Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिजाऊ जयंती

$
0
0

व्हिजन अॅकॅडमी

जेलरोड : जेलरोड येथील व्हिजन अॅकॅडमी शाळेत राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका सुनिथा थॉमस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी दीपाली भट्टड, जयश्री बोरोले, वृषाली बोराडे, मेघा कनोजिया, सुवर्णा झळके, सुनीता चौधरी, सुचित्रा पवार, प्रवीण अहिरे, देविदास मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका थॉमस म्हणाल्या की, स्वराज्य निर्माण करणारे, पिढ्यानपिढ्या असंख्य मातांना प्रेरणा देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता जिजाऊ. त्यांनी लहानपणापासून शिवरायांना मैदानी खेळाचे प्रशिक्षण दिले. राजकारभार कसा करावा यांचे धडे महाराजांना दिले. महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊ या नेहमी आग्रही असत. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. दीपाली भट्टड यांनी ही राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००००००००

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान

देवळाली कॅम्प : स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या पुत्राच्या हृदयात स्वाभिमान अन डोळ्यात स्वप्न पेरणाऱ्या अन संस्कारांचा आदर्श उभा करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने तत्कालीन कालखंडामध्ये मोघल सत्ता उलथवून लावण्यात शिवाजी व संभाजी महाराजांचा बळ मिळाल्याचे प्रतिपादन नगरसेविका आशा गोडसे यांनी केले. जुने बस स्थानक परिसरात भारतीय मराठा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने काल राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी गोडसे बोलत होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

----

कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळा

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीमध्ये जिजामातांची भूमिका अतुलनीय असून त्या शिवरायांच्या प्रमुख मार्गदर्शक व प्रेरणास्थान होत्या असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रभावती धिवरे यांनी केले. तर आजच्या भारतातील तरुण पिढीपुढे स्वामी विवेकानंद हे एक प्रेरणादायी उदाहरण असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांनी केले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रभावती धिवरे, प्रा. सुनीता आडके, भीमराव धिवरे, वैशाली संत, नुजत शेख आदी उपस्थित होते. त्यानंतर बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी बिस्कीट, इडली, पाववडा, पाणीपुरी, सरबत, गाजरहालवा, साबुदाणावडा इत्यादी पदार्थांचे दुकाने थाटली.

-----

सकल बहुजन मराठा समाज

पंचवटी : सकल बहुजन मराठा समाज शिवजन्मोत्सव समितीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. पंचवटी कारंजा येथे झालेल्या कार्यक्रमास महापालिका स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, भिकुबाई बागूल, वत्सला खैरे, वैशाली भोसले आदी उपस्थित होते.

----

हिरे कॉलेज

पंचवटी : हिरे कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ व हिरे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. डॉ. एन. बी. पवार, डॉ. विनीत रकिबे आदी उपस्थित होते. डॉ. किरण पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एन. व्ही. देशमुख यांनी परिचय करून दिला.

----

एबीपी सोशल ऑर्गनायझेशन

पंचवटी : एबीपी सोशल ऑर्गनायझेशनतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेविका शालिनी पवार, योगविद्याधामचे रमेश धस, प्रतिभा धस, लक्ष्मी पवार, राहुल पवार आदी उपस्थित होते.

----

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव महिला समिती

नाशिकरोड : राजमाता जिजाऊंचे कार्य आजही आदर्शवतच आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी केलेल्या संस्कारांचे अवलोकन केले असता आजचा समाजही सुदृढ बनु शकतो असे मत खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शिवजन्मोत्सव समिती व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव महिला समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेले आमदार योगेश घोलप म्हणाले की, मातोश्रींच्या कार्याचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण सर्वजण सामुहिक प्रयत्न करू असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक रमेश धोंगडे आदी उपस्थित होते.

----

महावितरण परिमंडल कार्यालय

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात शनिवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी झाली. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते यांच्यासह परिमंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा

$
0
0

खासगी क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या असहायतेचा फायदा घेत खासगी क्लासमधील एका शिक्षकाने तिच्यवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात या शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल करण्याचे धाडस दाखविल्याने या प्रकाराचा वाचा फुटली. अनिल भरत अवचारे (वय २८ रा. अरिंगळे मळा, एकलहरे रोड) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. अवचारे याला न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुणावली आहे. या घटनेमुळे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला गेला असून खासगी क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

