Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘हॉकर्स झोन’च्या फेरनिश्चितीस नकार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने तयार केलेल्या 'हॉकर्स झोन'च्या फेरनिश्चितीची मागणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धुडकावली आहे.

महासभेने यापूर्वी मंजूर केलेल्या हॉकर्स झोन्सचीच अंमलबजावणी करणार असल्याचे आयुक्त मुंढे यांनी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सांगितले असून, शहर फेरीवाला समितीनेही त्याला मंजुरी दिल्याची आठवण समितीच्या सदस्यांना करून दिली. त्यामुळे समितीच्या सदस्यांना माघारी परतावे लागले आहे.

शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी आणि हॉकर्स झोनची फेरनिश्चिती करावी, अशी मागणी यावेळी समितीचे सदस्य नवनाथ ढगे, संदीप भवर, अंजली गांगुर्डे, युनूस सय्यद यांनी आयुक्तांकडे केली. फेरीवाला समितीच्या मान्यतेशिवाय १५ मार्च २०१६ रोजीच्या महासभेत हॉकर्स झोन्सचा ठराव मंजूर केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, महासभेच्या, तसेच शहर फेरीवाला समितीने यापूर्वी हॉकर्स झोन्सला मंजुरी दिली असल्याने फेरनिश्चितीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत सदस्यांची सूचना आयुक्त तथा समितीचे अध्यक्ष मुंढे यांनी फेटाळून लावली. त्यामुळे ते सध्याच्या हॉकर्स झोन्सच्याच अंमलबजावणीवर ठाम राहिल्याने संघर्ष अटळ आहे. यासोबतच फेरीवाल्यांना परवाने देणे, त्यासंदर्भातील अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देणे, तसेच याविषयीची कार्यपद्धती निश्चित करणे, फेरीवाल्यांना वीज, पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा पुरविणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

--

या मागण्यांवर चर्चा

यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात बोगस विक्रेत्यांची नावनोंदणी केली गेल्याचे सांगत दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. हॉकर्स व नो हॉकर्स झोन्सबाबत संघटनेने सुचविलेल्या पर्यायांचा विचार व्हावा, हॉकर्सकडून आकारल्या जाणाऱ्या दैनंदिन शुल्काबाबत फेरीवाला समितीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जावा, तोपर्यंत शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमित फेरीवाले, टपरीधारकांवर महापालिकेने कारवाई करू नये, अशी मागणी समितीच्या सदस्यांनी यावेळी केली.

-------------------

(((अस्तित्वातील हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीवर आयुक्त ठाम)))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नववसाहती झळाळणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरभरातील रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्यासोबतच नववसाहतींमध्ये साडेसात हजार पथदीप बसविण्याचा निर्णय घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नववसाहतींतील रस्ते लवकरच झळाळणार आहेत.

नववसाहतींमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने या ठिकाणी तब्बल सात हजार ५८५ पथदीपांचे खांब बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पार पडणार आहे. तीन महिन्यांत ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, या पोलवर एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. आयुक्त मुंढे यांनी सुरू केलेल्या एनएमसी ई कनेक्ट अॅपवर विद्युत विभागाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींवरून शहरात सर्वेक्षण केले असता अनेक ठिकाणी पथदीपच नाहीत, तर अनेक ठिकाणी दिवेच नसल्याचे आढळले. त्यामुळे याचा आधार घेत नवीन पथदीप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील काही पथदीप स्मार्ट सिटीतून, तर काही महापालिकेच्या तिजोरीतून बसविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये यापूर्वीच तरतूद करण्यात आली होती. परंतु, आयुक्त मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात सर्व एलईडी दिवे बसविले जाणार असल्याचे सांगत दिवे व पथदीपांची मागणी फेटाळून लावली होती. परंतु, आता आयुक्तांविरोधात नगरसेवकांमध्ये नाराजी सूर असून, थेट अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांची ही नाराजी दूर करण्यासाठी अगोदरच ८० कोटींची रस्त्यांची कामे त्यांनी मंजूर केली आहेत. पाठोपाठ आता शहरात आवश्यक त्या ठिकाणी पथदीप बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तीन टप्प्यांत होणार प्रक्रिया

महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद केलेल्या निधीनुसार तीन टप्प्यांत निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी ७.३० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध होणार आहे, तर २५ सप्टेंबर रोजी ५ कोटी ३७ कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत पंचवटीतील जुने गावठाण भागात ८ कोटी ६५ कोटी रुपये खर्च करून दोन हजार ४३६ पथदीप बसविले जाणार असून, त्यासाठी १२ सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या निर्णयाने नगरसेवकांची नाराजी कमी करण्याचा आयुक्तांचा प्रयत्न आहे.

पंचवटीला झुकते माप

पथदीप हे प्रामुख्याने नव्याने विकसित होणाऱ्या भागातच बसविले जाणार आहेत. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एक ते सहामध्ये दोन हजार ८१९ पथदीपांचे खांब लावले जाणार आहेत. पश्‍चिम विभागातील प्रभाग ७, १२ व १३ मध्ये एक हजार ६१०, सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ ते ११ व २३ मध्ये ६१७, पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४ ते १६, २३ व ३० मध्ये ४७९, नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १७ ते २२ मध्ये एक हजार ८२, सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ ते २९ आणि ३१ मध्ये ९६८ खांब बसविण्याचे नियोजन आहे. सर्वाधिक पथदीप पंचवटी विभागात बसविले जाणार असून, संपूर्ण शहरात एकूण ७ हजार ५८५ खांब बसविले जाणार आहेत.

