Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पत्नीची हत्या; पतीस जन्मठेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणातून पत्नीची निर्घुण हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे ३ मे २०१६ रोजी घडली होती. या खटल्यात १४ वर्षांच्या मुलाची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सुशांत विलास पठारे (रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नांदूर शिंगोटे येथील संपत भाबड यांच्या दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर पठारे दाम्पत्य राहत होते. ३ मे २०१६ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुशांत व पत्नी वैशाली यांच्या शंभर रुपयाच्या कारणातून वाद झाला होता. पत्नीने शंभर रुपये देण्यास नकार दिल्याने संतप्त सुशांतने तिला मारहाण केली. यावेळी पतीच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी तिने आत्महत्या करीत असल्याची सुसाईट नोट लिहून त्यास घाबरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त सुशांतने ही संधी साधत वैशालीचा ओढणीने गळा घोटला. यानंतर आत्महत्येचा बनाव करीत त्याने वैशालीच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी तिच्या कुर्त्यामध्ये छातीजवळ ठेवली. यानंतर रक्ताने माखलेला शर्ट पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या आईकडे सुपूर्द केला होता. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदनात वैशालीने आत्महत्या केलेली नसून तिचा घातपात झाल्याचा अहवाल समोर आला. गुह्याचा तपास उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांनी केला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पंकज चंद्रमोरे यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यात १४ वर्षांच्या मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. परिस्थीतीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा व लहान मुलाची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिता-पुत्राला टोईंगवरून मारहाण

$
0
0

नाशिक : खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी अरेरावी करीत पिता-पुत्रास भरचौकात मारहाण केल्याची घटना जिल्हा कोर्टाच्या प्रवेशद्वारावर घडली. बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी हे कर्मचारी थेट मारहाण करू लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवारी (दि.९) दुपारी खोदलेल्या मात्र मुरूम टाकून सपाट केलेल्या स्मार्ट रस्त्यावर दुचाकी लावून लोंढे (नाव समजू शकले नाही) पिता-पुत्र नोटरीच्या कामासाठी न्यायालयात आले होते. यावेळी त्यांची दुचाकी टोइंग वाहनावरील कामगारांनी उचलली. ही बाब लक्षात येताच पोलिस कर्मचाऱ्यास विनंती करीत जागेवर दंडाची रक्कम घेऊन वाहन देण्याचा पिता-पुत्राने आग्रह केला. मात्र उर्मट कामगाराने वाद घालत पितापुत्रास मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात आता कृत्रिम पाणी टंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा नदी दुथडी भरून वाहत असताना रविवारी मध्यरात्री ठेंगोडा येथील महावितरणचे रोहित्र जळाल्याने सोमवार व मंगळवार या दोन दिवस शहरवासियांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. त्यामऊळे शहरवासियांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

सटाणा शहरात गेल्या आठ दिवसांपासून चणकापूर धरणातील गिरणा नदीपात्रात आवर्तन आल्याने २८ मार्चपासून शहरात एक दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र रविवारी ७ एप्रिल रोजी मध्यरात्री महावितरण कंपनीचे ठेगोंडा येथील रोहित्र जळाले. परिणामी शहरात गत दोन दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गिरणा नदीपात्र दुथडी भरून वाहत असतांना शहरातील जनतेला केवळ तांत्रिक अडचणींमुळे पाणीटंचाई भासू लागल्याने पालिका प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

वीज रोहित्र तातडीने दुरूस्ती करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. बुधवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरळीत होईल.- सुनील मोरे, नगराध्यक्ष सनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय...मी मतदान करणारच!

$
0
0

जनजागृतीवर भर; जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांसह समाजिक संघटनांचे आवाहन

टीम मटा

निवडणुकीत अनेक मतदार मतदानाचा हक्का बजावत नाही. मात्र जोपर्यंत प्रत्येक मतदार मतदानाचा हक्क बजावत नाही तोपर्यंत स्थिर आणि सक्षम सरकार मिळणार आहे. त्यामुळेच मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांमध्ये जागृती व्हावी यासाठी करण्यात येत आहे.

नवरदेव, नवरा, अन् वऱ्हाडींनी दिले वचन

सटाणा : येथील नर्मदाई कृषी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी वडनेर येथील एका विवाह सोहळ्यातील वऱ्हाडींकडून 'होय...मी मतदान करणारच', असे अभिवचन घेऊन मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले.

तालुक्यातील वडनेर येथे लक्ष्मण वसंत शेवाळे आणि राजश्री अनिल महाजन यांचा विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी नर्मदाई कृषी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी दोन हजार प्रती वाटप केल्या. मतदारांमध्ये जागरूकता व्हावी यासाठी अध्यक्ष प्रकाश शेवाळे, उपाध्यक्षा धनश्री शेवाळे, सदस्य तुषार अहिरे, सोमनाथ बागुल, योगेश अहिरे, सुरेश वाघ, समाधान शेवाळे, अमर शेवाळे, गणेश भामरे, बबलू भामरे यांनी मतदार साक्षरता अभियान राबविले. यासाठी त्यांनी थेट वडनेर येथील लग्नमंडप गाठून विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता केली.

नर्मदाई कृषी फाउंडेशनच्यावतीने मतदानाचा अधिकार निर्भय वातावरणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी महिला आणि पुरुषांकडून मतदान करण्याचे अभिवचन घेण्यात आले. विवाह सोहळा असणाऱ्या लक्ष्मण-राजश्री, वर-वधूंचे वडील यांनीही मतदान करण्याविषयी लेखी अभिवचन दिले. विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे अभिवचन उत्साहाने दिले.

देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. यासाठी आमच्या फाउंडेशनमार्फत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. - प्रकाश शेवाळे, अध्यक्ष, नर्मदाई कृषी फाउंडेशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमांतर : सौरभ रत्नपारखी

$
0
0

माध्यमांतर : सौरभ रत्नपारखी

---

इतिहासाची ऐशीतैशी

'भारतीय इतिहासकार' हे शब्द उच्चारल्यावर अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतात.