पिडित मुलीच्या फिर्यादीनुसार, ती सन २०१६ या वर्षी दहावीच्या वर्गात शिकत असताना शहरातील कोरडे क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होती. याच क्लासमध्ये तिच्या घरासमोरच वास्तव्यास असणारा अनिल अवचारे हा इंग्रजी विषय शिकवित असे. सप्टेंबर २०१६ मध्ये अनिलने पीडितेच्या घरी जाऊन मोबाइलमध्ये तिचे नग्नावस्थेतील फोटो काढले आणि धमकावत तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. यानंतर अनिल हा पीडित मुलीच्या रिक्षाचा पाठलाग करीत तिच्या कॉलेजपर्यंत जात असे. तिच्या घरी कोणी नसताना त्याने फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार अत्याचार केले. सतत दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. डिसेंबर २०१८ मध्ये अनिलकडून होणारा त्रास वाढल्याने पीडितेने घरीच राहणे पसंत केले. त्यानंतर अनिलने तिच्या घरासमोर चिठ्ठ्या टाकून तिला धमकावण्यास सुरुवात केली. तिचे फोटो तिच्या वडिलांना दाखवण्याची धमकी देत घराबाहेरील पटांगणात भेटण्यासाठी जबरदस्ती केली. यावेळी पीडित मुलगी सकाळी सहा वाजता त्याला भेटण्यासाठी गेली असता तिच्याशी त्याने पटांगणावरही अत्याचार केला. या प्रकाराने पीडित मुलगी अस्वस्थ झाली. तिची अस्वस्था तिच्या बहिणीच्या लक्षात आल्यावर या प्रकाराला वाचा फुटली. त्यानंतर आईच्या मदतीने तिने नाशिकरोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी अनिल अवचारे याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मनिषा राऊत या गुन्ह्याचा पुढील तपास करित आहेत.

अवास्तव भीतीही कारणीभूत

या गुन्ह्यातील पीडित मुलीने वडिलांच्या भीतीपोटी तब्बल दोन वर्षे त्रास सहन केल्याचे तिच्या फिर्यादीतून उघड झाले आहे. शिवाय संशयित हा घरासमोरच राहणारा असल्याने तिच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता. हा प्रकार वडिलांना माहित झाल्यास शिक्षणासही मुकावे लागेल, अशी भीती या पीडित मुलीने फिर्यादीत व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला पालिकेत ‘राडा’

$
0
0

शिवीगाळ व मारहाण केल्याची मुख्याधिकाऱ्यांची पोलिसांत तक्रार

नगरसेवक दांपत्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

...

म. टा. वृत्तसेवा, येवला

सभापटलावर ठेवलेल्या नियोजित विषयांव्यतिरिक्त ऐनवेळचा एक विषय घेण्यावरून येवला नगरपालिकेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच 'राडा' झाला. विषय घेण्यावरून पालिकेतील काही सदस्य अन् मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची होतानाच, भरसभेत आपणास शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केली गेल्याची फिर्याद पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी येवला शहर पोलिसांत दिली आहे. नांदूरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी येवला पालिकेतील नगरसेवक पतीपत्नीसह एकूण सात जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही महिन्यात येवला पालिकेतील एका कर्मचारी संघटनेचे नेतेगण आणि पालिका मुख्याधिकारी यांच्यातील वादविवाद समोर येत आहेत. पूर्वीच्या या नानाविविध घटनांच्या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिकेची शुक्रवारी (दि. १२) दुपारी बोलवलेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सभेतील पुढे केला गेलेला ऐनवेळचा एक विषय सभागृहात मोठा राडा करून गेल्याचे बोलले जात आहे. सभेत प्रारंभी सभापटलाच्या विषयपत्रिकेमधील सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. पुढे पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक दयानंद जावळे यांनी आपल्याकडील एक ऐनवेळचा विषय समोर आणला असता, त्यावरून सभागृहात वादाची ठिणगी पडली. नगरसेवक दयानंद जावळे यांच्यासह त्यांच्या पत्नी शिवसेनेच्याच नगरसेविका किरणबाई जावळे यांनी आपला आवाज वाढविताना सभागृहात चांगलीच बाचाबाची झाली. त्यात सभागृहात मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ असा 'राडा' झाला.

नगरसेविका किरणबाई जावळे यांनी आपणास हाताने चापट्या मारीत धक्काबुक्की केली, तर नगरसेवक दयानंद जावळे यांनी शिविगाळ केली. सभागृहात इतरांनी जोडजमाव करून आपल्याला लज्जा उत्पन्न होईल, अशी शिवीगाळ करीत धमकी दिली असल्याची फिर्याद पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. इतर पाच जणांनी नगरपालिकेच्या सभागृहात अनाधिकृतपणे प्रवेश करून आपल्याला शिवीगाळ करीत लज्जा होईल, अशी शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी किरणबाई जावळे, त्यांचे पती नगरसेवक दयानंद जावळे या दोघा नगरसेवकांसह नितू कंडारे, मुकेश जावळे, दीपक जावळे, भीम जावळे, नीलेश जावळे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे, दमदाटी व शिवीगाळ करणे आदी कलमान्वये येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

चुलत भाऊ प्रल्हाद जावळे यांच्या स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज ऐनवेळच्या विषयात घेऊन मंजूर करावा, अशी मागणी सभागृहात माझ्यासह इतर नगरसेवकांनी केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी या विषयास हेतूपुरस्पर अनुमती दिली नाही. आमच्यावर खोटी फिर्याद दाखल केली आहे.

