Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कंटेनरच्या धडकेने सायकलस्वराचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई-आग्रा महामार्गावर तालुक्यातील झोडगे नजिक भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अपघात घडला. मंगेश एकनाथ वडगे (वय ५५ , रा. साक्री रोड, धुळे) असे ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी जितेंद्र राजाराम वडगे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश एकनाथ वडगे व विक्रम राठोड (रा. धुळे) हे सायकलिस्ट महामार्गावरून सायकलिंग करीत धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने येत होते. दरम्यान, झोडगे नजिक धुळ्याकडून मालेगावकडे वेगाने येणाऱ्या कंटेनरने ( एनएल ०१ एए १७८२ ) मंगेश यांना धडक दिली. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी विक्रम किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, ग्रामस्थ रुग्णवाहिकेसह दाखल झाले. मंगेश यांचा मृतदेह शवविच्छेदानासाठी मालेगावी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थानकातील बसच्या बॅटऱ्या लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठक्कर बाजार बसस्थानकात उभ्या असलेल्या दोन बसमधील चार बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्यात. ही घटना शनिवारी (दि. २५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे बस स्थानकात उभ्या राहणाऱ्या बसेसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.

या प्रकरणी बसचालक विजयकुमार जयसिंग जाधव (५१, रा. ता. खटाव, जि. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकात उभ्या असलेल्या एमएच १४ बीटी ४०५६ आणि एमएच १४ बीटी ५०३३ क्रमांकाच्या दोन बसमधील ३० हजार रुपयांच्या चार बॅटऱ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. पहाटे पाचच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला. याआधीही इतर बस डेपोंमधून चोरट्यांनी बसमधील बॅटरी व इतर किंमती ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता मुख्य बसस्थानकातही चोरट्यांनी चोरी केल्यात. काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी बसेसची तोडफोड केली होती. यामुळे रात्रीच्या वेळी बस स्थानकात उभ्या राहणाऱ्या बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तिडके कॉलनीत घरफोडी

बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्याने घरफोडी करून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा गुन्हा रविवारी (दि.२६) तिडके कॉलनीत झाला. या प्रकरणी महेश रमेश खिस्ती (४२, रा. तिडके कॉलनी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हे कुटुंब शनिवारी (दि. २५) बाहेर गेले. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने घरफोडी करून आत प्रवेश केला. तसेच कपाटातून तीन तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोकड असा ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.

लॅपटापचा अपहार

ओळखीचा गैरफायदा घेत एका संशयिताने युवकाकडील लॅपटॉप लंपास केल्याचा प्रकार राममंदिर परिसरात घडला. नीलेश विश्राम कर्डक, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी किरण सदाशिव सावळा (१९, रा. सितागुंफाजवळ, पंचवटी) याने तक्रार दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार २ जुलैपासून नीलेशने किरणचा लॅपटॉप नेला. मात्र, अद्याप त्याने तो परत केला नाही. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. शार्दुल करीत आहेत.

जप्त सदनिकेवर अतिक्रमण

बँकेने जप्त केलेल्या सदनिकेचे सील व कुलूप तोडून त्यावर अतिक्रमण करणाऱ्या चौघांविरोधात म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीराम तात्याराव जिंतुरकर, सरोज श्रीराम जिंतुरकर, गौरव श्रीराम जिंतुरकर, मंगेश श्रीराम जिंतुरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरण अमित अरुणकुमार सिंग (२५, रा. पखालरोड) यांनी म्हसरुळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार होम फस्ट फायनान्स कंपनीच्या ताब्यात मखमलाबाद शिवार येथील सुहासी अपार्टमेंटमधील एक सदनिका आहे. त्यावर बँकेने सील लावलेले आहे. मात्र, तरीही २५ ऑगस्टला संशयित जिंतुरकर यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बँकेचे सील तोडून सदनिकेवर अतिक्रमण केले.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमय रस्त्यांवर तारांबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरीरोड परिसरातील विनायकनगर येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यात पाणी साचण्यासह या रस्त्यांवर चिखलही पसरत असल्याने परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांचीदेखील तारांबळ उडत आहे. वाहने घसरून चालक चिखलात पडण्याचे प्रकारही होत आहेत. मात्र, तरीही यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

