Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेल्वे मालधक्यावर तिढा कायम

$
0
0

कार्टिंग एजंट्सच्या मक्तेदारीने रेल्वे मालधक्यावर तिढा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) कामाचा परराज्यातील कंपनीचा ठेका स्थानिक कार्टिंग एजंटांच्या मक्तेदारीमुळे नाशिकरोड रेल्वे मालधक्का अडचणीत आला असून तेथे काम करणाऱ्या कामगारांचीही कोंडी झाली आहे. या ठेक्यावरून कामगार संघटनांत असंतोष असून त्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या शनिवारी (दि. १९) सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे.

नाशिकरोड रेल्वे धक्क्यावरील 'एफसीआय'मार्फत येणाऱ्या शासकीय धान्याच्या वाहतुकीचा ठेका न्यू हैदराबाद मेडक ट्रान्सपोर्ट या परराज्यातील कंपनीला मिळाला आहे. यापूर्वी हा ठेका नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील आनंद टान्सपोर्ट कंपनी या कार्टिंग एजंटकडे होता. आता हा ठेका दुसऱ्या कंपनीला मिळाल्याने स्थानिक कामगारांनी सहकार्य करू नये यासाठी स्थानिक कार्टिंग एजंट कंपन्यांनी कामगारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी कामगार संघटना, कामगार उपायुक्त कार्यालय आणि कार्टिंग एजंट कंपन्यांत झालेल्या एका कराराचा आधार घेतला जात आहे. स्थानिक कामगार संघटनांनी परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीचे काम केल्यास या कथित कराराच्या आधारे संबंधित कामगारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची भीती कामगारांना दाखवली आहे. परिणामी नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांनी न्यू हैद्राबाद मेडक ट्रान्सपोर्ट कंपनीचे काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे 'एफसीआय'कडून आलेला शासकीय कोट्यातील धान्य नाशिकरोड येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये साठविणे आणि तेथून इतर ठिकाणी पाठविण्याचे काम ठप्प पडले होते. त्यानंतर या कंपनीने पोलिसांतही धाव घेतली. नाशिकरोड पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रश्नावर आता माथाडी कामगार मंडळ आणि कामगार उपायुक्त कार्यालय यांच्यात येत्या सोमवारी (दि. २१) बैठक होणार आहे.

कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना

कामगार उपायुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीत न्यू हैदराबाद मेडक ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या कामाबाबत निर्णय घेण्यापूर्वी शनिवारी (दि. १९) नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी, सिटू, राष्ट्रीय दलित पँथर आणि रिब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. माथाडी कामगार मंडळ आणि कामागार उपायुक्त कार्यालयाच्या सोमवारच्या (दि. २१) बैठकीत कोणताही निर्णय घेतल्यास त्यास विरोध करण्याची भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे. हा तिढा कार्टिंग एजंटच्या मक्तेदारीने निर्माण केल्याचे उघड झाले आहे. परिणामी मालधक्क्यावरील कामगारांत असुरक्षिततेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अध्यात्मिकतेने जीवन सुखमय’

$
0
0

नाशिक : 'जेव्हा जीवनातील सुखाची भावना बाजूला सारून, कल्याणकारी कार्य केले जाते, तो खरा जीवनगौरव होय. त्यामुळे समृद्ध जीवनासाठी अध्यात्मिक उपक्रमांची गरज असते. जेव्हा कौटुंबिकता आणि अध्यात्म जीवनात येते, तेव्हा जीवन आनंदी आणि सुखमय होते', असे प्रतिपादन विद्यावाचस्पती लक्ष्मीकांत जोशी यांनी केले.

श्री मोहिनीराज भक्त मंडळ नाशिकतर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी ७ वाजता शालिमार येथील मुं. श. औरंगाबादकर सभागृहात हा सोहळा झाला. सोहळ्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या मोहिनीराज भक्तांना 'श्री मोहिनीराज जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोहळ्याचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष किशोर गायधनी यांनी केले. मंडळाच्या विविध योजनांची माहिती मंडळाचे कार्यवाह सुधीर गायधनी यांनी दिली. सोहळ्यात 'श्री मोहिनीराज डॉट कॉम' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

भास्कर रत्नपारखी, श्रीकृष्ण रत्नपारखी, मालती दीक्षित, कालिंदी देव, पद्मावती दीक्षित, गंगाधर गायधनी, प्रवीण भावे, रमेश कुलकर्णी, श्रीधर दीक्षित, सुरेश चंद्रात्रे, वत्सला गायधनी, विश्वास गायधनी, प्रभावती शुक्ल, कालिंदी दीक्षित, प्रभाकर दीक्षित, प्रतिभा अग्निहोत्री यांना 'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिजाऊ ब्रिगेडतर्फे राष्ट्रमातेस वंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२१ वी जयंती मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्यान, शोभायात्रा, पुरस्कार सोहळे यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अशोकनगर, सातपूर येथे जिजाऊ ब्रिगेडतर्फे शिवव्याख्यात्या व नाशिक विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे यांचे व्याख्यान झाले. जिजाऊ पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैशाली देवरे, ब्रिगेड महानगर प्रमुख चारुशिला देशमुख यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. कुमुदिनी भामरे यांनी सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक केले. जिजाऊ ब्रिगेड राबवित असलेल्या उपक्रमांबाबत चारुशिला देशमुख यांनी माहिती दिली. स्त्री शक्तीचे महत्त्व वैशाली देवरे यांनी सांगितले. कार्यक्रमास जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश कार्याध्यक्षा शिवमती माधुरी भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले. संघटक नीलिमा निकम यांनी आभार मानले. जिजाऊ ब्रिगेडच्या सातपूर शाखा प्रमुखपदी कुमुदिनी भामरे यांची नियुक्ती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दोघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतजमिनीच्या वादातून कूळधारकास दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

