Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सुवर्णा पतसंस्थेस ९२ लाखांचा नफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेस २०१८-१९ या आर्थिक वर्षात ९२ लाख ४५ हजारांचा निव्वळ नफा झाला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष भास्कर कोठावदे यांनी दिली.

सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून बँकेचे भागभांडवल १ कोटी ४९ लाखांवर गेले आहे. खेळते भांडवल ४७ कोटी आहे. सध्या बँकेच्या ठेवी ३६ कोटी ७ लाख असून, २२ कोटी ६४ लाखांचे कर्जवाटप, तर २१ कोटी ७७ लाख गुंतवणूक बँकेने केली आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत बँकेच्या सभासदांची संख्या २ हजार २९१ इतकी झाली आहे. यंदा बँकेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने बँकेतर्फे प्रत्येक सभासदाला चांदीचा शिक्का भेट देण्यात असल्याची माहिती उपाध्यक्ष प्रकाश दिघे यांनी दिली. बँकेच्या सर्व शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणालीसह मिनी एटीएम बसविण्यात आले आहेत. या सुविधांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोसायटीच्या चौकशीसाठी प्राणांतिक उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कै मच्छिंद्र पा. टेमक सोसायटी, करंजगाव या संस्थेत अनागोंदी कारभार सुरू असून याची चौकशी करावी या मागणीसाठी करंजगाव येथील अरुण जगताप व विठ्ठल मदने यांनी सोमवारपासून सहनिबंधक कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

जगताप आणि मदने यांनी याबाबत विभागीय सहनिबंधक यांना निवेदन देत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संस्थेच्या वतीने बोगस कर्ज वाटण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीचा डोंगर उभा आहे. अनेकदा खोटे कागदपत्रे बनवण्यात येत आहे. तसेच खाडाखोड करून पैशांची अफरातफर केली जात आहे. याबाबत दोघांनी १६ एप्रिल रोजी पत्र दिले होते आणि २२ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिला होता. या दोघांच्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वारांना भोवली बेफिकिरी

$
0
0

विना हेम्लेटमुळे तीन महिन्यांत ३४ जणांचा बळी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हेल्मेट वापराकडे ९४ टक्के दुचाकीस्वार दुर्लक्ष करतात. हेल्मेटचा प्रभावी वापर होत नसल्याने रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये शहरात ३७ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात ३४ चालक विनाहेल्मेट होते. याच कालावधीत झालेल्या चार चारचाकी अपघातांमध्ये एकाही चालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता.

शहरात दुचाकींची संख्या लाखांच्या घरात असून, प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने खासगी वाहनांवरील भार वर्षागणिक वाढत आहे. रस्त्यावर दुचाकींची संख्या जास्त असल्याने या वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण सहाजिकच जास्त ठरते. मात्र, यातील बहुतांश अपघातातील मृत्यू कमी करण्यात यश मिळू शकते. दुचाकीस्वार हेल्मेटकडे दुर्लक्ष करतात. अपघातात डोक्यास दुखापत झाली दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतते. २०१८मध्ये जीवघेण्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २१७ पैकी ५८ टक्के म्हणजे १२६ व्यक्ती या दुचाकीस्वार होत्या. यानंतर सर्वाधिक बळी पादचाऱ्यांचे गेले. २०१८ तब्बल ५९ व्यक्ती रस्ता ओलंडताना किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असताना वाहनांच्या खाली सापडल्या. १२६ पैकी ९१ टक्के म्हणजे ११२ दुचाकीस्वारांनी अपघातावेळी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. तर, १४ व्यक्तींचा हेल्मेट असताना मृत्यू झाला. २०१९ मध्ये परिस्थितीत काही फरक पडलेला दिसत नाही. शहरात मार्च महिन्यापर्यंत विविध अपघातांमध्ये ५० नागरिकांचा बळी गेला आहे. त्यात ३७ दुचाकीस्वारांचा समावेश असून, त्यातील ३४ चालक विनाहेल्मेट होते. उर्वरित चार दुचाकीस्वारांचा मृत्यू हेल्मेट परिधान केलेले असताना झाला. याच कालावधीत एकूण आठ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक युवाशक्तीचा ऱ्हास

मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांमध्ये १८ ते ४० या वयोगटातील तरुणांचा वाटा हा ७० टक्क्यांहून अधिक आहे. रस्ते अपघातात वाहनचालकांची मानसिकता हा महत्त्वाचा घटक असून, त्यानंतर वाहतूक पोलिसांची कार्यपद्धतीचा प्रश्न येतो. हेल्मेटचा वापर नसताना अपघात झाल्यास डोक्याला दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. दुचाकी अपघातांमध्ये ९० टक्के मृत्यू हे डोक्याला मार लागल्याने होतात. वेळीच उपचार मिळाले तरी अपंगत्व येऊ शकते. हेल्मेट वापरामुळे या शक्यता कमी होतात. नियम पाळण्याची जबाबदारी प्रत्येक वाहनचालकाने घेतली तरी ७० टक्के अपघात कमी होतील, असा विश्वास सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

वर्ष- जीवघेणे अपघात- मृत्यू-गंभीर जखमी- एकूण अपघात

२०१२-१६५-१७५-५५६-६०८

२०१३-१२६-१३०-५७२-६०५

२०१४-१६८-१७४-४४६-५४९

२०१५-२२५-२३४-३९९-६१८

२०१६-२०३-२१३-३५१-६२८

२०१७-१५८-१७१-३९०-५०३

२०१८-२०९-२१७-३९६-५८०

२०१९-४७-५०-९२-१८०

एकूण-१३०१-१३६४-३२०२-४२७१

(२०१९ ची आकडेवारी मार्च महिन्यापर्यंतची)

...