दिंडोरीरोड परिसरातील वाढत्या नववसाहतींच्या परिसरातील विनायकनगर येथे रस्त्यांची चाळण होण्यासह परिसरातील ड्रेनेज तुंबलेले असल्याने त्याचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांत साचत आहे. त्यासोबतच या परिसरातील पथदीप कित्येक दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांतून मार्ग काढणे अवघड होत आहे, अशा तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभागातील संबंधित नगरसेवकांनी या भागातील रस्त्यांच्या स्थितीची पाहणी केली. त्यानंतर या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. मात्र, तो मुरूमही काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावासात वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा येथील रस्त्यांची स्थिती पूर्ववत झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विनायकनगर परिसरातील रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी, तसेच या परिसराच्या अन्य समस्यांकडे महापालिका यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

खास बाब म्हणजे या प्रभागातील नगरसेवकांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरील रस्त्यांची दुर्दशा होऊनदेखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. या भागातील वर्दळीच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनचालकांना आणि पायी चालणाऱ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ड्रेनेज, बंद पथदीपांचीही समस्या भेडसावत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

विनायकनगरमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेतच. शिवाय परिसरातील ड्रेनेज आणि पथदीपांची समस्यादेखील कित्येक दिवसांपासून कायम आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

-प्रा. हेमंत सोनवणे, स्थानिक रहिवासी

(लीड, फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्त तुकाराम मुंंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव

$
0
0

नाशिक:

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे करवाढ रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत आपल्याच ठरावाची अंमलबजावणी सुरू केल्याने भाजपच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. त्यामुळे मुंढेंविरोधात थेट अविश्वास ठरावाचे शस्र भाजपने उपसले आहे. सोमवारी भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मुंढेंविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस नगरसचिवांना सादर केली. त्यामुळे विशेष महासभा बोलविण्याचा अधिकार महापौरांकडे गेला असून महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

शहरातील इंच, इंच जमिनी करवाढीच्या ओझ्या खाली आणलेल्या मुंढेंच्या विरोधात भाजपने आता अविश्वासाचे हत्यार उपसले आहे. फेब्रुवारीपासून मुंढेंनी ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर अतिक्रमण केले. त्यांने नाराज झालेल्या नगरसेवकांनी आता करवाढीच्या मुद्द्यावरून मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. भरमसाठ बिलआल्यानंतर नगरसेवकांवर नागरिकांनी आता दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. महासभेचा ठराव बाजूला सारत, करवाढीची अंमलबाजणी सुरू केली. गेल्या शुक्रवारी बैठक घेवून या अविश्वास प्रस्तावाबाबत पुढाकार घेत गटनेत्यांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या पत्रावर स्थायी समितीच्या १५ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, त्यासाठी सोमवारी नगरसचिवांना विशेष महासभेचे पत्र दिले आहे. या सर्व बंडाचे नेतृत्व उपमहापौर प्रथमेश गिते यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सध्या मनसे आणि काँग्रेस गटनेत्यांच्या सह्या या पत्रावर आहेत.

अविश्वास प्रस्तावासाठी ८५ नगरसेवकांची गरज असून, भाजपचे ६६, मनसे ६ तर काँग्रेसचे ७ सदस्य अविश्वास ठरावाच्या बाजूने आहेत. १२२ पैकी ७९ नगरसेवक सध्या सोबत असून, राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात आहे. तर शिवसेनेची भूमिका आज ठरणार आहे. त्यामुळे अजूनही अविश्वासासाठी भाजपला ६ मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अवघ्या सात महिन्यातच मुंढेंना अविश्वास ठरावाचा सामना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडाला यात्रेचे स्वरुप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हर हर महादेव व बम बम भोलेच्या गजरात नाशिक शहरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजली होती. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरात भक्तीमय वातावरण होते. ठिकठिकाणच्या मंदिरातील गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

तिसऱ्या सोमवारनिमित्त भाविकांनी रामकुंडावर स्नानासाठी गर्दी केली. स्नान झाल्यावर समोर असलेल्या कपालेश्वर मंदिरात ओल्या वस्त्रानिशी भाविकांनी दर्शन घेतले. कपालेश्वर मंदिरात सकाळी ब्रह्मवृंदाच्या हस्ते पूजन झाले. कपालेश्वराला जाणाऱ्या-येणाऱ्या मार्गावर पोलिसांनी वाहतुकीचे चांगले नियोजन केले. मालेगाव स्टँडकडून रामकुंडावर येणाऱ्या मार्गावर वाहतूक एकतर्फी करण्यात आली. तसेच रामकुंडावरून मालवीय चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

