Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मविप्र मॅरेथॉन स्पर्धेलाललिता बाबर येणार

$
0
0

तीन हजारांवर खेळाडूंची नोंदणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहाव्या मविप्र राष्ट्रीय व ११ व्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत आतापर्यंत तीन हजारांवर खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहिती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी झालेल्या परिषदेत त्या बोलत होत्या. या स्पर्धेसाठी तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात ऑलिम्पिकमध्ये धडक मारणारी ललिता बाबर येणार आहे.

चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, सिडको महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर, डॉ. मीनाक्षी गवळी उपस्थित होत्या. मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे असून, स्पर्धेचा धावनमार्ग, रिफ्रेशमेंट व स्पंजिंग पॉइंट, वैद्यकीय सुविधा, स्पर्धेसाठी असलेले गट, खेळाडूंची निवास व भोजनव्यवस्था याविषयी पवार यांनी माहिती दिली. स्पर्धेसाठी एकूण ७ लाख २३ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स संघटना, तसेच महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटना व नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेची मान्यता असल्याची माहिती पवार यांनी दिली. स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राष्ट्रीय निरीक्षक जी. कृष्णन व महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे आर. जोशी निरीक्षक असतील. मॅरेथॉन स्पर्धेसाठी आतापर्यंत तीन हजार धावपटूंनी रजिस्ट्रेशन केले असून, यामध्ये नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. यंदा मागील स्पर्धेचा रेकॉर्ड ब्रेक होऊन नवीन विक्रमाची नोंद होईल, अशी आशा व्यक्त केली. स्पर्धेची सुरुवात रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारात अंतिम फेरीत धडक मारणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती संस्थेचे क्रीडाधिकारी पाटील यांनी दिली. संचालक सचिन पिंगळे यांनी आभार मानले. मविप्र मॅरेथॉनच्या स्मृतिचिन्हाचे अनावरण या वेळी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटील विद्यालयात क्रीडा महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, गंगापूर येथे आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे हिच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून आंतरवर्गीय क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. खे‌ळासाठी शालेय विद्यार्थ्यांना आपण नेहमी मार्गदर्शन करू, अशी ग्वाही मोनिका हिने यावेळी दिली.

अध्यक्षस्थानी ज्ञान साधना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे, गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर मोरे, शिवसेनेचे मनपा गटनेते विलास शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष संतू पाटील, सचिव हिरामण शिरसाट, संचालक सुदर्शन पाटील, एच. पी. पाटील आदी उपस्थित होते. मोनिका म्हणाली की, मला यश मिळविण्यासाठी आई-वडील, सणवार या साऱ्यांपासून दूर रहावे लागले. ४२ किमी अंतर काही तासांत पूर्ण करताना मला समोर मृत्यू दिसत होता, तरी मोठ्या जिद्दीने यश मिळवले. यशासाठी खूप कष्ट व सतत चिकाटी ठेवावी लागेल, असेही तिने नमूद केले. रत्नाकर चुंबळे यांनी सावित्रीबाई फुलेंचे कार्य आणि खेळाचे महत्त्व विशद केले. मोरे यांनी रहदारीचे नियम व मोबाइलच्या योग्य वापराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विलास शिंदे यांनी क्रीडाशिक्षक हिरामण शिंदे व नंदू पवार यांचे विशेष कौतुक केले. संस्थेचे विश्वस्त सुदर्शन पाटील यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. प्रास्ताविक व अध्यक्ष निवड प्राचार्य बापूराव खैरनार यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धांमध्ये डॉजबॉल, कबड्डी, खो-खो, लंगडी, मैदानी ५०, १००,२००,मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी आदी स्पर्धा होणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक बैरागी टिकमदास, क्रीडाशिक्षक, सर्व सहकारी शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकविना लघुउद्योग समिती!

$
0
0

सदस्यांमध्ये चक्क व्यंगचित्रकाराचीही वर्णी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिझर्व्ह बँकेने लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी एका तज्ज्ञ समितीचे गठन केले असून त्यावर उद्योगांचा प्रतिनिधीच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, या समितीत चक्क व्यंगचित्रकाराला स्थान दिले गेले आहे. मग, ज्यांच्यासाठी ही समिती आहे त्या उद्योगांचा प्रतिनिधी का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशाच्या औद्योगिक विकासामध्ये या क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकूण उद्योग संख्येच्या ९३ टक्के उद्योग लघुत्तम व लघु उद्योग आहेत. या क्षेत्रातील उद्योजकांना अलीकडच्या काळात जाणवणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना काय करता येईल आणि त्यांच्यात आर्थिक ताकद सातत्य कसे राखता येईल, यासाठी रिझर्व्ह बँकेने लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी तज्ज्ञ समितीचे गठन केले आहे. जून २०१९ अखेर या समितीला आपला अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करायचा आहे. या समितीने जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम इलाजांचाही विचार करून ते देशातील लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला कसे लागू करता येईल, याबाबतही सूचना करावयाच्या आहेत. या समितीवर एकूण ८ सदस्य असून त्यापैकी एकही सदस्य लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारा नाही. जे आहे ते सरकारी नोकर, बँकर, प्राध्यापक, महिला प्रतिनिधी असे असून शरद शर्मा या व्यंगचित्रकाराचीही नियुक्ती या समितीत करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच लघुउद्योग क्षेत्रात आश्चर्य आणि नाराजी पसरली आहे. देशातील बहुसंख्य लघुउद्योजक सहकारी बँकातूनही कर्ज घेत असले तरी त्या बँकिंग क्षेत्राचा प्रतिनिधी या समितीवर नसणे तितकेच आश्चर्यकारक आहे. लघुत्तम व लघु उद्योग क्षेत्रातील जिवंत समस्या जाणून घेऊन त्यावरील उपाययोजना काय असावी, याबाबत उद्योगांचा प्रतिनिधी गरजेचा असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरसारख्या संस्थेचा प्रतिनिधीही घेतला जाणे आवश्यक होते.

