Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मांसविक्रीसाठी परवाना आवश्यक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीला प्रतिबंध बसावा म्हणून, त्यासाठी परवाना निश्चितीचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे. शहरातील मांसविक्रेत्यांची नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला असून, त्यांना परवाना घ्यावा लागणार आहे.

महापालिकेकडून सध्या स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी सुरू असून, शहराच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर मांस विक्री होत असल्याने दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्यालाही बाधा निर्माण होते. शहरात जागा मिळेल तेथे कुठेही मांसविक्री होत असून, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मांसविक्री केल्यानंतर घाण तेथेच टाकली जाते. यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे महापालिकेने आता शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते या ठिकाणी उघड्यावरच मांस विक्री होते. चिकन, मटन, मासे या दुकानांमुळे अस्वच्छतेत वाढ होते. मांसविक्रेत्यांना परवान्याबाबतचा एक प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असला तरी, पालिकेने स्वत:च नोंदणी व परवाने देण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पालिका अधिनियम कलम ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१ (अ) ३८२, ४६८ या कायदेशीर तरतुदीस अधीन राहून मांस, चिकन, मासळी विक्री करणाऱ्या व्यक्ती वा दुकानास परवाना दिला जाणार आहे.

प्रकार शुल्क

मांस व चिकन एकत्रित विक्री परवाना - ५०००

मासळी विक्री व्यवसाय परवाना - २५००

मांस विक्रीसाठी व्यक्ती परवाना - ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरकुलात भरणारी अंगणवाडी सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

चुंचाळे शिवारात बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेत भाडेकरू असल्याच्या तक्रारी वाढल्याने मंगळवारी दुसऱ्या दिवशीही महापालिकेची सदनिका जप्त करण्याची मोहीम सुरू होती. यावेळी एका सदनिकेत अंगणवाडी सुरू असल्याचे लक्षात आल्याने ती सील करण्यात आली.

महापालिकेतर्फे चुंचाळे शिवारातील या घरकुल योजनेची तपासणी सुरू झाली असून, त्यात येथे अनेकजण घरकुलात भाडेतत्त्वावर राहत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. सोमवारी एक सदनिका सील केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही गीताबाई आश्रुबा लहाने यांच्या नावे असलेल्या सीएच /ए /१ मधील फ्लॅट नंबर १०४ मध्ये सुरू असलेली अंगणवाडी सील करण्यात आली आहे. नागरिकांनी ज्यांच्या नावावर या सदनिका असतील, त्यांनीच तेथे राहणे बंधनकारक असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. यापुढेसुद्धा ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चुंचाळे शिवारात या घरकुल योजनेअंतर्गत सुमारे ४० इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यातील काही सदनिका धारकांना देण्यात आल्या आहेत, तर काही बंद अवस्थेत आहेत. ज्यांच्या नावाने सदनिका आहे, त्यांनीच येथे राहावे असा सरकारचा नियम आहे. परंतु, हा नियम धुडकावला जात आहे, म्हणून ही कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान, मोहीम सुरू असताना बरेच सदनिकाधारक कारवाईच्या भीतीने आपल्या फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरखाली सापडल्याने क्लिनरचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दुधाच्या टँकरची हवा तपासात असताना वाहनचालकाकडून अचानक पडलेल्या रिव्हर्स गिअरमुळे क्लिनर चाकाखाली चिरडला. मुंबई-आग्रा महामार्गावर जत्रा हॉटेलच्या समोरही ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडली. विष्णू बालाजी पोटावळे (वय २२) असे या क्लिनरचे नाव आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुपारी दीडच्या सुमारास जत्रा हॉटेलच्यासमोर दुधाने भरलेला मालवाहतूक टँकर (एमजीएफ ०२७७) इंदूरकडून मुंबईला जात होता. जत्रा हॉटेल येथे पोचल्यावर वाहनचालक मधुकर महादेव महानवर याने क्लिनर विष्णू यास हवा चेक करण्यास सांगितले. तो हवा चेक करीत असताना चालक मधुकर महानवर याच्याकडून अचानकपणे टँकर सुरू होऊन रिव्हर्स गिअर पडला. टँकरचे चाक मानेवरून गेल्याने विष्णूचा जागीच ठार झाला.

चालक मधुकर महानवर व विष्णू पोटावळे हे दोघे मामा-भाचे असून ते तळेगाव (जि. लातूर) येथील रहिवाशी आहेत. मामाकडूनच भाच्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती कळविताच आडगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

कारच्या धडकेत सिडको मुलगी ठार

सिडको : संजीवनगर भागात घरासमोर खेळत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर कारचालक रूपेश फरार असून त्याचा साथीदार प्रितम कांबळे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अंजली गौड (१२) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. घरासमोर खेळत असताना अचानकपणे भरधाव वेगाने आलेल्या लान्सर कारने (एमएच ०२ केए १३५०) अंजलीला जोरदार धडक दिली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ऐन संक्रांतीच्या दिवशी सकाळीच ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्री गार्ड खरेदीची होणार चौकशी

$
0
0

मनमाड : मनमाड पालिकेने खरेदी केलेल्या सहाशे ट्री गार्ड मधील कथित भ्रष्टाचार संदर्भात प्रशासनाने चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ही समिती महिनाभरात अहवाल देणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सांगितले. सोमवारी मनमाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास पाटील,अमजद पठाण यांनी टेबल लाथाडून, खुर्च्या फेकून राडा घातला होता. ट्री गार्ड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे समिती नेमण्यात आली असून, श्यामकांत जाधव, कर अधिकारी अशोक पाईक, कार्यालयीन पर्यवेक्षक राजेंद्र पाटील यांचा या समितीत समावेश आहे. पालिकेने ६०० ट्री गार्ड खरेदी केले आहेत. ट्री गार्डच्या वजनाबाबत व तांत्रिक बाबींबद्दल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आक्षेप घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीच्या तक्रारी वाढता वाढता वाढे...