बेलपानांना मागणी

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर मंदिरातही सकाळपासूनच गर्दी होती. फुगेवाले, रहाटपाळणे, खेळणीविक्रेते व मेंहदी काढणाऱ्यांनी आपली छोटेखानी दुकाने थाटल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. मंदिरात दिवसभर सत्यनारायण पूजन व अभिषेक घालण्यात आले. नाशिकरोड येथील मुक्तीधाममध्येही भाविकांची सकाळपासूनच रिघ होती. बेल फुलांना प्रचंड मागणी होती. रविवार कारंजा व फुल बाजारात व मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला मुले-मुली आणि पुरुषही थांबले होते. सकाळी दर्शनासाठी सुरू असलेली गर्दी रात्रीपर्यंत कायम होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या हजाराहून अधिक फेऱ्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या सोमवार निमित्त जाण्यासाठी ईदगाह मैदानावरून एसटीने आठशेहून अधिक फेऱ्या मारल्या. रात्रीपर्यंत ही सेवा सुरू होती. बहुतांश बसमध्ये १०० च्या आसपास एका बसमध्ये भाविकांची संख्या होती.

तिसऱ्या सोमवारी गर्दी वाढणार असल्याने एसटीने २७५ बसेसचे नियोजन केले होते. त्यामुळे भाविकांना यात्रा करणे सोपे झाले. मोठ्या प्रमाणात गर्दी असून मोठे मैदान असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली नाही. राज्य परिवहन महामंडळाने रविवारी दुपारपासून ही सेवा सुरू केली. सुरुवातील कमी प्रतिसाद मिळाला; नंतर गर्दी वाढत गेली. रात्रीपर्यंत एसटीने ७०० च्या आसपास फेऱ्या पूर्ण केल्या. त्यासाठी मोठ्या रांगाही लागल्या होत्या. सोमवारी दुपारपर्यंत ४०० फेऱ्या झाल्या होत्या. सायंकळनंतर मात्र जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. येणाऱ्यांची संख्या वाढली. एका मार्गावरून एसटीला खाली जावे लागत असल्याचेही चित्र होते. दरवर्षी एसटीकडून चारही सोमवारी बसचे नियोजन मेळा बसस्थानकातून करते. पण, या बस स्थानकाचे काम चालू असल्याने पहिला व दुसऱ्या सोमवारी जुने सीबीएस येथून बस सोडण्यात आल्या. मात्र, तिसऱ्या सोमवारी गर्दी असल्याने एसटीने ईदगाह मैदावर तात्पुरते वाहनतळ उभे केले. या ठिकाणाहून सर्व बस सोडण्यात आले. या ठिकाणी मोठा मंडप, सीसीटीव्ही व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ईदगाह मैदानावर चिखल

सोमवारी दुपारी पाऊस पडल्याने ईदगाह मैदानावर सर्वत्र चिखल झाला होता. त्यामुळे भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. त्र्यंबकेश्वरहून येणारी एसटी त्यामुळे गेट जवळ सोडून काही प्रमाणात हा त्रास कमी करण्यात आला.

त्र्यंबक रोडवर बसची गर्दी

नेहमीच वाहनांची वर्दळ असलेल्या त्र्यंबक रोडवर एसटीची गर्दी दिसत होती. या रस्तावर येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्यामुळे एकाच वेळी तीन ते चार बस रस्त्यावर एकत्र दिसत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रोधावर नियंत्रणासाठी आत्मचिंतन गरजेचे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दैनंदिन जीवनात क्रोधमुक्त होण्यासाठी चिंतन महत्त्वाचे असते. त्यामुळे रोज किमान पाच ते दहा मिनिटे चिंतन करावे, असे निरूपण सुशीलकुंवरजी म. सा. यांनी केले.

जैन चातुर्मासानिमित्त रविवार कारंजा जैन स्थानक येथे चातुर्मास प्रवचन सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त सोमवारी सुशीलकुंवरजी म. सा. यांचे प्रवचन झाले. चिंतन आणि अध्यात्म यांची सांगड घालण्यासाठी काय करावे याबाबत त्यांनी निरूपण केले. साधना करताना भक्तांनी तणामुक्त असायला हवे. कामातील व्याप आणि सभोवतालच्या परिस्थितीमुळे येणारा राग कमी करणे जमले पाहिजे. योग्य नियोजनाचा अभाव असेल, तर तणाव निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने कामाचे नियोजन करायला हवे. चिंतन आत्मविश्वास वाढविण्याची शक्ती आहे. दिवसभर तुम्ही काय केले आहे याचे चिंतन केल्याने तुमच्यातील चांगल्या-वाईट गोष्टींचा बोध तुम्हाला होतो. त्यामुळे रोज किमान पाच ते दहा मिनिटे चिंतन करावे, असेही त्यांनी सांगितले.

