Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नित्याचा त्रास

$
0
0

\Bठिकाण : \Bजुने नाशिक\B

\B

जुने नाशिक परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या जनावरांमुळे आरोग्याचा प्रश्नही उभा ठाकला आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे महापालिकेने कायम कानाडोळा केला जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

\Bयेथे असतात गायी\B

जुन्या नाशिकमध्ये सारडा सर्कल, जुना वडाळा नाका, खडकाळी, दूधबाजार, गाडगे महाराज चौक, फूलबाजार, भद्रकाली, रविवार कारंजा या भागात मोकाट जनावरांबरोबरच भटक्या कुत्र्यांचाही त्रास आहे. परिसरातील गोठा मालकांची ही जनावरे असून, चरण्यासाठी त्यांना मोकळे सोडले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

\B

वाहतुकीचा प्रश्न\B

गायी रस्त्याच्या मधोमध रवंथ करत बसलेल्या असतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी अनेकदा होत असते. सारडा सर्कल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे होणारे अपघातही अधिक आहेत. गायींप्रमाणेच जुन्या नाशिकमधील प्रत्येक गल्लीत मोकाट कुत्र्यांचा मुक्त वावर दिसून येतो. ही भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जातात. अनेकदा ही कुत्री शाळकरी मुलांवर धावतात. जुन्या नाशिकमधील मोकाट जनावारांची समस्या कित्येक वर्षांपासून कायम असून, महापालिका प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

\Bरात्रीची वेळ घातकच\B

नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर महापालिकेने जुने नाशिक परिसरातील भटकी कुत्री ताब्यात घेत, निर्बीजीकरण केले. मात्र, त्यानंतर ही कुत्री पुन्हा रस्त्यावर सोडण्यात आली. या कुत्र्यांपाठोपाठ इतरही कुत्री परिसरात येऊ लागली आहेत. गंगाघाट, फूलबाजार, भद्रकाली, मेनरोड, दहीपूल या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रात्री व पहाटे या भागातून जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. याकडे महापालिकेने लक्ष देत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

\Bघंटागाडी दोन दिवसाआड\B

जुने नाशिक भागात घंटागाडी दोन दिवसाआड येते. त्यामुळे परिसरात कचरा मोठ्या प्रमाणावर साचून राहतो. घंटागाडी नियमित येत नसल्याने फूलबाजार, दहीपूल, गंगाघाट, भद्रकाली मार्केट, खडकाळी परिसरात रस्त्याच्या बाजूला कचरा टाकला जातो. हा कचरा खाण्यासाठी गायी आणि कुत्री परिसरात येतात. त्यामुळे परिसरात मोकाट जनावरांचा वावर अधिक असल्याचे दिसते. घंटागाडी नियमित आल्यास, तसेच परिसरात स्वच्छता राहिल्यास ही समस्या कमी होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली.

फूलबाजार, गंगाघाट व भद्रकाली परिसरात कचऱ्याची समस्या अधिक आहे. या कचऱ्यामुळे गायी व इतर भटकी जनावरे इथे येतात. भटक्या कुत्र्यांमुळे पहाटे किंवा रात्री या परिसरातून चालणेही कठीण होते. गायी रस्त्यातच ठाण मांडून असल्यामुळे वाहने चालवणेही कठीण होते.

- आकाश कुंवर, नागरिक

परिसरात दोन ते तीन दिवसांतून एकदा घंटागाडी येते. त्यामुळे कचरा परिसरातील रस्त्यावरच टाकला जातो. साचलेल्या कचऱ्याजवळ भटकी कुत्री जमतात. ही कुत्री येणाऱ्या-जाणाऱ्यांवर धावून जातात. या समस्येवर योग्य उपाय होणे आवश्यक आहे.

- सचिन देवगिरे, नागरिक

मोकाट जनावरांचा योग्य तो बंदोबस्त व्हावा. यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. लसीकरणानंतर पुन्हा जनावरांना रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे ही संख्या वाढते. ताब्यात घेण्यात आलेली जनावरे निर्जन स्थळी सुरक्षित ठेवायला हवी.

- गजानन शेलार, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरणबारीचे पूरपाणी ‘तळवाडे भामेर’मध्ये पडणारच

$
0
0

आमदार दीपिका चव्हाण यांची ग्वाही

म. टा . वृत्तसेवा, सटाणा

तळवाडे भामेर पोहच कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असून, कुठल्याही परिस्थितीत येत्या पावसाळ्यात हरणबारी धरणाचे पूरपाणी तळवाडे भामेर येथील पाझर तलावात पडणारच, अशी ग्वाही बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी तळवाडे भामेर येथे झालेल्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी दिली.

बागलाण विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळवाडे भामेर पोहच कालव्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता विद्यमान भाजप-सेनेच्या सरकारने रद्द केल्यामुळे या कामांना विलंब झाला होता. प्रशासकीय मानत्या रद्द झाली नसती तर दोन वर्षापूर्वीच तळवाडे भामेर पोहच कालवा पूर्ण झाला असता आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह, शेतीचा प्रश्‍न निकाली निघाला असता.

तळवाडे भामेर पोहच कालव्याचे २६ ते २८ किलोमीटरमधील बांधकामे व अनुषांगिक कामासाठी १ कोटी ६६ लक्ष ७३ हजार रुपयांची निविदा निघाली आहे. त्यात कालव्याचे बांधकामे व मातीकामाचा समावेश आहे. सदरहू निविदा काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तसेच जलसंपदा विभागाचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रधानसचिव ए. एस. सुर्वे यांच्याकडे केली हेाती.

तळवाडे भामेर पोहच कालवा व हरणबारी डावा कालवा या आघाडी सरकारच्या काळात मंजूर असलेल्या कामांना विद्यमान सरकारने सर्व प्रशासकीय मान्यता रद्द केल्या होत्या. परंतु आमदार दीपिका चव्हाण यांनी शासनाकडे आणि विधीमंडळात या कामांना पुन्हा सुधारित मान्यता द्यावी यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे गुजरातकडे वाहून जाणाऱ्या ५३.०२ दलघमी पाणी हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्र. ८ साठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. यावेळी सरपंच शकुंतला गायकवाड, शांताराम गायकवाड, सुरेश गायकवाड, जि. प. सभापती यतीन पगार, माजी जि. प. सभापती अशोक सावंत आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगावमध्ये लवकर मुलींचे वसतिगृह

