Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विभागीय आयुक्तालयात सोमवारी महिला लोकशाहीदिन

$
0
0

नाशिकरोड : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाहीदिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे महिला लोकशाहीदिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांनी दिली. तालुका व जिल्हा स्तरावर अर्ज केलेल्या ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या समस्येचे निराकरण झाले नसेल अशा महिलांनी जिल्हा लोकशाहीदिनाच्या टोकन नंबरसह आपले अर्ज येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व्हिसरोडवर खड्डे (फोटो)

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या सर्व्हिसरोडवर विभागीय क्रीडा संकुलाच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांवर मोठी कसरत करण्याची वेळ येत आहे. सर्व्हिसरोडवरून क्रीडा संकुलाकडे वळण्याच्या रस्त्यावरच हे खड्डे पडलेले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणीदेखील साचलेले आहे. रात्री अंधारात या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते त्वरित बुजविण्याची मागणी परिसरातून होत आहे.

उद्या गुणगौरव

जेलरोड : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे रविवारी (दि. ८) सायंकाळी पाचला विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे. जेलरोडच्या मंजुळा मंगल कार्यालयात दहावी-बारावीतील गुणवंतांना गौरविण्यात येईल, अशी माहिती आयोजक जिल्हा सरचिटणीस शशिकांत चौधरी, राहुल ढिकले, नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुने यांनी दिली. गुणवंतांनी नावनोंदणीसाठी संतोष पिल्ले (९८६०१११११५), प्रवीण पवार (९२७०००००३६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बसची दुरवस्था (फोटो)

पंचवटी : शहरातील दिंडोरी नाका येथून जाणाऱ्या कळवण डेपोच्या (एमएच ०७, सी ९३४५) बसची दुरवस्था झाल्याचे आढळून आले. या बसच्या मागच्या बाजूला असलेल्या संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असलेली काच फोडण्यात आलेली आहे. ही काच फोडल्यानंतर सध्या पावसाळा सुरू असूनदेखील ती पुन्हा बसविण्याची दक्षता घेतली नसल्याने प्रवासी, तसेच नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

'आप'चा विजयोत्सव

जेलरोड : सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमधील 'आप' सरकारच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे लोकहिताचे निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लोकशाहीचा मोठा विजय झाला आहे. त्यामुळे शहरात 'आप'तर्फे विजयोत्सव साजरा करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुंबई नाका येथे पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. पक्षाचे नेते जितेंद्र भावे, विकास पाटील, नितीन शुक्ल, जगबीर सिंग, सुमीत शर्मा, मीत पटेल, किरण अहिरे, विनोद कळमकर, प्रकाश प्रजापती आदींनी त्यात सहभाग घेतला.

कालवा रस्त्यावर कचरा (फोटो)

पंचवटी : गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याच्या नांदूर शिवाराच्या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. प्लास्टिकबंदीचा गाजावाजा होत असताना या भागात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या वापरलेल्या पिशव्या टाकण्यात येत आहेत. हे प्लास्टिक नेमके कोठून येते हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. या भागातील साफसफाई करण्यात आल्यानंतर पुन्हा येथे कचराकुंडीप्रमाणे कचरा टाकला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, याप्रश्नी ठोस उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोलपंप कर्मचाऱ्यावर वादातून तरुणावर वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुना आडगाव नाक्यावरील नॅशनल होमी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणाने किरकोळ कारणावरून वाद घालून तेथील कर्मचाऱ्याच्या हातावर चाकूने वार केले. हा प्रकार बुधवारी (दि. ४) रात्री दहाच्या सुमारास घडला.

घटनेमध्ये ललित जयंत पाटील (वय २५, रा. सातपूर) हा कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी दोघे जण या पंपावर आले़ त्यापैकी एकाने पाटील यास शंभर रुपयांचे पेट्रोल टाकण्यासाठी सांगितले. पाटील पंपाचे मीटर सेट करत असताना मागे बसलेल्या तरुणाने मीटर सेट न करताच पेट्रोल टाकण्यास सांगितले. मात्र, पाटील यांनी तसे करता येणार नाही, असे सांगताच संशयिताने खिशातून चाकू काढून त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर वार केले. यात तो जखमी झाला.

पंचवटी आगारात बॅटऱ्यांची चोरी

जुना आडगाव नाक्यावरील आगाराच्या आवारात उभ्या दोन बसेसमधील बॅटऱ्या तसेच तांब्याच्या तारा चोरून चोरटे पसार झाले. हा प्रकार गुरुवारी (दि. ५) मध्यरात्री घडला. या प्रकरणी पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पेठरोडवरील विभागीय कार्यशाळेत दुरुस्तीसाठी आणलेल्या बसमधून सुमारे ६० लिटर डिझेल चोरीस गेले होते.

मेडिकलमधून रोकड लंपास

दोन मेडिकल दुकानांचे शटर्स उचकटून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पेठरोडवरील दत्तनगरमध्ये बुधवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. मुंबई नाक्यावरील भाभानगर येथील जगदीश भोसले यांचे पेठरोडवरील दत्तनगरमध्ये दत्तकृपा मेडिकल तर संतोष कळमकर यांचे राधिका मेडिकल आहे. नेहमीप्रमाणे रात्री मेडिकल बंद करून ते घरी गेले. रात्री चोरट्यांनी दोन्ही मेडिकल दुकानांचे शटर्स उचकटून दत्तकृपा मेडिकलच्या गल्ल्यातील ७० हजार व राधिका मेडिकलमधून पाचशे अशी ७० हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली.