माणूस क्रोधाने अनेकांना दूर असतो. चिंतन केल्यास माणसाला त्याच्या चुकांची जाणीव होते. त्यासाठी दिवसभरात आपण काय कृत्य केले याचे चिंतन करणे गरजेचे असते. आध्यात्मिक बाबतीत चिंतन परमेश्वराची साधना करण्यासाठीदेखील महत्त्वाचे असते. चिंतनाच्या माध्यमातून लोभ, राग, मत्सर यांपासून माणूस लांब राहू लागतो. चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी प्रत्येकाने चिंतन करायलाच हवे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. प्रवचनास जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोगो :

चातुर्मास प्रवचन

रविवार कारंजा

लोगो :

सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिरराव यांची बदली रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुका तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली अन्यायकारक असून ती हेतूपुरस्सर केल्याचा दावा विविध संघटनांकडून केला जाऊ लागला आहे. ही बदली तात्काळ रद्द करावी, अशा मागणीच्या निवेदनांचा ओघ वाढू लागला आहे. काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदने दिली.

बदली हा प्रशासकीय कामाचा अविभाज्य भाग आहे. अलीकडेच काही तहसिलदारांच्या बदल्यांचे आदेश सरकारने काढले असून त्यामध्ये नाशिकच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांचीही संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. ही बदली करताना सेवाहक्क आणि तत्सम मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा दावा काही संघटनांनी केला असून ही बदली अन्यायकारक असल्याचेही निवेदनामध्ये म्हटले आहे.

अहिरराव यांच्या बदलीमुळे तालुक्यातील सामान्य नागरिकांमध्ये असंतोष असल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली आहे. अहिरराव यांनी गरजू, सामान्य नागरिकांना कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ती प्रशासकीय मदत केली. रेशनकार्ड वितरणासारख्या छोट्या पण अत्यावश्यक बाबींसाठी प्रशासकीय पातळीवर अडवणूक होत असताना त्यांनी गरजूंना असे कार्ड मिळवून दिले. त्यामुळे कार्यक्षम तहसीलदार म्हणून अहिरराव लोकप्रिय झाल्या. परंतु राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना धडकी भरल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणून तहसीलदारांची बदली केल्याचा संदेश जनमनावर भिनल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

राजकीय दबावाला भिक न घालता अहिरराव यांची बदली तात्काळ रद्द करावी अन्यथा तालुक्यातील जनता तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा तालुक्यातील शिंदे, चांशी, देहगाव, सारूळ, देवगाव, दोनडेगाव, राजूर बाहुला, विलहोळी, पिपरद, आंबे बाहुला, लाडची, सांडगाव, गिरणारे, किटमगाव, बाभळेश्वर, मोहंगाव, दरी, मानोरी, गंगापाडळी, लाखलगाव, दुगावं, बेलगव्हान, महिरावणी, महरीवपूर, कोटमगाव आदी ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राजू देसले यांनीही ही बदली रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोमेश्वर धबधब्यावर जीवरक्षक पथक तैनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमेश्वर धबधबा आणि येथील गोदापात्रातील पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनाचा आनंद घेत असल्याने खबरदारी म्हणून या परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी जीवरक्षक पथकाची नेमणूक केली.

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली. हौशी पर्यटकांनी सोमेश्वर धबधबा आणि गोदापात्राकडे धाव घेतली. हौशी पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र याठिकाणी पहावयास मिळत होते. गंगापूर पोलिसांनी याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला देऊन या परिसरात जीवरक्षकांचे पथक नेमण्याची मागणी केली. त्यानुसार या भागात १० जीवरक्षकांचे पथक नेमण्यात आले. या पथकाने पोलिसांच्या मदतीने उत्साही पर्यटकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे तसेच जोखीम उचलून सेल्फी न काढण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजंग एमआयडीसीचे काम युद्धपातळीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अजंग रावळगाव येथे नव्याने उभ्या राहत असलेल्या एमआयडीसीसंदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई यांच्यात मुंबई येथे सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या दोन महिन्यात अजंग रावळगाव एमआयडीसी संदर्भात कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार असल्याची भुसे यांनी दिली.

