Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदारांच्या हाती आल्या मतचिठ्ठ्या

$
0
0

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात निवडणूक आयागाने दिलेल्या मतदारांच्या चिठ्ठ्या या घरोघर पोहचविण्याचे काम सुरू झाले आहे. नगरपालिका कार्यालयात दिवसाच नव्हे तर रात्री देखील या मतदाराचे फोटो असलेल्या क्रमांक असलेल्या चिठ्ठ्या वितरीत केल्या जात आहेत.

शहरात जवळपास ११ हजार मतदार आहेत. त्यामध्ये यंदा नवमतदारांची संख्या लक्षणीय आहे. नगरपालिका कर्मचारी मतदार यादी क्रमांकाप्रमाणे या मतचिठ्ठ्यांचे वाटप करतांना दिसून येत आहेत. अवघ्या सहा दिवसांवर मतदान आले असतांना प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यांचे या कर्मचाऱ्यांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या कार्यशाळा, बैठका आदींमध्ये व्यस्त असतांना घरोघरी चिठ्ठ्या पोहचविणयाची जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून तालुक्यातील पाटोळे येथील अश्विनी जालिंदर पाटोळे या नवविवाहितेने विषप्राशन केले होते. तिचा नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी (दि. २२) मध्यरात्री मृत्यू झाला. दरम्यान आश्विनीपाठोपाठ तिचा पती जालिंदर अर्जुन पाटोळे (वय ३२) याचाही बुधवारी मृत्यू झाला.

अश्विनीचे वडील भाऊसाहेब सखाराम खैरनार (रा. चास, ता. सिन्नर) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पती जालिंदर अर्जुन खताळे, सासू द्रोपदाबाई अर्जुन खताळे यांच्या विरुद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी जालिंदरला मंगळवारी (दि. २२) रात्री सव्वानऊ वाजता अटक केली होती. त्यानंतर काही वेळातच त्याला मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने नगरपालिका दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. कोठडीत मृत्यू झालेल्या जालिंदरचे धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर जालिंदरच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

आश्विनीचा ३० जानेवारी २०१६ रोजी जालिंदर खताळे याच्याशी विवाह झाला होता. गेल्या सहा महिन्यांपासून जालिंदर व सासू द्रौपदाबाई या दोघांनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी करीत अश्‍विनीचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. नवरा जालिंदर हा दारु पिऊन मारहाण करीत होता. त्यामुळे अश्‍विनीने रविवारी (दि. २१) रात्री साडेअकरा वाजता तणनाशक विषारी औषधाचे सेवन केले होते. तिच्यावर सोमवारी रात्री पाटोळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अश्विनी पश्चात एक वर्षाचा मुलगा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडच्या ठेकेदारावर मेहेरबानी

$
0
0

काम अपूर्ण असतानाच सुधारीत आराखडा तयार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या स्मार्ट रोडचे काम रडतखडत सुरू असतानाच कंपनीने आता ठेकेदारावर पुन्हा मेहेरबानी करण्याची तयारी केली आहे. दोन वेळा मुदतवाढ देऊनही स्मार्ट रोडचे काम दृष्टीपथात दिसत नसताना आता या रस्त्याचा सुधारीत आराखडा तयार केला आहे. संचालक मंडळाला विश्वासात न घेताच या सुधारीत आराखड्यात दोन ते अडीच कोटींनी वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सुधारीत आराखड्यात किंमत किती वाढली याबाबत मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

स्मार्ट रोड नाशिककरांसाठी डोकेदु:खी ठरला आहे. एक किलोमीटर रस्त्याचे काम सुरू होऊन सव्वा वर्ष लोटले तरी काम पूर्ण झालेले नाही. गेल्या वर्षी जानेवारी २०१८ मध्ये स्मार्ट रस्त्याचे काम सुरू झाले. त्यासाठी १७ कोटींचे प्राकलन मंजूर केले होते. सुस्थितीतील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर २०१८ ची डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, वेळेत पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला पुन्हा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबरपर्यंत रस्त्याचे अवघे २५ टक्केच काम झाले होते. त्यामुळे कंपनीने मेहेरबानी दाखवत पुन्हा मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. तसेच, ठेकेदाराला दंडही ठोठावण्यात आला होता. त्यामुळे ठेकेदाराने घाईगडबडीत एका बाजूचे काम पूर्ण केले. दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची तयारी सुरू असतानाच आता तर ठेकेदाराच्या भल्यासाठी सुधारीत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात १७ कोटींचे काम हे १९ कोटींपर्यंत वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याऐवजी कंपनीकडून मात्र ठेकेदारावर केली जात असलेली मेहेरबानी चर्चेचा विषय बनली आहे.