नवविवाहितेची आत्महत्या

तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना म्हसरूळ शिवारातील वैदूवाडीत गुरुवारी (दि. ५) घडली. पूनम अजय शिंदे (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरात साडीने पंख्याला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षण राज्य मंत्र्यांची कळवणला धावती भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कळवणला धावती भेट दिल्याने येथील भाजपसह मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

डॉ. भामरे सटाण्याहून सुरगाण्याकडे जात असताना त्यांनी भाजप तालुकाध्यक्ष सुधाकर पगार व अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण कळवण येथे येत असल्याचे सांगितले. यावेळी पगार, जिल्हा कोषाध्यक्ष गोविंद कोठावदे, शहराध्यक्ष निंबा पगार, तालुका कार्यवाह दीपक वेढणे आदींनी स्वागत केले.

निधीसाठी मंत्र्यांना साकडे

कळवण शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून घ्यावा. शहरात उद्यान निर्मिती, स्वच्छता गृहे, रस्ता रुंदीकरण, पथदिवे आदी विकासकामांना शासनाने निधी उपलब्द करून द्यावा अशी मागणी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सुधाकर पगार यांनी भामरे यांच्याकडे केली.

मिसळचा घेतला स्वाद

डॉ. सुभाष भामरे यांनी सुरेश निकम, डॉ. विलास बच्छाव यांच्यासमवेत बसस्थानक जवळील हॉटेल गुरुकृपा येथे मिसळ खाल्ली. डॉ भामरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत मिसळ खाल्ल्याने कळवण शहरात औत्सुक्याचा विषय ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगावात मेडिकल फोडले

$
0
0

दोन लाखांची रोकड लंपास; शनिवारी पहाटेची घटना

म. टा. वृत्तसेवा निफाड

लासलगाव येथील विद्या नगरातील आशीर्वाद मेडिकलमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेची धाडसी चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोन पथके तयार करून चोरीच्या घटनेचा तपास सुरू आहे.

विद्या नगरात डॉ. किरण निकम यांचे आशीर्वाद हॉस्पिटल लगत आशीर्वाद मेडिकल आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी लाल रंगाच्या गाडीतून येत मेडिकलचे शटरचे कुलूप तोडले. ड्रावरमध्ये हॉस्पिटल व मेडिकलचे दोन तीन दिवसाचे व्यवहार व डॉक्टरांनी बाहेरगावी जाणार असल्याने विमा पॉलिसीसाठी काही रोख स्वरूपात ठेवलेली अशी एकूण एक लाख ९५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी घेऊन पोबारा केला.

महिलेला चोरट्यांनी दिली धमकी

डॉक्टर निकम यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसुती विभागाच्या गेटजवळ झोपलेल्या कांताबाई कुरे या महिलेला चोरांचा आवाज केल्यास त्यांना जाग आली. मात्र चोरट्यांनी त्यांना 'तुला ठार मारू', अशी धमकी दिली. चोरटे चोरी करून गेल्यानंतर कांताबाई यांनी डॉक्टर निकम यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीने पोलिसांना सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज हाती

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली. हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाल्याने या फुटेजचा आधार घेत लासलगाव पोलिसांनी दोन पथके तयार करून सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी चोरांचा शोध सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नुकसानीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात झालेल्या 'सुखोई-३०' या लढाऊ विमान अपघाताने परिसरातील सुमारे ७.३१ हेक्टर क्षेत्राचे सुमारे १५ कोटी ६५ लाखाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने प्रशासनाला सादर केला होता. परंतु नुकसानीची रक्कम अवास्तव असल्याचे दर्शवित जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला दिले आहेत.

गोरठाण-वावी शिवारात सराव करताना २७ जून रोजी एचएएलचे सुखोई विमान कोसळले होते. या अपघातात संदीप ढोमसे, योगेश ढोमसे, विलास निकम, सुकदेव निफाडे आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अपघात घडला तो मळे परिसर असून तेथे फळबागा होत्या. अपघातानंतर झालेल्या नुकसानीचा पंचनामा करा, असे निदेर्श जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला दिले होते. १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला. विमानाचे अवशेष शेतात विखुरल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यामध्ये म्हटले होते. विमानाचे इंधन मातीमध्ये मिसळल्याने जमीन नापीक होण्याची भितीही शेतकऱ्यांनी वर्तविली होती. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालाचे अवलोकन केले असता तो वस्तुस्थितीला धरून नसल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नोंदविले. त्यामुळे फेरमूल्यांकन करून पुन्हा अहवाल सादर करा, असे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वनियंत्रित अभ्यासाने यश निश्चित

$
0
0

रोहित जोशी यांचा सल्ला

कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. हे यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः नियंत्रण ठेवावे. अकरावी, बारावी हे दोन वर्षे फक्त अभ्यासासाठी झोकून दिल्यास, नक्कीच इच्छित ध्येय साध्य करता येईल, असा सल्ला जोशीज् लर्निंग सेंटरचे संचालक रोहित जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या प्लॅनेट कॅम्पस उपक्रमांतर्गत 'नीट परीक्षेची तयारी कशी करावी' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. मो. स. गोसावी फार्मसी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी ५ वाजता हे सत्र पार पडले. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मेडिकल, फार्मसी क्षेत्राची निवड करायची, असे अनेक विद्यार्थ्यांचे ध्येय असते. मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत प्राविण्य मिळवणे गरजेचे असते. नीट परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