बैठकीस एमआयडीसीचे अधिकारी अभिषेक कृष्णा, क्षेत्रिय अधिकारी शुभांगी पाटील, उपसचिव भोसले आदी उपस्थित होते. मालेगावात एमआयडीसीचे उपकार्यालय सुरू करावे, प्रस्तावित एमआयडीसीत ६० टक्के टेक्सस्टाईल व ४० टक्के कृषी पूरक व इतर उद्योगांचे नियोजन करावे, मालेगाव एमआयडीसीचा समावेश इंटिग्रेटेड टेक्सस्टाईल हब योजनेत समावेश करून विविध सुविधा द्याव्यात, स्थानिक उद्योजकांना प्राधान्य द्यावे, निर्धारित वेळेआधी उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना १० टक्के सवलत द्यावी, एक खिडकी योजना राबवावी आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.

एमआयडीसीच्या उपकार्यालयाबाबत तातडीने आठवड्यातून दोन वेळा क्षेत्रीय व्यवस्थापक व संबधित अधिकारी मालेगावी उपलब्ध करून दिला जाईल तसेच भविष्यात कायम स्वरूपी सुरू होईल. तसेच अजंग रावळगाव एमआयडीसी कार्यान्वित होण्यासाठी ले-आउट, भूखंड दर, पायाभूत सुविधा व अनुषंगिक कामे दोन महिन्यात युद्ध पातळीवर हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव गवई यांनी सांगितले. तसेच पुढील महिन्यात अधिकारी व उद्योजकांची बैठक घेण्याचा निर्णय यावेळी झाला. मुंबईत झालेल्या बैठकीला मालेगाव एमआयडीसी येथील व्यापारी व उद्योजक यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

$
0
0

मालेगाव : तालुक्यातील करंजगव्हाण येथील १८ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ललिता सुकदेव ह्याळीज असे तिचे नाव आहे. ती दुपारी दोन वाजता गट नंबर १०९/४ येथील विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली होती. पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत तलाठी यांनी प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

कामगाराची आत्महत्या

मालेगाव : शहरातील बडा कब्रस्तानमध्ये झाडाला गळफास घेत यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शाकीर अली कादीर अली (२६) हे त्याचे नाव आहे. यंत्रमाग उद्योगात आलेल्या मंदीमुळे त्याच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू इरा इंग्लिश स्कूल

$
0
0

न्यू इरा इंग्लिश स्कूल

न्यू इरा इंग्लिश स्कूलमध्ये राखीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी बनवलेली पर्यावरणपूरक राखी झाडाला बांधण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत मेहनत करावी, असा संदेश दिला. त्याबरोबरच प्रदूषणमुक्तीसाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत सादरीकरणासह शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करीत संस्कृती, संस्कार, नीतिमूल्यांची ओळख करवून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते चिखलमुक्त करण्याची मागणी

$
0
0

रस्ते चिखलमुक्त करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गेल्या काही दिवसांपासून देवळाली कॅम्प शहरातील रस्त्यांवर चिखलामुळे ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे.अनेक नागरिक दुचाकी चालविताना घसरून पडत असल्याने हे रस्ते फायर ब्रिगेडमार्फत स्वच्छ करण्याची मागणी नगरसेवक भगवान कटारिया यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

देवळाली कॅम्प परिसरातील हौसनरोड, मिठाई स्ट्रीट, मशीद स्ट्रीट, मेन स्ट्रीट, वडनेररोड, संसरी लेन क्रमांक १ व २, तसेच लामरोड आदी रस्त्यांची भूमिगत गटारींचे काम आणि पावसामुळे दुरवस्था झाली आहे. त्यावरून वाहने चालविताना अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी फायर ब्रिगेडच्या सहाय्याने असे रस्ते नियमित स्वच्छ करण्यात यावेत, जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यांवरील माती जमा करण्यात येऊन ती स्टेंचिंग ग्राउंड येथे टाकण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

---

कामगारनगरवासीयांची अरुंद रस्त्यांवरून कसरत (फोटो)

गंगापूररोड : सातपूर औद्योगिक वसाहतीला अगदी लागून असलेल्या कामगारनगर परिसरातील रहिवाशांवर अरुंद रस्त्यांवरून कसरत करीत प्रवास करण्याची वेळ आली आहे. महापालिकेने डीपीरोड मंजूर केला असताना वाढलेल्या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होऊन