महिना-जीवघेणे अपघात-मृत्यू-गंभीर अपघात-गंभीर जखमी

जानेवारी-२१-२२-२४-३४-

फेब्रुवारी-१४-१४-२१-३०

मार्च-१२-१३-२४-२८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान करणाऱ्यांनाशाळाप्रवेशात सवलत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करा आणि शाळेत प्रवेश घेताना फीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळवा, अशी योजना जेलरोडच्या गणेश धात्रक संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व विद्यालयाने जाहीर केली आहे.

नवीन प्रवेश घेणाऱ्यांच्या पालकांनी मतदान केल्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना बालवाडी, लहान गट, मोठा गट व पहिलीच्या सेमी इंग्रजी माध्यमासाठी फीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळेल. दि. २९ एप्रिलला मतदान झाल्यानंतर ३० एप्रिल व १ मो रोजी प्रवेश घेणाऱ्यांना ही सवलत मिळेल, असे संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक आणि मुख्याध्यापिका जयश्री सरोदे यांनी कळवले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाबाबत जागृती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, प्रत्येक नागरिकाने मतदान करावे हा योजनेमागील उद्देश आहे. मतदान जागृतीसाठी शाळेतर्फे रॅली काढून पथनाट्य घेण्यात आले. मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूचा महापूर; रोकडचा दुष्काळ

$
0
0

जिल्हाभरात ५९२ गुन्हे; ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत शहर पोलिस, ग्रामीण पोलिस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य, रोकड आणि शस्त्रांची तस्करी रडारवर घेतली. यात पैशांचे एखाद दुसरे प्रकरण समोर आले. तर, मद्य तस्करी, अवैध साठवणूक याबाबतच्या ५९२ गुन्हे प्रशासनाने केले आहेत. यात ५४ लाख ७३ हजार ९८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निवडणूक काळात मतदारांना भय आणि आमिष यापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागतात. याचमुळे पोलिस अवैध शस्त्राकडे लक्ष देतात. परवानाधारक शस्त्रे सुद्धा जमा करण्यात येतात. यानंतर आमिष दाखवणारे घटक म्हणजे पैसे आणि मद्य याकडे लक्ष पुरविले जाते. याचधर्तीवर शहर आणि जिल्ह्याभरात पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करते आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याभरात २०१ गुन्हे केले आहेत. त्यात ३५ लाख दोन हजार ५४२ रुपये किंमतीचा २८ हजार १०२ लिटर्स मद्यसाठा जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी सर्वाधिक म्हणजे ३०४ केसेस केल्या. मात्र, यात १६ लाख २१ हजार ४८१ रुपये किंमतीचा १८ हजार ७२८ लिटर्स मद्यसाठा ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला. शहर पोलिसांना याच कालावधीत एक हजार १०६ लिटर्स मद्यसाठा सापडला. यासाठी शहर पोलिसांनी ८७ केसेस केल्या. तर या मद्यसाठ्याची रकम तीन लाख ४९ हजर ९६० इतकी आहे. या तीन विभागांनी मिळून ५९२ केसेस केल्या. ५४ लाख ७३ हजार ९८३ रुपये किंमतीचे ४७ हजार ९३७ लिटर्स मद्य प्रशासनाने जप्त केलेत. निवडणुकीच्या तोंडावरच हा बेकायदा मद्यसाठा सापडला असून, हा मद्याचा महापूर आणखी किती वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पैसे वाहतूक सापडेना!

पेठ येथे सापडलेले १९ लाख आणि बागलाण येथील सुमारे चार लाख हा अपवाद वगळता पोलिसांच्या हाती अद्याप वाहतूक होणारे पैसे लागले नाहीत. शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच दररोज नाकाबंदी सुरू केली आहे. शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यावर रात्री वाहनांची तपासणी केली जाते. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होते. मात्र, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक पैशांची वाहतूक होत असल्याचे एकही प्रकरण पोलिसांना सापडलेले नाहीत. लोकसभेसाठी येत्या २९ तारखेला मतदान होणार असून, पैसे आणि मद्याच्या वाहतुकीसाठी हाच कालावधी महत्त्वाचा ठरणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तामसवाडीत बिबट्या जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , निफाड

निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना घडली आहे . सुमारे दीड वर्षांच्या या मादी बिबट्याने दर्शन दिल्याने येवला वन विभागाने १५ दिवसापूर्वी भास्कर यशवंत शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

हा बिबट्या पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाला. येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख, रामनाथ भोरकडे व वनमजूर आदींच्या पथकाने तामसवाडी येथे भेट दिली. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला घेऊन निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणण्यात आले. तेथे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ . चांदोरे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली . त्यानंतर वन विभागाने पुढील कार्यवाही केली. मात्र, बिबट्या जेरबंद झाल्याने तामसवाडी येथील शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या पाहण्यासाठी तामसवाडी येथील नागरिकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनातर्फे आज खरीप बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुका आणि दुष्काळी परिस्थिती या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम नियोजनासाठी मंगळवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.

