Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झिप झॅप झूम - बालकथा

$
0
0

चंगू आणि मंगू

अरुण पाटील, नाशिक

एका खेडेगावात दोन मित्र राहत होते. शिकायला एका शाळेत, एका वर्गात आणि एकाच बाकावर बसत होते. रहायलादेखील अगदी शेजारीच. त्यांच्या आवडीनिवडी बऱ्याच प्रमाणात सारख्या होत्या. दोघांची उंची समान होती. दोघेही खेळायला, फिरायला, मंदिरात आरती म्हणायला, अभ्यास करायला सोबतच असायचे. त्यांचे खेळ म्हणजे विटीदांडू, लगोऱ्या, गोट्या, झाडावर चढणे, कडुलिंबाचा खाली पडणारा पाला झेलून खजिना होईल या आशेने जमिनीत पुरणे, टायर फिरवणे असेच असायचे. एकाला जर आईने दुकानात, चक्कीवर जायला संगितले तर दुसरादेखील सोबतच. त्यांची एकजीवता आणि हातात हात घालून फिरणं पाहून मोठ्या पोरांनी त्यांचं नाव चंगू मंगू असे ठेवले. सगळेच त्यांना चंगू मंगू या नावाने ओळखू लागले.

शाळेला उन्हाळ्याची मोठी सुटी लागली होती. दुपारी उन्हं पडल्यामुळे चंगू मंगू बाहेर खेळायला न जाता घरात किंवा ओट्यावर पत्त्यांचा डाव मांडायचे आणि उन्हं कमी झाल्यानंतर शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानावरचा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी जायची. मैदानाभोवती भिंतीचं कंपाऊंड होतं. कंपाऊंड उंच असल्याने चंगू मंगू उडी मारून आत जाऊ शकत नव्हते. परंतु कंपाऊंडच्या बाजूने थोडं पुढं गेल्यावर कंपाऊंडला असलेल्या बोगद्यातून आत जाण्याची सोय होती. एकदाचे हे दोघे आत गेले म्हणजे त्यांची जागा ठरलेली असायची. ते क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या आदेशानुसार चेंडू आणून देण्यासाठी सीमारेषेच्या पलीकडे असलेल्या झाडाखाली चेंडूची वाट पाहत बसायचे. फिल्डरच्या हातून निसटलेला चेंडू आणून देण्यात चंगू मंगूला मज्जा वाटायची. त्यांचा तो आनंद क्रिकेट खेळण्यापेक्षा कमी नव्हता.

एकदा असाच क्रिकेटचा खेळ रंगला होता. बाहेरगावचा संघ सामना खेळण्यासाठी आलेला होता. एका दांडग्या पोराने चेंडू उंच टोलवला आणि तो चेंडू कंपाऊंडच्या बाहेर असलेल्या गवतात दिसेनासा झाला. गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी भरल्यानंतर वरून पडणारे आणि जमिनीवरून वाहत जाणारे पाणी एकत्र साचून त्या ठिकाणी छोटेसे डबके तयार झाले होते. त्या डबक्यात उगवलेल्या गवतात चेंडू सापडणे कठीण असायचे. परंतु चंगू मंगुला ते अशक्य नव्हते. त्यांना जणू सवयच झाली होती चेंडू शोधण्याची. दोघेही डबक्यात उतरले. त्यांचा अंदाज पक्का असल्यामुळेच चिखलात रुतलेला चेंडू त्यांनी शोधून काढला आणि तो मैदानात खेळणाऱ्या पोरांच्या दिशेने फेकला.

त्याच डबक्यात कुत्र्याचे छोटे पिल्लू चिखलात अडकलेलं चंगुला दिसलं. ते जखमी झाल्यामुळे व चिखलात खोल रुतल्याकारणाने त्याला पळता येत नव्हते. कदाचित उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी ते गोंडस पिल्लू डबक्यात मधोमध गेलं असावं असं त्यांना वाटलं. कोणीतरी आपल्याला डबक्याबाहेर काढेल या आशेने तो छोटा जीव विव्हळत होता. चंगू मंगूने त्या चिखलाने माखलेल्या कुत्र्याच्या पिलाला अलगद उचलून सुखरूप बाहेर काढलं. त्याची अंघोळ केली व त्याला पाणी पाजले. मैदानातला खेळ सोडून चंगू मंगू कुत्र्याच्या पिलाला हातात धरून आनंदाने घरी निघाले.

तात्पर्य : प्राणीमात्रांवर दया करावी.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंकुर साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

