Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चित्रपट चावडीत उद्या लघुपट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिकतर्फे 'चित्रपट चावडी' उपक्रमांतर्गत उद्या (२६ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध बेल्जियम दिग्दर्शक अ‍ॅग्नेस वरदा यांचा 'क्लिओ फ्रॉम फाइव्ह टू सेव्हन' हा लघुपट दाखविण्यात येणार आहे.

चित्रपट चावडी हा उपक्रम गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्स येथील मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब सेंटरमध्ये होणार आहे. अ‍ॅग्नेस वरदा या बेल्जियम चित्रपट दिग्दर्शक असून, ९० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सिनेमे आणि लघुपटांची निर्मिती केली आहे. उपक्रमांतर्गत दाखविण्यात येणाऱ्या लघुपटात पॅरिसमध्ये राहणाऱ्या एका तरुण गायिकेच्या जीवनाची कथा आहे. कॅन्सर या आजाराची लागण झालेली गायिका आणि तिचे खासगी आयुष्य, अशी ही कथा आहे. नव्वद मिनिटांचा हा लघुपट असून, या मोफत उपक्रमास रसिकांनी आ‌वर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाहीरनाम्यांमध्ये खेळ वंचितराहिल्याची क्रीडा क्षेत्रात खंत

$
0
0

नाशिक : आमचा पक्ष सत्तेवर आल्यावर खेळाडूंसाठी या योजना अमलात आणल्या जातील, त्या योजना अमलात आणल्या जातील, अशी आश्वासने सर्व पक्षांकडून दिली जातात. यंदा मात्र सर्वच पक्षांनी जाहीर केलेल्या वचननाम्यात नगण्य क्रीडा योजनांना स्थान दिले आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये सर्वच पक्षांबाबत नाराजीचा सूर आहे. खेळ हा कायमच दुर्लक्षित असलेला प्रकार आहे. या क्षेत्राकडून राजकीय पक्षांना काहीही मिळत नसल्याने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी क्रीडा क्षेत्राला स्थान दिलेले नाही. कबड्डी प्रशिक्षक प्रशांत भाबड, टेबल टेनिसचे प्रशिक्षक शेखर भंडारी, खो-खोचे प्रशिक्षक उमेश आटवणे यांच्यासह क्रीडापटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण्यांसाठी खेळ कायमच दुर्लक्षित आहे. खेळातून फारशी आर्थिक प्राप्ती होणार नसल्याने सर्वच पक्ष याकडे दुर्लक्ष करतात. क्रीडाविषयक अनेक निर्णय प्रलंबित असल्याची खंत क्रीडा प्रशिक्षकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षणचित्रे -

$
0
0

क्षणचित्रे -

- सायंकाळी पाचपासूनच कार्यकर्ते मैदानात जमण्यास सुरुवात

- सभेसाठी येणाऱ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

- सायंकाळी ७.३० नंतर गर्दी वाढली.

- 'करून दाखविणार' या प्रचारगीताने वेधले लक्ष

- विकासनामा आणि जाहीरनाम्याची चित्रफीत प्रदर्शित

- सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी

- सायंकाळी ८ वाजता सभेला सुरुवात

- सभेला सुरुवात होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

- फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकासुरांच्या नादी लागू नका

$
0
0

- उद्धव ठाकरेंची छगन भुजबळ यांच्यावर टीका

- राहुल गांधी, शरद पवारांवरही हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करायला निघालेले भुजबळ आता स्वत:च्या कर्माने जेलमध्ये गेले आहेत. जो भगव्याचा द्वेष करतो तो कर्माने मरतो. आज जामिनावर आहेत, उद्या पुन्हा जेलमध्ये जातील, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. काही जण अपक्ष म्हणून उभे आहेत, तर काही जण मफलरमधून गळा काढत आहेत. माझा दोष नाही; परंतु मला जेलमध्ये टाकण्याचा दावा करीत आहेत. मात्र, नाशिककरांनी अशा बकासुरांच्या नादी लागू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बुधवारी अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा झाली. या वेळी उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री दादा भुसे, शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार बाळासाहेब सानप, राजाभाऊ गोडसे, देवयानी फरांदे, योगेश घोलप, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

या वेळी ठाकरे यांनी देव, देश आणि धर्मासाठी भाजपसोबत युती केल्याचा पुनरुच्चार केला. काहींना लोक मत देत नाहीत, म्हणून ते यांनाही मत देऊ नका, असे सांगत फिरत असल्याचा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे हिंदुत्ववादी सरकार नको म्हणून एकत्र आले आहेत. दहशतवादी इशरत जहाँच्या घरी जाणारे राष्ट्रवादीचे नेते शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या घरी कधी गेले होते काय? सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करणारे आणि आपल्या देशातील सैन्यबलावर अविश्वास करणाऱ्यांना आणि निर्ढावलेल्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल त्यांनी या वेळी केला.