...

काम कमी, खर्च जास्त

कंपनीने पहिल्या टप्प्यात मंजूर केलेल्या आराखड्यात ठेकेदाराने जागा मिळत नसल्याचे सांगत बऱ्याच ठिकाणी फेरबदल केले आहेत. स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण करताना पूर्वी 'डक्‍ट' टाकण्याचे नियोजन होते. मात्र नंतर बदल करत यात सिमेंट पाइप टाकण्याचे निर्णय झाला. त्यामुळे खर्च कमी होणे अपेक्षित होते. परंतु, काम कमी होऊन खर्च वाढत असल्याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७ जणांना पोलिस महासंचालक पदक

$
0
0

विशेष व उत्कृष्ट सेवा; १ मे रोजी पदक प्रदान सोहळा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करणाऱ्या राज्यभरातील आठशेहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदाक जाहीर करण्यात आले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांना पदके प्रदान करण्यात येतील.

नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र पोलिस अकादमी अशा वेगवेगळ्या विभागातील जवळपास ५० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले आहे. यातील नंदू उगले यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये सहभागी झाल्याने पदक प्रदान करण्यात येणार असून, उर्वरित सर्वांना गुणवत्तापूर्वक सेवा केल्याचा निकष ठेवण्यात आला आहे. १ मे रोजी होणाऱ्या सोहळ्यामध्ये हे पदक प्रदान करण्यात येतील.

...

यांना मिळाले पदक

मधुकर सातपुते, सहायक समादेशक, महाराष्ट्र पोलिस अकादमी

राजेंद्र चौधरी, पोलिस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण

संतोष पाटील, पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय

राजेंद्र चौधरी, पोलिस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण

...

नाशिक शहर पोलिस दलातील एएसआय

राजू साळवे, मनोहर वाघ, शिवाजी भाऊसाहेब देशमुख, पोपट सोनू कारवार, रमेश तुकाराम देशमाने, संजय काशिनाथ सूर्यवंशी.

..

नाशिक शहर पोलिस दलातील कर्मचारी

नंदू रामभाऊ उगले, चंद्रकांत त्र्यंबक सदावर्ते, दतात्रेय पोपट पाळदे, मधुकर नथू घुगे, माणिक तुकाराम गायकर, सोमनाथ लहानु सातपुते, मनोज हरिभाऊ विसे, रवींद्र काशिनाथ बागूल, मोहन वामन कडवे, पोपट वामन माळोदे, संजय नारायण जाधव, गणेश मनाजी भामरे, महेबूब जैनदिन सैय्यद, कैलास भीमाजी कुशारे, अनिल पांडुरंग दिघोळे, जितेंद्र दिलीपसिंह परदेशी, प्रफुल सुरेश माळी, संजय त्र्यंबक सानप, प्रदीप चंद्रकांत म्हसदे.

...

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील एएसआय

दीपक सूर्यवंशी, सुनील गायकवाड, अरुण मुंढे.

...

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी

राजराम दिवटे, सुलतान शेख, प्रकाश चव्हाणके, शिवाजी जुंद्रे, दिलीप घुले, भगीरथ सोनवणे, पांडुरंग पारधी, राजेंद्र जाधव, सुनील कदम.

...

इतर विभागातील एएसआय व कर्मचारी

- दहशतवाद विरोधी पथक : राकेश खेडकर, जाकीर शेख

- एसीबी : अशोक धमांदे, सुभाष हांडगे, दिलीप ढुमणे, नरेंद्र कुलकर्णी, प्रमोद अहिरे

- एमपीए : मंगेश करडेल, अनिल वासेकर, शरद सोनवणे, सुशील कदम, संदीप देवरे, तुषार शेळके

- गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय : मोहन पडवळ, राकेश बावा, मच्छिंद्र शेलार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर पोलिसाविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तपासी अंमलदारास गुन्ह्यात मदत करण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच उकळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकाविरुद्ध अॅन्टी करप्शन ब्यूरोने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.