$
0
0

पावणे दोन वर्षात अडीच हजार तक्रारी

...

- आतापर्यंत ३ कोटी १५ लाखांचा दंड

- नागरिकांच्या २४१३ तक्रारी प्राप्त

- सर्वाधिक तक्रारी व दंड या सिडको, पंचवटी विभागात

- माहिती अधिकारातून मिळाली माहिती

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर स्वच्छतेचा कणा असलेल्या महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी घंटागाडी योजनेला ऑनलाइन ट्रॅकिंगची जोड देऊनही नागरिकांच्या घंटागाडीबाबतच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान तब्बल दोन हजार ४१३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रभागाऐवजी विभागनिहाय घंटागाडीचा ठेका देऊनही तक्रारी कमी होत नसल्याने प्रशासनानेही हात टेकले आहेत. दरम्यान, घंटागाडीच्या अनियमिततेप्रकरणी पावणेदोन वर्षांत तब्बल तीन कोटी १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शहरातील घंटागाड्यांच्या अनियमिततेचा प्रश्न हा प्रभाग, स्थायी आणि महासभेत नेहमीच गाजत असतो. महापालिकेच्या या आदर्श घंटागाडी प्रकल्पाबाबतच्या तक्रारीबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओसवाल यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यात प्रशासनाने उत्तर दिले असून, त्यात दंडात्मक आकारणीचीही माहिती दिली आहे.

महापालिकेने गेल्या वर्षी जानेवारीत घंटागाडी प्रकल्पाला ऑनलाइनची जोड दिली होती. प्रभागात घंटागाडी फिरताना तिचे ऑनलाइन ट्रॅकिंगसाठी जीपीएस यंत्रणाही बसविण्यात आली. परंतु, या घंटागाडीबाबत नागरिकांच्या तक्रारी या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे मिळालेल्या माहितीवरून समोर येत आहे.

जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत घंटागाडीसंदर्भात २४१३ तक्रारी प्राप्त झाल्याचे लेखी उत्तर देण्यात आले. नागरिकांच्या एवढ्या तक्रारी पाहता नागरिक या योजनेबाबत समाधानी नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ठेकेदारांना मोठ्या प्रमाणावर दंडही ठोठावण्यात आला आहे.

- सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नात्यांमध्ये रंगणार हसवाफसवीचा खेळ!

$
0
0

करिदिनानिमित्त आज उडणार धम्माल

रामनाथ माळोदे, पंचवटी

तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला, असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत स्नेहाचा गोडवा वाढविण्याची मकरसंक्रांतीला प्रथा आहे. संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी झोपून उठविताना हाक मारली जाते, समोरच्या व्यक्तीने काय? असे विचारले की त्याला 'अर्धी भाकरी घे अन् गाढवं वळायला जा' असे बोलून त्याची गंमत केली जाते. खेड्यापाड्यात आजही अशी गंमत केली जाते. मेहुणा-मेहुणी, दीर-भावजय,मेहुणे-मेहुणे अशा चेष्टमस्करीच्या नात्यांमध्ये या दिवशी धम्माल उडविली जाते. अशाच गमती बुधवारी (दि. १६) सकाळीही होणार आहेत.

एप्रिलच्या पहिल्या दिवशी एप्रिल फूल करून फसवा-फसवीचे प्रकार केले जातात. त्याही अगोदरपासून कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात विशेषतः खेडोपाडी करिदिनाच्या दिवशी सकाळी-सकाळी गाढव वळायला जा असे सांगण्याची जुनी प्रथा सुरू असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. रोजच्या रुक्ष जगण्यातून काही वेगळे करण्याचे आणि त्यातून प्रेरणा घेऊन नव्या उत्साहाने काम करण्यासाठी सण आणि उत्सव साजरे केले जातात. बदलणारे ऋतू आणि मराठी सण यांची सांगड अत्यंत योग्यरितीने घालण्यात आलेली आहे. आज कितीही आधुनिकीकरण झाले असले तरी सणाच्या दिवशी ठरल्याप्रमाणेच त्या-त्या गोष्टी केल्या जातात.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा आणि तीळगुळाचे फोटो यांचे मेसेज फिरू लागले आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात भेटून तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिळगुळाचा गोडवा एकमेकांना दिल्यानंतर दुसरा दिवस हा किंक्रातीचा असतो. त्याला करिदिन म्हटले जाते. या दिवशी कुणाशी भांडायच नाही. नाहीतर वर्षभर कर-कर लागते आणि वर्षभर कटकटी मागे लागतात, असा समज जुन्या जाणत्या लोकांनी रुढ केलेला आहे. त्यामुळे या दिवशी कोणते शुभकार्य करण्याचे टाळले जाते.

मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी एकमेकांना उठविताना समोरून प्रतिसाद मिळताच त्याला 'अर्धी भाकरी घे अन् गाढवं वळायला जा' असे म्हणत फसविणे आणि त्यानंतर मनमुराद हसण्याची धम्माल लहानपणे करायचो. ही प्रथा कधी सुरू झाली हे काही सांगता येणार नाही.

