Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाद कोर्टापर्यंत नेऊ नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सभासदांमध्ये आपसांत उद्भवणारे वाद कोर्टापर्यंत पोहचून संस्थेची बदनामी होऊ नये, यासाठीच लवादाची रचना करण्यात आली होती. मात्र, गत निवडणुकांमध्ये लवादाचे निर्णय डावलून काही सभासदांनी कोर्टाची पायरी गाठली. आपसातील वादाचे असे प्रसंग आपसातच मिटविण्यासाठी समझोता समिती स्थापण्यात यावी, अशी सूचना मविप्रच्या १०४ व्या सभेत काही सभासदांनी मांडली. ही सूचना विचार करण्यासाठी कार्यकारिणीपुढे मांडली जाईल, असे आश्वासन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सभासदांना दिले. \B

\Bगंगापूर रोडवरील संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रची १०४ वी सभा पार पडली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभासदांनी या सभेसाठी हजेरी लावली. खेळीमेळीत पार पडलेल्या या सभेच्या विषयपत्रिकेवर आठ विषयांचा समावेश होता. सभासदांनी या विषयपत्रिकेतील विषयांना एकमुखाने मंजुरी दिली. यावेळी काही सभासदांनी मांडलेल्या सूचनांना सरचिटणीस पवार यांनी उत्तरे दिली.

आगामी कालावधीत संस्थेच्या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये शहरासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. याशिवाय हॉर्टिकल्चर कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, पशुवैद्यकीय कॉलेज, नाइट कॉलेज, मूक बधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष कॉलेज, महिला कॉलेज या प्रकल्पांचाही समावेश आहे. यांच्या पूर्ततेवरही लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. व्यासपीठावर सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघो नाना अहिरे, संचालक भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, उत्तम बाबा भालेराव, दत्तात्रय पाटील, नाना महाले, प्रल्हाद गडाख, दिलीप पाटील, सचिन पिंगळे, डॉ. जयंत पवार, डॉ. प्रशांत देवरे, रायभान काळे, हेमंत वाजे, डॉ. विश्राम निकम, सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, विनायकदादा पाटील, श्रीराम शेटे, रामचंद्र बापू पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. यशवंत पवार, एकनाथ पाटील, प्रमोद पाटील, अॅड. शशिकांत पवार, अंबादास बनकर उपस्थित होते. सभेची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर सभापती माणिकराव बोरस्ते यांनी दुखवटा ठराव मांडला.

प्रास्ताविकात सरचिटणीस पवार यांनी सभासदांसमोर कामकाजांचा आढावा सादर केला. संस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, संस्थेचा आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा बाबींचा आढावा, संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी विमा योजना, वेतनवाढ, शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय, सभासद, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, सौरऊर्जा प्रकल्प, मध्यवर्ती प्रशिक्षण व रोजगार केंद्र, संस्थेमध्ये झालेला नवीन शाखांचा समावेश, मविप्र प्रसार माध्यम केंद्र, मध्यवर्ती संगणक कक्ष, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या अद्ययावत सुविधा, मानवी अवयव प्रत्यारोपण केंद्र आदी प्रकल्पांची माहिती दिली.

\B

\Bवारसा संग्रहालय २०२० मध्ये \B

\Bसंस्थेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी 'भारतीय शिक्षणाचे शैक्षणिक वारसा संग्रहालय' हा एक प्रकल्प असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मविप्र संस्थेच्या संस्थापकांच्या स्मृती जतनासह गेल्या शतकभरातील संस्थेची यशस्वी वाटचाल आणि 'बहुजन हिताय..बहुजन सुखाय' या ब्रीदाकडे झालेला प्रवास या वारसा संग्रहालयात जतन करण्यात येईल. याशिवाय शिक्षण प्रचार आणि प्रसारात झालेल्या क्रांतिकारक बदलांचाही आढावा यात घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सन् २०२० साली दिमाखात करण्यात येईल, असेही आश्वासन कार्यकारिणीच्या वतीने पवार यांनी दिले. संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्यस्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचे वणी येथील निवासस्थान संग्रहालय व वाचनालय स्वरुपात जतन करण्याचा संस्थेचा मान आहे.

वकिलांच्या फीपोटी ४१ लाखांचा खर्च

सन् २०११ ते २०१८ या कालावधीत आतापर्यंत सभासदांना विविध मुद्द्यांवरून संस्थेवर तब्बल ५० केस दाखल केल्याची माहिती सरचिटणीस पवार यांनी दिली. पैकी आतापर्यंत ३६ केस निकाली निघाल्या असून, १४ केसेस या न्यायप्रविष्ट आहेत. या कालावधीदरम्यान वकिलांवरील फीसाठी संस्थेला ४१ लाख रुपयांचा खर्च करावा लागल्याचेही पवार यांनी सांगितले. आपसातले वाद आपसात मिटण्यासाठी नेमलेल्या लवादाचे निर्णय डावलूनही काही सभासदांनी कोर्टात धाव घेतल्याच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीसाठी एसटीकडून चोख नियोजन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने ईदगाह मैदावर केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. रविवारी या वाहनतळावरुन मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात आल्या. एसटीने दोन दिवसांसाठी २७५ बसचे नियोजन केले आहे. त्यातील बहुतांश बस रविवारी सोडण्यात आल्या.

