Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लोकल चाचणीला लवकरच मुहूर्त

$
0
0

कल्याण-नाशिक लोकलची १ ते १० मेदरम्यान चाचणी

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कल्याण-नाशिक लोकलची कसारा घाटात १ ते १० मे दरम्यान चाचणी होणार आहे. चाचणी घेण्यास आरडीएसओने (रिसर्च डिझाइन अँड स्टॅडर्ड ऑर्गनायझेशन) परवानगी दिली आहे. चाचणीसाठी नऊ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. चाचणी अहवाल मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा व सुरक्षा आयुक्त जैन यांना सादर केला जाईल. त्यानंतर उद्घाटनाची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती माजी मुख्य लोको नियंत्रक वामन सांगळे यांनी 'मटा'ला दिली.

कल्याण-नाशिक ही लोकल फेब्रुवारीत सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे चाचणी तीन महिने लांबली आहे. चेन्नईच्या कारखान्यात तयार झाल्यानंतर बारा डब्यांच्या या लोकलने चेन्नई ते मुंबई चाचणी यशस्वी केली आहे. आता कसारा घाटातील चाचणी प्रलंबित आहे. नाशिक-कल्याणच्या तीन लोकल तयार ठेवल्या जातील. नाशिककरांचा प्रतिसाद पाहून गाडीची वेळ व किती फेऱ्या याचा निर्णय होईल.

...

आकर्षक लोकल

नाशिक लोकल बर्म्बाडियर प्रकारातील आहे. आकर्षक व मॉडर्न कोच, उत्तम सुरक्षा, आटोमॅटिक ब्रेक आदी बर्म्बाडीयरची वैशिष्ट्ये आहेत. मुंबईतील कुर्ला वर्कशॉपमध्ये नाशिक लोकलमध्ये संगणक प्रणालीचे काम सुरू झाले आहे.

...

चाचणीसाठी मिळाला निधी

चाचणीसाठी रेल्वेने संबंधित विभागाला नऊ लाख रुपये दिले आहेत. चाचणी घेताना सावधगिरी म्हणून प्रवाशांऐवजी डब्यांमध्ये खडीची पोती असतील. कल्याणला खडी भरायला ट्रॅक उपलब्ध होत नसल्याने चाचणी सध्या खोळंबली असली तरी ती १ ते १० मे दरम्यान कोणत्याही परिस्थिती होणार आहे. गाडी घाटात चढताना मागे येऊ नये म्हणून शेवटीही बँकर (इंजिन) लावण्यात येणार आहे. राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे या लोकलमध्ये पुशपूल तंत्रज्ञान आहे. मागील डबे ब्रेकचे काम करतात. त्यामुळे मागून इंजिन न लावताही लोकल सुसाट धावते. लोकल स्वयंचलित आहे. कसारा ते इगतपुरी दरम्यान १५ किलोमीटरचा घाट असून, या घाटाला सहा बोगदे आहेत, असे वामन सांगळे यांनी सांगितले.

..

सर्वांनाच फायदा

नाशिक-कल्याण लोकलचे दोन डबे शेती व अन्य मालासाठी राखीव आहेत. त्यामधून जिल्ह्यातील शेतकरी ताजा शेतीमाल मुंबईला पाठवू शकतील. लोकल गाडीमुळे खर्च फक्त शंभर ते दीडशे रुपये येईल. नाशिक-कल्याण एसटी भाडे सव्वाशेपर्यंत आहे. लोकलचे तिकीट अंदाजे साठ रुपये राहील.

...

- प्रवास अडीच तासांचा राहणार

- गाडीचा वेग ताशी शंभर किलोमीटर

- तीन कोचेस मिळवून एक युनिट

- महिला राखीव दोन, दिव्यांगांना एक, लगेजचे दोन, तीन फर्स्ट क्लास डबे

- गाडीची क्षमता अठराशे प्रवाशांपर्यंतची

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासकामांद्वारे उपकाराची परतफेड

$
0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारकरांना ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिक एवढ्या उन्हात माझ्या सभेला उपस्थित राहिलेत. तुमचे माझ्यावर नितांत प्रेम असल्यानेच तुम्ही दिलेला वेळ आणि माझ्यावर केलेले हे उपकार मी कधीच विसरणार नाही. विकासकामे करून तुमच्या या उपकाराची व्याजासकट परतफेड करून देईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. २२) नंदुरबारला आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

मी आपल्या ऊसाला चांगला भाव देऊन त्यापासून इथेनॉलनिर्मिती करून इंधनाची बचत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करेल. यातून देशाचे करोडो रुपये वाचतील आणि आदिवासींसाठी विविध योजना आणून तुमचा विकास करता येईल, असेही ते म्हणाले.

चहाची चव अजूनही कायम
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नंदुरबार शहर मला नवीन नसून, अनेकवेळा नंदुरबार शहरात येऊन चौधरी यांचा चहा प्यायलो आहे. तसेच आजही त्या चहाची चव मला आठवते. गेल्या काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महिलांशी संवाद साधला होता. त्यांना घरकुल मिळाल्याचा आनंद झाला असून, एकदा संधी देऊन आदिवासींसाठी व शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ताकद दिली तर मी भविष्यात नंदुरबारमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले. सर्व आदिवासींना पेन्शनची योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग सुरू करून धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा कायापालट होणार आहे. या ठिकाणी औद्योगिक क्रांती घडून येणार असून, लाखो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला संबोधित केले. काँग्रेसची लबाड टोळी आदिवासींना आरक्षण काढण्याबाबत दिशाभूल करीत आहे. आम्ही आता ४० हजार आदिवासींना वनजमिनी देण्याची तरतूद करणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यात लवकरच वैद्यकीय महाविद्यालयासह इतर सर्व कामांची पूर्तता केली जाणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. गावितांचा आदिवासी बोलीभाषेत संवाद
या वेळी भाजपाच्या नंदुरबार लोकसभा उमेदवार डॉ. हीना गावित यांनी सांगितले की, पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत १ लाख ५२ हजार महिलांना वितरित करण्यात आले असून सहा लाख लोकांना याचा फायदा होत आहे. जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये आमसूलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या ठिकाणी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना सोलर प्रकल्प देण्यात आले आहेत. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत दिल्ली दीड लाखांहून अधिक लाभार्थींना घरकुल दिल्याचा दावाही त्यांनी केला. या वेळी गावित यांनी आदिवासी मायबोली भाषेत आलेल्या आदिवासी बांधवांना पाच वर्षांत केलेल्या कामाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी यावेळी माजी खासदार माणिकराव गावितांना विकासकामांवरून थेट आव्हान दिले.