नाशिकसह पूर्ण राज्यच यंदा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने पाणीटंचाईच्या झळा जानेवारीपासूनच जिल्हावासीयांना जाणवू लागल्या आहेत. या झळा अधिक तीव्र झाल्या असून त्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासारख्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाला कराव्या लागत आहेत. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबाबत नियोजन करण्यासाठी खरिपाचे नियोजन आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला कृषिविकास विभागाचे अधिकारी, कंपन्या, तसेच कृषी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाणे, खते, कीटकनाशके यांची गरज समजून घेण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयाकडे रासायनिक खतांच्या नोंदविलेल्या मागणीचा आढावाही यावेळी घेण्यात येईल. कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेल्या भरारी पथकांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत घेतला जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे, मागेल त्या शेतकऱ्यांना पीककर्ज देणे, शेतकरी महाबीज व खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणारे बियाणे लक्षात घेऊन अतिरिक्त बियाण्यांच्या मागणीचे प्रस्ताव तयार करणे, खरीप हंगामातील बियाणे पुरवठा, खताचे नियोजन, पंतप्रधान पीक विमा योजना आदी विषयांबाबत आढावा घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकन्यायालयात ६७ केसेस निकाली

$
0
0

एकूण केसेस : ९०

निकाली केसेस : ६७

दंड व भरपाई : १५ लाख ७२ हजार

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नाशिकरोड वकील संघ यांच्या वतीने नाशिकरोड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सोमवारी (दि. २२) पार पडलेल्या फिरते लोकन्यायालयापुढे ठेवण्यात आलेल्या ९० पैकी ६७ दावे निकाली काढून १५ लाख ७२ हजार ८८९ रुपये रक्कम दंड व नुकसान भरपाईपोटी जमा करण्यात यश मिळाले.

नाशिक रोड न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मयुरा यादव, न्यायाधीश आरती शिंदे, न्यायाधीश प्रभाकर आवळे, नाशिकरोड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुदाम गायकवाड आदींच्या उपस्थितीत या लोकन्यायालयाचा प्रारंभ झाला. या लोकन्यायालयात नाशिकरोड न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मयुरा यादव यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील पॅनल तयार करण्यात आले होते. ॲड. शरद महाजन आणि ॲड. संजय मुठाळ हे देखील या पॅनलचे सदस्य होते. या पॅनलपुढे एकूण ९० केसेस ठेवण्यात आल्या. त्यापैकी ६७ केसेसवर समझोता झाला.

लोकन्यायालयाच्या प्रारंभी प्रमुख न्यायाधीश मयुरा यादव, ॲड. सुदाम गायकवाड यांनी पक्षकार आणि न्यायालय कर्मचाऱ्यांना लोकन्यायालयाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी ॲड. सुरेश चौघुले, ॲड. सुरेश कोठुळे, ॲड. विकास घुगरे, ॲड. आनंद भोसले, ॲड. महेश गायधनी, ॲड. शाम हांडगे, ॲड. संग्राम पुंडे, ॲड. ए. एस. कुलकर्णी, ॲड. मुस्तफा शेख, ॲड. प्रमोद माळोदे आदींसह दीपक कदम, किरण कर्डिले, मनोज जाधव, जयश्री शेळके आदींनी प्रयत्न केले. ॲड. उमेश साठे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियमित लसीकरणात रोटाव्हायरसचा समावेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटाव्हायरस या तोंडावाटे द्यावयाच्या लसीचा समावेश होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे अधिकारी वर्गाचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत नियमित लसीकरणामध्ये वेगवेगळ्या लसी बालकांना वयोमानानुसार दिल्या जातात. यामध्ये वेळोवेळी बदल होतात. नाशिक जिल्ह्यात डायरियामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटाव्हायरस या तोंडावाटे द्यावयाच्या लसीचा समावेश होणार आहे. यासाठी परिषद आरोग्य विभागामार्फत अधिकारी वर्गाचे प्रशिक्षण शिबिर झाले. यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे व जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नंदापूरकर यांच्या उपस्थितांना मार्गदर्शन कले.

जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट, रोटावायरसचा नियमित लसीकरणामध्ये समावेश का केला, याबाबत डॉ. नांदापूरकर यांनी माहिती दिली. रोटावायरस लसीचे महत्त्व सांगताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे म्हणाले, की सर्व अधिकाऱ्यांनी याचा बारकाईने अभ्यास करावयाचा आहे. तालुका पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुढील टप्प्यात प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. या लसीचा योग्य त्या लाभार्थींना लाभ करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

लस कशी द्यावयाची, लस दिल्यानंतर काही अडचण आल्यास बालकावर कशा प्रकारे उपचार करावयाचे या बद्दल जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, दावल साळवे, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी मार्गदर्शन केले.

