Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बागुलांसारख्या लेखकांमुळे वाचन संस्कृती टिकून

0
0

ज्येष्ठ प्रकाशक दिनकर गांगल यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रसिद्धी माध्यमांच्या गदारोळात वाचन संस्कृती लोप पावते की काय, असे काही वर्षापूर्वी वाटत होते. मात्र, प्रभाकर बागुलांच्या साहित्यामुळे तो भ्रम दूर झाला. त्यांच्यासारख्या लेखकांमुळे वाचन संस्कृती आजही टिकून असून जास्त लोकांपर्यंत पोहचते आहे यात शंका नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक दिनकर गांगल यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार दिनकर गांगल यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर बागुल यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 'सावाना'च्या मु. श. औरंगाबादकर सभागृहात बुधवारी पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. गांगल म्हणाले, की बागुल हे झपाटलेले लेखक आहे. त्यांचे साहित्य अभ्यासपूर्ण असून त्याच्या लेखनाची यादी पाहिली की त्यापुढे नतमस्तक व्हावे असे वाटते. त्यांची साहित्य निर्मिती ही त्यांच्या वेदनेतून जन्माला आली असल्याने ती अस्सल आहे. वाचन हे अनेक माध्यमांमधले माध्यम आहे. या माध्यमाला मध्यंतरीच्या काळात वाईट दिवस आले होते. बागुलांसारख्या लेखकांमुळे त्याला पुन्हा चागले दिवस आले आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यांची ९७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लवकरच ते शतक पूर्ण करतील, असा विश्वस गांगल यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना प्रभाकर बागुल म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असा संस्थेकडून माझा सत्कार होतो आहे, हे मी माझे भाग्य समजतो. निवृत्तीनंतरच्या १८ वर्षांच्या कालखंडात मी माझे साहित्य जास्त लिहिले आहे. राजे शहाजींना प्रकाशात आणण्याचे काम माझ्या कादंबरीतून केले आहे. या साहित्य निर्मितीसाठी अनेक रात्री मी जागून काढल्या आहेत. अनेकदा जीवनात दुखाचे प्रसंग आले. त्यावर स्वार होऊन माझी साहित्य निर्मिती केली.

श्रीकंत बेणी यांनी प्रास्ताविक केले. वसंत खैरनार यांनी गांगल यांचा परिचय करून दिला. भानुदास शौचे यांनी मानपत्राचे वाचन केले.

\Bफोटो : सतीश काळे \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट

0
0

पवार उद्या नाशकात

नाशिक : संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाचे अध्यक्ष वाय. सी. पवार हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी १८ जानेवारी दुपारी ३ वाजता ते शासकीय विश्रामगृह येथे येणार आहेत. दुपारी ४ वाजता ते नाशिक जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते रात्री धुळे येथे रवाना होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीवरून भाजपची कोंडी

0
0

महापौर-उपमहापौरांकडे बोट दाखवत सदस्यांकडून मुदतवाढीची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीची मुदत संपण्यास दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असून, भाजपने सर्व नऊ सदस्यांचे राजीनामे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, स्थायी समिती सदस्यत्वाची मुदत दोन वर्ष असतानाही सदस्यांचे राजीनामे घेण्यावरून भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. स्थायीच्या सदस्यांना एक वर्षाचा नियम असेल तर महापौर, उपमहापौरपदाचा कार्यकाळ सुद्धा सव्वा वर्षासाठीच असल्याचे पक्षाने जाहीर केले होते. महापौर व उपमहापौरांकडूनही राजीनामे का घेतले नाहीत, असे सांगत स्थायीतील काही सदस्यांनी पक्षाची कोंडी करीत बंडाची तयारी केली आहे.

महापालिकेच्या विद्यमान स्थायी समितीचा कार्यका‌ळ हा २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन सदस्य नियुक्तीच्या हालचाली सत्ताधारी भाजपकडून सुरू आहेत. सदस्यांची मुदत नियमाप्रमाणे दोन वर्षांची असली तरी सर्वांना संधी मिळावी यासाठी पक्षाने प्रत्येकाला एक वर्षाचाच कार्यकाळ निश्चित केला आहे. त्यामुळे यंदाही सर्वच्या सर्व ९ सदस्य भाजपकडून बदलले जाणार आहेत. त्यातच लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका असल्याने भाजपकडून नाराजांना या समितीवर पाठविण्याची तयारी केली जात आहे. तर आताच संधी असल्याचे बघून पक्षावर नगरसेवकांनी स्थायीवर जाण्यासाठी लॉबिंग सुरू केली आहे. स्थायी समितीमध्ये १६ पैकी ९ सदस्य भाजपचे, चार शिवसेनेचे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक सदस्य आहे. इतर पक्षांकडूनही आता नवीन सदस्यांना संधी दिली जाणार आहे. परंतु, गेल्या वेळेस भाजपने एकाच वेळी तीन ते चार मातब्बर नगरसेवकांना स्थायीवर पाठवून सभापतीपदासाठी झुंजवले होते. परंतु, ऐनवेळी हिमगौरी आहेर-आडके यांना सभापती पदासाठी संधी दिली होती. त्यामुळे मातब्बर इच्छुक नाराज झाले होते. याच मातब्बरांकडून आता भाजपसमोर अडचणी उभ्या केल्या जाण्याची शक्यता असून, राजीनाम्यास नकारघंटा कळवली जात आहे. त्यामुळे भाजपसमोर बंडाचा धोका निर्माण झाला आहे.

आम्हाला वेगळा न्याय का?