नागरिकांना गरम पाण्यानेच समाधान
नंदुरबारसह परिसरात तापमानाचा पारा ४० अंश असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा परिसरात सात ते आठ पाण्याचे टँकरने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, तापत्या उन्हात आलेल्या नागरिकांना गरम पाणी पिऊन समाधान मानावे लागले. या वेळी लाखाहून अधिक जनसमुदाय असल्याने नियोजन कोलमडले होते. पंतप्रधान मोदी हे नंदुरबार येथे हेलिकॉप्टरने दुपारी दीड वाजता दाखल झालेत आणि तब्बल तासाभरानंतर मार्गस्थ झाले.


सभेतील क्षणचित्रे...

मोठ्या संख्येने आदिवासींची उपस्थिती
प्रियांशू मच्छले हा चिमुकला मोदी लक्षवेधी
पिण्याचे पाणी थंड नसल्याने नागरिकांत नाराजी
‘हम सब चौकीदार’च्या घोषणा
काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका
आरक्षणाबाबत ठोस आश्वासन
शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन देणार
नंदुरबारच्या चहाची आठवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या डोंगरेंना नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

लोकसभा निवडणुकीचा काळ अन् निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेचे पालन केले जावे, निवडणूक काळात कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सध्याच्या केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर उदासीनतेचा आरोप करीत गेल्या पावणेदोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा भगवान डोंगरे अर्धनग्न अवस्थेत राहत असल्यामुळे त्यांना येवला तालुका पोलिसांनी रविवारी (दि.२१) नोटीस बजावली.

केंद्रातील भाजप सरकारने गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही, असा आरोप करत येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याने गेल्या महिन्यात (७ मार्च) नगरसूल येथील पोस्टातून दिल्ली येथील पीएमओ कार्यालयास आपले अंगवस्त्र एका स्पीड पोस्टद्वारे रवाना केले होते. ही कृती करताना कृष्णा डोंगरे यांनी केंद्र व राज्यातील विद्यमान राज्यकर्ते हटत नाहीत तोपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहण्याचा निश्चय केला होता. त्यानंतर डोंगर हे अर्धनग्न अवस्थेतच गावभर फिरत आहेत. सध्याचा लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ व त्यातील आदर्श आचारसंहिता याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले आदेश कलम लक्षात घेऊन शांततेचा भंग होऊ नये या अनुषंगाने कार्यवाही डोंगरे यांना रविवारी कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे.

अर्धनग्न अवस्थेतील आपल्या अभिनव आंदोलनामुळे काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा कोणाच्या सुरक्षेस बाधा व त्यांच्या दौरा कार्यक्रमात अडथळा निर्माण झाल्यास त्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, तसेच आपल्याविरोधात प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे येवला तालुका पोलिसांनी कृष्णा डोंगरे यांना दिलेल्या प्रतिबंधात्मक नोटीसमध्ये नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाडक्या ‘लाडली’ची तिसऱ्यांदा धूम

$
0
0

नाशिक:

पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. मुलगीही एकुलती एक. तिच्यात आईचे पंचप्राण दडलेले. परंतु, या अल्पवयीने मुलीने तब्बल तीनदा आईला पोलिस ठाण्याची वारी करायला लावली. आठवडाभरापूर्वी ही लाडली घरातून पळून गेली होती. ती गुजरातमधील उच्छल, तापी पोलिसांच्या हाती लागली. तेथून तिला जन्मदात्या माऊलीने रेल्वेने घरी आणले. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर पुन्हा या लाडलीने आईला गुंगारा दिल्याची घटना घडल्याने तिच्या आईच्या डोक्यावर पुन्हा विरहाचे आभाळ कोसळले.

एखाद्या चित्रपटातील कथानक शोभावे अशी ही घटना रविवारी दुपारी दोन वाजता घडली. यापूर्वीही ही लाडली दोनदा घरातून पळून गेली होती. मोठ्या कष्टाने तिचा शोध घेऊन तिच्या आईने तिला शोधून घरी आणले होते. सातपूर येथीलही मुलगी गेल्या मंगळवारी (दि. १६) दुपारी घरातून पळून गेली होती. शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेरीस मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने सातपूर पोलिस ठाण्यात केली होती. दोन दिवसापूर्वी सातपूर पोलिसांना ही मुलगी गुजरातमधील उच्छल, तापी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांना मिळून आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे तिथे जाऊन मुलीला ताब्यात घेऊन या असा निरोप सातपूर पोलिसांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आपल्या नातेवाईकांना बरोबर घेऊन उच्छल, तापी येथून मुलीला ताब्यात घेतले. मुलगी सुखरूप मिळाल्याने या माऊलीला मनोमन मोठा आनंद झाला. परंतु, त्यांचा आनंद घरी पोहचेपर्यंतही टिकला नाही. त्या रेल्वेने रविवारी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरल्या असता, त्यांच्या या प्रतापी लाडलीने पुन्हा चकवा दिला आणि काही समजायच्या आत धूम ठोकली. गुजरातमधून घरी आणलेल्या मुलीने घराचा उंबरठा ओलांडण्याआधीच पुन्हा आईच्या डोळ्यादेखत धूम ठोकल्याने या लाडलीच्या आईच्या हाती केवळ मुलीचा विरह तेव्हढा शिल्लक राहिला. मुलीच्या विरहातच त्यांनी पुन्हा नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची पुन्हा तक्रार नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचे २५ बळी

