Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सामाजिक भान संवेदनशील मनाचे लक्षण

$
0
0

सामाजिक भान हे

संवेदनशील मनाचे लक्षण

साहित्यिक विजयकुमार मिठे यांचे प्रतिपादन

- -

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाची जबाबदारी विचारवंत, लेखक, कवी व समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. सामाजिक जबाबदारीचे भान असणे हे जिवंतपणाचे लक्षण असून हे भान पाय जमिनीवर असणाऱ्यांकडे असतात. त्यासाठी संवेदनशील मन असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले.

समाजकार्य महाविद्यालयाच्या वार्षिक गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यिक मिठे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करत शैक्षणिक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाची भूमिका मांडली. वर्षभरात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांची चित्रफितीद्वारे प्रा. सुनिता जगताप यांनी वर्षभराचा अहवाल सादर केला. यावेळी महाविद्यालयातील विविध स्पर्धा, कार्यक्रम व शैक्षणिक गुणवत्ता संपादन केलेले विद्यार्थी तसेच महाविद्यालयाबाहेर राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय व जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा पवार यांनी केले. यावेळी मविप्रचे संचालक नानासाहेब महाले अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध स्पर्धा, शिक्षण आदींमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. घनशाम जगताप यांनी केले तर प्रा. प्रतिभा पगार यांनी आभार मानले.

- -

विद्यार्थ्यांचा गौरव

गांधी रिसर्च फाउंडेशन अंतर्गत गांधी विचार परीक्षा महाविद्यालयात घेण्यात आली होती. या परीक्षेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनिषा जाधव जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. माजी विद्यार्थिनी राजश्री भानगुडे हिलादेखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल गुणगौरव केला. तसेच माजी विद्यार्थिनी करिश्मा सुर्यवंशी, निकिता जंगम व सविता भांगरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर प्रथम वर्षाचे विद्यार्थी अक्षय बोंबले, नारायण गभाले व किर्ती वाणी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोशिक देऊन सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपक्षांची भाऊगर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या यंदाही मोठी असून, छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्यासह अनेक अपक्षांनी सोमवारी मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचीही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गर्दी असल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याचा प्रत्यय आला.

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांप्रमाणेच अपक्षांनीही कंबर कसली आहे. यापैकी काही अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. छावा क्रांतिवीर सेनेचे अपक्ष उमेदवार करण गायकर यांनी श्रमिकनगरपासून मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. मोजक्या समर्थकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याखेरीज प्रकाश कनोजे, सुधीर देशमुख आणि देवीदास सरकटे या तीन अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शिवसेना-भाजप युतीचे हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यासह सहा उमेदवारांनी आठ, तर आतापर्यंत एकूण १० उमेदवारांनी १२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही आतापर्यंत सात उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले. सोमवारी जीवा पांडू गावित यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हेमंत मोतीराम वाघेरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना-भाजप युतीच्या वतीने भारती पवार यांनी दोन अर्ज दाखल केले. बहुजन समाजपक्षाचे नांदगाव तालुक्यातील रहिवाशी अशोक जाधव, वंचित बहुजन आघाडीचे कळवण तालुक्यातील बापू बर्डे यांच्यासह अपक्ष उमेदवार मालेगावचे गाजी एतेजाद अहमद खान यांनीही उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत एकूण १७ उमेदवारांनी २५ उमेदवारी अर्ज भरले आहेत.

...

अर्जासाठी आज अखेरचा दिवस

लोकसभा निवडणुकीकरिता अर्ज भरण्याची मुदत आज (दि. ९) संपत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार समीर भुजबळ आणि धनराज महाले हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याखेरीज आम आदमी पक्षासह अनेक छोट्या मोठ्या पक्षांच्या, संघटनांच्या इच्छुकांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज नेले आहेत. हे इच्छुकही मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे देखील आज अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन अशी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दररोज हजार कनेक्शन तोडा

$
0
0

नाशिक : घरपट्टी व पाणीपट्टीची अपेक्षित वसुली न झाल्याने नाराज झालेल्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आता वसुलीसाठी आक्रमक होत थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. थकबाकीदारांविरोधात सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना करीत पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी दररोज एक हजार नळ कनेक्‍शन तोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिकेची घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी ही २५० कोटींवर पोहचली आहे. घरपट्टीतून अवघे ११५ कोटी रुपये मार्च अखेरपर्यंत पालिकेला मिळाले, तर पाणीपट्टीतून सुमारे ४५ कोटी रुपये प्राप्त झाले. शहरात सिडको, जुने नाशिक भागात घरपट्टीची आणि पाणीपट्टीची थकबाकी आहे. सर्वाधिक नळजोडण्यांचे थकबाकीदारही याच भागात आहेत. त्यामुळे विभाग प्रमुखांच्या बैठकीत अपेक्षित वसुली न झाल्याने आयुक्त गमे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. थकबाकी भरत नसलेल्या ग्राहकांचे नळ कनेक्‍शन तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार कुटुंबाकडे १३ कोटींची संपत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांची एकूण कौटुंबीक संपत्ती १३ कोटी रुपयांची असून कुटुंबात फक्त पती प्रवीण यांच्याच डोक्यावर कोचरगाव सोसायटीचे १० लाख ७६ हजार ९७५ रुपयांचे कर्ज आहे.