- दयानंद जावळे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात पाणीबाणी

$
0
0

दहा दिवसाआड मिळणार पाणी; गिरणा, आरमपात्र कोरडे

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा व आरम नदीपात्र कोरडे पडले आहे. सध्या शहराला पाच दिवसाआड पााणीपुरवठा होत आहे. ऐन यात्रोत्सव कालावधीत शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतानाच नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठल्याने सटाणा शहराला आता तब्बल दहा दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात अल्प पाऊस झाला. पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणारे आरम व गिरणा नदीपात्र देखील कोरडेठाक पडले आहे. या दोन्ही नदीपात्रात आता केळझर, चणकापूर, पुनद धरणातून आवर्तन मिळाल्यानंतरच पाणी येणार आहे. नदीपात्र वाहते राहिल्यास शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तसेच लगतच्या विहिरींना पाणी उतरल्यानंतर शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो.

यात्रोत्सवातच जलसंकट

सद्यस्थितीत नदीपात्रासह विहिरी देखील आटल्याने आता शहरवासियांना पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दहा दिवसाआड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवानिमित्ताने शहरात भाविकांसह नातेवाइकांची रेलचेल आहे. या दरम्यानच पालिका प्रशासनाने तब्बल दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे.

नगरसेवक सरसावले

अनके नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे टँकरची सुविधा निर्माण केली आहे. मात्र तरीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासह हद्दवाढ भागात होणार ८ कोटीची विकासकामे

$
0
0

विकासाला गती

मालेगावसाठी आठ कोटींच्या निधीला मान्यता

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून महापालिकेच्या हद्दवाढ भागातील विविध विकासकामांसाठी आठ कोटींच्या निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. नववर्षनिमित्ताने हद्दवाढ भागातील नागरिकांना विकासकामांची भेट मिळाली असून, फेब्रुवारीअखेर या विकासकामांचा शुभारंभ होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विकासकामांविषयी माहिती दिली

पत्रकार परिषदेत उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयराज पाटील, गटनेते नीलेश आहेर, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे उपस्थित होते.

मागील वर्षी नगरविकास विभागाने हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात पायाभूत सोईसुविधा निर्मितीकरिता महापालिकेस १४.५५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. या निधीसाठीची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ३ कोटींचा निधी अन्य विकासकामांसाठी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने ३ कोटींच्या निधीस मान्यता दिली असून यातून शहरातील कलेक्टर पट्टा, सोयगाव, द्याने, रमजानपुरा, सायने बु. भायगाव, दरेगाव, म्हाळदे या हद्दवाढ भागात ३ कोटींची विकासकामे होणार आहेत.

रस्त्यांचे डांबरीकरण

या ३ कोटींसह नगरविकासने अन्य ५ कोटींच्या विकासकामांना देखील प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून शहरातील जुना आग्रा रोड, सटाणा रोड, कॅम्प रोड, चर्च ते डिके रोड अशा प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण होणार आहे. या कामांसाठीचे प्रस्ताव येत्या आठवडाभरात तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून फेब्रुवारी अखेर प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. आमदार निधीतून हुतात्मा स्मारकात वाचनालय, अभ्यासिका व जेष्ठ नागरिकांसाठी उद्यान अशा सोई सुविधा करण्यात आल्या असल्याचे भुसे यांनी सांगितले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणित अन् विज्ञान कृतिपत्रिकेवर आज मार्गदर्शन

$
0
0

'रेषा एज्युकेशन सेंटर' आणि 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाषा अन् विज्ञानाच्या कृतिपत्रिकांना दहावीच्या विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे याबबतचे तंत्र समजावून घेतल्यानंतर आज, रविवारी (दि. १३) गणित आणि विज्ञानाच्या कृतिपत्रिकेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. रेषा एज्युकेशन सेंटर आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने हा उपक्रम पार पडणार आहे.

गंगापूर रोड आणि नाशिकरोड अशा दोन परिसरात रविवारी सत्र पार पडेल. यामध्ये गंगापूर रोड परिसरातील सत्र रेषा एज्युकेशन सेंटर, ३ बी, कौस्तुभ, एस. टी. कॉलनी येथे होईल. नाशिकरोड परिसरातील सत्र हॉटेल सेलिब्रेटा, बिग बझारच्या जवळ, नाशिकरोड येथे होणार आहे. गंगापूर रोड येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या गणित विषयक सत्रात मुख्याध्यापिका संध्या भातखंडे मार्गदर्शन करतील. नाशिकरोड येथे सकाळी गणित आणि विज्ञान या विषयाची दोन सत्र होणार आहेत. गणिताचे सत्र सकाळी ९.३० ते ११ या वेळेत होईल. या सत्रासाठी मुख्याध्यापिका संध्या भातखंडे या मार्गदर्शन करतील, तर सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या विज्ञान विषयक सत्रात अंजली ठोके या मार्गदर्शन करतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १०० रुपये नोंदणी फी आहे. कार्यक्रम वेळेतच सुरू होणार असल्याने वेळेअगोदर कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

..

याबाबत मिळणार मार्गदर्शन

- पारंपरिक परीक्षेच्या प्रचलित पद्धतीशिवाय कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते

- या घटकांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी

- विद्यार्थ्यांनीही कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेक्सपिअरची पात्रे वैश्विकच

$
0
0

प्राचार्य पद्माकर पुंडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकांची मानसिकता हा शेक्सपियरच्या साहित्याचा आत्मा आहे. त्याची पात्रे वैश्विकच होती. माणसाचे स्वभाव कसे असतात, याचा ऊहापोह त्याने साहित्यातून केला, असे प्रतिपादन प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी केले.