दुपारी तीननंतर ईदगाह मैदानावर भाविकांची गर्दी झाली. त्यानंतर रात्रभर ही गर्दी कायम होती. एसटीने या ठिकाणी मोठा मंडप उभारुन ठिकठिकाणी आपले कर्मचारी बंदोबस्तासाठी उभे केले होते. त्याचप्रमाणे इतर बस स्थानकावरही भाविकांना जागेत बदल केले, याची माहिती व्हावी म्हणून फलक लावण्यात आले. या बसस्थानकावर माहितीसाठी कर्मचारी उभे होते.

मेळा बस स्थानकाचे काम चालू असल्यामुळे एसटीने पहिल्या व दुसऱ्या सोमवारसाठी जुने सीबीएस येथून बसचे नियोजन केले होते. या ठिकाणाहून नियमित ३० व जादा २५ बस सोडण्यात आल्या. पण, स्मार्ट रोडचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न समोर आला. त्यामुळे एसटीने तिसऱ्या सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन ईदगाह मैदानावरून बस सोडण्याचे नियोजन केले. त्यामुळे भाविकांनाही दिलासा मिळाला. सोमवारी सकाळी ६ वाजेपापासून यात्रा संपेपर्यंत ही बससेवा सुरू राहणार आहे. या बस ईदगाह मैदानाजवळ असलेल्या हॉटेल राजदूतशेजारील गेटमधून सोडण्यात येत आहेत. येणाऱ्या बस गोल्फ क्लब विश्रामगृहाच्या मागच्या बाजूने दाखल होत आहे.

पोलिस बंदोबस्त

त्र्यंबकेश्वरला होणारी गर्दी लक्षात घेऊन तात्पुरत्या वाहनतळावर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला. त्याचप्रमाणे एसटीच्या अधिकारी व कर्मचारी यांनीसुद्धा हातात गाड्या घेत गर्दीचे नियोजन केले. चोऱ्या होऊ नये व प्रवाशांना त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजे संभाजी स्टेडियमचा लवकरच कायापालट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या क्रीडा विभागातर्फे अश्विननगर येथील राजे संभाजी स्टेडियमचा लवकरच कायापालट केला जाणार असून, या क्रीडांगणाला सहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्राच्या पथकाने या स्टेडियमची नुकतीच पाहणी केली असून, या ठिकाणी कोणत्या सुविधा देता येतील, याचा अहवाल ते आपल्या खात्याला सादर करणार आहे.

क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक शैलेंद्रकुमार यांच्या पथकाने ही पाहणी केली. शहरात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी महापालिकेने अश्विननगर भागात स्टेडियम उभारले. मात्र, या ठिकाणी कोणत्याही क्रीडा सुविधा न पुरविल्याने त्याचा पूर्णत: वापर होऊ शकला नाही. त्यामुळे या क्रीडांगणाची दुरवस्था झाली. या स्टेडियमचा विकास व्हावा यासाठी केंद्राच्या निधीतून निधी मिळावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका किरण गामणे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केली होती. त्यावेळी खेलो इंडिया उपक्रमांतर्गत त्याचा विकास केला जाईल, असे आश्वासन खासदार गोडसे यांनी दिले होते. त्यानुसार केंद्राच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक शैलेंद्रकुमार व इतर अधिकाऱ्यांनी या स्टेडियमची नुकतीच पाहणी केली. त्यावेळी प्रभाग समितीच्या सभापती हर्षा बडगुजर, किरण गामणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणाच्या भूताचा धोका

$
0
0

'महापारेषण'च्या मानगुटीवर

खासगीकरणाच्या भूताचा धोका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महापारेषणच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून, येणाऱ्या काळात खासगीकरणाचे भूत मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. आपल्या पुढे येणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी सजग रहावे,' असा इशारा कॉ. मोहन शर्मा यांनी दिला.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कस फेडरेशनतर्फे महापारेषण कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात रविवारी आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. महापारेषणच्या कर्मचाऱ्यांपुढील खासगीकरणाचे आवाहन आणि नवीन आकृतीबंध यांची माहिती वर्कस फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना व्हावी याकरता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. मोहन शर्मा तर महापारेषणतर्फे रवींद्र चव्हाण व गणपतराव मुंडे हे संचालक उपस्थित होते.

शर्मा म्हणाले,'पूर्वी महावितरणची एकाधिकारशाही होती त्यावेळी स्पर्धा नव्हती. आता खासगीकरणाचे वारे वाहू लागल्याने अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या संकटाकडे गंभीरपणे पहाण्याची गरज आहे. महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी वीजेची मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आज आपल्याकडे जादा वीज आहे. उत्तर प्रदेश सरकारने १२ जिल्हे खासगी कंपनीच्या ताब्यात दिले आहेत. तेथेही आपल्या संघटनेने विरोध केला असून, यापुढे कोणताही निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घायला हवे, असे फेडरेशनने सरकारला कळवले आहे.' येत्या काही काळात नवीन आकृतीबंध सादर होणार आहे. त्यामुळे तृतीय श्रेणी कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यातील पगाराची दुरी कमी होण्यास मदत होईल. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकजूट कायम ठेवावी, असेही सांगीतले.