डॉ. भारती पवार यांच्याकडे ५३ लाख ४२ हजार ७५४ रुपयांची जंगम असून ३० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पती प्रवीण यांच्याकडे ८१ लाख ९२ हजार ४५९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मुलांच्या नावे अनुक्रम दोन लाख आणि दीड लाखांची जंगम मालमत्ता आहे. पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनींची आताच्या बाजारभावानुसार किंमत १० कोटी ६० लाख रुपये आहे. डॉ. भारती यांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ७२ हजार रुपये असून पतीचे वार्षिक उत्पन्न १५ लाख ६१ हजार रुपये आहे.

डॉ. भारती पवार यांच्याकडे १ लाख ८९ हजार रुपये रोख स्वरुपात आहेत. २ लाख ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असून २१ लाख २० हजार रुपये किंमतीचा चांदीचा ऐवज आहे. त्याच्या पतीकडे १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ५० ग्रॅम सोने आहे. पती प्रवीण यांच्यावर कोचरगाव सोसायटीचे १० लाख ७६ हजार ९७५ रुपयांचे कर्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय इलेक्ट्रॉनिक्सने थकविली पीएफ रक्कम

$
0
0

कामगारांची आर्थिक कोंडी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील एकेकाळच्या नामांकित असलेल्या जय इलेक्ट्रॉनिक कंपनीमधील कामगारांचा प्रलंबित भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आर्मस्ट्राँग कंपनीने भरलेला नाही. त्यामुळे कामगार पेन्शनपासून वंचित आहेत. आर्मस्ट्राँग एनर्जी कंपन्याच्या संचालकपदी आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ आहेत.

एकेकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीत नावाजलेल्या जय इलेक्ट्रॉनिक कंपनीत शेकडो कामगार काम करत होते. टेप रेकॉर्डरची कॅसेट बनविणारी ही कंपनी २००४ मध्ये बंद झाली. यानंतर अमित पटेल व अमिषा पटेल यांच्या मालकीची जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी भुजबळ यांच्या आर्मस्टाँग फर्मने २०१२ मध्ये खरेदी केली. त्यावेळी 'निमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सिटू संघटनेचे कामगारनेते डॉ. डी. एल. कराड व मनोज पिंगळे यांच्या मध्यस्तीने कामगारांच्या देणी असलेल्या चेकचे वाटप सिटू भवनात करण्यात आले. यात कामगारांची उर्वरित देणी लवकरच दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच पीएफचे पैसेही अदा केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु, लाखो रुपयांचा पीएफ आजतागायत भरला गेला नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत आर्मस्ट्राँग कंपनीचे मालक उमेदवारी करीत आहेत. परंतु, दुसरीकडे त्यांच्याच अधिपत्याखाली असलेल्या कंपनीकडून पीएफ भरला जात नसल्याने कामगारांची आर्थिक कोंडी होत आहे. या प्रश्नी कारवाई करणार कोण, असा प्रश्न कामगारांनी केला आहे.

पोलिसांकडून दुर्लक्ष

याप्रश्नी पीएफ कार्यालयानेही आर्मस्ट्राँग कंपनीकडून कामगारांचा पीएफ थकविण्यात आला असल्याचे पत्राद्वारे पोलिसांना कळविले. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी कामगार, सिटू संघटना व पीएफ कार्यालयाने केली. मात्र, पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आर्मस्ट्राँग कंपनीने घेतल्यावर कामगारांचा हिशोब करण्यात आला. त्यावेळी पीएफचे पैसैही भरले जातील, असे आश्वासन दिले गेले होते. पीएफचे पैसे कंपनी मालकाने भरले नसल्याने कामगारांची पेन्शन सुरू झाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्याकडे तक्रारी केल्या. यावर ठोस निर्णय झालेला नाही.

- राजेंद्र नेमाडे, कामगार, जय इलेक्ट्रॉनिक्स

कामगारांच्या पीएफचा विषय २००६ चा आहे. आम्ही ही कंपनी २०११ मध्ये बँकेकडून लिलावाद्वारे विकत घेतली. पीएफ ऑफिसने आम्हाला नोटीस देऊन संचालकांचे जबाब घेतलेले आहेत. जय इलेक्ट्रॉनिक कंपनी आजही मुंबईत सुरू आहे. कंपनीचे प्रकरण सध्या बँकेत असून, उच्च न्यायालयाने याच मुद्द्यावर आम्हाला स्थगिती दिली आहे.

- समीर भुजबळ, संचालक, आर्मस्ट्राँग एनर्जी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थिनींची स्वच्छतागृहे होणार टापटीप

$
0
0

आरोग्यपूरक वातावरण निर्मितीचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील स्वच्छतागृह अपवाद वगळता अस्वच्छतेच्या गर्तेतच सापडलेली असतात. यामुळे किशोरवयीन मुलींची कुचंबना तर होतेच, शिवाय, मुली शाळाबाह्य होण्याचे प्रमाणही वाढते. हे टाळण्यासाठी व किशोरवयीन मुलींच्या निरोगी आरोग्यासाठी शाळांमधील स्वच्छतागृहांचे चित्र बदलण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. विद्यार्थिनींना आवश्यक सुविधा यामुळे मिळू शकणार आहेत.