--

(लोगो : शुभ वार्ता)

(लीड) एलईडी पथदीप किंवा महापालिका इमारत वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार फ्लॅट्सची परस्पर विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्लॅटच्या खरेदीचे व करारनाम्याचे पैसे घेऊन ते परस्पर तिसऱ्याच व्यक्‍तीला विक्री करून २० लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सुदाम भालके (रा. भालके फार्म, टाकळी रोड, तपोवन) आणि पंकज रामगीर गोसावी (रा. मनोकामना बंगला, कृष्णानगर, अंबड) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी जितेश रमेश वैश्य (रा. नाईस, १५/१६, सातपूर एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित संदीप भालके याची पाथर्डी फाटा भागात फ्लॅटबाबत स्कीम सुरू होती. या स्कीममध्ये वैश्य यांनी फ्लॅट घेतले होते. संशयित भालके व पंकज गोसावी यांनी जितेश वैश्य यांच्याकडून रोख व चेक स्वरूपात २० लाख रुपये घेतले. दरम्यान, संशयित भालके व गोसावी याने १ मे २०१५ ते ३० एप्रिल २०१८ या कालावधीत वैश्य यांच्याकडून पैसे घेऊन फ्लॅटचा करारनामा केला. मात्र, असे असतानाही त्यांना हे फ्लॅट न देता परस्पर तिसऱ्याच व्यक्‍तीला या फ्लॅटची विक्री केली. या इमारतीचे बांधकामही पूर्ण झालेले नसल्याचे वैश्य यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे पुढील तपास करीत आहेत.

--

दारू दुकानात एकावर कटरने हल्ला

आमच्यात बोलू नको, असे सांगितल्याने संतप्त झालेल्या एकाने खिशातील धारदार कटर काढून दुसऱ्यावर हल्ला केल्याची घटना चित्रकुट परिसरातील देशी दारू दुकानात घडली. या घटनेत पेठरोड भागातील युवक जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक बाबुराव चव्हाण (३६ रा. फुलेनगर, पेठरोड) असे जखमी युवकाचे नाव आहे. चव्हाण आणि त्याचा मित्र शिवाजी शिंदे शुक्रवारी सायंकाळी चित्रकुट परिसरातील देशी दारू दुकानात मद्यसेवन करत असताना ही घटना घडली. मोर्चा संदर्भात गप्पा मारत असताना संशयित जितेंद्र जाधव याने टिप्पणी केली. त्यावर तू आमच्यात बोलू नकोस असे अशोकने म्हटले. यामुळे संतप्त झालेल्या जितेंद्र जाधव याने खिशातील धारदार कटर काढून चव्हाणच्या गळ्यावर वार केला. या घटनेत चव्हाण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वाघ करीत आहेत.

--

रिक्षा प्रवासात पर्सवर डल्ला

सातपूरच्या अशोकनगर ते शहरातील ठक्‍कर बझारदरम्यान रिक्षातून प्रवास करणाऱ्या विवाहितेची हॅण्ड पर्स अनोळखी महिलांनी चोरी केली. पर्समध्ये तब्बल ६२ हजारांचा मुद्देमाल होता. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी आप्पासाहेब विलास दिघे (श्रीगणेश मंगलमूर्ती अपार्ट. अशोकनगर, सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी (दि. २४) दिघे यांच्यासह त्याचे कुटुंबियाने अशोकनगर ते ठक्‍कर बझार बस स्टॅण्ड असा रिक्षा प्रवास केला. याचदरम्यान रिक्षात बसलेल्या ३० ते ३२ वयोगटातील दोन महिलांनी आप्पासाहेब दिघे यांच्या पत्नीच्या हॅण्ड पर्समधून ३० हजार रुपये किमतीचा दीड तोळा वजनाचा नेकलेस, २० हजार रुपयांची सोन्याची पोत, १० हजार रुपयांच्या अर्धा तोळ्याच्या दोन अंगठ्या व बाळ्या, दोन हजार रुपयांची एक ग्रॅम वजनाची पोत असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत पोलिस हवालदार ए. आर. राठोड तपास करीत आहेत.

--

दुचाकीस्वार युवक ठार

पाथर्डी फाटा येथील शिवाजी पुतळ्यासमोर भरधाव ट्रकने प्लॅटिना दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात २४ वर्षांचा चालक ठार झाला. याबाबत अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळ दिलीप संगमनेरे (रा. मु. पो. खेरवाडी, ता. निफाड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून, दुचाकीवरील आणखी एक २२ वर्षांचा युवक तरुण जखमी आहे. शुक्रवारी (दि. २४) दुपारी साडेतीन वाजता आग्रा रोडवरील पाथर्डी फाटा येथे असलेल्या शिवाजी पुतळ्याजवळील उजव्या पुलावरून केदू संतू पवार (रा. मु. पो. सय्यद पिंप्री, ता. जि. नाशिक) व गोकुळ हे दोघे दुचाकीवरून (एमएच १५ जीसी ६६०४) नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात होते. याच वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकी डिव्हायडरवर जाऊन आदळली. दुचाकीवरील केदू पवार याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. गोकुळ संगमनेरे यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित ट्रकचालक पसार झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक म्हात्रे करीत आहेत.

--

उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपोवन रोडवरील गोविंद हॉटेलच्या जवळ १५ ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. चंद्रकांत रामभाऊ आहेर (६०, पोद्दार शाळेसमोर, तपोवन लिंक रोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी चंद्रकांत आहेर हे तपोवन रोडवरील गोविंद हॉटेलच्या समोर असलेल्या चेतना हॉस्पिटलच्या बाजूने रस्त्याने पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. आहेर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा गुरूवारी मृत्यू झाला. याबाबत प्रकाश सुभाष पाटील (रा. हिरावाडी, पंचवटी) यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.