'लाव रे'ची कॉपी

'लाव रे तो व्हिडीओ' या राज ठाकरेंच्या वाक्याची उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये कॉपी केली. ते म्हणाले, की राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दल असलेल्या विचारांचा व्हिडीओच नाशिककरांना ऐकवला. मी 'लाव रे तो व्हिडीओ' असे म्हणत नाही; परंतु तुम्ही यांचे सावरकरांबद्दलचे विचार ऐका असे सांगत, देशासाठी त्याग करणाऱ्या सावकरांबद्दल आदराने बोलण्याऐवजी असभ्य टीका करणाऱ्या राहुल गांधींवर पायताण काढायचे का, असा सवाल केला.

उद्धव म्हणाले...

- हिंदुस्थानी मुसलमान जवान औरंगजेब मला हवाय

- मला मुसलमानांचा द्वेष नाही

- दलित आणि बौद्ध यांच्या खांद्यावर डोके टेकवून ओवेसी पाऊल पुढे टाकतोय

- भाजपसोबत मतभेद होते, मतभिन्नता होती हे खरंय

- देशाच्या मजबुतीसाठी आम्ही एकत्र

- काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष

- हिंदुत्ववादी सरकार नको म्हणून विरोधक एकत्र

- काँग्रेस नेत्यांनी घोटाळ्यातही आदर्श दाखवला

- राहुल गांधींच्या वडिलांना शिव्या देणारे पवार पुन्हा त्यांच्यासोबत

- हिंदुत्वाचा प्रचार करणे यात काहीच गैर नाही

- बांगलादेशी फिरदौस अहमद या अभिनेत्याला ममतांनी प्रचारात बोलावले

- कचखाऊ नेतृत्व नसेल तर सैन्यही काही करू शकत नाही

- नरेंद्र मोदी हे कणखर नेतृत्व; राममंदिर बांधणारच

- ३७० वे कलम रद्द करणारच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने आणले बुरे दिन

$
0
0

दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भाजपने सत्ता मिळवली. मात्र, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, व्यापारी यांच्यासह समाजातील सर्व घटकांना बुरे दिन आणले आहे. त्यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी गटतट विसरून एकत्र येत आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांना विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. त्या वेळी पाटील बोलत होते.

ते म्हणाले, की केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करीत सरकारने दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्याने जनतेतील नाराजी बघून जवानांच्या नावाने मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. सरकारने आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या विविध योजनांना कात्री लावली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर दिली जात नाही. फसवी कर्जमाफी केली. सरकारच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. ननाशी परिसरातील पाच वळण योजना बंद करीत महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला नेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हक्काचे पाणी राखीव ठेवण्यासाठी, आदिवासींचे हक्क कायम ठेवण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची गरज असून, परिवर्तन नक्की होईल.

आमदार नरहरी झिरवाळ म्हणाले, की सरकारने आदिवासी जनतेवर अन्याय केला आहे. विविध योजना बंद केल्या आहेत. समाजातील सर्व घटक सरकारवर नाराज असून, मतपेटीतून जनता सरकारला धडा शिकवेल, असे पाटील यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर, प्रकाश वडजे, मनसे पेठ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, विश्वासराव देशमुख, शेखर देशमुख, दामू राऊत, जनार्दन भोये, राजू पवार आदींची भाषणे झाली. या वेळी पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांना करावा लागणार खुलासा

$
0
0

निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी सादर केलेला प्रचारावरील आतापर्यंतचा खर्च आणि खर्च निरीक्षकांनी नोंदविलेला खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली आहे. या तफावतीबाबत खुलासा करावा, असे स्पष्ट निर्देश निवडणूक शाखेने या उमेदवारांना दिले आहेत. अद्याप या उमेदवारांनी खुलासा सादर केला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी सध्या जीवाचे रान केले आहे. या प्रचारावर होणारा खर्च निवडणूक शाखेकडे सादर करणे उमेदवारांना अनिवार्य आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक खर्चाचे सादरीकरण उमेदवारांनी केले आहे. परंतु, उमेदवारांनी सादर केलेला खर्चाचा तपशील आणि खर्चावर देखरेख ठेवणाऱ्या भरारी पथकांनी नोंदविलेली निरीक्षणे यामुळे खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे पहावयास मिळते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांचा आतापर्यंत २६ लाख ७० हजार ५५८ रुपये खर्च झाल्याचे निरीक्षण यंत्रणेने नोंदविले आहे. त्याखालोखाल अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा खर्च २२ लाख ९६ हजार ४०४ रुपये एवढा नोंदविण्यात आला आहे. परंतु, या उमेदवारांकडून सादर करण्यात आलेला खर्च अनुक्रमे हा तुलनेने कमी दाखविण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली आहे.