रोहित जोशी म्हणाले, 'नीट'साठी कॉलेज, क्लास तसेच स्व अभ्यास करावा. दिवसातून किमान तीन तास अभ्यास करावा. या तीन तासांचे योग्य नियोजन करावे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीनही विषयांवर समान भर द्या. यासोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

परीक्षेचे असे नियोजन करा :

नीट परीक्षेत एकूण गुणांपैकी ५५० हून अधिक गुण मिळतील हे ध्येय ठेवा. बायोलॉजीमध्ये ३६० पैकी ३००, केमिस्ट्रीमध्ये १८० पैकी १४० तर फिजिक्समध्ये १८० पैकी ११० गुण मिळतीलच असा अभ्यास करा. यासाठी अकरावी व बारावीचे एनसीआरटी आणि महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके वापरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर सायकलवारी ठरणार लक्षवेधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्टच्या वतीने यंदाही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी चारशेहून अधिक सायकलप्रेमींनी नोंदणी केली आहे. आयपीएस अधिकारी हरिश बैजल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सायकल वारीच्या नोंदणीसाठी सोमवार (९ जुलै) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण हे सौर ऊर्जेवरील सायकल रथ राहणार आहे.

'वृक्षारोपण आणि शून्य प्लास्टिक' हा विषय घेऊन आयोजित या सायकल वारीचे हे सातवे वर्षे असून, गोल्फ क्लब येथून सर्व वारकऱ्यांना घेऊन प्रस्थान होणार आहे. सौर ऊर्जेवरील सायकल रथ वारीत अग्रस्थानी असणार आहे. यापुढे दरवर्षी या रथात राहुल फाटे गुरुजींच्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती असणार आहे. वारी दरम्यान रोपे लावून त्यांच्या देखभालीसाठी स्थानिकांना दत्तक देण्यात येणार आहेत. तसेच, उन्हाळ्यात या झाडांची काळजी एससीएफतर्फे घेण्यात येणार आहे. तसेच, मागील वर्षी सायकल रिंगण घालण्याचा यशस्वी प्रयोग यंदाही आणखी मोठ्या स्वरुपात होणार आहे. पंढरपूर जवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात हे सायकल रिंगण घालण्यात येणार आहे. हे सर्व क्षण अनुभवण्यासाठी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलिस्टमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. यंदाच्या वारीसाठी ५०० हून अधिक सायकलिस्ट सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांना आहे. नाशिक, सिन्नर, सायखेडा, निफाड, पिंपळगाव, संगमनेर, अहमदनगर तसेच पुणे, मुंबई सारख्या महानगरातूनही सायकलिस्ट वारीमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, प्रसाद उटेकर हा डोंबिवली येथील दृष्टिहीन तरुण टँडम सायकलवर वारीमध्ये सहभागी होणार असून, डॉ. मनीषा रौंदळ त्याच्यासोबत असणार आहेत. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी ही माहिती दिली. यावेळी मिलिंद अग्निहोत्री, एनसीएफचे सचिव नितीन भोसले, राजेंद्र वानखेडे, शैलेश राजहंस, योगेश शिंदे, रत्नाकर आहेर, आदी सदस्य उपस्थित होते. वारीमध्ये दोन अॅम्ब्युलन्स, ४ डॉक्टर्स आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी सुसज्य असणार आहेत.

पर्यावरणपूरक वारी

धकाधकीच्या जीवनात केवळ तीन दिवसांत पर्यावरणपूरक वारी करण्याची संधी निर्माण झाली आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला, खेळाडू यांची विनाशुल्क नोंदणी करण्यात आली आहे. सायकल अड्डा, रेणुका प्लाझा, जिपिओ रोड, शालिमार येथे नाशिक सायकलिस्टतर्फे वारीसाठी नावनोंदणी अर्ज उपलब्ध आहेत.

वारीचा कार्यक्रम असा

नाशिक - सिन्नर- नांदूरशिंगोटे - तळेगाव दिघी - नानज - कोल्हार - राहुरी - अहमदनगर - रुईछत्तीसी - चापडगाव - माहीजळगाव - करमाळा - टेंभूर्णी - पंढरपूर असा असणार आहे. पहिल्यादिवशी म्हणजेच १३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता सायकल पालखी निघून संध्याकाळपर्यंत अहमदनगर शहरात पोहचणार आहे. नगर शहरात मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी १४ जुलै रोजी टेंभुर्णी येथे मुक्काम करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी १५ जुलै रविवारी सकाळी विठुरायाचे दर्शन घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोरी येथे शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची ५० वी घटना निफाड तालुक्यातील चांदोरी येथे घडली. खंडू मुरलीधर आहेर (वय ७०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी ६ जुलै रोजी विष प्राशन केले होते. या शेतकरी आत्महत्येचा प्राथमिक अहवाल निफाडच्या तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मोहन आनंदा सानप (वय ३७) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे जुलै महिन्यातील ही शेतकरी आत्महत्येची तिसरी घटना ठरली आहे. निफाड तालुक्यात चालू वर्षात आतापर्यंत सहा जणांनी मृत्यूला कवटाळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदार यादी दुरुस्तीला फटका