--

चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या

पुणे रोडवरील बोधलेनगर व डीजीपीनगर येथील दोन मंदिरांतील दानपेट्या फोडून चोरट्यांनी १३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बोधलेनगर येथील साईशिवनगरजवळ असलेल्या द्वारकामाई साई मंदिरातील स्टीलचा डबा फोडून चोरट्यांनी ८०० रुपये व २०० रुपयांची पितळी थाळी चोरून नेली. तर याचनंतर चोरट्यांनी डीजीपीनगरच्या टागोरनगरमधील साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून सहा हजारांची रक्‍कम व सहा हजार रुपयांची दानपेटी असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मंदिरातील या दोन्ही चोऱ्यांप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश आवारे (रा. द्वारकामाई साई मंदिर, बोधलेनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार गोडसे करीत आहेत.

पंचवटीतील तडीपारास अटक

तडीपार असतानाही शहरात आलेल्या तडीपारास पोलिसांनी अटक केली. श्यामसिंग महावीरसिंग परदेशी (४१, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, लामखेडे मळा, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. गंभीर गुन्हे दाखल असल्याने परदेशीला काही महिन्यांपूर्वी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तो शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचवटी परिसरातील परदेशीच्या घरी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२४) पहाटे ही कारवाई केली. पोलिस शिपाई काशीनाथ मांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस हवालदार ए. डी. सोनवणे करीत आहेत.

0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉइंटर्स

$
0
0

नवीन ५८ कॉलेजेस -२

आयटी पार्क वेटिंगवरच!-३

मिशन 'सुदृढ बालक' -४

सुख-दु:खातील हक्काची वाटेकरी -५

धमाल वीकेंड -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - प्रा.टी.बी.साळुंके

घोटी सिन्नर अपघात एक ठार

$
0
0

अपघातात एक ठार

म. टा. वृत्तसेवा, घोटी

येथील सिन्नर चौफुली महामार्ग शिवारात भिवंडी आगारच्या बसने घोटी शहरातून महामार्गावर आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. एकजण गंभीर जखमी झाला. भिवंडी आगाराची बस (एमएच २०, बीएल ३३२१) ही त्र्यंबकेश्वरहून ठाण्याकडे जात असताना घोटी शहराजवळ सिन्नर चौफुली येथे बसने घोटीवरून अकोलेकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १७, बीएफ २६७८) धडक दिली. या अपघातात किसन आबा कोकतरे (वय ४५ रा. अकोले) हा जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक अनिल ढुमसे आदींनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमीला उपचारार्थ घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

000

वीजपंपाची चोरी

करणारे चोरटे जेरबंद

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात शेतीच्या वीजपंपाची चोरी करणाऱ्या दोघा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, जवळपास चार ते पाच चोरी केलेले वीजपंप पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केले. या संशयितांकडून जवळपास दोन लाखाची सामग्री जप्त केली आहे. याबाबत नामदेव दादा साबळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी घोटी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भाऊराव राजाराम गिरंगे (वय २४) व सुनील धोंडू साबळे (वय २६ रा. अडसरे) या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावण- ओळ

$
0
0

श्रावण मास बहरला,

धराने हिरवा शालू पांघरला

श्रावण म्हटला की सृष्टीतील कणन् कण प्रफुल्लीत होतात. सजीवांबरोबरच निर्जीवांनाही मग आपसूकच नवचैतन्याचे ढोहाळे लागतात. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उंभ्राडे गावातील ही शाळेची पडकी वास्तूही त्यास अपवाद कशी ठरेल? या जीर्ण वास्तूने आपल्या अंगाखांद्यावर चढवलेला हिरवाईचा साज श्रावण बहरात आल्याची साक्ष देतो आहे.

फोटो- विजय चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊले चालती ब्रह्मगिरीची वाट...

$
0
0

रविवारी रात्रीच गजबजणार फेरी मार्ग; तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी प्रशासन सज्ज

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्‍वर

त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तिसऱ्या सोमवार (दि. २७)च्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

तिसऱ्या सोमवारच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात बैठक झाली. तहसीलदार महेंद्र पवार यांच्या उपस्थित सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, सभापती विष्णू दोबाडे, नगरसेवक श्याम गंगापुत्र, सागर उजे आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्‍वर येथे तिसऱ्या सोमवारी भाविकांचा ओघ राहणार असल्याने भाविक एसटी, खासगी वाहने अन्य प्रवासी बस आदींचा वापर करून येतात. या गर्दीमुळे पोलिस यंत्रणेवर वाहनांचे नियोजन, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आदी कामांसाठी सर्वात जास्त ताण येतो. त्यामुळे जादा पोलिस बळ मागविण्यात आले आहे. सर्व खासगी वाहने खंबाळे, अंबोली, पहिने व तळवाडे वाहनतळावर थांबविण्यात येतील व तेथून बसने शहरात स्वतंत्रपणे एसटीने येता येईल. त्र्यंबकेश्वर गावात कुठलेही वाहन आणता येणार नाही, मात्र एसटी बस शहरात येतील हे नियोजन फक्त श्रावण सोमवारी असेल. बाकी जशी गर्दी वाढेल तसे नियोजन असेल, अशा सूचना करण्यात आल्या. परिक्रमा फेरी मार्गावरदेखील पुरेसा बंदोबस्त असेल. तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्त्व असून दरवर्षी लाखो शिवभक्त 'बम बम भोले'चा जयघोष करत ब्रह्मगिरीला तिसऱ्या श्रावणी सोमवारी फेरी मारतात. फेरीवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी तहसीलदार महेंद्र पवार व पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सोबत फेरी रस्त्याची पाहणी केली. तिसऱ्या श्रावणी सोमवारी किमान चार ते पाच लाख भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