$
0
0

मागील ३० दिवसांत १० मृत्यू

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उन्हाचा कडाका वाढत असताना स्वाइन फ्लूचा जोरसुद्धा कायम आहे. या वर्षात स्वाइन फ्लूमुळे विविध सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये २५ बळी गेले आहेत. त्यातील १० मृत्यू मागील महिन्याभरात झाले. वास्तविक ९० टक्के रुग्ण या आजारातून बरे झाले असल्याचा दावा डॉक्टर्सकडून करण्यात येत आहे.

जानेवारी ते १५ एप्रिल या कालावधीत नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लू आजाराची लागण झालेले २१ रुग्ण आढळून आले होते. त्यातील सहा रुग्ण उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडले. दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमध्ये हे प्रमाण २११ इतके होते. त्यातील १८ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार मृत्युमुखी पडलेल्यापैकी नऊ व्यक्ती या शहरी भागातील आहेत. त्यात पाच जण नाशिक शहरातील, तर मालेगाव आणि मनमाड शहरातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. उर्वरित १३ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यात मालेगाव तालुक्यातील चार, देवळ्यातील तीन, इगतपुरीतील दोन आणि सिन्नर तसेच पेठ तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या व्यक्तिरिक्त अहमदनगर जिल्ह्यातील चार आणि जळगाव जिल्ह्यातील एक अशा पाच रुग्णांचा नाशिकमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सिव्हिल हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या एकूण २३३ रुग्णांवर उपचार झाले. त्यातील २५ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. याचा अर्थ स्वाइन फ्लूमुळे १० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर ९० टक्के रुग्णांना दिलासा मिळाला, असे सिव्हिल हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी स्पष्ट केले. स्वाइन फ्लूमुळे गतवर्षी ७६ तर २०१७ मध्ये ९१ जणांचे बळी गेले.

...

डॉक्टरांचा सल्ला लवकर घ्या

स्वाइन फ्लू आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. दुर्दैवाने आजही अनेक रुग्णांना अगदी शेवटच्या क्षणी उपचारासाठी आणले जाते. स्वाइन फ्लू आणि फ्लू यातील अंतर लक्षात न घेता रुग्ण घरच्या घरी आजार बरा करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या त्या रुग्णाच्या जीवावर बेततात, असे

सिव्हिल आणि जिल्हा परिषदेतील वरिष्ठ डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रक्रिया उद्योगांसाठी टास्क फोर्स

$
0
0

खरीप हंगामाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी खरीपाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी दिले. शेतमालावरील प्रक्रिया, विपणन आणि वाहतुकीवर भर देण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यास कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक संजीव पडवळ, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांसह अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाणे, खते, किटकनाशकांची गरज समजून घ्या, अशा सूचना मांढरे यांनी दिल्या.

सन २०१९-२० या वर्षासाठी ६.३४ लक्ष हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती पडवळ यांनी बैठकीत दिली. खरीप हंगामात तृणधान्य पिकांसाठी ४.४७ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून या पिकांपासून १५.५५ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गळीत धान्य पिकासाठी १.०९ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. पावसाच्या खंडाचे व्यवस्थापन सूक्ष्म सिंचनाद्वारे करण्यात येणार असून सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेमध्ये १८२० किलो ग्रॅम प्रति हेक्टरचे लक्ष साधण्याचा प्रयत्न असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. जिल्ह्याच्या पश्चिम पट्टयात भात हे प्रमुख पिक असून ०.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी प्रस्तावित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रस्ताव देण्याचे आवाहन

सरकारच्या सहकार्याने जिल्ह्यात काही प्रक्रिया उद्योग स्थापन करता येतील का, या अनुषंगाने प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. नाशिकसारख्या कृषीप्रधान जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योग नाहीत याबाबत मांढरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. फळ प्रक्रिया उद्योगवाढीबाबत अभ्यास करून त्या दिशेने प्रयत्न करावेत. याबाबत आमच्याकडे प्रस्ताव द्यावा. आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

द्राक्ष निर्यातवाढीसाठी प्रयत्न

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाचा आढावाही मांढरे यांनी घेतला. जिल्ह्यात साधारणत: १६ लाख मेट्रिक टन द्राक्षांचे उत्पादन होते. यापैकी प्रत्येकी दीड लाख मेट्रिक टन द्राक्षे युरोप आणि बांग्लादेशला निर्यात केली जातात. उर्ग्रित द्राक्ष देशांर्तगत निर्यात होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. द्राक्षांच्या निर्यातीचे प्रमाण कमी असल्याबाबत बैठकीत चर्चा झाली. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी संसाधनांची कमतरता असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. दोन तालुक्यांसाठी किमान एका शीतगृहाची निर्मिती करायला हवी असा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. त्यास मान्यता मिळावी यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू, अशी ग्वाही मांढरे यांनी दिली. ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोर रडारवर; कॉलेजरोडवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजरोडवर घोळका करून उभ्या राहणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी रडावर घेतले असून थेट कारवाई केली जात आहे. त्यामुळे कॉलेजरोड परिसरात घोकळे कमी होत असून या पुढे टवाळखोरी करणाऱ्यांना चाप लावला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. निवडणुकांच्या काळात टवाळखोरी रडारवर आली असली, तरी कायदा व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून कारवाई निवडणुकांनंतरही कायम सुरू राहणार आहे.