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौर व उपमहापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा करण्याचे निश्‍चित झाले होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महापौर व उपमहापौरांचे राजीनामे दाखवत, सव्वा वर्षाचा कार्यकाळा घोषित केला होता. परंतु, सव्वा वर्ष उलटून त्यांचे राजीनामे पक्षाने घेतलेच नाहीत. पालिकेत सत्ता येवून दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्यापही राजीनामे न घेतल्याने आम्हालाच वेगळा न्याय का, असा सवाल हे सदस्य करीत आहेत. त्यामुळे आम्हाला नियमाप्रमाणे दोन वर्ष पूर्ण करू द्या, अशी आग्रही मागणी या सदस्यांनी केली आहे. अन्यथा दुसरा पर्यायही खुला असल्याचा इशारा दिल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक नाशिकची उपेक्षाच

0
0

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांनी भाजपला निवडून दिले, मुख्यंत्र्यांनी दत्तक घेतल्याची घोषणा केली पण, नंतर काय दिले. भुजबळांनी जो विकास केला तो साडेचार वर्षांत झाला का, आहेत ते उद्योग बंद पडले, बेरोजगारी, गुन्हेगारी वाढली, असा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली परिवर्तन यात्रा सिन्नर, घोटी येथून नाशिकला आल्यानंतर सिडको येथे झालेल्या जाहीर सभेत पवारांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजीमंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, भाजप सरकार घोषणा, आश्वासन देण्यापलिकडे काही करीत नाही. आज देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. घटनात्मक संस्था अडचणीत आल्या आहेत. देश चुकीच्या दिशेने जात आहे. कामगार देशोधडीला लागले आहेत. अंबानी, अदानी श्रीमंत होत आहेत, तर गरीब आणखी गरीब होत आहे. शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. लोकांनी जगावे तरी कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

..

आज तीन ठिकाणी सभा

आज, गुरुवारी दिंडोरी येथे दुपारी ११ वाजता, सायखेडा येथे दुपारी ३ वाजता सभा होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील शेवटची परिवर्तन सभा सायंकाळी ६ वाजता महर्षी वाल्मिकी स्टेडियम, मनमाड येथे होणार आहे.

...

'अच्छे दिन'ला जनता वैतागली : धनंजय मुंडे

मोदी सरकार हे जनतेची लूट करणारे सरकार आहे. लुटारू सरकारला हटविण्याची वेळ आली आहे. 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या सरकारला जनता आता वैतागली आहे. सरकारला खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे यांनी घोटी येथे व्यक्त केला.

...

सरकार भांडण लावत आहे : भुजबळ

निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींनी खुश करण्यासाठी गाजर दाखवले जात आहे. सरकारने अगोदर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे द्यावेत. हे सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचे काम करीत आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत इमारती सौरऊर्जेने झळाळणार

0
0

राज्यभरात ३२०० मेगावॅट क्षमतेचे उभारणार प्रकल्प

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पुढील दोन वर्षांत महावितरणद्वारे राज्यात ३२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महावितरणच्या राज्यातील १६ विभागांतील प्रत्येक मुख्य अभियंत्यांना २०० मेगावॅट सोलर प्रकल्प उभारण्याबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. या सौरऊर्जेचा वापर सर्व ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी केला जाणार असल्याने येत्या काळात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या इमारती सौरऊर्जेने झळाळणार आहेत.

राज्यातील सर्व नळयोजना, उपसासिंचन योजना (खाजगी व शासकीय) तसेच ग्रामपंचायतींमधील सर्व शासकीय इमारतींना (शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, आरोग्य केंद्रे) सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासंदर्भात नुकतीच एक राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणाअंतर्गत विविध योजना राबविण्याबाबत चर्चा झाली. या योजनेसाठी ५०० कोटींचे बजेट तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ऊर्जासंवर्धन धोरणाअंतर्गत पहिल्या टप्प्यात महावितरणकडून या योजना राबविण्यात येतील.

मार्चपर्यंत मुदत

एचव्हीडीएस, इन्फ्रा-२, दिनदयाल उपाध्याय व आय‍पीडीएस योजनांच्या अंमलबजावणीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. मार्च २०१९ पर्यंत इन्फ्रा २, दिनदयाल उपाध्याय तसेच आयपीडीएस योजनेचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याची डेडलाइन महावितरणला देण्यात आली. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे व नांदेड विभागात आयपीडीएसची कामे महानगर पालिकेद्वारे रस्ता पुर्नस्थापना दर मान्य न केल्यामुळे पूर्ण झाली नाहीत. ती पूर्ण करावीत तसेच एचव्हीडीएस योजनेत ज्या भागात विद्युत वाहक यंत्रणा पोहचणे शक्य नाही, त्या भागात सोलर कृषीपंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ७५० मेगावॅट सोलर प्रकल्प महाजनकोद्वारे राबवण्यात येणार आहेत. यापुढे सौरऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरणकडून तर महाजनकोकडून मोठे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण प्रकल्प संचालकपदी खंडाईत

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदावर भालचंद्र खंडाईत यांची नुकतीच निवड झाली आहे. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

भालचंद्र खंडाईत हे मुळचे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतील सानगडी येथील रहिवासी असून १९८९ मध्ये चंद्रपूर परिमंडलातील नवरगाव वितरण केंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून ते वीज मंडळात रुजू झाले होते. पुढे काटोल, कॉग्रेसनागर येथे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांची २०११ मध्ये मुंबई मुख्यालयात अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती झाली. २०१७ मध्ये त्यांची प्रादेशिक संचालक म्हणून नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात निवड झाली होती. प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत असताना सौभाग्य योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ऐटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी तेथील गावकऱ्यांसोबत चर्चा करून ऊर्जीकरणाची कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच राज्यात एचव्हीडीएस योजनेचे काम सर्वप्रथम नागपूर विभागात त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चटावलेल्यांनाच टाळूवरचे लोणी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वधर्मियांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेचा प्रस्ताव आरोग्य विभागाने स्थायी समितीवर ठेवला असून, यात वादग्रस्त ठेकेदारांनी ठेका मिळवण्याची तयारी केल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