भुजबळ यांनी १७ लाख ५९ हजार ८०४ रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक शाखेला दिली आहे. त्यामुळे नऊ लाखांहून अधिक रकमेची तफावत दिसते आहे. कोकाटे यांनी ३ लाख २७ हजार ७७९ रुपये खर्च दाखविला असून तब्बल १९ लाख ६८ हजारांची खर्चाची तफावत पहावयास मिळते आहे. हेमंत गोडसे यांच्या खर्चातही १० लाख ३५ हजारांची तफावत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांचा एक लाख ७८ हजार ९२७ रूपये खर्च झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

अशी जाणवलीय तफावत

उमेदवार खर्चाचा तपशील

विलास देसले १ लाख ५० हजार ७२३

सुधीर देशमुख ५६ हजार ३५०

वैभव आहिरे ४३ हजार ४६०

संजय घोडके ३८ हजार ४२८

विनोद शिरसाट ३१ हजार ८२८

प्रकाश कनोजे २९ हजार ९६१

सिंधूबाई केदार २८ हजार ६५०

प्रियंका शिरोळे २६ हजार ५४०

धनंजय भावसार २६ हजार ४००

शिवनाथ कासार २५ हजार ८६०

शरद आहेर २३ हजार ६५५

सोनिया जावळे १९ हजार ३२५

देविदास सरकटे १३ हजार ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशियायी अॅथलेटिक्समध्ये संजीवनी तिसरी

$
0
0

सलग दोन पदके पटकावली

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोहा, कतार येथे सुरू असलेल्या २३ व्या अशियायी अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. संजीवनीने या स्पर्धेत सलग दोन पदके पटकावल्याने भारतीयांची मान उंचावली आहे. या स्पर्धेत भाग घेणारी संजीवनी ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.

या स्पर्धेत बहारिनच्या हॅब्तेजिब्रल शिताये हिने प्रथम क्रमांक पटकावत १० हजार मिटरचे अंतर ३१.१५.६२ मायक्रो सेकंदात पूर्ण केले. जपानच्या नीया हितोमी हिने हे अंतर ३१.२२.६३ मायक्रोसेकंदात पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला तर भारताच्या संजीवनी जाधव हिने हे अंतर ३२.४४.०९६ सेकंदात पूर्ण करीत तृतीय क्रमांक पटकावला. याच स्पर्धेत ५ हजार मीटर गटात भारताच्या संजीवनी जाधव हिने चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत संजीवनीने दोन पदके मिळवली आहे. पतीयाळा येथे मार्च महिन्यात झालेल्या सीनिअर फेडरेशन स्पर्धेत दहा किलोमिटर गटात संजीवनीने ३२ मिनीटे ५७ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले होते. या कामगिरीच्या आधारावर तिची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. संजीवनी सोबत मध्य प्रदेशची पारुल चौधरी ही सहभागी झाली होती. तिने ५ हजार मीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला होता. संजीवनी जाधव ही महाराष्ट्रातून सहभागी होणारी एकमेव खेळाडू आहे.

.....

संजीवनीवर डोपिंगचे आरोप झाल्यावर दु:ख झाले. परंतु या आरोपातून न खचता तिने पात्रता सिद्ध केली आहे. यापुढेही ती अधिकाधीक मेडल भारताला मिळवून देईल यात शंका नाही.

विजेंद्रसिंग, संजीवनीचे प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊशे हेक्टरवर कोप!

$
0
0

अवकाळीचा पावसाने ५० गावांमधील एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ५४ गावांमधील ९४१.५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तब्बल एक हजार १८४ शेतकरी यामुळे बाधित झाले असून कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसल्याची माहिती पंचनाम्यांमधून पुढे आली आहे.