कॉलेजरोडवर अनेक ठिकाणी रस्त्यात बाइक्स उभ्या करत तरुण टवाळखोरी करतात. ही टवाळखोरी पोलिसांनी रडारवर घेतली असून रस्त्यात घोळका करुन उभे असलेल्यांवर थेट कारवाई करण्यात येत आहे. बीवायके कॉलेजच्या मागील बाजूस मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास १५ ते २० तरुण रस्त्यात बाइक्स उभ्या करून ट‌वाळखोरी करत होते. त्यावेळी टूरिझम पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. टवाळखोरी करताना दिसलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला नेत समज दिली जात आहे.

आचारसंहिता आणि निवडणुकीचा काळ लक्षात घेता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकांनंतर कॉलेजरोडसह इतर परिसरातही टवाळखोरांवर कारवाई केली जाणार असून घोळका करून उभे राहणारे, रस्त्याने आरडाओरड करणारे, वाहतुकीची शिस्त मोडणारे, अशा तरुणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच कारवाई केल्या जाणाऱ्या टवाळखोरांच्या कुटुंबीयांनाही त्या संदर्भातील माहिती दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतार समाजाचा ५ मे रोजी मेळावा

$
0
0

\Bसुतार समाजाचा

५ मे रोजी मेळावा

\Bनाशिक : विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय सुतार समाज वधू-वर पालक मेळाव्याचे आयोजन ५ मे रोजी लक्ष्मीविजय लॉन्स, औरंगाबाद रोड येथे करण्यात आले आहे. मेळाव्यानंतर समाजाची पुस्तिका काढण्यात येणार आाहे. वधू आणि वरांचा फोटो आणि माहितीतून परिचय करून देण्यात येणार आहे. मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेश्या व्यवसायप्रकरणी महिलेसह तिघे अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

परिसरातील महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेसह तीन जणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. यात एका पुरुषाचाही समावेश आहे.

आदर्शनगर, पवननगर भागातील संगिता दिलीप सोनवणे (३८) ही महिला काही महिलांना बोलावून त्यांच्याकडून बळीजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत होती. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलिसांनी एका बोगस गिऱ्हाईकाला तेथे पाठवून या प्रकाराची खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सोनवणे हिच्यासह अन्य एक महिला व एक व्यक्‍ती आढळून आले. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष खडके, तुषार चव्हाण, संजीव जाधव, अविनाश देवरे, हेमंत आहेर, मनोहर कोळी यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंच्या मागण्यांना केराची टोपली

$
0
0

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये क्रीडाला स्थान नाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आमचा पक्ष सत्तेवर आल्यास खेळाडूंसाठी या योजना अमलात आणल्या जातील, त्या योजना अमलात आणल्या जातील, अशी आश्वासने सर्वच पक्ष ऐरवी जाहीर करतात. यंदा मात्र सर्वच पक्षांनी जाहीर केलेल्या वचननाम्यात खेळाडूंसाठीच्या योजनांना नगण्य स्थान दिले आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये सर्वच पक्षांबाबत नाराजीचा सूर आहे.

खेळ हा कायमच दुर्लक्षित असलेला प्रकार आहे. या क्षेत्राकडून राजकीय पक्षांना काहीही मिळत नसल्याने याकडे फरसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी क्रीडा क्षेत्राला स्थान दिलेले नाही. नाशिकमधील क्रीडापटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कबड्डी प्रशिक्षक प्रशांत भाबड म्हणतात, की राजकारण्यांसाठी खेळ हा कायमच दुर्लक्षित प्रकार आहे. केंद्र किंवा राज्याच्या अर्थसंकल्पात खेळाला अत्यंत तुटपुंजी तरतूद असते. खेळातून फारशी आर्थिक प्राप्ती होणार नसल्याने सर्वच पक्ष याकडे दुर्लक्ष करतात. सगळ्यांना मंत्रीपद हवे असते; मात्र क्रीडा मंत्रीपद कुणालाही नको असते. नेते तर सोडा मात्र आयएएस अधिकाऱ्यांनाही या विभागात रस नसतो. बांधकामे कशी होतील, विविध योजना राबवून पैसे कसे कमवता येतील याकडे सर्वांचे लक्ष असते. राजवर्धन राठोड हे क्रीडा मंत्री झाल्यानंतर थोडा फरक पडला. मात्र, त्यात अमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.

टेबल टेनिस प्रशिक्षक शेखर भंडारी म्हणाले, की दरवेळी निवडणुका येतात. क्रीडा संघटनांना अश्वासने दिली जातात. निवडणुका झाल्या की आश्वासने नेते विसरून जातात. आज खेळापुढे अनेक प्रश्न आहेत. प्रशासकीय पातळीवर अनेक निर्णय प्रलंबित आहेत. ज्येष्ठ खेळाडूंच्या मानधनाचा प्रश्न असो वा खेळाडूंना देण्यात येणाऱ्या नोकऱ्यांचा प्रश्न असो त्याबद्दल कोणताही राजकीय पक्ष चकार शब्द काढत नाही. मत मागण्यासाठी क्रीडा संस्थांचे उंबरठे झिजवले जातात. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये खेळाडूंच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे यापुढेही काही होईल, अशी शक्यता वाटत नाही.