महापालिकेमार्फत शहरात २००३ सालापासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबवली जात आहे. सहा विभागांत सर्वधर्मियांच्या मिळून १८ स्मशानभूमी आहेत. महिन्याकाठी साधारणतः ५०० ते ६०० मृतदेहांचे दहन वा दफन केले जात असल्याचा नाशिक महापालिकेचा अंदाज आहे. प्रत्येक मृतदेहासाठी ८ मण लाकूड, ५ लिटर रॉकेल, एक मडके तसेच गोवऱ्या दिल्या जातात. त्यासाठी महापालिकेकडून ठेकेदाराला विशिष्ट रक्कम अदा केली जाते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून काही ठेकेदारांनी रिंग करून वारंवार मुदतवाढ करून ठेका कायम ठेवला होता. त्यामुळे गेल्या वर्षी स्थायी समितीच्या बैठकीत मोफत अंत्यसंस्काराचा ठेक्यावरून वादळी चर्चा झाली होती. पंचवटी आणि नाशिकरोड येथील ठेकेदार मापात पाप करून मृतांच्याही टाळूवरचे लोणी खात असल्याचा आरोप नगरसेवक जगदीश पाटील यांनी केला होता. लाकूड आणि रॉकेलचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याचा आरोप पुराव्यानिशी केला होता. त्यावरून सभापतींनी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच, वारंवार मुदतवाढ न देण्याचेही आदेश देत निविदा प्रक्रिया राबविण्याची कारवाई करा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने निविदा प्रक्रिया राबवली असून, त्यात सहा विभागांसाठी ठेकेदारांची निश्चिती केली आहे. परंतु, यात पुन्हा यापूर्वीच वादग्रस्त ठरलेले व काळ्या यादीतील ठेकेदार पात्र ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा वाद होणार आहे. यापूर्वीच्या वादग्रस्त ठेकेदारांची पार्श्वभूमी न तपासताच तसेच काही ठेकेदारांचा काळ्या यादीतील समावेशाबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असतानाच पुन्हा त्यांनाच ठेका देण्याची घाई आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

पद्धत एकच; पण दर वेगवेगळे

एका व्यक्तीवर मोफत अंत्यसंस्कारासाठी कमीत कमी १७३१ तर जास्तीत जास्त २४०० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे दोन ठेकेदारांमध्ये तब्बल साडेसहाशे रुपयांचा फरक आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत विचारणा करण्याची तयारी सदस्यांनी सुरू केली आहे. लिंगायत, गोसावी, नाथपंथी आणि गवळी समजाच्या दफन विधीसाठी आडवा खड्डा खोदल्यावर २५०० रुपये आणि उभा खड्डा खोदल्यावर २७०० रुपये दिले जातात. त्याचवेळी मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी २७०० रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे यातही ठेकेदारनिहाय वेगवेगळे दर लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

पात्र ठेकेदार

विभाग निविदाधारकाचे नाव प्रतिव्यक्ती रक्कम

नाशिक रोड एन. एस. मालपाणी २२९०

नाशिक पूर्व श्री लक्ष्मी विजय सॉ मिल १७३१

पंचवटी श्री लक्ष्मी विजय सॉ मिल १७३१

सातपूर सैय्यद तुराब अली रेहमततुल्ला २४००

नवीन नाशिक यश एंटरप्रायजेस २०६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक हत्याप्रकरणी दोघे ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील सुपरमार्केटच्या मालकाचा खून करून तब्बल सहा लाखांची रोकड लांबविल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. घटनेच्या मुख्य सुत्रधारासह तिघेजण अजूनही पसार असून यापूर्वीही संबंधित व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी संशयितांकडून जप्त करण्यात आली असली तरी मुद्देमाल मिळू न शकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

इंदिरानगर परिसरातील सुपर मार्केटचे मालक अविनाश महादेव शिंदे हे आपल्या चार वर्षांच्या मुलासमवेत घरी जात असताना रोकड लुटण्यासाठी दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार मंगळवारी (दि. ८) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. प्रतिकार करणाऱ्या शिंदे यांना धारदार हत्यारांनी भोसकण्यात आले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सहा लाखांची रोकड हिसकावून हल्लेखोरांनी पोबारा केला. या गुन्ह्याची उकल करून संशयितांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील काही संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी या गुन्ह्याचा तपास करीत चिमा नाना पवार (रा. धामणगाव आवारी, ता. अकोले, जि. अहमदनगर) आणि सुनील रामचंद्र पवार या दोघांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही पंचवटी, फुलेनगर परिसरात वास्तव्यास आहेत. पोलिस आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागल्याने घटनेच्या मुख्य सूत्रधारासह तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. फरार झालेल्यापैकी एका संशयितावर गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल असून त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी दिली. संशयित हे पाइपलाइनसाठी खड्डे खोदण्याचे काम करतात. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांनी हा दरोड्याचा मार्ग अवलंबल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पत्नीसोबत असल्याने फसला प्रयत्न

लूटमार करण्यापूर्वी संशयितांनी रेकी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. शिंदे यांच्या सुपर मार्केटच्या बाजूला एक वाइन शॉप आहे. मद्य खरेदीच्या बहाण्याने संशयित तेथे येत. बिसलरीच्या बाटलीमध्ये मद्य टाकून तेथील हालचालींवर बारीक लक्ष ठेवत. एकदा दोरी बांधलेल्या बकेटमधून शिंदे यांच्या कुटुंबीयांनी घरातून त्यांना पैसे दिल्याचे निरीक्षण संशयितांनी नोंदविले होते. लूटमारीच्या उद्देशाने २ जानेवारीलाच तयारी केली होती. परंतु, शिंदे यांच्या समवेत त्यांची पत्नीही असल्याने त्यावेळी प्रयत्न फसला. त्यानंतर ८ जानेवारीला ही लूटमार करण्यात आली.

