Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

क्राइम न्यूज

$
0
0

महिलेची पर्स लंपास

नाशिक : खिमजी भगवानदास आरोग्यभवन येथून चोरट्यांनी सुरेखा विजय रसाळ (रा. दत्तनगर, बोरगड) यांची रविवारी सकाळी पर्स लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्समध्ये साडेतीन हजारांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे आणि मोबाइल असा सुमारे साडेचार हजारांचा मुद्देमाल होता.

पर्समधून रोकड लंपास

नाशिक : बसमध्ये चढत असताना सीमा रमेश गायकवाड (रा. परेल मुंबई) यांच्या पर्सची चेन उघडून चोरट्यांनी साडेचौदा हजार रुपये लंपास केले. ही घटना नाशिकरोड बसस्थानकावर घडली. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत

पादचारी ठार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात चार महिन्यांपूर्वी झाला होता. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. सीताराम श्यामराव डावरे (रा. प्रबुद्धनगर, सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डावरे यांचे सातपूर येथे दुकान असून, ५ सप्टेंबर रोजी ते दुकानातून घराकडे पायी जात असताना हा अपघात झाला होता. बसस्थानक परिसरातून औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर जात असताना डावरे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

लेखानगर येथील इंदिरा गांधी वसाहतीत भारत दिलीप दांडेकर या २७ वर्षीय तरुणाने सोमवारी (ता. २४) सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विवाहितेची आत्महत्या

भावले मळा परिसरातील तिरडशेत भागात नीलिमा उमेश भावले या २६ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी विवाहितेने आपल्या पतीस 'मला माफ करा' असा एसएमएस पाठविला होता. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढीव घरपट्टीतून दिलासा?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टीचे २५३ कोटींचे उद्दिष्ट १०० कोटींनी घटविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचा थेट परिणाम विकासकामांवर होणार आहे. मात्र, नागरिकांना वाढीव करजाचातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करयोग्य मूल्यात पाच ते सहा पटींनी वाढ करीत, नवीन मिळकतींना वाढीव दर लागू केला होता. महासभेने जुन्या मिळकतींना १८ टक्के करवाढीला मंजुरी दिली असतानाही, छुप्या दराने ही वाढ ३६ टक्क्यांपर्यंत नेली होती. मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींना नवीन करयोग्य मूल्यदराने घरपट्टी लागू केल्याने महापालिकेचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे घरपट्टीचे उद्दिष्ट २५३ कोटींपर्यंत नेले होते. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे घरपट्टीचे उद्दिष्ट ११५ कोटींपर्यंत होते. परंतु, चालू वर्षात ते थेट २५३ कोटींपर्यंत गेल्याने लोकप्रतिनिधींनाही धक्का बसला होता. नव्या मिळकतींना दंडासह आकारलेले शुल्क, महापालिकेच्या ९०३ मिळकतींना रेडी रेकनरचा दर लावल्याने हा आकडा वाढला होता. परंतु, वाढीव करावरूनच भाजप आणि मुंढे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मुंढे यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, नवीन मिळकतींना सरासरी एक ते दीड लाखांच्या नोटिसा पाठविण्यास सुरुवात झाली होती. जवळपास ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अखेर या वादातूनच मुंढेंना पालिकेतून जावे लागले.

मुंढेंची बदली झाल्यानंतर गेल्या महासभेत ५९ हजार मिळकतींना नवीन करयोग्य मूल्यासह व दंडासह आकारण्यात येत असलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली. तसेच वाढीव कराबाबतही फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची अडचण झाली असून, विविध कर विभागासमोरचे संकट अधिकच वाढले आहे. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही या करवाढीबाबत दिलासा देण्याचे आश्वासन दिले असून, त्याचा अभ्यास सुरू केला आहे. २५३ कोटींचे उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे, याबाबत विविध कर विभाग पेचात पडला आहे. २५३ कोटींचे उद्दिष्ट साध्य करायचे तर, लोकप्रतिनिधींशी संघर्ष करावा लागेल. तो टाळण्यासाठी विविध कर विभागाने चालू वर्षाचे घरपट्टीचे उद्दिष्ट थेट १०० कोटींनी कमी केले आहे. महासभेच्या १८ टक्के करवाढीसह मनपा मिळकतींना रेडिरेकनर दराने आकारणी करून १५३ कोटींचेच उद्दिष्ट सुधारित बजेटमध्ये ठेवण्याच्या निर्णयाप्रत विविध कर संकलन विभाग पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेने आतापर्यंत ९२ कोटींची विक्रमी घरपट्टी वसूल केली आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत केवळ ६० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विविध कर संकलन विभागाने घरपट्टीचे उद्दिष्ट घटविल्याने नागरिकांना आता वाढीव घरपट्टीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बजेटचाही आकडा घटणार

प्रशासन, स्थायी आणि महासभेच्या प्रवासानंतर पालिकेचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे बजेट हे २१८९ कोटींपर्यंत गेले होते. या बजेटमध्ये २५३ कोटींच्या उत्पन्नाचा वाटाही गृहीत धरण्यात आला होता. परंतु, आता थेट घरपट्टीचे उद्दिष्ट हे १०० कोटींनी घटणार असल्याने प्रशासनाचे बजेटही शंभर कोटींनी कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आयुक्तांनी मांडलेले १७८५ कोटींचे बजेट १६८५ कोटींपर्यंत खाली येणार आहे. त्याचा थेट परिणाम भांडवली आणि विकासकामांवर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांची ‘उतरवली’!