खेळ हा सामाजिक जीवनाचे अंग आहे असे राजकारणी समजायला तयार नाहीत. खेळाने शारिरीकच नाही तर मानसिक संतुलन चांगले राहते, रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचे मनगट तयार केले तेव्हा कुठे शिवशाही अवतरली. देशात चांगले बदल घडवायचे असतील तर खेळाला दुर्लक्षून चालणार नाही. हे राजकीय पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी ध्यानात घ्यायला हवे, असे मत खो-खो प्रशिक्षक उमेश आटवणे यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाचा तडाखा, पारा चाळिशीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील तापमानाने चाळिशी गाठली असून, उन्हाच्या दाहकतेने नाशिककरांना हैराण केले आहे. आठवडाभरात कमाल तापमानात ७ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, १७ एप्रिल रोजी ३३.१ अंश सेल्सिअसवर असलेले तापमान मंगळवारी ४०.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. एप्रिलअखेर असलेली ही परिस्थिती मेमध्येही कायम राहणार असल्याचे व त्यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

राज्यभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे. एप्रिल महिना अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, तीव्र उन्हाळा असा विरोधाभासी वातावरणाचा अनुभव देणारा ठरला. सातत्याने बदलत्या या वातावरणाचा सामना नाशिककरांना करावा लागत असून, त्याचा आरोग्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ४ एप्रिल रोजी ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आल्यानंतर मंगळवार, २३ एप्रिलपर्यंत तापमानात सातत्याने चढ-उतार होत होता. त्यातच अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने वातावरण दमट झाले होते. परिणामी तीव्र उकाडा शहरात निर्माण झाला होता. आता पुन्हा तापमान चाळिशी गाठली असून, मंगळवारी दिवसभर उन्हाच्या चटक्याने नाशिककरांना हैराण केले. उन्हाच्या या कडाक्यामुळे दिवसभर रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्रही याचमुळे शहरात दिसून आले. कामानिमित्त बाहेर पडणे अटळ असलेल्यांकडून या चटक्यांपासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी शीतपेय व थंड फळांचे रस पिण्यास शहरातील ज्यूस सेंटरवर गर्दी केली जात असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे.

--

\Bआठवडाभरातील तापमान\B

दिनांक कमाल किमान

२३ एप्रिल ४०.१ २०.३

२२ एप्रिल ३८.२ १९.१

२१ एप्रिल ३७.७ १७.६

२० एप्रिल ३८.० १८.६

१९ एप्रिल ३७.३ १९.८

१८ एप्रिल ३५.२ १७.४

१७ एप्रिल ३३.१ २०.९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजधानीमुळे गैरसोय

$
0
0

इतर गाड्यांना होतोय उशीर

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीसाठी इतर रेल्वे गाड्या थांबवून ठेवण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेमुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व नाराजी व्यक्त होत आहे. राजधानी एक्स्प्रेसला पुढे जाऊ देण्यासाठी गोदावरी, सेवाग्राम, मनमाड, इगतपुरी शटल या गाड्या इगतपुरी अथवा इतर स्थानकात थांबवून ठेवल्या जातात, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर मध्य रेल्वेमार्ग राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली आहे. राजधानी एक्स्प्रेस ही गाडी मुंबईहून दिल्लीला बुधवारी आणि शनिवारी धावते. दिल्लीहून मुंबईसाठी ही गाडी गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी सव्वापाचला सुटते. मुंबईला ती शुक्रवारी आणि सोमवारी पोहोचते. नवीन वेळापत्रकानुसार तिच्या वेळा बदलल्याने वेळ आणखी कमी झाला आहे. मात्र, या गाडीच्याच प्रवाशांना त्याचा फायदा होतो. नेहमीच्या गाड्यांमधील प्रवाशांना फटका बसत आहे.

..

सामान्यांना फटका

मनमाड, निफाड, लासलगावकडे जाण्यासाठी तेथील चाकरमाने, विद्यार्थी, नोकरदार अशा सर्वच जणांना नाशिक रेल्वे स्थानकात मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसची वाट पहात बसावी लागते. राजधानी एक्स्प्रेसला पुढे जाऊ देण्यासाठी गोदावरी, सेवाग्राम, मनमाड, इगतपुरी शटल या गाड्या इगतपुरी अथवा इतर स्थानकात थांबवून ठेवल्या जातात, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. अर्धा तास किंवा तासभर गाड्या लेट होतात. राजधानीसाठी चाकरमान्यांची कदर नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

..

लवकरच गाड्या धावणार वेळेत

मुंबई ते भुसावळ तिसरा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. कल्याण ते इगतपुरी दरम्यान त्याचे काम झाले आहे. तेथून पुढे बाकी आहे. ते झाल्यानंतर अनेक गाड्या वेळेत धावू लागतील. राजधानीचाही प्रश्न सुटेल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

...

आधी दुरांतोचा त्रास

दुरांतो एक्स्प्रेससाठी पंचवटी एक्स्प्रेस लेट होत असे. त्यावरून आंदोलन झाल्यानंतर आणि निवेदने दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पंचवटी मुंबईला जाताना लेट होत आहे. त्यामुळे चाकरमानी, व्यावसायिक आदींची गैरसोय होत आहे. आता राजधानी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची चिंता वाढली आहे.

...

राजधानी एक्स्प्रेसला महत्त्व द्या, परंतु, नाशिक-मनमाड प्रवास करणाऱ्या नजीकच्या टप्प्यातील प्रवाशांना वेठीस धरू नये. रेल्वे प्रशासनाने मासिक पासधारक नियमित प्रवाशांचाही विचार करावा. त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल.