यू-डायस डाटा २०१७-१८नुसार राज्यातील सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते बारावीच्या ६६ हजार ७५० शाळा आहेत. यापैकी ६५ हजार १०३ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहेत. स्वच्छतागृहाची योग्य देखभाल व दुरुस्तीअभावी स्वच्छतागृहे अकार्यान्वित होतात. परिणामी, स्वच्छतागृह अस्वच्छ असल्यामुळे त्याचा वापर करणे मुली टाळतात. शिवाय, यामुळे शाळेतच न येण्याची त्यांची मानसिकता होत असल्याने शाळाबाह्य होण्याची शक्यताही वाढते. याचा विचार करून व सर्व समावेशक आरोग्यदायी वातावरण शाळेत बनविण्याची गरज लक्षात घेऊन स्वच्छतागृह सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अपर मुख्य सचिव तथा राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा देण्यात आल्या आहेत.

नाशिकमध्ये महापालिकेच्या ९० प्राथमिक व १३ माध्यमिक शाळा असून जिल्हा परिषदेच्या ३ हजार ३५६ शाळा आहेत. या शाळांमधील हजारो विद्यार्थिनींना येत्या शैक्षणिक वर्षापासून सुविधांचा लाभ मिळू शकणार आहे.

\Bअशी होणार अंमलबजावणी\B

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा अनुदानामध्ये स्वच्छता कार्य योजनेसाठी दहा टक्के निधी अंतर्भूत असतो. या निधीमधून किंवा लोकसहभाग, उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्राधान्याने शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून वापरण्यायोग्य राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

\Bया सुविधांचा समावेश

\Bआरसा, साहित्य अडविण्यासाठी हूक व साहित्य ठेवण्यासाठी शेल्फ, कचरापेटी, पाणी साठविण्यासाठी बादली व मग, हात धुण्यासाठी साबण व्यवस्था, लाइट व्यवस्था या सुविधा मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत: स्वत:ला केलेली मदत ही उत्तम

$
0
0

अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीवनातील कोणतीही अवघड परीक्षा द्या; परंतु तुम्ही स्वत: स्वत:ला केलेली मदत ही उत्तम मदत असते हे विसरू नका, ते तुमच्या यशाचे गमक बनू शकते. अभ्यास करताना स्वत:चा आदर्श ठेवा, स्वत: किती कष्टातून संघर्षातून शिकत आहात हे लक्षात घ्या. वेळ आहे, आणखी पुढे जा, वेळेचा सदुपयोग करा, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांनी केले.

युनिक अॅकॅडमीच्या वतीने यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झाला. याप्रसंगी सोनवणे बोलत होते. व्यासपीठावर प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. ज्ञानेश्वर राठोड, कपिल हांडे, विनोद भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.

युनिक अॅकॅडमीच्या ६८ विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथम आलेला वैभव पवार, कावेरी जाधव, साहेबराव भोरे, अर्चना निकम, उमा ढेकळे, राहुल केदारे, नीलेश गंगावणे, विजय चौरे यांच्यासह यशस्वी गुणवंतांचा त्यात समावेश होता. प्रा. चंद्रकांत मोरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अॅकॅडमीच्या वतीने १५ एप्रिल ते १५ मे यादरम्यान १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी-यूपीएससी संदर्भात सेमिनार होणार आहे. त्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

आई-वडिलांना विसरू नका

सोनवणे म्हणाले, की आपण कितीही अभ्यास करा, कितीही परीक्षा पास व्हा; परंतु एक सार्वत्रिक सत्य आहे, की आपण ज्या आई-वडिलांचे बोट धरून शाळेत गेलो. त्यांना कधीही विसरू नका. त्यांना नेहमी आनंदी ठेवा. आई-वडिलांनी यश दिले आहे. त्यामुळे तुम्ही यशस्वी झाल्यानंतरही त्यांना नेहमी सन्मान द्या, तरच तुमच्या अधिकारी पदाचे तुम्ही चिज केले असा वाटेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात तडाखा तापमान ४३ अंशांवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोमवारी या मोसमातील उच्चांकी तापमान नोंद झाले. कमाल तापमान ४३.२ अंश तर किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरवासीय घामाघूम झाले आहेत.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान ४२ अंशांपलिकडे गेले होते. त्यामुळे मालेगाववासीय रोजचं उकाड्याने हैराण होत आहेत. सोमवारचा दिवस चांगलाच तापदायक ठरला. उकाडा आणि उन्हाच्या झळा यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. तापमान विक्रमी वाढत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष उभारण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेस कामगाराचा मुलगा झाला कलेक्टर

$
0
0

प्रेस कामगाराचा मुलगा कलेक्टर

जेलरोडच्या रियाजला यूपीएसीत २६१ वे रँकिंग

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडचे नाव घेतले की टवाळखोर पोरांचे चेहरे समोर येतात, तर गुंडगिरीची चर्चा होते. पण आता ही ओळख जेलरोडचा रियाज अहमद सय्यदने बदलली आहे. रियाज यूपीएसस्सी परीक्षेत देशात २६१ आला आहे. लवकरच तो कलेक्टर होणार आहे. गरिबी जवळून पाहिलेली असल्यामुळे रियाजने दिल्ली, मुंबई ऐवजी झारखंड, बिहार, सिक्कीम अशा मागास राज्यांमध्ये कलेक्टर होण्याचा प्राधान्यक्रम नोंदवला आहे. सोमवारी तो नाशिकमध्ये आल्यावर त्याचे नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे नागरिक व मित्रांनी जोरदार स्वागत केले.

