Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उद्दिष्ट ५२ हजार वृक्ष लागवडीचे

$
0
0

- आचारसंहिता संपताच महापालिकेकडून प्रारंभ

- उद्दिष्टापैकी ७० टक्के बांबूंची लागवड

- सहाही विभागांत ७६ ठिकाणी होणार लागवड

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत अडकलेली महापालिकेची ५२ हजार वृक्षलागवड मोहीम आता आचारसंहिता सपंताच सुरू होणार आहे. संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ दिल्यानंतर दोनच दिवसात आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. ठेकेदारानेही वृक्षलागवडीची तयारी पूर्ण केली आहे. शहरात ऐन पावसाळ्यात वृक्षांसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

राज्य सरकारच्या वन विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत यावर्षी नाशिक महापालिकेला ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने उद्दिष्ट वाढवून हा आकडा ५२ हजारांपर्यंत नेला. या उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने कार्यवाही सुरू केली होती. सहाही विभागांत वृक्ष लागवडीसाठी चार मक्तेदारांची नियुक्ती केली होती. रस्त्यावर वृक्ष लागवड यशस्वी होत नसल्याने महापालिकेने विशिष्ट प्रभागांमध्ये जागा निश्चित केल्या होत्या. त्यानुसार सहाही विभागांत ७६ ठिकाणी ५२ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असून, सर्वाधिक १० हजार १७० वृक्ष लागवड ही नाशिकरोडला करण्यात येणार होती. उर्वरित पाच विभागात सरासरी ९ हजार वृक्षांची लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले होते. लावलेले वृक्ष मरू नये यासाठी नव्या ठेक्यात वर्षभर या वृक्षांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली आहे. या मोहिमेअंतर्गत बांबू, वड, पिंपळ, कडूनिंब, सप्तपर्णी, अर्जुन, उंबर, लोखंडी, साग, काटेसांवर, खैरे, बीजा, नांद्रुक, ताह्मण, पुत्रंजिवी, चिंच, टोकफळ, पांगार, रुद्राक्ष, कैलासपती, भिलावा, काळा शिरस, बहावा, कांचन आदी ६२ देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून महापालिका क्षेत्रातील जैवविविधता राखण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिल्यानंतर दोनच दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे काम रखडले. परंतु, या आचारसंहितेमुळे ठेकेदारांनी वृक्ष लागवडीची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपताच खड्डे करण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात वृक्षलागवड सुरू होणार असल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाणही वाढणार आहे.

..

नदीकाठावर बांबूंची लागवड

यंदाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत प्रथमच अन्य प्रजातींच्या वृक्षांसोबतच बांबूची लागवड केली जाणार आहे. सुमारे ५२ हजार वृक्षांमध्ये ७० टक्के वृक्ष लागवड ही बांबूंची केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही नदी संवर्धनासाठी गोदावरी, नंदिनी या दोन प्रमुख नद्यांच्या काठी बांबूची लागवड केली जाणार आहे. यातून आर्थिक लाभही होईल, असा दावा पालिकेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेला ‘भूतबाधा’!

$
0
0

मटा विशेष

vinod.patil@timesgroup.com

tweet- @vinodpatilMT

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक डबघाईला द्वारकेवरील कब्रस्थानाची जागाच कारणीभूत असल्याचा जावईशोध संचालक मंडळासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लावला आहे. ही 'भूतबाधा' उतरण्यासाठी बँकेचे मुख्यालय पुन्हा नव्या इमारतीतून सीबीएसजवळील जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. वैज्ञानिक युगात जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत अंधश्रद्धा पाळल्या जात असल्याने त्याची चर्चा सुरू आहे.

अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर या जुन्या इमारतीत तिजोरीसह सत्यनारायणाची पूजा उरकरण्यात आली असून, टप्प्या-टप्प्याने अन्य विभाग या इमारतीत स्थलांतरीत करण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही आणि तिजोऱ्यांच्या खरेदीसाठी भुताटकीचा संदर्भ दिल्याने वादात सापडलेली जिल्हा बँक या नव्या अंधश्रद्धेपायी तब्बल पाच कोटी रुपयांवर पाणी सोडणार आहे. भाजपच्या ताब्यातील बँकेच्या आर्थिक भरभराटीचा संबंध थेट अंधश्रद्धेशी जोडण्यात आल्याने नव्या वादालाही तोंड फुटणार आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा बँक कधी नव्हे इतक्या आर्थिक संकटात सापडली आहे. जिल्हा बँकेचे जवळपास २७०० कोटींचे कर्ज थकीत असून, कर्जवसुली मात्र अवघी पाच ते दहा टक्के आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात बँकेने कर्जवसुलीचा तगादा सुरू केला आहे. या कर्जवसुलीवरून जिल्ह्यात सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या विरोधात भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आघाडी उघडली आहे. दुसरीकडे बँकेला सततच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळेही संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी विचारात पडले आहेत. बँकेला सतत होणारा तोटा, बरखास्तीची कारवाई, संचालकांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, तिजोऱ्या लूटण्याचे प्रमाण यामुळे सगळेच चिंताक्रांत आहेत. चिंतेत असलेल्या संचालक मंडळासह अधिकारी कर्मचाऱ्यांना यावर आता जालीम उपाय सापडला आहे. या आर्थिक अरिष्टाचा संदर्भ त्यांनी थेट अंधश्रद्धेशी जोडला आहे. जिल्हा बँकेचे मुख्यालय पूर्वी सीबीएसजवळील जुन्या इमारतीत होते. सन २००७ मध्ये या इमारतीतून जिल्हा बँकेचे मुख्यालय हे द्वारका भागातील नव्याने पाच कोटी खर्चून बांधलेल्या इमारतीत करण्यात आले होते. तत्कालिन अध्यक्ष माणिकराव कोकाटेंच्या कार्यकाळात सदरची इमारत उभारण्यात आली होती. गाजावाजा करून त्याचे स्थलांतरही करण्यात आले. परंतु, हे स्थलांतर झाल्यापासून बँकेला अवकळा आल्याचा समज वाढू लागला. द्वारकेवरील नव्या इमारतीची जागा कब्रस्थानच्या मालकीची होती. या ठिकाणी प्रेतांचे दफनविधी होत असत असे सांगितले जात होते. परंतु, बँकेने सन २००२ मध्ये ही जागा एका ट्रस्ट्रकडून जप्त केली होती. त्यामुळे आता ही जागा शापित असल्याचे सांगत तिला भुताकटीने पछाडलेले असल्याचा समज येथे कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा झाला आहे. बँकेच्या नव्या इमारतीतील स्थलांतरानंतरच बँक आर्थिक डबघाईस आल्याची मानसिकता झाली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदरची बाब संचालक मंडळाच्या गळी उतरवली आहे. त्यामुळे काहीही करून बँकेला आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी झपाटलेले अध्यक्ष केदा आहेर आणि संचालक मंडळानेही त्याला संमती दिली. परंतु, एकाच वेळेस स्थलांतर केल्यास गाजावाजा होईल म्हणून टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून अक्षय्यतृतीयेच्या दिवशी जुन्या बँकेच्या इमारतीतील स्ट्राँग रूमच्या पूजेच्या बहाण्याने या ठिकाणी सत्यनारायणाची पूजाही उरकण्यात आली आहे. यावरून बँक स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा होत आहे. या नव्या प्रयोगाने बँकेचे संचालक मंडळ मात्र नवा वाद ओढावून घेणार आहेत.

सीबीएसवरील जुन्या बँकेची जागा अपुरी पडत असल्याचे सांगत, सन २००३-०४ मध्ये तत्कालीण संचालक मंडळाने द्वारकेवरील जागेत नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाचे तब्बल पाच कोटी रुपये खर्चून भव्य दिव्य इमारत उभी करण्यात आली होती. सन २००७ मध्ये या जागेचे शुद्धिकरण होऊन या ठिकाणी बँकेचे स्थलांतरही करण्यात आले होते. परंतु, बँक गावाबाहेर जाताच संचालकांनी या बँकेत गैरव्यवहारांचा कळस केला. कधी नोकरभरती, कधी सीसीटीव्ही, तिजोरी खरेदीसह कर्जवाटपातील भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांची बँक संचालकांनीच तळाशी नेली, अशी चर्चा आहे. परिणामी, नव्या इमारतीसाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले, अशीच चर्चा होत आहे.

उद्घाटनाला आणला भगत

दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या तिजोऱ्यांची लूट सुरू असतानाच, जिल्हा बँकेच्या एका माजी संचालकाने धक्कादायक खुलासे केले होते. बँकेच्या इमारतीची जागा ही कब्रस्तानाची असल्याने संबंधीत इमारतीची भुताटकी हटविण्यासाठी उद्‍घाटनाच्या आदल्या रात्रीच भगत आणून इमारतीची शांती केल्याचा दावा या संचालकाने केला होता. मुख्य शाखाच बाधित असल्याने अन्य शाखा सुरक्षित कशा राहतील, असा अजब तर्क या संचालकांनी लावल्यानंतरच सीसीटीव्ही आणि तिजोऱ्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा भुताटकीचा संदर्भ जोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सदरची नवीन इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर उभी असून बँक स्थलांतरीत झाल्यापासूनच आर्थिक तोट्यात जात असल्याची मानसिकता अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. बँकेला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची आमची तयारी आहे. या जागेवर काम करण्याची कर्मचाऱ्यांची मानसिकता नसल्याने बँक स्थलांतराचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

- केदा आहेर, अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिअल इस्टेटला बूस्ट