यावेळी महापारेषणचे प्रकल्प संचालक रवींद्र चव्हाण म्हणाले,'नवीन आकृतीबंध अंतिम टप्प्यात आहे. या नवीन आकृतीबंधाचा फायदा ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांना होणार असून, येत्या काही दिवसातच तो लागू होईल. त्याकरता कर्मचाऱ्यांनीही मल्टीटास्किंग होणे गरजेचे आहे. येत्या काळात स्काडा सिस्टीम येईल. त्यानंतर रिमोट ऑपरेशन येईल. या सर्वांमध्ये पारंगत असायला हवे. ऑर्गनायझेशनचा फॉर्म बदलला तरीही आवाहने पेलण्याचे सामर्थ्य प्रत्येकात यायला हवीत. नवीन आकृतीबंधात अनेकांना पदोन्नती मिळणार आहे. त्याकरता प्रत्येकाने आपल्यातील स्कील अपडेट करणे गरजेचे आहे.' यावेळी गणपतराव मुंडे यांनी नाटक आणि खेळाचे सामने कायम सुरू राहतील, अशी ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्राच्या आठ विभागातून प्रतिनिधी आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्याकडून १७ मोबाइल हस्तगत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चोरीच्या गुह्यात अटक केलेल्या सराईत संशयिताने शहरातील तब्बल १७ पादचाऱ्यांच्या हातातून महागडे मोबाइल पळविल्याची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून एक लाख ७० हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. संशयिताच्या अटकेने अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली.

यश उर्फ बाज्या राजेंद्र पाटील (रा. भोरमळा, एकलहरा रोड) असे मोबाइल चोरट्याचे नाव आहे. औद्योगिक वसाहतीसह सिडको-सातपूर आणि शहरात मोबाइलवर बोलणाऱ्या पादचाऱ्यांना तो लक्ष करीत होता. पाठीमागून दुचाकीवर येवून मोबाइल हिसकावून धूम ठोकण्याचा संशयिताने सपाटाच लावला होता. पोलिस त्याच्या मागावर असतांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकास मिळालेल्या माहितीवरून तो पोलिसांच्या हाती लागला. उंटवाडी भागात मोबाइल विक्रीसाठी यश गुरुवारी (दि.२३) येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. संशयितास अंबड पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुह्यात अटक करण्यात आली. त्याने पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान तब्बल १७ मोबाइल चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून एक लाख ७० हजार रुपयांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई युनिट एकचे निरीक्षक आनंद वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक जाकिर शेख, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे हवालदार रवींद्र बागूल, संजय मुळक, अनिल दिघोळे, वसंत पांडव, यवाजी महाले, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, मोहन देशमुख, शांताराम महाले, संतोष कोरडे, शिपाई रावजी मगर, विशाल काठे, नीलेश भोईर, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, प्रतिभा पोखरकर, संजय सूर्यवंशी व दीपक जठार आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी निर्भयपणे पोलिसांची मदत घ्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'स्त्रियांच्या सहभागाशिवाय पोलिस अनेक समस्यांपर्यंत पोहचू शकणार नाहीत. स्त्रियांचा सक्रिय सहभाग असल्यास अत्याचारासारख्या घटनांना पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे महिलांनी निर्भयतेने पुढे येऊन पोलिसांची मदत घ्यावी. अन्यायाला विरोध करावा,' असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.

पोलिस सखी मंचतर्फे आयोजीत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात दराडे बोलत होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी पोलिस सखी मंचची स्थापना केली असून, या महिलांनी आज, ग्रामीण पोलिस दलातील सर्व पोलिस स्टेशन्स, पोलिस मुख्यालयात पोलिसांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला. पोलिसांना सतत वेगवेगळ्या सण उत्सावांच्या पार्श्वभुमीवर कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे पोलिसांना या आंनदापासून वंचित रहावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलिस सखी मंचतर्फे 'राखी विथ खाकी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोलिस सखी मंचाच्या महिला, युवती, शालेय विद्यार्थिनींनी तसेच पोलिस कुटुंबातील महिलांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन्समधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. यावेळी उपस्थित महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. तसेच हत्यारांच्या हाताळीणीविषयी माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाच्या दिवशी राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पोलिसांना ताण तणावापासून दूर ठेवण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात, असे मत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात २

$
0
0

\Bइंदिरानगरला शाडूची

मूर्ती कार्यशाळा\B

नाशिक : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी इंदिरानगर येथील शर्मा मंगल कार्यालयात शाडू मातीची गणेशमूर्ती बनविण्याविषयी \Bकार्यशाळा घेण्यात आली.\B नगरसेवक रुपाली निकुळे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सुबक व आकर्षक गणेशमूर्ती बनविण्याविषयी कार्यशाळेत भास्कर भानोसे, वीणा गायधनी, सनी भदे, करंदीकर आदींनी मार्गदर्शन केले.