१३ ते १६ एप्रिल या कालावधीत वादळी वाऱ्यासह आलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हावासीयांची दाणादाण उडविली. या पावसामुळे शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या सहाय्याने पंचनामे केले. जिल्ह्यातील १५ पैकी तब्बल आठ तालुक्यातील ५४ गावांमधील पिकांना या पावसामुळे फटका बसला आहे. यामध्ये ७२२ हेक्टरवरील बागायती क्षेत्राचे तर २१८.५९ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. तब्बल ३८३ हेक्टरवरील कांदा यामुळे बाधित झाला आहे. त्याखालोखाल ३०७ हेक्टरवरील भाजीपाल्याला अवकाळीचा तडाखा बसला. या पावसाने डाळींबाचे मोठे नुकसान केले असून १७२ हेक्टरवरील डाळींब पिक धोक्यात आले आहे. २६.२० हेक्टरवरील द्राक्ष बागा, २५ हेक्टरवरील गहू, १५.३४ हेक्टरवरील लिंबू, साडेचार हेक्टरवरील टोमॅटो, १,६० हेक्टरवरील काकडी, अर्धा हेक्टरवरील भोपळा आणि ०.३० हेक्टरवरील मिरचीला या पावसाचा फटका बसला आहे. १.४० हेक्टरवरील आंबा, साडेतीन हेक्टरवरील कलिंगड, चिकूचे ०.२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. आतापर्यंतच्या एकूण ९४० हेक्टरचा विचार करता सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

असे झाले नुकसान

पीक.......शेती क्षेत्र

कांदा : ३८३ हेक्टर

भाजीपाला : ३०७ हेक्टर

डाळींब : १७२ हेक्टर

द्राक्ष बागा : २६.२० हेक्टर

गहू : २५ हेक्टर

लिंबू : १५.३४ हेक्टर

टोमॅटो : ४.५ हेक्टर

कलिंगड : ३.५ हेक्टर

काकडी : १.६० हेक्टर

आंबा : १.४० हेक्टर

भोपळा : ०.५ हेक्टर

मिरची : ०.३० हेक्टर

चिकू : ०.२० हेक्टर

एकूण : ९४० हेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पथदीपांचा अजूनही भरदिवसा लखलखाट

$
0
0

पथदीपांचा अजूनही

भरदिवसा लखलखाट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जत्रा हॉटेल चौक ते नांदूरनाका दरम्यान दुभाजकातील पथदीप सायंकाळी सहाच्या आताच सुरु असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतरही हे दिवे त्याच वेळेत सुरु होत आहेत.

उन्हाळ्यात साधारण सायंकाळी साडे सात वाजेनंतर अंधार पडतो. हे विचारात घेता रोज तास दीडतास पथदीप आधी सुरू राहिल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांनी दिलेल्या महसूलचा अपव्यय होत आहे. या पथदिपांचे टाईमर बदलण्याची गरज आहे. याच मार्गावरील अन्य पथदीप मात्र सायंकाळी उशिरा सुरू होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएमसीएस’मध्ये २७ ला माजी विद्यार्थी मेळावा

$
0
0

नाशिक : मविप्रच्या सीएमसीएस महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी (दि. २७) होणार आहे. यामध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक सामाजिक व व्यावसायिक यशामागे असलेल्या सीएमसीएस महाविद्यालयाच्या योगदानाचे महत्त्व विषद करणार आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आलेल्या विविध अनुभवांचे कथन करणार आहेत. मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. शिंदे व उपाध्यक्ष प्रा. प्रशांत कदम यांनी केले आहे.

करिअर मार्गदर्शन आज

नाशिक : जागर मनाचा या करिअर मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी (दि. २५) करिअर मार्गदर्शन सेमिनार होणार आहे. गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे संयुक्त राष्ट्रांची ग्लोबल युथ ब्रँड अॅम्बॅसॅडर व पुणे येथील रहिवासी दीक्षा दिंडे ही सायंकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. शारिरीक विकलांगतेवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर तिने केलेला प्रवास या सेमिनरमधून उलगडला जाणार आहे. 'जागर मना'च्या सहसंचालिका श्रीया गुणे या दीक्षाची मुलाखत घेणार आहेत. दुसऱ्या सत्रात करिअर समुपदेशक शंतनू गुणे हे 'करिअर आणि त्याची निवड' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसावळ शटल, मुंबई-भुसावळ पॅसेंजर सुरू

$
0
0

उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देवळाली भुसावळ शटल आणि मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन रेल्वेगाड्या दीड महिन्यानंतर पुन्हा सुरू झाल्याने उत्तर महाराष्ट्राच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुटीमुळे या दोन्ही गाड्यांना दररोज एकूण अडीच हजार प्रवासी लाभत आहेत.