अजित जगधने (नेमणूक वावी पोलिस ठाणे, पद-पोलिस नाईक) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारविरुद्ध वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याबाबत पोलिस हवालदार अडांगळे यांना मदत करण्यास सांगण्याचे मान्य करीत जगधनेने तक्रारदारशी संपर्क वाढवला. गुन्ह्यात शक्य ती मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या जगधनेने तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाचेची रक्कम मागितली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचला, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. मात्र, पडताळणीत लाचेची रकम मागून ती मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्याने एसीबीने वावी पोलिस ठाण्यातच जगधनेविरुद्ध तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआघाडीचा २६ ला ‘सर्जिकल स्ट्राइक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमुळे पिछाडीवर गेलेली महाआघाडी आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीवर 'सर्जिकल स्टाइक' करणार आहे. भाजप सेनेच्या नेत्यांच्या सभांना उत्तर देण्यासाठी येत्या २६ एप्रिल रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. अभिनेता डॉ. अमोल कोल्हे रोड शो घेणार आहे तर जोडीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचीही जाहीर सभा होणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या २९ एप्रिलला मतदान होणार असून, प्रचारासाठी आता अवघे चारच दिवस उरले आहेत. आतापर्यंत महायुतीचा प्रचार जोमाने सुरू असताना, महाआघाडीचा मात्र जेमतेम आहे. शिवसेना आणि भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगाव बसवंतला येऊन गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्याही सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाआघाडी कोमात असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीनवेळा नाशिकमध्ये येऊन वातावरण निर्मिती केली. परंतु, निवडणुकीचे वातावरण शेवटच्या टप्प्यातच फिरते याची जाणीव असलेल्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एकाच दिवशी महाआघाडीच्या तीन नेत्यांच्या सभा लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या सिन्नरमध्ये थेट राहुल गांधींची सभा घेऊन गडाला हादरा देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या २६ रोजी नाशिक आणि दिंडोरीत सभा होणार आहेत. समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंचा रोड शोही होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा याच दिवशी नाशिकच्या गोल्फ क्बल मैदानावर जाहीर सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाहविरोधात मास्टरस्ट्रोक मारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय भाजीबाजाराला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने भरविण्यात आलेल्या सेंद्रिय भाजीपाला, फळे व धान्य बाजार उपक्रमास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या बाजारातून नाशिककरांनी आरोग्यवर्धक भाजीपाला, फळे आणि धान्य खरेदी केले.

नाशिककरांना रसायनविरहीत भाजीपाला, फळे आणि धान्य उपलब्ध व्हावेत आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने क्लबच्या गंजमाळ सभागृहात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी आरोग्यवर्धक भाजीपाला बाजार भरविण्यात येत आहे. मंगळवारी या बाजारास भेट देऊन नाशिककर ग्राहकांनी भाजीपाला, फळे आणि धान्य खरेदी केले. यानिमित्ताने शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात पोहोचणार असून, शेतकऱ्यांनी स्वतः प्रक्रिया केलेला शेतमाल यावेळी उपलब्ध करून देण्यात आला होता. नाशिककर देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक हेमराज राजपूत, सुधीर वाघ आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटीच्या ‘मॉक टेस्ट’ने विद्यार्थी रिलॅक्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फार्मसी, इंजिनीअरिंग आणि अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमांसाठी पार पडणारी सीईटी परीक्षा यंदा प्रथमच ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येत असल्याने परीक्षार्थींच्या मनावर सुप्त दडपण आहे. पण, सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिल्याने जीव भांड्यात पडला. चौथ्या टप्प्यात शहरातील सात कॉलेजेसमध्ये ही मॉक टेस्ट पार पडली. मुख्य परीक्षा २ ते १३ मे या कालावधीत होणार आहे.