पोलिसांची अडथळ्यांवर मात

गुन्ह्यात परप्रांतीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करीत होते. सीसीटीव्हीचे फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिस संशयित स्थानिक गुन्हेगार सहभागी असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. परिसरातील अनेक व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांजवळ सीसीटीव्ही बसविले आहेत. परंतु काही कॅमेऱ्यांच्या समोरच फुलमाळा आल्याने संशयित हालचाली ठळकपणे टिपण्यात अडचणी आल्या. त्यामुळे तपासात अडथळे आले. सीसीटीव्हीच्या टप्प्यातील परिसर मोकळा ठेवावा, मोठ्या प्रमाणावर रोकड बाळगणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांनी रोकड बाळगतेवेळी प्रत्येकवेळी एकाच पद्धतीचा अवलंब करणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा गौरव

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

विधी आयोगाच्या अहवालानुसार अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींना वेळेवर उपचार मिळाल्यास अपघातात मृत्यूंची संख्या कमी होऊ शकते. यादृष्टीने अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांच्या वतीने अपघातात मदत करणाऱ्या व्यक्तींना 'रस्ता सुरक्षा अभियान, २०१९' अंतर्गत गौरवण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केलेली असेल, त्याची माहिती दि. ३१ जानेवारी २०१९ पर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, खटला विभाग नाशिक यांच्याकडे उपस्थित राहून, अथवा रजिस्टर पोस्टाने कार्यालयाकडे सादर करावी. मदतीचा द्यावा लागणारा तपशील १)अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता, छायाचित्र व मोबाइल नंबर २) अपघातग्रस्तांना मदत केल्याची तारीख, वेळ आणि ठिकाण तसेच थोडक्यात माहिती ३) अपघात ग्रस्त व्यक्तीचा संपर्क क्रमांक (असल्यास) ४) पोलिस विभाग, आरोग्य विभाग यांनी याबाबतचे प्रशस्ती दिलेले असल्यास ५) उपलब्ध असणारे सरकारी व इतर कोणतेही कागदपत्र, ६) वर्तमानपत्रातील बातमीपत्र, अपघात परिस्थिती विशद करणारे छायाचित्र. दि. ३१ जानेवारीपर्यंत ज्यांचे अर्ज मिळतील, अशांची तपासणी करण्यात येऊन सदर व्यक्तींची निवड करण्यात येईल. अशा व्यक्तींचा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर ऑडिटसाठी अल्टिमेटम

0
0

- ८० टक्के इमारती फायर ऑडिटविना

- १५ फेब्रुवारीपर्यंत ऑडिटचे मनपाचे आवाहन

- १५ मीटरपेक्षा जास्त उंच इमारतींना ऑडिट अनिवार्य

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंधरा मीटरपेक्षा अधिक उंचीच्या रहिवाशी इमारतींसह व्यापारी संकुले, शालेय इमारती, रुग्णालये आणि शासकीय इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविणे आवश्यक असून, दरवर्षी ती यंत्रणा कार्यक्षम असल्याचे सक्षमता प्रमाणपत्र (फायर ऑडिट) पालिकेकडून प्राप्त करून घेण्याचे बंधन आहे. परंतु, शहरातील ८० टक्के इमारतींकडून या नियमाचे पालन होत नसल्याने पालिकेने नागरिकांना आता १५ फेब्रुवारीपर्यंत अखेरची संधी उपलब्ध करून दिली आहे.

महापालिकेने जाहीर नोटीसद्वारे नागरिकांना सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले असून, त्याला प्रतिसाद न दिल्यास थेट इमारती या वापरायोग्य नसल्याचे घोषित करण्याचा इशारा दिला आहे. पंधरा मीटरपेक्षा उंच सर्व प्रकारच्या व्यावसायिक, रहिवासी इमारतींना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविल्यानंतर दरवर्षी जानेवारी व जुलै अशा सहा महिन्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दल व आणीबाणी सेवा विभागाकडून ती यंत्रणा कार्यक्षम असल्याचा दाखला घेणे बंधनकारक आहे. अनेक वर्षांपासून महापालिकेच्या अग्निशामक व आणीबाणी सेवेतर्फे ऑडिटच्या सूचना दिल्या असून, त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे महापालिकेने फायर ऑडिट करण्याचे आवाहन केले असून, १५ फेब्रुवारीपर्यंत अखेरची मुदत दिली आहे. त्यानंतर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

..

वीजपुरवठा होऊ शकतो खंडित

फायर ऑडिट न केल्यास संबंधित इमारती या वापरायोग्य नसल्याचे घोषित करूनही नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, तर कायद्याप्रमाणे इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करणे व इमारती सील करण्याचाही पर्याय पालिकेपुढे आहे. त्यामुळे पालिकेने प्रथम नागरिकांना महिनाभराची संधी देऊन कार्यवाही करण्यासाठी आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‘सायकलिंग ब्रेव्हे’

0
0

नाशिक : नाशिकमध्ये १ हजार २०० किलोमीटरची सायकलिंग ब्रेव्हे स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेत १० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. यामध्ये नाशिकचे ५, पुण्याचे ३, तर मुंबईच्या २ सायकलिस्टचा सहभाग आहे. हे सायकलिस्ट नाशिक ते भोपाळ आणि भोपाळ ते नाशिक हे अंतर ९० तासांत पूर्ण करणार आहे. नाशिकमध्ये प्रथमच सायकलिंग ब्रेव्हे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वी सायसपूर्वी २००, ४००, ६०० आणि १ हजार किलोमीटरच्या ब्रेव्हे स्पर्धा देशातील विविध भागात झाल्या आहेत. नाशिकमधून गुरूवारी (१७ जानेवारी) सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. नाशिक, धुळे, मणपूर, भोपाळ असा स्पर्धेचा मार्ग असेल. भोपाळपासून सायकलिस्ट पुन्हा मणपूर, धुळे मार्गे नाशिकला पोहोचतील. यासाठी स्पर्धकांना पाच दिवसांचा अवधी दिला असून, ९० तासांत हे अंतर पूर्ण करायचे आहे. कोणत्याही व्यक्तिच्या सहकार्याशिवाय स्वत:च्या हिंमतीवर आणि सायकलिंगच्या जोरावर ही स्पर्धा पूर्ण करावी लागत असल्याने, या स्पर्धेला ब्रेव्हे असे म्हटले जाते. स्पर्धेत आशिष भट्टड, चंद्रभान पालवे, बाळासाहेब वाकचौरे, हिमांशु थुसे आणि निलेश वाकचौरे हे नाशिक सायकलिस्ट सहभागी होतील. तर अमोल कानवडे, विजय सानप व अजित माने हे पुण्याचे, तसेच सिद्धार्थ भामरे आणि सतीश शर्मा हे मुंबईचे स्पर्धेक सहभागी होणार आहेत. यशवंत मुधोळकर हे या स्पर्धेचे व्यवस्थापक असून, स्पर्धकांना नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खबिया यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या हत्येप्रकरणी नऊ संशयित ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रिणीशी ठेवलेल्या प्रेमसंबंधांमूळे उद्भवलेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भिमवाडी झोपडपट्टी परिसरात संक्रांतीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत.