$
0
0

अंकुर साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लेखक किरण सोनार यांच्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो' या चारित्र्य ग्रंथास अंकुर साहित्य संघ, अकोला यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय चारित्र्य वाङमयीन पुरस्कार-२०१७ जाहीर झाला आहे. ८ जून रोजी मुक्ताई नगर येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचसोबत अंकुर साहित्य संघाने राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार जाहीर केले. अरविंद भामरेप्रकाश क्षीरसागर, कालिका बापट, डॉ. अजिनबी शेख यांना काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर विविध लेखन प्रकारात हे पुरस्कार देर्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरसावले भाविक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी वारकरी भाविकांच्या देणग्यांचा ओघ वाढला आहे. शासनाने परिसर विकास आराखडाकरिता अद्याप निधी दिलेला नाही. मात्र भाविकांनी निधीची कमतरता पडणार नाही असा निश्चय केल्यामुळे देणगीदारांचा उत्साह वाढला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे जीर्णोद्धार समितीची बैठक घेण्यात आली. यावेळेस संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाचा वेग वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन ह.भ.प. महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले. आर्किटेक्ट अमृता पवार, कॉन्ट्रक्टर श्रीहरी तिडके व विश्वस्त मंडळ यांची ही संयुक्त बैठक होती. या बैठकीत प्रामुख्याने मंदिराच्या कामाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान उटीच्या वारीच्या वेळेस संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चाळीसगाव तालुक्यातील वहाडे येथील रहिवासी पांडुरंग दोधू सुतार (अशोकनगर, नाशिक) यांनी श्रीनिवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पंडितराव कोल्हे, विश्वस्त संजय धोंडगे, सचिव जिजाबाई मधुकर लांडे, त्र्यंबकराव गायकवाड ,पुंडलिक थेटे आदींच्या उपस्थितीत एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश विश्वस्तांच्या स्वाधीन केला. याबरोबरच समाधी संस्थानचे अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे यांनी भागवत सांप्रदायाच्या भाविकांना आपल्या कीर्तनानंतर संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर जीर्णोद्धारासाठी आवाहन केल्याप्रमाणे ठिकठिकाणच्या १४ भाविकांनी ३ लाख ३६ हजार रोख देणगी अध्यक्ष कोल्हे यांच्या स्वाधीन केली आहे.

निवृत्तिनाथ समाधी मंदिर भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे अपुरे पडत आहेत. भविकांची गैरसोय असते. समाधी गाभारा देखील लहान असल्याने भाविकांना समाधानकारक दर्शन देखील होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर समाधी मंदिराचा जीर्णोद्धाराशिवाय मार्ग नाही. हे विश्वस्तांच्या लक्षात आले आणि समाधी मंदिर जीर्णोद्धासाठी आराखडा व अंदाजपत्रक आदी पूर्ण करून हा सर्व पैसा देणगी तथा लोकवर्गणीतून उभा करण्यात येत आहे. मंदिर बांधकाम फक्त काळ्या पाषाणात सुमारे २ कोटी ५७ लक्ष रुपयांचे काम होत आहे. संपूर्ण मंदिर सभामंडप बाजुचा कोट आदी संपूर्ण काम अंदाजे साडे बावीस कोटी रुपयापर्यंतचे आहे. संजय महाराज धोंडगे यांनी पाठपुरावा करत शासनदरबारी परिसर विकास आराखडा सादर केला आहे. मंदिराचे काम दोखील प्रगतीपथावर आहे. दरम्यान याच कामांकरिता वारकरी सांप्रदायिक असलेल्या अनेक भागवत भक्तांकडून देणगीचा ओघ सुरू असून, उटीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर वरील प्रमाणे देणगी मिळाली आहे.

9822816242

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाणामारीत दरोडेखोर ठार

$
0
0

चांदवडजवळील खैसवाड्यातील घटना; वस्तीवर भीतीचे वातावरण

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड शहरातील खैसवाडा परिसरात शनिवारी (दि. ४) रात्री संशयित दरोडेखोर आणि नागरिकांच्यात झालेल्या झटापटीत एक संशयित दरोडेखोर ठार झाला. तर दुसरा जखमी गंभीर झाला असून, त्यांचे इतर साथीदार फरार आहेत. या झटापटीत इतर चार नागरिकही जखमी झाले आहेत. फरार संशयितांचा अजून तपास लागलेला नसून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. या घटनेमुळे चांदवड परिसरात एकच घबराट पसरली आहे.

चांदवड शहरापासून बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या खैसवाडा परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास संशयित दरोडेखोरांच्या टोळक्यांनी कबाडे मळ्यात राहत जमीन कसणारे नवनाथ मोरे यांच्यावर हल्ला केला. मोरे आणि दरोडेखोरांसोबत झटापट झाली. त्यांची झटापट सुरू असताना त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी मोरे यांच्या घराकडे धाव घेतली. मोठा जमाव जमल्याने दरोडेखोर व नागरिकांमध्ये रात्री तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एका दरोडेखोराचा जागीच मृत्यू झाला. तर एक दरोडेखोर गंभीर जखमी झाला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात नवनाथ मोरे (वय ३६), मुलगा समाधान मोरे (वय १४), प्रकाश वाजदेव (वय ३६), संतोष अहिरे (वय २६) यांच्या डोक्याला, हाताला गंभीर मार लागला. खैसवाडा परिरसातील जखमी नागरिकांवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जखमी दरोडेखोराला उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

चांदवड पोलिस ठाण्यात नवनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दरोडेखोराच्या मुत्यूबाबत अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल, मनमाडच्या पोलिस उपअधीक्षक आर. रागसुधा, नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे, पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

खैसवाड्यात पोलिसांची छावणी

चांदवड शहर आणि परिसरात डोंगरभाग असल्यामुळे चोरट्यांना लपण्यासाठी खूप जागा आहेत. तसेच महामार्गही जवळ असल्याने अनेक घटनांतील आरोपी, गुन्हेगार लगेचच पसार होतात. चांदवडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खैसवाडा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या या घटनेनंतर रविवार सकाळपासून पोलिसांचा ताफा तैनात आहे. नाशिक, मालेगाव, चांदवड, नांदगाव येथील पोलिसांचे विविध पथके खैसवाडात गस्त घालत होते. या घटनेतील मृत तसेच फरार झालेल्या संशयित दरोडेखोरांची ओळख पटलेली नसून, पोलिस त्यांचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिकांच्या पोस्टल मतदानावर बारकोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा श्रीगणेशा लष्करी जवानांच्या मतमोजणीनेच होणार असून, यंदा प्रथमच बारकोडच्या सहाय्याने हे पोस्टल मतदान मोजले जाणार आहे. निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत केलेल्या प्रयोगांपैकी हा एक प्रयोग असून, त्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निवडणूक शाखेला देण्यात आल्या आहेत. बारकोडचे स्कॅन न जुळल्यास संबंधित मतदान बाद ठरविले जाणार आहे.