संवाद संस्थेच्या वतीने शेक्सपिअरच्या नाटकातील 'आपली माणसं' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. पुंडे म्हणाले, की माणूस विचार करीत बसला तर त्याच्या हाती काही लागणार नाही. त्यासाठी त्याने कृती करणे गरजेचे आहे. शेक्सपिअरच्या नाटकांनी हेच सांगितले.

हॅम्लेट, ज्युलियस सिझर, किंगलियर या नाटकांमधील पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये या वेळी त्यांनी सांगितली. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. संवाद संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, डॉ. बाळासाहेब गुंजाळ, संजय करंजकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेकीद्वारे व्याधी दूर करणे शक्य

$
0
0

डॉ. खर्डीकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेकी हा शब्द जरी जपानी भाषेतला असला, तरी रेकी ही मूळ संकल्पना भारतीय आहे. रेकीद्वारे ब्रह्मांडातील ऊर्जा शरीरात आणणे शक्य होते. त्यातून शरीराला पूरक ऊर्जा मिळून, शरीर निरोगी राहणे शक्य होते, तसेच शारीरिक व्याधीदेखील रेकीद्वारे दूर होऊ शकतात, असे प्रतिपादन डॉ. विपुल खर्डीकर यांनी केले.

नाशिक सेवा समिती ट्रस्टतर्फे डॉ. खर्डीकर यांचे 'रेकी विद्येची माहिती' या विषयावर व्याख्यान झाले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात शनिवारी दुपारी ४ वाजता हे व्याख्यान झाले. डॉ. खर्डीकर म्हणाले, की रेकी ही विश्वव्यापी ऊर्जा असून, याद्वारे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविणे यासह शारीरिक आजारांपासून मुक्ती मिळवणे शक्य होते. रेकी या संकल्पनेवर अनेकांचा विश्वास बसत नाही; पण कित्येक रुग्णांना याचा सकारात्मक परिणाम जाणवला आहे. व्यक्ती सतत नकारात्मक विचार करीत असेल, तर व्यक्तीच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. व्यक्तीला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी रेकी फायदेशीर ठरते, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी शरीरातील सात चक्रे आणि त्यांचे कार्य, तसेच या चक्रांचा जीवनावर होणारा प्रभाव यांची माहिती उपस्थितांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लूट करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0

तीन लुटारूंना अटक

नाशिक : पंचवटीतील मार्केट यार्डात भाजीपाला खरेदी करणाऱ्या तरुणासह त्याच्या साथीदाराला ओळखीतीलच तिघांनी मारहाण करून लुटले. संशयितांनी मोबाइल फोन व पाच हजार रुपये काढून घेतले. पंचवटी पोलिसांनी गुन्हा घडल्यावर काही तासांतच तिघांना अटक केली. दीपक अनिल नामेकर (२१, रा. तेली गल्ली, रविवार कारंजा), प्रीतम प्रशांत बेलेकर (रा. विंचूरकर वाडा, भद्रकाली) आणि प्रथमेश प्रकाश शेलार (२२) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सूर्याकुमार शिवपलटण मौर्या (रा. १८, कळवा, ठाणे) याने फिर्याद दिली.

रिक्षाचालकास अटक

नाशिक : गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली. महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात झालेल्या या कारवाईप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिशान जावेद शेख (वय ३०, रा. नाईकपुरा, जुने नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ऑटो रिक्षातून बेकायदा गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जत्रा हॉटेल भागात सापळा लावला. या वेळी संशयित रिक्षाची (एमएच १५ ईएच ०७०८) झडती घेतली असता त्यात गोमांस आढळून आले. उपनिरीक्षक सदाफुले तपास करीत आहेत.

उंटवाडीत सात जुगारी पकडले

उंटवाडीतील सिटी सेंटर भागातील आरुषी हॉटेल परिसरातील बांबूच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी छापा मारला, त्या वेळी रवी गुंजाळ व त्याचे सहा साथीदार मुंबई मेन बाजार नावाचा मटका जुगार खेळताना आढळले. संशयितांच्या ताब्यातून १७ हजार ८० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस शिपाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून, गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

भाजलेल्या महिलेचा मृत्यू

समईची ज्योत कमी करीत असताना साडीने पेट घेतल्याने गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी जयभवानी रोड भागात घडली होती. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रेखा शशिकांत निर्गुण (वय ५२, रा. जय भवानी रोड, नाशिकरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. घराच्या देव्हाऱ्यातील समईची ज्योत कमी करीत असताना अचानक त्यांच्या साडीने पेट घेतला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हवालदार विंचू तपास करीत आहेत.