रियासतकार गो. स. सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे, जदुनाथ सरकार, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते थेट अलीकडच्या काळात निनाद बेडेकर यांच्यापर्यंत अनेक महनीय इतिहासकरांनी इतिहास लेखनाच्या क्षेत्रात अजोड कामगिरी करून ठेवली आहे. हे करत असताना त्यांना अनेकदा पदरमोड करावी लागली. वाळवींनी पोखरलेल्या आणि भग्न होत चाललेल्या प्राचीन वास्तूंमधून त्यांना अनेक ऐतिहासिक पत्रव्यवहार, पोथ्या, बखरी शोधून काढाव्या लागल्या. खेड्यापाड्यात बंबात पाणी तापविताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या मार्गावर असलेली अनेक दुर्मिळ कागदपत्रे त्यांनी मोठ्या कष्टाने मिळवली. जुन्या वाड्यांच्या माळ्यावर धूळ खात पडलेल्या गाठोड्यांच्या आत त्यांना अनेकदा इतिहासाचा अनमोल ठेवा मिळाला.

आपली हयात घालवून त्यांनी फारसी, संस्कृत, इंग्रजी, भाषांवर प्रभुत्व मिळवून त्या-त्या भाषेतली ग्रंथसंपदा मराठीत आणली. मोडी, ब्राह्मीसारख्या लिपींची लेखन-वाचनकौशल्ये आत्मसात केली. पण आज हे सर्व सांगण्याचं कारण काय तर परवा एका मित्राने व्हाट्सअॅपवर 'दुर्मिळ माहिती' या शीर्षकाखाली एक मेसेज पाठवला होता. त्या संपूर्ण मेसेजमध्ये एका इतिहासप्रसिद्ध महापुरुषाचे गुणगान होते. त्या महापुरुषाचे रणभूमीवरचे अचाट कर्तृत्व, अफाट शारिरीक ताकद, त्याची विद्वत्ता यांचे रसभरीत वर्णन केलेले होते. हा महापुरुष कोण हे सांगण्यात काहीच अर्थ नाही, कारण दोन दिवसांपूर्वी तोच मेसेज दुसऱ्या एका महापुरुषासंदर्भात मी वाचला होता.

'इतिहास' हा विषय सोशल मीडियावर इतका हास्यास्पद आणि स्वस्त का झाला आहे, असा कधीकधी प्रश्न पडतो. ज्या घटनांचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही, ज्याला संदर्भसाधनांचा कोणताच पाया नाही किंवा कोणत्याही समकालीन कागदपत्रात नोंद नसताना हे इतिहासपर मेसेजेस इतके व्हायरल कसे होत असतात?

जे कोणी उत्साही गडी हे मेसेजेस फॉरवर्ड करतात, त्यांच्याकडेदेखील याची उत्तरे नसतात, कारण 'Use and throw' प्रमाणेच नव्याने जन्माला आलेल्या 'Read and forward' संस्कृतीने एका विचित्र सामाजिक विकाराला जन्म दिला आहे.

आपण महापुरुषांची जातवार विभागणी केली आहे, मग त्यांच्या अनुयायांमध्येदेखील दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठत्व दाखवण्याची अहमहमिका लागते. इतिहासात कुठेच न सापडणारे चमत्कारिक पराक्रम बळेच त्यांच्या माथी मारण्यात येतात, कारण त्या महापुरुषाला न्यूनत्व यायला नको. एखादवेळा भाबडेपणा किंवा अज्ञान यातून होणारे फॉरवर्ड्स समजू शकतो, पण चक्क IAS/IPS दर्जाचे अधिकारीदेखील या विकाराला बळी पडताना दिसतात.

आपापल्या जातीतील साधू-संत, राजे-महाराजे यांच्याबद्दल असणारे प्रेम व आकर्षण समजण्यासारखे असले तरी त्यासाठी दुसऱ्या महापुरुषांची निंदानालस्ती करण्याची गरज नसते. दोन जातीधर्मांत कलुषित इतिहासाच्या साहाय्याने वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक गेल्या कित्येक वर्षात करताना दिसत आहेत. या समाजकंटकांचे हेतू अनेकदा राजकीय असतात. भावनिक होणारी जनता म्हणजे त्यांच्यासाठी आयतं गवसलेलं घबाडच! मग आपल्या महापुरुषाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन समोरच्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यांच्याशी विचार जुळत नाहीत, अशा एखाद्याविरुद्ध पक्षाचा पाया रचणाऱ्या महापुरुषाला बदनाम करायचे, त्याचे चारित्र्यहनन करायचे, त्याच्याभोवती संशयाचे धुके निर्माण करायचे, त्यासाठी त्याच्या पुस्तकातील सोयीची वाक्ये उचलायची (तर कधी स्वतःच्या मनाची वाक्ये त्याच्या तोंडी घालायची), एखाद्या ललित कादंबरीला इतिहास समजून त्याचे दाखले द्यायचे, तर कधी एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापरून त्याच्या फोटोचे विकृतीकरण करायचे. हे प्रकार सर्रास चालू आहेत.

'IF YOU WANTS TO KILL SOMEONE KILL HIS HISTORY FIRST' एखाद्याला संपवायचे असेल तर आधी त्याचा इतिहास संपवा हे इंग्रजांनी शिकवलेलं ब्रीद आपण फार कसोशीने पाळताना दिसत आहोत. पण इतिहासाचा अभ्यास करताना एक प्रमुख पथ्य नेहमी पाळावे लागते, ते म्हणजे 'STUDY THE HISTORIAN BEFORE YOU STUDY THE HISTORY' (इतिहास अभ्यासण्याआधी इतिहासकाराचा अभ्यास करा.) तुम्हाला इतिहासपर किंवा धार्मिक मेसेज फॉरवर्ड करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? ते पाठविण्याचा उद्देश काय आहे? पाठविणाऱ्याचा त्याविषयी स्वत:चा अभ्यास किती आहे? कोणत्या समकालीन कागदात तशी नोंद आहे? या सर्वांची उत्तरे जोवर मिळत नाहीत, तोवर सोशल मीडियावर येणारे मेसेज हे 'इतिहास्यास्पद' श्रेणीतच गणले जातील.