एक वर्षापर्यंतच्या बालकांना लस

खासगी क्षेत्रांमध्ये रोटावायरस लसीची किंमत दोन हजार रुपये असून शासकीय पातळीवर नियमित लसीकरण कार्यक्रमांमध्ये ती मोफत दिली जाणार आहे. ही लस पावडर स्वरूपात असून लस मुलांना पाजण्यापूर्वी ती द्रवरूपात तयार करून सिरिंजच्या साह्याने बालकांना तोंडावाटे देण्यात येणार आहे. दीड महिना ते एक वर्षापर्यंतच्या बालकांना ही लस देता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे पाणी पळवणार नाही

$
0
0

मोदी उवाच...

- शेजारी देश भारताकडे पाहताना शंभरदा विचार करतात

- दहशतवाद्यांना पाताळातूनही शोधून मारू

- ना नजर खाली करू, ना वर; नजरेला नजर भिडवून बोलू

- शेतकरी सन्मानसाठी पाच एकरची अट रद्द करू

- देशाची सुरक्षा, सन्मान मतदारांच्या हाती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे पाणी गुजरातला पळवले जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, नाशिककरांच्या इच्छेविरुद्ध पाणी घेणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या जाहीर सभेत दिले. शेतकरी-ग्राहकांमध्ये काँग्रेसने निर्माण केलेली दलालांची साखळी मोडीत काढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, आमदार डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, महापौर रंजना भानसी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कौतुकाने केली. यानंतर मराठीत संवाद साधत त्यांनी नाशिकची संस्कृती सप्तरंगी असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आंदोलनाचा उल्लेख करीत येथे येऊन आपण धन्य झाल्याचे ते म्हणाले. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेचा उल्लेख करीत भारतातील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांवरून तत्कालीन यूपीए सरकारला त्यांनी लक्ष्य केले. मोदी म्हणाले, '२०१४ पूर्वी देशात काय परिस्थिती होती? देशातील विविध भागांत बॉम्बस्फोट होत होते. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार केवळ शोकसभा घेऊन जगभरात पाकिस्तानच्या नावाने गळा काढत होते. आता भारताकडे नजर वर करून पाहण्याआधी शंभरवेळा विचार करावा लागतो. दहशतवाद्यांना आता कळलंय की भारतात बॉम्बस्फोट घडवले तर येथे मोदी आहे. दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना पाताळातूनही शोधून काढून ठार मारतील.' मोदी पुढे म्हणाले, 'आम्ही नजर खाली किंवा वर करून पाहणार नाही, तर नजरेला नजर भिडवून बोलू, असे तेव्हा मी म्हणालो होतो, आज प्रत्येक भारतीय ताठ मानेने उभा आहे. जगभरात भारत आणि देशवासियांचा जो जयजयकार सुरू आहे, तो तुमच्या एका मतामुळे आहे. भारत सध्याच्या आव्हानांना सामोरा जात आहे, ही तुमच्या त्या मताची ताकद आहे,' अशा शब्दांत त्यांनी मतदारांच्या भावनांना हात घातला. देशाची सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमानाची 'चौकीदारी' तुमच्या हातात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शेतकरी आणि ग्राहकांमध्ये काँग्रेसने निर्माण केलेल्या दलालांच्या साखळीविरोधात आपला लढा असून, ती मोडीत काढू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. देशात पुन्हा आपले सरकार आले तर शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी पाच एकर जमिनीची अट रद्द करून सर्वांना लाभ देऊ. नाशिकचे पाणी गुजरातला पळवले जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, नाशिककरांच्या इच्छेविरोधात पाणी घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना करंट लागतो

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही मोदी यांनी टीका केली. 'पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. त्यातील कौल पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. मी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर बोललो की काही लोकांना कंरट लागतो आणि मला शिव्या द्यायला सुरुवात करतात', अशी कोपरखळी त्यांनी पवारांचे नाव न घेता मारली.

एचएएलचे उत्पादन दुप्पट करणार

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात एचएएल खिळखिळी झाल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला. आमचे सरकार आल्यानंतर एचएएलला आम्ही काम दिले आहे. 'मेक इन इंडिया'अंतर्गत आम्ही एचएएलला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या दहा वर्षांत एचएएलचे उत्पादन दुप्पट करण्याचा आमचा मानस असून, एचएएलसंदर्भात उठवल्या जात असलेल्या वावड्या चुकीच्या असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकथा

$
0
0

शिकवण गुरुजींची

अरुण पाटील, नाशिक

शाळेला सुटी लागल्यामुळे कुणाल फारच आळसावला होता. एरवी सकाळी सहा वाजता उठणारा कुणाल नऊ वाजेपर्यंत झोपत होता. उठल्यानंतर रिमोट कंट्रोल घेऊन टीव्ही सुरू करून तासभर कार्टून पाहण्यात दंग व्हायचा. ताई त्याला आंघोळ करण्यासाठी व दात घासण्यासाठी विणवायची पण तो ताईला जुमानत नव्हता. शेवटी आईचा पारा चढल्यावर तो टीव्ही बंद करून न्हाणीघरात जायचा.