रियाज गेल्या सहा महिन्यांपासून दार्जिलिंग येथे रेंज फॉरेस्ट ऑफिसरचे ट्रेनिंग घेत आहे. पुरुषोत्तम स्कूल आणि बिटको कॉलेजमध्ये कायम टॉपर राहिलेला रियाज बिटकोचा जनरल सेक्रेटरी होता. एम.एसस्सीनंतर त्याने आयएएसची जोरदार तयारी सुरू केली. त्यासाठी सखोल वाचन केले. स्पर्धा परीक्षेसाठी मुंबई-पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये वातावरण नसल्याने रियाजने अभ्यासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात मागासांसाठी स्पर्धा प्रशिक्षण केंद्र आहे. त्यात त्याने प्रवेश मिळवला. तीन वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर रियाजला स्पर्धेचा अंदाज आला. प्रेरणी मिळाली. रात्रीचा दिवस केल्यानंतर तो यशस्वी झाला. या केंद्रातून यावर्षी तब्बल ४२ विद्यार्थी आयएएस पास झाले.

---

कुटुंबाचा पाठिंबा

पंचक गावठाण भागात पत्र्याच्या घरात रियाजचे कुटुंब राहते. त्याचे वडील नाशिकरोड प्रेसमध्ये कामगार होते. तिसरे शिकलेले असले तरी त्यांनी चार मुली व दोन मुलांना प्रेरित केले. रिजायच्या बहिणीदेखील उच्चशिक्षित आहेत. वडील अहमद, आई जुलेखा, सलिम चौधरी, आरिफ शेख, मुबारक सय्यद, जी. आर. कलाल, सुनील बोराडे, तारीक सर यांची प्रेरणा तर पुरुषोत्तम स्कूल, बिटको कॉलेज, जामिया विद्यापीठातील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे रियाजने सांगितले.

----

मागास भागात काम करणार

मटाशी बोलताना रियाज म्हणाला की, प्रशासकीय सेवेद्वारा समाजाचे कल्याण करता येते. आदिवासी हा माझा संशोधनाचा विषय असल्याने मी झारखंड, बिहारसारख्या राज्यांमध्ये सेवेसाठी इच्छुक आहे. एक जिल्हाधिकारी पंधरा लाख लोकांचे कल्याण करू शकतो. या संधीचे मी नक्कीच सोनं करेन. नाशिकरोडला स्पर्धा परीक्षांचा ट्रेण्ड वाढत आहे. भविष्यात नाशिकचे युवक आयएएस होतील अशी खात्री आहे.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय इलेक्ट्रॉनिक्सने थकविला कामगारांचा पीएफ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील एकेकाळच्या नामांकित असलेल्या जय इलेक्ट्रॉनिक कंपनीमधील कामगारांचा प्रलंबित पीएफ आर्मस्ट्राँग कंपनीने भरलेला नाही. त्यामुळे कामगार पेन्शनपासून वंचित आहेत. आर्मस्ट्राँग कंपनी ही पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांची आहे.

...

नी पीएफचे पैसेचे अदा केले नसल्याचे सांगितले.

एकेकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीत नावाजलेल्या जय इलेक्ट्रॉनिक कंपनीत शेकडो कामगार काम करत होते. टेपरेकाँर्डरची कँसेट बनविणारी कंपनी २००४ मध्ये बंद झाली होती. यानंतर आर्मस्ट्राँग या फर्मने जय इलेक्ट्राँनिक्स कंपनी विकत घेतली होती. परंतु, यात कामगारांची देणी नवीन कंपनी मालकाने दिली असली तरी त्यांचा पीएफ भरला नसल्याने पेन्शन मिळत नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत कामगारांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत आर्मस्ट्राँग कंपनीचे मालक पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांनी पीएफचे पैसेचे अदा केले नसल्याचे सांगितले. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयानेही कामगारांचा पीएफ थकविण्यात आला असल्याचे पत्राद्वारे पोलिसांना कळविले. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी कामगार, सिटू संघटना व पीएफ कार्यालयाने केली. मात्र, पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

..

अमित पटेल व अमिषा पटेल यांच्या मालकीची जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी भुजबळ यांच्या आर्मस्टाँग फर्मने २०१२ मध्ये खरेदी केली होती. यावेळी 'निमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सिटू संघटनेचे कामगारनेते डॉ. डी. एल. कराड व मनोज पिंगळे यांच्या मध्यस्तीने कामगारांच्या देणी असलेल्या चेकचे वाटप सिटू भवनात करण्यात आले. यात कामगारांची उर्वरित देणी लवकरच दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच पीएफचे पैसेही अदा केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु, आजतागायत कामगारांचा लाखो रुपयांचा पीएफ भरला गेला नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत आर्मस्ट्राँग कंपनीचे मालक उमेदवारी करीत आहेत. परंतु, दुसरीकडे त्यांच्याच अधिपत्याखाली असलेल्या कंपनीतील कामगारांचा पीएफ भरला जात नसल्याने कामगारांची आर्थिक कोंडी होत आहे. या प्रश्नी कारवाई करणार कोण, असा प्रश्न कामगारांनी केला आहे.