- कृष्णकुमार नेरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षयपात्रचा प्रस्ताव महासभेवर

$
0
0

२८ हजार विद्यार्थ्यांना सकस व दर्जेदार आहार मिळणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या ९४ शाळांमधील २८ हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता राज्य सरकारच्या सूचनेनुसार 'इस्कॉन मंदिर' संचलित अक्षपात्र फाउंडेशनच्या मदतीने अक्षयपात्र योजना राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने महासभेवर ठेवला आहे. शिक्षण समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता महासभेवर हा प्रस्ताव सादर झाला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर त्याची लागलीच अंमलबजावणी केली जाणार असल्याने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सकस आणि दर्जेदार आहार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बचतगटाकडून सध्या आहार दिला जातो; परंतु या आहाराबाबत पालकांसह विद्यार्थ्यांच्याही तक्रारी असतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत अक्षयपात्र योजनेवर चर्चा झाली होती. सेंट्रल किचनच्या माध्यमातून शाळांना सकस आहार देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी मांडला. राज्य सरकारनेही याबाबत सूचना केल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले होते. इस्कॉन मंदिर संचलित अक्षयपात्र फाउंडेशनच्या वतीने महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस व दर्जेदार पोषण आहार देण्याचा प्रस्ताव आल्याचे सांगत देवरेंनी त्याला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या योजनेत सध्याच्या बचत गटांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षण समितीने त्याला मंजुरी दिली होती. आता शिक्षण समितीच्या मंजुरीनंतर शिक्षण विभागाने महासभेवर प्रस्ताव दाखल केला आहे. महापालिकेच्या ९४ शाळांमधील २७ हजार ५८७ विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाक प्रणालीअंतर्गत भोजनपुरवठा करण्याचा प्रस्ताव महासभेवर आला आहे. बचतगटातील महिलांना या योजनेत समाविष्ट केले जाणार असल्याने १९ तारखेच्या महासभेत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

१२ राज्यांत विस्तार

या संस्थेकडून देशातील १२ राज्यांमधील १४०० शाळांमध्ये अक्षयपात्र योजना राबविली जाते. जवळपास १७ लाख विद्यार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा केला जातो, तर महाराष्ट्रात ठाणे महापालिकेतील २३ हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून चविष्ट सकस आणि गरम भोजन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. शासकीय अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च करून संस्था पोषण आहार पुरवणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ महापालिका शाळांमधील गोरगरीब मुलांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेनऊ कोटी गेले कुठे?

$
0
0

कालिदास कलामंदिरासाठी ६६ लाखांचे आऊटसोर्सिंग; दोन जणांचीही नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल साडेनऊ कोंटीचा खर्च करूनही महाकवी कालिदास कलामंदिरातील त्रुटी दूर न झाल्याने अखेरीस महापालिकेने पुन्हा ६६ लाखांची उधळण करण्यास सुरुवात केली आहे. कालिदासमधील तांत्रिक बाबींचे नियोजन पुन्हा ठेकेदाराकडे सोपविण्याची तयारी केली असून वातानुकूलित यंत्रणा, प्रकाश योजना ध्वनी योजनेच्या संचालनासाठी आता ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. या ठेकेदाराला आगामी दोन वर्षांसाठी ६६ लाख रुपये अदा केले जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे कोट्यवधी रुपये गेले कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून महाकवी कालिदास कलामंदिराकडे बघितले जाते. परंतु, या कलामंदिराच्या दुरवस्थेबाबत तीन वर्षांपूर्वी अभिनेता प्रशांत दामले, मोहन जोशींसह अनेक कलावंतानी टिकेची झोड उडवली होती. प्रशांत दामले यांनी तर सोशल मीडियावर फोटा शेअर करीत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्यामुळे मनसेच्या सत्ता काळातच या कलामंदिराचा मेकओव्हर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनसेच्या सत्ताकाळातच यासाठी नऊ कोटीची तरतूदही केली होती. मात्र, पालिकेतून मनसेची सत्ता जाताच, भाजपच्या सत्ताकाळात स्मार्ट सिटी अंतर्गत या कलांमदिराचा पुनर्निमाणाचा निर्णय घेण्यात आला होता. स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल साडे नऊ कोटींची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली होती. त्यामुळे गेले वर्षभर हा प्रकल्प बंद करण्यात आला होती. परंतु, मेकओव्हर होऊनही कालिदासमधील त्रुटी संपत नसल्याचे समोर आले आहे.

आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही त्रुटी असल्याचे कलावंताचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात हॅम्लेट नाटकादरम्यान तब्बल आठ ते दहा वेळा वीज गायब झाली. तर कलावंताना अंधारात जेवण करावे लागत असल्याची तक्रार आहे. प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन यांनी याबाबतचे ट्विटही केले होते. तसेच महापालिकेच्या कारभारावर टीकाही केली आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने याची दखल घेत, पुन्हा यंत्रणा चालविण्यासाठी खासगी ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला दोन वर्षांसाठी ६६ लाख रुपये दिले जाणार आहे.

पुन्हा खर्च का?

वातानुकूलित यंत्रणेच्या संचलनासाठी २३ लाख ६२ हजार रुपये, प्रकाश योजनेसाठी १८ लाख ६० हजार रुपये तर ध्वनी योजनेसाठी १७ लाख ५० हजार रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहे. परंतु, स्मार्ट सिटी अंतर्गत साडेनऊ कोटी खर्च करूनही पुन्हा ६६ लाखांचा खर्च का, असा सवाल आता केला जात आहे.