आईने त्याला बऱ्याचदा सांगितलं की, तू जर वेळेवर उठला तर माझी घरातील सर्व कामे नित्यनियमाने होतात. एके दिवशी तो आईला म्हणाला, 'अगं आई आता सुट्या आहेत, नाही तर नेहमी शाळा, क्लास, गृहपाठ, प्रोजेक्ट हे करता करता मला खेळायला, झोपायला, टीव्ही पाहायला वेळ मिळत नाही. सुट्यांमध्ये तरी मला मनसोक्तपणे स्वच्छंदी जगू दिले पाहिजे.' कुणालचे हे शब्द ऐकून ताईने पण त्याला दुजोरा दिला. बाबांनीदेखील सकारात्मकता दर्शविली. त्यानंतर बऱ्याचदा आई त्याच्या कलानेच त्याला स्वीकारायची.

उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या जेवणानंतर घरातील मंडळी सुस्तावलेली होती. कुणाल मात्र ताईसोबत बुद्धिबळ खेळत होता. अचानक बाहेरून ताई, ताई, असा आवाज आला. कुणालने दार उघडले. दाराजवळ एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा उभा होता. कपडे मळकट व अर्धवट फाटलेले होते. हातात पाणी घेण्यासाठी तांब्या होता. गल्लीत भूमिगत गटारची कामे सुरू होती. भटकी कुटुंबं उन्हाचे चटके अंगावर झेलत काम करत होती. त्यांचाच तो मुलगा होता. ताईने त्याला थंडगार पाणी प्यायला दिलं. सोबत त्याला त्याच्या आई बाबांसाठी तांब्याभर पाणीदेखील दिलं.

तो मुलगा मात्र जमिनीपासून पाय चोरत होता. जमीन खूप तापलेली होती. त्याच्या पायांकडे कुणालचे लक्ष गेलं. तो अनवाणी असल्यामुळे त्याचे नाजूक आणि कोमल पाय उन्हात भाजून निघाले होते. कुणालने कुणालाही न विचारता व क्षणाचाही विलंब न करता त्याच्याकडे असलेल्या बुटांच्या तीन जोड पैकी एक जोड त्याने त्या मुलाच्या पायात घालून दिला. आई हे सर्व खिडकीतून बघत होती. आईला कुणालचे फार कौतुक वाटले. तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाली, 'बेटा शाब्बास, तू आज अगदी मस्त काम केलं.' त्यावर कुणाल उत्तरला, 'अगं आई गुरुजींनीच आम्हाला शिकवलंय की आपण गरीब, दुर्बल, आणि गरजूंना मदत केली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तक दिन विशेष बातमी

$
0
0

पुस्तक दिन विशेष बातमी

---

ग्रंथ निघाले लंडनला!

'ग्रंथ तुमच्या दारी' अभिनव उपक्रमाचा परदेशात झेंडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि इल्फर्ड मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ तुमच्या दारी योजना लंडनमध्ये सुरू होत आहे. आज जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व आले आहे. लंडन येथे दर्जेदार मराठी साहित्य असलेल्या मोठ्या वाचकांसाठी १३ ग्रंथ पेट्या आणि बाल साहित्याच्या २ ग्रंथ पेट्या तेथील वाचकांना उपलब्ध होणार आहेत. सागर डुघरेकर हे ग्रंथ तुमच्या दारीचे लंडनमधील समन्वयक आहे. त्यांनी इल्फर्ड (पूर्व लंडन) लंडन येथे ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले आहे.

भारताबाहेरील मराठी वाचक बांधवांसाठी ग्रंथ तुमच्या दारी संकल्पनेचे स्वरुप ठरवण्यात आले असल्याने आज अनेक देशात हा उपक्रम सुरू आहे. दर्जेदार विविध विषयांची, लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असून ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके आहेत. साहित्याचे, लेखनशैलीचे जास्तीत जास्त प्रकार कथा, कादंबरी, विनोद, रहस्य, चरित्र, प्रवासवर्णन थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा आहे. ग्रंथ संपदा वाचनासाठी विनामूल्य असल्याने त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

----

ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम

ग्रंथ तुमच्या दारीची विक्रमी घोडदौड सुरू असून १६६१ ग्रंथपेट्या, २ कोटी रुपयांची ग्रंथ संपदा, महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, दिल्ली, सिल्वासा, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, ओमान, बे एरिया सॅनफ्रान्सिस्को, मॉरिशस, सिंगापूर , लंडन येथे हा उपक्रम आहे.