अजित भालचंद्र आंबीकर आणि नितीन भालचंद्र आंबीकर (दोघे रा. गितांजली सोसायटी, गंगापूररोड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी स्वप्नील राजेंद्र आहेर (२४, रा. मांडवड, ता. नांदगाव) याने फिर्याद दिली. स्वप्निलचे वडील राजेंद्र आहेर यांनी १३ नोव्हेंबर २०१८ रोजी संशयितांच्या दमदाटीला वैतागून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मांडवड (ता. नांदगाव) येथे आंबीकर यांच्या शेतजमिनीवर आहेर कुटुंबिय पणजोबापासून कूळ म्हणून शेतजमीन कसत आहेत. जमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद उद्भवल्यानंतर महसूल विभाग आणि पुढे कोर्टात प्रकरण गेले. सध्या महाराष्ट्र महसूल न्याय प्राधिकरणाकडे वादाचे प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, हा वाद सुरू झाल्यानंतर संशयित आरोपींनी वेळोवेळी राजेंद्र आहेर यांच्यासह फिर्यादी स्वप्निल यास दमदाटी केली. याच त्रासाला कंटाळून राजेंद्र आहेर यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी नांदगाव पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. स्वप्निलने याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षकांना भेटून आपली कैफियत मांडली. यानंतर नांदगाव पोलिसांनी दोघा संशयितांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत महाविद्यालयातर्फे शंकराचार्यांचे पाद्यपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढोल ताशांच्या गजर, वेद मंत्रोच्चाराच्या घोषात श्रृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांचा पाद्यपूजन व दर्शन सोहळा रविवार पेठेतील चित्तपावन मंगल कार्यालयात मोठ्या भक्ती भावाने पार पडला. निमित्त होते, वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित श्री लक्ष्मी कुबेर यागाच्या पूर्णाहुतीचे. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक सहभागी झाले.

श्रृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य यांचे परिसरात आगमन होताच, एकमुखी दत्तमंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर फुलांनी सजवलेल्या पायघड्यावर चित्तपावन मंगल कार्यालयात प्रवेश केला. यावेळी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. यावेळी शांताराम शास्त्री भानोसे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मवृंदानी केलेल्या मंत्रघोषात वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित श्री लक्ष्मी कुबेर यागाची पूर्णाहूती त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित यजमानांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी शंकराचार्यांनी उपस्थितांना आर्शिवाद दिले.

प्रत्येकाने धर्माचे आचरण करावे वेद अध्यायन करून आपली संस्कृती टिकवावी, असे मार्गदर्शन शंकराचार्य यांनी उपस्थितांना केले. यावेळी विविध संस्थांच्या वतीने त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उद्योजक धनंजय बेळे, वेदमूर्ती शांताराम शास्त्री भानोसे, वेदमूर्ती दिनेश गायधनी, वेदमूर्ती लोकेश आकोलकर, अंजली जाधव, वेदमूर्ती जयंत जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान, देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या दुर्गा मंगल कार्यालयात तीळभांडेश्वर लेन येथे सोमवारी (दि. १४) दुपारी ४ वाजता पाद्यपूजन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

$
0
0

नाशिक : काम करताना शर्ट मशिनमध्ये सापडल्याने गळ्याला फास बसून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सातपूर एमआयडीसीतील सिकॉप कंपनीत शनिवारी (दि.१२) सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मधुकर सीताराम राउतमाळे (वय ३६, रा. कुळबस्ते, ता. त्र्यंबकेश्वर) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. शनिवारी सकाळी राउतमाळे कंपनीत काम करीत असताना ही घटना घडली. मशिनवर काम करणाऱ्या राउतमाळे यांच्या अंगातील शर्ट चालू मशिनमध्ये अडकला. मशिनने शर्टला खेचल्याने शर्टचा फास राउतमाळे यांच्या गळ्याला बसला. मशिनचा जोर जास्त असल्याने त्यांच्या मानेचे हाड मोडले. इतर कामगारांनी राउतमाळे यांना लागलीच बाजूला काढीत उपचारासाठी जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना राउतमाळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

...

वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

नाशिक : अंबड परिसरात वेगवेगळ्या घटनेत ३० वर्षांच्या तरुणासह २५ वर्षांच्या युवकाने आत्महत्या केली. या दोन्ही घटनांप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध अंबड पोलिस घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल प्रवीणचंद संचेती (वय ३०, रा. स्वामी समर्थ अपार्ट. अतुल डेअरीजवळ, डीजीपीनगर) असे तरुणाचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हर्षलने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला होता. हर्षलच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसून, घटनेचा अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत. दरम्यान, आत्महत्येची आणखी एक घटना पांगरे मळा येथील शिताई अपार्टमेंटमध्ये झाली. या ठिकाणी राहणाऱ्या अश्विनी बंडू भोर (वय २५) या तरुणीने अज्ञात कारणातून ११ जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केले. ही घटना उघडकीस येताच अश्विनीचा मित्र लाला असिफ शेख याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास हवालदार गारले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखनवर : प्रा. अशोक पिंगळे

$
0
0

सुखनवर : प्रा. अशोक पिंगळे

---

हमारी ऩज्म

रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिए आ

आ फि़र से मुझे छोड के जाने के लिए आ

***

शोला था जल बुझा हूँ हवा ये मुजे न दो

मै कब का जा चुका हूँ सदाये मुजे न दो

***

अब के हम बिछडे तो शायद ख्वाबों में मिले

जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिले

या अहमद फराज यांच्या संवेदनशील लेखनीतून उतरलेल्या व शहेनशा-ए-ग़ज़ल मेहदी हसन यांनी अनुक्रमे यमनकल्याण, किरवानी व जनस मोहिनी रागावर गायलेल्या या माईलस्टोन असलेल्या ग़ज़लांच्या पलीकडे एक पंजाबी पठाणाचे प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा व दु:खाचे लेखणीद्वारे प्रकट होणारे विवेचन अनेकांना माहितही असेल, परंतु त्यातील अनेक रंगछटा ग़ज़ल व ऩज्मद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत करताना त्याचे किडनी विकाराने २५ ऑगस्ट २००८ रोजी निधनामुळे त्यांच्या पूर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी... 'जिंदा रहते कोई न जाने, मौत के बाद सब पहचाने' या शेरचा आधार घ्यावासा वाटतो.