$
0
0

अंगणवाडी सेविका कमी केल्याने मनुष्यबळ घटले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २७२ अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी केल्याचा फटका जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागालाही बसला आहे. कारवाई झालेल्या बहुतांश अंगणवाडी सेविका बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून काम करीत असल्याने त्यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती करायची याची चिंता निवडणूक विभागाला सतावू लागली आहे. कमी केलेल्या अंगणवाडी सेविका महापालिका सेवेतील असल्याने महापालिकेकडूनच पर्यायी मनुष्यबळ घ्या, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला केली आहे. महापालिका आयुक्त एवढे कर्मचारी उपलब्ध करून देणार का? हे पहाणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच, कामात अनियमितता आढळून येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अंगणवाड्यांमधील विद्यार्थीपट कमी असणे, एकाच विद्यार्थ्याची नावे दोन ठिकाणी असणे यासारखी अनियमितता आढळून आल्याने २७२ अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांबरोबरच अंगणवाडी सेविकांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली या तीन मतदारसंघांमध्येही अशीच परिस्थिती असल्याने बीएलओ म्हणून एवढे मनुष्यबळ आता कोठून उपलब्ध करावे याची चिंता जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाला सतावू लागली आहे. मतदार याद्या दुरुस्तीचे कामे खोळंबू नये याकरिता महापालिकेकडून पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून घ्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

१२९ बीएलओ या अंगणवाडी सेविका

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये २९१ बीएलओंपैकी १२९ बीएलओ या अंगणवाडी सेविका आहेत. मात्र, मुंढे यांनी केलेल्या कारवाईत या मतदारसंघामधील ७६ अंगणवाडी सेविका कमी झाल्या आहेत. त्यामुळे या अंगणवाडी सेविकांकडील दफ्तर जमा करून घेण्याची कार्यवाही निवडणूक शाखेला करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताई व संजीवनीचा स्वागत सोहळा आज

$
0
0

नाशिक : दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत भोसलाच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी ताई बामणे हिने ८०० मीटरमध्ये जिंकलेले सुवर्णपदक, एशियाड खेळांसाठी पात्र ठरलेली संजीवनी जाधव आणि खेलो इंडिया स्पर्धेत १५०० मीटर रौप्यपदक पटकाविणारी संस्थेची विद्यार्थिनी प्रगती मुळाने या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ आज (८ जुलै) सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन या संस्थेतर्फे पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता संस्थेच्या डॉ. मुंजे सभागृहात या यशस्वी विद्यार्थिनींना संस्थेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे.

-

सैनिकी प्रशिक्षण उद्घाटन

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी संस्थेच्या वतीने इयत्ता सातवी आणि आठवीच्या अनिवासी विद्यार्थ्यांच्या रामदंडी सैनिकी प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. देशभरातील सैनिकी विद्यालयांमध्ये या धर्तीवर होणारा हा एकमेक उपक्रम आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज (८ जुलै) संस्थेमध्ये होणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळसा करारात काळंबेरं

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कोळसाटंचाईची ओरड करणाऱ्या राज्यातील महाजनको कंपनीने भुसावळ आणि नाशिक या दोन्ही जुन्या वीजनिर्मिती केंद्रांतील काही कोळसा राज्यातील दोन खासगी वीजनिर्मिती कंपन्यांना देण्याचा करार केला आहे. आधीच या दोन्ही वीजनिर्मिती केंद्रांची स्थिती कोळशाअभावी व्हेंटिलेटरवरील रुग्णासारखी झालेली असताना या वीजनिर्मिती केंद्रांना मिळणाऱ्या कोळशातील काही कोटा खासगी वीजनिर्मिती कंपन्यांना देण्याच्या करारात खासगी वीजनिर्मिती कंपन्यांच्या फायद्यासाठी मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता वीजनिर्मिती क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

महाजनकोकडेच कोळसाटंचाई असताना महाजनकोने राजकीय दबावाखाली खासगी वीजनिर्मिती कंपन्यांच्या फायद्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला असण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील महाजनको कंपनीच्या वीजनिर्मिती केंद्रांना वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून कोळशाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे म्हणणे यापूर्वी महाजनकोने मांडले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. राज्यातील भुसावळ, नाशिक, पारस व परळी या महत्त्वाच्या वीजनिर्मिती केंद्रांवरील कोळशाचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲथॉरिटीच्या निकषांनुसार ही वीजनिर्मिती केंद्रे सुपरक्रिटिकल स्थितीत आली आहेत. त्यामुळे या वीजनिर्मिती केंद्रांवरील वीजनिर्मिती संच कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह देशातील इतर भागातील कोळसा खाणींच्या प्रदेशात झालेल्या पावसामुळे कोळशाच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कोळसाटंचाई आणि वीजनिर्मितीचा वाढलेला खर्च या दोन कारणांनी भुसावळ आणि नाशिक या दोन वीजनिर्मिती केंद्रांच्या कोट्यातील काही कोळसा महाजनको कंपनीने राज्यातील धारिवाल (चंद्रपूर) आणि आयडीएल एनर्जी प्लान्ट, बेला, जि. नागपूर या दोन खासगी क्षेत्रांतील वीजनिर्मिती कंपन्यांना देण्याचा करार नुकताच केला आहे. एकीकडे स्वतःच्या वीजनिर्मिती केंद्रांवर पुरेसा कोळसा नसल्याची ओरड महाजनकोकडून वारंवार केली जात असताना आहे त्या कोळशातील काही कोटा खासगी वीजनिर्मिती कंपन्यांना देण्याचा नऊ महिन्यांसाठीचा करार केल्याने या करारातून मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नाशिक, भुसावळ प्रकल्प रडारवर