- विवेक चांदवडकर, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक चव्हाणांची आज धुळ्यात सभा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार, आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या दोन जाहीर सभाचे आयोजन बुधवारी (दि. २४) करण्यात आले आहे. शिंदखेडा येथील गांधी चौकात सायंकाळी पाच वाजता पहिली सभा तर आर्वी येथे रात्री रात्री आठ वाजता दुसरी सभा होणार आहे. सभेस खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार अमरीश पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी आ. मुझफ्फर हुसेन आदी उपस्थित राहणार आहेत. धुळे मतदारसंघात येत्या सोमवारी (दि. २९) मतदान होणार असून प्रचार अंतिम टप्प्यात पोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची सोनसाखळी लांबवली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणास बेदम चोप देत दोघांनी सोनसाखळी हिसकावून घेतली. ही घटना कॅनॉलरोड भागात घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आकाश काळे (रा. कुमावतनगर) आणि अजित कापसे (रा. दत्तनगर) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सुनील शंकरराव ढाकणे (रा. ढाकणे सदन, कॅनॉलरोड) यांनी तक्रार दिली. ढाकणे सोमवारी सायंकाळी आपल्या घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. वाटेत संशयित एका मुलाशी भांडण करीत होते. यावेळी ढाकणे वाद मिटविण्यासाठी धावून गेले असता, दोघा संशयितांनी तू आमचे भांडणात का पडला असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी संतप्त दुकलीने ढाकणे यांना रस्त्यावर पडलेल्या विटांनी बेदम मारहाण केली. ढाकणे जखमी झाल्यानंतर संशयितांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून घेतली. यानंतर संशयित आरोपींनी एमएच १५ सीएम २५१४ या वाहनातून पोबारा केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक के. डी. वाघ करीत आहेत.

--

सोन्याच्या ब्रेसलेटची

लॉन्समधून चोरी

नाशिक : लॉन्समध्ये वधू कक्षातील बॅगमध्ये ठेवलेल्या सुमारे ५० हजारांच्या सोन्याच्या ब्रेसलेटवर चोरट्यांनी डल्ला मारला. कुटुंबिय विवाहाची धावपळीत असल्याची संधी साधत चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिभा रमाकांत शिंदे (रा. तारवालानगर, पंचवटी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. शिंदे कुटुंबिय यांचा शनिवारी विवाह सोहळा होता. वधू कक्षात कुटुंबीयांनी आपल्या बॅगा ठेवल्या होत्या. कुटुंबिय विवाहाच्या गर्दीत असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या ब्रेसलेटवर डल्ला मारला.

...............

कुरापत काढून

विद्यार्थ्यांना मारहाण

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून रूममध्ये धिंगाणा घालतात या कारणातून चौघांच्या टोळक्याने दोघा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत संशयितांनी चाकूचा धाक दाखवित जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सनी भगवान पवार, अजय भगवान पवार आणि त्याचे दोन साथिदार अशी संशयितांची नावे आहे. याबाबत वैभव विकास लुंबाडे (२० रा. हल्ली सरस्वतीनगर, मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) या युवकाने तक्रार दिली.

--

महालक्ष्मीनगरला घरफोडी

नाशिक : जत्रा हॉटेल परिसरातील महालक्ष्मीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि टीव्हीवर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण संतोष मोरे (रा. गजलक्ष्मी, रो हाऊस) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोरे कुटुंबिय २१ ते २४ एप्रिलदरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ४६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

...

बॅटऱ्यांची चोरी

नाशिक : गल्लीत उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना चेहडी बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील संतू सातपुते (रा. चेहडी, नाशिकरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. सातपुते यांच्या ट्रॅक्टर व पिकअप जीपसह अशोक आवारे यांच्या मारुती व्हॅनच्या सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरट्यानी चोरून नेल्या. ही घटना शनिवारी (दि. २०) रात्री घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मक्तेदारी मोडण्यासाठी वंचित आघाडी रिंगणात

$
0
0

सत्ता हातात घेण्यासाठी केवळ काही ठराविक पक्षांनीच मक्तेदारी दिसते. तीच मोडून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरली आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांचे अधिकाधिक उमेदवार दिल्लीत कसे जातील, यासाठी कार्यकर्त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचा मुद्दा उमेदवार पवन पवार यांच्या वतीने उपस्थित असलेले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. संजय जाधव यांनी मांडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे रुपांतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत केले. यामुळे दलित, मुस्लिम व इतरांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या पाठिशी मतदार ठामपणे उभे राहतील, असा विश्वास डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.

वंचित आघाडीच्या विकासाचा एजंडा शिक्षण हाच होय. नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी शासकीय कॉलेजांचे जाळे तयार करू. शेतकरी पाल्यांसाठी तालुका स्तरावर कृषी महाविद्यालयांची उभारणी करू, एमआयडीसीच्या आरक्षित भूखंडांवर नवीन उद्योग आणण्यासाठी आग्रही भूमिका बजावू. कोल्ड स्टोओरेजची ग्रामीण भागात सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळवून देण्यास पुढाकार घेणार. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या प्रलंबित शिफारशी लागू करण्यासाठी प्रयत्न घेणार असल्याचे सांगत डॉ. जाधव यांनी आपल्या पक्षाच्या विकासाचा एजंडा मांडला.