शेकोटीत पडून वृद्धाचा मृत्यू

शेकोटीजवळ शेकत असताना अचानक चक्कर येऊन शेकोटीत पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथे घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दौलत पुंजा गांगुर्डे (वय ६०, रा. तिरडशेत) असे या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या घरासमोर शुक्रवारी सकाळी शेकोटी पेटवून गांगुर्डे शेकत असताना ही घटना घडली. अचानक चक्कर आल्याने ते पेटत्या शेकोटीत पडले. यामुळे त्यांचे तोंड, छाती व हात गंभीर भाजले गेले. श्याम गांगुर्डे यांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. हवालदार माळोदे तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर भागातील रफिक रमजू शेख (वय २६) याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा सप्ताहास प्रारंभ

$
0
0

युवा सप्ताहास प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शक्ती विकास अॅकॅडमीतर्फे युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, १२ ते १९ जानेवारी या काळावधीत विविध स्पर्धा आणि स्वच्छता अभियान या सप्ताहात होणार आहे. या सप्ताहाला शनिवारी प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि शक्ती विकास अॅकॅडमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 'स्वामी विवेकानंद' व 'राजमाता जिजाऊ' यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अॅकॅडमीतर्फे आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी, क्रीडा शिक्षक डॉ. मीनाक्षी गवळी आणि अकादमीचे अध्यक्ष मनोहर जगताप उपस्थित होते. अकादमी तर्फे १२ ते १९ जानेवारी या कालावधीत युवा सप्ताह घेण्यात येणार आहे. यामध्ये वक्तृत्व, निबंध, रांगोळी यांसह विविध क्रीडा स्पर्धा आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येईल, असे अॅकॅडमीतर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतींचे नाव समाज जोडण्यासाठी वापरा

$
0
0

प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांनी मोठ्या धैर्याने औरंगजेबासह इतर पाच पाच आघाड्यांविरोधात पूर्ण ताकद एकवटून स्वराज्याचे संरक्षण केले. मराठी मातीला असलेल्या फुटीरतेच्या शापाने त्यांचा घात केला. साक्षात मृत्यू समोर असतानाही त्यांनी रायगडच्या सिंहासनाशी तडजोड केली नाही. कसे जगावे हे छत्रपती शिवरायांकडून तर कसे मरावे हे शंभू अर्थात संभाजी राजेंकडून शिकावे, असे प्रतिपादन वक्ते प्रशांत देशमुख यांनी मनमाड येथे केले. तसेच छत्रपतींचे नाव समात जोडण्यासाठी वापरा, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील सीता लक्ष्मी सभागृहात संस्कृती संवर्धन समितीतर्फे सुरू असलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प 'छत्रपती वीर संभाजी' या विषयावर त्यांनी गुंफले. संस्थेचे अध्यक्ष किशोर नावरकर, माजी आमदार संजय पवार, नरेश गुजराथी, पुरुषोत्तम दिंडोरकर, दिनेश धारवाडकर उपस्थित होते.

यावेळी आपल्या ओघवत्या शैलीत संभाजी राजे यांचा इतिहास मांडत प्रशांत देशमुख यांनी इतिहासातील अनेक प्रसंग सभागृहात प्रभावीपणे उभे केले. ते म्हणाले की, संभाजी राजांनी प्राण मोलाने शिवरायांचे स्वराज्य जपले. त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्राला बलदान दिले. जनता पेटून उठली आणि स्वराज्यासाठी लढली. अखेर औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत करावी लागली. औरंगजेबाला मराठी राज्य जिंकता आले नाही. शिवरायांची प्रेरणा आणि शंभू राजांचे हौतात्म्य! ही त्याची दोन कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माणसानं पहिल्यांदा खेकडी वृत्ती सोडली पाहिजे. दुसऱ्याच्या वाटेत फुले नाही पेरली तरी चालतील पण किमान काटे तरी टाकणार नाही एवढा तरी निश्चय मनात करायला हवा, असे देशमुख यांनी सांगितले.

तरुणाईला आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही दोन नावे समाज तोडण्यासाठी नाही तर समाज जोडण्यासाठीच आहेत, या नावांचा वापर आम्ही समाज जोडण्यासाठीच करू, असा निश्चय तरुणाईने मनात केला पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, शुक्रवारी छत्रे विद्यालयातील प्राथमिक शिक्षक वृत्तपत्र लेखक प्रशांत कुलकर्णी यांच्या 'गाथा शिवरायांची' या पुस्तकाचे प्रकाशन वक्ते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात : पुस्तक प्रकाशन

$
0
0

'अ थॉट फॉर युवर पेनी' पुस्तकाचे आज प्रकाशन

नाशिक : समुपदेशिका शुभा बलदोटालिखित 'अ थॉट फॉर युवर पेनी' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. अण्णासाहेब मुरकुटे सभागृह, मुरकुटे कॉलनी, पंडित कॉलनी येथे हा कार्यक्रम होईल. वनाधिपती विनायकदादा पाटील, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती अॅड. मनीष बस्ते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संक्रांतीचा उत्साह

$
0
0

आंध्र प्रदेशात मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'संक्रांती संबरलू' या उत्सवाचे आयोजन केले जाते. विशाखापट्टण्णमध्ये या उत्सवादरम्यान पारंपरिक वेशभूषा करून हा उत्सव साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरीतून सुटला अन् अपसंपदेत अडकला!