---

वाचन संस्कृती लयाला जाते आहे आणि आपल्या मराठीचे काही खरे नाही अशी ओरड करणाऱ्यांना 'ग्रंथ तुमच्या दारी' सारखी योजना म्हणजे एक चांगलीच विस्मय चकित करणारी गोष्ट वाटेल. जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत. एका छोट्याशा कल्पनेला आज जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तो उतरोत्तर वाढावी हीच आमची संकल्पना आहे.

-विनायक रानडे, संस्थापक, ग्रंथ तुमच्या दारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या विद्यार्थी प्रवेशाचे शिक्षण विभागापुढे आव्हान

$
0
0

\Bआरटीईचे ५२ टक्के प्रवेश पूर्ण

\B...

आतापर्यंत झालेले प्रवेश : १८४३

प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी : १६४३

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरटीईत पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या बारा दिवसांत ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी १८४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, १६४३ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी समितीने बाद केले आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत आरटीईचे १८४३ प्रवेश म्हणजेच ५२ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. येत्या चार दिवसात ४८ टक्के प्रवेश पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे.

आर्थिक दुर्बल व मागास गटातील विद्यार्थ्यांना (आरटीई) मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्यात ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७३५ जागांसाठी आरटीई प्रक्रिया सुरू आहे. सुमारे ४५७ शाळांमध्ये २५ टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षी या प्रक्रियेत काही ना काही बदल होत असून, यंदा या प्रक्रियेची लॉटरी राज्यस्तरावरून काढण्याचा नियम करण्यात आला. पुणे येथे ८ एप्रिल रोजी पहिली लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा कागदपत्रे पडताळणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून खोटे पत्ते दिलेले प्रवेश गुगल मॅपिंगच्या आधाराने रद्द ठरविण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून मुकले आहेत. गेल्या वर्षीदेखील ७ हजार १०८ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली होती. त्यापैकी ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांचेच प्रत्यक्ष प्रवेश झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगावी डाळिंब लिलावास सुरुवातलासलगांव बाजार समितीत डाळींब लिलावास प्रारंभ.म टा वृत्तस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर डाळिंब लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सदस्य सचिव बी. वाय. होळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांनी डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे डाळिंब लिलावास सुरुवात करण्यात आली. डाळिंब उत्पादकांनी आपला शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. तसेच वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असे होळकर यांनी उद्‌घाटनप्रसंगी सांगितले.

डाळिंब खरेदीस इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी परवानाबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे होळकर यांनी सांगितले.

सरासरी ८०० रुपये क्रेट

लिलावाच्या सुरुवातीला गणेश विठ्ठल बोळींज (रा. पा. वाडी) या शेतकऱ्याचा डाळिंबाला १५५१ रुपये क्रेट, तर दत्तात्रय शिंदे यांच्या डाळिंबाला ११०० रुपये क्रेट भाव मिळाला. दिवसभरात १७६ क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी ५० रुपये, जास्तीत जास्त १५५१ रुपये तर सरासरी ८०० रुपये असा भाव होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या विकासावर उमेदवारांचे मंथन

$
0
0

'मटा डिबेट'द्वारे उमेदवारांचे सादरीकरण

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गतिमान औद्योगिक विकास, भक्कम पायाभूत सुविधा, मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी आणि कृषीसह प्रक्रिया उद्योगाला चालना अशा बहुविध प्रकारचे मुद्दे उपस्थित करीत प्रमुख उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांचे 'नाशिक व्हिजन' नाशिककरांपुढे मांडले. निमित्त होते 'मटा डिबेट'चे. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने गोदाघाटावरील य. म. पटांगणावर जाहीर 'मटा डिबेट'चे आयोजन करण्यात आले होते. त्यात नाशिकच्या विविध संधी आणि विकासाचे चित्र मांडण्यात आले.

'मटा डिबेट'मध्ये महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ, महायुतीच्या वतीने अजय बोरस्ते, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. संजय जाधव यांनी सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. म्हणूनच नाशिक मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांचे नाशिकबद्दलचे व्हिजन आणि त्यांची विविध प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका जाणून घेण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने 'मटा डिबेट'चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या डिबेटमध्ये सर्वप्रथम उमेदवारांनी त्यांची भूमिका मांडली. प्रामुख्याने आपल्याला खासदार का व्हायचे आहे आणि नाशिकमधील कुठले प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटतात हे त्यांनी विषद केले. उपस्थित नाशिककरांनी त्यास दाद दिली. एखाद्या प्रश्नाकडे पाहण्याचा त्यांचा विचार आणि तो सोडविण्यासाठी आवश्यक बाबी यावर विशेष खल झाला. विशेष म्हणजे, उपस्थित श्रोते आणि जाणकारांनी त्यांची प्रश्ने लिखित स्वरुपात 'मटा'कडे सुपूर्द केली. त्या प्रश्नांनाही वाचा फोडण्यात आली. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. केवळ घोषणाबाजीवर समाधान मानण्यापेक्षा आणि खोटी आश्वासने दाखविण्यापेक्षा नाशिकचा खरा विकास साधण्यासााठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दिली. 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र तरटे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘साध्वी प्रज्ञासिंहवर कठोर कारवाई करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जिगरबाज हेमंत करकरे यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी भारतीय ट्रेड युनियन केंद्राने (सीटू) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटल्यानुसार २६/११ च्या हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या करकरे यांच्याबद्दल प्रज्ञासिंह यांनी जी भाषा वापरली ती अतिशय क्लेशदायक आहे. दुर्दैव म्हणजे प्रज्ञासिंह एका पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असल्याबाबत डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, मनीषा देशपांडे आदींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रज्ञासिंह यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सीटूने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारासाठी मेसेजचा आधार