अहमद फराज यांचे मूळ नाव सैयद अहमद शाह अली. त्यांचे प्रारंभिक शिक्षण फारसीमध्ये झाले. ग़जल फॉर्म मुळत: फारसी असल्यामुळे १९ व्या शतकात विकसित होत असलेल्या या काव्य प्रकारात एक आगळं वेगळं योगदान दिलं, परंतु ते देत असतानाचा त्यांचा प्रवास अत्यंत रंजक होता. पाकिस्तानमधील पेशावर विद्यापीठात फारसी व उर्दू विषयाचे शिक्षण घेतल्यानंतर तेथेच ते प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. सुरुवातीच्या काळात सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ताँ हमारा ज्यांनी वर्णन केले त्या डॉ. इकबाल यांच्या काव्याने प्रभावित असलेल्या फराज़ यांच्या ग़जल व ऩज्मवर फैज अहमद फैज आणि सरदार झाफरी व अहमद नदीम कासमी यांच्या भावूक, संवेदनशील व सामाजिक आशयाचा प्रभाव होता. मदर्द आशोबफ, मखाना बदोशफ, जिंदगी-ए-जिंदगी, शब खून, जानाँ-जानाँ, बे-आवाज़, गली-कूचों, नाबीना शहर में आईना, तनहा-तनहा यांसारखी ग़ज़ल व ऩज्म संग्रह प्रसिद्ध होती. २००४ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यानां हिलाल-ए-इम्तियाज या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले होते. रेडिओ पाकिस्तानमध्ये काम करताना अ‍ॅकॅडमी ऑफ लेटर्सच्या चेअमरनपदी काम केले.

अहमद फराज़ यांचा स्वभाव सुरुवातीपासून रोमँटिक होता. प्रेमासाठी आतुर असलेल्या भावनांचे अंतरंग व्यक्त करताना ते म्हणतात -

यूँ तो पहले भी हुए उस से कई बार ज़ुदा

लेकिन अब के नज़र आते हैं कुछ आसार ज़ुदा

वरील ग़जल शेरांमध्ये दयेचा प्रहार, सांत्वनाचे आघात, भेटणारे दुरावे, लाघवी नकार, जीवनाबद्दलच्या तक्रारी असे किती तरी शब्द आशय अधिक गहन व सुंदर करून जातात आणि प्रेम व्यक्त करताना व विरहात प्रेयसीच्या अवस्थेबद्दल वर्णन करताना हळूवार, रेशमी व सुचक बनतात.

अखंड भारताच्या फाळणीनंतर नवीन राजकीय समीकरणात व सांस्कृतिक ध्रुवीकरणात साहित्यावर फैज अहमद फैज़ यांच्या मदाग़दार उज़ालाफ, मसुब्हे आज़ादीफ व अली सरदार जा़फरी, अदीब सहारनपुरी यांच्या कम्यूनिझम विचारसरणीवर आधारित आधुनिक विचार प्रवाहाची शैली रूढ होत गेली. काव्याच्या नव्या परिभाषेने जन्म घेतला. पाकिस्तानात इस्लामी आणि भारतात समाजवादी असे रुप दिले. त्यात अहमद फराज़ यांनी विविध ऩज्मद्वारे लोकक्षोभ व्यक्त केला. त्यात त्यांना झिया उल हक राजवटीत भर मुशायऱ्यातून पोलिसांनी उचलून नेले व त्यांना छळ सोसावा लागला.

अनेकवेळा त्यांना पाकिस्तानातून परागंदा होऊन युरोप व कॅनडात जावे लागले. समाजातल्या एकूण अन्याय व पाखंडीपणा विरुद्ध आवाज उठविताना हा कवी म्हणतो-

अमीरे-शहर फकीरों को लूट लेता है फराज़

कभी ब-हिला-ए-मजहब कभी बनामे व़फा

जगामधील ढोंगी (पाखंडी) असा प्रस्थापित वर्ग हे फराज़ यांच्या ग़जलेचे मुख्य लक्ष आहे.

फराज़ांच्या ग़ज़ल व विविध ऩज्ममधून त्यांचे जीवनविषयक चिंतन, जगण्यासाठी सामाजिक व राजकीय द्वंद्वातून उभा राहणारा भावनिक संघर्ष, त्यातून होणारा कोंडमारा आणि विविशता, प्रेम, विरह, प्रतीक्षा व मिलनापलीकडील हे सर्व काही त्यांच्या या प्रवासात त्यांना ज्या गोष्टींनी छळले व भाळले तेच त्यांनी त्यांच्या लेखणीतून व्यक्त केले होते.

(लेखक गझलचे अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधुभारती यांचा आज नागरी सत्कार

$
0
0

विधुभारती यांचा आज नागरी सत्कार

नाशिक : शहरात विजययात्रेवर असलेल्या शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्य श्री विधुभारती यांचा नाशिकरांतर्फे सोमवारी (दि. १४) शंकराचार्य न्यास व सहयोगी संस्थांच्या वतीने नागरी सत्कार होणार आहे. यात धर्मजागरण पीठ, श्री शृंगेरी, नाशिक कैलास मठ, शुक्ल यजुर्वेदीय संस्था आणि महर्षी गौतमी-गोदावरी विद्या प्रतिष्ठान या संस्थांचा सहभाग आहे. डॉ. कुर्तकोटी सभागृह, जुना गंगापूर नाका येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास शंकराचार्यांना सन्मानपत्र दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारतीय पर्यटनाला मिळाली पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यटन प्रदर्शनातच सहलींची बुकिंग करण्यास पर्यटकांनी पसंती दिली असून, सर्वाधिक पसंती भारतीय सहलींना देण्यात आली आहे. तीन दिवसात भारतीय सहलींसाठी ४०, तर विदेशातील सहलींसाठी ३० पर्यटकांनी नोंदणी केल्याचे आयोजकांनी सांगितले.

ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ नाशिक (तान) तर्फे शुक्रवार ते रविवार या काळात जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये तीन दिवसीय पर्यटन प्रदर्शन भरविण्यात आले. ते पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. या तीन दिवसांत सुमारे अडीच हजारांवर पर्यटकांनी प्रदर्शनास भेट दिली. विविध सहलींची माहिती घेण्यात आली. यामध्ये ५० पर्यटन कंपन्यांचे प्रतिनिधी नाशिककरांना सहलींची माहिती देत होते. दोन महिन्यांनी येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटनाला कोणत्या ठिकाणी जाणे शक्य असेल, कोणती सहली खिशाला परवडणारी असेल, कोणत्या सहलीची निवड करणे योग्य असते, याबाबतची माहिती पर्यटकांना प्रदर्शनात देण्यात आली. यामध्ये धार्मिक सहलींसाठी २५, तर क्रुझ सहलींसाठी ५ पेक्षा अधिक पर्यटकांनी नोंदणी केल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

रविवारी रात्री ८ वाजता आयोजकांसह विविध पर्यटन कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत प्रदर्शनाचा समारोप झाला. यातून नाशिककरांपर्यंत पर्यटनाच्या नव्या संधींची माहिती पोहोचवणे सोपे झाल्याचे मत आयोजकांनी मांडले. यावेळी स्पॉट बुकिंग करणाऱ्यांना सहलीच्या शुल्कात विशेष सूट देण्यात आली. प्रदर्शनाचे संयोजन असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भालेराव, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, सचिव मनोज वासवाणी, खजिनदार अंबरिश मोरे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३० ड्रायव्हिंग लायसन्सवर ‘संक्रात’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०१८ या वर्षात वाहतूक पोलिसांनी तब्बल ३८६ वाहनचालकांचे वाहन परवाने जप्त केले. या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून ते प्रादेशिक परिवहन विभागास सादर करण्यात आले. यातील १३० परवाने निलंबित झाले असून, या वर्षी प्रलंबित २५६ वाहन परवान्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर शहर वाहतूक शाखेतर्फे संबंधीत वाहनचालकावर दंडात्मक कारवाई होते. दुसरीकडे वाहनचालकास जागेवर दंड भरायचा नसल्यास तो कोर्टात दाद मागू शकतो. अनेकदा 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह' अथवा 'ओव्हर स्पीड', अवैध प्रवासी वाहतूक, सिग्नल जम्पिंग असे गंभीर प्रकार सर्रास घडताना दिसतात. स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा वाहनचालकांचे परवाने वाहतूक पोलिस जप्त करतात. यानंतर तो परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठवले जातात. २०१८ या वर्षात वाहतूक शाखेने तब्बल ३८६ प्रस्ताव आरटीओकडे पाठवले. त्यातील १३० परवाने निलंबित झाले आहेत. २०१७ मध्ये वाहतूक शाखेने पाठवलेल्या १३४ प्रस्तावांपैकी सुमारे १३० परवाने निलंबित झाले होते. याबाबत वाहतूक पोलिसांनी सांगितले की, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, मोबाइलवर बोलणे, सिग्नल जम्पिंग, रॅश ड्रायव्हिंग तसेच मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे अशा प्रमुख पाच कारणांसाठी वाहनचालकाचा परवाना जप्त करण्यात येतो. जप्त परवाना आणि निलंबनाचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जातो. तेथे वाहनचालकाने आपली बाजू मांडल्यानंतर पुढील निर्णय होतो. वाहनचालकाने केलेली चूक पुन्हा होऊ नये, म्हणून ही कार्यवाही करण्यात येते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. वाहतूक पोलिसांशिवाय आरटीओ देखील आपल्या पातळीवर कारवाई करीत असते. वाहन परवाना निलंबित झालेल्या वाहनचालकास ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतरच निलंबनाचा कालावधी संपला की वाहन परवाना मिळू शकतो. संबंधित वाहनचालकांना बुधवारी आरटीओ कार्यालयात बोलवण्यात येते. त्याच्यावरील आरोप आणि वाहनचालकाने मांडलेली बाजू लक्षात घेता १५ दिवस ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला जातो. अवैध प्रवासी वाहतुकीच्या प्रकारात तर अनेकदा वाहन परवानादेखील काही कालावधीसाठी निलंबित करण्यात येतो. एखाद्या वाहनचालकाने चार महिन्यांच्या आत तीन वेळा नियमभंग केल्याचे समोर आल्यास त्याचा परवाना रद्द करता येतो. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यातून होणारा मनस्ताप देखील टाळता येऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

--

महिना निलंबन प्रस्ताव निलंबित परवाने

जानेवारी ६ ६

फेब्रुवारी ० ०

मार्च १२७ ५३

एप्रिल ४४ १९

मे ५१ २३

जुन २९ ८

जुलै २१ ४

ऑगस्ट ५ १

सप्टेंबर ४ १

ऑक्टोबर १ ०

नोव्हेंबर ० ०

डिसेंबर ९८ १५

एकूण ३८६ १३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारात दरवळला मकरसंक्रांतीचा गोडवा

$
0
0

खरेदीसाठी महिलांची गर्दी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक दिवसावर आलेल्या मकरसंक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिलावर्गाने रविवारी बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. सुटीची पर्वणी साधत तीळगूळ, हळदी कुंकवाच्या वस्तू यासह आकर्षक पतंगीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. यावेळी हलव्याच्या दागिन्यांच्या साजाने थटलेल्या बाजारपेठेत संक्रांतीच्या गोड पदार्थांचा गोडवा दरवळत होता.