देवळाली-भुसावळ शटल आणि मुंबई-भुसावळ पॅसेंजर या गाड्यांना खान्देशवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभतो. या दोन्ही गाड्या स्थानकात येताच पूर्ण भरून जातात. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, या दोन्ही गाड्यांना मिळून दररोज अडीच हजार प्रवासी असतात. दीड महिना या गाड्या बंद होत्या. याशिवाय या दीड महिन्यात इगतपुरीमधील रेल्वे ब्लॉक व अन्य कारणांमुळे भरपूर महसूल देणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी व अन्य गाड्या रद्द केल्या. यामुळे लाखोंचा महसूलही बुडाला.

...

छोट्या गावांना लाभ

देवळाली-भुसावळ शटल आणि मुंबई भुसावळ पॅसेंजरमुळे नाशिक ते भुसावळ दरम्यानच्या अनेक छोट्या गावांना फायदा होतो. मनमाड, ओढा, खेरवाडी, कसबे सुकेणे, निफाड, उगाव, लासलागव, समीट, मनमाड, पानेवाडी, हिसवळ, पांझणे, नांदगाव अशा असंख्य छोट्या रेल्वेस्टेशनमध्येही ही गाडी थांबते. त्या गावातील विद्यार्थी, नोकरदार या दोन गाड्यांवर अवलंबून असतात. या गाडीवर फेरीवाले, शेतकरी, छोटे विक्रेते, रिक्षाचालक असे अनेक व्यावसायिकही रोजीरोटी करतात. त्यांनाही दिलासा मिळाला आहे.

...

सौजन्य दाखवावे

सोमवारी (दि. २२) भुसावळ-देवळाली पॅसेंजर पहाटे चारला नेहमीप्रमाणे भुसावळहून देवळाली रेल्वेस्थानकात दाखल झाली. तथापि, गाडी दीड महिना बंद असल्याने प्रवाशांना गाडी सुरू झाल्याची माहितीच मिळाली नाही. रेल्वेनेही प्रवाशांना दोन दिवस आधी कळवले नाही. त्यामुळे या गाडीला सोमवारी प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभला. तशीच ही गाडी तोट्यात सकाळी सहाला नाशिकरोडहून भुसावळला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

...

मे महिना सुरू होताच रेल्वे प्रवाशांची संख्या आणखी वाढणार आहे. प्रवाशांना मनस्ताप होऊ नये म्हणून जादा कर्मचारी व जादा तिकीट खिडक्या सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.

- एम. बी. डोके, तिकीट बुकिंग निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाईचा चटके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

एकिकडे संपूर्ण तालुक्याला पाणीटंचाईने ग्रासलेले असताना दुसरीकडे सरकारी यंत्रणा मात्र उपाययाजना करण्यासाठी लोकसभेचे मतदान होण्याची वाट पाहात आहे. पाण्यासाठी यावर्षी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता आहे. विहिरींनी तळ गाठला असून, धरणांमध्ये आता गाळ दिसायला लागला आहे. टंचाईची भीषणता वाढीस लागलेली असताना उपाययोजना करणारे अधिकारी आता निवडणूक कामाला जुंपले आहेत. त्यामुळे टंचाई असून देखील टंचाई प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामसेवक कुचराई करीत आहेत. विशेष म्हणजे प्रस्तावच न दिसल्याने तालुक्यात टंचाई परिस्थितीच नाही असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

सध्या तालुक्यात सोमनाथ नगर गणेशगावची वाडी विनायक नगर व वेळे येथील प्रस्ताव दाखल झालेले आहेत. पाच टँकरचे प्रस्ताव मागणी असतांना दोन टँकर मंजूर झाले अहेत मात्र अद्याप पर्यंत अवघा एक टँकर पंचायत समितीस मिळाला आहे. तालुक्यासह त्र्यंबकेश्वर शहरासही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. त्र्यंबकेश्वर शहरात देखील दिवसाआड पाणी तेही अवघे अर्धा ते पाऊणतास पाणी सोडण्याची वेळ पालिकेवर आली आहे. शहरासाठी अंबोली, बेझे आणि अहिल्या धरण असे तीन तीन प्रकल्प असूनही गावावर टंचाई परिस्थितीची सावट आहे. ब्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीवायएसपींसह चौघांना पोलिस महासंचालक पदक