राज्यातील महाजनकोचे जुने वीजनिर्मिती केंद्र कंपनीच्या खासगीकरणाला अनुकूल धोरणामुळे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या नाशिक व भुसावळ येथे अवघे दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. याशिवाय नाशिकला वीजनिर्मितीसाठी प्रतियुनिट ३.५८, तर भुसावळला ३.२३ पैसे प्रतियुनिट इतका खर्च येतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्या तुलनेत धारिवाल आणि बेला येथील खासगी वीजनिर्मिती कंपन्यांत अवघा २.७६ पैसे प्रतियुनिट इतकाच खर्च येतो. त्यामुळे वीजग्राहकांच्या हितासाठी कंपनीने आपल्या कोट्यातील काही कोळसा या खासगी कंपन्यांना देण्याचा व त्यांच्याकडून वीज खरेदी करण्याचा करार केला आहे. मात्र, या करारामुळे नाशिक आणि भुसावळ या दोन्ही जुन्या वीजनिर्मिती केंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिक वीजनिर्मिती केंद्रावर सध्या दोन दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे. याशिवाय दररोज सुमारे सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टन कोळसा विदर्भातून उपलब्ध होत आहे. त्यामुळे दररोजची गरज पूर्ण होत आहे. मात्र, विदर्भातील पावसाचे प्रमाण वाढल्यास अडचण निर्माण होऊ शकते.

-उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, वीजनिर्मिती केंद्र, एकलहरे

महाजनकोने आपल्या कोट्यातील काही कोळसा खासगी वीजनिर्मिती कंपन्यांना देण्याचा करार झाला आहे. मात्र, ट्रान्समिशनचा हिशेब कंपनी देत नाही. ट्रान्समिशनचे ऑडिट केल्यास खर्च कमी होऊ शकतो. सरकारनेही जुन्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. ग्राहकांना स्वस्त दरात वीज मिळायलाच हवी.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला अद्यापपावसाची प्रतीक्षाच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई, कोकणासह विदर्भात जोरदार बरसणारा पाऊस नाशिकवर मात्र रुसल्याचे चित्र आहे. जून महिन्यात केवळ नोंदीपुरता सरासरी ओलांडणाऱ्या पावसाची जुलैचा दुसरा आठवडा सुरू होत असतानाही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. नाशिक परिसरात सोमवारी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जूनच्या प्रारंभीच दस्तक दिलेल्या मान्सूनने यंदा नाशिकवर अवकृपा दाखविल्याचे चित्र आहे. केवळ नऊ तालुक्यांमध्येच सरासरीइतका पाऊस जूनमध्ये झाला आहे. त्यामुळे तुरळक प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. मान्सूनचे आगमन होते तेव्हा सर्वसाधारणपणे जोरदार पाऊस होतो. यंदा मात्र नाशिकला जोरदार पाऊस झालेला नाही. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी २,३२४ मिलिमीटर पाऊस होतो. जूनमध्ये जिल्ह्याने सरासरी ओलांडल्याची नोंद आहे. मात्र, निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे. ज्या तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे तेथेही पूर्णपणे पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. केवळ आकडेवारी दिसते आहे म्हणून पाऊस झाला हे खरे असले तरी प्रत्यक्षात पावसाची मोठी प्रतीक्षा नाशिककरांना आहे. जून उलटून जुलै सुरू झाला तरी पावसाने नाशिककडे पाठच फिरवली असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भ, कोकण, मुंबई या भागात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मात्र नाशिककडे पाठ फिरवली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळेच शहरात अवघ्या २.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर दुपारच्या सुमारास चक्क ऊन पडल्याचे पाहायला मिळाले. जळगाव परिसरात रविवारी तर नाशिक परिसरात सोमवारी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

केवळ १५ टक्के पाणी

जिल्ह्यातील ७ मोठ्या आणि १७ लहान अशा एकूण २४ जलसाठ्यांमध्ये केवळ १५ टक्केच पाणी उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात २८७६ दशलक्ष घनफूट म्हणजेच २८ टक्के पाणीसाठा आहे. जुलैअखेरपर्यंत धरणांमधले आरक्षण असून, पावसाची आता मोठी गरज आहे. पावसाने पाठ फिरविल्यास जिल्ह्यात टंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थव्यवस्था देशोधडीला

$
0
0

पी. चिंदबरम यांचा हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाचा विकास आणि भवि‌ष्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नव्हे, तर गुंतवणूक आणि रोजगारावर अवलंबून असते. मात्र, केंद्र सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील गुंतवणूक व रोजगारच बुडाला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थाच देशोधडीला लागल्याची घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. गुंतवणूक, रोजगार, कंझम्पशन आणि सरकारचा खर्च अशी अर्थव्यवस्थेची चार चाके असतात. मात्र, सध्या या अर्थव्यवस्थेची गुंतवणूक, रोजगार आणि कंझम्पशन ही तीन चाके पंक्चर झाली असताना सरकारचा खर्च वाढत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडल्याचा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला. गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचे अर्थचक्रच या सरकारने मोडीत काढल्याची टीका त्यांनी केली.

नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने 'देशाची आर्थिक परिस्थिती : कमी गुंतवणूक रोजगार नाही' या विषयावर पी. चिंदबरम यांच्याशी रविवारी परिसंवाद झाला. त्या वेळी ते बोलत होते.

साडेतीन कोटी बेरोजगार

नोटबंदी आणि जीएसटीने देशाला बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. सद्य:स्थितीत देशात ३ कोटी ६० लाख तरुण हे रोजगाराच्या शोधात आहेत. मात्र, हे सरकार ७० लाख लोकांना दरवर्षी रोजगार दिल्याचा दावा करीत आहे. देशात सध्या नव्या रोजगाराची निर्मिती होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेल गीतांनी वर्षा ऋतुचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली..., रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना अशा गाजलेल्या मराठी गीतांबरोबरच नैनो में बदरा छाये, बिजली सी चमके हाय, मेघा छाये आधी रात बैरन बन गयी निंदीया अशा हिंदी गीतांच्या श्रवणानी रसिकमन तृप्त झाले. निमित्त होते, साहित्य सरिता हिंदी मंचाद्वारा प्रस्तूत हिंदी मराठी वर्षा गीतांच्या कार्यक्रमाचे. राका कॉलनीतील ज्योती कलश येथे शनिवारी हा कार्यक्रम पार पडला.

पावसाळा ऋतूचे सुरेल स्वागत या कार्यक्रमामार्फत करण्यात आले. गायिका आरती भिसे यांनी केलेल्या गाण्यांच्या सुरेल सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. राजीव शहा यांनीदेखील दिल है के मानता नही, गीताचे सादरीकरण करत वाह वा मिळाली. यावेळी आदिवासी विभागाचे निवृत्त आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुधा झालानी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. ज्योती गजभिये होत्या. यावेळी साहित्य सरिता हिंदी मंचाच्या अध्यक्षा डॉ. ज्योती गजभिये, कार्याध्यक्ष भरतसिंह ठाकूर, सचिव शारदा गायकवाड, सहसचिव सुनीता माहेश्वरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींना मृत्यूदंडाची मागणी

$
0
0

राईनपाड्याच्या घटनेच्या निषेधार्थ साक्रीत मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राईनपाडा घटनेतील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घटना पुन्हा होणार नाही, याची सरकारने हमी घेतलीच पाहिजे आदी मागण्या करीत शनिवारी (दि. ७) अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती, जमाती संघटनेच्या वतीने करण्यात आले. साक्रीतील शिवाजी वाचनालय येथून तहसील कचेरीवर हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

या निषेध मोर्चाला भारिप बहुजन महासंघानेदेखील पाठिंबा देत सहभाग घेतला. राईनपाडा (ता. साक्री) येथे १ जुलैला भटक्या जमातीतील नागपंथी डवरी समाजाच्या ५ भिक्षुकांची मुले पळवणारी टोळी असल्याच्या अफवेतून जमावाने निर्घृणपणे ठेचून हत्या केली. या घटनेच्या निषेधात राज्यभरातील नागपंथी तसेच भटक्या विमुक्त जाती संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शनिवारी साक्रीत अखिल भारतीय भटक्या विमुक्त जमाती संघटना यांच्या वतीने या घटनेविरोधात मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात राईनपाडा घटनेतील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, भटक्या विमुक्त समाजाचा पोट भरण्यासाठी भिक्षा मागणे हेच साधन आहे. त्यामुळे सरकारने त्यांना कायमस्वरुपी मान्यता देऊन ओळखपत्र द्यावे, पीडित कुटुंबांना २५ लाख मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, पक्के घर बांधून द्यावे व एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करून सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चात भटक्या समाजाचे अशोक गिरी, गोकुळ जगताप, मनोज गोसावी, सागर गोसावी, राहुल शिंदे, उमेश बाबर, गणेश जगताप, भोलानाथ जोशी, प्रकाश साळवे, किशोर वाघ, पंकज मराठे, गोविंदा सोनवणे, भटू पवार आदी सहभागी झाले होते. भारिपने स्वतंत्र निवेदन देत आपल्या मागण्या मांडल्या. या वेळी कमलाकर मोहिते, संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीला खडसेंचेच आव्हान?

$
0
0

महापालिकेसाठीच्या युतीवर सावट; पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

pravin.chaudhari@timesgroup.com

महापालिका निवडणुकीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते सुरेश जैन यांनी युतीची घोषणा केली. मात्र, दोन्ही पक्षांकडून जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच भाजपचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी युतीला जाहीर विरोध केला आहे. तसेच प्रसंगी इच्छुक समर्थकांसह आघाडीचे आव्हान उभे करण्याची खेळी चालविल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. आज (दि. ८) जळगावात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन दोघेही येत असल्याने युतीबाबतचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जळगाव महापालिकेची निवडणुकसाठी दि. १ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. यासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, ४ जुलैपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते माजी आमदार सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन भाजप-शिवसेना युतीची घोषणा केली होती. या वेळी दोन्ही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन युतीसाठी हिरवा कंदीला मिळवला तरी दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मात्र १९ प्रभागातील संपूर्ण ७५ जागांसाठी घेण्यात येत आहेत. त्यामुळे अद्याप युती आहे की नाही, यावर नक्की होत नाही असेच दिसते. युतीच्या घोषणेनंतर जागावाटपाची बैठक लवकरच घेण्याचेदेखील या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र, या बैठकीलाही अद्याप मुहूर्त गवसला नसल्याने शिवसेना व भाजपमधील आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहे.