रोजच किरकोळ अपघात होत असून, या अरुंद रस्त्यांवर रोजच वाहतूक कोंडीही होत आहे. महापालिकेने या रस्त्यांचे त्वरित रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

--

बसथांब्याची दुरवस्था

सातपूर : त्र्यंबकेश्वररोडवरील पिंपळगाव बहुला येथील बसथांब्याची दोन महिन्यांपूर्वी दुरवस्था होऊनदेखील त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी भरधाव वेगातील गाडीच्या धडकेने हा बसथांबा जमीनदोस्त झालेला आहे. याबाबत महापालिका व पोलिस प्रशासनाने संबंधित वाहनचालकाकडून दंड वसूल करून हा बसथांबा नव्याने उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

--

रेल्वे रुळांवर कचरा (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकातील रुळांवर सोमवारी शीतपेयाच्या शेकडो हिरव्या स्ट्रॉ आणि कचरा टाकून दिल्याचा प्रकार घडला. रुळांवरील कचऱ्यामुळे उंदीर वढण्यासह रेल्वेगाडी घसरण्याचा धोका निर्माण होतो. काही काळापूर्वीच येथे उंदरांनी वायरिंग कुरतडल्यामुळे शार्टशर्किट होऊन आग लागली होती. त्यामुळे तेथे तातडीने स्वच्छता करण्यात आली.

--

भाविकांना खिचडीवाटप

नाशिकरोड : श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांसाठी दुर्गा फ्रेंड सर्कल व रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे भाविकांना साबूदाना खिचडी व फळवाटप करण्यात आले. पन्नास किलोंची खिचडी आणि पन्नास डझन केळींचे यावेळी वाटप करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेविका डॉ. सीमा ताजणे, मित्रमेळाचे राजेंद्र ताजणे, नय्यूम खान, दौलत शिंदे, दत्ता आगळे, जगन गवळी, अमोल भालेराव, पिंटू भोसले आदी उपस्थित होते. शिवाजी पुतळा येथे भगवान शंकराच्या पिंडीची आरास करून पूजाविधीही करण्यात आला.

--

भररस्त्यात खड्डा (फोटो)

जेलरोड : विभागीय महसूल आयुक्तालयाच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला असून, त्यात नुकताच धान्याचा ट्रकही फसला होता. रात्री येथे अंधार असल्याने दुचाकी वाहनचालकांनाही या खड्ड्याचा फटका बसतो. नागरिकांनी तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासकीय गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावरच असलेला हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात २१० किमीच्या मलवाहिका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता महापालिकेने सर्वंकष असा मलनिःसारण व्यवस्थापन आराखडा (सिवरेज मास्टर प्लान) तयार केला असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रातील नवीन वसाहतींमध्ये १११ कोटी ३७ लाख रुपये खर्चातून तब्बल २१० कि.मी. लांबीच्या नव्या मलवाहिका टाकण्यात येणार आहेत. बजेटनुसार २०२० पर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार असून, शहराच्या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

महापालिकेने सर्वंकष मलनिःसारण व्यवस्थापन आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मलनिःसारण व्यवस्थेची ८ झोनमध्ये विभागणी केली आहे. या अंतर्गत १५९४ किमी लांबीच्या मलवाहिकेचे काम करण्यात येत आहे. आठ झोनपैकी तपोवन, आगर टाकळी, चेहेडी आणि पंचक या चार झोनची कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरीत गंगापूर आणि पिंपळगाव खांब या दोन झोनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मखमलाबाद आणि कामटवाडे या दोन झोनचे काम २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी नवीन शहर विकास आराखड्यात जागेचे आरक्षण टाकण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश व 'नीरी'च्या शिफारशींनुसार मलनिःसारण केंद्रांची क्षमतावाढ व अद्ययावतीकरण केले जात आहे.

यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल 'नीरी'च्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात येत असून, या कामांसाठी २०१८-१९ च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात ४३ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. या कामांसाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

दोन वर्षात क्षमता वाढ

अमृत अभियानांतर्गत गंगापूर येथे १८ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे मलनिःसारण केंद्राचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी २८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर पिंपळगाव खांब येथे ३२ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे मलनिःसारण केंद्राचे काम सुरू आहे. येथे ५ हेक्टरपैकी १.३० हेक्टर जागेवर काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२६ नंतर मखमलाबाद आणि कामटवाडे येथे मलनिःसारण केंद्रांची कामे होणार आहेत. चारही प्रकल्प मिळून ३४२.५. दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे मलनिःसारण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन वर्षांत एकूण ३९२.५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमता निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा हेल्पलाइन पान १ कॅप्शन

$
0
0

देणे झाले सुंदर!