(लेखक ब्लॉगर आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज मिळत नसल्याने बँक मॅनेजरला शिवीगाळ

$
0
0

कर्ज मिळत नसल्याने बँक मॅनेजरला शिवीगाळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्ज मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने बँक व्यवस्थापकास शिवीगाळ करीत दमदाटी केली. ही घटना अमृतधाम परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अजय राधाकृष्ण धंजल (रा. शांतीनिकेतन सोसा. कुणाल हॉटेल मागे) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी शक्ती प्रसाद रथ (रा. बळीमंदिरासमोर) यांनी तक्रार दिली. शक्तीप्रसाद हे युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आहेत. गेल्या बुधवारी (दि. ३) त्यांना शिवीगाळ करण्याची घटना घडली. संशयित अजयने बँकेकडे व्यवसायासाठी मुद्रा लोनची मागणी केली होती. ११ मार्च रोजी त्याने अमृतधाम येथील शाखेत अर्ज दाखल केला होता. यावेळी त्याने व्यवस्थापक रथ यांचा नंबर मिळवित कागदपत्रांची पूर्तता केली होती. बँकेच्या तपासणीत संशयिताने अन्य एका बँकेतून कर्ज काढलेले असून, ते थकबाकीदार असल्याचे समोर आले. तसेच कागदपत्रात त्रुटी असल्याने बँकेने मुद्रा लोन देण्यास नाकारले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने अमृतधाम शाखा गाठून व्यवस्थापक शिवप्रसाद यांच्या कॅबीनमध्ये बेकायदेशीर प्रवेश करीत शिवीगाळ व दमदाटी केली.

--

लेबर ठेकेदारास मारहाण

मजूर पुरविण्याचा ठेका घेण्याच्या कारणावरून दोन परप्रांतीय लेबर कॉन्ट्रक्टरमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. एका ठेकेदाराने आपल्या साथिदारांच्या मदतीने गोळी झाडण्याची धमकी दिली. तसेच दुसऱ्याचे अपहरण करीत त्यास बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली.

धनंजय सिंग (रा. विठ्ठल अपार्ट. कामटवाडे), विक्रम उल्हास जाधव (रा. आंबेडकरनगर, अंबड) आणि विजय अशोक सिंग (रा. कॅनलरोड, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी इंदल बुद्धिमान सिंग (रा. कारगिल चौक, दत्तनगर) यांनी तक्रार दिली. सिंग आणि संशयितांमध्ये एस. आर. फायबर ग्लास या कंपनीत लेबर पुरविण्याच्या ठेका घेण्यावरून वाद सुरू आहे. याच कारणातून संशयितांनी शनिवारी (दि. ६) सिंग यास कारगिल चौकातील मारूती संकुल भागात असलेल्या बिअर शॉप येथे बोलावून घेत शिवीगाळ केली. यावेळी संतप्त टोळक्याने बेदम मारहाण केली असता धनंजयसिंग याच्या भाच्याने 'इसको गोली मारो असे म्हणत बळजबरीने पांढऱ्या कारमध्ये बसविले. यानंतर टोळक्याने कारमधून अपहरण करीत सिंग यास एका वर्क शॉपमध्ये घेवून जात बेदम मारहाण केली.

--

मुलीचा विनयभंग

नाशिक : शाळेतून घराकडे परतणाऱ्या मुलीस गाठून तरूणाने विनयभंग केला. ही घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास पोलिसांनी अटक केली. दिलीप नामदेव कोळी (३१ रा. गणेशचौक) असे संशयिताचे नाव आहे. गणेश चौक भागातील शाळकरी मुलगी सोमवारी दुपारी शाळेतून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.

--

एकास अटक

रात्रीच्या वेळी महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर चॉपर घेवून फिरणाऱ्या सिद्धार्थ नाना शिंदे (२० रा. नागसेननगर, वडाळानाका) या संशयितास पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ शिंदे हा रविवारी मध्यरात्री वडाळानाका उड्डाणपुलाखाली आरडाओरड करीत असतांना गस्तीपथकाने त्यास ताब्यात घेतले असता त्यांच्या अंगझडतीत धारदार चॉपर मिळून आले. त्याच्याविरूद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

--

वैद्यनगरला घरफोडी

जनरल वैद्यनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे आणि मनगटी घड्याळाचा समावेश आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुलाब किसन जगताप (रा.आस्ता सोसा. पाटीदार भवन जवळ वैद्यनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. जगताप कुटुंबिय बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी रविवारी (दि.७) हात साफ केला.

--

शारदानगरला घरफोडी

गंगापूररोडवरील शारदानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १९ हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोदकुमार लालबहाद्दूर माथूर (रा. स्वीटहोम बंगला, शारदानगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. माथूर कुटुंबिय २७ ते २९ मार्च दरम्यान फिरण्यासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी डल्ला मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साकारली ७५ फुटांची महारांगोळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडीरोडवरील लक्षिका सभागृहात रश्मी विसपुते यांनी ३ हजार ३७५ चौरस फूट जागेत ७५ फूट उंचीची महारांगोळी साकारली आहे. गुरुवारपर्यंत (दि. ११) ही रांगोळी नाशिककरांना पाहता येणार आहे.

महागुढी आणि महारांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या वरिष्ठ समन्वयक अमी छेडा, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष शामराव बिरारी उपस्थित होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या या रांगोळीची नोंद 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे छेडा यांनी सांगितले. रांगोळी पाहण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांनी बुधवारी (१० एप्रिल) सकाळी १० वाजता महेंद्र जगताप यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक, तर सायंकाळी ५ वाजता शिल्पकार यतिन पंडित व संदीप लोंढे यांचे शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक होणार आहे. गुरुवारी (दि. ११ एप्रिल) श्रीरामपूर येथील डी. डी. कचोळे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष निसर्गचित्र रेखाटनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएड, एमएड सीईटी २२ मे रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्यात येणार असून त्यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मे व जून महिन्यात सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. इंटिग्रेटेड बीएड व एमएड पदव्युत्तर प्रवेशासाठीही अर्जप्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. २२ मे रोजी या अभ्यासक्रमाची सीईटी राज्यभरात होणार आहे.