$
0
0

महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते सन्मान

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी अशा ८०० जणांना दि. २३ एप्रिल रोजी पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील एक पोलिस उपअधिक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलिस हेडकॉन्स्टेबल अशा चार जणांचा समावेश आहे. तर धुळे जिल्ह्यातून पोलिस दलातील अकरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पोलिस महासंचालक सु. कु. जायसवाल यांनी पोलिस महासंचालक पदक जाहीर झालेल्या कर्मचाऱ्यांबाबतचे नुकतेच आदेश काढले. यात पोलिस उपअधीक्षक गजानन तुळशीराम राठोड (जळगाव), पोलिस उपनिरीक्षक युवराज मोतीराम पाटील (जळगाव), पोलिस हवालदार देवेंद्र मोतीराम दाणीर व संजय एकनाथ शेलार यांचा समावेश आहे.

संजय शेलार यांना २२४ बक्षिसे
संजय शेलार यांनी खामगाव शहर, पारोळा, जळगाव, स्थानिक गुन्हे शाखा अशी २२ वर्षांची सेवा बजावली आहे. ते सध्या जळगाव शहर पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहे. सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी बजावली आहे. याबद्दल त्यांना २२४ रिवॉर्ड मिळाले आहेत. या कामगिरीची दखल घेत त्यांना पोलिस महासंचालकपदक जाहीर झाले आहे.

धुळ्यातील अकरा जणांना सन्मान
धुळे : महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस प्रशासनातर्फे धुळे जिल्हा पोलिस दलातील अकरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले असून, पोलिस प्रमुख विश्वास पांढरे यांच्या हस्ते त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. राज्यात पोलिस दलात उत्कृष्ट सेवा, कामगिरी बजाविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाते. यंदा शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, हवालदार नरेंद्र कुलकर्णी यांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील संतोष हिरे, राजेंद्र माळी, शेखर चंद्रात्रे, प्रशिक्षण केंद्रातील ज्ञानेश्वर पाटील, संजय ओतारी व रणजितसिंग वळवी, धुळे राज्य राखीव पोलिस दलातील अंबालाल राजपूत, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातील पोलिस उपनिरीक्षक सुनील जगताप, जगदीश पाटील, मोहंमद मोबीन यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशात उष्णतेची लाट

$
0
0

जळगाव, धुळे व नंदुरबारचा पारा ४२ अंशांवर

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

खान्देशासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसांत खान्देशचा तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहचल्याने अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे खान्देशवासी कासावीस झाले आहेत. बुधवारी (दि. २४) जळगावचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तसेच धुळ्यातही कमाल तापमान ४२, तर नंदुरबारला ४३ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले.

जळगाव जिल्ह्याचे तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच ४३ अंशापयत पोहचले होते. त्यानतंर मागील आठवड्यात झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे ढगाळ वातावरण झाल्याने तापमानात घट आली होते. ४३ अंशावर गेलेले तापमान मागील आठवड्यात ३७ अंश सेल्सियसपयत घसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या चार दिवसात पुन्हा तापमानाच्या पाऱ्याने उसळी घेतली आहे. मंगळवारी (दि. २३) जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव व रावेर दोघा मतदारसंघात मतदान झाले. मात्र, उष्णेच्या लाटीमुळेच मतदानाच्या टक्केवारीवरदेखील परिणाम दिसून आला.

जळगाव शहरात तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहचल्याने जळगावकरांची चांगलीच होरपळ होत आहे. सकाळी १० वाजेपासून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना कासावीस करीत आहेत. रात्री देखिल असह्य उकाड्याचा सामाना करावा लागत आहे. अबाल वृध्दाचे उन्हामुळे हाल होत आहेत. जळगाव शहरात दुपारी आता मध्यवर्ती बाजारपेठा देखिल ओस पडू लागल्यात आहेत.उन्हापासून सरंक्षणासाठी जळगावकरांच्य डोक्यावर टोप्या, रुमाल व डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्सदेखील डोळ्यावर चढले आहेत. महिला तरुणींच्या अंगावर सन कोट, हॅन्डग्लोज दिसायला लागले आहेत. बाजारात ऊसाचा रस, जलजिरा तसेच फळांच्या ज्यूसच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी होत आहे.

उद्याने दिवसभर खुले
सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, दुपारी बाहेर पडणेही कठीण झाले. निसर्गाचा सहवास आणि शितल गारवा मिळावा यासाठी जळगावकरांची पाऊले उद्यानांकडे आपसुक वळत आहेत. महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान येथे लहान मुलांसह, महिला, वृद्धांसाठी हे जणु काही ऑक्सीजन पार्कच ठरले आहे. शाळांना सुटी लागली असल्याने मुलांची या उद्यानांत चांगलीच गर्दी असते. आता ही दोन्ही उद्याने जळगावकरांच्या सेवेत आज (दि. २५) ते दि. १५ जूनपर्यंत सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत दिवसभर खुली राहणार आहेत.