शहरातील पीव्हीजी इंजिनीअरिंग कॉलेज, के. के. वाघ कॉलेज, गुरू गोविंदसिंग कॉलेज, मविप्रचे केबीटी इंजिनीअरिंग कॉलेज, केव्हीएन नाईक कॉलेज, लोकनेते गोपीनाथ मुंढे कॉलेज आणि संदीप फाउंडेशन या सात कॉलेजांमध्ये ही चाचणी पार पडली. यंदा ही सीईटी २ ते १३ मे दरम्यान होणार आहे. केवळ ४ आणि ५ मे रोजी या परीक्षेत खंड राहील. नीट परीक्षा ५ मे रोजी पार पडत आहे. सीईटी देणारे बहुतांश विद्यार्थी नीटसाठीही प्रविष्ट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाही सीईटीसाठी राज्यभरातून सुमारे साडेचार लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सीईटीसाठी ऑनलाइन पध्दतीने २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत अॅडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे. या परीक्षेतही पीसीएम (फिजीक्स-केमेस्ट्री-मॅथ्स), पीसीबी (फिजिक्स-केमेस्ट्री-बायोलॉजी) आणि पीसीएमबी (फिजिक्स-केमेस्ट्री-मॅथ्स-बायोलॉजी) या विषयांचा समावेश राहील.

दरम्यान, या सराव परीक्षेसाठी सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सराव परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. राज्यभरातून ४ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला आहे.

...

ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी

पीसीएम ग्रुप : १,२०,३५५

पीसीबी ग्रुप : १,२२,२६४

पीसीएमबी ग्रुप : १,७०,६६५

एकूण : ४,१३,२८४

सराव परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थी : ५५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजपाठोपाठ उद्धव यांचेही 'लाव रे तो व्हिडिओ'

$
0
0

नाशिकः

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमध्ये व्हिडिओ दाखवयला सुरुवात केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही 'लाव रे तो व्हिडिओ'ला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर व्हिडिओमार्फत टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या नाशिक येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांचे संसदेतील तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारी वक्तव्ये दाखवली. यावेळी सावरकरांएवढ्या हालअपेष्टा जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगात भोगल्या का, अशी विचारणाही केली. काहींना जनता मतदान करत नाही, म्हणून दुसऱ्यांना मतदान करू नका, असे सांगत सुटलेत, असा टोला राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी लगावला.

काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे. हिंदूत्ववादी सरकार नको, म्हणून विरोधक एकवटले आहेत. यातून त्यांचा हिंदू द्वेष दिसून येतो. अन्य काही नसलं, तरी काँग्रेसच्या नेत्यांनी घोटाळ्यातील आदर्श दाखवला आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

सैनिकांच्या शौर्याचं आम्ही भांडवल करत नाही. मात्र, विरोधक नको त्या शंका उपस्थित करून जवानांचे खच्चीकरण करताहेत. इशरत जहाँ यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी सांत्वन केलं. तोंडाला काळं फासिन, पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं पवार म्हणाले होते. आता कुठे गेलं ते डांबर, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

देशाचे नेतृत्व कचखाऊ असेल, तर सैन्यदेखील काहीच करू शकत नाही. भारतमातेच्या गळ्याभोवती हिरवा फास आवळला जात आहे. हिंदुत्वाचा प्रकार करणं, यात काहीच गैर नाही. नरेंद्र मोदी यांच्या स्वरुपात देशाला कणखर नेतृत्व मिळाले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. कोणत्याही परिस्थितीत राम मंदिर बांधणारच; ३७० कलम रद्द करणारच, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरसा चमकल्याचा वाद पोचला पोलिसात

$
0
0

सातपूर :

सातपूर परिरास बुधवारी सकाळी दुचाकी आरसा चमकत असल्याने उफाळून आलेला वाद थेट पोलिसात पोचला. पोलिसांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत त्यांचे समूपदेशन केले. दोन्ही बाजूचे लोक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने गुन्हे दाखल करण्याची दिलेली तंबी वादावर पडदा टाकण्यासाठी उपयोगी पडली. तसेच

कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात किरकोळ वादाने पोलिस हैराण झाले आहेत. श्रमिकनगरच्या हंसनगरी भागात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीचा आरसा घरात चमकल्यावरून भगत नावाच्या व्यक्तीने आपल्या घरासमोरील कुटुंबाशी वाद घातला. अखेर दोघांनी थेट सातपूर पोलिस स्टेशनच गाठले. अगोदरही केवळ आंब्याच्या झाडाचे पान घराच्या बाजूने उडतात म्हणून भगत यांनी वाद घातला होता. आता दुचाकीचा आरसा चमकल्यावर वाद घालणे कितपत योग्य आहे असा सवाल तक्रारदार कुटुंबाने केला. दोन, तीन वेळा दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी अखेर तक्रारी दाखल केल्या. संबंधित दोनही कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांपासून समोरासमोर राहणाऱ्यांमध्ये केवळ बाहेरील महिलांच्या शिरकावाने वादाला ठिणगी पडली असल्याचे समजते. पोलिसांनी दोघांनाही समज दिली असून यापुढे वाद झाल्यास कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, अशी तंबीही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉगिंग करताना नागरिकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानाजवळील रस्त्यावर जॉगिंग करताना एका नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २४) सकाळी आठ वाजता घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नंदूभाई चव्हाण (वय ५२, रा. आनंदनगर, नाशिकरोड) असे आहे.

मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानाजवळील रस्त्यावर जॉगिंग करण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांसह व तरुण येत असतात. त्यापैकी नेहमी जॉगिंगसाठी येणाऱ्या नंदुभाई चव्हाण यांचा जॉगिंग करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नंदूभाई चव्हाण व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर होते. या घटनेनंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींमुळे जगात भारतीयांचा मान वाढला

$
0
0

फोटो : सतिश काळे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी भारतीय लोक परदेशात काही घेण्यासाठी, मागण्यासाठी आले अशी परदेशी नागरिकांची भावना असायची. परंतु, हल्ली भारतीयांना गुंतवणूकदार, पर्यटक म्हणून आदराने पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा आणि भारतीयांचा मान वाढला, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आणि उत्तराखंड येथील पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी बुधवारी नाशिकमध्ये केले.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित प्रचार सभेत सतपाल महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत, महापौर रंजना भानसी आदी मान्यवर उपस्थित होते. सतपाल महाराज यांनी प्रारंभी हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या बलिदानाचे स्मरण केले. त्यानंतर ते म्हणाले, की पुलवामा येथील घटनेने देशवासीय व्यथीत झाले. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्याचे स्वातंत्र्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलाला दिले. मोदी यांच्या कुटनीतीमुळे अन्य देशही दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सक्षम हवाईदल, नौदल आणि भूदल हे भारताचे सामर्थ्य आहेच. परंतु, त्याचबरोबर आता अंतराळतही भारताचे सामर्थ्य निर्माण झाले आहे. पूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या देशांकडे असलेली ही ताकद आता भारतानेही प्राप्त केली आहे. सॅटलाईट्सच्या मदतीमुळे परकीय सत्तांची गुप्तहेरी रोखणे आणि भारतावर वाईट नजर टाकणाऱ्यांना धडा शिकविणे यामुळे शक्य होऊ शकणार असल्याचा विश्वास सतपाल महाराज यांनी व्यक्त केला. गरिबांच्या घरावर सोलर पॅनल बसावेत, त्याला हवी तेवढी वीज वापरून अन्य वीज विकता यावी यासारखा विकास भाजप सरकारला अभिप्रेत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोलच्या दणदणाटात कार्यकर्त्यांचे स्वागत