इंटिग्रेटेड बीएड व एमएड हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी सीईटी सेलकडून काही निकष लावण्यात आले असून, त्यामध्ये अर्ज भरणारी व्यक्ती हा भारतीय असावी, तिने विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर असणे आवश्यक आहे, या परीक्षांना किमान ५५ टक्के गुण मिळालेले असावे, या निकषांचा समावेश आहे. सीईटीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. सरकारी, अनुदानित, सरकार अनुदानित अल्पसंख्याक, विद्यापीठीय विभाग आदी ठिकाणी प्रवेश मिळू शकणार आहेत. प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर इतर प्रवर्गांसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पोस्ट, कुरिअरच्या माध्यमातून पाठविलेले अर्ज विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली असून ०२२-२२०१६१५७/ ५९ या क्रमांकावर संपर्क साधू शकणार आहेत.

\Bअशा आहेत तारखा

\Bप्रवेश अर्ज - सुरू. २३ एप्रिलपर्यंत मुदत

हॉल तिकीट उपलब्धता - १३ मेपासून

सीईटी - २२ मे

परीक्षेचा निकाल - ७ जून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांच्या मानसिकतेत बिघाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातारा गादीने पेशवाईची वस्त्रे देण्याचे काम केले एवढाच उल्लेख शरद पवार यांनी केला. त्यामध्ये जात-पात, समाजाचा उल्लेख कोठेच नव्हता. त्यांनी इतिहासाची परंपरा सांगण्याचे काम केले. धर्म आणि जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे, समाजांना एकमेकांविरोधात उभे करण्याचा उद्योग चांगल्या पध्दतीने मुख्यमंत्री आणि त्यांच्या भाजप पक्षाने केला आहे. मुख्यमंत्र्यांची मानसिकता बिघडली आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केली.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे समीर भुजबळ आणि धनराज महाले यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाटील नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि त्यांच्या धोरणांवर तोफ डागली. ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षाने पाच वर्षांपूर्वी जाहीरनाम्यातून जी वचने दिली त्यातील एकही वचन त्यांना पूर्ण करता आले नाही. एकही शब्द भाजपने पाळलेला नाही. भाजपने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी यंदा जाहीरनामा नव्हे, तर माफीनामा प्रसिद्ध करायला हवा होता. त्यांनी जनतेसमोर आणलेल्या जाहीरनाम्यावर देश विश्वास ठेवणार नाही, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात कोठेच विकास दिसत नाही. पाच वर्षांपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यावर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोटो होते. लालकृष्ण अडवानी यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोदी यांनी घरी पाठविले आहे. मोदी आणि अमित शहा हे स्वत: आता भाजपचे मालक झाले आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात काहीच दम नसल्याने त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

...

नाशिकच्या विकासाला ग्रहण

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांचे प्रश्न, विजेचे वाढलेले दर, खतांच्या वाढलेल्या किमती, शेतमालाच्या भावाकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष यांसारखे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. नाशिकचा विकास थांबला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमचे येथील दोन्ही उमेदवार मतदार निवडून देतील ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींचे धोरण ठरवा

$
0
0

उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश; ३ मे रोजी सुनावणी म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या ७६९ मिळकतींचा सर्व्हे करून त्याचे तीन टप्प्यांत विभागणी करून सार्वजनिक मिळकतींचा गैरवापर करणाऱ्यांवर चाप बसवावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत फ्रवशी स्कूलचे अध्यक्ष रतन लथ यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि एन. एम. जामदार यांच्या खंडपीठात ही सुनावणी सुरू आहे. महापालिकेच्या मिळकती वेगवेगळ्या सामाजिक तसेच, सार्वजनिक कारणांसाठी संस्था अथवा वैयक्तिक पातळीवर उपलब्ध करून दिल्या जातात. या मालमत्तांचा गैरवापर होत असल्याने लथ यांनी काही काळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ५ एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यात ७६९ जागांचा वापर संबंधित संस्था अथवा व्यक्ती करीत असल्या तरी त्यावर सर्वसामान्य नागरिकांना तेथील सुविधा वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तीन टप्प्यांत हा विषय सोडवावा, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले. नाममात्र दरात महापालिकेच्या शेकडो मिळकती भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असून, त्यातील काहींचा खरोखर योग्य वापर होतो तर काही मिळकती या राजकीय तसेच समाजघातक कामांसाठी वापरल्या जातात, असे लथ यांनी जनहित याचिकेत स्पष्ट केले आहे. लथ यांच्यावतीने अॅड. मिलिंद साठे, अॅड. मुकुल तळे आदींनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ, महाले यांचे अर्ज दाखल

$
0
0

गाजावाला टाळूल साधेपणाने भरले अर्ज

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन टाळून मंगळवारी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केले. दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची वाताहात, महागाईचे चटके आणि तत्सम अनेक समस्यांमुळे मिरवणुकीतून गाजावाजा न करता साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

नाशिक मतदारसंघातून समीर भुजबळ, तर दिंडोरी मतदारसंघातून धनराज महाले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. भुजबळ यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी मंजुळा सुरेश धनगर, शहीद जवान केशव गोसावी यांची पत्नी यशोदा, दलित युवती कल्याणी अहिरे, खेळाडू कोमल चंद्रकांत जगदाळे होते. महाले यांनी सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश सागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यासमवेत खेळाडू पूनम सोनुने, बेरोजगार तरुण आदेश बोडके, नितीन पवार, विलास निरगुडे आदी उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अन्य मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

...

महालेंच्या मुलाचा, कोकाटेंच्या मुलीचाही अर्ज

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांचा मुलगा वैभव यानेही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपविरोधात बंडखोरी करणारे माणिकराव कोकाटे यांची मुलगी सिमंतिनी कोकाटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याखेरीज अपक्ष उमेदवार करण गायकर यांनी आज पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी भरलेला अर्ज ऐनवेळी एखाद्या त्रुटीमूळे बाद झाला, तर उमेदवारी संकटात येऊ नये याकरिता उमेदवारांकडून ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

...

दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, पाणीटंचाईचे भीषण संकट, वाढती महागाई, सीमेवरील तणाव या गंभीर प्रश्नांचा सामना नागरिक करीत असल्याने शक्तिप्रदर्शन आणि गाजावाजा टाळून साधेपणाने अर्ज दाखल केला. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून, सर्वसामान्यांची वाहतुकीमुळे होणारी कोंडी यामुळे टाळता आली.

- समीर भुजबळ, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस

....

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. या मतदारसंघातील रहिवाशांना विविध योजना आणि प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाच्या नकाशावर आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

- धनराज महाले, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठात मेडिकल कॉलेज

$
0
0

होमिओपॅथी, आयुर्वेद अन् फिजीओथेरपीसाठी प्रस्ताव

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : jitendratarte@MT

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विस्तीर्ण कॅम्पसचा आरोग्य क्षेत्रास फायदा व्हावा, या उद्देशाने विद्यापीठ मुख्यालयाच्या कॅम्पसमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजीओथेरपी या विद्याशाखांचे महाविद्यालय विद्यापीठ कॅम्पसमध्ये साकारण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने सरकारकडे पाठविला आहे. त्यास लवकरच हिरवा झेंडा मिळण्याची अपेक्षा आहे. या तीनही विद्याशाखा मिळून विद्यापीठाने ३०० जागांची मागणी मेडिकल कौन्सिलकडे केली आहे.

होमिओपॅथी दिनाच्या औचित्यावर या विद्याशाखेच्या कॉलेजसाठी विद्यापीठाकडून पाठपुरावा होणे, ही सुद्धा सकारात्मक बाब आहे. म्हसरूळ परिसरात आरोग्य विद्यापीठास लाभलेल्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये काही वैद्यकीय विद्याशाखांचे महाविद्यालय सुरू करता येणे शक्य असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दोन वर्षांपूर्वी एका समारंभात सांगितले होते. यानंतर विद्यापीठाने यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. वर्षभरापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजीओथेरपी या तीन विद्याशाखांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. पण आयुष मंत्रालयाने नवीन होमिओपॅथी आणि आयुर्वेद महाविद्यालयांना परवानगी न देण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे हा प्रस्ताव अद्याप लालफितीत आहे. या प्रस्तावानुसार तीनही विद्याशाखांमध्ये प्रत्येकी १०० जागांची मागणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केली आहे. हा प्रस्ताव जसाच्या तसा स्वीकारला गेल्यास उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखांमध्ये आणखी ३०० जागांची भर पडेल.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने पात्रता निकषात केलेल्या बदलांच्या परिणामी गतवर्षी राज्यात होमिओपॅथी आणि आयुर्वेद विद्याशाखांच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. या नव्या नियमांविरोधात महाविद्यालयांच्या संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात संघटनेने दाद मागितली होती. यावर सुनावणी करताना गतवर्षीच्या प्रवेश प्रकियेत या दोन्ही विद्याशाखांमधील प्रवेशाची मुदत उलटून गेल्यानंतरही विशेष बाब म्हणून या शाखांमधील रिक्त जागा भरण्याची परवानगी दिली होती. पूर्वीच्या निकषांनुसार या विद्याशाखांतील प्रवेश आयुर्वेद व होमिओपॅथी कौन्सिलने ठरविलेल्या पात्रतेनुसार होत होते. गतवर्षी दोन्ही विद्याशाखांसाठी आयुष मंत्रालयाने सर्वसाधारण प्रवर्गासाठी 'नीट'मध्ये किमान ५० टक्के पर्सेंटाइल व मागासवर्गांसाठी किमान ४० टक्के पर्सेंटाइल असा नवा पात्रता निकष लागू केला होता. या मुद्द्यादरम्यान दोन्हीही विद्याशाखांच्या नव्या महाविद्यालयांना परवानगी देण्यात येत नव्हती.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी आणि फिजीओथेरपी या वैद्यकीय विज्ञानशाखांचे महाविद्यालय उभारण्यासाठी सरकारला विद्यापीठाने प्रस्ताव सादर केला आहे. विद्याशाखानिहाय प्रत्येकी १०० यानुसार एकूण ३०० जागांची मागणी केली आहे. शासन लवकरच या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी आशा आहे.

- डॉ. के. डी. चव्हाण, कुलसचिव,

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसमंतात गुंजली महास्तोत्रांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामनामाचा गजर, एक ताल, एक स्वरात सुरू असलेले स्तोत्रपठन, नृत्यातून केलेली रामस्तुती अशा भक्तिमय वातावरणात महास्तोत्रांजली हा मंत्रमुग्ध करणारा सोहळा रंगला. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर सोमवारी सकाळी हा आगळावेगळा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी, चिन्मय मिशन संस्थेचे कार्यकारी अद्वैतानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ओंकार मंत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर गणपती स्तोत्र, रामस्तुती, रामरक्षा, मारुतीस्तोत्र, हनुमान चालिसा या स्तोत्रांचे एकाच तालात, लयीत, सामूहिक झाले. भक्तिमय, प्रसन्न वातावरण व रामाचा गजर यामुळे आसमंत दुमदुमून गेला. तसेच शिक्षिकांनीदेखील रामस्तुतीवर ठेका धरत नृत्य सादर केले. यावेळी प्रमुख अतिथी अद्वैतानंद महाराज उपस्थित होते. मनोगतात त्यांनी स्तोत्र म्हणजे ईश्वराची केलेली स्तुती आणि ती स्तुती आपण रोज करावी व स्तोत्रात गायलेले ईश्वराचे गुण आत्मसात करावे असे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने रामाचा आदर्श घ्यावा असेही त्यांनी सुचविले. यावर्षीही महास्तोत्रांजली या सामूहिक स्तोत्रपठण कार्यक्रमात संस्थेच्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत एकूण ४ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम संस्थेने घेतला. संस्थेच्या राममंदिरात गुढीपाडवा ते रामनवमी या काळात विविध कार्यक्रम होतात. त्याचा लाभ परिसरातील अनेक नागरिक घेत असतात. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकरी, विभागाच्या मुख्याध्यापिका, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर जाहीरनाम्यात आले ‘प्रदूषण’!