फिरते आरोग्य पथक

त्र्यंबकेश्‍वर येथे ग्रामीण रुग्णालयातर्फे चार ठिकाणी फिरते आरोग्य पथक तैनात करण्यात येईल. त्र्यंबकेश्‍वर मंदिर, जव्हार फाट्यावरील बसस्थानक, सापगाव फाटा (जेथून फेरीचा परतीचा मार्ग आहे) व कुशावर्त तीर्थ या ठिकाणी फिरते आरोग्य पथक असेल. नऊ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. १0८ क्रमांकाच्या दोन तसेच इतर ९ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे.

असा असेल फौजफाटा

तिसऱ्या सोमवारी १ पोलिस अधीक्षक, १ अपर पोलिस अधीक्षक, ३ पोलिस उपअधीक्षक, १४ पोलिस निरीक्षक, ५१ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ५०० पोलिस कर्मचारी, ११८ महिला पोलिस, ५०० होमगार्ड यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ४० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

खासगी वाहनांना प्रवेश बंदी

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त रविवार आणि सोमवारी भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्‍वर येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ४०० हून अधिक जादा बसेसचे नियोजन केले आहे. रविवारपासून खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककडून येणारी वाहने खंबाळे येथे उभी करून भाविकांना एसटीने जावे लागणार आहे. जव्हारकडून येणारी वाहने अंबोली येथे थांबविण्यात येणार असून, तेथूनही बसेसची व्यवस्था असणार आहे. घोटीकडून येणारी वाहने पहिने येथे थांबविण्यात येणार आहेत. गिरणारेमार्गे येणारी वाहने तळवाडे येथे थांबविण्यात येणार आहे. सातपूर, नाशिकरोड, निमाणी, महामार्ग, सिडको, घोटी येथूनही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

कुशावर्तावर बॅरीकेडींग

त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या सोमवारचे पूर्व नियोजन वेगाने सुरू आहे. नगर परिषदेने कुशावर्तावर रविवारी दुपारपासूनच गर्दी होईल म्हणून शनिवारी सायंकाळी तीर्थामधील संरक्षक जाळीवर उंच बॅरेकेडींग उभारले आहे. गर्दीमध्ये खोल पाण्यात भाविकांनी उतरू नये, याकरिता ही व्यवस्था उभारण्यात आली आहे. रविवारी रात्री गर्दीचा उच्चांक राहणार असल्याने जागोजाग पथदीप लावण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन लाखांचा मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रशासित प्रदेशातून होणारी मद्याची तस्करी रोखण्यासाठी एक्साइज विभागाने हरसूल आणि बोरीपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे दोन दिवस विशेष मोहीम राबविली. या कारवाईत पथकाने पाच तस्करांच्या मुसक्या आवळत कारसह सव्वादोन लाखांचा मद्यसाठा हस्तगत केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक एकने ही कारवाई केली. केंद्रशासित दादरा-नगर हवेलीसह दमण येथून होणाऱ्या मद्याच्या चोरट्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस ग्रामीण भागात विशेष मोहीम राबविण्यात आली. पथकाने हरसूल आणि बोरीपाडा येथे केलेल्या कारवाईत मद्याची वाहतूक आणि विक्रीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात वसीम रफिक शेख, भगवान मोतीराम पवार, इम्रान नूर मोहम्मद शेख, सुरेश गोपाळ शेंडे (रा. हरसूल) आणि रमेश लक्ष्मण शेंडे (रा. शेडेपाडा, हरसूल) आदींना अटक करण्यात आली. राज्यात विक्रीस बंदी असलेला परराज्यांतील मद्यसाठा यावेळी पथकाच्या हाती लागला. मद्याची वाहतूक करणाऱ्या कार (एमएच १५, बीडी ६८९४)सह सुमारे २ लाख २८ हजार ६६४ रुपये किमतीचा मद्यसाठा पथकाने जप्त केला. ही कारवाई पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, जवान वीरेंद्र वाघ, सुनील पाटील, विलास कुंवर, विष्णू सानप, विजेंद्र चव्हाण, मच्छिंद्र अहिरे आदींनी केली.

(डीप सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयस्पर्शी सोहळ्याने भारावले जवान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देशाच्या रक्षणासाठी सिद्ध असलेल्या लष्करी जवानांच्या हातांवर आपल्या चिमुकल्या हातांनी राख्या बांधून देवळाली कॅन्टोन्मेंट संयुक्त प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी शनिवारीच रक्षाबंधन साजरे केले. येथील ११६ टीए पॅरा बटालियनमध्ये रंगलेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्याने जवानदेखील भारावून गेल्याचे दिसून आले.

बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणाचा उत्साह वेगळाच असतो. आपण सामान्यजन गाव-शहरात राहत असताना हा सण आपल्या बहीण-भावासोबत साजरा करू शकतो. मात्र, देश रक्षणार्थ घरापासून दूरवर कार्यरत असलेल्या लष्करी जवानांना हा सण आपल्या परिवारासोबत साजरा करता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयंची उणीव भासू नये या उद्देशाने 'एक राखी जवानांसाठी' या उपक्रमांतर्गत देवळाली कॅन्टोन्मेंट संयुक्त प्राथमिक शाळेच्या शालेय समितीतर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. समितीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका आशा गोडसे, मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांनी आपल्या निवडक विद्यार्थिनींसोबत येथील लष्कराच्या टीए बटालियनमध्ये रक्षाबंधन साजरे केले. युनिट कमांडिंग ऑफिसर एस. के. साह यांना नगरसेविका आशा गोडसे यांनी राखी बांधली. मुख्याध्यापिका कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थिनींनी सुभेदार राजाराम वारुंगसे, सुभेदार हवा सिंग, सुभेदार विक्रम सिंग, कॅप्टन त्रिलोक सिंग, कॅप्टन वरुण गोस्वामी, मेजर आकाशदीप आदींसह बटालियनच्या सर्व जवानांना राख्या बांधल्या. यावेळी लष्कराच्या वतीने विद्यार्थिनींना खाऊवाटप करण्यात आले. शाळेच्या वतीने पोपट खंडिझोड यांनी टीए बटालियनने शाळेला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. शिक्षक पंकज निसाळ, रामेश्वर दांगोडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकऱ्यांमध्ये ओबीसींना डावलले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशात ओबीसींची संख्या ५४ टक्के असताना २७ टक्के आरक्षण मिळाले; मात्र अद्यापही नोकऱ्यामध्ये ओबीसींना डावलण्यात येत असल्याची खंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

महात्मा फुले उद्योजक ग्रुपतर्फे जेजुरकर फेस्टिव्हल लॉन्स येथे एकदिवसीय माळी उद्योजक मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी माळी समाजातील युवकांनी श्रमाला महत्त्व देऊन उद्योग व्यवसायात प्रगती करावी. कितीही अडचणी संकटे आले तरी खंबीर उभे राहून विविध उद्योग व्यवसायात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भुजबळ यांनी माळी समाजातील तरुणांनी उद्योगाबरोबरच सरकारी पदांवर पोहचावे आणि माळी समाजाबरोबरच इतर समाजातील बहुजन समाजातील लोकांना पुढे नेण्याचे काम करावे, असेही सांगितले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, मधुकर जेजुरकर, बाजीराव तिडके, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, सुनील फरांदे, विजय राऊत, चंद्रकांत बागुल, समाधान जेजुरकर, राकाशेठ माळी, योगेश कमोद, डॉ. शाम पगार, संतोष पुंड, दिपक मंडलिक आदी उपस्थित होते.

यावेळी महात्मा फुले उद्योजक अॅपचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिक्षा नहिरे यांनी सदर अॅपची माहिती दिली. यावेळी समाधान जेजुरकर यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक निवृत्ती भदाणे, महिंद्रा सूर्यवंशी आपली यशस्वी वाटचाल विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन माळी, योगेश कमोद यांनी केले. या मेळाव्यात अनिल जाधव प्रास्ताविक केले. तरुण उद्योजक प्रशांत बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले.

महात्मा फुले खरे उद्योजक!

महात्मा फुले हे खरे उद्योजक होते. त्यांनी कात्रजचा डॅम बांधला त्यामुळे शेतकरी बारमाही शेती करू लागले. महात्मा जोतीराव फुले यांच्या अनुयायांनी टाईम्स ऑफ इंडिया, कापड गिरण्या, मुंबई महानगरपालिका इमारत बांधली होती. १५० वर्षांपूर्वीं त्यांनी उद्योगाचे शिक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली होती. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थी आज घेऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी बांधवांचे नुकसान करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आदिवासी बांधवांचा विकास साधला जावा हा वनहक्कांच्या दाव्यांचा उद्देश आहे. परंतू क्षुल्लक कारणांनी दावे अपात्र ठरविण्याचे प्रमाण राज्यामध्ये वाढले आहे. प्रांताधिकारी स्तरावर अपात्र ठरविण्यात येत असलेले दावे नंतर जिल्हाधिकारी स्तरावर मंजूर केले जातात. नकारात्मक भूमिकेतून आदिवासी बांधवांचे नुकसान करू नका.' असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी शनिवारी केले.

जिल्ह्यातील प्रलंबित वनदाव्यांचा आढावा वर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आदिवासी विकास विभागाचे किरण कुलकर्णी यांसह प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. जिल्ह्यात वन हक्कचे साडे बारा हजार दावे प्रलंबित असल्याची माहिती या बैठकीच्या प्रारंभीच पुढे आली. हे दावे प्रलंबित असण्याची कारणे वर्मा यांनी समजावून घेतली. वन हक्कांच्या दाव्यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची सेवा करता येऊ शकते. परंतु दावे रद्द करण्याचे प्रमाण अधिक असून, अधिकाऱ्यांच्या नकारात्मक वृत्तीमुळे आदिवासींचे नुकसान होत असल्याचे वर्मा यावेळी म्हणाल्या. अधिकाऱ्यांनी नकारात्मक भूमिकेतून बाहेर पडून ही प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत, असे आदेश त्यांनी दिले.