दोघांची नियुक्ती

महापालिकेवर झालेल्या टिकेनंतर प्रशासनाने तडकाफडकी दोन जणांची कालिदास कलामंदिरात नियुक्ती केली आहे. विद्युत विभागातील शाखा अभियंता संतोष बेलगावकर यांच्याकडे कालिदास कलामंदिरातील वीजविषयक तांत्रिक बाबींचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर पंचवटी विभागातील वीजतंत्री डी. एस. करके यांची कालिदास कलामंदिरात बदली करण्यात आली आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीपर्यंत या दोघांवर तांत्रिक बाबींचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तक्रारी कमी करण्यासाठी महापालिकेने या उपयोजना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकाश पाठक यांचे शनिवारी व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वामी विवेकानंदांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या नाशिक शाखेतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक यांच्या व्याख्यानाचे शनिवारी (दि. १९) आयोजन करण्यात आले आहे. नाशिक-पुणे रस्त्यावरील अंबासोसायटी, समाजमंदिर, नाशिकरोड येथे सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे. 'विवेकानंदांचे विचारपुष्प : कौटुंबिक, मानसिक, अध्यात्मिक आणि सामाजिक प्रगतीसाठी' या विषयावर यावेळी पाठक मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने यतीन मुजूमदार, अमोल अहिरे, राजेंद्र पवार, शिरीष समर्थ आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या मनीषा, निशाचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तराखंड मधील रुद्रपूर येथे झालेल्या २९ व्या राष्ट्रीय किशोर खो-खो स्पर्धेत ओडिशाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. या संघात नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील मनीषा पडेर व खिर्डी सुरगाणा आश्रमशाळेतील निशा वैजल यांनी महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला. या दोन्ही खेळाडूंचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सत्कार करण्यात आला.

निशा वैजल ही या वर्षात दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे. २१ तारखेपासून परभणी येथे होणाऱ्या सराव शिबिरात ती सहभागी होणार असून, २८ ते ३१ जानेवारी दरम्यान कर्नाटक येथील मंड्या येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. या दोन्ही खेळाडूंचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षी याच स्पर्धांमधून नाशिक मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाला पराभवाचा धक्का बसला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या पराभवाची परतफेड काढल्यामुळे या आदिवासी लेकींच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सत्काराच्यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी नरेश गीते म्हणाले की, नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत नाशिक मधील शासकीय कन्या शाळेतील विद्यार्थिनीं बाजी मारली आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब असून खेळाडूंना प्रोस्ताहित करणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्योतिकलश’ प्रकरणी दोन दिवसांत तोडगा काढू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्योतिकलश सभागृह महापालिकेने सील केल्यामुळे शहरात होणारी चर्चा आपल्यालाही योग्य वाटत नसल्याचे सांगत या प्रकरणी दोन दिवसांत तोडगा काढू, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार हेमंत टकले यांना दिले. ज्योतिकलश प्रकरणी मंगळवारी टकले यांनी गमे यांची भेट घेतली असता, गमे यांनी वरील आश्वासन दिले.

लोकहितवादी मंडळाचे राका कॉलनी येथील ज्योतिकलश सभागृह कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेने सील केल्याप्रकरणी लोकहितवादी मंडळाचे माजी अध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. आयुक्त गमे यांची त्यांनी मंगळवारी भेट घेतली. हे सभागृह, लोकहितवादी मंडळाची पार्श्वभूमीदेखील टकले यांनी गमे यांना सांगितली. तात्यासाहेब शिरवाडकर यांनी या मंडळाची स्थापना केली असून, ज्योतिकलश उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते महापालिकेने अशा तऱ्हेने बंद करायला नको होते, असे सांगतानाच लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा, असे टकले यांनी सांगितले. गार्डनमध्ये झोपडपट्टीतील लोक गोंधळ घालत असतील तर लोकहितवादी, महापालिका व स्थानिक नागरिकांनी मिळून या प्रकरणी काही तरी तोडगा काढायला हवा, असे सांगितले. स्थानिकांनादेखील त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे म्हणणे ऐकून यातून सुवर्णमध्य काढावा असे पुढे त्यांनी सांगितले. याबाबत आयुक्तांनी सर्व म्हणणे ऐकून घेत अतिरिक्त आयुक्त, तसेच इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोनच दिवसांत या प्रश्नी तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमने सामने : प्रशांत भरवीरकर

$
0
0

आमने सामने : प्रशांत भरवीरकर

---

लोकहितवादी मंडळाचे, राका कॉलनीतील 'ज्योतीकलश' सभागृह महापालिकेने सील केले असून, स्थानिकांच्या तक्रारीमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी कॉलनीतील प्रतिनिधी समितीवर यावा, अशी साद घातली असून लोकहितवादीने आमच्यावर खोटे आरोप केले आहेत असे स्थानिक रहिवासी सुरेश दाते यांचे म्हणणे आहे.

---

कॉलनीतील प्रतिनिधी समितीवर यावा

राका कॉलनीतील रहिवासी अनेकदा आमच्याशी व्यक्तिगत संवाद साधतात. त्यावेळी मी राका कॉलनीमध्ये पोहोचतो आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करतो. अनेकदा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आम्ही कारवाई केली असून, सरकार वाडा पोलिस स्टेशनला तशी तक्रारही देण्यात आली आहे. दारू, गांजा पीत असणाऱ्यांची तक्रार आम्ही अनेकवेळा केलेली आहे. राका कॉलनीतील रहिवाशांचे जे म्हणणे आहे, ते त्यांनी आमच्यासमोर येऊन मांडावे.