खडसेंची जाहीर नाराजी
महापालिका निवडणूक जाहीर होताच माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी युतीला विरोध जाहीर केला होता. गेल्या निवडणुकीच्या प्रचारात खडसे यांनीच सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे जैनांसोबतची युती मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पक्षातील मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करीत जैन यांची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट करून देत युतीसाठी मान्यता मिळवली. यामुळे खडसे यांनी या युतीच्या व्यासपीठावर बसून प्रचार करण्यास नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर प्रसंगी समर्थकांना घेऊन महापालिका निवडणुकीच आघाडी देऊन आव्हान उभे करण्याची खेळी चालविली आहे.

भाजप-खाविआत जागांसाठी रस्सीखेच
भाजपचे महानगराध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांनी भाजपला ७५ पैकी कमीत कमी ४० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दुसरीकडे सुरेश जैन यांचे बंधू व जैनांच्या खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनी आमचे ४७ विद्यमान नगरसेवक असल्याने जागेच्या मागणीसाठी हा बेस असेल असे स्पष्ट केले आहे. योग्य सन्मान राखतील तरच युती करावी, अशी सेना व खाविआच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचे म्हणत त्यांनीही योग्य न मिळल्यास युतीची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत.

जागावाटपाअभावी इच्छुक संभ्रमात
महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांनी युतीची घोषणा केली असली तरी अद्याप जागावाटाबाबत प्राथमिक चर्चा न झाल्याने दोन्ही पक्षांमधील इच्छुक संभ्रमात पडले आहेत. दि. ४ जुलैपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तर दि. ११ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे. अद्याप युतीचे जागा वाटप होत नसल्याने इच्छुकाचीदेखील गोची झाली आहे.

पालकमंत्री आज जळगावात
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज (दि. ८) जळगावात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यानच्या त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजनदेखील जळगावात उपस्थित राहणार असल्याने युती व जागावाटपाचा अंतिम फैसला त्यांच्या उपस्थितीत होऊन अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपतील रस्सीखेच, आमदार खडसे यांची टोकाची भूमिका व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री काय घोषणा करतात याकडे पदाधिकारी व इच्छुकांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाच्या कामास अखेर प्रारंभ

$
0
0

पिंपळगाव-चिंचखेड चौफुलीचा प्रश्न मार्गी लागणार

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव शहरातील चिंचखेड चौफुलीवरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामास ३१ जुलै रोजी प्रारंभ झाला.

पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड चौफुली अपघातांसाठी कृप्रसिद्ध स्पॉट व परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने मंजूर असलेल्या बहु प्रतिक्षीत उड्डाणपुलाच्या कामास सुरवात झाल्याने वाहतूक कोंडीपासून वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

चिंचखेड चौफुली परिसरात १८ मीटरचे तीन बोगदे असलेला उड्डाणपूल व उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड अशी रचना असलेला उड्डाणपूल प्रत्यक्षात पूर्ण उभारण्यात येणार आहेत. रोजच होणारी वाहतूक कोंडी पाहता या चौफुलीवर उड्डाणपूल होणे गरजेचे होते. मात्र यासाठी वाहनधारकांसह पिंपळगावकरांना किमान दोन ते अडीच वर्ष वाट पहावी लागणार यात काही शंकाच नाही.

आशिया खंडातील क्रमांक एकची व्यापारी व शेती बाजारपेठ असा नावलौकिक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरात मोठ्या प्रताणात उलाढाल होते. साहजिकच शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सतत वाहनांची गर्दी असते. चिंचखेड चौफुलीवर अपघात व वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाल्याने उड्डाणपुलामुळे जोपुळ रोड, पिंपळगाव बाजार समितीकडे जाणारी वाहने बोगद्यांतून मार्गक्रमण करणार आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलावरून सरळ जाणार असल्याने परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटणार आहे

राष्ट्रीय महामार्गा साकारताना चिंचखेड चौफुली परिसरात उड्डाणपुलाची गरज असतानाही कोणतीही व्यवस्था नव्हती, या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारने पिंपळगाव चौफुली परिसरात उड्डाणपूल मंजूर केला. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय दळणवळण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याच उड्डाणपुलाचे भूमीपूजनही झाले. त्यानंतर उड्डाणपुलाच्या कामास अखेर मुहूर्त लागल्याने कामास जोरदार सुरवात झाली आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षे लागणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चिंचखेड चौफुलीवरील मंजूर झालेल्या उड्डाणपुलाचे कामे सुरू करण्याबाबत वारंवार पाठपुरवठा केला होता. शासनाने याची दखल घेतल्याने या पुलाच्या कामास अखेर सुरवात झाली आहे.--बापूसाहेब पाटील, जिल्हा संघटक भाजप

..............