धुळे, नंदुरबारलाही चटके
धुळे : शहरासह जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने तापमानाचा पारा काही अंशी घसरला होता. मात्र आता पुन्हा तापमानात वाढ होऊन धुळे, नंदुरबार शहरांचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे आता नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. धुळे शहरात आणि जिल्ह्यात दि. १३ ते १५ एप्रिलच्या काळात अचानक वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात बदल होऊन गारवा आला होता. कमाल तापमानही ३५ ते ३७ पर्यंत आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा तापमान वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत कमाल तापामान हे ४० अशांच्यावर गेले असून, बुधवारी (दि. २४) धुळे शहराचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या पतीसह सासूविरुध्द गुन्हा

$
0
0

नाशिक : माहेरून दीड लाख रुपये आणावे, या मागणीसाठी छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नवनाथ विष्णू दातीर व हौसाबाई विष्णू दातीर (रा. मोठी विहीर, अंबड) अशी संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी शिंदे पळसे येथील श्रीराम भिकाजी मते यांनी तक्रार दिली. अंबड गावातील मोठी विहीर भागात राहणाऱ्या मायाबाई नवनाथ दातीर (वय २८) या विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या आत्महत्येस सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप मृत विवाहितेचे वडील मते यांनी केला. पहिली मुलगी झाली तसेच, म्हशी घेण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. या छळास कंटाळून अखेर तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक म्हात्रे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिंग एजंटसाठी धावपळ

$
0
0

देवळाली कॅम्प : मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांत पोलिंग एजंट नेमण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी नाशिकमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी व विविध पक्षांकडून प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांत पोलिंग एजंट कार्यकर्ते एकत्र करून जबाबदारी वाटप करण्याचे काम विविध स्तरावर सुरू आहे. काही पक्षांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिंग एजंटची नेमणूक करण्यासाठी माणसे मिळत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजन बंधूंच्या शिरपेचात आणखी एका विक्रमाचा तुरा

$
0
0

के २ के चॅलेंजची गिनीज बुकात नोंद

…..

- तंबाखूमुक्ती आणि खेलो इंडियाला मोहीम समर्पित

- दहा हजार हॅण्डबिल मुद्रित करून वितरित

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाजन बंधू फाउंडेशनतर्फे आयोजित के २ के (श्रीनगर ते कन्याकुमारी) या विशेष मोहिमेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. भारताच्या उत्तरेतून दक्षिणेकडे सर्वात वेगवान सायकल प्रवास या प्रकारात या मोहिमेची नोंद झाली आहे.

गिनीज आणि डब्ल्यूयुसीए यांनी या मोहिमेसाठी १२ दिवसांची वेळ निर्धारित केली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये श्रीनगरपासून काश्मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ८५० किलोमीटर अंतर महाजन बंधूंनी १० दिवस १० तासांत पूर्ण करीत विक्रम केला होता. गिनीज बुकने बुधवारी (दि. २४) उशिरा या विक्रमाची नोंद घेतली. या मोहिमेत आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लाल चौक, श्रीनगर येथून ५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ७.४४ वाजता के २ के मोहीम सुरू झाली आणि १५ नोव्हेंबरला ५.४५ वाजता केप कोमोरिन, कन्याकुमारी बीच या ठिकाणी समाप्त झाली. तंबाखुमुक्ती आणि खेलो इंडिया या योजनांना समर्थन देण्यासाठी ही मोहीम समर्पित करण्यात आली. यात एकूण १० हजार हॅन्डबिल मुद्रित करून लोकांना वितरित करण्यात आले. युवकांना तंबाखू सोडण्याचे आवाहन करीत व्यायाम आणि खेळाची सांगड घालावी, असे आवाहनही करण्यात आले. या मोहिमेत सहकार्य करणाऱ्यांचे दोघांनी आभार मानले.

…..

माझा असा विश्वास आहे की या मोहिमेच्या माध्यामातून जनजागृती झाल्याने अनेक नागरिक तंबाखूमुक्त आणि निरोगी आयुष्य जगतील. निरोगी नागरिकच एक मजबूत राष्ट्र निर्माण करू शकतात.

- डॉ. महेंद्र महाजन

…..