$
0
0

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा

....

ज्ञात स्रोतापेक्षा ७० टक्के जास्त संपत्ती

पदाचा दुरुपयोग करून जमवली संपत्ती

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शासकीय सेवेत पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत मुंबईच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने आपल्या उत्पन्नापेक्षा तब्बल ७१ टक्के अपसंपदा जमविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे २०१२ मध्ये दाखल सापळ्याच्या गुन्ह्यात कोर्टाने निर्दोष सुटका केल्यानंतर याच प्रकरणात संबंधिताविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला.

शामराव महादेव शेटे व त्याची पत्नी शर्मिला शामराव शेटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शामराव शेटे सध्या मुंबईतील अंधेरी येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आरटीओ खात्यात १९८६ मध्ये पदभार स्वीकारणाऱ्या शेटे यांनी २०१२ पर्यंत जवळपास महाराष्ट्रभर काम केले. सन २०१२ साली नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या शेटे यांना ६०० रुपयांची लाच घेताना औरंगाबादच्या एसीबी पथकाने अटक केली होती. सापळ्यामध्ये अटक झाली तर अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येते. त्यामुळे शेटे यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली. मात्र, एसीबीने सुरू केलेल्या या चौकशीकडे शेटे यांनी वेळोवेळी पाठ फिरवली. त्यामुळे एसीबीने एकतर्फी ही चौकशी पूर्ण केली. त्यात शेटे यांनी नाशिक, कोल्हापूर आणि अन्य एका ठिकाणी बेनामी मालमत्ता घेतल्याचे समोर आले. २१ मार्च १९८६ ते १२ मार्च २०१२ या कालावधीत पदाचा दुरुपयोग करून शेटे यांनी उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ६९ लाख १७ हजार २२८ रुपयांची म्हणजेच ७०.९१% एवढी अपसंपदा स्वत:च्या व पत्नी शमीर्ला शेटे यांच्या नावे संपादित करून धारण केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एसीबीच्या निरीक्षक मृदुला नाईक करीत आहेत. दरम्यान, शेटे यांच्या विरूद्ध दाखल सापळ्याच्या गुन्ह्यात त्यांची निर्दोष सुटका झाली असून, अपसंपदेच्या गुन्ह्यात काय घडामोडी होतात याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातही वंचितांचा ऐक्यप्रयोग

$
0
0

वंचित आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन; आघाडी-युतीला आव्हान

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक व दिंडोरी मतदारसंघात युती आणि आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच, तिसऱ्या आघाडीतील भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या एकत्रित बहुजन आघाडीनेही जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये प्रथमच हा प्रयोग होत असून, त्यासाठी भारिपचे डॉ. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असुद्दिन औवेसी हे रविवारी नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येत आहेत. वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केल्याने युती आणि आघाडीला धसका भरला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राजकीय पक्षांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने मात्र एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेचीही निवडणूक येत असल्याने यंदा राजकीय वातावरण अधिक काळ तप्त राहणार आहे. नाशिकमध्ये सध्या शिवसेना-भाजपचे वर्चस्व असून, नाशिकमध्ये शिवसेनेचा तर दिंडोरीत भाजपचा खासदार आहे. कधी काळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील या दोन लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या वेळेस युती आणि आघाडीत थेट सामना झाला होता. बसपानेही दिनकर पाटील यांच्या रुपाने उमेदवार दिला होता. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दिंडोरीत माकपच्या रुपाने युती आणि आघाडीला आव्हान दिले जाते. परंतु, यंदा माकपकडून आघाडीला बाय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सरळ लढत होईल असे चित्र असतानाच आघाडी आणि युतीपुढे वंचित बहुजन आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर आणि औवेसी यांनी राज्यात प्रथमच एकत्रिकरणाचा पहिला प्रयोग राबवला असून, वंचित आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यात या वंचित आघाडीच्या सभांना मोठा प्रतिसादही मिळत आहे.

नाशिकमध्येही वंचित आघाडीची रविवारी दुपारी ३ वाजता जाहीर सभा होत आहे. या सभेला आंबेडकर, औवेसी उपस्थित राहणार आहे. अनंत कान्हेरे मैदानावर विशाल सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. आंबेडकरांनी समाजाची एकत्रित मूठ बांधत आघाडी आणि युतीपुढे आव्हान उभे केले आहे. तर औवेसींनीही मुस्लिम समाज आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरू केली आहे. नाशिकमध्येही यासाठीची चाचपणी केली जात असून, तिसरा पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वंचित आघाडीकडून रविवारी निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून, उमेदवारांचीही घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या आघाडीच्या सभेकडे लक्ष लागून आहे.

..

दिग्गजांची उपस्थिती

अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी दुपारी होणाऱ्या या सभेत भारिप बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असुद्दीन औवेसी यांच्या सोबतच माजी आमदार लक्ष्मण माने, विजय मोरे, हरिदास भदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. वंचित आघाडीकडून या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ज्योतिकलश’च्या जागेवर स्थानिक रहिवाशांचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

\Bकुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाच्या ज्योतिकलश सभागृहाच्या जागेवर राका कॉलनीतील स्थानिक रहिवाशांनी दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार ही जागा मनपाने रहिवाशांसाठी आरक्षित केली असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.