$
0
0

शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आडगाव येथील मुलींचे वसतिगृह लवकरच सुरू करता यावे यासाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वसतिगृहाच्या इमारतीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे शनिवारी सुपूर्द केली. समितीमार्फत पुढील दीड महिन्यात वसतिगृह सुरू करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, आर्थिक दुर्बल घटकातील २०० मुलींना मार्चमध्ये निवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नाशिकसह नागपुर, औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यातील कराड येथे आर्थिक दुर्बल घटकांतील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह उभारले. नाशिकमध्ये आडगाव परिसरात पाच मजली भव्य वसतिगृह उभारण्यात आले आहे. येथे २०० मुलींची निवासाची व्यवस्था होणार असून, तेथे पिण्याचे पाणी, बेड, गाद्या, स्वच्छतागृह, पार्किंग तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध कारणांमुळे ही इमारत गेले काही दिवस वापराविना पडून होती. परंतु अलीकडेच सुरू झालेल्या पंजाबराव देशमुख वसतीगृहाच्या धर्तीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आडगाव येथील वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी संबंधित वसतिगृहाची इमारत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती यापुढील काळात वसतिगृहाचा ठेका देण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ठेकेदार नेमणुकीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या वसतिगृहाचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल फोरमच्या टँकरमुक्तीला बळ

$
0
0

वेळे, खोकरतळे आणि एकदरा गावांचा पाणी प्रश्न सुटणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या खासदार निधीतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकरमुक्त गाव या अभियानास साडे चौदा लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे तसेच पेठ तालुक्यातील एकदरा आणि खोकरतळे या तीन गावांना पाणी टंचाईतून मुक्तता मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सोशल नेटवर्किंग फोरम ही संस्था टंचाईग्रस्त आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडवत असून अनेक गावांना टँकरमुक्त केले आहे. यापैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा या गावचा पाणी प्रश्न फोरमने सोडवल्यावर या योजनेचे लोकार्पण खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले होते. कोणत्याही यंत्रणांच्या दृष्टिक्षेपात नसलेल्या या गावात धड रस्ताही नव्हता. इतक्या दुर्गम भागातील गावाचा पाणी प्रश्न एका सामाजिक संस्थेने सोडवला याची माहिती मिळाल्यावर मागील वर्षी ते खास दिल्लीहून लोकार्पणास हजर राहिले. फोरमचे काम प्रत्यक्ष बघून त्यांनी कार्यक्रमातच पुढील काही गावांसाठी खासदार निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता करून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील तीन गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साडे चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

आतापर्यंत विविध संस्था आणि समाजमाध्यमांवरील तरुणांच्या सहकार्याने फोरमने अतिशय कमी खर्चात ११ गावांना टँकरमुक्त केले आहे. याशिवाय केळबारी या गावाचे काम प्रगतीपथावर असून सहस्त्रबुद्धे यांच्या खासदार निधीसंदर्भातही शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर लवकरच अजून तीन गावांचा पाणी प्रश्न सुटेल.

खासदार सहस्त्रबुद्धेंचा आदर्श घेऊन कार्पोरेट कंपन्या, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही सहकार्य केल्यास अजून अनेक तहानलेल्या गावांना पाणी उपलब्ध करून देऊ.

- प्रमोद गायकवाड, संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम._

ज्या गावात रस्ताही नाही तिथे सोशल नेटवर्किंग फोरमने पाण्याची समस्या सोडवल्याचे बघून आनंद वाटला आणि पुढील गावांना माझ्या निधीतून मदत केली. आता नाशिकच्या प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून तीनही गावांना उन्हाळ्याच्या आत पाणी पुरवावे.

-डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाची पेटली दाढी दुसरा पेटवी विडी

$
0
0

बनावट विडी बंडलवर नामांकित कंपनीचे लेबल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बनावट विडी बंडलवर नामांकित कंपनीचे लेबल लावून विक्रीचे रॅकेट उघडकीस आले आहे. इनव्हेस्टीगेशन अ‍ॅण्ड डिटेक्टीव्ह सर्व्हिस या खासगी गुप्तचर संस्थेने हा घोटाळा उघडकीस आणला. दूधबाजारातील मास्टर सुपारी या होलसेल दुकानात बनावट साठा मिळून आला असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये कॉपी राईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्सारी जाफर अहमद (रा. पिंजारघाटरोड, भद्रकाली) असे संशयीत विक्रेत्याचे नाव आहे. भद्रकाली भागात संभाजी विडीच्या नावाने मोठ्या प्रमाणात बनावट विडी विक्री होत असल्याची माहिती मुंबईस्थीत इनव्हेस्टीगेशन अ‍ॅण्ड डिटेक्टीव्ह सर्व्हीस या संस्थेस मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी प्रादेशिक व्यवस्थापक संतोष कुमार गांधी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जुने नाशिक भागात धाडसत्र राबविले. दूधबाजारातील मास्टर सुपारी अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स या होलसेल दुकानात छापा टाकला असता पथकाच्या हाती बनावट विडीचा साठा लागला. बनावट विडीस नामांकित संभाजी विडीचे लेबल वापरून विक्री सुरू होती. या दुकानात मिळालेल्या विडी बॉक्सवर छत्रपती विडी वर्कस साबळे वाघीरे आणि कंपनी ट्रेड मार्क रजिस्टर नंबर २८१२२२ असल्याने डिटेक्टीव्ह पथकाचा संशय बळावला. या पथकाने तत्काळ कंपनीशी संपर्क साधत या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लावला. पोलिसांच्या मदतीने या दुकानातील सुमारे वीस हजार रूपये किमतीचा बनावट विडीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकातर्फे सात ‘जिनिअस’चा सन्मान

$
0
0

तुर्की ओपन चॅम्पियनशिप २०१८मध्ये कोरले नाशिकचे नाव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून 'तुर्की ओपन चॅम्पियनशिप' या आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील स्पर्धेत नाशिकचे नाव कोरणाऱ्या सात छोट्या जिनिअस विद्यार्थ्यांना शनिवारी गौरविण्यात आले. अशोका ग्लोबल अकॅडमी, अर्जुननगर येथे अशोका एज्युकेशन फाउंडेशन आणि जिनिअस किड्सच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. तुर्कीमध्ये सादर केलेले डेमो विद्यार्थ्यांनी मोठ्या सहजपणे या कार्यक्रमात सादर करून उपस्थितांना अचंबित केले.