पोलिसांकडून दुर्लक्ष

याप्रश्नी भविष्य निर्वाह निधी कार्यालयानेही आर्मस्ट्राँग कंपनीकडूनही कामगारांचा पीएफ थकविण्यात आला असल्याचे पत्राद्वारे पोलिसांना कळविले. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी कामगार, सिटू संघटना व पीएफ कार्यालयाने केली. मात्र, पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

जय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आर्मस्ट्राँग कंपनीने घेतल्यावर कामगारांचा हिशोब करण्यात आला. त्यावेळी पीएफचे पैसैही भरले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. पीएफचे पैसे कंपनी मालकाने भरले नसल्याने कामगारांची पेन्शन सुरू झाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्याकडे तक्रारी केल्या. यावर ठोस निर्णय झालेला नाही.

- राजेंद्र नेमाडे, कामगार, जय इलेक्ट्रॉनिक्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुसेन यांच्यासारखे गुरू योगायोगाने लाभतात

$
0
0

हुसेन यांच्यासारखे गुरू

योगायोगाने लाभतात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोहम्मद हुसेन यांनी अनेक नामवंत संगीताकारांसोबत काम केले असल्यामुळे त्यांना सर्वच वाद्यांची उत्तम जाण होती. भारतीय पलुस्कर पद्धतीची स्वरलिपी तसेच पाश्‍चात्य संगिताचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी आपल्या हजारो कलावंत घडवले. हुसेन यांच्यासारखे गुरू केवळ योगायोगाने मिळत नाही तर ते ऋणानुबंधाने लाभतात, अशा शब्दात त्यांच्या चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या.

शालिमार येथील आयएमए सभागृहात संगीत दिग्दर्शक मोहम्मद हुसेन यांची श्रद्धांजली सभा झाली. यावेळी मधुकर झेंडे म्हणाले की, नाशिक ही कलाकारांची पावनभूमी आहे. त्यातीलच एक दिग्गज कलावंत म्हणजे मोहम्मद हुसेन. नाशिकचे नाव त्यांच्यासारख्या कलाकारांमुळेच मोठे झाले आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. डॉ. सुनील बुकाणे म्हणाले की, नाशिकला आल्यानंतर हुसेन सरांकडे संगीत शिकण्यासाठी जा असा सल्ला अनेकांनी दिला. मी त्यांच्याकडे शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकलो. कोणतीही गायनाची ओळ परफेक्‍ट झाल्याशिवाय ते पुढे जाऊ देत नसत. संगीत हे चांगले मेडिटेशन आहे, असे ते मला नेहमी सांगायचे. संगितामुळे रक्तदाब, मधुमेह तसेच ताणतणाव व्यवस्थापनासाठी कसा फायदा होतो, हे त्यांनी मला शिकवले.

मेघा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश साळवे, शशांक इखणकर, सकलेन शेख, सना शेख, शबाना शेख, मयुरी सोनार, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारकीत वाढला पैका!

$
0
0

हेमंत गोडसे यांच्या संपत्तीत पाच कोटींनी वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान खासदार आणि शिवसेना, भाजप आणि रिपाइं महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मालमत्तेमध्ये गेल्या पाच वर्षांत एकूण पाच कोटींनी वाढ झाली आहे. जंगम मालमत्तेत दोन कोटी ३५ लाखांनी तर स्थावर मालमत्तेत २ कोटी ७९ लाखांनी वाढ झाली आहे. गोडसे यांच्याकडे आजमितीस सहा कोटी ३५ लाखांची जंगम मालमत्ता असून सहा कोटी १७ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

गोडसे यांनी सिव्हिल इंजिनीयरिंग या अभ्यासक्रमाची पदविका घेतली आहे. त्यांचा शेती आणि बांधकाम व्यवसाय आहे. गोडसे यांचे गतवेळी वार्षिक उत्पन्न १७ लाख २९ हजार ५४ रुपये एवढे होते. परंतु, यंदा हे उत्पन्न सात लाख ४७ हजार ४६६ रुपये म्हणजेच कमी झाले आहे. त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ४ लाख २१ हजार ७९५ रुपये होते. ते सहा लाख ७९ हजार रुपये झाले आहे. त्यांच्या एका मुलाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख तर दुसऱ्या मुलाचे वार्षिक उत्पन्न चार लाख ५७ हजार रुपये आहे. गोडसे यांच्याकडे सहा लाख ७० हजार रुपयांची रोकड आहे. त्यांच्या पत्नीकडे तीन लाख ३८ हजार, दोन्ही मुलांकडे अनुक्रमे १ लाख १६ हजार आणि २ लाख ३३ हजारांची रोकड आहे. गोडसे यांच्याकडे २९ लाख ९० हजारांची वाहने आहेत. त्यांच्या पत्नीकडे १३ लाखांचे वाहन असून मुलांकडे १० आणि नऊ लाखांची वाहने आहेत. हेमंत गोडसे यांच्याकडे १२० ग्रॅम सोने असून पत्नीकडे १६० ग्रॅम सोने आहे. मोठ्या मुलाकडे ९८ ग्रॅम आणि धाकट्या मुलाकडे ६१ ग्रॅम सोने आहे.

गोडसे कुटुंब चार कोटींचे कर्जदार

खासदार गोडसे यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर ३ कोटी २८ लाख ५५ हजार १९५ रुपयांचे तर पत्नीच्या नावे ७२ लाख ३२ हजार ५२६ रुपयांचे कर्ज आहे. मुलगा अजिंक्य याच्यावर पाच लाख ७० हजार ४०५ रुपयांचे तर सागर याच्या नावे ४ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज आहे. म्हणजे गोडसे परिवारावर एकूण चार कोटी १० लाख ८३ हजार १२६ रुपयांचे कर्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’चा रौप्यमहोत्सवी दीक्षांत सोहळा शुक्रवारी

$
0
0

दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी पदवीदान समारंभ शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता विद्यापीठ आवारात होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात मुक्त विद्यापीठातर्फे तब्बल १ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.

३० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा यंदाचा हा रौप्यमहोत्सवी पदवीदान समारंभ आहे. विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि एक हजार ८७४ अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य चालते. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी सहा लाख १५ हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. पीएच. डी. - एम. फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या सुमारे १३८ अभ्यासक्रमांच्या एक लक्ष ४८ हजार २६० विद्यार्थ्यांना यंदा या समारंभात पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. पदवीदान समारंभासाठी विद्यापीठात विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी नाव पडताळणी व दुरुस्तीसाठी ५ एप्रिलपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिमखान्याला विजेतेपद

$
0
0

एसएमबीटी मान्सून लीग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व एसएमबीटी मेडिकल कॉलेजतर्फे झालेल्या १६ वर्षांखालील एसएमबीटी मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिमखाना संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात नाशिक क्रिकेट अॅकॅडमीचा ७ गडी राखून पराभव केला. यापूर्वी नाशिक जिमखान्याने १९ वर्षांखालील एसएमबीटी मान्सून लीग स्पर्धा जिंकली होती.

नाशिक क्रिकेट अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, रोशन वाघसरेच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे नाशिक क्रिकेट अॅकॅडमीचा संघ ३४ षटकांत १०० धावांत गारद झाला. रोशनने १९ धावांत ६ गडी टिपले. रवींद्र मच्छा याने ४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात नाशिक जिमखान्याने ४१ षटकांत सर्व बाद १३४ धावा केल्या. येतेंद्र कार्लेकरने ३३, तर आकाश बोरसेने २२ धावा केल्या. साहील पारीखने ६ गडी बाद केले. ३४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या नाशिक क्रिकेट अकॅडमीला दुसऱ्या डावातही फारशी चमक दाखवता आली नाही. रोशन वाघसरे व रितेश तिडकेच्या गोलंदाजीपुढे त्यांचा डाव ४५ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आला. साहील पारीखने ३२, तर रवींद्र मच्छाने २५ धावांचे योगदान दिले. रोशन व रितेशने प्रत्येकी ३ गडी बाद केले. विजयाचे ८३ धावांचे लक्ष्य नाशिक जिमखान्याने २५ षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात पूर्ण करीत एसएमबीटी मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दुसऱ्या डावात यशराज तिडके याने नाबाद ३४ धावा व रितेश तिडकेने नाबाद २४ धावा केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

$
0
0

नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून डॉ. भारती पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना, भाजप, रिपाइं व रासप महायुतीचे नाशिकमधील उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. 'शिवसेना-भाजप महायुतीचा विजय असो', 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक काढली. भाजप-सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाचेही दर्शन या निमित्ताने घडून आले. महायुतीच्या या शक्तिप्रदर्शनाने परिसर भगवेमय बनला होता.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने महायुतीने मिरवणुकीद्वारे आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच, बी. डी. भालेकर शाळेलगतच्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उमेदवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो युतीच्या कार्यकर्त्यांनी हाती उंचावून धरलेले धनुष्यबाण आणि कमळाचे चिन्ह लक्ष वेधून घेत होते. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने आबालवृद्ध, महिला या मिरवणुकीत सहभागी झाले होत्या. हाती भगवा डौलाने फडकत कार्यकर्ते युतीच्या उमेदवाराच्या विजयाच्या घोषणा देत पुढे सरकत होते. बी. डी. भालेकर मैदानावरून निघालेली ही मिरवणूक अण्णा भाऊ साठे पुतळा, बी. डी. भालेकर शाळेसमोरून गंजमाळ सिग्नलमार्गे दूधबाजार, भद्रकाली मार्केट, संत गाडगे महाराज चौक, मेनरोड, वंदे मातरम चौक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहर सिग्नलमार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. भव्य मिरवणुकीमुळे अवघा परिसरच भगवा झाला होता. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गोडसे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे, तर डॉ. पवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना उमेदवारी अर्ज सादर केले.

....

दिग्गजांची हजेरी

मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेल्या रथावर उमेदवार गोडसे, डॉ. भारती यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापौर रंजना भानसी, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा बॅँक अध्यक्ष केदा आहेर, भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, राहुल आहेर, योगेश घोलप, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, प्रथमेश गिते, दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे आदी उपस्थित होते.

...

डमी मोदीने वेधले लक्ष

महायुतीच्या उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शन मिरवणुकीत नरेंद्र मोदींची हुबेहूब छबी असलेल्या विकास महंते हा कलाकारही सहभागी झाला होता. खासदार गोडसे व डॉ. भारती पवार यांच्यासोबत मिरवणूक चित्ररथावर असलेल्या महंतेनेही मोदींसारखेच हातवारे आणि शब्दफेकी केल्याने ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. मिरवणूक मार्गावर ते सर्वांनाच अभिवादन करीत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना जोश चढला होत, तर दुसरीकहे सर्वसामान्य मतदार कुतूहलाने बघत होते.

...