या कॉलनीतील लोकांना, स्वाध्यायासाठी आम्ही आठवड्यातून तीन दिवस ज्योतीकलश सभागृह उपलब्ध करून देतो. तसेच कायमस्वरूपी योगा क्लास येथे चालतात. रोज गार्डनमध्ये सगळे जमतात. त्यापेक्षा मला असे वाटते की, कार्यकारिणीवर एक त्यांचा माणूस असावा. यातून आमच्या समस्या त्यांना कळतील, तशी मी त्यांना साद घालतो आहे. लोकहितवादी मंडळाच्या ज्योतिकलश सभागृहामध्ये सातत्याने नाटकाच्या प्रॅक्टिस चालतात. नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्यांसाठी तसेच एकपात्री प्रयोग करणाऱ्यांसाठी फ्रीमध्ये हे सभागृह दिले जाते. तात्यासाहेबांच्या नावाने एक काव्य स्पर्धा येथे घेतली जाते. उर्दू हायस्कूलची मुले त्यात कविता म्हणतात. नव्या पिढीला, कॉन्व्हेंटला तात्यासाहेब कोण होते हे त्यातून माहीत होते. त्यामुळे लोकहितवादी हे चांगले कार्य करत आहे, असे मला वाटते. तात्यासाहेबांनी लोकहितवादी मंडळाची मुहूर्तमेढ रोवली, ज्योतिकलश सभागृह लोकसहभागातून उभे केले. ब. चिं. सहस्रबुद्धे यांनी करारनामा केला. त्या करारनाम्यानुसार आम्ही येथे आहोत.

५० हजार रुपये पावतीचा जर विषय असेल तर त्या बाईंनी वर्षभर सभागृह वापरले त्यामुळे त्यांना हे शुल्क भरावे लागले. महिन्याकाठी पाच हजार रुपये ती देणगी म्हणून आम्ही त्यांच्याकडून स्वीकारले. त्याचे व्यवस्थित ऑडिट झालेले आहे. लाखाच्या आत उत्पन्न आहे तर देणगी स्वरुपात आम्ही पैसे घेणार ना! कारण इतर खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसा कुठून येणार? कलाकार मंडळी त्यांचा वेळ देऊ शकतात. परंतु, पैसे देऊ शकत नाही. पन्नास-साठ लोकांचा राबता येथे असतो, नाटक बंद पडू नये अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही शहरासाठी काहीतरी करीत आहोत स्थानिक रहिवाशांचे म्हणणे असेल की मागे शेड बांधले. तेथे नाटकाचे साहित्य ठेवलेले आहे. त्याव्यतिरिक्त काहीही असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्यासाठी आम्ही तयार असून, सामान सांभाळावेच लागणार आहे. कॉलनीतील लोकांची कोणतीही तक्रार आम्ही सोडवायला तयार आहोत. बिल्डिंग आमची आहे, असे आम्ही अजिबात वागत नाही तर ती स्थानिकांची बिल्डिंग आहे असेच आम्ही वागतो. ते म्हणतात की, सिक्युरिटी ठेवा परंतु इतके पैसे आम्हाला परवडणार नाही. आमची अशी विनंती आहे की त्यांनीही यात खारीचा वाटा घ्यावा. दोघे मिळून ठरवू. ते सांगतील तसे होईल. त्यांना वाटते बगीचा डेव्हलप करावा, आम्ही त्यासाठी तयार आहोत. करारानुसार आम्ही सर्व गोष्टी करण्यासाठी बांधील आहोत. मुलांना खेळण्यासाठी गार्डन पाहिजे आम्ही दिवसभर ते उपलब्ध करून देतो. आम्हाला तेथे राहायचे असेल तर आम्ही आमचा त्रास कशाला होऊ देऊ? स्थानिक रहिवासी म्हणत असतील की इतर कार्यक्रमांसाठी हे सभागृह उपलब्ध करून द्यावे, ते ही आम्ही देण्यासाठी तयार आहोत. परंतु, येथे जेवणाची परवानगी आम्ही देत नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छा आहे. आमचा जन्म नाशिक शहरात झालेला आहे, आम्ही बाहेरचे नाही. दोघांच्या समन्वयाने जे होईल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

---

लोकहितवादीने केलेले आरोप खोटे

राका कॉलनीतील 'ज्योतिकलश' या नावाने ओळखली जाणारी वास्तू व क्रीडांगण गेल्या अनेक वर्षांपासून लोकहितवादी मंडळाच्या ताब्यात असून ही जागा महानगरपालिकेने कॉलनीतील रहिवाशांसाठी आरक्षित केलेली आहे. लोकहितवादी मंडळ अनेकदा ही जागा इतर संस्थांना वापरण्यास देते, असे दिसते. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तूचे व क्रीडांगणाची कुठलीही देखभाल होत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने लोकहितवादी मंडळाकडून ही जागा ताब्यात घेऊन कॉलनीचा रहिवाशांसाठी जागेचा वापर करावा अशी विनंती महापालिकेला करण्यात आलेली आहे.

