Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उद्योजकाला फसविले

$
0
0

दर्जाहीन मशीन मारले माथी; एक कोटीची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कंपनीत आवश्यक असणारे एसक्युएफ मशीन तयार करून देण्याच्या बदल्यात एक कोटी तीन लाख एक हजार ५६२ रुपये घेऊन निकृष्ट दर्जाचे मशीन देऊन नाशिकच्या उद्योजकाची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईस्थित नऊ जणांविरूद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पॉवेल वॅरेझेकोस्की, स्लावोमिर वॉझनियाक, कांची वरदैय्या, मिलिंद कुलकर्णी, हरिष खट्टर, रॉअर्ट सेनोस्की, प्रशांत रॉय, नितीन कुमार पांडे, हेमंत खाचणे (सर्व रा. महापे औद्योगिक वसाहत, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील विनीत प्रकाश पोळ यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोळ यांना त्यांच्या कंपनीत आवश्यक असलेली एसक्यूएफ मशीनची आवश्यकता होती. ८ एप्रिल २०१५ रोजी या मशीनचे उत्पादन करून देतो, असे आश्वासन देऊन संशयितांनी पोळ यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. मार्च महिन्यांमध्ये त्यांनी मशीन सुद्धा दिले. परंतु, पोळ यांच्या कंपनीला अपेक्षित असलेले डिझाइन देण्यात आले नाही. तसेच, संबंधित मशीन निकृष्ट पद्धतीने तयार केले. त्या मशीनवर पोळ काहीच काम करू शकले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्याने फिर्यादीने अंबड पोलिस ठाणे गाठून विश्वासघात

फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तोतया पोलिसांनी वृद्धास लुटले

शहरात पुन्हा एकदा तोतया पोलिस सक्रीय झाले असून, त्यांनी वृद्धांना लक्ष्य केले आहे. पोलिस असल्याची बतावणी करीत दोघांनी वृद्धाच्या अंगावरील दागिने काढून घेत त्यांना लुटल्याची घटना शनिवारी (दि. ६) सकाळी म्हसरूळ परिसरात घडली. प्रल्हाद सुकलाल राठोड (६५, रा. चाणक्यपुरी सोसायटी, मखमलाबाद लिंकरोड) यांनी तक्रार दिली. राठोड हे शनिवारी सकाळी किशोर सूर्यवंशीमार्गावरील सप्तशृंगी देवीच्या मंदिरासामोरून जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत दागिने काढून ठेवा, अशी दमदाटी केली. तसेच, त्यांच्या गळातील सोन्याची चेन व अंगठी असे ६५ हजाराचे दागिने घेऊन पळून गेले. ही बाब निदर्शनास येताच राठोड यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

एटीएम बदलले, ४१ हजारांवर डल्ला

पासवर्ड निर्माण करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने पासवर्ड माहिती करून घेत एटीएम कार्डची बदली करून वृद्धाची ४१ हजार २७८ रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील स्टेटबँक एटीएम परिसरात घडली. विजय उगडू मेतकर (रा. दुर्गानगर कामठवाडे) यांनी तक्रार दिली. २१ मार्च रोजी ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भारतीय स्टेट बँकेत नवीन एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी गेले होते. नवीन कार्डचा पासवर्ड तयार करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने

संशयिताने त्यांचा पासवर्ड माहिती करून घेतला. तसेच, हातचलाखीने कार्ड बदलून घेतले. यानंतर विविध ठिकाणांवरून त्यांच्या बँक खात्यातील ४१ हजार २७८ रुपयांची रक्कम काढून घेतली. सरकारवाडा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल हिसकावला

मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीवरील तिघा चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली. ही घटना भद्रकालीतील पिंपळचौक परिसरात शुक्रवारी (दि. ५) रात्री घडली. अश्विनकुमार नंदकिशोर शौचे (४१, रा. दिंडोरीरोड, पंचवटी) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी रात्री ते आठ वाजेच्या सुमारास मेनरोडकडून पिंपळपार चौक परिसरात जात असताना पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी त्यांच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सखी मतदान केंद्रासाठी आवाहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महिलांमधील कर्तृत्व व हुशारीला वाव देण्यासाठी व पुरुषांच्या बरोबरीने महिलाही सक्षमपणे काम करू शकतात म्हणून आता येत्या लोकसभा निवडणुकीत सबकुछ महिलाराज असणारे 'सखी मतदान केंद्र' नांदगाव मतदार संघात असणार आहे. मतदान केंद्राध्यक्षापासमन जर पोलिस कर्मचारीपर्यंत सगळ्या महिलाच कार्यरत असणार आहेत. हे आव्हान स्वीकारून