$
0
0

काँग्रेससह भाजपकडूनही मुद्याचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील वाढत्या प्रदूषणाची दखल अखेर राजकीय पक्षांनी घेतली आहे. म्हणूनच काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रदूषण दूर करण्याची ग्वाही दिली असून त्यासाठी ठोस कार्यवाही करण्याचे वचनही देण्यात आले आहे. यानिमित्ताने पर्यावरणीय समस्यांची दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

भारतासह विविध देशांसाठी चिंतेचा बनलेला वायू प्रदूषणाचा मुद्दा अखेर लोकसभा निवडणुकीत येऊन ठेपल्याचे दिसून येत आहे. कारण, प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्येच आता त्याला स्थान दिले आहे. 'स्वच्छ भारत मिशन' बरोबरच आता 'स्वच्छ वायू योजना' हाती घेणार असल्याचे वचन सत्ताधारी भाजपने संकल्पपत्राद्वारे दिले आहे. तर, काँग्रेसनेही हवा प्रदूषण रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करणार असल्याचा शब्द दिला आहे. याबाबत 'देर आए, दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया पर्यावरण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागवार उद्दिष्ट निश्चित करण्याचे काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे. तर, स्वच्छ वायू योजनाद्वारे हवा प्रदूषण कमी करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण दूर करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलली असून या योजनेकडे मिशन म्हणून पाहिले जाईल आणि देशातील १०२ प्रदूषित शहरांवर लक्ष्य केंद्रित केले जाईल, असे भाजपने सांगितले आहे.

पुढील पाच वर्षात या पाचही शहरातील वायू प्रदूषण ३५ टक्क्यांनी केले केले जाईल, असा शब्द भाजपने दिली आहे. काँग्रेसनेही पर्यावरणाला स्थान दिले असून 'हरित अर्थसंकल्प' सादर करण्याचेही जाहीर केले आहे. तसेच, प्रदूषणाचे योग्य ते दस्तावेजीकरण करण्याचेही काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे. भारताला यापुढील काळात हरित निर्माण हब म्हणून नावारुपाला आणले जाईल. अपारंपरिक ऊर्जेला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाईल आणि वीज निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

जलशक्ती मंत्रालय

पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील जाहीर सभेत केली आहे. तसेच पाण्यासंबंधी विशेष कृती दलाची स्थापना आणि मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येईल', असेही भाजपने जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस वर्षांपुढील नागरिकांची तपासणी

$
0
0

जिल्हा शासकीय रुग्णालयाचा उपक्रम

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यातील ३० वर्षांपुढील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनीची साथ मिळणार आहे. असंसर्गिक आजार, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब याची या दरम्यान तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, निवासी शल्य चिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली. तसेच, सार्वजनिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान, डॉ. जगदाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या उद्दिष्टाबाबत माहिती दिली. १०६ उपकेंद्रामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे भविष्यात ६०० आरोग्यवर्धिनी स्थापन करून त्यामार्फत ३० वयापुढील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टर हे विधायक समाजसेवक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण विश्वात वैद्यकीय सेवा देणारा वर्ग डॉक्टर सर्वोच्च विधायक असे समाजसेवक आहेत. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून डॉक्टर लोकांच्या आजाराचे निराकरण करण्याबरोबरच त्यांना आणीबाणीच्या परिस्थितीत जीवनदानही देत असल्याचे प्रतिपादन कोईम्बतूर येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. बालावेंकट यांनी केले.

आयएमए नाशिक शाखेच्या २०१९-२० च्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत देवरे यांचा आणि त्यांच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शालिमार येथील जोशी सभागृहात सायंकाळी ८ वाजता झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, उपाध्यक्ष डॉ. हेमंत सोनानिस, सचिव डॉ. विशाल गुंजाळ, खजिनदार डॉ. किरण शिंदे आणि महिला आघाडी प्रमुख म्हणून डॉ. गीतांजली गोंदकर आणि कार्यकारिणी सदस्यांनी पदग्रहण केले. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन् आणि आमदार डॉ. राहुल आहेर हे होते. नाशिकचे मावळते अध्यक्ष डॉ. आवेश पलोड आणि सचिव डॉ. नितीन चिताळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पदग्रहण सोहळ्यास डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी. राधाकृष्णन आणि आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मावळते अध्यक्ष व सदस्यांचे कौतुक केले. मावळते अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी वर्षभर राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. तर नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांनी येणाऱ्या वर्षभरातील कार्यक्रमांची रूपरेषा सादर केली. 'हेल्दी डॉक्टर हेल्दी सोसायटी' हे या वर्षाच ब्रीदवाक्य आणि उद्देश असेल असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कपिल पालेकर, डॉ. विशाल पवार, डॉ. पंकज भदाणे, डॉ. सागर भालेराव, डॉ. मीनल रणदिवे, डॉ. सारिका देवरे, डॉ. माधवी गोरे - मुठाळ यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानाचा पारा घसरला, पण चटके कायम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहा दिवसांपूर्वी चाळिशीपार गेलेल्या शहराच्या तापमानात मंगळवारी घट झाली. असे असले, तरी अद्यापही उष्णतेची लाट शहरात कायम आहे. मंगळ‌वारी शहराचे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सोमवारी ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यात दोन अंश सेल्सिअसने मंगळवारी घट झाली. तपामानात शनिवारपासून किंचितशी घट होत असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तापमान पुन्हा चाळिशी गाठण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उष्ण व शुष्क वाऱ्यांमुळे राज्यात उष्णतेची लाट परसली आहे. काही प्रमाणात तापमानाचा पारा घसरला असला, तरी उष्णतेचा चटका मात्र बसत आहे. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी (४ एप्रिल) शहरातील कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तत्पूर्वी तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान कमी-जास्त होत होता. गुरुवारी चाळिशी पार गेलेले तापमान आता पुन्हा ३६.९ अंश सेल्सिअसवर आले आहे. शहरातील किमान तापमानही १९ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान कमी-अधिक होत असल्याने उष्णतेच्या झळा बसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच, त्यानंतर शहरातील तापमान पुन्हा चाळिशी ओलांडण्याची शक्यता असून, एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

...