लोकहितवादी मंडळाच्या ताब्यातील जागा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. येथे बाहेरील लोकांचा नेहमी उपद्रव होतो. स्थानिकांना या जागेचा कोणताही उपयोग होत नाही. त्यांना कुठल्याही कामासाठी ही जागा हवी असेल तर त्यासाठी पैसे भरावे लागतात. ओपन स्पेस स्थानिकांची असेल तर त्यासाठी पैसे कशाला भरावे लागले पाहिजे? लोकहितवादी मंडळाने वेळोवेळी स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यापेक्षा त्यांनी स्थानिकांवर आरोप करण्याला जास्त प्राधान्य दिले आहे. गार्डन करण्यासाठी स्थानिकांनी त्यांना कुठलाही अटकाव केला नाही. त्यांनी ग्रीन जीम करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता, तसे असेल तर त्यांनी पुरावा द्यावा. महापालिकेच्या कोणत्याही अटी-शर्तींचे पालन लोकहितवादी मंडळाने केलेले नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओपन स्पेसची मालकी स्थानिकांकडे असते त्यामुळे ही मालकी आमच्याकडे मिळावी असे आमचे म्हणणे आहे. गेल्या ३८ वर्षांपासून स्थानिकांनी लोकहितवादी मंडळाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केले आहे. परंतु, आता या गार्डनमध्ये बाहेरील लोकांचा उपद्रव वाढलेला आहे. येथे येऊन लोक मद्य पितात, गांजा पितात, जुगार खेळतात. या गोष्टींचा विपरीत परिणाम होत असून स्थानिकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकहितवादी मंडळाने अनेक खोटे आरोपही केले असून नाटकाची तालीम चालू असताना कुठलेही दगड आम्ही फेकलेले नाही. दगड फेकता हा खोटा आरोप त्यांनी केला आहे तसेच स्थानिकांनी बोर्ड फाडला असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, स्थानिक लोक बोर्ड फाडतील कशाला, तो आम्हीच लावला आहे. याउलट स्थानिकांचाच वेळोवेळी अपमान झालेला आहे.

-सुरेश दाते, स्थानिक रहिवासी

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे कारखाना उद्घाटन

$
0
0

रेल्वे प्रकल्पाचे

आज भूमिपूजन

जेलरोड : एकलहरे येथे रेल्वे कर्षण कारखान्यातील रेल्वे चाकांच्या निर्मिती आणि दुरुस्ती प्रकल्पाचे गुरुवारी (ता. १७) भूमिपूजन होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते, पालकमंत्री गिरीष महाजन, महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, निर्मल गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. या प्रकल्पासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ५३ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीबरोबरच नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. खासदार हेमंत गोडसे आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन माजी सचिव आनंद गांगुर्डे, भारत पाटील, पुंजाराम जाधव, प्रकाश पाटील, यशवंत भोर आदींनी प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारवा, वटवाघळाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संक्रांतीचा दुसरा दिवसही पक्ष्यांच्या जीवावर बेतला असून, बुधवारी मांजामुळे दोन पक्ष्यांना जीव गमवावा लागला. कॉलेजरोडला पारवा, तर महात्मानगर येथे वटवाघळाचा मृत्यू झाल्याची माहिती पक्षीमित्रांनी दिली.

नाशिक शहरात मंगळवारी मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. पतंगबाजीमुळे पक्ष्यांवर मात्र संक्रांत ओढावली. मंगळवारी शहरातील विविध भागात १२ पेक्षा अधिक पक्षी मांजामुळे जखमी झाले. यात काही पक्ष्यांचे पंख, तर काहींचे पाय कापले गेले. या पक्ष्यांवर पक्षीमित्रांनी उपचार करून आकाशात सोडून दिले. पण संक्रांतीचा दुसरा दिवस दोन पक्ष्यांचा जीव घेणारा ठरला. सकाळी ११ च्या सुमारास महात्मानगर मैदानाजवळील एका बंगल्याच्या आवारात असलेल्या नारळाच्या झाडावर मांजात वघवाघळाचा पंख अडकले. त्यामुळे वटवाघूळ गंभीर जखमी झाले. पक्षीमित्रांनी मांजातून वटवाघळाची सुटका केली. पण तोपर्यंत ते मृत झाले होते. चांदशी गावाकडील मोकळ्या जागेत खड्डा करून, ते पुरण्यात आले. दुपारी कॉलेजरोड येथील थत्तेनगर परिसरातील एका झाडावरील मांजात अकडून पारव्याचे पंख कापले गेले. दुपारी २ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. पक्षीमित्र अभिजित खेडलेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घंटागाडीवर चढून पारव्याची मांजातून सुटका केली. पंख पूर्णत: कापले गेल्याने पारव्याने झाडावरच मान टाकली होती. शहरातील विविध भागात मांजामुळे जखमी झालेले पक्षी आढळून आले. इंदिरानगरमध्ये मांजा अडकल्याने कबुतराच्या पायाला जखम झाली असून, त्यावर उपचार सुरू आहेत. नायलॉनसह इतर मांजांचा वापर पतंगोत्सवात झाल्याने, पक्ष्यांना जीव गमवावा लागत असल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पक्ष्यांचे जखमी होण्याचे प्रमाण कमी असले, तरी येत्या दोन ते तीन दिवसांत मांजामुळे पक्षी जखमी होण्याची शक्यता असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकावणारा पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माझ्या विरोधातील खटला मागे घ्या; अन्यथा कुटुंबाला संपवेल, असे धमकावणाऱ्यावर तरुणावर म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोरगड परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी विशाल दिलीप परदेशी (वय २८, रा. बोरगड) यांनी फिर्याद दिली आहे. मयूर राजाराम जाधव (वय २६, रा. बोरगड) असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मयूर याच्या विरोधात यापूर्वीही एक गुन्हा दाखल आहे. त्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मयूरने मंगळवारी (दि.१५) विशाल, त्याचा मित्र आणि वडिलांना अडविले. विशालच्या वडिलांना दमदाटी करीत तुम्ही माझ्याविरोधातील खटला मागे घ्या, असे सांगितले. खटला मागे घेतली नाही तर कुटुंब संपवेल अशीही धमकी दिली.