$
0
0

जाहीरनामा, उमेदवारांची माहिती बल्क एसएमएसद्वारे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकांचा प्रचार रंगू लागला असून याद्वारे मोठ्या प्रमाणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासह मतदारांपर्यंत पोचण्याचा उमेदवार प्रयत्न करीत आहेत. पण, याव्यतिरिक्त 'बल्क एसएमएस'ला प्राधान्य दिले जात आहेत. याद्वारे उमेदवारासह जाहीरनाम्याची माहिती देणारी लिंक मतदारांना पाठविली जात आहे. तसेच उमेदवाराच्या दररोजच्या प्रचार फेऱ्या, सभा आणि अन्य माहिती एसएमएसद्वारे पोहोचविली जात आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी बल्क एसएमएसचे पॅक खरेदी केल्याचे समजते आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली आहे. निवडणुकीचे जोरदार पडघम सोशल मीडियावर वाजू लागले आहेत. त्यात उमेदवारांनी सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बल्क एसएमएसचा वापर केला आहे. जेणेकरून सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्यांपर्यंतही पोहोचणे उमेदवारांना शक्य होत आहे. अवघ्या आठ दिवसांवर मतदान आल्याने उमेदवारांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू केली आहे. उमेदवारांच्या रॅली आणि भेटीगाठी वाढल्या असून सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एसएमएसचा आधार घेतला जात आहे.

एसएमएस पाठविण्यात फक्त उमेदवारांचा पुढाकार आहे, असे नाही. तर राजकीय पक्षांनीही एसएमएस करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षही सरसावल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे. उमेदवारांचे समर्थक, पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ते यांच्या नावाने देखील एसएमएस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे आठ दिवसांवर आलेल्या मतदानापूर्वी एकमेकांमधील लढत अधिक रंगत आल्याचे दिसून येत आहे.

\Bवेबसाइटचाही वापर!\B

काही वेबसाइटद्वारे 'बल्क एसएमएस' मोफत पाठवणे शक्य असते. त्या वेबसाइटचाही वापर उमेदवारांकडून होत आहे. वेबसाइटद्वारे एकाच वेळी सर्व मतदारांना एसएमएस केला जात आहे. या एसएमएममध्ये उमेदवारांची माहिती जाणून घेण्याची लिंक शेअर करण्यात येत आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यावर उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना दिसते. तसेच पक्षाचा जाहीरनामा देखील मतदारांना पाहता येत आहे. त्यामुळे सोशल मीडियासह बल्क एसएमएसचा फंडा या निवडणुकीत कितपत फायदेशीर ठरतो, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉप अॅक्ट नसेल तर थेट खटला!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुकाने तसेच आस्थापनांनी कामगार आणि शॉप अ‍ॅक्ट कायद्याचे पालन करावे; अन्यथा अशा व्यावसायिकांविरुद्ध कोर्टात थेट खटले दाखल करण्याचा इशारा दुकाने निरीक्षक तथा सुविधाकार विशाल जोगी यांनी दिला आहे. यापूर्वी दाखल केलेल्या काही खटल्यामध्ये कोर्टाने आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली असून, ही कारवाई टाळण्यासाठी शॉप अ‍ॅक्ट आणि कामगार कायद्याचे पालन करावे, असे आवाहन जोगी यांनी केले आहे.

सातपूर एमआयडीसीतील दुकाने आणि आस्थापनामधील व्यावसायीकांनी कामगार कायद्याचे उलंघन केल्याची बाब काही कालावधीपूर्वी समोर आली होती. याबाबत शॉप अ‍ॅक्ट विभागाने पाच खटले सुद्धा न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात दोषी आढळून आलेल्या व्यावसायिकांना प्रत्येकी ३६ हजाराचा दंड ठोठावला.