देशरक्षणासाठी घरापासून शेकडो मैल दूर अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात सैनिक कर्तव्य बजावतात. लोकशाही व्यवस्थेने त्यांनाही मतदानाचा हक्क दिला आहे. परंतु देशरक्षणाच्या मोहिमेवर असलेल्या या सैनिकांना अनेकदा हा हक्क बजावता येत नाही. त्यांना हा हक्क बजावता यावा याकरीता निवडणूक आयोगाद्वारे त्यांना पोस्टल मतदानाची सुविधा पुरविली जाते. यंदाही लोकसभा निवडणुकीची तयारी करताना आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक शाखेने आपल्या भागात कार्यरत परंतु अन्य मतदारसंघातील रहिवासी असलेल्या लष्करातील जवानांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार नाशिक येथील आर्टिलरी सेंटर, देवळाली कॅम्प छावणी येथे कार्यरत लष्करी अधिकारी आणि जवानांची यादी जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाली. याच धर्तीवर अन्य जिल्ह्यांतून अशाच प्रकारची यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील व मतदारसंघातील लष्करी जवानांची मतदार यादी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचे नेमणुकीचे ठिकाणही नमूद करण्यात आल्याने अशा सैनिकांसाठी त्यांच्या मुख्यालयात ईटीपीबीएस या प्रणालीद्वारे ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात आल्या. ज्या सैनिकासाठी ही मतपत्रिका पाठविली त्या मतपत्रिकेच्या सर्वांत खाली बारकोड देण्यात आला. सैनिकाने मतदान केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती निवडणूक अधिकाऱ्याकडे परत पाठवितांना आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या पाकिटातच पाठविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पाकिटावर देखील बारकोड टाकण्यात आला आहे. प्रत्येक लष्करी जवानाकरीता स्वतंत्र बारकोड असल्याने त्यानेच मतदान केले याची खात्री होऊ शकणार आहे. यामुळे आपसूकच बनावट मतदान रोखण्यास मदत होणार आहे.

नाशिकमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यापूर्वीच निवडणूक शाखेने सैनिकांसाठी या मतपत्रिका रवाना केल्या होत्या. बंद पाकिटातील या मतपत्रिका आता जिल्हा प्रशासनाला प्राप्त होऊ लागल्या आहेत. या मतपत्रिकांच्या मोजणीबाबत अलीकडेच निवडणूक आयोगाने निवडणूक शाखेला मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रत्येक मतपत्रिकेच्या पाकिटावरील बारकोडची अगोदर स्कॅनिंग करून खात्री करून घ्यावी. स्कॅनिंग जुळत नसेल तर ती मतपत्रिका मोजण्यासाठी ग्राह्य धरू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पाकिटावरील बारकोड जुळले तरी, आतील मतपत्रिकेच्याही बारकोडची स्कॅनिंग केल्याशिवाय ती मोजण्यासाठी न घेण्याच्या सूचनाही यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. २३ मे रोजी मतमोजणीला सुरूवात होताच प्रथम सैनिकांच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालार्थ आयडीसाठी शिक्षक संघटना आक्रमक,आज विचारणार जाब शालार्थ आयडीसाठी शिक्षक संघटना आक्रमक,आज व

$
0
0

'शालार्थ'साठी संघटना आक्रमक

आज शिक्षण उपसंचालक कार्यालयात करणार ठिय्या

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शालार्थ आयडी प्रस्ताव मंजुरीचा चेंडू शिक्षण संचालक आणि शिक्षण आयुक्तांच्या कोर्टातून विभागीय शिक्षण उपसंचालक आणि दहावी-बारावी बोर्डाचे विभागीय अध्यक्षांच्या कोर्टात टोलवूनही हाती काहीही लागलेले नाही. यामुळे नाशिक विभागातील शिक्षकांची अवस्था 'तेलही गेले तूपही गेले अन् हाती धुपाटणे आले' अशी झाली आहे. शालार्थ आयडीचे कामकाज सुरू करण्यासाठी अद्यापही मुहूर्त न सापडलेल्या विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयाला जाब विचारण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटना आज सोमवारी (६ मे) दुपारी १२ वाजता नाशिकरोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या मांडणार आहेत.

नाशिक विभागातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शालार्थ आयडी प्रस्तावांचा घोळ आणखी वाढला आहे. अधिकाऱ्यांची लॉबी याबाबतीत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याऐवजी एकमेकांवर जबाबदारी ढकलून शिक्षकांना वेठीस धरण्यास प्राधान्य देत आहे. आतापर्यंत शालार्थ आयडी मंजुरीचे अधिकार शिक्षण संचालक आणि शिक्षण आयुक्त यांच्या स्तरावर होते. मात्र, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने मोठा संघर्ष करून हे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या स्तरावरून देण्यास परवानगी मिळवली होती. त्यानंतर शालार्थ आयडीचे काम लवकर मार्गी लागेल अशी आशा शिक्षकांना लागली होती. मात्र, नाशिक जिल्ह्यात शालार्थ आयडीप्रस्ताव गेल्या ४५ दिवसांपासून धूळ खात पडून असल्याने या शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांतून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या या उदासीन कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला गेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत शालार्थ आयडीचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र नाशिकमध्ये अजूनही या कामाला मुहुर्त न लागल्याने शिक्षकांचा संयम सुटला आहे.