'महाराष्ट्र टाइम्स'च्या मटा हेल्पलाइन या उपक्रमाचा धनादेश प्रदान सोहळा सोमवारी पार पडला. कॉलेज रोडवरील विद्यानगरीतील एनबीटी कॉलेजच्या आरएनटी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रथमेश भापकर, मनीषा पुंजारे, वैभवी जोर्वेकर, वैभव पांडे, सानिका क्षीरसागर, विशाल शेवाळे, भक्ती कोकाटे, साक्षी जगदाळे, साक्षी घरटे, साक्षी कल्पवृक्ष यांना धनादेश प्रदान करताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव मो. स. गोसावी, कॉसमॉस बँकेच्या नाशिकच्या व्यवस्थापिका केतकी विसपुते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बार्न्स स्कूलमध्ये आज शालेय फुटबॉल स्पर्धा

$
0
0

बार्न्स स्कूलमध्ये आज शालेय फुटबॉल स्पर्धा

देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूलमध्ये आज, मंगळवारी (दि. २८) तिसाव्या अखिल महाराष्ट्र अँग्लो इंडियन शालेय फुटबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांत बंधुभाव आणि खिलाडूपणा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने १९८८ पासून ही स्पर्धा आयोजित केली जात असून, यंदा देवळालीतील बार्न्स स्कूलकडे या स्पर्धेचे यजमानपद आलेले आहे. या स्पर्धेत राज्यातील १० संघ सहभागी झालेले असून, त्यात मुंबईची बॉम्बे स्कॉटिश स्कूल, सेंट पीटर्स स्कूल, चॅम्पियन स्कूल, पुण्याची बिशप्स स्कूल अशा माध्यमिक गटातील चार, तर उच्च माध्यमिकमध्ये देवळालीची बार्न्स स्कूल, मुंबईची ख्रिस्त चर्च स्कूल, बाँम्बे स्कॉटिश स्कूल, कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल, पुण्याची बिशप्स स्कूल अशा सहा संघांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रिय यांची प्रमुख उपस्थिती राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठार मारण्याचा प्रयत्न; पाच वर्षांची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. खटी यांनी सोमवारी (दि. २७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची सुनावली.

आरोपी दीपक परदेशी यास पत्नी कोमलच्या चारित्र्यावर संशय होता. दीपकचा १९ ऑगस्ट २०१६ रोजी वाढदिवस असल्याने त्याचा मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (रा. शांतीनगर, मांडसांगवी) हा मित्रांसह केक घेऊन रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी परदेशीच्या घरी गेला होता. केक कापल्यानंतर सर्व मित्र दारू प्याले आणि निघून गेले. मात्र, ठाकूर हा परदेशीच्या घरी थांबलेला होता़ चरित्र्यावर संशय घेत दीपकने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पत्नीशी भांडण सुरू झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर परदेशीने बॅगमधून गावठी कट्टा काढून पत्नीवर एक तर ठाकूरवर दोन गोळ्या झाडल्या. कोमलच्या डोक्यात गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली तर ठाकूरच्या गळ्यास व गालास गोळ्या चाटून गेल्या. गोळीबारामुळे घाबरलेल्या ठाकूरने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी परदेशीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये परदेशीविरुद्ध ठार मारण्याबाबतचा गुन्हा दाखल झाला. कोर्टात सरकारी वकील कल्पक निबांळकर यांनी आठ साक्षीदार तपासले. परदेशीची पत्नी कोमल हिने सरकार पक्षाला सहकार्य केले नाही. मात्र, डोक्यास झालेली जखम व हॉस्पिटलमध्ये झालेले उपचाराबाबत तिला आपले म्हणणे मांडता आले नाही. सबळ पुराव्यांमुळे कोर्टाने परदेशी यास दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको-प्रभाग सभा

$
0
0

(फोटो आहे)

सत्ताधाऱ्यांवरच भांडण्याची वेळ!