कितपत व्यवहार्य?

केवळ सरकारी बाबू, पुस्तकी पंडित आणि खासगी बँकांचे प्रतिनिधी अशांची तज्ज्ञ समिती कितपत व्यवहार्य मार्ग आणि उपाययोजना सुचवू शकतील, असा प्रश्न उद्योग वर्तुळातून विचारला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी याचा विचार करून सदरहू तज्ज्ञ समितीवर लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा प्रतिनिधी घ्यावा, अशी मागणी होत आहे.

उद्योगांसाठीच्या समितीवर उद्योजक प्रतिनिधीच नाही, ही बाबच निराशाजनक आहे. ज्या कारणांसाठी समिती गठीत केली आहे तो हेतू यामधून साध्य होणार आहे का? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी दखल घ्यावी.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर

लोगो : चर्चा तर होणारच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय कुंग फुत नाशिकचे वर्चस्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय कुंग फु चॅम्पियनशिप स्पर्धेत सातपूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली.

या स्पर्धेत आर. जे. स्पोर्ट्स अँड एज्युकेशनल रिसर्च सेंटर व महाराष्ट्र कुंग फु असोसिएशनच्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, गुजरात, पंजाब आणि गोवा इत्यादी राज्यांच्या दोनशेवर खेळाडूंनी यात सहभाग घेतला.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत नाशिकच्या आर. जे. स्पोर्ट्स व महाराष्ट्र कुंग फु असोसिएशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. यात शुभम शर्मा, गौरी घाटोळ, मधू साळवे, प्रणाली शिंदे, अनिशा वर्मा, नारायण पवार, साहिल चंद्रमोरे यांनी सुवर्णपदक पटकावले. सूरज पेंढारे, आकाश खरे, विशाल प्रजापती, सरस्वती विधाते यांनी रौप्यपदक पटकावले. त्याचप्रमाणे लक्ष्मी मुंगटे, प्रतिभा ठोके यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

आंतरराष्ट्रीय कुंग फु परिषद व कुंग फु असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन पपून पॉल आणि प्रेसिडेंट ऑफ कुंग फु असोसिएशन इंडिया पूर्वचे सहाय्यक संचालक वेणूगोपाल घोष यावेळी उपस्थित होते. या खेळाडूंना आर. जे. स्पोर्ट्स व महाराष्ट्र कुंग फु असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव मास्टर राजूराम जैस्वाल व टीम मॅनेजर यशस्वी साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. राजूराम जैस्वाल यांना आंतरराष्ट्रीय थर्ड डॅन ब्लॅक बेल्ट ही पदवी बहाल करण्यात आली. सूरज पेंढारे यांना राष्ट्रीय फस्ट डॅन ब्लॅक बेल्टने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून मारहाण

$
0
0

घरात घुसून मारहाण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात घुसून कुटुंबीयांना दमदाटी करीत तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या प्रकाराबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

राजू उर्फ शानू सैदाअप्पा वाघमारे (वय १८) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. कस्तूरबानगर भागात राहणारे त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. टिळकवाडीतील प्रकाश देवराम जेजूरकर (रा. जेजूरकर सोसा.) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल दिली. जेजूरकर कुटुंबीय मंगळवारी (ता. १) सायंकाळी आपल्या घरात असताना संशयित व त्याचे तीन साथीदार हातात लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉड घेऊन अनधिकृतपणे घरात शिरले. या वेळी संशयिताने आमचे नादी लागलात, तर तुम्हाला राहू देणार नाहीत. हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. या वेळी जेजूरकर यांचा मुलगा यतीन संशयितांना समजावण्यास गेला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

एकास अटक

नाशिक : तलावडीतील पंजाब बेकरी परिसरात उघड्यावर जुगार खेळविणारा रामेश्वर लक्ष्मण साबळे (रा. सहजानंद हाइट्स, हिरावाडी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६,२०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पंजाब बेकरी परिसरातील पेपर स्टॉल भागात साबळे सोरट आणि मटका जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी (ता. ३) सकाळी पोलिसांनी संशयितास अटक केली. त्याच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस शिपाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार केदारे तपास करीत आहेत.

सायकलचोराला अटक

नाशिक : केटीएचएम कॉलेजमध्ये पार्क केलेली सायकल लंपास करणारा अर्जुन बेलप्पा वाणी (वय ३९, रा. नशिराबाद, जि. जळगाव, हल्ली रा. नाशिकरोड रेल्वे स्टेशन) याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. अर्जुन वाणी याने २७ डिसेंबर रोजी प्रणय बाळासाहेब घुले (वय १९, रा. आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूर रोड) याची सात हजार रुपयांची केस्टो कंपनीची सायकल केटीएचएम कॉलेजमध्ये पार्क केलेली असताना लंपास केली. या प्रकरणी हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समजावून घ्या कृतिपत्रिकेचे गणित

$
0
0

रेषा केंद्र आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीत समाविष्ट करण्यात आलेली कृतिपत्रिका नेमकी काय आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांना नेमकी काय पूर्वतयारी करावी लागणार आहे. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यांच्यातील फरक काय, कृतिपत्रिका सोडविताना काय काळजी घ्यावी अशा प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना समजावून सांगण्यासाठी ६ आणि १३ जानेवारी रोजी कृतिपत्रिका विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोड आणि नाशिकरोड अशा दोन्हीही ठिकाणी हा उपक्रम होणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेसाठी मोफत प्रवेश आहे.