$
0
0

वाहनचालक पोलिसांची हाती दीडशे मद्यपी; थेट कोर्टात रवानगी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाचे स्वागत करताना मद्यप्राशन करून वाहने हाकणाऱ्या तब्बल १५० वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत कोर्टात पाठवले. सायंकाळपासून सुरू झालेल्या कारवाई दरम्यान सापडलेल्या तळीरामांना नव वर्षाचे सेलिब्रेशन चांगलेच महागात पडले. याबरोबर पोलिस आणि वाहतूक विभागांनी केलेल्या कारवाईतही काही वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले.

कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी शहर पोलिसांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून तयारी केली. यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर २६ नाकाबंदी आणि ३९ फिक्स पॉईंट तैनात होते. मोकळे रस्ते मिळल्यानंतर रॅश ड्रायव्हिंग होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरकेडिंग केली. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला पण अपघात झाले नाहीत. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करणारे वाहनचालक रडारवर घेण्याचे नियोजन पोलिसांनी केले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आपल्याकडील १५ ब्रेथ अॅनालायझरचा वापर करीत मद्यपी वाहनचालकांचा शोध घेतला. रात्री १० ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत तब्बल १५० मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या हाती लागले. गत वर्षी याच दिवशी अवघे २८ मद्यपीचालकांवर कारवाई झाली होती.

प्रत्येकाला दंडाचा दणका

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने अल्कोहोलची तपासणी केल्यानंतर वाहनचालकांना लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात मद्यपी वाहनचालकांना कोर्टात पाठवले जाते. वाहतूक पोलिस जागेवर पावती फाडत नाही. संबंधित १५० वाहनचालकांनाही कोर्टात पाठवण्यात आले असून, त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड होऊ शकतो. दरम्यान, नाकाबंदी व्यतिरिक्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मोठ्या कार्यक्रमाजवळ पोलिसांची गस्तही सुरू होती. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक तैनात करण्यात आले होते.

सुशिक्षितांची संख्या अधिक

सापडलेल्या तळीरामांमध्ये दुचाकीस्वारांची आणि सुशिक्षितांची संख्या लक्षणीय होती. ३१ डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, मुख्यालयातील ३०० कर्मचारी, १३ स्ट्रायकींग फोर्स, दोन आरसीपी प्लाटून, दोन जलद गती पथक आणि पोलिस स्टेशनचा मिळून जवळपास तीन हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर होता. या बंदोबस्तासाठी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या होत्या.

अपघात मुक्त सेलिब्रेशन व्हावे यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून याची तयारी सुरू होती. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह सारख्या गंभीर प्रकारात १५० वाहनचालक सापडले.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

..

अशी राबविली यंत्रणा

२६ प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी

३९ फिक्स पॉईंट

१५ ब्रेथ अॅनालायझरचा वापर

मुख्यालयातील ३०० कर्मचारी

१३ स्ट्रायकींग फोर्स

दोन आरसीपी प्लाटून

दोन जलद गती पथक

एकूण तीन हजार पोलिस तैनात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यांसह मद्यविक्रेत्यांना दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाने ३१ डिसेंबर रोजी रात्रभर तपासणी मोहीम राबवित नाकाबंदी आणि तपासणी नाक्यांवर मद्यप्राशन करून वाहने हाकणाऱ्या ८८ वाहनचालकांवर कारवाई केली. तसेच जुगार अड्ड्यांसह अवैध मद्य विक्रेत्यांना दणका दिला.

नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; तसेच जीवघेणे अपघात थांबावे यासाठी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ४० पोलिस स्टेशननिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील महामार्ग, वर्दळीची ठिकाणे, चेक पोस्ट अशा ठिकाणांवर बॅरिकेटस् टाकून नाकाबंदी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर फिक्स पॉईंट लावण्यात आले. याशिवाय महामार्ग व रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क पॅट्रोलिंग ठेवण्यात आली होती.

महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस व दामिनी पथक तैनात करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, हॉटेल्स, ढाबे, मॉल्स अशा वर्दळीच्या ठिकाणी नजर ठेवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा वाहतूक शाखा व मालेगावच्या शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ८८ मद्यपी वाहनचालकांकडून १७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पाऊण लाखाचा मद्यसाठ जप्त

अवैधरित्या मद्याची विक्री व वाहतूक करणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यानुसार तब्बल १३ गुन्हे दाखल झाले. यात ७४ हजार ४४८ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान, ८ जुगाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रायच्या निर्णयाविरोधात लढणार सुप्रीम कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबल व्यावसायिकांनी ग्राहकांना दिलेल्या सेवेमुळे दूरचित्रवाहिन्या मोठ्या झाल्या. परंतु केबल व्यावसायिकांचे योगदान विसरून त्यांच्याच मुळावर घाला घालण्याचा कुटील डाव वाहिन्या आणि ट्रायकडून खेळला जातो आहे. म्हणूनच ट्रायच्या या निर्णयाविरोधात संघटीतपणे सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देण्याचा निर्धार नाशिक जिल्हा केबल व्यावसायिक संघटनेने मंगळवारी केला.