मोदी सरकारच्या काळात 'एचएएल'च्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. यामुळे सर्वसामान्यांना हक्काची नोकरी गमवावी लागली. आजपर्यंत पक्षांनी जनतेला केवळ आश्वासने दिली. परंतु, प्रश्न कायम ठेवले. देशाच्या सीमा बंद केल्याने कांद्याचे भाव घसरले, शेतकरी अडचणीत सापडला. सत्तेतील काही महाभाग शेतकऱ्यांच्या मुलांना दारूडे म्हणून संबोधतात, ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. सर्वसामान्यांचे प्रश्न व काश्मिरचा अनेक वर्षांपासून भिजत पडलेली समस्या वंचित आघाडी सत्तेत आल्यावर मार्गी लावणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

यापूर्वी दलित, मुस्लिम व इतरांना काँग्रेस, राष्ट्रवादीशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र, वंचित आघाडीच्या माध्यमातून नवीन पर्याय मतदारांना मिळाला आहे. वंचित आघाडी स्वतंत्र पक्ष आहे. त्यास भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांनी अगोदर स्वतःला तपासून घ्यावे, मगच आरोप करावेत. वंचित आघाडीत सर्वच जाती धर्मातील उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे, असे डॉ. जाधव म्हणाले. वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्यावर दाखल गुन्ह्यांबाबत त्यांनी सांगितले, की समाजात काम करताना न्याय हक्कासाठी लढावे लागते. यात आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. पवार यांना अॅक्ट्रॉसिटी दाखल करता येऊ नये म्हणून दलित अधिकाऱ्याकडून पवार यांना मारहाण करण्यात आली. यात सरकारने ब्लॅकमेलिंगचे काम केल्याचा आरोप डॉ. जाधव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राहुल गांधी डागणार तोफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकासासाठी भाजपला मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिककरांना केल्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील नाशिकसह दिंडोरी आणि शिर्डी मतदारसंघांच्या महाआघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येणार आहेत. शुक्रवारी (दि. २६) सिन्नरमध्ये त्यांची प्रचार सभा होणार असून, पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर ते तोफ डागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीकरिता तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. आता चौथ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह दिंडोरी, शिर्डी, धुळे आणि नंदुरबार या मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि. २९) मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रचारासाठी आता अवघ्या चार दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रचारतोफा उत्तर महाराष्ट्रात धडाडणार आहेत. राफेल घोटाळ्यासह भाजप सरकारविरोधातील विविध मुद्द्यांना हात घालत मोदी सरकारची कोंडी करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी नाशिक जिल्ह्यात येणार असून, सिन्नरमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची सभा होणार असून, ती यशस्वी करण्यासाठी महाआघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ, दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे.

--

अधिकाऱ्यांकडून सभास्थळाची पाहणी

सिन्नर शहरातील आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावर ही सभा घेण्याचे नियोजन असून, गांधी यांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे. गांधी यांचे हेलिकॉप्टरने सभास्थळी आगमन होणार असून, हेलिपॅडसाठीही सध्या चाचपणी सुरू आहे. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. कोकाटेंची कोर्टात ‘हजेरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मला विकासाचे व्यसन आहे, मला लोकांचे काम केल्यावर आनंद मिळतो, माझ्या कार्यकर्त्यांवर व माझ्या मतदारसंघातील लोकांवर माझे अतोनात प्रेम आहे, असे सांगत मतदारसघांच्या विकासासाठी आपल्याला निवडून द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी वकिलांना केले. स्वत: वकील असलेल्या कोकाटेंनी मंगळवारी नाशिक आणि नाशिकरोड येथील वकील चेंबर्सना भेटी देऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशी प्रचार अन् निवडणुकीतील चुरस वाढू लागली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकीकडे प्रचार रॅलींवर भर दिला असतानाच अॅड. कोकाटेंनी शहरातील प्रभावी घटकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. ग्रामीणमध्ये सभांचा धडाका, तर शहरात विविध संघटनांच्या गाठीभेटी घेत ते मतांची पेरणी करीत आहेत. वकील चेंबर्सच्या भोटीदरम्यान अॅड. कोकाटेंसारखा नेता प्रत्येक ठिकाणी असावा. कोकाटेंचे उपक्रम प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडतात. अशा विकासाचे व्हिजन असलेल्या नेत्याला संसदेत पाठवू, असा विश्वास यावेळी वकील संघाने कोकाटेंना दिला. दरम्यान, नाशिकमधील विसे मळ्यातील कोकाटे यांच्या कार्यालयातून आज, बुधवारी (दि. २४) सकाळी आठ वाजेपासून रॅलीस प्रारंभ होणार असून, ही रॅली दिवसभर मतदारसंघात फिरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा कायापालट करणार

$
0
0

२००९ चे २०१४ या काळात खासदार असताना खऱ्या अर्थाने नाशिकचा कायापालट करण्याचे काम केले. त्याच कामास गती देण्यासाठी प्राधान्य असेल. त्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी सांगितले.

उड्डाणपूल, नाशिक-मुंबई, नाशिक-धुळे, नाशिक-त्र्यंबक, नाशिक-सिन्नर, सिन्नर-पुणे हे मोठे रस्ते, रिंग रोड तसेच काँक्रिटचे रस्ते तयार केले. उद्योग आणि पर्यटन वाढविण्यासाठी आतंरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळ उभारले. पर्यटनास चालना देण्यासाठी बोटक्लब यासारखे प्रकल्प सुरू केले. रोजगार तसेच शेतीमालाच्या आयात निर्यात धोरणाबाबत संसदेत प्रश्न मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा मुद्दा समीर भुजबळ यांनी मांडला.

नाशिकला मेगा फूडपार्क, मार्केट टर्मिनल, पुणे विद्यापीठ संकुल यांच्यासाठी मंजुरी मिळविली. नंतरच्या पाच वर्षाच्या काळात ते रद्द झाले. एकलहरे ६६० मेगा वॅटचा प्रकल्प मंजूर करून आणला. तो प्रकल्प पुढे गेला नाही. टेस्टिंग लॅबसाठी जागा मिळवून दिली. पाच वर्षे झाली तरी कामाला सुरुवात झाली नाही. निवडणूक तोंडावर असताना फक्त भूमीपूजून करण्यात आल्याचे सांगून भुजबळ यांनी विद्यमान खासदारांच्या कार्यशैलावर प्रश्न उपस्थित केले.