अरबाज शेरू पठाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल बापू कापसे (वय २१), बॉबी बथुवेल जगदाने (वय १९), विशाल बेकारू भगवती (वय १८), राहुल दत्तू लहांगे (वय १८ सर्व रा. मल्हारखान,अशोकस्तंभ), अनिकेत नितीन टोपले (वय २०, रा. गोळे कॉलनी, अशोक स्तंभ), गौरव दिलीप उन्हवणे (वय १८, रा. काकडबाग, गंगापूर रोड) अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य तिघे अल्पवयीन आहेत.

कुणाल अनिल कोरडे (वय १८, रा. भिमवाडी झोपडपट्टी, गंजमाळ) याने फिर्याद दिली आहे. याखेरीज अन्य तिन अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल अनिल कोरडे याने त्यांचा मित्र कुणाल कापसे याच्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याने दोहोंमध्ये वाद उद्भवला. कुणाल कोरडे याने त्याचा जिवलग मित्र असलेल्या अरबाज पठाण याला तेथे बोलावून घेतले. पठाण याने तेथे असलेल्या विशाल भगवती याच्या मडक्या नावाच्या मित्राला दोन-तीन चापटी मारून तेथून हाकलून दिले. रात्री नऊच्या सुमारास कुणाल कोरडे हा अरबाज, रोहित, विजय, उमेश व छोट्या हे सर्वजण भिमवाडीत बिबनाबाई पठाण यांच्या घरासमोर गप्पा मारत होते. त्यावेळी कुणाल पगारे उर्फ मडक्या, विशाल भगवती यांनी त्यांच्या काही मित्रांना तेथे बोलावून घेतले. त्या सर्वांनी कुणाल कोरडे आणि अरबाज पठाण यांना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. बॉबी जगदाने याने चॉपरने तर विशाल भगवती याने चाकूने अरबाज याच्या छातीवर, पोटावर, हातावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांसाठी ‘अब दिल्ली दूर नही’

0
0

जेलरोड:

उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली अतिवेगवान राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वेच्या मार्गाने १९ जानेवारीपासून धावणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकादरम्यान धावणारी गाडी नाशिकरोड, मनमाड, भुसावळ येथे थांबणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईत जाऊन दिल्लीची गाडी पकडावी लागणार नाही. केवळ १७ तासांत नाशिककरांना दिल्लीत पोहचणे शक्य होणार आहे. गाडीला घाटामध्ये पुश-पुल तंत्र वापरले जाणार असल्याने वेळेत बचत होणार आहे.

नाशिक, नगर, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, धुळे येथील रेल्वे प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी मुंबई येथून रेल्वेगाडी पकडावी लागत असे. यामुळे वेळ आणि पैसे यांचा भुर्दंड बसत होता. तसेच शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागत होता. आता त्यातून सुटका होणार आहे. खासदार गोडसे यांनी राजधानी एक्सप्रेस पश्चिमऐवजी मध्य रेल्वे मार्गाने धावावी यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तसेच विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. राज्यात मध्य रेल्वेचे ४६५ किमीचे जाळे असूनही दिल्लीला जाण्यासाठी अतिवेगवान रेल्वेगाडी उपलब्ध नसल्याचे गोडसे यांनी रेल्वे मंत्रालयाचे सचिव प्रवीण गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

आठवड्यातून दोनदा

राजधानी एक्सप्रेस मुंबई-कल्याण, नाशिक-मनमाड-भुसावळ या रेल्वेस्थानकांवरुन दिल्लीकडे रवाना होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बुधवार आणि शनिवारी मुंबईहून ही गाडी मध्य रेल्वेमार्गे धावेल. मुंबईहून ही गाडी दुपारी २.२० वाजता सुटणार असून, दिल्लीत दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० वाजता दिल्लीत पोहचेल. येताना दिल्लीहून गुरुवारी आणि रविवारी सुटणार आहे. दिल्लीहून ती दुपारी ३.४५ वाजता सुटून मुंबईला सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. शनिवारी सायंकाळी प्रथमच ही गाडी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणार असल्याने शिवसेना कार्यकर्ते, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी स्वागताला उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही टोकांना इंजिन

राजधानी एक्सप्रेससाठी पुश-पुल तंत्र वापरले आहे. या तंत्रात रेल्वेगाडीच्या दोन्ही टोकांना इंजिन असते. दोन्ही इंजिने रेल्वेला एकाच दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करतात. घाटात पुढील इंजिन गाडीला ओढते तर मागील इंजिन पुढे ढकलते. कसारासारख्या अवघड घाटात पुश-पुल तंत्र वापरणे आवश्यक आहे. सध्या अतिरिक्त इंजिन (बॅकर) संबंधित रेल्वेस्थानकांमध्ये गाडीला जोडले जाते. त्यामुळे गाडी घाट जोमाने चढते; मात्र, इंजिन जोडण्यासाठी कसारा आणि इगतपुरीत गाडीला वीस मिनिटे जास्त लागतात. राजधानी एक्सप्रेसला मुंबईपासूनच मागेही इंजिन जोडले जाणार असल्याने गाडीला इगतपुरी, कसाऱ्यात थांबावे लागणार नाही. पुश-पुल तंत्राच्या सहाय्याने मुंबई विभागातील कसारा आणि इगतपुरी दरम्यानच्या घाटांच्या प्रदेशात राजधानी एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. चाचण्या समाधानकारक झाल्याने गाडीला हिरवा झेंडा मिळाला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पुश-पुल ट्रायल्स लवकरात लवकर पूर्ण करुन गाडी नियमितपणे सोडण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारराजासाठी टोल फ्री क्रमांक