संयुक्त मोजणीला उपस्थित रहा

बहुतांश वेळा वनविभागाकडून महसुल व आदिवासी विभागांना अपेक्षित मदत मिळत नसल्याने दावे निकाली काढण्यास विलंब होत असल्याचे निरीक्षण आदिवासी विकासचे मुख्य सचिव वर्मा यांनी नोंदविले. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन पट्ट्यांच्या संयुक्त मोजणीला उपस्थित राहण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रांताधिकारी स्तरावरच चांगले काम झाले तर प्रलंबित वनहक्कांच्या दाव्यांची संख्या कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वनहक्क दावे विभागाला भेट देऊन त्यांनी तेथील रेकॉर्डची तपासणी केली. तसेच तेथील कामाबाबत समाधानही व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी अविश्वासाची नोटीस

$
0
0

अविश्वासाची भाजप देणार नोटीस

काँग्रेस, मनसे ठरावाच्या बाजूने; शिवसेनेचा चेंढू उद्धव ठाकरेंकडे तर राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचे नेतृत्व भाजपने आता स्वता:कडे घेतले असून, सोमवारी मुंढें विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायीच्या १५ सदस्यांसह काँग्रेस आणि मनसेच्या गटनेत्यांच्या सह्यांचे पत्र नगरसचिवांकडे दाखल केले जाणार असून, भाजप सोमवारीच आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करणार आहे. तर शिवसेनेने या ठरावात सहभागी होण्यासाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंची परवानगी मागीतली आहे. सध्यस्थितीत भाजपकडे काँग्रेस, मनसेला धरून ७९ नगरसेवकाचे बळ असून, भाजपला आणखीन सहा नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे आता सोमवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शहरातील इंच, इंच जमिनी करवाढीच्या ओझ्या खाली आणलेल्या मुंढेंच्या विरोधात भाजपने आता अविश्वासाचे हत्यार उपसले आहे. फेब्रुवारीपासून मुंढेंनी ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर अतिक्रमण केले. त्यांने नाराज झालेल्या नगरसेवकांनी आता करवाढीच्या मुद्द्यावरून मुंढें विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. भरमसाठ बिले आल्यानंतर नगरसेवकांवर नागरिकांनी आता दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. महासभेचा ठराव बाजूला सारत, करवाढीची अंमलबाजणी सुरू केली. शुक्रवारी रामायणवर बैठक घेवून भाजपनेच आता या अविश्वास प्रस्तावाबाबत पुढाकार घेत गटनेत्यांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या पत्रावर स्थायीच्या १५ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, त्यासाठी सोमवारी नगरसचिवांना विशेष महासभेचे पत्र दिले जाणार आहेत. या सर्व बंडाचे नेतृत्व उपमहापौर प्रथमेश गिते यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

सध्या मनसे आणि काँग्रेस गटनेत्यांच्या सह्या या पत्रावर आहेत. अविश्वास प्रस्तावासाठी ८५ नगरसेवकांची गरज असून, भाजपचे ६६, मनसे ६ तर काँग्रेसचे ७ सदस्य अविश्वास ठरावाच्या बाजूने आहेत. १२२ पैकी ७९ नगरसेवक सध्या सोबत असून, राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात आहे. तर शिवसेनेची भूमिका सोमवारी ठरणार आहे. त्यामुळे अजूनही अविश्वासासाठी भाजपला ६ मतांची गरज भासणार आहे.

‌सेनेचा निर्णय ठाकरेंच्या कोर्टात

अविश्वास प्रस्तावाच्या पत्रावर शिवसेनेच्या स्थायी समिती सदस्यांच्या सह्या असल्या तरी, विरोधी पक्षनेता व गटनेत्यांच्या सह्या झालेल्या नाहीत. शिवसेनेचा करवाढीच्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे ठरावाला समर्थन दिले नाही, तर नागरिकांचा रोष पत्करावा लागेलच, परंतु नगरसेवकही फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे अविश्वासाबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंची परवानगी मागण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीची भूमिका मात्र अध्यापही गुलदस्त्यात आहे. छगन भुजबळ याबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कृती समितीचा पाठिंबा

महासभेचा वादग्रस्त ५२२ क्रमांकाचा करवाढीचा आदेश रद्द करण्यासाठी अन्याय निवारण कृती समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने करवाढी विरोधात शहरभर रान उठवले होते. तसेच कोर्टात जाण्याचीही तयारी केली होती. त्यामुळे या अविश्वास प्रस्तावाला कृती समितीने पाठिंबा दिला आहे. आयुक्त जर करवाढ रद्द करत नसतील, तर त्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी सांगितले आहे. तर समितीचे उन्मेश गायधनी यांनी हा निर्णय अगोदर होणे गरजेचे असल्याचे करवाढी विरोधात लढा उभा करणार असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनहक्क चौकट

$
0
0

कानउघाडणीनंतर जाग

वनहक्केचे दावे निकाली निघावेत याकरीता आदिवासी बांधव कित्येक दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. आदिवासी तालुक्यांमधील लोकप्रतिनिधींनी वारंवार हा विषय उचलून धरला आहे. इतकेच नव्हे तर मुंबईपर्यंत ज्या विविध कारणांसाठी आदिवासी बांधवांनी जो लॉंगमार्च काढला त्यामध्ये वनहक्कांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघावीत ही देखील प्रमुख मागणी होती. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यासाठी अनेकदा बैठका घेतल्या आहेत. वर्मा यांनी यंत्रणेची कानउघाडणी केल्याने प्रांताधिकारी स्तरावर या प्रकरणांच्या निपटाऱ्यास गती मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७४ गावांमध्ये खळाळणार ‘पेयजल’

$
0
0

पाणीपुरवठा योजनांसाठी ५०१ कोटी ८६ लाख रुपये खर्च

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये जिल्ह्यातील ५७४ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ५०१ कोटी ८६ लाख रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. २९८ गावातील योजनांचा समावेशक असा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात मागील व चालू असलेल्या योजनांसाठी १० कोटी ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील दोन वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकाचे निर्देश होते. मात्र आता ही बंदी उठविण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यात आला. या आगोदर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून १०२ गावांसाठी ५१ योजना मंजूर केल्या असून, त्यासाठी ४४ कोटी २२ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने गावांसाठी हागणदारीमुक्तीची अट घातली होती. मागील तीन वर्षांत स्वच्छ भारत मिशनमध्येही राज्याने अत्यंत उल्लेखनीय काम केल्यामुळे त्याचा फायदाही या योजना मंजूर करण्यात झाला आहे.