धाडसाने काम करण्यासाठी महिलांनी पुढे यावे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मल यांनी नांदगाव येथे केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या ,आदर्श असे सखी मतदान केंद्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शना नुसार कार्यन्वयीत करण्यात आले असून नांदगावमध्ये ही विशेष योजना राबवली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी निर्मल यांनी सांगितले

अनेकदा मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी म्हणून पुरुष कर्मचाऱ्यास नेमले जाते व महिलांना शक्यतो इतर अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाते. शक्यतो मतदान केंद्राध्यक्ष जबाबदारी पुरुष वर्गाकडे देण्याकडे कल असतो, मात्र सखी मतदान केंद्र या विशेष संकल्पनेत मतदान केंद्राध्यक्ष या जबाबदारीच्या पदावर महिला असणार आहे. तसेच मतदान अधिकारी क्रमांक १ व २ साठी महिलांचीच निवड केली जाणार आहे. शिपाई, मदतनीस देखील महिला असतील तर या मतदान केंद्रावर असणारा पोलिस फाटा देखील महिलांमधूनच निवडला जाणार आहे, अशी माहिती देत पल्लवी निर्मल यांनी या मतदान केंद्रासाठी महिलांनी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६३ वर्षांत ४ लाख मते बाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही निवडणुकीत एका मताला महत्त्व असताना नाशिक व दिंडोरी मतदार संघात गेल्या १६ लोकसभा निवडणुकांत आतापर्यंत ४ लाख ५ हजार २०४ मते बाद झाली आहेत. तर २० हजार ८ मतदारांनी 'नोटा'चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले आहे.

दिंडोरी हा मतदारसंघ पूर्वी मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. पण, २००९ मध्ये दिंडोरी हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. हा मतदारसंघ मालेगाव असतानाची आकडेवारी १९५१ ते २००४ च्या निवडणुकीपर्यंत आहे. तर नाशिकच्या बदलाची आकडेवारीसुद्धा निवडणुक यंत्रणेकडून मिळालेली आहे. त्यात ६३ वर्षांत झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांत बाद व नोटा मतांची आकडेवारी समोर आली आहे.

१९५१ ते १९९९ च्या १३ लोकसभा निवडणुकांत मतपत्रिकाद्वारे मतदान केले जात होते. पण, त्यानंतर २००४, २००९ मध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला. २०१४ मध्ये ईव्हीएममध्येच 'नोटा'चा पर्यायही देण्यात आला. बाद होण्याचे प्रमाण मतपत्रिकेद्वारे होणाऱ्या निवडणुकीत होत होते. पण, ईव्हीएममुळे ही डोकेदुखी कमी झाली. देशात ईव्हीएमचा वापर १९८२ मध्ये पहिल्यांदा करण्यात आला. त्यानंतर त्याचा वापर आता सर्वत्र केला जात आहे. पण, या मशिनबद्दल आजही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

नोटाचा वापर १ ते २ टक्के

दिलेल्यापैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर 'नोटा' (नन ऑफ दि अॅबाव्ह) म्हणजे यापैकी कुणी नाही याचा वापर करता येतो. २०१३ मध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्यप्रदेश व दिल्ली या ठिकाणी 'नोटा'चा वापर झाला. त्यात एक ते दोन टक्के लोकांनी याचा वापर केला. नाशिकध्ये दोन्ही मतदार संघात याचे प्रमाणे १ ते २ टक्के दरम्यानच आहे. मतपत्रिकेतून बाद मत होण्याचे प्रमाण सरासरी दहा हजारांच्या आसपास होते. आता 'नोटा'चे प्रमाणही तितकेच आहे. त्यामुळे बाद व 'नोटा' सारखेच असले तरी त्यात फरक आहे. बाद मते चुकून झालेली असतात. यात सहसा उमेदवाराला नाकारले जात नाही. पण, नोटामध्ये उमेदवार नाकारला जातो. त्यामुळे या दोघांतील हा फरक महत्त्वाचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतवार्ता-२

$
0
0

मतदानासाठी पत्र्याचे शेड

नाशिकरोड : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम अक्कलकुवा तालुक्यात तीन गावांत मतदान केंद्रांसाठी सार्वजनिक इमारतच उपलब्ध नसल्याने येथील ८०० मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनातर्फे पत्र्याचे शेड ठोकून मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. धनखेडी, मुखाडी आणि झापी अशी या तीन मतदान केंद्रांची नावे आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघात येत्या २९ एप्रिलला सार्वत्रिक मतदान होणार आहे. मतदारांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून मतदान केंद्र दूर नसावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिलेल्या असल्याने प्रशासनाकडून या तिन्ही गावांत मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी पत्र्याचे शेड ठोकले जाणार आहे. मतदानावेळी प्रशासनाकडून सशस्त्र पोलिस बंदोबस्तही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या तिन्ही मतदान केंद्रांवर ८०० मतदार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा ऋषिकेश यूपीएससीत चमकला

$
0
0

४९१ वे रँकिंग; खडतर परिस्थितीत मिळविले यश

म. टा. वृत्तसेवा सिडको

सिडको परिसरात राहणाऱ्या सुंदरबन कॉलनीतील ऋषीकेश प्रदीप रावले या युवकाने पहिल्याच टप्प्यात यूपीएससीत यश संपादन केले. स्वतःवर असलेल्या आत्मविश्वासामुळेच हे यश संपादित करण्यात आले असल्याचे मत ऋषीकेशने व्यक्‍त केले.