यंदा मंगळवारी (१५ जानेवारी) मकरसंक्रांत आहे. त्या निमित्ताने रविवारी सुटीचा मुहूर्त साधत महिलावर्गासह तरुणांनी बाजारपेठेत गर्दी केली. बाजारातील रेडिमेड तीळगूळ, तिळाचे लाडू, चिक्की, गुळाची रेवडी, साखरफुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात आले. तीळगूळ ११० ते १६० रुपये किलो, रेवडी १२० रुपये, तिळाचे लाडू १८० रुपये किलोने मिळत आहेत. तसेच संक्रांतीला विशेष मान असणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके, गजरे, मोहनमाळ, सुट्टे तनमणी, मंगळसूत्र, बांगडी, घड्याळ, नथ, छल्ला, हार, फुलगुच्छ, नेकलेस, अशा दागिन्यांना महिलावर्गाने पसंती दिली. हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी मेनरोड, दहिपूल, रविवार कारंजा या ठिकाणी महिलांची गर्दी अधिक दिसली.

...

\Bपतंगांचे विशेष आकर्षण

\B यंदा कापडी आणि कागदी पतंगांचे विशेष आकर्षण दिसून आले. यामध्ये कार्टून्स पतंगीला दरवर्षीप्रमाणे अधिक मागणी आहे. त्याचप्रमाणे कापडी पतंगांमध्ये गरुड, स्पायडरमॅन, फिश, अँग्रीबर्ड या पतंग ३० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. नायलॉन मांज्याला बंदी असल्याने सुतरी आणि बरेली मांजा ग्राहकांनी खरेदी केला असला, तरी छुप्या पद्धतीने अद्यापही नायलॉन मांजा विकला जात असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या स्वस्त

$
0
0

लोगो - मार्केटवॉच

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाजार समितीत पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. यामुळे हिरव्यागार पालेभाज्या १० ते १५ रु. जुडीने मिळत आहेत. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदापात विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे कांदापातच्या जुडीचे दर ५ ते १० रुपयांपर्यंत घसरले आहेत. पाणी कमी पडू लागल्याने तसेच थोडा उन्हाचा चटका जाणवू लागल्याने पालेभाज्यांची आवक वाढू लागली आहे.

मेथी, कांदापात, शेपू, पालक या पालेभाज्यांचे जुडीचे दर १० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कोथिंबीरचीही आवक चांगली असून, चांगल्या प्रतीच्या जुडीला ४० रुपये दर मिळत आहे. मात्र मेथीचे दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात १५ ते २० रुपयांना मिळणारी मेथीची जुडी १० रुपयांपर्यंत खाली आली आहे. पालकची जुडी ५ रुपयांना मिळत आहे. यामुळे ग्राहकांना कमी दरात भरपूर भाजीपाला मिळत आहे.

फळभाज्यांचेही दर आवाक्यात असून, शेवगा मात्र भाव खात आहे. शेवग्याला ६० ते ८० किलोचा दर मिळत आहे. त्या खालोखाल कारले, गिलके व दोडके 'भाव' खात आहेत. या फळभाज्यांना किलोला दर ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. वांगे, भेंडी, ढोबळी मिरची या भाज्यांचे किलोच दरही ४० रुपयांपर्यंत पोहाचले आहेत.

टोमॅटोचे दर थोडे वाढले असून, २० रुपये किलोने मिळत आहेत. बटाट्याचे दर २० रुपये किलोवर स्थिर आहेत. उपवासाच्या पदार्थ तयार करण्यास पुढील महिन्यांपासून सुरुवात होईल. यामुळे बटाट्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

..

किरकोळ बाजारात कांदा महाग

बाजार समितीत दर मिळत नसल्याने शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर कांदा फेकून दिला. असे असूनही किरकोळ बाजारात मात्र कांदा १० ते १५ रुपये किलोने विक्री होत आहे. लाल नवीन कांदा विक्रेते १५ रुपये किलोने विकत आहेत.

....................

मोड आलेल्या कडधान्याला मागणी

नाशिक : हिवाळ्यात मोड आलेले कडधान्य जेवणात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. यामुळे मटकी, मूग, हरभरा, चवळी या मोड आलेल्या धान्याची मागणी वाढली आहे. मटकीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात ६० रुपये किलोने मिळणारी मटकी ४८ रुपये किलोने मिळत आहे. हरभरा ६०, मूग ६० तसेच, चवळी ६० रुपये किलोने मिळत आहे. यंदा दुष्काळामुळे कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे मोड आलेल्या कडधान्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

....

पालेभाज्यांचे दर

मेथी - १० रु. जुडी

कांदापात - ५ ते १० रु. जुडी

पालक - ५ रु. जुडी

शेपू - ७ रु. जुडी

कोथिंबीर - ४० रु. जुडी

..

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)

टोमॅटो - २०

काकडी - २०

शेवगा - ६० ते ८०

भेंडी - ४०

वांगे - ४०

कारले - ५०

गिलके - ४०

दोडके - ५० ते ६०

गाजर - २०

ढोबळी मिरची - ४०

मिरची - ४० ते ५०

बटाटा - २०

कांदा - १० ते १५

मुळा - १५ रु.चे ८

कोबी - १० रु. नग

फ्लॉवर - १० ते १२ रु. नग

...................

ज्वारी खातेय 'भाव'

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ज्वारी, बाजरीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच, रब्बी हंगामातही गहू, हरभरा पिकांची लागवड कमी झाली आहे. यामुळे गहू, ज्वारी, बाजरीचे दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ज्वारी गहू, बाजरीपेक्षा महाग असून, किलोचे दर ३५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

यंदा दुष्काळामुळे बाजरी व ज्वारीचे उत्पादन कमी झाले. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातही गहू व हरभरा पिकाची लागवड खूपच कमी झाली आहे. यामुळे या पिकांचे दर वाढले आहेत. गेल्या महिन्यात २६ रुपये किलोने मिळणारा गहू २९ ते ३० रुपये किलोने मिळू लागला आहे. बाजरीचे दर किलोमागे दाने ते तीन रुपयांनी वाढले आहेत. ज्वारी यंदा मात्र भाव खात आहे.

................

चव आणि दरमुळे द्राक्ष आंबटच!