गंगापूररोड आणि नाशिकरोड या परिसरात एकाच वेळी विज्ञान, गणित आणि मराठी या विषयांवर या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. रविवारी (६ जानेवारी) गंगापूररोडवरील रेषा एज्युकेशन सेंटर, ३ बी, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूररोड येथे होणाऱ्या या कार्यशाळेत विज्ञान विषयावर दुपारी ३ ते ५ या वेळेत अध्यापनाचा तीन दशकांपेक्षाही अधिक अनुभव असलेल्या मुख्याध्यापिका अंजली ठोके मार्गदर्शन करतील. याच दिवशी नाशिकरोड येथील हॉटेल सेलिब्रेटा, जुनी अंध शाळा, नाशिक बिग बझारच्या जवळ येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत मराठीच्या नामवंत मार्गदर्शक निर्मल अष्टपुत्रे या मराठी विषयावरील कृतिपत्रिकेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

येथे करा नोंदणी

बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीला कृतिपत्रिकांचा आधार असणार आहे. त्यामुळे पारंपरिक परीक्षेच्या प्रचलित पद्धतीशिवाय कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते, त्यांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी, विद्यार्थ्यांनीही कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावे आदी विषयांवर या उपक्रमात पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नस्तनपूरला आज यात्रोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शनी महाराजांच्या साडेतीन पीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या व प्रभू रामचंद्रांनी स्थापना केलेल्या नस्तनपूर येथील शनी मंदिरात शनी अमावस्येनिमित्त शनिवारी यात्रोत्सव होत आहे. या उत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, लाखो भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे.

उत्सवनिमित्ताने किल्ला, मुख्य प्रवेशद्वार अशा दोन ठिकाणी वाहनतळाची निर्मिती करण्यात आली आहे. आमंत्रित पाहुण्यांच्याहस्ते तसेच पंढरपूरच्या धर्तीवर (प्रायोगिक तत्वावर) दर्शन रांगेतील आरतीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या शनिभक्ताला सपत्नीक महापूजेचा व आरतीचा मान मिळणार आहे. नंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामी राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष, यात्रा उत्सवात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आला असल्याचे मंदिर ट्रस्ट अध्यक्ष माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा विद्यार्थ्यांची पोलिस स्टेशन भेट

$
0
0

मनपा विद्यार्थ्यांची

पोलिस ठाण्यास भेट

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

'रेजिंग डे' पोलिस जनता मैत्री संवाद अंतर्गत नाशिकरोड पोलिस ठाण्यात महानगरपालिका शाळा क्रमांक ५६ च्या विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याचे कामकाज व कार्यप्रणाली समजावून सांगण्यात आली. सहाय्यक निरीक्षक जगदीश शेलकर, उपनिरीक्षक सुवर्णा हांडोरे, केंद्रप्रमुख राजश्री गांगुर्डे, समता शिक्षक परिषदेचे चंद्रकांत गायकवाड, सविता जाधव, प्रियंका सूर्यवंशी, बबन राठोड, पोलिस शिपाई कुणाल काळे, कुंदन राठोड, रमेश काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुवर्णा हांडोरे यांनी पोलिस खात्यात वापरली जाणारी शस्रे, पोलिस कोठडी, न्याय प्रक्रिया, ठाणे अंमलदार कक्ष, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया, दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे, दिली जाणारी शिक्षा याविषयी माहिती दिली. जगदीश शेलकर यांनी लहान मुले, वृद्ध, महिला यांच्यासाठी कायद्यातील तरतूदी व कलमांची माहिती दिली. लहानपणापासून चांगली वर्तणूक ठेवा, सुजाण नागरिक बना, निर्भयपणे तक्रार करा, पोलिसांविषयी भीती न ठेवता त्यांना आपले मित्र करा, असे त्यांनी सांगितले. बबन राठोड यांनी पोलिसांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ग्रामसिंहां’ची दहशत!

$
0
0

ठिकाण : जेलरोड

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड आणि जेलरोड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक, बालके जखमी झाल्याच्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. जेलरोड परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे महिला, लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांमध्येही भीतीचे वातावरण आहे. नाशिकरोडला धोंगडेनगरमध्ये सहा महिन्यांपूर्वी एका गायीने धुमाकूळ घालून नागरिकांना जखमी केले होते. महापालिके भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी केली आहे. मात्र, या समस्येकडे नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जेलरोडच्या ययातीनगर भागात वर्षभरापूर्वी मोकट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता. काही दिवसांपूर्वी ययातीनगरमध्ये चार वर्षीय बालिकेला, तसेच एका ज्येष्ठ व्यक्तीला पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले होते. जेलरोडच्या वर्दळीच्या भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना, तसेच दुचाकीसारख्या वाहनांवर जाणाऱ्यांना सातत्याने भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पहाटे क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, दूध विक्रेत्यांना व प्रेस कामगारांना या कुत्र्यांचा विशेष त्रास होतो. पहाटे घरोघर वृत्तपत्रवाटप करणाऱ्यांनाही कुत्र्यांचा जाच सहन करावा लागतो.