सिडकोतील सुंदरबन कॉलनीत राहणाऱ्या ऋषीकेश हा राणेनगर येथील सेंट फ्रांसिस हायस्कूलमध्ये शिकत होता. दहावी नंतर त्याचा औरंगाबाद येथील एस. पी. आय महाविद्यालयात नंबर लागला. पुढे २०१७ मध्ये त्याने बी. ई मेकॅकिनल केले. त्यानंतर यूपीएससी परिक्षा देण्याचा निश्चिय करून त्याने दिल्लीत अभ्यासाला सुरुवात केली. आणि पहिल्याच प्रयत्नात तो देशभरात ४९१ व्या क्रमांकावर आला. ऋषीकेशचे वडील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. सन २००८ मध्ये त्यांचे निधन झाले. आई नाशिक महापालिकेच्या शाळेत शिक्षिका आहे. लहान बहीण बी. फार्मसीचे शिक्षण घेत आहे. यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर ऋषीकेशने सांगितले की, ही परिक्षा अवघड असली तरी यात सातत्य असणे आवश्यक आहे. स्वतःचा आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत यश

$
0
0

चित्रकला स्पर्धेत यश

नाशिक : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स, नाशिक यांच्यातर्फे 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह व रस्ता सुरक्षा' या सामाजिक ज्वलंत विषयावर आधारित जिल्हास्तरीय भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये या सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नाशिक मधील कृष्णा सानप, सचिन थोरात या दोघांच्या चित्रांची निवड करण्यात आली. आरटीओचे विभागीय अधिकारी भारत कळसकर यांच्या हस्ते दोघांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक - धनलक्ष्मी शाळेत विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा

$
0
0

धनलक्ष्मी शाळेत ऑनलाइन परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांची माहिती व्हावी, तसेच प्रात्यक्षिकांद्वारे सराव झाल्यास त्याचा निश्चितच भविष्यात फायदा होऊ शकेल, या उद्देशाने मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. अशा प्रकारची परीक्षा घेणारी मराठी माध्यमाची पहिली शाळा म्हणून शाळेस बहुमान प्राप्त झाला असून यंदाही ही परीक्षा घेण्यात आली.

दहावी व बारावीनंतर सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता ऑनलाइन सीईटी परीक्षा अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच या परीक्षांची माहिती देण्यात येते, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. इयत्ता पहिलीपासून ते दहावीच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. यामध्ये विविध विषयांतील वस्तुनिष्ठ प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक युगात कौशल्याधिष्ठित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, संस्था सचिव ज्योती कोल्हे यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा घेण्यात आली. यामुळे संगणक हाताळणी व विषयाचा सखोल अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागते. तसेच स्पर्धा परीक्षांसह इतर तत्सम परीक्षांची तयारी शालेयवयापासूनच होते, असे मत कोल्हे यांनी मांडले.

प्रथम व द्वितीय सत्रात ही परीक्षा घेण्यात येत असून मागील वर्षी विज्ञान या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर यावेळी भूगोल या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. संस्था संचलित सर्व शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्साहात रंगली ‘आयाम वुमन्स ड्राइव्ह’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयाम नाशिक व वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आयाम वुमन्स ड्राइव्ह २०१९' ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या टीएसडी प्रकारच्या रॅलीस रविवारी सकाळी फ्रवशी अकॅडमीपासून सुरुवात झाली. दुचाकींसाठी ६० किमी आणि कारसाठी १०० किमी एवढे अंतर पार करत ८ दुचाकी व ३३ कार अशी सुमारे ४१ वाहने या रॅलीत धावली.

महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी आयाम नाशिक व वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत उत्कृष्ट वाहने सजवण्यासाठी विविध बक्षीसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे महिलांनी तऱ्हेतऱ्हेने गाड्या सजवल्या होत्या. पर्यावरणाविषयी घोषवाक्य, मुलींविषयी जागृती करणारे संदेश, कॅन्सरला कसे तोंड द्यावे याबद्दल मेसेज, नाशिकच्या वॉव या महिला ग्रुपचा रेड डॉट बॅगबद्दल माहिती, असे अनेक विषय महिलांनी सुंदर पद्धतीने लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला होता. प्राणी वाचवा, प्राण्यांशी क्रूरपणे वागू नका हा संदेश देणाऱ्या स्पर्धक स्वतः जंगली प्राण्यांसारखे कपडे व मेकअप करून आल्या होत्या. तसेच गाडी ही जंगलासारखी सजवली होती. रॅलीच्या उद्घाटनवेळी फ्रवशीचे रतन लथ, विश्वास ठाकूर, विनायक रानडे यांसह आयामच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वंचित’सह गायकर यांचाही आज अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असून, आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, बापू बर्डे यांच्यासह अपक्ष करण गायकर हेदेखील उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधणार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवारही अर्ज भरणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या इच्छुकांचा मेळा जमणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत (दि. ९) उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अजूनही बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या हाती केवळ दोनच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पवन पवार, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बापू बर्डे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते रॅलीसाठी कालिदास कलामंदिराजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमणार आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्र्यंबक नाका, शालिमारजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली सीबीएस परिसरात येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार केल्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास पवार आणि बर्डे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहेत.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार करण गायकर हेदेखील सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. मोटारसायकल रॅलीद्वारे यावेळी ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. श्रमिकनगर-अशोकनगर-सातपूर कॉलनी-सातपूर-आयटीआय सिग्नल-महात्मानगर-डोंगरे वसतिगृह-राजीव गांधी भवन-गोल्फ क्लब मैदानामार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचेल. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर औरंगाबाद रोडवरील गोदावरी लॉन्स येथे दुपारी एक वाजता जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणासाठी विक्रमी उपस्थिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रशिक्षणाला विक्रमी उपस्थिती लाभल्याची माहिती निवडणूक शाखेने रविवारी दिली. २६ हजारपैकी केवळ ३०० कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीची कारणेही ग्राह्य असल्याने तूर्तास त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. परंतु, पुढील दोन दिवसांत या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा निवडणूक शाखेने दिला आहे.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाला ३० हजार कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. या कर्मचाऱ्यांना ऑर्डर पाठविण्यात आल्या असून, त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीचे काम करण्यास उदासीनता दर्शविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिला होता. तसेच प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणस्थळी आणण्यासाठी पोलिसांचे वाहन घरापर्यंत पाठविण्याचा इशाराही देण्यात आला होता. २६ हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३०० कर्मचारी प्रशिक्षणाला अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वीच्या निवडणुकांत काही हजार कर्मचारी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवित असल्याचा यंत्रणांचा अनुभव आहे. त्यामुळेच ही उपस्थिती रेकॉर्डब्रेक असल्याचा दावा निवडणूक शाखेने केला आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना फोन करून यंत्रणेने विचारणा केली. परंतु, हॉस्पिटलमध्ये दाखल असणे, प्रसूती रजा यांसारख्या विविध ग्राह्य कारणांमुळे हे कर्मचारी उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तूर्तास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे आनंदकर यांनी स्पष्ट केले. परंतु, संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवसांत प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. ते न घेतल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आनंदकर यांनी दिला आहे.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती

मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी प्रशिक्षणवर्ग ही नामी संधी असून, राजकीय पक्षांनीदेखील त्यांचे प्रतिनिधी या प्रशिक्षण वर्गाला पाठवावेत असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेद्वारे करण्यात आले होते. राजकीय पक्षांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रिया समजून घेत शंकांचेही निरसन करवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय बांधकामात गैरव्यवहार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक तालुक्यातील वावीहर्ष गावामध्ये शौचालय बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला असून, याबाबत गटविकासाधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्याने सोमवारी टमरेल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेल्या शौचालयांचे बांधकाम अपुर्णावस्थेत आहे. त्यांचे संपूर्ण पेमेंट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करावी यासाठी एक महिन्यापूर्वी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात घेराव देखील घालण्यात आला होता. त्यावेळी सदरच्या कामाची तत्काळ कारवाई चौकशी करून कामे पूर्ण करण्याबाबत कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी आश्वासन दिले होते. तथापि काहीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. म्हणून टमरेल घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वावीहर्ष येथील ग्रामस्थ टमरेल घेऊन पंचायत समिती कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी दिली आहे. त्र्यंबक तालुका हागणदारी मुक्त झाल्याचे पंचायत समिती कार्यालयाने केलेला दावा पोकळ असल्याचा स्पष्ट झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबार मतदारसंघात प्रमुख उमेदवारांचे आज अर्ज

$
0
0

आघाडीचे पाडवी तर युतीच्या डॉ. गावितांचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत सर्वच प्रमुख उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांनीदेखील अर्ज घेतले आहेत. त्यातील दोन अपक्ष उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. हिना गावित हे दोन्ही आज (दि. ८) अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुहास नटावदकर आणि त्यांच्या कन्या डॉ. समिधा नटावदकर हेदेखील अर्ज दाखल करणार असल्याने आता या जागेसाठी चुरस वाढणार आहे.