\B

गुणवंतांचा गौरव\B

नाशिक : मैत्रायणीय शाखा सेवा संघातर्फे इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना गौरविण्याबरोबरच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मनोज बाग यांनी केले. तर शिल्पा फासे, केतकी जकातदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

\Bफ्रवशी अॅकॅडमीचे यश (फोटो आहे)\B

नाशिक : फ्रवशी अॅकॅडमीच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पाचव्या नॅशनल शोटोकॉन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग नोंदवत यश मिळवले आहे. अन्विक्षा इंगळे या विद्यार्थिनीने एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले आहे. तर वर्धमान बिडकर यानेदेखील एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. या यशाबद्दल अन्विक्षा व वर्धमान यांचे आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्टतर्फे कौतुक करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

$
0
0

मतदार याद्यांचा संक्षिप्त

पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

४ जानेवारीला मतदार यादी प्रसिध्द करणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. ४ जानेवारीला प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मतदार याद्यांमध्ये पात्र मतदारांची नावे समाविष्ट नसल्यास किंवा प्रारुप मतदार यादीमधील नोंदीबाबत आक्षेप असल्यास त्याबाबत अर्ज करता येणार आहे. इतकेच नव्हे; तर मतदारांना काही दुरुस्ती करावयाची असल्यास ती देखील करता येणार आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीकरीता निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठीचे बॅलेट आणि कंट्रोल युनीटही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करीत आहेत. आता पुढील टप्प्यामध्ये आयोगाने मतदार यादी पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या दावे आणि हरकती ३० नोव्हेंबरपूर्वी निकाली काढण्यात येणार आहे. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्या छपाईसह ४ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

१ जानेवारी २०१९ रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि. १ जानेवारी २००१ वा त्यापूर्वीची आहे, अशा व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र ठरणार आहेत. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेली नसतील अथवा प्रारुप मतदार यादीमधील नोंदीबाबत आक्षेप अथवा दुरुस्ती करावयाची असेल तर ती मतदारांना विहित नमुन्यातील अर्जाच्या मदतीने करता येणार आहे. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची नेमणूक करून बिनचुक यादी तयार करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. मतदारांच्या सोयीसाठी संकेतस्थळावरही ऑनलाइन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वगळलेल्या नावे प्रसिध्द करणार

पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, अन्यत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र मिनी फुटबॉल संघ रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया व हरीयाणा मिनी फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाल, हरियाणा येथे होत असलेल्या राष्ट्रीय मिनी (२१ वर्षा आतील) फुटबाल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचा संघ रवाना झाला आहे.

४ ऑगस्ट रोजी नाशिक येथे झालेल्या राज्य निवडचाचणीतून महाराष्ट्रचा संघ निवडण्यात आला होता. महाराष्ट्र संघाच्या पुढील वाटचालीसाठी मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष सचिन हांडगे, सचिव शशांक जोशी, विजय ठाकूर ,ज्ञानेश्वर निगळ,बालाजी घोंघडे, देवेश बोरसे यांनी शुभेच्छा दिल्या.

संघ पुढील प्रमाणे

आरव भावनानी (कर्णधार), आर्यन आढाव, वेद देवकर, आदित्य आहेर, नरेंद्र तलरेजा, प्रज्ज्वल अग्रवाल, स्वामिन इघे, ईशान कोकणी, आविष्कार मेश्राम, आकाश दत्ता, शशांक जोशी (कोच).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरणारेत सोडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

$
0
0

गिरणारेत सोडलेल्या

कुत्र्यांचा बंदोबस्त करा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने पकडलेली कुत्री गिरणारे गावात सोडली जात असून, या ठिकाणी कुत्र्यांमुळे भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. या सोडलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नाशिक तालुका सरचिटणीस नितीन गायकर यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरात दररोज बेवारस कुत्री पकडली जातात. ही कुत्री सोडायची कुठे, असा प्रश्न असल्याने हे कर्मचारी शहरापासून जवळ असलेल्या गिरणारे गावात आणून सोडतात. गावात कुत्र्यांची संख्या वाढल्याने महिलांना व लहान मुलांना रस्त्याचे चालणे मुष्किल झाले आहे.

अनेकदा या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच रात्री पुन्हा कुत्री आणून सोडण्यात आली. गावात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे काही दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेस कामगारांची पूरग्रस्तांना मदत

$
0
0

प्रेस कामगारांची पूरग्रस्तांना मदत

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केरळमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याकरिता येथील दोन्ही प्रेसमधील हजारो कामगार पुढे आले आहेत.