नाशिक : बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली असली तरी चव आणि जादा दरामुळे द्राक्ष आंबट लागत आहेत. द्राक्षांना किलोला १८० ते २०० रुपये दर मिळत आहे. द्राक्षानंतर डाळिंबाचे दर असून, किलोला ६० ते ९० रुपये दर मिळत आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून फळांची आवक वाढू लागली आहे. बाजारात संत्री, पपई, चिक्कू, अॅपल बोर या फळांची सर्वाधिक आवक होत आहे. द्राक्षांची बाजारात हळूहळू आवक वाढू लागली असली तरी दर मात्र सर्वसामान्यांच्या आवकेबाहेर आहेत. द्राक्ष २०० रुपये किलोने विक्री होत आहेत. मात्र, साखर उतरली नसल्याने द्राक्ष थोडे आंबट लागत आहेत. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून द्राक्षांची आवक वाढणार आहे. डाळिंबाला चांगला दर मिळत असून, ६० ते ९० रुपये किलोने विक्री होत आहेत. इतर फळांचे दर मात्र जैसे थे आहेत.

..

फळांचे किलोचे दर (रुपयांमध्ये)

द्राक्ष - १०० ते १२०

डाळिंब - ६० ते ९०

स्ट्रॉबेरी - १८०

चिकू - ५० ते ६०

सफरचंद - १०० ते १४०

पपई - २५

टरबूज - २०

संत्री - ६०

शहाळे - ४० रु. नग

अननस - ६० रु. नग

ड्रॅगन - १०० रु. नग

किवी - ४० रु. नग

केळी - ३० रु. डझन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी संस्कृती समजून घ्यावी

$
0
0

राजेंद्र जोशी यांचे प्रतिपादन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी वारली जमात अभावग्रस्त असूनही कोणतीही तक्रार करीत नाही. निसर्गाच्या सानिध्यात साधी, सोपी, हव्यास नसलेली जीवनशैली जगतात व समाधानी असतात. शहरातील कलाप्रेमींनी वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यायला हवी, असे प्रतिपादन शंकराचार्य न्यास संचलित गोशाळेचे प्रमुख राजेंद्र जोशी यांनी केले.

ग्रीन केअर संस्था, विनर ग्रुप आणि वारली आर्ट फाउंडेशनतर्फे रविवारी 'चित्रांजली' वारली चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतींना समर्पित या प्रदर्शनाचे उद्घाटन राजेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर उपस्थित होते. कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात झालेल्या या प्रदर्शनात ज्येष्ठ कलाशिक्षक पूर्णिमा आठवले, त्यांच्या विद्यार्थिनी शर्वरी देशपांडे, सिमरन संधू, श्रावणी शिंदे, हर्षाली पुनावाला, ओवी नानिवडेकर यांची ५० पेक्षा जास्त वारली चित्रे मांडण्यात आली. संजय देवधर यांनी कॅन्व्हासवर रंगवलेली पेंटिंग्ज आणि सिन्नरचे रवींद्र वैष्णव यांच्या आकर्षक पॉटसचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती गाडगीळ आणि कर्नल अरुण गाडगीळ होते. प्रारंभी पूर्णिमा आठवले यांनी स्वागत केले व संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वाती गाडगीळ म्हणाल्या, की कलाकार बुद्धी, मन, हृदय आणि बोटांच्या समन्वयातून कलानिर्मिती करतात. माणसाचा 'मानव' होण्यासाठी कला महत्त्वाची ठरते हे वारली कलेतून प्रत्ययाला येते. संजय देवधर म्हणाले, की आदिम कलेतील सौंदर्य शहरी रसिकांपर्यंत नेतानाच आदिवासी बांधवांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जातो. नाशिकमध्ये वारली चित्रसंग्रहालय व्हावे असा मानसही त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांमधून आदिवासी जीवनशैली, बहारदार निसर्ग, दैनंदिन जीवन, समृद्ध पर्यावरण यांचा प्रत्यय रसिकांना आला. सोनल चिनागी हिने सूत्रसंचालन केले. सलिम सय्यद यांनी मान्यवरांचे सत्कार केले. शर्वरी देशपांडे हिने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत बुधवारी निर्धार परिवर्तन यात्रा

$
0
0

इगतपुरी तालुक्यात गणनिहाय बैठका

■■

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, एनसीपी कनेक्ट अॅपची माहिती देणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर सुरू असलेली निर्धार परिवर्तन संघर्ष यात्रा बुधवारी (दि. १६) घोटी येथे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्धार परिवर्तन मेळावा रविवारी झाला. याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन करण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी तालुक्यात गणनिहाय बैठका घेत आहेत.

राज्यभर काढण्यात येत असलेली निर्धार परिवर्तन - संघर्ष यात्रा घोटी बाजार समिती प्रांगणात येत आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री मधुकर पिचड, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मेळावा तालुक्यातील खेड गटातील खेडभैरव व धामणगाव येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समीर भुजबळ यांनी बैठक घेतली. यावेळी माजी आमदार जयवंत जाधव, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुने, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, बाळासाहेब वाघ, गोरख बोडके, सुनील वाजे, माजी उपसभापती पांडूरंग वारुंगसे आदिंनी निर्धार मेळावाबाबत माहिती दिली.

'राष्ट्रवादी युवक'ची कार्यकारिणी जाहीर

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

राष्ट्रवादी काँग्रेसची नाशिकरोड विभागीयस्तरीय बैठक जेलरोड येथील पाटीदार भवनमध्ये रविवारी झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नाशिकरोड विभागीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी सर्व पोलिंग एजंट आणि बुथ प्रमुखांचा आढावा घेतला.

नवीन कार्यकारिणीमध्ये नाशिकरोड अध्यक्षपदी सत्यम पोतदार, कार्याध्यक्षपदी सोनू वायकर, उपाध्यक्षपदी शाबीर शेख, सरचिटणीस रुपेश थोरात, प्रभाग अध्यक्ष सिद्धांत भवर, गणेश गांगुर्डे, अमित घोडे, सौरभ पवार, स्वप्नील फुले, संतोष पुंड, प्रसाद वाघ यांचा समावेश आहे. दरम्यान, निवडणुका जवळ आल्याने संघटन बांधणीवर भर द्यावा, असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले.