काँग्रेसने आधी शक्तिप्रदर्शन करीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, आचारसंहितेमुळे शक्तिप्रदर्शनाऐवजी मुख्य पदाधिकाऱ्यांसह जावून अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. तर भाजपतर्फे डॉ. हिना गावित हे आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दुसरीकडे भाजपकडून ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता भाजप पदाधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता डॉ. हिना गावित हे आज (दि. ८) अर्ज दाखल करतील. मात्र, भाजपकडून त्यांच्याऐवजी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुहास नटावदकर, त्यांच्या कन्या डॉ. समिधा नटावदकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. अशात नटावदकर पिता-पुत्रीदेखील आज (दि. ८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली नाही तर अपक्ष उमेदवारी करण्याचा दावा नटावदकर कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. तर १० एप्रिल रोजी दाखल अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील मतदारांना मूर्ख बनविले

$
0
0

आमदार अनिल गोटे यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे-मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला अद्याप प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एकदाही मनमाड-इंदूरचा उल्लेख केला नाही. त्यामुळे डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना मूर्ख बनविल्याचा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला. ते रविवारी (दि. ७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गोटे बोलत होते. लोकसभेची उमेदवारी ही कोणाला पाडण्यासाठी आपण करीत नसून विजयासाठी करीत आहोत. धुळे लोकसभा मतदारसंघात फिरल्यानंतर इथल्या खासदारांना मंत्रिपद मिळाले. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना काहीही मिळालेले नाही, असेही आमदार गोटे म्हणाले. डॉ. सुभाष भामरे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारांना मूर्ख बनविण्याचे काम केले आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला अद्याप प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. रेल्वेमार्गाच्या कामाबाबत सक्षमपणे बाजू मांडण्यासाठी भाजपचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार दोघंही सक्षम नसल्याची टीकाही आमदार अनिल गोटे यांनी या वेळी केली. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमध्ये धुळ्याचा नववा क्रमांक लागतो. मात्र, धुळ्याचा अद्याप यात समावेश झालेला नाही. याला जबाबदार येथील लोकप्रतिनिधी आहेत, असा आरोपदेखील आमदार अनिल गोटे यांनी या वेळी केला. आपण विजयी झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत रेल्वेमार्गाला मंजुरी मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार गोटे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावितांची अडविली वाट

$
0
0

साक्रीतील टिटाणे ग्रामस्थ आक्रमक; विश्वासात न घेतल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरातील भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित हे रविवारी (दि. ७) सकाळी साक्री तालुक्यातील टीटाणे गावात भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी ग्रामस्थांनी डॉ. विजयकुमार गावित यांची गाडी अडवून जाब विचारला. गेल्या पाच वर्षांत खासदार डॉ. हिना गावित यांनी कोणतीही मदत केली नाही. अथवा मतदारांना विश्वासात घेतले नाही. मात्र, लोकसभा निवडणूक येताच आता गावात मतांसाठी येण्यास सुरुवात केली आहे, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

जोपर्यंत आम्हाला विश्वासात घेणार नाहीत. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी केले जाणार नाही. तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील, असेही ग्रामस्थ म्हणाले. सर्व ठिकाणी प्रचार, बैठका, सभावेळी बोलविण्यात येत नाही. यामुळे आपली सर्वप्रथम भूमिका स्पष्ट करा मगच गावात प्रवेश करावा, असे आमदार विजयकुमार गावित यांना ठणकावून सांगितले. या सर्व गोंधळानंतर आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना अखेर माघारी परतावे लागले. तसेच याबाबत सोशल मीडियावर टीटाणे गावातील ग्रामस्थ व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या चर्चेचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

कुणाल पाटील आज अर्ज भरणार
धुळे लोकसभा मतदारसंघात आज (दि. ८) काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील हे अंसख्य कार्यकर्त्यासह उमेवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे उद्या (दि. ९) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. निवडणुकीच्या घोषणेनंतर सुरू असलेल्या मतदारांच्या भेटी व प्रचाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणखी वेग येईल.