$
0
0

गृह खरेदीसाठी साधला अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर शहरात अनेकांच्या घराचे स्वप्न साकार झाले असून, मंगळवारच्या दिवशी १५० फ्लॅट विकले गेल्याची माहिती क्रेडाई नाशिक शाखेचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने रिअल इस्टेटवर आठ टक्के जीएसटी लागू केल्यानंतर गृहखरेदी मंदावली होती. अनेक बिल्डर्सचे प्रोजेक्ट तयार असूनही ग्राहकांची वाट पहावी लागत होती. मात्र केंद्र सरकारने ८ टक्के जीएसटी १ टक्का केल्याने बाजाराला बूस्ट मिळाले. गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर देखील मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. गेल्या वर्षी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर १२५ फ्लॅट विक्री झाले. त्यावेळी ४५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज होता. हा आकडा यावर्षी २० टक्क्यांनी वाढला आहे. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर १५० च्यावर फ्लॅट विकले गेले असून, ५५ कोटींची उलाढाल झाली असल्याचा अंदाज आहे.

दिवाळीपासून रिअल इस्टेट मार्केट जोरात असून, शहरात मोठे प्रकल्प येत आहेत. तीस लाखांच्या फ्लॅटला २ लाख ४० हजार जीएसटी लागत होता, तो आता अवघ्या ३० हजारांवर आला आहे. त्यामुळे ग्राहकांचे दोन लाख रुपये वाचले असून, मुंबईच्या ग्राहकांचा देखील नाशिकमध्ये घर घेण्याचा ट्रेंड वाढतो आहे. २१ लाख आणि ३५ लाखांच्या घरांना चांगली मागणी आहे. काही दिवसांपूर्वी घरे तयार होती तेव्हा ग्राहक नव्हते आता ग्राहक आहेत तर घरे तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न साकार होईल याकडे आमचा कटाक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

...

वाहन खरेदीचा उत्साह

यंदाही वाहन खेरदीसाठी उत्साह दिसून आला. बाजारात एक हजार टू व्हीलर, तर ४०० फोर व्हिलरची अंदाजे विक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात इलेक्ट्रीक टूव्हीलरची देखील लोकांनी माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची टेबलनियुक्ती गुलदस्त्यात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये २३ मे रोजी मतमोजणी होणार असून, ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यावर प्रशासनाचा भर आहे. मतमोजणीकरिता नियुक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे तीनवेळा 'रॅण्डमायजेशन' केले जाणार असून, शेवटचे 'रॅन्डमायजेशन' मतमोजणीच्या दिवशी सकाळी पाच वाजता होणार आहे. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना त्यांचे नियुक्तीचे ठिकाण समजू शकणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेपुढे आता मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आव्हान आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी सुरू केली असून, याबाबतचा आढावाही वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून घेतला जातो आहे. जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबलची मांडणी वेअर हाऊस येथे करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या अंदाजे २२ ते २६ फेऱ्या होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, मदतनीस असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी बॅरिकेड्सच्या पलीकडून मतमोजणीच्या कामकाजावर लक्ष ठेऊ शकणार आहेत. मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी बँकांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्राधान्याने नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी निश्चित झाल्यानंतर त्यांना १३ ते १५ मे या कालावधीत पहिले प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती निश्चित करण्यासाठी तीन वेळा रॅण्डमायजेशनची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यातील शेवटची प्रक्रिया मतमोजणीचे दिवशी राबविण्यात येणार असून, त्यानंतरच या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्या टेबलवर नियुक्ती मिळाली हे स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदापात ७५ रुपये जुडी

$
0
0

पंचवटी : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने पालेभाज्यांचे उत्पादनात घट येऊ लागली आहे. त्यात मंगळवारी (दि. ७) नाशिक कृषी उत्त्पन्न बाजार समितीत आवक कमी झाल्याने कांदापात तब्बल ७५ रुपये प्रति जुडी या दराने विकली गेली. आतापर्यंत कांदापात ६० रुपये प्रति जुडी या दरात विकली गेली होती.

मंगळवारी (दि. ७) शिवांजली या कंपनीत लिलावासाठी सिद्ध पिंप्री येथील शेतकरी ज्ञानेश्वर ढिकले यांनी ३०० जुडी कांदापात विक्रीसाठी आणली होती. आवक घटल्याने मागणी वाढल्याने लिलावात चढाओढ वाढली आणि कांदापात विक्रमी दराने विकली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा ब

झिप झॅप झूम - ओळखा पाहू

$
0
0

पुढील शब्दांतील एक अक्षर गाळा व होणारे शब्द लिहा

माधुरी दणगे, नाशिक

- -

परीक्षा

जावळ

पातळ

जेवण

अंगण

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळक्याचा युवकावर हल्ला

$
0
0

नाशिक : जीवे ठार मारण्याची धमकी देत युवकास टोळक्याने बेदम चोप दिला. हनुमाननगर भागात झालेल्या या घटनेत दोघा सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन दौलत आहिरे (रा. हनुमानवाडी, पंचवटी), रामा किसन गोसावी (रा. निसर्गनगर, नांदूरनाका), मयूर पंडित लोखंडे (रा. कळसकरनगर, त्रिकोणी बंगला) बोका व त्याचा भाऊ आणि त्यांचे साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी शिवम रामशिरोमणी राठोड (रा. मंगलमूर्ती नगर, विठ्ठल मंगल कार्यालय) या युवकाने फिर्याद दिली. शिवम राठोड सोमवारी (दि. ६) महामार्गावरील सर्व्हिसरोडने पायी जात असतांना ही घटना घडली.