बैठकीस राष्ट्रवादीचे विभाग प्रमुख मनोहर कोरडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब मते, गजानन शेलार, कैलास मुदलीयार, गौतम पगारे, विशाल बने, संजय बोडके, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांनी भुजबळ यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाज सेवा संघातर्फे मोरॅक स्पर्धा उत्साहात

$
0
0

समाज सेवा संघातर्फे

\Bमोरॅक स्पर्धा उत्साहात

\Bनाशिक : महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पहिली जिल्हा मोरॅक स्पर्धा विद्यालयात रविवारी उत्साहात पार पडली. संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे यांनी मोरॅक खेळासाठी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या खेळात विविध वयोगटातील खेळाडू सहभागी झाले. यावेळी नाशिक मोरॅक असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मराठे, मुंबई मोरॅक असोसिएशनचे सचिव छत्रपती पुरस्कारप्राप्त महेंद्र तांबे, उद्योगपती सुरेश अलई, सचिव सुधाकर साळी, सहसचिव शांताराम अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता टाकळकर, प्राथमिक मुख्याध्यापिका शीतल पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ज्योतिकलश’चा मिटेना वाद

$
0
0

तोडगा काढण्यासाठी मध्यस्ताची गरज

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्योतिकलश सभागृह महापालिकेने सील केल्याच्या घटनेला रविवारी सहा दिवस उलटून गेले. परंतु, या प्रकरणी काही तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक वर्तुळातील बड्या मंडळींनी चुप्पी का साधली आहे, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणात मध्यस्ती करून तो मिटवण्याची गरज आहे, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

कुसुमाग्रज यांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात आलेले हे सभागृह नाटकांच्या तालमीसाठी तसेच, इतर छोट्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगात आणले जाते. मात्र स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवरून महापालिकेने हे सभागृह सहा दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता सील केले. या संदर्भात रहिवाशांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असून, कोणत्याही करारनाम्याची मुदत साधारण ३० वर्षे असते. लोकहितवादी मंडळाला ही जागा ताब्यात घेऊन ३८ वर्षे उलटली आहेत. या जागेवर उद्यान उभारून मगच सभागृह बांधावे, अशी करारनाम्यात अट आहे. मात्र तिचे उल्लंघन करण्यात आले आहे. या जागेची देखभाल केली जात नसल्याने तो मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. सभागृह रहिवाशांना वापरासाठी दिले जात नाही. मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. कुसुमाग्रजांनी विशिष्ट उद्देशाने सभागृह बांधले असले, तरी त्यांच्या नावाचा भावनिक वापर करून लोकहितवादी मंडळ ताबा सोडण्यास तयार नाही. राका कॉलनीत सर्व रहिवासी सुसंस्कृत असून, कोणी दगडफेक वा फलक फाडण्याचे काम करणारे नाही. तरी त्यांची अकारण बदनामी केली जात आहे. उलट लोकहितवादी मंडळाकडूनच सभागृहाचा व्यावसायिक वापर केला जात असून, एका महिलेकडून ५० हजार रुपये जागाभाडे वसूल करण्यात आले. एका संस्थेला व्यावसायिक उद्देशासाठी सभागृह भाड्याने देण्यात आले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी रहिवाशांनी विरोध केल्यानंतर त्या संस्थेला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

...

लवकरच होणार संस्था स्थापन

राका कॉलनीतील नागरिक लवकरच संस्था स्थापन करीत असून, महापालिकेने सभागृह या संस्थेच्या ताब्यात द्यावे. या संस्थेच्या परवानगीने नाटकांच्या तालमींसाठीही सभागृह उपलब्ध करून दिले जाईल. अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूटपाथवरच्या नागरिकांना मायेची उब

$
0
0

फूटपाथवर ब्लँकेटवाटप

नाशिक : शहरात वाढत्या कडाक्याच्या थंडीत त्रिमूर्ती चौक परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. नाशिक ट्रान्सपोर्टकडून सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. दरवर्षी थंडीच्या हंगामात गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप केले जाते. यंदाच्या वर्षी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत उपक्रम राबविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्र जिवाचे’तर्फे मदतीचा हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्र जिवाचे फाउंडेशन, पंचवटी या सांस्कृतिक व सामाजिक संस्थेच्या वतीने माइल स्टोन फॉर स्पेशल चिल्ड्रन ट्रस्टला एक लाख २१ हजार रुपये, तर मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थेला २१ हजार रुपये निधी देण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिर येथे 'स्वर-श्रेया' हा नावीन्यपूर्ण संगीतमय कार्यक्रम झाला त्यात हा निधी देण्यात आला.

मैत्र जिवाचे फाउंडेशनतर्फे समाजहिताची परंपरा अखंडपणे सुरू ठेवत यंदाच्या वर्षी संस्थेतर्फे व काही समाजबांधवांच्या मदतीने व या कार्यक्रमाच्या रकमेतून माइल स्टोन फॉर स्पेशल चिल्ड्रन ट्रस्ट, नाशिक या संस्थेच्या सुमारे ४५ मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना तसेच मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था, विल्होळी, नाशिक या शाळेच्या ३२ विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले.

स्वर श्रेया कार्यक्रमात नाशिकच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मीना परूळकर-निकम व गायिका श्रेयसी रॉय तसेच सुप्रसिद्ध गायक चैतन्य कुलकर्णी, मुंबई यांनी गाणी सादर केली. सत्यम शिवम सुंदरम, सुन रहा है ना तू, बदमाश दिल ये, बैरी पिया बडा बेदर्दी, घुमर, बहारा, झुबी झुबी, अधीर मन झाले, मनवा लागे, सिंगार को रहने दो आदी गाण्यांचा समावेश होता.

कार्यक्रमात मैत्र जिवाचे फाउंडेशनच्या कामावर आधारित एक चित्रिफत दाखवण्यात आली. कार्यक्रमास संगीतकार प्रशांत महाबळ यांनी वाद्यवृंद संयोजन केले. निवेदन पुणे येथील निवेदक संदीप पंचवाटकर यांनी केले. फाउंडेशनच्या वतीने अ‍ॅड. अजय निकम, गणेश भोरे, सुनील बोरसे, हर्षद मटकर व महेश महंकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅकमेल होणारे सरकार नकोच!