उन्हात तापलाय प्रचार
सध्या धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तापमानाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भर उन्हात प्रचाराला नेत्यांना, कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात प्रचारसभा न ठेवता सायंकाळी आणि रात्रीच्यावेळेस प्रचारसभा घेतल्या जातील, असेच सध्यातरी चित्र दिसत आहे. यामुळे आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरी कुठेही होणार नाही

$
0
0

जलसंपदा गिरीश महाजन यांचा दावा; नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली असली तरी, अजून माघारीला वे‌ळ आहे. बंडखोरांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू असे सांगत कुठेही बंडखोरी होऊ देणार नाही, असा दावा जलसंपदा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीतील उमेदवार डॉ. भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी बंडखोरांच्या आपण संपर्कात असल्याचा दावा केला. भाजप हा शेतकरी, मजूर, सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांसाठी काम करणारा पक्ष आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात या सर्व घटकांना स्थान दिले आहे. राम मंदिर हा भाजपच्या अस्मितेचा प्रश्न असून, सत्तेत आल्यावर ३७० कलम रद्द करणे आणि राम मंदिर बाधण्यास प्राधान्य राहणार आहे. देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही या देशातील जनतेची इच्छा असल्याचे सांगत २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा दावा महाजन यांनी केला. तसेच, भाजपच्या जाहीरनाम्यात देशहिताला व सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकणार असल्याचे सांगत बंडखोरी होऊ देणार असे महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच, अर्ज माघारीला अजून वेळ असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. सामनामधून झालेल्या टीकेबाबत बोलताना आपण सामना वाचला नसल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

..

विखेंबाबत सूचक विधान

राधाकृष्ण विखे पाटील हे नगरमधील नरेंद्र मोदींच्या जाहीरसभेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबद्दल बोलताना महाजन यांनी विखेंच्या प्रवेशाबाबत अद्याप आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच, त्यांना पक्षात घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा आहे. विखे भाजपमध्ये आले, तर वावगे काय असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असून, अनेक जण रांगेत आहेत. अनेकांना प्रवाहाच्या दिशेने यायचे आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समीर भुजबळ आज अर्ज भरणार

$
0
0

\Bशक्तिप्रदर्शन टाळणार\B

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालिकेपासून केंद्रापर्यंत एकच सरकार सत्तेत असतानाही नाशिककरांच्या वाट्याला आलेली निराशा, विकास व रोजगार संधीचे अभाव यामुळे बडे शक्तिप्रदर्शन टाळून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार समीर भुजबळ हे आज (दि. ९) साध्या पद्धतीने अर्ज सादर करणार आहेत, अशी माहिती माजी आमदार जयवंत जाधव आणि पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे भुजबळ अर्ज सादर करतेवेळी नाही तर नंतरच शक्तिप्रदर्शन करणार असल्याचा संदेश या रचनेतून दिला जाणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.

या पत्रकार परिषदेत माजी आमदार जाधव यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. पालिकेपासून ते राज्य-केंद्रातही भाजप सरकार असताना नाशिकसारख्या शहराचा अजिबात विकास होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले असले तरी या शहराच्या वाटेचे प्रकल्प पळवून नेले, अशी खंतही व्यक्त केली. जयवंत जाधव व शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले की, नाशिकचा विकास आणि प्रगती साधणारे विकास प्रकल्प पळविले जात आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कॉरिडॉर आणि पाण्यावरून नाशिक विरुद्ध नगर आणि नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पाहायला मिळतो. हा संघर्ष टाळण्यासाठी दमणगंगा, पिंजाळ व नारपार या नद्यांचे समुद्राला जाणारे १५७ दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी अडवून गोदावरी व गिरणाखोऱ्यात टाकण्याची शिफारस चितळे समितीने केली असताना हेच पाणी गुजरातला वळविण्याचा घाट घालण्यात आला आहे.

नाशिक शहराचा पुढील ४० वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून गंगापूर धरणाच्या वरच्या बाजूला किकवी धरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र हे धरण बांधण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा राज्य सरकारने रद्द करून टाकल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार कसा? पाण्याशी संबंधित मेरी सीडीओ येथील जलविज्ञान माहिती व्यवस्थापन कक्षबंद करण्यात आला आहे. ही बाब नाशिकवर अन्याय होत असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

..