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे केबल सेवा आता पॅकेज स्वरूपात प्राप्त होणार आहे. १३० रुपये एवढ्या किमान मासिक खर्चात ग्राहकांना बेसिक फ्री चॅनल्सचे पॅकेज उपलब्ध होणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणतेही चॅनल घेण्यासाठी ग्राहकांना दरमहा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. कुठल्याही अतिरिक्त चॅनलची सेवा घेण्यासाठी ग्राहकांना विशिष्ठ रक्कम मोजावी लागणार आहे. त्याहून अधिक शुल्क आकारल्यास संबंधित केबल व्यावसायिकांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ट्रायच्या या धोरणाला देशभरातील केबल व्यावसायिकांकडून विरोध होत असून, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा केबल व्यावसायिक संघटनेने मंगळवारी बैठक बोलावली होती.

मुंबई नाका येथील कालिकामाता मंदिराच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाभरातून शेकडो केबल व्यावसायिक उपस्थित होते. बहुतांश केबल व्यावसायिकांनी ट्रायच्या या धोरणाला विरोध दर्शविला.

ट्रायने ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र दिले असले तरी या नियमावलीत केबल ऑपरेटर्सचा कुठेही विचार केला नसल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. ट्रायचे हे धोरण केबल व्यावसायिकांच्या आणि ग्राहकांच्याही हिताचे नसल्याचा दावा करीत या नियमावलीविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देण्याचा निर्धार या बैठकीत केबल व्यावसायिकांनी व्यक्त केला. न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असल्याने ते उभे करण्याची तयारी दर्शविण्यात आली. ज्या ग्राहकांनी केबल व्यावसायिकांकडे अथवा दूरचित्रवाणी वाहिन्यांची सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांकडे पैसे भरले आहेत त्यांनी नव्या नियमानुसार कोणत्या वाहिनीसाठी किती रक्कम भरायची याबाबत ग्राहकांसह केबल व्यावसायिकांमध्येही संभ्रम आहे. नियमावलीत सुस्पष्टता नसल्याने त्यास विरोध दर्शविण्यात आला.

ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार प्रसारण कंपन्यांना महिन्याकाठी ८० टक्के तर उर्वरित २० टक्क्यांमधील केवळ १० टक्केच रक्कम केबल व्यावसायिकांच्या हातात पडणार असल्याचा दावा बैठकीत काही केबल व्यावसायिकांनी केला. ट्रायच्या या नियमावलीद्वारे अप्रत्यक्षरित्या ग्राहकांच्या खिशातून अधिक पैसे काढण्याचे काम वाहिन्या करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ब्रॉडकास्टर, एमएसओ आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून केबल व्यावसायिक काम करतात. परंतु त्यांनाच वाऱ्यावर सोडण्यात येत असल्याने न्यायालयीन लढाईचा निर्धार करण्यात आला. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष नुरभाई शेख, विनय टांकसाळे, संजय गुजरानी, नितीन आव्हाड, मुकुंद बागुल आदींसह पदाधिकारी व केबल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांची अंतरे

$
0
0

शेतकऱ्यांना वाळीत टाका

कांदा ज्याप्रमाणे डोळ्यांत अश्रू आणतो, त्याप्रमाणे कांदा पिकवणारे शेतकरी सरकारची अडवणूक करतात. कांद्याचे भाव वाढून शेतकरी खूश झाले तर अतिरिक्त पैसे मोजावे लागल्याने ग्राहकांना फटका बसतो. खरेतर शेतकऱ्यांवर सरकारचा अंकुश नाही. तो मनात येईल ते पेरतो. त्यांच्यावर कुणाचेही बंधन नाही. तो कुणाचेही नियंत्रण मानत नसतो. शेतकऱ्याला भोळा समजू नये. शेतकऱ्यासारखा हुशार-बुद्धिमान कुणीही नसावा. शेतकरी शिक्षणापासून वंचित आहे. कमी शिकला असला तरी त्याची बुद्धी चौफेर असते. तो केवळ अज्ञानाचे डोंग घेतो आणि सर्व शहाणे-विद्वानांना खरेतर वेड्यात काढत असतो. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लागत नाही. दुसरीकडे सामान्य नागरिक, नोकरदार वर्गाकडून मात्र कर वसुली केली जाते. जो शेतकरी हजारो टन कांदा रस्त्यावर ओततो तो गरीब कसा? सामान्य लोकांनी अशा शेतकऱ्यांची ढोंगबाजी उघड करावी. त्यांना वाळीत टाकावे.