$
0
0

अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीचे गुपीत बाहेर काढण्याची धमकी देशाच्या पंतप्रधानाला विदेशी कंपन्या देऊन ब्लॅमकेल करत आहे. जे सरकार आतापर्यंत दुसऱ्याला ब्लॅकमेल करत होते तेच सरकार ब्लॅकमेलला बळी पडले आहे. त्यामुळे असे ब्लॅकमेलिंग होणारे सरकार आपल्याला नको, असे सांगत भारीप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

अनंत कान्हेकर मैदानात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत बोलतांना त्यांनी हा आरोप केला. यावेळी आंबेडकर यांनी, नोटाबंदी जाहीर होण्याअगोदर विदेशी कंपन्याबरोबर जुलै महिन्यात डेबिट व क्रेडिट कार्ड बनवणाऱ्या कंपन्याबरोबर करार झाला होता. त्यानंतर नोटाबंदी करण्यात आली. पण, त्याचा वापर जास्त होत नसल्यामुळे सरकारने आठ दिवसापूर्वी पुन्हा दोन हजाराच्या नोट कमी छापण्याचा निर्णय घेतला. यामागे हे ब्लॅकमेलिंग असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने नोटाबंदी काळापैसा बाहेर काढण्यासाठी केली नाही तर ती आमच्याशी केलेल्या करारामुळे केली असे गुपीत आम्ही लोकांना सांगू, अशी धमकी या कंपन्यानी दिल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. या सभेत त्यांनी राफेल करारातही सरकार देशाच्या सुरक्षिततेशी भाजप खेळत आहे. विमाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणाताच करार न केल्यामुळे ती बिघडली तर ती कचऱ्यात जाणार असल्याचेही सांगितले.

राज्यात १६९ कुटुंबाचे सरकार

राज्यात सत्ता मराठ्यांची नाही तर ती फक्त १६९ कुटुंबाची आहे. कोणत्याही ठिकाणचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य घ्या त्यांचे नाते एकमेकांशी जोडलेले आहे. त्यामुळे राज्यात फक्त १६९ कुटुंबाभोवतीच राजकारण फिरते. त्यामुळे वंचितांना सत्तेत स्थान मिळत नाही. मराठ्यांचे सरकार असते तर कांदा रस्त्यावर आला असता का? आत्महत्या झाल्या असत्या का ? असा प्रश्न करून अॅड. आंबेडकर यांनी या कुटंबाच्या हातातून सत्ता काढा त्या दिवशी शेतकरी आत्महत्या थाबंतील, असे आवाहन वंचित मराठा समाजाला केले.

शिवसेनेचे भांडण प्रियकरांचे

शिवसेना व भाजपचे भांडण नवरा-बायकोचे आहे, असे बोलले जाते. पण, हे भांडण नवरा-बायकोचे नसून ते प्रियकर-प्रेयसीचे आहे. नवरा-बायकोचे भांडण झाले तर ते वेगळे होतात. पण, प्रियकर-प्रेयसीचे भांडण झाले तर ते अधिक मागून संपवात, असे सांगून यांच्या भांडणाकडे लक्ष न देता. वंचितांची सत्ता आणा असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावना नाही; पुरावे महत्त्वाचे

$
0
0

जिल्हा न्यायाधीश एस. सी. खती यांचे प्रतिपादन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायव्यवस्थेसाठी काम करताना खरं बोलण्याचे धाडस, दोन्ही बाजू ऐकून घेण्याचे सामंजस्य असावे. कायद्यात भावना नाही तर पुरावे महत्त्वाचे असतात. त्यामुळे जितक्या वेळा पुराव्यांचा अभ्यास करता येईल तितक्या वेळा तो करावा, असे प्रतिपादन जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. खती यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे एनबीटी लॉ कॉलेज व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १३व्या राष्ट्रस्तरीय मूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पारितोषिक वितरणाने या स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की, कायदा आणि वेळ यांचा मेळ घातल्यास आपण आदर्श व्यक्ती होऊ शकतो. स्पर्धांमधून भविष्याची तयारी होत असते. ही तयारी मूट ट्रायलमधून होईल असे सांगत स्पर्धक विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कायदा समजून घेण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

...

\Bस्पर्धेतील विजेते \B

- बेस्ट जजमेंट अॅवॉर्ड - अभिजित खोत (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

- बेस्ट मेमोरिअल अॅवॉर्ड - दयानंद लॉ कॉलेज, सोलापूर

- बेस्ट विटनेस अॅवॉर्ड - राधिका पुरोहित, दीपेश सक्सेना, प्रतीक बानभेरू, आकाश जाधव

- बेस्ट व्हॉलेंटिअर अॅवॉर्ड - एन. बी. टी. लॉ कॉलेज, नाशिक

- बेस्ट एक्झामिनेशन ऑफ विटनेस अॅवॉर्ड - अभिषेक चौहान (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

- बेस्ट क्रॉस एक्झामिनेशन - विशाखा सोनटक्के (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

- बेस्ट अर्ग्युमेंट अॅवॉर्ड - आनंद राठोड (अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ)

- बेस्ट अॅडव्होकेट लेडी अॅवॉर्ड - ध्वीजा शाह (सिम्बॉयसिस लॉ कॉलेज, हैदराबाद)

- बेस्ट अॅडव्होकेट मेल अॅवॉर्ड - नवनीत डोगरा (सिम्बॉयसिस लॉ कॉलेज, हैदराबाद)

- रनर अप टीम अॅवॉर्ड - ऋषिकेश पानसरे, आनंद नेटावटे, श्रीलेखा भागवत (मविप्र समाज लॉ कॉलेज)

- विनर टीम अॅवॉर्ड - अभिषेक चौहाण, विशाखा सोनटक्के, अभिजित खोत (डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images