येथे संख्या अधिक

भटक्या कुत्र्यांची संख्या नाशिकरोडच्या जयभवानी रोड, देवळाली गाव, नेहरूनगर आणि जेलरोडच्या कॅनॉल रोडवर अधिक आहे. मांस-मच्छी विक्रेत्यांच्या टपऱ्यांजवळ कुत्र्यांची संख्या अधिक असते. जेलरोडच्या इंगळेनगर चौकात पन्नास वर्षे जुने मच्छी मार्केट आहे. येथे मटण आणि चिकन विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असते. दसक, पंचक, सायखेडा रोड, टाकळी रोड, उपनगर, जयभवानी रोड, आर्टिलरी सेंटर, विहितगाव, रोकडोबावाडी आदी ठिकाणी मटण विक्रेत्यांच्या टपऱ्या सुरू झाल्या आहेत. तेथेही कुत्र्यांचा मुक्काम असतो. काही वसाहतींमध्ये मांसाहारचे तुकडे टाकले जातात. तेथे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. जेलरोडच्या मॉडेल कॉलनीत नागरिकांनी ठेवलेल्या कचरापेटीत ही कुत्री रात्री घुसतात. शिळेपाके अन्न, तसेच मांसाचे तुकडे खाल्यानंतर कचरा विस्कटून टाकतात. त्यामुळे कचरा पसरून असह्य दुर्गंधी पसरते. जेलरोड परिसरातील भीमनगरमागील ब्रह्मगिरी सोसायटीत, तसेच कॅनॉल रोडवर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळी वृत्तपत्रे घरोघरी पोहचविणाऱ्या विक्रेत्यांना, तसेच विद्यार्थ्यांना या कुत्र्यांचा त्रास होतो.

हे आहेत लक्ष्य

पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, कचरा वेचणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास अधिक होतो. नोकरदार, तसेच क्लासवरून सायंकाळी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे कुत्री लागतात. जेलरोडला इंगळेनगर, पवारवाडी, जेलरोड- कॅनॉल रोड, तसेच उपनगर पोलिस ठाण्याच्या रोडवर हा त्रास होतो. ही कुत्री दबा धरून बसलेली असतात. सातपूर, अंबड येथून मध्यरात्री उशिरा कामावरून नाशिकरोडला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर जीव मुठीत धरूनच घरी यावे लागते. द्वारका व डीजीपीनगरमध्येही कुत्र्यांचा जाच आहे.

दहशतीच्या घटना

जयभवानी रोडच्या जाचक मळ्यात दोन वर्षांपूर्वी तीन बालकांसह आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. प्रकाश रहाणे यांचा पावणेतीन वर्षांचा मुलगा सिद्धार्थ शेजाऱ्यांबरोबर फिरायला निघाला असता एका कुत्र्याने सिद्धार्थला कानाच्या मागे व दंडावर चावा घेतला होता. काही वेळाने निवृत्त प्रेस कामगाराच्या कोपऱ्याला आणि नंतर पाच वर्षीय बालकाच्या दंडावर चावा घेतला. या कुत्र्याने पाटील कॉम्प्लेक्सजवळ प्रथम दीर-भावजयीला चावा घेतला. लहान मुलीला व वास्तुपार्कजवळ भाजी विक्रेत्यालाही कुत्र्याने चावा घेतला. कुत्री पकडण्यासाठी गाडी न आल्याने नागरिकांनी दुपारी साडेतीनपर्यंत वाट पाहून कुत्र्याला मारून दूरवर नेऊन टाकले. जेलरोडच्या ययातीनगर भागात काही महिन्यांपूर्वी चार वर्षीय बालिकेला, तसेच एका ज्येष्ठ नागरिकाला कुत्र्याने चावा घेतला होता. जेलरोडच्याच भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना, तसेच दुचाकीस्वारांवरही भटक्या कुत्र्यांनी अनेकदा हल्ला चढवला आहे.

भटक्या कुत्र्यांचा त्रास जेलरोडच्या भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना, तसेच दुचाकीस्वारांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, दूध विक्रेते, पेपर विक्रेते व प्रेस कामगारांचा पाठलागही ही कुत्री करतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.

- गणेश कुलथे, वृत्तपत्र विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासच्या तांत्रिक त्रुटींचा कार्यक्रमांना फटका

$
0
0

रसभंग होतोय

कालिदासच्या तांत्रिक त्रुटींचा कार्यक्रमांना फटका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिराचे नुकतेच पुनरुज्जीवन करण्यात आले. साडे नऊ कोटी रुपयांचा चुराडा करूनही तेथे प्राथमिक सुविधादेखील नसल्याने अनेक कार्यक्रमांना त्याचा फटका बसत आहे. नुकत्याच झालेल्या काही नाटकांमध्येही अचानक लाईट गेल्याने प्रेक्षकांचा रसभंग होणे, तसेच कार्यक्रमाच्या वेळी पुरेसा प्रकाश नसणे यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागत असून कलाकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

प्रेक्षकांची वर्षभर पंचाईत करून महाकवी कालिदास कलामंदिर बंद ठेवण्यात आले. वर्ष उलटून गेल्यावरही सहा महिने कालिदास महापालिका आयुक्तांच्या धोरणामुळे बंदच होते या दिवसांमध्ये परशुराम साईखेडकर नाट्यगृह तसेच दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रम ठेवण्यात येत असत. दीड वर्षे नाशिककरांनी वाट पाहून त्यांच्या पदरात कालिदास कलामंदिर पडले मात्र तेथे प्राथमिक सुविधादेखील नसल्याने कलावंत तसेच प्रेक्षकांचा रसभंग होत आहे. याच प्रत्यय नुकताच एका नाटकादरम्यानदेखील आला. शांतेचं कार्ट चालू आहे, या नाटकात तब्बल वीस वेळा लाईट गेले. त्यामुळे नाटक सुरू ठेवावे की बंद करावे हेच कलाकारांना कळत नव्हते. अनेकदा तर त्यांनी काही काळासाठी थांबून घेणेच पसंत केले मात्र यात रसभंग झाल्याने नाशिक महापालिकेच्या नावाने बोटे मोडण्यात येत होती.

अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करूनही कलावंतांच्या पदरात असे नाट्यगृह पडणार असेल तर त्यापेक्षा इतर ठिकाणी नाटक केलेले काय वाईट अशी प्रतिक्रिया मुंबईहून आलेल्या कलाकारांमध्ये उमटत आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव याने तर फेसबूकवर कालिदास कलामंदिराविषयी एक पोस्ट लिहून त्याचे वाभाडच काढले. लोक इतके पैसे खर्च करून नाटक पाहायला येतात तर त्यांचा वीसवेळा रसभंग झालेला योग्य आहे का? त्यांच्या पैशांची व वेळेची किंमत मोठी आहे, त्यांनी असे अर्धवट आनंदात नाटक पहायचे का असा सवाल प्रियदर्शन यांनी केला असून टीव्ही, सिनेमा, इंटरनेट मोठ्या प्रमाणात असताना प्रेक्षकांनी नाटक का पाहायचे, रसभंग का करायचा? नाशिककरांना उत्तम सोयीसुविधा मिळायला हव्यात, हा वीजभंग लवकरात लवकर थांबवा अशा शब्दात प्रियदर्शनने महापालिकेला साकडे घातले आहे.

----

मुंबईच्या कलाकाराची पोटितडीक

प्रशांत दामले यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून कालिदासच्या दुरवस्थेचे वाभाडे काढले होते. त्यानंतर भरत जाधव यांनीदेखील पत्र देऊन महापालिकेला याबाबत सूचना केली होती. आता प्रियदर्शन जाधवने पोस्ट लिहून महापालिकेला काही प्रश्न विचारले आहेत. मुंबईच्या कलाकारांना येथे येऊन प्रयोग सादर करावे लागतात त्यामुळे ते या नाट्यमंदिराविषयी जागरूक राहून काही बदल सुचवतात ते लक्षात घेऊन महापालिकेने काम केले पाहिजे अशी चर्चा सांस्कृतिक वर्तुळात आहे.

---

नूतनीकरणानंतर नाशिकच्या वाटेचा अंधार सरेल असं वाटलं होतं पण 'कार्ट' ते कार्टंच. अजूनही ध्वनी आणि प्रकाशयोजना तंत्रज्ञ कालिदासच्या त्रुटींची यादी वाचून दाखवतात. पैशा परी पैसा गेलाच पण नाशिकच्या रंगभुमीची नाचक्की होते ती वेगळी. हे सगळं सुरळीत व्हावं ह्याशिवाय नटराजाकडे आणखी मागु शकतो.

- प्राजक्त देशमुख, नाट्यलेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांना वीजवितरणाचा मार्ग सुकर

$
0
0

सायने, संगमेश्वर वीज उपकेंद्र कार्यान्वित

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतंर्गत ३३/११ के. व्ही. सायने बु. टेक्सटाइल पार्क व संगमेश्वर वीज उपकेंद्राचे उद्घाटन-भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत भुसे यांनी उपकेंद्राची घोषणा केली होती. त्यानुसार हे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे.

हे उपकेंद्र मालेगाव परिसरातील उद्योग विकासासाठी उपयुक्त ठरू शकेल. वीज उपलब्धतेमुळे औद्योगिक वसाहतींकडे उद्योजक अधिक प्रमाणात आकर्षित होतील. औद्योगिक वसाहतीत उद्योगांना चालना मिळेल असे, प्रतिपादन यावेळी राज्यमंत्री भुसे यांनी केले. उद्घाटनप्रसंगी आमदार असिफ शेख, उपमहापौर सखाराम घोडके, मुख्य अभियंता नाशिक परिमंडळ ब्रिजपालसिंह जनवीर, प्र. अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, अधीक्षक अभियंता संजय खंदारे, कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मागणीनुसार त्यांना तातडीने वीजपुरवठा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. वीजगळती थांबावी यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. आमदार शेख म्हणाले, या उपकेंद्रामुळे सायने, पवारवाडी, दरेगाव या परिसरातील गावांना फायदा होणार असून, त्याचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. उपकेंद्राच्या निर्मितीसाठी अडीच कोटी रुपये खर्च आला असून मे २०२० पर्यंत सर्वाना वीजजोडणी देणात येणार असल्याची माहिती जनवीर यांनी दिली.

संगमेश्वर उपकेंद्राचे भूमीपूजन

सायने येथील उपकेंद्राच्या उद्घाटनासोबतच शहरातील संगमेश्वर भागातील विजेचा प्रश्न निकाली निकाली काढण्यासाठी येथे देखील ३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र लवकरच कार्यन्वित होणार आहे. शुक्रवारी या उपकेंद्राचे देखील भूमिपूजन भुसे यांच्या हस्ते पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट जनावरे जोड - सातपूर

$
0
0

या भागात असतो वावर

महापालिकेच्या सातपूर विभागात मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर पशुवैद्यकीय विभागाकडून कारवाई केली जाते. सातपूर गाव,

दादासाहेब गायकवाडनगर, राजवाडा, शिवाजी मंडई परिसर, सातपूर काँलनी, आनंदछाया, नीलकंठेश्वरनगर, जाधव संकुल, अशोकनगर मुख्य रस्ता, अशोकनगर

भाजी मंडई आदी ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर असतो. मालकी नसलेल्या मोकाट जनावरांना महापालिकेच्या ठेकेदाराकडून ताब्यात घेतले जाते. मात्र, मालकी

असलेल्या जनावरांवर कारवाई केली जात नसल्याने त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. संबंधित जनावरांचे मालक असलेल्यांवरदेखील महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

नगरसेवक, तसेच नागरिकांच्या तक्रारी आल्यावर मोकाट जनावरे ठेकेदाराला सांगत ताब्यात घेतली जातात. मात्र, मालकी असलेली जनावरे सार्वजनिक ठिकाणी येऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. महापालिकेकडून तक्रारी प्राप्त झाल्यावर तत्काळ मोकाट जनावरे ताब्यात घेण्याची कारवाई केली जाते.