१ व २ डिसेंबर रोजी इस्तंबूल, तुर्की येथे मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशनतर्फे 'तुर्की ओपन चॅम्पियनशिप' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्लिष्ट गणिते, फ्लॅश अँझान या सर्वांत अवघड विषयाची स्पर्धा, मेंटल मॅथ स्पर्धांचा यात समावेश होता. या स्पर्धेत जगभरातील अनेक देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातून जिनिअस किड्स संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांमधील ४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात नाशिकमधील जिनिअस किड्स, गंगापूर रोड अकॅडमीतील आर्यन शुक्ल, गार्गी जोशी, अरुंधती पताडे, तनुश्री जगताप, रोहिणी शिरडकर, दुर्वा माळी, समृद्धी शेवाळे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. आर्यन शुक्ल, गार्गी जोशी, अरुंधती पताडे यांनी दोन जागतिक विक्रम नोंदवून ८ सुवर्णचषक, १५ पदके मिळविली. तनुश्री जगताप, रोहिणी शिरडकर, दुर्वा माळी, समृद्धी शेवाळे यांनी पहिल्या दहा क्रमांकांमध्ये येऊन विशेष मानांकन प्राप्त केले. नितीन जगताप व वैशाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. तसेच त्यांना जागतिक स्तरावरील मार्गदर्शक जिनिअस किड्स, इंडियाचे संस्थापक युजेबियस नोरोहा यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले होते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अशोका ग्रुपचे अशोक कटारिया, आशिष कटारिया यांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

- -

डेमोंनी केले अचंबित

गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ हे सामान्यत: विद्यार्थ्यांना शाळेत नकोशी वाटतात. परंतु, अवघ्या वीस, तीस सेकंदांत क्लिष्ट गणित, दहा आकडी अंकांची बेरीज, गुणाकार चुटकीसरशी सोडवत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना अचंबित केले. मोठमोठ्या अंकांवर केवळ एकदा नजर फिरवून त्याची बेरीज, गुणाकार करून काही क्षणात सांगितलेली एकूण उत्तरे यांना उपस्थितांची प्रचंड दाद मिळाली.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम मोडाल, तर खबरदार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कामकाजाचा महिनाभर अभ्यास केल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मावळते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीमुळे सुस्तावलेली यंत्रणा, तसेच बेशिस्त कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. थेट खातेप्रमुखांनाच नोटिसा देत त्यांनी नियम मोडाल, तर खबरदार, असा इशाराच दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करसज्जतेसाठी शी जिनपिंग यांचे आदेश

$
0
0

वृत्तसंस्था, बीजिंग

शतकभरात घडल्या नाहीत, अशा महत्त्वाच्या घडामोडी जगात घडत आहेत, असे सांगत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराला युद्धासाठी सदैव तयारीत असण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

शी हे चीनच्या लष्कराचेही प्रमुख असून, त्यांनी केंद्रीय लष्करी आयोगाच्या बैठकीमध्ये हे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, 'जगामध्ये शतकभरात घडल्या नाहीत, असे महत्त्वाचे बदल घडत आहेत. चीनलाही विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे या बदलांच्या काळामध्ये कोणत्याही धोक्यासाठी सज्ज राहणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सुरक्षा दलांनी सदैव सज्ज राहण्याची गरज आहे. सुरक्षा दलांनी धोका, समस्या आणि युद्धाविषयीची जागरुकताही वाढविणे गरजेचे आहे. संरक्षण आणि लष्करी विकासासाठी पक्ष, सरकारी विभाग आणि संस्थांनी स्थानिक व केंद्रीय अशा सर्वच स्तरांवर सहकार्य करण्याची गरज आहे.'

चिनी लष्करामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या सैनिकांसाठीचा प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांवरून सहा महिन्यांचा करण्यात आला आहे. शी यांच्या उपस्थितीमध्ये या नव्या सत्राची सुरुवातही झाली. लष्कराने आपद्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठीही सशक्त असण्याची गरज त्यांनी नमूद केली.

अमेरिकेच्या लष्करासमोरील सर्वांत महत्त्वाचे प्राधान्य चीन आहे, असे अमेरिकेचे प्रभारी संरक्षणमंत्री पॅट्रीक शनहान यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, शी यांचे वरील विधान आले आहे.

व्यापारचर्चा प्रगतीपथावर

वॉशिंग्टन : द्विपक्षीय व्यापाराच्या दृष्टीने चीनबरोबर उच्चस्तरावरील चर्चा प्रगतीपथावर आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली; तसेच गेल्या वर्षीच्या आयात शुल्काच्या धक्क्यातून देशातील पोलाद उद्योग सावरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये पोलादावरील आयातशुल्क २५ टक्के केले होते. चीननेही त्याला प्रत्युत्तर देत, काही वस्तूंवरील आयात शुल्क वाढविले होते आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अर्जेंटिनामध्ये झालेल्या जी-२० देशांच्या परिषदेवेळी ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची भेट झाली होती आणि व्यापारयुद्धावर चर्चेतून तोडगा काढण्यावर सहमती झाली. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा होत असून, त्यामध्ये मी आणि शी जिनपिंग दोघेही लक्ष देत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शबरीमला वाद पेटताच

$
0
0

वृत्तसंस्था, कन्नूर/तिरुअनंतपुरम

शबरीमला प्रकरणावरून सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष(माकप) आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारीही हिंसक चकमकी झाल्या. अनेक नेत्यांची घरे, दुकाने तसेच कार्यकर्ते यांना लक्ष्य करण्यात आले.

माकपचे आमदार ए. एन. शमशीर यांच्या माडपिडीकाइल येथील घरावर, भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या वडियील पीडिकिया येथील घरावर आणि माकपचे कन्नूर जिल्ह्याचे माजी सचिव पी. शशी यांच्या तलस्सेरी येथील घरावर बॉम्ब फेकण्यात आले. मात्र, या हल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

शमशीर आणि शशी यांच्या घरांवर हल्ला झाल्यानंतर काही वेळातच मुरलीधरन यांच्या वंशपरंपरागत घरावर हल्ला करण्यात आला. माकप आणि संघ-भाजप नेत्यांमध्ये शांततेसाठी वाटाघाटी सुरू असतानाच हा हिंसाचार सुरू होता.

रजस्वला वयातील दोन महिलांनी दोन जानेवारी रोजी शबरीमलातील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केल्यानंतर केरळमध्ये उसळलेला हिंसाचार अद्याप शमलेला नाही. कन्नूरसह पेरंब्रा, कोझिकोडे, मल्लपुरम, अय्यप्पाचे स्थान असलेले अदूर आदी ठिकाणीही शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.

कन्नूरमधील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी २६० जणांना अटक केली आहे. पेरियारम भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय अज्ञात हल्लेखोरांनी जाळून टाकले.