---

आदेशांना केराची टोपली

शालार्थ आयडीच्या कामकाजाचा आढावा दर दहा दिवसांनी द्यावा असे आदेश शिक्षण आयुक्तांनी शिक्षण उपसंचालक व बोर्डाच्या अध्यक्षांना दिल्याचा दावा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केला आहे. परंतु शिक्षण आयुक्तांच्या या आदेशांना या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. शालार्थ आयडीचे कामकाजाचे मार्गदर्शनासाठी आतापर्यंत दोनदा व्हिडिओ कॉन्फरन्सही झाली आहे. तरीही शालार्थ आयडीचे कामकाज अद्यापही ठप्प पडले आहे.

----

शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यापुढे शालार्थ आयडीचे कामकाज सुरू करण्याचे आश्वासन अधिकारी देतात. प्रत्यक्षात काम सुरुच करत नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी शिक्षकांना फोन करून वैयक्तिक बोलावून घेण्याला प्राधान्य देतात.

- एस. बी. देशमुख (सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेहेडीत ८० हजाराची घरफोडीचेहेडीत ८० हजाराची घरफोडीम.टा.वृत्तसेवा नाशिकरोड उन्हाळ्याचे दिवस अ

$
0
0

८० हजारांची घरफोडी

नाशिकरोड : उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुटुंब घराबाहेर ओट्यावर झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी चेहेडी येथील साहेबराव रुंजाजी ताजनपुरे यांच्या घरातून ५० हजार रुपयांच्या दागिन्यांसह रोख ३० हजार रुपयांची रक्कम लुटून नेली. सामनगावर रोडवरील फौजी वस्तीवर ही घटना घडली. चोरट्यांनी साहेबराव ताजनपुरे यांच्या घरातील कपाटातून रोख ३० हजार रुपये, दोन तोळे वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत आणि १० हजार रुपये किमतेचे एक तोळ्याचे कानातील झुबे असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात साहेबराव ताजनपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेहेडीतील सुशिला ताजनपुरे आणि सुलाबाई पवार यांच्या घरीही सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरला प्रथमच ड्रायफ्रूटची आयात

$
0
0

नाशिक : ओझर विमानतळावर प्रथमच कार्गो विमानाद्वारे ड्रायफ्रूटची आयात करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील प्रसिद्ध अक्रोडची एक टन आयात झाली असून, हे अक्रोड मुंबईत विक्रीसाठी रवाना झाले आहेत. नाशिकमधून आंबे आणि शेवगा आखाती देशांत थेट निर्यात केले जात आहेत. यापुढील काळात ही आयात आणि निर्यात वाढण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वृत्त...३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रामशेज’ची पाहणीसमितीतर्फे पाहणीम. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडकिल्ले रामश

$
0
0

(फोटो आहे.)

'रामशेज'ची पाहणी

नाशिकरोड : किल्ले रामशेज येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने समितीने तयारीसाठी रामशेज किल्ला परिसराची पाहणी केली. छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ कदम, ज्येष्ठ नेते संजय बोडके, छत्रपती युवा सेना तालुका कार्याध्यक्ष शुभम बोडके, छत्रपती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विलास गायधनी, तुषार भोसले, महानगरप्रमुख यश बच्छाव आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री करणार दुष्काळाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन सोमवार (दि. ६) दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येणार आहेत. सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांमधील टंचाई परिस्थितीची पाहणी करून ते दुष्काळग्रस्तांशी चर्चा करणार आहेत. परंतु, पालकमंत्र्यांचा दौरा रात्री उशिरापर्यंत प्राप्त न झाल्याने जिल्हा प्रशासनाने या पाहणीबाबत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे महाजन यांचा दौरा होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना राज्यातील पाणीटंचाई तसेच दुष्काळीस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसर सर्व मंत्री, पालकमंत्री जिल्हा दौरे करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके आणि १७ महसूल मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. सद्यस्थितीत २०० गावे आणि ७०१ वाड्या अशा एकूण ९०० गावांना २६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. धरणांमधील जलसाठाही गतवर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी खालावला आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या स्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री महाजन दौऱ्यावर येणार आहेत. सिन्नर तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये जाऊन ते ग्रामस्थांशी संवाद साधतील. शेतातील पिकांची परिस्थिती, पाण्याची उपलब्धता, अवकाळीमुळे झालेले नुकसान याची माहिती ते घेणार आहेत. सिन्नरनंतर निफाड, येवला, नांदगाव आणि मालेगावात ते पहाणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या डॉक्टरची ‘माउंट केनिया’वर चढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दक्षिण अफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे आणि केनियातील सर्वात उंच शिखर असलेले ‘माऊंट केनिया’ सर करण्याची किमया नाशिकच्या डॉ. शिरीष घन यांनी केली आहे. तब्बल १६ हजार ५०० फूट असलेल्या या शिखरावर चढाई करणारे घन हे नाशकातील पहिलेच गिर्यारोहक आहेत.