आम्ही डिसेंबर २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात गिनीजच्या अधिकाऱ्यांना मोहिमेचे सर्व पुरावे सादर केले. सर्व पुरावे देऊन विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर आम्हाला रेकॉर्डबद्दल माहिती देण्यात आली.

- डॉ. हितेंद्र महाजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकबंदीचे उल्लंघन तीन व्यावसायिकांना दंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्लास्टिकबंदीचे उल्लंघन आणि शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे गुरुवारी (दि. २५) नाशिकरोड विभागातील पाच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी दिली.

पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे शहरात प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारच्या कारवाईत जेलरोड भागातील रिद्धि सिद्धी स्नॅक सेंटर, श्रीकृष्ण आइस्क्रीम आणि हाजी चिकन सेंटर या दुकानांच्या मालकांना प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपये आर्थिक दंड ठोठावला. त्यांनी शहरात लागू असलेल्या प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्याची बाब तपासणीदरम्यान आढळून आली. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकणी दोषी आढळून आल्याने सार्थक मच्छी सेंटरच्या मालकाला तीन हजार रुपये, तर सुरेश लोखंडे या नागरिकाला ५०० रुपये आर्थिक दंड पालिकेच्या घनकचरा विभागाच्या संजय गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठोठावला. नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईदर्शनाची शिर्डीवारीकी उमेदवारांची ‘मत’वारी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यासाठी उमेदवारांची अहमहमिकाच लागली आहे. उमेदवारांकडून जनसामान्यांची साईभक्ती कॅश करीत पायी पालखी काढली जात असून, उमदेवारांच्या कार्यकर्त्यांनी पायी शिर्डीला जाऊन येण्यात आघाडी मारली आहे. प्रत्येक प्रभागात साईभक्तांसाठी उमेदवारांच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम होत असून, जेवणावळी उठत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी साईभक्तांचा उपयोग व्हावा या हेतूने शिर्डीला पायी जाण्याच्या आवाहनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. प्रभागातील मतदारांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावले जात असून, साई पालखी सोहळा त्यापैकीच एक आहे. मतदारांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी सध्या 'साई भंडारा' मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यात चूलबंद आमंत्रण असल्याने 'होममिनिस्टरांच्या' आज्ञेने आपसूकच या कार्यक्रमाला सहकुटुंब हजेरी लावली जाते. या कार्यक्रमातच साईंचे चरित्र नाट्यरूपात दाखविण्यात येत आहे. या पालखीदरम्यान येणारा सर्वच खर्च छुप्या पद्धतीने उमेदवारच करीत असल्याने 'वाटे हळूहळू चला मुखाने साईनाम बोला'चा मंत्र म्हणत शिर्डीवारी करून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांची सेनेला धास्ती

$
0
0

पालकमंत्र्यांपाठोपाठ संजय राऊतांचाही नाशिकमध्ये मुक्कामी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासह अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचे गणित शेवटच्या टप्प्यात बदलू नये, यासाठी आता पालकमंत्री गिरीश महाजनांपाठोपाठ शिवसेनेचे नेते संजय राऊतही नाशकात तळ ठोकणार आहेत. प्रचाराच्या शेवटचे तीन दिवस राऊतांकडे नाशिकच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजपच्या काही आमदारांनी गोडसे यांच्या प्रचारासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. तसेच भाजपमधील काही नेत्यांनी प्रचारापासून अंतर राखले आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याकडून शेवटच्या टप्प्यात वातावरण निर्मिती केली जाण्याची शक्यता आहे. त्यातच अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सुरुवातीला महायुतीच्या बाजूने असलेले वातावरण आता बदलत असल्याची भीती महायुतीला सतावत आहेत. भाजपच्या बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाजन हे स्वत: नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे भाजपसह शिवसेनेच्या काही नेत्यांनी गोडसे यांच्या प्रचार मोहिमेबाबत तक्रारी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट संजय राऊत यांना नाशिकमध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.

दगाफटका टाळण्यासाठी

भुजबळांच्या व्युहरचनेचा अंदाज येत नसल्याने आता शिवसेना सावध झाली आहे. त्यामुळे खासदार गोडसे यांच्या शेवटच्या मतदारसंघाचे नियोजन आता राऊत यांच्यावर सोपवण्यात आले आहे. राऊत आता २६ ते २९ एप्रिलपर्यंत नाशिकमध्येच तळ ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भुजबळ यांच्याकडून दगाफटका होऊ नये, यासाठीची काळजी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images