नाशिकरोड प्रभागसमिती सभेतील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रभाग समितीची सभा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून सोमवारी (ता. २७)तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभापती पंडित आवारे यांच्या दालनात झालेल्या पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आगपाखड केली.

नाशिकरोड विभागीय कार्यालयात झालेली ही सभा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली. प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक बाजीराव भागवत, केशव पोरजे, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, मिरा हांडगे, जयश्री खर्जुल, विशाल संगमनेरे, सुनिता कोठुळे, अंबादास पगारे, सीमा ताजणे, मंगला आढाव आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रभाग सभापतींच्या दालनात झालेली बैठक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने गाजली. पालिकेच्या विद्युत, बांधकाम, पाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांवर उपस्थित नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. खड्ड्यांच्या प्रश्नावरही नगरसेवकांनी उपस्थित अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. गेल्या वेळच्या प्रभाग सभेत गाजलेल्या विषयांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाल्याने नगरसेवकांचा तिळपापड झाला.

सत्ताधाऱ्यांवरच भांडण्याची वेळ

सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवरच भांडण्याची दुर्दैवी वेळ आल्याने त्यांचे हसू झाले. पालिकेत भाजपला सत्ता मिळाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व प्रभाग सभेत भाजपच्याच नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरी समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांशी झगडावे लागत असल्याने सत्ताधारी भाजपचा पालिका प्रशासनावर कोणताही अंकुश राहिलेला नसल्याची बाबही या निमित्ताने उघड झाली आहे. शहरात सर्व प्रभागांत बहुतेक पथदीप गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले असल्याच्या प्रश्नाकडे प्रत्येक प्रभाग सभेत शिवसेनेसह भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे. याशिवाय, अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठविला आहे. मात्र, हे सर्व प्रश्न शहरात जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती सदस्यास मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्यावर रविवार (दि. २६) रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान निफाड येवला महामार्गावर नैताळे गावाजवळ प्राणघातक हल्ला झाला. हल्लेखोर फरार झाले असून रात्री उशिरापर्यंत निफाड पोलिसात गुन्हा नोंदविणे सुरू होते. सुराशे यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे.

शिवसेनेचे शिवा सुरासे हे खडक माळेगाव गणातून पंचायत समितीचे प्रतिनिधित्त्व करतात. निफाड येथून लासलगावकडे रविवारी रात्री आपल्या खासगी वाहनातून मित्रांसमवेत जात असताना नैताळे येथील बोरगुडे पेट्रोल पंपासमोर अज्ञात गुंडांनी त्यांची गाडी अडविली. आणि हॉकी स्टिक, लोखंडी रॉड व सळया यांनी मारहाण केली. यात शिवा सुराशे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नैताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सुराशे यांच्यावर अचानक झालेला हल्ला राजकीय हेतूने की प्रशासनातील वाद यामुळे झाला अशी चर्चा नागरिकांमध्ये पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अकरावीच्या जागा वाढवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशात दहा टक्के जागा वाढवून मिळाव्यात, याबाबतच्या कार्यवाहीसाठी सर्व कॉलेजांना सूचित करावे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून काही विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेले नाहीत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्यापासून विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी खोळंबा होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

पक्षाच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निवेदन देण्यात आले. अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते. यंदाही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे झालेले नाही. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ समोर येऊ लागल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

प्रवेश प्रक्रियेतून सध्या काही कॉलेजांचे प्रवेश विद्यार्थी क्षमतेनुसार पूर्ण झाले आहेत. या कॉलेजांमध्ये अकरावीच्या अध्यापनाचे कार्य सुरू झाले आहे. त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाच्या १० टक्के जागा वाढवून द्याव्यात. तसेच सर्व वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. याकडे आपण वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे करण्यात आली. मनविसे राज्य उपाध्यक्ष संदीप भवर, शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, संदीप पैठणपगार आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी अशी तरतूद करा

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ७५ टक्के जागा शहरातील विद्यार्थ्यांसाठी तर २५ टक्के जागा नाशिक बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात. जेणेकरून नाशिक बाहेरील विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली.

मॅनेजमेंट कोटा रद्द करू नये

अकरावी प्रवेशातील मॅनेजमेंट कोटा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करू नये, त्यासंदर्भात सर्व कॉलेजांना सूचित करावे, मॅनेजमेंट कोटा कॉलेजांनी समर्पित केल्याने कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते. रिक्त जागांबाबत सर्व खुलासा वेबसाइटवर शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images