पेरुंब्रा येथे माकपच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला. तलस्सेरी येथे संघाचे पदाधिकारी के. चंद्रशेखरन यांच्यावर हल्ला करण्यात आला. संघाचे स्वयंसेवक हिंसाचार घडवित असल्याचा आरोप मापकचे प्रदेश चिटणीस कोडियेरी बाळकृष्णन यांनी केला.

'तंत्री नव्हे, ब्रह्मराक्षस'

कोची : महिलांनी प्रवेश केल्यानंतर शुद्धिकरणासाठी मंदिर बंद ठेवणाऱ्या मुख्य पुजाऱ्यावर केरळमधील मंत्र्याने जोरदार टीका केली आहे. हा पुजारी म्हणजे ब्रह्मराक्षस आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री जी. सुधाकरन यांनी म्हटले आहे. जी व्यक्ती एखाद्या भगिनीला अशुद्ध म्हणते ती माणूस म्हणवून घेण्याच्या योग्यतेची आहे का, असा प्रश्नही सुधाकरन यांनी उपस्थित केला आहे. 'हा तंत्री म्हणजे जातिवादाचा पुतळा आहे. तो ब्राह्मण नसून, ब्रह्मराक्षस आहे,' अशी टीका सुधाकरन यांनी केली आहे.

सरकारमुळेच हिंसाचार - भाजप

नवी दिल्ली : केरळमधील हिंसाचार राज्यातील डाव्या आघाडी सरकारमुळेच होत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. हा प्रश्न परिपक्वतेने हाताळण्याऐवजी सरकारने तो पेटवला. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले, काही मारलेही गेले. 'सध्या या हिंसाचाराचा केंद्रबिदू कन्नूर आहे. तो मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच हा प्रश्न जटील बनला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी म्हटले आहे आमच्या नेत्यांच्या घरांवर बॉम्ब फेकले गेले. हे सर्व माकपच्या गुडांनी सरकारी आशीर्वादाने केले आहे. संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात हिंसाचार करण्याची माकपची परंपराच आहे. या हिंसाचाराला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत,' असे राव म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांकडून दखल

न्यूयॉर्क : शबरीमला वादातून उसळलेल्या हिंसाचाराची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे. सर्वांना कायद्याचे पालन केले पाहिजे, अशी अपेक्षा सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी व्यक्त केली आहे. 'या विषयावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे हा विषय आम्ही भारतीय यंत्रणांवरच सोडत आहोत. सर्व पक्षांनी कायद्याचे पालन करावे, अशीच आमची इच्छा आहे. सर्वांना समानतेचा मूलभूत अधिकार आहे, अशीच संयुक्त राष्ट्रांची भूमिका आहे,' असे सरचिटणीसांचे प्रवक्ते फरहान हक यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार हक्कासाठी मंगळवारपासून एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकार ही कामगारांची पिळवणूक करणारी संस्था बनली असून, कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने न पहाणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी ८ आणि ९ जानेवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, या संपामध्ये २०० कारखान्यांमधील २५ हजार कामगारांसह विविध आस्थापनांचे शेकडो कामगार सहभागी होणार असल्याची माहिती कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

'एक धक्का और दो' अशी साद घालत मोठ्या संख्येने या संपात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.

सर्व क्षेत्रामधील सर्व प्रकारच्या कामगार, कष्टकऱ्यांना महागाई भत्त्यासह कमीत कमी १८ हजार रुपये किमान वेतन लागू करावे, महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पाऊले उचलावीत, बेरोजगारीवर नियंत्रण आणावे, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करावी, कष्टकऱ्यांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन द्यावी, कंत्राटीकरण थांबवावे यासारख्या काही प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संघटनांनी यापूर्वी दोनवेळा एक दिवसांचा संप पुकारला. संसदेसमोर आंदोलन केले. १५ कोटी लोक संपामध्ये सहभागी होऊन देखील पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली नसल्याबद्दल सिटू संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी नाराजी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला श्रीधर देशपांडे, आयटकचे राजू देसले, वीज कामगार संघटनेचे व्ही. डी. धनवटे, बॉश कंपनी संघटनेचे प्रवीण पाटील, क्रॉम्पटन ग्रिव्हजचे रावसाहेब ढेमसे, सिएटचे शिवाजी भावले, आशा प्रवर्तक संघटनेचे विजय दराडे, विमा कर्मचारी संघटनेचे मोहन देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे आदित्य तुपे आदींसह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संपाबाबत डॉ. कराड म्हणाले, 'कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना वेळ नाही. मालकवर्गाला फायदेशीर ठरणारे कामगारविरोधी कायदे हे सरकार आणत आहे. या सरकारमुळे कायम नोकऱ्या ही पद्धतच मोडीत निघाली आहे. नोकरीची सुरक्षितता राहिलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कामगार संघटनांच्या १२ प्रमुख मागण्या असून, त्या सरकारने मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळेच या संपाचे आवाहन करण्यात आले आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील २०० कारखान्यांमधील सुमारे २५ हजार कामगार सहभागी होणार आहेत. कामगारविरोधी बदलाला आव्हान देण्यासाठी या संपामध्ये अधिकाधिक कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

समितीने संपाचे नियोजन केले असून, ८ जानेवारीला सर्व तालुक्यांमध्ये मोर्चे काढण्यात येणार आहेत. ९ जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत विराट मोर्चा काढण्यात येईल. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेसह संपात सहभागी न होऊ शकणाऱ्या अनेक संघटनांनी या संपाला पाठींबा दिला आहे.

- डॉ. डी. एल. कराड, राज्य अध्यक्ष सीटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉग-इन होईना अन् कि बोर्ड चालेना!

$
0
0

व्ही. एन. नाईक केंद्रात टायपिंग परीक्षेत अडचणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारपासून सुरू झालेल्या शासकीय कॉम्युटर टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शहरातील एका केंद्राच्या ढिसाळ कारभाराचा फटका परीक्षार्थींना बसला. विशेषे म्हणज कि-बोर्डविषयी अडचणी सांगणाऱ्या उमेदवारांना परीक्षकांनी 'तुम्ही की बोर्ड घरून आणायचा होता' अशा शब्दात उत्तरे दिल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी शहरातील व्ही. एन. नाईक कॉलेज परीक्षा केंद्रांवर २५ इन्स्टिट्यूटमधील परीक्षार्थी उपस्थित होते. मात्र लॉग-इन होण्यासाठी बराच वेळ जाणे, कि-बोर्ड ऑपरेट न होणे असे अनुभव उमेदवारांना आल्याने काहींना या गैरनियोजनाचा फटका बसला. अनेकांनी याबाबत तक्रारही केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