\Bसहा दिवसांचे तापमान

दिनांक................................... कमाल................. किमान

\B९ एप्रिल.................................. ३६.९.................. १९.८

८ एप्रिल.................................. ३८.४.................. १८.६

७ एप्रिल.................................. ३७.६.................. १९.०

६ एप्रिल.................................. ३७.२.................. २०.६

५ एप्रिल.................................. ३७.१.................. २१.२

४ एप्रिल.................................. ४०.४.................. २१.४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथीला हवा सरकारी आश्रय

$
0
0

लोगो : होमिओपॅथी दिनविशेष\B

\B

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwini.kawaleMT

नाशिक : सामान्यांचे दुखणे दूर करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात आरोग्याच्या शाखांमध्ये मोठा भेदभाव केला जात असल्याचे चित्र राज्यभरात आहे. काही शाखांना सरकारी व्यवस्थेकडून विविध बाजूंनी प्रोत्साहन तर काही शाखांना मात्र सावत्र वागणूक अशी परिस्थिती आहे. होमिओपॅथी ही शाखा राज्यातील वैद्यकीय शाखांमध्ये सावत्र ठरत असून, राज्यात एकही होमिओपॅथीचे सरकारी कॉलेज नसल्याची वस्तुस्थिती आहे.

राज्यभरात होमिओपॅथीची ४६ कॉलेजेस आहेत. सुमारे ३ हजार ४४५ विद्यार्थी या कॉलेजांमध्ये शिक्षण घेतात. मेडिकल, अॅलोपॅथी, युनानी, आयुर्वेदिक, डेंटल यांसारख्या विद्याशाखांना राज्य सरकारकडून अनुदानितचा दर्जा दिला जात असताना, होमिओपॅथीला मात्र विनाअनुदानितच्या रांगेत बसविण्यात आले आहे. कॉलेजेस असो वा रोजगार होमिओपॅथीबाबत सरकारकडून सातत्याने दुजाभाव का केला जातो, अशी भावना यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये निर्माण झाली आहे.

राज्यातील सर्व ४६ कॉलेज विनाअनुदानित असल्याने त्यांची फी एक लाख रुपयांच्या घरात पोहोचते. परिणामी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले क्षमता असूनदेखील या शिक्षणापासून ते वंचित राहत असल्याची परिस्थिती राज्यभर आहे. होमिओपॅथी या शाखेची इतर शाखांशी स्पर्धा असून, सरकारकडूनही दुजाभाव केला जात असल्याने आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वारंवार संघर्ष उभा राहत आहे. कॉलेजांबाबत ही परिस्थिती असण्याबरोबरच रोजगाराबाबतही होमिओपॅथीची शाखा दुय्यम ठरत आहे. एमबीबीएस डॉक्टरांच्या तुलनेत अपवाद वगळता नोकऱ्यांपासूनही वंचित राहण्याची परिस्थिती राज्यभरात आहे.

२८ जिल्ह्यांत ४६ कॉलेजेस\B

\Bराज्यभरात २८ जिल्ह्यांमध्ये होमिओपॅथीची ४६ कॉलेजेस आहेत. ही सर्व कॉलेजेस विना अनुदानित आहेत. यातील नाशिक जिल्ह्यामधील मोतीवाला नॅशनल होमिओपॅथी कॉलेज, श्रीमती के. बी. अबड होमिओपॅथी कॉलेज, चांदवड व धन्वंतरी होमिओपॅथी कॉलेज कामटवाडा या तीन कॉलेजांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक होमिओपॅथी कॉलेज अहमदनगर जिल्ह्यात असून, त्याची संख्या ५ आहे.

आरोग्याच्या सर्व शाखांना समसमान दर्जा दिला पाहिजे. प्रत्येक शाखेचे वेगळेपण महत्त्व आहे, ते ओळखून सरकारी व्यवस्थेनी सर्वांना समान सुविधा दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र सरकार मात्र या शाखांमध्ये भेदभाव करताना दिसते. गुजरात राज्यातील परिस्थिती वेगळी असून, एमबीबीएस डॉक्टरप्रमाणेच बीएचएमएस डॉक्टरांना सुविधा दिल्या जातात.

\B- डॉ. अनुप गावंडे, कन्सल्टिंग होमिओपॅथ

\B

होमिओपॅथी डॉक्टरांसाठी सरकारकडून नोकऱ्यांची उपलब्धता नाही. कोणत्याही प्रकारचे सहकार्य नाही. औषधांना सबसिडी नाही. तसेच होमिओपॅथीची औषधे व रुग्णांकडून मिळणारी फी यामध्येदेखील मोठी तफावत असते. सरकारने होमिओपॅथीची गरज ओळखून सहकार्य करणे अपेक्षित आहे.

- डॉ. उमेश नगरकर, अध्यक्ष, नाशिक होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘द्वेष पसरवणाऱ्या शक्ती ओळखा’

$
0
0

मराठी लेखकांकडून सोशल मीडियावर पत्रक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहांसह ६०० कलाकारांनी मतदान करा आणि भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून बाहेर हाकला, असे आवाहन पत्रकाद्वारे नुकतेच केले. याच पार्श्वभूमीवर मराठीतील १०७ लेखकांनीही 'जातीधर्माच्या नावावर मते मागणाऱ्यांना मते देऊ नका' अशा आशयाचे पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.