व्यवसायाने कान नाक, घसा तज्ज्ञ असलेल्या डॉ. घन यांनी आतापर्यंत अनेक अवघड चढाया केल्या आहेत. माउंट केनिया या शिखरावर चढाई करण्यासाठी एकूण चार जणांचा संघ सहभागी झाला होता. त्यात महाराष्ट्रातून घन हे एकमेव गिर्यारोहक सहभागी झाले होते. यातील तीन गिर्यारोहक हे भारतीय वंशाचे असून ते केनियाचे रहिवासी आहेत. माउंट केनिया हे शिखर आफ्रिका खंडातील दोन नंबरचे उंच शिखर आहे. दाट जंगलात व हिंस्त्र श्वापद असलेले हे ठिकाण चढाई करण्यासाठी शरिराचा कस लागतो. चार जणांच्या संघाने दि. १६ एप्रिल रोजी या शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली.

केनियातील सिरीमॉन या ८ हजार ५०० फुटावर असलेल्या नॅशनल पार्कच्या गेट पासून मोहिमेला सुरुवात झाली. ही मोहीम चार दिवसांची होती. पहिल्या दिवशी त्यांचा मुक्काम ११ हजार फुटावर असलेल्या ओल्ड मोझेस या ठिकाणी होता. या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मॅकेन्डर व्हॅली ओलांडून १४ हजार फूट उंचीवर असलेल्या शिफ्टन येथे जाण्यासाठी चढाई केली. या ठिकाणी जाताना पक्षांची, झाडांची जैव विविधता त्यांना अभ्यासता आली. तेथील सरकार वन्य जीवांचे रक्षण कशा पद्धतीने करते, याचा अभ्यास करता आला. या प्रवासात त्यांना माऊंटन हायरॅक्स (मोठे उंदीर) पाहता आले. सायंकाळी शिफ्टन येथे मुक्काम केल्यानंतर मुख्य चढाईला रात्री दोन वाजता सुरुवात झाल्याचे डॉ. घन यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

चढाईचे आव्हान सर

वाऱ्याचा प्रचंड वेग, थंडी, कमी होत जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा यामुळे प्रत्येकाला थकवा जाणवत होता. पहाटे पाच वाजता ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेल्या एका तलावाजवळ ते पोहचले. दीड तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खडतर असलेल्या दगडाच्या वाटेतून चढाईला प्रारंभ झाला. या मार्गावर उंचीच्या शिड्या व दोरखंड लावण्यात आले होते. (वाया फेराटा) त्या माध्यमातून पुन्हा चढाई सुरु केली. माऊंट केनियाच्या ओलेनाना, पाटीयान, नेलियान या ती शिखरांपैकी एक महत्वाचे असलेले ओलेनाना नावाचे शिखर या चौघांच्या संघाने पादाक्रांत केले. तीन दिवसांच्या चढाई नंतर उतरण्यास दोन दिवसांचा कालावधी लागला. पहिल्या दिवशी चार तास, दुसऱ्या दिवशी ८ तास, तिसऱ्या दिवशी १७ तास चढाई करावी लागली, असेही डॉ. घन यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून हे शिखर सर करण्याचा मानस होता. त्यासाठी दिवसातून चार वेळा पांडवलेणी चढण्याचा व उतरण्याचा सराव केला. कधी ब्रह्मगिरीवरदेखील गेलो. शारिरीक व्यायामाबरोबरच योगा, मेडिटेशन याचाही सराव केला. या पुढेही अनेक मोहीम करायच्या आहेत.

- डॉ. शिरीष घन, गिर्यारोहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकट१

$
0
0

दृष्टिक्षेप

- दुष्काळी परिस्थिती व मागण्यांची दखल घेण्यासाठी टास्क फोर्स स्थापन

- नांदूरमध्यमेश्वर धरणातही मृत साठा शिल्लक

- मे उलटूनही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाई नियोजन आराखडा कागदावरच

जिल्ह्यातील सद्य:स्थिती

०८ तालुके दुष्काळी

१७ महसुली मंडळांत टंचाई

९०१ गावे, वाड्यांना झळा

२६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

निफाड तालुका

१६ पाझर तलाव आटले

४४७ बंधारे कोरडेठाक

३० गावे टंचाई तीव्र

मालेगाव तालुका

४० पेक्षा अधिक गावांतील भूजल पातळीत घट

२०० फुटांपेक्षा अधिक खोल भूजल पातळी

१८ गावांच्या विंधन विहिरींचे प्रस्ताव लालफितीत

त्र्यंबकेश्वर तालुका

८५ गावांना दरवर्षी झळा

१८३ वाड्यांमध्ये टंचाई

इगतपुरी तालुका

०४ धरणांनी गाठला तळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'हिटलरविषयी समाजात दोन विचार'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक स्तरावर खूपच मोठे नुकसान झाले. पाच वर्षे, आठ महिने, सात दिवस चाललेले हे युद्ध ८ मे १९४५ला हे युद्ध संपले. जर्मनीचा तत्कालीन सर्वेसर्वा एडॉल्फ हिटलर या युद्धाला कारणीभूत होता. या महायुद्धातील हिटलरच्या अत्याचारांची, त्यांच्या महत्त्वाकांक्षांच्या वर्णनाची इतिहासात नोंद केली आहे. हिटलरविषयी त्यांना आदर्श मानणारे तर काही लोक कर्दनकाळ मानणारे, असे दोन्ही विचारांचे दिसतात, असे प्रतिपादन अध्यापक पुष्पावती, रुंग्ठा कन्या विद्यालयचे डॉ. जोगेश्वर नांदूरकर यांनी गुंफले. प्रौढ नागरिक मित्र मंडळ आयोजित वसंत व्याख्यानमालेचे सहावे पुष्प सोमवारी पार पडले. डॉ. नांदूरकर यांनी हे पुष्प 'एडॉल्फ हिटलर व दुसरे महायुद्ध' या विषयावर गुंफले. ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन हिटलरविषयी नांदूरकरांनी विचार मांडले.