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेडच्या (एसपीएमसीआयएल) केंद्रीय प्रशासनाने देशातील सर्व युनिटमधील कामगारांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे. त्याला नाशिकरोड येथील सीएनपी आणि आयएसपी या दोन्ही प्रेसमधील कामगार संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 'एसपीएमसीआयएल'चे अप्पर महाप्रबंधक बी. जे. गुप्ता यांनी देशातील सर्व युनिटमधील कामगारांना मूळ वेतनातील एक दिवसाचे वेतन केरमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून केरळच्या मुख्यमंत्री आपत्कालीन सहाय्यता निधीसाठी देण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत कामगार संघटनांनी कार्यालयातील सूचना फलकावर मदत निधीच्या आवाहनाची सूचना प्रसिद्ध केली असून, जवळपास सर्वच कामगारांनी प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथील सीएनपी प्रेसमध्ये २१२६ आणि आयएसपी प्रेसमध्ये १९४५ असे दोन्ही प्रेसमध्ये एकूण ४०७१ कामगार सेवेत आहेत. 'पीएमसीआयएल'ने यापूर्वीही देशात ज्या भागात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली त्या वेळी तेथील आपत्तिग्रस्तांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

--

धोकादायक सेल्फीला गांधी तलाव भागात ऊत (फोटो)

पंचवटी : गंगापूर धरणातील विसर्ग अन् श्रावणसरींमुळे सध्या गोदावरी खळाळून वाहत आहे. रामकुंडाजवळील गांधी तलावावरून पाण्याचा प्रवाह जोराने वाहत असताना या भागात काही जण सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरत आहेत. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात पडण्याची शक्यता असतानाही त्यात उतरण्याचा प्रयत्न करून सेल्फी काढले जात आहेत. या प्रकारामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली असून, येथील सुरक्षारक्षक विरोध करीत असतानादेखील असे प्रकार सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

--

'युगांतर'ची मदत

जेलरोड : उपनगरच्या युगांतर सोशल फाऊंडेशनतर्फे केरळमधील पूरग्रस्तांसाठी परिसरातून मदत जमविण्यात आली. नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत पूरग्रस्तांसाठी नवीन कपडे, खाद्यपदार्थ, अन्नधान्य, औषधे आदी वस्तू 'युगांतर'कडे जमा केल्या. नंतर त्या ऑल इंडिया मल्याळी असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आल्या. ही मदत केरळला रवाना करण्यात येणार आहे. 'युगांतर'चे अध्यक्ष रवी पगारे, नगरसेविका सुषमा पगारे, मल्याळी असोसिएशनचे अध्यक्ष रणजित नायर यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.

--

शाहीमार्गावर कचराफेक (फोटो)

पंचवटी : गाडगे महाराज पूल ते तपोवन या नदीकाठच्या भागात तयार करण्यात आलेल्या शाहीमार्गाच्या कडेला गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या भागात अस्वच्छता पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे कचऱ्यामुळे मोकाट कुत्री आणि डुकरांचादेखील सुळसुळाट झालेला आहे. या मार्गाने भाविकांची आणि पर्यटकांची वाहने जात असताना त्यांना नाशिकच्या अस्वच्छतेचे दर्शन होत आहे. त्यामुळे या मार्गाची त्वरित स्वच्छता करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

--

शैक्षणिक विकास कार्यक्रम

जेलरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनमधील संगणक विभागातर्फे बिग डेटा अनॅलिटिक्स अँड मशिन लर्निंग या

विषयावर सोमवार (दि. २७)पासून पाच दिवसांचा शैक्षणिक विकास कार्यक्रम होणार आहे. राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या शैक्षणिक विकास कार्यक्रमासाठी या कॉलेजची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ, राज्य तांत्रिक शिक्षणालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकार, प्रभारी सचिव व्ही. आर. जाधव, उपसचिव यू. टी. नागदेवे, डी. पी. नाठे, सर डॉ. मो. स. गोसावी, प्रभारी प्राचार्य प्रा. प्रदीप देशपांडे प्रमुख पाहुणे राहतील.

--

गोदेत भाजीपाला धुलाई! (फोटो)

पंचवटी : गोदावरी नदीपात्रात कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण करण्यास मनाई असतानादेखील अजूनही त्यात वाहने, कपडे धुणे सुरूच असून, आता भाजीपाला धुण्याचे प्रकारदेखील सुरू झाले आहेत. रविवारी जुन्या भाजीबाजाराच्या पटांगणावर गोदावरीच्या पाण्यात आले धुवून ते गोदाकाठीच पसरवून देण्यात आले होते. शेजारीच महिलांची कपडे धुण्यासाठी गर्दी झाली होती. वाहने धुण्याचे प्रकारही सुरूच होते. असे प्रकार वारंवार होत असूनही ठोस कारवाई होत नसल्याने गोदाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमानीवर झेंडा लावण्यावरून वाद

$
0
0

मालेगाव तालुक्यातील प्रकार; तणावपूर्ण शांतता

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील आघार बुद्रुक व ढवळेश्वर येथे गावाच्या कमानीवर झेंडा लावण्याच्या कारणावरून रविवारी तणावची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस प्रशासनाकडून वेळीच कारवाई करण्यात येऊन झेंडे जप्त करण्यात आले असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

मालेगाव-सटाणा रस्त्यावरील आघार बुद्रुक ढवळेश्वर गावात दोन समाजातील गटात तणाव निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीत ग्रामसभेदरम्यान गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कमानीवर ग्रामदैवताचा झेंडा लावण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार गावातील एका गटाने शनिवारी वाजतगाजत झेंडा लावला. मात्र, रविवारी दुसऱ्या समाजाच्या गटाकडूनदेखील कमानीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न झाला. यातून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. जमाव वाढत गेल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस उप अधीक्षक शशिकांत शिंदे, वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुहास राऊत यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस प्रशासनाने दोन्ही गटातील लोकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, जमावला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, पोलिस प्रशासनाने संबंधित झेंडे जप्त केले आहेत. गावात सध्या राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्यासह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठराव बेकायदेशीर?