हागणदारीमुक्तीसाठी २७ कोटींचा निधी

जिल्ह्यातील या हागणदारीमुक्त गावांमध्ये झालेल्या शौचालयाच्या बांधकामासाठी उर्वरीत आवश्यक निधी रक्कम २७ कोटी ३३ लाख रुपये ऑगस्ट २०१८ मध्ये मंजूर करण्यात आले आहेत.

कोट

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत बांधलेल्या शौचालयांना निधी असे एकत्रित मिळून जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून ६०३ कोटी ४७ लाख रुपये एवढा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.--

बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री

तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या योजना

तालुका- गावे/ वाड्या/वस्त्या योजनेची संख्या-किंमत

बागलाण ५५- ४३- २३ कोटी ५८ लाख

चांदवड १६ - १६- १० कोटी ३१ लक्ष

देवळा १२- ७- ७ कोटी ४४ लाख

दिंडोरी २४ -२४- १७ कोटी ४३ लाख

इगतपुरी ४५- ३४- ४२ कोटी १७ लाख

कळवण १७- १०- ८ कोटी ५० लाख

मालेगाव ५८- १०- १०७ कोटी ८१ लाख

नांदगाव ८२- १७- ३५ कोटी २७ लाख

नाशिक २४- २१- ३० कोटी ९५ लाख

निफाड २८- २४- २७ कोटी ६७ लाख

पेठ २१- २१- ८ कोटी ९९ लाख

सिन्नर ४१- २६- २३ कोटी ९ लाख

सुरगाणा ३०- २८- १० कोटी १६ लाख

त्रंब्यकेश्वर ७०- १५- १६ कोटी ९७ लाख

येवला ५१- २- ९० कोटी ७६ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात -

$
0
0

अध्यक्षपदी पवन आहेर (फोटो आहे)

नाशिक : जिल्हा काँग्रेस अपंग सेलच्या अध्यक्षपदी पवन आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अपंगांच्या हक्कांसाठी पवन आहेर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. अध्यपदी नियुक्त झाल्याचे पत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, पृथ्वीराज मोगल यांनी आहेर यांचे अभिनंदन केले आहे.

चार्वी काबरा हीचे यश (फोटो आहे)

नाशिक : एनटीएसई (नॅशनल टॅलेंट सर्च एक्सामिनेशन) परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्याबाबत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चार्वी काबरा या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. एनटीएसई स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबाबत चार्वीला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. सर्व स्तरावरून चार्वीचे अभिनंदन केले जात आहे.

सहयोग शिबिराचे आयोजन

नाशिक : विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्पाद्वारे वय २५ ते ४५ या गटातील दाम्पत्यांसाठी सहयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार (८ व ९ सप्टेंबर) रोजी हे शिबिर पिंपळद येथील विवेकानंद केंद्राच्या प्रकल्प संकुलात होणार आहे. शिबिरादरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्राणायम, योगासने, भक्तीसंध्या, गीतापाठ आणि आनंदमेळा यांचे देखील आयोजन शिबिरात करण्यात आले आहे. नाशिककरांनी या शिबीरास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्पाद्वारे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीत शेजारील राष्ट्रे अपयशी

$
0
0

लोकशाहीत शेजारील राष्ट्रे अपयशी

राजकीय अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिपादन, नाशिक

देशातील भाषा, धर्म आणि प्रांत या विविधतेशी एकरूप होणे भारताच्या शेजारील राष्ट्रांना जमले नाही. श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतान या राष्ट्रातील लोकशाहीमध्ये लष्कर हे राजकारण आणि जनतचे मध्यस्थी आहे. या चारही राष्ट्रात राजकारणाचा एक हिस्सा म्हणून लष्कराची ओळख आहे. त्यामुळे या राष्ट्रात लोकशाही अस्तित्वात असली तरी राजकीयदृष्ट्या तेथील लोकशाही असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे ही राष्ट्रे लोकशाहीत अपयशी ठरत आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर यांनी केले.

एचपीटी कॉलेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आणि एचपीटीचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास पळशीकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्या रूपन सिंग, उपप्राचार्या डॉ. एम. डी. देशपांडे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे व्यासपीठावर होते. 'भारताच्या शेजारील राष्ट्रांची लोकशाही' या विषयावर डॉ. पळशीकर यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला. ते म्हणाले की, प्रामुख्याने युरोप, इंग्लंड आणि अमेरिका या राष्ट्रांच्या राजकारणाबद्दल भारतीय उत्सुकेतेने बोलतात. पण, भारताच्या शेजारील राष्ट्रांतील राजकारणाबाबत भारतीयांना फारशी कल्पना नसते. भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या लोकशाहीत असंतोष आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, तेथील जनतेचा आणि सत्ताधाऱ्यांचा असेलला विरोधाभास. चारही राष्ट्रात मुळचे नागरिक वगळता भारतातील नागरिकांचा एक गट आहे. जसे की, श्रीलंकेत चहाच्या व्यापारासाठी गेलेले तामिळ श्रीलंकात स्थायिक झाले. त्यांचा मोठा जनसमुदाय आहे. पाकिस्तानात पंजाबमधून गेलेले मुस्लिम स्थायिक झाले. असेच नेपाळ आणि बांगलादेशातही आहे. त्यामुळे तेथील जनतेचा आपापसात रोष आहे. श्रीलंकेने तामिळ नागरिकांच्या मागण्या पूर्ण केल्या नसल्या तरी त्यांना दुखावेल असेही निर्णय घेतले नाहीत. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशात मात्र एककेंद्री राजकारण केले जाते. तेथील राजकीय घराणेशाहींचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यामुळे या राष्ट्रांत लोकशाही असूनही तेथील लोकांना हवे तसे अधिकार मिळत नाही. यावेळी एचपीटी कॉलेजच्या राज्यशास्त्र तसेच पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाकी सोबत साजरे करा रक्षाबंधन