ऋचक योग हिटलरच्या कुंडलित होता. या योगामुळे आणि मंगळ ग्रह चांगला असल्यामुळे हिटलर ते शूर, धाडसी, होता. त्यामुळेच त्याच्यात लढाऊ वृत्ती निर्माण झाली. या ग्रहांमुळे कौटुंबिक सौख्य त्यांना मिळाले नाही. वडिलांनी कठोरपणे वागणूक दिली. खरेतर हिटलर स्वभावाने हळवा होता. परिस्थितीने त्यांना कठोर बनवले. सैन्यात दाखल झाल्यानंतर खूप पराक्रम त्यांनी करून दाखवला. पण ज्यू लोकांविषयी त्यांच्या मनात अतिशय राग होता. त्यामुळे त्यांनी सोयीनुसार डाव टाकून सत्ता आपल्या हातात घेतली. नाझी पक्षाची स्थापना केली. चंद्रकांत जामदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक केले आहे. कल्पना कुवर यांनी परिचय करून दिला. अनंत साळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रदीप देवी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टीकोन बदला; अन्यथा नाती संपतील!

$
0
0

मानसोपचार तज्ज्ञ राकीब अहमद यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्यानेच आज कौटुंबिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्फोट हे फक्त अणू रेणूंचे होत नाहीत तर नात्यांचेही होत आहेत. घटस्फोट हे फक्त पती-पत्नींचे होत नाही तर आई-मुलगी, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, बहिण-बहिण असे नात्यांचेही होत आहेत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नाही तर नाती संपतील, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ राकीब अहमद यांनी केले.

नाशिकरोड बँक आणि मसाप नाशिकरोड शाखेतर्फे नाशिकरोडला सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत 'नांदा सौख्यभरे' या विषयावर राकीब यांनी विचार मांडले. जीवनाचा उद्देश, नीतीमत्ता, नीतीमूल्ये, दर्जा, जजमेंट यावर जीवनाचा दृष्टीकोन ठरतो. जसे कर्म तसे फळ असते. वाढती स्पर्धा, हेवेदावे यामुळे आत्महत्या वाढल्या नाहीत, तर या समस्यांना सामोरे जाण्यासाठी जी एकत्र समाज आणि कुटुंब पद्धती होती ती संपल्यामुळे हे होत आहेत. नातीगोती संपल्यामुळे पती-पत्नीही वेगळे राहत आहेत. नाती संपवून आपण व्यवहार सुरू केले आहेत. भावा-भावांमध्ये बोलण्याची संधी असते पण इच्छा नसते. शुल्लक कारणांनी आपण नाते तोडतो. लोक नव्हे तर मने दूर झाली आहेत. ताणतणाव संपवून, आनंदासाठी स्वतःला कुटुंबाशी, समाजाशी जोडा. त्यासाठी स्वतःच पुढाकार घ्या. पती-पत्नीचे संबंध बिघडत आहेत. कारण आपण अहंकार जपत आहोत. आपण वर्तमानाएवजी भूतकाळ किंवा भविष्यकाळात जगत आहोत. इच्छा आणि गरजा यातील फरक आपण विसरलो आहोत, असे मत त्यांनी मांडले.

'थँक्यू, सॉरी, प्लीज' या तीन शब्दांनी जीवन सुंदर होते. फक्त हे तीन शब्द व्यक्ती व काळ बघून वापरू नयेत. माणसाची किंमत, स्थळ, वेळेनुसार बदलू नये. जीवन हे एकच उद्देश आहे. नव्या पिढीची नीतीमूल्य बदलली आहेत, ती त्यांना शिकवली तर कुटुंब आणि समाज सुखी होईल, असा विश्वास अहमद यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरट्याचा सिडकोत उपद्रव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी जाणाऱ्या सिडकोतील नागरिकांचे मोबाइल चोरटे पळवून नेत आहेत. चोरट्यांनी रविवारी (दि. ५) तब्बल चार मोबाइलवर डल्ला मारला.

गणेश चौक भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून करण्यात येते आहे. योगेश श्यामराव जोशी (रा. गणेश चौक, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. जोशी कुटुंबियासह शेजारी गच्चीवर झोपलेले असतांना रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपयांचे मोबाइल चोरून नेले.

भाजी मंडईत

मोबाइल लंपास

भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या खिशातील किंमती मोबाइल चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना सातपूर भाजी मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छन्नुलाल लालचंद पाटील (रा. राधाकृष्णनगर, सातपूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पाटील १२ डिसेंबर रोजी सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी भाजी मंडईत गेले होते. भाजीपाला खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील लिनोव्हा कंपनीचा मोबाइल चोरून नेला.

..............