राज्यात सध्या असणाऱ्या मेगा भरतीच्या बातम्यांमुळे शासकीय कॉम्प्युटर टायपिंगसारख्या परीक्षांकडे उमेदवारांचा कल वाढला आहे. या परीक्षेमध्ये वेळ आणि टायपिंगच्या वेगाचा समन्वय साधावा लागतो. हा समन्वय साधू न शकणारा विद्यार्थी स्पर्धेबाहेर फेकला जातो. यासाठी वर्षभर विद्यार्थी सातत्याने कॉम्प्युटर टायपिंगचा सराव करतात. दीर्घकाळ असा सराव करूनही ऐनवेळी परीक्षा केंद्रावर १५ ते २० मिनीट उशिरा लॉग-इन होणे, की बोर्ड व्यवस्थित ऑपरेट न होणे अशा अनुभवांमुळे काही विद्यार्थ्यांना तयारी असूनही तांत्रिक कारणांमुळे माघार घ्यावी लागली, असा दावा काही उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'मटा'शी बोलताना केला. या तांत्रिक अडचणींबाबत उमेदवारांनी परीक्षकांना तक्रारी केल्यानंतर, 'तुम्ही की बोर्ड घरून आणायचा होता' अशी तऱ्हेवाईक उत्तरे दिल्याने उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

असे आहे नियोजन

राज्यातील ३१२ केंद्रांवर परीक्षा होणार

राज्यभरातून १ लाख ९३ हजार विद्यार्थी प्रविष्ट

प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र

नाशिक विभागात ३६ केंद्रांवर परीक्षा

शनिवारपासून ११ जानेवारी पर्यंत इंग्रजी विषयाच्या टायपिंग परीक्षा

१८ ते २३ जानेवारी दरम्यान मराठी व हिंदी विषयाच्या टायपिंग परीक्षा

प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी

विद्यार्थ्यांच्या बॅचनिहाय परीक्षा होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी सीईओंचे कारवाईचे सत्र

$
0
0

सरपंच, ग्रामसेवक व मुख्याध्यापक रडारवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०१८ मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीस मान्यता देण्याऱ्या इगतपुरी तालुकयातील तत्कालिन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.

इगतपुरी तालुक्याप्रमाणेच बागलाण तालुक्यातील बिजारसे येथील एका प्रकरणात ग्रामसेवक व सरंपच यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले गिते यांनी दिले आहेत. शिस्तविषयक कारवाईचे अधिकार प्रदान करुनही गटविकास अधिकारी नोटिसा देण्याव्यतिरिक्त कार्यवाही करीत नसल्याने गिते यांनी गंभीर दखल घेतली आहे.

गिते यांनी त्यांच्याकडील अधिकारांचे हस्तांतरण करुन शिस्तविषयक कारवाईचे सर्व अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. मात्र तरीदेखील गटविकास अधिकारी या अधिकारांचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बागलाण तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगांतर्गत भूमिगत गटारीच्या कामाबाबत उपसरपंच व सदस्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चौकशी अहवालात या कामात अनियमितता झाल्याचे व यास ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र याबाबत ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रशासकीय कारवाई करणे आवश्यक असताना गटविकास अधिकाऱ्यांनी केवळ नोटीस देण्याचेच काम केले त्यामुळे त्यांनी गंभीर दखल घेतली.

परिचरांना पदोन्नती व नियमित वेतनवाढ

जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आल्यानंतर १२ वर्षे सलग सेवा झालेल्या तब्बल १०४ परिचरांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. ६ परिचरांना परिक्षाधीन कालावधी संपुष्टात आणून त्यांना नियमित वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डीसाठी बेंगळुरू,जयपूर,अहमदाबाद भोपाळ विमानसेवा सुरू

$
0
0

शिर्डी:

शिर्डीच्या विमानसेवेला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याने अल्पावधीत शिर्डी विमानसेवेचा देशभर विस्तार झाला. रविवारी एकाच दिवशी जयपूर-शिर्डी, बेंगळुरू-शिर्डी, भोपाळ-शिर्डी, अहमदाबाद-शिर्डी विमानसेवाला प्रारंभ झाला आहे. तसेच, १० जानेवारी पासून चेन्नई- शिर्डी अशी थेट विमान सेवा सुरू होणार आहे.

साई मंदिराच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असल्याने शिर्डी साठी स्वतंत्र विमानतळ उभारण्यात आले. मागील वर्षी एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी विमान सेवा सुरु करण्यात आली. दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने हैदराबादच्या फ्लाइटला उदंड प्रतिसाद मिळाला ‘एअर अलायन्स’ तसेच स्पाईस जेटने हैदराबादसाठी फ्लाइटच्या संखेत वाढ केली. सध्या या शहरासाठी रोज ६ फ्लाइट सुरु आहेत. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी-दिल्ली विमान सेवेलादेखील मोठा प्रतिसाद मिळाला.

मुंबई, हैदराबाद आणि नवी दिल्ली या तीन शहरातून रोज सुरु असलेल्या एकूण १० फ्लाइटसला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने स्पाईस-जेट ने आणखी पाच शहरातून १२ फ्लाइटस सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ६ जानेवारीपासून एकाच दिवशी बंगलोर-शिर्डी, जयपूर-शिर्डी, अहमदाबाद-शिर्डी , भोपाळ-शिर्डी या शहरातून विमानसेवाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या सर्व फ्लाइट्स पूर्ण भरलेल्या होत्या अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्री यांनी दिली. स्पाईस जेट येत्या गुरुवार पासून चेन्नई-शिर्डी अशी थेट विमान सेवा सुरु करीत असून त्याचे शंभर टक्के आगाऊ बुकिंगसुद्धा झाले आहे असे सांगण्यात आले. शिर्डीसाठी रोज २२ फ्लाइट्स उपलब्ध झाल्याने शिर्डीला जाण्यासाठी देशभरातील भाविकांना त्याचा मोठा फायदा मिळत आहे. मार्च अखेरीस शिर्डी एअरपोर्टवर रात्रीची विमान सेवा सुरु झाल्यावर शिर्डीसाठी आणखी फ्लाइट सुरु होतील. देशभरातील सर्वच मोठी धार्मिक स्थळे शिर्डीला जोडली जाणार आहेत असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि चेअरमन सुरेश काकाणी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिओ कंपनीचा मोबाइल टॉवर देण्याचे आमीष दाखवून दोघांनी एकास ४९ हजार ५०० रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसात माणिक बबलू दंडापातसह आणखी एका संशयिताविरोधात फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशीलकुमार सिंह (३५, रा. गांधीनगर) यांना २३ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता मोबाइलवर फोन आला. संशयित आरोपीने बँक खाते क्रमांक व आयएफएसी क्रमांक देत पैसे टाकण्यास सांगितले. तसेच या मोबदल्यात तुमच्या प्लॉटवर जिओचा मोबाइल टॉवर मंजूर होईल, त्यामुळे आर्थिक फायदा होईल, असे आमिषही संशयितांनी दाखवले. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार यांनी दोनदा ४९ हजार ५०० रुपये बँकेत जमा केले. त्यानंतर संशयितांनी सिंह यांच्याकडे १५ लाख रुपये मागितले. त्यांनी ते देण्यास नकार दिला. तसेच टॉवरबाबत विचारणा केली. त्यावेळी संशयितांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी उपनगरला फसवणुकीची फिर्याद दाखल केली.