$
0
0

यंदा 'राखी विथ खाकी'

नाशिक पोलिस आयुक्तालयाचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियावर महिलांना बदनामीला किंवा त्रासाला सामोरे जावे लागते. सायबर क्राइम अंतर्गत महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींची संख्या अधिक आहे. या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलिस सदैव तत्पर आहेत. नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून महिलांच्या तक्रारींची विशेष खबरदारी घेतली जाते. महिलांच्या रक्षणासाठी नाशिक पोलिस चोवीस तास कर्तव्यदक्ष असतात. अडचणीच्या काळात तत्परतेने मदतीस धावणाऱ्या पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा करा, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तालयाने केले आहे.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून 'राखी विथ खाकी' या उपक्रमाचे आयोजन नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. इंटरनेटवरील बदनामीच्या मिळणाऱ्या धमक्यांना मी घाबरणार नाही. कारण, माझा भाऊ पोलिस आहे, अशी ठाम भूमिका नाशिकच्या प्रत्येक महिलेत रुजावी. या हेतूने 'राखी विथ खाकी' हा उपक्रम आयोजित केल्याचे पोलिस आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले आहे. या उपक्रमांअंतर्गत आज, (२६ ऑगस्ट) रक्षाबंधनाच्या निमित्ताने नाशिक पोलिसांना राखी बांधायची आहे. पोलिसांना राखी बांधल्यानंतर त्यांच्या सोबत एक सेल्फी क्लिक करायचा आहे. हा सेल्फी ९७६२१००१०० किंवा ९७६२२००२०० या क्रमांकावर व्हॉटसअॅपवर पाठवायचा आहे. सोमवार (२७ ऑगस्ट) पर्यंत हा सेल्फी पाठवता येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांप्रती आपुलकीची भावना महिलांमध्ये निर्माण होईल. जो सोबत नाही पण, कायम माझ्या साथीला आहे ही भावना दृढ होईल. या हेतूने राखी विथ राखी उपक्रम आयोजित केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तालयाने ट्विटरद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखीचे धागे करणार नात्यांची वीण घट्ट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज, रविवारी (दि. २६) साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनाचा मुहूर्त दिवसभराचा असून, या सणाच्या पूर्वसंध्येला शनिवारी शहरात राख्या आणि गिफ्ट खरेदीची लगबग बघायला मिळाली.

भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा, प्रेम, स्नेह आणि पवित्रता यांचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सणाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीनुसार श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाला राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना करते. तसेच, यानिमित्ताने बहिणीच्या रक्षणाचे वचन भावाकडून दिले जाते.

खरेदीचा उत्साह

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राख्या, तसेच गिफ्ट खरेदीसाठी शनिवारी बाजारपेठेत मोठी वर्दळ दिसून आली. यंदा इको फ्रेंडली आणि पारंपरिक राख्यांना महिलावर्गाने सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसले. लहानग्यांसाठी स्पिनर आणि कार्टून्स राखी खरेदी करण्याकडे तरुणींचा कल होता. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मेनरोडला पूजेचे साहित्य घेण्यासाठीही नाशिककरांनी गर्दी केली होती.

पहाटे ५.४३ पासून मुहूर्त (स्वतंत्र चौकट)

आजचे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी सकाळी ५.४३ ते दुपारी १२.२८, दुपारी २.०३ ते ३.३८ पर्यंत शुभ मुहूर्त आहे. नारळी पौर्णिमा सायंकाळी ५.३० वाजता समाप्त होणार आहे. मात्र, असे असले, तरी यंदा सूर्योदय व्यापिनी तिथी असल्यामुळे पौर्मिणा संपल्यानंतरही रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे. सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी ६.४३ ते ८.१३ या वेळेतदेखील रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. सायंकाळी ५.१३ ते ६.४८ या काळात राहू काळ असल्याने रक्षाबंधन साजरे करू नये, अशी माहिती पुरोहित अमोल किरपेकर यांनी दिली आहे.
(पंकज चांडोले)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या पेन्शनसाठी पाच सप्टेंबरला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा, या मागण्यांसाठी देशभरातील केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक लोकसभेवर ५ सप्टेंबर रोजी मोर्चा नेणार आहेत. भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातीलही अनेक कर्मचारी व शिक्षक यामध्ये सहभागी होणार आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी, निम-सरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीसह नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावरून संसदेवर निघणाऱ्या या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सक्रिय सहभागी होणार आहे.

ही समितीदेखील जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आग्रही असून शिक्षक समितीने विधिमंडळावर काढलेले दोन स्वतंत्र मोर्चे, शासनाच्या कर्मचारी, शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आयोजित केलेले संयुक्त व स्वतंत्र आंदोलने केली आहेत. या मोर्चात अधिकाधिक शिक्षकांनी सामील व्हावे, असे आवाहन राज्य शिक्षक नेते काळूजी बोरसे-पाटील, राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य कार्याध्यक्ष किरण गायकवाड आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images