महापालिकेने कुठलीही पूर्वसूचना न देता ज्योतिकलश सभागृह सील केल्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रात गदारोळ झाला. यातच राका कॉलनीतील स्थानिक रहिवासी आणि लोकहितवादी मंडळ यांच्यातील दुहीसुध्दा या निवेदनामुळे उघड झाली आहे. या सभागृहाबाबत पालिकेला स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे की, सद्यस्थितीत लोकहितवादी मंडळाच्या ताब्यात असणारी ही वास्तू व क्रीडांगणाची देखभाल केली जात नाही. करारनाम्यानुसार संबंधित ठिकाणाचे उद्यान विकसित केले गेलेले नाही. या वास्तूच्या मोकळ्या जागेत अनेकदा समाजकंटकांचा उपद्रव होतो. शिवाय मोकळ्या जागेचा उपयोग व्यापारी फायद्यासाठी केला जातो, अशा आशयाच्या तक्रारी रहिवाशांनी पालिकेकडे केल्या आहेत.

...

लोकहितवादी मंडळाची भूमिका

लोकहितवादी मंडळाच्या वतीने या सभागृहाच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही वास्तू बांधण्यासाठी कुसुमाग्रजांनी महापालिकेची मदत घेतली नव्हती. लोकवर्गणीतून उभी राहिलेली ही वास्तू असल्याने मंडळाच्या कलेच्या जपवणुकीच्या उद्दिष्टांसाठी ती मंडळाकडे सुरक्षित रहाणे गरजेचे आहे, अशी लोकहितवादी मंडळाची भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या सेवेसाठी सुरक्षा सप्ताह

$
0
0

धुळ्यात विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाकडून दरवर्षाप्रमाणे यंदाही दि. ११ ते २५ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा पंधरवडा सप्ताह राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी महामंडळाकडून ‘सुरक्षित सेवा व विना अपघात प्रवास’ अशी जनजागृती या सप्ताहादरम्यान केली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली.

दरवर्षाप्रमाणे यंदाही ३० वा रस्ता सुरक्षा सप्ताहाला राज्य परिवहन महामंडळाकडून शुक्रवारी (दि. ११) धुळे आगारात प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा पोलिस प्रमुख विश्वास पांढरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राकेश देवरे, गणेश सोनवणे, आगारप्रमुख भगवान जगनोर, यांत्रिक अभियंता रमेश अहिरे यांच्यासह धुळे राज्य परिवहन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला गेल्या वर्षभरात विना अपघात सेवा देणारे चालक, तसेच जास्तीचे उत्पन्न आणणारे चालक तसेच दोषमुक्त एसटी सेवेत देणारे कार्यशाळेतील यांत्रिक कारागिर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर कर्मचाऱ्यांशी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे म्हणाले की, जीवन जगतांना आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरक्षा आहे. आणि तिच आपल्याकडे नसेल तर जीवन जगण्यात काहीही अर्थ नाही. गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, वर्षभरात रस्ते अपघातात एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. मात्र हे प्रमाण कमी करायचे असेल तर वाहन चालविताना वाहतूकीचे नियम पाळून वाहन हाताळण्यास अपघात टाळणे सहज सोपे होणार आहे, असेही अधसीक्षक पांढरे म्हणाले.

पडताळणी करूनच वाहन हाताळा
विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा पंधरवाडा मोहीम तात्पुरता नसून कायमस्वरुपी वाहन चालविताना वाहनांचे नियम समोर ठेवून वाहन चालविले पाहिजे. आतापर्यंत महामंडाळाच्या धुळे विभागाने गेल्यावर्षी २ कोटी ५० लाख रुपये अपघात दावाप्रकरण भरपाई दिली आहे. मात्र तोट्यात असलेली एसटीचे कर्मचारी पगारवाढीसाठी निरनिराळे आंदोलने करून न्याय मागण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे विनाअपघात सुरक्षित सेवा दिल्यास कोट्यवधी रुपये एसटी महामंडळाचे वाचतील आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील. त्यामुळे सुरक्षित सेवा दिली पाहिजे. तसेच वाहनांचे यांत्रिक दोषामुळे ९९ टक्के आणि १ टक्का मानवी दोषामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वाहनात कोणताही दोष नाही याची पडताळणी करूनच वाहन हाताळले गेले पाहिजे, असेही सपकाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वादोन लाखांचा नायलॉन मांजा हस्तगत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यास क्राइम ब्रँच युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित विक्रेत्याकडून तब्बल दोन लाख २२ हजार रुपये किमतीचे ३०० गट्टू हस्तगत करण्यात आले. पोलिसांची कारवाई सातत्याने होत असली तरी नायलॉन मांजाची चोरीछुपे शहरात विक्री होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणारी नायलॉन मांजाची विक्री व वापराबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्वच पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रीवर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात दररोज कोठेतरी नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. किरकोळ विक्रेत्यांना अटक केली जात असताना पुरवठादार मात्र पोलिसांच्या कचाट्यात सापडत नव्हता.