विकास योजना पळवल्या

एकलहरे वीज निर्मिती प्रकल्प बंद होणार, विजेचे वाढते दर, विद्यापीठाच्या कॅम्पसचा रखडलेला प्रश्न, 'नायपर'सारख्या संस्थांची नाशिकमधून हद्दपारी, फलोत्पादन संशोधन केंद्राचे निफाडमधून दिल्लीत स्थलांतर, एसटीच्या शहरातील बसेसची घटती संख्या, शहरात येणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न डोके वर काढत असताना नाशिकमधून नागपूरला हलिवण्यात आलेले मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नाशिकच्या बोट क्लबमधून सारंगखेडा (जि. नंदूरबार) येथे पळविण्यात आलेल्या बोटी, नाशिक पॅकेजमध्ये मंजूर असलेल्या इगतपुरीच्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनी कांबळगावला (जि. पालघर) पळविण्याचा प्रयत्न आदी बाबी नाशिकला विकासाच्या दृष्टीने पिछाडीवर ठेवणाऱ्या आहेत, अशी टीका यावेळी जाधव व ठाकरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनुष तोफ लष्करात दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वदेशी बनावटीची बेफोर्स समजली जाणारी धनुष तोफ अखेर लष्करात दाखल झाली आहे. जबलपूर येथील कारखान्यात झालेल्या समारंभात ती लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली. हा सोहळा नाशिकमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलण्यात आला. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा सोहळा नाशिकला होऊ शकला नाही. या तोफेमुळे लष्कराची ताकद वाढली आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात भारतीय लष्कराला होवेत्झर आणि वज्र या दोन तोफ मिळाल्या. तब्बल तीस वर्षांच्या कालावधीनंतर दोन तोफा लष्कराला मिळाल्याने त्याचे महत्त्व अधिक होते. बोफोर्स तोफेच्या खरेदीवरुन मोठा गदारोळ झाल्याने तीस वर्षे कुठल्याही तोफेची खरेदी झाली नव्हती. तसेच, भारतीय बनावटीची तोफ विकसित करण्यात यावी, असा सूर आळवला जात होता. अखेर अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर देशातील संरक्षण क्षेत्राला दिलासा देणारी धनुष गन विकसित करण्यात आली आहे. ही तोफ नाशिकमधील तोफखाना केंद्रात पंतप्रधानांच्या हस्ते लष्कराकडे सुपूर्द करण्याचे निश्चित झाले होते. पण, तो सोहळा होऊ शकला नाही. अखेर ही तोफ जबलपूर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या सोहळ्यात ही तोफ लष्कराला देण्यात आली. याप्रसंगी संरक्षण विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार, आर्टिलरीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पी. के. श्रीवास्तव, पश्चिम कमांडचे प्रमुख मेजर जनरल मनमीत सिंग, गुणवत्ता विभागाचे नियंत्रक ब्रिगेडिअर रवी भारद्वाज, ब्रिगेडिअर भार्गवा आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाचे अध्यक्ष सौरभ कुमार हे उपस्थित होते.

धनुषमुळे भारताची ताकद कित्येकपटीने वाढणार असून, 'मेक इन इंडिया' या मोहिमेचे यश म्हणून तिच्याकडे पाहिले जाईल, असे मान्यवरांनी सांगितले आहे. बहुविध प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतर धनुष लष्कराला मिळाली आहे. होवेत्झर आणि वज्रनंतर धनुषही भारतीय सीमांचे संरक्षण करण्यात मैलाचा दगड बनेल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला आहे. या तोफेच्या निर्मितीमुळे संरक्षण संशोधन आणि विकास करणाऱ्या तसेच ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या अधिकारी व तज्ज्ञांचे मनोबल वाढले आहे.

अशी आहे धनुष

१५५ मिलीमीटर असलेली ही तोफ सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. ४५ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य ती भेदू शकते. अत्याधुनिक स्वरुपाची ही तोफ असून त्यात अनेक आधुनिक फिचर्स आहेत. सध्याची बोफोर्स तोफ ३९ किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. सद्यस्थितीत ही तोफ ८१ टक्के भारतीय बनावटीची आहे. या वर्षाच्या अखेरीस हे प्रमाण ९१ टक्के होणार आहे. एका मिनिटाला आठ तोफगोळे डागण्याची या तोफेची क्षमता आहे. सद्यस्थितीत ६ धनुष तोफा लष्कराला दिल्या जात आहेत. तर, एकूण ११४ तोफांची ऑर्डर ऑर्डिनन्स फॅक्टरीला देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमी युगुलाची आत्महत्या

$
0
0

सटाणा : कुटुंबीयांकडून प्रेमविवाहास विरोध असल्याने लखमापूर येथील तरुण-तरुणीने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. लखमापूर येथील कारगिल या आदिवासी वस्तीवर वास्तव्यास असलेले आत्माराम दत्तू दळवी (२२) व सुनीता भोरसिंग गांगुर्डे (१९) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. सुनीता ही महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे समजते. दोघांनी आपल्या कुटुंबीयांजवळ प्रेमविवाहासाठी आग्रह धरला होता. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांकडून यास तीव्र विरोध होता. रविवारी दि. ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच दोराने दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत निवृत्तिनाथ संस्थान अध्यक्षपदी कोल्हे

$
0
0

सचिव पदावर जिजाबाई लांडे यांची वर्णी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी हभप पंडित महाराज कोल्हे तर सचिव पदावर जिजाबाई लांडे यांची निवड झाली आहे. विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट होणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती.