गावातील कमानीवर झेंडा लावण्याबाबतचा करण्यात आलेला ठराव बेकायदेशीर असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. याबाबत ग्रामविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी कळवले असून, अशाप्रकारे गावाच्या वेशीवर कुठल्याही प्रकरचा झेंडा लावण्याचा ठराव करणे नियमबाह्य आहे. असा ठराव विखंडित करण्याबाबत कारवाई करण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकारी पिंगळे यांनी लेखी कळवले असल्याची माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाहतूक करणारा वाळूचा ट्रक ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सिडको, उत्तमनगर भागात अवैधपणे वाळूची वाहतूक करणारा ट्रक अंबड पोलिसांनी शनिवारी (दि. २५) रात्री ११ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची माहिती याबाबत वाळू वाहतूकदारांनीच अंबड पोलिसांकडे दिली. यानंतर अंबड पोलिसांनी वाळूचा ट्रक ताब्यात घेतला होता.

शहरात बंदी असतांनाही वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप वाळू वाहतूकदारांनी केला होता. वाळूचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असला, तरी ज्या ठिकाणी वाळू उपसा केला जात आाहे, अशा संबंधित व्यावसायिकावर महसूल विभाग कधी कारवाई करणार असा प्रश्न वाळू वाहतूकदारांनी केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकवर उशिरापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समजते. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार आवळकंठे यांनी निफाड येथे कारवाई केली होती. मात्र, आता पोलिसांकडून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा कारवाईमुळे महसूल विभाग काय करीत आहे, असा सवाल वाळू वाहतूकदारांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार खेळणाऱ्या १७ जणांना पकडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे एस. टी. बसस्टॅन्ड लगत असलेल्या व्यापारी संकुलातील दोघा गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलिस पथकाने छापा मारत जुगार खेळणाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाइल, दुचाकी व दोन अ‍ॅपेरिक्षा असा सुमारे दोन लाख ६५ हजार ८१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. छापा पडताच अन्य पाच जण फरार झाले आहे.

ताहाराबाद बसस्थानकालगत व्यापारी संकुलातील दोघा गाळ्यांमध्ये खुलेआम जुगाराचे अड्डे सुरू होते. या संदर्भात माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथक उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, हवालदार निकम, खैरनार, साबळे यांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या व्यापारी संकुलातील गाळ्यांवर छापा मारला. राकेश पवार (रा. करंजाड), उमेश नंदन (रा. ताहाराबाद) यांच्यासह जुगार खेळणाऱ्या पंडित भिका नंदन, गजेंद्र मुरलीधर पिंपळसे, (रा. मांगीतुंगी), श्रीकांत तात्याजी पवार (रा. दरेगाव), चंद्रकांत गांगुर्डे (रा. वीरगांव), शरद गंवादे (रा. शिरसमणी), राकेश निकम (रा. पिंपळकोठे), राजेंद्र मोहिते (रा. भडाणे), राजेंद्र वारुळे (रा. जायखेडा), अनिल माळी (रा. करंजाड), पंडित माळी (रा. अजंदे), बापू पवार (रा. पिंगळवाडे), दीपक बळीराम घरटे, वसंत रामभाऊ नंदन, सुभाष वसंत गायकवाड, बाळा सोनवणे (सर्व रा. ताहाराबाद) या जणांना रंगेहाथ पकडले. तर बाळू गवळी, मधुकर नंदन, गोटू सोनवणे, सुरेश मानकर, धनंजय साळवे हे पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. जायखेड पोलिसात २२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ३४ हजार २१० रुपये तसेच १६ मोबाइल, दोन दुचाकी, दोन अ‍ॅपेरिक्षा असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानूर परिसरात दिंडी प्रदक्षिणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मानूर येथील विश्वसंत श्री तुकोबाराय सेवाभावी ट्रस्ट यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी दिंडी प्रदक्षिणेने झाली. डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. मानूरगावातून दिंडीची प्रदक्षिणा करण्यात आली.