0
0

जिल्हास्तरावर प्रशासनाचा पहिलाच उपक्रम

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : राज्यासह देशात निवडणुकांचे वारे वाहत असून मतदारांच्या शंका निरसनासाठी निवडणूक विभागाने पुढचे पाऊल टाकले आहे. जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक विभागाची टोल फ्री सुविधा निर्माण करण्यात आली असून हा टोल फ्री क्रमांक आता कायमस्वरुपी कार्यान्वित राहणार आहे. १८००२५३३१९५० या टोल फ्री क्रमांकावरून नागरिक निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती जाणून घेतानाच तक्रारी, सूचना आणि अभिप्राय देखील नोंदवू शकणार आहेत. विशेष म्हणजे या क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज जतन केले जाणार असून तक्रारीचा ऑनलाइन पाठपुरावा तक्रारदार करू शकणार आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे राबवितानाच मतदानाचा टक्का वाढविण्यावर निवडणूक आयोगाचा यंदा विशेष जोर आहे. त्यामुळेच दोषरहित मतदार यादी बनविण्यासह निवडणूक प्रक्रीयेबाबतची विश्वासार्हता वाढविण्याकरीता निवडणूक आयोग कमालीचा आग्रही असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुर्वीच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबतची विश्वासार्हता वाढावा, यासाठी जनतेमध्ये जाऊन त्याबाबतची प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत. याखेरीज विविध स्तरावर मतदान प्रक्रीयेविषयी जनजागृती सुरू आहे. आता यापुढचे पाऊल टाकत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने जिल्ह्यातील मतदारांसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. तूर्तास या टोल फ्री क्रमांकावर लँड लाइनद्वारे संपर्क साधता येत असला तरी मोबाइलद्वारेही त्यावर लवकरच संपर्क साधता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

शंका निरसन होणार

सद्यस्थितीत सकाळी ९ ते रात्री ८ या कालावधीत १८००२५३३१९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार आणि मतदान याविषयीची माहिती घेण्यासाठी नागरिक संपर्क साधू शकतील. मतदारयादीमध्ये नाव कसे नोंदवावे, या प्राथमिक स्वरूपाच्या माहितीसह निवडणूक प्रणालीशी संबंधित दुरुस्त्या कशा कराव्यात व मतदान प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही शंकांचे निरसन नागरिकांना येथे करवून घेता येणार आहे.

तर तक्रारीचा पाठपुरावाही शक्य

तक्रार सहज सुटण्यासारखी असेल तर संबंधितांकडून फोनद्वारे माहिती देऊन ती लगेचच सोडविली जाईल. या टोल फ्री क्रमांकावर येणारा प्रत्येक कॉल राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणाली (नॅशनल ग्रिव्हान्सेस सर्व्हिस पोर्टल) वर जतन केला जाणार आहे. तक्रारीच्या निरसनाला काही कालावधी लागणार असेल तर संबंधित तक्रारदाराचा आयडी क्रमांक तयार होईल. तो निवडणूक शाखेकडून संबंधित तक्रारदाराला दिला जाईल. या क्रमांकाच्या आधारे या प्रणालीवर तक्रारीसंदर्भात पाठपुरावा करता येणार आहे. परंतु, मोबाइल पोर्टेलिटीवर टोल फ्रीची सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच ते होऊ शकेल असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

जिल्हास्तरावर पहिल्यांदाच निवडणूक विभागाचा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. यापुढे तो जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेत कायमस्वरुपी कार्यान्वित राहील. टोल फ्री क्रमाकांवर संवाद साधण्यासाठी कर्मचारी नियुक्त केला असून नागरिकांच्या शंकाचे तो कशाप्रकारे निरसन करतो यावर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. प्रत्येक कॉलचे रेकॉर्डींग तसेच सीसीटीव्ही फुटेज राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणालीकडे जतन केले जाणार आहे. नागरिकांनी या टोल फ्री सेवेचा लाभ घ्यावा.

- गणेश राठोड, तहसीलदार निवडणूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरला ‘हॅप्पी स्ट्रीट’चा कल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने रविवारी (दि.२० जानेवारी) सकाळी ७ ते ९ या वेळेत गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी झुंबा, जादूचे खेळ, कॅलिग्राफीची नजाकत, जुन्या गाड्यांचा नजराणा अशा अनेक गोष्टी नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स आणि 'हॅप्पी स्ट्रीट' हे जणू समीकरणच झाले आहे. दर्जेदार बातम्यांबरोबरच वाचकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मटाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून 'हॅप्पी स्ट्रीट'ने नाशिककरांना अक्षरश: वेड लावले आहे. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटांतील व्यक्ती या उपक्रमाची वाट पाहत असतात. मागील आठवड्यात नाशिकरोड व त्या अगोदर व्हिरिडीयन व्हॅली व कॉलेजरोड येथे झालेल्या 'हॅप्पी स्ट्रीट'ला नाशिककरांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लहान मुलांसाठी विविध खेळ खेळण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जादूचे प्रयोगदेखील सादर केले जाणार आहेत. क्लासिकल व वेस्टर्न म्युझिकचा बॅँड सादर होणार आहे. कॅलिग्राफीचे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत. झुंबासाठी स्वतंत्र टीम असेल. इंग्रजी, हिंदी, मराठी गीतांच्या चालीवर थिरकण्याची मजा यावेळी अनुभवता येईल.

कलाकारांना नाव नोंदविण्याची संधी

तुमची कला 'हॅप्पी स्ट्रीट'वर सादर करण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धनगर समाजाचे नेते अण्णा विश्राम सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. १६) दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या हातातील रॉकेलचा डबा शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागातील पोलिस कर्मचारी नरेंद्रसिंह कचवाह, भूषण खेडवण व सहकाऱ्यांनी हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला.