- निर्मला गायकवाड-पेखळे, विभागीय अधिकारी, मनपा, सातपूर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोकस : गाय हल्ला

$
0
0

स्वच्छता नसल्यानेच जनावरांचा त्रास

प्राण्याने केलेल्या हल्ल्यामागची कारणे समजून घ्यायला हवीत. रस्त्यावर खाद्यपदार्थ पडलेले असतात, तेव्हा ते खाण्यासाठी गायी, कुत्री घोळक्याने येतात. हे पदार्थ मिळविण्यासाठी ते एकमेकांना ठोसे मारतात. आपापसांत भांडतात. एकमेकांवरच नव्हे, तर कुणावरही धावून जातात. यातूनच लहान मुले आणि वृद्धेला या प्राण्याने जखमी केले असण्याची शक्यता प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे. खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीपाला विक्रेते उरलेसुरले पदार्थ रस्त्यावरच टाकून निघून जातात. हे पदार्थ खाण्यासाठी गायी, कुत्री तेथे जमतात. मोकाट जनावरांचा वावर वाढला, की असे प्रकार घडतात. शहरात सिडको, सातपूर, रविवार कारंजा, पंचवटी, नाशिकरोड अशा सर्वच परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त वावर आढळतो. उरलेसुरले पदार्थ कचराकुंडीत टाकायला हवेत. याबाबत नागरिक कमालीचे उदासीन असून, महापालिकाही स्वच्छतेबाबत पुरेपूर काळजी घेत नाही. शहरातील गोठे हे शहराबाहेर स्थलांतरित करायला हवेत. अशा प्राण्यांचे मालक दिवसा त्यांना मोकाट सोडतात. सायंकाळी घेऊन जातात. प्राण्यांना मोकाट सोडणाऱ्यांवरदेखील महापालिकेने कारवाईचा बडगा उगारालायला हवा, अशी अपेक्षा प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.

हे प्राणी बेवारस नसतात. रस्त्यात वाहनांच्या गोंगाटात ते गोंधळतात. अशा प्राण्यांकरिता पांजरापोळची सुविधा असायला हवी. त्यांना मोकाट सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. मुक्या जिवांबाबत मदत हवी असल्यास शरण फॉर अॅनिमल्स या संस्थेशी संपर्क साधावा.

- शरण्या शेट्टी, शरण फॉर अॅनिमल्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून थंडीची लाट

$
0
0

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात रविवारपासून थंडीची लाट येण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तविली आहे. नाशिकसह जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासुन नाशिककर कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. निफाडमध्ये तर गेल्या आठवड्यात किमान तापमान १.७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. यावेळी नाशिकमधील तापमानाचा पाराही पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. परंतु नववर्षाच्या सुरूवातीपासून पुन्हा थंडीचा कडाका कमी होण्यास सुरुवात झाली. १ जानेवारीला ६.२ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान २ जानेवारीला ७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. शुक्रवारी ८.५ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान शनिवारी ९.४ अंशांवर पोहोचले. आता पुन्हा थंडीचा कडाका वाढत जाण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तविली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि दिल्लीत सुरू झालेला पाऊस यामुळे पुढील ७२ तासांत मध्य भारताच्या मैदानी प्रदेशातून उत्तरी वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या अधिकाऱ्याची चौकशीची मागणी

$
0
0

मालेगाव : तालुक्यातील निंबायती येथे जमिनीच्या वादात नवबौद्ध समाजातील लोकांना जबर मारहाण झाली होती. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात अॅट्रॉसीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरुड यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. सदर गावात एका जमिनीच्या वादातून जयपाल जगताप, संदीप जगताप, कमलबाई जगताप व प्रभाबाई जगताप यांना मारहाण झाल्याने ते जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी पंचायत समितीचे उपसभापती व अन्य बारा जणांवर अॅट्रॉसीटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अद्याप अटक झालेली नाही. याप्रकरणी तालुक्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत शिंदे, के. के. पाटील यांची चौकशी करण्याची मागणी गरुड यांनी केली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फोकस- मोकाट जनावरे

$
0
0

महापालिका- विनोद पाटील

दोन वर्षांत ५४८ जनावरांचा बंदोबस्त

सिडकोत मोकाट गायीमुळे बालकासह वृद्धेला जखमी केल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी महापालिकेकडून पंचवटीत कोंडवाडा सुरू करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेकडे सध्या मोकाट जनावरे पकडण्यासाठी स्वत:ची यंत्रणा नसून, ठेकेदाराच्या भरवशावर जनावरांची धरपकड सुरू आहे. प्रत्यक्षात एप्रिलपासून महापालिकेला ठेकेदारही मिळालेला नसून, ठेकेदारासाठी तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. गेल्या दोन वर्षांत महापालिका क्षेत्रात अवघ्या ५४८ जनावरांवर कारवाई केली आहे. त्यातील ४६८ जनावरे त्यांच्या मालकांनी दंड भरून सोडून नेली आहेत. महापालिकेकडून प्रतिजनावर पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येतो. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ३० जनांवरांचा मृत्यू झाला आहे, तर महापालिकेने ५० जनावरे गोशाळेत जमा केली आहेत. एक एप्रिल २०१८ पासून ठेका संपल्याने शहरातील मोकाट जनावरांवरील कारवाई बंद आहे. निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता महापालिकेने येईल त्याला काम देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग

महापालिकेत आतापर्यंत मोकाट जनावरे आणि कुत्र्यांसंदर्भातील कारवाईसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत नव्हता. अतिक्रमण विभागामार्फतच मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासह श्वान निर्बीजीकरणाचे काम केले जात होते. मात्र, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी या शहराचा वाढता विस्तार लक्षात घेत, महापालिकेत स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागासाठी स्वतंत्र स्टाफ व वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्यास श्वान निर्बीजीकरण, तसेच डुकरांवरील कारवाईचीही जबाबदारी आता या विभागावर निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेत यासाठी विभाग निर्माण करण्यात आला असला, तरी विभागवार कर्मचारी वर्ग नसल्याने विभागाला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.

१२ वर्षांत ६० हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण

ठेकेदाराच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर पाथर्डी येथील महापालिकेच्या ट्रक टर्मिनसच्या जागेत उभारलेल्या कक्षात निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. गेल्या १२ वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून तब्बल ६० हजार भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मात्र, तरीही दरवर्षी या शहातील कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. या श्वान निर्बीजीकरणात अनेकदा महासभा व स्थायी समितीच्या बैठीकत नगरसेवकांकडून आवाज उठवण्यात आला आहे. प्राण्यांसंदर्भात केंद्र सरकारचे असलेले कठोर कायदे आणि महापालिकेकडे त्यांच्यावर कारवाईसाठी स्वतंत्र विभागच नसल्याने महापालिकाही हतबल झाली आहे.

कारवाईसाठी कायद्यांचा अडसर

शहरातील मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका दिला असून, संबंधित ठेकेदाराकडून श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांवर विशेष लक्ष ठेवून त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. भटक्या कुत्र्यांना जिवानिशी मारणे कायद्याने गुन्हा असल्याने या कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निर्बीजीकरणाचा ठेका दरवर्षी दिला जातो. विशेष म्हणजे प्राण्यांसदर्भात असलेल्या कायद्यानुसार निर्बीजीकरणासाठी ज्या ठिकाणाहून पकडला, त्याच ठिकाणी पुन्हा आणून सोडण्याची तरतूद कायद्यात आहेत. या निर्बीजीकरणावर दरवर्षी ९० लाखांचा खर्चही केला जातो. शहराच्या विविध भागांतील कुत्र्यांना डॉग स्क्वाड व डॉग व्हॅनच्या साह्याने पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. विल्होळी येथील ट्रक टर्मिनसच्या जागेत हा प्रकल्प सुरू आहे, तर मोकाट जनावरांवर कारवाई करतानाही कायद्याची अडचण समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नस्तनपुरात शनि महाराजांचा जयघोष

$
0
0

लाखो भाविकांनी घेतले दर्शन; महिलांची संख्या अधिक

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

प्रभू रामचंद्रांनी स्थापित केलेल्या व शनी महाराजांच्या साडे तीन पीठांपैकी एक असलेल्या नस्तनपूर येथे शनी अमावस्येनिमित्त शनिवारी देशभरातील लाखो भाविक शनीचरणी नतमस्तक झाले. विशेष म्हणजे या मंदिरात महिलांना थेट प्रवेश असल्याने दर्शनासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. दिल्ली, गुजरातसह महाराष्ट्रातील भाविकांनी हजेरी लावली.

नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे शनिवारी पहाटे पाच वाजता धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी आठ वाजता महिला न्यायाधीश प्रेरणा दांडेकर यांच्या हस्ते शनेश्वराची आरती करण्यात आली. ट्रस्टचे पदाधिकारी माजी आमदार अनिल आहेर, खासेराव सुर्वे, उदय पवार, नारायण अग्रवाल, शिवाजी बच्छाव, विजय चोपडा, संदीप मवाळ, नवनाथ बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संयोजन करण्यात आले.

स्त्रीयांना थेट प्रवेश

यंदा नस्तनपूर येथे काही प्रमाणात शुल्क आकारून व्हीआयपी दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शनी शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलने झाली. मात्र नस्तनपूर येथे शनी मंदिरात स्त्रीयांना थेट प्रवेश देण्याचे शनी मंदिर ट्रस्टचे धोरण आधीपासूनच असल्याने महिलांनीही दर्शन घेतले. विशेष म्हणजे स्त्री-पुरुष भक्तांसाठी एकच रांग होती.

रेल्वेने दिला थांबा

नस्तनपूर येथे शहराबरोबरच ग्रामीण भागातील शनीभक्त येतात हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन्ही रेल्वे गाड्यांना शनिवारी नस्तनपूर येथे थांबा दिला.

संरक्षक भिंत अद्याप कागदोपत्री

भुसावळ रेल्वे प्रशासनाने नस्तनपूर येथे शनी मंदिराजवळच ट्रॅकच्या अलीकडे मोठी संरक्षक भिंत बांधण्याचे ठरवले असल्याचे विभागीय रेल्वे प्रबंधकांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या या संरक्षक भिंतीला मंजुरी देखील मिळाल्याची चर्चा होती. मात्र शनी अमावस्येच्या यात्रोत्सव प्रसंगी प्रत्यक्षात संरक्षक भिंत काही बांधली गेली नाही, याबाबत शनी भक्तांत नाराजी उमटली.