रोकडसह कागदपत्रे लांबविली

नाशिक : मंदिरामध्ये आलेल्या वृद्धेजवळील रोकड आणि पर्स चोरट्याने लांबविल्याचा प्रकार पंचवटीत घडला. याप्रकरणी मंगला विठ्ठल सांगळे (वय ७२, रा. पाथर्डीफाटा) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्या मंगळवारी (दि.१५) गंगेवरील देवी मंदिरात पूजा करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मंगला यांच्याकडील कापडी पिशवीतील सात हजार रुपये, महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिस हवालदार एच. आय. शेख तपास करीत आहेत.

भद्रकालीत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा

नाशिक : भद्रकालीतील सावतामाळी मंदिरासमोर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. रविराज भगिरथ वाघ (वय ३२, रा.काजीपुरा कोट, भद्रकाली) याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित ओम सासे, प्रितम ठाकरे, कृष्णा नाडर, धनंजय गायकवाड, अक्षय कानडे, प्रतिक काशिद यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून वाद घातला. वाद सोडवण्यासाठी रविराज गेले असता संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ओम राजेंद्र सासे (वय १८, रा. कथडा) याने दिलेल्या तक्रारीत मागील भांडणाची तसेच वाहनाचा कट लागल्याची कुरापत काढून संशयित धनंजय गायकवाड, अक्षय कानडे, प्रतिक वाघ, रविराज वाघ, अदित्य भोकरे, पिंटू कानडे आदींनी दगड विटाने मारहाण केल्याचे म्हटले आहे.

पैशांसाठी तरुणीला मारहाण

नाशिक : पैसे देण्यास नकार दिला म्हणून संशयिताने तरुणीला बेदम मारहाण केली. अश्‍विननगर परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीने अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. संशयित अमोल भंडारी (रा. अश्‍विननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा परिसरातील रहिवासी असलेल्या या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.१४) सकाळी सातच्या सुमारास संशयित अमोल याने पैशांची मागणी केली. तरुणीने पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने तिला लोखंडी अवजाराने मारहाण केली.

भद्रकालीत गोमांस जप्त

नाशिक : भद्रकालीतील घासबाजार परिसरात कारवाई करून पोलिसांनी गोमांस जप्त केले. याप्रकरणी रफिक हनिफ कुरेशी (वय २८, रा. वडाळागाव) यास अटक केली आहे. भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि.१५) कारवाई केली. बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करून ते मांस विक्री करण्याचा प्रयत्न कुरेशी करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तरुणाची आत्महत्या

नाशिक : शिंगाडा तलावाजवळील बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. जमीरुद्दीन फकिरुद्दीन कुरेशी (वय २८) असे त्याचे नाव आहे. चिराग मेहता यांनी मुंबई नाका पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. १५) सांयकाळी जमीरुद्दीन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारवा घटला; तापमान वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहाटे वातावरणात गारवा जाणवत असला तरी थंडीचा जोर ओसरत चालल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. शहरात बुधवारी किमान ११ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, गारवा कमी होऊन तापमान वाढू लागले आहे. बुधवारी नोंदविण्यात आलेले ३१.२ अंश सेल्सियस हे कमाल तापमान, आगामी काळात तीस अंशांच्या पुढेच राहिल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जानेवारीच्या सुरुवातीस शहरातील किमान तापमान ३ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने नाशिककर कडाक्याच्या अनुभव घेत होते. परंतु, आठवडाभरापासून या किमान तापमानात वाढ झाली असून, किमान तापमान ११ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. तसेच कमाल तापमानातही आठवड्यापासून चढ-उतार होत आहेत. ११ जानेवारीपासून कमाल तापमान ३० अंशाच्यावर नोंदविले जात असल्याने, शहरातील गारवा घटून उष्णता जाणवू लागली आहे. मकरसंक्रातीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंडे वाऱ्यांऐवजी कोरडे वारे वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम शहरातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा आता हळूहळू वाढू लागेल, असे हवामान विभागाने सांगितले. शहरात रविवारी (दि. १३) कमाल ३०.३ तापमानाची नोंद झाली असून, बुधवारी हे तापमान ३१.२ पर्यंत पोहोचले आहे. वातावरणातील बदल व कोरड्या वाऱ्यांचा वेग बघता जानेवारीच्या अखेरीस तापमान ३४ ते ३५ अंशापर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

\Bअसे होते तापमान

\Bदिनांक.............. किमान............. कमाल

१६ जानेवारी........ ११................ ३१.२

१५ जानेवारी......... १०............... २९.९

१४ जानेवारी.......... १०.६........... २७.३

१३ जानेवारी........... ८............... ३०.३

१२ जानेवारी........... ९.६............ ३०.८

११ जानेवारी............ ८.४.......... ३०.९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला स्वतंत्र औद्योगिक प्राधिकरण