तालुक्यातील उडाणे गावातील इंदाई देवी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक मंडळ संचलित आश्रमशाळा जळीत प्रकरणी दाखल गुन्हाचा योग्य तपास करून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आत्मदहनाचा इशारा अण्णा सूर्यवंशी यांनी दिला होता. मात्र, याबाबत पोलिस विभागाने दखल घेतली नाही, म्हणून बुधवारी अचानक त्यांनी अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला. पोलिस विभागाकडून याबाबत योग्य तो तपास करून आश्रमशाळा जळीत प्रकरणी दोषीवर कठारे कारवाई करण्याचे आश्वासन शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांनी दिले आहेत. जर येत्या काही दिवसात न्याय न मिळाल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांवरून उडी घेवून आत्महत्या करेल, असा इशारा पोलिस यंत्रणेला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट चालकावर गुन्हा

0
0

भुशा पॉईंटच्या घटनेत मृतांचा आकडा सातवर; प्रशासनाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी (दि. १५) नर्मदा नदीत क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवासी बसल्याने बोट पाण्यात उलटल्याची घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. यात बुधवारी (दि. १६) मोनिका विरसिंग पावरा (वय ५) व चिमल भाईदास पावरा या दोघांचे महाराष्ट्र व गुजरात आपत्ती निवारण विभागास मृतदेह सापडले आहेत. यामुळे आता मृतांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख मदत देण्याचे जाहीर केले. तर बोटचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मकरसंक्रांतीला भुशा पॉईंटवर बोट उलटल्याने पाच भाविकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बुधवारी (दि. १६) आणखी दोन जणांची वाढ झाली असून, शोध पथकाला सकाळी दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेतील बोटचालक मालक वसंत भामट्या पावरा यांच्यावर कलम ३०४ प्रमाणे धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बोटीचा पंचनामा करून बोट जप्त करण्यात आली असून, मृत सातही जणांवर बुधवारी दुपारी तेलखेडी गावात शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी धडगाव तालुक्यातील विविध पाडे व गावांतून हजारोच्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते.

अशी घडली घटना
धडगाव तालुक्यातील भूशा गाव उदय आणि नर्मदाच्या नदीच्या संगमावर वसले आहे. दरवर्षी संक्रांतीला या ठिकाणी भाविक नर्मदा नदीची पूजा आणि स्नान करण्यासाठी येतात. याठिकाणी सर्व आदिवासी भाविक एकत्र येतात आणि त्यांना भूशा पॉईंटवरून दुसऱ्या ठिकाणी काठावर जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. यावर्षीदेखील संक्रांतीला मंगळवारी भाविक नदीपूजनासाठी आले होते. यात एका बंदिस्त बोटीमध्ये जवळपास ७० भाविक बसले. मात्र, या बोटीची क्षमता केवळ ३० जणांची होती. त्यामुळे ही बोट अवघ्या १५ ते २० फुटांपर्यंत गेल्यानंतर वजनाने एका बाजूला उलटली आणि बोटीतील भाविकांचा जीव गुदमरू लागला. बोटीतील महिला व बालके आरडाओरड करू लागल्याने जवळच असलेल्या भाविकांनी नदीत उड्या घेवून बचावकार्य सुरू केले. मात्र, यात ७० पैकी ७ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर उर्वरितांपैकी ज्यांना पोहता येत होते त्यांनी काठ गाठून आपले प्राण वाचविले. जिल्हा प्रशासनाकडून अजूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

धोका पत्करून जीवदान दिले
बोट उलटल्याची घटना घडल्यानंतर मदतकार्य करताना मगरींचा मोठा धोका निर्माण झाला होता. नर्मदा नदीत मोठ्या प्रमाणावर मगर असल्याने व स्थानिकांना याची माहिती असल्याने तेथे मदत करणाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता नदीत उड्या घेतल्या. त्यांनी या वेळी बोटीतील बुडालेल्या अनेकांना काठापर्यंत सुरक्षित आणण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. नर्मदा नदीतील मगरींबाबत जिल्हा प्रशासनासह स्थानिकांना माहिती होती. मात्र, बचावकार्यात सर्वांनीच प्रयत्न करून अनेकांना जीवदान दिले आहे.

धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीवरील भुशा येथे बोट उलटल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करण्यात आले. पुन्हा एकदा नदीत शोध कार्य सुरू असून, याबाबत बोट चालकासह संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
-डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत, हिंदीच्या कृतिपत्रिकेवर मार्गदर्शन

0
0

रेषा एज्युकेशन सेंटरसोबत 'मटा'चा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदललेली पाठ्यपुस्तके आणि मूल्यमापन पदधती यांना सोबत घेऊन दहावीचे विद्यार्थी यंदा कृतिपत्रिकेवर आधारित परीक्षेस सामोरे जाणार आहेत. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यामध्ये नेमका फरक काय, हे इतर विषयांच्या बाबतीत समजावून घेतल्यानंतर आता अंतिम टप्प्यात हिंदी आणि संस्कृत या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या दोन्ही विषयांच्या कृतिपत्रिकेसंदर्भात विद्यार्थ्यांना रविवारी (दि. २०) मार्गदर्शन केले जाणार आहे.

पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यातील फरक, कृतिपत्रिका सोडविताना घ्यायची काळजी आदी मुद्द्यांवर यावेळी संस्कृत विषयासाठी मार्गदर्शक कुमुदीनी फेगडे आणि हिंदी विषयासाठी मार्गदर्शक सुरेखा बोंडे या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी व पालक सहभागी होऊ शकतात.

येथे साधा संपर्क

कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असला तरीही यासाठी नोंदणी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत या विषयाचे मार्गदर्शन रविवारी सकाळी १० ते ११.३० या वेळेत तर हिंदी या विषयाचे मार्गदर्शन दुपारी १२ ते १.३० या वेळेत मिळेल. अधिक माहिती व नोंदणीसाठी रेषा एज्युकेशन सेंटर, ३ ब, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूर रोड या पत्त्यावर किंवा ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना उद्योजकतेचे धडे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर व मिटकॉन तर्फे एक महिना ३० महिलांना उद्योजकतेचे धडे देण्यात आले. त्यानंतर या महिलांना प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागाचे प्रमाणपत्र व उद्योग आधार नोंदणीपत्राचे वाटप स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, महिला समितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या प्रशिक्षणात ३० महिलांनी उद्योग सुरू केले हे विशेष.