कृष्णा सूर्यवंशी, नाशिक

'त्या' शिक्षकाचे अभिनंदन

किरण बाबासाहेब खैरनार या संगमनेर येथील जिल्हा परिषदेतील शेतकऱ्याने सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेण्याचे नाकारल्याचे वाचनात आले. खरे तर हा शिक्षक अभिनंदनास पात्र आहे. शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना शासनाला व समाजाला समजाव्यात यासाठी वेतन आयोगाचा लाभ नाकारत असल्याचे या शिक्षकाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्याचेही त्याने आवर्जून नमूद केले आहे. खरेतर महाराष्ट्रातील वर्ग-१ व वर्ग-२ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रात्रपत्रित अधिकारी महासंघाने वेतन आयोगासाठी संप पुकारला होता. या मंडळींनी या अवलिया शिक्षकाकडून धडे घेण्याची गरज आहे. अशा संघटनांनी शेतकऱ्यांचे दु:ख जाणले व ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास मदत होईल.

प्रा. बी. बी. घुगे, नाशिक

राखीव निधीचा तिढा

रिझर्व्ह बँकेकडे तीन लाख साठ हजार कोटी रुपयांचा राखीव निधी असूनही तो सरकारला दिला जात नाही, यावरून दिसून येते की सरकार किती हतबल झाले आहे. माजी गवर्नर ऊर्जित पटेल यांनी शेवटी राजीनामा दिला. पण ते नमले नाही. विद्यमान गवर्नरही सावधपणे पावले उचलत आहेत. सरकारवर विरोधी पक्ष आरोप करतात, की सरकारला या रकमेची गरज वित्तीय तूट भरून काढण्यासाठी हवी आहे. दुसरीकडे अर्थमंत्री जेटली लोकसभेत सांगतात, की सरकारला या निधीचा वापर गरिबी निर्मुलनासाठी व बँकांना फेर भांडवलीकरणासाठी करायचा आहे. पुढील लोकसभा निवडणुकांसाठी जेमतेम चार महिने शिल्लक आहेत. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प संसदेकडून मंजूर करायचा आहे. बँकांचे बुडित कर्ज मोठ्या प्रमाणात वाढल्याने रिझर्व बँकेने काही सरकारी बँकांवर निर्बंध आणले आहेत. त्यांना नवीन कर्जे देण्यास रोखण्यात आल्याने सरकारची कोंडी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने पैसा दिला तरी पुढील दोन महिन्यांत सरकार दारिद्र्य निर्मूलन करू शकत नाही. त्याचप्रमाणे बँका दोन महिन्यांत कर्जवाटप करून ही रक्कम मार्गी लावू शकत नाही.

विकास जोग, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्र नवीन

अर्थसंकल्पाचा अचूक भाष्यकर्ता हरपला

$
0
0

\Bज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे निधन

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय अर्थसंकल्पाचा अचूक अंदाज बांधणारे, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून डॉ. रारावीकर आजारी होते. दिल्लीतील घरी उपचार सुरू असताना, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांचे ते वडिल होत.

प्रा. डॉ. रारावीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला. अर्थशास्त्रात बी.ए, एम.ए आणि पी.एचडीचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांनी ४० वर्षांहून अधिक वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. नाशिकमधील कॉलेजरोड परिसरात त्यांचे घर होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड बिटको कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी प्रा. डॉ. अरुणा रारावीकर या संस्कृतच्या प्राध्यापक होत्या.

डॉ. रारावीकरांचा अर्थसंकल्प हा विशेष व्यासंगाचा विषय होता. त्यामुळे अर्थसंकल्प तज्ज्ञ म्हणून त्यांच्या नावलौकीक आहे. डॉ. रारावीकर यांचा केंद्रीय अर्थसंकल्पाचा अंदाज कायम अचूक असायचा. अर्थमंत्र्यांच्या आवाहनानुसार डॉ. रारावीकरांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तयार करून अर्थमंत्र्यांना एकादा पाठविला. तो अर्थसंकल्प आणि केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तंतोतंत सारखा असल्याचे दिसले. त्यावेळी डॉ. रारावीकरांना बजेट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात केलेल्या संशोधनपर लिखाणांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले. डॉ. रारावीकरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या अनेक शोधनिबंधानाही पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या जाण्याने बुध्दीवान अर्थशास्त्रतज्ज्ञ हरपल्याची भावना अर्थशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केली.

अर्थविषयक विपुल लेखन

डॉ. रारावीकरांनी अनेक आर्थिक विषयांवर विपुल लिखाण केले. प्रत्येक वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पावर कॉलेज आणि विविध समूहांत त्यांची व्याख्याने होत असत. डॉ. रारावीकरांचे 'असा आहे केंद्रीय अर्थसंकल्प' हे पुस्तक दरवर्षी प्रकाशित व्हायचे. यासह 'नोबेल अर्थशास्त्रज्ञ' आणि 'डायमंड अर्थशास्त्रकोश' ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. त्यांनी अर्थसंकल्पांवर वर्तमानपत्रांमध्ये केलेले लेखन विशेष लोकप्रिय ठरले. नाशिक महापालिकेच्या समितीत आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

डॉ. रारावीकर हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांचे निरीक्षण अतिशय अचूक होते. त्यामुळेच त्यांच्याकडून अर्थसंकल्प समजून घेणे ही एक मोठी संधीच असायची. अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगणारा तज्ज्ञ आपल्यातून निघून गेला आहे. ही मोठी हानी आहे.