व्यवसाय सुरू करतांना दुकाने व आस्थापना मालक आणि चालक यांनी कामगार कायद्यानुसार शॉप अ‍ॅक्टची नोंदणी करणे आवश्यक असते. यासाठी आस्थापनामध्ये कार्यरत कामगारांची संख्या महत्त्वाची असते. शॉपअ‍ॅक्ट परवाना घेतल्यानंतर व्यावसायिक पुढील कार्यवाहीकडे डोळेझाक करतात. प्रत्यक्षात या परवानाचे वेळोवेळी नूतनीकरण करणे, कामगारांची नोंद, कामगारांना साप्ताहिक सुटीबाबत नोंद तसेच या नियमातील तरतुदींची पूर्तता करणे महत्त्वाचे असते. शॉप अॅक्ट लायसन्सबाबत उदासिनता आढळून येत असल्याने विभागाने कठोर कारवाई करण्याचे धोरण आखले आहे. यापुढे दोषी व्यावसायिकांवर थेट न्यायालयात खटले दाखल केले जात आहेत. संबंधितांनी याची दखल घेऊन शॉप अ‍ॅक्ट आणि कामगार कायद्याचे पालन करावे, असे आवाहन जोगी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडून सारे हजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने बोलावलेल्या दुसऱ्या प्रशिक्षणसत्राला ९९ टक्के कर्मचारी उपस्थित राहिले. काही ग्राह्य कारणांमुळे एक टक्काच लोक या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिले असून, या कारणांशी निवडणूक विभागही सहमत असल्याचे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.

नाशिक, दिंडोरीसह धुळे मतदारसंघात समाविष्ट बागलाण, मालेगाव यांसारख्या तालुक्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, याकरिता तब्बल २७ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येनकेन कारणाने निवडणूक कामकाजाची जबाबदारी टाळू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळप्रसंगी ठणकावून सांगत ही जबाबदारी पार पाडण्याची तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठी उत्सूक नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यंदा प्रथमच या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार असल्याने कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. मतदान प्रक्रियेच्या दिवशी कोणत्या कर्मचाऱ्यावर काय जबाबदारी राहणार हे देखील निश्चित करण्यात आले असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधितांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडला असून, दुसऱ्या टप्प्यातही प्रशिक्षणवर्गाला साधारणत: सर्वच कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सुमारे ९० ते ९५ टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही उद्या आटोपणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. दरवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभेपर्यंतच्या कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत याबाबतची जबाबदारी टाळण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे निवडणूक काळात बोलाविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणवर्गांनाही अनुपस्थित राहणाऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांच्या पुढे असते. परंतु, यंदा हे प्रमाण केवळ एक टक्क्यांवर आल्याचा दावा निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.

...

'ती' व्हॅन पोलिसांच्याच आवारात

निवडणूक प्रशिक्षणवर्गाला उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणस्थळी घेऊन येण्यासाठी पोलिसांच्या व्हॅनची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने घेतला होता. तसा इशाराही नियुक्त केलेल्या कर्मचारीवर्गाला देण्यात आला होता. परंतु, घरापर्यंत पोलिस येऊ नयेत याकरिता कर्मचाऱ्यांनीच दक्षता घेत या प्रशिक्षणवर्गांना हजर राहण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे यंदा उपस्थितीचा टक्काही वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या करणी अन् कथनीत फरक

$
0
0

वांजुळपाणी समितीचा आरोप

म. टा. वृतसेवा, मालेगाव

महाराष्ट्राच्या नद्यांच्या पाणीप्रश्नाबाबत त्या त्या भागातील जनतेच्या इच्छेविरुद्ध कोणताही निर्णय होणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगावी दिली असली तरी वांजूळ पाणी संघर्ष समितीने मात्र नद्यांचे पाणी पूर्ववाहिनी करण्याबाबत सरकारच्या करणी व कथनीमध्ये फरक असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा स्थळी दिलेली ग्वाही म्हणजे आंदोलनकर्त्यांची किमान दखल घेतल्याचे समाधान असले तरी याप्रश्नी लेखी द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्ववाहिनी करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन करणाऱ्या वांजूळपाणी संघर्ष समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम वाहिनीनद्यांचे पाणी पूर्ववाहिनी करून महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे याविषयी पिंपळगाव येथील सभेत उत्तर द्यावे असा थेट सवाल केला होता. त्यामुळे मोदी नद्यांच्या पाणीप्रश्नी काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मोदींनी भाषणाच्या शेवटी नदींच्या पाणीप्रश्नी काँग्रेसवर टीका करीत ते लोकांमध्ये गैरसमज पसरवित असल्याचा आरोप केला. तसेच या भागातील नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणी काहीही करणार नाही अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्री फडणवीस एकिकडे नार-पार-तापी-नर्मदा लिंकिकचे सर्वेक्षण झालेले असून १६ टीएमसी पाणी गुजरातला सोडण्याचे पत्र देतात आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात महाराष्ट्राच्या मनाविरुद्ध करणार नाही. यावरून पंतप्रधान साफ खोट बोलतात हे स्पष्ट होते. जर तसे नसेल तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी लेखी देऊन त्यांनी नार-पार-तापी-नर्मदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या १६ टीएमसी पाण्यावर हक्क सोडावा.

- देवा पाटील, वांजूळ पाणी संघर्ष समिती सदस्य

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे की महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी देऊन उर्वरित पाणी गुजरातला देण्याबाबत निर्णय घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव सभेत याप्रश्नी ग्वाही दिली असली तरी तशी ठोस कृती त्यांनी करावी. गुजरातचा विचार करताना महाराष्ट्र देखील सुजलाम् सुफलाम् करावा ही आमची मागणी कायम आहे.

- के.एन.अहिरे, वांजूळ पाणी संघर्ष समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images