महिला घरातील शक्तीस्थान आहे. नियमित कामे सांभाळून त्या इतर कामे उत्तम प्रकारे करतात. एकाचवेळी अनेक कामे करण्याची कला त्यांना उपजत असते. त्यामुळे महिलांनी व्यापार-उद्योग केला पाहिजे. कुठलाही कमीपणा न बाळगता विचारावे व प्रगती करा असे सांगत स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उद्योजकता विकास प्रशिक्षणाची चौथी बॅच आहे. तीन दशकांपूर्वी नाशिकमध्ये असाच प्रशिक्षण वर्ग घेतल्यानंतर चेंबरच्या पाठपुराव्याची दखल घेऊन औद्योगिक वसाहतीत के झोनमध्ये महिलांसाठी वेगळी जागा आरक्षित करण्यात आल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष मंडलेचा यांनी सांगितले. तसेच याआधीच्या प्रशिक्षणार्थीसाठी नाशिकमध्ये फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. आताच्या वर्गाच्या प्रशिक्षणार्थीही यशस्वी उद्योजिका बनतील व चेंबर त्यांना नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

महिला समितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे यांनी प्रास्ताविक केले. नीता वैद्य यांनी स्वागत केले हेमा दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपा चांगरानी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचएएल’कडे भरपूर काम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)कडे कामाची कुठलीही कमी नााही. त्यांच्याकडे भरपूर काम आहे. विद्यमान केंद्र सरकारने २८ हजार कोटी रुपयांच्या कामावर स्वाक्षरी झाली आहे, तर ७३ हजार कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव आहेत. त्यावरही लवकरच अंतिम निर्णय होईल. त्यामुळे एचएएलविषयी कुठलेही संभ्रम नसून, संरक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान भरीव राहणार आहे.' असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.

डिफेन्स हबच्या घोषणेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले,'नवीन संरक्षण धोरणानुसार लघु व मध्यम उद्योगांना संरक्षण क्षेत्रात पदार्पण करण्यात येणारे अडथळे कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. डिफेन्स एक्सलेन्स फ्रेमवर्क, डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंज, मिशन रक्षा ज्ञान शक्ती, मेक २ योजना यामुळे मेक इन इंडिया ही मोहीम अधिकाधिक फायदेशीर ठरत आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतानाच परदेशी गुंतवणूकही वाढत आहे. यातूनच संरक्षण सामर्गीसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज संपुष्टात येत आहे.'

प्रदर्शानाला प्रतिसाद

संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या सरकारी उद्योगांमार्फत आयोजित प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली. एचएएल, बेल, बीडीएल, एमडीएल, जीएसएल, बीएईएमएल, मिधानी सारख्या संस्थानी आपली उत्पादने प्रदर्शित केली होती. त्याचबरोबर ओएफबी, डीआरडीओ, भारतीय लष्कराचे विविध विभाग, नौसेना आणि वायुसेनेनेदेखील आपल्या उत्पादन आणि सेवेचे प्रदर्शन याठिकाणी करण्यात आले होते.

संघटनांचे सहकार्य

निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, लघु उद्योग भारती, सोसायटी ऑफ डिफेन्स मॅन्युफॅक्चरर (एसआयडीएम), कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थांचे सहकार्य या सेमिनारसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. तसेच, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, निमाचे तुषार चव्हाण, शशिकांत जाधव, धनंजय बेळे आदींनी त्यासाठी परीश्रम घेतले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी सेमिनारच्या शेवटी नाशिकबाबत सादरीकरण केले. डिफेन्स हबसाठी नाशिक कसे पोषक आहे, येथील क्षमता काय आहेत आणि येत्या काळात काय करण्याच गरज आहे, याचा वेध त्यांनी या सादरीकरणात घेतला.

'राफेल' ही गरज

कारगील युद्धावेळीच अत्युच्च उंचीवर जाणाऱ्या विमानांची आपल्याकडे कमतरता असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधुनिक पिढीच्या विमानांची गरज स्पष्ट झाली. म्हणूनच राफेलची निवड करण्यात आली. आघाडी सरकारने या खरेदीसाठी अतिशय दिरंगाई केली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात या कराराला चालना देण्यात आली. ही खरेदी प्रक्रिया अतिशय पारदर्शक असून, राफेल विमाने या वर्षी भारतात दाखल होतील. या विमानामुळे हवाई दल सशक्त होतानाच देशाच्या संरक्षण सिद्धतेला नवा आयाम लाभणार असल्याचे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.

यांनी केले सादरीकरण

'भारतीय सशस्त्र दलातील भांडवली गरजांसंदर्भात उद्योजकांसाठी असलेल्या संधी' तसेच 'महसूली गरजा (पार्ट्स, कॉंसुमेबल्स) यांच्या देशांतर्गत उत्पादनातुन निर्माण होणाऱ्या संधी' या विषयांवर पॅनल डिस्कशन्सचे आयोजन करण्यात आले. यात वायुसेनेचे एअर वाईस मार्शल जे चलपती, सैन्यदलातील ब्रिगेडियर अजय सूद, नौदलाचे कॅप्टन नितीन बिश्नोई, भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व सीईओ आर एस भाटिया, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि.चे चीफ मॅनेजर डिसाइन विजय शिंदे, डीआरडीओचे डीजी डॉ. पी. के. मेहता, बोर्ड लार्सन अँड टुब्रोचे उपाध्यक्ष व सदस्य सीएमडीई मुकेश भार्गवा, ब्रिगेडिअर आर. ए. मंदार, नौदलाचे असिस्टंट चीफ ऑफ नेव्हल स्टाफ रिअर ऍडमिरल व्ही. एम. दॉस, लार्सन अँड टुब्रो चे सतीश भारतन, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.चे डॉ. जे. एम. जहांगीर यांनी उपस्थितांना सत्रांत मार्गदर्शन करीत संवाद साधला व उपस्थितांच्या प्रश्न व शंकांचे समाधान केले. या सेमिनारला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images