दुचाकी अपघातात एक ठार

नाशिक : भरधाव दुचाकी उभ्या असलेल्या आयशर मालट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील श्रमीकनगर भागात झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय संतोष गवळी (२१ रा. अशोकनगर, सातपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गवळी रविवारी (दि. ५) मध्यरात्री कार्बन नाक्याकडून अशोकनगर येथे जाण्यासाठी पल्सर (एमएच १५, जेटी ४८५१) या दुचाकीवर प्रवास करीत असताना हा अपघात झाला. साईलिला हॉटेल परिसरात भरधाव दुचाकी महिंद्रा कंपनीच्या भिंतीस लागून उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर (एमएच ४३ यु ९४१७) जाऊन आदळली.

युवकावर चॉपरने वार

नाशिक : वडिलांवर हात उचलल्याने संतप्त झालेल्या मुलाने एका युवकावर चॉपरने वार केल्याची घटना एकलहरे येथे घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोरख मोरे व बाळा मोरे (रा. सिद्धार्थ नगर, एकलहरे) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी वंश दिलीप सोनवणे (रा. सिद्धार्थ नगर) यांनी तक्रार दिली. सोनवणे रविवारी रात्री एकलहरे येथील महावीर किराणा स्टोअर्स या दुकाना समोरून पायी जात असताना ही घटना घडली.

वृद्धाची आत्महत्या

नाशिक : शरणपूररोड भागात राहणाऱ्या ६४ वर्षांच्या वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रवेश बाळकृष्ण नारंग (६४, रा. नीलगंगा सोसायटी, शरणपूररोड) असे या वृद्धाचे नाव आहे. नारंग यांनी सोमवारी (दि. ६) दुपारी राहत्या घरी अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब सायंकाळी उघडकीस आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काझीगढी पुन्हा केंद्रस्थानी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात गोदाकाठावरील काझीगढी येथे भूस्खलनाची शक्यता बळावत असल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. रहिवाशांच्या सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजना कराव्यात किंवा येथील दोनशे कुटुंबांचे पावसाळ्यापूर्वीच पुनर्वसन करून त्याचा अहवाल सादर करावा, असे पत्र जिल्हा प्रशासनाने महापालिकेला दिले आहे.

राज्यात यावर्षी वेळेवर आणि सरासरी इतका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा सरत असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने आतापासूनच मान्सूनपूर्व तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या काझीगढी येथे दरवर्षीच पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होते. माळीणसारखी दुर्घटना येथे घडू नये, याकरिता येथील रहिवाशांचा सुरक्षेला गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाचे प्राधान्य राहिले आहे. यंदाही पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काझीगढी येथील रहिवाशांचे स्थलांतर करावे अन्यथा तेथे ठोस उपाययोजना कराव्यात असे पत्र जिल्हाधिकारी प्रशासनाने महापालिकेला दिले आहे.

गोदावरी काठावर असणाऱ्या काझीगढीचा काही भाग २०१३ साली ढासळला होता. दरवर्षी पावसाळ्यात गढीचा काही भाग ढासळत असतो, याचे स्मरण या पत्रातून महापालिकेला करून देण्यात आले आहे. गढीवरील धोकादायक भागात ४५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात मातीचा भराव कोसळण्याचा धोका असल्याने स्थानिकांना स्थलांतरीत करण्याची तयारी केली जाते. परंतु, येथील रहिवासी घरे सोडून अन्यत्र स्थलांतरीत होण्यास तयार नसतात. याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आतापासूनच याबाबत आपल्या स्तरावर उपाययोजना कराव्यात आणि त्याचा अहवाल तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय व सरकारला सादर करावा, असे या पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी घेतला आंबेरसाचा आस्वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची चव जिभेवर रेंगाळण्यास सुरुवात झाली आहे. अक्षय्यतृतीयेचे औचित्य साधून नाशिककरांनी आंब्याचा रसास्वाद घेण्यास सुरुवात केली. आंब्यांची ही चव आता पुढील दोन अडीच महिने नाशिककरांना चाखता येणार आहे.

नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणारा आंबा अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. पूर्वजांना गोडाधोडाचा घास भरविण्याच्या निमित्ताने नाशिककरांनी गेल्या दोन दिवसांपासून आंबे खरेदीला प्राधान्य दिले. पूरणपोळी, मांड्यासोबत आंबेरसाचा आस्वाद घेण्यासाठी अबालवृद्ध आतूरले होते. सणाच्या निमित्ताने आंब्यांची चव चाखण्यास सुरुवात झाली असून, पुढील दोन अडीच महिने नाशिककर आंब्यांवर यथेच्छ ताव मारणार आहेत. बाजारपेठेत रत्नागिरी आणि देवगड हापूस, राजापूरी, केशर, लालबाग, पायरी या जातींचे आंबे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय्यतृतीयेने मोहरली बाजारपेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुर्हूतापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय्यतृतीयेचा योग साधत नागरिकांनी सोन्या-चांदीसह विविध वस्तू आणि वास्तू खरेदीवर भर दिला. अक्षय्यतृतीयेमुळे बाजारपेठ पुन्हा एकदा मोहरली असून, चैतन्य संचारले आहे.

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी मंगळवारी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायन्सेन आदी खरेदीसाठी बाजारपेठ नागरिकांची गर्दीने फुलली होती. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर ३२५०० ते ३२७०० दरम्यान होता. चांदीचा प्रतिकिलोसाठी दर ३८ हजार रुपये होता. सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत मंगळवारी दिवसभर गर्दी दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 10

महासभेचा मिळकत ठराव धूळखात

$
0
0

सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील मिळकतींवर जप्तीची कारवाई सुरू झाल्यानंतर सदरची कारवाई भंपक ठरविणाऱ्या सत्ताधारी भाजपसह शहरातील तीनही आमदारांना पालिकेच्या मिळकत धोरणाच्या ठरावाचा चार वर्षांपासून विसर पडल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मनसेच्या सत्ताकाळात विविध समाजउपयोगी उपक्रमासाठी प्रतिवर्ष दहा रुपये चौरस मीटरप्रमाणे भाड्याने देण्याचा ठराव मंजूर करीत तो शासनाकडे पाठविला असताना त्याच्या अंमलबजावणीकडे महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या ठरावाच्या अंमलबजावणीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या ठरावाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष का, असा सवाल केला जात आहे.

रतन लथ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील मिळकती जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. अभ्यासिका, वाचनालये, समाज मंदिरे यांनाही टाळे लावण्यात येत आहे. या कारवाई विरोधात महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह आमदारांनाही टाहो फोडला आहे. परंतु, या मिळकत वापराच्या ठरावाकडे मात्र महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह आमदारांनीही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. सन २०१२ मध्ये आमदार सीमा हिरे यांच्या अभ्यासिकेविरोधात अॅड. बाळासाहेब चौधरी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणातही न्यायालयाने या मिळकती ताब्यात घेवून धोरण ठरवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. यात जवळपास ९०३ मिळकती आढळून येत त्यांचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले होते. न्यायालयाच्या निर्णयाचा आधार देत आयुक्तांनी या मिळकतींना रेडीरेकनरचा दर लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, व्यावसायिक मिळकतींप्रमाणे अभ्यासिका, समाज मंदिर, वाचनालय, व्यायामशाळा अशा उपक्रमांसाठी रेडीरेकनरनुसार दर आकारणी परवडणार नाही असे सांगत, मिळकतींच्या आकारणीबाबत २० नोव्हेंबर २०१५ च्या महासभेत ७६७ क्रमांकाचा नवीन ठराव करण्यात आला होता. या ठरावात स्पष्टपणे अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा या उपक्रमांना १० रुपये प्रति चौरस मीटर याप्रमाणे प्रतिवर्ष दर आकारणी करण्याविषयी निर्णय झाला आहे. त्यावर तात्कालीन आयुक्तांची सही झाली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप करण्यात आलेली नाही. हा ठराव तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडेही पाठवला होता. परंतु, त्याबाबत शासनानेही कोणतेही धोरण स्वीकारलेले नाही. त्यामुळे महासभेचा ठराव असतानाही त्याची अंमलबजावणी करण्याचे सोडून सत्ताधारी भाजपचे आमदार आणि पदाधिकारी मात्र मिळकती जप्तीच्या नावाने ओरड करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदाराविरोधात वीजचोरीचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मिनी पीलरमधून विनापरवाना वीजजोडणी घेऊन एका प्लास्टिक कारखानदाराने गेल्या सहा महिन्यांत १ लाख १३ हजार ३४१ रुपयांची १० हजार ७४२ युनिटची चोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी शेख नियाज अहमद अब्दुल वाहिद (रा. मदिनानगर, मदिना लॉन्ससमोर, वडाळा गाव, नाशिक) या प्लास्टिक कारखानदाराविरोधात महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय दिगंबर काळे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विद्युत कायदा २००३ मधील कलमांनुसार फिर्याद दिल्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणच्या भरारी पथकातील विनय काळे यांच्यासह सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता डी. जी. पडोरे, तंत्रज्ञ एल. एम. सोनवणे आणि एस. एस. जाधव यांचे पथक शेख नियाज वाहिद यांच्या मालकीच्या वडाळागावातील प्लास्टिक कारखान्याची वीजजोडणीची तपासणी करण्यासाठी गेले होते. या कारखान्यातील वीजजोडणीची तपासणी केली असता, रस्त्यावरील मिनी पीलरवरून थेट वीजजोडणी घेऊन वीजपुरवठा सुरू असल्याचे या भरारी पथकाच्या निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खळाळला सोमेश्वर धबधबा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांसाठी आरक्षित पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आले असून, हे पाणी मंगळवारी सोमेश्वर धबधबा परिसरात दाखल झाले. त्यामुळे तब्बल आठ ते नऊ महिन्यांनंतर हा धबधबा पुन्हा ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली असून, हा खळाळता धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले सोमेश्वर परिसराकडे वळू लागली आहेत.

अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांसाठी गंगापूर आणि दारणा धरणामध्ये काही पाणी आरक्षित केले जाते. शिर्डी, राहाता, कोपरगावसह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने आरक्षित पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू होती. या पार्श्वभूमीवर या दोन्ही धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सोमवारी दुपारनंतर हे पाणी सोडण्यात आले. मंगळवारी सोमेश्वर परिसरात हे पाणी दाखल झाले. येथील धबधब्यातून पाणी वाहू लागल्याने पर्यटकांना भर उन्हाळ्यातही धबधब्याचा सुखद आविष्कार पाहण्याची संधी या आवर्तनामुळे उपलब्ध झाली. धबधब्यातून ओसंडणारे हे पाणी पाहण्यासाठी नाशिकमधील पर्यटक सोमेश्वर परिसरात गर्दी करून लागले आहेत. शाळांना असलेला सुटीचा हंगाम आणि मंगळवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त मिळालेल्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्धांनी धबधबा परिसरात गर्दी केली. धबधब्याचे नेत्रसुख घेतानाच सोमेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, नवशा गणपती परिसरातही नागरिकांची गर्दी पहावयास मिळत होती. २१ मे पर्यंत गोदापात्रातून हे पाणी खळाळणार असून, तोपर्यंत पर्यटनप्रेमींना या धबधब्याचे नेत्रसुख घेता येणार आहे.

नो सेल्फी झोनची आवश्यकता

धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सेल्फीचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले. काही अतिउत्साही पर्यटक धबधब्याच्या काठावर उभे राहून सेल्फी काढण्यात मश्गूल होते. जीव धोक्यात घालून सेल्फी काढताना दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोमेश्वर धबधब्यासह पावसाळी पर्यटनाची काही ठिकाणे आतापासूनच नो सेल्फी झोन म्हणून जाहीर केली गेल्यास दुर्घटनांना आळा बसू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकचे सिव्हिल रुग्णालय राज्यात प्रथम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक आरोग्यसेवेचा दर्जा सुधारावा, यासाठी सुरू केलेल्या कायाकल्प योजनेत नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलने पुन्हा एकदा बाजी मारली. सिव्हिल हॉस्पिटलने राज्यभरातील सरकारी हॉस्पिटल्सला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे हॉस्पिटलला तब्बल ५० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. यासोबतच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि कळवण उपजिल्हा रुग्णालयांनीदेखील या योजनेंतर्गत प्रत्येकी एक लाखांच्या बक्षिसासाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.

आरोग्य विभागाकडून मंगळवारी ही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. आरोग्य विभागाने सरकारी दवाखान्यांची स्थिती सुधारण्यासाठी 'कायाकल्प' ही योजना सुरू केली आहे. या योजनेत हॉस्पिटलमधील स्वच्छता, पेशंट व कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, हॉस्पिटलमधील कचरा, पूरक सुविधा, इन्फेक्शन कंट्रोल व हॉस्पिटलमधील सुविधा या घटकांकडे लक्ष पुरविले जाते. हॉस्पिटलमधील या सुविधांची दोन समित्यांकडून पाहणी होते. त्यानुसार सिव्हिल हॉस्पिटलने प्रयत्नपूर्वक वरील घटकांना प्राधान्य दिले. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलने स्वच्छता, जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, पेशंट व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे याबाबत जनजागृतीची मोहीमच हाती घेतली होती. यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती असताना त्याचा परिणाम दिसून येत नाही. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील स्वच्छतेबाबत नियमित चांगल्या प्रतिक्रियादेखील दिल्या जातात. या सर्व घटकांमुळे सिव्हिल हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून राज्यात अव्वल ठरत आहे. गेल्या वर्षी पुरस्कार नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला मिळाला होता. आरोग्य उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, अधिसेविका मानिनी देशमुख व कल्पना पवार, स्वच्छता निरीक्षक, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य व स्टाफ आदींनी याबाबत आनंद व्यक्त केला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांचे मोलाचे मार्गदर्शन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, कार्यकारी अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकाऱ्यामुळे हे यश मिळाले, असे सिव्हिल सर्जन डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले.