$
0
0

नाशिक : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला. गोल्फ क्लब मैदानावर बुधवारी सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत ढोलच्या दणदणाटात करण्यात आले. 'करून दाखविणार'च्या घोषणांनी मैदानाचा परिसर दणाणल्याचे दिसून आले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी गोल्फ क्लब मैदानावर सभा घेतली. सभेसाठी सायंकाळी पाचपासून गर्दीला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसातपर्यंत मैदान रिकामे होते. मात्र, त्यानंतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने मैदानात जमू लागले. शहरातील सर्व भागातील कार्यकर्ते सभेसाठी गर्दी करीत होते. सभेसाठी मैदानात जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत होती. कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यानंतर पोलिसांनीही कुमक वाढविली. गोल्फ क्लब मैदानाच्या बाहेर कार्यकर्त्यांना वाहने पार्किंग करण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. सभेत येणाऱ्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात येत होते. 'शिवसेनेचा विजय असो', 'करून दाखविणार', अशा घोषणा देत कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून आले. सभेत मोठ्या प्रमाणात तरुणांसह महिलांचा सहभाग दिसून आला. त्यांचा उत्साह व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही स्पष्ट दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थानातील केबल धूळ खात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिकला भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शासनाकडून हजारो कोटींचा निधी मिळविला जातो. या निधीतून काही तात्पुरते तर काही कायमस्वरूपीची कामे केली जातात. त्यातील काही सामुग्री परत वापरात येण्यासाठी उपयुक्त असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या नवीन सिंहस्थ शाहीमार्गालगत टाकण्यात आलेल्या केबलचे दिसत आहे. या केबलची सध्याची अवस्था बघता त्याचा पुनर्वापर होणे अशक्य वाटू लागले आहे.

सन २०१५-१६ च्या कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपये निधी दिला होता. यातून अनेक सामुग्री खरेदी केलेली गेली. त्यातील काही सामुग्री बेवारस अवस्थेत पडून आहे. विजेच्या उच्च प्रतीच्या केबल साधुग्राममधील गवत जळाल्याने त्यांचे आवरण जळाले आहे. शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यापेक्षाही शाहीमार्गावरील केबलची अवस्था बिकट झालेली दिसत आहे. गौरी पटांगणाच्या समोरच्या रस्त्यापासून रस्त्याच्या पूर्वेला पीव्हीसी पाइपमध्ये या केबल घालून ते पाइप प्लास्टर करून बंदिस्त करण्यात आले होते. हे प्लास्टरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पडून पीव्हीसी पाइप उघडे पडले, ते तुटून गेले असल्याने केबल उघड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी या केबलची प्लास्टिक आवरण निघाले आहेत.

गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात येथील पथदीप पडून गेले, त्याचे दिवे गायब झाले, पथदीपाचे खांबही आता दिसेनासे झाले. काही दिवसात केबलही गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजेच्या केबल, खांब, उच्च प्रतिचे हॅलोजन आदी सामुग्री खरेदी करण्यात आली. कुंभमेळा होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला असून, ही सामुग्री आहे तशीच पडून आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाला सुगीचे दिवस

$
0
0

फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक घटली

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाळ्यात पाण्याची भासणारी कमतरतेवर मात करीत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याला सध्या चांगले दर मिळत आहे. आवक वाढलेली असतानाही चांगली मागणी असल्याने भाजीपाल्याला सध्या सुगीचे दिवस आलेले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारच्या लिलावासाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक चांगली आहे. तर सायंकाळी होणाऱ्या लिलावासाठी येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे.

बाजार समितीच्या आवारात धरणक्षेत्रातील भागातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येणे सुरू झाले आहे. लग्नसराई आणि परपेठेतून भाजीपाल्याला वाढलेली मागणी यांच्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढलेली असताना चांगले दर मिळत आहेत. त्यात ढोबळी मिरची, कारली, दोडके, गिलके, भेंडी, गवार आदी पिकांना मागणी वाढल्याने त्यांचे दरही वाढलेले आहेत. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीने प्रति जुडी ६० रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

गाळपेऱ्याच्या बागायती क्षेत्रातून भाजीपाल्याच्या पिकांमध्ये वेलवर्गीय पिकांच्या लागवडीवर उन्हाळ्यात भर दिला जातो. ग्रीन हाऊस आणि पॉलीहाऊसमध्ये पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असल्याने उन्हाचा परिणाम कमी होत असल्याने दर्जेदार भाजीपाला काढण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. त्यामुळे सध्या दर्जेदार भाजीपाला बाजार येत आहे. दर्जेदार कारली आणि दुधीभोपळा यांची निर्यातही बाजार समितीतून होऊ लागली आहे.

......