मराठीतील तीन पिढ्यांचे लेखक एकत्र येऊन त्यांनी हे आवाहन केले असून मतदानाचा अधिकार वापरून धर्म-जातीबद्दल द्वेष पसरवणाऱ्या शक्ती ओळखण्याबाबत आवाहन केले आहे. कलाकार हा समतोल साधणारा असतो. जे जे उमेदवार जातीधर्माचा आश्रय घेऊन प्रचार करीत आहेत त्या सर्वांवर या पत्रकात ताशेरे ओढण्यात आले आहेत. या पत्रकावर ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे, नाटककार जयंत पवार, नाटककार महेश एलकुंचवार यासह १०७ जणांची नावे आहेत. यात नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील व प्राजक्त देशमुख यांचाही समावेश आहे.

सध्याची लोकसभा निवडणूक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आज भारताची ही सर्वसमावेशक संकल्पनाच नेमकी धोक्यात आली आहे. आज नाच, गाणी, विनोद धोक्यात आले आहेत. संविधानही या तडाख्यातून सुटलेले नाही. जिथे वाद-संवाद-चर्चा-मतभेद यांचे स्वागत असेल, जिथे लोकांना सहजपणे व्यक्त होता येईल, अशा संस्था आणि व्यासपीठे यांचीच घुसमट होते आहे. प्रश्न विचारणे, खोटारडेपणा उघड करणे, खरे बोलणे यांना 'राष्ट्रद्रोही' ठरवले जाते आहे. विद्वेषाची ही बिजे आता थेट खाण्यापिण्यांत, सण-समारंभांत, प्रार्थनांमध्ये मिसळली आहेत, असहिष्णू -विद्वेषी -विभाजनवादी शक्तींना सत्तेतून घालवा. अशा आशयाच्या चर्चा कलाकारांमध्ये झडत आहेत.

आपल्या मनात दुसरा धर्म, जात व माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या शक्ती ओळखून मतदानाचा हक्क बजावायचा आहे. लेखक-कलावंत हे समाजावर प्रभाव असणारे जबाबदार घटक मानले जातात. त्यामुळे लेखकांनी माणूसद्वेषी राजकारणाविरूद्ध आणि निर्माण होऊ पहाणाऱ्या विद्वेषी व्यवस्थेविरुद्ध उचललेले हे पाऊल सहिष्णू, सर्वसमावेशक भारतासाठी, भारताच्या नव्या पिढ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे.

- दत्ता पाटील, नाट्यलेखक

मी एका विशिष्ट पक्षाला मत देऊ नका असं काही माननीय लोकांनी सामूहिक आवाहन केल्याचं वाचलं होतं. ते मला अयोग्य वाटलं. आपण कोणाला मत द्यावं अशी सक्ती करू शकत नाही तशीच कोणाला करू नये हे देखील त्यात आलं. आपापल्या मतदारसंघाची पाच वर्षांमधील प्रगती-अधोगती आणि सद्य उमेदवाराचा अभ्यास करून सगळ्यांनीच आपल्याला योग्य वाटेल त्यास मतदान करावे.

- प्राजक्त देशमुख, नाट्यलेखक

गेल्या काही वर्षांत आपलेच जवळचे लोक जेव्हा धर्म आणि जातीचे लेबल लावून आपल्यासमोर उभे राहतात तेव्हा मन अस्थिर होतं. गेल्या काही दिवसात अतिशय हुशारीने काही यंत्रणा 'राष्ट्रप्रेमा'च्या नावाखाली हे करताना लक्षात येतंय. आपण एक आहोत, हे विसरून चालणार नाही. तेव्हा शांतपणे विचार करू आणि कोणत्याही जात-धर्माचा विचार न करता आपल्या सदसदविवेक बुद्धीने मतदान करू यात.

- सचिन शिंदे, नाट्यदिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चिल्लर’चा फंडा; उमेदवार स्वत:च अडकला!

$
0
0

- अनामत रक्कमसाठी आणली दहा रुपयांची नाणी

- प्रशासनाच्या आदेशाने उमेदवाराची धावपळ

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटातील नाऱ्याची आठवण करून देणारा किस्सा मंगळवारी नाशिकमध्ये घडला. नाशिक लोकसभा निवडणुकीची अपक्ष उमेदवारी करू इच्छिणाऱ्या एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० हजार रुपयांची चिल्लर आणली. परंतु, त्याचा हा फंडा प्रशासनाने त्याच्यावरच उलटविला. मुदतीत नाणी मोजून देण्याचे फर्मान प्रशासनाने सोडल्याने उमेदवारासह त्याच्या समर्थकांची धावपळ उडाली.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. नाशिक शहरातच वास्तव्यास असलेले शिवाजी वाघ हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या समर्थकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाले. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. खुल्या गटातील उमेदवारांना २५ हजार रुपये अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे यंत्रणेने त्यांना अनामत रक्कम भरण्यास सांगितले. पंधरा हजारांच्या नोटा आणि १० हजार रुपयांची नाणी अनामत रक्कम भरण्यासाठी आणल्याची माहिती त्यांनी मध्यवर्ती सभागृहातील यंत्रणेला दिली. परंतु, अन्य अपक्ष उमेदवारांची एकाचवेळी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्याने यंत्रणा त्यामध्ये अडकून पडली. वाघ यांनी एक हजार रुपये चिल्लरच्या १० थैल्या तयार कराव्यात, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वाघ यांच्या समर्थकांवर ही १० हजारांची नाणी मोजून ती १० थैल्यांमध्ये विभागण्याची वेळ आली. दुपारी तीन वाजेपर्यंतचे अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने वाघ यांच्यासह सर्वच अपक्ष उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यात आले. परंतु, त्यानंतरही त्यांचे समर्थक अनामत रक्कम भरण्यासाठी आणलेली चिल्लर नाणी मोजण्यातच व्यस्त होते. एक रुपयाची १९००, २ रुपयांची १४५०, ५ रुपयांची ६४० तर १० रुपयांची २०० नाणी त्यांनी मोजली. वाघ यांना अनामत रक्कम जमा करण्यास विलंब झाला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असला तरी छाननीमध्येच आता त्यांच्या उमेदवारीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

..

जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या एका अपक्ष इच्छुकाच्या मदतनीसाला मुदत संपू लागल्याने दालनात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे संबंधितांनी जीवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी दिली. तेथे उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करीत गोंधळ रोखला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images