'एलअ‍ॅण्डटी'च्या साहित्याची चोरी

जत्रा हॉटेल ते आडगाव दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामावरून चोरट्यांनी साहित्य चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीपकुमार मनोजकुमार साहू (रा. बळी मंदिराजवळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. जत्रा हॉटेल ते आडगाव दरम्यान एलअ‍ॅण्डटी या बांधकाम कंपनीच्या वतीने उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. के. के. वाघ कॉलेज समोर २६ एप्रिल ते ४ मे दरम्यान सुरू असलेल्या बांधकामावरून अज्ञात चोरट्यांनी दोन बोरिंग स्टार्टर व एलईडी हॅलोजन असा सुमारे आठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

विष प्राशन करीत

दोघांची आत्महत्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यात एका २५ वर्षांच्या युवकासह ५० वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी आडगाव आणि पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जत्रा हॉटेल भागात राहणाऱ्या विशाल दुर्योधन माने (वय २५, रा. शरयू पार्क) या तरुणाने शनिवारी (दि.४) अज्ञात कारणातून आपल्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यास तत्काळ नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना रविवारी (दि. ५) त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुसरी घटना हनुमानवाडीत घडली. आत्माराम नाना धोंडगे (वय ५०, रा. हनुमानवाडी, पंचवटी) यांनी रविवारी (दि. ५) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात येताच नातेवाईक नवनाथ कानडे यांनी त्यांना खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीवनात तुलना म्हणजे दु:ख!

$
0
0

समुपदेशक अश्विनी धुप्पे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसाचे आयुष्य व्यवस्थित चाललेले असते अशातच तो कुणाशी तरी तुलना करू लागतो आणि त्याच्या वाट्याला दु:ख येते. खरे तर तुलना म्हणजेच दु:ख हे समीकरण एकदा लक्षात आले म्हणजे आयुष्य सर्वार्थाने चांगले जगण्याची सुरुवात होते, असे प्रतिपादन समुपदेशक अश्विनी धुप्पे यांनी केले.

वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या सत्रात त्या बोलत होते. 'आनंदी कुटुंबाचे रहस्य' या विषयावरील सोमवारी त्यांनी सहावे पुष्प गुंफले. हे पुष्प अॅड. द. तु. जायभावे यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे ही व्याख्यानमाला सुरू आहे.

धुप्पे म्हणाल्या, की महिलांमध्ये एक वेगळी शक्ती आहे, ती योग्य दिशेने प्रवाहित झाली तर या जगात फार मोठे बदल घडून येतील. आनंदी जीवनाचे एक सूत्र असते, ते लक्षात आले म्हणजे माणूस नीटनेटके जगायला लागतो. जीवनात खूप ताणतणाव आहे त्यामुळे माणसाची खूप घुसमट होते. त्याचा पहिला परिणाम आरोग्यावर होतो. आजार बळावतात त्यामुळे दु:खाला सामोरे जायचे नसल्यास आपल्यापेक्षा वरच्याचे जगणे पाहून अधिक दु:खी होण्यापेक्षा आपल्यापेक्षा हालाखीचे जीवन जगणाऱ्याकडे बघा.

यावेळी मंचावर अॅड. जयंत जायभावे, शकुंतला जाधव, अॅड. वसुधा कराड, माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांची उपस्थिती होती. अॅड. द. तु. जायभावे यांच्या स्मृतींना अॅड. मयूर जाधव यांनी उजाळा दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

बार कौन्सिल देणार मोफत सेवा

महापालिकेच्या धोरणामुळे सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून काही लाख रुपये वर्षाकाठी त्या भरू शकणार नाही. त्यामुळे बार कौन्सिलने त्यांना कोर्ट कचेरीसाठी मोफत सेवा पुरवावी, असे आवाहन वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले. त्यावर बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी मोफत सेवेचे जाहीर आश्वासन दिले. 'महापालिकेला कायद्याचा बडगा दाखवू' असे सांगतानाच नागरिकांनीही अशा सेवाभावी संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नोंदवले.

आजचे व्याख्यान

वक्ता : विलास शिंदे

विषय : भारतीय शेती सद्यस्थिती व पुढील आवाहने

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपार गुंडाकडून हल्ला अन् दहशत!

$
0
0

सरकारवाडा पोलिसांकडून २४ तासांनंतर अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुन्हेगारी कारवायांमुळे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणाऱ्या तडीपार संशयितास पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचाऱ्यांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्याच्याविरूद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

जावेद उर्फ साजन सल्लाउद्दीन अन्सारी (रा. वास्तूनगर, अशोकनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडीपाराचे नाव आहे. जावेद याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलिसांनी त्यास तडीपार केले आहे. घरासमोरील मोकळ्या मैदानावर शनिवारी (दि. ४) बसलेल्या सुशील श्रीवास्तव (रा. नववृंदावन नगर, अशोकनगर) यास येथे का बसलास, असे विचारत संशयित अन्सारी व त्याच्या एका साथिदाराने शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. श्रीवास्तव जमिनीवर कोसळताच संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड टाकला. हा प्रकार पोलिस ठाण्यात गेल्याने तडीपाराच्या वास्तव्याबाबत पोलिसांना समजले. त्यानंतर जावेदचा माग सुरू झाला. पोलिस त्याचा शोध घेत असतांना रविवारी (दि. ५) तो गोल्डन वास्तू बिल्डिंगमधील प्रथमेश शिलाई दुकानासमोर आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने त्यास बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिस अटक करण्याची चाहुल लागताच त्याने पोलिसांवर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सावध पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. संशयिताच्या अंगझडतीत धारदार चाकू आढळून आला. या प्रकरणी पोलिस नाईक हिरामण सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरोधात विना परवानगी वावर, शासकीय कामात अडथळा तसेच शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तर श्रीवास्तव याच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकू घेऊन दहशत निर्माण करणारा अटकेत