बुधवारी आवक आणि मिळालेले दर

फळभाज्या .........आवक (क्विटंलमध्ये)................दर (प्रति किलो)

टोमॅटो ..............५००..................................५ ते ९

वांगी................१२३...................................१३ ते ३०

फ्लॉवर.............१७८....................................११ ते २५

कोबी...............१९०.....................................६ ते १५

ढोबळी मिरची.....१३८...................................३५ ते ५०

दुधीभोपळा.........५४६....................................६ ते १६

कारली .............६०........................................४० ते ७५

दोडका..............३७.......................................४१ ते ६२

गिलके...............२३ ......................................१५ ते ३५

भेंडी ...............४८.........................................३९ ते ५७

गवार................१२........................................४० ते ७०

..............

पालेभाज्या ................आवक (जुडी)....................दर (प्रति जुडी)

कोथिंबीर ..................४४ हजार३०० .................. ३२ ते ६०

मेथी.........................५ हजार २०० ......................७ ते १७

शेपू.........................१७ हजार७०० ......................६ ते १९

कांदापात..................१९ हजार ......................६ ते ३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नुकसानीचा आकडा वाढणार?

$
0
0

नुकसानीचा आकडा वाढणार?

अवकाळी पावसाने अनेक व्यक्तींचे बळी घेतले असून त्यांना सरकारने तातडीने प्रत्येकी चार लाख रुपयांची मदतही दिली आहे. सलग चार दिवस पाऊस पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, पंचनामे करण्याबाबतचे आदेश सरकारकडून प्राप्त होत नसल्याने जिल्हा प्रशासनही बुचकळ्यात पडले होते. अखेर सरकारकडून पंचनाम्यांचे आदेश प्राप्त होताच पंचनामे सुरू करण्यात आले. अजूनही हे पंचनामे सुरू असून नुकसानीचा आकडा वाढू शकतो, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन सोशल ग्रुप महाराष्ट्रात सर्वोत्तम

$
0
0

अध्यक्ष राजेंद्र धोका यांचे गौरवोद्गार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजासाठी, सदस्यांसाठी जैन सोशल ग्रुप सेंट्रल या ग्रुपतर्फे विविध सामाजिक उपक्रम व सभासदांसाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येत असतात. हा ग्रुप महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ग्रुप असल्याचे गौरवोद्गार जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष राजेंद्र धोका यांनी काढले.

जैन सोशल ग्रुप सेंट्रलच्या २०१९-२० या वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा साठे लॉन्स येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धोका बोलत होते. जेएसजी सेंट्रलने गेल्या पाच वर्षांत मास्टर शेफ, मातृपितृवंदना, ट्रेझर हंट, लहान मुलांची सहल, त्याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवून इतरांसमोर आदर्श निर्माण केला. त्याबरोबरच नूतन युवा अध्यक्ष हे असल्याने ग्रुप अधिक जोमाने काम करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

अशोका ग्रुपचे संचालक व उद्योजक अशोक कटारिया यांचीही यावेळी उपस्थिती होती. हा ग्रुप सदैव सामाजिक व आर्थिक मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अजय मंचरकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी करण्यात आलेले विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम हे उल्लेखनीय होते, असेही त्यांनी नमूद केले. मंचावर जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे चीफ सेक्रेटरी बिरेन शहा, जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सचिन शहा, खजिनदार प्रतीश ताथेड, विभागीय समन्वयक अनिल नहार, बांधकाम व्यावसायिक शामराव केदार, सुभाष भंडारी, चंद्रकांत पारख, शारदा भंडारी, सुमन पारख, माजी अध्यक्ष अजय मंचरकर व नूतन अध्यक्ष आशिष नहार उपस्थित होते.