घरातून दोन लॅपटॉपची चोरी

चेतनानगर येथील घरात शिरून चोरट्याने दोन लॅपटॉप लंपास केले. ही घटना ३० डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी ललित गुलाबराव पाटील (२६, रा. डोंगरगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांनी इंदिरानगर पोलिसात फिर्याद दिली. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात घुसलेल्या चोरट्याने दोन लॅपटॉप चोरून नेले. घटनेचा अधिक पोलिस हवालदार व्ही. एस. पाठक करीत आहेत.

..

तरुणाची आत्महत्या; मायलेकींविरूद्ध गुन्हा

आडगाव शिवारातील राहणाऱ्या तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी आडगावमधीलच मायलेकींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रिहाना आत्तार आणि जास्मीन आत्तार (दोघी रा. श्रीरामनगर, आडगाव शिवार) असे दोघा संशयितांचे नावे आहेत. राहुल संजय पाटील (२३, रा. गजानन पार्क, आडगाव शिवार) या तरुणाने शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या घरात गळफास घेत शुक्रवारी (दि. ४) आत्महत्या केली. या प्रकरणी राहुलचा भाऊ सागर याने रिहाना आणि त्यांची मुलगी जास्मीन या दोघींमुळे राहुलने आत्महत्या केल्याचा आरोप केला. त्याच्या फिर्यादीनुसार, दोघी मायलेकी राहुलकडे चार लाख रुपयांची मागणी करीत त्यास मानसिक त्रास देत होते. दोघींच्या छळाला कंटाळून राहुलने आत्महत्या केली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बिडगर हे तपास करीत आहेत.

..

तरुणांवर हल्लाप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा

सिडको, उत्तमनगर परिसरात दोन तरुणांना बेदम मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिसात १७ ते १८ जणांविरोधात गुन्हा दाखल. जमावाच्या मारहाणीत अविनाश नानाजी उशिरे (१९, रा. उत्तमनगर) हा तरुण जखमी झाला. उत्तमनगर परिसरात संशयित विशाल माणिक चौघुले (२३), अशपाक रफिक पठाण (३३), विशाल साहेबराव धनवटे (२७), तौफीक रशिद शेख (२२), राहुल राधाकृष्ण गव्हाणे (२२) यांच्यासह इतर १५ ते १६ जणांच्या जमावाने शनिवारी (दि. ५) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तलवार, लाठ्या, काठ्यांनी अविनाश व त्याचा मित्र मोहित पाटील यांना बेदम मारहाण केली. घटनेनंतर संशयित पसार झाले होते.

वाहतूक पोलिसास धक्काबुक्की

अपघातानंतर वाहतूक पोलिसास धक्काबुक्की करून दोघे संशयित फरार झाल्याची घटना पाथर्डी फाटा येथील पोलिस चौकीजवळ घडली. या प्रकरणी पोलिस नाईक सचिन गोपाल जाधव (३९) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसात राजेंद्र बळीराम सोनवणे (३३) आणि सुनील धनू जाधव (२२) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीनुसार राजेंद्र आणि सुनील यांनी अपघात केला. त्यामुळे जाधव यांनी दोघांना अपघातग्रस्त वाहन पोलीस चौकीस आणण्यास सांगितले. मात्र, दोघांनी जाधव यांच्या आदेशास विरोध करून त्यांना धक्काबुक्की करून पळ काढला.

बसचालकास मारहाण

वाहनास धक्का लागल्याची कुरापत काढून बसचालकास मारहाण करणाऱ्या एकास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. सेफन सिंकदर सैयद (२४, रा. बडदे नगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. अरुण दगडू उगले (३८, रा. दोडी बुद्रुक, ता. सिन्नर) यांनी प्रकरणी फिर्याद दिली. उगले हे शनिवारी (दि. ५) सायंकाळी बस (एमएच १५ एके ८०७९) चालवत होते. मेहेर सिग्नलजवळ कारचालक सेफन सैय्यद याने गाडीला खरचटल्याची कुरापत काढून अरुण उगले यांना मारहाण केली. या प्रकरणी उगले यांनी सरकारवाडा पोलिसात सैय्यद विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून सेफन सैयदला अटक केली.

..

जाधव मळ्यात आत्महत्या

गंगापूर रोडवरील जाधव मळा परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षाच्या व्यक्तीने विषप्राशन करून आत्महत्या केली. संजय दगा मोरे असे या व्यक्तीचे नाव आहे. संजय मोरे यांनी ३१ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास विषप्राशन केले होते. त्यामुळे त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी (दि. ५) सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

..

विवाहितेचा मृत्यू

स्टोव्हचा भडका होऊन गंभीररित्या भाजलेल्या विवाहितेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. भारती अशोक पुजारी (२१, रा. स्वामीनगर, अंबड) असे या विवाहितेचे नाव आहे. स्टोव्हचा गुरुवारी (दि. ३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भडका होऊन यात भारती ९० टक्के भाजल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्यांची नणंद सवितादेवी यांनी सिव्हिलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी (दि. ५) भारती यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १७ व्या वर्षी चिन्मयचे ‘संगीत चंद्रप्रिया’

$
0
0

कालिदास कलामंदिरात ३० जानेवारीला प्रयोग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संगीत नाटकाला 'देवबाभळी'च्या रुपाने चांगले दिवस आलेले असताना चिन्मय मोघे नावाच्या आणखी १७ वर्षाच्या तरुणाने नाट्यक्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी 'संगीत चंद्रप्रिया' या संगीत नाटकाची निर्मिती केली आहे. हे संगीत नाटक ३० जानेवारी महाकवी कालिदास कलामंदिरात याचा प्रयोग होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांनी स्वतःची नांदी व शास्त्रीय नाट्यसंगीताचा आधार असलेली नवी १२ नाट्यपदे घेऊन हे संगीत नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे.