शनीभक्ताचा असाही मान

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परंपरेनुसार नस्तनपूर येथेही दुपारी १२ वाजता हजर असलेल्या भक्तांमधून एका भक्ताला सपत्नीक शनी महाराजांच्या आरतीचा मान देण्यात आला. यंदा हा मान चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील नारायणसिंग देवरे व त्यांची पत्नी विजया देवरे यांना मिळाला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य सुनीता आहेर, दर्शन आहेर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ने केलेला विकास खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

' राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेला नाशिकचा विकास हा खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी करावे,' असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी पळसेतील जनसंपर्क दौऱ्याप्रसंगी केले.

मातोरी गावापासून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क दौऱ्यास माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले,'साडेचार वर्षात भाजप सरकारने केवळ जनतेला आश्वासनांचा पाऊस पाडून सर्वसामान्यांना वेड्यात काढण्‍याचे काम केले आहे. नाशिक ग्रामीण भागात कोणतीही विकासाचे काम साडेचार वर्षात या सरकारने केलेले नाही. येत्या निवडणुकांमध्ये बुथ प्रमुखांनी आपली महत्त्वाची भूमिका बजवावी. निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोबाइल अॅप तयार केले जाणार असून, त्या अॅपद्वारे मतदाराची माहिती शोधता येणार आहे.' यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क दौऱ्यात बुथ प्रमुखांच्या नेमणुकाही करण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली विधानसभा अध्यक्ष गणेश गायधनी म्हणाले,'राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पळसे गावातील काही जमिनीवर पार्किंग झोन टाकण्यात आला होता; परंतु तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पळसे येथील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील पार्किंग झोन रद्द करण्यात आला. तसेच आज नाशिक सिन्नर महामार्गाची निर्मिती देखील छगन भुजबळ यांनी केली असल्याचे नमुद केले.'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक तालुक्यातील गण गटाच्या दौऱ्यात जिल्हाप्रमुख कोंडाजी मामा आव्हाड, तालुकाप्रमुख राजाराम धनवटे, योगेश मिसाळ, सभापती रत्नकर चुंबळे, विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब मस्के, दिलीप खैरे, गणेश गायधनी, सुनील कोथमिरे, शरद गायधनी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवळाली विधानसभा अध्यक्ष गणेश गायधनी तर आभार अॅड. शरद गायधनी यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी शेमळीत पाण्यासाठी महिलांचा संताप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील नवी शेमळी ग्रामपंचायतीची अधिकृत विहीर आटल्याने तब्बल महिनाभरापासून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर संतप्त ग्रामस्थ व महिलांनी शनिवारी नवी शेमळी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. दरम्यान पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरणार यांनी नवीन विहिरी अधिग्रहण करून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महिलांनी हंडा मोर्चा आंदोलन मागे घेतले. नवी शेमळी येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नाही. यामुळे ग्रामसस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने नवीन विहीर अधिग्रहीत केली होती. या विहिरीवरून पाणीवाटप करण्यात येत होते. मात्र गत महिनाभरापासून ज्या विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू होता ती विहीरदेखील आटल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नवी शेमळी येथील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरणार यांनी नव्याने विहीर अधिग्रहीत करण्याची माहिती दिली. तसेच तातडीने पााणीपुरवठा पूर्ववत करण्याची तयारी दर्शविल्यानंतर महिलांनी आपली हंडा मोर्चा माघारी नेला. यावेळी आंदोलनात महिलांसह विशाल वाघ, बापू वाघ, मनोहर वाघ, अनिकेत वाघ आदींसह ग्रामस्थ सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्याकांसाठी दिला ‘अल्पवेळ’

$
0
0

आयोगाचे उपाध्यक्ष आले अन् गेले! मालेगावात नाराजी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा शनिवारी मालेगाव दौरा आयोजित करण्यात आला होता. येथील हज हाउसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अभ्यंकर यांनी उर्दू शिक्षक बांधवांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. अवघी १५ ते २० मिनिटांत अभ्यंकर यांनी आपले भाषण आटोपले. त्यामुळे ते आले, बोलले अन् गेले! अशीच भावना नागरिकांनी व्यक्त केली.

आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी अल्पसंख्याक समुदायाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दौरा करीत असल्याचे म्हटले. संबंधित विभागाकडे प्रलंबित प्रश्न सुपूर्त करून पाठपुरावा करण्याचे आश्वसन अभ्यंकर यांनी दिली.

व्यासपीठावर तहसीलदार ज्योती देवरे, उपायुक्त नितीन कापडणीस, विलास गोसावी, गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी आदी मान्यवर उपस्थित होते. अल्पसंख्याक आयोगाची कार्यप्रणाली, अधिकार यांविषयी अभ्यंकर यांनी उपस्थितांना माहिती दिली.

अभ्यंकर मालेगावी येत असल्याने त्यांचा शासकीय कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार येथील अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, तहसीलदार, मनपा शिक्षण मंडळ अधिकारी यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र अभ्यंकरांचा दौरा अवघ्या १५ ते २० मिनिटांत आटोपला. हज हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपले छोटेखानी भाषण देली आणि काढता पाय घेतला. त्यामुळे अल्पवेळेत आयोगाच्या उपाध्यक्षांनी कोणते प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव शहरात असे दौरे आयोजित केले जात असतील तर हे दौरे म्हणजे निव्वळ औपचारिकता असल्याचेच स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images