- डॉ. अनिता गोगटे, अर्थशास्त्र प्राध्यापिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहस्त्रदीपांनी उजळला गोदाकाठ

$
0
0

रामकुंड परिसरात सहस्त्रदीप प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. स्वामी सखा मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट व शिवनेरी मित्रमंडळातर्फे हा कार्यक्रम झाला. या वेळी स्वरधारा कार्यक्रम झाला. गणेशवंदना, सरस्वती वंदना, शिववंदनेच्या सुरांनी गोदाकाठ भक्तिमय झाला. सारेगामा लिट्ल चॅम्प्स विजेती अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि नाशिकच्या पार्श्वगायिका मीना परुळेकर-निकम यांनी भजन व अभंग गायन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

kadar khan चित्र-अतुल बेलोकर

आपला वाटणारा अभ्यासक गमावला

$
0
0

आपला वाटणारा अभ्यासक गमावला

- विनायक गोविलकर, अर्थतज्ज्ञ

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर सरांचा अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास होता. अभ्यासातील सातत्य ही त्यांची विशेष ख्याती! त्यामुळेच त्यांना वित्त मंत्रालयाने केंद्रीय अर्थसंकल्प पुरस्कार देऊन गौरविले. त्यांनी लिहिलेल्या शोध निबंधांना ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि दोन ब्राझ पदके मिळाली. अर्थशास्त्रासारखा विषय अतिशय सोप्या भाषेत समजावून देण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देण्यात आला. त्यांनी ५ पुस्तके, शेकडो विचार प्रवर्तक लेख आणि अनेक भाषणातून आर्थिक विषयांवर भाष्य केले. त्यांची मांडणी सामान्य माणसापासून अर्थतज्ज्ञांपर्यंत साऱ्यांना उपयुक्त आणि दिशादर्शक असे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्यांच्या कृषी विषयातील संशोधनासाठी पुरस्कार प्रदान केला. भारताच्या आर्थिक आणि वित्तीय धोरणावरील त्यांच्या शोध निबंधाला नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने पुरस्कार देऊन गौरविले. त्यांनी ४१ वर्षे महाविद्यालयात निष्ठेने आणि अत्यंत आवडीने ज्ञानदान केले. पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राच्या अभ्यास मंडळात त्यांनी सहभाग घेतला. अर्थशास्त्रातील योगदानाची दाखल घेऊन मराठी अर्थशास्त्र परिषदेने त्यांना दोन वर्षांपूर्वी 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित केले होते. नाशिक महापालिका, अल्प बचत खाते, महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ या सारख्या संस्थांचे ते आर्थिक सल्लागार होते. अनेक संशोधकांना त्यांनी संशोधनासाठी उद्युक्त केले, मार्गदर्शन केले. नाशिकमधून प्रकाशित होणाऱ्या 'थिंक लाईन' या अर्थविषयक द्वै मासिकाच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. आपला वाटणारा अभ्यासू थोर मार्गदर्शक हरपला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेंगळुरू, उटीचा अभ्यासदौरा

$
0
0

पात्र ट्रॅव्हल्स एजन्सीकडून मागवल्या निविदा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांसाठी बेंगळुरू, म्हैसूर व उटी या तीन ठिकाणी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. समितीच्या सदस्यांना अभ्यास दौऱ्यावर जाण्याचा आंनद मिळणार असून प्रशासनाने त्यासाठी पाच लाखांची तरतूद केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांसाठी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. यंदाही प्रशासनाने या अभ्यास दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. समितीच्या सदस्यांसाठी प्रशासनाकडून पुन्हा बेंगळुरू, म्हैसूर आणि उटी या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. समितीकडून भेटी देऊन तेथील स्थानिक स्वराज्य संस्थाकडून महिला व बालकल्याणांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अभ्यास करण्यात येतो. तसेच या संस्थांकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांनाही भेटी देऊन त्यांचा अभ्यास करून त्या योजनांचा लाभ शहरातील महिला व बालकांना देता येईल काय, याची चाचपणी केली जाते. त्यासाठी महापालिकेने पात्र ट्रॅव्हल्स कंपनीकडून यंदाही निविदा मागविल्या आहेत. त्यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

गुरुवारपर्यंत निविदामुदत

अभ्यास दौऱ्यात सदस्यांचा विमानप्रवास, मोटारप्रवास, भोजन तसेच निवासाचा खर्च समाविष्ट आहे. पात्र ट्रॅव्हल्स कंपनीकडून गुरुवार, १० जानेवारीपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा मंजूर झाल्यानंतर या दौऱ्याचे नियोजन महिला व बालकल्याण विभागाकडून केले जाणार आहे. महिला व बालकल्याण समितीकडून मंजूर योजनांना प्रशासनाकडून चालना दिली जात नसली तरी सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याची हौस मात्र प्रशासनाकडून दरवर्षी पूर्ण केली जात असल्याचे चित्र आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घडवा सिल्क थ्रेडचे दागिने