संस्थानाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत दीर्घ चर्चेअंती हभप संजय महाराज धोंडगे यांनी अध्यक्षपदाचा आणि पवनकुमार भुतडा यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपस्थित विश्वस्त मंडळ सदस्यांनी नवीन पदाधिकारी नियुक्त केले. दरम्यान, पुंडलिक थेटे यांच्याकडे पंढरपूर पालखी सोहळ्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जून २०१५ मध्ये विश्वस्त मंडळ सदस्य नियुक्तीनंतर त्र्यंबकराव गायकवाड हे पहिले वर्षभर अध्यक्ष राहिले. त्यानंतर जवळपास सव्वा दोन वर्षे हभप संजय महाराज धोंडगे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, हभप पंडित महाराज कोल्हे यांच्याकडून यापुढील काम त्याच गतीने होईल, अशी अपेक्षा उपस्थित वारकरी बांधवांनी केली आहे. पंडित महाराज कोल्हे यांनी वारकरी महामंडळाच्या माध्यमातून यापूर्वी लढा दिलेला आहे. सचिव जिजाबाई लांडे या माजी जिल्हा परिषद सदस्या तसेच अंजनेरीच्या माजी सरपंच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक - शालेय विद्यार्थी राबवताय मतदान जनजागृती मोहिम

$
0
0

विद्यार्थी करताहेत जनजागृती

विविध उपक्रमांतून मतदानाविषयी मोहीम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूकीचे वारे सध्या वाहत असून मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी शहरातील शाळा, विद्यार्थी जनजागृती करत असून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत आहेत.

- -

अभिनवमध्ये विद्यार्थ्यांनी उभारली संकल्पाची गुढी

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद शाळेत साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाला करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती संकल्पाची गुढी उभारली. आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, असे विद्यार्थ्यांना सांगत आपल्या आई-वडिलांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सांगावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी 'लोकसभा निवडणूक २०१९' मध्ये निर्भिडपणे मतदान करून माझा मतदानाचा हक्क बजावेन', अशा आशयाचे 'संकल्प पत्र' घरातील सदस्यांना देऊन त्यांना मतदानात सहभागी होण्यासाठी आग्रह करू, अशी शपथ घेतली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, ज्येष्ठ शिक्षिका डॉ. सुवर्णा गायकवाड, रोहिणी गायकवाड, जया जाधव आदी उपस्थित होते.

- -

पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती

घटनेने देशाच्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते बजावलेच पाहिजे, या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित पेठे विद्यालयात मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव व नाशिक मध्य १२४च्या नायब तहसिलदार सविता पठारे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी हातात सूचना फलक घेऊन 'मतदान करा' अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी स्काऊट व शालेय गणवेशात उपस्थित होते. बँड पथकाच्या आवाजाने व मतदान करा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या जनजागृतीच्या कार्यक्रमात शाळेचे उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, सेक्टर ऑफिसर जावेद शेख, राजेंद्र कापसे, सर्व शालेय पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम फेरीसाठी मनीष जोगळेकर यांनी फलक बनवले होते. परिसरातील नागरिकांनी मतदान करा या अभियानास उत्तम प्रतिसाद दिला.

- -

रुंग्टा हायस्कूलमध्ये प्रारूप मतदानाने अनुभव

मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत जु. स. रुंग्टा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी प्रारूप मतदान करून प्रत्यक्ष मतदान करण्याचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तोताराम घुगे, संस्थेचे माजी सचिव व ज्येष्ठ कला शिक्षक अरुण पैठणकर, एनसीसी ऑफिसर राजेंद्र गायवन, नीलिमा कांगणे, मनीषा जोशी, सुलभा कुलकर्णी, १२४ नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाचे मास्टर ट्रेनर मुकुंद बागुल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुकुंद बागुल यांनी विद्यार्थ्यांनी कसे मतदान करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक तोताराम घुगे यांनी मतदान करणे हे किती महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांसाठी प्रारूप मतदान कक्ष उभारण्यात आला होता. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची रचना करण्यात येऊन प्रत्यक्ष कशा पद्धतीने मतदान केले जाते हे विद्यार्थ्यांनी मतदान करून अनुभवले. या जनजागृती मोहिमेदरम्यान आपल्या कुटुंबीय व परिसरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सांगितले.

- -

केबीएचतर्फे जनजागृती रॅली

गंगापूर रोड येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय नाशिक येथे शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपला कृतीशील सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पाटील कॉलनी, कॉलेजरोड, गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर, या परिसरात रॅलीचे आयोजन करून परिसरातील नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. सुरुवातीला रॅलीचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक देवराम डामरे, पर्यवेक्षक जयवंत बोढारे, तसेच शासकीय मतदान अधिकारी संजय आडेसरा यांनी केले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक सुजाता पवार, नरेंद्र पाटील, क्रांती देवरे, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images