टाळ-मृदुगाच्या गजरात भजनांचे गायन करीत निघालेल्या या दिंडीत कलश घेऊन मुली-महिला सहभागी झाल्या. भगवे ध्वज घेऊन भाविक ज्ञानोबा माऊली तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले. अखंड हरिनाम सप्ताहात तुकाराम महाराज जेऊरकर, पुरुषोत्तम महाराज घुमरे, जयंत महाराज गोसावी, भगिरथ महाराज काळे, पांडुरंग महाराज घुले, सुखदेव महाराज राजपूत यांचे कीर्तन आणि उत्तम महाराज गोसावी, साहेबराव महाराज मुरकुटे, रामदास महाराज जाधव, शारदा सूर्यवंशी, संतोष महाराज शास्त्री, रामनाथ महाराज शिलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे यांचे प्रवचन झाले. महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीसीटीव्ही फुटेजमुळे दानपेटी चोर गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणारा चोर सीसीटीव्ही फुटेजमुळे गजाआड झाला. नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर एकमधील साईबाबा मंदिर व बोधलेनगर येथील मंदिरात त्याने साथीदारासह दानपेटी फोडली होती.

सीसीटीव्हीमधील फुटेजच्या आधारे सूरज दिलीप बागूल (२४, रा. ब्रीजनगर, वैभवलक्ष्मी अपार्टमेंट, जुना सायखेडा रोड, जेलरोड) यास पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने साथीदारास दोन्ही चोऱ्या केल्याचे कबूल केले. त्याचा साथीदार फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी बागूलविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीजीपीनगर एक आणि बोधलेनगर येथील दोन मंदिरात तीन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जाधव, जगदाळे, हवालदार सुनील कोकाटे, काशिनाथ गोडसे, अनिल शिंदे, किरण देशमुख, विलास गिते, समीर चंद्रमोरे, प्रदीप ठाकूर, महेंद्र जाधव, अमोल टिळेकर, भागवत आदींनी तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नीचा संघर्ष

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

Tweet - sanchetigMT

नाशिक : फॅमिली पेन्शनची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेकडून सैन्यदलातील कॅप्टनच्या वृद्ध पत्नीची परवड सुरू असल्याची घटना समोर आली असून, या प्रकाराला कंटाळून अखेर कॅप्टनच्या पत्नीने उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. कॅप्टन मनोहर कापडणीस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ६४ वर्षीय पत्नी मंडोधरा यांनी हा उपोषणाचा निर्णय घेतला असून, त्या सातपूर येथील स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर मुलासह उपोषण करणार आहेत. बँकेने याआधी सात वर्षे त्यांना कमी पेन्शन दिली होती. त्याविरुद्ध संघर्ष केल्यानंतर अखेर त्यांना टप्याटप्याने फरक देण्यात आला. त्यानंतरही बँकेने चुकीची माहिती दिली. नंतर माहिती देणेच बंद केल्यामुळे मंडोधरा कापडणीस यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे.

सटाणा तालुक्यातील द्याने येथील रहिवासी असलेले कॅप्टन मनोहर कापडणीस भारतीय सैन्यामधून १९९६ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्यामार्फत पेन्शन सुरू झाली. २००५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही पेन्शन त्यांच्या पत्नीला देण्याची पेमेंट पेन्शन ऑर्डर सटाणा स्टेट बँकेला देण्यात आली. मात्र, ऑर्डरप्रमाणे मंडोधरा यांना पुरेशी पेन्शन देण्यात आली नाही. फॅमिली पेन्शन १५ हजार ४६५ रुपये असताना बँकेने त्यांना फक्त ३,३३६ रुपये पेन्शन अदा केली. यात नंतर वाढही होत गेली. मात्र, पूर्ण पैसे बँकेने दिले नाहीत. त्यामुळे मंडोधरा यांनी तक्रार केली. बँकेने चूक मान्य करीत २०१२ मध्ये त्यांना ६ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा फरक दिला. मात्र, हा फरक २०१७ पर्यंत टप्प्याटप्प्याने देण्यात आला. ही फरकाची एकूण रक्कम ११ लाख २६ हजार ७६४ रुपये होती. बँकेने जास्त पैसे गेल्याचे कारण दाखवत मंडोधरा यांच्या पेन्शनमधून दरमहा ८४०० रुपये कापण्यास सुरुवात केली. त्याविरुद्ध पुन्हा तक्रार केल्यानंतर बँकेने ही रक्कमही परत दिली. बँकेच्या या घोळामुळे मंडोधरा यांनी बँकेकडे पेन्शनच्या तफावतीच्या पेपरची मागणी केली असून, ते दिले जात नसल्याने मंडोधरा कापडणीस मुलगा विजयसोबत उपोषण करणार आहेत.

बँक म्हणते, माहिती दिली

बँकेने २०१३ पासून मागितलेली सर्व माहिती दिली आहे. ही माहिती शक्य तितक्या सोप्या शब्दांत देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा बँकेने केला आहे. पेन्शन ही निवृत्त व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे निवृत्त व वरिष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी बँक घेत असल्याचे पत्र स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक विनोद कुमार यांनी १४ जून २०१८ ला मंडोधरा कापडणीस यांना दिले आहे.

कोट

बँकेतील अधिकारी काही तरी लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कागदपत्रे मिळण्यासाठी मला उपोषण करावे लागत आहे. जोपर्यंत बँकेकडून पेन्शनची कागदपत्रे मिळत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आहे.