\Bअध्यक्षपदी आशिष नहार \B

कार्यक्रमात २०१९-२०च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आशिष नहार, सचिवपदी मिना भटेवरा, उपाध्यक्षपदी पवन बेदमुथा, शुभदा बोरा, खजिनदारपदी निर्मल गुजराणी, सहखजिनदारपदी कुणाल पारख, सहसचिव नितीन भंडारी, जनसंपर्क अधिकारी पदावर हितेश शाह, मयूर भंडारी यांची नेमणूक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण स्पर्धेसाठी मेधाली जाणार इटलीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थिनी मेधाली रेडकर हिची इटली येथील नेपोली येथे आयोजित ३० वी समर युनिव्हर्सिएड जलतरण स्पर्धेकरिता निवड झाली आहे. जलतरणपटू मेधाली ही मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युन्सिपल वैद्यकीय महाविद्यालयातील भौतिकोपचार शाखेची विद्यार्थिनी आहे.

मेधालीच्या जलतरण क्रीडाप्रकारातील कौशल्याचे निवड समितीतील तज्ज्ञांनी परीक्षण करून तिची या स्पर्धेकरिता निवड केली. देशातील विविध विद्यापीठांतील उत्कृष्ट जलतरणपटूंचा भारतीय संघ निवडला असून, त्यात तिचा समावेश आहे. यापूर्वी मेधाली रेडकर हिने बेळगाव येथे भारतीय विद्यापीठ संघ यांच्यामार्फत आयोजित आखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण (महिला) स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच १ व ३ मीटर डायव्हिंग, स्प्रिंगबोर्ड क्रीडा प्रकारात गुणवत्ता प्रमाणपत्रसह दोन सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागचे संचालक डॉ. संदीप गंडुरे यांनी तिचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हसोबा महाराजांचा शनिवारी यात्रोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक-पुणे महामार्गावर पाच बंगला परिसरात असलेल्या प्रसिद्ध घंट्या म्हसोबा महाराजांचा सालाबादप्रमाणे यात्रोत्सव शनिवारपासून (दि. २७) दोन दिवस साजरा करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवासाठी देशभरातून भाविक हजेरी लावत असतात.

यात्रोत्सवात शनिवारी (दि. २७) पहाटे ५ वाजता मूर्ती अभिषेक, सकाळी ९ वाजता मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मांडव डहाळ्याचा कार्यक्रम, सकाळी ९ ते १० पर्यंत रक्तदान शिबिर तर सांयकाळी ७ ते रात्री ११ वाजेदरम्यान महाप्रसाद वाटप होईल.याच दिवशी सायंकाळी ७ वाजता कदम मळा येथून तकतराव मिरवणूक व रात्री ९ ते ११ दरम्यान गिरणारे येथील हभप नवनाथ महाराज थेटे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सवात रविवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता कदम मळा येथे विराट कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. यावेळी पुरुष व महिला विजयी कुस्तीपटूंना रोख रक्कम तर मानाची कुस्ती पटकावणाऱ्या मल्लांना मानाचा चषक देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दशरथ कदम यांनी दिली आहे.

म्हसोबा महाराजांच्या सभामंडपातील २५ ग्रामपासून १११ किलो पर्यंतच्या घंट्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. या घंट्या म्हणजे भाविकांना नवसाला पावल्याचे, मनोकामना पूर्ण झाल्याचे प्रतीक मानले जाते. यावर्षी म्हसोबा महाराजांना मंदिर विश्वस्थांच्या वतीने ३० किलो संपूर्ण पितळी व सोन्याच्या मुलामा असलेला मुकुट समितीच्या वतीने अर्पण केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवतापाबाबत आजपासून सप्ताह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर यंदा २५ ते ३० एप्रिल दरम्यान हिवताप जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहेत.

'हिवतापाला झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू', असे यंदाचे घोषवाक्य आहे. या अंतर्गत गुरुवारी (दि. २५) रॅली काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २६) विविध सामाजिक, हिवतापाविषयी जनजागृती, शनिवारी (दि. २७) आरोग्य शिक्षणाअंतर्गत पोस्टर, पुस्तिका, बॅनर्स आदींचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. सोमवारी (दि. २९) हिवताप हटविण्याची प्रतिज्ञा करण्यात येणार असून मंगळवारी (दि. ३०) उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.

या सप्ताहात घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावे, हिवताप आजार होऊ नये यासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, घरातील पाणी साठ्यांना घट्ट झाकणे लावावीत, घरावरील, घराभोवती पडलेले भंगार सामानाची विल्हेवाट लावावी, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन नागरिकांनाही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images