यामुळे युनिट एकच्या पथकाने शहरातील सर्वात मोठ्या विक्रेत्याकडे लक्ष केंद्रीत केले. नायलॉन मांजाचा मोठा बॉक्स घेऊन एक विक्रेता रविवार कारंजा भागातून जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशातील पोलिसांनी शनिवारी (दि. १२) सापळा रचला. संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोपेडवरुन (एमएच १५, ईझेड ६३८१) संशयित दिलीप पांडुरंग सोनवणे हा नायलॉन मांजाचा बॉक्स घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली व झडती घेत त्याच्याजवळील बॉक्स जप्त केला. त्याच्याकडून नायलॉन मांजाच्या गुप्त साठ्याच्या ठिकाणाची माहिती घेत वाघ यांच्यासमवेत वसंत पांडव, आसिफ तांबोळी, स्वप्नील जुंद्रे आदींनी त्याठिकाणी धाड टाकली. तेथील गुदामात पोलिसांना दिल्ली येथून मागविण्यात आलेल्या नायलॉन मांजाचे ३०० गट्टू सापडले. ते हस्तगत करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत अंदाजे दोन लाख २२ हजार रुपये इतकी आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नायलॉन मांजाचा साठा असा एकूण पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सोनवणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शहरात ठिकठिकाणी हा मांजा पोहच होणार होता. या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल डिझेलच्या दरांत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत असलेले इंधनाचे दर पुन्हा वाढले आहेत. नाशिकमध्ये लिटरला पेट्रोलचा दर ७६ रुपये ४ पैसे, तर डिझेलचा दर ६६ रुपये ४ पैसे इतका झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून इंधनाच्या किमतीत चढउतार होत होते. मात्र, रविवारी पेट्रोल डिझेलच्या किमतीत एक रुपयाने वाढ झालेली दिसून आली.

नाशिकमध्ये दहा दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर ७४ रुपये ४ पैसे, तर डिझेलचे दर ६४ रुपये २७ पैसे इतके होते. डिसेंबरच्या सुरुवातीला पेट्रोल ७८ रुपये ४६ पैशांपर्यंत पोहोचले होते. मात्र, अखेरीस पेट्रोलचा दर ७४ रुपये ५६ पैसे इतका खाली आला होता. डिझेलचा दर डिसेंबरमध्ये ६९ रुपये ७५ पैशांवरून ६४ रुपये ८३ पैशांवर आला होता. गेल्या दहा दिवसांत इंधन दरात १ रुपयाचा चढउतार होत होता. मात्र, रविवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाली. जानेवारीत इंधनाच्या किमती पुन्हा वाढू लागल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली असून, नववर्षात इंधनाच्या किमतीने पुन्हा उच्चांक गाठू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

\Bदहा दिवसांचे दर

दिनांक............. पेट्रोल........... डिझेल

\B१३ जानेवारी...... ७६.०४......... ६६.२५

१२ जानेवारी...... ७४.९७......... ६५.०७

११ जानेवारी...... ७४.८१......... ६४.८०

१० जानेवारी....... ७४.५४......... ६४.४३

९ जानेवारी......... ७४.६७......... ६४.६१

८ जानेवारी......... ७४.२६......... ६४.२२

७ जानेवारी......... ७४.४२......... ६४.३७

६ जानेवारी.......... ७४.२३......... ६४.३०

५ जानेवारी.......... ७४.४९......... ६४.६६

४ जानेवारी........... ७४.०४......... ६४.२७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटीच्या नावाखाली अनेक प्रकल्प पळविले

$
0
0

माजी खासदार समीर भुजबळ यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली शहरातील अनेक प्रकल्प पळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आयोजित बुथ कमिट्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, की शहरात आघाडी सरकारच्या काळात विविध विकासकामे केली. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली; मात्र सत्तेत आलेल्या शिवसेना भाजप सरकारने हे प्रकल्प रखडवीत धुळीला मिळवले. यातील काही महत्त्वाचे प्रकल्प नाशिकमधून पळविण्यात येत आहेत. नाशिक दत्तक घेऊन नाशिकला स्मार्ट सिटी करू अशा घोषणा केल्या त्यांनाच स्मार्ट सिटीचा विसर पडल्याची टीका त्यांनी केली. सरकारने अनेक स्वप्न दाखविले मात्र जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युती सरकारला पायउतार करण्याची गरज आहे.

प्रत्येक बूथमध्ये असणारा कार्यकर्ता आणि त्याचे सहकारी यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न एनसीपी कनेक्ट या अॅपच्या माध्यमातून सोडविले जाणार आहे. पक्षाच्या पुढच्या वाटचाली संदर्भातील ध्येय धोरणे पोहचविता येणार आहे. यातून प्रत्येक घरापर्यंत पोहचून पक्षबांधणी होणार आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. शहरातील सिडको येथे बुधवारी (दि. १६) होणाऱ्या निर्धार परिवर्तन यात्रेत सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images