$
0
0

'एमआयडीसी'चा राज्य शासनाकडे प्रस्ताव

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत ही स्वतंत्र औद्योगिक नगरी घोषित करावी, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास हे औद्योगिक क्षेत्र महापालिका क्षेत्रातून वगळण्यात येईल. असे झाले तर महापालिकेचा आर्थिक कणाच मोडू शकेल. विविध नागरी सुविधांसाठी पालिकेवर अवलंबून राहणाऱ्या उद्योगांना मात्र आता पालिकेचे हे लोढणे नकोसे झाल्यानचे गेल्या अनेक वर्षांपासून लटकलेला हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी विविध औद्योगिक वसाहती या महापालिका व नगरपालिका क्षेत्रात आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्याची पुरेशी दखल घेतली जात नसल्याने या वसाहतींसाठी स्वतंत्र प्राधिकरण करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून औद्योगिक वर्तुळातून होत आहे. तथापि, आता यासंदर्भात प्रस्तावच दाखल करण्याचे निर्देश सरकारने दिल्याने याबाबत सरकार गंभीर दिसत आहे. सरकारच्या आदेशानेच एमआयडीसीने हा प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. सातपूर व अंबड येथील औद्योगिक क्षेत्र हे महापालिकेच्या क्षेत्रात येते. त्यामुळे त्यांना महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स द्यावा लागतो. त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची उद्योजकांची तक्रार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे महापालिका क्षेत्रातून औद्योगिक वसाहत वगळा ही उद्योजकांची मागणी आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार नागरी क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींचे प्राधिकरण करावे, असे पत्र सन २०१७ मध्येच उद्योग विभागाकडून नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आले होते. त्यादृष्टीने आता गांभीर्याने हालचाली सुरू झाल्या असून, प्राधिकरणासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीनेच हा प्रस्ताव तयार करून सादर केला आहे.

...

असा आहे प्रस्ताव

औद्योगिक नगरीच्या या प्रस्तावात महापालिका हद्द दर्शवणारा नकाशा, उद्योग क्षेत्राचा नकाशा, जाहीर मसुदा बरोबरच सर्व माहिती आहे. महापालिका हद्दीतील किती क्षेत्र या प्राधिकरणात येणार आहे, हे नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे गेल्या तीन जानेवारीला पाठवण्यात आला आहे.

...

असे आहे क्षेत्र

नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक क्षेत्रात ६३४.५१ हेक्टर ए‌वढी, तर अंबड औद्योगिक वसाहतीत अंबड, चुंचाळे, पाथर्डी येथील ५१५.९५ हेक्टर जमीन अंतर्भूत आहे.

...

उद्योग विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यात महामंडळाच्या मुख्यालयाकडून जी माहिती व नकाशे हवे ते सर्व पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास स्वतंत्र औद्योगिक प्राधिकरण या वसाहतीसाठी असेल.

- हेमांगी पाटील-भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो ओळ

$
0
0

जलीकट्टूचा थरार...

तमिळनाडूतील प्रसिद्ध जलीकट्टू या नावाने प्रसिद्ध असलेल्या बैलांच्या झुंजींच्या परंपरेला मंगळवारी मदुरईत जल्लोषात सुरू झाली. यावेळी ४७६ बैलांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी ४४ जण जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्या अनियमित

$
0
0

नाशिक : घंटागाड्या नियमित येत नसल्याने अंबड परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. तर महालक्ष्मीनगर परिसरात घंटागाड्या अनियमित व अवेळी येत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. घंडागाड्या अनेकदा सोसायट्यांच्या बाहेर थोडावेळच थांबत असल्याने कचरा घेऊन येतपर्यंत त्या निघून जात असल्यानेही रहिवासी त्रासले आहेत. याबाबत नागरिक तक्रारी करत असूनही काहीच फरक पडत नसल्याचीही तक्रार नागरिकानी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑडिट न केल्यास इमारती सील करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फायर ऑडिट करण्यासाठी नागरिकांना १५ फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला आहे. १५ फेब्रुवारीच्या आत ज्या इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रण नसेल त्यांनी ती बसवून घ्यावी तसेच, ज्या इमारतींनी सक्षमता प्रमाणपत्र घेतले नसेल त्यांनी ते करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही न केल्यास थेट सदरच्या इमारती या वापरायोग्य नसल्याचे घोषित करण्याचा व सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

फायर अॅक्ट नियमाप्रमाणे शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट, रुग्णालये, शैक्षणिक इमारती (बहुमजली शाळा व महाविद्यालये), व्यावसायिक इमारती, औद्योगिक इमारती, गोदामे तसेच १५ मीटर पेक्षा उंच रहिवासी इमारती व सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविणे आणि दरवर्षी त्याचे फायर ऑडिट करणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविल्यानंतर दरवर्षी जानेवारी व जुलै अशा सहा महिन्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दल व आणीबाणी सेवा विभागाकडून ती यंत्रणा कार्यक्षम असल्याचा दाखला घेणे बंधनकारक आहे. अनेक वर्षांपासून महापालिकेच्या अग्निशामक व आणीबाणी सेवेतर्फे ऑडिटच्या सूचना दिल्या असून, त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. वर्षातून दोनदा फॉर्म बी व वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक असतानाही, याकडे निवासी इमारतींसह व्यावसायिकांनीही दुर्लक्ष केले आहे. शहरात सुमारे एक लाखांच्या आसपास व्यावसायिक व रहिवाशी इमारती आहेत. त्यातील २० ते २५ टक्के इमारतींमध्येच अग्निरोधक यंत्रणा आहे, तर ९० टक्के इमारतींधारकांकडून फायर ऑडिट केले जात नाही. त्यामुळे पालिकेने आता यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images