- मंडोधरा कापडणीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘औद्योगिक, व्यावसायांसाठी वीजवापराचे प्रमाण अधिक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या औद्योगिक आणि व्यावसायिक उद्देशांसाठी विजेचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, आवश्यकतेपेक्षा अधिक वीज वापर होत आहे का, याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. पारंपारिक उर्जास्रोतांपासून वीज निर्मिती करणे महाग झाल्याने सर्वांनी विजेचा वापर जपून करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सर्टिफाईड एनर्जी ऑडिटर संजय गवादे यांनी केले.

म्हसरूळ-वरवंडी रोडवरील श्री महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एनर्जी कन्झर्व्हेशन आणि ऑडिट या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऑडिटर गवांदे म्हणाले की, विजेची बचत करणे सध्या काळाची गरज बनली आहे. आपण वापरत असलेली यंत्रसामग्री, उपकरणे त्यांची कार्यक्षमता आणि आवश्यकता तपासली तरी विजेची मोठी बचत शक्य आहे. मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी असल्याने नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. विविध उत्पादन संस्था, व्यावसायिक इमारती तसेच तारांकित हॉटेलमध्ये केवळ पाच टक्के एनर्जी ऑडिटच्या माध्यमातून वीजबचत केली गेली तर आजही अंधारात राहणाऱ्या कितीतरी लोकांना वीज उपलब्ध करून देता येईल.

यावेळी महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग विभागाचे विभागप्रमुख प्रा. सागर पाटील, प्रा. आदित्य आहिरे, प्रा. सुवर्णा जाधव , प्रा वैशाली जाधव, प्रा. श्रुती शिंदे, प्रा. सोनाली एलमाने आदी उपस्थित होते. प्रा .सोनाली एलमाने यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रतिनिधी श्वेता सरोने हिने आभार मानले.

ऊर्जाबचतीतून देशसेवा

विद्यार्थ्यांना एनर्जी ऑडिट करतांना लागणारी उपकरणे, इमारतीचा ले-आउट प्लॅन, सध्या किती वीज खर्च होत आहे याची तपासणी, विद्युत दिवे, उपकरणांची गरज आदींविषयी गवांदे यांनी मार्गदर्शन केले. एनर्जी ऑडिट करणे व्यक्ती आणि औद्योगिक व्यावसायिक, व्यापारी संस्थांसाठी गरजेचे आहे आणि यातून ऊर्जा बचत होऊन देशसेवा घडू शकेल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटी प्रशासकासह १६ जणांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील कहान नगर सोसायटीवर नेमणूक करण्यात आलेल्या प्रशासक प्रवीणचंद्र व्होरा यांनी खोटी कागदपत्रे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात सादर केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अधिकारी रवींद्र गजरे यांनी फिर्याद देत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. व्होरा यांच्यासह अन्य १६ जणांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

जैन धर्मियांच्या कहान नगर सोसायटीच्या वॉलकंपाउंडच्या कामाची खोटी बिले सादर करून संस्थेत चार लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल १२ संचालकाविरुद्ध यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच सोसायटीवर प्रवीणचंद्र व्होरा यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. आता त्यांच्यावरच खोटी कागदपत्रे सादर केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आपल्या सोसायटीतील अतिक्रमण काढले जाऊ नये, या सामूहिक उद्देशाने संस्थेच्या चेअरमनपदाचा खोटा व बनावट शिक्का तयार करून प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या प्रवीणचंद्र व्होरा यांनी त्यावर चेअरमन म्हणून आपली सही केली. तो खोटा प्रस्ताव मंजुरीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात सादर केला. याबाबत काहीतरी काळेबेरे असल्याचे लक्षात आल्याने कागदपत्रे तपासली असता खोटा शिक्का वापरून प्रशासनाची दिशाभूल होईल, असा चुकीचा आराखडा तयार करण्यात आल्याचे लक्षात आले. या प्रकरणी संशयित प्रवीणचंद्र व्होरा, रजनीकांत कामदार, रमेश शाह, बी. जे. मेहता, आशिष घिया, सुमनबेन मेहता, संजीव व्होरा, विपुल मोटानी, कांतीलाल मोटानी, नितीन शाह, के. एच. व्होरा, निमेश मेहता, सुमनभाई दोशी, मंजुळाबेन पारेख, अल्पना जैन, आर. एच. व्होरा, भरत शाह आदींवर देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिंदू नामावलीबाबत प्राध्यापकांची कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनुदानित, विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन पध्दतीने बिंदूनामावली नोंदवही लिहिणे आणि सांख्यिकीय माहिती (अनुशेष) संकलित करण्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यातील प्राध्यापकांनीही सहभाग घेतला.

विद्यापीठामधील आरक्षण कक्षाकडून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत महाविद्यालयांच्या २६४ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेसाठी सामान्य प्रशासन विभाग, १६-ब, मंत्रालयामधील घुले अपर सचिव, अरविंद मोरये कक्ष अधिकारी, पूजा मानकर कक्ष अधिकारी, स्नेहा किसवे-देवकाते सहायक आयुक्त, मावक, पूने यांनी मार्गदर्शन केले. कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनीही या कार्यशाळेस संबोधित करत या विषयाचे महत्त्व पटवून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images