एकीचे घडविले दर्शन

शक्तिप्रदर्शनात शिवसेना-भाजपच्या नेत्यांमधील एकीचे दर्शनही दिसून आले. महापालिकेतील भाजप-सेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेतील सदस्यासंह नगरपालिका ते ग्रामपंचायतीतील सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या शक्तिप्रदर्शनाकडे रिपाइंच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती असली, तरी प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली.

....

पाच वर्षांच्या संधीचे सोने केले आहे. मतदारसंघासाठी अनेक प्रकल्प आणून मार्गी लावले आहेत. त्यामुळे मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता मतदारसंघाच्या विकासासाठी पुढच्या पाच वर्षांसाठी सुद्धा जनतेकडून मलाच संधी दिली जाणार आहे.

- हेमंत गोडसे, शिवसेना उमेदवार

..

दिंडोरी मतदारसंघात शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्रावर काम करण्यासाठी मतदारांनी मला संधी दिली पाहिजे. मतदारसंघाचा अनुषेश भरून काढण्यासाठी निवडणूक लढवत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करण्याचा अनुभव असून, द्राक्ष निर्यात आणि आदिवासींच्या विकासाला प्राधान्य देणार आहे.

- डॉ. भारती पवार, भाजप उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

एक एकर शेती विकूनही कर्ज फिटेना

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यात शिंगवे येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष यशवंत शिंदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. शिंदे यांच्यावर कर्ज होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एक एकर जमीन विकून कर्ज फेडले; मात्र परिस्थितीमुळे नवीन कर्ज वाढावे लागले. मानसिक हानी होत असल्याने त्यांनी गळफास घेत आयुष्याची अखेर केली.

सुभाष शिंदे यांच्यावर ५० हजार रुपयांचे पतसंस्थेचे, ५० हजार रुपयांचे एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि खासगी सावकाराचे एक लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच अनेक दुकानदार आणि नातेवाइकांकडे त्यांची उधारी झाली होती. केवळ अर्धा एकर जमीन शिल्लक राहिल्याने त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे त्यांना अवघड झाले होते. पिकाचे पडलेले बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती, कुटुंबाचा वाढता खर्च, शेतीसाठी लागणारे भांडवल याचा आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी करंजगाव-कोठूरे मार्गावरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आपले जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी सरला, मुलगा राहुल, मुलगी रुपाली असा परिवार आहे. निफाड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून झाल्यानंतर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल गोटेंची अखेर भाजपला सोडचिठ्ठी

$
0
0

धुळ्यातून आज अपक्ष अर्ज दाखल करणार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळ्याचे भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा सोमवारी (दि. ८) भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे मुंबईत जाऊन दिला. गेल्या काही दिवसांपासून आमदार अनिल गोटे यांनी स्वकीयांच्याविरोधात बंड पुकारले होते. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. अखेर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णयदेखील सायंकाळी जाहीर केला आहे.

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी धुळे महापालिकेतही भाजपविरोधात पॅनल उभे केले होते. त्यांनी सोमवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला आहे. अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले असून, शिवतीर्थ चौकात सायंकाळी लोकसभा उमेदवारीची प्रचार सभादेखील घेण्यात आली. या वेळी आमदार गोटे यांनी आज (दि. ९) अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचे सांगितले.

बॅनरवर पंतप्रधानांचा फोटो का?
दरम्यान, या जाहीर सभेच्या बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकण्यात आला होता. त्यामुळे अनिल गोटे यांचे नेमके कोणाला समर्थन आहे, याबाबत संभ्रम कायम आहे. सभेच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर अनिल गोटे यांचा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला होता. तसेच ‘अनिल गोटे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत’ असेही म्हटले होते. यामुळे धुळेकरांसमोर जाताना अनिल गोटे हे त्यांनी सोडलेल्या पक्षातील व्यक्तींचे फोटो वापरत असल्याने नेमके कोणत्या पक्षाचे हा प्रश्नही कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाल पाटलांचा अर्ज दाखल

$
0
0

कुणाल पाटलांचा अर्ज दाखल

धुळ्यात काँग्रेस आघाडीचे शक्तिप्रदर्शन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी सोमवारी (दि. ८) प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे समर्थक, शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिलांसह सर्वच घटकांतील लोक रस्त्यावर एकत्रितपणे उतरल्याने कॉंग्रेस आघाडीचे हे ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन विरोधकांना सूचक इशारा देणारे ठरले आहे.

देवपूरातील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय येथून सोमवारी (दि. ८) सकाळी १० वाजता आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कै. चुडामण आण्णा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ढोल ताशांच्या गजरात काँग्रेस आघाडीच्या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली आग्रा रोडमार्गे गांधी पुतळा येथे पोहोचली. महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली नगरपट्टीमार्गे जिल्हा बँक चौकात आल्यावर तिचे सभेत रुपांतर झाले. या सभेनंतर कुणाल पाटील यांनी निवडक नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना होऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी माजी मंत्री अमरिश पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मालेगावचे आमदार आसिफ शेख, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, मालेगावचे महापौर रसीद शेख, माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अद्वय हिरे, प्रसाद हिरे, डॉ. तुषार शेवाळे, नाशिक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे महेश मिस्तरी काँग्रेसमध्ये
काँग्रेसच्या जाहीर सभेत शिवसेनेचे धुळे लोकसभा संघटक महेश मिस्तरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी या वेळी कुणाल पाटील यांना पाठींबा जाहीर करून युतीचे उमेदवार डॉ. भामरे यांच्यावर टीका केली. कट्टर शिवसैनिक अशी छबी असलेल्या महेश मिस्तरी यांना कॉंग्रेसच्या मंचावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी हे डॉ. भामरेंसोबत गेल्या अनेक दिवसांपासून युतीचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे मतदारसंघात शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून, एक गट आमदार कुणाल पाटलांकडे असून दुसरा गट भाजपसोबत असल्याचे चित्र दिसत आहे.