नाटकाचा वैचारिक आशय स्त्रीवाद अधोरेखित करणारा असून चंद्रगुप्त यांची विधवाविवाह तसेच सतीप्रथा याबाबत नाटकात मतप्रदर्शन आहे. या सर्व वाईट रुढी बंद करण्यासाठी चंद्रगुप्ताने केलेला आटापिटा आणि या सर्व प्रकाराला कारणीभूत ठरणारी त्याची प्रेयसी यावर संगीत चंद्रप्रिया हे नाटक बेतलेले आहे. या नाटकाची निर्मिती, लेखन व दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत चिन्मय आहे.

मूळ नाशिकचा असलेला चिन्मय पुण्यातील एस. पी. कॉलेजात बी. ए. च्या प्रथम वर्षाला आहे. नाशिकमधील आदर्श विद्यालयात दहावी तर केटीएचएममध्ये बारावी शिकलेल्या चिन्मयने वृत्तात सर्व लेखन केले आहे. ७० वृत्तांत लेखन, स्वत:ची १२ वृत्ते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील साडेतीन हजार श्लोकांचे महाकाव्य, प्रेमगंध, उर्मिला या दोन कादंबरी इतके लिखाण सध्या त्याच्या नावावर आहे. सहावीपासून वृत्तबद्ध काव्यलेखन करणाऱ्या चिन्मयने गझल आणि इतर काव्य प्रकारातून तीन काव्यसंग्रह प्रकाशनासाठी सज्ज केले आहे. चिन्मय हा जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांचा मुलगा आहे. नाटकात अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर आकाश भडसावळे, विश्वास पांगारकर, नीला इनामदार यांच्या भूमिका आहेत. नाटकाला नाशिकचेच संगीतकार जगदेव वैरागकर यांनी संगीत दिले आहे.

नाटकाच्या कथानकाविषयी!

संगीत चंद्रप्रिया हे नाटक गुप्त साम्राज्यातील सम्राट चंद्रगुप्त या सम्राटाबाबत आहे. इतिहासकारांच्या मते, भारतात खरोखर जेव्हा सुवर्णयुग होते, तेव्हा सम्राट चंद्रगुप्त हे राज्य करत होते. हे नाटक म्हणजे त्यांची प्रेमकथा व शौर्यकथा यांचे नाट्यमय रुपांतर आहे.

नाटकाचे लेखन मी केले असे म्हणण्यापेक्षा ते माझ्याकडून झाले असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 'समर' हे टोपणनाव धारण करून हे नाट्य लिहिले आहे. त्याचसोबत मराठी भाषेतील पहिले वृत्तबद्ध महाकाव्यही मी लिहिले आहे. ते ३,५०० श्लोकांचे आहे. तसेच 'प्रेमगंध'ही कादंबरी व गजलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. नाशिककरांना हे नाटक नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.

- चिन्मय मोघे,

नाट्यलेखक-दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशी दारू विक्रीप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बेकायदेशिरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर नाशिकरोड गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल होण्याची ही शहरातील पहिलीच वेळ आहे.

सिन्नर फाटा परिसरात शनिवारी (दि. ५) सायंकाळी पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, रेणुका भोर, जाधव, जुंद्रे आदींच्या पथकाला एकलहरे रोडवरील अरिंगळे मळ्यात एका पत्र्याच्या शेडमध्ये एक महिला देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता लताबाई चांगदेव काळे (वय ६०) ही महिला या ठिकाणी देशी दारुची विक्री करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्या ताब्यातून देशी दारुच्या नऊ बाटल्या हस्तगत केल्या. पोलिसांनी तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदयानुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अपघातातील जखमी

विवाहितेचा मृत्यू

नाशिकरोड : रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीचालकाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू मृत्यू झाला. ही घटना राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ घडली. दीप्ती हेमंत भामरे (वय ३०, रा. साजन सोसायटी, ज्ञानेश्वरनगर, जेलरोड) असे या महिलेचे नाव आहे.

दीप्ती या पती हेमंत भामरे यांच्या सोबत दुचाकीवरून (एमएच १५ सीएक्स ९८४४) गुरुवारी (दि. ३) रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान शिवाजीनगर येथे त्यांच्या आईकडे जात होत्या. राजराजेश्वरीजवळील व्यंकटेश बंगल्याजवळ त्यांच्या गाडीला दुचाकीचालकाने (एमएच १५ डीझेड ४८६३) या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेल्या दीप्ती यांना प्रथम नाशिकरोडमधील जयराम हॉस्पिटल व त्यानंतर आडगाव येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि. ४) दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. हेमंत भामरे यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या आक्षेपांना मिळेना ‘न्याय’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आयुक्तालयाजवळच उभ्या राहणाऱ्या सहा मजली इमारतीच्या बांधकाम शहर पोलिसांनी हरकत घेतली. याबाबत महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार देखील केला. मात्र, पोलिसांनाच न्याय मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या इमारतीतील पार्किंग व पोलिस आयुक्तालयाच्या सुरक्षेचा मुद्दा पोलिसांच्या केंद्रस्थानी आहे.

गंगापूररोडवरील पोलिस मुख्यालयाशेजारीच पोलिस आयुक्तालयाची प्रशस्त इमारत आहे. या शेजारी सध्या सहा मजली इमारतीचे काम सुरू असून, त्याबाबतच पोलिसांनी पत्र व्यवहाराद्वारे आपले आक्षेप महापालिका आणि नगररचना विभागास कळविले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून पत्रव्यवहार करुनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत बोलताना पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शहरात सर्वत्र पार्किंगची ओरड केली जाते. प्रत्यक्षात पुरेशा पार्किंगचा विचार न करता इमारतीच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. परिणाम वाहने रस्त्यावर पार्क होतात. अशोकस्तंभाकडून येणारा रस्ताच मुळात अरूंद असून, तिथे बस स्टॉप देखील आहे. सार्वजनिक परिवहनाचा कोणताही विचार न करता सहा मजली इमारतीत शेकडो कार्यालये स्थिरस्थावर होणार आहेत. याबाबत महापालिका, अग्निशमन तसेच मंत्रालयात देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मरण पत्रेही पाठविण्यात आली आहेत. मात्र, पोलिसांनाच न्याय मिळत नसल्याची स्थिती आहे. याप्रकरणात पोलिस आयुक्तालयाच्या सुरक्षेचाही मुद्दा महत्त्वाचा असून, बांधकाम परवानगी देताना याचाही विचार झाला नसल्याची खंत व्यक्त करण्यात येते आहे.

