रकारची ६२२ कामे सुरू असून, त्यावर २१ हजार ७२४ मजुरांना रोजगार मिळाला आहे. अन्य सरकारी यंत्रणांकडून सद्य:स्थितीत एक हजार ८६ कामे सुरू आहेत. त्यावर १९ हजार ३४५ मजुरांना काम मिळाले आहे. धरण व बंधाऱ्यातून गाळ काढणे, वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे, जलयुक्त शिवार, शेततळी, विहिरी, रस्तेनिर्मिती अशी विविध कामे रोजगार हमी योजनेंतर्गत केली जात आहेत. येवला तालुक्यात सर्वाधिक ७ हजार ११४ मजुरांना रोहयोअंतर्गत काम मिळाले आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर तालुक्यात ५ हजार ६८६ मजुरांना या माध्यमातून रोजगार प्राप्त होत आहे. पेठ, सुरगाणा या तालुक्यांमधील मजुरांनाही या योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे फायदा झाला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत ही योजना ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या जनतेसाठी वरदान ठरली आहे. रोजगार हमी योजनेवर काम मिळावे यासाठी ग्रामपंचायतींकडून जॉब कॉर्ड घेण्यासाठी मजुरांची गर्दी वाढू लागली आहे. मजुरांची संख्या वाढली तरी त्यांना देण्यासाठी कामे उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

रोजगार हमीवरील कामगारांचा तपशील

तालुका ग्रामपंचायत सरकारी यंत्रणा

बागलाण १५४८ १३२६

चांदवड २०२१ ५८९

देवळा २७० ७२६

दिंडोरी १३३८ १४१०

इगतपुरी १४७० ८९४

कळवण १०५० १८३६

मालेगाव ६५४ ६१२

नांदगाव १५४२ ४३२

नाशिक १७४ ५८२

निफाड ७१५ १२२

पेठ १४९४ ३५५२

सिन्नर ४०८ ३२४

सुरगाणा १५३० १६५०

त्र्यंबकेश्वर १०३८ ४६४८

येवला ६४७२ ६४२

एकूण २१,७२४ १९,३५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा गुणगौरव

$
0
0

नाशिकरोड : मातापिता आणि गुरुजणांच्या संस्कारांनीच जीवनाला दिशा मिळते, असे प्रतिपादन गुणवंत कामगार प्रशांत कापसे यांनी केले. नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवप्रसंगी ते बोलत होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कवी शरद आडके, नासाकाच्या माजी संचालिका लीलाताई गायधनी, कामगार नेते नामदेव गायधनी, प्रेसचे सेवानिवृत्त अधिकारी शिवनाथ चौधरी, मुख्याध्यापक शंकर पिंगळे आदी उपस्थित होते. बालमंदिर ते नववीपर्यंतच्या प्रत्येक तुकडीतील गुणानुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकप्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांना विमल आणि रामदास घमाजी कापसे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बससेवा रेंगाळणार!

$
0
0

विरोधकांना दुरुस्ती याचिका दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या शहर बससेवेसाठी सत्ताधारी भाजपने महासभेच्या ठरावात परस्पर परिवहन समितीऐवजी परिवहन कंपनी स्थापन केल्याचा वाद आता उच्च न्यायालयात पोहचला आहे. महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या गटनेत्यांनी कंपनीकरणाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात महापालिकेच्या वकिलांनी कंपनी स्थापन झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विरोधकांनी महासभेच्या ठरावाला आव्हान दिले असल्याने न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कंपनीलाही आव्हान देण्यासाठी दुरुस्ती याचिका दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली. त्यामुळे शहर बससेवा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी दत्तक नाशिककरांच्या माथी राज्य परिवहन महामंडळाची तोट्यात सुरू असलेली बससेवा मारली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने महामंडळाकडील तोट्यातील बससेवा ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी नवीन बस थेट खरेदी न करता ठेकेदारामार्फतही सेवा चालवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी 'ग्रॉस टू कॉस्ट' या तत्त्वाचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला. महापालिका प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम २५ नुसार सदरची बससेवा चालविण्यासाठी परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. प्रशासनावर तसेच बससेवेवर नियंत्रण रहावे, यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्याचा कायद्यात समावेश आहे. परंतु, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी बससेवेच्या नियंत्रणासाठी परिवहन समितीऐवजी परिवहन कंपनी स्थापन करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला. परंतु, सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी त्याला तीव्र विरोध केला. मुख्यमंत्र्यांनीही कायद्याचेच पालन करण्याच्या सूचना केल्यानंतर १९ सप्टेबर २०१८ च्या महासभेत परिवहन समितीचीच घोषणा करून प्रस्ताव मंजूर केला गेला. मुंढेंनी पुन्हा सूत्रे फिरवत मुख्यमंत्र्यांना कंपनीसाठी पालकमंत्र्यांच्या मदतीने राजी करून घेतले. त्यामुळे महासभेचा परिवहन समितीचा ठराव मंजूर असतानाही महापौरांवर मात्र कंपनी स्थापनाच्या ठराव द्यावा लागला. पालिका अधिनियमानुसार परिवहन समिती अनिवार्य असताना कंपनीकरण केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, मनसेचे गटनेते सलिम शेख आणि अपक्ष नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अॅड. संदीप शिंदे यांनी सोमवारी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयात मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी थेट ठरावाला आव्हान दिले होते. परंतु, यावेळी झालेल्या सुनावणीत महापालिकेचे वकील एम. एल. पाटील यांनी पालिकेने कंपनी स्थापन केल्याची माहिती दिली. तसेच, ही प्रक्रिया तीन ते चार महिने चालेल असे न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याचिकेत ठरावासह कंपनी स्थापन करण्यालाही आव्हान द्यावे, अशी सूचना न्यायालयाने केली. न्यायालयाने यासाठी याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली. त्यामुळे बससेवेची सुनावणी आता महिनाभर लांबणीवर पडली आहे.

..

कायदेशीर वादाने धास्ती

सत्ताधाऱ्यांनी मंत्रालयातील दबावामुळे थेट महासभेच्या ठरावात परस्पर केलेले बदल अंगलट येण्याची शक्यता आहे. विरोधकांनी या कंपनीकरणाला कायदेशीर आव्हान दिले असल्याने शहर बससेवेची अंमलबजावणीही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने या बससेवेचा विषय प्रलंबित आहे. दुसरीकडे न्यायालयाने चार आठवड्यांनी सुनावणी ठेवल्याने प्रशासनासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. न्यायालयाने तूर्तास बससेवेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचा हा काहीसा दिलासा असला तरी कंपनी की परिवहन समिती या पेचात बससेवा अडकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images