$
0
0

(कल्चर क्लब लोगो, क्यू आर कोड, फेसबुक लिंक वापरावी)

--

घडवा सिल्क थ्रेडचे दागिने

'कल्चर क्लब'तर्फे कार्यशाळेचे आयोजन

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या स्वागतानंतर घराघरात वर्षातील पहिल्यावहिल्या सणाचे म्हणजेच, संक्रांतीचे वेध लागले आहेत. या सणाच्या दिवशी होणाऱ्या हळदीकुंकू समारंभासाठी महिलावर्गाला खास दागिने हवे असतात. आता संक्रांतीच्या उत्साहाच्या जोडीला कलात्मक दागिने तुम्हाला शिकता येणार आहेत. त्यासाठी सहभागी व्हा, 'मटा कल्चर क्लब' आयोजित सिल्क थ्रेड ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेत.

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब तर्फे संक्रांत सणाच्यानिमित्ताने सिल्क थ्रेड ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संक्रांतीला काळी वस्त्रे आणि साजशृंगार करून महिला सजतात. घरोघरी हळदीकुंकू समारंभ करण्यात येतो. यावेळी वैविध्यपूर्ण दागिने परिधान करण्याकडे महिलावर्गाचा कल असतो. जर हे दागिने तुम्ही स्वतः तयार केलेत, तर सणाचा उत्साह अधिक वाढेल. त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यशाळा होईल. महात्मानगर येथे असलेल्या सई संघई यांच्या द फिटनेस स्टुडिओत कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत ज्वेलरी मेकिंग एक्सपर्ट सई बोराटे या मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत बिंदी, मुकुट, हार, कानातले, मंगळसूत्र, बांगडी यांसह इतर दागिने बनविण्याचे तंत्र शिकविले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सभासदांना ३०० आणि इतरांना ३५० रुपये शुल्क असेल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी दुपारी २ ते ४ या वेळेत ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड येथे संपर्क साधावा. कल्चर कल्बच्या ऑनलाईन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com येथे भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्पनांना आकार द्या

$
0
0

कल्पनांना आकार द्या

प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांचा सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाचं आपण देणं लागतो, ही भावना प्रत्येकात रुजायला हवी. आपल्या ध्येयातून समाजाचेही कल्याण होईल, याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे. सध्याच्या पिढीत कल्पनाशक्तीला अधिक वाव आहे. आपल्या मनातील कल्पना अस्तित्वात आणून त्यांना आकार द्यायला शिकले पाहिजे. जेव्हा कल्पना सत्यात उतरात तेव्हा माणूस म्हणून जगण्याचा आनंद अधिक वाढतो. त्यासाठी कल्पना वास्तवात उतरविण्यासाठी कार्य करा, असा सल्ला प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी विद्यार्थिनींना दिला.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख आर्टस अँड कॉमर्स कॉलेजमध्ये भारतीय शिक्षण व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 'युवा आयाम'ची स्थापना करण्यात आली. यावेळी एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य, देशमुख कॉलेजच्या प्राचार्या डॉ. लीना पांढरे व्यासपीठावर होत्या. यावेळी विद्यार्थिनींसोबत संवाद साधताना डॉ. वैद्य म्हणाल्या, की युवा आयामच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. शिक्षणासोबतच परिसरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन युवा आयामतर्फे व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्या डॉ. पांढरे यांनी युवा आयामच्या कार्यासंदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, की प्रत्येक मंगळवारी युवा आयाम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात येतील. कार्यक्रमात विविध विषयांवर विद्यार्थिनींना आपले विचार मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारांचाही अभ्यास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनल बर्वे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस कंपनी संचालकांची नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सिटी बससाठी स्वतंत्र परिवहन कंपनीची स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महासभेच्या ठरावानुसार या कंपनीत पंधरा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आयुक्त या कंपनीचे अध्यक्ष राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाची तोट्यातील बससेवा महापालिकेच्या माथी मारण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सत्ताधारी भाजपने सिटी बस सेवेला चालना देत, त्या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा चालविण्याचा प्रस्ताव २० सप्टेंबर रोजीच्या महासभेत आयुक्त मुंढे यांनी मांडला होता. बस सेवेसाठी परिवहन समिती न करता कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून ही सेवा चालविण्याचा प्रस्ताव मुंढे यांनी सादर केला होता. विरोधी पक्षांसह सत्तारूढ भाजपच्या नगरसेवकांनी बससेवेसाठी कंपनी स्थापन करण्यास कडाडून विरोध दर्शविला होता. बस सेवेसाठी परिवहन समिती स्थापन करण्याची महापालिका कायद्यातच तरतूद असताना, आयुक्तांकडून कंपनी स्थापन करण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल करीत नगरसेवकांनी परिवहन समितीसाठी महासभेतील चर्चेदरम्यान आग्रह धरला होता. चर्चेअंती सत्ताधाऱ्यांनी 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर खासगीकरणातून बससेवा चालविण्याचा, तसेच परिवहन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर केला होता. परंतु, मुंढे यांनी पुन्हा सूत्रे फिरवत कंपनीच्या बाजूने मुख्यमंत्र्यांचे मन वळवले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध करीत मुंढे असेपर्यंत ठरावच दिला नव्हता. मुंढे यांच्या बदलीनंतर तब्बल तीन महिन्यानंतर सत्ताधाऱ्यांनी बससेवेचा ठराव देत, कंपनीच्या बाजूने कौल दिला होता. कंपनी कायदा, २०१३ नुसार स्वतंत्र परिवहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. प्रशासनाला हा ठराव प्राप्त झाल्यानंतर आता सिटी बस सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत सर्वप्रथम नववर्षात सिटी बसच्या नियंत्रणासाठी एसपीव्हीच्या धर्तीवर कंपनी स्थापन करण्यासाठी महासभेच्या ठरावानुसार १४ संचालकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी संचालकांकडून कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. ती प्राप्त झाल्यानंतर कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कंपनीची स्थापना झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