पिंपळगाव शहरातील चिंचखेड चौफुलीवरील बाजार समितीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या उड्डाणपुलाच्या कामास अखेर प्रारंभ झाल्याने वाहन धारकांना वाहतूक कोंडीपासून सुटका होऊन मोठा दिलासा लाभेल.--

दीपक शिंदे, मनसे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार्टअप मंत्रवर आज मार्गदर्शन

$
0
0

स्टार्टअप मंत्रवर आज मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुमागो इन्फोटेकच्या वतीने आज (८ जुलै) 'स्टार्टअप मंत्र २०१८' या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या तरुणाईला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास संकुल, जुना गंगापूर नाका या ठिकाणी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान हा कार्यक्रम होणार आहे.

त्यात स्टार्ट अप मार्गदर्शक गिरीश पगारे, सिलिकॉन व्हॅली संस्थेचे संचालक प्रमोद गायकवाड, उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक हे स्टार्टअपमधील संधी, स्टार्टअपचा प्रवास, स्टार्टअपदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्टार्टअपसाठी उपलब्ध सरकारी योजनांची माहिती देतील. याशिवाय के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एस. साने, गुरूगोविंद सिंग पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. पी. एस. दुग्गल, संदीप फाउंडेशन संचलित इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. अमोल पोटगंटवार हे विद्यार्थ्यांना स्टार्टअप प्रोत्साहन मिळण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरला मोकाट कुत्र्यांचा दोन बालिकांना चावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूरमधील तेली गल्ली येथील संताजी मंगल कार्यालय परिसरात मोकाट कुत्र्यांनी दोन लहान बालिकांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली. कुत्र्यांनी बालिकांवर हल्ला केल्या लक्षात येताच नागरिकांनी तातडीने धाव घेत बालिकांची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तेली गल्लीत राहणाऱ्या तीनवर्षीय अलिना रियाज शेख आणि चारवर्षीय तुलसी दुर्गश मेहेरे या बालिकांचे आई-वडील सकाळी मोलमजुरीस गेल्यानंतर त्या आपल्या घरासमोर खेळत असताना समोरून आलेल्या मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून दोघींनाही चावा घेतला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या बालिकांना कुत्र्यांच्या तावडीतून सोडविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यात दोन्ही बालिकांच्या कानाला, डोक्याला व डोळ्याच्या बाजूला जखमा झाल्या आहेत. या प्रकारामुळे भगूरवासीयांनी संताप व्यक्त करीत भगूर नगरपालिकेने परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कुत्री मारणे अथवा पकडणे दोन्हींवरही बंदी असल्याने अशा घटना भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त होत असून, याप्रश्नी तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांचा दणका

$
0
0

पेगलवाडीत वाहन तपासणी; दहा जणांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पावसाळी सुरू झाला की हौशी पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी अक्षरश: धडपड करतात. पार्टी करण्यासाठी तर आठवडाभर नियोजन करून सारेच दैनंदिन आयुष्यातील शीन घालविण्यासाठी पर्यटनाच्या नावाखाली अक्षरश: हुल्लडबाजी करतात. त्र्यंबक परिसरात प्रत्येक पावसाळ्यात अशा हुल्लडबाज पर्यटकांमुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे अशा पर्यटकांना प्रतिबंध घालण्यासाठी त्र्यंबक पोलिसांनी शनिवारी धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उप अधीक्षक शामराव वाळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबक पोलिसांनी खास नाकाबंदी केल्याने मद्यपी या परिसरातून माघारी फिरले.

त्र्यंबक परिसरात पहिणे घाटात दरवर्षी पावसाळ्यात तरुणांकडून वेगात दुचाकी, चारचाकी चालविणे, मद्यप्राशन करून या परिसरात धिंगाणा घालणे, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास देणे असे प्रकार होत असतात. याबाबत अनेकदा तक्रार करूनही अशा हुल्लडबाजांवर कठोर झाल्याचे आठवत नाही. मात्र यंदा पोलिसांनी सुरुवातीपासून खबरदारी घेत अशा हौशी पर्यटकांवर नजर ठेवली आहे. शनिवारी त्र्यंबक पोलिसांनी पहिणे घाट परिसरात वाहनांची तपासणी केली. पोलिसांना पाहताच अनेक तरुणांना बाईकवरच धूम ठोकली. पेगलवाडी फाटा येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. काही वाहनांमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्या तेथेच ओतून देण्यात आल्या. मोटार वाहन कायद्याप्रमाणे १० वाहन चालकावर करवाई करण्यात आली.

निसर्गाचा आनंद घ्या

पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक कैलास अकुले, मेहेर, घुगे, खैरे आदींसह कर्मचाऱ्यांनी जागोजाग तपासणी सत्र राबविले. निसर्ग सहलीचा आनंद घ्या. मात्र मद्य पिणे कुटुंबासह सहलीला आलेल्यांना त्रास देणे. रस्त्यावर धिंगाणा घालणे, असे प्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्र्यंबक पोलिसांनी दिला आहे. सहलीला आलेल्यांनी निसर्गाचा आनंद घ्यावा. सेल्फी काढतांना काळजी घ्यावी. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने जलशयाच्या जवळ जाऊ नये. डोंगरकडे निसरडे झाले असून, अशा ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images