हातात चाकू घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. संशयित राजीवनगर झोपडपट्टीत भरदिवसा दहशत माजवित होता. त्याच्या ताब्यातून धारदारचाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर उर्फ हांबऱ्या नारायण बशिरे (वय २८, रा. राजीवनगर झोपडपट्टी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित रविवारी (दि. ५) दुपारी झोपडपट्टीतील सार्वजनिक रोडवर हातात सुरा घेऊन दहशत निर्माण करण्यासाठी शिवीगाळ करीत फिरत होता. ही घटना कळताच पोलिसांनी त्यास घटनास्थळी पोहचून बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलिस नाईक राजू राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी ऐकत नाहीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित असताना, 'अधिकारी माझे ऐकत नाहीत' असे धक्कादायक विधान करीत दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आचारसंहितेचे कारण पुढे करीत अधिकारी बैठकीला येत नसल्याचे सांगत दुष्काळाचे खापर अधिकाऱ्यांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. जिल्ह्यात २६३ टँकरद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे, तर जनावरांचेही चाऱ्याअभावी हाल आहेत. त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दुष्काळी दौऱ्याकडे शेतकरी आस लावून होते. महाजन दुष्काळाबाबत काहीतरी ठोस उपाययोजना करतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे महाजन यांच्यावर शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करीत, आपल्या व्यथा महाजन यांच्यासमोर मांडल्या. चारा छावण्या सुरू कराव्यात, जिल्हा बँकेची कर्जवसुली थांबवावी, ५० पैशांच्या आत आणेवारी असतानाही मदत नाही आदी तक्रारी शेतकऱ्यांनी मांडल्या. त्यामुळे महाजन यांच्याकडून शेतकऱ्यांचे सांत्वन होणे अपेक्षित असताना, त्यांनीच धक्कादायक विधान करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेचा बागूलबुवा केला जात असल्याचे सांगत, 'अधिकारी आमचे ऐकत नाहीत' असे धक्कादायक विधान केले. या दौऱ्यात अधिकारी आले नसल्याचे सांगून हा आमचा खासगी दौरा असल्याचा दावा महाजन यांनी शेतकऱ्यांसमोर केला. प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना कामासाठी फोन केले तर आचारसंहितेचे कारण दिले जाते. एखादा अधिकारी बरोबर असता तर त्याला दुष्काळाची दाहकता लक्षात आली असती, असा दावाही त्यांनी शेतकऱ्यांसमोर केला. त्यामुळे महाजन यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित शेतकरी आश्चर्यचकीत झाले. पालकमंत्रीच असे सांगत असतील तर जिल्हा प्रशासन एवढे मुजोर कसे, असा सवाल यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. परंतु, पालकमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नसतील या विधानावर मात्र शेतकरीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. दुष्काळाचे खापर प्रशासनावर फोडून जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न पालकमंत्री करीत असल्याची चर्चा यावेळी शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली.

मग आम्ही जायचे कोणाकडे?

तुम्ही आमच्या दु:खावर फुंकर घालू शकत नसाल तर आमचा तळतळाट कोणासमोर मांडायचा, असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. आम्ही फक्त मते देण्यासाठीच आहोत का, असा सवाल करीत अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही यावेळी केली. परंतु, केवळ अधिकाऱ्यांवर खापर फोडून तुम्ही जबाबदारीतून मुक्त होऊ नका, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंढेंसह जाधव गटावर दरोड्याचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

लोकसभेची निवडणूक कोणतेही गालबोट न लागता पार पडल्याने सर्वच पक्षांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु, सातपूरला निवडणुकीवरून दोन राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला वाद थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. परिणामी दोन राजकीय पक्षांच्या गटांवर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, स्वारबाबानगर येथील मायको रुग्णालय येथे विजय जगताप यांना मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडील ६ हजार रुपये व एक तोळा सोन्याची अंगठी संशयितांनी चोरली. जगताप यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी अरुण जाधव, रमेश जाधव, वामन गायकवाड, भिवानंद काळे, अमिन शेख, हेमंत सोनवणे, नीलेश जाधव, नितीन गोऱ्हे, विनोद मुंगतोडे, नंदकुमार जाधव, राहुल कांबळे व अविनाश शिंदे यांच्यावर संशयित म्हणून दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर अरुण जाधव यांना वंचित बहुजन आघाडीचे काम का केले म्हणून संशयित प्रकाश लोंढे, लोंढेचा भाचा (नाव माहित नाही), विजय जगताप, ऋषिकेश सोनवणे व एक काळ्या वर्णाचा इसम यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांना मारहाण करत संबधितांनी सोन्याची चेन व ७ ते ८ हजार रुपये घेतल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा छावण्या सुरू करू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असून, नांदगाव तालुक्यात तातडीने चारा छावण्या सुरू करण्यात येतील, तसेच टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नांदगाव येथील खिर्डी, बाणगावसह परिसरातील शेतकऱ्यांना दिले. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नांदगाव येथे आले असता बाणगाव येथे बैठकीत ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.

नार-पार सोडवू

केंद्रात पुन्हा एकदा भाजप शिवसेनेचे मोदी सरकार येणार असून, सरकार आल्यावर नार- पारचा प्रश्न तडीस नेऊ, अशी ग्वाही महाजन यांनी बाणगाव येथील बैठकीत दिली. चारा छावण्या लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी भाजपचे माजी आमदार संजय पवार, तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, तालुकाध्यक्ष किरण देवरे आदी उपस्थित होते. बाणगाव येथील बैठक आटोपून महाजन हिसवळकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images