हे असतील सदस्य...

अध्यक्ष- आयुक्त, संचालक -महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, सत्ताधारी पक्षाचा गटनेता, विरोधी पक्षाचा गटनेता, शहर अभियंता, स्मार्ट सिटी सीईओ, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखापाल, आरटीओ, विभागीय नियंत्रक तर सचिव म्हणून परिवहन व्यवस्थापक काम करणार आहेत. कंपनीच्या संचालकांना त्यांचे नियुक्तीपत्र रवाना करण्यात आले असून, कंपनीची लवकरच बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्यपी रिक्षाचालकाची मुजोरी

$
0
0

मारहाणीनंतर सायकलही नेली पळवून

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्यपी रिक्षाचालकाने दोघा सायकलस्वारांना धडक दिल्यानंतर त्यांनाच मारहाण करून सायकल रिक्षात टाकून नेली. देवळालीगावातील भारत पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी जोगेश्‍वर रामचंद्र राजा (वय ४९, रा. विहितगाव) यांनी एमएच १५ बीएन ४८०४ क्रमांकाच्या रिक्षाचालकाविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जोगेश्‍वर राजा यांचा मुलगा वेदांत व त्याचा मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास सायकलवरून जात होते. त्यावेळी संशयित मद्यपी रिक्षाचालकाने वेदांतच्या सायकलला धडक दिली. सायकलवरून पडल्याने वेदांतच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी संशयित रिक्षाचालकाने वेदांत व त्याच्या मित्रास मारहाण करून त्यांची सायकल रिक्षात टाकून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सुंदरनगरला गांजा जप्त

देवळाली गावातील दोघांकडून पोलिसांनी अडीच किलो गांजा जप्त केला. याबाबत उपनगर पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू रामधर यादव (वय २३) व इलियास गुलाब शेख (दोघे रा. सुंदरनगर, देवळालीगाव, नाशिकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. बबलू यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. बबलू यादव याच्याकडून मंगळवारी (दि. २) पाच हजार १४० रुपयांचा अडीच किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेख यांच्यासह तिघांविरोधात वॉरंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलेला शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सलीम शेख यांच्यासह तिघांविरोधात बुधवारी (दि. २) न्यायालयाने पकड वॉरंट बजावले आहे. शेख यांच्यासह संभाजी शंकरराव पवार आणि नंदा दौलत रकिबे यांच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

वंदना निवृत्ती मोरे असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. शेख यांच्यासह चौघांनी २१ डिसेंबर २००८ रोजी अशोकनगर येथे या महिलेला शिवीगाळ करून तिला मारहाण करण्याची धमकी दिली होती. शेख यांच्या सांगण्यावरून इतर संशयितांनी वंदना व तिची बहीण पूजा हिस मारहाणही केली होती. सातपूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. जिल्हा न्यायालयाने खटला तातडीने चालविण्याचा आदेश देऊनही संशयित गैरहजर राहिले. संशयितांचे जिल्हा न्यायालयातील रिव्हिजनही फेटाळण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमाची गोष्ट सांगणारे ‘लास्ट सीन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी नाजुक गोष्ट. कुणी त्यास अत्यंत गंभीरपणे घेतात, कुणी अत्यंत नाजूकपणे हाताळतात, तर कुणी याला अगदी वरवरचे स्थान देतात. अशाच दोन मैत्रिणीच्या आयुष्यात प्रेम येते. दोघींही आपापल्या स्वभावाप्रमाणे प्रेमाला स्थान देतात. प्रेमावर भाष्य करणारे 'लास्ट सीन' हे नाटक कामगार कल्याण केंद्र गांधीनगर वसाहत यांच्या वतीने ६६ व्या कामगार कल्याण महोत्सवात सादर झाले. प. सा. नाट्यगृहात बुधवारी या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