सध्याची वाहनांची संख्या आणि २५ वर्षांनी वाढणाऱ्या वाहनांची संख्या यात मोठी तफावत असून, याचा विचार सध्या बांधकाम करताना होत नाही. त्यामुळे शहरातील पार्किंगची स्थिती भविष्यात बिकट बनेल. पोलिस आयुक्तालयाशेजारील इमारतीच्या बांधकामास हरकत घेतली असून, त्याबाबत महापालिका आणि शासनस्तरावर पत्रव्यवहार करण्यात येतो आहे.

- माधुरी कांगणे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कर्मचाऱ्यांचा संप

$
0
0

नाशिकरोड : सन २००३ च्या वीज कायद्यात सुधारणा करून विद्युत (संशोधन) कायदा २०१८ या नवीन कायद्याचे प्रारूप तयार केले असून, हा कायदा मंजुरीसाठी संसदेत मांडण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. हा कायदा सार्वजनिक वीज उद्योगांसह सर्व वीज कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असल्याने या कायद्याला विरोध करण्यासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संयुक्त कृती समिती आज (दि.७) एकदिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळा कोट्यवधींचा; जप्त मालमत्ता लाखोंची

$
0
0

हर्षल नाईकच्या बेपत्ता होण्याचे रहस्य कायम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हर्षल नाईक हा मुख्य संशयित बेपत्ता होण्याचे रहस्य कायम आहे. गुन्हा उघडकीस येऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असून, मागील वर्षाच्या सुरुवातीलाच परभणी जिल्ह्यात त्याच्या शेवटच्या खाणाखुणा मिळाल्या होत्या. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात अगदीच लाखोंचा मुद्देमाल आत्तापर्यंत जप्त झाल्याने गुंतवणुकरदारांमध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण आहे.

मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिसात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल आहे. २५ हजार ४३९ ग्रॅम सोने आणि २५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची या प्रकरणात फसवणूक झाली. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी व भारत सोनवणे यांना १५ कोटी रुपये कोर्टात भरण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ३० ऑक्टोबर रोजी दिले. जामिनासाठी कोर्टात अर्ज करणाऱ्या या संशयित अर्जदारांना कोर्टाने ही महत्त्वपूर्ण अट टाकली. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी संशयितांनी कोर्टात पैसे जमा केलेले नाही. या प्रकरणातील महत्त्वाचे दोन दुवे असून, त्यातील एक म्हणजे सीए परिक्षीतत औरंगाबादकर असून, त्याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळाला आहे. मात्र, तो पोलिसांनाच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, या घोटाळ्याचा सूत्रधार हर्षल नाईक हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फरार असून, त्याचाही कोणताही ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त भागवत सोनवणे यांनी सांगितले, की घोटाळ्यात जप्त झालेली मालमत्ता काही लाखांची असून, गुलबर्गा जिल्ह्यातील हर्षल नाईकची मालमत्ताही सुद्धा एका खेड्यागावात असल्याचे तपासात समोर आले आहे. गुतंवणूकदारांच्या पैशांचे काय झाले हे फक्त सीए औरंगाबादकर आणि हर्षल नाईक हे सांगू शकतात. दोघांचाही शोध सुरू आहे. मात्र, हर्षलचा थांगपत्ता मिळणे दुरापास्त ठरले आहे. गतवर्षी हा गुन्हा उघडकीस आला, त्याच वेळी तो फरार झाला. त्याचे शेवटचे लोकेशन परभणी जिल्ह्यात मिळाले होते. त्यानंतर त्याचा कोणताही सुगावा मिळालेला नाही. यामुळे विविध शंका उपस्थित होतात. त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

लोगो : मिरजकर फसवणूक प्रकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजा; तिघा विक्रेत्यांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणखी तिघा विक्रेत्यांना क्राइम ब्रँचच्या युनिट एकने रविवारी दिवसभरात अटक केली. यातील दोन विक्रेते पंचवटी हद्दीत तर एक अंबड हद्दीतील आहे. संशयितांकडून ३१ हजार ८०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ५३ गट्टू हस्तगत करण्यात आले.

सुमित अशोक महाले (रा. साखरे भवन, मालेगाव स्टॅण्ड), गोरख मुरलीधर शिंदे (रा. जाधव संकुल, चुंचाळे शिवार) आणि अतुल प्रभाकर आहेर (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित विक्रेत्यांची नावे आहेत. जीवघेणा आणि पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि साठवणुकीवर पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, असे असताना काही विक्रेते चोरीछुपे या धोकादायक मांजाची विक्री करतात. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, युनिट एकच्या पथकाने शुक्रवारपासून कारवाईस गती दिली आहे. रविवारी याच पथकाने मालेगाव स्टॅण्ड येथे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या महाले यास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून १५ हजार ५०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे २६ गट्टू हस्तगत केले. गोरख शिंदे हा जाधव संकुल परिसरात मांजा विक्री करताना सापडला. त्याच्याकडून चार हजार २०० रुपयांचे १२ गट्टू सापडले. मधुबन कॉलनीत १२ हजार रुपये किमतीचे १५ गट्टू विक्रीसाठी बाळगणाऱ्या अतुल आहेरला पोलिसांनी अटक केली. या सर्वांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस नाईक मोहन देशमुख, संतोष कोरडे, शांताराम महाले, पोलिस उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार यावाजी महाले, संजय मुळक, कॉन्स्टेबल विशाल देवरे, दिलीप मोंढे, प्रवीण चव्हाण, दिलीप मोंढे आदींनी केली.

शनिवारीही एकास अटक

अंबडमधील गजानन नगर परिसरातील घरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. राहुल भागवत जाधव (२६, रा. गजानन नगर) असे या मांजा विक्रेत्याचे नाव आहे. राहुल जाधव हा त्याच्या घरात नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शहानिशा करून शनिवारी (दि. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास कारवाई केली. त्यात राहुलकडून नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच त्यास अटकही केली आहे.

गुन्हे दाखल करण्याची मागणी.

नाशिक : पोलिस खात्याकडून हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती केली जात असून, त्याचप्रमाणे नायलॉन मांजाचा वापर करू नये याबाबत जनजागृती करावी व या मांजाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार दिनानिमित्त पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार, नाशिक शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री चालू आहे. नायलॉन मांजामुळे अनेकजण जखमी झाले असून पशूपक्ष्यांनादेखील त्याचा त्रास होतो. त्यामुळे या मांज्याविरोधात जनजागृती करण्याची मागणी नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाकडून करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष रमेश कडलग, सुरेश बागूल, चंद्रकांत वाघुलीकर, विकास कवडे, भरत जैन, मनीष गोडबोले, संगीता बागूल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images