...

मेहनत तसेच एकजुटीने प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा सन्मान आहे. यामुळे सर्वांचे अभिनंदन. हॉस्पिटल प्रशासन मागील दोन वर्षांपासून गुणवत्तापूर्वक सेवा देण्यात सातत्य राखते आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईव्हीएम’भोवती भुजबळांचाही बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड वेअरहाऊस येथे कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षेवर नजर रहावी याकरिता आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनीही आपले प्रतिनिधी तेथे नेमले आहेत. अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांच्यापाठोपाठ येथे प्रतिनिधी नेमणारे भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील दुसरे उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी मात्र सुरक्षेबाबत निश्चिंतता दर्शविली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिकमधील १८, तर दिंडोरीतील आठ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. हे मशिन याच दिवशी सायंकाळी सातनंतर अंबड येथील वेअर हाऊसमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दुपारपर्यंत सर्व मशिन्सची तपासणी पूर्ण होऊन वेअर हाऊस सील करण्यात आले. या सर्व ईव्हीएम मशिन्सवर सीसीटीव्ही यंत्रणेचा वॉच आहे. याशिवाय येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दल, राज्य राखीव पोलिस दल आणि नाशिक शहर पोलिसांचाही खडा पहारा आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत असून, ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेला बाधा तर निर्माण होणार नाही याची चिंता उमेदवारांना सतावू लागली आहे. ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रतिनिधी नेमण्याची मुभा निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिली आहे. त्यानुसार सर्वप्रथम अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांनी निवडणूक शाखेला प्रस्ताव देत अंबड वेअर हाऊस येथे तीन प्रतिनिधींची नेमणूक केली. अन्य उमेदवारही वेअर हाऊस येथे प्रतिनिधी नेमू शकतात अशा आशयाचे पत्र निवडणूक शाखेने देखील उमेदवारांना पाठविले. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील अंबड वेअर हाऊस येथील सुरक्षेवर 'वॉच' ठेवण्यासाठी प्रतिनिधी नेमण्याचा प्रस्ताव निवडणूक शाखेकडे दिला आहे. चार प्रतिनिधी नेमण्याची परवानगी भुजबळ यांनी मागितली असून, त्यांचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेतील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता अंबड वेअर हाऊस येथील ईव्हीएमच्या सुरक्षेवर भुजबळांची नजर असणार आहे. निवडणूक शाखेने संबंधित चार प्रतिनिधींना ओळखपत्र दिले असून, ते दाखविल्यानंतरच या प्रतिनिधींना वेअर हाऊसच्या आवारात प्रवेश दिला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांची अंतरे

$
0
0

हा तर तेजोभंगाचा प्रयत्न

रामायण-महाभारत काळापासून हिंदु समाजात हिंसाचार घडत असल्याचे विधान नुकतेच माकपचे नेते सिताराम येचुरी यांनी केले. इटलीतील मुसोलिनी यांच्या फॅसिझमकडून प्रेरणा घेऊन भारतात लष्करी संघटनेचा उगम झाला असेही येचुरी यांच्या म्हणण्याचा सूर आहे. पृथ्वीवरील सर्वच मानवी समाजात प्राचीन व अर्वाचिन तसेच आजची परिस्थिती बघता हिंसाचार होताच व आजही आहे. ज्या युरोपमध्ये भगवान येशू ख्रिस्त झाले, त्याच युरोपात दोन महायुद्धे झाली. हिंदुस्थानात फाळणीदरम्यान लाखो निरपराध लोक मारले गेले. आजही नक्षलवादी पोलिसांना व नागरिकांना ठार करीतच आहेत. तेव्हा हिंसाचार निंदनीय असला तरीही एवढा मोठा मानवीसंहार आधुनिक काळात कोठे झाला? सीताराम येचुरी यांचे प्रेरणास्थान असलेल्या रशिया व चीनमध्ये लेनिन, स्टॅलिन व माओ यांनी केलेला मानवी हिंसाचार भयावह होता. ज्योती बसू येण्यापूर्वीचा पश्चिम बंगाल आठवला तर आजही अंगावर काटे येतात. नक्षलवादाची प्रेरणा कुणाची आहे? स्वातंत्र्यानंतर तेलंगणात दंगली कुणी केल्या? हे सर्व येचुरींना ठाऊक आहे. विषय कोणताही असो, प्रसंग वा घटना कोणतीही असो, हिंदु समाजाला सतत दोष देऊन या समाजाचा तेजोभंग करण्याचे योजनापूर्वक प्रयत्न समाजवादी व साम्यवादी करीत आलेले आहेत.

अॅड. के. जी. कुलकर्णी, नाशिक

पीयूसीसक्ती होणार का?