मागील पाच वर्षाच्या काळात सरकारने केवळ खोटी स्वप्ने दाखविली, खोटी आश्वासने दिली. रोजगार निव्वळ घोषणा दिल्या. याउलट भाजप सरकारच्या काळात रोजगार कमी झाले. कारखाने बंद पडले. शेतीमालाला हमीभाव नाही, कर्जमाफी मिळाली नाही. खतांवरील सबसिडी काढली, खते व शेती अवजारांवर जीएसटी लावला. यातून शेतीचा खर्च वाढत गेला. उत्पन्न कमी झाले. शेतकरी आणि महिला सक्षमीकरणाचे काम झाले नाही. पाच वर्षात न झालेल्या कामामुळे नाशिकचा विकास खुंटला. २०१९ परिवर्तन घडून आणण्यासाठी आणि प्रगतीसाठी, नाशिकचे प्रश्न सोडविण्याचे ही उमेदवारी करीत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी भुजबळ म्हणाले, की शिवसेना-भाजपने खोटे आरोप करीत आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. छगन भुजबळ यांचे देशव्यापी नेतृत्व उभे राहू नये म्हणून खोटे आरोप करण्यात आले. बदनाम करीत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान रचले गेले. राज्यात यापूर्वी १९९५ मध्ये युतीचे सरकार असताना भुजबळ विरोधी पक्षनेते होते. त्यांनी युतीच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र भूमिका मांडली होती. त्यामुळेच युती सरकारला पायउतार व्हावे लागले होती. ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून भुजबळांचा आवाज बंद दाबण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला.

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्र सदनाच्या कामाची उद्घाटनाप्रसंगी स्तुती केली होती. या सदनाच्या उभारणीत एक रुपया सुद्धा सरकारने दिलेला नाही. असे असताना निराधार आरोप करून नाशिकच्या भूमीपूत्रांना बदनाम करण्यात आल्याचा मुद्दा भुजबळ यांनी मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्ये धाडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्यावर आणि समीर भुजबळांवर केलेले आरोप सर्व खोटे असून, तसा अहवाल न्यायालयाकडून तर येईलच. त्यानंतर मात्र माझ्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मी जेलमध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा थेट इशारा माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी दिला. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेस आमदार डॉ. सुधीर तांबे, वैभव पिचड, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, भगीरथ शिंदे, जयवंत जाधव, कोंडाजीमामा आव्हाड, गजानन शेलार आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, की मोदींना मी आव्हान करतो, की आपल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत, नोटाबंदीमुळे नागरिक आनंदित आहेत, शेतकऱ्यांचे पैसे दिले, असे मला जाहीर सभेत लेखी स्वरूपात दाखवावे. त्यात जर सत्यता आढळून आली, तर मी स्वतः समीर भुजबळ यांची उमेदवारी मागे घेईन. सिन्नर तालुक्यातील पाणी, शेती अन् रस्त्यांचा प्रश्न, तसेच रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचे काम फक्त समीर भुजबळच करू शकतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

--

वावीतही सभा

सिन्नर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मंजूर करून तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून आणा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी वावी येथे झालेल्या जाहीर सभेत केले. सिन्नर तालुक्याचे सतत दहा वर्षे आमदार म्हणून काम करणाऱ्या कोकाटेंनी तालुक्यातील नागरिकांवर अन्यायच केला असून, अशा अन्यायकारक आणि नाकर्तेपणाची भूमिका घेणाऱ्या कोकाटेंना सिन्नरकरांचा आता अचानक पुळका आल्याचे सांगत यावेळी कोकाटेंना सिन्नरकर नाकारल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेती, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाला धोका

$
0
0

डॉ. गिरधर पाटील यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना २०१४ ते २०१९ या कालखंडाने मोठा धडा शिकवला आहे. पूर्वी किमान शेतीचे अस्तित्व कायम राहील असा दिलासा असायचा. परंतु, शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षातील कारभार कर्दनकाळ ठरला. त्यांच्या अस्तित्वालाच धोका जाणवू लागल्याची टीका शेतकरी नेते अभ्यासक डॉ. गिरीधर पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत केली.

शेतकरीविरोधी धोरणे अवलंबिणाऱ्या भाजप सरकारवर तोफ डागत डॉ. पाटील यांनी नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी शेतकरी प्रतिनिधी शिवाजी खैरनार, दिलीप कुंवर आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, की शेती काय असते हे माहिती नसणाऱ्यांनी सोयीस्कर आश्वासने देत सत्ता मिळवली. भाजपा हा शहरी पक्ष असून त्यास सत्तेपासून दूर ठेवण्यात शेतकरी व ग्रामीण मतदारांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यामुळेच भाजप सरकार शेतकऱ्यांबद्दल आकस व अनास्था ठेवत असल्याचा दावा पाटील यांनी केला.

येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी घोषणा भाजपाने केली आहे. परंतु, शेतीत आवश्यक असणारे उत्पादन, बाजार, प्रक्रिया व तंत्रज्ञान आघाडीवर काही एक न करता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, असा सवाल करीत हा एक जुमलाच असल्याचे मत त्यांनी मांडले.

कार्पोरेट शेतीचा डाव

रामदेव बाबा, अंबानी, अडाणी यासारख्यांच्या घशात हजारो एकर जमीन घालून कार्पोरेट शेतीची स्थापना करण्याचा सरकारचा डाव आहे. शेती, रोजगार व व्यापाराला रसातळाला नेणारी नोटबंदी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा जीएसटी असे तुघलकी निर्णय घेणारे हे सरकार सत्तेवर येता कामा नये, अशी भूमिका डॉ. पाटील यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images