सध्या समाजात तरुण पिढीमध्ये प्रेमाचे मोठे फॅड आहे. प्रेम करणे ही फॅशन झाली आहे. अनिता आणि सुमन या दोघी मैत्रिणी असतात. सुमन ही अत्यंत स्वच्छंदी असते. सुमनच्या आयुष्यात अनेक बॉयफ्रेंड येऊन गेलेले असतात; मात्र अनिता यापासून दुर असते. असेच एकदा प्रसाद नावाचा एक तरुण अनिताच्या प्रेमात पडतो. अनेक वर्षे त्यांचे प्रेम सुरू असते. अशावेळी अनिताच्या शाळेतील एक मुलगा अजय हा देखील तिच्यावर शाळेपासून प्रेम करीत असतो. अजय शाळेपासून प्रेम करीत असल्याने अनिता प्रसादला सोडून अजयबरोबर राहू लागते. अनिताला एचआयव्ही असल्याचे कालांतराने उघड होते. अजय अनिताची तिच्या आजारपणात काळजी घेत नाही. तो तिला सोडून निघून जातो. या कालावधीत अनिताची प्रकृती जास्त खालावते व अनिताचा त्यात मृत्यू होतो. अनिताचा मृत्यू हा प्रसादच्या जिव्हारी लागतो. प्रसाद हा अनितावर खरोखर प्रेम करीत असल्याने अनिताने त्याला सोडल्यानंतर कुणाबरोबरही संबंध ठेवलेले नसतात. अखेर अनिताच्या चितेत उडी घेऊन प्रसाद आपले जीवन संपवतो, असे या नाटकाचा लास्ट सीन आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसन्न काटे यांनी केले होते.

नेपथ्य - नीलेश जोशी, संगीत - प्रा. नीलेश जाधव, प्रकाशयोजना - दिनेश चौधरी, रंगभूषा - माणिक कानडे यांची होती. नाटकात अनिताची भूमिका सायली पाबळकर, सुमन - भाग्यश्री कुवर, प्रसाद - शुभम शिंदे, दादा - सतीश वाणी, सुमनचा नवरा - गिरीष देशपांडे, अजय - नारायण माळी यांनी भूमिका केल्या. नाटकाची निर्मिती बहुरंगी कलावंत यांची होती. निर्मितीप्रमुख पंकज देशमुख व सायली हे होते. नाटकाला सौरभ मोरे, संकेत मोरे, विश्वास, नंदू ह्याळीज, माधव सुराळकर, विनम्र, प्रकाश सोनवणे यांनी सहाय्य केले.

\Bलोगो : कामगार कल्याण नाट्य महोत्सव

फोटो : सतीश काळे \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीसाठी अखेर समिती स्थापन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरक्षित भूखंडाच्या २१ कोटींच्या मोबदल्याप्रकरणी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी द्विसदस्यी समिती स्थापन केली आहे. समितीत समाजकल्याण उपायुक्त हरिभाऊ फडोळ आणि नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक किशोर पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाच्या संपादनापोटी उर्वरित २१ कोटींचा निधी स्थायी समितीची मान्यता न घेता प्रशासनाने परस्पर अदा केल्यावरून भाजपमध्येच वाद सुरू झाला आहे. तुकाराम मुंढे यांची बदली होताच प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी परस्पर हा मोबदला दिला होता. आयुक्त गमे पदभार स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला राधाकृष्णन् यांनी रात्री ८ वाजता उपअभियंत्यांकडे नगररचना सहायक संचालकाचा पदभार असताना धनादेश काढण्याची घाई केल्याचा पाटील यांचा आरोप आहे. या प्रकरणात सभागृहनेते पाटील व स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यात रंगलेला सामना व स्थायी समितीत सभापतींविरोधात झालेल्या आंदोलनाचा वाद रंगला होता. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी समेट घडविल्यानंतर सभापती आहेर-आडके यांनी चौकशीसाठी उपसमिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनाही चौकशीबाबत आदेश देण्यात आला होता. महासभेने याबाबत ठराव केला असून, उपअभियंता अग्रवाल यांनी आणलेली टिप्पणी बदलून धनादेश काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप कसा केला, उत्कर्ष वाघ नावाच्या दलालाने या प्रकरणात कशी मध्यस्थी केली, या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेच्या आर्थिक नुकसानीची अधिकाऱ्यांकडून वसुली करावी व त्यांचे अधिकारही गोठवावेत, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. ठराव महापौरांकडून प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी त्यावर तत्काळ अंमलबजावणी केली असून, चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी परिसरात उद्या निर्जळी

$
0
0

नाशिक : पंचवटी जलशुद्धिकरण केंद्राच्या आवारात मुख्य वितरण वाहिनीच्या क्रॉस कनेक्शनचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पंचवटी विभागातील दुपार व सायंकाळचा पाणीपुरवठा शुक्रवारी (दि. ४) बंद राहणार आहे. शनिवारी (दि. ५) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील आरटीओ मेरी परिसर, तारवाला नगर, स्वस्तिक नगर, लामखेडे मळा ते हिरावाडी दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी, फुलेनगर, पंचवटी पोलिस स्टेशन परिसर, श्रीरामनगर, लोकसहकार नगर, निमाणी परिसर ते पंचवटी कारंजा परिसर, तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील पंचवटी भाजी मार्केट, दिंडोरीनाका, पेठनाका, इंद्रकुंड, एरंडवाडी, मेघराज बेकरी ते पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्डपासून रामकुंडापर्यंत, पंचवटी गावठाण भागातील मालवीय चौक, शनिचौक व रामकुंड परिसर आदी भागात शुक्रवारी दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images