शासनाच्या वतीने जशी हेल्मेटसक्ती राबविण्यात येते, जी की लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने गरजेची आहे तशीच सक्ती वाहनांची पीयूसी तपासून घेण्याबाबत करणे गरजेचे आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची आकडेवारी वाढती आहे. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे प्रमाण वाढते आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, रहदारीचे प्रमाण, वाहतुकीची कोंडी त्यात भर घालते आहे. लहान मुले तसेच मोठ्यांना सुद्धा श्वसनाचे विकार, सर्दी किंवा प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषणामुळे पक्ष्यांचे प्रमाण कमी होऊन निसर्गाचा ऱ्हास होताना दिसतो आहे. त्यामुळे शासनाने पीयूसीबाबत अभियान हाती घेतल्यास प्रदूषणाला आळा बसून नागरिकांचे आरोग्यही शाबूत राहू शकेल.

किरण जाधव, पंचवटी

पाण्याचे नियोजन करावे

दरवर्षी एप्रिल मे जून या कालावधीत पाण्याची कमतरता असते हे नवीन नाही. दुष्काळ यावेळी जास्त जाणवतो आहे. तहान लागली की विहीर खोदायची ही राज्य सरकारची चाल जुनीच असते. जमिनीत पाणी असेल तर पाणी मिळणार आहे. दुष्काळ पडणार आहे हे अगोदर कळते. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून देखिल ठोस उपाययोजना करण्यात अपयश आले कसे? शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप संथगतीने होते व सर्व पिकांना पीकविमा वाटप नाही. पाणी नाही. त्यामुळे चाराही नाही हे लक्षात येत नाही का? शहरांना पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो, तसाच शेतीला का नाही केला जात? पाइपलाइनमुळे श्रम आणि वीज सुद्धा वाचेल. ठिबक सिंचन योजना सक्तीची असावी. गावागावात शेतीशिवारात लहान-लहान पाणवठे शासनाच्या मदतीने तयार करावेत. पाणी आडवा, पाणी जिरवा यांसारख्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी. बेसुमार वृक्षतोड थांबवावी, नद्यांचे पाणी कसे साठविता येइल याकरिता नवीन योजना असावी. जर एक वर्ष पाऊसच पडला नाही तर बुद्धी सुन्न होईलच हे सत्य. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतही सरकारला पाण्याचे ठोस नियोजन करण्यात यश मिळाले नाही. म्हणून दुष्काळाचे हाल सोसावे लागतात. थोड्याच दिवसात सर्वत्र वाळवंट होईल, हे सत्य नाकारून चालणार नाही. पावसाच्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे.

नानासाहेब मंडलिक, ओझर मिग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारविरोधात वीजचोरीचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मिनी पीलरमधून विनापरवाना वीजजोडणी घेऊन एका प्लास्टिक कारखानदाराने गेल्या सहा महिन्यांत १ लाख १३ हजार ३४१ रुपयांची १० हजार ७४२ युनिटची चोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी शेख नियाज अहमद अब्दुल वाहिद (रा. मदिनानगर, मदिना लॉन्ससमोर, वडाळा गाव, नाशिक) या प्लास्टिक कारखानदाराविरोधात महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय दिगंबर काळे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विद्युत कायदा २००३ मधील कलमांनुसार फिर्याद दिल्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महावितरणच्या भरारी पथकातील विनय काळे यांच्यासह सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता डी. जी. पडोरे, तंत्रज्ञ एल. एम. सोनवणे आणि एस. एस. जाधव यांचे पथक शेख नियाज वाहिद यांच्या मालकीच्या वडाळागावातील प्लास्टिक कारखान्याची वीजजोडणीची तपासणी करण्यासाठी गेले होते. या कारखान्यातील वीजजोडणीची तपासणी केली असता, रस्त्यावरील मिनी पीलरवरून थेट वीजजोडणी घेऊन वीजपुरवठा सुरू असल्याचे या भरारी पथकाच्या निदर्शनास आले. गेल्या सहा महिन्यांपासून ही वीज चोरी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसवेश्वर जयंती उत्साहातमहात्मा ब

$
0
0

सातपूर : कामगारनगरी सातपूर कॉलनीत आनंद छाया येथे महात्मा बसवेश्वर यांची ८८८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी पर्वत गुरेड्डी, मल्लिकार्जुन उमदी यांच्याहस्ते बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर गुरेड्डी यांनी बसवेश्वरांच्या जीवनपट सांगितला. प्रास्ताविकात धोंडूआप्पा हिंगमिरे यांनी बसवेश्वर जयंतीनिमित्ताने प्रत्येकाने किमान ५ वृक्ष लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वाढदिवसावर खर्च करण्यावर भर न देता वृक्षांची लागवड केल्यास तापमान कमी होण्यास मदत होईल, असेही हिंगमिरे म्हणाले. याप्रसंगी लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images