सात उमेदवारांचे नंदुरबारला अर्ज
धुळे : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ८) सात उमेदवारांनी चौदा नामनिर्देशनपत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांच्याकडे सादर केले. आतापर्यंत एकूण नऊ उमेदवारांनी सोळा नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये भाजपतर्फे डॉ. हिना गावीत यांनी तीन तर आमदार डॉ. विजयकुमार कृष्णराव गावीत आणि डॉ. सुहास नटावदकर यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र सादर केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी दोन नामनिर्देशन पत्र सादर केले. तसेच रेखा सुरेश देसाई यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच भरत जाल्या पावरा आणि अशोक दौलतसिंग पाडवी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

मतदारांच्या भेटीगाठींवर भर
रावेर : केंद्र व राज्य सरकारने अध्यात्मिक व वारकरी संप्रदायासाठी गत पाच वर्षात भरीव विकास कामे केली आहेत, असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी तामसवाडी (ता. रावेर) येथे बोलताना व्यक्त केले. तामसवाडी येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यानंतर दुपारी अध्यात्मिक आघाडीच्या मेळाव्यात खडसेंनी मतदारांशी संवाद साधला. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनीदेखील मुक्ताईनगरला प्रचार दौरा करीत मतदारांसोबत संवाद साधला. दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांकडून आता मतदारांच्या भेटीगाठींवर भर देण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी पायपीट सुरू केली आहे.

रोहिदास पाटील यांचे शालक भाजपच्या वाटेवर?
धुळे : धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सुभाष देवरे आज (ता. ९) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे देवरे भाजपप्रवेश करतात की ही केवळ अफवा आहे, याबाबत आज चित्र स्पष्ट होणार आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुतणे उत्कर्ष पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता रोहिदास पाटील यांचे सख्खे शालक सुभाष देवरेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सुभाष देवरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नुकतीच भेट घेतल्याचेही वृत्त आहे. या भेटीनंतरच देवरे यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. देवरे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असून, ते बोरीस गटातून जिल्हा परिषदेवर अनेक वेळा निवडून गेले आहेत. शिवाय त्यांनी काही वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. आता ते धुळे बाजार समितीचे सभापती आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही देवरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांनी शिवसेनेतर्फे आमदारकीसाठी उमेदवारीही केली होती. मात्र, आमदार गोटे यांनी त्यांचा पराभव केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः ‘चिल्लर’ फंडा उमेदवाराच्याच अंगलट!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील नाऱ्याची आठवण करून देणारा किस्सा मंगळवारी नाशिकमध्ये घडला. नाशिक लोकसभा निवडणुकीची अपक्ष उमेदवारी करू इच्छिणाऱ्या एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० हजार रूपयांची चिल्लर आणली. परंतु, त्याचा हा फंडा प्रशासनाने त्याच्यावरच उलटविला. मुदतीत नाणी मोजून देण्याचे फर्मान प्रशासनाने सोडल्याने उमेदवाराही त्याच्या समर्थकांची धावपळ उडाली.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. नाशिक शहरातच वास्तव्यास असलेले शिवाजी वाघ हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या समर्थकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाले. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. खुल्या गटातील उमेदवारांना २५ हजार रुपये अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे यंत्रणेने त्यांना अनामत रक्कम भरण्यास सांगितले. १५ हजारांच्या नोटा आणि १० हजार रुपयांची नाणी अनामत रक्कम भरण्यासाठी आणल्याची माहिती त्यांनी मध्यवर्ती सभागृहातील यंत्रणेला दिली. परंतु, अन्य अपक्ष उमेदवारांची एकाचवेळी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्याने यंत्रणा त्यामध्ये अडकून पडली. वाघ यांनी १ हजार रूपये चिल्लरच्या १० थैल्या तयार कराव्यात, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वाघ यांच्या समर्थकांवर ही १० हजारांची नाणी मोजून ती १० थैल्यांमध्ये विभागण्याची वेळ आली. दुपारी तीन वाजेपर्यंतचे अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने वाघ यांच्यासह सर्वच अपक्ष उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यात आले. परंतु, त्यानंतरही त्यांचे समर्थक अनामत रक्कम भरण्यासाठी आणलेली चिल्लर नाणी मोजण्यातच व्यस्त होते. एक रुपयाची १९००, २ रुपयांची १४५०, ५ रूपयांची ६४० तर १० रुपयांची २०० नाणी त्यांनी मोजली. वाघ यांना अनामत रक्कम जमा करण्यास विलंब झाला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असला, तरी छाननीमध्येच आता त्यांच्या उमेदवाराचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या एका अपक्ष इच्छुकाच्या मदतनीसाला मुदत संपू लागल्याने दालनात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे संबंधितांनी जीवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी दिली. तेथे उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करीत गोंधळ रोखला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images